Mall Premyuddh - 68 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 68

Featured Books
Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 68

मल्ल प्रेमयुद्ध



लग्नाचा मुहूर्त जवळ येत होता तसतसे स्वप्नाची हुरहूर वाढत होती. स्वप्नाने हिरव्या कठाची लालबुंद कलरची नववारी साडी नेसली होती.स्वप्ना सुंदर दिसत होती. निर्या सावरत आलेली क्रांती तिच्याकडे बघतच राहिली.

"स्वप्ना किती सुंदर दिसतेस! हा नक्की नटल्याचा परिणाम हाय की कोणासाठी तरी आवरल्याचा परिणाम हाय." स्वप्ना आ करून क्रांतीकडे बघत बसली.
" क्रांति माझ्यापेक्षा तू किती गोड दिसतेस ते बघ आधी... नारंगी कलर )च्या साडीत तुझा चेहरा तुझा रूप अजूनच खुलून दिसतंय. एक विचारू?"
"विचारणा.."
क्रांतीने स्वप्नाचा पदर नीट करत म्हटले.
" मंगळसूत्र नाही काढलस?" क्रांतीच्या डोळ्यात पाणी आलं. स्वप्ना म्हणाली, "अग तू रडावं यासाठी नाही विचारलं मी पण..."
" समजलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते... काय ना हे ठीक हाय माझा घटस्फोट झाला. सगळं झालं पण लग्न झालंय हे तितकच खर हाय ना... मला एक माहित नाय का? पण घालावसं वाटतं म्हणून घालते. कारण असं कायच नाय पण मला घालावसं वाटतं. गावातले लोकसुद्धा विचारतात घटस्फोट झाला म्हणजी काय? या सगळ्यांना उत्तर देण्यापेक्षा गळ्यात मंगळसूत्र असल्यावर कोणी विचारत नाय. हे दुसरं कारण." क्रांती उगाचच तिच्या निऱ्या नीट करत बोलत होती.
" क्रांती तुला दुखवायचं हेतून होता ग, माझा पण तुम्ही थोडं थांबायला पाहिजे होतं."
" ते शक्य नव्हतं आणि आता सुद्धा नाय." तेवढ्यात दारातून हसत चिनू आणि रत्ना आतमध्ये येत होत्या. दोघी सुद्धा सुंदर दिसत होत्या.
" चला ब्राह्मण काकांनी बोलावलय." आबा स्वप्नाला न्यायला आले. क्रांतीच्या डोळ्यातलं पाणी आबांनी बघितल. हीच वेळ योग्य हाय असं म्हणत आबांनी तिच्या क्रांतीसमोर हात जोडले. "बाय आमाला माफ करा. आमी आत्तापर्यंत कोणाच्याही पुढ अस हात जोडल नायत पण माहिती नाय का तुमच्या पुढ जोडावसं वाटलं आणि माफी मागावीशी वाटली. क्रांतीने डोक्यावर पदर घेतला आणि पुढ आली वाकून पहिल्यांदा आबांना नमस्कार केला आणि आबांचे हात हातात धरले.
" आबा असं का म्हणताय?"
" कारण चूक आमची व्हती. तुम्हाला दोघांनाही वेगळ करण्यात."
" आबा झालं ते झालं... आता मी सून म्हणून नशिबात नव्हते. त्यात तुमची काय बी चूक नव्हती. सगळ्यांचे डोळे पाण्याने भरले.
"नाय आमी सासर म्हणून तुझ्या नशिबाला चांगलं नाय आलो. आमाला माफ करशील ना?"बाबांचे डोळे पाणवले.
" आबा नका बोलू... लेकीला कधी राग येतो का बाप कसाही वागला तरी? नाही ना मग तुम्ही माझ अजूनपण बापच हाय. मला नाय वाईट वाटलं."
तिच्या हा बोलण्याचा आबांना आणखीच त्रास झाला. तेव्हा हुमसून रडू लागले.
" आबा हे काय लहान बाळासारखे रडता?" क्रांतीने समजूतदारपणे त्यांच्या पाठीवरून हात फिरवला.
" खूप मोठपणा गाजवला. कधीतरी लहान बाळ व्हऊन रडू द्या आम्हाला पण आमचं पण मन मोकळं करू द्या. स्वतःच्या लेकाचा स्वतःच्या हाताने संसार मोडला. मन लई जड झालं व्हतं. आज रिकामा करूद्यात."
" कधीपण गरज लागू द्या. हाक मारा मी धावत ईल."
क्रांतीने आबांचे डोळे पुसले. आबांनी स्वतःला सावरले आणि म्हणाले.
"चला चला स्वप्नाबाई नवरदेव वाट बघत्याल. सगळेजण लग्न मंडपात गेले. भूषण आतुरतेने स्वप्नाची वाट बघत होता तिला बघून त्याच्या काळजाची ठोके जास्तच वाढू लागले. विधींना सुरुवात झाली. चिनूने निळ्या रंगाचे साडी नेसली होती. ऋषी तिला बघून "खल्लास" अशी अकटिंग करून म्हणाला. चिनू लाजली. हे मात्र लांब बसलेल्या दादांच्या नजरेने हेरल्या.
वीर क्रांतीला फक्त डोळ्यांनी न्याहळत होता. क्रांती त्याच्याकडे बघत ही नव्हती. लग्न संपन्न झाले. भूषणच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळ्यांना दिसत होता.
जेवणाच्या पंगती पडल्या. स्वप्नाचे आई वडील दादा आणि आशाना जेवायला आग्रह करत होते.
" आम्ही अन्नाचा अपमान करणार नाय, आम्ही जीव पण एका प्रश्नाच उत्तर पाहिजेन. ऋषी आणि चिनू एकमेकांच्या प्रेमात हायत त्यांचा इचार करायला पाहिजे. पहिल्या पोरीच्या बाबतीत हे असं सगळं घडलं. आम्हाला वाटतं आमच्या ह्या लेकीच्या बाबतीत आता वाईट नको घडायला. तुम्हाला मान्य असल तर त्या दोघांचं शिक्षण झाल्यावर आपण पुढचं बघू...पण जर तुमच्या मनात नसल तर त्यांना इथे थांबायला सांगू." दादा शांतपणे बोलत व्हते.
स्वप्नाची वडील बोलले,
"दादा आमच्या दोघांच्या पण मनात आहे. चिनू आमच्या घरची सून व्हावी पण दोघांची शिक्षण पूर्ण होऊ द्यात स्वतःच्या पायावर उभे राहू देत. मग आपण बघू. हवं तर बोलणी करून ठेऊ. चिनूने सगळे ऐकलं आणि ते आनंदाने जवळजवळ नाचायला लागली. तिच्या मागून येऊन ऋषीने तिचा हात पकडला आणि तिला एका बाजूला भिंतीला टेकून उभे केले.
" किती गोड दिसतेस. माहिती किती वेळ मी तुला एकटीला गाठायचा प्रयत्न करत होतो. पण तू आहेस की नवरीच्या बाजूने हलायला तयार नाही."
"ऋषी अरे दादा आई आणि तुझे आई वडील आपल्या लग्नाविषयी बोलत होते." ऋषीने तिचा हात घट्ट हातात पकडला. " ऋषीला धक्काच बसला.
" काय? आपल्या लग्न बद्दल बोलत होते?' ऋषीने पटकन तिचा हात सोडला.
" थांब मी आई बाबांना विचारून येतो." तिने पटकन हात ऋषीचा पकडला आणि म्हणाली.
" त्यांच्या मतांनी होऊ देत की जरा... आपण आपल्या मताने झाले आता त्यांना त्यांच्या मताने आपल्याला एक करून देत. ऋषी तिच्या डोळ्यात बघायला लागला. तेवढ्यात संग्राम तिथे आला.
"जिलेबी खाणार का जिलेबी? ताजी ताजी जिलेबी.."ऋषी आणि चिनू पटकन बाजूला झाली. संग्राम मोठ्याने हसायला लागला.
" दादा काय आहे...?" तेवढ्यात वीर हॅलो हॅलो करत बाहेर निघून गेला. साठेसरांचा त्याला कॉल आला होता. संग्रामने जिलेबीची थाळी ऋषीच्या हातात दिली आणि तो वीरच्या मागे गेला.
" हॅलो हा सर बोला"
" नॅशनल लेवलला तुझं सिलेक्शन झाला आहे."
"पण मी इथन पुढं खेळणार न्हाय सर..."
"सिलेक्शन होत नाही वीर सहज आणि तुझं नाव मी खूप आधी दिल होत."
"पण सर तुम्ही मला न विचारता माझं नाव..."
"कारण मला माहित आहे तू माझ्यासाठी नाही म्हणणार नाहीस.."
"पण सर आता मी स्वतःला वचन दिलंय मी यापुढं खेळणार नाय आणि तुम्ही नॅशनलला नाव दिल...?"
संग्राम सगळं ऐकत होता. त्याला खूप आनंद झाला होता पण वीर कोणाचाच ऐकणार नाही हे सुद्धा माहीत होतं.
वीर नॉर्मल चेहरा करत आत आला नि सगळ्यांना आग्रहाने जेवायला वाढू लागला.
संग्राम त्याला लांबून बघत होता. तो त्याच्या निर्णयावर ठाम होता.
संग्राम त्याच्या जवळ गेला.
"तुला जायला पाहिजे.."
"कुठं?"
वीर जेवण वाढत बोलत होता.
"स्पर्धेला..."
"तू???"
"मी ऐकलं सगळं.."
"मी नाय जाणार.."
"वीर तुला जावं लागलं.."
"दादा माझं ठरलंय..." एवढं बोलून वीर वाड्यात निघून गेला.
"दादा काय झालं? वीरदादा अस का निघून ..गेला" ऋषीने त्यांचे संभाषण ऐकलं. संग्रामने त्याला सगळे सांगितले.
" ऋषी मला म्हायीत हाय त्यानं एकदा ठरवलं की तो कोणाचं ऐकत न्हाय..."
ही बातमी भूषणपर्यंत गेली. भूषण वीरकडे गेला. वीर त्याच्या रुममध्ये बसला होता.
"आर भूषण्या तू इथं??"
"तू का मला सोडून इथं इवून बसलास?"
"आर ते येणार व्हतो.."
"बोल खोटं.. तुला म्हायती हाय तू माझ्यापासन काय बी लपवू शकत न्हाईस..."

"भूषण्या तुला समजल सगळं माजी... पण मला खेळायचं न्हाय अन माझा निर्णय एकदा झाला की झाला.."
"ठीक हाय...मी जातो.."
"भूषण्या लेका.."
"वैणींन सांगितलं तर ऐकशील???"वीर शांत होता.

क्रांती दरवाजा मागून सगळं ऐकत होती.



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत