Mall Premyuddh - 73 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 73

Featured Books
  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

  • સંઘર્ષ જિંદગીનો

                સંઘર્ષ જિંદગીનો        પાત્ર અજય, અમિત, અર્ચના,...

  • સોલમેટસ - 3

    આરવ રુશીના હાથમાં અદિતિની ડાયરી જુએ છે અને એને એની અદિતિ સાથ...

  • તલાશ 3 - ભાગ 21

     ડિસ્ક્લેમર: આ એક કાલ્પનિક વાર્તા છે. તથા તમામ પાત્રો અને તે...

Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 73

मल्ल प्रेमयुद्ध







गाव- क्रांतीचे घर




रत्नाचे वडील- आई, ऋषीचे आई- वडील, दादा, आशा, संतोष ऋषी सगळे बसले होते. सगळेजण बैठकीला बसले होते.

"तुम्हाला इथे बोलवायच कारण तुमास्नी मी कळवलं हाय... मला वाटत माझ्या दोन्ही पोरांची लग्न लवकर व्हायला पाहिजे. यात मला कोणतच विघ्न नको..."

"दादा चुकीच समजू नका पण एक मुलीच्या बाबतीत अस झालं म्हणून तुम्ही घाई करताय का? ऋषीचे अजून शिक्षण होतंय आणि चिनूचे सुद्धा...आपण रत्ना आणि संतोषच्या लग्नात त्यांचा साखरपुडा करू..." ऋषीची आई म्हणाली.

"ताई तुमचं म्हणणं बरोबर हाय पण आता आमचा आमच्यावर इश्वास न्हाय तर कोणावर सुदा न्हाय... म्हणून अमास्नी वाटत की लग्न व्हावं.." आशा डोळ्यातले पाणी टिपत होती.

"बरोबर हाय ताईंचं आपण दोन्ही लग्न एकत्र करायला पाहिजे." रत्नाच्या वडिलांनी आशा आणि दादांना दुजोरा दिला.

"आम्ही तयार आहोत..." ऋषीचे बाबा
"ठीक हाय मग.... तुम्हाला ज्या अपेक्षा हायत त्या सांगा.."
"अहो पण मुलांना काय वाटतं..."
"आई बाबा मला काही प्रोब्लेम नाही आपण चिनूला पिढी शिकवूया.." ऋषी
"दादा आमची काहीएक अपेक्षा नाही फक्त लग्न करून दया..."
"दोन्ही लग्न एकत्र हायत तर तर लग्न करून देण्याची जबाबदारी माझी सुदा हाय ... माझ्या पोरीचं लग्न मग माझी इच्छा हाय माह्या दारात व्हावं अन चिनुच लग्न इथं व्हावं मग कस करायचं...? मला वाटत रत्ना काय अन चिनू के मला दोन्ही पोरीचं तर माझ्या दारात दोघींची लग्न व्हत्याल ... सगळं खर्च मी करीन..."
"न्हाय व... लग्न तुमच्या दारात करू माझी काय हरकत नाय फकस्त खर्च वाटून घेऊ..."
"अहो लग्नच खर्च सगळे मिळून करू... चारही लेकरं आपलीच आहेत... जो काय खर्च आहे तो किळून करू काय..." ऋषीच्या बाबांचं मोठं मन बघून दादा अन रत्नाच्या बाबाचं मन भरून आले. ब्राम्हण काका आले अन जवळच मुहूर्त काढून लग्नाची तारीख काढली. सगळे खुश होते. आशाने जेवणाची पाने वाढली. सगळेजण हसून खेळत जेवत होते. दादांच्या मनावरचा फार मोठा फार कमी झाल्याचा आनंद चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. ऋषीच्या बाबांनी दादांच्या खांद्यावर हात ठेवला. दादांना जाणीव झाली सगळेच आबासारखे नसतात.

जरा वेळाने आबा आले. दादा आणि आशाने हसून त्यांचे स्वागत केले पण वरवरचे...
"मी बोलावलं होतं दादाला... पण उशीर झाला दादा लग्नाची तारीख ठरली." आबांनी सगळ्यांचे अभिनंदन केले.
"दादा मला वाटत परत हे म्हणणं योग्य न्हाय पण एकदा इश्वास ठेवा आमच्यावर परत एकदा..."
आबांनी डोक्यावरचा फेटा काढून दादाच्या पायावर ठेवला.

"आबा एवढं मोठं नका करू अमास्नी... विश्वास ठेवावा की नाय हा नंतरचा प्रश्न हाय.. आता माझ्या लेकीला काय वाटत हे महत्त्वाचं हाय... तिच्या शब्दाबाहेर आता आमची जायची हिम्मत नाय..."

"मी सूनबाईबर बोलतो, समजवायचा प्रयत्न करतो..."
सगळे स्तब्ध उभे ऐकत होते. आबांची घालमेल एक बाप म्हणून सगळ्यांना दिसत होती. पण तो बाप होता ज्याने आपल्या लेकीला गपचूप रडताना बघितले होते. किती किती वेळ ती एकटी बसायची. रात्र रात्र जागून काढायची. त्रास बघितला होता. तिला परत त्यांना रडताना बघायचं नव्हतं. त8चा आयुष्य तिला जगू द्यायचे होत.

"आबा नका ईचारु तिला ... तिच्यावर आता कोणतीच जबरदस्ती नको व्हायला... कृपा करा आबासाहेब आता माझ्या लेकीचं आयुष्य परत उध्वस्त वाहताना आमाला न्हाय बघवणार... नका ईचारु तिला..." दादांच्या डोळ्यातले अश्रू बघून सगळे हळवे झाले होते.

" एवढं प्रेम व्हत तर तुमच्या लेकच्या डोक्यात ही सूडबुद्धी कशी का अली आबासाहेब... आणि त्याला तुम्ही साथ दिली."आशाला केंव्हाचा हा प्रश्न विचारायचा होता.
"आशा नको त्या जुन्या गोष्टी काढू.. आनंदाची येळ हाय आबासाहेबांना जेवायला वाढ."
आबासाहेब काहीही न बोलता जेवले आणि सगळ्यांनी निरोप घेतला.


रत्नाला फोन करून संतुने लग्न ठरल्याचे सांगितले. रत्नाने आनंदाने क्रांतीला मिठी मारली.

"क्रांते लै दिवस ह्या दिवसाची वाट बघत होते.. शेवटी ठरलं..."
"आता मला वन्स म्हणणार की क्रांते म्हणणार... अस म्हणाली ना तर माझ्या भावाला सांगून भांडण लावीन हा तुमच्यात..."
रत्ना अन क्रांती पुन्हा आनंदाने हसायला लागल्या. क्रांतीने पुन्हा रत्नाला मिठीत घेतले. दोघींच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू आले.

"क्रांते मी खुश हाय पण तुझ्या आयुष्यात आनंद असायला पाहिजे ग..."
"रत्ना वेडाबाई आता तू तुमचा इचार कर... माझा इचार करायला बाकी हायती... आणि मी माझी खंबीर हाय.."
"व्हय... पण..."
"आता पण न्हाय अन बिन न्हाय... आता स्वप्न बघा लै थोडं दिस रहायल्यात..."
रत्नाने तिला प्रेमाने जवळ घेतले.


***********************************


रत्ना पटकन आवरून तयार झाली होती.
"बर तू अजून तयार न्हाय झालीस आपल्याला जायचंय ना... मॅच बघायला... आपली गॅंग पोहचली कोर्ट मध्ये..."
"तू जा रत्ना मला वाटलं तर येते मी..."
"मी एकटी रिक्षाने जाणार तुला वाटलं तर परत तू रिक्षाने येणार डबल खर्च त्यापेक्षा चल.."

"रत्ना ज तू आतातरी माझा मूड न्हाय..."
"वीर वाट बघत असलं क्रांते..."
"जिंकतील ते बघ.."
"एवढं वाटतंय तर चल ते कस जिंकतायत ते बघायला."
"न्हाय तू जा मी येते जरा वेळानी..."
"ठीक हाय..."
रतन जास्त काहीही न बोलता निघून गेली.
क्रांती शांत विचार करत बसली.


वीरला तिच्यासाठी जिंकायचे होते. त्याला मनातून वाटत होते क्रांती नक्की येणार... कोर्टवर तयारी सुरू झाली. अनौनसमेंट झाली. भूषण, स्वप्ना, ऋषी, चिनू, संग्राम सगळे वीरला चीअरअप करत होते. वीर खेळत होता पण त्याच लक्ष मात्र कोणाच्यातरी वाटेकडे लागले होते.
"वीर धर... पकड... सोडू नकोस..." वीर जिंकत होता. सगळेजण ओरडत होते.


"मला ते हरलेले नाय आवडणार... पण माझा न त्यांचा संबंध काय आवडण अन न आवडण ह्या गोष्टी लांब जाऊन पडल्या.
आता त्याचा काय उपयोग..? आता त्यांच्या आयुष्यात मी नाय अन माझ्या आयुष्यात ते न्हाईत... मी फक्त आणि माझा खेळ बस..." हा विचार करत असताना क्रांती एक बाजूला वीरने घेतलेला ड्रेस घालत होती. वीरने घेतलेले कानातले घातले. त्याने घेतलेले छोटे मंगळसूत्र घातले. कोणती गोष्ट होती जी तिच्यापासून लांब जात नव्हती. तो मोह होता जो तिला त्याच्याकडे जाण्यापासून अडवत नव्हता.


अश्या माणसाकडे तू का जातीयेस ज्याने तुला प्रेम या शब्दाचा खरा अर्थ दाखवला. ज्याने विश्वासघात केला त्याच माणूस जिंकाव हा अट्टाहास का...? कोणता पुरुष आपल्या बायकोला लग्नाच्या दुसऱ्या दिवशी असा वाऱ्यावर सोडून जातो. तिचा विचार न करता तिच्या प्रेमाचा विचार न करता... तिच्या आजूबाजूला असणाऱ्या माणसांना काय वाटेल याचा जराही विचार न करता तुला सहज सोडून जातो त्याचा विचार का करावा...? त्याची ओढ का लागावी...? तू परत त्या क्रूर माणसाच्या प्रेमात पडतीये का...? परत विश्वासघात करून घ्यायची कसली एवढी हौस...?

तरीही क्रांतीची पावलं आपोआप त्या रस्त्याने चालली होती.


वीर अजून वाट बघत होता. त्याचे डोळे मेन डोअरला लागले होते त्याला रत्ना दिसली. रत्नाने डोळ्यानेच त्याला नाही म्हटले. आणि वीर भांभावला. वीर अपोझिट कडून खाली आपटला गेला. वीर मर खात होता. तोंडावर... छातीवर... पोटात...
त्याच्या कानात एकाच वाक्य होत...
"वीर तुम्ही जिंकणार आहात... काहीही करून तुम्हाला जिंकायला हवं...." वीरला नसलेली क्रांती त्याच्या समोर दिलेत होती आणि त्याला
" उठा वीर उठा..." म्हणत होती...
कसलं प्रेम हे त्याला ठाऊक होतं क्रांती नाही इथे तरी त्याला भास होत होता. तो प्रयत्न करून सुटला...आणि...आणि.... वीर फायनल जिंकला..
एकच जल्लोष...
एकाच नारा...
वीर... वीर... वीर...
वीरचा हात उंच हवेत उचलला गेला. पण तरीही वीर नाराज होता त्याची नजर क्रांतीला शोधत होती.
संतुला त्याने पाहिले. फोनवर बोलताना त्याचा चेहरा बदलाला.
एकेक करून सगळे बाहेर पडत होते त्याला काहीही कळायला मार्ग नव्हता. त्याने त्याचा हात हंपायरच्या हातातून सोडवला. बाथरोब अंगावर चढवला आणि त्यांच्या दिशेने धावला.



"काय झालं..." त्याने ऋषीला अडवले.
"वीर अरे क्रांतीचा इकडे येताना एकसिडेंट झालाय... अन ती..."
"कुठल्या हॉस्पिटलमध्ये...?"
"जहागीरदार..."
वीर घाबरला त्याला घाम आला. आणि तो काहीही विचार न तो तसाच अनवाणी पायाने पळत सुटला....
तसाच....
बिचारा...



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत...