Bhagy Dile tu Mala - 100 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग १००

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग १००



ए नसिब अपनी जित पर
इतना गुरुर ना कर
तेरी जितसे ज्यादा यहा
मेरे हार के चर्चे है....

मागील काही महिने स्वराच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होते. तिने ह्या काही महिन्यात फक्त शांतता अनुभवली होती. आईच्या स्वभावात अचानक बदल झालेला तिला दिसून येत होता पण आई अजूनही तिच्याशी काहीच बोलल्या नसल्याने तिला अन्वय पासून दूर जाण्याची भीतीही सतावू लागली होती. स्वराने ह्या पूर्ण काळात अन्वयच्या घरच्यांचं मन जिंकून घेतल होत तरीही स्वराला मात्र त्या घरात पूर्ण अधिकार मिळाले नव्हते. हळूहळू दिवस जात होते आणि स्वरा आपल्या मनाची तयारी करू लागली. तिच्यासाठी इतकंही सोपं नव्हतं अन्वयची साथ सोडण पण ती त्याच्या कुटुंबांच्या आनंदासाठी काहीही करू शकत होती. तिची अपेक्षा होती निदान तिच्या सोडून जाण्याने तरी तिच्यावरच्या स्वार्थीपणाचा डाग पुसला जाईल. स्वरा मनापासून आईची सेवा करू लागली आणि आईची स्थिती दिवसेंदिवस सुधारू लागली.

अशीच एक सकाळ. स्वराच्या आयुष्यातला तो सर्वात आनंदाचा आणि त्रासाचा दिवस होता. स्वरा सकाळी-सकाळी आईच्या रूममध्ये पोहोचली. रोज ती त्यांच्यासोबत फिरत असे त्यामुळे आजही ती विल चेअर घेऊन तिथे गेली होती. स्वराने विल चेअर समोर घेतली आणि आई हळुवार आधार घेत बेडवरून उठल्या. त्यांनी आज विल चेअरला बाजूला सारले आणि हळुवार स्वराचा हात बाजूला करून स्वतःच चालू लागल्या. आई हळूहळू एकेक पाऊल टाकू लागल्या आणि स्वरा हळुवार त्यांचा हात सोडू लागली. आई पाऊल टाकता-टाकता समोर निघून गेल्या आणि स्वरा बघतच राहिली. आज खूप दिवसांनी आई स्वता बेडवरून उठून चालत होत्या म्हणून अन्वय, अन्वयचे बाबा कौतुकाने बघत होते. आईच्या हसण्याचा आवाज पूर्णता रूममध्ये पसरला होता. त्यांच्या निखळ हसण्याने स्वराच्या डोळ्यात क्षणभर अश्रू उभे राहिले होते. स्वरा त्यांच्याकडे डोळे भरून बघतच होती की आई म्हणाल्या," स्वरा आता तुला माझ्यासाठी दिवसभर राहावं लागणार नाही हा.. तू मुक्त आहेस माझ्या जबाबदारीतून. आता तुला हव ते करू शकतेस. माझ्यासाठी तुला अडकून राहावं लागणार नाही."

आई आनंदात कुठलाही विचार न करता बोलून गेल्या तर आईचे शब्द जणू स्वराच्या मनात खोलवर जाऊन दडले आणि ती ह्या ३-४ महिन्यात कधीही न विसरलेली गोष्ट पुन्हा तिच्या समोर येऊन उभी राहिली. स्वराच ते वचन तिला क्षणात आठवलं आणि हसता-हसता अचानक तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती कसला तरी विचार करतच होती की आई म्हणाल्या," स्वरा निघायचं नाही का आज?"

स्वराने क्षणभर डोळ्यात येऊ पाहणारे अश्रू पुसले आणि मोकळ्या मनाने बाहेर जाऊ लागली. आज फक्त स्वरा नाही तर अन्वय, अन्वयचे बाबा सर्वच एकत्र फिरायला निघाले होते. आज ते सर्व शांत होते फक्त आईला सोडून. आज आई कितीतरी वेळ बोलत होत्या. जणू एखाद्या पक्षाला पिंजऱ्यातून मुक्त केल्यावर त्याला जितका आनंद होतो तितकाच आनंद आईला झाला होता त्यामुळे स्वराची नजर त्यांच्यावरून हटली नव्हती. स्वरा आज काहीतरी त्यांच्या नजरेत, त्यांच्या चेहऱ्यावर शोधत होती. तिच्या मते हा तोच आनंद होता ज्या त्या कितीतरी दिवसापासून शोधत होत्या पण तो आनंद नक्की कशाचा आहे तिला माहिती नव्हतं. स्वरा आईवर लक्ष देऊन होतीच की अन्वय म्हणाला," स्वरा मग आजपासून तुझी सुटका झाली सो ऑफिस जॉईन करणार आहेस की आता घरीच रहायच आहे. म्हणशील तर रेसिग्नेशन टाकतो, चालेल ना?"

अन्वय हसत होता तर स्वरा आपल्याच विचारात हरवली होती तरीही त्याचे शब्द तिला स्पष्ट ऐकू आले होते. तिलाही कदाचित हेच हवं होतं म्हणून ती बोलणारच तेवढ्यातच आई उत्तरल्या," कसा रे तू अन्वय!! ती कंटाळली असेल घरात बसून बसून, जाऊ दे तिला ऑफिस तस पण ना आम्ही दोघी घरात असू तर भांडण होतील मग म्हणशील की नुसते भांडता त्यापेक्षा जा तू हिला ऑफिसला घेऊन."

आईचे शब्द येताच स्वरा शांतच झाली. तिला समोर काहिच बोलता आले नाही. तसे आई, अन्वय आज गमतीत बोलत होते पण का माहिती नाही स्वराच्या मनात ते शब्द अगदी खोलवर रुतू लागले होते. कदाचित हाच तो दिवस होता जेव्हा स्वराला अन्वयची साथ सोडावी लागणार होती असे तिला क्षणभर वाटू लागले.

आज आई सर्वांसोबत गप्पा मारत होत्या. एक क्षण देखील त्यांच्या चेहऱ्यावर उदासी नव्हती तर स्वरा फक्त काही वेळ त्यांच्यासोबत घालवत होती. तिच्या मनाने ठरवलं होतं आता ते पूर्णत्त्वास न्यायचे होते म्हणून काही क्षण तिने आपले विचार बाजूला ठेवले आणि तीही त्यांच्यात मिसळून हसू लागली, त्यांच्या गप्पाचा भाग बनू लागली पण स्वरा आता नक्की काय पाऊल उचलणार आहे ह्याबद्दल कुणालाच अंदाज नव्हता. ती आज आपल्या आयुष्याचे काही सुंदर क्षण अन्वय आणि त्याच्या कुटुंबासोबत घालवत होती. त्यासमोर तिने स्वतःचे अश्रू देखील पिऊन घेतले.

जवळपास एखादा तास झाला होता. सर्व फिरून घरी परतले होते. स्वरा आपल्या विचारातच हरवत चहा बनवू लागली होती तेव्हा अचानक अन्वयने तिला मिठी मारली. तशी त्याची मिठी तिला नेहमी शांतता देऊन जायची पण आज तिला त्याच्या मिठीतच राहून खूप रडायचं होत. ती काय फिल करते आहे ते सर्व सांगायचं होत पण आलेला विचार तिने मनात दाबून टाकला आणि अश्रूला थांबवून ती तशीच उभी राहिली. अन्वयने मिठी मारल्यावर काहीतरी बोलणारी स्वरा इतकी शांत का हा विचार त्याला सतावू लागला होता आणि अन्वय मिठी घट्ट करत उत्तरला," मॅडम आज नाही म्हणालात ना की कुणी बघेल, तुम्हाला लज्जा वगैरे वाटत नाही का?"

त्याचा प्रत्येक शब्द आज ती मनात साठवून घेत होती, त्याच्या शब्दाने तिच्या डोळ्यात अश्रूच यायचे बाकी राहिले होते पण तिने ते सुद्धा पिऊन घेतले आणि चेहऱ्यावर खोट हसून आणत उत्तरली," मी बोलून काहीही फायदा आहे का? नाही ना.. म्हणून काहीच म्हणाले नाही."

अन्वय जरा हसतच उत्तरला," सही पकडे है. बायको खूप हुशार झाल्या आहात हा तुम्ही अलीकडे. बहुतेक माझ्या संगतीचा असर आहे, हो ना?"

स्वरा क्षणातच त्याच्या बाजूने वळत उत्तरली," अन्वय सर माझ्याकडे आज जे काही आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे. मग आदर असो की प्रेम. सर्व काही तुमचंच आहे. मला जगातला सर्वात सुंदर लाइफ पार्टनर मिळाला म्हणून देवाला धन्यवाद मानेन."

स्वराच्या चेहऱ्यावर हसू तर होत पण आवाजात काहीतरी कमीपणा जाणवत होता हे अन्वयला कळणार नाही तर कुणाला कळणार. त्यामुळे त्याने लगेचच विचारले," स्वरा अस नाही की तू माझी स्तुती करत नाहीस पण आज ना त्या स्तुतीत ती मज्जा नाही. तुझ्या आवाजात ना अस काहीतरी आहे जे मी ह्याआधी कधी बघितलं नाही. स्वरा सोडून तर जाणार नाहीस ना मला?"

अन्वयने स्वराच्या मनातले क्षणात भाव सहज ओळ्खले होते. स्वरालाही माहीत होतं की अन्वय पासून काहीही लपवन शक्य नाही पण आज ती कमजोर पडली असती तर सर्व नाती विस्कळीत झाली असती म्हणून ती पटकन दुसऱ्या बाजूने वळाली. जगाने दिलेल्या हजार ह्यातना सहन केल्यावर तिच्याकडे जो विश्वास आला होता तो तिने आवाजात परत आणला आणि हसत म्हणाली," तुम्हाला सोडून सोडून कुठे जाणार बर? मनात तर कायम आहातच तिथून कसे काढू?

तुम बसे हो सागर किनारे
नाव का जहा कोई काम नही
बेह जायेंगे हम लेहरो की तरहँ
जी लेंगे जिंदगी एक पल ही सही

तिचे शब्द येताच अन्वय हसत उत्तरला," वा क्या बात है मॅडम. दिलं खुश कर दिया आपने. बर ते होत राहील पण आता चहा देणार आहात का मला? आज लवकर निघायचं आहे मिटिंग आहे माझी, तुझ्याशी बोलत बसलो तर वेळ कसा जाणार मलाही समजणार नाही सो प्लिज आज लवकर दे."

अन्वयने स्वराची मिठी सैल केली आणि स्वरा चहा कपात ओतु लागली. आज अन्वय स्वराकडे बघतच होता. स्वराने दोन कप घेण्याऐवजी आज एकाच कपात चहा ओतला होता हे बघून अन्वय म्हणाला," मॅडम आज मला चहा नाही मिळणार का?"

आज अन्वय पटर-पटर करत होता तर स्वराला काहीच बोलायच नव्हतं. आज तिच्या शांततेत बरच काही लपल होत. अन्वय तिच्याकडे बघत होता आणि स्वराने चहाचा कप ओठाना लावला. चहाचे एक दोन सिप स्वतःच घेतले आणि नंतर कप त्याच्या हातात दिला. आज अन्वय स्वराला शॉक होऊन बघत होता. रोज कितीतरी वेळ म्हटल्यावर बाईसाहेब एकाच कपात चहा प्यायला तयार होत असे पण आज न बोलताही ती कशी तयार झाली हा प्रश्न त्याला पडून गेला होता पण त्याला प्रश्न विचारून तिला त्रास द्यायचा नव्हता म्हणून तो आज शांतपणे चहा घेत होता किंवा तीच प्रेम नव्याने अनुभवत होता. आता अशी एक वेळ आली जेव्हा कुणीच कुणाशी बोलत नव्हते फक्त चहाचा कप एका कडून दुसऱ्याकडे जात होता आणि दोघेही तो क्षण एन्जॉय करत होते. अन्वयच्या चेहऱ्याकडे त्याच्या नजरेत बघताना ती जणू विसरूनच गेली होती की हा तिचा ह्या घरातला शेवटचा दिवस आहे. दोघेही एकमेकाच्या नजरेत हरवले होते. स्वराच्या नजरेत काही क्षण तिच्या मनातले भाव नव्हते म्हणून त्यालाही ते वाचणे जमले नव्हते किंबहुना काय लपवायच आणि काय दाखवायच हे आता स्वराच शिकली होती त्यामुळे ती त्याला तेच दाखवत होती जे स्वराला दाखवायच होत. दोघे एकमेकांत हरवले होते. ना जगाची पर्वा होती ना कुणाचे विचार. स्वरा त्याच्या नजरेत हरवली होतीच की अन्वयने चहा संपविला आणि तिच्या गालावरून हात फिरवत तो बेडरूमकडे निघाला. बेडरूममध्ये जातानाही त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होत ज्यात स्वरा हरवली होती. तो काही क्षणात निघून गेला आणि स्वरा फक्त त्याच्याकडे बघत राहिली. तो गेला आणि कितीतरी वेळापासून अडवून ठेवलेल्या अश्रूंना तिने वाट करून दिली. आज ते अश्रू वाहत होते, प्रेम अपयशी झालं म्हणून नाही तर एका आईला मुलाच प्रेम मिळाव म्हणून. सोपं होतं तिच्यासाठी एका मुलाला आईपासून तोडण पण तिने स्वतःला हरवून एका आईला जिंकविण्याचा निर्णय घेतला होता. असा निर्णय ज्यामुळे तिचा आनंद कायमचा नाहीसा होणार होता पण कुणाला तरी आयुष्यभर आनंद मिळणार होता. स्वरा हे फक्त नाव नव्हतं तर खऱ्या अर्थाने कहाणी होती जी अन्वयच्या आयुष्यातून काही क्षणातून नाहीशी होणार होती. ही एकमेव अशी कहाणी होती ज्यात चुक त्या दोघांची नव्हती तरीही ती अपूर्ण राहणार होती आणि त्याला सोडून जातानाही स्वराच्या डोळ्यात समाधान होत. काय असत हे प्रेम? मूर्खपणा का? की स्वार्थीपणा??

प्रेम म्हणजे मिळविण नसतंच तर कुठेतरी वेगळीकडे असतानाही त्या व्यक्तीवर तेवढंच प्रेम करणं म्हणजेही प्रेमच असत आणि स्वराने फायनली तोच मार्ग निवडला होता. तिच्या ह्या निर्णयाने एक कहाणी अपूर्ण तर राहणार होती पण सर्व आठवणीत ठेवतील अशी कहाणी ती नक्कीच रचनार होती. तिने लग्नाच्या आधी जो विचार केला होता तोच निर्णय घेण्याची ही वेळ होती. तिला वाटलं नव्हतं की ही वेळ येईल पण नशिबाने तिच्यावर ती वेळ आणली होती आणि स्वराने हसूनच त्याचेही स्वागत केले.

सकाळचे ९ च्या आसपास झाले होते. स्वराने सर्वाना नाश्ता दिला आणि बेडरूममध्ये येऊन अन्वयच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होती. स्वरा कधीच अस वागत नव्हती म्हणून अन्वयला हसू येत होतं पण ती सतत आज त्याच्याकडेच बघते आहे म्हणून अन्वयने आज तिला एकही प्रश्न विचारला नव्हता. अन्वय तिचा हा रोमँटिक स्वभाव एन्जॉय करत होता. त्याच्या चेहऱ्यावर सतत हसू होत आणि ते हसू बघण्यातच स्वराला आनंद मिळत होता. गेल्या कितीतरी वेळेपासून रूममध्ये सर्व असच घडत होतं. फायनली अन्वयची तयारी झाली आणि तो तिच्या कपाळावर किस करून जाऊ लागला. त्याने काही पावले टाकलीच होती की स्वराने त्याला मागून घट्ट मिठी मारत म्हटले," अन्वय सर लव्ह यु सो मच. मिस यु..!!"

अन्वयला तीच हे रोमँटिक वागणं फारच आवडलं होत फक्त तिने त्याला इतकं घट्ट पकडून ठेवलं होतं की त्याला वळून तिचा चेहरा पाहता आला नव्हता. अन्वयच्या चेहऱ्यावर गोड हसू होत तर स्वराच्या डोळ्यात विरहाचे अश्रू. अन्वय काही क्षण तर तिची मिठी अनुभवण्यात व्यस्त होता आणि काही वेळाने म्हणाला," बायको इतकंच मिस करत असणार तर सुट्टी घेऊ का?"

अन्वय अगदीच रोमँटिक होत बोलून गेला. तो आता आपल्याकडे वळणार हे स्वराला जाणवलं आणि तिने पटकन डोळ्यातले अश्रू पुसून घेतले. अन्वय तिच्याकडे वळाला तोपर्यंत तिने चेहऱ्यावर हसू आनलं होतं. तो हसत तिच्याकडे बघत होता आणि स्वरा सुद्धा हसतच उत्तरली," तुमची मिटिंग आहे ना मग जाऊन ह्या. मी तर इथेच आहे, तुम्हाला कुठे सोडून जाणार आहे. मग हवं तेवढं प्रेम करा माझ्यावर, मी काहीच बोलणार नाही. इतकं प्रेम करा की मला बाकी कशाचीच आठवण राहणार नाही. पुन्हा एकदा स्वार्थी होऊन मागतेय कराल ना माझ्यावर प्रेम??"

अन्वय काही क्षण तिच्याकडे बघतच होता. तिच्या चेहऱ्यावरची शांतता बघून अन्वयने तिच्या कपाळावर किस केले. अन्वयने आपले ओठ बाजूला केलेच होते की स्वराने आपले पाय उंचवत अन्वयच्या कपाळावर, गालावर जणू किस्सीची बरसातच केली. ती कीस करत होती आणि अन्वय पहिल्यांदा स्वराचा हा स्वभाव अनुभवत होता. तिने पटापट किस केले आणि अन्वय हळुवार हसत उत्तरला," बायको नक्की जाऊ ना?"

अन्वयच्या चेहऱ्यावरच गोड हसू बघून ती त्याचा हात पकडत बाहेर घेऊन जाऊ लागली. तिने त्याला काहिच उत्तर दिलं नव्हतं पण ती सतत त्याच्याकडे बघत होती. आज तिने स्वतःच त्याच्या खिशात रुमाल, पॉकेट टाकले होते. स्वराने त्याला दारावर सोडले आणि अन्वय कार सुरू करू लागला. आज अन्वयच मन त्याला सांगत होत की घरून कुठेच जाऊ नकोस पण मिटिंग असल्याने त्याला जाण भाग होत. त्याने क्षणात कार काढली आणि हळुवार चालवू लागला. तो जात होता पण स्वराच्या पापण्या क्षणभर सुद्धा हलल्या नव्हत्या. आज अन्वय देखील फक्त तिच्याकडे बघत होता. पहिल्यांदा अस झालं होतं की तो तिच्या मनातलं समजू शकला नव्हता. तो तिला बघत बघत पसार झाला तर स्वरा कितीतरी वेळेपासून त्याच्याकडे बघत होती. तो तर गेला होता पण स्वरा आताही तिकडेच बघत होती. पुन्हा त्याला बघायला मिळणार नाही हे तिच्या मनाने तिला सांगितलं होतं म्हणूनच कदाचित ती क्षणभर त्याच्याकडे बघतच राहिली.

स्वराला तिथे उभे राहून किती वेळ झाला होता माहिती नाही. अन्वय जाऊन काही वेळ गेला आणि स्वराही रूममध्ये परतली. तिने बेडरूममध्ये येताच दार बंद केले आणि पटकन बेडवर जाऊन पडली. आज सकाळपासून कंट्रोल केलेले अश्रू क्षणात बाहेर पडले आणि समोर ठेवून असलेला अन्वयचा फोटो हातात घेत ती रडतच उत्तरली," अन्वय सर सॉरी!! तुमच्या सारखा लाइफ पार्टनर मिळणे माझे भाग्य होते पण कदाचित आपली साथ आता इथपर्यंतच असणार आहे. मी माझ्या स्वार्थीपणात एक निर्णय घेतला, त्याबद्दल मला आनंदही आहे आणि दुःखही. आनंद ह्यासाठी की मी माझ्या आयुष्याचे सर्वात सुंदर क्षण सोबत घेऊन जाणार आहे आणि वाईट ह्यासाठी की माझ्यामुळे मी एका आई पासून मुलाला दूर केलं. मला नाही माहिती तुम्ही मला चुकीच समजणार की बरोबर पण एका आईपासून मी तुम्हाला दूर करू शकत नाही. 'स्वरान्वय' हे पर्व कदाचित इथपर्यंतच होत. माझ्या आयुष्यातील सर्वांत सुंदर आठवणी तुम्हीच मला दिल्या आहेत तेव्हा थॅंक्यु म्हणून कमीपणा जाणवू देणार नाही. अन्वय सर दोन लोक एकत्र येऊन जर पूर्ण कुटुंब विस्कळीत होत असेल तर त्या दोन लोकांचा एकत्र येण्याचा काहीच फायदा नाही त्यापेक्षा आपण वेगळं राहून दोन कुटुंब जोडून ठेवू. अन्वय सर होऊ शकत की तुम्ही माझ्यावर रागावणार पण प्लिज मला विसरू नका. मला कायम आठवणीत ठेवा पहिल प्रेम म्हणून. अन्वय सर कदाचित आपली कहाणी अपूर्ण राहील पण मी म्हणेन माझी ही कहाणी फक्त तुम्हीच पूर्ण केलीत. आई वडिलांनी मला नाव नक्कीच दिलं पण मला अस्तित्व मिळालं ते स्वरान्वय ह्या शब्दाने. हे अस्तित्व हे प्रेम जगाने विचार केला तरीही माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही. अन्वय सर लव्ह यु!! थॅंक्यु मला पुन्हा एकदा प्रेमात पाडण्यासाठी आणि प्रेम चुकीच नसत हे शिकविण्यासाठी. एका कुरूप व्यक्तीला सतत सुंदर आहे हे सांगण्यासाठी आणि कितीही त्रासात असताना मला हसवण्यासाठी. आता कदाचित आपण सोबत नसू तरीही माझ्या नजरेत सतत तुम्ही असणार आहात. लव्ह यु नवरोबा! मिस यु सो मच! मला विसरणार तर नाही ना तुम्ही?"

स्वरा आज अन्वयच्या फोटो सोबत कितीतरी वेळ गप्पा मारत होती. कदाचित समोरासमोर त्याच्याशी गप्पा मारणे शक्य नव्हते म्हणून ती त्याच्या फोटोशी बोलत होती. तिला जवळपास आईच्या बर्या होण्याची चाहूल आधीच लागली होती म्हणून स्वराने अन्वयच्या नकळत आपली पॅकिंग करायला घेतली होती. एका बॅग मध्ये जितके कपडे तिला भरता येत होते तिने ते भरले आणि घरातून निघायला सज्ज झाली. स्वरा स्वतःच वचन पूर्ण करायला किंबहुना प्रेम वाटायला काहीही करू शकत होती ह्याचंच ते उदाहरण होत. कितीतरी वेळ बसून आज तिने ते अश्रू गाळून घेतले. पूर्ण रूम तिचे अन्वय सोबतचे क्षण नजरे खालून काढले आणि पुन्हा एका प्रवासास सज्ज झाली. हा तिचा कदाचित शेवटचाच प्रवास होता. अन्वय शिवाय तीच जीवन म्हणजे मरणच होत म्हणून हा प्रवास तिला खऱ्या अर्थाने स्वर्गात घेऊन जाणार होता. शेवटचा प्रवास होता तो, कदाचित जगाला नव्याने प्रेम शिकविणारा. अन्वय सोबत असताना कदाचित लोकांना त्यांचं प्रेम समजलं नव्हतं पण ती त्याला सोडून गेल्यावर समजेल का ह्याचीही खात्री स्वराला नव्हती मुळात तिला त्यातलं काहीच नको होतं. तिला अन्वयच्या आठवणी मिळाल्या होत्या आता त्याच जीवनभर पुरेशा ठरणार होत्या.

एक कहाणी के लिये
दुसरी कहाणी खतम कर रही हु
बेशक तकलीफ भरा होगा ये सफर हमारे लिये
पर खुद को आझाद करके, सबको खुशिया मेहर कर रही हु..

*********

सायंकाळची वेळ होती. अन्वय ऑफिस मधून परतला होता. बेडरूमला येताच तो मोठ्याने म्हणाला," स्वरा प्लिज चहा देशील का? खूप थकलोय ग! आज तुझ्या हातचा चहा घेताच बर वाटेल मला."

अन्वयने आवाज तर दिला पण स्वराच उत्तर काही आलं नाही. इतर वेळी तर स्वरा अन्वय येताच धावत यायची पण आज का आली नाही म्हणून तो विचार करू लागला. अन्वय येऊन २ मिनिटे झाले होते तरीही स्वराचा आवाज आला नाही म्हणून तो तिला शोधू लागला. स्वरा आज बेडरूम, बाथरूम, किचन किंवा बाहेर कुठेच नव्हती म्हणून तो सरळ आईच्या बेडरूममध्ये गेला. आई आताच उठल्या होत्या. अन्वयने मध्ये जात त्यांना विचारले," आई स्वराला बघितलस का तू? ती कुठेच दिसत नाहीये. एवढंच काय दुपारी पण कॉल केला होता तिला तर तिचा मोबाइल बंद येत होता. कुठे बघितलस का तिला?"

अन्वयच्या नजरेत चिंता होती तर आईही घाबरत बोलून गेली," अन्वय मीही उठले तेव्हापासून तिलाच शोधतेय पण तिचा काहीच पत्ता नाहीये. आईकडे गेली असेल बहुतेक. कॉल लावून बघ बर त्यांना."

अन्वयने क्षणातच स्वराला कॉल लावला पण आताही तिचा फोन बंदच येत होता. कितीतरी वेळ त्याने तिला कॉल ट्राय केले पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. अन्वयने आता तिच्या बाबांनादेखील कॉल केला पण त्यांचाही फोन बंदच आला होता. जवळपास अर्धा तास तो कॉल लावत होता पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. अन्वय आता थोडा टेन्शनमध्ये आला होता. त्याची नजर आता आईकडे गेली. आई त्याच्यापेक्षा जास्त चिंतीत वाटत होती म्हणून अन्वयने चेहऱ्यावर हसू आणत म्हटले," आई काळजी नको करू मी येतो बघून बाहेर सापडेल ती. गेली असेल अशीच कुठेतरी.."

आईच बोलणे येण्याच्या आधीच अन्वय धावत-पळत बाहेर गेला. अंधार वाढत होता. त्याने आधी पूर्ण पार्क पिंजून काढला. तो सर्वाना स्वराबद्दल विचारत होता पण कुणीच आज तिला पाहिलं नव्हतं. तो वेड्यासारखं तिला इकडे तिकडे बघत होता पण तिचा काहीच पत्ता नव्हता. स्वरा पार्क मध्ये, आसपासच्याच्या भागात कुठेच सापडत नाही म्हणून अन्वयने सरळ गाडी तिच्या आईच्या घराकडे वळवली..तो आज गाडी चालवत तर होता पण त्याच्या चेहऱ्यावर भीती होती. कसातरी प्रवास करत त्याने घर गाठले. त्याला एक आशा होती की ती कदाचित तिथे असेल पण दाराच्या समोर जाताच तीही आशा फोल ठरली. त्याने धावत पळतच आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस करायला सुरुवात केली. पण आज स्वराबद्दल किंवा तिच्या कुटुंबाबद्दल कुणालाच काहिच माहिती नव्हत. आज अन्वय काम करून थकला होता तरीही त्याने तिचा शोध घेणे थांबविले नाही. तो तिला शोधत राहिला पण स्वराचा चेहरा त्याला कुठेच दिसला नाही.

शोधून शोधून २ तासाच्या वर गेले होते. स्वरा कदाचित घरी परतली असेल म्हणून त्याने पटकन कार सुरू केली आणि घराकडे पळाला. तसा रस्ता फक्त अर्ध्या तासांचा होता पण आज त्याच्यासाठी ते जणू हजारो किलोमीटरच अंतर जाणवत होतं. त्याचे श्वास लागले होते तरीही त्याने तिची चिंता करणे सोडले नव्हते. स्वरा नक्की कुठे आहे हा प्रश्न त्याला सतावत होता. हा एक प्रश्न डोक्यात घेऊनच त्याने अर्धा तास प्रवास केला. घरी पोहोचताच त्याने पटकन गाडी पार्क केली आणि गाडीचे दार आपटत पुन्हा बेडरूममध्ये गेला. त्याने पुन्हा एकदा घर शोधून काढल पण ती कुठेच नव्हती. तो धावत-धावतच पुन्हा आईच्या बेडरूममध्ये गेला आणि हडबडीत विचारून गेला," स्वरा आली का ग आई?"

आईचा चेहरा त्याला त्याच उत्तर देत होता. आई काहीच बोलली नाही आणि अन्वय पून्हा बाहेर जाऊ लागला तेवढ्यात आई म्हणाल्या," अन्वय…"

आईच्या आवाजाने अन्वय थांबला आणि आईकडे बघू लागला तर आई रडवेल्या स्वरात म्हणाल्या," अन्वय ती तुला ह्या घरात आता सापडणार नाही. मला आठवत जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते आणि ती मला भेटायला आली होती तेव्हा ती स्वतःलाच म्हणाली होती की मी तुम्हाला तुमच्या मुलापासून दूर करणार नाही. तुम्हाला त्रास झालेला मी बघू शकणार नाही तेव्हा तुम्ही ज्यादिवशी बरे होणार त्यादिवशी मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. बघ ना आज मी पूर्णपणे बरी झाले आणि ती गेली. अन्वय मी तिला मनातलं सांगायला उशीर केला का रे?"

अन्वयने आईच बोलणं तर ऐकलं होतं पण बोलणं होताच तो धावत बेडरूममध्ये गेला. त्याने अलमारी उघडून बघितली. त्यात स्वराचे कपडे अजिबात नव्हते. अलमारी बघताच त्याला आईच्या शब्दांवर विश्वास बसला. त्याच हृदय आता धडधड करत होत, इतक्या गतीने की अन्वयला काय करू सुचत नव्हतं. अन्वय कावरा-बावरा झाला होता तेव्हाच त्यांच समोरच्या एका फोटोवर नजर गेली. तो त्याचाच फोटो होता. त्याच्या फोटो वर तिने लिपस्टिकने निशाण उमटवले होते म्हणून अन्वयच्या चेहऱ्यावर गोड हसू अवतरलं. त्याने फोटो हातात घेतला त्याच्या खालीच एक चिट्ठी त्याला मिळाली. त्याने ती वाचायला घेतली..

" काय लिहू खरच माहिती नाही. तुम्हाला अंदाज आलाच असेल की घरात नक्की काय झालंय. जास्त टेन्शन घेऊ नका, मी मरणार वगैरे नाहीये, बस जगत राहीन एकटी आणि हा बर का माझ्याशिवाय कुणाचा विचार केलात तर जीव घेईन तुमचा स्वप्नांत येऊन. नवरोबा मिस करेन तुम्हाला खूप. नेहमी म्हणता ना लव्ह यु म्हणत नाहीस मग आज म्हणते नवरोबा खूप खूप प्रेम आहे माझं तुमच्यावर आणि ते कधीच कमी होणार नाही. असा चेहरा पाडून बसू नका हा. चला हसा बर. हा असच. कायम असेच हसत राहा. बाय बाय नवरोबा. मिस यु!! आणि बर का दुसरी बायको हवी असेल तर बिनधास्त बनवा माझी अनुमती आहे. आईला खूप दुखावलं आहे आपण तेव्हा त्यांना आनंदी ठेवा. मी आहे आपल्या आई बाबांसोबत. काळजी करू नका घेईन तुमच्या स्वराची काळजी. आता जास्त बोलणं होणार नाही. अन्वय सर मी गेल्यावर रडू नका उलट हसत राहा तेव्हाच मी तुम्हाला सापडेल. आवडेल तुम्हाला मला तुमच्या हसण्यात शोधायला?"

स्वराची चिट्ठी वाचून अन्वय वेड्यासारखा हसत होता. आई त्याच क्षणी मध्ये आली. त्यांनी ती चिट्ठी अन्वयच्या हातातून काढून घेतली आणि वाचू लागल्या. आई वाचत होत्या तर अन्वय आरशात बघून हसत होता. कदाचित स्वराला शोधण्याचा प्रयत्न तो करत असावा. आईची चिट्ठी वाचून झाली आणि अन्वय हसत उत्तरला," आई म्हणालो होतो ना की ती माझ्याचसाठी मला सोडून जाईल. नाहीये ती स्वार्थी. बघ गेली सोडून. आताही जगाने तिला म्हणावं की ती सुंदर नाहीये आणि सुंदरता कशावरून ठरवायची. चेहऱ्यावरून की तिच्या त्यागावरून? जी दुसऱ्यासाठी स्वतःला त्रास करून घेते ती खरच स्वार्थी आहे का?"

अन्वयने एक प्रश्न केला होता ज्याच उत्तर त्याला माहिती नव्हत ना जगाला. आई त्याच्याकडे क्षणभर बघत राहिली तर अन्वय अजूनही आरशात बघून वेड्यासारखं हसत होता. ज्या आरशात स्वराने स्वतःला कधी बघितलं नव्हतं आता त्याच आरशात बघून तो तिला शोधू पाहत होता. ती सापडणार होती का त्याला कायम त्याच आरशात???

हीरे मोती, मैं ना चाहूँ
मैं… तो चाहूँ संगम तेरा
मैं तो तेरी.. सैयां
तू है… मेरा
सैयां…. सैयां….

तू जो, छूले, प्यार से
आराम से मर जाऊँ
आजा, चन्दा बाहों में
तुझमें ही, गुम हो जाऊँ
मैं, तेरे नाम में, खो जाऊँ
सैयां… सैयां…

मेरे दिन, खुशी से झूमें, गायें रातें
पल-पल मुझे डुबायें, जाते-जाते
तुझे जीत-जीत हारूँ
ये प्राण-प्राण वारूँ

हाय ऐसे मैं, निहारूँ
तेरी आरती उतारूँ
तेरे नाम से, जुड़े है सारे नाते
सैयां… सैयां…

बन के माला प्रेम की
तेरे तन पे झर-झर जाऊँ
बैठूँ नैया प्रीत की
संसार से तर जाऊँ
तेरे प्यार से तर जाऊँ
सैयां… सैयां…