Bhagy Dile tu Mala - 95 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ९५

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ९५


बेहद आसानीसे केह देते है लोग
तुमने हमारा वजुद छिन लिया
मैने आज आयना दिखाया उनको
और उनका अहम छिन लिया....

रात्रीची वेळ होती. अन्वय कितीतरी वेळेपासून रडत होता तर स्वरा शांत होती. अन्वयला अस बघून नक्की काय बोलावं तीच तिलाच कळत नव्हतं म्हणून ती त्याला शांत करायचा प्रयत्न करत होती पण अन्वयच्या अश्रूंचा बांध आज फुटला होता आणि आज तो काहीही केल्या थांबत नव्हता. किती वेळ गेला असेल माहिती नाही, त्याच रडन थांबल नव्हतं आणि स्वरा त्याच्या केसांवरून हात फेरत उत्तरली," अन्वय सर पुरे झालं. किती रडणार आणखी? तुम्हीच अशी हिम्मत हरून गेलात तर मी काय करू? मी कुणाकडे बघायच? प्लिज शांत व्हा ना. प्लिज माझ्यासाठी."

अन्वयच्या हुंदक्याचा आवाज आज काही कमी झाला नव्हता पण स्वराचे शब्द येताच अन्वयची नजर तिच्यावर गेली. त्याच्याप्रती असलेली काळजी तिच्या डोळ्यात त्याला दिसत होती म्हणून अन्वयने हळुवार डोळ्यातील पाणी पुसले. काही क्षण तिच्या डोळ्यात त्याने बघतच हळुवार स्वरात विचारले," स्वरा तू इथे कशी आलीस? तुला ह्या जागेबद्दल कस समजलं??"

स्वरा पटकन डोक्यावर हात मारत उत्तरली," मी तर विसरलेच की सौरभ सर तिथे एकटेच वाट बघत आहेत. त्यांनाही चिंता असेलच की तुमची. उगाच आपल्यामुळे त्यांना त्रास झालाय आणि मी त्यांना एकटीच सोडून आले."

सौरभ वाट बघत आहे हे ऐकून अन्वय स्वतःच तिच्या कुशीतून उठला. त्याने आपला पूर्ण चेहरा रुमालाने एकदा पुसुन काढला आणि चेहऱ्यावरचे भाव बदलत म्हणाला," सॉरी माझ्यामुळे सर्वाना त्रास झाला. आज पहिल्यांदा स्वतःच्या रागावर ताबा ठेवता आला नाही. रागाच्या भरात एवढं पण समजलं नाही की तुम्ही काळजी करत असणार. मी देखील माझाच विचार केला. तुम्हाला काय वाटत असणार ह्याचा क्षणभर सुद्धा मला विचार आला नाही. सॉरी!! खुप खूप सॉरी स्वरा!!"

स्वरा क्षणभर विचार करत उत्तरली," एकाच अटीवर माफ करेन."

अन्वय मिश्किल भाव चेहऱ्यावर आणत म्हणाला," कसली अट?"

स्वरा अन्वयचे केस विखरत म्हणाली," मला कायम हसणारे अन्वय सर आवडतात तेव्हा मला ते अन्वय ह्याक्षणी परत हवेत नाही तर मी इथून हलणार देखील नाही. माफ करायचं तर दूरच आणि मी बोलनार पण नाही तुमच्याशी ह्या क्षणानंतर तेव्हा तुम्ही ठरवा मला हवं ते द्यायचं की नाही ते."

स्वरा त्याच्याकडे रुसून बघत होती तर स्वराचा चेहरा बघून अन्वय सुद्धा हलकेच हसत म्हणाला," मग निघायचं आता वेडाबाई घराकडे? तो वाट बघत असेल, त्यालाही भेटू म्हणजे तो निशिंत होईल."

स्वराने त्याचा हात हलकेच आपल्या हातात घेतला आणि दोघेही कारकडे निघाले. अन्वयच्या चेहऱ्यावर आज किंचित का असेना हसू आलं म्हणून स्वरा मनातून खुश झाली होती. आज स्वरा सतत त्याच्याकडे बघत होती तर अन्वय आज तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता. हळूहळू का होईना ते समोर जाऊ लागले. अन्वयला समोर येताना बघून सौरभ जरा चिंतेतच म्हणाला," बडी आर यु ऑल राइट?"

अन्वयने त्याला घट्ट मिठी मारली आणि पुढच्याच क्षणी म्हणाला," थँक्स यार बडी!! आज तू नही होता तो मेरे स्वरा को कोई नही संभाल पाता. मै अपणे दुःखमे उसको भूलही गया पर तू हमेशा की तरहँ साथ मे है. थॅंक्यु अँड सॉरी की तुम सबको मेरे वजहसे तकलीफ हुयी. सच मे थॅंक्यु!!"

सौरभनेही मिठी घट्ट आवरत म्हटले," इट्स ओके यार. समझ सकता हु तेरी हालत. कभी ना कभी ये होगा मुझे पेहलेसेही पता था, आखीर कब तक तू शांत बैठणे वाला था. तुने इतने दिन इंतजार कर लिया वही बहोत है. चल हो गया वो हो गया, अब बहोत देर हो गयी है. किसिने कुछ खाया नही होगा. घर चल और थोडा खाले. तब जाकर स्वरा को भी चैन मिलेगा."

अन्वयने मिठी सैल केली आणि हळुवार शब्दात म्हणाला," हा ठीक है, तुझे भी देर हो रही होगी, चल निकलते है बाय. गुड नाईट. पोहोचणे के बाद मॅसेज करना याद से और सून इस बारे मे किसीं को कुछ ना पता चले."

सौरभने हसताच अन्वयला त्याच उत्तर मिळाले आणि दोघांनाही गुड नाईट विश करून तो पटकन कार घेऊन निघाला...

सौरभ निघताच अन्वयनेही कार काढली आणि हळुवार चालवू लागला. गाडी हळुवार धावत होती. गाडी चालवतानासुद्धा आज अन्वय शांतच वाटत होता. आता ना त्याच्या डोळ्यात अश्रू होते ना तो खूप भावनिक जाणवत होता. त्याने बऱ्यापैकी स्वतःलाच सावरून घेतले होते पण स्वरा मात्र स्वतःला सावरू शकत नव्हती. तिला त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे ह्याबद्दल आतुरता होती. खर तर स्वराला त्याला काहीतरी विचारायचं होत पण ती आज त्याच्याशी बोलायची हिम्मत करू शकत नव्हती. कितीतरी वेळ ती त्याच्याकडे बघत होती आणि अन्वयने हसतच म्हटले," आज मला रडताना बघितलस म्हणून प्रश्न विचारायला घाबरत आहेस ना? इट्स ओके, कधी कधी जास्त होऊन जातं तेव्हा येत रडू, आज नाही बघवल मला ते सर्व म्हणून बोलून गेलो आणि मी ठीक आहे सो काळजी नको करुस. तुला काही विचारायचं असेल तर बिनधास्त विचारू शकतेस. मी आहे सध्या ठीक सो घाबरू नकोस."

तो बोलून गेला तरीही स्वरा त्याच्याकडे बघतच होती. तिने आज अन्वयच वेगळंच रुप बघितलं होत. ज्याने कधीच आईला उलटे शब्द ऐकवले नव्हते तो आज तिला बरच काही बोलून गेला होता. त्याने तिच्या मनातलं समजून घेतलं म्हणून तिला आज फार आनंद होत होता पण आज अन्वयचे शब्द ऐकून त्यांना खूप त्रास होत असेल हेदेखील तिला जाणवत होत. त्यामुळे ती आज आनंदी नव्हती. अन्वयने तिची बाजू घेऊन, जगाच्या पलीकडे जाऊन तिची साथ तर दिली होती पण तिच्यामुळे कदाचित त्यांचं नात खराब झालं म्हणून ती पुन्हा आपल्याच विचारात हरवली होती. अन्वय गाडी चालवत होता तर स्वराच्या डोक्यात विचारचक्र सुरू होत फक्त तिने ते त्याला जाणवू दिलं नाही. तिने आपल्या ओठांवर हसू कायम ठेवल होत पण त्या हसण्यात हजारो प्रश्न होते.

स्वरा आपल्या विचारात हरवली होती म्हणून तीच लक्ष बाजूला गेलं नव्हतं. तीच लक्ष गेलं ते कार कुठेतरी थांबल्यावर. कार थांबली आणि अन्वय बाहेर निघाला. स्वराने बाहेर बघितलं तर जाणवलं की कार तिच्या आईच्या घरासमोर थांबली होती. अन्वय समोर जात होता म्हणून स्वराने पटकन उतरत विचारले," अन्वय सर इकडे का आलोत आपण? हे तर आईच घर आहे ना मग??"

अन्वयने हळुवार तिच्याकडे नजर फिरवली आणि चेहऱ्यावर गोड हसू आणत म्हणाला," कारण आजपासून आपण इथेच राहणार आहोत."

अन्वय हसत तर होता पण स्वराच्या हृदयाचे ठोके अधिक गतीने चालू लागले. तिला जी भीती होती तीच भीती ह्या एका वाक्याने पूर्ण झाली. ती त्याच्याकडे एकटक बघत होती तर अन्वयने हसतच म्हटले," इथेच उभी राहणार आहेस का चल आता. मला केव्हा एकदा बेडवर पडतोय अस झालं आहे."

अन्वय समोर-समोर जात होता तर स्वरा अगदीच शांत झाली होती, तिला काय बोलू काहीच कळत नव्हतं. अन्वयच्या नक्की मनात काय सुरू आहे ह्याबद्दल आता तिला विचार येऊ लागले होते. तो कदाचित रागात बोलून गेला असेल अस तिला वाटलं होतं पण अन्वयने बोलून तिला स्पष्ट सांगितलं की तो आता तिकडे कधीच जाणार नाही. त्याने त्याचा निर्णय घेतला होता पण आईपासून आपण त्याला तोडल हा विचार करून स्वराच मन बेचैन झालं होतं. तिला नक्की काय करावं समजत नव्हतं.

रात्रीचे १ वाजायला आले होते जेव्हा अन्वयने दारावर बेल वाजवली. पहिल्यांदा बेल वाजवली तेव्हा दार उघडल्या गेलं नाही म्हणून दुसऱ्यांदा बेल वाजवून अन्वय दार उघडण्याची वाट बघू लागला. ३ मिनिटांचा कालावधी गेला जेव्हा समोरून दार उघडल्या गेलं. दार स्वराच्या बाबांनी उघडलं होत. अन्वय- स्वराला ह्यावेळी बघून त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती म्हणून त्याने गंभीर मुद्रेने अन्वयला विचारले," जावई बापू ह्यावेळी तुम्ही इथे? काही घडलंय का? म्हणजे एवढ्या रात्री तुम्ही येत नाहीत ना म्हणून विचारलं."

त्यांचा चेहरा जरा घाबरलेला जाणवत होता म्हणून अन्वय हळूच हसत म्हणाला," बाबा आम्ही सौरभकडे गेलो होतो, तिथून यायला उशीर झाला म्हणून इकडे आलोय. काहीच झालं नाहीये. सॉरी तुमची झोप बिघडली माझ्यामुळे."

त्याच्या चेहऱ्यावरच निरागस हसू बघून स्वरा विचारातच पडली होती. काही वेळेआधी रडणारा आणि आता एकदम शांत जाणवणारा अन्वय तोच आहे का विचार येत होता. तर त्याच उत्तर ऐकून स्वराचे बाबा निशिंत झाले होते. त्यांनी त्याना बसायला सांगितले आणि स्वतः स्वराच्या आईला उठवायला बेडरूममध्ये गेले. काहीच क्षणात स्वराची आई पाण्याचा ग्लास घेऊन आल्या आणि त्यांनी अन्वयला विचारले," जावई बापू इतक्या रात्री यायचं होत आधी कळवायच ना काहीतरी जेवण बनवलं असत. हरकत नाही, मी घेते काहीतरी बनवायला."

अन्वयने पाण्याचा ग्लास घेतला आणि हळुवार हसत उत्तरला," आई माझं जेवण आटोपलं फक्त तुमच्या मुलीने काही खाल्लं नाही सो तिला बसवून खायला द्या. विसरू नका हा. सॉरी आई तुम्हाला माझ्याशी आता खूप बोलायच असेल पण मी जरा थकलोय तेव्हा काही समस्या नसेल तर मी झोपू का? खूप थकलोय आज. उद्या बोलू निवांत."

त्याच उत्तर ऐकताच स्वराने त्याला अंगावर चादर आणून दिली आणि बाकी तिघेही बेडरूममध्ये गेले. स्वराला आईला खूप काही सांगायचं होत पण ही योग्य वेळ नव्हती म्हणून ती पूढे काहीच बोलली नाही. जेवायलाही तिने नकार कळविला आणि घरातले सर्व लाइट्स क्षणात बंद झाले. अन्वय झोप येतेय म्हणून बेडवर पडला तर होता पण आज त्याला काही झोप येणार नव्हती. त्याच्याही समोर तो प्रसंग जसाच्या तसा उभा होता. एकीकडे सर्व काही गप्पपणे ऐकणारी स्वरा होती तर दुसरीकडे रागावणारा अन्वय. आज त्याने जीवापेक्षा जिवलग व्यक्तीला सुनावल होत म्हणून त्याला आज झोप लागणार नव्हती तर स्वराने तिकडे एक हसत खेळत घर कायमच तोडल म्हणून तीही जागतच होती. ही भाग्याची रात्र होती, स्वराची खरी कहाणी सांगणारी एक कथा. आज दोघेही दुखावले होते तरीही त्यावेळी त्यांना दुसऱ्याच लोकांची काळजी होती, त्यांचे विचार त्यांच्या मनाला शिवून जात होते.

कैसे कहू दर्द मुझे भी होता है
माँ तेरे लिये दिलं मेरा भी रोता है
पर भरोसा करके साथ दिया है किसिने मेरा
उसे कैसे जिंदगीसे निकालु जिसे दुनियाने ठुकराया है...

***********

ती सकाळची वेळ होती. अन्वय आज जरा उशिराच उठला होता. स्वराच्या आईला रात्रीच काहीतरी गडबड असल्याचं जाणवलं होत पण त्या काही बोलल्या नाही परंतु सकाळी त्यांनी स्वराला सर्व विचारलं आणि स्वराने एक एक शब्द त्यांना सांगितला. ते सर्व ऐकून त्या जरा विचारात पडल्या होत्या. आपला जावई आपल्या मुलीची इतकी काळीज घेतो हे बघून त्यांना फार आनंद झाला होता पण एक घर समोरून तुटणार होत हे बघून त्यांनाही स्वराप्रमाने दुःख झालं होतं. स्वरा कदाचित त्याच्याशी ह्या विषयावर बोलू शकत नव्हती म्हणून तिने आपल्या आईला सांगितलं. स्वराचे बाबा बाहेर फिरायला गेले होते. अन्वयही आताच उठून फ्रेश झाला होता म्हणून आई चहा घेऊन गेल्या. अन्वयने त्यांच्याकडून चहा घेतला आणि त्याने आपल लक्ष टीव्हीमध्ये घातलं. स्वराच्या आईला नक्की कस बोलू समजत नव्हतं पण स्वरा त्यांना बोल म्हणून इशारा करत होती. शेवटी नाईलाजाने स्वराच्या आईने हळुवार आवाजात म्हटले," जावई बापू तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का?"

अन्वय हसतच उत्तरला," स्वराने तुम्हाला बोलायला समोर केलंय वाटत. हिम्मत नाहीये तिच्यात माझ्याशी बोलण्याची म्हणून असेल."

त्याच्या आवाजाने दोघीही एकमेकांकडे आवाक होऊन बघू लागल्या. स्वराला माहिती नव्हत की अन्वय स्वराच्या मनातल सहज ओळखून घेतो तेव्हा तिने आईला आधीच सांगितलं असेल ह्याबद्दल त्याला कल्पना होती. त्यांचा गोंधळ उडाला होता आणि अन्वय हसतच उत्तरला," आई बर झालं स्वराने सर्व सांगितलं. मी स्वतःच ह्यावर तुमच्याशी बोलणार होतो आणि परवानगीची गरज नाहीये बिनधास्त बोला तुम्ही."

अन्वयने टीव्ही बंद केली आणि पूर्ण लक्ष आईवर देऊ लागला. आईही विचार करत म्हणाल्या," जावई बापू मला अभिमान आहे तुमचा. आम्हाला खरच कधी वाटलं नव्हतं की आमच्या नंतर आमच्या मुलीची इतकी काळजी कुणी घेईल त्यामुळे तुम्ही जे वागला आहात ते ऐकून खरच आनंद होतोय पण आई- वडिलांना नका हा सोडू. मान्य की स्वराच्या बाबतीत ते चुकले असतील पण तुमच्यापासून दूर राहण त्यांना जमणार नाही विशेष म्हणजे स्वरालाच ते आवडणार नाही. ती सर्व काही सहन करू शकेल पण तुम्हाला आई-वडीलांपासून दूर केलं हा आरोप ती नक्कीच सहन करू शकणार नाही."

अन्वयने नजर वळवून स्वराकडे बघितले आणि हसतच म्हणाला," स्वरा ये इथे बस."

स्वरा घाबरत-घाबरतच त्याच्याजवळ येऊन बसली आणि अन्वय स्वराचा हात हातात घेऊन म्हणाला," स्वरा मला जगाचा फरक पडत नाही पण ह्याचा अर्थ असा नाही की कुणीही माझ्या बायकोला बोलेल. हे मान्य की तू सर्व सहन करशील पण सहन करण्याला एक मर्यादा आहे. स्वरा मन त्यांचं वळविता येत ज्यांना मन असत, ज्यांना मन नाहीच त्यांचं कस वळविणार. खर तर मलाच वाईट वाटत आहे की माझे आई-बाबा तुझ्यासोबत असे वागले. स्वरा तुला वाटत असेल की मी रागात निर्णय घेतला पण अस नाहीये. त्यांना त्रास आपण तिथे राहतोय आणि रोज लोकांचं ऐकावे लागत आहे ह्याचा आहे मग मी त्यांना त्या त्रासातून मुक्त केलं. आपणच तिथे नसू तर त्यांना ते आठवणार नाही. मी दूर राहिलो तर ते माझ्या नावाने ओरडतील पण अटलिस्ट त्यांना हवं तसं आनंदाने राहतील. आपल्यामुळे त्यांना नक्किच ऐकावे लागणार नाही. स्वरा तुला आठवतय मुंबईला तुझ्यासाठी मी भांडलो होतो, खर तर मला पहिल्या दिवसापासूनच आईला बोलायच होत पण कदाचित आई आहे म्हणून शांत बसलो. स्वरा जर ती स्त्री असून एका स्त्रीच्या भावना समजून घेऊ शकत नसेल तर त्या प्रत्येक स्त्रीला मी हेच उत्तर देईल मग ती माझी आई का असेना. आई असो की कुणीही चूक ते चुकच. ती माझी आई आहे म्हणून मी इतके दिवस शांत होतो पण सहन करण्याचाही मर्यादा असते आणि ती मर्यादा आता संपली. प्रत्येकाला आपापले निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी माझा निर्णय घेतला, तिला माझ्यापासून वेगळे राहायचे आहे हा निर्णय तिचा आहे आणि मी त्या निर्णयाचा आदर करेन. उशीर झाला असेल हरकत नाहीं पण शेवटी तिला हवं ते मिळालं. आता राहील ती खुश आणि मी तुला खुश ठेवेन. तिला खुश ठेवायला तिचे जगवाले आहेत. ज्यांचा ती सतत विचार करत असते. आशा आहे ते तिची प्रत्येक क्षणी साथ निभावतील. स्वरा। आजपर्यंत मी फक्त आईमुळे शांत होतो पण आजपासून जर तुला कुणी काही बोलल ना तर त्यांचे दात तोडल्याशिवाय राहणार नाही बघच."

त्याच उत्तर येताच स्वरा शांतच झाली. तिला नक्की काय उत्तर देऊ समजतच नव्हतं. आई आणि स्वरा अन्वयला समजवायला आल्या होत्या पण इथे अन्वयने त्यांना बोलायला जागाच ठेवली नाही. त्या एकटक अन्वयकडे बघत होत्या आणि अन्वय पुन्हा म्हणाला," आई स्वरा फक्त माझी बायको नाहीये तर ती एक मनुष्य पण आहे आणि त्या मुलीसोबत जर कुणी चुकीच वागत असेल तर मग मी कुणालाच माफ करणार नाही. कुणालाच नाही. लोक काय आई पण म्हणेल की बायको साठी आईला सोडलं पण मला माहित आहे मी चुकीचा नाहीये सो मला फरक पडणार नाही. आताही तुम्हाला फरक पडेल आई, माझे घरचे, लोक काय विचार करतील त्याचा?"

स्वराच्या आई अन्वयच्या चेहऱ्यावरून हात फिरवीत म्हणाल्या," जावई बापू तुम्हाला उत्तर द्यायला माझ्याकडे शब्दच नाहीत आणि एका मुलीची आई म्हणून सांगेन की माझ्या मुलीच, आमचं नशीब आहे की आम्हाला तुमच्यासारखा जावई मिळाला. खूप अभिमान वाटतोय मला तुमचा. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यात आम्ही सहभागी असू."

त्यांचं उत्तर येताच स्वराच्या, अन्वयच्या चेहऱ्यावर क्षणात हसू आलं. अचानक गोंधळलेले चेहरे खुलून निघाले आणि अन्वय हसत म्हणाला," मग आजपासून आम्हा दोघांनाही तुमचं प्रेम हवंय. आम्हाला आता आमचं आयुष्य तुमच्यासोबत काढायचं आहे. आवडेल ना तुम्हाला आम्ही इथे राहिलेलं की जगाचा विचार येईल पुन्हा?"

स्वराच्या आई हसरा चेंहरा ठेवत म्हणाल्या," आमचं भाग्यच जावई बापू की आम्हाला इतक्या सुंदर मुलासोबत आयुष्य घालवायला मिळेल. आम्हाला खूप खूप आवडेल तुमच्यासोबत राहायला. जगाचा विचार तर आधीही केला नव्हता पण तुमच्या बोलण्याने पुन्हा एकदा हिम्मत मिळाली. मला वाटत जगाचा विचार करण्यापेक्षा मुलांचा आनंद महत्त्वाचा आणि त्यासाठी काहीही करू."

आईने होकार दिला आणि अन्वयच्या मनावरचं ओझं कमी झालं. स्वराला आता एक सेकंद पण त्रास सहन करावा लागणार नव्हता ह्या विचाराने अन्वय जरा जास्तच खुश झाला होता तर अन्वय सारख्या मुलासोबत आपली मुलगी राहतेय हे बघून आईलाही समाधान मिळालं होतं.

त्यांचं बोलणं सुरू होतच की अन्वय म्हणाला," आई मला जरा बाहेर जायचं आहे मी दुपारपर्यंत येतो. मला वेळ लागेल कदाचित."

अन्वय आईला नमस्कार करून बाहेर निघाला तर स्वरा अन्वयच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती आणि आई म्हणाली," स्वरा मानलं हा तुला. तुझी चॉइस जगातली सर्वात भारी चॉइस आहे. पूर्ण जग फिरले असते ना तरीही असा हिरा शोधून नसता आणला. मला कधीतरी वाटायचं की देवाने अस भाग्य का दिलं तुला पण आता म्हणेन की देवाने फक्त एक व्यक्ती तुझ्या आयुष्यात आणला आणि बाकी सर्व घाव क्षणात भरले. प्रत्येक आईने ना असा अन्वय नक्कीच घडवायला हवा. काय म्हणतेस स्वरा?"

स्वरा हळुवार आईचा हात हातात घेत उत्तरली," भगवान के घर देर हैं अंधेर नही. लाइफ पार्टनर भूतकाळ विसरायला लावणारा नसावा तर त्याने वर्तमान इतका सुंदर बनवावा की आपल्या आयुष्यात एखादा असा भूतकाळ होता हे ती स्वतःच विसरू शकली पाहिजे. अन्वय सर त्यातलेच आहेत म्हणून आवडीने जगाला ओरडून सांगेन की अन्वय सरांनी खऱ्या अर्थाने मला भाग्य दिले. ते नाहीत तर माझ्या जगण्याला अर्थ नाही आणि आहेत तर मग कुठलीच कमी नाही. खरच आई प्रत्येक मुलीला असा जीवनसाथी नक्किच मिळावा."

आईने स्वराच्या चेहऱ्यावरून हात फिरविला. दोघीही एकमेकांकडे क्षणभर बघत होत्या आणि पुढे त्यांना काही बोलायची गरजच उरली नाही. आयुष्यात ९९ माणसे चुकीची आली तरी जीवन बरबाद करू शकत नाही पण त्या एकाला सोडू नये जो खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी आला असतो. तो म्हणजेच तुमचं भाग्य!! तो नसेल तर कदाचित भाग्याची कहाणी सुद्धा अपूर्णच!!

बेभान सुटला तो वारा
अंगातून भीतीने वाहू लागल्या धारा
क्षणभर मरणाची भीती वाटली जेव्हा
तू येऊन माझा क्षणात हात पकडला...
भाग्य दिले तू मला...

होती हजार कारणे तुझ्याकडे
मला सोडून जाण्याची
बोलताना संपूर्ण जग
तो माझ्या बाजूने उभा होता
भाग्य दिले तू मला.....

ना पर्वा त्याला जगाची
ना खंत जिवलगाना दुखवण्याचे
हसरा चेहरा ठेवून जेव्हा तू
आधार मला दिलास
भाग्य दिले तू मला....