Mall Premyuddh - 69 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 69

Featured Books
Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 69




मल्ल प्रेमयुद्ध




क्रांती पटकन दरवाजामागे लपली.

चिनू तिच्या मागून आली.

काय झालं तायडे ? चिनुने विचारले.

क्रांतीने हातानेच गप्प बस असे खुणावले आणि तिला बाजूला नेले.

"आता ह्यांच्या मनात नक्की काय आहे माहित नाही."

"पण झालं काय ते तर सांग ?"

"त्यांचे नॅशनल साठी सिलेक्शन झाले आहे. लै मोठी संधी हें अन हे नाय म्हणत्यात."

"मग आग तू का इचार कर्टिस हा त्यांचं निर्णय हाय ..."

"जाऊबाई मला सांगत होत्या की, माझ्याशी ते जे काय वागले ते ह्या कुस्तीच्या अहंकारामुळं वागले त्यामुळे मी त्यांच्यापासून दुरावली आणि म्हणूनच आता प्रायश्चित्त म्हणून हे आयुष्यात कधीच कुस्ती खेळणार नाय."

"तायडे तू विचार का करतेस तुझा आता क्जकाय संबंध?"

"ते पण खर हाय म्हणा ... चाल निघू आपण " दोघीही तिथून निघाल्या लग्नाचा विधी व्यवस्थित पार पडला होता. जेवण उरकली होती . एव्हाना वीर नॅशनलला खेळणार नाही हि बातमी सगळीकडफे झाली होती. सगळे बारीक चेहरे करून बसले होते.

“आत्याबाई येते.” क्रांतीने सुलोचनाबाईंना नमस्कार केला. “व्हय बे ये… चार दिस व्हतीस तर बर वाटल. आता पार्ट कधी येशील?”

“आत्या तुम्ही बोलावं कधीपण मी धावत यिन.” सुलोचनाबाई नाराज व्हत्या पण त्या क्रांतीला दाखवत नव्हत्या. क्रांती भूषण आणि स्वप्नाचा निरोप घ्यायला गेली. “भाऊजी स्वप्ना येते. नीट राहा मी उद्याच मुबईला निघाली त्यामुळं पूजेला काय येत येणार न्हाय. पण परत नक्की भेटायला यीन. “


भूषणला कय बोलावं समाजात नव्हते एकीकडे त्याचा संसारी थाटला जात होता आणि दुसरीकडे मित्राचा संसार मोडत होता. क्रांतीला बोलावं क? म्हणुन तो दाह वेळा तरी म्हणत शब्दांची बांधणी करत होता. पण त्याला जमलं नाय.

इकडे दादा आणी अशा स्वप्नाच्या आई वडिलांच्या निरोप घेत होते. “संतू आणि रत्ना ह्यांच्या कानात ह्या दोघांचा साखरपुडा उरकून घेऊ.” स्वप्नाचे बाबा म्हणाले. चिनुने दोघांनाही नमस्कार केला. तिथे सुलोचनाबाई आणि आबा आले.

“माफ करा दादा आम्हाला आयुष्यात जी चूक करायला नको व्हती ती आमी केली.” अंबानी दादांसमोर हात जोडले.

“आबासाहेब जे त्या दोघांच्या नशिबात व्हतं ते झालं आता आपण काय करू शकतो ?”

“मनात आणलं तर… ?”

“आबा आमची पोरगी बाहुली न्हाय… तुमि म्हणाल तवा काडीमोड ग्यायचा तुम्ही म्हणलं तवा तुमची सून म्हणून तुमच्या घरी आणायचा. तुमचा अपमान करायचा नव्हता म्हणून आतापर्यंत काय बोललो न्हाय पण माझ्या पोरिलापण मन हाय तिचे इचार हायत आता तिचा निर्णय ती घेणार अमी नाय… “ दादांना राग अनावर झाला होता. चिनू आणि क्रांती मागे येऊन उभ्या राहिल्या होत्या.

“आबा माफ करा दादा असं कोणाला तोडून बोलत न्हाईत पण त्यांच्या पोरींवर आलं मात्र त्यांना कुणबी थांबवू शकत न्हाय.”

“पोरी आबांना त्यांच्या चुच जंव झालं म्हणून ते भावनेच्या भरात म्हणले त्यांच्या कडन मी हात जोडून माफी मागते.” सुलोचनाबाईंनी हात जोडले.

पोरी ते जरी म्हणले तरी आमच्या स्वार्थासाठी मी तुझा वापर होऊन देणार न्हाय.” क्रांतीने सुलोचनाबाईंना नमस्कार केला सगळे निघणार तोच भूषणने आवाज दिला.

“वैनी…” क्रांतीने मागे पाहिले.


भूषण तिच्या जवळ आला.

"वैनी माझ्यासाठी आज एक मागितलं तर द्याल?"

"भाऊजी अचानक काय झालं?"


"वैनी मी सांगणार नव्हतो पण राहवना म्हणून सांगतोय… वीरची राज्यस्तरीय खेळत निवड झाली हाय पण कसली स्वतःला शपथ दिली म्हणून खेळायचं न्हाय म्हणतोय. वैनी तो कुणाचंच एकना तुम्ही एकदा सांगाल का?"

क्रांतीने दादांकड बघितलं.

"दादा???"

"कुणाच्या भविष्यात चांगलं व्हणार असलं अन जर तिथं तुझी गरज वाटत असलं तर तू जा… फकस्त मनानं आता अडकून असू नकस. आम्ही भायर हाय तू य…"


क्रांती वाड्याच्या दिशेने गेली. रूमच्या दिशेने जाताना तिचा वाड्यातला लग्नानंतर चा पहिला दिवस आठवला. वाड्यात पूजे दिवशीचा गोंधळ आणि सगळ्यात महत्त्वाच आमची पहिली रात्र… क्रांतीला भरून आलं विचार करताना ती कधी रूममध्ये आली हे तीच तिलाच समजले नाही.


वीरला तिच्या येण्याची चाहूल लागली.

"माफी करा चुकून न विचाराता आत आली."

"तुम्ही इथं.."

"मला खरं तर अजिबात हौस नव्हती इथं यायची पण तुमचा नेहमीच हट्टीपणा कानावर आला न आले इथं…"

"काय झालं?"

"मला काय विचारता स्वतःला विचारा…"

"तुमी मला हे सांगायला आला असाल की स्पर्धेत उतारा तर ते शक्य न्हाय कारण मी कुस्ती सोडली."

"का…?"

"ह्या कुस्तीपायी माझ्या आयुष्यात चांगली लोक माझ्यापसन लांब गेल्यात म्हणून.."

"कुस्तीपायी न्हाई स्वतःच्या मर्जीच्या विचारांमुळं… कुस्तीला का दोष देताय आणि मला आता कोणताही वेगळ्या गोष्टीत शिरायचं न्हाय, तुम्ही ही स्पर्धा खेळायची अन जिंकायची."

"न्हाय…"


“तुमाला जर वाटत असलं कि तुम्हाला असलं तुम्ही तुमचा राग खेळावर काढाल आणि पुन्हा मी तुमच्या जवळ यिन… पण अस व्हणार नाय कारण तुम्ही माझ्या मनाचा इचार केला नाही कधीच.. मी किती प्रेम केलं तुमच्यावर हे मला आत्ता सांगायचं न्हाय, मी त्याच्यासाठी अली न्हाय अली असती तर आधीच डिओर्स व्हायच्या आधी अली असती. आता मला त्याची गरज वाटत नाय कारण मला वाटत तुमचं पहिलं प्रेम कुस्तीवर हाय आणि पहिलं प्रेम मनातन कधीच जात नाय अन म्हणूनच सांगावस वाटतय की, तुमचं कुस्तीवर प्रेम हाय आणि तुम्ही ते सोडावं का हे आधी रकड मनाला ऊचारहन बघा अन मग निर्णय घ्या."

"माझा निर्णय झालाय."

"तर तुमाला अस वाटतय का की जर तुम्ही कुस्ती सोडली तर तुमच्या आयुष्यात मी परत यिन. तर तो तुमचा गैरसमज झालाय. अस कधीच व्हणार न्हाय कारण माझ्या मनातून एक प्रियकर किंवा नवरा ही भावनाच पुसून गेली. याला कारण तुम्ही असाल पण माझं मन उडालय त्यातन… मला वाटतय की तुम्ही तुमच्यासाठी एकट्याचा इचार करून निर्णय घेऊ नका तुमच्यापेक्षा इतरांना काय वाटतय तुमच्याबद्दल याचा आता विचार करा, स्वतःचा इचार करण बंद करा आता."

वीरच्या तिच्याकडे बघायची हिम्मत होत नव्हती तो तिच्याकडे पाठ करून खिडकीतून बाहेर बघत होता. कां मात्र तिच्या बोलण्याकडे होते. धडधाकट माणसाला तीच बोलणं काट्यांसारखं टोचत होत.

"माझी शपथ हाय तुमाला.."

"एका अटीवर… "

"तिथं तुम्ही पाहिजे.."

"जबरदस्ती झाली मंजी…"

"न्हाय माझी इच्छा हाय…"

"आधी माझ्यासमोर साठेसरांना फोन करा."

वीरने निमूटपणे फोन काढला आणि साठेसरांना होकार सांगितलं.

बाहेर सगळेजण त्यांचं बोलणं चोरून ऐकत होते. वीरचा होकार ऐकल्यावर जवळजवळ जोरात गोंधळ सुरू झाला. क्रांती अन वीर बाहेर आले. ह्यांचा गोंधळ बघून क्रांती बाहेर पडली.

वीर मात्र उद्या जायची तयारी करत होता.


क्रांती बाहेर आली आणि भूषण तिच्या जवळ आला.

"वैनी मला माहिती व्हत हा तुमच्याशिवाय कुणाचंच ऐकणार न्हाय."

"भाऊजी ते खेळायला तयार झालेत पण मी परत त्यांच्याकड इन हा त्यांच्या मनातला गैरसमज प्लिज खोडून काढा करण आता हे शक्य न्हाय."

"वैनी मला तुमच्या भावना समजात्यात तुमी लई दुखावल्या हाय… म बोलून घेईन वीर बरोबर."

क्रांतीला बघून सुलोचनाबाई रडायला लागल्या. तिने त्यांना समजावून सांगितले.

तेजश्री ला काळजी घ्याल लावली.

संग्रामला बाबा या शब्दाची जाणीव करून दिली.

आबांना पुन्हा नमस्कार केला

स्वप्नाला पुन्हा मिठीत कवटाळले आणि...

क्रांतीने सगळ्यांचा निरोप घेतला


क्रमशः

भाग्यशाली अनुप राऊत.