Bhagy Dile tu Mala - 89 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ८९

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ८९

कुछ पल मुझे लगा
ये दुनिया ठेहर जाये
हो संग तेरे युही जिंदगी
क्यू ना खुदका ऐसा सुंदर शहर बनाया जाये...

ती सकाळची वेळ. आजूबाजूला पहाडच पहाड, निसर्गाच सुंदर रूप खुलून आलं होतं. बोचरीही थंडी जाणवू लागली होती आणि स्वरा दुर्गा माते समोर नतमस्तक झाली होती. ती खूप दिवसाने अशी शांत जाणवत होती म्हणून आजही अन्वयची नजर मूर्तीवर नसून स्वराच्या चेहऱ्यावर होती. कदाचित अन्वयनेही तिला ह्याआधी अस कधीच बघितलं नव्हतं म्हणून तो शांतपणे तिला बघत होता. अगदी काही मिनिटे स्वरा तशीच उभी होती आणि अचानक तिने डोळे उघडले. अन्वय आताही तिच्याकडे बघत होता म्हणून तिने हळूच रागावत त्याला म्हटले," अन्वय सर कमीत कमी आज तरी त्या मूर्तीकडे बघा. सतत माझ्याकडेच काय बघायच? देवासमोर पण असच करणार आहात का?? इथे तरी लज्जा बाळगा. मान्य की लोकांशी तुमचं काही घेणं देणं नाही पण देवासमोर पण असच वागणार??"

तीच बोलणं ऐकताच अन्वयने दोन्ही हात जोडून मूर्तीला प्रणाम केले आणि बाहेर जाऊ लागला. स्वराही त्याच्या मागे मागे बाहेर जाऊ लागली आणि तिने शांतपणे त्याला बघत म्हटले," बोला. मी काय म्हणते आहे. देवासमोरही काहीच वाटत नाही तुम्हाला, देव कोपला तर??"

अन्वयने हसतच क्षणभर तिच्याकडे बघितले आणि हळुवार स्वरात म्हणाला," देवीने मागण्यासाठी काहीच ठेवलं नाही. एक तर तुला आयुष्यभरासाठी दिलं आणि इतके दिवस जे हसू, जी शांतता तुझ्या चेहऱ्यावर दिसत नव्हती तीही येताच मिळाली म्हणून तुझ्याकडेच बघत आहे. तशी पण देवी काही रागावणार नाहीये, बायकोवर जास्त प्रेम करतो म्हणून उलट तथास्तु म्हणेल ती तुझ्यावर एवढं प्रेम करण्यासाठी. ती लोकांच्या वाईट वागण्यावर कोपते, बायकोवर प्रेम करणार्यांवर का रागावेल बर उलट तिला आनंदच झाला असेल, तुझ्या सतत मागे मागे राहतो म्हणून. देवीलाही वाटलं असेलना कधी की देवाने तिच्या मागे मागे राहावं.."

स्वरा क्षणभर त्याच्यावर हसत म्हणाली," अन्वय सर तुम्ही अशक्य आहात. अगदी अशक्य!! क्षणभर ना मी विसरतेच की तुमच्याकडे माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असत आणि मी पुन्हा मूर्ख बनून तुम्हाला प्रश्न विचारते. तुम्ही आणि तुमची उत्तर ह्याच समाधान माझ्याकडे ह्या जन्मात तर नाही."

अन्वयही हसतच उत्तरला," हा ते खरं आहे तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे म्हणून तर बायको आहेस ना माझी. नाही तर ही मुलगी मला पटली असती अस अजिबात वाटत नाही बाबा. तुझे प्रश्न सोडवता सोडवता माझी झालीस, नाही तर आज पण मला तुझी वाट बघावी लागली असती मॅडम. खर सांगू ना हे प्रश्नच माझी चावी आहेत तुझ्याजवळ येण्याची. म्हणून ही प्रश्न आणि त्यांची उत्तर ही खूप खास आहेत बाबा माझ्यासाठी. लोकांना त्रास वाटेल पण मला तर ह्या प्रश्नामुळेच मिळाली आहेस तू. मग एवढे नवस करून तू मिळाली आहेस तर का बघू नये तुला? मग देवीसमोर तर देवीसमोर मला फरक पडत नाही. तुला नाही आवडत मी बघितलेलं?? "

त्याच बोलणं येताच तिच्या चेहऱ्यावर अचानक लाजेचे भाव पसरले आणि स्वरा हलकेच आवाजात म्हणाली," तुम्ही ना एक संधी सोडत नाही मला लाजवायची. आता इथेही मला त्रास देणार आहात का? चला आता, नाही तर इथले लोक पण विचारतील माझ्या लाजण्याच कारण. आई, माही तर सोडत नाही आता हे लोक पण सोडणार नाहीत..तुम्ही ना वेड बनविल आहे मला तुमच्या प्रेमात म्हणून अशी वागते मी."

अन्वयने हसतच उत्तर दिले," सांग मग नवरा प्रेम करतो खूप माझा आणि तस पण फक्त नवराच प्रेम करतो म्हणावं माझ्यावर, मी नाही करत त्याच्यावर. तेव्हाच तर एक आय लव्ह यु म्हटलं नाहीस आजपर्यंत. खडूस कुठली!!"

स्वरा त्याच्या चेहऱ्याकडे बघून क्षणभर हसतच होती पण तिने काहीच उत्तर दिले नाही तर अन्वय आजूबाजूच वातावरण बघत समोर चालत होता. त्याच आता तिच्याकडे लक्ष नव्हतं आणि स्वराने हक्काने त्याचा हात पकडून घेतला. अन्वयला तो सुखद धक्का होता त्यामुळे त्याने क्षणाचा विलंब न करता तिचाही हात पकडला. ते चालत होते आणि पुन्हा त्यांना एकदा जगाची चिंता नव्हती. लोक काय म्हणतील हा प्रश्न तर त्यांनी प्रवास सुरु करण्या आधीच काढून फेकला होता म्हणून त्यांना ह्या प्रश्नाने कधीच फरक पडत नव्हता त्यामुळे आज सकाळपासूनच स्वराच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज जाणवत होतं त्यामुळे तो तिला कुठेतरी बाहेर घेऊन आलाय ह्याच समाधन त्याला मिळत होत.

ती एक मनमोहक सकाळ होती. सूर्य पहाडातून नुकताच वर आलेला. पाऊस नुकताच ओसरला होता त्यामुळे अन्वयने बाहेर जायचा प्लॅन केला. गेले काही महिने स्वरा- अन्वयच आयुष्य अगदीच अडथळ्यांनी भरलं होत. त्यांना सुख मिळत होते पण तेही मोजून मोजून. दिवसही जात होते पण स्वराला अजूनही कुणीच स्वीकारलं नव्हतं किंबहुना तिला प्रत्येक क्षणी त्रासच मिळाला होता तरीही अन्वयच्या साथीने तिने जवळपास संघर्षमय ६ महिने पूर्ण केले होते. ह्या ६ महिन्यात त्यांनी बरेच चढ- उतार बघितले होते. आयुष्य अगदीच आव्हानांनी भरलं होत त्यामुळे तिला त्यातून थोडा ब्रेक मिळावा म्हणून तो तिला बाहेर घेऊन आला होता.

भीमताल... निसर्गाच्या कुशीत वसलेली एक सुंदर जागा. उत्तराखंड देवभूमी असल्याने मंदिराची इथे काहीच कमी नाही. अगदी मानसिक शांतता देण्याचं काम ते करतात म्हणूनच अन्वय तिला इथे घेऊन आला होता आणि त्याचा उद्देश देखील सफल झाला. ते चालतच होते की स्वराला वाटेवरून चालताना काही बदके दिसली. त्या बदकांच्या मागे काही लहान मुले धावत होती आणि त्या लहान मुलांच खळखळून हसन बघून स्वराच्याही चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल. तीच हसू बघताच अन्वयने तिला विचारलं," घ्यायच आहे त्यांना हातात?"

स्वराच्या चेहऱ्यावर हसू बघता त्याला उत्तराची गरज पडली नाही आणि तो हसतच म्हणाला," जा मग पकड. वाट कसली बघत आहेस. तुला इथे कसलच बंधन नाही. जगाच कधीच नव्हतं, आता घरच्यांचं पण नाही तेव्हा मनभरून जग हे क्षण.."

स्वरा आता जरा उदास चेहरा करत म्हणाली," ते ठीक आहे हो पण मला चोच मारतील ना ते मग कस पकडायच बर त्यांना?"

तिचा निरागस चेहरा बघून अन्वय एकदम गोड हसू चेहऱ्यावर आणत उत्तरला," बापरे माझी झाशीची राणी घाबरली वाटत. कुणालाही न घाबरणारी चक्क पक्षांना घाबरली विश्वास बसत नाहीये. अरेरे!! "

तो तिची खेचत होता आणि स्वरा त्याला धपाटे घालू लागली. काही क्षण मारून झाल्यावर तिने म्हटले," तुम्ही खेचताय ना माझी इथे पण. घरी आईसोबत मिळून खेचता आणि इथेही तेच करत आहात. माझी मदत करावी ते नाही तर तुम्हाला माझी खेचण्यात जास्त मज्जा येते ना? खेचा मग. जा मी बोलणारच नाही आता."

तिने त्याचा हात सोडला आणि दूर जाऊ लागली पण त्याने पटकन तिचा हात पकडून पुन्हा तिला ओढले आणि हसतच म्हणाला," मॅडम पक्षी, प्राणी प्रेमाची भाषा समजतात माणसांना समजत नसली तरीही. मानस चेहऱ्यात भेद करतात, रंगात भेद करतात, प्राणी पक्षी नाही. पकड त्यांना आणि प्रेमाने स्पर्श कर. तुला सोडणारच नाही ते. प्रयत्न तर करून बघ कदाचित तुझ्याही प्रेमात पडतील ते, जसा मी पडलोय.."

त्याच एक उत्तर आणि स्वराचा रुसवा क्षणात गायब. तिने हळूच त्याच्याकडे हसून बघितले. हळुवार हात सोडला आणि त्या बदकांच्या मागे जाऊ लागली. ते बदक समोर समोर जात होते आणि स्वरा मागे मागे. तिला त्यांना पकडताना मज्जा येत होती आणि अन्वय तिच्याकडे बघून हसत होता. स्वरा त्यांच्या मागे धावत तर होती पण तिला काही ते मिळाले नाही वरून अन्वय आपल्यावर हसतोय म्हणून स्वराने म्हटले," तुम्ही काय हसताय, या पकडू लागा. नाही तर आज माझे धपाटे खाणार. हसू नका, चला कामाला लागा."

अन्वय हसतच तिच्याकडे गेला. त्याच्या हातात खायची काहीतरी वस्तू होती. ती त्याने हातात ठेवली आणि खाली निवांत बसला. त्याच्या हातात ती वस्तू बघताच बदक पटकन ती वस्तू खायला आले. त्याने बदकाला ती वस्तू खाऊ दिली आणि त्याना कोमल हाताने स्पर्श करू लागला. त्याचा स्पर्श होताच त्यातील एका बदकानेही त्याला स्वतःला हातात घेण्याची परवानगी दिली. अन्वय त्याला प्रेमाने कुरवाळतच होता की स्वराने हळुवार त्याच्या हातातून बदकाला घेत म्हटले," स्मार्ट मूव्ह हा सर. मला कस सुचल नाही. मला वाटलं होतं तुम्ही फक्त माणसांना प्रेमात पाडता पण इथे तर पक्षी पण फॅन आहेत तुमचे. कसं जमत तुम्हाला काय माहिती? म्हणूनच हे वेडेपण सुद्धा मला आवडत बघा जगाने काहीही म्हटलं तरीही!!"

ती बोलून गेली तर अन्वय तिच्या बोलण्यावर सतत मिश्किल हसत होता. ती आज इतकं गोड बोलत होती की त्याची नजर एकदाही तिच्यावरून दूर झाली नाही. तो तिला बघत होता तर ती त्या बदकासोबत खेळत होती. त्याच्या अंगावरून हात फिरवत होती. त्याच्या कोमल स्पर्श आपल्या गालांना करत होती आणि अन्वयने हसतच विचारले," मी कुणाला प्रेमात पाडल बर?"

स्वरा त्या बडकाला किस्सी करत म्हणाली," मला नाही का पाडल? आता तर इतकी प्रेमात पडले की तुमच्या शिवाय दुसर काही दिसत नाही. मीरा भक्त बनली आहे सध्या कृष्णाची. जादू आहे बाबा तुमच्या शब्दात आणि स्पर्शातही. वेड लावतात सर्वाना. मला इतकं लावलं की सर्व लग्न करून मोकळं झाले. मागचा पुढचा विचार न करता. तुमच्या प्रेयसी जळतात तेव्हा हसू येत मला आणि अभिमान पण वाटत की मी ह्या कृष्णाच्या प्रेमात पडले, आधी राधा बनून प्रेम अनुभवलं आणि आता रुक्मिणी बनून बायकोप्रति असलेली प्रेम, काळजी अनुभवतेय."

आज खूप दिवसाने स्वराचा अल्लडपणा बाहेर आला होता. अन्वयने बदकाना जे खायला दिलं होतं ते तिने त्याच्या हातातून हिसकावून घेतलं आणि बदक निवांत खाऊ लागला. स्वरा किती वेळ तरी त्या बदकासोबत खेळत होती आणि अन्वय तिच्या निरागसपनाकडे बघून हसत होता. क्षणभर त्याला तिचा हेवाच वाटला. इतकी प्रगल्भ असतानाही तिने आपल्यातल्या त्या चंचल, खेळकर स्वराला हरवू दिले नव्हते त्यामुळे कदाचित त्याची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. ती बदकासोबत खेळण्यात व्यस्त होती आणि अन्वय तिला बघण्यात व्यस्त होता. काहीच क्षण गेले आणि स्वराच्या हातची ती वस्तू संपली. स्वरा काय करणार म्हणून बघत होता आणि स्वरा अगदी गोड आवाजात उत्तरली," संपा यार..."

तिचा तो गोड आणि तो क्युट आवाज ऐकून अन्वय क्षणभर स्वतःला हसण्यापासून थांबवू शकला नाही. तो काही क्षण वेड्यासारखं हसत होता आणि स्वराने विचारले," कशाला हसत आहात?"

अन्वयने तिला काही उत्तर दिले नाही पण मनातल्या मनात म्हणाला," क्युटनेस ओवरलोडेड मॅडम!! किती ही निरागसता!! आता सांग बर तुला बघून मी पुन्हा पुन्हा प्रेमात पडणार नाही का? पुन्हा वरून विचारतेस की माझ्याकडे पाहण्यासारख काय आहे? तुझी सुंदरता फक्त मला माहीत आहे. जी मला तुझ्यापासून दूर जाऊ देत नाही. हाऊ क्युट यु आर!! लव्ह यु मॅडम, लव्ह यु सो मच!!"

तो वेड्यासारखं हसत होता आणि स्वरा त्याच्याकडे दुर्लक्ष करत उत्तरली," अन्वय सर आपण ह्याला घरी घेऊन जाऊया का?"

तिचा प्रश्न ऐकताच अन्वय जरा शांत होत म्हणाला," स्वरा बॅड मॅनर्स!! पक्षी ह्या सुंदर वातावरणातच मस्त दिसतात. त्यांना निवांत जगू दे. तुला माहिती आहे ना कुणाला बंदिस्त करण्याचा त्रास?"

तिने क्षणभर त्याच्याकडे कुतूहलाने बघितले आणि त्या बदकाला सोडून दिले. तो बदक चिवचिव आवाज करत इतर बदकामध्ये गेला आणि काहीच क्षणात पसार झाला. त्या बदकासोबत खेळताना अन्वयला खरी स्वरा दिसली होती, जी कदाचित जगाशी संघर्ष करता करता हरवली होती त्यामुळे आज त्याची नजर सतत तिच्यावरच फिरत होती.

काही क्षण गेले. दोघेही समोर-समोर चालत होते. कुणी कुणाशीच बोलत नव्हतं कारण आजूबाजूच वातावरणच इतकं सुंदर होत की ते त्यातच हरवून गेले होते शिवाय बाजूला बोटिंग करायला लेक होती. अन्वय त्या लेककडे बघत चालला होता की स्वरा ओरडत म्हणाली," अय्या पॅराग्लायडिंग!!"

तिच्या आवाजाने त्याच लक्ष समोर गेलं. तो बघतच होता की ती पुन्हा उत्तरली," अन्वय सर चला ना करू. माझी खूप इच्छा आहे. अस आकाशात उडायला आणि खालच सर्व बघायला मस्त वाटत. वरून खालच जग बघण्याची मज्जाच वेगळी. निवांत आकाशात उडन किती भारी वाटत!!"

स्वरा त्याच्याकडे हसून बघत होती तर तो हसतच म्हणाला," सॉरी स्वरा पण मला उंचीवर चक्कर येते. मला नाही जमणार. सॉरी!!"

ती आता चेहरा पाडतच उत्तरली," मग मी पण नको जाऊ का?"

तिचा तो क्युट चेहरा बघून अन्वय क्षणभर हसलाच आणि पुढच्याच क्षणी म्हणाला," मी अस म्हटलं का वेडाबाई!! इथे तुला आवडेल ते करू शकतेस. जा उड आणि मनमोकळ जग."

त्याने म्हणावं आणि ती त्याचा हात पकडून धावू लागली. ह्याआधी त्याला तिच्यामध्ये इतका उत्साह कधीच दिसला नव्हता. तिने त्याचा हात पकडतच तिथे नेले आणि उडण्यासाठी तयारी करू लागली. पॅराग्लायडिंग करवणारा तिच्या सुरक्षेतची तयारी करत होता आणि अन्वय हळूच पण गमतीच्या स्वरात उत्तरला," भैय्या जरा संभाल के. ये एकही पिस है मेरे पास और दुसरा धुंडनेसेभी नही मिलेगा.."

त्याच्या शब्दाने स्वरा आणि तो व्यक्ती दोघेही क्षणभर हसतच होते. फायनली सेफटी वर्क पूर्ण झालं आणि स्वराने पुन्हा एकदा विचारलं," पक्का ना तुम्ही येणार नाही? पुन्हा विचारतेय नाही तर म्हणाल स्वार्थी एकटीच गेली.."

अन्वयने तिला नजरेनेच मनाई केली आणि स्वरा क्षणात आकाशात झेपावली. कायम अगदीच शांत राहणारी ती आकाशात झेपावताच मोठ्याने ओरडू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज अगदी सर्वाना जात होता तरीही तिच्यातला उत्साह कमी झाला नव्हता. ती उडाली आणि वरूनच अन्वयला हात दाखवू लागली. तिचा तो अल्लडपणा बघून आज अन्वयलाही राहवलं नाही आणि अगदीच फोटोची आवड नसणारा अन्वय तिचे कितीतरी फोटो काढत होता. तीच ते ओरडन असो की मग दिलखुलास हसन. तो तिची प्रत्येक हालचाल कॅमेरामध्ये टिपत होता. स्वरा आकाशात झेपावत होती आणि अन्वय तिचा प्रत्येक क्षण कॅमेरामध्ये टिपत राहिला. तिचा चेहरा आज इतका खुलला होता की त्याला लोकाना हवी त्या सुंदरतेची गरजही नव्हती.

अगदी कितीतरी वेळ ती आकाशात घिरट्या घालत होती आणि बऱ्याच वेळानंतर खाली उतरली. ती खाली उतरली तरीही तिचा उत्साह कमी झाला नव्हता. तिने उतरताच अन्वयकडे धाव घेतली आणि त्याच्या जवळ जात म्हणाली," थॅंक्यु अन्वय सर! इतक्या सुंदर स्थळी आणल्याबद्दल. आज कितीतरी दिवसाने मी हे सर्व अनुभवते आहे. प्रगल्भता दाखवता-दाखवता मी स्वतःला केव्हा हरवून बसले कळलंच नाही पण पुन्हा एकदा तुम्ही मला हसविल. मला माझ्यातली मी शोधायला मदत केली. आय लव.."

ती बोलता- बोलता थांबली आणि अन्वयने शॉक होत विचारले," काय म्हणालात मॅडम आपण? बोला बोला.."

तो तिच्याकडे हसून बघत होता आणि स्वरा जरा नजर खाली करत म्हणाली," आय लव्ह फूड्स आणि आता ओरडून ओरडून माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले आहेत सो जेवायला चला. उगाच डोक्यात काहीही विचार करू नका. माहिती आहे तुम्ही खिचडी पकवण्यात एक्स्पर्ट आहात."

अन्वय क्षणभर हसतच म्हणाला," नौटंकी!! ओठावर आलं होतं पण म्हटलं नाहीस ना? तुला आवडत ना माझा छळ करायला?"

स्वरा त्याच बोलणं ऐकून क्षणभर हसतच होती तर अन्वय उदास झाला होता. त्याचा रुसलेला चेहरा बघून तर स्वरा आणखीच हसत उत्तरली," नौटंकी मी की तुम्ही? इकडे भूक लागली मला आणि तिथे रुसून बसला आहात."

अन्वय थोडा मिश्किल हसत म्हणाला," बर चला बाबा. आधी खाऊन घेऊ मग ऐकेन तुझ्या तोंडून ते तीन शब्द."

अन्वय हसत- हसत चालला होता तर स्वरा त्याच्या चेहऱ्याकडे बघत चालली होती. त्याच्या चेहऱ्यावर गोडवा होता, त्याच्या नजरेत प्रेम होतं तीच्याकडून ते शब्द ऐकून घेण्याची आतुरता होती पण स्वरा होती की त्याला आणखीच त्रास देत होती. तिने ह्या ६ महिन्यात एकदाही ते तीन शब्द म्हटले नव्हते, कदाचित एका खास प्रसंगाची ती वाट बघत असावी...

इजहार बहोत छोटा शब्द है
तेरी मोहब्बत के सामने
तू कहे तू चिल्लाकर जमाणे से कह दु
हा हमे तुमसे बेपनाहँ मोहब्बत है....

ती रात्रीची वेळ होती. स्वरा- अन्वयच जेवण आटोपलं आणि ते शतपावली करायला बाहेर पडले. दिवसभर आज दोघांनी मस्त सैर केली होती. बोटिंग पासून शॉपिंग पर्यंत सर्व करून थकले होते तरीही रात्रीचा तो मनमोहक नजारा बघायला ते दोघेही कंटाळले नव्हते. ते बाहेर निघाले आणि त्यांना जाणवू लागल की अगदी दिवसभर गजबजलेली ही जागा रात्री शांततेत आणखिच खास भासते. ते मोठं मोठे डोंगर, डोंगरावरून पडणारी ती नदी, मैदानी भागात आल्यावर कशी शांत वाहते हे स्वराने आज अनुभवलं होत. दुसरीकडे कितीही गर्मी असली तरीही हे शहर जरा थंडच वाटत. त्यात हिरवागार निसर्ग सोबतीला असल्याने वातावरणात आणखीच गारवा होता आणि सोबत होता तिचा जिवलग. ती त्याच्या हातात घालून निवांत चालत होती तरीही कुणीच कुणाशी काहीच बोलत नव्हत. जागा आताही तीच होती पण सकाळच रूप आणि आताच रूप ह्यात जमीन-आकाशाइतका फरक होता म्हणून त्या मनमोहक वातावरणात ते सैर करायला निघाले होते. दूर कुठेतरी चालताना अन्वयला पहाडीवर घर दिसत होते आणि अन्वय मिश्किल हसत म्हणाला," स्वरा काही वर्षाने ना आपण इथेच राहायला येऊ. आपलं बाळ सोबत असेल. त्याला मस्त मोठं करू. आयुष्याचा प्रत्येक प्रसंग ह्या निसर्गात घालवू. तुझ्यासोबत असताना तर मला आयुष्याचे शंभर वर्षे सुद्धा कमी पडतील. घ्यायच ना इथे घर?? किती सुंदर असेल आपलं म्हातारपण. तू, मी अंक हा निसर्ग. म्हातारपणात पून्हा एकदा तरुणपण अनुभवायला मिळेल बघ."

त्याच्या चेहऱ्यावर हलकेच हसू पसरले होते. कदाचित तो तिच्या स्वप्नात हरवला होता. काही वेळ स्वरा त्याच्या चेहऱ्याकडे बघत शांत होती आणि एक उसासा घेत हळुवार म्हणाली," आणि मी तुम्हाला सोडून गेले तर?"

तिचा प्रश्न येताच अन्वयने हळुवार तिच्याकडे बघितले आणि हसतच म्हणाला," मग काय दुसर लग्न करेन. आपल्या बाळाला आई नको का दुसरी? त्याला असच ठेवणार आहे का मी? त्याला प्रेम द्यायला दुसरी आई नको का?"

अन्वय क्षणभर हसलाच होता की स्वरा जरा मोठ्यानेच हसत म्हणाली," खरच करणार ना? प्रॉमिस करा मला की मी गेल्यावर दुसर लग्न करणार तुम्ही."

ती अचानक उत्साहात बोलून गेली होती आणि अन्वय अगदीच शांत झाला. त्याची नजर केवळ समोर होती आणि चेहऱ्यावरच हसूही गायब झाल होत. तिच्या ते लक्ष्यात येताच तिचाही चेहरा पडला आणि आता स्वतःलाच ती गिल्टी समजू लागली. तिची आता त्याच्याकडे बघायची हिंमत नव्हती आणि तो क्षणभर हसत उत्तरला," आई जेव्हा मला म्हणाली होती की दुसर लग्न करशील का ती गेल्यावर तेव्हा तू ऐकलं होतंस हे माहिती आहे मला फक्त वाट बघत होतो केव्हा बोलशील स्वतःहून ह्याची."

त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होत तर स्वराला आता काय बोलू तेच समजत नव्हतं. ती एकदमच शांत झाली आणि अन्वयने तिला बाजूला थांबवत म्हटले," तुला हीच भीती आहे ना की उद्या जाऊन तुझे प्रयत्न कामी नाही आले तर? म्हणून अस म्हणत आहेस ना की सोडून जाशील? तू सोडून गेल्यावर मी एकटा पडेल म्हणून तु लग्नाबद्दल बोलत आहेस ना?"

स्वरा त्याच्याकडे अवाक होऊन बघत होती. म्हणजेच आजपर्यंत ती त्याच्यापासून जे सर्व लपवायला बघत होती, ते आधीच त्याला माहित होतं तरीही त्याने एकदाही तिला जाणवू दिलं नाही उलट तो तिला खुश कस ठेवता येईल ते बघत होता म्हणून त्याच्याबद्दल तिच्या मनात आदर आणखीच वाढला होता पण आज तिची बोलायची काही हिम्मत झाली नाही. त्याला तेही जाणवलं आणि अन्वयच तिच्या नजरेला नजर देत म्हणाला," खर सांगू तर नाही करणार लग्न पण तुला अडवणारही नाही जाण्यापासून. तुझ्यासोबत मुंबईला होतो स्वरा तेव्हा नकळत हजारो सल्ले दिले तुला पण आता तुझ्यासोबत राहताना समजलं की सल्ला देणं खूप सोपं असत आणि ते भोगण तितकंच कठीण. मीच अनुभवला आहे तो त्रास तुझ्यासोबत. लोकांच्या घृणास्पद नजराही बघितल्या आहेत. खर सांगू एक व्यक्ती म्हणून तुझा खूप आदर वाटतो. तुला माहिती आहे की खूप त्रास होणार आहे तरीही फक्त माझ्या प्रेमासाठी तू सर्व स्वीकारलं आणि सर्व करूनही जर मनाला शांती मिळाली नाही तर कदाचित जगण्याला काहीच अर्थ नसेल. आपण जगतो ते समाधान मिळवायला पण आपल्या आयुष्यात सर्व करूनही समाधान मिळत नसेल तर त्या जगण्यालाही काहीच अर्थ नाही. तुझ्याही मनात हे अस सुरू असणार अंदाज आहे मला, त्यामुळे मी तुला नाही थांबवणार फक्त जाताना सांगून जा बस एवढीच इच्छा. तुला जमेल तेंव्हापर्यंत प्रयत्न कर आणि ज्यादिवशी वाटेल की आता जमणार नाही तेव्हा मला सांग. आयुष्याचे काही दिवस पुन्हा सोबत घालवू आणि हसूनच एकमेकांपासून दूर होऊ. त्रास होईल मला पण तो तुझ्या आनंदासमोर काहीच असनार नाही स्वरा. मला ती हसताना हवी आहेस मग सोबत राहा नाही तर नको राहू.."

स्वरा त्याच्याकडे भरलेल्या डोळ्याने बघत होती आणि अन्वय तिचा हात पकडून पुन्हा चालू लागला. तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते पण आज ते त्याने पुसले नव्हते आणि अन्वय पुन्हा म्हणाला," खर सांगू तर मला तुझ्यासोबत वर सुद्धा यायला आवडेल पण मी नाही येऊ शकत. जबाबदारी असेल माझ्यावर तुझ्या आई-बाबांची, माझ्या आईबाबांची आणि जर आपलं बाळ झालं तर त्याचीही त्यामुळे त्यांच मनापासून करेन मग येईल तुझ्याकडे. तोपर्यंत वाट बघ माझी. पुन्हा एकदा सुंदर जग निर्माण करू वर. जिथे लोकांमुळे आपण वेगळे होणार नाही. आपलं प्रेमच पुरेस असेल पूर्ण आयुष्य सोबत घालवायला. ना घरच्यांची चिंता ना लोकांचे विचार फक्त तू आणि मी."

अन्वय सतत बोलत तर होता पण बोलताना एकदाही त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते म्हणून स्वरानेच विचारले," मला विसरणार तर नाही ना तुम्ही?"

अन्वय क्षणभर हसतच उत्तरला," तुला विसरणार नाही उलट तुला जिवंत वेगळ्या पद्धतीने ठेवेन. तू गेल्यावर ना स्वरा तुझ्यासारख्या ज्या ज्या मुली असतील त्या सर्वाना मी फायनान्शिअली, मेंटली स्टेबल करेन. त्या जिवंत राहिल्या तर कदाचित मला थोडं समाधान मिळेल की मी माझ्या स्वराला नाही पण इतर स्वराना जिवंत ठेवलं. त्यांच्यात तू मला कायमच दिसशील मग तुला विसरायचा प्रश्नच येत नाही. तस पण मला मुलगी झाली तर तीच नाव स्वराच ठेवेन. तिला मी उडायला शिकवेन, हसायला शिकवेन, तुझ्यासारखी कणखर बनवेन. तिला तिची आई कशी होती ते सांगेन आणि जगात एकट सोडेल जगाशी संघर्ष करायला. माझ्या मुलीत तुला जिवंत ठेवेन स्वरा कायम."

अन्वय अजूनही मिश्किल हसत होता आणि स्वरा अश्रू पुसत म्हणाली," एवढं प्रेम करता माझ्यावर? इतकं प्रेम करता की माझ्यासाठी स्वतःचा त्रास सुद्धा विसरून जाणार?"

अन्वय काही क्षण हसतच राहिला पण त्याने काही उत्तर दिले नाही आणि स्वराने म्हटले," बोला ना."

अन्वय तिच्याकडे बघून हसला आणि क्षणातच म्हणाला," प्रेम तर खूप आहे माझं पण बायकोचच नाहीये तेव्हाच तर एक पण आय लव्ह यु म्हटलं नाही मॅडमने आजपर्यंत. बहुतेक मीच खास नाहीये बायकोसाठी."

अन्वय हसत होता आणि स्वराच्या रडवेल्या चेहऱ्यावर क्षणात हसू आलं. तो समोर जातच होता की तिने त्याचा हात अडवून धरले आणि खाली गुडघ्यावर बसत म्हणाली," लोक बघत आहेत हे अजिबात सांगायचं नाही मला. मी जे बोलतेय ते फक्त ऐकायचं. ह्यासमोर एक शब्द नको मला."

अन्वय हसून तिच्याकडे बघत होता आणि स्वरा म्हणाली…

एक अंजानीसी मोड पर
कुछ जान पेहचान हुयी
रुठे हुये थे हम अपणे नसीबसे
तुम आये नसिब की भाषा बदल गयी
वैसे तो हकदार नही मै
आपके मोहब्बत की
पर फिरभी केहती हु
आपकी मोहब्बतनेही मेरी दुनिया सवार दि.."

स्वरा आता त्याच्या डोळ्यात बघत मोठ्याने ओरडली," आय लव्ह यु अन्वय सर. आय लव्ह यु. जगात कुणीही प्रेम करत नाही इतकं प्रेम मी तुमच्यावर करते. कदाचित तुमचं प्रेम अनुभवायला शब्द कमी पडतील म्हणून आज जगाला ओरडून सांगते.. आय लव्ह यु अन्वय सर.. आय लव्ह यु.. तुम्ही आहात तर ही स्वरा आहे अन्यथा स्वराच्या ह्या अस्तित्त्वाला सुद्धा काहीच अर्थ नाही. तुम्ही श्वास आहात, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरच तेज आहात. तुम्ही प्रेमाचं प्रतीक आणि काळजीच भांडार आहात. माझ्यासाठी माझे देव आहात. अन्वय सर यु आर माय लाइफ. लव्ह यु डिअर हजबंड आणि थॅंक्यु फॉर युअर लव्ह!!"

ती गुडघ्यावर बसून होती. सर्व आजूबाजूचे लोक स्वराकडे बघून हसत होते पण दोघांनाही त्याक्षणी काहीच फरक पडत नव्हता. ते तर अजूनही एकमेकांच्या नजरेत हरवले होते.

सोपं असत कारण सांगून वेगळं होन पण तेवढंच कठीण आहे हजार कारण असतानाही शेवट पर्यंत संघर्ष करणं. त्याच उत्तम उदाहरण म्हणजे " स्वरान्वय".

आज ते प्रेमासाठी ओळखलं जाणार स्थळही स्वरा- प्रेमाचं प्रेम बघून क्षणभर भारावल असेल ह्यात शंका वाटत नाही..

मोहब्बत कर लेते है हजारो लोग
पर निभाई कैसे जाती है ये तुमसे सिखा
वैसे तो ये अल्फाज है बडा साधा
पर तुमनेही सिखायी है मोहब्बत की परिभाषा..