Bhagy Dile tu Mala - 102 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग १०२

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग १०२




हर बार जितसे अपनी
खुशीया मिला नही करती
कुछ खुशीया दुसरो को जिताकर
खुद हार जानेमेभी मिल जाती है...


पुन्हा एक सकाळ परंतु ही सकाळ काहीतरी खास होती. आज तिच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्ती तिच्या सोबत होत्या. आजपर्यंत स्वराच्या डोक्यात कुठला ना कुठला प्रश्न घर करून राहत होता पण ही एकमेव सकाळ होती ज्यावेळी स्वराच्या मनात, डोक्यात काहीच नव्हतं म्हणूनच की काय आज तोच आनंद तिच्या चेहऱ्यावर सतत दिसून येत होता. हा असा दिवस होता जिथे स्वराची सर्व स्वप्न पूर्ण झाली होती. अन्वयला मिळविताच स्वराच आयुष्य स्वर्गासारखं झालं होतं पण आईला त्यांचं नात मान्य नसल्याने अन्वयच्या विशेषतः स्वराच्या चेहऱ्यावर दुःखाची सावली कायमच उमटलेली दिसायची पण आज अन्वय खूप दिवसाने खुलेपनाणे हसत होता आणि पर्यायाने स्वराच्याही चेहऱ्यावर हसू होत. आता ते कितीही प्रयत्न केले असते तरी कुणीही हिरावून घेऊ शकल नसत. आयुष्यात समस्यां सर्वानाच येतात पण तुमच्या मेहनतीनमध्ये दम असेल तर समोरच्यालाही हार मानावीच लागते ह्याच जिवंत उदाहरण म्हणजे स्वरा मोहिते. ती फक्त जगाच्या संघर्षातच जिंकली नाही तर नात्यांचा अवघड गुंताही तिने सोडवला. सोपं नसत काहिच पण जो सतत प्रयत्न करतो, त्यालाच त्याचे अधिकार मिळतात बाकी केवळ देवाच्या भरवशावर राहून आयुष्य चांगले होण्याचे वाट बघत असतात पण स्वरा त्यापेक्षा वेगळी होती म्हणून कदाचीत नाशीबालाही तिच्या समोर हार मानावी लागली होती.

किती भारी असत ना प्रेम देखील. एखादा व्यक्ती त्रासामध्ये असला की रात्र रात्र झोप लागत नाही आणि एखादा व्यक्ती खुश असला तर कारण नसतानाही आपल्या चेहऱ्यावर सतत हसू असत. प्रेमच असत जे जगायला नवीन स्फूर्ती देत तर इथे तर जगताना यातनाही सहन कराव्या लागतात. प्रेम ही आयुष्यातली सर्वात सुखद गोष्ट त्यामुळे ते मिळवायला संघर्ष सुद्धा असाच असावा लागतो. जे ती हिम्मत ठेवत नाही ते आयुष्यभर प्रेमाला कोसत बसतात तर जे हिम्मत करतात ते नवीन इतिहास लिहितात. मग ते सोबत असोत व नसोत त्याने फरक पडत नाही. स्वराने हे दोन्हीही प्रवास सहज पार केले आणि फायनली तिच्या आयुष्यात सुखाने एंट्री केली. आता हे सुखही तिच्या आयुष्यात कायमस्वरूपी आले होते. अगदी योग्यच म्हणतात लोक सत्याला जिंकायला वेळ लागू शकतो पण ते कधी ना कधी जिंकतच. ते करून दाखविले स्वरान्वयने, ते करून दाखवल प्रेमाने. प्रेम करण्यात काय ठेवलंय असा जर कुणाला प्रश्न पडत असेल तर त्यांनी अन्वयची साथ आणि स्वराचा संघर्ष बघावा कदाचित आपल्यालाही प्रेमाचा गुड अर्थ समजत जाईल. इतकंही सोपं नसत प्रेम करणं पण जो करतो तो आयुष्याच्या सर्वात सुंदर आठवणी जगतो हे तितकंच सत्य आहे.

ती सकाळची वेळ. स्वरा, आई, अन्वय तिघेही बाहेर फेरफटका मारत होते. स्वरा आज खूपच खुश जाणवत होती म्हणून अन्वय आज तिचा चेहरा वाचण्यात जास्तच व्यस्त झाला होता. आज तिच्या चेहऱ्यावर इंद्रधनुचे रंग होते, निसर्गाची बहार होती, संगीताचे स्वर होते आणि पुन्हा नव्याने उमलून आलेलं प्रेम होतं. आज पूर्ण वेळ अन्वय स्वराला बघत होता. स्वरालाही त्याचा अंदाज होता पण तिने आज त्याला क्षणभर अडवलं नाही कारण तिलाही ते हवंहवंसं झालं होतं. अन्वय एक क्षण तिला बघणे सोडत नाही म्हणून स्वराने हलकेच पाय काढत चहा आणायला प्रस्थान केले. आई अन्वयकडे बघतच होती. अन्वयची नजर स्वरावरून हटत नाहीये हे बघुन आईने विचारले," अन्वय अस काय आहे स्वरात की तू तिला सतत बघतोस तरीही तुझं मन भरत नाही. हे विचारण्याच कारण म्हणजे पुरुषांची फितरत आहे की त्यांना नवीन नवीन असताना बायको फार आवडते पण नंतर नात जून झाल्यावर तीच बायको, तेच नात बोर व्हायला लागत. मग त्याबाबतीत मी असो की बाकी सर्व स्त्रिया, सारखीच स्थिती आहे आमची तेव्हा काय कारण आहे कळेल का मला?"

अन्वयने आईला बाजूच्या बेंचवर बसविले आणि हळूच हसत उत्तरला," तिच्यात नाही ग, आई प्रत्येक मुलींमध्ये असते ही खासियत. प्रत्येक स्त्रीला सोने, चांदी नको असतात. लग्नानंतर एक माफक अपेक्षा असते ती प्रेमाची. लग्नानंतर पुरुष प्रेम दाखवतात तेदेखील एकाच वेळी आणि नंतर तेच प्रेम हरवत कुठे त्यांचं त्यांनाच माहिती. म्हणून कदाचित लग्नानंतर क्षणात खुललेला तिचा चेहरा लग्नाच्या काही महिन्यानंतर अचानक कोमेजतो. पुरुषांना कळतही नाही प्रत्येक स्त्री काही महिन्यातच बायको वरून आई सून बनते आणि प्रत्येक कुटुंब नकळत एका स्त्रीला घरात कैद करून ठेवत. समाजमान्य कैद म्हणू शकतो हवं तर त्याला. कर्तव्याच्या नावावर ती आपोआप बंदिस्त होते आणि गंमत अशी की तिला त्याची जाणीवही होत नाही. मूल, सासू सासरे, नातेवाईक ह्याचं करताना तिलाच त्याची जाणीव होत नाही हे विशेष. मला विचारशील तर सांगेन की मला बायकोशी कस वागायचं आणि तिला आदर कसा द्यायचा ह्याच उत्तर मला सापडल आहे. लग्नाला फार महिने माझ्याही झाले नाहीत पण एका स्त्रीच मन वाचण्यात मी यशस्वी झालो अस नक्कीच म्हणेन. मी काय बघतो रोज तिच्याकडे?? म्हणशील तर तेच रोजचच आहे. तीच स्वरा आणि तोच तिचा स्वभाव पण प्रत्यक्षात रोज सतत बघून मी तिला सांगत असतो की माझं अजूनही तिच्यावर तितकच प्रेम आहे आणि तू अजूनही तितकीच सुंदर आहे. तिला स्तुतीचे दोन शब्द हवे असतात, मग तिला कधीच कुठल्याच गोष्टीची गरज भासत नाही. अगदी सोन्याची देखील नाही. तिला ते मिळाले की तिचा पूर्ण दिवस मस्त जातो. तीच हसन म्हणजे माझं पूर्ण कुटुंब आनंदात राहत हे कुणाला समजत नाही. मला ते समजलं म्हणून कदाचित मी तिच्याकडे सतत बघून सांगत असतो की तू आजही माझ्यासाठी तितकीच खास आहे जितकी आधी होतीस आणि नंतरही राहशील. प्रत्येक वेळी बोलायला शब्दाची गरज नसते कधी कधी कृतीतून व्यक्त होता येत फक्त हे कुणाला समजलं नाही. मला समजलं म्हणून मी तिच्यासाठी हवं ते करतो मग कुणी बायकोचा गुलाम म्हटलं तरी हरकत नाही. जर बायको नवऱ्यासाठी गुलाम बनत असेल तर नवऱ्याने का होऊ नये? तिला तर कधी वाईट वाटत नाही नवऱ्याच गुलाम म्हटलेल मग पुरुषाना का वाटत? तस पण आई ती आनंदी नसेल तर एक मर्द म्हणून जगात मिरवण्यालाही काहीच अर्थ नाही म्हणून लोकांचं एकण्यापेक्षा आपल्या आवडत्या लोकांना काय आवडत ते बघावं. लोक दोन्हीही बाजूने बोलतात तेव्हा त्यांचं ऐकून आपल्या लोकांना दुखावण्यापेक्षा आपल्या अर्धांगिनीला आनंदी ठेवून आपलं कुटुंब आनंदी ठेवण योग्य नाही का?"

आई त्याच्याकडे बघत उत्तरल्या," अन्वय मला विचार यायला लागला ये रे.."

अन्वयने गंभीर होत विचारले," कसला ग?"

आई हसतच उत्तरल्या," हेच की तुला जन्म देताना मी कोणत्या देवाचे नवस केले होते. जमलं तर स्वरालाही सांगेन म्हणजे अशीच पिढी माझ्या घरून आणखी चांगले चांगले अन्वय देत जाईल. अन्वयच का स्वराही हवी मला. मला आता माझ्याच घरून नवीन विचारांची पिढी सुरू करायची आहे. देशील ना मला खेळायला लवकर त्यांना?"

अन्वय हसत उत्तरला," मातोश्री अजून त्याला वेळ आहे, मला तर अजून बायको सोबत खूप रोमांस करायचा आहे. तुझ्यासाठी मी काही माझा रोमांस कमी करणार नाही. नको बाबा आताच कबाब मे हड्डी!!"

अन्वयच्या बोलण्यावर दोघेही क्षणभर हसू लागले. अन्वयच बोलणं ऐकून अन्वय नक्किच पुरुष होता का हे सांगणे कदाचित कठीणच. पुरुष त्याला बायकोचा गुलाम म्हणतील ह्यात वाद नाही पण बायकोची चिंता करणे तिच्यावर प्रेम करणे हेच लग्नाचं महत्त्वपूर्ण कर्तव्य नसत का? की फक्त बेडवर तिच्यावर प्रेम करणं हेच खरं कर्तव्य आहे. अन्वयच्या डोक्यात क्षणभर हेच विचार सुरू होते म्हणून तो गालातल्या गालात हसत होता. काही वेळ आईनीही त्याला हसण्यात साथ दिली आणि त्या सिरीयस होत म्हणाल्या," अन्वय तुझं प्रेम जिंकल मला मान्य आहे. आम्हाला आमच्या चुकांची जाणीवही झाली पण समोर बघशील तर जाणवेल की आजही लोकांच्या नजरा स्वराला वेगळ्याच नजरेने बघतात. ती दाखवत नसली तरीही तिला त्रास होत असणार अन्वय. ही गोष्ट केव्हा बदलेल? स्वराला हा एक क्षण कायमच त्रास सहन करावा लागेल का? तू म्हणतोस तस तिने आयुष्यभर का ह्या एका क्षणात कैद व्हावे? तिला मुक्त कस करायचं रे?"

आई उत्तराची वाट बघत होत्या तर अन्वय विचारात पडला होता. काही क्षण त्याच्या डोक्यात प्रश्नाने झेप घेतली होती. आज अचानक त्याला त्याचे काही वाक्य आठवले होते जे त्यानें कधीतरी स्वराला म्हटले होते. त्याला ह्या क्षणी जाणवू लागल होत की कदाचित मी जे म्हटलं होतं ती प्रत्येकच गोष्ट तितकी सोपी नव्हती. जो प्रत्यक्षात सहन करतो त्याला खऱ्या अर्थाने वेदनांचा अर्थ कळतो. किती सोपं असत ना हे म्हणणं की लोकांकडे दुर्लक्ष कर पण खरंच ते इतकं सोपी आहे का? ज्याची जळते त्यालाच कळते तरीही स्वराने त्याला कधीच जाणवू दिलं नाही की त्याला उलटून बोलली नाही. किती ही सनहशीलत? खरच अंत नाही का ह्या सहनशीलतेला?"

अन्वय आपल्याच विचारात हरवला होता तेव्हाच स्वरा मागून चहा घेऊन आली. स्वराने आईला चहा दिला तर हातात कप धरून असतानाही अन्वयच लक्ष स्वराकडे नव्हतं. काही क्षण ती त्याच्याकडे बघत म्हणाली," नवरोबा कुठे हरवला आहात? घ्या चहा नाही तर गार होईल.."

तिच्या आवाजाने तो आपल्याच विचारातून बाहेर आला. स्वराचा गोड चेहरा बघताच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परतल. त्याने तिच्या हातातला चहाचा कप घेतला आणि तिला दोघांच्या मध्ये बसवत म्हणाला," अग आई काहीतरी विचारत होती त्याच विचारात पडलो होतो. तिचा प्रश्न ऐकला आणि काय उत्तर देऊ समजत नव्हतं म्हणून विचार करत बसलो होतो. मला तर जमत नाहीये बघ बर तुला जमतंय का?"

स्वराने पटकन विचारले," अस काय विचारलं आईने की तुम्हाला उत्तर देणे जमत नाहीये? तुम्हाला नसेल जमत म्हणजे मुद्दा गँभिर आहे. कळू द्या मलाही."

अन्वय हळूच हसत उत्तरला," आई म्हणतेय की तिला घरात एक बाळ हवंय. तिला खेळायचं आहे म्हणे तिच्याशी. तूच सांग तिला केव्हा तिची इच्छा पूर्ण होणार होईल ते, माझ्याकडे तर नाही काहीच उत्तर. सांगतेस ना?"

अन्वयच्या शब्दाने स्वरा क्षणभर लाजली. तिची आईकडे बघण्याची हिम्मत होत नव्हती. तेव्हाच अन्वय म्हणाला," आई ११ पुरतील न ग आपल्याला. ६ मुली, ५ मुले. काही आत्याकडे पाठवू तर काही तू सांभाळ म्हणजे तुला कंटाळा येणार नाही. एक झोपल की दुसर उठेल मग बस सांभाळत. चालेल ना??"

अन्वयच्या आईही आता सामील होत म्हणाल्या," तुम्हाला हवे तेवढे चालेल मला. ही आजी आहे की सांभाळायला आणि विशेष म्हणजे तुमच्या भाषेत सांगायच झालं तर मी त्यांना कबाब मे हड्डी नाही बनू देणार मग तर काही प्रॉब्लेम नाही ना?"

स्वरां लाजूनच आईच्या मिठीत शिरली. तिचे गाल इतके लाल झाले होते की ती कुणाशीच नजर मिळवू शकत नव्हती. ती आईच्या कुशीत शिरली आणि आई हळूच हसत उत्तरल्या," किती त्रास देतोस ना तू माझ्या सुनेला? स्वरा मारू का ग ह्याला?"

आईचे शब्द येताच स्वराने कुशीतून मान वर काढत म्हटले," हो खूप मारा. मी समजावून थकले ह्यांना सर्वांसमोर अस काही बोलू नये पण ऐकतच नाहीत. माझ्याकडून सुद्धा दोन जास्तीच्या मारा. चावट कुठले!! कधी कुठे काय बोलावं काहिच कळत नाही. मूर्ख बावळट!!"

स्वरा त्याच्याकडे हसून बघत होती आणि अन्वयही हसतच उत्तरला," आई बघितलस ११ मुलांचं नाव घेताच मॅडमचा चेहरा किती उजळला आहे ते. असा जर चेहरा उजळणार असेल तर दोन काय दहा मार आणि ते कबाब मे हड्डी वाली गोष्ट आवडली हा मला. आता बघ किती लवकर तुला नात देतो. तू फक्त वाटच बघ. तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल मातोश्री. ती निशिंत रहा."

स्वरा अन्वयच्या नजरेत बघत होती. तो एकटक तिच्याकडे बघत होता. त्याच्याशी नजर मिळविण्याची तिची हिम्मत नव्हती म्हणून तिने आईकडे बघितले. आईच्या नजरेत सुद्धा तेच भाव होते. आई तिला बघून हसत होत्या. स्वराला त्याक्षणी इतकं लाजायला झालं होत की ती चहाचा कप तिथेच ठेवून समोर पळू लागली. तसे पळत असताना तिला कुणाचंच भान नव्हतं. ती समोर पळताना सुद्धा अन्वयकडे बघत होती आणि तो सतत तिलाच बघतोय हे बघून पुन्हा जोराने पळायची. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पुन्हा एकदा बाहेर आला होता. आज त्याला ती स्वरा जाणवत होती जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा फोटोमध्ये बघितले होते. तीच तेच रूप पून्हा एकदा बघून अन्वयच्या तोंडून शब्द निघाले," आई तू विचारत होतीस ना तिच्यात अस काय आहे की मी तिच्याकडे सतत बघतो तर त्याच उत्तर आहे सिम्प्लिसिटी. तीच वय नक्कीच वाढत आहे पण तिने तिच्यातल्या नटखट स्वराला कधीच हरवू दिलं नाही. ती वेळप्रसंगी कणखर बनली पण जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा ती मधली स्वरा आपोआप बाहेर येते. ती जगत असताना तिने स्वतामधल्या खऱ्या स्वराला कधीच हरवू दिलं नाही. ती जी आहे ते चेहऱ्यावर सतत दिसत म्हणून कदाचित मी तीच्यापासून दूर जाऊ शकत नाही. कुठे मिळते ना आई हजारो चेहरे लपवून जगणाऱ्या ह्या जगामध्ये एक निखळ व्यक्तिमत्त्व असणारी व्यक्ती. ती मला मिळाली आहे तर मग माझं सतत तिला बघन योग्य नाही का?"

अन्वय आणि अन्वयच्या आई दोघेही स्वराच्या त्या निखळ हसण्याकडे बघत होते. स्वराला खरच जगाची चिंता नव्हती. कदाचित स्वरा जगायच कस ते शिकली होती. जगात सर्वात जास्त आनंद आपण स्वतःच देऊ शकतो म्हणून तिने स्वतःला आनंदी ठेवण्याचे मार्ग स्वतःच शोधले होते. जे सतत त्रासाच ओझं घेऊन मरणाची वाट बघत असतात त्या सर्वांसमोर स्वरा अस एक उदाहरण होत जिने जीवनाच्या संकल्पना बदलल्या होत्या. ती मन मारून जगत नव्हती तर तिने आयुष्य जगण्याचे नवीन मार्ग शोधले होते मग ते जगाला पटतात की नाही ह्याचीही चिंता तिला कधीच नव्हती. ती पळत होती आणि अन्वय सतत तिच्याकडे बघत होता. काय होते दोघेही माहिती नाही पण प्रेम काय असत हे दोघेही खूप छान शिकवून जात होते. प्रेम म्हणजे खूप काही नसतंच. तो असा एक क्षण आहे जिथे जगातले सर्व टेन्शन विसरले जातात. एक सुखद मिठी असते जिथे व्यक्तीला सुरक्षित वाटत. समजून घेणारा साथीदार असतो जो तिला कधीच बंधनात ठेवत नाही. तो तिला उडायला शिकवितो आणि पडल्यावर प्रेमाने फुंकर मारायलाही विसरत नाही. वेळ पडली तर ओरडतो पण गरज पडली तर संपूर्ण जगाविरुद्ध जाऊन तिची साथ देतो. प्रेमाच्या हजारो व्याख्या असतील आणि हजारो उदाहरण असतील पण प्रेम कस असावं हे स्वरा-अन्वयचा प्रवास बघतानाच जाणवत कारण त्यात मोह नाही तर आहे त्याग. जिथे त्याग असेल ते नात खरच कुणी तोडू शकत का? कदाचित कुणालाच शक्य नाही कारण ते शरीराने दूर नक्कीच करू शकतील पण मनाने त्यांना तोडने कधीच शक्य नाही..

तेरी खूबसुरती मुझे
तेरी और लाती है
मैं भूल जाता है दुनिया को
जब भी तेरी बात होती है..

क्रमशः......