Bhagy Dile tu Mala - 103 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग १०३

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग १०३

मिल जाते है कइ लोग
अंजानी राहो पर
कुछ जिंदगी का खात्मा कर देते है
तो कुछ सिखाते है जिंदगी हस कर जिना...

आयुष्यात ज्यांचा संघर्ष मोठा असतो ते सुंदरतेने नाही तर संघर्षाने ओळखले जातात. मुळात त्यावेळी त्यांचा संघर्षच खऱ्या अर्थाने सुंदरता असते. वाक्य फिलॉसॉफीकल वाटत असल तरीही ते तितकंच प्रॅक्टिकल आहे. समाजात जगत असताना एक वाक्य कायम ऐकू येत. " स्त्री पुरुष समानता" पण त्याहीपलीकडे जाऊन बघितलं तर एक गोष्ट महत्त्वाची वाटते ती म्हणजे ' समानता'. एखादं बाळ जर कुरूप जन्माला आल तर त्याचा संघर्ष आपल्यापेक्षा जास्त असतो किंबहुना आपणच त्याचा तो संघर्ष खडतर करतो. समाजात वावरत असताना स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारी माणसच अशा लोकांना, त्यांच्या आईवडिलांना डीवचण्यात पुढाकार घेतात आणि त्या व्यक्तीचा खऱ्या आयुष्यात पदार्पण करण्याआधीच संघर्ष सुरू होतो. समाजातील लोकांशी संघर्ष करणे अगदीच सोपे पण आपल्याच लोकांत राहून त्यांच्या नजरेला नजर देऊन संघर्ष करणे हे तितकंच मोठं आव्हान असत म्हणून अशा लोकांना सुंदरतेने नाही तर संघर्षाने ओळखल्या जात. किती सोपं होईल ना जर लोकांनी त्यांना हिनवणे सोडले तर?? प्रश्न सोपा आहे परंतु करण तेवढंच कठीण कारण तेव्हा लोकांचा इगो कसा सॅटीसफाइड होणार? आम्हाला इतकं माहिती असताना कुणाला सांगायला नको तेदेखील कुणी विचारलं नसताना नाही तर लोकांचे नको असलेले सल्ले, विचार नक्की ऐकणार कोण? सर्व खेळ चालतो तो आम्ही किती मोठे आहोंत हे दाखवण्यासाठी पण आपल्याला मोठं दाखवताना आपण समोरच्याला किती छोट करून सोडतो हा विचार कुणालाच येत नाही. इतकं सर्व सांगणं ह्यासाठीच कारण स्वराने हे जन्मापासून अनुभवलं नाही पण जेव्हा अनुभवायला मिळालं तेव्हा काही वर्षे सुद्धा तिला आयुष्यभरासारखी वाटत होती. सुरुवातीला तीही खचली पण तिच्या आयुष्यात एक व्यक्ती आला ज्याने तिला प्रत्येक क्षणी सांगितलं की तुझा संघर्ष तुझी सुंदरता आहे आणि तो प्रत्येक अडथळा पार करत स्वराने स्वतःच समाजात एक विशेष स्थान निर्माण केलं. ज्यांनी तिला स्वीकारलं ते आता तिच्या चेहऱ्याकडे कधीच बघणार नव्हते आणि ज्यांनी तिला स्वीकारलं नाही त्यांना चेहर्यापलीकडे कधी काहीच दिसलं नाही ही समाजाची शोकांतिका आहे असच म्हणावं लागेल. विचित्र आहे ना देवाने सर्वाना सारख बनविल तरीही काही लोक स्वरा, अन्वय सारखे आहेत आणि काही दुसर्यांना त्रास देऊन स्वता आनंद अनुभवनारे. जोपर्यंत हे लोक स्वतःचा नजरिया बदलणार नाहीत तोपर्यंत ना समानता येईल ना स्त्री पुरुष समानता. ह्याला कारण एकच समानतेला विरोध पुरुषाकडून नंतर आधी स्त्री कडून होतो म्हणूनच कदाचित स्वरा सारख्या मुलींचा संघर्ष अधिकच लांबतो पण स्वराला ह्या गोष्टीचा कधीच फरक पडला नाही म्हणून कदाचित तिला त्रास देणारे एका जागी स्वस्थ बसले तर सर्वांचे टोमने ऐकणारी स्वरा सर्वाना जीवन कस जगायच हे शिकवत राहिली. ती जिंकली होती एका प्रवासात आणि समाजाला ती मान्य नसतानाही ते तिला काहिच बोलू शकत नव्हते हे तिच्या खऱ्या जिंकण्याच प्रतीक ठरलं.

काही महिन्याचा कालावधी निघून गेला. स्वरा आता घरात सर्वांची लाडकी झाली. एक वेळ तिच्या आवाजाला घरात चार भिंतीत दरवडण्याचा अधिकार नव्हता आणि आता तिच्या हसण्यानेच त्या घराची सकाळ व्हायची. अन्वयने स्वतःच्या आई-बाबांशी बोलून स्वराच्या आईबाबांना वरच्या रूममध्ये शिफ्ट करून घेतले होते आणि स्वराला कायम त्रास देणारी चिंताही आता नाहीशी झाली होती. स्वरा आता मुक्तपणे फिरू लागली होती. तिच्या आयुष्यात काही अशी लोक होती जी तिला जीवापेक्षा जास्त जपत होती आणि आता स्वराला झेप घ्यायला आकाश कमी पडू लागल होत. म्हणतात नात्याशिवाय आनंद आणि दुःख अपूर्णच असतात, अन्वयने तिला कधीतरी हे म्हटलं होत आणि त्यानेच तिला हे स्वतःच्या कृतीतून पटवून दिल. एक वेळ प्रत्येक नात्याला कोसणारी स्वरा आज त्याच नात्यात रमली होती. नजरिया तिने स्वतःच आधी बदलला होता म्हणून कदाचित ती अन्वय आणि इतर नात्याना स्वीकारु शकली होती.

सकाळची वेळ. नाश्ता करायला टेबल सज्ज झाला होता. स्वराच्या आई-सासूबाईंनी मिळून सर्वांसाठी नाश्ता बनविला होता तर घरातले छोटे-मोठे सर्व नाश्ता करायला टेबलवर बसले होते. आज निहारिका, शरद सुद्धा त्यांना जॉईन झाले होते. अन्वयच्या आई आज गरम गरम नाश्ता टेबल वर घेऊन आल्या आणि स्वराला वाढू लागल्या. स्वरा नको नको म्हणत असतानाही त्या वाढत होत्या आणि निहारीका हे सर्व तिरकस नजरेने बघत होती. आईने नाश्ता वाढला आणि त्या स्वराच्या केसांवरून हात फिरवतच होत्या की निहारिका म्हणाली," दादा तू बरोबर म्हणतोस, मला ना ह्यांनी कचरा पेटीतूनच उचलून आणलं आहे तेव्हाच तर आधी तुला नको म्हणत असताना वाढायची आणि आता वहिनीला वाढते. इथे मुलगी किती दिवसांनी आली त्याच काहीच पडलं नाही. बाबा जास्तच प्रेम येत नाहीये का आईच सुनेवर. मला तर कधी भरवल नाही इतकं प्रेमाने?"

निहारिका बाबांकडे केविलवाण्या नजरेने बघत होती आणि बाबा स्वराच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाले," ए शहाणे पुन्हा काही माझ्या सुनेला बोललीस तर बघ हा!! गुपचूप खा. कुणी दोन घास आईच्या हातचे खाल्ले की तुझ्या पोटात कस दुखत ग? लागली बोलायला की मला कचरा पेटीतून आणलं."

निहारिकाला वाटलं होतं की बाबा आज तिची बाजू घेतील म्हणून निहारिकाने बाबांना मधात आणले होते पण बाबांनी ऐनवेळी पलटी मारली आणि निहारिकाच क्षणात हसू झालं. मग काय शरद आणि काय अन्वय सर्वच तिच्यावर हसत होते. सर्वाना हसताना बघून निहारिकाचा चेहरा क्षणात पडला. ती खाली नजर टाकून खाऊ लागली तेवढ्यात तिच्या समोर एक हात आला. तिने त्या हाताकडे बघितले. स्वराची आई हातात चमचा घेऊन तिच्या बाजूलाच उभी होती. निहारीकाने त्याना बघताच पटकन घास खाल्ला आणि हसत उत्तरली," तुम्ही खरच मला उचलून आणलं हे सिद्ध झालय. तुम्ही तर माझी काळजी घेत नाही पण स्वराच्या आई सतत माझी काळजी घेतात. माझ्या खऱ्या आई बघा किती माझी काळजी घेतात. स्वरा मी तुझ्या आईला चोरून नेऊ का ग? प्रत्येक गोष्टीत इतकी सपोर्ट करणारी आई खरच कुणाला नको असेल ना?"

स्वरा हसतच उत्तरली," घेऊन जा बिनधास्त, आज घेऊन जाशील नंतर तुझ्या सासूबाईचे बोलणं ऐकून स्वतःच सोडून देशील पुन्हा इथे."

स्वरा बोलून गेली आणि निहारिकाच्या चेहऱ्यावर क्षणात हसू आल. एवढंच काय शरद देखील हसत होता. आजची सकाळ काहितरी खासच होती. अन्वयने गेले कित्येक महिने हेच स्वप्न बघितलं होत आणि आता ते पूर्ण होऊ लागलं होतं. अस म्हणतात की कुठल्याही गोष्टीची सुरुवात स्वतःच्या घरूनच व्हावी, एका सुनेला मुलगी मानण्याची प्रथा सुरू करायचे स्वप्न त्याने स्वतः बघितले होते. आज ते पूर्ण होऊ लागल्याने अन्वयच्या डोळ्यात अश्रू आले होते. स्वराने ते बघितले आणि हळुवार एक मॅसेज टाइप केला आणि पुन्हा नाश्ता करण्यात व्यस्त झाली. काहीच सेकंदात मॅसेज त्याला सेंड झाला आणि अन्वयने मॅसेज येताच ओपन केला.

" आय हेट टीअर्स डिअर पुष्पां. अन्वय सर आता ना सर्व नीट होणार आहे तेव्हा पुन्हा डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका. मला नाही आवडणार तुमच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू बघायला. तुम्ही हसत असलात ना की माझी विकेटच पडते आणि ते मला आयुष्यभर हवंय. काय म्हणता तो तुमचा रोमँटिक स्वभाव. मीही मागे हटणार नाहीये त्यासाठी. मग हसणार ना सतत माझ्यासाठी? तुम्ही जर रोज हसत असणार ना तर मी एक रोज किस्सी देईन तुम्हाला ते देखील तुम्हाला हवी तिथे. प्रॉमिस!!"

अन्वयने मॅसेज बघितला आणि क्षणभर त्याला त्याचच हसू आवरत नव्हत. त्याचे गाल लाल झाले होते. शरदच लक्ष त्याक्षणी अन्वयवरच होत आणि शरद हसत म्हणाला," निहू फक्त आईबाबाच नाहीत तर तुझा भाऊ पण स्वरा वहिनीचाच दिवाना आहे. बघ ना टेबल वर पण त्यांची चॅटिंग सुरू आहे. दादा एकटेच काय हसत आहात. आम्हाला पण दाखवाणा काय मॅसेज सेंड केलाय वहिनीने. आम्हीही जरा हसू. पुन्हा थोडीशी मस्ती होईल."

शरद बोलतच होता की निहारिकाने त्याच्या हातातून मोबाइल हिसकावून घेतला आणि मॅसेज वाचून हसू लागली. निहारीका ने मॅसेज वाचायला घेताच स्वराचा चेहरा पुन्हा एकदा लाजरा मोजरा झाला होता. तिला काय रिऍक्ट करु समजत नव्हतं आणि शरदने विचारले," निहू काय लिहिलं आहे त्यात जरा आम्हालाही कळू दे. एकटीच काय हसते आहेस आम्ही देखील वाट बघत आहोत म्हटलं मॅसेज वाचण्याची."

निहारिकाने क्षणात मोबाइल अन्वयला परत दिला आणि निहू जरा रुसत म्हणाली," वहिनी किती रोमँटिक आहात ना तुम्ही दोघे. नाही तर आमचे हे, आई बघतील म्हणून स्वतःच्याच बायकोचा हात पकडायला मागे पुढे बघतात आणि म्हणे की आम्हाला पण दाखव. शरद तू राहू दे, तुला नाही जमणार ह्यांच्यासारखं प्रेम करायला. तू ना घाबरट आहेस. प्रेम कराव तर माझ्या दादासारख. बायकोला प्रेम दाखवायला क्षणभर लाजत नाहीं. ह्याबाबतीत मी दोघांच्या बाजूने आहे. लव्ह बर्डस आहेत ते. तुम्हाला नाही कळणार त्यांचं मॉडर्न असूनही संस्कारी प्रेम."

निहारिकाने अन्वयचा हात पकडतच उत्तर दिले होते. तिच्या चेहऱ्यावर ते सर्व बोलताना समाधान होत पण निहारिकाने शरदच हसू केलं होतं म्हणून तोही हसतच उत्तरला," आज भावाचे जास्तच गोडवे गायले जात आहेत तर. हरकत नाही. मी घाबरट का? मी सिद्ध केलं की तुझा भाऊ पण घाबरट आहे तर काय देशील?"

निहारिका हसतच उत्तरली," माझा भाऊ आणि घाबरट. शक्यच नाही. तू बोल हवं ते देईल."

टेबल वर सुरू झालेल गमतीच वातावरण थोडं आणखीच गमतीशीर झालं आणि घरातले मोठे सर्व फक्त ऐकायचं काम करत होते. शरदने मोर्चा आता अन्वयकडे वळविला आणि हसतच त्याने म्हटले," दादा मी एकच प्रश्न तुला विचारणार आहे. त्याच उत्तर स्पष्टीकरणात्मक घ्यायच. हो किंवा नाही मध्ये नाही.. चालेल??"

अन्वय बोलायच्या आधीच निहारिका म्हणाली," तू विचार रे फक्त मग बघ माझ्या दादांच उत्तर. अस कुठलंच उत्तर नाही जे त्याच्याकडे नाही. तो अस उत्तर देईल की तुझी क्षणात बोलती बंद करेल मग मीच मागेन तुला हवं ते आणि ते तुला द्यावं लागेल."

निहारिका त्याच्याकडे हसून बघत होती तर शरदही हसतच म्हणाला," इतका कॉन्फिडन्स!! नॉट बॅड हा!! पण कधी कधी जास्त बोलू नये नाही तर हसू होत नंतर. असो देखते है क्या जवाब देते है तुम्हारे भैया. सो दादा प्रश्न असा आहे की आयुष्याचा इतका प्रवास केल्यावर सर्वात जास्त प्रेम कुणावर करतोस आई की स्वरावर? जिने तुला संस्कार देऊन उत्तम बनवलं तिच्यावर की जिने तुला तुझ्यातला अन्वय शोधून समाजात वेगळी नजर दिली त्या स्वरावर? नो चिटिंग पटकन द्यायचं हा उत्तर."

शरदने असा प्रश्न उभा केला होता ज्याच उत्तर अगदी कुठल्याच मुलाकडे नसेल. शरद प्रश्न विचारून अन्वयला पेचात पाडल म्हणून हसत होता तर आजूबाजूला बसणारे सर्व अन्वयकडे बघत होते. अन्वयही हसून सर्वांकडे बघत होता. निहारीका तर त्याला डोळे फाडून बघत होती आणि अन्वय हसत म्हणाला," ह्या उत्तरासाठी फोन पे चर्चा होऊ शकते का बाबांसोबत? ते अनुभवी आहे सो ह्याच उत्तर ते बऱ्यापैकी देऊ शकतील. मग घेऊ ना ही लाइफ्लाइन?"

शरद काही बोलणार त्याआधीच बाबा पाय काढता घेत उत्तरले," अन्वय बाळ हाच प्रश्न मला माझ्या आईने विचारला होता. तेव्हाच मला त्याच उत्तर देता आलं नाही तर आज काय देणार. सॉरी बाबा मी ह्यात तुझी काहीच मदत करू शकत नाही. तू आणि शरद बघ आता काय ते. मी इथे अजिबात पडणार नाही. नाही तर आजच घर सोडून जावं लागेल मला."

बाबा आपल्या जागेवर बसून पाय मागे घेत होते तर बाकी मनमोकळे हसत होते. शरदचा चेहरा तर किती फुलला होता त्याच त्यालाच माहिती कारण ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी कुणिच देऊ शकणार नव्हता. सर्व त्याच्याकडे बघत होते आणि अन्वय हसतच म्हणाला," शरद राव जिंकलात तुम्ही. सॉरी निहू, खरच हा प्रश्न असा आहे की ज्याच उत्तर देणे मला शक्य नाही. ह्या आयुष्यात तरी शक्य नाही. कुणाला एकाला निवडणे म्हणजे हार होईल आणि मी कुणाला हरवू शकत नाही. त्यापेक्षा मीच हार मानतो. हार मानली साहेब मी. तुम्हाला जी शिक्षा निहूला द्यायची ती मला द्या, मी पूर्ण करेन."

शरद हसतच उत्तरला," ये!! अन्वय दादा शिक्षा तिला आहे तुम्हाला नाही. नवर्याला टोमणे मारते ना मग तिला मिळायला हवीच. चला निहारीका मॅडम आज दिवसभर मी तुम्हाला म्हणेल ते करावं लागेल. तुझी शिक्षा काय असेल हे सर्वांसमोर सांगणार नाही पण लवकरच कळेल. समजलं आता की जगातले सर्व पुरुष घाबरट आहेत. हरलीस ना? पुन्हा पंगा नको घेत जाऊ हा माझ्यासोबत."

शरद हसत होता तर निहारिका अन्वयला मारत म्हणाली," दादा तुला उत्तर द्यावच लागेल. नाही दिलंस तर हा मला आयुष्यभर ऐकवणार. प्लिज ना दादा! अशी कशी रे हार मानलिस तू. तेही इतक्या लवकर. आज जर तू उत्तर दिलं नाहीस ना तर मी पुन्हा बोलणारच नाही तुझ्याशी. बघ तुला काय हवं ते."

निहारिका आता गाल फुगवून बसली होती. अन्वय तिला समजावत होता पण ती समजायचं नाव घेत नव्हती तेवढ्यात स्वराच्या आई म्हणाल्या," जावई बापू खर तर आम्हा सर्वांना आवडेल तुमचं उत्तर ऐकायला. तुमची उत्तर खरच भारी असतात. इतर पुरुष ज्याच उत्तर देऊ शकत नाहीत त्याच उत्तर तुम्ही नक्की देऊ शकता तेव्हा द्या उत्तर. इथे कुणालाही वाईट वाटणार नाही कारण आम्हाला विश्वास आहे की तुमचं उत्तरच तस असेल."

आता सर्वच अन्वयकडे बघत होते. निहारिका तर एकटक त्याच्याकडे बघत होती आणि अन्वय हसतच उत्तरला," प्रत्येक मुलाच पहिल प्रेम असत ते म्हणजे आई म्हणून मलाही आई खास आहे. स्वरा आणि आईची तुलना अगदीच शक्य नाही तेव्हा माझं उत्तर आईच असेल. आता त्याच कारण सांगतो. आई ही एकमेव व्यक्ती असते जीच्यासोबत आपण आयुष्याचा जास्तीत जास्त वेळ घालवतो. ती आपल्यावर योग्य संस्कार करते, हवं तेव्हा प्रेम आणि हवं तेव्हा रागावते. तिच्यामुळे आपण जगाच्या संघर्षात उतरतो. ती नसेल तर आपल्या असण्याला पण काहीच अर्थ नाही. तिने जर आपल्याला योग्य संस्कार दिले नाही तर मग एक राज कायम पैदा होत राहील म्हणून त्याच उत्तर आई. मी विचार करतो की जो व्यक्ती आईशी प्रामाणिक असू शकत नाही तो खरच बायकोशी असू शकेल का? ह्या एकाच प्रश्नांत जवळपास सर्व उत्तरे आहेत. माझ्या आईने माझ्यावर उत्तम संस्कार केले नसते तर मीही कदाचित लोक बघतात त्याच सुंदरतेत हरवून बसलो असतो आणि स्वराची सुंदरता कधीच बघू शकलो नसतो. आज जर स्वरा माझ्या आयुष्यात आहे त्याच महत्त्वपुर्ण कारण म्हणजे आई. तिने मला इतकं मोठं बनवलं नसत तर कदाचित मी मोठ्या पोस्टवर नसतो आणि नकळत स्वराशी भेट झाली नसती. भाग्याने आम्ही नक्कीच मिळालो पण त्याच अप्रत्यक्ष कारण म्हणजे आई. आई रागावली होती तेव्हा सर्व काही असूनही आम्ही आनंदी नव्हतो आणि आई सोबत असताना काहीही नसले तरी आम्ही आनंदी राहू हे खात्रीने सांगू शकतो. मागे विचार करतो तेव्हा एक प्रश्न पडतो. स्वरावर ऍसिड अटॅक झाला तेव्हा तिचे आईबाबा नसते तर? स्वयमचे बाबा गेल्यावर त्याच्या आईने त्याला सांभाळले नसते तर? आई जन्म देते म्हणून जननी नाहीये तर ती आपल्याला घडवते म्हणून जननी आहे. आई पहिल प्रेम आहे तर बायको शेवटच. शरद म्हणतो तसा मी आईला घाबरत नाही कारण घाबरायला काहीतरी चुकीच करणे गरजेचे आहे आणि चुकलो नाही तिथे का घाबरायचे? खर सांगू शरद आईसमोर बायकोबद्दल प्रेम व्यक्त करायला आणि बायकोसमोर आईबद्दल प्रेम व्यक्त करायला कधीच घाबरू नये कारण त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.एकाच आयुष्यात त्यांच्या वेगवेगळ्या जागा आहेत. आईची जागा बायको घेऊ शकत नाही आणि बायकोची जागा आई घेऊ शकत नाही. आई, आई असते आणि बायको, बायको. त्यांना तोलन अगदी कठीणच. दोघीही एकच नान असतील तर त्याची तुलना कशी करायची बर? म्हणून शरद राव मी म्हणेन की तुमचा प्रश्नच चुकीचा आहे. आई, बायको मध्ये कुणाला निवडता येत नाही. फक्त आईशी अस नात असावं की तिने बायकोला समजून घ्याव आणि बायकोवर इतकं प्रेम कराव की तिने आईची कधीही तक्रार करू नये. बस इतकं सोपं आहे शरद राव तुमचं उत्तर."

अन्वय बोलून गेला आणि सर्व त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. काही वेळ वातावरण शांत झाल होत आणि शरद अन्वयचे पाय पकडत म्हणाला," दादा तुम्ही खरच ग्रेट आहात. खरच मानले पाहिजे तुमचे विचार. हार मानली मी तुमच्या विचारांसमोर आणि बायको आजपासून खरच घाबरणार नाही मी प्रेम व्यक्त करायला. दादांचे शब्द कायम आठवणीत राहतील. एक एक शब्द अगदी हृदयात जाऊन बसला आहे, मला नाही वाटत तो आता तिथून बाहेर निघेल."

शरद एकटाच बोलून गेला होता तर बाकी सर्व लोक कुतूहलाने त्याच्याकडे बघत होते. सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता," अन्वय नक्की तू कोणत्या मातीचां बनला आहेस?"

प्रत्येकाची नजर अन्वयच्या उत्तराचा मतितार्थ शोधत होती. किती सोपं असत ना जीवन पण अहंकार, इगो ह्या सर्वामध्ये आपण इतके गुरफटले जातो की त्यासमोर आपल्याला काहीच दिसत नाही. स्वरा जर संघर्षाच प्रतीक असेल तर अन्वय प्रतीक होता प्रेमाचं. त्याने जगाला नाही पण घरच्यांना शेवटी शिकविलच महत्त्व प्रेमाचं म्हणूनच कदाचित तिथे दोन्हीही वेगवेगळ्या विचारांच्या पिढ्या एकत्र असताना कुणाच्याही मनात प्रश्न उपस्थित झाला नव्हता. प्रेमाला प्रेमानेच जिंकता येत हे त्याने सांगितलं होतं आणि कदाचित त्यांच्या कित्येक पिढ्या ही गोष्ट विसरणार सुद्धा नाहीत..

बदलते नही लोग
बस हालात बदल जाते है
सोच बदलती है जब अपनी
लगता है लोग बदल रहे है...

**************

ती सायंकाळची वेळ होती. अन्वय ऑफिसमधून घरी परतला होता पण घर शांत-शांत वाटत होतं. त्याने आज घरात कुणाला शोधायचा प्रयत्न देखील केला नाही. त्याने बेडरूममध्ये जात आपली बॅग टेबलवर ठेवली आणि फ्रेश होऊन पुन्हा बेडवर येऊन पडला. तो कसल्यातरी विचारात हरवलाच होता की त्याच्या समोर चहाचा कप आला. आईचा चेहरा समोर येताच अन्वयने हसतच चहाचा कप घेतला. आई त्याच्या बाजूला बसल्या आणि अन्वय विचारू लागला," आज घर रिकाम रिकाम, कुठे गेलेत सर्व?"

आई हसतच उत्तरल्या," गेले आहेत फिरायला. मलाही चल म्हणाले पण माझी इच्छा नव्हती म्हणून गेले नाही."

अन्वयने एकच प्रश्न विचारला आणि तो पून्हा शांत झाला. तो आता हळुवार चहा घेऊ लागला होता. चहा घेताना त्याच आईकडे लक्ष नव्हत पण आई सतत त्याच्याकडे बघत होत्या. काहीच क्षणात अन्वयने चहा घेतला आणि आईने अन्वयला विचारले," खूप थकला आहेस का अन्वय? चेहऱ्यावर थोडस पण तेज नाही. आता तर सर्व नीट आहे मग इतका शांत शांत का?"

अन्वयने आता आईच्या चेहऱ्याकडे लक्ष दिलं. आई चिंतेच्या नजरेने त्याच्याकडे बघत होत्या म्हणून त्याने चहाचा कप बाजूला ठेवला आणि आईच्या मांडीवर झोपत म्हणाला," थकलो नाहीये आई फक्त तुझा एक प्रश्न खूप त्रास देतोय मागील काही दिवसापासून. तो झोपू देत नाहीये मला. त्याच उत्तर मिळत नाही तोपर्यंत मला समाधानाची झोप येणार नाही."

आईने त्याच्या केसांवरून हात फिरवत विचारले," कुठला प्रश्न अन्वय? अस काय आहे त्या प्रश्नात की माझ्या मुलाला त्रास देतोय?"

अन्वय आईचा हात पकडतच म्हणाला," हेच की तुझ्या बाबतीत लोकांच्या नजरा काही दिवसात बदलतीलही पण स्वराच्या बाबतीत काय? तिला त्रास नसेल होत का लोकांच्या नजरांचा? तिच्या आयुष्यात खूप आनंद असतानाही तिच्या आयुष्यात हा एकमेव दुःखाचा क्षण का असावा? का बंदिस्त राहावं तिने ह्या एका क्षणात? तिलाही अधिकार आहे ना त्यातून बाहेर पडण्याचा?"

अन्वयच्या आईही धीरगंभीर स्वरात उत्तरल्या," अन्वय मलाही त्रास होतो ह्या गोष्टीचा. मी फक्त काही दिवस झाले हे सर्व अनुभवते आहे तरीही किती त्रास झाला सांगू शकत नाही मग तिने किती वर्षे अनुभवायचं आहे हे? मलाही देतो त्रास हा प्रश्न जेव्हा जेव्हा तिच्यासोबत फिरताना लोकांच्या नजरा बघते. अन्वय खर सांगू तर सर्व काही बदललं पण लोकांची ही नजर कधीच बदलणार नाही. काय माहिती पुन्हा किती सहन करायचं आहे तिला हे?"

अन्वय आईला मध्येच अडवत उत्तरला," आई मला खर तर आज ह्यावर उत्तर मिळाल आहे फक्त मला ह्यात तुझी मदत लागेल. अस होऊ शकत की तिची मदत करताना आपल्याकडे काहीच राहणार नाही पण मनाला समाधान नक्कीच मिळेल. तुला आवडेल स्वराची मदत करायला?"

आई हसतच उत्तरल्या," अन्वय आता आयुष्यात काहीही नसेल तरीही चालेल पण समाधान महत्त्वाचं आहे हे तुझ्याकडूनच शिकले मी. सांग मलाही काय आहे ह्या कोड्याच उत्तर. त्यासाठी हवी ती मदत करायला मी तयार आहे. कदाचित त्यामुळेच मनातलं गिल्ट दूर होईल तिच्यासोबत मागे जे वागले त्याच."

अन्वयने आईचा हात घट्ट पकडला आणि आईच्या नजरेला नजर देत काहीतरी सांगू लागला. आईशी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर दुःख-आनंदाचे संमिश्र भाव होते. त्याने आईला जवळपास मागील काही दिवसात केलेले सर्व प्रयत्न सांगितले आणि काही वेळाने शांत झाला. अन्वयच बोलून झालं आणि आईने त्याच्या कपाळावर किस करत म्हटले," अन्वय मी पाठीशी आहे बाळा तुझ्या. खूप सुंदर विचार केला आहेस तू. तू म्हणतोस त्याप्रमाणे माहिती नाही आपण तिला खूप काही देऊ शकू का पण आपल्या मनाला समाधान नक्कीच मिळेल. देऊ आपण तिला हे गिफ्ट. मला वाटत ती डिजर्व करते हे गिफ्ट. त्याशिवाय काहीच बदलणार नाही. थॅंक्यु अन्वय! माझ्या मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी. "

अन्वयने हसतच विचारले," तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये ना? तुला माहिती आहे ना ह्या निर्णयाने काय होईल ते? कदाचित सर्वच जाईल. काहीच राहणार नाही आपलं. विचार कर, मग निर्णय घे. तुला हवा तेवढा वेळ घे वाटल्यास."

आई हसतच उत्तरल्या," अन्वय सर्व काही गमावून जीवनाचा खरा अर्थ समजला आहे मग त्या समाधानासमोर तू जे मागतो आहेस ते काहिच नाही. तू फक्त मला सांग कधी करायचं ते, मी स्वतःच येईल तुझ्यासोबत आणि आज तू एक आई काय असते हे सांगितलंस ना ते दाखवूनही देईल. अन्वय आज तुझ्या पाठीशी नाही राहिले तर एक स्त्री म्हणून मी हरेल आणि मला ह्यावेळी हरायच नाही. ह्यावेळी एका आईला,एक स्त्रीला जिंकायचं आहे आणि त्यासाठी तू म्हणतो आहेस ते केवळ नाममात्र आहे. जे होईल ते होईल, मी जगेन त्याही स्थितीत."

आईच उत्तर ऐकून अन्वयचा चेहरा पुन्हा एकदा खुलला होता. आता त्याच्याकडे बोलायला काहीच उरल नव्हत. आईशी कस बोलायच ह्या विचाराने त्याच्या कित्येक रात्री अशाच गेल्या होत्या पण आज ते टेन्शनही नाहीस झालं. आज आईशी गप्पा मारताना त्याला कधी झोप आली ते कळलंच नाही. समाधान अशी एक गोष्ट आहे जी हजारो समस्यां असतानाही निवांत झोपू देते ही शिकवण कदाचित सर्वानाच शिकायला हवी. फक्त समाधान कशात शोधाव ह्या ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

*********

रात्रीचे जवळपास ९ वाजले होते. अन्वय निवांत बेडवर झोपला होता. स्वराने बेडरूममध्ये प्रवेश केला आणि अन्वयचा शांत चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. तो इतका शांत झोपला होता की स्वरा त्याच्याजवळ जाऊन बसली. त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली," नवरोबा एकच तर मन आहे ते किती वेळा आणखी जिंकणार आहात? धन्य आहे त्या आई ज्यांनी तुम्हाला जन्म दिला. मी देवाला प्रार्थना करेन की प्रत्येक घरीं असा एक अन्वय नक्कीच द्यावा तेव्हाच कदाचित एका स्त्रीच महत्त्व किती असत ते समजेल. तुमच्या सारखे पुरुषच खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता सिद्ध करतात नाही तर आम्ही बायकांच आमच्या शत्रू आहोत. अन्वय सर कधी बोलले नाही पण आज नक्की बोलेन की माझ्या पोटी जन्माला स्वरा कधीच येऊ नये कारण त्या समाज व्यवस्थेने आधीच निर्माण केल्या आहेत, यायचंच असेल तर दुसऱ्या अन्वयने जन्म घ्यावा जो समाजातील प्रत्येक स्वराला जीवन जगवायचं शिकवेल. अन्वय सर आज एक प्रॉमिस करते तुम्हाला, आता फक्त अन्वय एखाद्या स्वरासाठी झटणार नाही तर माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मीही प्रत्येक स्वरासाठी झटेल मग समोर कितीही राज आले तरी हरकत नाही. एक वेळ काय हजार वेळ माझा चेहरा खराब केला तरी हरकत नाही पण मी तुम्हाला वचन देते की ही स्वरा कधीच हरणार नाही. कधीच नाही. तिच्या चेहऱ्यावर हे हसू असच कायम राहील. आता जे होईल ते स्वीकारायला मी तयार आहे कारण माझी ऊर्जा कायम माझ्यासोबत असेल. अन्वय सर!! नाव नाही माझं आयुष्य आहे हा एक शब्द..."

स्वराने अन्वयच्या कपाळावर किस केले आणि काही वेळ त्याला तशीच बघत राहिली. आज अन्वय खूपच शांतपणे झोपला होता म्हणून तिने त्याला त्रास दिला नाही पण काही वेळ तिने त्याला बघणेही सोडले नव्हते. खर प्रेम कदाचित असच व्यक्त करता येत. गरजेचं नसत की प्रत्येक वेळा शब्दातून तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे सांगायला हवं पण एकदा तरी नक्कीच सांगायला हवं म्हणजे नात्यांची मूळ आणखी घट्ट होत जातात.

रात्रीचे जवळपास १० वाजले होते. अन्वय बऱ्याच वेळाने उठला आणि फ्रेश होऊन बाहेर परतला होता. आताही घरातल्या वातावरणात फारसा फरक नव्हता. वातावरण पूर्णता शांत जाणवत होत. अन्वयला वाटलं होतं की कदाचित आताही कुणीच आलेलं नाही त्यामुळे तो निवांतपणे हॉलमध्ये जाऊ लागला. हॉल मध्ये त्याने नजर टाकलीच होती की सर्वच शांतपणे समोर बसून असल्याचे जाणवले. सर्व घरात असताना इतके शांत का म्हणून अन्वय सर्वांकडे जाऊ लागला. अन्वयने समोर पाऊल टाकलेच होते की त्याला एक आवाज आला आणि तो तिथेच थांबला. तो टीव्हीचा आवाज होता आणि ते शब्द होते..

" राज सलूजा इनकी पॅरोल पर छुट्टी.. उनके अच्छे बिहेविअर के चलते उन्हे १५ दिनो का पॅरोल मिला है."

एक अशी बातमी आली होती ज्यामुळे सर्व शांत झाले होते. अगदि सर्व काही सुरळीत चाललं असताना पुन्हा एक तुफान येऊन थांबल होत. आज प्रत्येकाची नजर फक्त स्वरावर होती तर स्वराची नजर होती ती बातमीवर. स्वराच्या चेहऱ्यावर ना आज आनंद होता ना होत दुःख तर हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच हृदय खूपच तीव्र गतीने धडकू लागलं होतं. त्यांचा आवाज इतका होता की जणू स्वराच्या कानावर ते सहज पडत होते आणि एकच प्रश्न विचारत होते," स्वरा आता नक्की काय ?"

बहोत आसान है
जिंदगी को समझना
सब कूछ मिल सकता है यही
पर जरुरी है उसके लिये संघर्ष करना..

क्रमशः.....