Ekapeksha - 5 in Marathi Comedy stories by Gajendra Kudmate books and stories PDF | एकापेक्षा - 5

Featured Books
Categories
Share

एकापेक्षा - 5

नमस्कार मित्रांनो, पुन्हा आलो आहे मी तुमची भेट घ्यायला आणि तुम्हाला खीळखीळून हसवायला. तर मित्रांनो, मागील भेटीत मी माझ्या शालेय जिवनातील काही निवडक प्रसंग तुमचा सोबत शेअर केले होते. तर आज पुन्हा काही निवडक असे प्रसंग मी तुमचासाठी घेऊन आलेलो आहो. तर मित्रांनो, आजचा भेटीतील पहिला प्रसंग मी तुम्हाला सांगण्यास सुरुवात करतो. तर हा प्रसंग आहे आमचा आकाश बब्बा याचा. तर आकाश हा कमलेशचा क्वार्टर मध्ये प्रफुलचा शेजारी राहत होता. तो आमचा सगळ्यांचा पेक्षा वयाने मोठा होता आणि एक नंबरचा आळशी असा व्यक्ति होता. शिक्षणात तर एक नंबरचा मुर्ख असा होता. तो दहावीत सलग पाच वर्ष नापास होउन त्याने पंचवार्षिक योजना केलेली होती आणि अजूनही तो तेथेच थाबुन गेलेला होता. तर आकाश बब्बा बद्दल थोड़ी अल्प अशी माहिती सांगतो. आकाश हा आमचा परिसरातील एक निखट्ट् आळशी असा मुलगा होता, त्याचे बाबा हे फैक्टरीत साहेब होते. आकाशचा घरात त्याचे आई बाबा आणि दोन लहान बहिणी होत्या. म्हणजे आकाश हा एकुलता एक नागित्तर आणि विशेष म्हणजे घरातील मोठा मुलगा होता. तर आकाश हा पंचवार्षिक योजनेचा
मार्फत घरीच आसन मांड्न बसलेला होता. त्याचा दोन्हीही बहिणी या शिक्षणात चांगल्या होत्या तर त्या त्याचा पेक्षा पुढे आणि पुढे गेलेल्या होत्या.
आकाशचा घरचा सदस्यांची एक छान परन्तु विचित्र अशी सवय होती, ती म्हणजे रात्री जेवण झाल्यानंतर अर्धा तास तरी घरापासून लांब रस्त्यावर जाऊन फिरायचे. त्यातल्या त्यात एकानेच नव्हे तर सम्पूर्ण परिवाराने फिरायचे. आता तुम्ही म्हणाल फिरणे आणि ते सुद्धा सम्पूर्ण परिवाराचा बरोबर ही तर फारच चांगली गोष्ट आहे तर मी का बर विचित्र म्हणत आहे.
तर मी सुध्दा म्हणतो आहे की ही सवय छान आहे परन्तु प्रत्येक गोष्टीला काही वेळ काळ असतो. आम्हाला फिरायचे आहे म्हणजे फिरायचे आहे तिकड़े एकसारखा पाऊस येत असेल तरीही आम्ही फिरायला जाणार तिकडे छत्री घेउन जाणार परन्तु जाणार. ज्या पावसात आपण सगळे पावसात भिजण्यापासुन लांब राहण्याचा प्रयत्न करतो. हा परिवार नेमका त्या क्ष्णी सुद्धा फिरायला जातो. त्यातल्या त्यात त्या दोन्ही बापलेकांचा ड्रेसकोड हा सारखाच होता म्हणजे कमरेचा खली पांढरा पैजामा आणि वर पांढरी बनियान घालायची. त्या दोन्हीही बापलेकांची कदकाठी ही इतकी सारखी होती की मागचा बाजूने जर बघीतले तर आकाश कोण आणि त्याचे बाबा कोण आहेत हे ओळखायला येत नव्हते. तर बापलेकांचा याच एकसारखे दिसण्यामुळे एकदा तो हसण्याचा क्षण निर्माण झालेला होता, त्याची सुरुवात अशी झालेली होती की मी आधीच सांगितल्याप्रमाणे आकाश हा एक नंबरचा आळशी आणि कामचोर असा मूलगा होता, तर तो घरी रहायचा आणी त्याचा तो पहरावा असायचा खाली पांढरा पैजामा आणि वर पांढरी बनियान, तर आमचाकडे एक गणेश नावाचा मूलगा रहायचा माझा शेजारी. म्हणजे तो आणि मी एकाच क्वार्टर मध्ये शेजारी शेजारी रहात होतो. त्याने शिक्षण हे सोडले होते आणि तो खाजगी कंपनीत कामाला जायचा. त्यामुळे त्याची आणि आमची भेट ही संयोगाने व्हायची. त्याच बरोबर त्याचा मित्र वर्ग हा सुद्धा आमचा पेक्षा वेगळा होता. तर तो कधीही कामावरून यायचा तर त्याची सायकल ही फार वेगाने चालवत यायचा आणि आकाश जर रस्त्याचा बाजूला उभा असेल तर तो आकाशला अलगद चिमटा काढायचा. जर आकाश हा त्याचा घराचा ओटया वर उभा असेल तर तो जोराचा आवाजात, "बे आकाश म्हणायचा आणि निघून जायचा."
तर असाच एके दिवशी गणेश हा कामावरून आला त्याने बघितले की आकाश ओटयावर उभा आहे तर त्याने जोरात आवाज दिला, "बे आकाश" आणि तो पुढे निघून गेला मागे वळून सुद्धा बघितले नाही. असेच एकदोन दिवस झाले होते तर पुन्हा एके दिवशी गणेश कामावरून घरी येताना त्याला आकाश हा रस्त्याचा शेजारी उभा असलेला दिसला. तर त्याची सायकल वेगाने चालवत तो आकाशचा जवळ आला आणि आकाशचा बूडावर त्याने जोरात चिमटा घेतला. त्यानंतर तो तसाच मागे वळून न बघता त्याचा घरी निघून गेला. मग आला तो अधिक गमतीदार दिवस तर त्या वेळेस सुद्धा गणेश हा कामावरून घरी परत येत होता. तर त्याला आकाश हा रस्त्यावर फिरताना दिसला. यावेळेस मात्र गणेश याने आकाशचा पाठीवर एक जोरात थापड मारली आणि तो तसाच त्याचा घरी निघून गेला. यावेळेस मात्र त्याचा मगोमागे आकाश ही त्याचा घरी येऊन पोहोचला आणि त्याने गणेशला खाली बोलावले. तर गणेश गॅलरीत येऊन म्हणाला, " क्या हुआ आकाश बब्बा क्यों चिल्ला रहा है तू." मग आकाश बोलला, ' तू नीचे आ पहले. " गणेशला माहीत होते की आकाश कुणाशी भाडण भांडण करू शकत नाही की कुणावर हाथ उगारू शकत नाही. तर गणेश खाली आला मग आकाशने त्याचा गळ्यात हात घातला आणि तो त्याला त्याचा घराचा लांब त्या रस्त्यावर घेऊन गेला, तेथे जाऊन तो म्हणाला, " अबे गणेश क्या किया बे तूने मेरे ड्याडी बहोत चिल्ला रहे है तेरे नाम से और गाली दे रहे है. तेव्हा गणेश आश्चर्यचकीत झाला आणि तो म्हणाला, " तेरे पीताजी क्यों मेरे नाम से चिल्ला रहे है. लेकिन मेंरे को बता तू यह क्यों पूछ रहा है, तेरे को तो मालूम होगा ना." तेव्हा आकाश हा अनभिज्ञपणे बोलला, " अबे मै तो आज और अभी दस मिनिट पहले घर को आया हु, मैं तो पंधरा दिन से घर पे नही था, मैं मेरे बुआ के घर गया था."
आता मात्र गणेशला सगळी गोष्ट ही कळून चुकली होती आणि तो हसू लागला होता. आकाश त्याला म्हणाला, " बे तू पागल तो नही हो गया है मैंने क्या कोई चुटकुला सुनाया है क्या जो तू हस रहा है." मग गणेश त्याला बोलला, "बे आकाश तुम बाप बेटे कपड़े तो अलग अलग पहना करो बे" गणेशचे ते बोलणे ऐकून आकाश मात्र एकसारखा त्याचा तोंडाकड़े बघत राहिला त्याला गणेशचा बोलण्याचा अर्थ कळलाच नाही. मात्र तुम्हाला जरुर कळला असेल तरीही संगतो गणेशने ज्याचा बुडावर चिमटा काढला आणि मग दुसऱ्या दिवशी ज्याचा पाठीवर थापड़ मारली तो आकाश नव्हता तर ते त्याचे बाबा होते. तर मित्रांनो अशाप्रकारे कपड़े सारखे असल्यामुळे आणि कदकाठी एकसारखी असल्यामुळे तो हास्यास्पद असा क्षण निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशी गणेशने आम्हाला तो क्षण सांगितला तर आमचे हसू हे थांबतच नव्हते. तर मीत्रानों, माझ्या शालेय जीवनातील निवडक प्रसंगातील हा आणखी एक प्रसंग होता यानंतरचा प्रसंग तर याचा पेक्षा अधिक गमतीदार आहे ज्यामुळे एक नाही दोन नाही तर सम्पूर्ण परिसर आणि दुसऱ्या परिसरातील लोकांवर आधी भांडण करण्याची आणि मग हसण्याची वेळ आलेली होती.
शेष पुढ़ील भागात.......