Bhagy Dile tu Mala - 84 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ८४

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ८४

बरसो से सजाया था एक सपना
वो पलभर मे आज बिखर गया
तुमने हस कर टाल दिये जवाब
और मैने तेरी आंखो मे सब पढ लिया...

स्वार्थ ह्या शब्दाने जणू आज ज्याच्या त्याच्या मनात गोंधळ घातला होता. अन्वय शांतपणे बाहेरच वातावरण बघत होता तर स्वरा शांतपणे अन्वयला बघत होती आणि तिसरीकडे अन्वयची आई आपल्याच विचारात हरवली होती. तिघ्याच्याही मनात एकच प्रश्न होता. स्वरा आईचा प्रश्न ऐकून विचार करत होती की जर तिने स्वतःचा स्वार्थ बघितला नसता आणि अन्वयसोबत आयुष्य जगायला आतुर नसती तर कदाचित अन्वय- आईच्या नात्यात आज दुरावा आला नसता पर्यायाने आईची आज अशी स्थिती नसती. दुसरीकडे अन्वयच्या आईला विचार येत होता की अन्वय म्हणाला खरच तसच होईल का कारण मला तर ती सून म्हणून मुळात मान्य नाहीच आणि का मी तिच्यामुळे माघार घ्यावी? माझा अधिकार आहे माझ्या मुलावर आणि स्वरा गेल्यावर अन्वयला माझी इच्छा पूर्ण कर म्हणणं कुठेच चुकीच नाही तर तिसरीकडे होता अन्वय. जो ह्या दोघांमध्ये उभा होता आणि आईचा प्रश्न ऐकून सतत हसत होता. त्यालाही क्षणभर वाटून गेलं होतं की का आपण तिला इथे बंदिस्त करायला आणलं, लोकांची बोलणं खायला आणलं, कदाचित मीच परत मुंबईला गेलो नसतो तर स्वरा आज स्वयमसोबत खुश तर असती. तिला घरातूनच तर यातना मिळाल्या नसत्या. आनंदात असताना स्वार्थाचा मोह कुणाला आवरता येत नाही पण जेव्हा आपल्या स्वार्थामुळे कुणाला त्रास होत आहे हे समजत तेव्हा स्वार्थ हा किती त्रास देतो ह्याचा अनुभव स्वरा-अन्वयला येत होता..

आज तिघेही स्वार्थ ह्या विषयावरच विचार करत होते. सोपं नव्हतं त्यातून बाहेर पडण कारण आईच्या प्रश्नाने जवळपास हे पक्क झालं होतं की ती स्वराला कधीच स्वीकारणार नाही त्यामुळे पुढे काय ह्या प्रश्नाचा विचार अन्वय सतत करत होता पण त्याहीपेक्षा एक विचार त्याला जास्त त्रास देत होता. एखादं नात तोडून कुणी नवीन नात जोडायला कस सांगू शकत? तेही स्वतःची आई. राग असेल मान्य आहे पण कुणाच मन दुखावून स्वतःच मन खुश करणं कितपत योग्य? जर हे कुणी तिसर्यांने म्हटलं असत तर अन्वयच रुद्र रूप त्याला बघायला मिळाल असत पण त्याच्या स्वतःच्या आईने अस म्हटल्याने त्याला विचार येत होता. तो त्या क्षणी आईवर रागावू शकत तर नव्हता म्हणून त्याने हसण्यातून आपली चीड काढणे पसंद केले होते. स्वार्थ मनात एकदा बसला की त्याला समोर काहीच दिसत नाही ह्याचा प्रत्यय त्याला बऱ्यापैकी आला होता फक्त तो कुणाला काहिच बोलू शकत नव्हता. त्या रात्री किती वाजले होते माहिती नाही. अन्वय बाहेर बसूनच स्वतःला शांत करत होता तर स्वरा एकटक त्याच्याकडे बघत होती. दोघांनाही वाटत होतं की एकमेकांना होणाऱ्या त्रासाचे तेच जबाबदार आहेत. अस असताना मग दोघे स्वतःहून काही वेगळा तर निर्णय घेणार नव्हते ना??

मध्यरात्र उलटून गेली होती. अन्वय बेडरूमकडे जायला निघाला. अन्वय उठताच स्वरा पटकन बेडवर जाऊन पडली आणि झोपेच नाटक करू लागली. अन्वय क्षणात मध्ये पोहोचला. स्वराला शांत झोपलेलं बघून त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू परतल. तो तिला बघत- बघतच बेडवर पडला आणि हळूच तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाला," किती निरागस दिसतेस ना तू स्वरा झोपेत!! झोपेतही इतकं सुंदर कुणी कस दिसू शकत बर!! दिसू शकत, एकच ती म्हणजे माझी स्वरा. इतकी सुंदर की माझ्याकडे तिच्याबद्दल बोलायला शब्द नसतात. स्वरा तुला सांगू, हे जग ना तुला कधीच समजून नाही घेऊ शकत. मला कळत नाही की जी सुंदरता मी तुझ्यात बघू शकतो ते इतर लोक का बघू शकत नाही? ह्या स्वराला बघून कुणी बोलून दाखवाव की तू सुंदर नाहीस मग मानेन. सर्वाना कुरूप कुरूप बोलून दुखवायला जमत पण ह्या सुंदर स्वराला बघून कुणाला स्तुती का करावीशी वाटते नाही मला कळत नाही. असो...स्वरा तुला सांगतोय कुणी काहीही म्हणू दे पण तू त्यांचं मनावर घेऊ नकोस. तू अशीच कायम खुश राहा. मला तेच हवंय बाकी काहीच नको. मी म्हटलं तस मला खरच फरक पडत नाही कुणाच्या विचाराने पण खुश राहा कायम."

अन्वय आज जरा आज भावुक झाला होता. त्याने तिच्या कपाळावर किस केले आणि लाईट बंद करून झोपी गेला. त्याने लाईट बंद केला आणि स्वराचे डोळे उघडले..त्याने डोळे मिटले होते तर स्वरा त्याच्याकडे बघतच होती. क्षणभर तिला त्याचा आदरच वाटत होता. लोक त्याला काही ना काही सतत तिच्यावरून बोलत होते पण त्याने कधी ते दुःख तिच्यापर्यंत येऊ दिलं नाही आणि इतकं सर्व ऐकून तिच्यावर चिडण्याऐवजी तो आणखीच तिची जास्त काळजी घेत होता. त्याच्या प्रेमाने ती थोड्या वेळा आधी आलेले विचार क्षणात विसरली आणि त्याला घट्ट बिलगली. त्यानेही तिलाही मिठीत घेतले आणि दोघेही आपापल्या डोक्यातले विचार बाजूला सारून झोपी गेले. आजची रात्र निघाली तर होती पण उद्याची रात्र काय घेऊन येणार ह्याबद्दल त्यांना विचार येत नव्हता. पण ते काहीच क्षण असणार होत कारण दोघांनाही जवळपास अंदाज आलाच होता की इतर गोष्टी जशा शाश्वत नाहीत तसच त्यांचं नातही होत. त्यांचं स्वप्न पूर्ण करायला काही लोकांची सहमती हवी होती, कदाचित ती नसती मिळाली तर ते नात......???

किसीं के अल्फाज सूनकर
किसीं को जज किया नही करते
जो मोहब्बत करते है वो
बिच मे साथ छोडा नही करते...

*********

तो क्षण होऊन जवळपास २ दिवस गेले होते. आज आईला बर वाटत होत. आईने आज स्वयंपाक देखील स्वतःच बनवला होता त्यामुळे अन्वयला जरा बर वाटत होतं पण ह्या दोन दिवसात तो बराच शांत झाला होता. एक क्षण असा होता की आई त्याच्याशी बोलायला तयार नव्हती तर आता प्रत्येक वेळी तिच्या शब्दातुन अन्वय घायाळ होत होता. आईच्या नजरेत,तिच्या शब्दात त्याला काही असे प्रश्न दिसत होते जे त्याला मनातून तोडत होते. गेले दोन दिवस अन्वय घरीच होता पण त्याची आईच्या रूममध्ये जायची हिम्मत होत नव्हती कारण ती त्याला जे प्रश्न विचारत होती त्याची उत्तरे त्याच्याकडेच नव्हती म्हणून तो विचारात पडला होता. तरीही स्वरा सोबत असताना त्याने क्षणभरही ते आपल्या चेहऱ्यावर जाणवू दिलं नव्हतं. बाकी तो आपल्याच विचारात हरवला जायचा. काय होत ह्या दोघांचा मध्य? नक्की काय करायला हवं होतं हा प्रश्न त्याला सतावू लागला पण त्याच्याकडे त्याच उत्तर नव्हतं. तो नकळत विचारात हरवत गेला आणि अन्वय-स्वराच्या भविष्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभ झालं. अस प्रश्नचिन्ह जो तो स्वतः प्रयत्न करूनही त्याला दूर सारू शकत नव्हता. कदाचित नियतीला जे मान्य होत तेच त्यालाही स्वीकारावं लागणार होत. तो हतबल झाला होता. म्हणतात वेळ बदलायला वेळ लागत नाही. एक वेळ माझं भविष्य मी लिहितो म्हणणारा अन्वय भाग्याच्या भरवशावर अवलंबून राहील अस कुणाला स्वप्नांत देखील वाटलं नव्हतं पण सत्य हेच होत की तो मधून हरत चालला होता. जगासमोर क्षणभर न डगमगनारा तो घरच्यांसमोर इतका हतबल होईल त्यालाही वाटलं नव्हतं पण सत्य तेच होत.

अन्वय ज्या स्थितीतून सध्या जात होता त्याच सेम परिस्थितीतुन स्वराही जात होती. ती अन्वय समोर नॉर्मल असल्याच भासवत तर होती पण तिच्याही मनात प्रश्नाचं काहूर माजल होत कारण आईच्या त्या प्रश्नाच उत्तर खुद्द स्वराकडे नव्हते तर अन्वय नक्की काय उत्तर देणार होता. तीही आपल्याच विचारात हरवली होती आणि नकळत का होईना अन्वयला दुखावत असल्याची ती बोच तिच्या मनात तशीच राहिली. ते एकमेकांसोबत असताना वेगळेच जीवन जगायचे पण एकट्यात असताना त्यांना खऱ्या अर्थाने आव्हानाची कल्पना येत होती. सजवलेली सर्व स्वप्न अंधारात हरवताना दिसत होती आणि कदाचित एकच प्रश्न दोघांच्याही मनी असावा की आपलं आयुष्य नक्की काय वळण घेणार आहे. आपण घेतलेला निर्णय शेवटपर्यंत निभावू शकू की आपल्याच लोकांसाठी आपल्याला एकमेकांची साथ सोडावी लागेल. प्रश्न गहन होता आणि उत्तर कुणाकडेच नव्हतं. कुणाकडेच नव्हतं.

ती त्याच दिवसाची सायंकाळ होती. आई आता पूर्णपणे बरी झाली होती. अन्वयच्याही डोक्याला प्रश्न त्रास देते होते म्हणून तो उद्यापासून पुन्हा ऑफिस जॉईन करणार होता. तेवढ्या वेळ का होईना त्याला शांती मिळणार होती आणि ह्यातून काहीतरी मार्ग काढायला तो पुढचा विचार करू शकणार होता. अन्वय हॉलमध्ये एकटाच बसला होता. बाबा बाहेर फिरायला गेले होते. तो स्वराला आणायला ऑफिसला जाणार होता पण ती आज दुपारीच आईकडे गेली असल्याने तो तिला न्यायला गेला नव्हता. त्याला बसून- बसून कंटाळा आलाच होता की तो टीव्हीसमोर बसला आणि क्षणात समोरून कुणितरी येताना दिसलं..त्याची नजर समोर गेली आणि निहारिकाने त्याला धावतच मिठी मारली. अन्वय तिला बघून थोडा खुश झाला होता. निहारिकाने त्याला हग करतच म्हटले," बाबाने आजच सांगितलं आईला बर नाही ते तेव्हा म्हटलं जाऊन येऊ. बघू तरी तिला. आई कशी आहे रे दादा?"

ती मिठीतुन बाहेर आली आणि अन्वय हसतच म्हणाला," मला काय विचारते आहेस, भेटायला आली आहेस ना तिला. जा भेट मग आणि विचार स्वतःच."

निहारिका गालातल्या गालात हसत समोर गेली आणि मागून शरद येताना दिसला. आज शरद सोबत त्याची आई देखील आली होती. आईला बघताच अन्वय हसत- हसत म्हणाला," या न आई. बसा.."

शरदने त्याला हात मिळवीतच म्हटले," दादा आपण नंतर बोलू. आधी सासूबाईला भेटून येतो. नाही तर ओरडणार माझ्या नावाने. तुला माहिती आहे ना त्यांचा स्वभाव."

अन्वय क्षणभर हसला आणि शरद सरळ बेडरूमकडे निघाला. अन्वय देखील पुढच्याच क्षणी किचनमधून पाण्याचा ग्लास आणत, शरदच्या आईच्या हातात देत म्हणाला," कशा आहात आई? तब्येत वगैरे काय म्हणते? खूप दिवस झाले आपली भेट नाही झाली. बर झालं तुम्ही आलात भेटायला. तुम्हाला भेटून आनंद होतोय."

अन्वय हसतच बोलून गेला आणि शरदच्या आई हसतच उत्तरल्या," मला काय होणार अन्वय. मी मजेत आपली. जगते कशी बशी. आज विहिन बाईची तब्येत बरी नाही कळलं म्हणून आले भेटायला. बर नाही वाटत ना माहिती होऊनही भेटायला नाही आलं तर."

आईने पाण्याचा ग्लास घेतला तर अन्वय त्यांच्याकडे हसून बघत होता. आईने पाण्याचा ग्लास तर घेतला पण त्या इकडे तिकडे बघत होत्या हे त्याच्या नजरेतून सुटलं नाही तरीही त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत त्यांच्या हातातून श्रुष्टीला घेतले आणि तिच्या गालावर किस्सी करत म्हणाला," किती दिवस झाले ना तुला बघून वेडोबा. मस्त दिसते आहेस हा. माझी आठवण आली ना तुला? मी तर खूप मिस केल तुला. कसा आहेस तू??"

त्याने तिला किस्सी केली. श्रुष्टीचा चेहरा बघताच त्याचा कंटाळा कुठेतरी दूर पळाला आणि विचारही क्षणात गायबच झाले. अन्वय सृष्टीला खेळवत होता त्यामुळे त्याच लक्ष दुसरीकडे गेलं नव्हतं. खेळवता- खेळवता अन्वयच लक्ष पुन्हा शरदच्या आईकडे गेलं. त्यां आधी किचनमध्ये डोकावून बघत होत्या तरं नंतर त्या त्याच्या बेडरूममध्ये डोकावून बघू लागल्या. त्यांना बघून आईच नक्की काय सुरू आहे समजत नव्हतं म्हणून हसतच त्याने म्हटले," आई ती माझी रूम आहे, माझ्या आईची रूम समोर आहे. तुम्हाला भेटायच असेल तर जाऊन भेटून घ्या त्यांना."

शरदच्या आई काहीच बोलल्या नाहीत. त्या शांतपणे येऊन सोफ्यावर बसल्या. त्यांचं नक्की काय सुरू आहे अन्वयला कळत नव्हतं म्हणून तो हसून त्यांच्याकडे बघत होता. काही क्षण त्यांनी कसला तरी विचार केला आणि हळूच हसत म्हणाल्या," काय रे अन्वय!! आम्हाला काहीच दिवसात परक केलंस ना? लग्न केलंस आणि आम्हाला कळवल पण नाहीस. साधे कपडे सुद्धा घेतले नाहीस, कपडे तर सोडा पण तू लग्नाचं सुद्धा कळवल नाहीस आणि बातमी मिळाली ती बाहेरच्यांकडून. ह्याला काय म्हणायचं बर? तुला बोलवायच नव्हतं का आम्हाला?"

अन्वयला त्या आल्या तेव्हाच हा प्रश्न अपेक्षित होता फक्त त्या किचन बेडरूममध्ये काय शोधत होत्या हे समजायला जरा वेळ लागला होता. अन्वयने अगदी हसत-हसत म्हटले," कस विसरणार तुम्हाला आई? मी ना पळवून आणलं मुलीला मग सर्वाना कस बोलावणार होतो म्हणून कुणाला बोलावू शकलो नाही. साडी वगैरे काय ते तर आता पण घेऊ शकतो आई. त्याला वेळ थोडी लागतो. म्हणत असणार तर आता चला. हव्या तेवढ्या घ्या. तुम्हाला कुणी अडवलं बर?"

अन्वयला त्यांच्या मनात नक्की काय सुरू आहे ह्याचा अंदाज आला होता म्हणून जाणूनच त्याने अस उत्तर दिलं होतं पण त्या थांबणार नाही हे त्यालाही माहीत होतं म्हणून चेहऱ्यावर हसण्याचे भाव आणत तो त्यांच्याकडे एकटक बघत राहिला. अगदी काही क्षण गेले आणि त्या म्हणाल्या," पण अन्वय आम्ही तर वेगळंच काही ऐकलं. तुला खोटं ठरवायच नाहीये पण लोक म्हणतात तस."

अन्वयने हसतच विचारले," काय म्हणतात लोक?"

आईने हसतच म्हटले," हेच की तू कोर्ट मॅरेज केलंस आणि तुझ्याच लग्नाला तुझ्याच घरचे नव्हते. मी निहारिकाला विचारलं पण तिने मला काहिच सांगितलं नाही म्हणून म्हटलं लोकांचं ऐकण्यापेक्षा तुलाच विचारावं. बरोबर आहे का रे अन्वय मी ऐकलेले?"

अन्वयच्या चेहऱ्यावर आता मिश्किल हसू आलं होतं आणि तो हळुवार शब्दात म्हणाला," हो खरय आई. घरच्यांना नव्हती पसंद मुलगी म्हणून कुणीच नाही आले. माझ्या काही मित्रांच्या समवेतच लग्न झालं."

शरदच्या आई आता जरा मोठ्यानेच म्हणाल्या," काय? विश्वासच बसत नाहीये मला माझ्या कानावर. जो मुलगा आईच इतकस बोलणं टाळत नाही तो स्वतः त्यांच्या विरोधात गेला. आई रागावली नाही का रे तुला? इतकं मोठं धाडस केलंस ना म्हणून विचारतेय हा? त्या रागावल्या नाहीत इतकं होऊनही?"

अन्वयही हसतच म्हणाला," रागावणार का नाही? लाडक्या मुलाने तीच ऐकलं नाही तर रागही तेवढाच यायला हवा ना तिला. बरोबर न आई?"

आईने जरा चेहऱ्यावरच हसू नाहीस केलं आणि उदास स्वरात म्हणाल्या," हा ते आहेच. त्यांचं नाक तर समाजात खालीच झालं असेल. काय नाक दाखवतील त्या आता समाजात मग राग येन स्वाभाविक आहे. असतात कुणकुणाची कर्म काय करणार? ज्यांच्या नशिबात जे असत तेच त्यांना मिळत. तुझ्या आईच्या नशीबात नव्हती त्यांच्या पसंतीची मुलगी म्हणून नाही मिळाली."

अन्वयला ह्याच शब्दांची प्रतीक्षा होती. त्या मुळात विचारपूस करायला आल्या नव्हत्या, त्या तर आईला नीचा दाखवायला आल्या होत्या हे त्याला माहिती होत म्हणून तो पूढे काहिच बोलला नाही. त्याने पूर्ण लक्ष श्रुष्टी सोबत खेळण्यात घालवले आणि शांत बसलेल्या पुन्हा आई म्हणाल्या," बर अन्वय आईने लग्नाला का नकार दिला रे? म्हणजे दुसऱ्या जातीची वगैरे आहे का? पण त्याला काय होतंय? आपण कुठे मानतो जात- पात तेव्हाच तर शरद- निहारिकाच लग्न सुद्धा झालं ना? मग काय असावं बर कारण? मला तर काहीच समजत नाहीये बाबा? आता हेदेखील तूच सांग."

शरदच्या आई नौटंकी करण्यात उस्ताद होत्या. त्यालाही समजलं की ह्या हात फिरवून घास घेत आहेत. त्यांना त्याच्याच तोंडून त्यांच्या घरातले वाद ऐकायचे होते पण अन्वयचा स्वभाव आधीच शांत असल्याने तो त्याना उलटून बोलणार नव्हता. त्याने हसतच उत्तर दिले," तस तुम्हाला लोकांच्या बोलण्यातून ऐकायला आलंच असेल तरीही सांगतो. ती ऍसिड अटॅक पीडित आहे. आईला सुंदर मुलगी हवी होती म्हणून मग तिला स्वीकारण्याचा प्रश्नच येत नव्हता. हेच कारण आहे की घरून कुणीच आले नव्हते आणि मी कुणाला बोलावू शकलो नाही."

अन्वय बोलतच होता की शरद- निहारिका बाहेर आले आणि आई हळूच हसत म्हणाल्या," अन्वय येते मी लता ताईना भेटून."

शरदच्या आई तडका- फडकी मध्ये गेल्या आणि निहारिकाने त्याच्या जवळ येत विचारले," काय म्हणत होत्या आई? आम्ही येताच शांत का झाल्या?"

अन्वयने हसतच म्हटले," गप्पा मारत होतो ग. तस पण तुझ्याबद्दल बोलत होतो म्हणून त्या समोर बोलल्या नाही. चालायच्याच गप्पा. तू नको पडूस मध्ये आमच्या."

अन्वय हसतच होता की निहारिकाने विचारले," बर ते सोड मला सांग वहिनी कुठे आहे? मी तिलाच भेटायला आले आहे आणि आज तीच गायब. एव्हाना ऑफिसवरून यायला हवं होतं ना तिने. कुठे आहे ती??"

स्वराला भेटण्याचा तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह बघून अन्वय म्हणाला," अग ती आईकडे गेली आहे. मला मॅसेज आला होता. येईल ती एखाद्या तासात. थांबा आजची रात्र. तिच्याशी भेटताही येईल आणि सोबतच जेवण पण करू मिळून."

निहारिका हसतच म्हणाली," मला चालेल. वहिनी सोबत गप्पा मारेल मी मस्त. शरद चालेल ना तुम्हाला?"

शरद हसतच म्हणाला," हो बाबा. कधी नाही म्हटलं का तुला?"

त्याच उत्तर येताच अन्वय म्हणाला," बघ मला म्हणतेस बायकोचा गुलाम आणि शरद कोण आहे?"

निहारिका त्याच बोलणं ऐकून हसलीच होती की शरद त्याच्या जवळ जात म्हणाला," माझी अवस्था त्यापेक्षा वाईट आहे दादा. मी तर नौकर आहे त्या घरात. आईच ऐकलं की बायको चिडते आणि बायकोच ऐकलं की आई. तू अंदाज पण लावू शकत नाहीस किती छळ करतात ह्या माझा."

त्याचे शब्द येतात निहारिकाने त्याला धपाटा मारला आणि सर्वच हसू लागले. त्यांच्या येण्याने घरातल वातावरण जरा मस्त झाल होत आणि अन्वय हळुवार आवाजात म्हणाला," निहू, श्रुष्टी झोपली बघ अंगावरच माझ्या. जा हिला झोपव माझ्या रूममध्ये."

निहारिकाने क्षणात तिला हातात घेतले आणि त्यांच्या बेडरूममध्ये झोपवायला घेऊन गेली.

जवळपास एक ते दीड तास झाला होता. आईची तब्येत बरी नसल्याने स्वयंपाक बनवायची जबाबदारी निहारिकाने स्वतःवर घेतली होती तर बाकी सर्व हॉल मध्ये बसले होते. बाबा, शरद आणि अन्वयच्या गप्पा बऱ्याच रंगात आल्या होत्या तर अन्वयच्या आई आणि शरदच्या आईही थोड्या फार गप्पा मारत होत्या. वातावरण अगदीच प्रसन्न वाटत होतं. तेवढ्यात घाईघाईने स्वरा मध्ये येताना दिसली. तिला यायला उशीर झाल्याने ती पटापट घरात येण्याचा प्रयत्न करत होती. तिने धावतच दार ओलांडले आणि अचानक मध्ये थांबली. तिच्याकडे सर्व एकटक बघत होते आणि काहीशी तीच अवस्था होती. ती सर्वाना बघून थोडी घाबरली होती. स्वराने अन्वयकडे लक्ष दिले. शरदचा चेहरा समोर दिसताच तिला बऱ्यापैकी कल्पना आली आणि ती थोडी रिलॅक्स झाली. ती बघतच होती, अन्वय सर्वांची ओळख करून द्यायला उठणारच की शरदच्या आई म्हणाल्या," लता ताई खरच लोक म्हणतात तेवढीच सुंदर आहे तुमची सून. कुठून शोधली हो ही चंद्राची कोर? इतकी प्रकाशमान की सर्वाना सेकंदात प्रकाशमान करेल. पण लता ताई का लपवून ठेवल हो तुम्ही हिला? दाखवायच की जगाला किती सुंदर सून शोधली आहे ते. तुम्ही म्हटलं होतं ना तस सगळ्यांना मग दाखवायच की जगालाही तर कळायला हवं ना किती सुंदर सून शोधून आणलीत तुम्ही. हिला लपवून ठेवून बरोबर नाही केलत हा तुम्ही."

त्यांचे शब्द येताच अन्वयच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. त्याला त्यांचा क्षणभर राग आला होता पण त्याने मूठ आवळून घेतली. पुढच्याच क्षणी आपल्या रागातून बाहेर येत त्याने स्वराकडे बघितले. ती नेहमीप्रमाणे मिश्किल हसत होती पण तिला त्रास झाला होता हे अन्वयला समजायला वेळ लागला नव्हता. तो तिच्याकडे एकटक बघत होता. अन्वयच्या आईने त्यांना काहीच उत्तर दिल नाही आणि पूर्ण वातावरण शांतच राहील. स्वराला नक्की काय बोलू समजत नव्हतं म्हणून ती पुतळ्यासारखी तिथेच उभी होती. अन्वयला तिची स्थिती समजली आणि चेहऱ्यावर खोट हसू आणत अन्वय म्हणाला," स्वरा तू फ्रेश हो. मी चहा घेऊन येतो तुला. बाकी सर्व नंतर बोलू. जा पटकन थकून आकी असणार ना??"

स्वराने मिश्किल हसू ओठावर ठेवत बेडरूम गाठली तर अन्वय तिच्यासाठी चहा बनवायला किचनमध्ये पोहोचला. किचनला गेल्यावर त्याचा जरा राग शांत झाला होता. त्याला कुणी काहीही बोललं तरी तो सहन करू शकत होता पण स्वराला कुणी काही बोलल तर त्याला नक्कीच आवडणार नव्हत पण तो शरदच्या आईवर रागावू सुद्धा शकत नव्हता म्हणून चहाचा बहाणा बनवून तो किचनमध्ये आला. त्याला चहा बनविताना बघून निहारीकाने विचारले," दादा आता चहा? इतक्या उशिरा? जेवण बनवते आहेस थांब ना. पटकन होईल बघ, मग तुला वाढते सर्वात आधी."

अन्वय हसतच उत्तरला," अग मला नकोय. स्वरासाठी आहे. स्वरा गेली आहे फ्रेश व्हायला म्हणून चहा बनवतोय. रोज ती बनवते म्हटलं आज आपण बनवूया, थोडस फ्रेश फिल करेल ती."

निहारिका हसतच उत्तरली," नॉट बॅड हा दादा!! सर्व पुरुषांनी अस असायला हवं. प्राउड ऑफ यु!! तू इथे आहेस तर बघ ना सर्व, मी जाऊन येते तिला भेटायला. किती उत्सुकता आहे तिला बघायची माहिती आहे तुला."

ती जाणारच की अन्वय तिचा हात पकडत म्हणाला," ती आताच आली आहे जरा शांत पडू दे, तिला भेटायला पूर्ण रात्र पडली आहे. भेट नंतर. आज पूर्ण वेळ तुझ्याकडे सोडेल तिला मग तर झालं?आणि स्वयंपाक बनव आधी नाही तर सासूबाई ओरडायची तुझी. माहिती आहे ना कशा आहेत त्या? थोडाही उशीर झाला तर आपल्या घराचा उद्धार करायला मागे पुढे बघणार नाहीत. हिटलर सासू!!"

निहारिकाला त्याच बोलणं ऐकून काही क्षण हसू आवरल नव्हतं. आता दोघेही किचनमध्ये हसत- हसत काम करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलंच होत की शरदच्या आईचा आवाज आला, तो इतका मोठा होता की घरात काही क्षण सन्नाटा पसरला होता. त्या म्हणाल्या," मूर्ख मुली तुला कुणी सांगितलं हिला हातात घ्यायला. स्वतःचा नाही पण ह्या लहान मुलीचा तरी विचार करायचा होतास. काही अक्कल वगैरे आहे तुला की बाजारात विकली आहेस? विकली असेल म्हणा तेव्हाच तर सासू बोलत नाही तरी घरात ठाण मांडून बसली आहेस."

त्यांचा आवाज येताच अन्वय- निहारिकाने पटकन गॅस बंद केला आणि धावतच पळाले. शरद, आई, बाबा अन्वयच्या बेडरूमकडे गेले म्हणून निहारीका- अन्वयही बेडरूमला पोहोचले. मध्ये पोहोचताच त्यांना जाणवलं की स्वरा सृष्टीच्या बाजूला उभी आहे आणि सृष्टीला शरदच्या आईने हातात धरले आहे. त्यांना काहिच समजत नव्हतं आणि निहारिकाला बघताच शरदच्या आई म्हणाल्या," अशी कशी ग निहारिका तू? स्वतःच्या मुलीला नीट सांभाळता येत नाही का तुला? तुला नव्हतं बघता येत हिला तर माझ्याकडे घ्यायच होत. तुला अंदाज आहे का ते लहान पोर हिचा चेहरा बघून किती घाबरल असत? ही सृष्टीला हातात घेत होती. तिला काही झालं असत तर नक्की जबाबदार कोण असत? ह्यांनी तर हात वर केला असता? ह्याचं काय जाणार होत? तुलाही कळत नाही का सृष्टीला दूर ठेवावं हिच्या म्हणून. इथे मलाच तिचा चेहरा बघून उलट्या व्हायला आल्या आहेत. ह्या लहान मुलीचे काय हाल झाले असते कळत नाही का तुला? बर झालं मी आले नाही तर.. काय ग एवढं पण कळत नाही का तुला? चेहरा तर खराब आहे निदान मन तरी मोठं ठेवायचं? काय करावं आणि काय नाही ते देखील समजत नाही का?"

त्या एका श्वासात सर्व बोलून गेल्या. अन्वयच अजिबात त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. त्याची नजर तर स्वरावर स्थिरावली होती. स्वराचा चेहरा फार उतरला होता. तिला कदाचित रडायचं होत पण तिने अश्रू थांबवुन घेतले होते. अन्वयला त्यावेळी किती राग येत होता त्याच त्याला माहिती पण त्याने राग कंट्रोल केला..निहारिका समोर आईला बोलणारच होती पण त्यानेही तिला बोलू दिले नाही. अन्वय काही क्षण स्वराला बघत तिथेच पुतळ्यासारखा उभा होता. हळूहळू सर्व बाहेर गेले फक्त निहारिका सोडून पण तिला जाणवलं की ह्याक्षणी त्यांना एकट सोडणे गरजेचे आहे म्हणून तीही बाहेर पडली आणि आता उरले ते दोघे एकमेकांसोबत. काही क्षण ते एकमेकांना बघत होते. स्वराच्या चेहऱ्यावर हसू होत पण तिच्या नजरेत तिला काय वाटत होतं हे अन्वय साफ बघू शकत होता आणि बाकी समोर बोलायची गरजच उरली नाही.

अगदी काहीच मिनिटांचा कालावधी गेला. अन्वय बेडरूममधुन स्वराचा हात पकडतच बाहेर पडला. हॉल मध्ये येताच सर्वांकडे बघत तो शरदच्या आईला म्हणाला," आई सॉरी, मला नव्हतं माहिती तुम्हाला तिचा इतका त्रास होईल नाही तर आज घरी बोलावंलच नसत, तिच्या आईकडेच थांबायला लावलं असत. हरकत नाही, आताही वेळ गेला नाही. तुम्हाला उलट्या होतात ना तिला बघून सो नाही राहणार क्षणभरही ती इथे. मी जातोय घेऊ घेऊन. निहू आईला जेवण केल्याशिवाय नको जाऊ देऊ. आपल्या घरी कुणीही आलं तर उपाशी पोटी जात नाही माहिती आहे ना तुला. तेव्हा त्यांना हवं नको ते बघ. त्यांचे छान आदरातिथ्य कर आणि निवांत सकाळी उठून घरी जा आणि आई पूढे कधी येणार असाल तर फोन करून ह्या म्हणजे मी आणि स्वरा बाहेर जाऊ कुठेतरी. तुम्हाला पुढे कधीच त्रास होणार नाही तिच्या चेहऱ्याचा."

अन्वयने स्वराचा हात पकडतच तिला बाहेर नेले आणि कार काढू लागला. स्वरा त्याच्याकडे एकटक बघतच होती की तो नम्रपणे म्हणाला," स्वरा मध्ये बस."

स्वरा बसलीच होती की निहारिका आणि शरद धावतच मागे आले. निहारीका ड्राइवर सिट जवळ जात रडतच म्हणाली," दादा कुठे जातो आहेस? अटलिस्ट जेवण तरी कर. मी आईकडून माफी मागते तुझी पण चल घरात. अस जाऊ नकोस. प्लिज मध्ये चल..प्लिज चल ना."

शरदही लगेच म्हणाला," दादा सॉरी रे!! आई अशी वागेल ह्याचा थोडा जरी अंदाज आला असता तर आणलंच नसत तिला. ती नाही बोलणार काही आता मी शब्द देतो तुला. पण अस रागावून जाऊ नकोस. प्लिज!!"

अन्वय हळूच गाडीतून उतरत म्हणाला," शरद सॉरी पण मी आता इथे नाही थांबू शकत. तू नाही समजू शकत का माझे भाव? मी सध्या काय फिल करतोय माझं मला माहित आहे आणि मला आता इथे वाद नकोत. शरद काही क्षण मला शांती हवी. प्लिज समजून घे ना मला!! प्लिज."

शरद त्याच्यापुढे काहीच बोलू शकला नाही आणि पुडच्याच क्षणी अन्वय निहारिकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाला," निहू भेटू आपण नंतर पण आता जाऊ दे मला प्लिज. इथे थांबलो तर प्रॉब्लेम होतील आणि मला वाद घालायचे नाहीत सो आज जाऊदे. भेटवतो तुझ्या वहिनीशी नंतर सॉरी!!"

अन्वय जसा गाडीतून उतरला तसाच पुन्हा बसला आणि गाडी सुरू करत भरधाव वेगाने पळाला. निहारिका- शरद त्यांना कितीतरी वेळ बघतच होते पण अन्वय काही थांबला नाही. निहारिकाच्या डोळ्यात आताही अश्रू होते तर शरदला नक्की काय बोलू तेच समजत नव्हतं. तो वेड्यासारखं त्यांच्या कारकडे बघत होता.

काही क्षण गेले. अन्वयने गाडीची स्पीड कमी केली आणि निवांत गाडी चालवू लागला. त्याच स्वराकडे लक्ष नव्हत पण स्वरा मात्र त्याच्याकडेच बघत होती. आज त्याच्या चेहऱ्यावरचे भाव स्वराच्या लक्षात येत नव्हते. त्याच्या चेहर्यावर राग होता की शांतता होती ते आज समजू पाहत होती. ह्याआधीही एकदा तो असच वागला होता. जेव्हा दीपिकाच्या वाढदिवसाला सर्वांनी तिला सोबत नेल नव्हतं. आजदेखील त्याच्या चेहऱ्यावर सेम भाव होता पण आज ती त्याच्याशी नजर मिळवायची पण हिम्मत करू शकत नव्हती. अन्वय तसा शांत पण रागावला की काय होत हे तिला ह्याक्षणी जाणवत होत. आज त्याच पूर्ण लक्ष समोर होत, त्याने एकदाही तिच्याकडे बघितले नव्हते म्हणून तीही त्यांच्याशी बोलायची हिम्मत गोळा करू शकली नाही. काही वेळ अशीच शांतता राहिली. आपण नेमकं कुठे जातोय हे तिला माहिती नव्हतं म्हणून हिम्मत करत तिने विचारले," अन्वय सर आपण कुठे जातोय?"

अन्वयने तिच्याकडे न बघताच उत्तर दिले," भूक लागली आहे ग. माझ्या आवडीच्या हॉटेलमध्ये जाऊ जेवायला. थोडा वेळ लागेल. पोहोचू लवकरच."

त्याच शॉर्ट अँड स्वीट उत्तर त्यांनतर पुन्हा एकदा कारमध्ये शांतता. स्वराला आज काहीच सुचत नव्हतं नाही तर त्याला हसवायला ती नक्कीच काहीतरी बोलून गेली असती पण आज त्याच्या स्वभावात काहीतरी वेगळंच होत त्यामुळे तिने गप्प बसण्यातच धन्यता मानली. आज त्याचा मूड असा होता की स्वरालाही क्षणभर त्याची भीती वाटू लागली होती. ज्या अन्वयच्या चेहऱ्यावर सतत हास्य असायचं तो इतका रागावणार अस तिला कधी स्वप्नांत पण वाटलं नव्हतं म्हणून ती त्याचा हा स्वभाव डोळ्यात साठवून घेऊ लागली.

जवळपास १५ मिनिट गेले जेव्हा अन्वयने कार थांबवली. तो उतरला आणि मागोमाग स्वराही उतरली. दोघेही सोबतच रेस्ट्रोरंटमध्ये जाऊ लागले. अन्वयने टेबल कुठे खाली असल्याची खात्री केली आणि जाऊन एका कोपऱ्यातल्या टेबलवर बसला. तीही त्याला न्याहाळतच समोर खुर्चीवर बसली. काहीच क्षणात तिथे वेटर आला. अन्वयने त्याला काय हवं ते मागवलं. स्वरानेही आपला ऑर्डर दिला आणि शांत बसली. ऑर्डर यायला वेळ होता म्हणून स्वरा अन्वयवर नजर टाकत होती. तो आज खूपच शांत जाणवत होता. ह्याआधी तिने त्याला एवढं शांत कधीच बघितलं नव्हतं एवढंच काय आताही त्याची नजर फोनमंध्ये होती ना की स्वरावर. सतत स्वराकडे बघून तिला लाजवून सोडणारा हाच अन्वय आहे आज ह्यावर स्वराला विश्वास बसत नव्हता. अगदी काहीच क्षणात ऑर्डर आला आणि अन्वयने मोबाइल बाजूला ठेवत जेवणावर लक्ष दिले. जेवतानाही तो काहीच बोलला नाही. त्याला कुणाचे तरी कॉल आले होते पण त्याने रिसिव्ह न करताच मोबाइल बंद केला होता. स्वरा त्याची प्रत्येक हालचाल बारीक नजरेने टिपत होती पण तिने त्याच्याशी बोलण्याची रिस्क घेतली नाही. जवळपास जेवण पूर्ण होईपर्यंत त्यांचं असंच वागणं सुरू होत. नेहमी हसत खेळत राहणाऱ्या जोडप्यामध्ये इतकी शांतता आलीय हे बघून स्वरा विचारात पडली होती.

*******

रात्रीचे १० वाजायला आले होते. अन्वयने पुन्हा एकदा कार एका जागी थांबवली आणि हळूच बाहेर उतरला. अन्वय नक्की कोणत्या जागी घेऊन आलाय म्हणून ती मधूनच बाहेरची जागा बघत होती. ती बाहेरच्या वातावरणात हरवली आहे, कारच्या बाहेर उतरत नाहीये हे बघून अन्वयनेच विचारले," उतरायचं नाहीये का स्वरा?"

तो स्वराकडे एकटक बघत होता आणि गोंधळून तिने विचारले," आपण इथे कुठे आलो? घरी जायचं नाहीये का आपल्याला?"

अन्वयच्या चेहऱ्यावर आता पहिल्यांदा स्माईल आली होती. त्याने तिच्या जवळ येत गाडीचे दार उघडले आणि हसतच म्हणाला," मॅडम हेदेखील आपलंच घर आहे फक्त तुला कधी सांगायची वेळ आली नाही. हे मी माझ्या पैशाने घेतलेल घर आहे. आज आपण ह्याच घरी रहायच आहे. बस थोडी शांती हवी मला म्हणून. चलायच ना?"

त्याच्या चेहऱ्यावर आलेली हलकी स्माईल बघून स्वराने समोर काहीच म्हटलं नाही. ती बाहेर निघाली आणि अन्वयने गाडीमध्ये असलेल्या पाण्याच्या बॉटल सोबत घेतल्या. स्वरा त्याची वाट बघत होती. अन्वय आता समोर झाला आणि धावतच जाऊन त्याने दार उघडले. स्वराही त्याच्या पाठोपाठ मध्ये आली. ती घर बघतच होती की अन्वय म्हणाला," हे आपलं घर. तसा मी वीकमध्ये एकदोनदा येत असतो इथे सो सर्व नीट आहे तरीही तू बघून घे. तुला काही कमी वाटत असेल तर मग चेंजेस करून घेऊ. आता येन जाण होतच राहील."

स्वरा घर बघत होती तर अन्वयने बेडरूममध्ये जाऊन रूम साफ करून घेतली..तस सर्व काही छानच होत फक्त थोडी फार धूळ होती त्याने ती साफ केली. स्वरा संपूर्ण घर बघतच बेडरूममध्ये पोहोचली आणि हसतच म्हणाली," मस्त आहे हो घर. छान सजवलंत तुम्ही. काहीच कमी नाहीये एकदम फर्स्ट क्लास!!"

अन्वयनेही हसतच म्हटले," हो माझ्या कमाईच आहे ना सो सर्व माझ्याच आवडीच आहे. तुला आहेत अधिकार ह्यात बदल करायचे. तुला हवं तेव्हा बदल करू शकते. तुझ्यासाठी इथे काहीच नियम नाहीत. अगदी सर्व चेंज केलं तरीही चालेल."

अन्वय तिच्याकडे हसून बघत होता तर स्वरा त्याच्याकडे बघून मिश्किल हसली आणि अन्वय पुन्हा म्हणाला," ते नंतर. आता कपडे चेंज कर. निहारिका येत असते इथे सो कपाटात तिचे कपडे असतील. जा बघ आणि चेंज करून ये. थकली असणार ना बेडवर निवांत पड. इथे तुला कुणीच त्रास देणार नाही. रिलॅक्स होऊन पड."

स्वरा पटकन वॉशरूममध्ये गेली आणि फ्रेश होऊन परतही आली. त्यात १० मिनिटे गेली होती..ती पोहोचली तेव्हा अन्वय बाहेर चंद्राकडे बघत होता. त्याच तिच्याकडे लक्ष नव्हतं पण तो आता जरा नॉर्मल वाटत होता म्हणून स्वराने विचारले," सर रागावला आहात का त्यांच्यावर? नका हो रागावू. खर तर मी बेडरूमला पोहोचले तेव्हा ती माझ्याकडे डोळे उघडून एकटक बघत होती. मग मलाही नाही राहवलं तिला घेण्यापासून. तेव्हा माझ्या लक्षातच नाही आलं की ती माझा चेहरा बघून घाबरू शकते. त्यात त्यांची काही चूक नाही. त्या बरोबर बोलल्या, मला समजून घ्यायला हवं होतं. आता लक्षात ठेवेन आणि मलाही वाईट वाटलं नाही. मोठ्यांच कधी वाईट मानून घ्यायच नसत सो स्वतःला शांत करा. मला त्यांच्या बोलण्याचा जितका त्रास झाला नाही त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला त्रास झाला तर होईल सो प्लिज स्वतःला शांत कर माझ्यासाठी. प्लिज!! एवढं नाही करणार नवरोबा??"

स्वरा एकाच श्वासात सर्व बोलून थांबली तर अन्वय बऱ्याच वेळ काहीच बोलला नाही. तो बहुतेक कसला तरी विचार करत होता म्हणून तिनेही समोर काहीच विचारलं नाही. काही वेळ असाच गेला..ती बेडवर निवांत बसली आणि अन्वय म्हणाला," राग नाही आला स्वरा. आई- वडिलांचा राग करून त्रास आपल्यालाच होणार आहे त्यामुळे त्यांचा राग करणे शक्य नाही. फक्त थोडस वाईट वाटलं हा विचार करून की एक स्त्री असूनही त्या दुसऱ्या स्त्रीच्या भावना समजू शकत नाहीत. मुलीच समजू शकतो, तिला त्रास झाला असता हे मान्य पण आईला टोमणे मारण्यात आणि तुला प्रत्येक क्षणी तुझा चेहरा आठवण करीन देण्यात कसला आलाय आनंद? ह्यांच्याशी त्यांचा संबंध काय? ह्याने नक्की काय मिळत लोकांना? समाधान आणि ते कशाचं? लोकांवर कमेंट करून नक्की कोणतं सुख मिळत लोकांना??"

स्वरा ह्यावर काहीच बोलू शकत नव्हती कारण ह्या प्रश्नाचं उत्तर तिलाच मिळालं नव्हतं तिला उत्तर मिळाल नाही, शेवटी अन्वयच्याच सांगण्यावरून तिने लोकांना इग्नोर करणं सुरू केलं होतं आणि आनंदी राहू लागली. ती अन्वयच्या बोलण्याचा शांतपणे विचार करतच होती की अन्वय म्हणाला," स्वरा तू आयुष्यात आली आहेस ना तेव्हापासून एक शब्द कायमचा माझ्या आयुष्याचा भाग झाला आहे. तो सतत पीछा करतोय माझा आणि मी त्याच उत्तर शोधू शकत नाहीये. पहिल्यांदा होतंय अस."

तो बोलतच होता की स्वराने कुतुहलाने विचारले," कोणता शब्द?"

अन्वय हसत उत्तरला," 'सुंदरता…'

लोक सतत टोमणे मारून तू किती सुंदर आहेस हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. ज्यांना ते जमत नाही ते सरळ सरळ बोलून मोकळे होतात. हा शब्द आता इतका ऐकला जातोय की त्याचा अर्थ जाणून घेण्याची मलाही खरच इच्छा होतेय. आजच्या प्रसंगावरून मला राग नाही आला पण एक गोष्ट सतत मनात घर करते आहे ती अशी की सुंदरता फक्त चेहऱ्यावरून असते का? चला हे मी स्वीकारलं पण चेहऱ्याच्या सुंदरतेचीही व्याख्या स्पष्ट नाही.

चला एक वेळ मान्य केल कीं तू सुंदर नाहीस, तुझा चेहरा सुंदर नाही पण मला हे कळत नाही की एखाद्या सुंदर मुलीशी लग्न केल्यावर जर तिला बाळ होत नसेल तर दुसर्या मुलीशी त्या मुलांचं लग्न का लावून दिल्या जात? ह्यात त्याची आई असो को तो सहसा विरोध करत नाही तेव्हा मला प्रश्न पडतो ती तर सुंदर आहे म्हणून तुम्ही तिला घरात आणलं ना?? आणि बाळ झालं नाही म्हणून ती सुंदरता अचानक कशी नाहीशी झाली? मग त्या मुलीची सुंदरता नक्की कशाने जज केली? चेहऱ्याने की तिच्या मातृत्त्वाने? ज्या लोकांनी तिला सुंदर म्हणून गावात, शहरात मिरवणूक केली ते लोक सुंदरता ओळखायला चुकले की ती मुलगीच सुंदर नव्हती??

दुसरी गोष्ट, मुलगी काळी-सावली असेल आणि ती मुलाला जन्म देऊ शकली तर तिची सुंदरता नक्की कशी जज करायची? रंगावरून की ती बाळ जन्माला देऊ शकते ह्यावरुन. नंतर लोकांना बाळाची, आपल्या रक्ताची इतकी लालसा असते की तिचा काळा रंग आपोआप दुर्लक्षित केल्या जातो. मग नक्की सुंदर कोण? बाळाला जन्म देणारी ती काळी सावळी मुलगी की बाळाला जन्म न देऊ शकणारी ती गोरी पण मुलगी??

पुन्हा बघ, एखादी मुलगी चेहऱ्याने खूप सुंदर असते. तिला वाजत-गाजत घरात तर आणल्या जात पण तिच्यावर कुणाची नजर पडू नये म्हणून तिलाच घरात कैद करून ठेवल्या जात. मग एक प्रश्न पडतो की सुंदरता दाखवायला असते की झाकून ठेवायला? झाकून ठेवायला असेल तर मग चेहऱ्याचा इतका उहापोह का? का तुला प्रत्येक क्षणी चेहऱ्यावरून जज करून एकवल्या जात? ही कसली सुंदरता स्वरा जी सर्वाना दाखवता येत नाही. सुंदरता तर दाखवण्यात असते ना? निसर्गाची सुंदरता दिसली नाही तर जगातली लोक आपलं मन मोकळं करायला जातील कुठे? मग त्यापेक्षा तू उत्तम नाहीस का जिला माहिती आहे की आपण सुंदर नाही तरी तिला त्याचा फरक पडत नाही. तू आयुष्यचा प्रत्येक क्षण जगतेस स्वतःला सुंदर समजून. ह्या दोन गोष्टीचा विचार केला तर मला प्रश्न पडतो लोक नक्की सुंदरता कशावरून ठरवतात?"

स्वराही हसत उत्तरली," एखादा मुलगा जॉबवर असल्यावर त्याला मुलगी देताना रंग बघितल्या जात नाही ही सुंदरता त्याच्या पैशाची मानायची की चेहऱ्याची?"

अन्वय क्षणभर हसला आणि स्वरालाही हसू आलं. ते एकमेकांकडे बघत होते आणि अन्वय म्हणाला," स्वरा ही दुनिया ना शातीर आहे. आपल्या नियमाप्रमाणे सुंदरता ठरवते. त्यांना वाटलं तर एखादी व्यक्ती सुंदर आहे, तिला सहज स्वीकारता येत आणि त्यांना नसेल वाटत तर मग संपूर्ण दुनिया तिच्या मागे लागते, जी गोष्ट तिने कितीतरी क्षण, वर्ष अनुभवली आहे तेच पुन्हा पुन्हा सांगायला. दुसर्यांना त्रासात बघून लोकांना नक्की काय समाधान मिळत माहिती नाही. कधी कधी वाटत की हा देश सोडूनच जाऊ पण...स्वरा विचित्र आहेत लोक आणि त्यांच्या सुंदरतेच्या व्याख्याही फक्त ते आपल्या चुका कधीच स्वीकारनार नाहीत मग माझी आई असो की शरदची आहे. त्यांना सतत वाटत की आपला अनुभव जास्त आहे म्हणून आपण बरोबर आहोत पण अस नसत कधी कधी वय कमी असूनही मोठे मोठे अनुभव येतात तर कधी कधी वय जास्त असूनही लोक वेड्यासारखे वागतात. मला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही पण त्यांच्यामुळे तू का सहन कराव सर्व? कधी बदलणार हे सर्व?"

अन्वय बोलत होता पण ह्याच उत्तर त्यालाही माहिती नव्हत. त्याच्या बोलण्यात आज तथ्य होत पण जगाला बद्दलविणे खरच शक्य नव्हतं. ह्या एका प्रसंगावरून स्वराला आणखी किती त्रास होणार आहे ह्याची प्रचिती त्याला आली होती आणि तो पुन्हा एकदा प्रश्नात हरवला," नक्की कसे स्वराला ह्या समाजात स्थान मिळवून द्यायचे?? स्वतःचा स्वार्थ बघणाऱ्या ह्या जगात तीच स्वातंत्र्य कस अबाधित ठेवायचं?"

प्रश्न गहन आहे आणि त्याच उत्तर तितकंच कठीण. शोधू शकेल अन्वय ह्याच उत्तर?

डरता नही जमानेसे
ना किसीं अपने का मुझे खाँफ है
पर जब भी होती ही आंखे नम तेरी
मुझे खुदसे डर लगणे लगता है...