Bhagy Dile tu Mala - 82 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ८२

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ८२

कहियोने बांधे तारीफो के पूल
तो कहीयोने गालिया देकर है टोका
कब खतम होगी चेहरेसे ये नफरत
पुछती है हाथो की रेखा??

स्वरा- अन्वयची कहाणी हळूहळू समोर जाऊ लागली होती. अन्वय तिला आनंदी ठेवायचे शक्य तेवढे प्रयत्न करत होता पण अगदी पुढच्याच क्षणी काय होईल त्यालाही माहिती नव्हत. अन्वय लग्नाआधी स्वरा सोबत नव्हता तेव्हा तिच्याकडे बघणाऱ्या लोकांच्या नजरांशी त्याचा संबंध आला नव्हतां तो सोबत राहू लागला आणि प्रत्येकाची ती घृणास्पद नजर बघून अन्वय मनोमन दुखावल्या जाऊ लागला फक्त स्वराला ते कधी जाणवू नये ह्याची प्रत्येक क्षण त्याने काळजी घेतली होती पण हे असंच केव्हांपर्यंत चालू राहील ह्या विचाराने त्याची रात्रीची झोप उडवली होती. तो तिला सांगू शकत नव्हता पण मागे गेलेला प्रत्येक दिवस त्याला तिची चिंता वाटत होती आणि अन्वय त्याबाबतीत काहीच करू शकत नसल्याने त्याची स्वतःवरच चिडचिड होऊ लागले. दिवस जाऊ लागले होते पण परिस्थिती काही बदलत नव्हती. लोक मुळात बदलले नव्हते म्हणून तो स्वतःला खुश ठेवून तिचा मूड चांगला करू लागला पण हे नक्की केव्हांपर्यंत चालणार होत??

महिनाभराचा कालावधी उलटून गेला होता. स्वरा- अन्वयसोबत आपल्या आयुष्याचे काही सुंदर क्षण जगत होती. आज पुन्हा सुट्टीचा दिवस. अन्वय निवांत बेडवर टीव्ही बघत बसला होता. स्वराने कॉफी त्याच्या समोर धरली, त्याने हसतच ती तिच्या हातातून घेतली आणि काही क्षण दोघेही शांतपणे कॉफीचा आस्वाद घेऊ लागले. काही क्षण शांततेत गेल्यावर स्वराने विचारले," अन्वय सर आज काय बनवू स्पेशल तुमच्यासाठी? तशा तुम्ही कधी फरमाहिश करत नाहीत म्हणून म्हटलं स्वतःच विचारावं. काय बनवू नवरोबा आज खास तुमच्यासाठी??"

अन्वयने क्षणभर तिच्याकडे बघितले आणि हसतच उत्तरला," आज गोड चालेल पण त्यासाठी बनवत बसून स्वतःला त्रास करून घेण्याची गरज नाही. तू विचार केलास तर आताही देऊ शकतेस. देणार ना??"

अन्वय तिच्या डोळ्यात बघत होता आणि स्वराने चहाचा मग बाजूला ठेवत, त्याच्याकडे बघत म्हटले," अन्वय सर दिलं असत हो पण ना तुमची शुगर वाढेल. उगाच तब्येत वगैरे खराब होऊन जाईल तुमची. नवऱ्याची काळजी घेणं बायकोच परम कर्तव्य आहे ना म्हणून तुमचाच विचार करून तुम्हाला गोड देत नाही. नाही तर मला बिचारीला गोड द्यायला कसली हरकत बर?"

अन्वय काही क्षण तिच्याकडे हसून बघत होता आणि स्वरा त्याच्या जवळ येत म्हणाली," हाच विचार करताय ना की स्वरा पण चावट झालीय खुप. काय करणार नवऱ्याने पर्यायच सोडला नाही माझ्याकडे. सतत रोमांस सुचतो त्यांना मग घरी असो की ऑफिस. आता तिथून पळायला दुसरी वाट नाही म्हणून म्हटलं कशाला लाजत बसायचं. मीही होते तुमच्यासारखी. हवंय गोड??"

अन्वयने नजरेने इशारा करतच उत्तर दिले आणि स्वराने बाजूचा कप हातात देत म्हटले," ह्यात साखर टाकून आणू का? जास्त गोड आवडत ना तुम्हाला??"

आज अन्वय शांतपणे तिचा हसरा चेहरा बघत होता आणि स्वरा स्वभावाच्या विरुद्ध जाऊन त्याची खेचत होती. त्याला ही तीच स्वरा आहे, जी सतत शांत- शांत राहायची ह्यावर विश्वास बसतच नव्हता त्यामुळे कुतूहलाने तो आणखीच एकटक तिच्याकडे बघू लागला आणि स्वराने पुन्हा विचारले," सांगा ना काय बनवू तुमच्या आवडीच?? उगाच वेगळे विषय काढून माझी दिशाभूल करता. आता सांगून द्या नवरोबा. मलाही फार आवडत माझ्या लाडक्या नवर्यासाठी सर्व बनवायला."

ती विनंती करत होती तर अन्वयने कप पुन्हा ओठाला लावत म्हटले," अग श्वेताने लंचला इनवाइट केलं आहे. ती म्हणाली की स्पेशली स्वराला भेटायच आहे. मी तस तिला उत्तर दिलं नाही अजून म्हटल तुला आवडेल न आवडेल म्हणून तुला आधी विचारतोय. तू सांग जायचं का? नसेल जायचं तर मग सांगतो माझ्या आवडीच काहीतरी."

स्वराने रागावण्याऐवजी हसतच विचारले," तुमची क्रश आणि मला भेटायच म्हणतेय? बापरे हा चमत्कार कसा झाला? काही खास कारण आहे का मला भेटण्याच?"

अन्वयनेही हसत हसतच उत्तर दिले," कदाचित जिलस झाली आहे तुझ्यावर, संजना सारखे टोमने मारायला बोलावलं असेल. आता सांग येशील??"

स्वराने क्षणभर हसतच म्हटले," मग तर जावं लागेलच. बघू तर तुमची क्रश काय म्हणते? आता मलाही बघायच आहे किती टोमणे एकवते ती तर. तुम्ही कॉफी घ्या मग निघू लवकरच."

अन्वयने तीच बोलणं ऐकलं आणि क्षणात तिला होकार कळविला आणि पुन्हा एकदा टीव्ही बघण्यात लक्ष घातल.

दुपारचे जवळपास १२ वाजत आले होते. स्वराची तयारी झाली होती पण अन्वय आज बाहेर जायला नखरे करत होता. स्वरा कितितरी वेळेपासून त्याला उठायला सांगत होती पण तो काही उठला नव्हता शेवटी स्वराने त्याला कसतरी मनवल आणि तो तयार व्हायला वॉशरूममध्ये पोहोचला. कपडे चेंज करून यायला त्याला १० मिनिटे गेली होती. अन्वयने बेडरूमला येताच गाडीची चावी घेतली आणि दोघेही क्षणातच बाहेर पडले. जाता-जाता स्वराने रूमवर नजर टाकली. आई आज बाहेर आल्या नव्हत्या म्हणून स्वराला कमाल वाटत होती. बाबाही बाहेर हॉलमध्ये बसून होते पण ते कुणाशीच काहीच बोलले नाही. स्वराला काहीतरी विचित्र वाटलं म्हणून ती क्षणभर तिथेच थांबली. अन्वय समोर कार काढायला बाहेर पडला आणि स्वराने विचारले," बाबा आज आई दिसत नाही आहेत? कुठे गेल्या आहेत का??"

बाबा नम्रपणे उत्तरले," थकली असेल बहुतेक जास्त म्हणून अजून उठली नाही."

स्वराने प्रतिप्रश्न केला," बाबा मग जेवणाच कस तुमच्या? मी बनवू का?"

बाबा टीव्हीकडे लक्ष देतच म्हणाले," नाही त्याची गरज नाही. ती उठली की बनवेल. तुम्ही जा जिथे जायचं आहे तिथे. उशीर होईल उगाच."

स्वराला काही बरोबरं वाटत नव्हतं पण बाहेरून अन्वयचा आवाज आला आणि ती क्षणात घराच्या बाहेर पडली. ती कारमध्ये बसताच अन्वयने कार सुरू केली. श्वेताच्या घरी जायला फक्त १५ मिनिटे लागणार होते म्हणून अन्वय निवांत चालवत होता तर स्वरा विचारात पडली होती. काही वेळ अन्वय तिच्याकडे बघत होता आणि तिचा उदास चेहरा बघत त्याने विचारले," काय ग श्वेताला भेटायच टेन्शन आलंय का? पून्हा इर्शा तर करणार नाहीस ना तिच्यावर?"

स्वरा त्याच बोलणं ऐकून मिश्किल हसली आणि हळुवार स्वरात उत्तरली," तो तर हक्क आहे माझा अन्वय सर. माझ्या नवऱ्यावर इतक्या मुली लाइन मारतात तर इर्शा नको का व्हायला? मी तर कुणाची नजर लागू नये म्हणून तुम्हाला काजळ लावून देणार होते पण लोक काय म्हणतील म्हणून शांत बसले आहे. मी विचार करतेय एक पाटी बनवून त्यावर लिहाव बुरी नजर वाले तेरा मूह काला."

तीच बोलणं ऐकून अन्वय मोठ्याने हसत उत्तरला," म्हणजे आज काही खर नाही माझं. गृहयुद्ध पक्क आहे. एकीकडे ती फ्लर्टी आणि दुसरीकडे हक्क गाजवणारी बायको. ती काही उलट-सुलट बोलू नये म्हणजे मिळविल. देवा वाचव रे मला आज."

अन्वय हसत होता आणि स्वरा बाहेर बघत म्हणाली," अन्वय सर प्लिज गाडी थांबवात का बाजूला?"

ती एवढ्या मोठ्याने म्हणाली होती की तिला नक्की काय झालं ते त्याला समजत नव्हतं. त्याने आजूबाजूच्या गाड्या बघून कार हळूच बाजूला थांबवली आणि घाबरत विचारले," काय झालं स्वरा अचानक गाडी का थांबवायला लावलीस? काही विसरली आहेस का?"

अन्वय घाबरून एकटक तिच्याकडे बघत होता आणि स्वरा जरा चेहऱ्यावर शांत भाव आणत उत्तरली," कसे ना तुम्ही अन्वय सर? मैत्रिणीच्या घरी जात आहात आणि सोबत काहीच घेतलं नाही. काय वाटेल तिला? इथे पण मलाच मॅनेज करावं लागतं आहे बघा. आता बघत काय बसला आहात? तुमचं व्हॉलेट द्या. समोर गुलदस्त्याच दुकान आहे. अटलिस्ट गुलदस्ता बघून ती खुश तरी होईल. इतक्या सुंदर मुलीला भेटायला जात आहात, थोडे पण मॅनर्स नाहीत ना??"

अन्वय मूर्खासारखं एकटक तिच्याकडे बघत होता. त्याला समजतच नव्हतं की ही तीच मुलगी आहे जी मला क्रश म्हणून चिडवते आणि पुढच्याच क्षणी त्याच मुलीला सुंदर संबोधून तिच्यासाठी गुलदस्ता घेते. त्याला विचार येताच क्षणात त्याच्या ओठावर हसू आलं.

त्याने पुढच्याच क्षणी तिच्या हातात व्हॉलेट दिलं आणि ती येण्याची वाट बघू लागला. स्वरा बुके आणायला बाहेर गेली होती तर अन्वय तिची कार मध्ये वाट बघत होता. अगदी ५ मिनिटच झाले होते. स्वरा परतली आणि अन्वयने पुन्हा कार सुरू केली. आता जवळपास १२.३० व्हायला आले होते. श्वेताचा कॉल येऊन गेला होता म्हणून तो पटापट गाडी चालवत होता. आणखी काही मिनिटांचा कालावधी गेला आणि अन्वय श्वेताने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला. स्वरा- अन्वय लिफ्टने तिच्या रूमसमोर पोहोचले. अनव्यने फ्लॅट नंबरची खात्री केली आणि घराची डोरबेल वाजवली. त्याने डोर बेल वाजवताच अगदी सेकंदमध्ये दरवाजा उघडल्या गेला. समोर श्वेता हसरा चेहरा घेऊन त्यांची वाट बघतच होती. तिला बघताच अन्वयने समोरून बुके दिला आणि श्वेता फ्लर्टी अंदाजमध्ये म्हणाली," अन्वय मेरे लिये रोज लाये हो. बिवी के सामनेही मुझे प्रपोज करणे का इरादा तो नही है ना? हाउ रोमँटिक अन्वय यु आर!! सोच क्या रहे हो फिर??"

तिचा पहिलच वाक्य आल आणि अन्वयच्या तोंडच पाणी पळाल. तो एक वेळ तिच्याकडे बघत होता तर एक वेळ स्वराकडे बघर होता. त्याला वाटलं होतं की ती त्याच्यावर रागावणार पण तीच त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती हसूनच श्वेताकडे बघत होती. अन्वय जरा घामाघूम झाला होता आणि श्वेताच पुन्हा म्हणाली," अब क्या गृहप्रवेश का इंतजार कर रहे हो? प्लिज कम इनसाइड. मै कोई फॉर्मलिटी नही निभाने वाली."

तिचा खुललेला चेहरा बघूनच दोघेही मध्ये पोहोचले. ती दोघांनाही सोफ्यावर बसवून सरळ किचन रूमला गेली. दोघेही तिची रूम बघतच होते की तिने पाण्याचे ग्लास त्यांच्या हातात देत म्हटले," अभि अभि यहा शिफ्ट हुयी हु इसलीये ज्यादा सामान नही है. वैसे भी अकेले के लिये इतनाही काफी है. देखलो गरीब का घर. तुम्हारे जितना बडा नही पर काफी है मेरे अकेले के लिये."

अन्वयने पाणी पिता- पिताच म्हटले," घर मस्त मेंटेन किया है तुमने बिलकुल तुम्हारी ही तरहँ!!"

श्वेताने पुन्हा त्याच्या जवळ जात म्हटले," लाइन मार रहे हो अन्वय वो भी बिवी के सामने. क्या बात है! तुम तो बिवी से बिलकुल नही डरते. मुझे कोई प्रॉब्लेम नही तर सिधे सिधे बोल सकते हो, जो भी दिलं मे है. ऐसें घुमा फिरा के बोलणे मे क्या मजा ना अन्वय?"

तीच वाक्य येताच अन्वयला ठसका लागला तर तिचा फ्लर्टी स्वभाव बघून स्वराला हसू आवरत नव्हतं. अन्वयला सहसा कुणी हरवत नसे पण त्याचा असा गोंधळलेला चेहरा तिने बघितला आणि ती स्वतःला हसण्यापासून थांबवू शकली नाही. अन्वय डोळे फाडून तिच्याकडे बघत होता तर श्वेता जरा रुसत म्हणाली," जब वक्त था तब लाइन मारते नही थे और अब शादी हो गयी है तो ऐसें बिनधास्त बोल रहे हो. देख रही हो ना स्वरा? कैसे होते है ये पुरुष? "

स्वरा आता मिश्किल हसत उत्तरली," आपका क्रश है आप देख लो मुझे. मै नही बिचमे पडणे वाली. मै तो यहा एन्जॉय करणे आयी हु. मै भी तो देखु उनके खास दोस्त के सामने क्या क्या बाते होती है."

ती हसत- हसत बोलून गेली होती तर अन्वय गुपचूप त्यांचं बोलणं ऐकत होता. त्याला समजलं होत की आज ह्यांच्यात बोलणं अगदी रिस्कीच काम आहे म्हणून त्याने पुढे एक शब्द देखील बोलणं टाळल होत आणि श्वेता स्वराकडे बघत म्हणाली," बिवी हो तो ऐसी!! सही चॉइस है अन्वय. चलो बाते होती रहेगी. पेहले लंच कर लेते है. मुझे बहोत भूक लग रही है फिर बताती हु तुम्हारे इनको. कुछ राज भी खुलने वाले है, दिलं थाम के रखना स्वरा."

ती बोलायचीचज इतकं गोड की स्वराला तिच्या स्वभावाने क्षणात भुरळ घातली. भूक त्यांनाही लागलीच होती म्हणून गप्पा बाजूला सारून तेही तिच्या मागे गेले. दोघेही क्षणातच हात धुवून टेबलवर बसले. श्वेताने तोपर्यंत टेबल सजवून ठेवला होता. स्वरा- अन्वय टेबलवर बसले आणि श्वेता एक एक बाऊल ओपन करू लागली. तिला अगदीच लक्षात आलं की त्या सर्व अन्वयच्या फेवरेट डिशेश होत्या म्हणून स्वराने हसतच विचारले," दि ये सब अन्वय सर की फेवरेट है ना? आपको आज भी पता है इनकी पसंद?"

श्वेताने शेवटच बाऊल आणून टेबलवर ठेवलं आणि त्यांना जेवण वाढत उत्तरली," भुलेही कब थे मॅडम? वो तो आप ले गयी इन्हे चुराके वरणा मै हकसे खाना खिला रही होती."

तिच्या बोलण्यात अन्वयचा सतत उल्लेख होता आणि स्वराने न राहवुन प्रश्न विचारला," आजभी इतना प्यार करती हो अन्वयसे??"

स्वराचा एक प्रश्न आणि सर्व शांत झाले होते. अन्वयचा चेहरा तर पाहण्यासारखा झाला होता. स्वराची नजर श्वेतावर तर श्वेताची अन्वयवर होती. अन्वयला काय रिऍक्ट करू तेच समजत नव्हतं आणि श्वेताच उत्तरली," स्वरा गप्पे मारणेही तो बुलाया है तुम्हे. पेहले लंच कर लेते है बादमे बात करते है."

तीच उत्तर येताच अन्वयचा जीव जरासा भांड्यात पडला. स्वरानेही पुढे काहीच म्हटले नाही आणि सर्व हळूहळू जेवण करायला लागले पण अन्वयची आज स्थिती जास्तच बिघडणार आहे हे त्याला जाणवलं होत म्हणून त्याने जेवण करतानाही आपली नजर वर केली नव्हती. त्यांचं जेवण पूर्ण व्हायला जवळपास पाऊणतास लागला होता. एकमेकांना न्याहाळत- न्याहाळत त्यांचं जेवण पूर्ण झाल आणि तिघेही तिच्या बेडरूममध्ये जाऊन बेडला टेकले. अन्वयने चुपचाप एक कोपरा पकडला आणि शांत बसला तर स्वराने क्षणात पुन्हा विचारले," अब बताईये. अब भी प्यार करती हो सर से?"

श्वेताही हसतच उत्तरली," सच मे तुम्हे सब कुछ जाणना है? तकलीफ तो नही होगी ना तुम्हे सूनकर? मुझे बोलणे मे कोई दिक्कत नही, पर तुम्हे सूनने मे हो सकती है. सो सोच लो? नही तो रेहने दो मेरी बाते मेरेही दिलं मे."

स्वरानेही हसतच म्हटले," सच बोलू तो मुझे अन्वय सर के बारे मे कुछ ज्यादा पता नही है इसलीये मैभी जाणना चाहती हु सब कुछ. तकलीफ क्यू होगी? फिलिंगस झुठी थोडी होती है. वो बया न की जाये तो आपको ज्यादा तकलीफ होगी सो प्लिज. मै तयार हु सूनने को."

स्वरा एकटक तिच्याकडे बघत होती आणि श्वेता अन्वयकडे बघून हसतच म्हणाली," वो कॉलेज के शुरुवाती दिन थे. आज शायद उमर बढ
गयी है इसलीये दीखती नही लेकिन तब मै बहोत सुंदर दीखती थि. जहा से जाऊ लडके की लाइने लगती थि मुझे देखने फिर वो ज्युनियर हो या सिनियर. एक दिन ऐसेही हम कॅन्टीनमे बैठे थे. तारीफे मेरे लिये रोज का काम था पर नजरे ठेहरी जब मैने किसींका जवाब सुना. मुझे देखकर सौरभ सर केह रहे थि की देख ना भाई क्या लडकी है. कोई उसे देखे तो देखताही रेह जाये. मैने सुना और मनही मन हस पडी पर वो खुशी ज्यादा देर नही चली क्यूकी एक लडके का जवाब आया, भाई मेरे लडकी है तो सुंदर दिखेगीही. खुदाने सुंदर बनाया है उसे पेहलेसेही . उसमे क्या बडी बात है? उसका जवाब आया और मेरी हसी युही ठेहर गयी. मैने गुस्सेसे जीसकी तरफ देखा वो अन्वय था. मैने उसपर नजर डाली और वो अपणे किताब मे था डुबा हुवा. मैने अगलेही पल कॅन्टीनमे नजर डाली. वहा ऐसा एक भी लडका नही था जो मुझे देख नही रहा था सिर्फ अन्वय के अलावा. तब तक हजारो लडके आये थे मेरी जिंदगी मे जो मेरी सुंदरता के दिवाने थे पर अन्वय अकेला ऐसा था जीसने मुझे सुंदरता से नही जाना. उसका अटीट्युड देखके पेहलेही दिन मै ऊसपर लट्टूहो गयी. लडकीयो को जो पीछे पीछे करे वो पसंद नही आते और जो उन्हे ना देखे उसी पे उनकी नजर ठेहर जाती है, ये सब कुछ मैने भी अनुभव किया. वो एक पल और मुझपे अन्वयका नशासा चढा. रात-दिन उसके बारेमेही खयाल आने लगे, उसी का ख्वाबो मे बसेरा था. रेहना मुश्किल हो गया एक पल और उसे पाने के लिये मैने एक कदम उठाया. थि आशिको की भिड ऊस का ग्रुप का मै हिस्सा बन गयी. अन्वय के प्यार मे मानो दिवानी हो गयी. उसकी एक झलक पाने को दिलं बेकरार था, कैसे बताउ स्वरा वो वक्त क्या था.."

ती बोलताना त्या क्षणात पोहोचलीच होती की स्वराने मधातच तिला अडवत विचारले," पर इस सब मे अन्वय सर कहा है? क्या सर बात नही करते थे आपसे? ऊस दिवानी श्वेता का हाल फिर क्या हुवा?"

श्वेताने हसतच म्हटले," करता था यार पर सिर्फ पढाई की. उसके अलावा मैने प्यार की उससे बात की हो ये याद आता नही. स्वरा मै ना कभी कभी सोचती थि की इतनी खूबसुरत लडकी साथ होते हुये भी ये मुझसे बात क्यू नही करता? नजरे क्यू नही मिलाता? क्या उसको मेरे दिलं का हाल समझ नही आता. ऐसा हर बार होता था. एक सुंदर लडकी को वो हर बार नजरअंदाज कर रहा था और एक दिन मैने अन्वयसे गुस्सेमे पुछ लिया. क्यू साहब इतनी सुंदर लडकी साथ होते हुये भी आपको कुच मेहसुस नही होता?"

स्वराने पटकन विचारले," क्या कहा था सरने फिर?"

श्वेताने अन्वयकडे बघत विचारले," याद है अन्वय क्या कहा था?"

अन्वयच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल आणि तो म्हणाला," तुम्हारी असली सुंदरता तुम्हारा चेहरा नही तो सादगी है, स्वभाव है. शायद इसलीये मै तुम्हारे साथ बात कर रहा हु वरणा चेहरे की खूबसुरती से तो मुझे पेहलेे भी लगाव नही था और ना कभी होगा."

श्वेताने हसतच विचारले," अब तुमही बताओ स्वरा. ऐसा सूनने के बाद कोई लडकी भला कैसे खुदका दिलं उसको देणे से रोक पाये?"

स्वराने हसतच म्हटले," सेम हिअर!! मेरा भी हाल कुछ ऐसाही था. वरणा उससे पेहले मुझे प्यार शब्द को समझाना भी मुश्किल ही था. ये छोडिये फिर क्या हुवा?"

श्वेता चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आणत म्हणाली," फिर सपणे ज्यादा बढे होने लगे. दिलं से निकल कर शादी तक पोहोच गये. मै करती रही उसको दिलं का हाल बताने का प्रयास पर उसने किताबोसे उपर झाककर मेरी नजरो मे देखाही नही."

स्वराने नाराज होत विचारले," मै बिच मे आ गयी ना आपके? वरणा शायद आपण आज साथ होते."

श्वेता जरा मोठ्याने हसत म्हणाली," नही यार! मैने सौरभ सर और अन्वय की बाते सून ली थि. जब सौरभ सरने पूछा था की श्वेता इतनी पसंद करती है तुझे तो तू बात आगे क्यू नही बढाता? मुझे याद है, अन्वयने कहा था की ऐसी लडकी जिससे मुझे प्यार हो वो अभि मुझे मिली नही. ऐसी लडकी मिल गयी तो उसे जमाणे से लढकर हासिल कर लुंगा. वो लडकी श्वेता नही है तो क्यू मै उसे झुटे वादे करू? वो आखरी वक्त था जब मैने प्यार का एहसास किया. अन्वयके जवाब का सम्मान किया. उसके बाद मैने अन्वय से ऊस बारे मे कभी बात नही की. कॉलेज खतम हो गया तबभी नही. प्यार है स्वरा हमेशासे शायद ईसलीये उसे कभी भुला न सकी. ऊस दौर मे कुछ वक्त खुदको बिजी कर लिया और अन्वय मेरी यादो मे सिमटँकर रेह गया. हमारी कहाणी खतम होही गयी थि पर एक दिन प्रिया मिली. उसने अन्वयके बारे मे बताया और मै खुदको रोक ना पायी. वो अकेला है येही सोचकर आयी थि पर..."

स्वरा तिच्याकडे बघतच होती की श्वेता डोळे पुसत म्हणाली,"अन्वयने पूछा था ना की कैसी दीखती है मेरी बिवी? तो उसका जवाब देना चाहती हु. उसका मॅसेज आने के बाद मैने सौरभसे बात की और एक एक अल्फाज सूनकर रो पडी. मै चाहू ते मॅसेजपे जवाब से सकती थि पर मुझे तुमसे मिलकर तुम्हे बताना था. स्वरा तुम सिर्फ सुंदर नही बहोत बहोत सुंदर हो. सच केहता है वो की तुम्हारे जैसी सुंदर लडकी पुरे कॉलेजमे नही थि और ना होगी. एक पल मुझेभी लगा था जब मेरा दिलं तुटा की प्यार नही करणा चाहीये पर आज तुमहें देखकर लगता है क्यू ना प्यार बार बार किया जाये? मै बहोत खुश अन्वय तुम्हारे लिये. तुमने जो सौरभ से कहा था वो सच मे करके दिखाया. तुमने चेहरे को नही सादगी को अपनाया. प्राउड ऑफ यु बडी!! दिलं से दुवा करती हु की तुम खुश रहो."

श्वेताच्या डोळ्यात काही वेळ अश्रू होते पण कुणीच तिला थांबवलं नाही. अन्वय अगदीच शांत बसला होता. तर स्वराच्या चेहऱ्यावर थोडं हसू होत. अन्वयचे हे रूप तिने कधी बघितलंच नव्हतं पण जेव्हा आता बघितलं तेव्हा त्याच्यावरचा आदर आणखीच वाढला होता. त्याच्यावर प्रेम करणारी, त्याच्या प्रेमात हरणारी मुलगीही त्याच्याबद्दल वाईट संगण्याऐवजी त्याच्याबद्दल भरभरून बोलत आहे हे ऐकून तिला त्याला स्वीकारण्याच्या निर्णयावर अभिमान वाटत होता..

तिघात संवाद सुरूच होता की अन्वयचा फोन वाजला. त्याने क्षणात रिसिव्ह केला आणि दोन मिनिटात ठेवतच म्हणाला," सॉरी गर्ल्स. मुझे याद नही था की मैने मेरे दोस्त से आज मिलने के लिये कहा था. सो तुम बाते करो. मै आता हु थोडी देर मे."

अन्वय क्षणांतच रूममधून पसार झाला. आता रूममध्ये फक्त दोघी होत्या. काही क्षण दोघी एकमेकांकडे बघत होत्या पण कुणीच कुणाशी बोलायला तयार नव्हत. श्वेताला खूप वेळेपासून तिला काहीतरी विचारायचं होत पण तिला विचारू की नको अस झालं होतं. भरपूर वेळ स्वतःच्या मनाला शांत ठेवल्यावर शेवटी तिने म्हटलं," स्वरा अगर तुम्हे कोई प्रॉब्लेम नही हो तो एक सवाल पुछु."

स्वराने हसतच परवानगी दिली. तरीही श्वेता काही क्षण विचार करत म्हणाली," स्वरा तुम्हे अन्वयने तो अपना लिया पर क्या उनके घरवालो ने अपणाया है?"

स्वरा मिश्किल हसू ओठावर आणत म्हणाली," नही और शायद कभी अपनाऐंगे ऐसें लगताभी नही. एक- देड महिना हो गया है शादी को, ममी मुझसे बात करती नही, पापा करते है पर शायद दिलं से नही. अन्वय सर की बेहन बात करती है पर वो साथ नही. कुछ ऐसी है मेरी कहाणी. खुश है लेकिन घरवालो का साथ नही और आज होगा भी के नही पता नही.."

श्वेताने गंभीर स्वरात विचारले," तुम्हे तकलीफ नही होती इन सबसे?"

स्वराने हसतच तिला उत्तर दिले," सरने पेहलेही बताया था इस बारे मे. तब से मन की तयारी कर ली थि. तकलीफ नही होती ऐसा नही केह सकती पर शायद उसे सहन करणा सिख चुकी हु. इसलीये आसान हो गया है जिंदगी जिना."

श्वेताच्या चेहऱ्यावर सुंदर हसू होत आणि तिने पुन्हा विचारले," अन्वयने जब तुम्हारे साथ क्या होणे वाला है ये बताया तब तुम क्या सोच रही थि?"

स्वरा सहज उत्तरली," अगर मै नॉर्मल होती तो शायद किसीं और के लिये इतनी बाते नही सूनती लेकिन मैने भी सौरभ सरसे ये बात सुनी थि जो आपणे बतायी तब जाकर एहसास हुआ की अगर कोई मेरे लिये इतना लढ सकता है तो क्या मेरा हक नही बनता मै उनके खुशी के लिये थोडीसी डांट खालु. मेरे दिलं ने मुझसे जो कहा मैने झट से मान लिया. बस और क्या बन गयी उनकी. तकलीफे आती जाती रहेगी पर जो मजा उनके साथ मे है उसके सामने तकलीफ भी कुछ नही."

श्वेताला तीच उत्तर ऐकून भारावून गेल्यासारखं झालं होतं म्हणून ती स्वराच्या हातावर हात ठेवत म्हणाली," ग्रेट लव्ह!! मुझे लगा की सिर्फ अन्वय का प्यार काबिल-ए-तारीफ है लेकिन अब लगता है की अब उसका कम पड जायेगा तुम्हारे सामने. यु डिजर्व टू इच अनादर. आय एम हॅपी फॉर यु!!"

स्वरा केवळ तिच्याकडे बघून हसत होती. कदाचित त्या हसण्यातच त्यांचा पूर्ण प्रवास सामावलेला होता.

श्वेताशी संवाद एक वेगळीच अनुभूती होती. जगात काही चांगलं मानस आहेत ह्यावर पुन्हा एकदा स्वराचा विश्वास बसला होता. प्रेमात नकार मिळूनही जो त्याचा राग करत नाही त्याला खऱ्या अर्थाने प्रेम समजलेलं असत. नाही तर काही लोक असतात जे नकार मिळाल्याने ऍसिड फेकतात. दोन्हीही प्रेमाचीच रूप तरीही किंती वेगवेगळी??

शब्दो से नही आंखो से होती बया होती है मोहब्बत
हुनर सिख लो ये, फिर कभी ना होगी तुम्हे शिकायत..

*********

ती सायंकाळची वेळ होती. अन्वय-स्वरा घरी पोहोचले आणि येतचवथकल्यामुळे झोपी गेले होते. स्वराला जाग आली तेव्हा ती चहा बनवायला किचनला जाऊ लागली. जाताना तिने पुन्हा एकदा घरात नजर टाकली. आज पूर्ण घर शांत शांत वाटत होतं. क्षणात तिच्या लक्षात आलं की आई अजूनही बाहेर आल्या नाहीत. बेडरूमच दार सुद्धा अजून बंदच होत. स्वराच्या डोक्यात विचार सुरूच होते तरीही तिने चहा बनवायला घेतला. त्या पूर्ण वेळात सुद्धा स्वराची नजर फक्त आणि फक्त आईच्या बेडरूमवर होती. स्वराने १० ते १५ मिनिटात चहा बनविला आणि आपल्या बेडरूममध्ये घेऊन आली. अन्वय जस्ट आताच उठला होता. तिने त्याला चहा दिला आणि विचात करत शांत बसली. अन्वय समोर असतानाही काही क्षण ती आपल्याच विचारात हरवली होती. तिला अन्वयशी ह्या विषयावर बोलायच होत पण तो उगाच जास्त टेन्शन घेईल म्हणून ती शांतच बसली होती. वेळ जात होता पण स्वराची बेचैनी काही कमी झाली नव्हतीं. सतत तिच्या मनात आईबद्दल विचार येत होते. आई बाहेर येत नाहीत अस सहसा होत नाही त्यामुळे तिला वेगळीच शंका मनात येऊ लागली होती. तिने चहा कसातरी घेतला आणि न राहवता म्हणाली," अन्वय सर ऐका ना!!"

अन्वयने हसतच उत्तर दिले," मॅडम तुमचं कधी ऐकलं नाही अस झालंय का? बोला काय म्हणता. गोड देणार आहात का आता पण खायला?"

अन्वय हसून तिच्याकडे बघत होता तर स्वरा उदास स्वरात उत्तरली," अन्वय सर मला सकाळपासून आई अजिबातच बाहेर दिसल्या नाही. त्यांचं दार पण केव्हाच बंदच आहे. मला सकाळीच जाणवलं ते. बाबांना दुपारी विचारलं तर म्हणाले होते की त्या अजूनही झोपून उठल्या नाहीत. तेव्हा काही वाटलं नाही पण आता मनात वेगवेगळ्या शंका येत आहेत. त्यांची तब्येत तर बरी असेल ना? तुम्ही जाऊन बघता का?"

अन्वयचा चहा पिऊन झाला होता आणि तो जरा अस्वस्थ होत म्हणाला," मग आधी का सांगितलं नाहीस स्वरा? तिची तब्येत अलीकडे तशी पण ठीक राहत नाही सो आधीच सांगायचं होत तू मला."

स्वरा पुन्हा म्हणाली," माझ्या लक्षात होत पण श्वेताकडे बोलत बसलो तेव्हा विसरून गेले. आता चहा करताना बाहेर बघितलं तर दार अजूनही उघडलं नाहीये. तेव्हा पुन्हा सर्व आठवलं म्हणून आता सांगते आहे. बघता का जरा जाऊन?"

स्वराच बोलणं पूर्ण होत नाही तोपर्यंत अन्वय पटकन बेडवरून उठला आणि आईच्या रूममध्ये पोहोचला. स्वरा त्याची बाहेरच वाट बघत होती. अन्वय मध्ये पोहोचला. आई अंगावर चादर ओढून झोपलेली होती. आईला भरपूर थंडी वाजत होती हे तिला पाहताच त्याला जाणवलं म्हणून तो तिच्या अगदीच जवळ बाजूला जाऊन बसला. त्याने घाबरून क्षणातच तिच्या कपाळाला हात लावून बघितले. त्याला हात लावताच जाणवलं की आई तापाने फनफनत होती. आईला इतका ताप बघून अन्वय क्षणभर घाबरलाच आणि मोठ्याने आईला आवाज देऊ लागला. तापाने आईचे डोळे उघडत नव्हते. कितीतरी वेळ आवाज आल्यावर त्यांनी डोळे उघडले आणि त्याच्याकडे बघू लागल्या. अन्वयने हाताने सहारा देऊन त्यांना बेडवरच बसविले आणि रागावत म्हणाला," अशी कशी ग वेंधळी तू? इतका ताप भरलाय तरीही सांगितलं का नाहीस? मरायचा विचार आहे का तुझा? एक आवाज तर द्यायचा."

आईने अन्वयकडे बघत हळुवारपणे म्हटले," अन्वय जिवंत राहायला तू कारण तरी काय ठेवलस माझ्याकडे? तू माझा स्वाभिमान हिरावून घेतला आहेस आणि वरून अपेक्षा करतोस की मी तुला बोलावून घेईन? लोकांना घाबरून इथे रूमच्या रूम मध्ये पळून असते. जगाशी संपर्क नाही की काही नाही. माझी अवस्था काय आहे हे बघायला तुझ्याकडे वेळ तरी आहे का? बायकोची बाजू घेण्यापासून वेळ मिळेल तर तू माझ्याकडे बघशील ना? तूच सांग नक्की जगून काय करू? मेले तरच जीवाला शांती मिळेल बघ माझ्या."

अन्वय आईचे शब्द ऐकून भावुक झाला होता. त्याच्या डोळ्यातून फक्त अश्रू बाकी यायचे होते आणि तो स्वतःला आवरत म्हणाला," ज्याला तू मुलगाच मानत नाहीस त्याच्यासाठी जीव कशाला वाया घालवते आहेस हा विचार कर मग जगायला हजार कारण सापडेल. सांग जगाला की मी माझ्या मुलाच श्राद्ध केलंय मग कुणीच तुला त्रास देणार नाही. मुलगाच मेला म्हटलं तर कुणी उगाच का त्रास देईल तुला? तस पण माझ्यासाठी नको जगूस, स्वतःच्या मुलीसाठी, बाबांसाठी जग. आता तुला मला ऐकवून शांती मिळाली असेल चल उठ पटकन, जाऊ आपण हॉस्पिटलमध्ये. बाकीची शांती तब्येत बरी झाल्यावर मिळेल. मी आहे इथेच ऐकायला, मग ऐकवत बस पण आता चल."

अन्वय तिचा हात पकडून उठविणारच तेव्हाच आई पुन्हा म्हणाल्या," अन्वय ती तुझी वाट बघत असेल तिच्याकडे जा. माझ्यासाठी माझा नवरा आहे जिवंत. ते गेलेत औषध आणायला. औषध घेऊन होईल मी ठीक. तू आपल्या बायकोची काळजी घे जा. माझा विचार नको करुस. नाही तर तिला वाईट वाटायचं. म्हणेल तुझे कान भरले."

अन्वयला आता राग आवरत नव्हता म्हणून तो जरा चिडतच म्हणाला," हो जाईन, तिच्याकडेच रहायच आहे आयुष्यभर पण जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत तू माझी जबाबदारी आहेस सो आधी तू हॉस्पिटलमध्ये चल. भांडण वगैरे करायला पूर्ण आयुष्य पडलं आहे. मग हवं एवढं बोल. सध्या तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे आणि आता मी तुझं अजिबात ऐकणार नाहीये. तू स्वता चल नाही तर मी उचलून नेईन तुला. मी ५ मिनिटात येतोय तू थोडे केस वगैरे आवरून घे. आई आज बोलायला नको लावुस. तुला माहिती आहे बाकी सर्व बाबतीत मी ऐकून घेईन पण ह्याबाबतीत मला वाद नकोत. हो तयार मी आलोच."

अन्वय क्षणात बाहेर पडला. स्वरा त्याची बाहेर वाट बघतच होती. तो बाहेर येताच स्वराने विचारले," अन्वय काय झालं आईना? काही सिरीयस तर नाही ना?"

अन्वय बेडरूममध्ये शिरत म्हणाला," तुझी शंका बरोबर होती, खूप ताप भरलाय तिला. बर झालं तुझं लक्ष गेलं तिकडे नाही तर रागामुळे तिने मला कधीच सांगितलंच नसत. मेली असती तरीही काहिच बोलली नसती. ऐक मी चेंज करतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो."

स्वरा पोटतिडकीने बोलून गेली," मी येऊ?"

आई आतमध्ये काय काय बोलून गेली त्याला चांगलंच आठवलं म्हणून तो स्वराकडे बघून हसत म्हणाला," नाही त्याची गरज नाही, मी मॅनेज करेन. चल येतो, स्वरा मी तुला मॅसेज करेन तेव्हा आईसाठी खिचडी वगैरे बनवून ठेव आणि बाबांसाठी जेवणही बनव म्हणजे ते उपाशी राहणार नाहीत."

अन्वयने क्षणात कपडे चेंज केले आणि पैसे, गाडीची चावी घेऊन बाहेर निघाला. आईला अन्वयचा स्वभाव माहीत होता, तो तिच्यासाठी पजेसीव होता तेव्हा तो काहीही करू शकत होता म्हणून तिनेही केस आवरून साडी नीट केली होती. अन्वयने आईला आधार देत बाहेर नेले. स्वरा त्यांना बघतच होती. अन्वयने आईला हळूच गाडीत बसविले आणि क्षणात पसार झाला.

इकडे स्वरा एकटीच घरी होती. तिचा जीव खाली वर होत होता. अन्वयने तिला थांबायला सांगितलं तर होत पण तिचे पेशन्स साथ देत नव्हते. घरातल्या- घरात तिच्या किती चकरा झाल्या होत्या पण त्यांचा अजूनही काहीच पत्ता नव्हता. दारात तिने कितीतरी वेळ येऊन बाहेर पाहिले होते पण ते कुठेच आसपास दिसत नव्हते. आता त्यांना जाऊनसुद्धा दोन तास झाले होते. स्वराला राहवलं नाही आणि तिने अण्वयला कॉल केला पण अन्वयने क्षणात कॉल कट केला. तिला समजलं की ते बिजी असतील म्हणून तिने पुन्हा कॉल केला नाही पण तीच मन अजूनही शांत झाल नव्हतं. ती आतुरतेने त्याच्या कॉलची वाट बघत होती तेव्हा काहीच क्षणात अन्वयने खिचडी बनवून ठेव आम्ही लवकरच येतोय असा तिला मॅसेज केला आणि ती किचनमध्ये पोहोचली. तिने सोबतच व्हेजिटेबल सूप सुद्धा बनवायला घेतले. ती किचनमध्ये पोहोचली आणि तेवढ्यात बाबा मध्ये आले. बाबानी काही विचारण्यापूर्वीच तिने त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याच सांगितलं आणि तेही हॉल मध्ये निवांत बसले.

आता त्यांना जाऊन जवळपास २ तास झाले होते. स्वराच आवरून झालं होतं. बाहेर कारचा आवाज येताच स्वरा किचनमधून हॉल मध्ये आली. आई आताही कमजोरच वाटत होत्या. अन्वयने त्यांना आधार देत बेडरूममध्ये नेले. त्याने आईला नीट बसविले आणि काहिच क्षणात बाहेर आला. स्वराने बाहेर येताच त्याला विचारले," काय झालं सर आईना?"

अन्वय किचनमध्ये आला आणि पाणी घेता- घेताच म्हणाला," काही नाही टेन्शन घेतलं तिने जास्त म्हणून बीपी वाढला. डॉक्टर घाबरायचं कारण नाही म्हणाले सो तू पण रिलॅक्स हो. बर खिचडी बनवलीस?"

स्वराने पुढच्याच क्षणी ताट हातात धरत म्हटले," हो झाली सोबत हे सूप पण द्या बर वाटेल त्यांना. "

अन्वयने ताट हातात घेतल आणि हळूच म्हणाला," बाबांना जेवण करून घे म्हणावं आणि त्यांना म्हण की अन्वयने सांगितलं आज वर आराम करा जाऊन. मी थांबतो आईकडे."

अन्वय ताट घेऊन मध्ये पोहोचला. आई बसून होती आणि ताट हातात बघताच म्हणाली," मला नको तिच्या हातच काहीच. मी आहे अशीच छान. मला काही झालं नाही."

अन्वय मिश्किल हसत म्हणाला," माहिती आहे तुला विटाळ आहे तिचा म्हणून आधीच बाहेरून बोलावलं आहे फक्त तिने मला वाढून दिलं. आता वाढून देण्याचाही प्रॉब्लेम असेल तर मी दुसर वाढून घेतो पण अन्न वाया गेलेलं आवडेल का तुला?"

आई काहीच बोलल्या नाही आणि अन्वय खरच बाहेर ताट घेऊन जाऊ लागला. तेव्हाच आईने अडवत त्याच्या हातातून ताट घेतले आणि खाऊ लागल्या, सूप पण पिऊन घेतलं. त्यांनी थोडं फार खाताच अन्वयने त्यांना औषध दिले आणि आई बेडवर पडल्या. इकडे बाबांनीही जेवण करून घेतलं होतं.

अन्वय मध्ये जाऊन बराच वेळ झाला होता पण तो काही बाहेर आला नाही म्हणून तिला चिंता होत होती. स्वरा रूम मध्ये पण इकडे- तिकडे चकरा मारत होती. तेव्हाच अन्वय बाहेर येताना तिला दिसला आणि ती धावतच त्याच्याजवळ पोहोचली. अन्वयने बाऊल मध्ये पाणी घेतलं आणि काहीतरी शोधू लागला. तेवढ्यात स्वरानेच त्याला विचारलं," काय झालं अन्वय सर, काही शोधत आहात का?"

अन्वय हळूच म्हणाला," स्वरा आईचा ताप अजूनही कमी झाला नाहीये. मला रुमाल आणून दे. थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतो तिच्या कपाळावर थोड बर वाटेल त्याने तिला."

स्वराने धावतच त्याला रुमाल आणून दिला आणि अन्वय मध्ये जाताना म्हणाला," तू जेवून घे स्वरा, मला वेळ लागेल. मी थांबतो आईकडे."

अन्वय म्हणाला तर होता पण स्वराच मन काही मानायला तयार नव्हत त्यामुळे ती जेवण न करता बेडरूममध्ये जाऊन एकटीच बसली.

जवळपास रात्रीचे १ते २ वाजले होते. स्वरा अन्वयची वाट बघत बेडवर बसली होती. तिला आईला अस बघून चैन पडत नव्हतं म्हणून ती तशीच बसून राहिली. तेवढ्यात अन्वय मध्ये येत म्हणाला," का ग झोपली नाहीस का?"

स्वराने नम्र स्वरात म्हटले," नाही तुमचीच वाट बघत होते. आता कशी आहे आईची तब्येत?"

अन्वयने वॉशरूममध्ये जाऊन कपडे चेंज केले आणि बेडवर बसत म्हणाला," झोपलीय आता कुठे. जरा कमी झालाय ताप बघू सकाळी उतरतो की नाही ताप तर"

स्वरा पुढच्याच क्षणी म्हणाली," मी जेवण वाढते थोडं खाऊन घ्या."

स्वरा बाहेर जाणारच की अन्वय तिच्या कुशीत झोपत म्हणाला," नको स्वरा इच्छा नाही."

अन्वय तिच्या कुशीत तसाच पडून राहिला तर स्वरा त्याच्या केसांवरून हात फेरत राहिली. अन्वय बेडवर जरी पडला असला तरीही त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे हे स्वराला जाणवलं होत म्हणून बऱ्याच वेळ वाट बघत ती उत्तरली," अन्वय सर काही झालंय का? आई काही म्हणाल्या का तुम्हाला?"

अन्वयने तिचा हात घट्ट पकडला आणि जड आवाजात म्हणाला," स्वरा आईची आजची जी स्थिती आहे त्याला मी जबाबदार आहे. इतके वर्ष मी माझ्या मनासारखं वागत आलोय. तिचीही माझ्या बाबतीत काही स्वप्न असतील हे विसरूनच गेलो. तिने मला लहानाच मोठं केलं, माझे हट्ट पुरवले आणि मी तिला काय दिल तर मनःस्ताप, तिचा स्वाभिमान हिरावून घेतला. माझ्यासारखा मुलगा खरच कुठल्याच आईला देऊ नये. तिला जर काही झालं ना तर मी कधीच माफ करू शकणार नाही स्वतःला. स्वरा आधी काहीच वाटलं नव्हतं पण आज आईची स्थिती बघून खूप घाबरलोय मी. तिच्या वेदना मला आज त्रास देत आहेत. काही होणार तर नाही ना आईला? तस झालं तर मी माफ नाही करू शकणार स्वरा स्वतःला. कधीच नाही."

त्याचे शब्द ऐकून खर तर स्वराच खचली होती तरीही त्याला सांभाळत म्हणाली," नाही होणार काहिच आईला काळजी नका करू. दोन दिवसात होतील त्या चांगल्या."

स्वरांने समजवताच तो शांत झाला होता पण त्याला काही झोप लागली नाही. स्वराने काहिच क्षणात लाईट ऑफ केला. अन्वय तिच्या कुशीत तसाच झोपून होता तर स्वरा त्याच्या केसांवरून हात फेरत होती. रात्र सरत होती. अन्वय थकल्याने काहीच वेळात झोपी गेला होता तर स्वरा आपल्याच विचारात हरवली होती. आज अन्वयच्या शब्दात तिने खंत बघितली होती आणि नकळत का होईना तिने आई- मुलाला दूर केल्याची खंत तिच्याही मनात तशीच तेवत राहिली. त्या रात्री स्वरा फक्त विचार करत होती. तिने ह्याआधी कुणाला त्रास दिला नव्हता पण आज नकळत जेव्हा अन्वयच दुःख बाहेर आल तेव्हा ती स्वतःच खचली आणि अचानक एक प्रश्न तिच्या समोर आला," त्याच्या आयुष्यात येऊन आपण चूक तर नाही केली ना? आपण आपल्या स्वार्थासाठी जिवलग आई-मुलाला वेगळं तर नाही केलं ना? आणि खरच त्यांना काही झालं तर जबाबदार कोण? अन्वय सर की मी? कारण माझ्यासाठी तर त्यांचं नात पणाला लागलं आहे. ह्या सर्वाना मीच जबाबदार आहे ना?"

पेहली बार दिलं मे
ये खयाल आया है
खुद को खुश रखणे के लिये
जाने कितनो को दर्द परोसा है..

स्वरा विचारात हरवली होती आणि हा असा एक विचार होता जिथे नकारात्मकता पहिल्यांदा सकारात्मकतेवर हावी झाली होती. आयुष्यात वेगळं काही घडायला एक विचार पुरेसा असतो. स्वराच्या डोक्यात तो विचार आला होता..