Mall Premyuddh - 58 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 58

Featured Books
Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 58

मल्ल प्रेमयुध्द






क्रांतीचा फोन वाजला. तिने आर्याचा नंबर सेव्ह करून ठेवला होता.
"हीच फोन???" तरीही क्रांतीने फोन उचलला.
"हॅलो.."
"वीर कुठे?"
"मला काय म्हायीत?"
"मला माहीत आहे न ... तू जिंकून मोठा तिर मारला आहेस म्हणून तो परत तुझ्याकडे आला आहे. साधा माझा फोन उचलत नाही. आज पाच दिवस झाले तो म,ह्याशी बोलला नाही की आला नाही माझ्याकडे..."
"पण मग मला काय म्हायीत ते कुठे गेलेत? माझा नि त्यांनाच काहीही संबंध नाही. मी माझ्या माहेरी हाय." क्रांतीने फोन ठेवून दिला.
"हॅलो... हॅलो.." आर्या जोराने किंचाळली.
"सगळे सारखेच... 'पपा ssss 'पपाsss" आर्यांचे 'पपा पळत आले.
"काय झालं बेटा?"
"त्याच काही समजलं का?"
"बाळा माणस लावलेत मी कामाला अजूनतरी कोणालाही सापडला नाही. तू क्रांतीला फोन केलास का? "
"हो... तिच्याकडे नाही..."
"खोटं बोलत असेल ती."
"नाही 'पपा ती खोटं नाही बोलत."
"अग तीच प्रेम जर तिला परत मिळत असेल तर ती खोत सुद्धा बोलू शकते ना."
"नाही 'पपा ती नाही खोटं बोलणार एवढ्या दिवसात तर ववधी तरी मी तिला ओळखली. 'पपा आपण त्याच्या घरी जाऊन येवुयात का?"
"नको... तो घरी जाणार नाही कारण त्याच्या घरातले अर्ध्याच्या वर लोक त्याच्या विरोधात आहेत. मुंबईत शोध घेऊ मग बघू जर नाही सापडला तर आपण गावी डायरेक्ट जाऊ फोन न करता."
"ठी आहे 'पपा मज जरा त्याच्या आजूबाजूला चौकशी करते."
"बाळा तू नको पळू आपली माणस आहेत ना त्यांना सांगतो मी."

"'पपा त्याने जर मला फसवल तर??"
"तुझ्या बापाशी पंगा घ्यायची कोणाची ताकत आहे का ते हह्य गावामधून आलेल्या पोराची असेल. तू अजिबात काळजी करू नकोस आपण नक्की शोधून काढू त्याला."


समीर आणि रत्ना प्रॅक्टिस करून बसले होते.
"यार ही कधी परत येणार?"
"कोण??"
"कोण काय ग...? आपला तिसरा पार्टनर..."
"कोण र?"
"मुद्दाम करतेस ना? मला त्रास द्यायला."
"न्हाय र... मला म्हायती हाय तुला लई आठवण येती पण आर राहू दे की थोडे दिस कंटाळली हाय ती... अन तुला सांगते ती इथं जरी असली तरी रोजची प्रॅक्टिस चालू असणार."

"हो ग दोन दिवस झाले की आता... मी फोन करतो तिला..."

"समीर करमत न्हय व्हय तुला...?"
"अजिबात नाही ग.. ती जवळ नसली मग बर वाटत." रत्ना विचारात पडली. "हा प्रेमात पडला की काय क्रांतीच्या...?"
"लावू का फोन??"
"लाव बाबा तुला काय चैन न्हय पडणार..."


क्रांती फोन हातात घेऊन बसली होती .
"करू का ह्यांना फोन ? कुठं गेल असतील डोक्यात राग घालून... मी जिंकली याच एवढं दुःख झालं का ह्यांना? मला वाईट वाटतंय की मी ज्यांचा तिरस्कार करायची त्यांच्या प्रेमात पडायला भाग पाडले त्यांनी मला... आणि स्वतः काय केलं???" चिनू तिच्या पुढे येऊन उभी राहिली.
"तायडे काय झालं?" क्रांती तिच्याच विचारात होती. चिनूने तिला हलवलं.
"तायडे..."
"हा..'
"काय झालं?"
"आर्याचा फोन व्हता... वीर आलेत का विचारात व्हती."
"दाजी अन ते का येत्याल तुझ्याकड?" तेवढ्यात परत क्रांतीचा फोन वाजला.
"समीर.. हॅलो.."
"काय मॅडम जिंकला अन आम्हाला विसरला .. हो न... एक फो करायचा होता गेल्यानंतर... तुला नाही न आठवण येत."
"आर तिला बोलून देशील का?" रत्ना पलीकडून म्हणाली.
"हो... हो.. किती बोलतोयस आर..."
"मग काय इथं मला करमत न्हाय."
"बर एक मला आर्याचा फोन आला व्हता."
"का? तुला का फोन केला तिने."
"वीर तिचा फोन उचलत नाय अन रूममध्ये पण न्हय तिला वाटलं माझ्याकडं आल्यात पण माझ्याकड का येत्यात ना ते...."
"पण मग वीर गेला कुठे?" रत्ना त्याला टिकडू खुणावत होती काय झालं? त्याने हातानेच थांब म्हणाला.
"व्हय ना समीर फो करू का त्यांना?"
"नको मी साठे सरांशी बोलतो. त्यांना काही अहित शे का विचारतील किंवा तयाना कॉल करायला सांगतो." थांब रत्नाद
सोबत बोल.
"हॅलो क्रांते काय झालं ते मी ऐकल पण तू फोन करू नकोस."

" काळजी वाटती ग..."
"तुझा इतर केला का त्यांनी...?"
"पण माझं..."
"बस बस...घटस्फोट व्हाईल आता त्यांचा इचार मनातन काढून टाक. ठेवते."

"तायडे रत्ना खरं बोलतीया...कशाला तू दाजींचा इचार करतीस? मला माहितीये की ते कुठ गेल ते कोणालाच माहित नाय म्हणून काळजी वाटती तुला..."चिनू म्हणाली.

"चिनू तू ऋषीला फोन करून बघतीस का? त्यांना सांग की वीरला फोन करून बघा म्हणून... कारण मी भूषणभाऊजी ला सांगितलं असतं पण त्यांचा सुद्धा फोन ते उचलणार नायत, एक काम करते तेजश्री वहिनींना विचारू का?"

"तायडे तू शांत बस जरा काळजी करू नकोस... ते कुठे सुद्धा गेल नसत्याल आणि आज गेल असल तरी सुखरूप असत्याल, बदला घ्यायला त्यांनी एवढं मोठा विचार केला म्हटल्यावर तू जिंकलीस. तर ते हरण्याचा विचार करत्याल का?" चिनू तिला समजावत म्हणाली.

" चिनू कोणाच्या मनात काय कधी असल काय सांगता येत नाय. त्यांच्या डोक्यात काय असल मला तरी याचा कायच अंदाज येत नाय... मी तेजश्री वहिनींना फोन करती आणि इचारते."

क्रांतीने तेजश्रीना फोन केला. तेजश्री बराच वेळ झाला. तरी फोन उचलत नव्हत्या. क्रांतीला आता अजूनच काळजी वाटायला लागली. वाड्यात सगळे खाली वीर कड बघत होते. वीरची दाढी वाढलेली. केस विस्कटलेले. तसाच तो बॅग घेऊन वाड्यात आला होता. आई, तेजश्री, संग्राम कोणी काहीच बोललं नाही. पण शेवटी आबा म्हणाले,
"वीर काय हालत करून घेतली? काय झाल?" वीर काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने बॅग सोफ्यावर टाकून दिली. आणि धडधड वरती निघून गेला. त्याला काही समजत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. आबा त्याच्या मागे मागे गेले.
" वीर... वीर ..." संग्रामने आबांना हाक मारली.
"आबा तुम्ही थांबा तुम्ही त्याला एवढ्यात काही इचारू नका, त्याला आराम करू दे त्याचा त्याला एकटा तर राहू दे..." संग्रामच आबांनी पहिल्यांदा ऐकलं आणि आबा खाली आले. आबा पटकन सोफ्यावर बसले आणि म्हणाले,
" काय झाली माझ्या पोराची अवस्था? मोठ्या पैलवान व्हायची स्वप्न मी बघत व्हतो. त्याची अवस्था बघून मला सहन होत नाय. सुलोचना बाईंनी पहिल्यांदा त्यांचे तोंड उघडल म्हणाल्या,
" ह्याला पण जबाबदार तुमी हाय माझ्या पोराचं वाटोळ करायला..."

आबा सुलोचना बाईंच्या तोंडाकडे बघत होते.
" तू मला उलट बोलतीस... तुझी हिम्मत कशी झाली माझ्यापुढ तोंड उघडायची."
आता मी तुमाला घाबरणार नाय, कारण खर ते खर तुमच्यामुळ सगळ झाल तुमी त्याला त्यायळस पाठीमाग घातला नसता आण म्हणलं असता लग्न झाल तुमच आता नीट रा.. सगळं डोक्यातन काढून टाक. तर ऐकलं असतं त्यानी तेवाच पण नाय.. तुमी त्याच्या पाठीमाग उभ राहिला चुकीच्या गोष्टीत. म्हणून पोरच अस झाल." मला तर हे माहीत असतं तर मी हे लग्न हुन दिल नसतं." आबा निशब्द झाल आबा पटकन खाली बसल. काहीही न बोलता... सुलोचनाबाईंना थोडासा आश्चर्य वाटलं पण त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.