Bhagy Dile tu Mala - 91 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ९१

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ९१

गुंता मनाचा माझ्या
जेव्हा तू सोडविला
मी राहिले न माझी
भाग्य दिले तू मला...

मागचे चार- पाच दिवस स्वरान्वयच्या आयुष्यातले सोनेरी पर्व होते. स्वरा- अन्वय एकत्र आल्यावर प्रेम म्हणजे नक्की काय आहे हे त्यांच्या समवेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीला पटलं होत. स्वरा-अन्वय शिवाय प्रेमाची व्याख्या खरच करता येत नाही म्हणून कदाचित ते दोन नावे सुद्धा आपोआप एक झाली. " स्वरान्वय " प्रेमाची नवीन व्याख्या. त्यांनी त्यांच्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला शिकविल की प्रेम म्हणजे नक्की काय असते. चेहऱ्याची सुंदरता क्षणिक असते पण मनाने केलेल प्रेम कधीच कमी होत नाही उलट ते आणखीच वाढत जात. हे काही दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचे होते त्यामुळे स्वरान्वयने मनभरून जगले होते कारण त्यांना माहिती होत की कदाचित समोर त्यांच्या आयुष्यात येणारा कोणताही क्षण शेवटचा असू शकतो. आयुष्यात शाश्वत काहीही नसत अगदी लोकांचे विचारही नाही पण ते बदलायला कदाचित हा जन्म अपुरा पडेल हे अन्वय-स्वराला समजलं होत म्हणून दोघांचाही सोबतचा शेवटचा क्षण म्हणून ते प्रत्येक क्षण जगत होते.

ते उत्तराखंडवरून दोघेही घरी आले होते. खर तर आले होते परंतु नावालाच कारण त्या क्षणाचा गोडवा अजूनही त्यांच्या चेहऱ्यावरून उतरला नव्हता. अगदी काही मिनीटच झाले होते जेव्हा ते घरी पोहोचले. स्वरा बॅगमधील कपडे अनपॅक करत होती तर अन्वय नेहमीप्रमाणे स्वराकडे बघत होता. स्वराच त्याच्याकडे लक्ष नव्हतं पण तिला लक्ष द्यायची गरजही नव्हती कारण तिला माहिती होत की तो आताही तिच्याकडेच बघत असणार. असा एकही क्षण नव्हता जेव्हा अन्वयची नजर ह्या ५ दिवसात स्वरावरुन दूर झाली होती आणि तिचा भ्रमही गळून पडला की ती सुंदर नाहीये. ह्या काही दिवसात स्वराला पटल होत की तिच्या एवढं सुंदर दुसर कुणीच नाही. घराच्या चार भिंतीत तर कुणीही खोटी खोटी स्तुती करू शकत पण संपूर्ण जगासमोर जो तिला स्वीकारायला घाबरत नाही तोच खर्या अर्थाने सुंदरता समजतो. अन्वयने फक्त तिला आवडाव म्हणून सुंदर म्हटलं नव्हतं तर त्याने जगाला दाखवून सुद्धा दिलं होतं की ती सर्वांपेक्षा सुंदर आहे फक्त ती सुंदरता चेहऱ्यात शोधत बसू नका म्हणूनच कदाचित आज स्वरालाही ती जास्तच सुंदर वाटत होती किंवा अस म्हणू शकता की ती त्या क्षणातून अजूनही बाहेर आली नव्हती. त्याच बघनही आज तिला खूप आवडतं होत. स्वराने काही क्षण स्वतःला कंट्रोल केले आणि आपली नजर कपड्यांवरच ठेवत तिने विचारले," साहेब किती इम्प्रेस करणार आणखी? आता तर लोक पण तुमची स्तुती करायला लागले आहेत. इतकं प्रेम करणंही बर नाहीये? खर सांगू तर मी जेवढ्या वेळ तुमच्याबद्दल विचार करते ना तेवढ्याच वेळ माझी आकलन शक्ती कमी पडते आणि तुमच्याबद्दल त्यापेक्षा जास्त आदर वाढतो. प्रेम व्यक्त करताना लोकांची पर्वा नाही की कुणाच्या विचारांचा क्षणभर विचार नाही फक्त बायकोला हसवायला काहीही करू शकता. आई माझ्याशी बोलत असत्या ना तर त्यांना नक्की विचारलं असत की आई तुम्ही ह्यांना जन्म द्यायच्या वेळी काय खाल्लं होत की हे अस सुंदर व्यक्तिमत्त्व जन्माला आल."

अन्वय बऱ्याच वेळ तिच्याकडे बघून हसत होता आणि हळूच हसत उत्तरला," विचारून सांगू का?"

स्वरा हसतच उत्तरली," हो खरच विचारा. मीही तेच खाईन म्हणजे मला तुमच्यासारख समजदार बाळ होईल. मलाही एका समजूतदार मुलाची आई म्हणून मिरवून घ्यायला फार आवडेल."

तीच बोलणं होताच अन्वय बेडवरून उठत मोठ्याने म्हणाला," ए नाही हा! मला मुलगी हवी ते पण तुझ्यासारखी आणि ह्यावर मला काही वाद नको. तुझ्यासारखी एकदम गोड. रंगाने कशीही असू दे पण सर्वांच मन जिंकणारी. माझी दुसरी स्वरा. मी तुझ्यापेक्षाही तिच्यावर जास्त प्रेम करेन आधीच सांगतोय."

स्वराने हसतच विचारले," समजा नाहीच झाली तर?? सर्व माझ्या हातात थोडी आहे. मुळात ते आपल्या हातात नाहीच. मग काय स्वीकारणार नाही त्याला?"

अन्वय काही वेळ शांत बसला. तो असा कधी शांत बसत नसे म्हणून स्वराही त्याच्याकडे हसून बघत होती. काही क्षण त्याच्या इकडून, तिकडे चकरा मारून झाल्या आणि तो हसतच म्हणाला," जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ट्राय करू. ११ वी झाली तरी चालेल पण मला तर मुलगीच हवी. मला किती लाड करायचे आहे तिचे माहिती आहे तुला. आताच किती स्वप्न बघतोय तिचे मी. खूप खूप प्रेम द्यायचं आहे मला. तिचे लाड पुरवायचे आहे, तिचा हट्ट पूर्ण करायचा आहे. पाहिजे तर स्वराच. "

स्वरा जरा हसतच म्हणाली," हा मोठे आले शहाणे! एवढं सोपं आहे का ११ जन्माला घालणं..मला तर एकच पुरेस आहे मग जे होईल ते होईल. तुम्हाला काय सोपं वाटत बाळ जन्माला घालणं. तुम्ही पुरुष काय रोमांस करून मोकळे होता पण आम्हाला त्यांचं आयुष्यभर करावं लागतं. खडूस कुठले!! ११ वी झाली तरीही चालेल पण मुलगीच हवी म्हणे. जा दुसरी बायको करा मग जी तुम्हाला मुलगी देईल."

स्वरा रुसून बोलत होती तर अन्वयने पटकन तिला मागून मिठी मारत म्हटले," सॉरी!! गंमत करत होतो. आवडेल मला जे होईल ते पण त्याला तुझेच संस्कार मिळावे हा प्रयत्न मी करेन. बर बायको हा विषय निघाला आहेच तर मग करूया का त्याच्या येण्याची तयारी. इथे अडवणार पण कुणी नाहीये. म्हणशील तर आताच..."

अन्वय तिला मिठीत घट्ट पकडून होता आणि स्वराच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा लाजेचे भाव आले. त्याला तिचा मूड कसा बनवायचा हे चांगलं माहिती होत. तो अस काही वागला की मग तिला फक्त वेड लागायच बाकी असायचं. आताही काहीसं असच सुरू होत आणि स्वरा उत्तरली," हो साहेब अडवणार कुणी नाहीये पण त्यालाही काही वेळ, काळ नसतो का? आताच तर आलोत ना इतके सुंदर क्षण जगून त्याना अजून थोडं मुरून जाऊ द्या मग पुन्हा बनवू आठवणी.

अन्वय क्षणभर हस्तच उत्तरला," खर की काय? मला तर माहितीच नव्हतं. मला सतत वाटत की फक्त मलाच रोमांस सुचतो पण हे तर काही वेगळंच ऐकतोय मी. बर सांग ना तुला काय काय आवडत आणखी?"

स्वरा त्याच बोलणं ऐकून लाजलीच. आता तिच्याकडे बोलायला शब्दच नव्हते म्हणून ती हसत राहिली तर अन्वय हसतच म्हणाला," सांगा ना मॅडम? मी वाट बघतोय."

अन्वय तिला मिठीत घेऊनच होता. ती पुढच्याच क्षणी त्याच्या बाजूने वळाली आणि हसत म्हणाली," हे अस काही बोललात की शब्द नसतात माझ्याकडे बोलायला. कधी कधी इतका सुंदर नवरा भेटला म्हणून जगाला ओरडून सांगू की सतत लाजवतो म्हणून आईकडे तक्रार करू समजत नाही."

अन्वय तिच्याकडे बघतच म्हणाला," ते तू बघ पण मी आता खूप काही करू शकतो आणि अडवणार नाही आहेस तू मला."

ती क्षणभर त्याच्या बोलण्यावर हसत राहिली. तोही हसतच होता. त्याने तिला घट्ट पकडून ठेवले होते आणि हळूच कपाळावर किस करत म्हणाला," स्वरा मला बाकी काहीच नकोय फक्त मला उत्तराखंडला भेटलेली स्वरा कायम हवीय. ती अल्लड, बेजबाबदार स्वरा मला जास्त आवडेल. इतकी प्रगल्भ स्वरा मला नको कारण तिने प्रत्येक गोष्ट सहन करण मला नाही आवडणार. तुला जर कुणी काही बोलल ना तर सरळ ओरड अगदी माझ्या आईवरही पण ह्या स्वराला हरवू देऊ नकोस. प्रॉमिस हरवू देणार नाहीस ना तिला?"

तिने हळूच त्याची मिठी घट्ट केली आणि डोळे मिटत म्हणाली," कुणावर ओरडायला मला नाही आवडणार पण तुमची स्वरा तुम्हाला कायम मिळेल हे प्रॉमिस करते. मग स्थिती काहीही असो. वेळ कुठलिही असो. तुमची स्वरा तुम्हाला सदैव मिळेल प्रॉमिस."

अन्वय शांतपणे तिची मिठी अनुभवत होता. तर ती त्याची ती आश्वासक मिठी अनुभवत होती. ज्यात काळजी होती,प्रेम होतं. ती घट्ट डोळे मिटुनच होती की तिचा फोन वाजला. फोन वाजताच तिचे डोळे उघडले. तिला दुरूनच पूजाच नाव दिसलं आणि हळुवार आवाजात उत्तरली," आली कबाब मे हड्डी. ह्यांना ना आमचं सुख बघवतच नाही."

अस खर तर अन्वयने म्हणायला हवं होतं पण स्वरा म्हणतेय हे बघून क्षणभर त्याला हसायलाच आलं होतं. त्यानं हसतच तिची मिठी सैल केली आणि बेडवर जाऊन पडला तर स्वरानेही बेडवर बसून कॉल रिसिव्ह केला. समोरून पूजा म्हणाली," हाय स्वीटू. कशी आहेस?"

स्वरा क्षणभर हसत उत्तरली," आतापर्यंत तर छान होते पण आता नसेल हे माहिती आहे. तुला काय वाटत मला माहिती नाही तू का कॉल केला आहेस ते?"

पूजा जरा मोठ्याने हसतच उत्तरली," क्या बात है! चला मग घुमवून फिरवून विचारावं लागणार नाही. मी सरळ विचारते कस झालं तुमचं हनिमून? जीजूने जास्त तर त्रास दिला नाही ना? तसे ते देणार नाहीत पण सांगताही येत नाही. सांग ना काय काय केलं??"

अन्वय काय कमी होता की पूजा आता त्रास देत होती. काही क्षण तर पुन्हा सर्व तेच तिच्या डोळ्यासमोरून गेलं आणि लाजेचे भाव उफाळून वर आले होते तरीही ती काहीच बोलली नाही आणि पूजाने म्हटले," तुझं लाजन बघायला नाही तर ऐकायला फोन केलाय मी. लाजन त्यांना दाखव, मला नाही. तस पण त्यांनी बघितलंच असणार म्हणा पण मला काय काय केलं ते सर्व ऐकायचं आहे आणि बहाणा अजिबात नकोय. कळलं?? चल बोल पटकन.."

स्वरा क्षणभर स्वतःच सर्व आठवून हसू लागली. पूजा आताही स्वराच्या उत्तराची वाट बघत होती आणि स्वरा हळुवारपणे म्हणाली," नंतर सांगते, अन्वय सर समोरच आहेत."

तिने तस म्हणावं आणि अन्वय हळुवार आवाजात म्हणाला," तुम्ही बोला मी येतो. मला तस पण जायचं आहे बाहेर."

स्वरा समोर काहीच बोलायच्या आधीच त्याने पटकन तिच्या गालावर किस्सी केली आणि बाहेर पळाला. त्याच ते वागणं बघून स्वरा क्षणभर त्याच्या चेहऱ्याकडेच बघत होती. क्षणभर स्वराला पूजा कॉलवर आहे ह्याच भानसुद्धा नव्हतं. ती त्याला बघतच होती की तेवढ्यात पूजाने विचारले," कशी वाटली मग?"

स्वराने विचित्र नजरेने विचारले," काय कशी वाटली?"

पूजा अगदी हसतच म्हणाली," किस्सी ग. जीजूने दिली ना तुला आताच. तेच विचारतेय, गोड होती ना?"

तिच्याशी बोलायला अगदी सुरुवातच केली होती आणि स्वराचा चेहरा पुन्हा एकदा खुलुन निघाला. स्वरा गोड आवाजात उत्तरली," तू पण ना काहीही बोलतेस. तुला माहिती आहे त्याच उत्तर मग विचारून का छळतेस मला. आधीच त्यांनी काय कमी त्रास दिलाय. एक क्षण असा नव्हता जेव्हा मी लाजले नाही आणि आता तू. किती छडनार आहात बर मला आणखी?"

स्वरा अजूनही लाजतच होती आणि पूजाने पटकन म्हटले," माहिती तर तस सर्वच आहे पण तुझ्या तोंडून ऐकण्याची मज्जाच वेगळी. तशी पण जीजूनंतर तुझी खेचण्याचा अधिकार मलाच आहे. जस्ट फॉरगेट ईट. विषय भटकवू नको. आधी लाजन बाजूला ठेव आणि पहिल्या दिवसापासून काय काय घडलं ते मला सांग. मी वाट बघतेय."

स्वरा क्षणभर तिच्यावर हसली. तिला नक्की कुठून सुरुवात करू काहीच समजत नव्हतं. आठवायला गेलं की अंगावर शहारा यायचा ती एक भीती आणि सांगितलं नाही तर पूजा अशीच छळत राहिली ही वेगळी भीती त्यामुळे तिने काही क्षण लाजेचे भाव दूर ठेवले आणि पुढचे १५-२० मिनिट ती तिला प्रत्येक गोष्ट सांगत होती. पूजाला सर्व सांगत असतानाही स्वराच्या चेहेऱ्यावर सतत हसू होत हे पूजाला जाणवलं होत पण ती ऐकण्यात इतकी तल्लीन झाली होती की तिने मधात तिला चिडवले नव्हते. स्वराने सर्व सांगितलं आणि पूजा हसतच उत्तरली," बापरे हा काय रोमांस? मी विचार करत होते त्यापेक्षा जास्तच आहे. मला तर विचार करूनच हसू येतंय तुझी काय स्थिती असेल त्यावेळी. लाजून लाजून जीवच गेला असेल तुझा."

स्वरा आताही लाजतच उत्तरली," हो ना!! बायकांना नवरा रोमांस करत नाही त्याचा त्रास आहे आणि मला जास्त करतो त्याचा."

तीच उत्तर येताच पूजाने हसत विचारले," नक्की त्रास आहे ना की तुलाही सतत हवा असतो तो त्यांचा स्वभाव. तुझं लाजन मला देत आहे बर उत्तर. खर आहे ना तुला आवडतो ना त्यांचा हा स्वभाव खूप?"

स्वरा काही क्षण शांतच झाली. तिला काय बोलू सुचतच नव्हतं. चेहऱ्यावर लाजेचे भाव आणि ती हळूच हसत म्हणाली," गप ग! आधीच किती छळल आहे त्यांनी आता तू नको सुरू होऊस. गाल हसून हसून दुखायला लागलेत माहिती आहे तुला. आता पण आठवून शहारा येतोय अंगावर. मी त्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करतेय आणि तू पुन्हा मला तिथेच घेऊन जात आहेस. मूर्ख कुठली!!"

पूजा क्षणभर हसत उत्तरली," मग दुखू दे त्यांच्या प्रेमाची निशाणी आताच उमटली चेहऱ्यावर आणि आज दिवसभर पण उमटणार आहे. आता कुठे सुटका होणार आहे मॅडम तुमची, ही तर सुरुवात आहे फक्त. अजून तर पूर्ण रात्र बाकी आहे. तुला काय वाटत सोडतील ते?"

स्वरा हसली पण ह्यावेळी मॅडमकडे बोलायला काहीच नव्हतं आणि बोलली असती तर पूजाने आणखीच खेचली असती म्हणून स्वराने शांतच बसने पसंद केले होते. पूजानेही आता आपलं हसू नाहीस केलं आणि जरा सिरीयस होत उत्तरली," बाकी सर्व ठीक आहे स्वरा पण मला कधीच वाटलं नव्हतं की तू जाण्याच बोलशील आणि सर रागवायच्या ऐवजी तुला इतकं भन्नाट उत्तर देतील. हिम्मत लागते ग आपल्याच खास व्यक्तीला आपल्यापासून दूर जाऊ द्यायला म्हणून ते उत्तर कदाचित माझ्यासाठी खास आहे. स्वरा, खर सांगू मला नाही माहिती की तुला तिथे किती त्रास होत असेल पण इतकं सांगू शकते की तू त्यांच्याशी लग्न करून खूप सुंदर निर्णय घेतलास. आयुष्यात अन्वयसारखे लोक राहिले तर प्रेम किती पवित्र होत जाईल ना?"

स्वरा हळुवार आवाजात उत्तरली," हो मग कदाचित कुठल्याच मुलीवर ऍसिड अटॅक सुद्धा होणार नाही आणि प्रेम सुद्धा बदनाम होणार नाही. हा एक क्षण प्रेमाला किती बदनाम करतो ना?"

पूजा शांत स्वरात उत्तरली," हो माहिती आहे पण अन्वय सरासारखे लोक पुन्हा प्रेमाला जिवंत करतात. ते सांगतात प्रेम नक्की काय असत. त्यांना फरक पडत नाही वय, वजन आणि रंगाने विशेष म्हणजे दुराव्याने. ते तर आपल्या खास व्यक्तीला मिळवून सुद्धा जाण्याची परवानगी देतात तर इकडे फक्त नकार मिळाला म्हणून ऍसिड अटॅक करतात. किती सुंदर मन आहे ना त्यांच्याकडे? नक्की मन आहे ना कारण त्यालाही मर्यादा असतात पण सर तर प्रत्येक गोष्ट हसून स्वीकारतात. तुला जगाकडून होणारा त्रास असो की घरच्यांचे बोलणे. ते सर्व हसून हसून सहन करतात. काय आहेत ते? कुठून आणतात इतकी सहनशीलता?"

स्वरा हसतच उत्तरली," मीही त्याचच उत्तर शोधतेय. मी सहन करतेय कारण माझ्यावर तशी वेळ आली आहे पण त्यांच्याशी ह्याच काही घेणं देणं नसतानाही त्यांनी माझं दुःख स्वतःच बनवून घेतलं. खरच एक व्यक्ती म्हणून मानलं पाहिजे त्यांना. पूजा आपण मूर्तींना पूजतो पण माझ्यासाठी देव म्हणजे अन्वय सर. जर माणसात देव कुठे असेल तर त्यातले एक अन्वय सर आहेत हे नक्किच आवडीने सांगेल."

तीच एक वाक्य आणि दोघेही काही क्षण शांत. स्वराला समजलं तिच्याकडे काहीच उत्तर नाही म्हणून तीच म्हणाली," खर सांगू मला स्वार्थी व्हायला आवडत नाही पण अन्वय सरांचा विचार करते तेव्हा स्वार्थी झाले नसते तर स्वतःवर रागावले असते. इतकं प्रेम खरंच मला अनुभवायला मिळालं नसत. आता त्रास होतोय पण त्यापेक्षा जास्त मज्जा त्यांचं प्रेम अनुभवण्यात आहे पूजा हे आवडीने सांगेन. नाही माहिती पूजा उद्या काय होईल आमच्या आयुष्यात पण हे प्रत्येक क्षण मला मनात साठवून घ्यायचे आहेत मग मला कुणाकडून काहीच नकोय. हसत-हसत देवाघरी जाईन मी. बघू पुढे काय होतंय तर?"

काही क्षण दोघेही शांत होते आणि पूजा शांत स्वरात उत्तरली," मलाही बघायच आहे देव प्रेमाला हरवतो की जिंकवतो ते. हरवल तुम्हाला तरी त्याला म्हणेन मी की नशीब लिहिणारा तू सुद्धा हरलास त्यांच्या प्रेमासमोर. अस प्रेम केलं त्यांनी. तुला तरी जमणार आहे का त्यांच्या एवढं प्रेम करायला? मी पक्क सांगते की देव सुद्धा हा प्रश्न ऐकून शांत बसेल कारण नाही जमणार त्याला अस प्रेम करायला. हॅट्स ऑफ टू बोथ!! आजच्या काळात जिथे प्रेम फक्त सेक्स साठी केलं जातं त्या काळात तुम्ही प्रेमाचा खरा अर्थ शिकवीत आहात. प्राउड ऑफ यु डिअर!!"

स्वराच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होत तर पूजाचीही सेम स्थिती होती. कधी कधी आयुष्यात एखाद्या बद्दल बोलायला शब्द कमी पडतात. त्यातलाच एक अन्वय. फार कमी आहेत तसे लोक पण आहेत म्हणूनच हे जग सुरू आहे.

पूजाने फोन ठेवला आणि स्वरा पुन्हा कपडे अनपॅक करू लागली. तिलाही जवळपास तासभर लागला होता सर्व काम करायला. तीच काम आटोपलच होत की तो बाहेरून आला. काही क्षण तो बेडवर पडला आणि हळूच हसत त्याने विचारले," मग काय म्हणे कबाब मे हड्डी?"

स्वरा क्षणभर त्याच्या बोलण्यावर हसली आणि मनातले भाव लपवत म्हणाली," तुम्हाला का सांगू, आमचं सिक्रेट आहे ते."

स्वरा त्याच्याकडे बघून हसत होती आणि अन्वय हसतच उत्तरला," ह्यात काय सिक्रेट? विचारलं असणार काय काय केलं, कुठे कुठे फिरले तेव्हाच तर मी समोर होतो तेव्हा बोलणं शक्य झालं नाही. मला अंदाज आहे काय बोलणं झालं असेल तुमच्यात तर ठेव सिक्रेट तुझ्या जवळ. मोठी आली सिक्रेट आहे म्हणणारी.

त्याच वाक्य येताच स्वरा क्षणभर हसू लागली. अन्वय क्षणात तिच्या मिठीत शिरला आणि हसतच उत्तरला," खर तर मलाही सौरभ, विराज हेच विचारत होते. कस बस सोडवून आलोय स्वतःला म्हणून मला समजल की तुमच्यात काय बोलणं झालं असेल. कस सांगायचं बर त्यांना? मूर्ख कुठले. समजत नाही का त्यांना आपले क्षण आहेत हे, त्याना कसे सांगणार?"

स्वरा त्याच बोलणं ऐकून क्षणभर हसतच होती. आज तिचा बोलायचा मूड नव्हता, आज त्याच ऐकण्यात तिला समाधान मिळत होत. तो हसून बोलत होता तर ती फक्त त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती. काही क्षण असेच गेले. थोडाथोडा बोलणारा अन्वय आता शांत झाला म्हणून तिने त्याच्याकडे नीट बघितले. तो शांतपणे झोपी गेला होता आणि स्वराने त्याच्या कपाळावर किस करत म्हटले," वेडोबा माझे!! आयुष्यात सर्वात सुंदर गिफ्ट दिलय मला देवाने तुमच्या रुपात. असा नवरा ना प्रत्येक मुलीला भेटावा. जो विना बोलताही तिच्या मनातलं ओळखून घेईल. तिच्या मनात लपलेल्या स्वप्नांना स्वतःच जाणून पूर्ण करणारा, तिने हसावं म्हणून सतत मस्ती करणारा आणि मला त्रास होतो म्हणून स्वतःला त्रास करून घेणारा. मिळेल का रे देवा असा दुसरा?"

ती क्षणभर हसत पुन्हा स्वतःच म्हणाली," मला नाही वाटत पुन्हा असा बनवशील तू. एकमेव पिस बनवला आहेस असा अस वाटत मला. पण गरज आहे रे असे पिस बनविण्याची तेव्हा आता मला काही नाही दिलंस तरीही चालेल पण प्रत्येक मुलीला असा अन्वय नक्की दे म्हणजे तिचा प्रेमावरचा,लग्नावरचा, नात्यावरचा विश्वास उडणार नाही. नक्की दे हा देवा आणि बर का आजपर्यंत तुला खूप ओरडले ना मी की का माझ्या आयुष्यात इतका त्रास दिलास? तर आता मीच म्हणते, देवा भाग्य दिले तू मला. अन्वयच्या रूपाने खऱ्या अर्थाने भाग्य दिलेस. आता मी कधीही तुझ्याकडे आले ना तर शामची मीरा बनून तुझी सेवा करेन पण हे खरं की माझ्यावर तुझा अधिकार असणार नाही. माझ्यावर फक्त अन्वयचा अधिकार असेल."

ती देवाशी बोलत होती. तो तिला दिसत नव्हता पण ती त्याला फिल करत होती. अन्वय शांत झोपला होता पण एक वाक्य अजूनही त्या रूममध्ये दरवळत होत. " भाग्य दिले तू मला.." नक्की कुणी दिलं होतं देवाने की देवानेच बनवलेल्या पुरुष जातीमधील एका सर्वोत्तम पुरुषाने?

पण हे सत्य होत की अन्वयने तिला जगायला शिकविल होत, तिला वेगळं स्थान दिल होत आणि त्याच्या वागण्यात, बोलण्यात एकदाही त्याबद्दल अंश नव्हता. काय असेल अन्वय हे स्वरा पेक्षा कुणी सांगूही शकत नव्हत. ती त्याच्याकडे बघत होती आणि त्याच्या सुंदर हसूमध्ये विरघळून गेली. हे तेच हसू होत जे दोघांनाही एकमेकांसोबत राहायला हिम्मत देत होते. त्यांना बघितलं तर नक्कीच वाटत, इतकंही कठीण नाही आयुष्य फक्त जगायची हिम्मत आपल्यात असायला हवी...

मी कुरूपतेचे प्रतीक
तुझ्या नजरेने सुंदर बनविले
लोकांची पर्वा नाहीं ज्याला
तो तूच, भाग्य दिले तू मला...

कहाणी तुझ्या साथीची
सांगेन सर्व जगाला
तू आहेस माझा आणि मी तुझी
भाग्य दिले तू मला...