Koun - 12 in Marathi Thriller by Gajendra Kudmate books and stories PDF | कोण? - 12

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

कोण? - 12

भाग – १२
शेवटी सावली तिचा स्वतःचा घरी एकदाची आली परंतु तिचा मानसिक आजारामुळे तिला अधून मधून तेथे जावे लागेल. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे शरीराने स्वस्थ अशा सावलीला मानसिक ताण हि एक नवीन प्रकारची व्याधी आयुष्यात भेट म्हणून तिला मिळाला होती आणि तिला आता तिचा सोबतच संपूर्ण आयुष्य जगायचे होते. आता हळू हळू सावलीचे जीवन सुरळीतपणे व्हायला सुरु झाले होते. ती आणि तिचा परिवार मागील सगळा त्रास विसरून आता एका नवीन दिवसाप्रमाणे पुढील आयुष्य जगत होते. सावलीची तब्येत आता पूर्वीपेक्षा फार बरी म्हणजे एकदम फुल एन्ड फायनल झाली होती. तिला आता तिचा पूर्वीचा दिवसांप्रमाणे आपल्या दैनंदिन कार्यात व्यस्त व्हायचे होते. म्हणून सावलीने एका कंपनीत कामासाठी अर्ज केलेला होता. देवाचा कृपेने तो अर्ज स्वीकार झालेला होता आणि सावलीला साक्षात्कार यासाठी बोलावण्यात आलेले होते. सावली ठरलेल्या दिवशी आणि वेळेत त्या कंपनीचा कार्यालयात उपस्थित झाली होती. तेथे गेल्यावर तिला कळले होते कि तिलाच नव्हे तर तीचासारख्या आणखी काही मुलींना तेथे बोलावले गेले होते.

तर त्यांचे साक्षात्कार सुरु झाले होते. क्रमाक्रमाने एक एक मुलगी आत केबिन मध्ये जाऊन तिचे साक्षात्कार देऊन बाहेर निघत होती. सावली तशी आधी सांगितल्याप्रमाणे हुशार तर होती परंतु वेळ आणि काळ कशी आहे आणि कधी बदलली आहे ते तिला पटकन लक्षात येत होती. त्या अनुषंगाने सावली तिचा क्रमांक येण्याचा प्रतीक्षेत बसलेली असतांना तिची नजर मात्र सगळीकडे म्हणजे त्या ऑफिस आणि तेथील स्टाफ याचा बोलण्या आणि वागण्यावर अचूक होती. ती सोबत सोबत केबिन मधून बाहेर येणाऱ्या मुलींचे चेहरे सुद्धा तिचा तीक्ष्ण नजरेने अचूक वाचत होती. तिला आता हळू हळू जाणवू लागले होते कि आत केबिनमध्ये काहीतरी वेगळ घडतय म्हणून ती आत अधिकच गंभीरतेने ते सगळ अनुभवू लागली होती. सावलीचा क्रमांक हा जवळ जवळ शेवटाचा जवळ होता म्हणून तिला फार वेळ होता. तर तिने बघितले कि मुली आत्मविश्वासाने आणि आनंदाने आत जात होत्या परंतु येतांना त्यांचा चेहरयावर तो आत्मविश्वास आणि आनंद काही दिसत नव्हता. शिवाय तिला खटकणारी गोष्ट हि होती कि अस फक्त सुंदर दिसणाऱ्या मुलींचा बाबतच होत होते. त्याच बरोबर काही साधारण आणि काही बघायला चांगल्या नसलेल्या मुलींचा साक्षात्काराची वेळ आणि सुंदर मुलींचा साक्षात्काराची वेळ यात सुद्धा अंतर होता.
कमी सुंदर मुलींचा साक्षात्कार हा पंधरा मिनिटांचा किंवा त्यापेक्षाही कमी असा होता आणि सुंदर मुलींचा साक्षात्कार हा अर्धा तास किंवा त्यापेक्षाही जास्त असा होता. असे नाही कि त्या सुंदर मुली सगळ्याच अति हुशार होत्या आणि त्या कुरूप किंवा कमी सुंदर मुली सगळ्या बिनडोक होत्या. अंतर एवढेच होते कि आत केबिनमध्ये बसलेली व्यक्ती तसे अंतर करत होती. असे करता करता त्या ऑफिसचा मध्यंतरचा जेवणाची वेळ झाली होती. म्हणून तेथील चपराशाने येऊन सांगितले कि उर्वरित मुलींचे साक्षात्कार हे जेवणानंतर होतील. असे सांगून तो निघून गेला आणि उरलेल्या मुली आणि सावली तेथेच बसले असतांना त्या केबिनमधून तीन पुरुष बाहेर पडले. त्यांनी चपराशाला विचारले तर त्याने सगळ्या मुलींकडे बोट दाखवले. मग ते तिघेही सगळ्या मुलींचा दिशेने बघत बघत निघू लागले. तेव्हा सावलीने अनुभवले कि त्या तिघांची नजर फक्त आणि फक्त मुलींचा बाहेरील सुंदरतेवर जास्त मोहित होत होती. ते स्वतः सुद्धा तेवढे हुशार आणि जाणकार नव्हते जेणेकरून कुणाचे साक्षात्कार ते घेऊ शकतील. सावली जवळ येत असतांना त्या तिघांनी हि सावलीकडे बघितले तर त्यांचा नजरी सावलीचा चेहऱ्यावरून तिचा सर्वांगावरून खाली खाली घसरत होती. असेच त्यांचा नजरा सगळ्याच मुलींचा सर्वांगावरून खाली गेलेली असेल. तर आता सावलीला काहीतरी घोळ होण्याचे संकेत तिचा मेंदू देऊ लागला होता.

जेवणाची वेळ असल्यामुळे ते सगळे जेवण्यास निघून गेले आणि सावली आणि त्या मुली तेथून निघून बाहेर एका बागेत येऊन घरून आणलेले जेवण जेवण्यासाठी येवून बसल्या होत्या. सावली आणि त्या मुलींत आता संवाद सुरु झालेला होता. शिवाय तेथे ज्या सुंदर मुलींचे साक्षात्कार झालेले होते त्या सुद्धा आलेल्या होत्या. म्हणून सहज सावलीने एका मुलीला उत्सुकतेवश विचारले, “ काय ग तुमचे साक्षात्कार झालेत ना मग तुम्ही का बर थांबले आहात. शिवाय तुमचे साक्षात्कार कसे झाले आणि कशाबद्दल विचारपूस झाली.” तेव्हा एक मुलगी बोलली, “ काही नाही ग आम्ही आत मध्ये गेलो तर तेथे बसलेल्या तिघांनी आम्हाला आत एका खुर्चीवर बसवले आणि ते तिघेही माझ्या तीन बाजूने येऊन बसले. त्यांनी मला अर्धा तास बसवून ठेवले आणि विणकामाचे प्रश्न विचारू लागले होते. कोणी माझ्या परफ्युमचे कौतुक करत होता तर कोणी माझा केसांचा. एकाने माझ्या कपड्यांची चौकशी केली तर एकाने माझ्या लिपस्टिकची. एकाने तर हद्दच केली त्याने आधी माझी उंची, वजन आणि नंतर माझा फिगर किती आहे ते विचारले.” आता तर सावलीचा संशय हा खात्रीत परिवर्तीत झालेला होता. ती एक नामवंत अशी कंपनी नव्हती परंतु गरज सगळ्यांना असते आणि आहे आयुष्यात. त्या गरजेखातर सावली आणि त्या मुली तेथे साक्षात्कारासाठी आलेल्या होत्या. शेष पुढील भागात ...........