Mall Premyuddh - 49 in Marathi Love Stories by Bhagyashali Raut books and stories PDF | मल्ल प्रेमयुद्ध - भाग 49

Featured Books
Categories
Share

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 49

मल्ल प्रेम युद्ध


संग्राम तेजश्रीची वाट बघत बसला होता. बारा वाजून गेले तरी अजून तेजश्री किचनमध्येच होती. सगळे झोपायला गेले तरी काय करती बघायला तो खाली आला. तेजश्री सगळी आवरावर करून हात पुसत खुर्चीवर बसली होती. संग्रामला बघून तिच्या चेहऱ्यावर हसू आल.

"काय पाहियीजे व्हय?" तेजश्री
"काय व एवढा चेहरा का पडलाय?"संग्राम
" काय नाय हो पाय दुखत व्हते थोड."
"किती दिवस झाल एवढं सगळं काम करताय. पाय दुखणार नाय तर काय व्हईल... किती येळ झाला तुम्ही किचनमधीच काम करताय. सगळी झोपलीत की..."
"हा व थोडंसं राहिलं व्हतं म्हटलं आवरून यावं. येते आता..." तेजश्री टॉवेल ठेवायला उठली. संग्राम तिच्या मागून आला इकडे तिकडे बघितलं सगळीकड अंधार व्हता. त्याने अलगद त्याच्या कवेत तिला उचलून घेतलं आणि बेडरूमकडे निघाला. तेजश्री गांगारून गेली. तिला काही समजत नव्हते. या आधी संग्राम वाड्यात अस कधीच वागल नव्हत. उचलून घेतल्यावर ती त्याच्याकडेच बघत होती. संग्राम हसला आणि बेडरूममध्ये पोहोचला. त्याने तिला अलगदच बेडवर ठेवलं.
तेजश्री म्हणाली, "आज कायतरी वेगळं दिसतंय बरं मनात?" संग्रामने दरवाजा लावून घेतला. " का बायकोची सेवा करू नये व्हय?
"कधी कधी करावी की पण आज जरा जास्तच व्हती. कुणी बघितलं असतं म्हंजी?"
" कुणी कशाला बघायला येतंय? सगळी गाढ झोपलयात. कुणी बघत नाय तुम्हाला आणि इतका येळ वाट बघायला लावायची का आम्हाला? किती वेळ झालं आम्ही इथं वाट बघत बसलोय."
" अरे बापरे आमची वाट आणि तुम्ही कशाला?"
स्वप्नाने त्याला काय कारण त्याने कपाटातली पिशवी काढली आणि तेजश्रीच्या हातात दिली.
"खरंतर मी आपल्या पहिल्या रात्री करायला पाहिजेल व्हतं पण..."
" आता त्या रात्रीची आठवण नको ना काढायला?"
तिने पिशवी उघडली बॉक्स उघडला त्याच्यामध्ये गुलाबी रंगाचा नाईट ड्रेस होता. तो नाईट ड्रेस बघून तिला हसूच आलं.
"अहो हे काय हे असलं कुठ घालती का मी?"
" तुमाला काय वाड्याभर घालून फिरायला लावतो की काय मी?"
" मी नाय घालणार मला लाज वाटती बाई"
"तेजश्री कशा हो तुमी अशा...बायको हायना माझी..."
तेजश्री स्वतःवरच हसली उठली आणि आत गेली. ती तो ड्रेस नाईट ड्रेस घालून बाहेर आली . संग्राम तिच्या हरवून गेला. तिच्या गळ्याला त्यांनी हाताने स्पर्श केला. ती शहारली.
"अहो मला एक कसंतरी व्हतंय." ती म्हणायचं म्हणून म्हटली. खरंच संग्राम तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला.
"मी तर कधीच इतक्या सुंदर तुमाला बघितलं नव्हतं... तुम्ही लय झाक दिसताय." तेजश्री लाजली आणि बेडवर जाऊन बसली. तिच्या हाताची चाळे चालू होते.
"मला कसंतरी होतंय मी बदलून येऊ का?"
" नाय..." संग्राम हसतच तिच्याजवळ गेला. तिला खूप कसतरी होत होतं. संग्राम इतक्या प्रेमाने वागतोय मनातून तिला बरं वाटत होतं.
" या प्रेमाला कुणाची दृष्ट आता तरी नको लागायला..." सतत र मनात म्हणत होती. त्याने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला, "आता मनाला रुक रुक नको, आता आपल्या संसाराला कोणाची दृष्ट नाय लागणार..." तिला हसू आलं.
"यांना कसं कळालं माझ्या मनातलं..."
" मनातल्या मनात काय बोलताय? आता तरी माझ्याशी बोला." तेजश्रीला अजून हसू आलं. तिने त्याच्या ओठावर ओटी ठेवले. तिला आता कोणताच नवीन कारण त्यांच्यामध्ये नको होतं ते एकरूप झाले.



क्रांतीला जाग आली. तेव्हा आजूबाजूला कसलाच आवाज येत नव्हता. सगळीकडे शांतता होती. पण उजाडलेल तिला दिसत होतं. ते एकदम दचकून जागी झाली.शेजारी बघितलं तर वीर नव्हताच.
"अरे हे कसं काय असं गेल." बाथरूम मध्ये आंघोळ करत असलं म्हणून त्याने बाथरूम मधला दरवाजा बघितला दरवाजाचं सताट उघडा होता. तो बाथरूम मध्ये नव्हता. तिने इकडे तिकडे बघितलं नंतर घड्याळाकडे बघितलं.
" अर देवा... साडेसहा वाजले उशीर झाला मला उठायला. काय म्हणतील? पहिल्याच दिवशी उशीर झाला."
ती पटकन टॉवेल आणि कपडे घेऊन आत मधी गेली. स्वतःला परत नाईट ड्रेस मध्ये एकदा आरशात बघितलं आणि लाजली. आणि बाथरूम मध्ये गेली. बाहेर आली. सुंदर छोट्या लेसच्या पिवळ्या रंगाची साडी नेसली. केस हलकेसे टॉवेलने झटकले. आणि मागे सोडले. तिला भास झाला तिच्या मागे वीर येऊन उभा राहिलाय आणि तिच्या केसात मागून पकडून तिच्या केसांमध्ये नाक घुसळतोय. तिच्या अंगावर शहरा आला.
कुठ गेल असतील बरं मला असं न सांगता?" म्हणून तीन एक छोटा क्लिप डोक्याला लावला आणि खाली आली.
खाली आली तर स्वयंपाक घरात आत्याबाई आणि तेजश्री होत्या.
"जाऊबाई मला उठायला उशीर झाला. मला हाक का नाय बर मारली." क्रांती हळूच म्हणाली.
" अगं असूदेत की आमाला माहिती हाय. आज उशीरच व्हतो उठायला. म्हणून नाय हाक मारली. बरं भाऊजी उठल का? त्यांना चहा घीवुन जा... चहा झालाय."
" मीच तुमाला विचारणार व्हते... जाऊबाई की हे दिसत नायीत खोलीत... सकाळ सकाळ कुठ जात्यात क? तेजश्री गडबडली. "नायत म्हणजी... घरातच असत्याल नायतर व्यायामाला... पण आज का जात्याल... व्यायामाला ते तुला न सांगता..." क्रांतीने आत्याबाईंना विचारले.
"आत्याबाई हे तुमाला काय सांगून गेल्यात का? आत्याबाई हसल्या आणि म्हणाल्या, " आता मला का सांगल तो ? तुला सांगणार ना..."
"नाय वाटल बाई मी झोपली व्हते म्हणून मला वाटलं की तुम्हाला सांगितल असलं."
" ना ग मला नाय सांगितलं... पण त्याला लवकर उठायची सवय हाय...गेला असेल भायर..." क्रांतीला कसंस व्हायला लागलं. तिन इकडे तिकड नजर टाकली चिनू उठली नव्हती. ऋषी नव्हता. संग्राम नव्हता. आजूबाजूला कुणी नव्हतं. तेवढ्यात भूषण बाहेरून आला.
"वहिनी वीरू कुठया? उठला न्हाय अजून???"
भाऊजी तुम्ही पण इथच हे नायत वाड्यात? कुठच नायत आणि कुणालाच माहीत नाय..."
आबा झोपाळ्यावर पेपर वाचत बसले होते. क्रांती त्यांच्या समोर डोक्यावर पदर घेऊन आली आणि म्हणाली.
"आबासाहेब यांना बघितलं का?"आबासाहेब एका शब्दाने काहीच बोलले नाही. नाय म्हणावं का हो म्हणावं हे त्यांना कळत नव्हतं. क्रांतीने त्यांची घालमेल ओळखली. ती त्यांच्या जवळ जाऊन पायाशी बसली. "आबासाहेब काय झालंय का? हे कुठच दिसत नायत... सगळ्यांनाच काळजी वाटायला लागली." तेजश्री आत्याबाई बाहेर आल्या.
"आव तुम्हाला माहिती का वीर कुठे गेलाय? सुलोचनाबाईन काळजीनं विचारलं.

"सुनबाई वीर पहाटच्याच गाडीन मुंबईला गेलाय." क्रांतीला धक्का बसला.
"का??? आणि मला काय बोललेच नाय ते... आणि आज का गेलत? अजून आठ दिवसाच्या सुट्ट्या बाकी व्हत्या."
आबांनी तिच्या हातात एक पत्र ठेवलं आणि म्हणाले वीरने तुमच्यासाठी दिलय ते वाचा. हळूहळू संग्राम, ऋषी, स्वप्ना, चिनू सगळेच खाली आले. काय प्रकारे कोणाच्याही लक्षात येत नव्हता. कालचा दिवस सगळ्यांसाठीच अतिशय सुंदर होता. क्रांतीच्या तर जीवाची घालमेल वाढली होती. तिन ती चिट्ठी उघडली आणि तिच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागल. एवढी कमजोर ताई चीनूने कधीच बघितली नव्हती. ती क्रांतीशेजारी जाऊन उभी राहिली.
"काय झालं तायडे?" क्रांतीने डोळे पुसले आणि म्हणाली. "विश्वासघात" कोणाला काहीच समजत नव्हतं.
"आबासाहेब म्हणजे ही फसवणूक व्हती माझ्या आयुष्याची? खेळ व्हता? काय इतका कुचकटपणा? इतकं मनात साठलेलं? आबा ह्याला काय म्हणावं? आणि तुम्ही त्यांची साथ दिलीत? आबा प्रेम केलं मी मनापासून त्यांच्यावर त्यांनी असा विश्वासघात करावा? हे मी नाही सहन करू शकत? तुम्ही सांगा तुम्हाला हे पटलं?"
" सुनबाई मी खोटं बोलणार नाय... हे सगळं मला लग्नाच्या आधीच माहित व्हतं." सुलोचनाबाई पुढे आल्या आणि म्हणाल्या. "आव काय झालय नक्की सांगा? काल शुभकार्य घडल घरात आण आज काय चालू हाय सगळं..."
"क्रांती आग आम्हाला तर सांग काय झालं?" संग्रामने तीच्या हातातली चिठ्ठी घेतली आणि वाचली.
"वीरच्या डोक्यात हे इतकं सगळं व्हतं? आबा तुम्ही सांगितलं नाय का त्याला? क्रांतीच्या आयुष्याशी असं खेळणं केल? आबा नीट सांगा काय झालय? तेजश्री त्याच्याजवळ येत म्हणाली."अग ह्याच्या डोक्यात काय होतं तेजश्री? सूट घेतलाय क्रांतीचा. .. लग्न करून आणि आता तिने पुढे खेळायचं नाय असं सांगतोय... हा तिला इथच ठीवून मुंबईला प्रॅक्टिसला निघून गेला... हे सगळं ऐकून सगळ्यांचे काम सुन्न झालत... कुणाला काय बोलावं कळेना... क्रांतीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. चिनू ने तिला सावरलं. स्वप्नांनी तिला पाणी आणून दिलं. "चिनू मी असा विचारच नव्हता केला... वीरच्या डोक्यात असं काय असल? इतकं निष्ठुर कसं असावं माणसान? इतकी सूटबुद्धी का? ते काय नाय आबा त्यांना जस वागायचं असल ते वागत्याल... मी माझ्या पद्धतीन वागणार ... मी इथ थांबणार नाय आणि माझ्या माहेरी पण जाणार नाय." सुलोचनाबाई तिच्या जवळ आल्या आण म्हणाल्या,
"क्रांती तू रडू नकस वीरला मी फोन करती आण बोलूवून घेते. त्याला जाब इचारते."
"आत्याबाई जाब इचारून कायच उपयोग नाय... या माणसान सगळं प्लॅनिंग करून माझ्या आयुष्यशी खेळायलाय तो...आता नाय...
ती रडत रडत वरती गेली . डोक्याला हात लावला आणि मटकण खाली बसली.
" हे काय झालं वीर इतकं प्रेम केलं व्हतं तुमच्यावर इतकं आणि तुमी माझ्याशी असं वागला... आता नाय मी आता तुम्हाला माफी नाय. पटापट तिने बॅग काढली. होतं तसं सगळं सामान होतं. तिने बॅक उचलली आणि खाली आली. संग्राम म्हणाला, "क्रांती तू सांग तुला कुठ जायचय मी सोडून येतो तुला."
क्रांती म्हणाली, " नाय भाऊजी मला कुणाच्याही मदतीची गरज नाय... ना मी माझ्या माहेरी परत जाणार." संग्राम म्हणाला,, "मी तुझा दीर म्हणून म्हणतच नाय... मी एक माणूस म्हणून म्हणतोय, तू सांग मला कुठ सोडू...?"
क्रांती म्हणाली " मुंबईला अकॅडमी मधी मला आत्ताच्या आत्ता जायचंय."
" थांबा सुनबाई तुमी ह्या घरच्या सुनबाई हाय... आता हा उंबरा आम्ही सांगितल्याशिवाय तुम्ही ओलांडायचा नाय..." आबांच्या चेहऱ्यावर राग होता आणि क्रांतीच्या डोळ्यात अश्रू....

क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत