Premache Rahasya - 1 in Marathi Detective stories by Neel Mukadam books and stories PDF | प्रेमाचे रहस्य - 1

Featured Books
Categories
Share

प्रेमाचे रहस्य - 1

“त्या घरात ते तिघे होते, तर मग त्याला कोणी मारले?” ज्युलियन डँमान मला विचारत होता. “सोपे आहे सर. तिचे लग्न जो हॉपकिन्स शी झाले होते पण अँटोन तिचा प्रियकर होता व तिचे त्याच्यावर खूप प्रेम होते”, मी नेहमीप्रमाणे एक ढोबळ विधान केले. त्या टेकडीवर ते एकच घर होते, पण? त्या घरात ते तिघे म्हणजे मौसियर जो हॉपकिन्स, त्यांची पत्नी मादाम अँजेना व तिची नणंद म्हणजेच मौसियर जो यांची बहीण जेनिफर राहत होते. “सर, माझी मैत्रिण बार्बरा मला काल भेटली तेव्हा ती ही त्याच प्रकरणावर बोलत होती”, मी म्हणालो. “पण ऐलेन, मौसियर जो हॉपकिन्सना त्यांच्या पत्नीचे हे चोरटे प्रेमप्रकरण माहित नव्हते की काय?” ज्युलियन म्हणाला. त्यानंतर, ज्युलियनला अचानक काहीतरी आठवले. मी जरा बाहेर फेरफटका मारून येतो, असे म्हणून तो बाहेर गेला.  या साऱ्या प्रकरणामुळे मी मात्र हताश मनाने घरीच बसलो होतो.

 

ज्युलियन एका स्कर्ट विकणाऱ्या ‘जेम्स बॉइज जेम्स’ नावाच्या (कदाचित ते दुकान आता ‘वॉट नीड्स कस्टमर’ नावाने चालू असेल) दुकानात गेला. तिथल्या काउंटरवरच्या माणसाने त्याला विचारले, “मौसियर ज्युलियन, तुम्हाला स्कर्ट पाहिजेय का?” ज्युलियन अजूनही त्या तीन वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकरणाचाच विचार करत होता. “अं.. तुम्ही स्कर्टविषयी काही बोललात का?” काहीशा आगंतुक मुलाकडे पाहतात ना.. तशा नजरेने पहात ज्युलियनने विचारले. तो काउंटरवरचा पोऱ्या परत म्हणाला, “मी तुम्हाला स्कर्ट दाखवू का?” ज्युलियन म्हणाला, “लेडी हॉपकिन्सला तिच्या नवऱ्याने मारले की नणंदेने का प्रियकराने?” काउंटरवरचा माणूस ओरडलाच.. “काय..? स्कर्टच्या प्रियकराने..” “चूप. काहीतरी वेड्यासारखे बोलू नकोस” असे म्हणून ज्युलियनने पूर्ण प्रकरण त्याला सांगितले. म्हणाला, “1970 चा पाच नोव्हेंबर.. दुपारचे दोन वाजले होते, तेव्हा तुम्हीच लेडी हॉपकिन्सला स्कर्ट दाखवायला गेला होतात ना?” तो काउंटरवरचा माणूस म्हणाला, “हो.. सर. पण माझ्याबरोबर माझा एक नोकर फ्रँकलिनही होता”. ज्युलियन म्हणाला, “तुम्हाला माहितीये? अँजेना मैमोझेलचा मृत्यू झालाय”. एवढे बोलून काउंटर वरच्या पोऱ्याच्या गोल गरगरीत चेहऱ्याकडे पाहत ज्युलियन तिथून निघाला.

 

 इकडे माझ्या घरी एक वेगळाच प्रकार घडला होता. “सर, ऐलेन सर, अँजेना मैमोझेल जिवंत आहेत”. असे बोलून माझ्या जावयाने मला शॉकच दिला होता. “सेंडोम. असे होऊ शकते का?” मी त्याला म्हणालो. “खरंच सासरेबुवा, घ्या, बोला तुम्हीच”. असे म्हणून फोनचा रिसिव्हर त्याने माझ्या हातात दिला. मी ही घटना ज्युलियनला सांगितली व फोन त्याच्या हातात दिला. मी विचार केला की हा मैमोझेलचा पुनर्जन्म झाला की काय? “ज्युलियन मौसियर, माझे इकडच्या सॉरीवर खूप प्रेम आहे. असे अँजेना हॉपकिन्स च्या आवाजात फोनवर कोणीतरी बोलत होते. ती बाई एवढे बोलली आणि आणि फोन कट झाला. हे सर्व ऐकून ज्युलियनपेक्षाही मी जास्त वेडावलेलो होतो. पण ज्युलियननी म्हटले, “चल, हे शक्यच नाही, कोणीतरी आपली मजा करत असेल”. तो पुढे म्हणाला, “मी गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणचा सर्व अभ्यास केला आहे. अँजेना मेली होती कारण एका तलवारीने तिच्यावर हल्ला झाला होता. आणि तिच्या नवऱ्याचे नव्हे तर तिच्या नणंदेचे ठसे त्या तलवारीवर सापडले होते”. त्या दिवशी आम्ही तो विषय तिथेच थांबवला.

 

       दुसऱ्या दिवशी ज्युलियन माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला म्हणालो, “जर अँटोनवर अँजेनाचे प्रेम असेल व तिच्या नणंदेचे देखील अँटोनवर प्रेम असेल तर मनात असूया निर्माण होऊन तिच्या नणंदेने तिला मारले असेल किंवा मौसियर जो?” एवढे बोलून मी चहा बनवला व ज्युलियनला दिला. “चल आता तो विषय सोड. आपण चहा पोटात टाकूया”, मी म्हणालो. “पण, मी प्रत्यक्ष जाऊन तिथे अँजेनाला मृत पाहिले आहे. ज्युलियन म्हणाला. “नशिबाचे खेळ असतात सारे”. “पण खुन्याचा वार चुकला असेल तर?” मी म्हणालो. “तू काय वेडा आहेस? अँजेनाच्या पोटात तलवार खुपसलेली होती व डॉक्टरांनीच तिला मृत घोषित केले होते,” ज्युलियन म्हणाला. मी म्हणालो, “सर, अँटोनला तिच्याशी लग्न करायचे असेल तर?” “मी बार्बराकडून जेवढी माहिती मिळवली आहे त्यानुसार अँटोनचे अँजेनावर प्रेम नव्हतेच, उलट तो तिचा तिरस्कारच करायचा,” ज्युलियन म्हणाला. मी शेवटी या विषयावर काहीही न बोलता फिरायला म्हणून बाहेर पडलो.

 

 मी “वॉट नीड्स कस्टमर” मध्ये गेलो व त्या काउंटरवरच्या हरामखोर पोऱ्याला म्हणालो, “तू अँजेना मॅडमच्या घरी गेलेलास व नंतर काही वेळाने अँजेना मॅडमचा मृत्यू झाला.” तो काउंटरवरील पोऱ्या म्हणाला, “सर, फक्त अँजेना मॅडमचाच नाही तर त्यांचा प्रियकर अँटोनचाही मृत्यू झालाय. हा पेपर वाचा”. त्याने ‘इंग्लंड्स वेलफेअर’ हा पेपर माझ्या हातात दिला. मी हळूच वाचले, अँजेना हॉपकिन्स यांनी स्वतःला मारून घेतले व त्यानंतर त्यांचा प्रियकर अँटोननेही स्वतःला संपवले. मी म्हटले, “काय रे? ह्या पेपरची किंमत काय?” “सर, पाच डॉलर्स”, तो म्हणाला. मी तेवढे पैसे देऊन तो पेपर विकत घेऊन घरी आलो.

 

         घरी येऊन पाहतो तर ज्युलियन हॉट चॉकलेट पीत होता. मी काहीतरी फालतू विनोद केला. “काय? काही मिळाले का?” ज्युलियनने मला विचारले. “नाही सर, पण एक पेपर मिळालाय”, मी म्हणालो. ज्युलियन म्हणाला, “मग मला काय सकाळी रॅपर मिळालाय?” “मला तसे म्हणायचे नाही सर. या पेपरात लिहिले आहे की अँजेना मैमोझेलचा चा मृत्यू झाल्या नंतर अँटोनचा मृत्यू झालाय”. मी वैतागून म्हणालो. “अस्स, दाखव बघू तो पेपर.” ज्युलियन म्हणाला. मी पेपर त्याच्या हातात दिला. “अँजेना मैमोझेलचा मृत्यू झाला व मग अँटोनने गोळी मारून स्वतःला संपवले”, ज्युलियन म्हणाला. मी फ्रिज मधून दुसरे हॉट चॉकलेट काढले व म्हणालो, “सर, जो साहेबांशी अँजेनाचे पटत नव्हते असे तो ‘वॉट नीड्स कस्टमरवाला’ म्हणाला”. “मग?” ज्युलियन म्हणाला. “बार्बरा म्हणते की अँटोन अँजेनाचा तिरस्कार करायचा. मग अँटोनने अँजेनाला मेलेले पाहून स्वतःला गोळी का घातली असेल?”, मी म्हणालो. “मौसियर जो यांचे त्यादिवशी आपल्या पत्नीशी तांडव झाले असेल व रागाच्या भरात त्यांनी आपल्या पत्नीचा अँजेनाचा खून केला असेल. आणि मग अँजेनावर खरे प्रेम करणाऱ्या अँटोननी स्वतःला संपवले किंवा मौसियर जो ह्यांनी त्यांच्याविरुद्ध साक्षीदार राहू नये म्हणून अँटोनला मारले असेल”. ज्युलियन एवढे बोलून हॉट चॉकलेटचा ग्लास धुवायला आत गेला. मी हॉट चॉकलेट संपवले व किचनमध्ये गेलो तर ज्युलियन खिडकीवर बाहेर जात होता. मी काही त्याला थांबवले नाही.

 

 दुसऱ्या दिवशी ज्युलियन डर्मोशार पॅलेस, जिथे मौसियर जो ह्यांची बहीण राहायची तिथे गेला. त्याने दाराची बेल वाजवली,तर आत एक प्रेतं पडलेले होते. ज्युलियनने मला फोन केला व हे सर्व सांगितले. मी लगेच तिथे पोहोचलो व म्हणालो, “सर, आसपास काही मिळते का पाहूया”. ज्युलियनला बाजूलाच ‘अँटोन’ असे नांव लिहिलेला कागद मिळाला. त्याने तो उचलला व त्यावरचा मजकूर वाचायला सुरुवात केली. “अँटोन माझ्या भावाला सुरक्षित ठेव”, तुझीच जेनिफर हॉपकिन्स. मला काहीच कळेना. ज्युलियन म्हणाला, “अँटोनचा जो यांच्या बहिणीशी काहीतरी संबंध असावा, कदाचित त्यांचं दोघांचं प्रेमप्रकरण पण असेल. पण जेनिफरला मारले कोणी?” मी तो कागद माझ्या खिशात ठेवला व म्हणालो, “कदाचित अँटोनला जो यांची पत्नी व त्यांची बहीण दोघीही आवडत असतील, म्हणून दोघींच्या झटापटीत जेनिफर मेली असेल व अँजेना पळून गेली असेल”. ज्युलियनने मला शाब्बासकी दिली व म्हणाला, “चल आता, सूतावरून स्वर्ग गाठू नकोस. हा पुरावा घरी घेऊन चल”. मी तो कागद खिशातून काढला व म्हणालो, “जेनिफरला आपण मरणार आहोत याची जाणीव झाली असावी म्हणून तिने हे लिहिले असावे”. ज्युलियन म्हणाला, “ मी मौसियर जो यांना भेटून येतो”. ज्युलियन असे म्हणून परत डर्मोशार पॅलेस येथे गेला.

 

जेनिफरचे प्रेतं अजूनही तसेच तिथे पडलेले होते. ज्युलियनने नीट पाहिले तर जेनिफरच्या हातात अजून एक चिठ्ठी होती. आणि त्यावर लिहिले होते की ‘मीच गुन्हेगार आहे. अँटोन तू मला बरोबर शिक्षा दिलीस’…….. जेनिफर. ज्युलियनने हा कागद त्याच्या खिशात ठेवला. आम्ही दोघे तिथून आमच्या घरी आलो.

 

 आतापर्यंतचा कथाभाग इथेच संपला. कथेचा पुढील भाग काही दिवसात आपणासाठी येईलच. प्रतिक्षा  करा……