हौसला दो किसीं की तुटती हुयी उम्मीदो को
सहारा दो किसीं के थकते हुये कदमो को
बेहद आसान है किसीं को बाते सुनाना
अगर है दुनिया के विचारो से लढणे की हिम्मत तो उसे संघर्ष मे साथ दो.....
सकाळचे ११ वाजत आलेले. थेम्स नदी काठावर वसलेले सुंदर शहर लंडन. अन्वय केव्हापासून हॉस्पिटलमध्ये इकडून तिकडे चकरा मारत होता. अन्वय सोबत आई होत्या, त्यांचीही काहीशी अशीच स्थिती झाली होती पण त्यांनी स्वतःच्या मनाला आवर घातला होता. दोघांनाही केव्हा एकदा डॉक्टर येतात ह्याची चिंता लागली होती. गेले काही तास अन्वयने वाट बघितली होती पण आता वेळ जवळ येऊ लागली आणि अन्वयला एक-एक सेकंद जास्त वाटू लागला होता. त्याचे पेशन्स संपण्याच्या मार्गावर होते. आई केव्हापासून त्याला बसण्यासाठी सांगत होत्या पण अन्वयच मन आज अन्वयच्याच ताब्यात नव्हतं. तो आज अशांत होता. कित्येक प्रयत्न करूनही तो स्वतःच्या मनाला समजावू शकत नव्हता. तेवढ्यात अचानक डॉक्टर समोरून स्वराच्या रूममध्ये जाताना दिसले आणि अन्वय धावत-पळतच स्वराच्या रूममध्ये गेला..डॉक्टर सोबत एक नर्स आणि व्हॉडबोयसुद्धा होता. डॉक्टर त्यांना काहीतरी इशारा करून सांगत होते तर अन्वय निव्वळ मठ्ठासारखा बघत होता. आईला अन्वयची स्थिती समजत होती म्हणून त्यांनी अन्वयचा हात क्षणात पकडला. अन्वयलाही आज आधाराची खूप गरज होती त्यामुळे त्यांने आईचा हात घट्ट पकडून घेतला आणि त्याने समोरच्या प्रसंगांमध्ये स्वतःला झोकून दिले. अन्वय-आई आता एकटक बघत होते. त्यांच्या डोळ्यात आतुरता आणि भीती दोन्हीही होते. त्यांची नजर समोरच्या प्रसंगावरून हटणार नव्हती तर मन आणखी काही वेळ वाट बघायला तयार नव्हत. आई-अन्वयच्या मनाचा एक वेगळाच संघर्ष त्यावेळी सुरू होता. त्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्टपणे दिसतही होत तरीही एकमेकांचे हात हातात घेऊन ते एकमेकांना धीर देत उभे होते. अगदी काही क्षण गेले, रूममध्ये पिंड्रॉप सायलेन्स होता आणि डॉक्टर काहीतरी बोलू लागले. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नर्सने हातात कैची घेतली आणि स्वराच्या बेडबाजूला जाऊन थांबली. स्वरा झोपून होती तिला नीट बसविले आणि चेहऱ्यावर घट्ट बांधलेली पट्टी नर्स हळूहळू काढू लागली. पट्टीचा एक-एक थर निघू लागला आणि अन्वय-आईच्या हृदयाची धडधड वाढू लागली. अन्वय ह्याआधी इतका कधीच घाबरला नव्हता पण आज तो घाबरला होता. कदाचित त्याने पाहिलेल स्वप्न आज पूर्ण होत असाव म्हणूनच असेल. अन्वयची आज पापणी सुद्धा हलली नव्हती आणि नर्स एक-एक थर बाजूला करू लागली. स्वराचा नवीन चेहरा बघायला आता फक्त काही सेकंदाचा कालावधी बाकी होता पण आज हेच सेकंद जणू तासासारखे भासत होते. फायनली पट्टीचा शेवटचा थर देखील नाहीसा झाला आणि त्यातून बाहेर आला तो तेजस्वी चेहरा, सुर्यासारखं तेज होत त्या चेहऱ्यात तर निसर्गाच वेगळेपण, इंद्रधनूच्या रंगांची रेखाटनी आणि फुलासारखी कोमलता. स्वराने हळुवार डोळे उघडले आणि आतापर्यंत अशांत असलेल्या अन्वयच्या चेहऱ्यावर अचानक समाधानाचे मोती पसरले. जितका स्वराचा चेहरा उजळून निघाला नव्हता तितका आज त्याचा चेहरा उजळून निघाला होता. स्वराचे डोळे उघडले तेव्हा अन्वय समोर होता. अन्वयचा हसरा चेहरा बघताच स्वराचा चेहरा किती खुलून निघाला ह्याचा तिलाच अंदाज नव्हता. क्षणभर दोघेही एकमेकांना एकटक बघत होते, नजरेला नजर तर मिळाली होती पण त्याचे ओठ अजूनही तिच्याशी बोलायला आतुर होते. दोघांनाही कधी एकदा एकमेकांशी बोलतो अस झालं होतं तेवढ्यात डॉक्टर म्हणाले," कॉंग्रेचुलेशन मिस्टर अन्वय.. फायनली सर्जरी हॅज बिन डन. मेनी मेनी कॉंग्रेचुलेशन टू बोथ ऑफ यु..स्वरा मॅडम, नाऊ यु मे रिलॅक्स.."
डॉक्टर बोलून तर गेले होते पण अन्वयच अजूनही त्यांच्याकडे लक्ष नव्हत. डॉक्टर त्याच्याकडे बघत क्षणभर हसले आणि सर्व स्टाफला घेऊन क्षणात पसार झाले. अन्वय आताही स्वराकडे वेड्यासारखं बघत होता. दोघेही एकमेकांच्या नजरेत विलीन झाले होतेच की आई स्वराच्या मानेवर काजळ लावत म्हणाल्या," अन्वय ही तीच स्वरा ना, जिला तू पहिल्यांदा फोटोत बघितलं होतंस. काय दिसते रे ही!! आपल्या खांद्यानात इतकं सुंदर कुणी असेल अस मला वाटत नाही. मनाने सुंदर असणारी स्वरा चेहऱ्याने सुद्धा तितकीच सुंदर आहे हे लोकांना समजेल तेव्हा त्यांची स्थिती काय होईल ना? जडतील ते. आता त्यांना हव्या त्या सुंदरतेच उत्तरही त्यांना नक्कीच मिळेल. अन्वय आता सांग बोलतील का लोक स्वराला उलटुन पालटून? आता कोण कमेंट पास करतील तिच्या चेहऱ्यावरून? अन्वय फायनली तुझं स्वप्न पूर्ण झालं. बघ तिला, जगातली सर्वात सुंदर मुलगी तुझ्यासमोर आहे, मनाने तर सुंदर होतीच पण पुन्हा एकदा तू तिला चेहऱ्याने पण सुंदर केलंस..काय सुंदर दिसत आहे ही. माझीच नजर नको लागो माझ्या सुनेला.."
स्वराने आईला हलकेच मिठी मारली तरीही अन्वय काहीच बोलला नव्हता. आईला स्वराशी खूप काही बोलायच होत पण त्यांनी स्वतःला आवरल. हा क्षण स्वरा-अन्वयचा होता, ते एकमेकांशी बोलायला आतुर होते त्यामुळे त्या ही गोड बातमी सर्वाना द्यायला बाहेर पोहोचल्या. आता रूममध्ये फक्त दोघे होते आणि स्वराने अन्वयकडे एकटक बघून हसतच विचारले," अस काय बघत आहात अन्वय सर?"
अन्वयनेही मिश्किल हसतच म्हटले," सुंदरतेचा नवीन अर्थ...मला आठवतंय जेव्हा मी पहिल्यांदा तुझा फोटो बघितला होता, तोच क्षण आणि तीच स्वरा आज माझ्यासमोर उभी आहे म्हणून कदाचित नजर हटत नाहीये. तुझी सुंदरता कदाचित चेहऱ्यात नाही पण जगासाठीही तू आता कायमच सुंदर असशील, तुला लोकांच्या नजरांचा त्रास होणार नाही हाच विचार करून मन भरून आलंय. मी म्हणालो होतो मी जगातील सर्व आनंद तुझ्या पायाशी आणून ठेवेन. प्रयत्न केले पण लोकांचया नजरेच समाधान माझ्याकडे सुद्धा नव्हतं म्हणून एक आनंद कायम तुझ्यापासून दुरावला जायचा, आज तो देखील तुझाच आहे, तुला नाही माहिती मी किती समाधानी आहे ह्याक्षणी म्हणून तुला बघतोय. आज खऱ्या अर्थाने मी मला दिलेलं वचन पूर्ण केलं. स्वरा आता हा आनंद तुझ्या चेहऱ्यावरून कुणीच हिरावून घेऊ शकणार नाही. अगदी कुणीच नाही.."
अन्वय स्वराकडे एकटक बघत होता आणि स्वराने त्याला धावतच घट्ट मिठी मारली. काही क्षण ती त्याच्या मिठीत विसावली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते पण कदाचित शेवटचे कारण आता समोर अश्रू यायला अन्वयने कुठलच कारण सोडलं नव्हतं. आज खऱ्या अर्थाने ती मुक्त झाली होती. ह्यासाठी तिला देवाकडे जावं लागलं नव्हतं तर अन्वयने ह्याच जगात राहून तिच्या चेहऱ्यापासून, तिच्या दुखापासून तिला मुक्त केलं होतं. ती त्याच्या मिठीत रडून इतकं प्रेम करणारा जीवनसाथी मिळाला म्हणून क्षणभर देवाचे आभात मानत होती तेवढ्यात अन्वयने विचारले," स्वरा आज तरी बघणार का आरशात स्वतःला?"
त्याचे शब्द ऐकताच स्वराने मिठी सैल केली. डोळ्यातले अश्रू क्षणात पुसले आणि हळुवार त्याच्या डोळ्यात बघत तिने त्याच्या कपाळावर किस करत म्हटले," अन्वय सर आरसा एकदा खोट बोलेल पण तुमचे डोळे कधीच बोलत नाहीत म्हणून मला आज आरशात नाही तर तुमच्या डोळ्यात बघायच आहे. अन्वय सर मला आजपर्यंत वाटत होतं की माझ्यासारखी कुरूप व्यक्ती ह्या जगात दुसरी कुणिच नाही पण आज तुमच्या डोळ्यात जेव्हा बघते आहे तेव्हा ओरडून सांगू शकते माझ्यासारख सुंदर कुणीच नाही. अन्वय सर तुम्ही मला फक्त ओळख नाही दिली, सुंदरतेचा अर्थ नाही समजावला तर स्वरा नावाच्या व्यक्तीला भाग्यच दिले. अस भाग्य जे कदाचित देवाने सुद्धा तीच्याकडून हिरावून घेतले होते. त्यालाही माझ्या जगण्यावर दया आली असावी पण तो नुसते बघत होता. तेव्हा तुम्ही आलात आणि पुन्हा एकदा नव्याने ती जुनी स्वरा मिळाली. सोपं नव्हतं त्या जुन्या स्वराला शोधून आनने पण तुम्हीं ते केलेत. जगातल्या सर्वात कुरूप मुलीला तुम्ही पुन्हा एकदा सुंदर बनविल. अस ऐकलं होतं की देव आपलं रंग रूप ठरवितो. त्याने बनविला होता माझा कुरूप चेहरा पण तुम्ही त्याच्याशी भांडून पुन्हा मला एक नवीन रूप दिलं. अन्वय सर आज मी देवालाही ओरडून सांगू शकते की देवा तू माझं नशीब लिहिण्यात कमी पडलास पण अन्वय सर नाही. त्यांनी मला पुन्हा एकदा भाग्य दिले. अन्वय सर भाग्य दिले तुम्ही मला. भाग्य दिले तू मला. एक मुलगी लग्न होऊन नवऱ्याच्या घरी जाते तेव्हा तीच भाग्य नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे बदलत मी अस ऐकलं होतं पण माझ्या नवऱ्याने माझा वेदनादायी भूतकाळच पुसून पुन्हा एक नवीन जीवन दिलंय. स्वराच्या भाग्याची कहाणी स्वरा बदलू शकली नाही पण अन्वयने ती पूर्णपणे बदलली म्हणून आज ओरडून सांगावस वाटत अन्वय सर भाग्य दिले तू मला. भाग्य दिले तू मला..."
स्वरा आज जे जे मनात येईल ते ते बोलत होती तर अन्वय सुद्धा आज तिला थांबवत नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचा, डोळ्यातल्या आनंदासमोर त्याला आज काहीच दिसत नव्हतं. ते दोघेही आता एकमेकांकडे बघत होते आणि अन्वय तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत म्हणाला," स्वरा ५ वर्षापेक्षा जास्त कालावधी गेलाय. आईने मला एक प्रश्न केला होता, मी तर कधीतरी पुन्हा नॉर्मल होईल पण स्वराच काय? तिने का इतकं सहन कराव आणि केव्हांपर्यंत? त्याच उत्तर मी शोधू लागलो आणि ते उत्तर होत सर्जरी. तू म्हणाली होतीस ना स्वरा चेहरा शाश्वत असतो तर तस नाहीये बघ तुझ्या त्या शाश्वत चेहऱ्याला मी शेवटी वळण दिलच. आयुष्यात शाश्वत काहीच नसत, ना कुरूप चेहरा ना लोकांची नजर फक्त फरक हाच की मी पैशाने तुझं रुप बदलू शकलो, लोकांची नजर नाही. स्वरा माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढे कमी पडत होते म्हणून आईला मदत मागितली आणि तिनेही माझ्या निर्णयावर सहमती दर्शवली. मला वाटलं होतं की तुला हा विचार एकवताच राग येईल पण अस काहीच झालं नाही. ज्या चेहऱ्यावर मी प्रेम केलं आता तोच चेहरा तुम्हाला का नकोसा झालाय म्हणून तू ओरडणार पण तस काहीच झालं नाही, तू सहमती दर्शवली आणि आज आईच्या त्या प्रश्नाचं उत्तर शेवटी मी शोधलंच. नाही देणार स्वरा तुला लोक आता त्रास. आज ५ वर्ष उलटुन गेले आहेत आणि ही ५ वी सर्जरी. तुला वेदना होत असतानाही तू फक्त माझ्या आनंदासाठी सर्व सहन करत होतीस. स्वरा कधी विचारलं नाही पण आज विचारतो, तुला एकदाही वाटलं नाही की माझ्यावर ओरडाव? एकदाही वाटलं नाही की माझी सर्जरी का करत आहात हे विचारावं? माझा तोच चेहरा तुम्हाला आवडत नाही का अस विचारावं? की तुम्ही सुद्धा इतर लोकांसारखे सुंदर चेहऱ्यावरच प्रेम करणारे आहात असा खडसावून प्रश्न विचारावा. मला ते कधी तुझ्या चेहऱ्यावर दिसलं नाही म्हणून आज विचारतोय. स्वरा तुला कधी राग नाही आला माझा ह्या इतक्या वर्षात?"
अन्वय सिरीयस होऊन विचारत होता तर स्वरा मिश्किल हसत उत्तरली," ह्या सर्व प्रश्नांच उत्तर एकच आहे तो म्हणजे विश्वास. मला तुमच्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास आहे आणि जिथे विश्वास असतो तिथे प्रश्न नसतात. त्रास ना खूप झाला अन्वय सर पण आज जेव्हा तुमचा हसरा चेहरा बघतेय ना तेव्हा अस वाटत की मला जणू कुठलाच त्रास झाला नाही. तुमच्या चेहऱ्यावरच हसू बघून तो त्रास, ते ५ वर्ष क्षणात नाहीसे झाले. तुमच्यावर विश्वास इतका आहे की माझ्या मनाने मला कधीच प्रश्न विचारले नाही. त्याला कदाचित माहीत होतं की तुम्ही एकमेव व्यक्ती आहात जे फक्त माझ्या आनंदासाठी सर्व करू शकता. जर मनालाच हा विश्वास असेल तर प्रश्न कुठून येतील. रगवायच माहिती नाही पण तुमचं हसू बघून मी खूप खुश झाले. हे हसू बघायला मी किती वर्षे तरसत होते आणि फायनली ते मला मिळालं. ह्या हसुसमोर तो त्रास पण काहीच नाही अन्वय सर. काहीच नाही.."
अन्वय," पण…"
स्वरा पुढच्याच क्षणी अन्वयच्या ओठांवर बोट ठेवत उत्तरली," पण नाही आणि बिन नाही. आज मला फक्त मिठीत ठेवा, हा क्षण मला फक्त फिल करायचा आहे. नको कुठले प्रश्न, नको जगाचे विचार. आज तुम्ही आणि मी फक्त. माझ्या नवीन जन्माच्या दिवशी फक्त आपण दोघे हा क्षण साजरा करू. मला आज माझ्या देवाला अनुभवायचं आहे फक्त तेव्हा मला ते करू द्या. तुम्ही बसा गप्प.."
अन्वय काही बोलणार त्याआधीच स्वरा त्याच्या मिठीत शिरली. अन्वयने गोड स्माईल देत तिला घट्ट मिठीत घेतले. ती मिठी इतकी आश्वासक होती की जणू स्वरा आपला पूर्ण भूतकाळ क्षणात विसरली होती. ती सर्जरीमुळे झालेल्या यातना विसरली होती, जगाने दिलेले टोमणे, त्यांची घृणास्पद नजर विसरली होती. आयुष्यातला कुरूप भूतकाळ विसरली आणि ती पहिल्यांदा आपल्या भविष्याचे स्वप्न पाहण्यात गुंग झाली. अशी स्वप्न जी तिने कधीतरी अपघातासोबतच मागे ठेवली होती पण पुन्हा एकदा तिच्या मनाने तिला स्वप्न पहायची परवानगी दिली आणि तिने ही संधी अजिबात सोडली नाही. काही काळ त्या स्वप्नांना सुरुंग लागला होता पण आता तिचा प्रत्येक खास व्यक्ती जवळ होता तेव्हा त्या स्वप्नाना कधीच सुरुंग लागणार नव्हता. ती पुन्हा एकदा आपलं नवीन घर, नवीन आयुष्य सजवू शकणार होती त्याच एकमेव कारण म्हणजे अन्वय. ती अन्वयच्या मिठीत विसावली होती आणि अन्वय तिच्या श्वासांचा आवाज अनुभवत होता. त्या श्वासात आज शांती होती जे त्याच्याही मनाला समाधान देऊन जात होत. ते श्वास जे दोघांनाही एक बनवते होते. शरीर दोन असली तरी आत्मा एक असल्याचा भास करवत होते आणि जगाला नव्याने प्रेमाची व्याख्या देत होते. प्रेमाची नवीन व्याख्या होती…" स्वरान्वय "....
चेहऱ्याची कुरूपता, मनाची सुंदरता
ह्यांच्या पलीकडे जाऊन जुळून आलेली कहाणी
सारी दुनिया होती वैरी जेव्हा तिच्या चेहऱ्याची
स्वरान्वयने दिली नवीन व्याख्या तेव्हा प्रेमाची..
स्वरान्वय..हवंहवंसं वाटणार प्रेम...आव्हान सोडवून स्वतःच अस्तित्व निर्माण करणारी जोडी. ज्यांनी प्रॉब्लेम आहे म्हणून वाट सोडली नाही तर तो प्रोब्लेमच नाहीसा करून प्रेमाला समाजात योग्य ते स्थान मिळवून दिले..हेच आहे प्रेम. ह्यापेक्षा वेगळं प्रेम काहीच असू शकत नाही..
****************
वर्तमानकाळ.......
बरसो बाद आज मै यहा
खुद का अक्स धुंड रही हु
ये सच है या आयने का फरहेब
सवाल खुदसे आज मै फिर पुछ रही हु...
स्वरा कित्येक वर्षाने स्वतःला आरशात बघत होती. तिला जाणवलं की ५ सर्जरी होऊनही चेहऱ्यावर काही डाग अजूनही तसेच शिल्लक आहेत पण जवळपास चेहरा बऱ्यापैकी क्लिन झाला आहे. चेहऱ्याचा शेप थोडा फार बदलला आहे पण ती चेहऱ्याची सुंदरता अजूनही तशीच तरुण जाणवत आहे. ह्या चेहऱ्यावरून कदाचित कुणीच सांगू शकणार नाही की तिच्यासोबत इतका मोठा अपघात झाला होता. आज ह्या चेहऱ्यामुळे तीचा जवळपास सर्व भूतकाळ पुसल्या गेला होता, तिची सुंदरता पुन्हा परतली होती तरीही ती अजूनही स्वतःला बघून हसली नव्हती. तिला हा चेहरा बघून नक्की कस रिऍक्ट करावं समजत नव्हतं, ती सतत आपल्या चेहँऱ्यावरून हात फिरवतच होती की तेवढ्यात अन्वयचे दोन्ही हात तिच्या कमरेला घट्ट बांधल्या गेले. त्याची मान तिच्या मानेला स्पर्श करू लागली होती. संपूर्ण शरीर त्याच्या स्पर्शाने क्षणात न्हाहून निघालं. त्याच्या स्पर्शाने स्वराचे विचार क्षणात बाजूला झाले आणि तिने त्याचा स्पर्श अनुभवताच डोळे घट्ट मिटले. त्याच्यामुळे तिच्या अंगावर आलेली ती सरसरी ती अनुभवू लागली आणि अन्वय तिच्या गालांवर किस करत म्हणाला," हॅपी मॅरेज अनिवर्सरी बायको..लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.."
त्याच्या त्या गोड आवाजाने जणू मनाची सर्व अशांतता क्षणात पुसल्या गेली आणि तिच्या चेहऱ्यावर आपोआप गोड हसू पसरल्या गेलं. तिने त्याला उत्तर दिले नाही, ती आताही त्याची आश्वासक मिठी अनुभवत होती. डोळ्यांनीही लाजेची पट्टी पांघरली. ती डोळे मिटुनच सर्व अनुभवत होती आणि अन्वय तिची मिठी घट्ट करत उत्तरला," स्वरा माझं एक स्वप्न आज पूर्ण झालं. तुला ना अशी घट्ट मिठी मारून दोघांनाही आरशात बघायच होत. तुझं हासन, लाजन ह्या चेहऱ्याला दाखवायच होत. खूप गर्व आहे ना ह्या आरशाला की हा सुंदरता दाखवतो तर ह्याला तुझं हसू दाखवून सांगायचं होत की माझ्या बायकोपेक्षा सुंदर कुणीच नाही. तिला तुझ्या खोट्या चेहऱ्याची गरज नाही पण तू कधीच आरसा बघितला नाहीस आणि माझं ते स्वप्न तसच राहील. पण म्हणतात ना तुमच्या स्वप्नांत सामर्थ्य अस असावं की नशिबालाही हार मानावी लागेल. बघ आज तू स्वतःच आरशात बघते आहेस आणि माझं स्वप्न सुद्धा पूर्ण झालं आणि खर सांगू तर आज ह्या आरशाला पण इर्शा होत असेल तुझी सुंदरता बघून तेव्हाच तर इतरांना चेहर्यावरुन जज करणारा हा आरसा आज शांत आहे. बायको किती ही सुंदरता? किती प्रेमात पाडणार मला आणखी?"
अन्वय बोलून गेला आणि स्वरा अलगद हसली. तिच्या गालांवर खळी पडली आणि तिची ती सुंदरता आणखीच वातावरण प्रसन्न करून जाऊ लागली. तिच्या हसण्याच्या आवाजात आज संगीतापेक्षा मधुर स्वर होते आणि अन्वय पुन्हा म्हणाला," स्वरा मला ना आज आपल्या दोघांना अस एकत्र बघून काहीतरी सुचतय..( ती..हमम..)
जमाने की बंदिशे
कब न जाने टूट गयी
मिली तुमसे नजरे कुछ आज ऐसें की
लगता है आयने की किंमत भी कम हो गयी..
स्वरा ह्या क्षणासाठी किती वाट बघितली माहिती नाही पण आज जेव्हा तो क्षण मिळतोय तेंव्हा जाणवतंय प्रेम किती सुंदर गोष्ट आहे. सुंदरता बदलली जाऊ शकते पण प्रेम कधीच नाही. शाश्वत फक्त मरण आहे बाकी सर्वच गोष्टी बदलल्या जाऊ शकतात. एक वेळ बाईसाहेब म्हणाल्या होत्या की माझ्या चेहऱ्याची दिवाणी असणारी दुनिया क्षणात नाहीशी झाली. बायको पुन्हा ती सुंदरता आता परत आलीय. आता ना मलाच इर्शा होईल जेव्हा ते तुझ्याकडे बघतील. काय करणार ना मी माझी बायको आहेच इतकी सुंदर की लोक बघणारच.. पण मग माझं काय होईल ना? मला तर विसरणार नाही ना बायको?"
स्वरा अजूनही डोळे लावून होती पण ती अन्वयचा प्रत्येक शब्द फिल करत होती, तिच्या चेहऱ्यावर प्रत्येक क्षणी हसू होत पण आज तिला काही बोलायच नव्हतं. ती आज त्याच्या प्रेमात, शब्दात हरवली होती. ती काहीच रिऍक्ट करत नाहीये हे बघून अन्वयनेही तिला त्रास द्यायला मानेवर किस करत म्हटले," बायको जरा समोर बघा तरी. संपूर्ण जग ज्या जोडीची स्तुती करत ती एकत्र कशी दिसते, बघायच नाही तुम्हाला? बघा बर समोर. खूप लाजन झालं आता.."
अन्वय एकटक आरशात बघत होता आणि स्वराने हळुवार डोळे उघडले. तिची एक नजर आरशावर पडली आणि तिथेच स्थिरावली. आताही आरसा तोच होता पण तिच्या चेहऱ्यावरील गोंधळ कुठेतरी दूर झाला होता आणि त्याची जागा घेतली सुंदर हास्याने. स्वरा समोर आरशात बघत होती तर अन्वय आरशात दोघांनाही एकटक बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर अगणित आनंद होता. तो आनंद बघताच स्वरा उत्तरली," हॅपी मॅरेज अनिवर्सरी नवरोबा!! क्या बात है!! काय सुंदर जोडी आहे ना!! कुणाचीही नजर ना लागो ह्या जोडीला. ( अन्वय हसला...) अन्वय सर मला ह्या आरशाच्या प्रेमात कधीच पडावस नाही वाटलं पण आज आपल्या दोघांना जेव्हा एकत्र बघते आहे तेव्हा ह्या आरशावरही मला प्रेम येतंय. आज दोघांना एकत्र बघून खरच वाटतंय की लोक उगाच आपली स्तुती करत नाहीत. आहे हा आपली जोडी इर्शा करण्यासारखी!! आणि नवरोबा तुमच्या इर्षेच म्हणाल तर मला आवडेल तुमची खेचायला. माझी खेचत असता ना सतत मग आता माझं पण बनत."
अन्वयने जरा नौटंकी करत चेहँरा पाडला आणि स्वरा हसतच म्हणाली," नवरोबा तुम्हाला गरजच नाही इर्शा करायची कारण ही स्वरा कायम तुमचीच असनार आहे फक्त चेहरा बदलला आहे, मन नाही. मनाने मी तुमची होते, आहे आणि सदैव राहणार आहे. लव्ह यु नवरोबा!!!"
स्वरा हसत-हसत उत्तरली आणि अन्वय हसतच म्हणाला," लव्ह यु टू बायको!! पण मी नाराज आहे तुझ्यावर. खूप राग आलाय मला."
स्वराने हसतच विचारले," का बरं? मी काय केलं आता?"
अन्वय आता आपल्या ओठांवर बोट ठेवत म्हणाला," बायको आज देखील ह्या सुंदर दिवसाची सुरुवात अशीच करणार. काही गोड नाही मिळणार का मला? आज तर बनत ना!! लग्नाचा वाढदिवस आहे आपला मग मिळणार नाही का गोड?"
स्वरा- अन्वयच्या लग्नाला ६ वर्ष झाली होती पण अन्वयचा हा स्वभाव ह्या ६ वर्षात कधीच बदलला नव्हता म्हणून स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात लाजेचे भाव पसरले. स्वरा फक्त लाजलीच होती की अन्वय म्हणाला," बस स्वरा!! आता लाजलीस ना तर घरात लाईटची पण गरज पडणार नाही. किती हे भारी लाजन!! इतकं पण नको लाजूस ग मी कामातूनच जातो( ती पुन्हा लाजली). देवा जगातल्या सर्व सुंदरता एकाच व्यक्तीमध्ये भरायची काय गरज होती बर? किती हे मनमोहक दृश्य!! बघ हा हिच्या प्रेमात मला वेड तर नाही लागणार ना?"
अन्वय आज जरा जास्तच रोमँटिक वाटत होता म्हणून स्वराने लाजून आपले हात चेहऱ्यावर घेतले. ती हात काढायचं नावच घेत नव्हती आणि अन्वय पुन्हा रोमँटिक होत उत्तरला," हाय मै मरजावा!! काय सुंदरता आहे ही. काय ते हसन, काय ते लाजन. आज तर स्वराच्या प्रेमात वेड लागलं तरीही चालेल. मी तर ओरडून सांगायला तयार आहे की मला माझ्या बायकोच वेड लागलं आहे. स्वरा आय एम इन लव्ह!!"
अन्वय बोलत होता तर स्वरा चेहऱ्यावर हात ठेवून नुसती लाजत होती. स्वरा हात काढत नाहीये म्हणून अन्वयने तिच्या मानेवर किस करायला सुरुवात केली आणि क्षणात अंगावर आलेल्या शहाऱ्याने स्वराचे चेहऱ्यावरचे हात पटकन खाली आले. हृदय धडधड करू लागल होत आणि अन्वय मानेवर फुंकर घालत उत्तरला," बायको आज खरच नाही मिळणार गोड?"
तो बोलत होता तर स्वरा आपल्यातच हरवली होती. त्यांच्या लग्नाला ६ वर्ष झाली होती पण अन्वयचा स्पर्श आजही तिला वेड लावत होता. त्याच्या श्वासांचे आवाज तिला त्रास देत होते तर अन्वयची ती नशिली नजर तिला भुरळ घालत होती. अन्वय तिच्याकडे बघतच होता, स्वराने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण आणले. त्याची मिठी सैल करत ती त्याच्या बाजूने वळाली आणि हळुवार स्वरात उत्तरली," देते पण आधी डोळे बंद करा. अशी द्यायला मला लज्जा वाटते..प्लिज!!"
अन्वय जरा रुसत उत्तरला," हे काय नवीन आता? मला तर अशीच हवी बघू तर किस्सी करताना तुझा चेहरा कसा दिसतो ते??"
तो ऐकायला तयार नव्हता म्हणून तिने हसतच त्याच्या डोळ्यावर आपला हात ठेवला. ती त्याच्या जवळ जात होती. तिचे श्वास तो आता सहज अनुभवू शकत होता. तिचा सुगंध तो जवळून अनुभवू लागला. तिच्या अशा वागण्याने त्याला स्वतःवरच कंट्रोल राहिला नाही आणि तिच्या कमरेभोवती केलेली मिठी आपोआप सैल झाली. त्यानेही क्षणात डोळे बंद केले. तिच्या ओठांचा रस प्यायला तो आतुर झालेला, ती त्याच्या कानाजवळ पोहोचली तो स्वतातच हरवला आहे हे बघून, संधि शोधून ती पटकन बाहेर पळाली. तिचे हात डोळ्यावरून नाहिशे होताच अन्वयने डोळे उघडले. ती तेंव्हापर्यंत बाहेर गेली होती तर अन्वय मधूनच तिच्याकडे बघत होता. अन्वयला आपण कस फसवलं म्हणून स्वरा त्याच्यावर हसत होती तर अन्वय तिला बेडरूममधून बघत म्हणाला," स्वरा प्लिज ना एकच दे..आज पण असच करणार आहेस? मी लाडका आहे ना तुझा मग आजची सुरुवात सुंदर नाही करणार का माझी? आता अस करणार ना तू माझ्यासोबत?"
ती त्याला हसून बघत होती. त्याला समजलं की इथे आपलं काम सहजासहजी होणार नाही त्यामुळे क्षणभर तो तिला बघत होता आणि त्याने मनोमन तिला पकडून मिठीत ओढण्याची योजना आखली. तो तिच्या मागे धावणारच की स्वराला त्याच्या योजनेचा सुगावा लागला आणि त्याच्याआधीच ती पळू लागली. अन्वय मागे तर स्वरा समोर. स्वराने काही पावले समोर टाकलीच होती की ती आईला जाऊन ठेपली. स्वराची आईला धडक देताच अन्वय पटकन रूममध्ये लपला. स्वरा आता विचित्र नजरेने आईकडे बघत होती. तिने मागे अन्वयकडे नजर टाकली तर तोही गायब झाला होता. तिला माहिती होत की आज आपण धपाटे नक्की खाणार म्हणून ती केविलवाण्या नजरेने आईला बघू लागली आणि आई हसतच म्हणाल्या," ह्या घरात लहान लहान मूल मस्ती करायला हवे होते एव्हाना. ते तर दूरच राहील पण तुम्हीच मस्ती करत आहात. लज्जा पण नाही ना तुम्हाला? घरात मोठे मोठे लोक आहेत तरीही तुमचा रोमांस काही कमी होत नाही बाबा? किती वर्षे असाच रोमांस सुरू राहणार, जरा गोड बातमी पण द्या.."
स्वरा जरा लाजतच उत्तरली," आई ते अन्वय सरच.."
आणि आई हसत म्हणाल्या," हा हा माहिती आहे मला माझाच मुलगा खोडकर आहे ते. चांगलं ओळखते मी त्याला. तुला त्रास देतो ना खूप तो??"
स्वरा लाजेचे भाव चेहऱ्यावर ठेवून आईकडे बघत होती आणि आई तिच्या कपाळावर किस करत उत्तरल्या," हॅपी मॅरेज अनिवर्सरि सुनबाई.."
आईने शुभेच्छा देताच स्वराने त्यांना वाकून नमस्कार केला आणि आई हसतच उत्तरल्या," माझ्या आयुष्यात जितकाही आनंद लिहिला असेल तो तुमच्या नशिबी ह्यावा हीच भगवंतांना प्रार्थना करेन. माझं संपूर्ण आयुष्य आणि सुख तुम्हाला मिळोत हीच प्रार्थना करेन आणि लवकर मला नात व्हावी ही पण करेल पण त्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल, आता नाही म्हणू नको हा!! तुम्ही आपले खेळत बसा आणि आम्ही मुलांसोबत खेळू. चालेल ना सूनबाई?"
स्वरा आईकडे हसून बघत होती.आईचे शब्द ऐकताच तिने पुढच्याच क्षणी आईला लाजून मिठी मारली आणि आई म्हणाल्या," तुमची चालू द्या नौटंकी, मी आणते चहा बनऊन. आज तू काहीच करायचं नाही. त्यालाही सांग बाहेर ये म्हणून, मी काही ओरडणार नाहीये."
स्वरा आईला नको नको म्हणत होती पण आज आई तीच काहीच ऐकणार नव्हत्या. आई क्षणात किचनला गेल्या. स्वराला माहीत होतं की अन्वयला ती एकटीच दिसली तर आज तीच काहीच खर नाही म्हणून ती किचनकडे जाऊ लागली. ती किचनला जाणारच की अन्वय पुन्हा मध्ये आला. तिची धडधड पुन्हा वाढू लागली. तो समोर समोर येत होता तर स्वरा मागे मागे जात होती. अन्वय कोणत्याही क्षणी स्वतःच गिफ्ट घेणारच की मागून निहारीका ओरडत उत्तरली," हॅपी मॅरेज अनिवर्सरी माय डिअर वहिनी.."
निहारीकाने तिला धावतच मिठी मारली आणि अन्वय पुन्हा आईच्या बेडरूममध्ये शिरला. अन्वयला अस बघून स्वराला हसू आवरत नव्हतं. निहारिकाने मिठी मारली त्यामागोमाग शरदनेही शुभेच्छा दिल्या. आताच मंदिरात जाऊन आलेल्या स्वराच्या आईबाबांनीही तिला मध्ये येत शुभेच्छा दिल्या तर अन्वय एका कोपऱ्यातुन सर्व गुपचूप एकत होता. आज त्याचा चेहरा बघून स्वराला हसू आवरत नव्हतं. इतक्या वर्षात ही एकमेव गोष्ट अशी ज्यात बदल झाला नव्हता. तो आताही तिच्या मिठीसाठी, किस्सीसाठी आतुर असतो हे बघून स्वराला आनंद देखील होत होता आणि त्याची खेचायची पण इच्छा होत होती म्हणून स्वरा आज त्याची जास्तच मज्जा घेत होती. नेहमीप्रमाणे आज सुद्धा दोघांच्या दिवसाची सुरुवात काहीशी अशीच मस्ती करताना झाली होती. स्वरा तशी त्याला छळत नसे पण आज ह्या खास दिवशी तिने ही संधी देखील सोडली नव्हती. आज प्यार तक्रार सर्व होत पण नजरेने कारण अन्वय सर्वासंमोर काही करणार नव्हता आणि आज स्वरा त्याला काही एकट्यात भेटणार नव्हती...
काही क्षण गेले स्वरा निहारिकाच्या मुलीशी खेळण्यात व्यस्त झाली आणि अन्वयने निहारिकाचा हात ओढत बेडरूममध्ये नेले. त्याने मध्ये जाताच आतून दार घट्ट लावून घेतले आणि हळुवार आवाजात रागावत म्हणाला," ए वहिनीची चमची. तुला ह्यासाठी बोलावलं आहे का मी? तुला माहिती आहे ना सर्व प्लॅन तुझ्यावर आहे मग इतका उशीर कोण करत का? अजून भरपूर तयारी करायची आहे कळत नाही का तुला? प्लॅन फेल झाला तर..."
अन्वय चिडून सर्व बोलत होता आणि निहारिका कान पकडत उत्तरली," सॉरी बॉस जरा उशीर झाला पण हरकत नाही आताच बोलते तिच्याशी. तू काळजी नको करुस तुझा हा प्लॅन नाही होणार फेल. तू बघ करते मी कस मॅनेज."
निहारीका मध्ये जाणारच की अन्वय तिला पुन्हा अडवत म्हणाला," सायंकाळ पर्यंत यायला नको तिने आणि तयारी करूनच आन हॉल मध्ये सरळ. समजत आहे ना मी काय म्हणतोय ते?"
निहारिका अन्वयचे गाल ओढत उत्तरली," हो बाबा सर्व लक्षात आहे. जाऊ का आता की आहे तुझं आणखी काही लेक्चर?"
अन्वय क्षणभर हसला तर निहारिका बाहेर हॉलमध्ये जाऊ लागली. अन्वय बेडरूममधूनच सर्व ऐकू लागला तर निहारिका स्वराच्या जवळ जात म्हणाली," ए वहिनी तिला सोड. तिच्याशी खेळायला भरपूर लोक आहेत. मी आज विशेष प्लॅन केलाय आपल्या दोघींचा फक्त सो चल आवर बाहेर जायच आहे आपल्याला. बाकी सर्वाना वेळ नंतर आज फक्त माझा वेळ. चल कर बर पटकन तयारी.."
स्वरा जरा हसतच उत्तरली," सॉरी ताई पण आज माझा अजिबात मूड नाहीये. मी तर घरीच सर्वांसोबत थांबणार आहे आज. सॉरी!! नंतर कधी जाऊ. आज माझा दिवस आहे ना सो तुम्हाला माझं ऐकाव लागेल मी नाही ऐकणार तुमचं.."
निहारिका तिला समजावत होती पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. एवढंच काय सर्वांनी तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती आपल्या निर्णयावरून क्षणभर हलली नव्हती. सर्व आता एकमेकांकडे बघत होते. सर्वाना माहीत होतं की आता प्लॅन निष्क्रिय होणार आणि अन्वय निहारिकाला सोडणार नाही. खूप दिवसापासून त्याने ह्या दिवसाची वाट बघितली होती तेव्हा ओरडा मिळणे पक्के होते. कुणाला काय बोलावं काही समजत नव्हतं आणि तेव्हाच अन्वय हॉल मध्ये येत म्हणाला," स्वरा मला ना माझे कपडे सापडत नाहीये प्लिज शोधुन देशील का मला?"
स्वराने अन्वयकडे क्षणभर नजर टाकली. त्याच्या डोळ्यात अगदी थोड्या वेळेपूर्वी असलेले भाव जाणवत होते. तिला माहिती होत की आता रूममध्ये जाण रिस्की आहे किंबहुना त्याचा मूड बघता आज घरातच राहाने रिस्क आहे म्हणून स्वरा हसत उत्तरली," ताई तुम्ही तुमच्या भावाला ड्रेस शोधून द्या मी आलेच तयार होऊन. दिवसभर फिरुया तुम्ही म्हणाल तिथे. आज मला घरी रहायच नाही क्षणभरसुद्धा..चालेल ना?"
स्वरा अन्वयच्या समोरूनच फ्रेश व्हायला बेडरूममध्ये गेली तर अचानक सर्वांचे चेहरे प्रफुल्लित झाले होते. हॉलमध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती आज नजरेने एकमेकांना ऑल द बेस्ट करत होता कारण आज फक्त त्यांच्या लग्नाचा वाढदिवसच नव्हता तर आजपासून स्वरा-अन्वयच्या कहाणीचा नवीन अध्याय सुरू होणार होता म्हणून आज प्रत्येक व्यक्ती त्या सोहळ्यात भाग घ्यायला आतुर होता…स्वरा अन्वयला बघून त्याच्यावर हसत बेडरूमला गेली. तिला वाटलं होतं की ती त्याला त्रास देत आहे पण प्रत्यक्षात आज त्यालाही तेच हवं होतं. आज त्याने काहीतरी प्लॅन केला होता, जो तिच्या चेहऱ्यावर जगातला सर्वात मोठा आनंद, सुंदर हसू आणणार होता म्हणून तोही तिच्याकडे बघून हसत होता. त्याच्या चेहऱ्यावरच गोड हसू सांगत होत, तो नक्की काय करणार होता ते..
कैसे समझाये अहमियत इस पल की
सौ जन्म दर्द मे गुजरे होंगे तब तुम हासिल हुए..
***********
ती सायंकाळची वेळ होती. बाहेर हलकेच अंधार पडला होता. हॉल मध्ये सेलिब्रेशनची सर्वच तयारी झाली होती. टीमटीम करणारे सिरीज तिच्या येण्याची आतुरतेने वाट बघत होते आणि ती वेळही आली. स्वरा कार मधून उतरल्याची बातमी अन्वयला मिळाली आणि सर्व तिच्या स्वागतासाठी तयार झाले होते. आज पहिल्यांदा सर्व लोक तिचा नवीन चेहरा बघायला उत्सुक होते म्हणून निहारिकाने स्वराची तयारीही तशीच करून दिली होती. आज स्वरा पुन्हा एकदा लाल साडी नेसून तयार झाली होती. कोपऱ्यापर्यंत स्लीव असलेला ब्लाउज, हलकासा मेकअप, पायात छनछन करणारे पैंजण, हातात सोन्याचे कंगण, गळ्यात मंगळसूत्र, नाकात नथ आणि कानात झुमके. आज स्वराला जो कुणी बघेल त्याच काहीच खर नव्हतं. स्वराला जवळपास अंदाज आलाच होता की अन्वयने काहीतरी प्लॅन नक्की केला होता म्हणून तीही तयारी करायला मागे हटली नव्हती. आज तिला स्वता अन्वयने अस बघावं अशी तिची इच्छा होती म्हणून तीही उत्सुक होती, त्याच्याशी पुन्हा नव्याने भेटायला. स्वरा नजर इकडे तिकडे फिरवत, हळुवार पावले टाकत हॉल मध्ये पोहोचली. तिला बघून अन्वय कसा रिऍक्ट करेल म्हणून स्वरा जरा लाजतच मध्ये चालत होती. त्या वेळी तिची नजर काही वर झाली नव्हती. तिने हॉलमध्ये पहिले पाऊल टाकले आणि नजर वर केली. तिची नजर आता समोरच्या दृश्यावर स्थिर झाली. तिला अंदाज होता की काहीतरी नक्कीच सरप्राइज आहे. हॉल सजवला असेल, केक आणला असेल वगैरे वगैरे पण अन्वयने त्या पलीकडे जाऊन तिला सरप्राइज द्यायचं ठरवलं होतं. तिची नजर समोर स्थिर झाली आणि तिच्या चेहऱ्यावर आपोआप हसू पसरल. तेच हसू जे अन्वय सतत तिच्या चेहऱ्यावर बघण्यासाठी आतुर होता. ती एकाच जागी स्तब्ध उभी राहून सर्व बघत होती. तिचे पाऊल सुद्धा तिथेच घट्ट जमले होते. ती पुढे काही रिऍक्ट करणार त्याआधीच पूजा, मधूने मिठी मारत तिला शुभेच्छा दिल्या. तीच होत नाही तर शोभना, कायरा, स्वयम, स्वयमच्या आई असे कितीतरी लोक तिला शुभेच्छा देत होते. तिथला प्रत्येक व्यक्ती शुभेच्छा देत होता आणि स्वरा हसून शुभेच्छा स्वीकारायच काम करत होती. आज त्याच्या ह्या गिफ्ट साठी तिच्याकडे बोलायला शब्द नव्हते म्हणून ती हसून आपले भाव मांडत होती. स्वराने क्षणभर सुद्धा विचार केला नव्हता की तिला इतकं सुंदर सरप्राइज ह्यादिवशी मिळेल. अन्वयने आज तिच्या आणि त्याच्या आयुष्यातील जवळपास सर्वच खास व्यक्तीला बोलावले होते म्हणूनच की काय तिचा आनंद द्विगुणित झाला होता. स्वरा त्या सर्वांना भेटून इतकी आनंदी झाली होती की काही क्षण तिच्या डोळ्यातुन आनंदाश्रू वाहत होते तर अन्वय तो प्रत्येक क्षण स्वतःच्या मनात साठवून घेत होता. ते अश्रू नव्हते, ते होत समाधान. आयुष्याच्या वाईट क्षणात साथ देणाऱ्या लोकांसोबतच तिच्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार आहे हे बघून स्वरा भारावून गेली होती तर अन्वय तिच्या चेहऱ्यावरच आधीच हसन आणि आताच रडन सर्व बघत होता. किती वेळ झाला होता माहिती नाही. आज पार्टीमधील प्रत्येक व्यक्ती स्वराला शुभेच्छा देत होता आणि स्वरा पुन्हा एकदा जुन्या नात्याना भेटून बहरून निघाली होती मुळात ती त्यात हरवली होती. आज स्वराच अन्वयकडे सुद्धा लक्ष गेलं नव्हतं. ती आपल्याच जगात हरवली होती आणि अन्वय मोठ्याने म्हणाला,
सुंदरता कैसी होती है जरा हमे भी दिखा दो
दिलं बेहक रहा है मेरा जरा इसे भी समझादो
नूर देखा था कभी मैने उसकी तसविर मे
अगर मिल जाये वो तसविर तो वो यादे हमेभी जरा लौटा दो
अन्वयच्या शायरीने सर्वांच लक्ष त्याच्याकडे गेलं. स्वरा दूर उभी राहून त्याच्याकडे एकटक बघत होती. भरलेल्या डोळ्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दुरूनच वाचू लागली आणि अन्वय पुन्हा म्हणाला," सर्वांचे खूप खूप आभार की इतक्या शॉर्ट पिरेड मध्ये तुम्ही आलात. आज स्वरा आणि माझ्या आयुष्याचे नवीन पर्व सुरू होणार आहे. हे नवीन पर्व आम्ही अनुभवतो आहे त्याच एक मुख्य कारण म्हणजे तुम्ही सर्व. कदाचित तुम्ही सर्व नसतात तर आज आम्ही हा क्षण सेलिब्रेट करू शकलो नसतो. त्यामुळे सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबातर्फे तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आज अन्वय-स्वरा एकत्र आहेत तर ते फक्त तुमच्यामुळे त्यामुळे खूप खूप धन्यवाद. तुमचे आमच्या आयुष्यातील स्थान कुणीच घेऊ शकत नाही. होऊ शकत मागील काही वर्षे एक प्रवास करता करता तुमच्याकडे दुर्लक्ष झाल असेल पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही तुम्हाला विसरलोय. आज त्याचीच आठवण करून द्यायला, आमच्या नवीन प्रवासात साथ द्यायला तुम्हाला बोलावलं आहे. आशा आहे आज तुम्हाला आमचा कसलाही राग नसेल, असेल तर प्लिज विसरून आमची नव्याने साथ द्या कारण तुमच्याविना आमचं भविष्य सुद्धा अशक्यच आहे."
अन्वयचे शब्द पूर्ण होताच सर्वांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि अन्वय हसत उत्तरला," टाळ्या म्हणजे बोलण्याचा शेवट बरोबर ना? बोर करतोय का मी? असेलही... पण तुमच्याकडे आज पर्याय नाही. ऐकाव तर लागणारच कारण माझी पार्टी आहे तर नियम पण माझेच असणार. सो हे काही मिनिट लेक्चर ऐकून घ्या.."
अन्वयच्या विनोदी बोलण्यासमोर कुणी हसणार नाही हे शक्यच नाही त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हसू लागला आणि अन्वय पुन्हा म्हणाला," जस्ट किडींग!! खर तर ही आमच्या नात्यांची नवीन सुरुवात असणार आहे आणि काही जुन्या गोष्टी आहेत ज्या मला आज क्लिअर करायच्या आहेत त्याशिवाय मी ह्या नात्यात समोर जाऊ शकत नाही म्हणून मी आज इथे आहे. तुम्ही आपला अमूल्य वेळ देऊन इथे आलात तेव्हा मला माझ्या नवीन नात्यांची सुरुवात करण्यापूर्वी तुमचे फक्त १० मिनिट हवेत, मिळतील का प्लिज?"
आज अन्वय-स्वराचा दिवस असल्याने कुणी त्यांना अडवण्याची शक्यता नव्हतीच त्यामुळे मधातून काही लोकं ओरडले," सर नियम तुमचे तर विचारून काय फायदा ना सरळ सुरुवात करा. बघू तरी लेक्चर कस आहे ते, नाही तर जेवण आहेच की, बोर झालो तर जाऊच आम्ही सरळ तिकडे, तशी पण खरी नजर तर तिकडेच आहे."
पूजा, मधू गमतीत बोलून गेली आणि अन्वय हसतच उत्तरला," ह्या ६ वर्षाच्या प्रवासात बऱ्याच गोष्टी घडल्या पण दोन गोष्टी आहेत ज्या मला तुम्हाला सांगाव्याशा वाटतात किंबहुना त्याशिवाय हा नवीन प्रवास मी नाही सुरू करू शकणार. तर ही गोष्ट आहे मुंबईच्या ऑफिसची. स्वरा आणि माझ्या भेटीची. मी तिच्याकडे आकर्षित होऊ लागलो होतो आणि ती लोकांचा विचात करून माझ्यापासून दूर जाऊ लागलेली. स्वराशी जसजसा जवळचा संबंध येत गेला तसतसा मी तिचा होत गेलो आणि पहिल्यांदा मला तिच्यातली ती दिसली. स्वरा संघर्षाच एक उदाहरण. तिचा संघर्ष खूप मोठा होता पण ती अडकली होती एका प्रश्नात. असा प्रश्न जो जगातल्या सर्व लोकांना पडतो..लोक काय म्हणतील? ती अशी वेळ होती जेव्हा स्वरा कायमच लोकांचं बोलणं मनावर घ्यायची. तिला लोकांचे मत इतके महत्त्वाचे वाटत होते की ती त्यांच्या विचारानुसारच जगत असे आणि जणू तिला आपले विचार, आपलं स्वातंत्र्य आहे हे विसरूनच गेली. मी हे खूप दिवस शांतपणे बघत होतो आणि शेवटी राहवलं नाही. मला एक दिवस तिच्या विचारांचा खूप राग आला आणि मी तिला विचारलं की का तुला तुझा चेहरा इतका महत्त्वाचा वाटतो? कधीतरी म्हातारी होशीलच आणि ज्या सुंदरतेचा लोक तरुणपणात गर्व करतात त्या चेहऱ्याला कुणी भाव पण देणार नाही, चेहऱ्याकडे कुणीच लक्ष देणार नाही. जी गोष्ट शाश्वत नाही त्या गोष्टीचा इतका काय विचार करायचा?? मी तेव्हा रागात तर बोलून गेलो पण आज तिच्यासोबत एक एक पाऊल साथ देताना जाणवत स्वरा मी चुकीचा होतो, हा माझा केवळ गैरसमज होता. पडतो फरक चेहऱ्याने..आज नाही तर आयुष्यभर पडतो. हे लक्षात केव्हा आलं स्वरा तुला माहिती आहे?? जेव्हा एके दिवशी माझ्या आईने मला म्हटलं अन्वय माझा चेहरा तर कधी ना कधी नीट होईल पण स्वराच काय? तिला तर पूर्ण आयुष्य असच काढायचं आहे? कदाचित आम्ही तुमच्या प्रेमाखातर बदललो पण जगाला कस बदलवणार? स्वरा दाखवत नाही ह्याचा अर्थ असा नाही की तिला त्रास होत नसेल. जगात सर्व गोष्टींपासून पळवाट काढता येते पण लोकांच्या नजरेपासून शक्य नाही मग तिने काय आयुष्यभर असच रहायच का? अन्वय सोपं असत म्हातारपण कारण तोपर्यंत आपण पूर्ण आयुष्य जगलो असतो त्यावेळी आयुष्याचा मोह असणार नाही पण तरुणपणात इतकं सोपं आहे का लोकांच्या नजराणा नजर देणं आणि दरवेळी त्यांच्या नजरेत आपला चेहरा बघून आपण काय आहोत ह्याची जाणीव करून घेणं? अन्वय तूच सांग तुला काहीच फरक जाणवत नाही तरुणपणी आणि म्हातारपणी चेहर्याबद्दल विचार करताना. म्हातारपण म्हणजे प्रवासाचा अंत तर तरुणपण म्हणजे प्रवासाची सुरुवात मग का फरक पडू नये चेहऱ्याने??"
अन्वयने बोलता- बोलता पॉज घेतला आणि त्याने सर्वांकडे नजर टाकली. प्रत्येक व्यक्ती अन्वयकडे नजर रोखून बघत होता, अगदी स्वराही आणि अन्वय थोडा गँभिर होत म्हणाला," त्यावेळी पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं की स्वरा कदाचित दिवसभर माझ्या सोबत असताना खुश राहते पण दिवसात असा एक क्षण असतो जेव्हा तिला समाजाला फेस करावं लागतं आणि त्यावेळी ती नक्कीच दुःखी असते कारण कितीही नाही म्हटलं तरीही मी समाजाचे विचार अमान्य करू शकतो पण मला, तिला त्याच समाजात वावरायच आहे हे सत्य मी कधीच बदलू शकत नाही. हा विचार माझ्या मनात आला आणि मी पहिल्यांदा स्वार्थी झालो. स्वरा म्हणते मी अन्वयशी लग्न करून स्वतःचा स्वार्थ साध्य केला पण स्वरा मीही सांगतोय तेव्हा झालो मी स्वार्थी. माझ्या प्रेमाच्या चेहऱ्यावर हसू आणायला मी स्वार्थी झालो. मला त्याक्षणी प्रश्न पडला की माझ्या स्वराने एक क्षण तरी का दुःखी असावं? मी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना विचार केला की मी जगाला बदलवू शकतो का?? कदाचित ह्याच उत्तर शक्यच नाही. कारण जगाला मी काय कुणीच बदलू शकत नाही. ते बदलतील स्वतःहून आणि त्याला पूर्ण आयुष्य जाईल. तोपर्यंत मला माझ्या स्वराने त्या एका क्षणात कैद राहणे मला पसंद नव्हतं. कधी कधी ना लोक बदलत नाही मग आपल्याकडे एकच पर्याय उरतो, ते म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी स्वतःला बदलवीन. माझ्यातला तो बदल म्हणजे काय? तो बदल म्हणजे इच्छा नसतानाही स्वराची सर्जरी करणे..जग बदललं नाही स्वरा म्हणून मला नाईलाजाने बदलाव लागलं आणि माझ्या स्वार्थासाठी तुझा चेहरा मी बदलण्याचा निर्णय घेतला."
अन्वय बोलता बोलता थांबला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्याने ते रुमालाने पुसून घेतले आणि पुनः एकदा म्हणाला," ह्या गेल्या ५ वर्षात जवळपास प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडला असेल की ज्या अन्वयने स्वराला त्या अवस्थेत स्वराला स्वीकारलं मग त्याच अन्वयला आज तिला सर्जरी करून सुंदर बनविण्याच वेड का लागलं? तोही तर लोकांसाठी बदलला नाही ना? त्यालाही तिचा हा चेहरा आवडत नाही का? लोकांचं बोलण सतत ऐकून कंटाळला असेल ना? तेव्हाच तर बदलतोय तो तिचा चेहरा. हा एक प्रश्न कदाचित स्वरालाही कायमच पडला असेल म्हणून त्याच उत्तर देणे मला जास्त गरजेचे वाटते. स्वरा मला ना तुझ्या रूपाने कधीच फरक पडला नव्हता आणि पडणारही नाही पण तुला एक क्षण सुद्धा दुःखी बघायला माझं मन तयार नाही. स्वार्थ तर स्वार्थ पण मला हवंय तुझं ते सुंदर हसू. तुझं बिनधास्तपाने आकाशात उडणे, लोकांच्या नजरेला नजर देऊन तुझं आकाशात भरारी घेणे आणि त्यासाठी सर्जरी हा एकमेव पर्याय होता. मी सर्जरी नाईलाज म्हणून केली नाही तर तुझ्या चेहऱ्यावर हसू बघावं म्हणून केली. फक्त लोकांमुळे ते सुंदर हसू मला बघण्याचा अधिकार नाही का? हजार वेळा विचार केला स्वरा तू रागावलीस तर? तुम्हीही त्याच पुरुषातले म्हणून सोडून तर जाणार नाहीस ना मला?? म्हणून कितीतरी दिवस मी माझ्या मनाला समजाऊन निर्णय बाजूला ठेवत गेलो पण शेवटी एक दिवस मनाचा स्वार्थ जिंकलाच, मी हरलो आणि स्वार्थ जिंकला. स्वरा माझ्याकडे पैसे नसते तर कदाचित मी मनाला समजावून गप्प केलं असत पण पैसे असतानाही मी मनाला कस शांत करू? पैसे असून जर स्वराच ते हसू मी बघू शकलो नसतो तर त्या पैशांच नक्की काय केलं असत? म्हणून तुझा राग ओढवून हा निर्णय घेतला. मला तेव्हाही माहिती होत की स्वराचा चेहरा पूर्णपणे बरा होणार नाही पण माझ्याकडे पैसे असताना देखील मी त्याचा वापर नसता केला तर माझं मन नक्की मला खात राहील असत.. स्वरा जगाने मला स्वार्थी म्हटलं तरी हरकत नाही पण माझं मन आज खूप समाधानी आहे. आज माझ्याकडे बँक बॅलन्स नाही, स्वतःची कमाई नाही पण माझ्या स्वराच्या आयुष्यात तो एक आनंदाचा क्षण कायम असेल ह्याचा आनंद मला खूप जास्त झालाय. म्हणतात की पैशाने सुख विकत घेता येत नाही, मलाही ते मान्य आहे पण पैशाने मला लोकांची नजर बदलवता येणार असेल तर माझ्याकडे असलेली पूर्ण संपत्ती मी तुझ्यासाठी खर्च करेन. आई तू म्हणाली होतीस ना लोकांची नजर बद्दलविणे शक्य आहे का?? नाही आहे पण मी बदलू शकत होतो सर्जरी करून आणि ते मी केलं. कधी कधी ना आपल्या तत्त्वपेक्ष्या आनंद महत्त्वाचा असतो आणि मला स्वराच्या आनंदाशिवाय दुसर काहीच नकोय. मग लोक स्वार्थी म्हणतील तर म्हणू दे..पण माझ्या प्रेमाला आज आनंदी बघतोय तेव्हा जाणवत स्वार्थी झालो तरच आनंद मिळतो. थोडासा स्वार्थ जीवनात असावाच. आपल्यालाच आपल्या आनंदाचा विचार करावा लागतो, जग फक्त कमेंट पास करत, आनंद देत नाही."
अन्वयच बोलणं थांबल तेंव्हा सर्वांचे डोळे पाणावले होते अगदी स्वराचेही. कारण अन्वयने आज सर्व काही कुर्बान केल होत फक्त तिच्या चेहऱ्यावर एक क्षण आनंद मिळावा म्हणून. कदाचित प्रेमाची ह्यापेक्षा वेगळी काही परिभाषा असूच शकत नाही. लोकांची नजर बद्दलविणे शक्य नाही म्हणून स्वतःला बदलवून तिला आनंद देणारा तो खरच जगावेगळा आहे..
सर्व भावुक झाले होते आणि पूजाने हळुवार शब्दात विचारले," जीजू दुसरी गोष्ट कोणती?"
अन्वयने डोळ्यातले अश्रू पुसले आणि हसतच म्हटले," हा आहे एक गैरसमज. तुम्हा-आम्हा सर्वांना झालेला अगदी माझ्या बायकोलाही झालेला. तो गैरसमज आहे भाग्य दिले तू मला."
अन्वय बोलून तर गेला पण कुणाला काहीच समजलं नव्हतं. सर्वांचे चेहरे विचारात पडले होते आणि अन्वय म्हणाला," जेव्हापासून स्वराला मी स्वीकारलं तेव्हापासून एक गोष्ट मी सतत ऐकत आलोय ती अशी की अन्वयने स्वराला स्वीकारून भाग्य दिले पण बायको प्रत्यक्षात हा तुमचा गैरसमज आहे. मी आधी मनुष्य होतो पण माणुसकी शिकलोय मी तुमच्याकडून. लोकांकडे कारण नसतात तरीही कारण शोधून ते नात्यापासून बाहेर पडू इच्छितात पण तुझ्याकडे हजारो कारण असताना, मनात सल टोचत असतानाही सतत नाती जपन मी तुझ्याकडून शिकलोय. प्रेम फक्त ऐकत आलो होतो पण प्रेम करायचं शिकलो तुझ्याकडून. आयुष्यात फक्त मिळवित आलो होतो पण खूप काही गमावून सुद्धा बरच काही मिळत हे तुझ्याकडून शिकलो. विचार करतो तेव्हा जाणवत की मला हजारो सुंदर मुली मिळू शकल्या असत्या पण खऱ्या अर्थाने जीवनाचा प्रेमाचा अर्थ दिला तो स्वरा ह्या व्यक्तीने. तशी ती जगासाठी कामाची नव्हती पण माझ्यात असलेल्या खऱ्या माणसाशी ओळख करून दिली स्वराने. स्वरा मी फक्त तुला स्वीकारलं पण तू खऱ्या अर्थाने मला जगण्याच कारण दिलं. आजच्या काळात पुरुष घरच्यांना लग्नाबद्दल सांगून दुखवायला सामोरे जात नाहीत पण तुझ्याच सोबतीने मी हा संघर्ष पार केलाय आणि नवीन अन्वयला जन्माला घातलं आहे. ज्याचा जन्म, ज्याचा श्वास, ज्याच अस्तित्त्व फक्त तुझ्या असण्याने आहे तेव्हा स्वरा तूच सांग भाग्य नक्की कुणी कुणाला दिले? स्वरा तू आहेस तर मी आहे नाही तर ह्या अन्वयलाही काहीच अर्थ नाही म्हणून आज ह्या सर्वांसमोर ओरडून कबुली देतो. स्वरा भाग्य दिले तू मला. माझ्या घराला घरपण देताना भाग्य दिले तू मला. मी हरल्यावर साथ देताना भाग्य दिले तू मला. घरच्यांसमोर, समाजासमोर संघर्ष करताना साथ देऊन भाग्य दिले तू मला. तुझ्या आयुष्यात मी आलो नसतो तर काहीच फरक पडला नसता पण तू माझ्या आयुष्यात नसती तर कदाचित मी कायमच अपूर्ण असतो एक पुरुष, एक मनुष्य म्हणुन.. म्हणून ओरडून सांगते स्वरा भाग्य दिले तू मला..भाग्य दिले तू मला.."
अन्वयच बोलणं झालंच होत की पूजा समोर येत म्हणाली," मित्र तर खूप आहेत यार पण जो आपल्यापेक्षाही लहान असून जगायच कस, मैत्री कशी निभवायची ते शिकवून जातो ती व्यक्ती म्हणजे स्वरा म्हणून मीही म्हणेन एक मित्र म्हणून स्वरा भाग्य दिले तू मला.. तुझ्याविना मैत्रीची कल्पना देखील करणे अशक्य.."
तीच बोलणं झालं होतच की स्वयम पुढे येत म्हणाला," स्वरा प्यार तो सब करते है पर उसका सही मतलब बहोत कम लोग समझते है. तुमने हर रिषते को जोडकर सबको कैसे जितें है ये है बताया. प्यार की, रिषते कीं परिभाषा को तुमने है सबको समझाया. इसलीये आज पेहली बार मराठी मे केहता हु स्वरा भाग्य दिले तू मला. तुम हो तो प्यार है, तुम प्यार की सुंदर मिसाल हो.."
स्वयमच बोलणं होताच अन्वयच्या आई म्हणाल्या," स्वरा माझ्याकडे तुझ्यासाठी शब्द नाहीत. तुला सर्वात जास्त त्रास मीच दिला असेल पण ते सर्व विसरून सहज ह्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला जोडणाऱ्या माझ्या घराच्या लक्ष्मीला म्हणेन स्वरा भाग्य दिले तू मला.. सोपा नव्हता तुझा हा प्रवास पण तू कुणालाही न तोडता सतत जोडून सिद्ध केलंस तुझ्याशिवाय ह्या घराला घरपण नाही. मला माझ्याच चुकांची जाणीव करून देऊन मला नवीन जीवन, माणुसकीची व्याख्या आणि नवीन शिकवण देणाऱ्या माझ्या मुलीला आज मी ओरडून सांगेन स्वरा भाग्य दिले तू मला.."
स्वराचे डोळे पाणावले होतेच की इतर सर्व लोक मोठ्याने म्हणाले," माणसाला माणुसकी आणि जीवनालाही संघर्ष शिकविणाऱ्या मुलीसाठी आज म्हणावेसे वाटते स्वरा भाग्य दिले तू मला. स्वरा भाग्य दिले तू मला.."
स्वराचा आज उर भरून आला होता. आज काहीशी अशीच स्थिती तिच्या आईबाबांची झाली होती. तिला नशिबाने इतके प्रेम करणारे व्यक्ति मिळाले होते की तिला बोलायला शब्द कमी पडत होते. अन्वय बरोबर म्हणतो ते नसते तर कदाचित अन्वय स्वरा कधीच नवीन प्रवासाची सुरुवात करू शकले नसते. स्वरा आज भारावून सर्वांकडे बघत होती. अन्वय क्षणातच तिच्याकडे गेला. त्याने तिच्या डोळ्यातले अश्रू क्षणात पुसले आणि तिचा हात पकडून तिला घेऊन जाऊ लागला. आज सर्व त्यांच्याकडे बघत होते आणि सर्वांच्या समवेत शेवटी अन्वय-स्वराने केक कापला.
एक असा दिवस होता जेव्हा स्वराचा चेहरा बघून लोक दूर पळायचे पण आज असा एक दिवस होता जेव्हा प्रत्येक व्यक्ती तिच्या संघर्षाच्या प्रेमात पडला होता. आज स्वरा- अन्वयने केक कट करून नवीन प्रवासाची सुरुवात केली होती आणि तिच्यासोबत होता तो प्रत्येक जिवलग व्यक्ती. आज असा एक क्षण होता जिथे स्वराला पहिल्यांदा एकट वाटत नव्हतं. ती हसत होती, नाचत होती आणि बेधुंद वाहत होती. तिच्या प्रत्येक जवळच्या व्यक्तींने तिला होत तस स्वीकारलं होत आणि ज्यांनी स्वीकारलं नाही त्यांना अन्वयने तिला स्वीकारायला भाग पाडल होत कदाचित हीच होती स्वराच्या भाग्याची कहाणी. प्रेम करायला फक्त मन नाही धाडस लागत. प्रेम तर सहज होऊन जाईल पण तिला स्वीकारून तिला खर जीवन देणे म्हणजे खऱ्या अर्थांने भाग्य दिले तू मला. एका मुलीसाठी आपल्या नवर्याला वेगळं घेऊन राहन खूप सोपी आहे पण त्याला कुणापासून वेगळं न करता, त्याच्या सर्व लोकांना आपलंसं करून घेणे म्हणजे भाग्य दिले तू मला..
जवाब देते नही अल्फाज हर बार
कुछ जवाब तो अपणे कर्म देते है
ऐसीही नही लिखी जाती प्रेम की कहाणीया
उसके लिये संघर्ष के बीज बोने पडते है...
***************
जवळपास रात्रीचे ३ वाजत आले होते. अन्वय अजूनही झोपला नव्हता. रूमच्या रूममध्ये तो इकडून तिकडे चकरा मारत होता. स्वरा आता कुठे आपल्या सर्व फ्रेंड्सना झोपवून पाणी घ्यायला खाली परतली होती. ती किचनला जाणारच की तिची नजर बेडरूमवर पडली. बेडरूमचे लाईट अजूनही सुरूच असल्याने तिने मध्ये डोकावून पाहिले तर अन्वय इकडून-तिकडे चकरा मारत होता. अन्वय टेन्शनमध्ये असला की अस करायचा हे तिला माहिती होत म्हणून हळुवार पाऊल टाकत ती बेडरूमला आली आणि त्याला स्पर्श करत तिने विचारल," अन्वय सर काही झालंय का? अजून झोपला का नाहीत? काही प्रॉब्लेम तर नाहीये ना पुन्हा?"
स्वरा दिसताच अन्वय जरा शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरची बेचैनी काही क्षण का असेना नाहीशी झाली तरीही तो काहीच बोलला नाही. तो तिच्याकडे बघत होता की स्वरा रागावत म्हणाली," आता अस करणार ना तुम्ही? मलादेखील नाही सांगणार. ठीक आहे मी जाते. मग बसा एकटेच विचार करत. तुम्ही ना असेच करता, सुख वाटून घेता पण दुःख एकटेच सहन करता.."
स्वरा बेडरूममधून जाणारच की अन्वयने तिचा हात पकडत नम्र स्वरात म्हटले," स्वरा लोकांप्रमाणे तुलाही वाटत असेल ना की अन्वय सुद्धा शेवटी सुंदरतेसमोर झुकलाच. त्याने पण शेवटी सुंदरताच स्वीकारली. त्यालाही स्वार्थ शेवटी त्याच सुंदरतेचा.. वाटलं असेल ना तुला?"
अन्वयच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्याचे शब्द ऐकू येताच स्वरा थांबली. ती त्याच्या बाजूने क्षणभर वळाली. तिच्या चेहऱ्यावर गोड स्मित होत. ती काहीच बोलली नाही. तिने त्याचा हात पकडत बेडवर बसविले आणि त्याच्या कुशीत लेटत उत्तरली," अन्वय सर मी ऐकत आलेय की बायकोने एक गोष्ट नवर्याला मागितली तर तिला वेगवेगळी कारण देऊन गप्प केल्या जात. मी त्याच काळातील एका अशा मुलाची बायको आहे ज्याने फक्त माझ्या काही मिनिटांच्या आनंदासाठी स्वतःकडे असलेले करोडो रुपये खर्च केले. आता तुम्हीच सांगा त्यांच्यावर मी रागवाव की असा हिरा मला मिळाला म्हणून मनमुराद प्रेम कराव?"
अन्वयने हसतच विचारले," स्वरा खरच रागावली नाहीस ना तू माझ्यावर?"
स्वरा त्याच्या हाताला किस करत म्हणाली," अजिबात नाही. तुमचा राग नाही आला केव्हाच पण मला लोकांचा राग कायमच येतो. त्यांचे विचार ऐकून कायमच थक्क झाले. अन्वय सर मी कुणावर रागावले नाहीये मी पण खरं सांगू तर चीड नक्कीच येते हा विचार करून की ह्या पूर्ण प्रवासात सर्व लोक मला फक्त आपले मत सांगत राहिले. मला काय हवं किंवा मला काय वाटत हे कुणीच विचारलं नाही. त्यांना ते जाणून घ्यावस वाटलं असत तर किती सोपं झालं असत ना माझं आयुष्य??"
स्वरा बोलून गेली आणि अन्वय हळुवार तिच्याकडे बघत उत्तरला," मला ऐकायला आवडेल स्वरा तुला काय वाटत ते. खर तर तुझ्या मताशिवाय ही नवीन कहाणी सुरूच होऊ शकणार नाही. सो आज बोल. मलाही ऐकून घ्यायच आहे आज सर्वच."
स्वराने क्षणभर त्याच्याकडे बघितले आणि जरा गंभीर स्वरात उत्तरली," अन्वय सर अपघात झाला होता तेव्हा ना मी माझ्या चेहऱ्याला कधीच घाबरले नाही, मी घाबरले ते लोकांचे विचार बघुन. प्रत्येक पावली स्वतःला सुसंस्कृत बोलणाऱ्या समाजाचे विचार मला त्याक्षणी बघायला मिळाले आणि मला स्वताप्रति, समाजाप्रती घृणा वाटू लागली. मला जेव्हा कुणीतरी कधीतरी भेटायला यायचं ना.. तेव्हा वाटायचं की कुणीतरी साथ द्यावी, हिम्मत द्यावी, म्हणावं की आम्ही सोबत आहोत तू एकटी नाहीस फक्त लढत राहा. ते तर कधी ऐकायला मिळाल नाहीच पण लोकांच्या वागण्यात, बोलण्यात मला कायम दया, घृणा सापडत राहिली. तुम्हीच सांगा एक मुलगी आपल्याबद्दल घृणा, दया बघून खरच खचून जाणार नाही का? राजने माझा फक्त चेहरा खराब केला सर पण समाजातील इतर माणसांनी माझ्याकडून जगण्याची आशाच हिरावून घेतली मग खरा आरोपी कोण? मला बोलणार समाज की माझ्यावर वर एसिड अटॅक करणारा राज? दोघातून एकालाच जबाबदार पकडन कितपत योग्य? एकाने चेहरा हिरावून घेतला तर दुसर्यांनी माझं अस्तित्त्व. खरा आरोपी कोण? मग अशा स्थितीत एका मुलीला मरण्याचा पर्याय योग्य वाटण चुकीच आहे का? अन्वय सर मला लोक सतत विचारतात की तू घाबरतेस का आरशात स्वतःला बघताना. खर सांगू तर अजिबात नाही. ह्या चेहऱ्याला काय घाबरायचं, मी सवय करून घेतली लवकरच ह्या चेहऱ्याची आणि मी मलाच सुंदर जाणवू लागले. मी घाबरले प्रत्येक वेळी लोकांच्या डोळ्यात माझ्याप्रति घृणा बघुन. त्यांना कोण सांगेल ना अन्वय सर की मी स्वतः काय आहे हे समजायला मला आरशात बघायची कधी गरजच पडली नाही कारण ते सर्व तर मी त्यांच्या नजरेतच बघत होते. मग लोकांच्या नजरेत सर्व दिसताना मी नक्की कोणत्या स्वराला आरशात बघू?"
अन्वय निवांत तीच बोलणं ऐकत होता आणि स्वरा पुन्हा म्हणाली," अन्वय सर तुम्ही म्हणालात ना की या चेहऱ्याच इतकं दुःख का करत बसतेस?? कधी तरी तो खराब होणारच मग त्याच एवढं काय मनाला लावून घ्यायच. खर सांगू तर मला स्वतःलाच माहिती होत किती फरक पडतो ह्या वयात चेहरा खराब झाल्याने फक्त तुम्हाला उत्तर का दिलं नाही माहिती आहे??"
अन्वय हसत उत्तरला," नाही.. तूच सांग."
स्वरा हसत उत्तरली," त्याआधी हजारो लोकांनी सल्ला दिला होता पण तुम्ही पहिलेच होतात ज्यांनी सल्ला आणि साथ एकाच वेळी दिली म्हणून म्हटलं जगून बघायला हरकत काय आहे. लोकांना फरक पडत नाही त्यांच्याबद्दल विचार करण्यापेक्षा, ज्याला आपली काळजी आहे त्याच का ऐकू नये? जो जगाशी लढून साथ देतो आहे त्याची साथ, सल्ला महत्वाचा की दया, घृणा देणारा समाज? स्वाभाविकच उत्तर होत तुमची साथ म्हणून तरुण वयात सुद्धा मी माझ्याच चेहऱ्याकडे दुर्लक्ष कस करता येईल आणि आनंदी राहता येईल ह्याचा प्रयत्न करू लागले आणि बघा त्याच सल्ल्याने आज माझं जीवन कुठे आलय. सल्ला चुकेलही सर पण साथ नाही..साथ सर्व काही सोडवू शकते हे मी अनुभवलं ह्या काही वर्षात..
तुम्ही कायम म्हणता ना माझ्या कडून खूप काही शिकलात पण मीही तुम्हाला आवडीने सांगेन की मी तुमच्याकडून शिकले दुसऱ्यासाठी जगण्यात किती आनंद मिळतो ते. मी तुमच्यासाठी जगायला शिकले आणि त्यानंतर खरच कधीच कुठलीही गोष्ट आपल्याकडे कमी आहे अस जाणवलं नाही. एक सकारात्मक व्यक्ती आपल्याला सकारात्मक बनवू शकतो हे मी तुमच्याकडून शिकले. तुमची प्रमाणिक साथ, हक्काने बोलणंच मला पुन्हा नव्याने प्रेमात पाडून गेलं नाही तर खुद्द देव आला असता तरीही मला प्रेमात पाडणे शक्य नव्हते. तुम्ही पहिले होतात ज्यांनी मला माणूस म्हणून ट्रीट केले आणि तुमचा चुकीचा सल्लाही मी माझं आयुष्य बनवून घेतल. सल्ला चुकू शकतो पण प्रामाणिक साथ नाही. मी अस म्हणेन की त्या साथीने तुमचा प्रश्न नाहीसा झाला नाही पण त्या त्रासाची तीव्रता नक्किच कमी झाली त्यामुळे तुम्ही चुकीचा सल्ला देउनही मला योग्य वाट दाखवली म्हणून ते कधी बोलले नाही. कदाचित नकळत का होईना तुम्ही योग्यच निघालात."
आज स्वरा बोलत होती आणि अन्वय एकटक तिच्याकडे बघत होता. पुन्हा स्वरा त्याच्याकडे बघतच उत्तरली," अन्वय सर खर सांगू तर मला अजिबात आवडलं नसत कुणी माझी सर्जरी करून मला पुन्हा समाजात स्थान मिळवून देणे. जी लोक माणसाला माणूस समजत नाहीत त्यांच्यासाठी काय बदलायचं? अन्वय सर सुंदरता ना लोकांच्या नजरेत असायला हवी म्हणजे सर्जरी केवळ नाममात्र असेल तिच्यासाठी पण केवळ माझ्या सुंदरतेची, सुखाची तुलना जर माझ्या चेहऱ्यावरून केली जाणार असेल तर मला नको ही सर्जरी. अन्वय सर मला सर्जरी नक्कीच आवडली नसती पण आज एक गोष्ट आवडीने सांगेल की ह्या सर्जरीमुळेच माझा पूर्ण भूतकाळ क्षणात पुसल्या गेला आहे. आता मला लोक माझ्या चेहऱ्याने जज करणार नाहीत ह्याचा आनंद आहे....पण.......
पण मला जर संधी मिळाली तर सर्व लोकांना ओरडून सांगेल की प्रत्येक स्वराला आनंदी राहण्यासाठी सर्जरीची नाही तर आदराची गरज आहे. तुमच्या नजरेत दिसणाऱ्या प्रेमाची गरज आहे. ती गोष्ट जर प्रत्येक स्वराला मिळाली तर कदाचित सर्जरी ही नाममात्र राहील आणि सुख तिच्या आयुष्यात आपोआप येतील. कुठल्याच सर्जरीने सुख मिळत नाही पण स्वराला आदर, प्रेम मिळालं तर ती नक्कीच आनंदी असू शकते. त्यांना सांगायला आवडेल की स्वराला मिळणारा प्रत्येक अन्वय कोटीमध्ये खर्च करणारा नसतो हो. तेव्हा सर्जरी करून तिचा चेहर्या बद्दलण्यापेक्षा स्वतःची नजर बदला कदाचित तिला वेगळं काही करण्याची गरजच पडणार नाही. तिचा चेहरा चांगला झाल्यावर ती जितकी सुखी होणार नाही ना त्यापेक्षा तुमच्या नजरेत तिच्याबद्दल असलेला आदर, सुंदरता बघून तिला आनंद मिळेल मग तिला हरवायला कितीही राज आले तरीही कमी पडतील. मी आवर्जून सांगेल की कोणत्याही स्वराला सल्ला देण्यापेक्षा साथ द्या, दया दाखवण्यापेक्षा हिम्मत द्या आणि तेही होत नसेल तर निदान तिला कमजोर तरी बनवू नका. इतकं जरी करू शकलात ना तरी अशा हजारो कोलमडलेल्या स्वरा क्षणात उभ्या होऊन केव्हा स्वतःच संघर्ष करतील कळणार नाही. तिला नाहीये कुणाच्या आधारची गरज, तिला हवा आहे आदर. तो दिला तरी तीच संपूर्ण जीवन सुखी होऊ शकत."
स्वरा आज खूप खूप बोलत होती आणि अन्वय शांतपणे ऐकत होता. स्वरा आज जे बोलत होती त्याचा विचार तर खुद्द अन्वयनेही केला नव्हता म्हणून तोही गप्प बसला होता आणि स्वरा पून्हा म्हणाली," अन्वय सर मला आवडो किंवा नको आवडो पण सत्य हेच आहे की ह्या एका सर्जरीने लोकांचे विचार क्षणात बदलले. कधी कधी आपण लोकांना बदलू शकत नसू तर स्वतःला बदलाव लागत ही शेवटची गोष्ट मी ह्या संघर्षात शिकले. आता मला दुसऱ्यांचा विचार करायचा नाही. तुम्ही सर्व संपत्ती गमावून मला एक नवीन चेहरा एक नवीन ओळख दिली आहे तेव्हा आता ह्या नवीन जीवनाला आनंदाने स्वीकारेल, पुन्हा एकदा नव्याने स्वप्न बघेन. तुमचे, माझे आणि होणाऱ्या बाळाचे. आता नको हे जग की नको कसले विचार. जे आपले नाहीच त्यांचा काय विचार करायचा. आता फक्त तुम्ही आणि मी. तुमची ही सुरक्षित मिठी आणि खड्ड्यात गेली दुनिया. अन्वय सर आपण ना दुनिया आपल्याला बेशरम म्हणेपर्यंत प्रेम निभावू काय म्हणता? व्यक्त होताना मग लोकांचा विचार करायचा नाही की जागा बघायची नाही. बस आपल्या मनाला वाटेल ते करायचं.."
अन्वय तीच बोलणं ऐकून क्षणभर हसला तर स्वरा त्याच्या मिठीत विसावली. ही एकमेव जागा होती जिथे तिला सतत सुरक्षित वाटत होत आणि ती तिथे विराजमान झाली. ती शांत झालीच होती की अन्वय म्हणाला," स्वरा सुंदरता म्हणजे काय हे विचारलं होतस ना तू फायनली त्याच उत्तर घेऊन आलोय. हा शेवटचा प्रश्न आणि ह्याच उत्तरच ही कथा पूर्ण करू शकत. ऐकायला आवडेल तुला.."
स्वरा हळुवार शब्दात उत्तरली," काय आहे बर ह्याच उत्तर ?"
अन्वय हसतच उत्तरला," सुंदरता नजरेत असून चालत नाही स्वरा ती फिल करणे पण गरजेचे आहे. सुगंध बघ नजरेने दिसत नाही पण डोळे मिटून फिल केला तर तो जाणवतो. वारा बघ दिसत नाही पण त्याच्या स्पर्शाने तो आपल्याला थंड करून जातो. नजर चांगली असायला आधी मन साफ असावं लागतं तेव्हाच तो वरच्या सुंदरतेला बाजूला सारून आतमधली सुंदरता शोधू शकतो. इन शॉर्ट खरी सुंदरता शोधायला माणसाला स्वतःच सुंदर असावे लागते नाही तर कमळ चिखलात उगवत म्हणून कमळाकडे दुर्लक्ष करणारे भरपूर सापडतील. हिरा शोधायला कोळसा बाजूला करावा लागतो. जो हे चिखल पार करणार नाही, जो हा काळा कोळसा बाजूला सारणार नाही तोपर्यंत कमळाची आणि हिऱ्याची सुंदरता त्याला बघता येणार नाही म्हणून म्हणेन की सुंदरता मनात असते, ती हृदयात दिसते. लोकांच्या मनातच सुंदरता नाही तर ती नजरेत दिसणार तरी कशी ना? ज्यांच मन साफ असत ते उशिरा का होईना हे सत्य स्वीकारतात पण जे स्वता सुंदर नाहीत त्यांच्याकडून अपेक्षा कसली? त्यांना वागू दे हवं तसं तेव्हाच तर चांगल्या लोकांची किंमत वाढेल ना!!"
स्वरा उत्तर ऐकून हसतच म्हणाली," नवरोबा कुठून शोधता हो ही उत्तर. कोणतं मॅजिक बुक आहे का तुमच्याकडे?"
अन्वय क्षणभर तिच्या बोलण्यावर हसतच होता की स्वरा पुन्हा म्हणाली," नवरोबा मला ना एका गोष्टीच फार वाईट वाटत आहे आता."
अन्वय हसतच उत्तरला," आता काय बर?"
स्वरा जरा रुसतच म्हणाली," नवरोबा आता आपल्याकडे पैसेच तर नाहीत मग मी नवऱ्याचे पैसे कसे उधळणार बर? चेहरा सुंदर झाला तर मग शॉपिंग, मेकप,दागिने नको का? शीट यार कसा त्रास देऊ मी आता नवर्याला?"
ती बोलून गेली तर अन्वय तिच्या क्यूटनेस वर काही क्षण हसत होता आणि अन्वय आपल्यावर हसतोय म्हणून ती काही क्षण त्याला धपाटे घालत होती. प्रेम अस करायचे की जगाला पण विचारात पाडायचे..काय होत प्रेम दोघांच माहिती नाही पण हसून सर्व दुःख क्षणात नाहीसे करायचे असे आहेत " स्वरान्वय "...
मोहब्बत मे झुकणा कोई बडी बात नहीं
चमकता हुआ सुरजभी ढल जाता है शितल चांद के लिये..
अन्वयला मारता-मारता स्वरा केव्हा समाधानाने झोपी गेली त्यालाच कळलं नाही. त्याने तिला नीट झोपविले आणि आज पहिल्यांदा त्याच मोबाइलवर लक्ष गेलं. त्याने व्हाट्सअप्प उघडून बघितले तर त्यावर एका मित्राचा मॅसेज होता. त्याने मॅसेज ओपन केला आणि क्षणभर बातमी बघून विचारात पडला. बातमी होती की राज सलुजाला डिप्रेशनचा त्रास त्यामुळे त्याला मानसोपचारतज्ज्ञांच्या स्पेशल देखरेखीची गरज. अन्वयने हसतच मोबाइल बाजूला ठेवला आणि स्वराच्या कपाळावर किस करत मनातल्या मनात म्हटले," राज तुला खरच प्रेम कधीच समजलं नाही. प्रेम म्हणजे मिळविणे नसत, खर प्रेम तर प्रेमाला मुक्त उडू देण्यात असत. ती व्यक्ती आपली असेल ना तर एखाद्या दिवशी परत नक्कीच येईल आणि आपली नसेल तरी आनंदात नक्कीच राहील ही भावना म्हणजे प्रेम. तुलाही तुझ्या आयुष्यात स्वरा नंतर कुणीतरी नक्किच मिळाली असती कारण व्यक्ती कधीच एकटा राहत नाही. योग्य वेळी आली की त्याला त्याचा साथीदार नक्कीच मिळतो. तुमच्या सारख्या लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे की तुम्हाला वाट बघायला आवडत नाही. प्रेम म्हणजे मिळविणे ही व्याख्या जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही खर प्रेम करूच शकत नाही. नका देऊ रे आपल्या हवसला प्रेमाचं नाव. एखादी व्यक्ती मिळूनही ती खुश नसेल ते प्रेम कसलं आणि दूर राहूनही जर ती खुश राहत असेल तर ते खरं प्रेम नाही का? राज तुला आणि तुझ्यासारख्या हजार लोकांना मला सांगावस वाटत तुम्ही एखाद्या मुलीचा चेहरा खराब करू शकता पण हिम्मत नाही तोडू शकत. फरक बघायचा आहे का? बघ माझी स्वरा आज निवांत झोपली आहे तर तू जेल मध्ये बसून स्वतःला हरवून बसला आहेस. वाईट गोष्टीचा शेवट वाईटच होणार राज. शेवटी मी तुलाच विचारतो इतकं सर्व करून नक्की काय मिळवलस??? वेडेपणा??? त्यापेक्षा प्रेमात नकार पचवला असतास तर आज तुझीही स्वतःची वेगळी ओळख असती. पडत असेल ना हा तुला प्रश्न राज रोज जेलमध्ये? नक्किच पडत असेल पण आता तुला संधी मिळणार नाही. वेळ असताना सुधारला असतास तर??"
अन्वय स्वताचाच प्रश्नावर हसत बेडवर सरळ झाला आणि स्वराला मिठीत घेऊन निवांत झोपला. आता त्यांच्यामध्ये कुणीच येणार नव्हतं अगदी कुणीच नाही. एक वेळ श्रीमंत असणाऱ्या अन्वयकडे आज काहीच नव्हतं पण त्याने एक गोष्ट कमावली होती जी कदाचित हजारो लोकांकडे नव्हती. ते म्हणजे " समाधान." शेवटी आपण आयुष्य जगतो तरी कशासाठी. समाधानासाठीच ना?? म्हणूनच कदाचित स्वरा आणि अन्वय आता निवांत झोपले होते तर चुकीच काम करणाऱ्या राजची झोप उडाली होती. त्यांना आज जगाच टेन्शन नव्हतं की भविष्याची चिंता. होत ते एकमेकांवर अतूट प्रेम करणारे साथीदार आणि कधीही न संपणार समाधान..
समाधान खऱ्या अर्थाने जीवनाचा अमृत. ते मिळालं नाही तर हजारो करोडो असून काही फायदा नाही आणि असेल तर रोज रात्री सुखाची झोप लागेल. उदाहरण अन्वय समोरच आहे..त्याने स्वीकारलं भिकारी होऊन समाधानी जगणं..पण त्यापेक्षा श्रीमंत आज कुणीच नाही हेदेखील आदराने सांगायला आवडेल कारण त्याच्याकडे होती त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करणारी स्वरा..मग नक्की त्यांनी काय गमावल?? तिने चेहरा, त्याने संपत्ती?? कदाचित काहीच नाही. संघर्ष सोपा करतो तुमचा मार्ग पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात मग तो प्रेमातला संघर्ष असो जी जीवनाचा. सोपं असत एका क्षणात स्वतःला संपवन पण तितकंच कठीण आहे स्वतःसाठी, प्रेमासाठी संघर्ष करने. स्वरांवयने केला आता तुमचं काय?
जाने कैसी बांधी तुने
अखियो की डोर
मन मेरा खिचा
चला आया तेरी ओर
मेरे चेहरे की सुबहँ
जुल्फो की शाम
मेरा सब कुछ है पिया
अब से तेरे नाम
नजरो ने तेरी छुआ
तो है ये जादू हुवा
होणे लगी हु मै हसी…
आफरिन आफरिन…….
समाप्त...
................
( तुम्हाला अस वाटत असेल ना कथेत सर्व काही नीट सुरू असताना ही सर्जरी अचानक कुठून आली??..तर अचानक अस काही नाही..कथेचा पहिल्या भागातच मी स्वराची सर्जरी झाली असल्याचे दाखवले आहे..तुम्ही वाचण्यात ते विसरलात ह्यात माझी नक्कीच चूक नाही..आता प्रश्न असा पडतो की सर्जरी शेवटी का केली तर त्याच कारण अस सर्जरी मध्ये केली असती तर स्वराचा संघर्ष हरवला असता आणि मला ते नको होत..
तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगतो..अन्वय,स्वरा ही खरी पात्रे आहेत. खऱ्या कथेत सुद्धा त्याने तिची सर्जरी केली आहे..तेव्हा सर्जरी गरजेची होती का ह्याची दोन कारणे आहेत..एक लेखक म्हणून मला कथा लिहिताना प्रश्न पडला. जर जास्तीत जास्त वाचकांना स्वरा कथेत सर्जरी वीणा नको तर खऱ्या आयुष्यात तिला किती लोक स्वीकारतील? सर्जरी, सुंदर चेहरा सत्य आहे जे लेखक म्हणून मी आणि नायक म्हणून अन्वय सुद्धा बदलू शकला नाही..
आणि दुसर कारण ते म्हणजे खऱ्या आयुष्यात अन्वय आपल्या एका मुलाखतीत म्हणाला होता की त्याने सर्जरी जगाचा विचार करून नाही केली..त्याने ही केले तिच्या आनंदासाठी..लोकांचे विचार बदलणे शक्य नाही पण सर्जरी मुळे लोकांची नजर बदलत असेल तर स्वार्थी होऊन सर्जरी करण्यात काहीच चुकीचं नाही..उलट ह्या एका गोष्टीमुळे तिला आता लोकांचा रोज द्वेष पत्करावा लागणार नाही..त्याने तिला आनंद मिळावा म्हणून ते केलं कारण कथेत खूप काही चढवून सांगता येत पण सत्य हेच आहे की लोकांना स्वराच्या चेहऱ्याने फरक पडतो..म्हणून सर्जरी हे ह्या कथेचं अंतिम सत्य होत..मग ते मला, तुम्हाला किंवा इतरांना मान्य नसल तरीही..है वास्तव आहे आणि पूर्ण कथा वास्तविक लिहिल्यावर मला कथेचा शेवट गोड पण रंगवून करायचा नव्हता..ह्या कथेचा शेवट फक्त वास्तविक शोभतो आणि ते वास्तव म्हणजे जग तिला चेहऱ्याने जज करत आणि कायम करेल म्हणूनच अन्वयने तो खराब चेहरा नाहीसा करून तिची लोकांच्या नजरेतून सुटका केली..हेच कारण आहे..बाकी तुम्हाला पटल नसेल तर कमेंट मध्ये बिनधास्त सांगू शकता. मी फक्त माझं मत मांडलं, ते तुम्हाला मान्य असलच पाहिजे अस माझं अजिबात म्हणणं नाही..)