बालवीर नावाच्या पुस्तकाविषयी
बालवीर नावाची पुस्तक वाचकांच्या हाती देतांना अतिशय आनंद होत आहे. तशी कोणतीही पुस्तक का असेना, लेखक तिला बाहेर काढत असतांना असीम आनंद वाटतच असतो. तसा मलाही वाटतोय.
ही माझी साहित्य जगतातील छ्यांशिवी पुस्तक असून अठ्ठावनवी कादंबरी आहे. मला कादंबरी लिहिणं आवडतं. म्हणूनच माझा कादंबरीच लिहिण्याकडे कल जास्त आहे.
ही कादंबरी लिहितांना मी संदर्भ म्हणून गुगलवरुन माहिती घेतली आहे. काही लेखकांचे लेखही घेतलेले आहेत. ज्यांची नावं लिहिलेली नव्हती. त्यांची मी आधीच माफी मागतो. कारण ती नावं वा फोननंबर नसल्यानं रितसर परवानगी मागता आली नाही. फक्त ती माहिती संदर्भ म्हणून वापरलेली आहे.
पुर्वी कादंबऱ्याच चालत होत्या. आता तसं नाही. आता कादंबऱ्या तेवढ्या प्रमाणात चालत नाहीत. कारण आता लोकांकडे वेळच उरलेला नाही. त्याला कारणीभूत आहे महागाई. आज महागाईची झळ प्रत्येक परीवाराला पोहोचलेली आहे. त्यातच महागाईचा काळ आल्यानं महागाईचा सामना करीत असतांना पुस्तक वाचनाचा कल कमी झाला व लोकं अलिकडील काळात पुस्तक वाचत नाहीत. तरीही मी लिहितो. त्यातच कादंबऱ्याच जास्त लिहितो. मग कोणी वाचन करो वा न करो.
माझ्या बऱ्याच पुस्तकाचं वाचन वाचकवर्ग करतात. कधी व्हाट्सअपवर मेसेज टाकतात. बरं वाटतं. परंतु ही एक बाजू माझी बरी असली तरी मला अलिकडील काळात माझ्या लिखाणाचे शत्रू निर्माण झाले असावेत असंही वाटायला लागलंय. तसं पाहिल्यास अलिकडील काळात जसजसा व्यक्ती प्रगती करतो. तसतसे त्याचा द्वेष करणारे शत्रूही निर्माण होत असतात. जे कुरघोडी करीत असतात. त्यांना कोणाचीही प्रगती खपत नाही. त्यांना वाटत असतं की मी समोर जायला हवं होतं. हाच व्यक्ती जावून राहिला. तसे ते स्वतःही पुढे जात नाहीत. निदान प्रयत्नही करीत नाहीत आणि इतर कोणी जात असेल तर त्यालाही जावू देत नाहीत. तसा प्रत्यय मलाही आलाय. असो. गीतेत सांगीतलं आहे की माणसानं फक्त कर्म करावं. फळाची अपेक्षा करु नये. हेच ठरवलं मी व मी तेच ठरवून फळाची अपेक्षा न करता लेखन करतो. कोणी कोणी म्हणतात की कशाला लिहितोस एवढं. कोण वाचतोय. मग राग येतो थोडासा. विचार करतो. याच्या का बापदादाचं चाललं. मग काही वेळानं राग दाबतो मनात. हसून देतो थोडासा आणि लिहितो त्यानंतर अविरत. वाटतं की दारु पिण्यापेक्षा हा छंद बरा.
बालवीर नावाची ही पुस्तक गुरु गोविंद सिंह व त्यांच्या चारही मुलांवर आधारीत आहे की ज्या त्यांच्या मुलांनी अतिशय अल्प काळात म्हणजे वय वर्ष सहा व आठ असतांना मृत्यूला न घाबरता मिठी मारली. ही पुस्तक म्हणजे त्यांच्या बलिदानाची गाथाच आहे. ती गाथा एका कादंबरीच्या स्वरुपात मांडली आहे. यात काही गोष्टी काल्पनिकही टाकल्या आहेत. ज्या मनाला पटणार नाहीत व लेखक कुठेतरी चुकला असेच वाटेल आणि जो चुकणार नाही, तो माणूस कसला? परंतु चूक ती चूक. तिला माफही करता येत नाही. तसं पाहिल्यास यात त्या गोष्टी एका दृष्टीनं चुका नाहीत. परंतु होवू शकते त्या चुका आपल्याला चुका वाटू शकतात. तेव्हा त्या चुका समजून घेवून सुचवाव्यात. मी ते मान्य करील. आपण ही पुस्तक वाचावी. चुका पदरात घालाव्यात व प्रतिक्रिया द्याव्यात ही विनंती. जेणेकरुन मला पुढेही अशाच स्वरुपाची दुसरी पुस्तक लिहिता येईल.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
बालवीर (कादंबरी)
अंकुश शिंगाडे
"बोला, कबूल आहे का आमचा धर्म?" काजी म्हणाला.
"नाही." ते बालवीर म्हणाले.
काजीनं ते शब्द ऐकले. तसा तो पुन्हा म्हणाला,
"आता शेवटचं विचारतो, बोला कबूल आहे का आमचा धर्म?"
तो काजीचा प्रश्न. तो त्या धर्मवेड्या बालकांनी शेवटच्या क्षणीही तन्मयेतेनं ऐकला व शेवटच्या क्षणीही त्या बालकांच्या तोंडातून तेवढ्याच तन्मयतेनं शब्द फुटले.
"नाही, आम्ही मरुन जावू. परंतु आम्ही आमचा धर्म कदापिही बदलवणार नाही. त्याची तुम्ही वाट पाहूच नका."
ते बालकं काही मोठी नव्हती वयानं. ती कोवळ्या वयातील होती. एक होता सहा वर्षाचा व दुसरा नऊ वर्षाचा. परंतु त्यांचं ते बाणेदारपणाचं उत्तर काजी आणि तिथं जमलेल्या तमाम बादशाही जनता जनार्दनांना लाजवत होतं.
काळजीनं ते शेवटच्या क्षणाचे शब्द ऐकले. तसा तो बादशाहाच्य वजीराला म्हणाला,
"खॉंनसा, मी आता काहीही करु शकत नाही. आता तुम्ही स्वतः निर्णय घ्या. तुम्ही आता हवा तसा निर्णय घ्यायला तयार आहात."
काजीचं ते म्हणणं. तसं म्हणणं ऐकताच बादशाही वजीर वजीरखान भडकला व म्हणाला,
"आता दिवारच पुर्ण करुन टाका. आता हे मरण पावले तरी चालेल."
बादशाही वजीराचे ते बोललेले शब्द. तसे ते इवले जीवं. सगळेजण एकमेकांकडे आश्चर्यानं पाहात होते. परंतु बादशाहाचाच वजीर होता तो. त्याच्या शब्दाचा विरोध तरी कोण करणार? दया येत होती. परंतु दया जरी येत असली तरी ती दया इतरांच्या कामाची नव्हतीच. शेवटी चारही बाजूनं बनलेल्या त्या भिंतीवर स्लॅब चढविण्यात आली व त्या मुलांना भिंतीत गाडून देण्यात आलं.
ती भिंतीत दफन करण्याची ती स्थिती. ती स्थिती पाहून कुठंतरी विधात्यालाही किंतु परंतु वाटलं असावं. कारण जशी स्लॅब पुर्ण झाली व त्या दोन्ही विरांचा श्वास निघायची वेळ आली. तशी भिंत कोसळली व ते चिमुकले जीवं त्या भिंतीबाहेर आले. तेही एक आश्चर्यच होतं. कोणी म्हणतात की वजीर खानानं काही वेळानं ती भिंत पाडली. ते दोघं जीवंत आहे की नाही हे पाहण्यासाठी. परंतु ते जीवंतच होते. ते पाहून वजीरखानास आश्चर्याचा धक्का बसला व त्यानं तलवार उपसून फतेहसिंह व जोरावर सिंह यांना ठार करुन टाकलं.
तेही एक आश्चर्यच होतं की भिंत पडली होती. त्या इवल्या इवल्या जीवांची दया घेतली होती त्या भिंतीनं. परंतु माणूसकीच्या पलीकडे गेलेल्या त्या शैतानरुपी माणसांना दया येत नव्हती त्या लहानग्या जीवांची. एवढी कुटकूट भरली होती धर्मांधता. अन् ते स्वार्थीपणही कुटकूट भरलं होतं त्यांच्यात.
स्वार्थपण.......माणसाला खात असतं त्याचं स्वार्थपण. स्वार्थपण केल्यानं माणसाचा विकास होतो. विकास नाही होत असं नाही. स्वार्थी व्यक्तींजवळ संपत्ती अगाढ वाढू शकते. तो चार पाच इमारती सहज बांधू शकतो. वाटल्यास स्वार्थी माणूस कितीतरी पुढेही जावू शकतो पैशानं व मालमत्तेनं. परंतु संबंधानं तो माणूस मागेच राहतो. कोणीही त्याचेशी व्यवहार करु पाहात नाहीत. म्हणतात की तो व्यक्ती स्वार्थी आहे. कोण त्याला मदत करणार.
अलीकडे समाजात असाच स्वार्थ वाढत आहे. तो एवढा वाढत आहे की त्या स्वार्थी माणसाला आपण काय करतो हेच दिसत नाही. शिवाय आपल्या हातून कोणती चूक होते हेही दिसत नाही. तो चुकांवर चुका करीत जातो व फसतो.
माणसानं स्वार्थी राहावंच थोडसं. कारण स्वार्थ जर नसला तर हित संपेल. अन् हित जर नसलं तर त्या माणसांची अवस्था एखाद्या वेड्यागत होईल वा भिकाऱ्यागत होईल. परंतु खरं सांगायचं झाल्यास आजच्या वेड्या माणसांनाही स्वार्थ असतोच. आपलं पोट भरावं असंही त्याला वाटत असतं. तो स्वतः उपाशी राहून इतरांच्या पोटाला अन्न देत नाही.
मुख्यतः माणसांचे स्वार्थपण जोपासणारी व स्वार्थपण न जोपासणारी अशा दोन गटात विभागणी केल्यास आज आपल्याला असं दिसेल की स्वार्थपण जोपासणारीच माणसं जगात भरपूर आहेत. प्रत्येक माणसालाच नाही तर प्राण्यांनाही स्वार्थ आहे. हा माझा, तो तुझा हे सगळं साऱ्यांनाच कळतं. साधा कुत्राही आपल्या मालकांना कोणी काही म्हणत असेल तर ते ओळखून भुंकतोच. जरी त्याचा मालक वाईट स्वभावाचा असला तरी आणि तो त्याला सतत मारहाण करीत असला तरी. तेच इतरही प्राण्यांचं आहे. आजची मांजरही फार हुशार झाली आहे. पुर्वीची मांजर सात घरं फिरुन खात होती. ती विप्रासारखी वागत होती. जसे विप्र. विप्र एका दिवशी फक्त पाचच घरची भिक्षा मागायचे. त्या पाच घरी भिक्षा नाही मिळाली तर तो सहाव्या घरी जात नसे. तो चक्कं उपाशी राहात असे. म्हणूनच त्याला पुढे समाजात प्रतिष्ठेचं स्थान मिळालं. आजच्या काळात जे विप्रांना प्रतिष्ठेचं स्थान आहे. ते त्यावेळचं वागणं. मात्र आजचे विप्र तसे नाहीत. हं, आजच्या विप्रांना माधुकरी मागण्याची वेळ आलीच तर ते पाचच घरी भिक्षा न मागता जास्त घरी भिक्षा मागतील. परंतु उपाशी राहणार नाहीत. याचं कारण आहे स्वार्थपण.
स्वार्थपणाचा कालचा इतिहास पाहता कालचे लोकं हे नियमांचे पक्के होते असा इतिहास सांगतो. ते नियम मोडत नव्हते असाही इतिहास सांगतो. शिवाय त्यांच्यात स्वार्थपण नव्हतं हेही इतिहासच सांगतो. याबाबतीत एक दंतकथा प्रचलीत आहे. नल दमयंती हे एका राज्याचे राजा राणी. परंतु जेव्हा त्यांचेवर नियतीनं पाठ फिरवली. तेव्हा ते वणवण भटकत होते. अशातच त्यांना काही दिवस उपासात काढावे लागले. त्यांच्याबाबतीत एक प्रसंग असा की नल दमयंतींना एके दिवशी फार भूक लागली असतांना एके ठिकाणी अर्धी पोळी मिळाली. नलनं त्या अर्ध्या पोळीतील अर्धी पोळी म्हणजेच चतकोर तुकडा दमयंतीला दिला. परंतु जेव्हा ते तो चतकोर तुकडा खात होते. ज्यावेळेस त्यांच्या पोटात असंख्य कावळे ओरडत होते. त्यावेळेस एक श्वान तिथं आला व तो आपली शेपटी हलवायला लागला. त्यावेळी नलनं आपल्या हिशाची चतकोर पोळी त्याला दिली. तशी ती पोळी त्या श्वानानं खाल्ली व पुन्हा तो आपली शेपटी हालवू लागला. तेव्हा परत दमयंतीच्या हिशातील पोळीही त्याला दिली. याला म्हणतात स्वार्थपण न जोपासणे. आज असे नल दमयंती जगात नाहीत. कारण आजच्या काळात कोणीही स्वतः उपाशी राहून आपली पोळी श्वानाला देत नाहीत. काल तर कर्णासारखा असा राजा होवून गेला की ज्याला माहीत होतं, आपण आपले कवचकुंडलं दान मागायला आलेल्या साधूरुपातील इंद्राला दिले तर आपण मरणार. तरीही त्यानं अगदी सहजतेनं किंतु परंतु न पाहता आपले कवचकुंडलं दिलेत. अन् आजच्या काळात युधीष्ठीरासारखा राजाही होणार नाही की जो स्वर्गात जातांना यमराजाच्या एका दुताला म्हणाला, "या श्वानाला जर माझ्यासोबत स्वर्गात जाण्याची परवानगी नसेल तर मला अजिबात नेवू नये. मिही येत नाही स्वर्गात आणि मलाही नको स्वर्ग."
ही त्यांची बाणेदार उत्तरं आणि तेच त्यांचं बाणेदार वागणं. कोणी त्याला दंतकथा म्हणतात. परंतु त्या दंतकथा वाटत असल्या तरी त्यांची नावं ऐतिहासिक पुस्तकात बरीच गाजली. हे सत्य नाकारता येत नाही. तसं पाहता अर्वाचीन काळातील काही लोकांचा इतिहासही तसाच आहे. जसे. महात्मा गांधी. त्यांच्या घरी काय कमी होतं. त्यांचे वडील पोरबंदरचे दिवाण होते. तसं पाहता ते सुखात राहू शकत होते त्या काळात. कोणी त्यांना आजही बदनाम करतात. म्हणतात की ते व्याभिचारी होते. परंतु तो या काळातील लोकांचा विचार करण्याचा भाग आहे. जर ते तसे असते तर त्या काळातील जिकडे तिकडे संस्काराचे जाळे असतांना लोकांना तसा व्याभीचारीपणा दिसल्यावर खरंच ते महात्मा गांधीमागं उभे तरी राहिले असते काय? ही विचार करणारी बाब आहे. परंतु आजच्या काळातील लोकांचं काय? आपण स्वतः काहीच करायचं नाही अन् आपलं नाव मोठं व्हावं म्हणून महापुरुषांवरच ताशेरे ओढायचे. हा काळ आला आहे आज. आज तर कोणीकोणी शिवरायांच्या काळात मदारी मेहतरच झाला नाही म्हणतात.
महात्मा गांधीनी स्वार्थपण न बाळगता आपली राजशी वस्र त्यागली. यावरुन त्यांच्यात स्वार्थपणा नव्हता काय? होता. तो म्हणजे ते राहात असलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे. आजच्या काळातील स्वार्थपणाचा इतिहास पाहता सर्वच लोकं स्वार्थपणाच्या दुर्बल इच्छेत कैद आहेत. या स्वार्थपणाच्या इतिहासात अर्वाचीन काळातील स्वार्थी वागणारे दोन बालकं होवून गेले की ज्यांच्या मनात कोणताच भीतीभाव नव्हता व ज्या बालकांना सरहिंदच्या वजीर खानानं अगदी कोमल वयात भिंतीत गाडून टाकण्याचा प्रकार केला. त्यातही त्या इवल्या जिवांनी आपल्या जिवांची पर्वा केली नाही. तो स्वार्थ होता. आपला धर्म. आपला धर्म चांगला की वाईट याचं त्यांना घेणंदेणं नव्हतं, तरीही.
स्वार्थपण कोणाला नाही. साध्या मुंगीलाही माहीत आहे स्वार्थपणा. तिही आपल्या तोंडातील दाणा सोडत नाही. माणसानं स्वार्थपण असं ठेवावं. देशाचं स्वार्थपण. माझा देश स्वतंत्र्यच असायला हवा. त्यासाठी मरण आलं तरी चालेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कित्येक लोकं शहीद झाले. त्यांनी आपल्या प्राणांची पर्वाच केली नाही. त्यात इवल्या आठ वर्षाच्या नंदुरबारच्या शिरीषकुमारचं बलिदान वाया जाणार नाही वा इतिहासात कधीही पुसलं जाणार नाही. त्यावेळेस घनश्यामदास, सुखदास इत्यादी शेकडो बालके प्राणास मुकले. परंतु त्यांनी इंग्रजांसमोर त्या लहानग्या वयातही हार मानली नाही. जे शिकायचं वय होतं. खेळण्याबागडण्याचं वय होतं. तसंच धर्माचं स्वार्थपण. मी मेलो तरी चालेल. परंतु परधर्म स्विकारणार नाही. जसं संभाजीला मारलं गेलं. ते मरण पावले. परंतु त्यांनी परधर्म स्विकारला नाही. म्हणूनच आज इतिहास त्यांची इज्जत करतो. याच शृंखलेत येतात साहेबजादा फतेहसिंह व जोरावर सिंह. जे धर्मासाठी कोवळ्या वयात भिंतीत गाडले गेले. परंतु भिंतीही त्यांना गाडू शकल्या नाहीत. ते जीवंत असतांनाच भिंतीला तडा गेला. ती पडली आणि ते जीवंतच भिंतीतून बाहेर पडले. ते पाहताच वजीरखानही आश्चर्यचकीत झाला. त्याचा राग अनावर झाला व त्यानं शेजारीच उभ्या असलेल्या शिपायाजवळील लटकवलेली तलवार उपसली अन् आव ताव न पाहता तो धावत भिंतीजवळ गेला व त्यानं त्या तलवारीनं त्यांची मानच कापून टाकली.
फतेहसिंह.......त्यावेळेस फतेहसिंह अवघ्या सहा वर्षाचा होता. जगातील मुलांचा विचार केल्यास अगदी अल्प वयातील शहीद झालेला पहिला बालक. शिखाच्या दहाव्या धर्मगुरुंचा मुलगा तर दुसराही त्याचाच मुलगा होता जोरावर सिंह. जो फक्त आठ वर्षाचा होता. दोघंही लहान होते. परंतु आपला धर्म वाचवतांना ते कधीही कचरले नाहीत वा धर्म बदलवला नाही. त्यांच्यातही स्वार्थ होताच. परंतु तो स्वार्थ होता धर्माचा. आमचा धर्म श्रेष्ठ मानण्याचा.
स्वार्थ.....आजही समाजात स्वार्थ आहे. एवढा स्वार्थ आहे की आपण केवळ संपत्ती मिळविण्यासाठी भावाभावाची हत्या करतो. साधा शेतातील धुरा थोडासा सरकला की शेजाऱ्या शेतकऱ्यांची हत्या करतो. कधीकधी बाजुवाल्यांचीही एक एक फुट जागेसाठी हत्या करतो. स्वार्थासाठी धर्म बदलवतो. अन् स्वार्थासाठी काहीही करतो. नल दमयंतीसारखा निःस्वार्थीपणा कधीच कोणत्याही स्वरुपाचा दिसत नाही आपल्यात. किंचीतही नाही. ना कर्णाच्या कवचकुंडल दान देणाऱ्या प्रसंगासारखा ना युधीष्ठीरच्या स्वर्गात श्वान नेणाऱ्या प्रसंगासारखा. खरं तर आजच्या काळातील स्वार्थानं गोळा केली असलेली ही संपत्ती वा वैभव मरणानंतर आपण नेत नाही. नेतो ते आपले चांगले कर्म.
माणसानं स्वार्थीपणानं वागावं की वागू नये असं मी म्हणत नाही. स्वार्थपण असावंच. ते नसेल तर आपल्याला आपल्याच देशात कोणीच राहू देणार नाही. कोणीही आपल्यावर ताबा मिळवेल. आपल्याला हरवेल व आपल्याला गुलाम करेल. परंतु एवढाही स्वार्थीपणा नसावा की आपला आपणच जीव घ्यावा. साध्या एक फुट जागेसाठी कुण्या भावाचा वा शेजाऱ्याचा जीव घेणारा स्वार्थीपणा कधीच नसावा आपणात. कारण ती एकफुट जागा काही आपण स्वर्गात नेत नाही. अन् कुणी ती जागा हिसकावूनही घेवू नये कोणाची. आपली एक फुट जागा कामाची. हं, जागाच पाहिजे तर विधात्याला साडेपाच फुट हक्काची जागा मागा. कारण आज एवढी माणसं मरतात की त्यांना जगात कायमची जागा मिळत नाही. एका जागेवर जाळलेल्या प्रेताची राख उचलून त्याच जागी दुसरं प्रेत जाळलं जातं. तसंच एका जागेवर दफन करण्यात आलेलं मुदडं सहा महिन्यानंतर बाहेर काढून फेकण्यात येतं व त्याच जागेवर दुसरं मुदडं गाडण्यात येत असतं. ही वास्तविकता आहे. कोणताच व्यक्ती कुणाचीच मालमत्ता नेत नाही. ना पैसाही नेत. मग हा मालमत्तेसाठी वा पैशासाठी वा इतर गोष्टीसाठी स्वार्थीपणा का? मुघल बादशाहांनी धर्मासाठी व सत्ताविस्तारासाठी एवढे बळी घेतले. काय मिळवलं त्यांनी? असा विचार केल्यास काहीच नाही असं म्हणता येईल. साध्या औरंगजेबाचं जर उदाहरण घेतलं तर त्यानं धर्मासाठी एवढं केलं. काय मिळालं त्याला. त्याची समाधी देखील साध्या पद्धतीत विराजमान आहे.
आज माणसानं स्वार्थीपणा किंचीत तरी सोडावा. सर्वांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. सर्वांना सन्मानानं जगवावं. कारण मृत्यूनंतर फक्त राख होते या देहाची. काहीच कोणाला मिळत नाही. त्याची प्रचीतीही वृद्ध झाल्यावर येते. येत आहे. आज ज्या लेकरांसाठी आपण आपलं स्वार्थपण जपतो ना. तीच लेकरं आपण म्हातारं झाल्यावर आपल्याला वृद्ध अवस्थेत फार त्रास देतात. वृद्धाश्रमात टाकतात आणि मेल्यावर मयतीलाही येत नाही. तसं पाहता मरणोपरांतही आपल्याला गाडायला वा जाळायला कायम स्वरुपाची जागा उपलब्ध होत नाही. म्हणूनच स्वार्थपणाची वास्तविकता जपतांना तोच विचार मनात ठेवावा व तसं वागावं. जेणेकरुन त्याचा फायदा तुम्हालाच होईल. जग तुमचंच नाव घेईल, कर्ण, युधीष्ठीर व नल दमयंतीसारखं. मग ते पाहायला तुम्ही नसले तरी चालेल. माणसानं स्वार्थपण जपावं. स्वार्थीपणानं जगावं. परंतु असं स्वार्थीपण जपावं की ज्यातून आपलाच नाही तर जगाचा उद्धार होईल. तेच स्वार्थीपण आपल्या कामाचं आणि उपयोगाचं आहे. दुसरं कोणतंच स्वार्थीपण आपल्या उपयोगाचं नाही हे तेवढंच खरं. स्वार्थपण आपण आपलं जीवन कसं जगतो यावर अवलंबून आहे. आपलं जीवन आनंददायी जगा, खुश राहा आणि सर्वांना सुखात ठेवा म्हणजे झालं. स्वार्थीपण जोपासत जगणं म्हणजे लोकांच्या विचारांची हत्या करणं होय. तेवढ्या गोष्टी सोडाव्या यातच आपलं भलं आहे. यात शंका नाही.
भिंत कोसळून पडली. तसं ते वाचताच खान चिडला व त्यानंतर त्यानं फतेहसिंह व जोरावर सिंहाला ठार करताच सारं संपलं. त्यानंतर खानाची आग शांत झाली होती.
साहेबजादा फतेहसिंह. गुरु गोविंद सिंहाचा चौथा मुलगा व साहेबजादा जोरावर सिंह गुरु गोविंदसिंहाचा तिसरा मुलगा. गुरु गोविंद सिंहाला चार मुलं होती. अजीत सिंह हा मोठा होता. तो त्याच्या दुसर्या पत्नीचा मुलगा होता. त्यानंतर त्याला तीन मुलं झाली. त्यातील फतेहसिंह व जोरावर सिंह हे एक.
जोरावर सिंह व फतेहसिंह जेव्हा लहान होते. तेव्हा गुरु गोविंद सिंह हे धर्मउपदेशासाठी बाहेरच असायचे. त्याचवेळेस मुघल बादशाहा औरंगजेब हा दिल्लीचा बादशाहा होता. तो दिल्लीत नव्हता. तो महाराष्ट्रात होता. परंतु दिल्लीचा तो बादशाहा असल्यानं त्याची हुकूमत भारताच्या बऱ्याचशा भागात होती. तसं त्यावेळेस भारताला भारत हे नाव नव्हतं तर भारताला हिंदुस्थान म्हटलं जात होतं. बादशाहा औरंगजेब जरी त्यावेळेस महाराष्ट्रात असला तरी त्यानं काही काही सुभ्याचा अधिकार काही दरबारातील विशेष लोकांना सोपवला होता व तो स्वतःच स्वतंत्र स्वरुपात राज्य सांभाळत होता.
बादशाहा औरंगजेब हा क्रूर बादशाहा होता की ज्यानं आपल्या स्वतःच्याच बापाला कैदेत टाकलं होतं आणि आपल्या भावाची क्रूरपणे हत्या केली होती. त्याला असं वाटत होतं की मी माझ्या वडीलालाच सोडलं नाही तर मग माझ्यासमोर बाकीची मंडळी कोण लागली. त्यातच त्यानं सन १६८९ मध्ये संभाजी राजाची धर्मासाठी क्रूरपणे हत्या केली होती व त्याच्या शवाचे तुकडे करुन वढू गावालगत इंद्रायणी नदीत फेकून दिले होते व संभाजीचे मस्तक भाल्यावर सजवून त्यानं त्याची मिरवणूक काढली होती संपुर्ण राज्यभर. ती मिरवणूक जेव्हा निघाली होती, तेव्हा सगळे मुघल बादशाही चाकरीतील मंडळी हसत होती. त्यात काही मराठे सरदारही होते. त्यांना आपला एक मराठी राजा मृत्यू पावलेला आहे यात गम नव्हते.
संभाजीचा मृत्यू.......तसं पाहिल्यास तो एक अपघातच होता. मराठेशाहीला तो एक धक्काच होता. त्यांची हत्या केल्यानंतर मराठेशाही दुबळी होईल असं बादशाहा औरंगजेबाला वाटत होतं. त्यामुळंच त्यानं संभाजी राजांची हत्या केली होती. परंतु ते लोण हिंदुस्थानच्या कानाकोपऱ्यात एवढे पोहोचले की त्यावेळेस हिंदुस्थानचा प्रत्येक वीर धर्मासाठी स्वतःच मस्तक कापायलाही तयार होता. मग त्यात लहान बालकं का असेना. अशाच लहान बालकात फतेहसिंह व जोरावर सिंह यांचाही समावेश होता.
************************************************
गुजरी.......शिखाचे दहावे गुरु, गुरु गोविंदसिंहाची आई. तसेच ती शिखाचे नववे गुरु गुरु तेगबहाद्दुरसिंहची पत्नी. तिचा जन्म करतारपुरमध्ये झाला. तिच्या वडीलाचं नाव लालचंद सुभिक्खी खत्री व आईचं नाव बिशन कौर होतं. तिचं साक्षगंध १६२९ ला व विवाह चार वर्षानंतर म्हणजेच चार फेब्रुवारी १६३३ ला करतारपुर इथेच संपन्न झाला. त्यानंतर ती अमृतसर इथं आपल्या पतीसोबत राहू लागली. त्यानंतर सन १६३५ मध्ये परीवार किरतपूर इथं रवाना झाला. त्यानंतर १६४४ मध्ये गुरु तेगबहाद्दूरचे वडील गुरु हरगोविंद यांचा मृत्यू झाल्यानंतर गुजरी आपली सासू व आपल्या पतीसमवेत तसेच माता नानकी समवेत अमृतसर जवळ बकाला इथे रवाना झाली होती.
सन १६६४ मध्ये गुरु तेगबहाद्दूर यांनी आपली आई नानकीबाईच्या नावाने एक गाव स्थापन केलं. ज्याला नानकी हे नाव दिलं होतं. जे गाव आता आनंदपूर साहेब या नावाने प्रसिद्ध आहे. त्यानंतर गुरु तेगबहाद्दूर यांनी आपली आई व आपली पत्नी माता गुजरीला पटना इथं ठेवलं व ते स्वतः आपले उपदेश देण्यासाठी रवाना झाले होते.
************************************************
गुरु तेगबहाद्दूर सिंह ज्यावेळेस आपले उपदेश देण्यासाठी रवाना झाले, त्यावेळेस गुजरी गरोदर होती. तिनं सन २२ डिसेंबर १६६६ ला गुरु गोविंद सिंहाला जन्म दिला. त्यावेळेस त्याचं नाव गोविंद राय ठेवलं होतं. ज्याचं रुपांतरण नंतरच्या काळात गुरु गोविंद सिंह म्हणून करण्यात आलं होतं. कारण गुरु गोविंद सिंह प्रत्येक शिखाला सिंहच समजत होते नव्हे तर समजायला सांगत असत. त्यानंतर गुरु तेगबहाद्दूर सिंह सन १६७० मध्ये पटन्याला परत आले. त्यावेळेस त्यांनी आपल्या परीवाराला लखनौला जाण्यास सांगीतले.
माता गुजरी लखनौला १३ सप्टेंबर सन १६७० मध्ये पोहोचली. त्यातच तिच्यासोबत तिची सासू नानकी व तिचा मुलगा गुरु गोविंद सिंह होता. ती लखनौला तिचा भाऊ मेहरचंद सोबत राहिली. त्यानंतर पुन्हा पुर्ण परीवार नानकी या गावी रवाना झालं. पुढे याच नानकी ठिकाणी गुरु तेगबहाद्दूर आले व तेथेच ते काही काळ स्थायी होवून राहू लागले होते. ज्यावेळेस गुरु तेगबहाद्दूर नानकीला आले, त्यावेळचं साल होतं सन १६७१. गुरु तेगबहाद्दूर हे नवव्या गुरुच्या रुपात विराजमान झाले होते. त्याचं कारण होतं त्यांची ओळख होणं. बकाला इथं बरेच लोकं राहात होते की जे स्वतःला गुरु समजत होते. त्याचवेळेस बाबा माखन शाह लबाना यांनी देवाला प्रार्थना केली होती की ते खऱ्या गुरुला शोधून काढतील. त्यातच त्यांना कळलं, बरेचसे गुरु असे आहेत की जे स्वतःला गुरु मानत आहेत व जे बकाला इथं आहेत.
बाबा माखन शाह लबाना हे अतिशय धनवान होते. त्यांनी देवाला मनोमन प्रार्थना केली होती की ज्या कोणत्या गुरुचे मला दर्शन होईल, त्या गुरुला मी पाचशे रुपये दान करेल. तसं कबूल करताच ते बकाला इथं आले. ते त्यानंतर बऱ्याच गुरुला भेटले व त्यांना दोन दोन अशर्फ्या दिल्या. त्यावेळेस सर्व गुरुंनी त्या अशर्फ्या घेतल्या. परंतु त्यानंतर ते काहीच बोलले नाहीत. मात्र गुरु तेगबहाद्दूरला त्या अशर्फ्या दिल्यानंतर त्यांनी माखन शाह लबानाला म्हटलं की तो बाकीच्या पाचशे अशर्फ्या केव्हा देणार आहे. त्यातच गुरु तेगबहाद्दूर यांनी त्या धनी माणसाला तसं म्हणताच त्या धनी माणसाला वाटलं,
'मी तर प्रत्यक्ष देवासमोर कबूल केलं होतं की मी पाचशे अशर्फ्या गुरुला दान देईल. त्यातच त्या अशर्फ्यातील दोन दोन अशर्फ्या मी इतर गुरुला दिल्या. परंतु त्यांनी पाचशे अशर्फ्याची आठवण दिली नाही. मात्र गुरु तेगबहाद्दूरनं त्याची आठवण दिली व म्हणत आहे की बाकीच्या पाचशे अशर्फ्या ते केव्हा देणार आहेत. कदाचीत देवानं पाठविलेला गुरु हाच तर नसावा.'
तीच गोष्ट. ती गोष्ट गुरु तेगबहाद्दूर म्हणताच बाबा माखन लबाना जोरात ओरडले. म्हणाले, 'गुरु लाधो रे गुरु लाधो रे' याचा अर्थ असा की मला गुरु भेटले. त्यानंतर त्या गुरुची तशी भेट होताच त्यांनी गुरु तेगबहाद्दूर सिंह यांना शिखाचे नववे गुरु म्हणून जाहीर केले.
गुरु तेगबहाद्दूर सन १६७१ ला नानकी इथे आल्यानंतर तिथं काही काश्मिरी पंडीतांचा एक काफिला त्याच्याकडे आला होता. त्यांनी सांगीतलं की जबरदस्तीनं त्यांचं धर्मपरीवर्तन केलं जात आहे. यावर उपाय सांगा. त्यावेळेस गुरु तेगबहाद्दूर यांनी विरोध करताच त्याचा जाब इफ्तीकार खान या मुघल वजीराला विचारला. परंतु त्यानं त्याचं उत्तर न देता खुद्द गुरु तेगबहाद्दूर यांना कैद केले व त्यांना दिल्ली येथे नेलं व तेथेच चांदणी चौकात उघड्यामध्ये तेगबहाद्दूर यांची तलवारीनं मान उडवल्या गेली.
मुघल शासक. जेवढेही मुघल शासक झाले. त्यांचा सर्वात पहिला हेतू असायचा. तो म्हणजे धर्मपरीवर्तन. ते समाजातील विविध धर्माच्या लोकांना जबरन मुस्लीम बनवीत असत. त्या गोष्टीचा जेही विरोध करीत. त्याची हत्याही केली जात असे. अशातच काश्मीर पंडीतांचा वाद आणि त्या वादावर विचारलेला तो बाणेदारपणाचा गुरु तेगबहाद्दूर यांचा प्रश्न. शेवटी त्याला स्वतः औरंगजेब बादशाहाच्या वतीनं प्रश्न केले गेले की त्यांनी मुस्लीम बनावं. परंतु त्यांनी सांगीतलं की मी स्वतः माझं मुडकं उडविण्याचं पसंत करेल. परंतु केस कापणार नाही. कारण मुस्लीम समुदायात मिशीचे केस कापण्याची व टक्कल करण्याची प्रथा होती.
गुरु तेगबहाद्दूर यांना पुन्हा त्यांनी मुस्लीम बनावं यासाठी प्रश्न केल्या गेला. परंतु त्यांनी आपलं तेच बाणेदार उत्तर दिलं. त्यातच मुस्लीम काजीचा राग अनावर झाला व त्यानं फतवा काढला की गुरु तेगबहाद्दूर सिंहाचं मुडकंच कापावं.
गुरु तेगबहाद्दूर यांची मान कापताच संपुर्ण शिख संप्रदाय क्रांतीरक्तानं लालेलाल झाला. परंतु आता नेतृत्व गुरु तेगबहाद्दूरच्या हत्येनं हरवलं होतं व आता लोकांना दुसऱ्या कणखर पण तेही खंबीर नेतृत्वाची गरज होती. ते मिळाल्याशिवाय शिख समुदाय पुढं पाऊल टाकणार नव्हतंच.
गुरु तेगबहाद्दूरची हत्या. ज्यावेळेस काश्मीरी पंडीत आपली याचिका घेवून गुरु तेगबहाद्दूरच्या दरबारी आले, तेव्हा त्या दरबारात त्याचाच मुलगा गोविंद राय देखील उपस्थीत होता. काश्मीरी पंडीतांनी आपली याचिका गुरु तेगबहाद्दूर समोर मांडली. त्या याचिकेत ते म्हणाले की त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतरण सुरु आहे. म्हणत आहेत की जर कोणता महापुरुष आपलं बलिदान द्यायला तयार होईल आणि बलिदान देईल. त्यानंतरच त्याचं धर्मांतरण थांबवलं जाईल. विचारांचा अवकाश........ काही वेळ असाच विचार करण्यात गेला. त्यानंतर गोविंद राय म्हणाले,
"पिताश्री, यासाठी आपल्यासारखा दुसरा कोणताच व्यक्ती तयार होवू शकत नाही."
गुरु गोविंद सिंह त्यावेळेस लहान होते. ते अवघ्या दहा वर्षाचे होते. त्यांना आपण काय बोलतो? तेही साधं कळत नसेल. तसं पाहिल्यास गोविंद रायनं म्हटलेले ते शब्द ऐकून संपुर्ण दरबार हसला. तो दरबार विचार करीत होता की त्या बाळाचं ते बोलणं बाळबोध स्वरुपाचं आहे. यावर गुरु तेगबहाद्दूर काही आपलं बलिदान द्यायला तयार होणार नाही. त्यानंतर काश्मिरी पंडीत एकमेकांकडे आश्चर्य चकीत नजरेनं पाहू लागले. ते त्यांचं आश्चर्यानं पाहणं गुरु तेगबहाद्दूर यांनी बघितलं. त्यानंतर ते काश्मिरी पंडीतांना म्हणाले,
"असं आश्चर्यानं पाहू नका एकमेकांकडे. मी देणार अशा स्वरुपाचं बलिदान. मलाही तसं बलिदान देतांना आनंदच होईल. जर सर्व काश्मिरी पंडीतांचं धर्मांतरण थांबवता येत असेल माझ्या बलिदानानं तर त्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती होईल माझ्या जीवनात? मी तयार आहे. आता औरंगजेबाला सांगावं की शिख गुरु तेगबहाद्दूरशी तुझी गाठ आहे."
गुरु तेगबहाद्दूरचा तो दरबार. दरबारात ते बोलून गेले होते ते शब्द. ते शब्द दुधारी तलवारीसारखे होते. हळूहळू ते शब्द दरबारातून दरबाराच्या बाहेर पडले. ते शब्द केवळ दरबाराच्याच बाहेर पडले नाहीत तर ते शब्द इफ्तीकारखान व औरंगजेब बादशाहाच्या कानावर गेले व त्यानं वटहुकूम काढला. 'आता गुरु तेगबहाद्दूर कुठेही दिसला तर त्याला ताबडतोब अटक करा.'
ते औरंगजेबाचे शब्द. सर्व औरंगजेबाच्या सरदारांना माहीत होतं की त्या औरंगजेबाच्या शब्दाचं पालन जर केलं गेलं नाही तर, तर तो एवढा क्रूर आहे की चक्कं तो मानेवरच आघात करतो. तशी त्याची नजरही तिक्ष्ण आहे. जर आपण बादशाहाची दगाबाजी केली तर जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्याला लपायला जागाच नाही. तो गरुडासारखा आपल्या तिक्ष्ण नजरेनं दगाबाजांना शोधून काढतो व सरळ यमसदनी पाठवतो. म्हणूनच बादशाहाशी दगाबाजी नको. शेवटी तसा वटहुकूम जाहीर होताच बादशाहाचे सरदार गुरु तेगबहाद्दूर यांना पकडायला त्यांच्या मागे लागले होते.
************************************************
ती तारीख होती ११ ऑगस्ट १६६४. त्या दिवशी दिल्लीतील शिखांचा एक जत्था पंजाबच्या दिशेनं रवाना झाला होता. त्यानंतर तो बकाला इथे गेला. मात्र हा जत्था निघण्यापूर्वी सहा महिने शिखांचे आठवे गुरु हरकिशन यांनी बकालामध्ये त्यांचा उत्तराधिकारी मिळेल असं सांगितलं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर हा जत्था पंजाबमधील बकाला गावाच्या दिशेनं निघाला. बकाला गावात शिखांची एक विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत तेग बहादूर यांना शिखांचे पुढचे गुरु म्हणून घोषित करण्यात आलं. या पारंपरिक समारंभात गुरदित्ता रंधावा यांनी नव्या गुरुंच्या कपाळावर भगवा नाम ओढून त्यांना नारळ आणि पाच पैसे दिले आणि त्यांना गुरूच्या गादीवर बसवलं. त्यापुर्वी बाबा माखन शाह लबाना या धनी माणसानं गुरु तेगबहाद्दूर यांना ते महान गुरु असल्याची उपाधी दिली होतीच.
सुरुवातीच्या काळात गुरू तेग बहादूर फारसे बोलके नव्हते. खुशवंत सिंहांच्या 'ए हिस्ट्री ऑफ द सिख्स' या पुस्तकात त्याचं वर्णन आलं आहे. म्हटलं आहे.
"गुरू तेग बहादूर अत्यंत नम्र स्वभावाचे असल्याने सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. धीरमल यांनी त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही. तेग बहादूर सिंह बकाला सोडून अमृतसरला आले, पण हरमंदिर साहिबचे दरवाजे त्यांच्यासाठी बंद केले गेले. मग ते तेथून त्यांच्या वडिलांनी वसवलेल्या किरतपूर गावी गेले. तेथूनच पाच किलोमीटर अंतरावर त्यांनी आनंदपूर नावाचं नवं गाव वसवलं. ज्याला आधी नानकी नाव दिलं होतं."
आज त्या ठिकाणाला आनंदपूर साहिब या नावाने ओळखलं जातं. पण इथंही त्यांच्या शत्रूंनी त्यांना सुखानं राहू दिलं नाही.
शिखांचे सहावे गुरु हरगोविंद यांचे सर्वात धाकटे पुत्र म्हणजे गुरु तेग बहादूर सिंह. त्यांचा जन्म १६२१ साली झाला. आनंदपूरमध्ये राहिल्यानंतर काही दिवसांनी गुरु तेग बहादूर सिंह यांच्या मनात पूर्व भारताला भेट देण्याचा विचार आला. ते पूर्वेकडे निघाले असताना, वाटेत आलम खानच्या नेतृत्वाखाली मुघल सैनिकांनी त्याला अटक करुन दिल्लीला परत आणलं. कारण औरंगजेबानं त्यांच्या अटकेची जबाबदारी आलमखानवर सोपवली होती.
गुरु तेगबहाद्दूरला अटक झाली. हे फक्त दरबारातील लोकांनाच माहीत होतं. इतरांना ते माहीत नव्हतं. त्यामुळं त्यांना प्रश्न पडला होता तो अटकेचा. ते विचार करीत होते, गुरु तेगबहादूरांना अटक का झाली त्याचा. त्यांच्यात एकमत नव्हतं. याबद्दल खुशवंत सिंग लिहितात,
"मुघलांचा दरबारी राम रायने त्यांना अटक करवली. गुरु तेग बहादूर यांनी शांततेचा भंग केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला."
याबाबतीत इतिहासकार फौजा सिंग म्हणतात,
"रामराय तेग बहादूर यांना आपला गुरु मानू लागले होते, त्यांचा कोणताही वाईट हेतू नव्हता."
गुरु तेगबहाद्दूर यांना अटक केल्यानंतर त्यांना औरंगजेबासमोर हजर केलं गेलं. त्यानंतर प्रश्नावली सुरु झाली. औरंगजेब बादशाहा आपले प्रश्न करीत होता आणि त्या प्रश्नांवर तेवढ्याच ताकदीनं व बाणेदारपणानं न घाबरता, भीतीचा अंगावर व मनावर कोणताही लवलेश दिसू न देता उत्तर देत होते गुरु तेगबहाद्दूर सिंह. एका प्रश्नांवर गुरु तेग बहादूर औरंगजेबाच्या प्रश्नांवर बोलताना म्हणाले,
"भले ही माझा धर्म हिंदू नसेल, भले ही मी वेदांच्या श्रेष्ठतेवर, मूर्तीपूजेवर आणि इतर चालीरीतींवर माझा विश्वास नसेल, पण हिंदू आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धांचा आदर आणि हक्कांसाठी मी कायमस्वरुपी लढेन.
ते गुरु तेग बहादूर यांचे शब्द. ते शब्द बादशाहाच्या काळजाला चिरुन गेले. ते शब्दबाण होते गुरु तेगबहाद्दूर यांच्या शब्दरुपी धनुष्यातून निघालेले. त्या शब्दबाणानं औरंगजेब धराशाही झाला. परंतु ते न दाखवता त्यांच्या त्या शब्दांचा आपल्यावर काहीही परिणाम झाला नाही. असंच औरंगजेबानं दाखवलं व म्हणाला,
"का दखलंदाजी करतो तू आमच्यात? अन् आमचा आदेश आहे की तू तुझा धर्म सोडून आमचा धर्म घे व सुखानं राहा. तुझ्या समुदायालाही सुखानं राहू दे."
ते औरंगजेबाचे शब्द. त्यावर औरंगजेबाच्या दरबारात जे उलेमा होते, त्यांनीही औरंगजेबाचे कान भरले. त्यांनी औरंगजेबाला सांगितलं,
'तेग बहादूरांचा वाढता प्रभाव इस्लामसाठी धोकादायक ठरु शकतो.'
ते उलेमांचं बोलणं. त्यातच गुरु तेगबहाद्दूर यांनी इस्लाम कबूल न करणं. शिवाय काश्मिरी पंडीतांची पहल करणं. म्हणणं की असं जबरदस्तीचं धर्मांतरण बरोबर नाही. त्यातच कोणीही भल्यासाठीच सांगीतलेला सल्ला बादशाहा औरंगजेबाला न पटणं. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना फाशीची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.
याआधीही एकदा गुरु तेगबहाद्दूर सिंह यांना पकडले होते. तेव्हा औरंगजेबाच्या दरबारात असलेला एक राजपूत मंत्री राजा रामसिंहाने त्यांना जिवंत सोडण्याची विनंती केली होती आणि औरंगजेबाने राजपूत मंत्र्यांची विनंती मान्य केली होती. त्यावेळेस जवळपास एक महिना गेला होता. डिसेंबर महिन्यात गुरु तेग बहादूर यांच्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आणि त्यांची सुटका करण्यात आली होती. त्यांची सुटका होताच त्यांनी पूर्वेकडचा प्रवास पुन्हा सुरु केला. ते मथुरा, आग्रा, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, बोधगया मार्गे पाटण्याला पोहोचले होते.
गुरु तेग बहादूर यांच्या पत्नी माता गुजरी यांनी तिथंच राहायचं असं ठरवलं. पण गुरु तेग बहादूर यांना त्यांच्या अनुयायांना भेटण्यासाठी ढाक्याकडे जायचं होतं. ढाक्यात असतानाच त्यांना मुलगा झाल्याची बातमी मिळाली. याच दरम्यान कामरूपच्या राजाने बंड केलं होतं. त्याचं हे बंड शमविण्यासाठी औरंगजेबाने राजा रामसिंग याच्यावर जबाबदारी सोपवली. त्या काळात कामरूपला धोकादायक मानलं जायचं, कारण इथल्या शूर योद्ध्यांची आणि काळ्या जादूची चर्चा असायची. राजा राम सिंह यांचा गुरु तेग बहादूर यांच्या आध्यात्मिक सामर्थ्यावर प्रचंड विश्वास होता. राजा राम सिंहाने गुरु तेग बहादूर यांना कामरूपच्या मोहिमेत सहभागी होण्याची विनंती केली आणि तेग बहादूरांनी देखील ती विनंती नाकारली नाही. याबाबतीत सरबप्रीत सिह लिहितात,
"या युद्धाच्या कालावधीत तेग बहादूर यांनी आसाममध्ये तीन वर्ष घालवली. या दरम्यान त्यांनी मध्यस्थांची भूमिका पार पाडली."
पाटण्यात आल्यावर त्यांना पंजाबमध्ये येण्याची विनंती करण्यात आली, कारण पंजाबमध्ये त्यांची गरज होती, त्यामुळं त्यांना त्यांच्या पत्नीला भेटता आलं नाही. मार्च १६७२ मध्ये ते चक्कं नानकीच्या गादीवर परतले. त्यांनी अशा ठिकाणी प्रवास केला, जिथं गुरु नानक वगळता इतर कोणत्याही शिख गुरुंनी भेट दिली नव्हती.
दि. २५ मे १६७५ मध्ये गुरु तेग बहादूर आनंदपूर साहिबमध्ये एका संगतीत बसले होते, तिथंच काश्मिरी पंडितांचा एक गट त्यांच्या भेटीसाठी आला. त्यातील पंडित किरपा राम या गटाचं नेतृत्व करत होते. त्यांनी तेग बहादूरांपुढं हात जोडले आणि त्यांना म्हणाले,
"हजारो वर्षांपूर्वीचा आमचा धर्म धोक्यात आलाय. औरंगजेबाने नेमलेला काश्मीरचा गव्हर्नर इफ्तेखार खान याने सगळ्यांना इस्लामचा स्विकार करण्याची सक्ती केलीय. जो कोणी इस्लाम स्विकारणार नाही त्यांना मृत्युदंड देण्यात येईल असाही आदेश दिलाय."
किरपा रामची ही कहाणी ऐकून गुरु तेग बहादूर सिंह यांचं मन द्रवलं, पण त्यांनी त्यांच्या विनंतीवर लगेच काही उत्तर दिलं नाही. बराच विचार केल्यावर काश्मिरी पंडितांशी बोलताना गुरु तेग बहादूर म्हणाले,
"बादशाहाच्या प्रतिनिधींना सांगा की, ज्या दिवशी गुरु तेग बहादूर इस्लामचा स्विकार करतील तेव्हा आम्हीही आमचा धर्म बदलू. ते बादशाहाशी दोन हात करायला तयार आहेत."
गुरु तेगबहाद्दूर. सर्व शिख समुदाय गुरु तेग बहादूर यांना 'सच्चा बादशाह' म्हणायचे आणि त्यावर औरंगजेबाच्या मनाचा तिळपापड व्हायचा. औरंगजेबाचा यावर आक्षेप होता. औरंगजेबाला वाटायचं की गुरु तेग बहादूर हेच खरे बादशाहा आहेत आणि आपण भारताचे शासक असून नकली बादशाहा आहोत. असंच जर सुरु असलं तर उद्या या संपूर्ण हिंदुस्थानात त्या गुरु तेगबहाद्दूरांनाच हिंदुस्थानचा बादशाहा समजतील. मग माझी जी आलमवीर बनायची इच्छा आहे. ती तशीच राहील. तसं पाहिल्यास गुरु तेग बहादूरांच नाव 'बहादूर' होतं. हे सुद्धा औरंगजेबाला खटकायचं. कारण हे नाव मुघल दरबारात उपस्थीत मान्यवरांना उपाधी म्हणून दिलं जात होतं. शेवटी औरंगजेबाने बदला घ्यायचा विचार केला व त्यातच ठरवलं की गुरु तेगबहाद्दूर सिंह यांना इस्लाम स्विकारायला लावावं. जेणेकरुन त्यांनी इस्लाम धर्म स्विकारल्यास जीत आपलीच होईल व आपल्या आलमवीर बनण्यातील अडथडाही आपोआपच दूर होईल व आपल्याला आलमवीर बनता येईल. असा विचार करुन त्यानं आपल्या सरदारांना आदेश दिला.
'गुरु तेग बहादूर यांना दिल्लीत आपल्यासमोर हजर करावं आणि इस्लाम स्विकारावा अन्यथा जीव गमवावा लागेल, असंही सांगावं.'
तो जल्लादी आदेश. तो आदेश मिळताच गुरु तेगबहाद्दूर यांना माहीत झालं की बादशाहाचे आपल्याला बोलावणे आहे. आता तिथं गेल्यावर आपला जीव जावू शकतो. अन् नाही गेल्यास ते कृत्य बुजदिलीपणाचं ठरेल. आपण तर शूर आहोत. मग त्याला का घाबरायचं. असा विचार करुन गुरु तेग बहादूर सिंह यांनी बादशाहाच्या भेटीला जाण्याचा विचार केला. तशी त्यांना १६६६ मध्ये शिवरायानं घेतलेली औरंगजेबाची आग्राभेट माहीतच होती व ती औरंगजेब बादशाहानं त्यांच्यासोबत केलेली दगाबाजीही माहीतच होती. त्यानंतर त्यांनी एक दिवस त्यांच्या कुटूंबियांचा आणि साथीदारांचा निरोप घेतला आणि सर्वांना सांगितलं,
"त्यांच्यानंतर पुढचे शिख गुरु त्यांचे पुत्र गोविंद राय बनतील. त्यांनाच शिखाचे दहावे गुरु बनवावं व आपल्या धर्माचे कार्य अविरत सुरु ठेवावे."
त्यानंतर ११ जुलै १६७५ रोजी गुरु तेग बहादूर आपल्या पाच अनुयायांसह दिल्लीकडे निघाले. त्यात त्यांच्यासोबत भाई मती दास, त्यांचे धाकटे भाऊ सती दास, भाई दयाला, भाई जैता आणि भाई उदय होते. थोडं अंतर चालून गेल्यावर त्यांनी भाई उदय आणि भाई जैता यांना पुढची बातमी काढण्यासाठी दिल्लीला पाठवलं. परंतु पुढच्याच दिवशी त्यांना रोपड पोलीस स्टेशनचे हकीम मिर्झा नूर मोहम्मद खान यांनी मलिकपूरमधील रंघारण गावात अटक केली.
रोपडहून त्यांना आणि त्यांच्या तीन साथीदारांना कडक बंदोबस्तात सरहिंदला नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना दिल्लीतील चांदणी चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. चार महिन्यांच्या या तुरुंगवासात त्यांचा आणि त्यांच्या तीन साथीदारांचा अतोनात छळ करण्यात आला.
गुरु तेग बहादूर सिंह यांना झालेली अटक. त्यातच त्यांचा अनन्वीत छळही सुरु होताच. त्यानंतर त्यांना आणि त्यांच्या तीन साथीदारांना दिल्लीच्या लाल किल्ल्यावर नेण्यात आलं. तिथं त्यांना हिंदू आणि शिख धर्माविषयी प्रश्न विचारण्यात आले. तिथं त्यांना विचारलं,
"जाणवं घालणाऱ्यांसाठी आणि कपाळावर टीका लावणाऱ्यांसाठी तुम्ही तुमचा प्राण का देताय?"
त्यावर गुरु तेग बहादूर म्हणाले,
"हिंदू जरी दुर्बल असतील तरी त्यांनी नानकांच्या दरबारात शरण मागितली आहे. जर मुस्लिमांनी ही मदत मागितली असती तरीही आम्ही त्यांच्यासाठी आमचे प्राण दिले असते."
************************************************
आज सकाळी सकाळी औरंगजेब बादशाहा उठला होता. त्यानंतर तो तयार झाला व तो सकाळी नऊ वाजता दिवाण-ए-आममध्ये दाखल झाला. तेथे आल्यावर तो त्याच्या रत्नजडित सिंहासनावर बसला. त्याने पांढऱ्या सिल्कचा झब्बा घातला होता. त्याच्या कमरेला एक सिल्कचा कमरबंद होता. त्याला रत्नजडित खंजीर लटकवला होता. डोक्यावर पांढराच साफा होता. बादशाहाच्या दोन्ही बाजूला किन्नर उभे होते. याकच्या शेपटीपासून आणि मोरांच्या पंखापासून बनवलेल्या पंख्यांनी ते बादशहाला वारा घालत होते.
बादशहाला आधी शिख धर्माची माहिती देण्यात आली. त्याला हे ही माहीत होतं की मुस्लिमांप्रमाणे शिखही मूर्तीपूजेच्या विरोधात आहेत. त्याला असं वाटत होतं की तो गुरु तेग बहादूरांना इस्लाम स्वीकारण्यास राजी करेल. त्यानंतर औरंगजेबानं बोलण्यास प्रारंभ केला.
औरंगजेबाने गुरु तेग बहादूरांना म्हटलं,
"तुमचा ना मूर्तीपूजेवर विश्वास आहे, ना या ब्राह्मणांवर, मग तरीही तुम्ही यांचं प्रकरण माझ्याकडे घेऊन का आलाय?"
गुरू तेग बहादूरांनी औरंगजेबाला आपल्या परीने सांगायचा प्रयत्न केला. मात्र तरीही औरंगजेब काही ऐकला नाही. शेवटी दरबारात स्पष्ट करण्यात आलं की, त्यांनी एकतर इस्लाम स्वीकारावा नाहीतर मरायला तयार व्हावं. गुरु तेगबहाद्दूर सिंह यांनी बादशाहाचं काहीही एक न ऐकल्यानं शेवटी त्यांना लोखंडी पिंजऱ्यात घालून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर औरंगजेबाने गुरु तेग बहादूरांकडे बरेच दूत पाठवले व विचारणा केली की त्यांनी इस्लाम स्विकारावा. तरंच सोडून देता येईल व आपला आणि आपल्या साथीदारांचा जीवही वाचवता येईल. परंतु त्यावर गुरु तेगबहाद्दूर यांनी आपला मुद्दा सोडला नाही. तसा तो एक दिवस उजळला.
तो एक दिवस. त्या एके दिवशी तुरुंगाचा प्रमुख गुरु तेग बहादूरा सिंहांना म्हणाला,
"तुम्ही इस्लाम स्विकारावा अशी बादशाहाची इच्छा आहे. जर तुम्हाला हे असं करणं शक्य नसेल तर निदान काहीतरी चमत्कार दाखवा, म्हणजे तुम्ही पवित्र पुरुष आहात यावर त्यांचा विश्वास बसेल."
यावर तेग बहादूर म्हणाले,
"माझ्या मित्रा, चमत्कार म्हणजे दैवी कृपा. ती दैवी कृपा काही जगासमोर जादू दाखवण्याची अनुमती देत नाही. त्याच्या कृपेचा गैरवापर केला तर त्याला राग येईल. असा चमत्कार दाखवण्याची मला गरज नाही, कारण आपल्यासमोर रोजच चमत्कार घडत आहेत. बादशाहा दुसऱ्यांना मृत्यूदंड देतोय पण त्याला अंदाज नाही आहे की, एक दिवस त्याला ही मृत्यू येणार आहे आणि हा चमत्कारच ठरणार आहे दैवी शक्तीचा."
गुरु तेग बहादूर आपल्या म्हणण्यावरुन माघार घेत नाही आहे, असं कळताच त्यांच्या साथीदारांचा छळ सुरु करण्यात आला. त्यावेळी प्रत्यक्ष गुरु तेगबहाद्दूर सिंह यांच्यासमोरच भर चांदणी चौकात जिथं आज कोतवाली आहे, तिथं कारंज्याजवळ भाई मती दास यांची वार करुन हत्या करण्यात आली. त्यांनी या अत्याचाराचा सामना शांती आणि धैर्याने केला. तिथं जवळच गुरु तेग बहादूर उभे होते, त्यांना पाहून मतीदास यांनी आशिर्वाद घेण्यासाठी हात जोडले. त्यानंतर त्यांनी वीरमरण पत्करले. परंतु ते घाबरले नव्हते. त्यानंतर सती दास यांना उकळत्या तेलात टाकण्यात आलं तर दयाला यांच्या अंगाला कापूस गुंडाळून एका खांबाला बांधण्यात आलं आणि नंतर त्याला आग लावण्यात आली व जाळून टाकण्यात आलं. असं कृत्य करीत असतांना कदाचीत गुरु तेगबहाद्दूर सिंह आपली भुमिका बदलवतील असं औरंगजेबाला वाटत होतं. परंतु ते सर्व होत असतांना ते दैवातील एक लेणं समजत गुरु तेगबहाद्दूर यांनी ते सगळं सहन केलं. परंतु ते टस चे मस झाले नाहीत.
गुरु तेगबहाद्दूर यांच्या साथीदाराच्या मारण्याचं कृत्य उघड्यावर भर चांदणी चौकात सुरु होतं. हा सर्व प्रकार पाहण्यासाठी तिथं मोठी गर्दी जमली होती आणि हे सर्व गुरु तेग बहादूर यांच्या डोळ्यासमोर सुरु होतं. त्यावेळी गुरु तेग बहादूर सिंह सतत वाहे गुरुंचा जप करत होते. त्यावेळेस तिथं जैता दास नावाचे आणखीन एक शिष्य उपस्थीत होते. त्यांनी त्या रात्री मारलेल्या इतर शिष्यांचे मृतदेह जवळून वाहणाऱ्या जमुना नदीत फेकून दिले. त्यानंतर गुरु तेगबहाद्दूर यांना मृत्युदंड देण्यात येणार होता. ज्या दिवशी गुरु तेग बहादूरांना मृत्युदंड देण्यात येणार होता, त्यादिवशी ते झोपेतून लवकर जागे झाले. कोतवालीजवळील विहिरीवर त्यांनी आंघोळ करुन प्रार्थना केली. अकरा वाजता त्यांना फाशीच्या ठिकाणी नेण्यात आलं. तिथं काझी अब्दुल वहाब बोरा यांनी त्यांना फतवा वाचून दाखवला. त्यावेळेस जल्लाद जलालुद्दीन समोर तलवार घेऊन उभा होता. त्या क्षणाला आकाशात ढग दाटून आले होते, लोक रडत होते. गुरु तेग बहादूर सिंह यांनी दोन्ही हात वर करून उपस्थितांना आशिर्वाद दिला. तसं पुन्हा एकदा काजीनं गुरु तेगबहाद्दूर यांना प्रश्न केला.
"आता शेवटचं विचारतो की तुला इस्लाम कबूल आहे की नाही? ते लवकर सांग. तसा आदेश आहे आमच्या आलमवीरांचा."
ती शेवटची वेळ. ते मरण डोळ्यासमोर दिसत होतं गुरु तेगबहाद्दूर सिंह यांना. तरीही न कचरता ते बाणेदारपणाने म्हणाले,
"मला बुजदिलासारखं मरण नको. मरण हवं विरासारखं. आपण मला मारुन टाकलं तरी चालेल, परंतु मी कधीही इस्लाम स्विकारणार नाही. कितीही जन्म झाले तरीही."
ते गुरु तेगबहाद्दूर यांचं बाणेदारपणाचं उत्तर. त्यानंतर काजी एवढा संतापला की त्यानं जलालुद्दीनला आदेश दिला व जलालुद्दीननं आदेशाचं पालन करुन गुरु तेग बहादूर सिंह यांचा शिरच्छेद केला. तसा त्यांचा शिरच्छेद करताच गर्दीत प्रचंड शांतता पसरली. ज्या ठिकाणी गुरु तेग बहादूर सिंह यांचा शिरच्छेद करण्यात आला, त्याच ठिकाणी नंतर सिसगंज गुरुद्वारा बांधण्यात आला. तेग बहादूर सिंह यांचे शिष्य जैता दास यांनी त्यांचं मस्तक दिल्लीपासून तिनशे चाळीस किमी अंतरावर वसलेल्या आनंदपूरला नेलं आणि त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाला, गोविंद रायला सोपवलं. त्यानंतर त्यांच्या मुलाने म्हणजेच गुरु गोविंद सिंहानं ते मस्तक आनंदपूर साहिबमध्ये सन्मानपूर्वक दफन केलं. त्यानंतर लखी शाह नामक व्यक्तीने कोतवालीपासून आठ किलोमीटर दूर असलेल्या रकाबगंज इथं गुरु तेग बहादूर सिंह यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तिथंच त्यांच्या स्मरणार्थ गुरुद्वारा बांधण्यात आला.
गुरु तेग बहादूर सिंह यांच्या बलिदानानंतर अनेक पंडितांनी शिख धर्म स्विकारला. काश्मिरी ब्राह्मणांचं नेतृत्व करणाऱ्या किरपा राम यांनीही शिख धर्म स्वीकारला. कारण गुरु तेगबहाद्दूर सिंह यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्यासाठीच बलिदान दिलं होतं. गुरु तेग बहादूर सिंह यांच्या बलिदानाने बऱ्याच गोष्टी बदलल्या. यातून भारतीय उपखंडाचा इतिहास बदलला. मानवी हक्कांसाठी लढताना दिलेल्या बलिदानापैकी हे एक मोठं बलिदान होतं आणि इथूनच हिंदुस्थानातील तमाम बलाढ्य मुघल साम्राज्याला शह देणारी ताकद मराठ्यात निर्माण झाली होती. ते त्यांचं बलिदान वाया गेलं नाही. त्यापासून बऱ्याच साम्राज्यानं बोध घेतला. मनाची तयारी केली. पुढं संभाजी महाराजांनीही त्यापासूनच बोध घेतला व औरंगजेब बादशाहासमोर तोही वीर झुकला नाही व हसत हसत त्यांनीही मरण पत्करलं होतं. जे एक प्रकारचं वीरमरणच होतं.
गुरु तेगबहाद्दूर यांचं वीरमरण. त्या मरणानंतर त्या मरणापासून प्रेरणा घेवून मराठेशाहीचा हस्तक संभाजी हसत हसत मरण पावला. त्यांनी औरंगजेबानं त्यांना दिलेल्या अनन्वीत वेदनाही सहन केल्या. परंतु ते औरंगजेब बादशाहासमोर झुकले नाहीत.
************************************************
औरंगजेब बादशाहा क्रुरकर्मा बादशाहा होता. तो अनन्वीत अत्याचार करीत होता लोकांवर. त्याला त्यात अतिशय आनंद येत होता. तसं पाहता तो काळ अतिशय धामधुमीचा काळ होता. गुरु तेगबहाद्दूर सिंहानंतर त्याचा मुलगा गोविंद सिंह शिखांचा दहावा गुरु बनला. शिखांचा दहावा गुरु बनल्यानंतर त्या काळात त्यांनी आपलं पुर्ण लक्ष धर्मसंगतीकडं वळवलं. परंतु हे करीत असतांना औरंगजेबाचा राग होताच गुरु गोविंद सिंहाला.
गुरु गोविंद सिंह शिखांचे दहावे गुरु म्हणून दाखल झाले होते. त्यांच्या मनात आपल्या पित्याच्या मरणाचं दुःख होतंच. तसा रागही त्यांच्या मनात धुमसत होताच. त्यामुळंच ते बदला घेण्याची वाट पाहात होते.
गुरु गोविंद सिंहाला जसा औरंगजेबाचा राग येत होता. तसाच राग येत होता माता गुजरीला. ती तर गुरु तेगबहाद्दूरांची पत्नी होती. तिच्याही मनात बदल्याची भावना होती व ती भावना वाढतच होती. परंतु ती बदला तरी कशी घेणार? ती युद्धमैदानात जावू शकत नव्हती.
गुरु गोविंद सिंहाला चार मुलं होती. एक मुलगा त्याच्या एका पत्नीचा होता. बाकी तीन मुलं दुसऱ्या पत्नीचे होते. त्या चारही मुलांना साहेबजादा म्हटलं जातं. त्यांची नावं होती अजीत सिंह, झुंजार सिंह, जोरावर सिंह आणि फतेहसिंह. फतेहसिंह व जोरावर सिंह अगदी लहान होते.
औरंगजेबाशी शिखाचे भरपूर युद्ध झाले होते. तसं पाहता औरंगजेब हा बादशाहा होता व त्याची फौजही मोठीच असायची. तसा चमकौर युद्धाचा प्रसंग. सरसा नदीजवळ गोविंद सिंहाचा परीवार वेगळा होणार होता. त्याचं कारण होतं औरंगजेबाशी लढणं. औरंगजेब असा काही दबत नाही हा विचार करुन गोविंद सिंहानं आपली आई गुजरीला म्हटलं,
"माते, फतेहसिंह व जोरावर सिंहाला तू घेवून जा. कुठेतरी आसरा घे. कारण जोरावर सिंह व फतेहसिंह लहान आहेत. ते युद्ध करु शकत नाहीत. शिवाय मी युद्धाच्या धांदलीत असल्यानं त्यांना सांभाळू शकणार नाही व तुझ्याकडेही लक्ष देवू शकणार नाही. तेव्हा तू त्यांना घेवून जा व स्वतःची सुरक्षा स्वतः कर."
ते गोविंद सिंहाचं म्हणणं. तसा गोविंद सिंहाच्या म्हणण्यानुसार माता गुजरी जोरावर सिंह व फतेहसिंह यांना घेवून निघाली. तसंच गोविंद सिंहानं आपले दोन साहिबजादे घेतले. त्यांना तो म्हणाला,
"तुम्ही माझ्यासोबत चाला. आपल्याला औरंगजेबाशी दोन हात करायचे आहेत. तसे मी तुम्हाला युद्धकौशल्य शिकवलेच आहे. घाबरायचं नाही."
गुरु गोविंद सिंहाचे ते बोल. ते बोल ऐकताच त्याची दोन्ही मुलं झुंजार सिंह व अजीत सिंह तयार झालीत आपल्या वडीलांसोबत जायला. त्यावेळेस ती किंचीतही कतरली नाहीत.
फतेहसिंह व जोरावर सिंह माता गुजरीसोबत निघाले होते. ती माता गुजरी. ना तिच्यासोबत कोणता सैनिक होता ना कोणती आशा. ज्यानुसार ती पुन्हा आपल्या परीवाराला मिळेल. शेवटी ती निघाली मार्ग सापडेल तिकडे ती चालू लागली. त्यातच तिला गंगू नावाचा तिचा नोकर मिळाला. जो बेईमान स्वभावाचा होता.
गंगू नोकर.........गुजरी माता दोन साहेबजाद्यांना घेवून रस्त्यानं निघाली होती. तसं जाता जाता तिला गंगू नोकर भेटला होता. ज्यानं कधीकाळी गुरु महालाची सेवा केली होती. गंगू नोकरानं तिला ही सहानुभूती दाखवली की तिला तो तिच्या परीवाराशी मिळवून देईल. तोपर्यंत तिनं त्याच्याकडे सुरक्षीत राहावं.
माता गुजरी गंगू नोकराकडं अधिवास करु लागली. त्यावेळेस तिनं फतेहसिंह व जोरावर सिंह यांना आपला पती गुरु तेगबहाद्दूर कसा शहीद झाला, याच्या गोष्टी सांगीतल्या होत्या. त्यानंतर तिनं संभाजी महाराजांच्या बलादानाचीही कहाणी फतेहसिंह व जोरावर सिंह यांना कथन केली होती. शेवटी ते दोनही वीर धर्मासाठी का शहीद झाले? याचंही महत्व तिनं फतेहसिंह व जोरावर सिंह यांना बयान केलं होतं. त्याच मुसळीत घडत होते फतेहसिंह व जोरावर सिंह. शेवटी त्यांच्यात त्या बालवयात एवढी हिंमत तिनं ठासून भरली की ते टस चे मस होवू शकले नाहीत त्यांच्या मृत्यूच्या अंतिम समयी. त्यातच ते पहिले बालवीर ठरले होते.
माता गुजरी व ते दोन्ही साहेबजादे गंगूच्या घरी गेले. तसं त्यांना गंगूचा सत्यपणा माहीत नव्हता. त्यामुळं ते तिथं अगदी बिनधास्त राहू लागले होते. त्यातच त्यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या औरंगजेबाच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटले नाहीत. तसा तो एक दिवस उजळला.
तो एक दिवस. औरंगजेबाच्या वजीराला फतेहसिंह व जोरावर सिंह व माता गुजरीबद्दल माहीत होताच त्या औरंगजेबाच्या वजीरानं आपला एक दूत गंगूला भेटायला पाठवला. तसा तो दूत आला. म्हणाला,
"आम्हाला माहीत झालं आहे की गोविद सिंहाचे दोन बंदे फतेहसिंह आणि जोरावर सिंह आपल्याकडे अधिवासात आहेत. ही बातमी खरी आहे का?"
तो त्या दुताचा प्रश्न. तशी माता गुजरी आणि त्या दोन्ही साहिबजाद्यांची माहिती गंगूनं सुरुवातीला द्यायला थोडेफार आडेवेढे घेतले. त्यानंतर तो दूत म्हणाला,
"आम्हाला पुर्ण माहिती आहे. परंतु ती माहीती आपल्याकडून हवी आहे. तशी माहिती आम्हाला सत्य कथन करावी. नाहीतर तुम्हाला माहीत आहे बादशाहा औरंगजेबाचा स्वभाव. एखाद्यावर खप्पामर्जी झालीच त्यांची तर ते त्याला सोडत नाहीत. शिवाय ते शोधून काढतात आणि मारुनही टाकतात खप्पामर्जी करणाऱ्यांना. अतिशय वेदना देवून. तळपत तळपत मारतात. आता सांगा, तुम्हाला तळपत मरायचं आहे की जिवंत राहायचं आहे? सांगा. सत्य काय आहे ते सांगा."
तो औरंगजेब बादशाहाच्या वजीराचा दूत. त्यावर गंगू नोकर म्हणाला,
"नाही नाही. माझ्याकडे कोणताच फतेहसिंह व जोरावर सिंह राहात नाही."
ते गंगूचं बोलणं. त्यावर दूत म्हणाला,
"तसं पाहिल्यास तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. पहिला पर्यायात आम्ही तुम्हाला पुष्कळ सारं धन देवू. अशर्फ्या देवू. जर तुम्ही सांगीतलं तर आणि दुसरा उपाय म्हणजे जर तुम्ही सांगीतलं नाही तर आम्ही तुम्हाला कैद करु. तुमच्या परीवारालाही कैद करु. तुम्हाला यातना देवू."
गंगू नोकरानं ते ऐकलं. तसा तो थोडा चूप बसला. परंतु तो चूप तरी किती वेळ बसणार. विचार करु लागला व काही वेळानं तो बोलता झाला. म्हणाला,
" नाही आहेत ते आमच्याकडं."
गंगूची सेवाभक्ती बोलून गेली होती. त्यावर चांगला विचार करीत गंगू म्हणाला होता.
"तसं पाहिल्यास आम्ही शोधूनच काढू त्यांना. ते कुठेही असतील तरीही. परंतु जर तुमच्याकडं ते मिळाले आणि ते आम्हाला जर कळलं तर विचार करा. विचार करा की तुमचे काय हाल होतील. तेव्हा एकतर तुम्ही अशर्फ्या पाहा. नाहीतर तुम्ही तयार राहा अत्याचार सहन करण्यास. तसं तुम्हाला माहीतच असेल. आमच्या बादशाहानं गुरु तेगबहाद्दूरलाही सोडलं नाही. त्याचे साथीदार व त्यांची कशी हत्या केली हा इतिहास काही जुना नाही. विचार करा. आम्ही तुम्हाला जास्त दिवस देत नाही. दोनचार दिवसात आपला विचार कळवा. येतो आम्ही." दूत म्हणाला.
दूत जे बोलायचं ते बोलून गेला. त्यानंतर तो निघून गेला. त्यानंतर दुताच्या बोलण्यावर गंगू नोकर विचार करु लागला. विचार होता माता गुजरी, फतेहसिंह व त्याचा भाऊ जोरावर सिंह यांचा.
गंगू नोकर विचार करु लागला. विचार करु लागला की आपण साधारण नोकर. शिवाय आपल्यालाही परीवार आहे. आपल्यालाही आपला परीवार महत्वाचा आहे. शिवाय आपण जर नाही म्हटलं तर ती बादशाहाची माणसं कधीतरी शोधूनच काढतील गुजरी आणि तिच्या दोन्ही नातवांना. अन् आपल्याला आणि आपल्या परीवाराला प्राणास मुकावे लागेल. शेवटी आपला प्राण आहे आणि आपला प्राण आपल्याला प्रिय आहे. शिवाय जर आपण त्यांना स्वतःच देवून दिलं त्यांच्या ताब्यात तर आपल्याला बदल्यात बऱ्याच अशर्फ्या मिळतील. तसाच एखादा जमीनीचा तुकडाही मागता येईल. तसा आपला प्राणही वाचेल.
गंगू नोकराचा तो विचार. दुसरा विचार होता, ' नाही नाही. ही स्वामीनिष्ठा नाही. आपण काहीतरी चुकतोय.'
गंगूच्या मनात बरेच विचार चालत होते. अशातच एक वेध त्याच्या स्वार्थी मनानं घेतला. विचार केला की जरी ही स्वामीनिष्ठा असली तरी त्या स्वामीनिष्ठेनं मला काय दिलंय आतापर्यंत. माहीत आहे की बादशाहाची खप्पामर्जी झालीच तर राजाचा रंक बनतो आणि त्याची खप्पामर्जी झाली तर रंकाचा राजाही बनतो. म्हणतात की बादशाहाजवळ भरपूर अशर्फ्या आहेत. शिवाय भरपूर जहांगीऱ्या आहेत. जमीन तर भरपूर आहे. काय करायचं आहे फतेहसिंह व जोरावर सिंहचं.
तो गंगूचा विचार. त्यातच तो तसा विचार करुन तयार झाला माता गुजरी आणि तिच्या नातवांना म्हणजेच फतेहसिंह व जोरावर सिंह यांना बादशाहाच्या वजीरांच्या सुपूर्द करायला. बदल्यात त्याला थोडीशी जमीन व काही अशर्फ्या हव्या होत्या आणि त्या द्यायलाही सरहिंदचा वजीरखान तयार होता. बदल्यात माता गुजरी आणि तिची नातवंड मागत होता. जी नातवंड आज त्याच्याच आश्रयाला होती.
वजीर खान...... बादशाहा औरंगजेबाचा एक वजीर. त्यानं आपले सैनिक पाठवून गंगूच्या निर्देशानुसार माता गुजरी व तिची नातवंड फतेहसिंह व जोरावर सिंह यांना आपल्या ताब्यात घेतलं. त्या बदल्यात त्यांनी गंगूला सोन्याच्या मोहरा बक्षीस म्हणून दिल्यात. त्यानंतर त्यांनी माता गुजरी व तिच्या दोन्ही नातवंडांना नेलं व अतिशय थंड अशा बर्फाच्या कमऱ्यात ठेवलं. त्यातच त्यानं त्यांना त्यांचं थंडीपासून संरक्षण करता येवू नये म्हणून एकही कापड त्यांना दिलं नाही. त्यावरुन वजीर खानचा उद्देश दिसून येत होता. तो त्यांना केवळ छळण्याचंच काम करीत होता. जणू त्याला वाटत होतं की अशा छळण्यानं त्यांना मुस्लीम बनविण्याचं आपलं स्वप्न साकार होणार व बदल्यात बादशाहा आपले कौतुक करणार. तशी ती रात्र त्यांची अतिशय कडाक्याच्या थंडीत गेली होती. तसा दुसरा दिवस उजळला.
दुसरा दिवस उजळला. त्या दिवशी वजीर खानाच्या सैनिकांनी त्यांना वजीरखानाच्या समक्ष उभं केलं. ज्यात भरल्या सभेत वजीर खानानं त्यांना प्रश्न केलेत. त्या प्रश्नांत त्यांच्यावर त्यांचे धर्म बदलविण्यावर जोर देण्यात आला. परंतु माता गुजरी व तिची दोन्ही नातवंड काही कच्च्या हिंमतीच्या बनावटीचे नव्हते की ते सहजासहजी इस्लाम कबूल करतील. त्यांच्यात त्यांच्या आजोबाचं म्हणजेच गुरु तेगबहाद्दूर सिंहाचं रक्त सळसळत होतं. तसंच त्यांची आजी माता गुजरीनं त्यांना गुरु तेगबहाद्दूर सिंह यांचं व संभाजी महाराजांचंही चरित्र सांगून त्यांच्यात हिंमत कुटकूट भरवली होती. शेवटी ते लहानसे साहिबजादे भरल्या सभेत वजीरखानाला जोरात म्हणाले,
"जो बोले सो निहाल, सत श्री अकाल."
सरहिंदचा गव्हर्नर वजीर खान.......धिप्पाड देहाचा क्रुर व्यक्ती. तो बादशाहा औरंगजेबासारखाच क्रुर होता. भल्याभल्यांची त्याच्यासमोर बोलायची हिंमत होत नसे. त्यातच ते लहानग्या वयातील फतेहसिंह व जोरावर सिंह. ते बोले सो निहाल, सत श्री अकाल असे बोलून गेले. त्यामुळं ते राजकुमार ते सगळं भरल्या सभेत बोलताच सर्व आसमंत गुंजला. त्यातच तिथं हजर असलेल्या मुलाजिमनं त्यांना वजीर खानासमोर आपलं मस्तक झुकवून उभं राहण्यास सांगीतलं. परंतु ते ऐकतील तेव्हा ना. ते बोलते झाले वजीर खानला न घाबरता. दोन्ही बालविरांनी किंचीतही किंतु परंतु मनात न ठेवता व किंचीतही वजीर खानास न घाबरता परत म्हणाले,
"आम्ही अकालपुरक आहोत. आम्ही आमच्या आईवडीलांच्या शिवाय कोणत्याही व्यक्तींसमोर आपलं मस्तक झुकवत नाही. असं करुन आम्ही आमच्या आजोबांच्या बलिदानाला व्यर्थ वाया घालवू इच्छीत नाही. जर आम्ही आमचं मस्तक तुमच्या समोर झुकवलं तर आम्ही आमच्या आजोबांना काय उत्तर देणार. ज्यांनी धर्मासाठी आपलं मस्तक कापणं बरोबर समजलं. परंतु शरणागती पत्करण्याच्या गोष्टीला प्राधान्य दिलं नाही."
ते दोन्ही साहेबजाद्यांची उत्तरे. ते ऐकून अचंबीत झालेला वजीर खान. त्यानं त्यानंतर बरंच काही केलं त्या साहेबजाद्यांना घाबरविण्यासंदर्भात. परंतु त्याचे सर्व प्रयत्न विफल झाले होते त्या लहानशा बाळबोध दोन्ही साहेबजाद्यांसमोर. तो पुरता खजील झाला होता ती उत्तरे ऐकून. कारण ती उत्तरे म्हणजे फतेहसिंह व जोरावर सिंहाच्या तोंडातून निघालेले बाणेदारपणाचे द्योतक होते.
************************************************
अजीत सिंह. गुरु गोविंद सिंहाचा मोठा मुलगा होता. त्याची आई होती महाराणी सुंदरी. त्याचे भाऊ होते झुंजार सिंह, जोरावर सिंह व फतेहसिंह. त्यांची आई होती जीतो.
चमकौरचं जे युद्ध झालं. त्या युद्धाचेवेळेस गुरु गोविंद सिंह यांनी साहेबजादा अजीत सिंह व त्याचा भाऊ झुंजार सिंह यांना सोबत घेवून लढलं होतं. त्यावेळेस साहेबजादा अजीत सिंह सतरा वर्षाचे होते.
अजीत सिंहचा जन्म ११ फेब्रुवारी १६८७. त्याचं पालनपोषण आनंदपूरला झालं. त्यानं घोड्यावर बसणे व तलवार चालवणे यासारख्या शिक्षा घेतल्या होत्या व त्यात तो तरबेज झाला होता. अजीत सिंह जेव्हा बारा वर्षाचा होता, तेव्हा त्याची नियुक्ती सैन्यात केल्या गेली होती.
सन १७०० ची घटना. गुरु गोविंद सिंह आनंदपुरात असतांना तिथं सरहिंदच्या मुगल फौजदारानं आपल्या सेनेद्वारा आनंदपुरलाच गुरु गोविंद सिंहावर हमला केला होता. त्यानं आनंदपूरला घेरलं होतं. संपूर्ण रसदच बंदाकरुन टाकली होती. जी काही गडावर होती. तिही संपण्यात जमा होती. काय करावं सुचत नव्हतं. अशातच गुरु गोविंद सिंहांनी आनंदपूरात आपल्या सैन्याचे काही गट पाडले होते. एका किल्ल्याचं नेतृत्व आपला मुलगा साहेबजादा अजीत सिंहला दिलं होतं. सरहिंदच्या वजीरखानामार्फत साहेबजादा अजीत सिंहावरही हमला झाला होता.
एकदा साहेबजादा अजीत सिंहावर हमला झाला होता, त्यावेळेस गुरु गोविंद सिंहानं आपला मुलगा अजीत सिंहाला तारागढ साहेबच्या रक्षेचा प्रभारी बनवला होता. त्यावेळेस मुगल सैनिकांसोबत अजीत सिंह व उदयसिंहची लढाई झाली. त्यात अजीत सिंह व उदयसिंह यांनी मुघल सैनिकांना चांगलीच धुळ चारली होती.
अजीत सिंह लहानशा वयात चांगले पराक्रम करु लागले होते. ज्यावेळेस ते बारा वर्षाचे होते, त्यावेळेस पंजाबच्या पोथोहर क्षेत्रात शिख संगतवर हमला केल्या गेला व संपत्ती लुटली गेली. त्यावेळेस गुरु गोविंद सिंह यांनी आपली कमान अजीत सिंहाला सोपवली व अजीत सिंहने लुटलेली संपत्ती ताब्यात घेतली आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा दिली. अजीत सिंह आपल्या युद्धकौशल्य जोरावर चांगला पराक्रम करु लागले होते. त्यांचा एक पराक्रम असाच वाखाणण्याजोगा होता. तो १५ मार्च १७०३ चा दिवस. देवकी दास नामक एक ब्राह्मण आनंदपुरात आला. त्यानं गुरु गोविंद सिंहांना म्हटलं,
"माझी पत्नी डेरा बस्सी प्रमुख चौधरी जबर खानाच्या ताब्यात आहे. मला ती हवी आहे. तेव्हा ती आपण परत आणून द्यावी."
त्यावेळेस गुरु गोविंद सिंहानं आपल्या मुलांना त्यांची मदत करण्याचा आदेश दिला. त्यानंतर साहेबजादा अजीत सिंह व त्याचा काका उदयसिंह यांनी जवळपास एकशे सैनिकांना सोबत घेवून बस्सीला गेले. त्यांनी गावाला वेढा घातला. त्यानंतर त्यांनी जबर खानाला एक संदेश पाठवला की त्यानं त्या ब्राह्मणाची पत्नी परत पाठवावी. नाहीतर आमच्याशी गाठ आहे.
अजीत सिंहचा तो संदेश. तो संदेश मिळताच जबर खान घाबरला नाही. नाही त्यानं त्या ब्राह्मणाला त्याची पत्नी परत करतो म्हटलं. उलट त्यानं आपल्या सैनिकांद्वारे साहेबजादा अजीत सिंहाच्या सैन्यावर हमला करवला. त्यानंतर युद्ध झालं व त्या युद्धात जबर खान मारला गेला. त्यानंतर रितीरिवाजानं साहेबजादा अजीत सिंहानं त्या ब्राह्मणाची पत्नी ब्राह्मणाला परत केली. ही गोष्ट जेव्हा लोकांना माहीत झाली, तेव्हा लोकांनी अजीत सिंहाच्या त्या पराक्रमाची स्तुती केली होती.
सन १७०४ उजळला होता. मुगलांनी आनंदपुरात घेराव केला होता. मुगलानं आव्हान केलं होतं की त्यांना फक्त आनंदपुरातील किल्ला हवा आहे. त्याला शहराचं नुकसान करायचं नाही. तेवढा किल्ला त्याच्या ताब्यात द्यावा. त्यानंतर आनंदपुर रात्रीला खाली केलं गेलं. अजीत सिंहाला रियरगार्डची कमान सोपवल्या गेली. त्यावेळेस अजीत सिंहानं आपले वडील, आपले लहान भाऊ, तसेच अन्य काही लोकांना सोबत घेवून त्यांनी सिरसा नदी पार केली. शत्रू मागे होता. तोही मागावर होता. त्यातच अजीत सिंह व सर्व परीवार चमकौरच्या दिशेने निघाले. त्यावेळेस बुद्धी चंद रावतच्या किल्ल्यावर काही काळ विश्राम केला. परंतु तिथं मुस्लीम सैनिक पोहोचले. त्यांनी किल्ल्याला घेराव टाकला. त्यानंतर तिथं मोठं युद्ध झालं व युद्धादरम्यान शिखांजवळील गोला बारुद व शस्रसाठा संपला. त्यावेळेस अजीत सिंहानं आपल्या सैन्याच्या तुकड्या केल्या. परंतु शत्रू सैन्याच्या फौजेसमोर कसा टिकाव लागणार होता शस्रसाठा संपला असतांना. शेवटी त्यावेळेस झालेल्या भीषण युद्धात साहेबजादा अजीत सिंह मरण पावले. त्यानंतर त्याचाच भाऊ झुंजार सिंह यानं त्या तुकड्यांचं नेतृत्व केलं.
ते चमकौरचं युद्ध. त्या युद्धादरम्यान सरसा नदी पार करुन निघालेले ते तिघेही जण. तसं पाहता पुर्ण परीवारच निघाला होता आनंदपूरवरुन. कारण आनंदपुरात मुघल सैनिकांच्या लाखोच्या संख्येत असलेल्या फौजेनं घेराव टाकला होता. त्यामुळंच कुठंतरी सुरक्षीत ठिकाण शोधणं आवश्यक होतं.
मुघलांचा सेनापती होता वजीर खान. त्याची लाखोच्या संख्येत विशालकाय फौज होती. त्यानं गुरु गोविंद सिंहाला धमकी दिली होती की जर ते पुर्ण परीवारासह आनंदपूर खाली करतील तर त्यांना सुरक्षीत जावू दिलं जाईल. आम्हाला फक्त आनंदपूरचा किल्ला हवा. जर ते आमच्याशी युद्ध करायला तयार असतील तर आम्हीही त्यांच्याशी युद्ध करु.
ती मुघलांची फौज. लाखोंच्या संख्येत असलेली फौज. गुरु गोविंद सिंहाजवळ तेवढी फौज नव्हती. त्यांना माहीत होतं की या लाखोंच्या संख्येत असलेल्या फौजेसमोर आपला टिकाव लागू शकणार नाही. तेव्हा आपण आनंदपूर साहिब सोडलेला बरा. त्यातच ते पुर्ण परीवारासह आनंदपूर सोडायला तयार झाले.
ती सरसा नदी. त्या नदीला भरपूर पाणी होतं. नदी दुथडी भरुन वाहात होती. काय करावं सुचत नव्हतं. त्यातच गुरु गोविंद सिंहाला त्याच्या लहान लहान मुलांची चिंता होती. फतेहसिंह, जोरावर सिंह लहान लहान होते. झुंजार सिंह व अजीत सिंह थोडे मोठे होते. तसं पाहता गुरु गोविंद सिंहांनी सर्वांनाचं अगदी लहानपणापासूनच युद्ध कौशल्य शिकवलं होतं. मोठे अजीत सिंह व झुंजार सिंह मार्शल आर्ट मध्ये पारंगत होते.
गुरु गोविंद सिंहांनी मुगलांच्या धमकीवरुन सरसा नदी पार तर केली आणि आनंदपूर सुपूर्द तर केलं वजीरखानाला. परंतु आनंदपूर सुपुर्द झाल्यानंतरही वजीर खान थांबला नाही. त्याची संतुष्टी झाली नाही व तो पुन्हा गोविंद सिंहाच्या मागावर चालून आला. तशी सरसा नदी पार करताच गुरु गोविंद सिंहाला कळलं की शत्रू मागावर आहे. त्यांनी आपल्या परीवाराची विभागणी दोन गटात केली. एका गटात फतेहसिंह, जोरावर सिंह, त्याची पत्नी सुंदरी व माता गुजरीला टाकलं. त्यांच्यासोबत गंगू स्वयंपाकी दिला व त्यांना आदेश दिला की त्यांनी अतिशय गुप्तपणे निघावं. तसं त्यांना सुरक्षीत नेण्याचं आश्वासन गंगूनं दिलं होतं. कारण गंगूचं घर तेवढ्यातच होतं. दुसऱ्या विभागणीत गुरु गोविंद सिंहांनी काही शिख बांधवांना टाकलं होतं की जे युद्धकौशल्य जाणत होते व ज्यांच्या दिशेनं शत्रू येवू शकत होता. त्यातच वजीर खानानं आपल्या सैनिकांना बजावून सांगीतलं होतं की गुरु गोविंद सिंहाला जिंदा वा मृत स्वरुपात पकडावं. परंतु गुरु गोविंद सिंहही तेवढेच हुशार होते. त्यांनी मुघल सेनापती वजीरखानला भूल दिली व आपल्या काही शिख खालसा दलाच्या तरुणांची काही तुकड्यात विभागणी केली व त्याची कमान सोपवली आपल्या दोन्ही पुत्रांवर. तसं पाहता दोन्ही पुत्रांनी त्या आधीच्या बऱ्याच युद्धात मुगलांना धुळ चारली होती. परंतु दुर्दैव असं की ह्या चमकौरच्या युद्धात अजीत सिंह मारला गेला व ते पाहात असलेला झुंजार सिंह थोडा हिंमतीनं खचलाच.
ते शत्रूंचं विशालकाय सैन्य. त्यातच गुरु गोविंद सिंहांचे ते नेमके सैन्य. त्या युद्धात ते सैनिक शहीद झाले. कारण खानाची फौज मोठी होती तर गुरु गोविंद सिंहाची फौज लहान. तसे त्यातही त्या सैन्यातील चाळीस सैनिक घाबरुन ते वजीरखानाला मिळाले होते. याचाच अर्थ असा की फौज नव्हती. तरीही त्या चाळीसही जणांनी खानाच्या फौजेचा निकराईनं प्रतिकार करण्याऐवजी ते त्यांना जावून मिळाले होते. अशातच मुगलांचा एक सेनापती नाहर खान गुरु गोविंद सिंहाच्या बाणापुढं टिकला नाही. तो मारला गेला. शिवाय ते चाळीस जण गेले तरी खालसा दलानं खानाच्या लाखोंच्या फौजेचा धुव्वा उडवीत अर्धेअधिक सैनिक मारले होते.
अजीत खान मरण पावला. तशी झुंजार सिंहाची हिंमत जरी थोड्याफार प्रमाणात खचली असली तरी ते आपल्या खालसा तुकडीला दाखवणं बरं नव्हतं. त्यातच त्यानं जोरदार आरोळी ठोकली. बोले सो निहाल सत श्री अकाल. तसा झुंजार सिंह बोलताच खालसा दल आणखी त्वेषानं लढू लागलं शत्रूंसोबत. परंतु दुर्भाग्य. दुर्भाग्य असं होतं की शत्रूंजवळ दारुगोळाही भरपूरच होता व अशातच तो चौदा वर्षाचा वीर धारातिर्थी पडला व थोड्या वेळातच तोही गतप्राण झाला. झुंजार सिंह. नावाप्रमाणेच तो झुंजार पणे लढला मुगलांच्या फौजेची. परंतु शत्रूसैन्यापुढे त्याचाही टिकाव लागला नाही.
गुरु गोविंद सिंहाचे दोन साहिबजादे. त्यांना चमकौरच्या युद्धात वीरमरण आलं होतं. तसे ते बरेचसे शिख सैन्य मरण पावले होते चमकौरच्या युद्धात. परंतु त्या शिखांनी लढून खानाला दाखवलं होतं आणि संपुर्ण मुगल सत्तेला दाखवलं होतं की शिख वर्ग देखील कमजोर नाही. तो अल्पसंख्येत जरी असला तरी मुगलांच्या अफाट सैन्याचा प्रतिकार करु शकतो आणि तेथूनच शिख साम्राज्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली होती.
************************************************
पंजे प्यारे.........शिखांची चमकौर युद्ध दरम्यान भरलेली परीषद. ज्याला पंजेप्यारे असं नाव दिलं गेलं आहे. तसा खालसा दल तयार करीत असतांना गुरु गोविंद सिंहानं शिख तरुणांसमोर तलवार उपसून विचारलं. "कोण कोण मरायला तयार आहे?" त्यावर ज्या ज्या लोकांनी होकार दिला. त्या त्या तरुणांना त्यांनी एका कमऱ्यात नेलं व रक्तभरली तलवार घेवून ते बाहेर येत गेले. जणू ते परीक्षा घेत होते आपल्या शिख तरुणांची. जेव्हा त्यापैकी पाचव्या व्यक्तीचा क्रमांक आला, तेव्हा गुरु गोविंद सिंहानं त्याला आत नेलं. त्यानंतर त्या पाचही जणांना सोबत घेवून ते बाहेर आले. हेच ते पंजे प्यारे.
चमकौरचं युद्ध सुरु होतं. वजीर खान मुगलांचा सेनापती म्हणून कार्य करीत होता. ते युद्ध जिंकता येईल की नाही याबाबत संभ्रम होता. अशातच पंजे प्यारेंची एक बैठक झाली व त्या बैठकीत ठरलं की मुगलांची फौज मोठी आहे. आपला टिकाव लागणार नाही. मग काय करावं. आपण शिताफीनं पळून जावं. तसा त्यांच्यासमोर महाराष्ट्रातील शिवरायांचाही इतिहास होताच. आग्र्याच्या कैदेत असतांना महाराज कैदेतून पसार झाले होते. तसेच त्यांच्याचसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या शिवा काशिदला पन्हाळ्याला ठेवून शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या कडेकोट बंदोबस्तातूनही निसटून गेले होते. याच इतिहासाची पुनरावृत्ती केली गेली गुरु गोविंद सिंहाच्या पंजे प्यारे परीषदेत. कोणीतरी म्हटलं,
"तुम्ही पळून जावं. नेतृत्व वाचलं तर आणखी सेना जमवता येईल. जर नेतृत्वच गेलं तर सारं जाईल."
ती पंजे प्यारे नावाची परीषद. ठरलं की पळून जावं. मग कोणत्या दिशेनं जावं. ठरलं आपण जटपूरला पळून जावं. परंतु पळून जातांना शत्रूनं ओळखलं तर......आपण वेषांतर करुन पळून जावं. तरीही शत्रूनं ओळखलं तर......
त्या पंजे प्यारे परीषदेतील सगळे शिख विचार करु लागले. मग विचार झाला. आपण तुमच्याचसारखा दिसणारा गुरु गोविंद सिंह बनवावा. त्याला तुमच्याजागी ठेवावा. शेवटी विचारच विचार. कोण बनवावा गुरु गोविंद सिंह. त्यातच त्यांना आठवलं संगत सिंहाचं नाव. संगत सिंह.......अति हुबेहुब गुरु गोविंद सिंहासारखा दिसणारा व्यक्ती. त्याला त्याच रात्री बोलावण्यात आलं. विचारणा केली गेली. कोणीतरी विचारलं,
"आपल्याला गुरु गोविंद सिंहाचे प्राण वाचवायचे आहेत. नेतृत्व वाचेल तर सर्व काही करता येईल. महाराष्ट्रात शिवरायांना वाचवलं होतं शिवा काशिद नावाच्या शिवाजीसारख्या हुबेहुब दिसणाऱ्या माणसानं पन्हाळ्यातून काढतांना. शिवाय बाजीप्रभू बलिदानी ठरले होते शिवाजींना वाचवतांना. इथं जर गुरुजी आपल्या सोबत राहिले तर गुरुजीही मरतील आणि आपण सगळेच. बोला, काय करायचं?"
संगत सिंहानं ते बोलणं ऐकलं. त्याला ती गोष्ट समजायला वेळ लागली नाही व तो म्हणाला,
"असं जर आहे तर मी गुरुजींसाठी तयार आहे. मिही गुरु गोविंद सिंह बनेल व गुरुजींना वाचवेल. गुरुजी वाचायला हवेत. मी मेलो तरी चालेल."
संगत सिंहाचे ते बोल. ठरलं, गुरुजींना वाचवायचं. मग घाई झाली. गुरु गोविंद सिंह तेवढ्याच तत्परतेनं वेषांतर करुन तेथून निघाले. त्यांच्यासोबत त्यांच्या रक्षणार्थ आणखी चार जण निघाले. बाकीचे युद्धात थांबले. तसे ते पसार झाले.
गुरु गोविंद सिंह पसार झाले. ते जटपुरला गेले. तेही दोन मुस्लिमांच्या मदतीनं, ज्यांचं नाव होतं गनीखान व नबीखान. ते फारच थकले होते. त्यावेळेस गनीखान व नबीखाननं गुरुजींची सेवा केली होती. त्यानंतर ते माई देशनजीच्या घरी पोहचले होते. तिथं ते काही दिवस राहिले.
संगत सिंह गुरुजींचं हुबेहुब रुप घेवून दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षरित्या सहभागी झाले होते. त्यांना कोणी ओळखू शकलं नाही. कारण ते हुबेहुब गुरु गोविंद सिंह सारखेच दिसत होते. तेही चमकौरच्या युद्धात शहीद झाले होते. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या राज्यात शिवा काशिद नावाचे लोकं होते. त्यामुळंच महाराष्ट्रात स्वराज्य राखता आलं. त्यासारखंच पंजाबातही संगत सिंह सारखे वीर होते. म्हणूनच शिखांचं अस्तित्व अबाधीत राहिलं. नाही तर त्यांचं अस्तित्वही केव्हाच नेस्तनाबूत झालं असतं ते आज जरी कळत असलं तरी त्यात शंका नाही.
************************************************
हिंमत अशी गोष्ट आहे की माणसाला जगणं शिकवते संकटावर मात करणं शिकवते. ती आपल्या मनात आत्मविश्वास निर्माण करते आणि त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर आपल्याकडून कोणत्याही स्वरुपाचं कठीणात कठीण कार्य घडवून आणते. म्हणतात की ज्याच्यामध्ये हिंमत असेल तर तोच खरा मर्द.
मर्द........मर्द याचा अर्थ माणूस नाही. मर्द याचा अर्थ पुरुषार्थ. ज्याला जीवनाला वा जगण्याला रंगत आणणे असं म्हणता येईल. अशी जीवनाला रंगत आजच्या काळात स्रिया देखील आणू शकतात. मग त्या मर्द नाहीत का? त्याही मर्दच असतात. म्हणूनच झाशीच्या राणी लक्ष्मीबाई बाबत म्हटलं जातं की खुब लडी मर्दानी वह तो झाशी वाली रानी थी आणि ते सत्य आहे. जी अशी मर्दासारखी कामं करीत असेल तिला मर्दानीच म्हटलं जातं व अशा इतिहासात बऱ्याच स्रिया झाल्या की ज्या मर्दानी ठरल्या. त्याचं कारण आहे हिंमत. मग कोणताही कठीणात कठीण प्रसंग का उद्भवेना.
इतिहासात वर्णीत असलेल्या महाराण्यात वर्णन करतांना झाशीची राणी लक्ष्मीबाईच झाली नाही तर, राणी पद्यावती, राणी संयोगिता, राणी येशुबाई, राणी ताराबाई, राणी चांदबिबी, राणी अहिल्याबाई व राणी चेन्नम्मा याही राण्या झाल्या की ज्या सत्तेवर असतांना ज्यांनी राज्यकारभार व्यवस्थीत चालवला. यात गुरु गोविंद सिंहाच्या आईचाही म्हणजेच माता गुजरीचाही समावेश आहे. तसं पाहता बऱ्याच स्रिया आजही शुरवीर आहेत. परंतु त्या हिंमत दाखवत नाहीत. तसंच इतिहासात असेही बरेच राजे झाले की ज्यांनी हिंमत दाखवली व स्वराज्यासाठी नाही तर आपल्या राज्यासाठी हिंमत दाखवली व हिंमतीच्याच भरवशावर राज्य टिकवून दाखवलं. तसंच केवळ हिंमतीच्या भरवशावर राजेच झाले नाही तर काही सामान्य लोकंही झाले की ज्यांनी हिंमतीच्या भरवशावर राज्य राखण्यास मदत केली. ज्यात शिवरायांच्या काळात झालेला शिवा काशिद आणि गुरु गोविंद सिंहाच्या काळात झालेला संगत सिंह. आज शिवा काशिद महाराष्ट्रापुरता मर्यादीत आहे व संगत सिंह पंजाब पुरता. त्यांना परप्रांतात गवगवा नाही. याच अनुषंगाने कवी कलश, मदारी मेहतर, बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी, धनाजी, संताजी यांचंही बलिदान वाखाणण्याजोगं आहे.
स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्यसमरात तर लहान लहान मुलांनी बलिदान दिलं. त्यात नंदूरबारचे शिरीषकुमार, घनश्यामदास, सुखदास आणि इतर देशातील बऱ्याच मुलांचा समावेश आहे. हे सगळं कसं घडलं याबाबत अभ्यास केल्यास नक्कीच जाणवेल की यात हिंमतीनं महत्वाची भूमिका बजावलेली होती. त्या स्वातंत्र्य समरात तर लोकं स्वतः होवून देशासाठी बलिदान द्यायला तयार होत होती. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास जालियनवाला बागेतील हत्याकांडाचं उदाहरण देता येईल की ज्यात जनरल डायरनं बेछूट गोळीबार केला होता. तसंच आपला जीव जाईल हे माहीत असूनही लाला लजपतराय यांनी सन १९२८ मध्ये सायमन कमीशनला गो बॅक म्हणत स्वतः मिरवणूक काढली व स्वतः मरण आपल्या अंगावर ओढवून घेतलं.
हिंमत.....हिंमतीच्या बाबत महत्वाचं सांगायचं झाल्यास हिंमतीनं संकटावर केवळ मातच करता येत नाही तर हिंमतीतून आपलं अस्तित्वही स्थापीत करता येतं. याच हिंमतीच्या जोरावर औरंगजेबाच्या लाखो सैन्याचा केवळ शिवरायांनी धुव्वा उडवला नव्हता तर त्याच हिंमतीच्या भरवशावर पुढं मराठ्यांनी औरंगजेबाचं पानीपत करुन दाखवलं होतं, आपल्या मुठभर सैनिकांच्या भरवशावर. तेच गुरु गोविंद सिंहानंही करुन दाखवलं होतं केवळ मुठभर खालसा सैनिकांच्या मदतीनं यात शंका नाही.
महत्वाचं सांगायचं झाल्यास हिंमत माणसात असावी. नसेल तर ती ठेवावी. कारण ती जर नसेल तर आपला कार्यभाग बुडतो आणि आपला कार्यभाग बुडाला तर आपण पुर्णच बुडतो असं म्हणता येईल. ज्यात हिंमत निर्माण झाली तर आत्मविश्वासही त्याच्या पाठीमागं निर्माण होते. मग आपल्या हातून कठीणात कठीण कार्यही घडून येते यात दुमत नाही.
हिंमत आणि आत्मविश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यात शंका नाही. हिंमत आणि आत्मविश्वास या एकाच नाण्याच्या दोन बाजू. कारण हिंमत नसेल तर आत्मविश्वास निर्माण होऊ शकत नाही व आत्मविश्वास नसेल तर हिंमतही निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच हिंमत आधी आपल्या मनात निर्माण करावी. मग आत्मविश्वासही आपोआपच आपल्या मनात निर्माण होत असते. तो निर्माण होवू द्यावा. कारण त्याच आत्मविश्वासाच्या भरवशावर आपला, आपल्या परीसराचा व आपल्या देशाचा विकास होवू शकतो हे तेवढंच खरं. आत्मविश्वास नसेल तर हिंमतीला काहीच अर्थ उरत नाही आणि हिंमत नसेल तर आत्मविश्वासाचाही काहीच उपयोग नसतो. आत्मविश्वासही व्यर्थ असतो व हिंमतही व्यर्थ ठरत असते.
गोविंद सिंह पळून गेले होते. ते पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. जीव वाचेल तर सर्वकाही करता येईल असं त्यांना कुणीतरी सांगीतलं होतं. तसं पाहता ते पळून गेले व त्यांचा जीव वाचला. परंतु त्यांचे पुत्र अजीत सिंह व झुंजार सिह कामास आले होते. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
ते शिखांचे बरेच सैनिक मरण पावले होते. कोणीही वाचला नव्हता. परंतु ती चमकौरची लढाई ते हारले नव्हते तर ती लढाई ते जिंकले होते. त्यात ते विजयी झाले होते. त्याचा राग वजीर खानला आला होता. शिवाय मुगलांच्या लाखोंच्या सैन्यांपैकी अर्धेअधिक सैन्य जास्त प्रमाणात मारले गेल्यानं तो माघारी फिरला होता व आणखीनच चिडला होता. त्यातच त्यानं ठरवल्यानुसार गुरु गोविंद सिंह त्याला चमकौरच्या युद्धात जीवंत वा मृतही न सापडल्यानं त्याला राग येणं साहजीकच होतं.
अजीत सिंह व झुंजार सिह. गोविंद सिंहाचे दोन पुत्र. ते मरण पावले असले तरी वजीर खान खुश नव्हता. त्याला अजीत सिंह व ते चार साहिबजादे हवे नव्हते. हवे होते गुरु गोविंद सिंह. कारण त्यांनी खालसा दलाची स्थापना करणं औरंगजेबाला पचनी पडलं नाही. म्हणूनच त्यानंच आदेश दिला होता की गुरु गोविंद सिंहाला मृत वा जिवंत पकडा. ज्यात चमकौरच्या युद्धाच्या वेळेसही यश आलं नव्हतं.
***********************************************
चमकौरचं युद्ध. ते युद्ध होण्यापुर्वी औरंगजेबाशी गुरु गोविंद सिंहांनी चौदा युद्ध केले होते. त्या सर्व युद्धात यशच मिळालं होतं गुरु गोविंद सिंहांना. तसं पाहता गुरु गोविंद सिंहाजवळ सैन्यदल कमीच असायचं. तरीही केवळ हिंमतीच्या भरवशावर ते युद्ध करीत व युद्धात विजयही संपादन करीत. त्याचंच आश्चर्य वाटत होतं औरंगजेबांना की कमी सैन्यदलाची संख्या असुनही गुरु गोविंद सिंह यश कसं मिळवतो आणि ती गोष्ट आश्चर्यही करण्यालायक होती.
वजीर खानाला चमकौरच्या युद्धानंतर फार राग आला होता. तो राग पाहता जे दोन साहिबजादे मरण पावले होते. त्याचा आनंद झाला होता त्याला. अशातच त्याच्या कानावर ती बातमी येवून धडकली. फतेहसिंह व जोरावर सिंह यांना कैद केलेलं आहे. तसा तो फार आनंदीत झाला. विचार करु लागला की आता आपण जिंकणारच.
वजीर खानाचा आनंद मनात मावत नव्हता. त्याला वाटत होतं की दोन साहिबजादे आपण संपवले. आता पुन्हा दोन साहिबजादे आपल्या कैदेत आहेत. ज्यांना आपण मुसलमान बनवू. जे ऐकून गुरु गोविंद सिंहाची मान खाली जाईल व तो लज्जीत होईल. त्यानंतर त्याच भावनेत विचार करीत करीत तो मृत्यू पावेल. मग त्यांच्या धर्माचं काय? जिथं मार्गदाताच संपेल. तिथं धर्म कसला? धर्मही आपोआपच संपुष्टात येईल.
आज आम्ही आमची मुलं जन्माला घालतो. त्यांना लहानाचे मोठे करतो. त्यांच्यासाठी स्वप्न पाहातो. कुणी डॉक्टर बनविण्याचे स्वप्न बघतात तर कोणी आपल्या मुलाला इंजीनियर बनविण्याची स्वप्न पाहतात. पण कोणाला जर विचारलं की आपल्या घरात फतेहसिंह व जोरावर सिंह बनवा तर मात्र बोबडी वळते. कारण आम्हाला फतेहसिंह व जोरावर सिंह आमच्या घरात नको असतात तर दुस-याच्या घरात आम्हाला ते हवे असतात. तसा कोणीही विचार करीत नाही. साधी साधी माणसं काही आपल्या स्वतःच्या मुलांना युद्धावर पाठवीत नाहीत. मात्र गुरु गोविंद सिंहानं आपली मुलं अगदी लहान वयाची असतांनाही युद्धावर पाठवली होती.
गुरु गोविंद सिंहांच्या मुलांबद्दल आमच्या मनात आदर आहे. पण खरंच आम्ही त्यांना खऱ्या स्वरुपात मानतो का? अन् मानत असेल तर आम्ही त्यांना जन्म दिलाच पाहिजे. त्या आमच्या मुलांना गुरु गोविंद सिंहांच्या मुलांसारखं घडवलं पाहिजे. असा विचार कोणी करीत नाही. त्यांनी तर मोगल बादशाहीशी युद्ध केलं. ते काटक जरी असले तरी त्यांनाही भीती वाटतच असेल थोडीशी. तरीही ते डगमगले नसावेत. कशासाठी? तर आपल्या धर्मासाठी. आज समस्त आमची मुलं. आजच्या आमच्या मुलाची जर मैत्री हवी असेल तर त्याने मैत्री श्रीमंत मुलाशी करावी असंच वाटतं आम्हाला. जो आमच्या लायक आहे.
महत्वाचं म्हणजे मी फतेहसिंह व जोरावर सिंह यांना जन्माला घालीन असा जर कोणी मनात प्रण केल्यास त्याला आजची जनता आज वेड्यात काढल्याशिवाय राहणार नाही. खरंच ती गुजरी माता थोर होती की जिनं धर्माची स्वप्न पाहात असतांना आपल्या केवळ वाणीने फतेहसिंह व जोरावर सिंह यांना घडवलं. धन्य ती माता की आपल्या नातवंडांचा जीव धोक्यात असतांनाही तिनं त्यांची हिंमत खचू दिली नाही. वजीरखानाच्या समोर जावू दिलं व त्याच्या समोर गेल्यावर डगमगायचे नाही हेच सांगीतलं. तिला माहीत होतं की हा वजीरखान आपल्या नातंवंडाना मारुन टाकेल आणि कोणत्या आजीस वाटते की आपली नातवंड मरावीत?
फतेहसिंह व जोरावर सिंह. ते कोणत्याही कामगीरीवर जात असताना आपल्या आईच्या वडीलांच्या पाया पडून जात असत. ते आपल्या आजीच्याही पाया पडत असत. ज्यावेळेस त्या दोघांना माता गुजरी पासून विलग करण्यात आलं, त्यावेळेसही त्यांनी आपल्या आजीच्या पाया पडल्या होत्या. त्याची आजीच एकमेव होती की ती त्यावेळेपर्यंत त्यांच्या सोबत होती. तिनंच त्यांना विजयाचा टिळाही लावला होता. तिलक होताच नतमस्तक होत ती लेकरं विलग झाली होती.
आजची मुलं जर पाहिली तर हा नतमस्तक होण्याचा संस्कारच दिसत नाही. त्यांच्याकडे पाहून असे वाटते की यांना मायबापाच्या आशिर्वादाची गरजच नाही. आजची मुले मायबापाला कचरा समजत जीवनभर वागतात. हवं तर वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात ठेवतात. त्यांची पत्नी येईपर्यंत सगळं ठीक असतं. पण नंतर ते एवढे बदलतात की पत्नीनं समजावलं तरी ते समजत नाही. मी, माझी पत्नी, माझी मुलं. एवढंच त्यांचं विश्व असतं. गुरु गोविंद सिंहांचं तसं नव्हतं. याउलट होतं. तो एक शिख होता की जे त्यांची आई मरतपर्यंत आईच्या आज्ञेत वागत असत. आईनं जे घ्यायचं म्हटल्यावर त्यांनी लढायची तयारी करावी. असंच त्यांचं व्यक्तीमत्व होतं. त्यानुसारच त्यांची मुलंही घडली होती. ज्यांनी आपल्याच बापाची रक्षा करतांना बलिदान दिलं होतं. आजीने जे जे सांगितले. ते ते कर्तव्य तिच्या नातवंडांनी पुर्ण केले होते. त्यासाठी त्यांनी आपले प्राण दिले होते.
गुरु तेगबहाद्दूरनं ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं ऐकलं होतं व तमाम हिंदू काश्मिरी पंडीतांना धर्म बदलविण्यापासून वाचवलं होतं. अगदी तसंच ऐकलं गुरु गोविंद सिंह यांनी. त्यांनाही चमकौर युद्धादरम्यान त्यांची मुलं अजीत सिंह व झुंजार सिंहांनी पळून जा म्हणताच ते निघून गेले होते युद्धातून. त्यानंतर त्या दोघांनीही चमकौर युद्ध गाजवलं होतं. संगत सिंहला हाताशी घेवून. संगत सिंह जेव्हा मरण पावला. त्यानंतर त्यांनीही संगत सिंहाला अंतर दिलं नसेलच.
गुरु गोविंद सिंहाचं काही कार्य महाराष्ट्रातील शिवबासारखंच मिळतं जुळतं आहे. ज्याप्रमाणे शिवबा मित्रासाठीही जीव लावायचे. शिवबासाठी जीवास जीव देणा-या मित्रांनाही शिवबाने अंतर दिले नाही. तानाजी कोंढाण्यावर शहीद झाल्यानंतर त्यांच्या पुत्राचे रायबाचे लग्न त्यांच्या गावी जावून शिवबाने लावून दिले. बाजीप्रभू देशपांडेच्या मुलालाही अंतर दिले नाही. तेच कर्तृत्व इतरही मित्रांच्या बाबतीत केले.
धर्माच्या बाबतीतही शिवबाचा दृष्टिकोण सहिष्णू स्वरुपाचा होता. काही कारणास्तव मुस्लीम झालेल्या नेतोजी पालकरला स्वधर्मात घेतले. पण त्यांना त्यासाठी बाध्य केले नाही. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी आधी शांततेचा दृष्टिकोण अवलंबिला. एखादा प्रभाग जर आपल्या राज्याला जोडायचा असेल तर तो भाग आपल्या राज्याला जोडण्यासाठी पहिलं वाटाघाटीचा मार्ग शिवराय अवलंबीत. पण शत्रू त्याने ऐकत नसेल तर मात्र हिंसाचार करीत असत. यात एखादा भाग जिंकलाच आणि युद्धात शत्रू राज्यातील महिला विधवा झाल्याच तर त्या विधवांनाही सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पार पाडीत असत. तेच गुरु गोविंद सिंह देखील करीत असायचे. तेच पाहून लहानाचे मोठे होत असलेल्या गुरु गोविंद सिंहाच्या मुलांनी त्यांच्यासाठी बलिदान दिले होते.
************************************************