Kimiyagar - 1 in Marathi Classic Stories by गिरीश books and stories PDF | किमयागार - 1

Featured Books
Categories
Share

किमयागार - 1

Alchemist या इंग्रजी पुस्तकाचे हे भावांतर आहे.
किमयागार - सुरुवात
त्या मुलाचे नांव सॅंटीआगो. तो मेंढपाळ होता. संध्याकाळ झाली होती. तो मेंढ्याना घेऊन प्रवास करत एका उजाड चर्चजवळ पोहोचला होता. त्या चर्चचे छप्पर उडाले होते. तेथे खुप उंबराची झाडे होती. त्याने ती रात्र तिथे काढायचे ठरवले. त्याने सर्व मेंढ्या दरवाजातून आत आल्याची खात्री केली व आजुबाजुने लाकडे लावली जेणेकरून कळपातील कोणी इकडे तिकडे जाऊ नये. त्या भागात लांडगे जरी नसले तरी एखादी मेंढी चुकली असती तर त्याचा दुसरा दिवस शोधण्यात गेला असता.
त्याने आपल्या अंगावरील जाकीट खाली पसरले, व तो वाचत असलेले पुस्तक उशीसारखे घेतले. त्याच्या मनात आले आता थोडे जाड पुस्तक आणले पाहिजे म्हणजे उशी म्हणूनपण चांगला उपयोग होईल आणि वेळही ही जास्त जाईल.
त्याला जाग आली तेव्हा तसा अंधारचं होता. पडक्या छपरातूंन तारे दिसत होते. आपण थोडा वेळ आणखीन झोपलो असतो तर, असा विचार त्याच्या मनात येउन गेला. मागच्या आठवड्यात पडलेले स्वप्नचं त्या रात्री ही पडले होते पण याही वेळी ते पूर्ण होण्याआधीच त्याला जाग आली होती.
तो उठला व मेंढ्यांना जागे करू लागला, त्याच्या लक्षात आले की तो जेव्हा जागा झाला होता तेव्हा कळपातही हालचाल सुरू झाली होती. जणुकाही एका अद्भुत धाग्याने त्याचे व मेंढ्यांचे जीवन जोडले गेले होते. तो गेली दोन वर्षे अन्नपाण्याच्या शोधात त्यांना घेऊन फिरत होता. त्याच्या मनात आले की आता यांना माझी इतकी सवय झालीय की माझी दिनचर्या त्याना माहीत झाली आहे पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या लक्षांत आले की खरेतर त्याला त्यांची दिनचर्या सवयीची झाली आहे.
कांहीं मेंढ्या उठायला वेळ लावणाऱ्या होत्या. त्याने आपल्या काठीने एक एक मेंढीला नावांने हाक मारत उठवले. मेंढ्यांना आपले बोलणे कळते असा त्याचा विश्वास होता.
तो पुस्तकांतील आवडलेले उतारे त्यांना ऐकवत असे, मेंढपाळांच्या एकटेपणा बद्दल तसेच सर्व
सुखकारक गोष्टी, तसेच गावातील गोष्टी ही सांगत असे.
पण गेल्या काही दिवसांत त्याच्या बोलण्यात एकचं विषय होता आणि तो म्हणजे चारचं दिवसांत तो ज्या गावात पोहोचणार होता, त्या गावातील व्यापाऱ्याची मुलगी. त्याच्या एका मित्राने त्या व्यापाऱ्याबद्दल सांगितले होते व त्या व्यापाऱ्याला लोकर त्याच्या समोरच काढून हवी असे म्हणून तो मेंढ्या घेऊन तेथे गेला होता.
तो व्यापाऱ्याला म्हणाला मला लोकर विकायची आहे. दुकानात गर्दी असल्यामुळे व्यापाऱ्याने दुपारपर्यंत थांबण्यास सांगितले. मुलगा दुकानाच्या पायरीवर बसला व पिशवीतून पुस्तक काढले व वाचू लागला. मागून एका मुलीचा आवाज आला, 'मेंढपाळ वाचन करू शकतात हे मला माहित नव्हते.' ती मुलगी त्या प्रदेशातील मुलींसारखी होती तीचे काळेभोर केस वाऱ्याने उडत होते आणि डोळे आर्जवी होते. तो म्हणाला 'खरेतर मी पुस्तकां पेक्षा माझ्या मेंढ्यांकडूनच शिकतो.' दोन तासांच्या त्यांच्या बोलण्यातून त्याला कळले की ती व्यापाऱ्याची मुलगी आहे. गावातील जीवनाविषयी चर्चा झाली की गावातील सर्व दिवस सारखेंच असतात. त्याने तीला तो ज्या गावातून, शहरांतून जाऊन आला होता त्याबद्दल सांगितले. तो रोज मेंढ्यांबरोबर बोलत असे, हा एक वेगळाच सुखद बदल होता.
तीने विचारले "तुला वाचायला कसे येते ? ".
तो म्हणाला सगळे शिकतात तसेच " शाळेत "
त्यावर ती म्हणाली
" मग तू मेंढपाळ कां आहेस ?".
उत्तरादाखल तो काही तरी पुटपुटला आणि तीच्या प्रश्नाला उत्तर देणे टाळले. त्याला खात्री होती की तीला त्याची बाजू समजणार नाही. त्याने तीला आपल्या प्रवासातील गोष्टी सांगितल्या त्या ऐकून तीचे चमकदार डोळे विस्फारले गेले, त्यात आश्चर्य दिसत होते. जसा वेळ जात होता तसें त्याला वाटू लागले की हा दिवस संपूच नये, तीचे वडील इतके व्यस्त राहू देत की तीन दिवस थांबावे लागेल. त्याच्या लक्षात आले हा वेगळाच अनुभव आहे, आपल्याला एकाच ठिकाणी थांबावे असे वाटू लागले आहे. या काळ्याभोर केसांच्या मुलीबरोबरचे दिवस किती छान असतील. पण थोड्या वेळाने व्यापारी आला व त्याला चार मेंढ्यांची लोकर द्यायला सांगितले व पैसे देऊन पुढील वर्षी येण्यास सांगितले.