Bhagy Dile tu Mala - 85 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ८५

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ८५


कैसे समझाये दुनिया को
मोहब्बत-ए-दास्ता
वो चेहरे पे अडी है
हमे दिलं से है वासता

अन्वय- स्वराच्या लग्नाला ३ महिने झाले होते. हा प्रवास त्यांना वाटला होता त्यापेक्षाही जास्तच त्रासदायक गेला होता. ते स्वतःला आनंदी करायचा एखादा बहाणा शोधत तोपर्यंत एक नवीन आव्हान त्यांची आतुरतेने वाट बघत असायचे. स्वरालाही आता अंदाज येऊ लागला होता की आपल्याला वाटला तेवढा सोपा प्रवास हा नक्कीच नाही. आपण कितीही प्रयत्न केले तरीही नात्यांच हे गणित आपण एकटे सोडवू शकत नाही. कदाचित प्रयत्न करूनही नाही म्हणून तिने आता विचार करणेच सोडून दिले आणि आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना ती हसतमुखाने फेस करण्यासाठी हिम्मत गोळा करू लागली. कदाचित ही एकमेवच गोष्ट होती जी तिला पूर्ण प्रवासात सकारात्मक ठेवणार होती आणि तिने मनालाही तीच समजावनी दिली.

अशीच एक सकाळ. आज अन्वयचा वाढदिवस. त्याचा वाढदिवस छान सेलिब्रेट करावा अशी तिची मनोमन इच्छा होती म्हणून आज तिने त्याच्यासाठी खास प्लॅन केला होता. एवढंच काय त्याला सरप्राइज देता यावं म्हणून तिने त्याला विश सुद्धा केलं नव्हतं. आज स्वरा, अन्वयसोबत बाहेर फिरायला देखील गेली नव्हती आणि त्याने तिला उठवल देखील नव्हत. आज त्याची छेळ काढायची संधी तिने क्षणभर सोडली नव्हती. स्वरा रोज काम करून करून थकून जाते ह्याच विचाराने त्याने तिला उठविले नव्हते पण आता बराच वेळ झाला होता. तो ऑफिसला जायला तयार झाला तरीही ती उठली नव्हती म्हणून त्याने तिच्या कपाळावर हात लावून बघितले. तीच अंग थंड जाणवत होतं त्यामुळे त्याने तिला हळूच आवाज दिला," स्वरा काय झालंय तुला? बर नाहीये का? आज इतका उशीर उठायला?"

त्याचा आवाज येताच स्वराने हळुवार डोळे उघडत म्हटले," हो एक्चुली बर वाटत नाहीये म्हणून उठायची इच्छा नाहीये. सॉरी सर आज ऑफिसला पण यायला जमणार नाही. तुम्ही जाऊन या."

तिचे शब्द येताच अन्वय जरा गडबडीतच म्हणाला," मग मूर्ख सांगायला काय गेलं? नुसतं झोपून काय तब्येत बरी होणार आहे. चल उठ हॉस्पिटलमध्ये जाऊया लवकर. तुझ्यापेक्षा ऑफिस महत्त्वाचं आहे का आता मला?"

अन्वय अस काही बोलेल तिला अजिबात विश्वास बसत नव्हता. तो तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असता तर तीच भांड उघड पडलं असत म्हणून डोक्याला हात लावत ती म्हणाली," तेवढं काही नाही झालं हो. बस डोकं दुखत आहे थोडं. मी आराम करेन दिवसभर मग वाटेल बर. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जायची गरज नाहीये. आता इतकीही काळजी दाखवू नका. अस म्हणा की मला आराम करायचा आहे ह्याच बहाण्याने. तुम्ही जा उशीर होईल तुम्हाला."

अन्वय जरा काळजीच्या स्वरातच उत्तरला," अग पण.."

स्वराने डोक्याला हात लावत पुन्हा म्हटले," म्हटलं ना होईल बरी. झोपू द्या आता मला. तुम्हीही निघा आणि जाताना दार लावून जा म्हणजे मला नीट झोपता येईल. आता तुम्हीच मला आराम करायला वेळ न देऊन त्रास देत आहात आणि वरून काळजी आहे म्हणत आहात. तुम्ही जा, जर काही जास्त वाटलं तर तुम्हाला कॉल करेन प्रॉमिस. आता तर जाणार ना?"

तिने रागावलेल्या स्वरात उत्तर दिलं आणि पटकन चादर अंगावर घेतली. अन्वय तिच्याकडे विचित्र नजरेने बघत जाऊ लागला. ती निवांत झोपली आहे बघून शेवटी त्याने हसतच दार लावले आणि बाहेर पडला. तो हॉलमध्ये पोहोचलाच होता की बाबा समोर बसून दिसले. बाबांना बघून त्याने मिश्किल हसू ओठावर आणले आणि अन्वयला बघताच बाबा म्हणाले," वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अन्वय!! खूप सुखी राहा बाळा. आयुष्यात तुला जे जे हवं ते ते मिळो अशी देवाला प्रार्थना करेन."

अन्वयने पुढच्याच क्षणी बाबांना नमस्कार केला. त्याने बाबांचे चरण स्पर्श करताच पूर्ण हॉलमध्ये नजर फिरवली. त्याच्या वाढदिवसाला आई नेहमी ओवळत असे म्हणून तो क्षणभर इकडे- तिकडे बघत होता पण आई त्याला कुठेच दिसली नाही. काही क्षण त्याने तिथे वाट बघितली आणि चेहऱ्यावर स्माईल आणतच घराबाहेर पडला.

अन्वयची कार बाहेर जाण्याचा आवाज येताच स्वराने चादरमध्ये खुपसलेलं डोकं बाहेर काढलं. खिडकीतून अन्वयची कार बाहेर दिसत नसल्याची खात्री तिने केली. अन्वयची कार पसार झाली आहे हे बघताच स्वरा आपला फोन शोधू लागली. तो टेबलवर ठेवला होता. ती पटकन फोनकडे धावली, गडबडीतच फोनचा लॉक उघडला आणि क्षणात तिने सौरभला फोन लावला. कॉल रिसिव्ह होताच सौरभने विचारले," गया अन्वय? "

स्वरानेही हसतच म्हटले," हा अभि गये है. मै अभि फ्रेश होंकर १२ बजे तक आपको मिलती हु. आपको याद है ना क्या क्या करणा है? याद रखना देर ना हो जाये और ऊन्हे पता भी म चले."

सौरभ हसतच उत्तरला," हा भाभीजी याद है सब कुछ. पेहले सजावट का सामान लेना है, केक का ऑर्डर देना है, शाम को खाने ऑर्डर दे दिया है बस अब विराज को उठाकर लाना है और कुछ बचा भाभीजी? अगर बचा हो तो वो भी कर लेंगे. भाभी का हुकूम सरहुकूम आंखो पर!!"

सौरभ तिला भाभी म्हणत होता म्हणून स्वरा क्षणभर हसलीच आणि लाजतच उत्तरली," और कुछ नही बस आप आ जाइये जलदीसे. आपने विश किया ना अन्वयको प्लॅन के तहत? वरणा ऊन्हे लगेगा की हम कुछ प्लॅन कर रहे है. उन्हे थोडी भी भनक नही लगनि चाहीये. किया ना आपणे?"

सौरभ तीच बोलन ऐकून क्षणभर हसतच राहिला होता आणि स्वराने विचारले," क्या हुआ सर?"

सौरभ हसतच उत्तरला," अब सच मे तुम मेरी स्टुडन्ट नही भाभी लग रही हो. हा किया बाबा सब प्लॅन के मूताबिकही किया है. वो छोडो, मै विराज को लेकर १२ तक आ जाऊंगा बस आप टाइम पर आ जाईये क्यूकी इस फ्लॅट की किज आपके पास है वरणा आपके वजहसेही प्लॅन फेल हो जायेगा."

स्वरा हसतच म्हणाली," हा ठीक है. मै अभि फ्रेश हो जाती हु फिर मिलते है १२ बजे. बाय.."

सौरभनेही बाय म्हणत फोन ठेवला.

तिने फोन ठेवला आणि स्वराच्या चेहत्यावर भल मोठं हसू उभं राहिलं. अन्वय जो कायम तिच्या चेहऱ्यावर हसू आणत होता, आता तिला एक संधी मिळत होती त्याच्या चेहऱ्यावर हसू आणायची त्यामुळे ती त्याचा हा क्षण साजरा करायला खूप आतूर होती. ती वेड्यासारखं हसतच होती की तिला जाणवलं आपल्याला जायला उशीर होईल म्हणून तिने पटकन आपल्या डोक्याला मारत म्हटले," स्वरा मॅडम ते आनंदी तेव्हा होतील ना जेव्हा तू इथून निघशील. चल पटकन तयार हो बर नाही तर सौरभ सर म्हणतात तसे तुझ्यामुळेच प्लॅन खराब होईल. चल आवर पटकन."

तिने जणू स्वतालाच आदेश दिला आणि फ्रेश व्हायला वॉशरूमला पोहोचली. त्या क्षणी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती.

*******

दुपारचे जवळपास १२ वाजले होते. स्वरा फ्लॅटवर पोहोचली तरीही सौरभ- विराज अजूनही आले नव्हते त्यामुळे रूम सफाईच काम तिने हाती घेतलं. तस फार काही करायचं नव्हतं कारण दोन दिवस आधीच ती पूर्ण रूम साफ करून गेली होती. त्यामुळे थोडी फार झाडपुस तिला करायची होती आणि ती कामाला लागली. अगदी अर्ध्या तासात तिने पूर्ण घर झाडून काढलं आणि त्यांची वाट बघू लागली. १२.३०च्या आसपास ते पोहोचले आणि स्वराने रागावतच विचारले," कितनी देर सर?"

सौरभ हसत म्हणाला," सॉरी सॉरी!! मै तो टाइम पर ही निकला था पर ये विराज खाणे बैठ गया. भुक्कड कहीका!! इसे खाये बगेर होता नही ना!! देख विराज मिली ना गाली तेरे कारण.. "

विराजही हसतच म्हणाला," हा तो काम इतना है की भूक तो लगेगीही इसलीये खाकर आ गया. क्या पता खाणे का वक्त मिले या नही. वैसे स्वरा मै तुम्हारे लिये भी नाश्ता लेकर आय हु. खा लो. काम होता रहेगा यार पर उसके लिये खाना क्यू छोडे?"

सौरभ पुढच्याच क्षणी हसत म्हणाला," तू नही बदलेगा साले.."

विराज हसतच होता की स्वरा जरा रागावतच म्हणाली," वो बादमे पेहले काम शुरु करते है. नही तो देर हो जायेगी और पुरा प्लॅन फेल. आज प्लॅन फेल हुवा ना तो आपको मै सच मे नही छोडने वाली. फिर समोसेके साथ गालिया भी खा लेना."

विराज हसतच उत्तरला," सॉरी सॉरी!! अभि शूरु करते है. हम अपणे भाई के लिये कुछ भी कर सकते है ये कुछ भी नही. "

त्याने जोशा- जोशातच सौरभच्या हातातली बॅग घेतली आणि तयारी करायला धावला तेवढयात सौरभ हसत म्हणाला," स्वरा देख लेना थोडासा काम करतेही इसे और भूक लग जायेगी. ये नाश्ता इसने तुम्हारे लिये नही खुद के लिये लाया है."

स्वरा- सौरभ हसतच होते की विराज मोठ्याने म्हणाला," मेरी बुराई करके हो गयी हो तो क्यू ना काम करले सौरभ?"

विराज त्याच्याकडे रागाने बघत होता आणि सौरभ हसतच कामाला लागला. स्वरानेही क्षणातच आपला चार्ज घेतला. त्यांनी तसा आधीच प्लॅन करून ठेवला होता की नक्की काय काय करायच आहे त्यामुळे त्यांना त्याबाबतीत अडचण जाणार नव्हती. सौरभने फुगे सोडले तर जवळपास सर्व वस्तू तयार केलेल्याच आणल्या होत्या त्यामुळे त्यांना फक्त ते सजवायच काम करायचं होतं. घरात ऑलरेडी साऊंड सिस्टीम होती म्हणून त्याबाबतीत काही प्रॉब्लेम होणार नव्हता. सौरभ- विराज प्लास्टिकच्या पताखा लावण्यात व्यस्त होते तर स्वरा फुगे फुगवून नीट ठेवत होती. ते कामाला तर लागले पण काम कमी आणि विराजचा गोंधळ जास्त होता त्यामुळे काम करताना देखील एक वेगळीच मज्जा त्यांना बघता येत होती. विराज- सौरभची मस्ती बघून तर स्वराच हसून- हसुन पोट गेलं होतं. अगदी तासभर होऊन गेला होता आणि सौरभने म्हटलं त्याप्रमाणे विराज नाश्ता करायला बसला. त्याला बघून सौरभ-स्वराला हसू आवरत नव्हतं. स्वरा- सौरभ हसतच होते की स्वराचा फोन वाजला. तिने मोबाइल बघितला तर त्यावर अन्वयचा कॉल आलेला दिसला. तिने दोघांनाही शांत केलं आणि हळूच फोन रिसिव्ह केला. तिने फोन उचलताच अन्वयने विचारले," स्वरा आता बर वाटत आहे का? जास्तच तब्येत खराब नाही झालं ना? तस असेल तर सांग मी येतो लगेच मग जाऊ हॉस्पिटलमध्ये. बोल गप्प का आहेस?"

तो बोलतच होता की स्वरा पटकन बोलून गेली," मला काय झालंय. मी ठीक आहे. एकदम मस्त. तुम्ही अस का विचारत आहात?"

अन्वयही जरा हसतच म्हणाला," मी अस का विचारत आहे हे तू मला विचारत आहेस? विचित्र आहे. सकाळी तर डोकं धरून बसली होतीस. मग मला काय खोट बोललीस डोक दुखत आहे म्हणून?"

ती क्षणभर विसरूनच गेली होती की तिने त्याला बहाणा मारलाय. पुढच्याच क्षणी तिने स्वतःच्याच डोक्यावर मारत म्हटले," म्हणजे तेव्हा दुखत होत पण आता नाही दुखत आहे. आता मी मस्त फ्रेश फिल करते आहे. बर ते सोडा मला तुम्हाला काहितरी सांगायचं आहे. आज जरा ऑफिसमधून उशिरा निघा."

तीच बोलणं पूर्ण होण्याआधीच अन्वय हसत उत्तरला," हे काहीतरी वेगळंच ऐकतोय स्वरा. प्रत्येक बायको नवर्याला म्हणते की लवकर या आणि तू उशिरा ये अस म्हणत आहेस. बायको वेड वगैरे लागलं आहे का? नक्की येऊ का हॉस्पिटलमध्ये न्यायला तुला? अटलिस्ट चेकप तरी करून घेऊ."

अन्वय हसतच होता की स्वरा जरा आताच चिडतच म्हणाली," झालं ज्ञान पाजळून. गप्प बसा आता. मी काय म्हणतेय ते एका आधी. आज माझी मैत्रिन अमेरिकेहून आलीय सो मी तिला भेटायला जातेय तर कदाचित उशीर होईल. तेव्हा ७-७.३० पर्यंत निघा म्हणजे येताना मलाही घेऊन ह्याल. जमेल ना की टॅक्सी करून येऊ?? बघा म्हणजे माझी काळजी असेल तरच या नाही तर मग मी करेन टॅक्सी."

अन्वय हसतच म्हणाला," ओ अस आहे तर. मग तर ये एकटीच. मी नाही येणार."

स्वरा जरा जास्तच बोलून गेली आणि आता बाजी तिच्यावरच पलटली. तिला आता बोलायला काहीच उरल नाही आणि अन्वय हसत म्हणाला," कॉल कर मला निघायच्या आधी. पीक करेन तुला. बाईसाहेब आणखी काय आदेश असेल तर सांगून द्या? मग काळजी असेल वगैरे शब्द ऐकावे लागणार नाहीत."

स्वराही जरा हसतच उत्तरली," सध्या तरी मला तयार व्हायचं आहे सो मी जातेय. काही लागलं तर करेन फोन, त्याची काळजी तुम्ही करू नका. आताया सरळ सायंकाळी कॉल करेन तुम्हाला. तोपर्यंत मला त्रास द्यायचा नाही. चला बाय."

तो काही बोलणार त्याआधीच स्वराने फोन कट केला आणि शांत असलेल्या सौरभने तिला विचारल," उसे देरसे आने को क्यू कहा स्वरा? मुझे कुछ समझा नही."

स्वरा हसत उत्तरली," ताकी हमे वक्त मिल सके. वैसे भी आपकी बिवीया तयार होणे मे वक्त लगायेगी ये मुझे पता है इसलीये ये खबरदारी. वरणा पता चला की वो आ गये और बाकी कोई आया ही नही."

सौरभ हसला, विराज आताही समोसा खण्यातच बिजी होता म्हणून सौरभने त्याच्या डोक्यावर पटकन टपली मारली आणि हसतच म्हणाला," मेरे भाई चल जलदी कर वरणा वो आ जायेगा और हम काम करते ही रेह जायेंगे. नही तो स्वरा मारेगी हा तुझे. चलेगा क्या?"

विराजने क्षणात समोसा खाल्ला आणि आता सर्व काम करू लागले. तशी फार काही तयारी करता येणार नव्हती पण स्वराला जेवढं जमत होत तेवढं तिने करायला घेतलं होतं. आता जवळपास ४ वाजले होते. रूम सजवून तयार झाली होती. त्या तिघांनी रूमचे दर्शन घेतले. लायटिंग पासून सजावटीपर्यंत रूम चमकत होती म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरल होत. पूर्ण काम झालंच होत की सौरभ हसतच उत्तरला," स्वरा फायनली हो गया. चलो हम तुम्हे ड्रॉप कर देते है बाद मे हम चले जायेंगे."

स्वराने म्हटले," सर मै खुद के लिये और अन्वय सर के लिये कपडे लेकर आयी हु. सो मुझे जाने की जरूरत नही है. बस आप जाकर जलदीसे आइये और जलदी आइये ताकी सरप्राइज पुरा हो सके. अपनी बिवीको भी यहीसे फोन लगा दिजीए वरणा लेट हो जायेगा."

सौरभ- विराज दोघेही हसतच बाहेर पडले तर स्वरा ते सर्व दृश्य बघून आनंदी झाली होती. त्यांच्या लग्नानंतर अन्वयचा पहिला वाढदिवस होता आणि त्यात तिला काहीच कमी ठेवायची नव्हती. ते गेले तर स्वरा त्या क्षणातच हरवली होती. तिला उघड्या डोळ्याने जणू समोरच सर्व दिसत होतं आणि ती पुन्हा एकदा त्याच्या स्वप्नात हरवली..

*******

सायंकाळचे ६.३० वाजले होते. सिया, श्रीलेखा, संकल्प, विराज, सौरभ सर्व रूममध्ये मस्ती करत होते तर स्वरा दारावर उभी राहून कुणाची तरी वाट बघत होती. आज स्वरा अन्वयला आवडते म्हणून साडी नेसून तयार झाली होती. पिवळ्या कलरची साडी त्यावर कानातले गोल- गोल झुमके, तिचे ते सिल्की सिल्की केस आणि ती मुळातच सुंदर त्यामुळे आज जवळपास सर्वांनीच आल्या आलीच स्तुतीसुमने उधळली होती. आज सर्वांची स्तुती बघून अन्वय तिला बघून कसा रिऍक्ट करेल ह्याच विचाराने स्वराच्या चेहऱ्यावर हसू पसरल होत. आत तिला तो केव्हा एकदा येतो अस झालं होतं पण त्याला यायला वेळ होता म्हणून तिने लाजेचे भाव तसेच सजवून ठेवले होते.अन्वयला यायला अजून वेळ आहे हे माहिती असताना ती नक्की कुणाची वाट बघते हे सियाला समजत नव्हतं म्हणून सियाने तिला विचारले," स्वरा किसीं का इंतजार कर रही हो? कोई खास आने वाला है क्या?"

ती काही बोलणार त्याआधीच संकल्प मोठ्याने म्हणाला," ओ माय गोड!! ये चांद आज इधर खुद चलकर कैसे आ रहा है. "

संकल्प एकटक समोर बघत होता. त्याचे डोळे कुणावर तरी स्थिरावले होते. तो कुणाकडे बघतो आहे म्हणून सर्व समोर बघू लागले आणि सौरभच्या तोंडून आवाज आला," पटाखा!!! कुछ नही बदला यार! वैसी की वैसी है आज भी. लगता है भगवानने इसे बडी फुरसदसे बनाया है."

ते तिघेही पापणीही न हलवता समोर बघत होते आणि श्रीलेखा समोर बघू लागली. काही क्षण तिचीही नजर तिच्यावरच होती. समोरून श्वेता येत होती. ती स्लिम टाइट जीन्स, फुल स्लीव्हची टीशर्ट घालून येताना जणू ती मॉडेल पेक्षा कमी जाणवत नव्हती. ती पाहता- पाहता जवळ आली आणि श्रीलेखाने हसतच विचारले," ए कॉलेज क्रश!! तू यहा कैसे? तुझे यहा का पता किसने दिया? अब किस का दिलं चुराने आयी हो जानेमन??"

श्वेताने हसतच स्वराला मिठी मारली आणि काहीच क्षणात स्वरा म्हणाली," इसे मैने बुलाया है. केह रही थि की कॉलेज के दोसतो को बहोत याद करती है. तो सोचा क्यू ना इसे भी बुलाया जाये. थोडी पार्टी मे रंगत आ जायेगी. सही किया ना?"

विराज हसतच म्हणाला," सही नही बहोत मस्त काम किया आपणे. अभि लगता है पार्टी मे जान आयी है."

श्रीलेखाने विराजकडे रागाने बघताच त्याने नजर खाली केली तर पुढच्याच क्षणी श्वेताने श्रीलेखाला घट्ट मिठी मारली. संकल्प, विराज आणि सौरभ एकटक तिच्याकडे बघतच होते की हळुवार श्वेताने सर्वाना विचारले," हाय गाईज कैसे हो?"

तिने हसून सर्वांकडे बघावं आणि सौरभ पटकन बोलून गेला," तू तो आज भी पटाखा दीखती है यार!! मन नही भरता आज भी देखते वक्त. कैसे करती हो खुदको मेंटेन? बनाने वाले ने भी तुझे बडी फुरसद से बनाया है."

त्याच वाक्य येताच श्वेता हसू लागली आणि श्रीलेखा म्हणाली," सिया देख क्या बोल रहा है सौरभ? तुझे कभीभी पटाखा कहा क्या इसने? खुदका क्रश देखकर देखो कैसी हालत हुयी इनकी? सौरभको संभाल लो वरणा आगे क्या क्या होगा अंदाजा भी नही लगा सकती."

सियाने सौरभकडे डोळे मोठे करून बघितले आणि सौरभने पटकन मान खाली टाकली. विराज तिच्याकडे बघतच होता की श्रीलेखाने म्हटले," विराज तू तो इसके तरफ देखणे की गलतीही मत करणा वरणा बहोत मार खायेगा तू. वो बहोत दिनो बाद मिली है इसका मतलब मैने तूम्हे छुट नही दि है. संभाल कर रेहना वरणा घर पर जातेही मार खायगा."

तिचे शब्द येताच विराजचा चेहरा पडला आणि तो हळूच म्हणाला," संकल्प मेरे भाई आज तूही देख ले. तेरी बिवी तो है ही नही यहा. लेले तू ही मजे. हमारा इतना अच्छा नसिब कहा??"

त्याचे शब्द येताच रूममधील प्रत्येक व्यक्ती हसत होता आणि श्रीलेखाने विचारले," ओय श्वेता तू आज कुछ नही बोल रही. बदल गयी है क्या? वरणा अब तक तो इनकी तो छुट्टी कर देती थि. लगता है वो वो श्वेता अब थंडी पड गयी है."

श्रीलेखा हसत होती आणि श्वेताच म्हणाली," ये नही सुधरेंगे. तब भी लाइन मारते थे और आज भी लाइन मारते है. इनको बोल कर कुछ फायदा है क्या दि? ये तब भी वही थे और आज भी वही है. मै नही देती इनको भाव."

श्वेता हसून बोलतच होती को श्रीलेखा पटकन म्हणाली," हा जैसे तू बहोत शरीफ बनणे वली है. तू नही मारेगी अन्वय पे लाइन? वो आने तो दे फिर देखेंगे कोण कोण सुधरा है और कोण आज भी क्रश को देखता रेहता है?"

तीच वाक्य आलं आणि सौरभ श्रीलेखाला टाळी देत म्हणाला," ये बात श्री!! श्वेता उमर घट रही है सिर्फ बेटा. बाकी दिलं आज भी जवान है और सुंदर कन्या के लिये आज भी धडकता है. "

तो बोलून गेला आणि श्वेताकडे बोलायला काहीच उत्तर राहील नाही. सियाही आता हसू लागली होती आणि बऱ्याच वेळाने श्वेता म्हणाली," ये बात तो है. क्रश आखीर क्रश होता है!! उसको कभीभी देखो वो मजा नही जाता. मै तो बिलकुल चान्स नही छोडने वाली पर लाइन मारणे के लिये साहब तो चाहीये ना. वही नही है तो किस पर मारू लाइन."

श्रीलेखाने पुन्हा म्हटले," श्वेता जरा संभाल के स्वरा यही पे कही मार खाणे की नौबत ना आये? सोच ले मैने बताने का काम किया है बाकी तू समझदार है है.."

श्रीलेखा तिच्यावर हसत होती तर श्वेताही हसतच म्हणाली," नही मारेगी इसे पेहलेसेही पता है. उसनेही लाइन मारणे की अनुमती दि है वरणा मै तो थोडी आती यहा पे. मै तो आज फुल टाइम उसपर लाइन मारनी वाली हु."

श्रीलेखा हसतच म्हणाली," बेशरम!! अब लगती है पेहले वाली श्वेता. वेलकम डिअर वन्स अगेन ऑन ग्रुप.."

त्या हसतच होत्या की श्वेता विचारु लागली," वो सब छोडो अपना बर्थडे बॉयफ्रेंड कहा पर है? सब आ गये फिर वो क्यू नही आया अब तक?"

आता विराजही जरा चिडत म्हणाला," हा स्वरा कहा है वो तुमने कॉल किया की नही उसे? और कितनी देर इंतजार करणार पडेगा उसका?"

दारावर नजर ठेवून असलेली स्वरा अचानक वळून म्हणाली," विराज भैय्या, निहारिका और शरद आने वाले है. उनको आने दो फिर कॉल करती हु उनको. देखो ना बहोत देर हुयी लेकिन आये नही वो अब तक."

सौरभ हसतच म्हणाला," आने वाले थे नही आ गये है."

त्याचे शब्द येताच स्वराच समोर लक्ष गेलं. ती हसून समोर बघतच होती की निहारिकाने धावतच स्वराला मिठी मारली. स्वरानेही तिला घट्ट मिठीत घेतले आणि निहारिका म्हणाली," वहिनी आज खऱ्या अर्थाने आपली भेट झाली. खूप खुश आहे मी आज. फायनली तुझ्याशी भेटायच स्वप्न पूर्ण झालं. कितो वाट बघावा लागला ना पहिल्या भेटीसाठी?"

तिने मिठी सोडली आणि शरद समोरून येत म्हणाला," वहिनी छान झालं तुम्ही बोलावलं आम्हाला. मागे तुमच्याशी निवांत बोलता पण आलं नव्हतं. आमची खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची आणि आज ती पूर्ण झाली. थॅंक्यु बोलावल्याबद्दल."

सृष्टी शरदच्या हातात होती. क्षणभर स्वराची नजर तिच्यावर गेली. ते निहारिकाच्या नजरेतून सुटलं नाही आणि निहारिका हसतच म्हणाली," काय विचार करते आहेस इतका? घे ना तिला. मामीकडे आवडेल तिला यायला. तिला नाही फरक पडत चेहऱ्याने, शेवटी माझी मुलगी आहे ती. कुणालाच घाबरत नाही ती. तेव्हा घ्या अजिबात विचार करू नका."

स्वराला काही क्षण काय बोलू कळत नव्हतं. तेव्हाच निहारिका म्हणाली," शरद सांगा ना तुम्ही की तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये."

शरद आता स्वतःच सृष्टीला स्वराच्या हातात देत म्हणाला," हो वहिनि नाहीये काही प्रॉब्लेम. उलट आईकडून माफी मागतो मी. त्यावेळी काही बोलू शकलो नाही त्यासाठी. मोठ्या लोकांना आपण काही बोलू शकत नाही पण ह्याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्यांचं म्हणणं मान्य असेल. मला आवडेल आमची लाडकी तुमच्याकडे असली तर. आम्ही तर ठेवून जाऊ तुमच्याकडे कुठे फिरायला गेलो तर मग संभाळत बसा तुम्हीच तिला."

स्वराने तिला घ्यायला हात समोर केलेच होती की ती गोड हसत तिच्याकडे आली. तीच गोड हसू बघून स्वराला किती आनंद झाला होता तीच तिलाच माहिती. तिच्या आजीने म्हटलं होतं की स्वराला बघून ती घाबरणार पण ती घाबरली नाही उलट हसू लागली आणि स्वराने तिला पटकन किस्सी दिली. त्या दोघांनाही तस पाहून निहारीकाला फार आनंद झाला होता. ते दोघेही अजून बाहेरच होते की श्रीलेखा म्हणाली," निहारीका, शरद अगर अपनी भाभी से मिलना हो गया हो तो हमसे भी मिल लो. हम भी तो आपका इंतजार कर रहे है ना."

निहारिकाने अगदी धावतच तिला मिठी मारली मागे मागे शरदही पोहोचला तर स्वराच्या हातात सृष्टी मस्त खेळत होती. आता सर्वच आले होते म्हणून अन्वयला बोलवायला काहिच प्रॉब्लेम नव्हता. ती त्या सर्वांपासून जरा दूर गेली आणि तिने अन्वयला कॉल लावला. समोरून कॉल रिसिव्ह करत अन्वय म्हणाला," तुमच्याच कॉलची वाट बघत होतो बाईसाहेब. केव्हांचा ऑफिसमध्ये बसून आहे. कंटाळा यायला लागला आहे. बोला मग कुठे यायचं आहे?"

स्वराने जरा हसतच म्हटले," सर कियाराने मला आपल्या नवीन फ्लॅट जवळ सोडले आहे. मीच म्हटलं तस तिला. तुम्ही येऊ शकता का तिथे काही प्रॉब्लेम नसेल तर?"

अन्वय हसतच म्हणाला," ओके येतो. १५ मिनिट लागतील जास्तीत जास्त. तू बाहेर येऊन राहा मग लवकरच निघू घराकडे."

तो यायला तयार झाला आणि स्वराने फोन ठेवला. ती आता लगबगीने मध्ये येत होती की सृष्टीने तिचे केस ओढले. स्वरा तिला हसतच म्हणाली," मामीला त्रास द्यायला आवडतो तुला?"

स्वरा बोलली आणि सृष्टीने हसतच मान खाली केली. स्वराला तीच ते हसन किती सुखावून जात होत तीच तिलाच माहिती. तिच्याशी बोलत- बोलतच ती मध्ये पोहोचली आणि मोठ्याने म्हणाली," हॅलो फ्रेंड्स अन्वय सर १५ मिनिट मे आ रहे है सो बी रेडी."

स्वराचे शब्द येताच सर्वांनी फायनली काय काय करायचं आहे विचार केला आणि बाकी सर्व गोष्टी बरोबर झाल्या की नाहीत त्या चेक करून घेतल्या. सर्व काही सेट होत, आता होती ती अन्वयची वाट...

जवळपास १५ ते २० मिनिटांचा कालावधी निघून गेला होता. स्वराची नजर अजूनही रस्त्यावर होती. तिला केव्हा एकदा अन्वयला भेटते अस झालं होतं. तिला अन्वयला बघायची इतकी घाई झाली होती की ती कितीतरी वेळेपासून बाहेरच उभी होती. आज त्याची वाट बघण्यात पण वेगळीच मज्जा होती. तो येणार म्हणून तिचा चेहरा खुलून निघाला होता. तेवढ्यात तिला एक कार घराकडे येताना दिसली आणि स्वरा जणू धावतच रोडवर उभी झाली. स्वरा मधात उभी आहे हे लक्ष्यात येताच अन्वयने हळुवार तिच्याजवळ नेऊन गाडी थांबवली आणि काच खाली करून तिच्याकडे बघू लागला. ती साडी, वरून तर खालपर्यंत शृंगार बघून अन्वय हरवला तो हरवलाच. काही क्षण तर त्याची नजर तिच्यावरून हटलीच नव्हती. ती लाजून त्याच्याकडे बघत होती तर तो एकटक तिच्याकडे बघत होता. काही क्षण असेच गेले आणि अन्वय हळूच हसत म्हणाला," बायको आज मला मारायचा विचार करून आला आहात का? किती हे सुंदर रूप. साडीवर तर काय दिसत आहात तुम्ही शब्दच नाहीत माझ्याकडे स्तुतीसाठी. बायको मी आधिच वेडा आहे हो तुमच्यासाठी आणखी किती वेड लावणार?"

स्वरा क्षणभर त्याच बोलणं ऐकून लाजलीच होती. त्याची नजर सतत स्वरावर होती आणि स्वराला लाजण्यापासून फुरसद मिळत नव्हती. ती फक्त लाजत आहे बघून अन्वयच म्हणाला," खर सांगू तर इथून क्षणभर पण हलावस वाटत नाहीये पण पर्याय नाही. मी घरी गेल्यावर जवळून बघेन माझ्या बायकोच रूप. स्वरा मॅडम चला आता घरी, मी तुम्हाला बघत बसलो तर मग बघतच बसेन."

तो गाडी सुरू करणारच की स्वरा त्याच्यासमोरन बाजूला झाली आणि आता घराचं सुंदर रूप त्याच्या नजरेला पडलं..बाहेर छान लायटिंग वगैरे लावलेली बघून अन्वय स्वतःच गाडीच्या बाहेर आला. तो घराकडे बघतच होता की स्वरा म्हणाली," वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नवरोबा!! तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर आज जे हसू बघायला मिळत आहे ते तसच कायम राहावं अशी बाप्पाना प्रार्थना करेन. तुम जियो हजारो साल नवरोबा!!"

अन्वयने तिच्याकडे बघितले आणि हसतच म्हणाला," थॅंक्यु मॅडम!! दिवसभर शुभेच्छा न देण्याच कारण आता समजलं. तरीच म्हटल तू विसरणे शक्य नाही. सरप्राइज प्लॅन होता तर!! तरिही दुपारी विचार आला की माझ्या भुक्कड मित्रांनी अजून पार्टी साठी फोन का नाही केला? सो सर्वांची मिलीभगत आहे तर ही. बाय द वे कोण कोण आहे मध्ये?"

स्वरा हसतच उत्तरली," चला बघून घ्या तुम्हीच. तुमच्यासाठी तर आलेत सर्व. चला नवरोबा, आजचा दिवस आणखी स्पेशल बनवूया.."

अन्वय हसला आणि स्वरा त्याचा हात हातात घेतच घराकडे घेऊन जाऊ लागली. तिने त्याचा हात घट्ट पकडला होता म्हणून तो तिच्या नजरेतून बाहेर बघू शकत नव्हता.

हळूहळू ते मध्ये जाऊ लागले. अन्वयची नजर क्षणभड बाहेरच्या वतावरणावर खिळली होती पण त्यानंतर त्याची नजर पुन्हा स्वरावर स्थिरावली. ती स्वराकडे बघत बघतच दारावर पोहोचला. त्याने दाराच्या मध्ये पाय टाकलच होता की सर्व मोठ्याने ओरडले," हॅपी बर्थडे अन्वय!!"

अन्वय क्षणभर सर्वांकडे हसून बघत होता. आज त्याची जवळपास सर्व खास लोक तिथे होती त्यामुळे काही क्षण तो आनंदाने भारावून गेला होता. तो घरातल वातावरण बघतच होता की विराजने त्याला मिठी मारत म्हटले," हॅपी बर्थडे मेरी जाण!!"

अन्वयने त्याला घट्ट मिठी मारली. सौरभ नंतर जवळपास सर्वांनीच त्याला विश केलं आणि सौरभ म्हणाला," हो गया हो तुम सबका तो उसे फ्रेश हो जाणे दो. तब तक आओ केंडल्स और केक लाते है."

अन्वय हळूच हसत बेडरूममध्ये गेला आणि मागेच स्वराही गेली. तिने त्याचे कपडे आधिच काढून ठेवले होते. तिने त्याच्यासाठी जो नवीन ड्रेस घेतला होता तोच तिने तिथे ठेवला होता. अन्वय ड्रेसकडे बघतच होता की स्वरा मागून म्हणाली," माझ्याकडून छोटस गिफ्ट. आवडलं तुम्हाला?"

अन्वय क्षणभर तिच्याकडे बघत म्हणाला," थॅंक्यु!! शर्ट साठी नाही तर ह्या सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी. ह्या सर्व लोकांना एकत्र बघून मला किती आनंद होतोय ते तुला सांगू शकत नाही. वाढदिवस खूप झालेत पण माझे सर्व खास लोक पहिल्यांदाच एकत्र आहेत. थॅंक्यु स्वरा तुझ्या सुंदर गिफ्ट साठी."

स्वरा त्याच्याकडे बघतच म्हणाली," तुम्ही खुश झालात ना मग मी पण खुश झाले. नवरोबा चला आता फ्रेश होऊन लवकर या. नाही तर सर्व ओरडतील माझ्या नावाने. म्हणतील बसलेत तिकडे रोमांस करत. मला नाही उडवून घ्यायची हा स्वतःची."

स्वरा हसून बाहेर जातच होती की अन्वय म्हणाला," स्वरा खूप सुंदर दिसते आहेस. तू आज जशी तयार झाली आहेस ना तस बघून मला वेडच लागायच बाकी उरलय. माझ्यासाठीच आहे ना सर्व. थॅंक्यु हा माझ्यासाठी तयार व्हायला. सर्व नसते ना तर नक्कीच तुम्हाला मिठीतुन बाहेर पडू दिल नसत, हरकत नाही रात्र माझीच असेल विसरू नका."

तो तिला बघत होता आणि ती क्षणातच लाजत बाहेर पळाली. आताही तो तिला वेड्यासारखं बघर होता.

अन्वय फ्रेश व्हायला पोहोचला तर बाकी सर्व तयारी करून बसले होते. एवढंच काय साऊंड बॉक्स देखील डान्स करायला तयार होते. अन्वय १५ मिनिटात आला आणि सर्वांनी येताच त्याला केक कट करायला उभे केले. त्याने क्षणात फायर केंडल्स पेटवली आणि केक कट केला. केक कट करताच पुन्हा एकदा हॅपी बर्थडे टू यु च आवाज रूम मध्ये घुमू लागला होता. अन्वयने केक कट केला आणि स्वराने तोच केक त्याला भरविला. अन्वयनेही केक कट करताच पहिला बाईट स्वराला भरविला आणि निहारिका रुसत म्हणाली," देखो अपणे बिवी को ही खिला रहा है. हमारी कोई कदरही नही. बिवीके सामने हमे भूल गये ना भाई?"

श्रीलेखाही हळूच हसत उत्तरली," अब बिवी के सामने बेहन क्या चीज है. तेरा भैय्या बिवी का दिवाना हो गया है निहू अब तो तेरा आन जाणा भी बंद हो जायेगा. तू केक की बात क्या कर रही है?"

तिने तस म्हणावं आणि अन्वयने तिलाच केक भरवला. हळूहळू त्याने सर्व लोकांना केक भरवायला सुरुवात केली. अन्वय सर्वाना केक भरवत होता तर सौरभच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन सुरू होता. त्याने फ्रीजमध्ये ठेवलेला एक केक हळूच बाहेर काढला आणि अन्वयच्या मागून येऊन त्याचा पूर्ण चेहरा भरवला. आता अन्वयच्या चेहऱ्याचा कुठलाच भाग बाकी नव्हता. तो माकड दिसत होता. अन्वयला केक भरवताच अन्वयनेही सौरभ,विराज, संकल्पला केकने भरवले आणि जणू वेगळ्या प्रकारची होळीच सुरू झाली. आज मूल असो की मुली प्रत्येकालाच भरवल होत आणि रूममध्ये गोंधळ सुरू झाला होता. आज तो प्रत्येक व्यक्ती आपल्या कॉलेज जीवनाचे काही अमूल्य क्षण पुन्हा जगत होता तर स्वरा सृष्टीला हातात घेऊन तो नजारा बघर होती. ती त्यांना बघत होती आणि क्षणात तिला मधू, पूजा, कियारा सर्वाची आठवण झाली. किती सुंदर असते ना मैत्रीची दुनिया? एक वेळ अशी येते की आपण दूर होतो पण आठवणी कायम तशाच राहतात आणि पुन्हा भेटल्यावर अगदी समोर येऊन उभ्या राहतात. त्यांना सर्वाना बघुन स्वराच्या मनात तेच विचार येत होते. अन्वय तर किती खुश होता ह्याचा तिला अंदाजाही नव्हता. तो खुश होता आणि स्वराही सुखावली होती.

मुळात केक संपला आणि आता सर्व शांत बसले. काहीच क्षणात सर्व चेहरे धुवून पुन्हा हॉल मध्ये परतले. ते शांत बसलेच होते की संकल्प म्हणाला," गाईज इतने मेही थक गये क्या? अभि तो डान्स करणा बाकी है."

विराज त्याला उत्तर देत म्हणाला," भाई पागल है क्या? अभि तो पुरी रात बाकी है. अभि तो जलसा होगा जलसा."

विराजने धावतच जाऊन साऊंड ऑन केला आणि श्रीलेखाचा हात पकडत मधात घेऊन गेला. सेम सौरभनेही तेच केलं आणि आता प्रत्येक व्यक्ती मधोमध जाऊन डान्स करू लागला. स्वरा मात्र सृष्टीला पकडून आपली कोपऱ्यात उभी होती. स्वराला त्या सर्वाना धम्माल करताना बघूनच आनंद होत होता. अन्वयच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून स्वराला समाधान मिळत होता. ते सर्व डान्स करत होते आणि स्वरा म्हणाली," सृष्टी तुला करायचं आहे डान्स? बघ आई,बाबा,मामा, काका कसे डान्स करत आहेत. तू करणार डान्स?"

सृष्टी गोड हसली आणि स्वरा तिचा हात वर करून तिला डान्स करवू लागली. सृष्टी तिच्याकडे असताना अगदी गोड हसत होती आणि अन्वय स्वराला मध्ये यायला फोर्स करत होता. खर तर अन्वय सोबर डान्स करायची तिचीही खूप इच्छा होती पण आज स्वराने साडी नेसल्याने तिला डान्स करायला जमत नव्हतं. तिने इशारा करून अन्वयला सांगितले आणि अन्वयनेही समजून घेतले. श्वेताने म्हटले तसे आज ती खरच फायदा घेत होती. आज असा एक क्षण नव्हता जेव्हा तिची नजर अन्वयवर गेली नव्हती. स्वराला ते दिसत होतं पण आज तिला इर्शा झाली नव्हती. ती तिला हक्काने तिचे क्षण जगू देत होती. आज जवळपास दोन तास ते धिंगाणा घालत होते. शेवटी डान्स करून थकले आणि सर्वांनी जेवणाचे ताट धरले. अगदी गोल गोल खुर्च्या मांडून ते एकमेकांसमोर बसलेच होते की सौरभ म्हणाला," थॅंक्यु यार स्वरा!! आज इस बहाणेसे हम फिर कॉलेज के दिनो मे लौट गये. बिलकुल ऐसेही मस्ती किया करते थे हम. आज फिरसे वही चान्स मिला तो दिलं खुश हो गया. थॅंक्यु सो मच. फिरसे यादे ताजा कराने के लिये."

अन्वयही हसतच म्हणाला," और श्वेता को देखकर जो तेरी आंखे दिलं का हाल बया कर रही है उसका क्या केहना है सौरभ?"

संधीच्या शोधात असलेली श्रीलेखा म्हणाली," वो तो लॉटरी लग गयी अन्वय. पार्टी की पार्टी हो गयी और क्रशसे मुलाकातभी. इसलीये तो इतना उछल कुद कर रहा है. सिया को देखते वक्त ऐसा कभी दिखा क्या? केहता होगा घर की मुर्गी दाल बराबर. सही है ना?"

तीच उत्तर येताच अन्वय म्हणाला," देख लो सिया, कही तुम्हारा नंबर ना कट जाये. साहब के तेवर कुछ ठीक नही लग रहे है. इतना खुश तो मैने जिंदगी मे कभी देखा नही. देख लो अब तुम."

दोघेही त्याची खेचत होते आणि श्रीलेखा हळूच म्हणाली," अन्वय वो अभि कुछ नही बोलेगी. मेरे खयाल से उसका बेलन तयार है घर पे. उसीसे स्वागत करेगी सौरभ का. केह रही होगी अभि कर लो जो करणा है, घर पे चलो बादमे बताती ही कोण पटाखा दिख रही थि तो.."

श्रीलेखाना अन्वयला टाळी दिली आणि कुणीच हसण्यापासून स्वतःला थांबवू शकले नाही. अगदी सियाही हसत होती. त्यांचं हसन सुरूच झालं होतं की निहारिका म्हणाली," सौरभ भैय्या आपका समझ सकती हु लेकिन ये विराज भैय्या क्यू केह रहे थे की श्वेतासे पुछो उसकी शादी हुयी के नही करके?"

निहारिकाचा आवाज येताच विराजला खाता- खाता ठसका लागला. सौरभने त्याला पटकन धावत पाणी आणून दिले आणि विराज घाबरत म्हणाला," निहारिका बेटा क्यू आग मे घी डाल रही है. वो मुझे बेलनसे नही, सिधे बिल्डिंगसे फेक देगी. कुछ तो लिहाज कर मेरा. तू अपणे भाई को जिंधा नही देखणा चाहती क्या?"

सौरभ आता हसत म्हणाला," तू इतना क्यू डरता है यार श्रीलेखासे. बिवीही तो है मार थोडी डालेगी? बता उसको हम मर्द है, नही डरते किसिसे. आज बोलही दे."

विराजने हसतच उत्तर दिले," हा उसके बाद तू मजे लेगा मेरे. वो मारती जायेगी और सालो तुम विडिओ बनाके सबको दिखाओगे. समझता नही क्या मै? साला हर दोस्त कमीना हैं यहा!"

त्याच्या शब्दाने पुन्हा एकदा हसण्याच वातावरण निर्माण झाल होत आणि श्वेता बऱ्याच वेळाने म्हणाली," दीदी करणे दिया करो थोडासा एन्जॉय. क्यू उनपे गुस्सा करती हो इतना?"

श्रीलेखा आता जरा हसतच उत्तरली," हा बडी आयी करणे दो वाली. तुझे पता है मै इसे मेरी बेहन की शादी मे ले गयी थि. बंदेणे पुरे बारातकी लडकीयो के नंबर जमा कर लिये थे. सिर्फ मेरी बेहन को छोडकर. उसकी शादी ना होती तो ये उसे भी नही छोडता. तब से ना इसे ज्यादा आजादि नही देती हु. वैसे लव्ह मॅरेज का एक फायदा है, एखादं मार भी दु कोई कुछ केहता नही. ममी भी मुझेही सपोर्ट करती है. तो बेचारा वहा भी नही जा सकता. क्यू विराज करणी है मस्ती?"

विराज तिच्याकडे बघून गोड हसत होता आणि सेम भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होते.

श्रीलेखा हसतच होती की श्वेताने म्हटले," पर अन्वय- स्वरा एक्ससेप्शन है. वो बहोत प्यार करते है. मुझे नही लगता वो मारती होगी."

तीच बोलणं झालंच होत की रसमलाई खात निहारिका म्हणाली," ये सब अफवाहँ है श्वेता दि. मै तो कॉल पर बात कर रही थि तभी भाभीने भैय्या को दो लगाये थे पीठ पे और आप केहती है भाभी मारती नही. भैय्या भी डरते है भाभीसे सब लव्ह मॅरेज वालो की यही दशा है. समझें?"

आता सर्व स्वराकडे बघत होते. स्वराच्याही चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल तेवढ्यात सौरभ म्हणाला," श्वेता शादी अरेंज, लव्ह ऐसी कुछ नही होती. घर पर हमे भी पडती ही है बस किसीं को बता नही सकते. घर से निकलना थोडी है हमे सबको बताके. क्यू सिया?"

सौरभ बोलताच सियाने मान खाली टाकली. आज सर्व एकमेकांची मज्जा घेत होते आणि रूममध्ये हसण्याच वातावरण निर्माण झाल. थोडा वेळ जरा आता वातावरण शांत झाल होत तेव्हाच सौरभने संकल्पला डोळा मारला आणि सौरभने हळूच विचारले," हमारा तो ठीक है श्वेता की तुम्हे देख रहे है ये सब को पता है लेकिन तुम बताओ आज भी अच्छा लगता है अन्वय को लाइन मारणा."

त्याच बोलणं ऐकू येताच तिला ठसका लागता लगता वाचला. तिच्याकडे सर्व बघत होते अगदी स्वराही. श्वेताने क्षणभर अन्वयकडे बघितले आणि हसतच उत्तरली," क्रश कितने सालो बाद भी दिखे, उसे देखणे का मजा कुछ खासही होता है. हो सकता है कुछ सालो बाद मेरे हाथो मे दो बच्चे हो उसके बाद भी अन्वयको देखणे के बाद दिलं मी तो गीतार बजेगी ही. इंसान बुढे होते है सर, प्यार तो हमेशा जवा होता है. आज क्या मै तो इसपर बुढापे मे भी लाइन मारणे वाली हु."

तीच उत्तर आलं आणि सर्व स्वराकडे बघू लागले. स्वराने सर्व ऐकलं आणि समोर जाऊ लागली तेवढ्यात श्रीलेखा म्हणाली," लगता है झाडू लाने जा रही है स्वरा. बेटा श्वेता अब तेरा कुछ नही हो सकता."

स्वराने ते ऐकलं आणि हसतच म्हणाली," क्या दीदी आप भी. मै तो पाणी लाने जा रही थि."

तीच बोलन झालंच होत की सौरभ म्हणाला," तो क्या उसे लाइन मारने दिया जाये?"

सर्व स्वराच्या तोंडाकडे बघत होते. स्वरा शांतपणे उभी होती आणि सर्व हसू लागले. आजच वातावरण खरच खूप सुंदर होत. सर्विकडे नुसतं हास्यमय वातावरण निर्माण झाल होत आणि सर्वात खास म्हणजे अन्वयच्या चेहऱ्यावर आनंद सामावत नव्हता आणि स्वराचा चेहरा आणखिच खास भासू लागला. हसता- हसता, गप्पा मारताना आजचा दिवस कसा गेला कुणालाच कळला नाही. सर्व घरी गेले होते पण चेहऱ्यावर सुंदर हसू आणि मनात सुंदर आठवणी घेऊन.

ती रात्रीची वेळ होती. अन्वय- स्वरा एकमेकांच्या कुशीत झोपले होते आणि अन्वय म्हणाला," थॅंक्यु स्वरा! आज खरच खूप सुंदर क्षण होता माझ्यासाठी. कितितरी दिवसांनी अस मनमोकळं जगलो. खरच थॅंक्यु."

स्वराने हलकेच त्याच्या कपाळावर ओठ टेकवले आणि त्याचे केस विखरत म्हणाली," एनीथिंग फॉर यु माय लव्ह. बर ते सोडा. मला सांगा की तुम्हाला गिफ्ट काय हवंय माझ्याकडून? आज बायको म्हणून गिफ्ट देईन तुम्हाला."

अन्वय हसतच उत्तरला," दिलास ना ड्रेस मग आता आणखी काय हवं असणार. तू आहेस माझ्या आयुष्यात खूप आहे बाकी मला काहीच नकोय. अगदी काहीच नकोय."

स्वरा हसतच उत्तरली," ते नाही. ते तर सहजच दिलं. अस गिफ्ट जे माझ्याशिवाय कुणिच नाही देऊ शकत."

अन्वय क्षणभर विचार करत म्हणाला," एक मुलगी. अगदी तुझ्यासारखी. गोड, सुंदर आणि सर्वांची काळजी घेणारी. देशील?"

स्वरा लाजतच म्हणाली," हे काय मागण झालं. मी तर केव्हाच तयार आहे. तुम्ही सांगा करायचं का प्लॅन?"

अन्वयही हसतच म्हणाला," करूया पण आता नाही. आता केलं ना तर ती येईल आणि मग मला रोमांस करायला वेळ मिळणार नाही. नको बाबा ती एवढ्या लवकर. ती आली की तुझा पूर्ण वेळ तिचा मग मी काय करू?"

त्याचे शब्द ऐकताच स्वरा क्षणभर हसतच राहिली आणि अन्वय जरा सिरीयस होत म्हणाला," स्वरा आपल्याला पहिलं बाळ झालं ना त्यानंतर आपण एक मुलगी दत्तक घेऊ. अशी गोरीगोमटी चेहऱ्याने सुंदर नको. मनाने सुंदर असावी. घेऊया दत्तक. तुला चालेल?"

स्वरा त्याच्या गालावर किस करत म्हणाली," माझ्या मनातल बोललात बघ. नक्की घेऊ. ती ना आपल्यावर खूप प्रेम करेल मला खात्री आहे. आपण एका स्वराला पुन्हा जीवन देऊ. तिला कधीच कुणाची कमी पडणार नाही इतकं प्रेम देऊ. तिला इतकं मोठं बनवु की लोकांनी तिच्या चेहऱ्यावर नाही तर मनावर प्रेम केलं पाहिजे."

अन्वय-स्वरा बोलता बोलता आपल्या स्वप्नात हरवले होते. अस स्वप्न जे त्यांना कायम खुश ठेवत होत. आयुष्यात कितीही दुःख असले तरीही..

जरुरी नही के सुंदर चेहरा हर मर्ज की दवा हो
कभी कभी सुकून पाने के लिये सुंदर मन की जरूरत पडती है...