Bhagy Dile tu Mala - 81 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ८१

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ८१


मेहक जाती हु मै तेरी खुशबुसे
नही कोई यहा ऐसा परफ्युम जो मुझे दिवाना बनाये...

सकाळची वेळ होती. स्वराचे सर्व काम आवरले होते. ती आता ऑफिसची तयारी करू लागली होती. अन्वयचा सकाळपासून काहीतरी वेगळाच मूड होता. आज फिरायला जाताना देखील अन्वय सतत तिच्याकडेच बघत होता आणि स्वरा लाजून पाणी पाणी झाली होती. आज असा एक क्षण नव्हता जेव्हा त्याने तिच्यावर नजर टाकली नव्हती. किचनमध्येही आज तो तिच्या मागे- मागेच होता. आई जेव्हा हॉलमध्ये येऊन बसल्या तेव्हा कुठे तो बेडरूममध्ये आला. तरीही त्याने तिच्याकडे बघन काही बंद केलं नव्हतं. स्वराला ते सर्व आवडतही होत पण त्याच्याकडे बघायची ती हिम्मतही करू शकत नव्हती. कदाचित काल रात्रीच्या आठवणी दोघांच्याही चेहऱ्यावर तशाच होत्या म्हणून आज त्यांच्यातल वातावरण काहितरी वेगळंच होत.

स्वरा तयारी करत होती तर अन्वय तयार होऊन बेडवर बसला होता. त्याची एक क्षणही नजर तिच्यावरून हटत नव्हती म्हणून स्वराचही कामात नीट लक्ष लागत नव्हत. अधून- मधून ती त्याच्याकडे बघत होती आणि पुन्हा एकदा तिचा चेहरा खुलून निघायचा. असाच कितीतरी वेळ गेला आणि अन्वयला मधातच मस्ती करायची इच्छा जागृत झाली. अन्वय पुढच्याच क्षणी तिच्या बाजूने गेला आणि तिच्या कानाजवळ जाऊन हलकेच म्हणाला…

ओठोसे छुलो तुम….

त्याचे शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा लाजेची कळी पसरली. पूर्ण शरीर साथ देऊ लागल. ती काहीच बोलली नाही पण ओठ जरा व्याकुळ झाले होते. त्याने तिचा चेहरा बघितला आणि पुन्हा म्हणाला…

होंठों से छूलो तुम
मेरा गीत अमर कर दो
होंठों से छूलो तुम
मेरा गीत अमर कर दो
बन जाओ मीत मेरी
मेरी प्रीत अमर कर दो
होंठों से छूलो तुम
मेरा गीत अमर कर दो

अन्वयचा मूड काही चेंज झाला नव्हता. तो सतत तिच्या आजूबाजूला फिरत होता तर स्वराला काय बोलू नि काय नको अस झालं होतं. तो पुन्हा बेडवर जाऊन बसला आणि स्वराच्या हृदयाची धडधड जरा कमी झाली. तिची आता अशी अवस्था झाली होती की कामात मन लागत नव्हतं. अन्वयच अस रूप बघून स्वरा मनोमन खुश झाली होती. अन्वय अजूनही गाणं म्हणतच होता की त्याचा फोन वाजला. अन्वय रोमँटिक शब्दातच उत्तरला," बोला मॅडम, आज कसा काय फोन? आज भावाची आठवण आली तुम्हाला??"

अन्वयने फोन स्पीकर वर ठेवला होता. अन्वयचे शब्द येताच निहारिका म्हणाली," हे बर आहे तुझं!! आधी तर रोज भाचीच्या आसपास असायचास पण बायको आल्यापासून तिलाही विसरला आहेस. म्हणायला नको पण बायकोचा गुलाम झाला आहेस. हे बरोबर नाहीये दादा. वहिनी येताच आम्हाला विसरलास ना?"

अन्वयने हसतच उत्तर दिले," अरे ह्या जगात कोण गुलाम नाहींये बायकोचा? शरद कुठे बोलतो तुझ्यासमोर? ए पण मला अजिबात आवडल नाही तू ह्या टाइमला फोन केलास ते. किती रोमँटिक मूड होता माझा. पूर्ण खराब केलास तू क्षणात. कबाब मे हड्डी कुठली!!"

स्वराला अन्वयच बोलणं ऐकून हसू आवरत नव्हतं. तो बहिणीसोबत पण एवढं फ्रीली बोलतोय हे बघून स्वराला गंमतच वाटत होती. ती मन लावून त्यांचं संभाषण ऐकत होती आणि पुढे निहारिका म्हणाली," हा मग तर योग्य वेळेवरच फोन केलाय. कबाब मे हड्डी बनायचा अधिकार माझाच आहे. आता ना एक कामच करते. तुझ्या भाचीलाच आणून ठेवते घरी म्हणजे ती सतत कबाब मे हड्डी बनेल काय म्हणतोस?"

दोघांच संभाषण इतकं गमतीदार होत की स्वराने पटापट आपली तयारी आटोपली आणि अन्वयच्या बाजूला जाऊन बसली. अन्वय आज चांगल्याच मूड मध्ये होता आणि त्याने हसतच म्हटले," बिनधास्त ठेवून जा. तिला मी ट्रेन करेन आणि शेड्युल बनवून देईल केव्हा रडायचं आणि केव्हा शांत रहायच ते. आमच्या रोमांसमध्ये नाही रडणार ती. लाडकी आहे माझी. मामाला त्रास देणार नाही."

स्वराने त्याच बोलणं ऐकून आता अन्वयला मागून धपाटाच दिला. ते होऊनही अन्वय क्षणभर हसतच होता आणि त्याने विचारले," बर कशी आहे सृष्टी? मागे ताप वगैरे होता ना तिला. आता ठिक आहे ना?"

निहारीका आता जरा शांत स्वरात उत्तरली," ती मस्त आहे रे पण दादा आई कशी आहे? म्हणजे ती वहिनीला त्रास तर देत नाही ना? मी केला होता कॉल पण माझ्याशीही नीट बोलली नाही फक्त शरदशी बोलली थोडं फार. तिकडे सर्व काही ठीक आहे ना?"

अन्वय मिश्किल हसत उत्तरला," आहे हट्टी तशीच. तुला माहिती आहे ना एकदा हट्टाला पेटली की मग कुणाचंच ऐकत नाही. बोलते ती स्वराला पण माझी बायको जरा जास्तच सहनशील, घेते एकूण पण ह्यात माझं एंटरटेनमेंट पूर्ण होत नाही. गेले कत्येक दिवस मला घरात जास्त सासू सुनेचे वादच बघायला मिळाले नाहीत. थोडी ना अशी शब्दांची बाचाबाची व्हायला हवी दोन्ही कडून तेव्हा कुठे बघण्याची मज्जा!! आय मिस ईट यार.."

अन्वय बोलतच होता की स्वराने चांगल्यानेच त्याला धपाटा घातला आणि तो जरा ओरडलाच. आवाज ऐकताच निहारिकाने हसतच म्हटले," वहिनीने धपाटा घातला बहुतेक?"

अन्वयने हसतच विचारले," तुला कस कळलं?"

आता निहारिका जरा हसतच म्हणाली," तू विसरू नकोस मी पण बायको आहे कुणाची तरी सो वहिनी सारखे शरदला धपाटे मीही घालते. तिला म्हणावं जे काम मी करू शकले नाही ते तिने करावं. आणखी दे म्हणावं धपाटे माझ्याकडून."

स्वरा केव्हाच हसू आवरून होती पण आता जास्तच मोठ्याने हसू लागली. तिच्या हसण्याचा आवाज निहारिकाला गेला होता आणि अन्वय म्हणाला," घे तूच सांग तुझ्या वहिनीला. स्पीकर वर आहे फोन. आपलं बोलन सुरू असल्यापासून दोन चार धपाटे झालेत घालून. आता काय भावाचा जीव घेणार आहेस??"

निहारिकाने हसतच म्हटले," हाय वहिनी कशी आहेस? काही प्रॉब्लेम तर नाही तुला घरी?"

अन्वयने स्वराकडे मोबाइल दिला आणि स्वरा हळूच म्हणाली," मी छान आहे ताई. कसला त्रास होणार बर? सर्व सुरळीत आहे. तुम्ही केव्हा येत आहात आम्हाला भेटायला."

निहारीका जरा चिडतच म्हणाली," कधीच येणार होते. लग्नालादेखील येणार होते पण आमच्या बंधू राजेंनी यायला नकार दिला मग काय करणार? माझी खूप इच्छा होती. मस्त छेडल असत तुम्हाला पण राहून गेलं सर्वच. ह्या दोघांच्या भांडणात मी फसले. एक दिवस घेईन बदला दोघांकडून. ह्यांना माहीत नाही मी पण ह्याचंच रक्त आहे. नाही बदला घेतला तर म्हण.."

स्वराही मिश्कीलपणे हसत उत्तरली," अस नाहीये हो ताई. अन्वय सर पण मिस करत होते तुम्हा सर्वांना पण परिस्थिती अशी होती की पर्याय नव्हता. आता या ना तुम्ही!!"

निहारिका हसतच म्हणाली," नको बाबा!! तुमचा नवरा आताच म्हणाला कबाब मे हड्डी म्हणून. तिकडे आलो आणि एक दिवस जास्त थांबलो तर हाकलून लावेल मला. नको ती रिस्क."

अन्वय मधातच हसत उत्तरला," हा बरोबर. यायचं आणि सायंकाळी पटकन जायचं..कबाब मे हड्डी वगैरे नाही बनायचं "

स्वराने पुन्हा एक धपाटा दिला आणि निहारिका म्हणाली," अजून द्या एक वहिनी माझ्याकडून. मी कधी त्याला मारायला गेले की आई मला मारायची म्हणून कधी मारू शकले नाही पण तुम्ही द्या हा."

स्वराने हसतच तिला म्हटले," हो देईल पण आधी ह्या तुम्ही. मला आवडेल तुम्हाला भेटायला आणि सृष्टीला पण भेटायला. पुन्हा तिला जर सोडून गेलात इकडे तर मी घेईन तिची काळजी. मला आवडत लहान मुलांसोबत खेळायला!!"

निहारिकाने गुगली फेकत म्हटले," एवढंच आवडत तर मग तुमचंच होऊ द्या ना. सृष्टी आणि ती/ तो खेळेल मस्त. सांगा मग केव्हा बनवत आहात मला आत्या??"

तिचा प्रश्न ऐकताच स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल पण स्वराकडे बोलायला शब्दच नव्हता म्हणून अन्वयच उत्तरला," अग थोडं मोठ्याने विचार बहुतेक तिला आवाज गेला नाही."

अन्वय- स्वराकडे बघून हसत होता तर स्वरा नजर खाली करून फोनकडे बघत होती. तेवढ्यात निहारिकाच म्हणाली," तुझं माहिती नाही पण तिला नक्की ऐकू गेलं आहे तेव्हाच तर वहिनी शांत आहे. बर हा प्रश्न सोडा वहिनीसाहेब. मला सांगा माझ्या भावावर तुम्ही अशी काय जादू केली की जो रोज मला, सृष्टीला बघायला विडिओ कॉल करत होता तो आता एकही कॉल करत नाही. काही सिक्रेट आहे का?"

तिचा प्रश्न येताच स्वरा कामातूनच गेली..तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि अन्वय म्हणाला," निहू काय प्रश्न विचारला आहेस यार तू? हाच प्रश्न मीही केव्हापासून विचारतोय पण ती उत्तर देत नाही. बघू आज तरी देते का..बोला स्वरा मॅडम!! माझी लाडकी बहीण काहीतरी विचारतेय तुम्हाला. तुम्ही उत्तर नाही देणार का?"

अन्वय- निहारिका दोघेही तीच उत्तर ऐकायला तयार होते तर स्वरा आपल्या लाजण्यातच हरवली होती. काही क्षण ती काहिच बोलली नाही आणि नंतर हळूच म्हणाली," ताई आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय मी निवांत कॉल करते बाय.."

निहारिकाही हसतच उत्तरली," हा जा पण ह्याचा अर्थ असा नाही की ह्या प्रश्नाचं उत्तर मी घेणार नाही. भेटेन तेव्हा पक्क विचारणार. तुम्ही उत्तर तयार ठेवा. बाय बाय वहिनीसाहेब!!"

स्वरा हसतच होती की अन्वय हळूच म्हणाला," तू काळजी नको करू निहू. तू विसरलीस तरी मी तुला आठवण करून देईन. बाय निहू."

स्वराने फोन ठेवला आणि अन्वय स्वराकडे बघून हसत होता. स्वराची दोघेही बहीण भावानी मिळून गोची केली होती. अन्वय तिला बघतच होता की स्वरा म्हणाली," अन्वय सर अलीकडे खूप चावट झाला आहात हा तुम्ही!! कुठेही, कुणासमोरही काहीही बोलता. ताईना काय वाटलं असेल बर? तुम्ही आपल्या निरागस बायकोला जरा जास्तच छडता अस नाही वाटत का तुम्हाला? हे बर नाहीये हा."

अन्वय क्षणभर हसतच उत्तरला," पण मी तर अजून चावटपणा सुरू केलाच नाहीये. खरा चावटपणा दाखवू का?"

तो जवळ येऊ लागला आणि स्वराची पुन्हा एकदा शिट्टी बिट्टी गुल झाली. तीच हृदय पुन्हा एकदा जोर्याने धडकू लागलं. तिला माहिती होत की ह्यावेळी तो तिला सोडणार नाही म्हणून स्वराने पटकन बॅग हातात घेत म्हटले," चला आता ऑफिसला उशीर होईल. मोठे आले दाखवू का म्हणणारे!! ह्याशिवाय दुसर सुचत काय साहेबांना. येताय की जाऊ मी रिक्षाने??"

स्वरा आपली बॅग घेऊन समोर गेली तर अन्वयही तिच्या मागे मागे जाऊ लागला. अगदी काहिच क्षणात कार सुरू झाली आणि दोघेही ऑफिसकडे जाऊ लागले..

कार सुरू झाली. अजूनही स्वराच्या गालावरची लाली काही कमी झाली नव्हती तर अन्वय तिला अधून-मधून बघून लाजवत होता. काही क्षण दोघांमध्ये अशीच गंमत- जमत सुरू होती. ती हसत होती तर तो तिच्या चेहऱ्यावरचे लाजेचे भाव बघत होता. काही क्षण त्यांचे असेच गेले आणि अन्वय म्हणाला," स्वरा मला वाटत निहू बरोबर म्हणत होती. बाळाच नाही पण हनिमूनचा विचार आपल्याला नक्किच करायला हवा. कोर्ट मॅरेज केलं म्हणून काय झालं पण हनिमून तर बनता है मॅडम. मी विचार करतोय एक महिन्याची सुट्टी काढतोच हनिमूनसाठी. काय म्हणतेस पुरेल ना एक महिना??"

स्वराचा आधीच हसून-हसून जीव गेला होता त्यात त्याच अस वाक्य येताच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा लाजेचे भाव आले आणि मोठ्याने ओरडली," एक महिना??"

अन्वयही जरा उदास स्वरात उत्तरला," कमी आहे ना माहिती आहे पण सर त्यापेक्षा जास्त सुट्टी देणार नाही. सो एकच महिना मॅनेज करावं लागेल. करू मस्त मज्जा एक महिना..मला तर आताच भारी वाटत आहे विचार करून. जायचं कुठे बर?"

स्वराने हसतच म्हटले," अन्वय सर आई म्हणतात तस तुम्हाला खरच वेड लागलं आहे. एक महिना हनिमून कोण करत आणि काय करणार आहात तिथे एक महिना?? भजन??"

अन्वयने क्षणभर तिच्या नजरेला नजर देत म्हटले," आते हेदेखील मीच सांगू. सांगितलं तर म्हणशील खूप चावट झाला आहात. जाऊदे आता सांगतोच.."

तो तिच्याकडे बघतच होता की स्वरा म्हणाली," नको समजलं मला. अनुभव आलाय बराच. मी माझ्या साठी म्हणत होते, मी तर विसरलेच की तुम्हाला एक महिनाही कमी पडेल. हो ना??"

अन्वय डोळे मिचकावत तिच्याकडे बघत होता तर स्वराला लाजण्यापासून फुरसद मिळत नव्हती. त्याची नजर अशी होती की तिला आता त्याच्याकडे बघायची हिम्मतसुद्धा होत नव्हती. तीच लाजन सुरूच होत की अन्वय पुढच्याच क्षणी म्हणाला," वेड तर लागलंय स्वरा मॅडमच आणि हे वेड मला उतरवायच पण नाही. आयुष्यभर नाही. माझ्या बस मध्ये असत तर जॉब सोडून पूर्ण जग फिरत बसलो असतो मॅडमसोबत. रोज नवीन जागा आणि मॅडमचा हा सुंदर चेहरा. बापरे!! विचार करूनच भारी वाटत आहे. तुला नाही वाटत आहे काहीच?"

अन्वयने म्हटले आणि स्वरा बाहेर बघू लागली. तिला हसन आज कंट्रोलच होत नव्हतं म्हणून काही क्षण ती त्याच्याशी काहीच बोलली नाही आणि थोड्या वेळाने म्हणाली," बस ना अन्वय सर किती लाजवणार आणखी? असच बोलत राहिलात तर माझं कामात मनच लागणार नाही. पोटात फुलपाखरू उडायला लागतात अस काही बोलायला लागलात तर. प्लिज नका ना देऊ त्रास!! प्लिज!!"

अन्वय अगदी रोमँटिक स्वरात उत्तरला," मला कळतंय ग तुझं बोलणं पण ह्या वेड्या मनाला समजत नाहीये ना त्याच काय करू? तू सांगून बघ, तुझ्याच ताब्यात आहे ते कदाचित ऐकणार तुझं तो. त्याने ऐकलं की मग मला प्लिज म्हणायची गरजच पडणार नाही. काय म्हणतेस??"

ती काहीच बोलली नाही कारण तिला माहीती होत की आज अन्वयच्या ह्या स्वभावात काहीच बदल होणार नाही म्हणून ती आपलं हसू तसच कायम ठेवून होती तेवढ्यात अन्वय पुन्हा म्हणाला," बायको तुम्ही विचारलं होत ना की सुंदरता काय तर त्याच थोडस उत्तर मला मिळालं. सुंदरता म्हणजे बहर!! त्याला रंग, रूपाचा, वय ह्याचा फरक पडत नाही. तो बहरला की बाकी सर्व गोष्टी अर्थहीन असतात. हीच आहे ना सुंदरता??"

स्वरा शांतच होती पण त्याच उत्तर तिला फार आवडल होत. आता कार मध्ये शांतपणे रोमांस सुरू होता. ओठ बोलत नव्हते पण डोळे मनातले भाव सतत व्यक्त करत होते आणि आणि अन्वयने सकाळी उरलेल्या गाण्याच्या ओळी पूर्ण केल्या..

न उमर की सीमा हो
न जनम का हो बंधन
न उमर की सीमा हो
न जनम का हो बंधन
जब प्यार करे कोई
तो देखे केवल मन
नई रीत चलाकर तुम
ये रीत अमर कर दो
ये रीत अमर कर दो
होठो से छुलो तुम
मेरा गीत अमर करदो
बन जाओ मित मेरी
संगीत अमर करदो

आकाश का सूनापन
मेरे तनहा मन में
आकाश का सूनापन
मेरे तनहा मन में
पायल छनकाती तुम
आजाओ जीवन में
साँसें देकर अपनी
संगीत अमर कर दो
संगीत अमर कर दो
मेरा गीत अमर कर दो
मेरा गीत अमर कर दो
मेरा गीत अमर कर दो
होठो से छुलो तुम
मेरा गीत अमर करदो
बन जाओ मित मेरी
संगीत अमर करदो

अन्वय- स्वरा अगदी ऑफिसच्या वेळेवरच पोहोचले होते. अन्वयने कार पार्क केली आणि दोघेही सोबतच जाऊ लागले. अगदी काही पावले त्यांनी टाकलीच होती की अन्वयने विचारले," स्वरा मग आज बोलू ना एका महिन्याच्या सुट्टीच?"

स्वरा त्याच्याकडे बघत म्हणाली," सर तुम्ही ना मार खाणार आहात माझा तेही ऑफिसमध्ये. गप्प बसा आता. गंमत झाली नाही का करून? इथे पण त्रास देणार आहेत का मला?"

स्वरा हसलीच होती की माही मागून जवळ येत म्हणाली," अन्वय सरको मारणे की बाते चल रही है. लगता है स्वरा मॅडम जलदीही बिवी वाले तेवर सिख गयी है. वैसे किस बात के लिये मारने की बात हो रही है जरा मुझे भी बताओ??"

अन्वय हसतच म्हणाला," तू सांगतेस की मी सांगू? तू नसेल सांगायला तर मी सांगू शकतो."

अन्वयने हसतच उत्तर दिले तर स्वराही हसतच मध्ये जात म्हणाली," कुछ नही माही. बस ये ज्यादा मजाक उडाते है मेरी इसलीये केहना पडता है."

माहीला समजून आल की काहीतरी सिक्रेट आहे म्हणून ती सांगत नाहीये त्यामुळे तिने काही विचारलं नाही. स्वरा आपल्या डेस्कजवळ पोहोचली. अन्वय आपल्या केबिनमध्ये एन्ट्री करणारच की पिऊन म्हणाला," स्वरा मॅडम आणि अन्वय सर, मिश्रा सरांनी तुम्हाला बोलावलं आहे."

अन्वय आणि स्वराला एकाच वेळी बोलावल्याने त्यांना जरा विचित्र वाटलं तरीही आपली बॅग दोघेही जागेवर ठेवत केबिनकडे गेले. जातानाही एकमेकांची नजर एकमेकांवर स्थिरावली होती हे विशेष. केबिनच्या दारावर येताच अन्वयने परवानगी मागितली," मे आय कम इन सर?"

मिश्रा सर नम्र स्वरात उतरले," हा आओ अन्वय.."

अन्वय- स्वरा काहीच क्षणात मध्ये पोहोचले. मिश्रा सर जरा कामात होते म्हणून नजर वर करून त्यांनी लक्ष दिलं नव्हतं. अन्वयनेही काही क्षण त्यांना काहीच विचारलं नाही. जवळपास २ मिनिटांच्या वर होऊन गेले होते. स्वरा- अन्वय तसेच उभे होते आणि शेवटी अन्वयने विचारले," सर आपने बुलाया था?"

सर लॅपटॉपमध्ये बघत उत्तरले," तुम दोनो को हणीमुन पर भेजना था इसलीये बुलाया है."

त्यांचे शब्द येताच अन्वय मोठ्याने ओरडला," व्हॉट??"

अन्वय-स्वरा स्वतःला मोठ्याने हसवायच थांबवू शकले नव्हते कारण आतापर्यंत अन्वय तिला ह्याच गोष्टीवरून त्रास देत होता आणि नेमकी ह्याच विचारातून बाहेर पडण्याची स्वराची तयारी असताना मिश्रा सर त्याबद्दलच बोलत होते म्हणून त्याना हसू आवरत नव्हतं. अन्वयने स्वराला नजरेनेच म्हटले," बघ इथे तर आपोआपच सुट्ट्या मंजूर झाल्यात मग जायचं की नाही?"

स्वराने नजर चोरली ती चोरलीच कारण आज त्याच्या डोळ्यात बघण्याची तिची काही बिशाद नव्हती. अन्वय हसतच होता की मिश्रा सरांनी नजर वर केली. त्यांच्या चेहऱ्यावरच हसू बघून काही क्षण ते स्वताही हसले आणि हळुवार म्हणाले," अरे अन्वय शादी के बाद तुम कही फिरणे गये नही तो मैने सोचा क्यू ना कम्पनी के तरफ से भेज दिया जाये."

अन्वय अतिउत्साहात म्हणाला," कहा सर स्वीजरलँड? वहा मस्त निला निला आस्मान, थंडी थंडी हवा, बर्फीले पहाड है."

अन्वय बोलत होता तर स्वरा नजर चोरून सरांना बघत होती. मिश्रा सरांनी दोन्ही हात एकमेकांवर ठेवले आणि हसतच उतरले," स्वीजरलँड तुम चले जाना. मै तुम लंडन भेज रहा हु."

अन्वय एकाही क्षणाचा विलंब न करता उत्तरला," लंडन मे हनिमून ये कुछ नया नही है? कौन जाता हा वहा?"

मिश्रा सरांच उत्तर," अन्वय तू तो बहोत उतावला है जाणे को. कहो तो स्वीजरलँड जाणे के लिये एक महिने की छुट्टी दे दु!!"

आता तर स्वराच चेहऱ्यावरच हसू काही केल्या जात नव्हत. अन्वय तिच्याकडे बघत होता हे सांगायला की बघ बोलायची गरजच पडली नाही. जायचं का मग? पण मॅडम आज कुठे नजर वर करून बघणार होत्या.

मिश्रा सरांनी काही क्षणांचा पॉज घेतला आणि म्हणाले," बी ऑन सिरीयस मोड. एक्चुली मैने कल जीस प्रोजेक्ट के बारे मे तूम्हे बताया था वो तुम दोनो मिलकर कर रहे हो और हमारा इंटरनॅशनल सेमिनार है कुच दिनो मे तो वहा तुम जा सकते हो. डेट फिक्स नही हुयी. आय विल इंफॉर्म यु. काम का काम और घुमना होता जायेगा इसलीये मैने वैसे कहा. वो मुंबई वाला प्रोजक्ट बहोत सक्सेसफुल रहा इसलीये ये प्रोजेक्ट तुम मिलकर करोगे. एनी क्वशन्स??"

अन्वय जरा मोठ्याने म्हणाला," नो सर!!"

मिश्रा सर आता हळूच म्हणाले," गुड!! अन्वय स्वरा को समझा देना. यु मे लिव्ह नाऊ.."

अन्वय- स्वरा जायला निघालेच होते की मागून मिश्रा सर म्हणाले," सून अन्वय एक साथ काम कर रहे हो मतलब स्वीजरलँडके प्लॅन मत बनाते बैठना. काम ही करणा हा नही तो पता चलेगा की प्रोजेक्ट बाजूमेही रेह गया और तुम दिलं ही दिलं स्वीजरलँड घुमकर लौट आये."

स्वराचा चेहऱ्यावर अगदी मिश्किल हसू होत आणि सेम अवस्था अन्वयची होती. दोघांनी केबिन सोडली. स्वरा आपल्या डेस्कवर जातच होती की अन्वय हळूच म्हणाला," स्वरा आता कशी पळवाट शोधशील? आता तर तुला मी बोलवेन तेव्हा यावं लागेल. मग तिथे रोमांस करायचा की काम ते नंतर ठरवू. काय म्हणतेस?"

स्वरा लाजून सरळ आपल्या डेस्ककडे धावत गेली आणि डेस्कवर बसली तर अन्वयने तिच्यावर नजर टाकत केबिन गाठली..

अन्वय निवांत खर्चीवर जाऊन टेकला. त्याच्या चेहऱ्यावर आताही हसू होत. स्वराचा सकाळपासूनचा लाजरा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हता. तो तर अगदी तिच्या त्या चेहर्यातच हरवला होता. स्वराची काही वेगळी स्थिती नव्हती. तिने डेस्कवर पोहोचताच लॅपटॉप ओपन केला आणि कामाला लागली पण तिच्या त्या चेहऱ्यावरच हसू एकही क्षण गायब झाल नव्हतं. ती काम तर करत होती पण अन्वयचा तो स्वभाव, अन्वयच रोमँटिक वागणं सर्व तिला जसच्या तस दिसत होतं. एक क्षण ह्या भुतासोबत कुणी काही करू शकत का म्हणणारी आज त्याचा त्या सुंदर क्षणीचा चेहरा आठवत होती. त्या क्षणी त्याच्या नजरेत प्रेम होतं. त्याचा तो हळुवार स्पर्श तिला खूपच आवडून गेला होता. त्या क्षणात कैद झाल्यावर स्वराला क्षणभर सुद्धा जाणवलं नाही की त्याला तिच्या चेहऱ्याने अजिबात फरक पडतो. ते प्रेमाचे सुंदर क्षण त्याच्यासोबत जगताना स्वरा आज भारावून गेली होती. आज तिच्या मनात, डोक्यात सर्विकडे तोच तो होता.

काहीच क्षण गेले. स्वरा काम तर करत होती पण तीच मन वेगळीकडे कुठेतरी फिरत होत. तेव्हाच तिच्या लँडलाइनची रिंग वाजली. तिने हळूच ती आंसर केली आणि अन्वय म्हणाला," मिसेस स्वरा प्रोजेक्टवर बोलायच आहे. प्लिज केबिनमध्ये या."

तिने काहीही न बोलता फोन ठेवला. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर हसू होत तर क्षणभर तिच्या हृदयाचे ठोके आणखीच वाढले होते. नजर आज त्याच्याशी मिळणार नव्हती हे तिला माहिती होत म्हणून नजरेला त्याच्याकडे न बघण्याची वॉर्निंग देत ती केबिनजवळ पोहोचली.
" सर आत येऊ का??"

तिचा पुन्हा एकदा तो गोड आवाज आणि अन्वयच भानच हरपलं. तो बाहेरूनच बघत होता, तिने अजूनही नजर वर केली नव्हती. त्या लाजण्यात पण एक वेगळीच मज्जा होती म्हणून अन्वय हसतच उत्तरला," या मॅडम.."

स्वरा मध्ये पोहोचली पण तिची त्याच्याकडे पाहण्याची हिम्मत झाली नाही. तिने नजर खाली करतच म्हटले," सर बोला ना."

अन्वयनेही अगदी हसतच उत्तर दिले," मिसेस स्वरा...तुम्ही वर बघणार असाल तरच मी बोलू शकेन ना. बघा बर वर."

अन्वय हसतच तिच्याकडे बघत होता तर स्वराने अजूनही नजर वर केली नाही. त्यांच्यात असाच शांततेचा संवाद सुरू होता आणि फायनली तिने नजर वर करून बघितले. तिने त्याला बघावं आणि त्यानेही तिच्याकडे एकटक बघावं. त्याच्या नजरेत तिला रात्रीचे भाव दिसत होते म्हणून तिने पुन्हा एकदा नजर खाली केली. हसू अजूनही तसच कायम होत. अन्वय त्याच क्षणी चेअरवरून उठला आणि सौम्य आवाजात म्हणाला," स्वरा माझ्या चेअरवर बस. लॅपटॉपमध्ये फाइल आहे त्यावरून समजावून सांगतो."

तो बोलून तर गेला पण स्वराची हिम्मत काही झाली नाही म्हणून अन्वय हळूच म्हणाला," स्वरा काळजी नको करू रोमांस साठी नाही कामासाठीच बोलावलं आहे. ट्रस्ट मी."

त्याचे असे शब्द येताच तिच्याकडे आता दुसरा पर्याय नव्हता. अन्वय चेअर पासून बाजूला झाला आणि स्वरा नजर चोरत त्याच्या खुर्चीवर बसायला जाऊ लागली. तिने त्याच्या बाजूने जाताना थोडं अंतर ठेवलच होत पण जातानाही त्याच्या त्या हाताचा स्पर्श झालाच. त्याचा स्पर्श होताच ती पुन्हा एकदा त्या जगात शिरली. ती खुर्चीवर बसली. काही क्षण सर्व शांत होत म्हणून तिला आपल्या विचारातून बाहेर पडायला काहीच वाव नव्हता. स्वरा खुर्चीवर बसली आणि अन्वय मागून अगदी तिच्या मानेजवळ येऊन थांबला. त्याची तिच्यावर नजर नव्हती पण तिची बारीक नजर त्याच्यावर होती. तो इतका जवळ असल्याने तिच्या हार्ट बिट्स सुद्धा तिच ऐकायला तयार नव्हत्या. हात- पाय थरथर कापायला लागलेले तरीही तिने ते सावरून धरलेले. तिच्या मनाची ती चंचल अवस्था होती तरीही अन्वय अगदी शांत भासत होता. ती त्याच्यातून बाहेर आली ते त्याच्या आवाजाने. तो तिला लॅपटॉपमध्ये बघून प्रोजेक्ट नक्की काय असणार आहे हे समजावून सांगू लागला तर स्वराही त्याच ऐकू लागली पण तीच मन आज दुहेरी अवस्थेत होत. अन्वय इतक्या जवळ असताना त्याच्या मिठीत बसून मस्त काम करावं असं तिला वाटत होतं पण ते काही शक्य नव्हतं. अन्वय काम करतानाही किती शांत सेन्सिअर वाटतो हे तिला जाणवल. जवळपास अर्धा तास तो तिला प्रोजेक्टबद्दल सांगत होता. त्याने बोलणं थांबवलं आणि क्षणभर तिच्यावर नजर गेली अगदी त्याच क्षणी तिचीही नजर त्याला येऊन भिडली. आता असा एक क्षण होता की ते स्वतःच एकमेकांच्या डोळ्यात बघायला स्वतःला अडवू शकले नाही. स्वराला तर त्याच्या कपाळावर आपल्या प्रेमाची मोहोर उमटवावीशी वाटत होती. काही क्षण ते एकमेकांच्या नजरेत बघतच होते की अन्वयने हसतच विचारले," काय बघत आहात मॅडम? आधी कधी बघितलं नाही का?"

स्वराची क्षणभरही नजर विचलित झाली नव्हती आणि ती म्हणाली," तुमचं प्रेम बघतेय. आधीही बघितलं आहे पण मन भरत नाही बघण्यापासून. सतत वाटत की हे प्रेम असच बरसत राहावं. एखादा नदीप्रमाणे, वाहत्या वाऱ्याप्रमाणे."

अन्वय तीच उत्तर ऐकून मिश्किल हसला आणि स्वराला आपण काय बोलून गेलो त्याचा अंदाज आला. तिने आपला चेहरा ओंजळीत लपवून घेतला. अन्वय तर वेड्यासारखं तिला बघतच होता. काही क्षण दोघांच्याही हृदयाच्या ठोक्याचा आवाज एकमेकांना ऐकू येईल अशी ती स्थिती होती. रोमांस करायला जागा नाही तर तस मन लागत, बेडरूम नाही तर इच्छा असावी लागते हे तो क्षण सांगत होता. स्वराने बराच वेळ आपला चेहरा ओंजळीत लपवून ठेवला होता आणि बोटांच्या फटीतून त्याच्याकडे बघत म्हणाली," अन्वय सर काम झालं असेल तर जाऊ??"

अन्वय पुन्हा तिच्या जवळ येत म्हणाला," नको…"

त्याच्या जवळ येण्याने तीच भानच हरपलं..तिची काय अवस्था झाली होती तिलाच माहिती. ती काही वेळ इथेच थांबली असती तर मनाने आणखी काय फरमाहिश केल्या असत्या तीच तिलाच माहिती नव्हत म्हणून ती लाजतच उत्तरली," अन्वय सर प्लिज!!"

तिचा आवाज इतका गोड होता की तो तिला नाही म्हणू शकला नाही. त्याने तिच्या भोवती असलेले हात बाजूला केले आणि खुर्चीच्या दूर झाला. स्वराही त्याच्या नजरेत बघत समोर जाऊ लागली. ती जात तर होती पण तिची- त्याची नजर आज एकमेकांना बघण्यापासून थांबवू शकली नव्हती. जणू त्यांच्या नजराणी एकमेकांना वेडच लावलं होत. ती बाहेर तर गेली पण दोघांनाही क्षणभर एकत्रच असल्याचा भास होत होता.

आजचा पूर्ण दिवस जणू दोघांसाठी खास होता. अन्वय- स्वरा एकमेकांना चोरून बघत होते. आजपर्यंत फक्त अन्वय तिला चोरून बघत होता पण आता स्वराही ते क्षण अनुभवू लागली. असा एक क्षण गेला नव्हता जेव्हा ती त्याच्याकडे बघत नव्हती. आज तिचीच त्याला बघायची इतकी इच्छा होत होती की ती जाणून काहीतरी कारण काढून त्याला बघायला जात होती. खूप सुंदर वातावरण होत ते. बराच वेळ स्वराच्या चेहऱ्यावर ते भाव होते आणि माहीने न राहवता विचारले," स्वरा आज की मुस्कुराहट का राज क्या है? कल जैसेही सर का मजा ले रही हो?"

स्वरा अगदी काहिच बोलली नाही किंबहुना तिचे डोळेच बोलत होते. ती काहीच बोलत नाहीये हे पाहून माही म्हणाली," नही नही आज कुछ और बात है? शायद इसलीयेही तुम सुबहँ ऊन्हे मारणे की बात कर रही थि. मुझे नही बताओगी? अब हम क्लोज फ्रेंड्स है ना!!"

स्वराने तिच्याकडे बघितलं आणि हसतच उत्तरली," डिअर माही!! तू ना शादी कर ले तब इस हसी का राज पता चलेगा. कैसा है ना राज कुछ बताये नही जाते. समझी? इसलीये जलदी से शादी कर ले बाद मे खुदही समझ जायेगी."

माही तिच्या जवळ येत उत्तरली," किसिंग वगैरे ना!!"

स्वरा हळूच तिच्या पाठीवर धपाटा घालत म्हणाली," पागल!! हर बार किसमे प्यार थोडी बया होता है. प्यार तो एक-दुसरे को देखणे और उसके नजरो मे अपने आप को मेहसुस करणे मे होता है."

माही जरा वेळ शांत होती आणि हसतच उत्तरली," तभी मै सोचू की तुम्हारा काममे मन क्यू नही लग रहा. मन वहा है तो यहा कैसे लगेगा ना? स्वरा अगर इतना देखने का मन कर रहा है तो ये मेरी फाइल सर को देकर आओ और कोई जलदी नही है आने की."

स्वराने तिला धपाटाच घातला होता की ती म्हणाली," क्या बात है!! ये हसी तो सर को देखणी बनती है. इसी का जादू है बाबा की सरकी नजरे आपसे हटती नही. उफ ये ओठो पर लाली और चेहरे की सुंदरता कही घायल ना करदे सर का दिलं.."

आज एक तर स्वरा आधीच लाजत होती त्यात माहीने आणखी भर घातली. आज पूर्ण दिवस माही स्वराची मज्जा घेत होती आणि स्वरा होती की ते सुंदर क्षण विसरू शकत नव्हती. काम सुरू होतच पण डोक्यात होते ते सुंदर क्षण..

सायंकाळची वेळ होती. अन्वय- स्वरा कारमधून घराकडे निघाले होते. दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते पण आलटून- पालटून त्यांची एकमेकांकडे नजर जात होती. आज दोघांचाही इतका सुंदर दिवस गेला होता की कामाचा थकवा पण जाणवत नव्हता. स्वरा अन्वयकडे बघत आहे हे त्याला जाणवलं आणि पुन्हा एकदा त्याच्या ओठातून शब्द आले…

तू जो कहे जीवनभर
तेरे लिये मै गाऊ
तेरे लिये मै गाऊ
गीत तेरे बोलो के
लिखता चला जाऊ
लिखता चला जाऊ
मेरे गितो मे
धुंडे तुझे जग सारा
छुकर मेरे मनको
किया तुने क्या इशारा
बदला ये मौसम
लगे प्यारा जग सारा
छुकर मेरे मन को
किया तुने क्या इशारा…

गाणं अन्वय जरी म्हणत होता तरी तो प्रत्येक शब्द स्वराला आपल्याच साठी वाटत होता. आयुष्यात दुःख सतत येतच असतात पण महत्त्वाचं असत आनंद सेलिब्रेट करणं. त्याला वेळ, काळ गरजेचा नसतो असते फक्त इच्छा. स्वराला आज जाणवलं होत. तिला माहीत होतं की कदाचित तिच्या आयुष्यात समोर भरपूर त्रास येणार आहेत पण अन्वयसोबतच्या ह्या सुंदर क्षणासाठी तिने हा प्रवास स्वीकारला होता. तो प्रवास तिच्या मनाला इतका भावला होता की अन्वयचा तो शांत चेहरा स्वतःपासून दूर करत नव्हती. आता तर ती त्याला गाणे म्हणताना एकटक बघत होती. त्यात चिंता नव्हती की कशाची काळजी. फक्त एक-एक क्षण जगणं लिहून होत.

कधी कधी आनंद अनुभवायला दुखाकडे दुर्लक्ष करण गरजेचं असत. हेच आहे सुखी जीवनाच रहस्य..आव्हान भरपूर येतात आयुष्यात पण त्याला तितकस महत्त्व न देता प्रत्येक क्षण एन्जॉय करणं ह्यात जगण्याचा, प्रेमाचा अर्थ लपलेला आहे. अन्वय-स्वराला हे कदाचित लवकरच समजलं होत म्हणून ते आयुष्यातला प्रत्येक क्षण एन्जॉय करत होते. भविष्यातील आव्हानाचा विचार न करताच..

तेरी नजरो मे खुदको मेहसुस करणा चाहती हु
मै आशिकी हु तेरे ईश्क मे बरबाद होणा चाहती हु....