Apradhbodh - 2 in Marathi Love Stories by Gajendra Kudmate books and stories PDF | अपराधबोध - 2

Featured Books
  • कोन थी वो?

    वो इक खाब है या हकीकत ये लफ्जों में बयान ना कर सकता है पता न...

  • क से कुत्ते

    हर कुत्ते का दिन आता है, ये कहावत पुरानी है,हर कोई न्याय पात...

  • दिल से दिल तक- 7

    (part-7)अब राहुल भी चिड़चिड़ा सा होने लगा था. एक तो आभा की ब...

  • Venom Mafiya - 1

    पुणे की सड़कों पर रात की ठंडी हवा चल रही थी। चारों ओर सन्नाटा...

  • बारिश की बूंदें और वो - भाग 6

    तकरार एक दिन, आदित्य ने स्नेहा से गंभीरता से कहा, "क्या हम इ...

Categories
Share

अपराधबोध - 2

श्वेता ही अवघी वीस वर्षांची असताना तिच्या परिवारासोबत नियतीने एक भयंकर असा घात केला. श्वेताचे बाबा एका दिवशी कामावरून घरी येत असताना त्यांच्या गाडीला एका मोठ्या गाडीने धडक दिली आणि ते त्या अपघातात गेले. श्वेताचे बाबा त्यांच्या मागे तिन्ही लेकरांचे भविष्य आणि त्यांचा संगोपणाची जिम्मेदार तिच्या आई वर सोडून गेले होते. त्यातल्या त्यात श्वेताची आई ही कमी शिकलेली होती तसे तिचे बाबाही कमी शिकले होते परंतु त्यांचे स्वप्न होते की आमची मुले आमच्यापेक्षाही जास्त शिकावे म्हणून त्यांनी सगळ्या मुलींना चांगल्या शिक्षण देण्याचे भरगस प्रयास आजवर केला होता. परंतु आता परिस्थिती ही बदललेली होती तिन्ही मुलांचे शिक्षण करण्यासाठी आता श्वेताचा आईला आपल्या घरातून बाहेर निघून काम कराव लागेल आणि सगळ्यांची पोट पोसावी लागेल. परंतु तिच्या आईच्या शिक्षणाच्या तुलनेत ती जे काम करायची त्याने फक्त परिवारातील सदस्यांचे पोट भरू शकत होते आणि तेही कधी उपाशी सुद्धा राहावे लागत होते. त्यावेळेस श्वेता ही वीस वर्षांची होऊन समजदार आणि थोडी परिपक्व झालेली होती तर श्वेताने त्यावेळेस एक धाडसी निर्णय घेतला तो त्याग आणि समर्पणाचा. म्हणून श्वेताने तिच्या शिक्षणाचा तुलनेत एक छानशी नोकरी शोधली आणि ती नोकरी करू लागली. तिने तिच्या बाबांची जिम्मेदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर उचलली होती.
आपल्या लहान भावबंधाच्या शिक्षण आणि भविष्यासाठी तिने आपले आयुष्य पणाला लावण्याचा निर्णय केला होता. तर तो काळ श्वेताचा आयुष्याचा एक फारच कठीण असा काळ होता. तर तो काळ श्वेताच्या आयुष्याचा एक फारच कठीण असा काळ होता. ती तीचा जिम्मेदारीचे जाणीवपूर्वक निर्वाहन करत राहिली. तिने आपल्या परिवाराच्या भविष्यासाठी स्वतःच्या स्वप्न इच्छा, आकांक्षा यांची आहुती दिलेली होती. त्या अनुषंगाने सारांशचा मनात प्रेमाचे बीज हे त्याचा कुमार वयातच रोपले गेले होते. लहान असतांना कसल्याही संबंध आणि नात्याची जाण नसताना अनयासपणे श्वेताला तो ताई म्हणायचा तिच्यासोबत तर त्याची जास्तीत जास्त वेळ घालवायचा. आता कुमार वयात पदार्पण करताच त्याला श्वेताचे आकर्षण आणि आपलेपण एका वेगळ्याच स्तरावर जाणवू लागले होते. तसे म्हणतात की मनुष्य आल्यावर किंवा येतांना जे काही सामान्य आणि असामान्य ज्ञान त्याला त्याच्या घरच्या मंडळीपासून भेटत नसेल ते ज्ञान त्याला बाहेरच्या अनोळख्या आणि ओळखीच्या परक्या लोकांपासून मिळत असते. त्याचबरोबर जगातील चांगले आणि या बाबीला कसल्याही पर्याय नाही असतो त्याला चांगल्या चांगल्या ज्ञानासोबत वाईटातील वाईट असे ज्ञान हे अशा लोकांपासून मिळते. फक्त आणि फक्त ते ज्ञान चांगले आहे की वाईट आहे हे त्याला स्वतःला ठरवायचे असते. त्याचबरोबर ते ज्ञान आत्मसात करायचे की नाही हे त्याने ठरवायचे असते. या बाबतीत मोठे त्याला फक्त मार्गदर्शन करू शकतात जबरदस्ती नाही.
सारांश ला नातेबंध यातील फरक कळू लागला होता आणि त्याला श्वेताची ओढ ही आधीपासून अधिकच लागली होती. परंतु याला काय आणि कसे म्हणतात हे माहित नव्हते. यात सारांशच्या मनाची तळमळ सारखी सुरू झाली होती. तो स्वतःशीच कधी कधी प्रश्न करायचा " श्वेताही माझ्या सख्ख्या नात्यातली मुलगी नाही आहे तर मी तिला ताई कसे म्हणू शकतो. ती काही माझी बहीण नाही आहे." त्या अनुषंगाने जसे कुमार वयातून तरुण वयात पदार्पण करताना शरीरात बदल घडतो सारांशच्या मनात आणि बुद्धीतही बदल घडवून घेऊ लागला होता. त्याची अनयासपणे एका मोठ्या अनुभूतीकडे वाटचाल सुरू झालेली होती आणि ती म्हणजे प्रेमाकडे. सारांशचे हावभाव आणि बोलचाल हळूहळू बदलत चालले होते. याची जाण त्या बिचार्‍या सारांशला त्याच्याबरोबर श्वेतालाही नव्हती. त्याच्या बरोबर श्वेताला त्याच्या बाबतीत साधी कल्पना नव्हती. ती तर त्यावेळेस फक्त आणि फक्त आपल्या कर्तव्याच्या पूर्ततीस पूर्णपणे समर्पित होती. तिच्या अवतीभवती काय आणि कसे घडून राहिले तिला त्याचे काही काहीच भान नव्हते. ती अजूनही सारांशच्या बरोबर चालत आणि बोलत राहिली. ती सारांशला निरागसपणे लहान समजून तशीच पूर्वीसारखी निखळ आणि निर्मळ असे प्रेम करत होती तिचा भाऊबंदाप्रमाणे. तसेच त्या बिचारीला दुसऱ्याला दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देण्याची साधी वेळ मिळत नव्हती. दिवसा भराचा त्रास आणि वेदना विसरण्यासाठी घरी येऊन ती आपल्या भाऊबंद आणि सारांश याच्यासोबत हसत त्याच्यावर प्रेम करत आपली वेळ घालवीत होती.
शेष पुढील भागात.........