Bhagy Dile tu Mala - 80 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ८०

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ८०

मायने बदल गये खूबसुरती के
इस्तेमाल जब आयने का हुआ
गोरी चमडी के दिवाने हुये सभी
काले रंगने मेरा सब कुछ छिन लिया...

सकाळची वेळ होती. ते नेहमीप्रमाणे फिरायला निघाले होते. सुरुवातीला सकाळी सोबत फिरायचं आणि मग दिवसभर कामात बिजी व्हायचं हे आता दोघांच ठरलेल होत त्यामुळे आजही शेड्युलमध्ये काहीच बदल झाला नव्हता. अन्वय-स्वरा सोबत जात होता. लोकांच्या नजरा सेम तशाच होत्या पण त्याने आता स्वतात बदल केला होता. कदाचित स्वराला सर्व सहन करताना बघून त्याच्यातही हिम्मत जागी झाली होती म्हणून त्यानेही लोकांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती. काहीच क्षणात ते त्या चहा वाल्याकडे पोहोचले. स्वराला घरी जाऊन चहा बनवावा लागू नये म्हणून दोघे बाहेरच चहा घेत होते. चहा वाल्याने त्यांच्या हातात चहा आणून दिला आणि ते निवांतपणे घेऊ लागले. स्वरा- अन्वय दोघेही बाहेरच वातावरण बघण्यात व्यस्त होते. अन्वयने काही क्षण स्वराकडे नजर टाकली. कालच्या प्रसंगानंतरसुद्धा तिच्या चेहऱ्यावर उदासी नव्हती म्हणून अन्वयही जरा खुशच झाला होता. काहीच क्षण गेले, अन्वय चहा घेतच होता की त्याला जाणवलं. समोर एक मुलगी केव्हाची सतत त्याच्याकडे बघत होती. अन्वयने बघूनही तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि इकडे-तिकडे बघू लागला. त्याला वाटलं होतं की ती कदाचित आपल्याला बघत नसावी म्हणून त्याने दुर्लक्ष केलं पण काहीच क्षणात त्याला जाणवलं की ती मुलगी त्याच्याकडेच बघत आहे. अन्वयनेही आता तिच्याकडे एकटक बघितले. अन्वयला जाणवलं की तिला कुठेतरी बघितल्यासारख वाटत आहे त्यामुळे तो तिला काही क्षण बघतच राहिला. काहीच क्षणात त्याला ती कोण आहे ते आठवलं आणि तिला ओळखताच त्याच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल. ते दोघेही एकमेकांकडे बघत होते. आता स्वराच लक्ष बाजूच्या वातावरनावरून अन्वयकडे गेलं. अन्वय त्या मुलीकडे हसून बघत होता. त्याच स्वराकडे लक्षही नव्हतं म्हणून ती त्या मुलीकडे रागाने बघू लागली. तिची एक नजर त्याच्यावर तर एक नजर तिच्यावर होती. ते काहीच बोलत नव्हते पण त्याचं एकमेकांवर सतत लक्ष होत म्हणून स्वराला राग आला होता. काहीच क्षण गेले आणि ती समोरची मुलगी म्हणाली," अब भी पहचानना बाकी है या इंट्रो देना पडेगा अन्वय सर?"

तिचा आवाज येताच अन्वय हसतच उत्तरला," जनाब आपको कैसे भूल सकते है. आप तो चहेती थि सबमे. पुरा क्लास तो आपके पीछे पडा रेहता था. फिर क्या सौरभ क्या संकल्प. पर मॅडमने किसिको भाव नही दिया. टॉपर, ब्युटी विथ ब्रेन अँड सो मेनी क्वालिटीज. हाऊ कॅन वी फॉरगेट यु मिस श्वेता. थोडा वक्त लगा पहचानने के लिये बट फायनली पहचान लिया और भी कुछ बताना है या इतनी तारीफ हो जायेगी?"

श्वेता समोरच्या बेंचवरून पटकन त्याच्या बाजूने येऊन बसली. अन्वयने तिला बसायला जागा करून दिली म्हणून स्वरालाही बाजूला सरकाव लागलं. अन्वयने स्वराकडे पाठ केली आणि स्वराला आणखीच राग आला. स्वरा फक्त ऐकायचं काम करत होती आणि श्वेता उत्तरली," सब कुछ याद है लेकिन मै किस पर मरती थि वो याद नही. तुम्हारे हर करिबी को तो पता था. पर जनाबने भावही नही दिया. क्यू सही कहा ना मैने मिस्टर अन्वय? चॉकलेट बॉय!"

अन्वय आता शांतच बसला कारण त्याला माहित होतं की ती त्याच्याबद्दलच बोलत होती. अन्वयच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरल होत हे स्वरापासून काही लपून राहू शकल नाही. अन्वयने तिच्यासमोर हात करत म्हटले," नाइस टू मिट यु अगेन डिअर श्वेता!! बहोत सालो बाद मिल रहे हो. कैसी हो और यहा कैसे??"

ती हॅन्ड शेक करत उत्तरली," नॉट गुड यार!! कॉलेज मे थि तो तुम्हे देखकर ही सुबहँ होती थी. तूम्हे देखणे को रोज कॅन्टीन मे जाणा. तुम नही दिखे तो दिनभर इंतजार करणा. तुम लायब्ररीमे रेहते थे इसलीये वहा बैठे रेहना सब मिस कर रही हु. वो मजा अब इस लाइफ मे कहा?? और वो तुम्हारी कविता ' श्वास की आभास हा ' मै तो हर रोज रेकॉर्ड करके सूनती थि. पर तुम कॉलेज से गये और लगता है जैसे जिनाही छोड दिया. आय मिस ईट यार!! तुम्हे और ऊन पलो को भला कैसे भूल सकती हु इसलीये आ गयी खास तुमसे मिलने."

श्वेताने त्याचा हात कितीतरी वेळ सोडला नव्हता हे स्वराने बघितले होते पण अन्वयला स्वरा बाजूला आहे की नाही ह्याच देखील भान नव्हतं. अन्वय हसतच उत्तरला," तूम्हे याद है सब कुछ? कविता का टायटल भी?"

ती जरा चेहऱ्यावर हास्य फुलवत म्हणाली," भुलेही कब थे अन्वय सर. ना तुम्हे भूल पाये ना तुम्हारी बाते. एक तुम अकेलेही थे जो मुझे सूट करते थे. मै दिवानो की तरह तुम पर मरती थि और तुम तो आप हमे नजरअंदाज कर डिया करते थे. तब नही पुछ पायी लेकिन अब तो बता दो की क्या कमी है मुझमे? मेरे दिलं का हाल पता होते हुये भी आपणे हमे अपणाया क्यू नही? हा २ साल छोटी हु पर ये तो चलता है. टॉपर थि, सुंदर नही हु देख के बताओ जरा? जरा मुझे भी तो पता चले क्यू आपने इस सुंदर लडकी के तरफ गौर नही किया?? कहिये जनाब!!"

अन्वयने तिच्याकडे बघितले नाही पण स्वरा मात्र तिच्याकडे बघत होती. दिसायला अगदी गोरी पान, उंची आलमोस्ट त्याच्या येवढी, शॉर्ट टाइप मध्ये केस, अंगावर ब्लॅक टी शर्ट आणि जीन्स. अगदी कुणालाही पाहताच आवडेल अशी ती. स्वराने तिच्याकडे बघून अन्वयकडे बघितले. अन्वय हसतच उत्तरला," कोई कमी नही थि. आय मीन कोई कमी नही है. यु आर द परफेक्ट वन टु एवरी मेन. चाहे तो भी कोई कमी नही धुंड सकता आपमें."

ती जरा लटकेच रागात उत्तरली," फिर क्यू अन्वय देखते नही थे? कोई और पसंद थि? नही नही ये नही हो सकता. तुम्हे तो लडकीयो से ज्यादा बुक्स पसंद थे. बता भी दिजीए अन्वय. इतने सालो से इंतजार कर रही हु आपके जवाब का?"

अन्वयने हसतच म्हटले," अभिभी फ्लर्ट करणे की आदत गयी नही लगता. चलो वो बिती बाते है ये बताओ की ये सुबहँ- सुबहँ सज- धज के कहा आयी हो? और उससेभी पेहले तुम हैद्राबाद मे थी ना यहा कैसे आयी?"

श्वेता हसतच म्हणाली," नॉट बॅड हा अन्वय!! तूम्हे तो मेरे बारे मे बहोत जाणकारी है और मुझे लगता था की तुम्हे तो मै याद भी नही. सच बताओ तुम मेरी प्रोफाइल पीक चेक करते हो ना फेसबुक पे. वैसे वो मैने तुम्हारे लिये ही रखी है. तुम्हे पसंद है ना लाल कलर? मुझे पता था इसलीये मैने वो फोटो रखी है."

लाल कलर अन्वयचा आवडता आहे हे ऐकताच स्वराचा मूड चांगलाच बदलला. तेवढ्यात त्याने उत्तर दिले," मेरी माँ ऐसा कुछ नही है. वो विराज बाते करता है तुम्हारे बारे मे इसलीये पता रेहता है. सच बोलू तो अच्छा लगता है तुम्हारे प्रोग्रेस के बारे मे सूनने के लिये. वो छोडो ये बताओ की इधर कैसे?"

श्वेता जरा सिरीयस होत उत्तरली," सच बोलू तो तुम्हारे लिये. जॉब हेंद्रबाद मे थि और तुमसे कभी मिल ना पायी. अब घरवाले शादी के पिछे पडे है. सोच रही थि की किसींसे करणी तो है तो क्यू ना तुमसे करलु? फिर लगा तुमने कर ली होगी और एक दिन पिया मिली उसने बताया की तुम सिंगल हो इसलीये पुछने आयी हु. खास तुम्हारे लिये दिल्ली मे ट्रान्सफर लिया है."

स्वरा तीच हे वाक्य ऐकून सरळ उठून जाऊ लागली. अन्वयने तिला जाताना बघितलं आणि त्याच्या आता लक्षात आलं की आपलं तिच्यावर लक्षच नव्हतं. तेव्हा श्वेताच बोलणं ऐकून तिला काय वाटलं असेल ह्याची त्याला कल्पना आली. त्याने आता श्वेताकडे बघितले आणि हसत उत्तरला," श्वेता, अभि मुझे घर जाणा बहोत जरुरी है वरणा बडे प्रॉब्लेम हो जायेगे. तुम दिल्ली मे हो ना तो फिर मुलाकात होगी. अब नंबर दे मुझे मै कॉल करता हु तूम्हे."

श्वेताने त्याला नंबर दिला पण हळूच विचारले," बताओ तो अचानक क्या हुआ? ऐसें क्यू भाग रहे हो?"

अन्वय जरा हसतच उत्तरला," मेरी माँ सब कुछ बताउंगा विस्तारसे लेकिन अभि नही और मै तूम्हे कॉल रहा हु नंबर सेव्ह कर लेना. बताता हु कब मिलना है तो. सॉरी!!"

अन्वय धावतच स्वराच्या मागे पळाला तर श्वेता त्याला बघतच होती. अन्वय श्वेतासोबत बोलायला थांबला त्यामुळे स्वरा बऱ्याच समोर निघून गेली होती. अन्वयने धावतच तिला गाठले. ती पटापट समोर चालत होती आणि अन्वय श्वास घेऊ लागला. काही क्षण त्याचे श्वास घेण्यातच गेले आणि त्याने स्वराला विचारले," काय ग अशी अचानक निघून का आलीस?"

स्वरा रागावतच उत्तरली," मग काय तुमचं उत्तर ऐकायला थांबायला हवं होतं. जा ना तुम्ही तिच्याकडे इकडे कशाला आलात? तीच उत्तर द्या. बघितलं नाही का कशी सुंदर आहे ती अप्सरेसारखी. मी काय अशी कुरूप. कशी म्हणत होती बघा म्हणून आणि तुम्ही बघत पण होतात ना?? सौरभ सर, विराज दादासोबत तुम्ही तर नव्हता ना तिच्यावर मरणारे? विचारत काय आहे म्हणा?? हैद्राबादला राहते हे माहिती आहे तर मग बाकी विचारायचच काय उरल?"

अन्वयला खर तर राग यायला हवा होता पण तिचा मूड बघून तो हसू लागला. पहिल्याच दिवशी मी इर्शा करणार नाही, करतील तुमच्या गोपिका म्हणणारी स्वरा आता स्वतःच इर्शा करत होती म्हणून अन्वय तिच्यावर हसतच होता. अन्वयच हसन तिला अजिबात आवडल नव्हतं म्हणून ती रागातच उत्तरली," हसायला काय झालं? माहिती आहे तुम्ही दात घासून आलात ते."

अन्वयला आता खरच हसू आवरत नव्हतं म्हणून तो जरा मोठ्याने हसू लागला आणि स्वरा रागातच उत्तरली," अन्वय सर आता हसलात ना तर दातच तोडीन तुमचे. हसन बंद करा. तुम्हाला माझा राग माहिती नाही."

अन्वयने क्षणभरासाठी का होईना हसन बंद केलं पण त्याला हसू आवरत नव्हतं हे तितकंच खरं. अन्वय तोंडावर हात ठेवून हसत- हसत तर स्वरा चेहऱ्यावर राग घेऊन समोर चालू लागले. अगदी १५ मिनिटात त्यांनी घराचा रस्ता पार केला पण त्यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नव्हता.

आजच घरातील वातावरण खूपच भारी होत. आज अन्वयला प्रेयसी, बायकोच खर रूप पाहायला मिळालं होतं म्हणून त्याच्या चेहऱ्यावर आज आनंद काही कमी झाला नव्हता. तर स्वरा घरी आल्यावर सुद्धा क्षणभर त्याच्याशी बोलली नव्हती. स्वरा बोलत नाहीये म्हणून अन्वयने फोन हातात घेतला आणि खोटा खोटा कॉल लावला. काहि क्षण तो थांबला आणि जरा मोठ्या आवाजात उत्तरला," हाय श्वेता!! सॉरी यार मेरी भी तुम्हारे साथ रुकने की बहोत इच्छा थि पर नही रुक पाया. बहोत बुरा लग रहा है मुझे. कोई बात नही आज शाम को मिलते है. मै हॉटेल बुक करता हु. बहोत सी बाते है कॉलेजकी और कुछ राजभी है जो तुमसे शेअर करणे है. तुम्हारे सवालो का जवाब भी देना है. तो मिलते है शाम को. सिधे ऑफिससे तुम्हे पीक कर लुंगा. बाय बाय डिअर!!"

अन्वयने पटकन फोन कट केल्याच नाटक केले आणि मोबाइलकडे काहीतरी बघत राहिला. स्वरा आधीच रागात होती. तिने पटकन टॉवेल घेतला आणि बाथरूममध्ये गेली. जाताना तिने दार इतक्या जोराने आपटल होत की अन्वयला हसू आवरेनास झालं होतं. आज खऱ्या अर्थाने त्याला तिच्यातली प्रेयसी दिसली होती आणि तो आतुर झाला होता पुन्हा पुन्हा त्या सुंदर प्रेयसीला बघायला.

अगदी २० मिनिटांचा कालावधी गेला होता. स्वरा अंघोळ करून बाहेर आली तशीच अन्वयकडे रागाने बघत किचनला गेली. अन्वय तिला त्याक्षणी सुद्धा बघत होता. ती किचनमध्ये काम करत होती आणि अन्वय मोठयाने श्वेताशी फोनवर बोलत असल्याचं नाटक करू लागला. एक नजर त्याची तिच्यावर होती आणि त्याला जाणवलं की ती चिडत आहे म्हणून आणखीच तो तिची गंमत घेऊ लागला. आज स्वराला राग आवरत नव्हता. तिची इच्छा झाली असती तर इतर बायकांप्रमाणे तिने भांडे आदळायला मागे पुढे बघितलं नसत पण आईचा दरारा इतका होता की ती काहीच करू शकली नाही. स्वराचा आज वेगळाच स्वभाव बाहेर येत होता आणि अन्वय होता की तिची गंमत करणं सोडत नव्हता…

जवळपास १० वाजले होते. स्वराच सर्व काम आवरल होत. ती तयारी करत होती. ह्या पूर्ण वेळात ती त्याच्याशी एकदाही बोलली नव्हती म्हणून अन्वय जरा तिचा स्वभाव बघून हसत होता. ती केस आवरत होती की अन्वयने पटकन बेडरूमचे दार बंद केले. स्वराला अन्वयच्या मनात नक्की काय सुरू आहे ते जाणवलं म्हणून ती त्याच्या विरुद्ध बाजूने तोंड करून हसू लागली. अन्वय हळुवारपणे तिच्याकडे येत होता म्हणून तिच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. तिला हसू तर येत होत पण तिला हसायचही नव्हतं त्यामुळे खरा गोंधळ तिचा सुरू होता. काहीच सेकंदात अन्वय तिच्या जवळ पोहोचला आणि तिला मागून मिठी मारू लागला. तेव्हाच स्वरा पुढे गेली आणि रागातच म्हणाली," हा आता रोमांस सुचनारच पण ती कोण महामाया बोलत होती तेव्हा माझ्याकडे लक्ष पण नाही गेलं ना तुमचं? ती एवढी सुंदर मुलगी समोर असताना कस जाणार ना माझ्याकडे लक्ष? हा मी जरा वाईट दिसते ना मग बरोबर आहे म्हणा कस आवडेल तुम्हाला तिला मी तुमची बायको आहे हे सांगायला?"

अन्वय तीच बोलणं तर ऐकत होता पण त्याला तिचा तो भाबळा स्वभाव बघून तिच्यावर आणखीच प्रेम येत होत आणि तो तिच्या बाजूने चालू लागला. अन्वय एक-एक पाऊल समोर तर ती एक-एक पाऊल मागे जात म्हणाली," अन्वय सर पुरे हा!! आतापर्यँत माझी काळजी नव्हती आणि आता बरा रोमांस सुचतोय तुम्हाला?"

अन्वयने ऐकल्याच न ऐकलं केलं आणि तिच्या बाजूने चालू लागला. ती मागे मागे जात होती आणि अन्वय समोर. एक क्षण असा आला की ती अडकून सरळ बेडवर पडली. अन्वयही अगदी तिच्या बाजूला बेडवर पडला. स्वराची नजर त्याच्यावरच होती आणि गंमत अशी की त्याच्या डोळ्यात बघताना तिचा राग पण नाहीसा झाला होता. अन्वयने तिच्या चेहऱ्यावरून केस बाजूला केले. ती त्याच्या आणि तो तिच्या नजरेत बघत होता. त्याने अगदी हळुवार आपले ओठ तिच्या बाजूने नेले. तिने त्याचक्षणी आपले डोळे बंद केले. तिच्या अंगात सरसरी निर्माण झाली. कोणत्याही क्षणी अन्वय तिच्या ओठातला रस पिऊ शकत होता. त्याने ओठ तिच्या ओठांजवळ नेलेच होते की तेव्हाच अन्वयचा फोन वाजला. तो मिश्रा सरांचा होता. फोनची रिंग वाजताच अन्वयची नजर तिच्यावरून हटली. स्वरा त्याच्याकडे बघत होती आणि अन्वय बाजूला झाला. स्वराच हृदय अजूनही धडधड करत होत. तो फोनवर बोलत होता पण इकडे स्वराची नुसती फजिती झाली होती. तिला त्याच्यावर रागावू की आपल्या भावनांवर कंट्रोल मिळवू समजत नव्हतं. ह्याक्षणी त्याच्याकडे पाहनही तिला जमणार नव्हतं म्हणून तिने पटापट केस बांधून घेतले आणि बॅग घेऊन तयार झाली. अन्वयने फोन ठेवला. तो जरा चिडला होता. त्याने पटकन आपली बॅग घेतली आणि समोर जाऊ लागला तर स्वराला आता त्याच्यावर हसू येत होतं. स्वराने पुन्हा नाटक करायचं असल्याने क्षणभर हसून घेतलं आणि पुन्हा एकदा स्वतःला नॉर्मल केलं. अन्वयने काहीच क्षणात कार काढली आणि दोघेही ऑफिसकडे निघाले. अन्वय हळूहळू कार चालवत होता तर स्वरा बाहेरच्या वतावरणात हरवली होती. कुणिच कुणाशी काहीच बोलत नव्हते आणि अन्वय जरा चिडतच म्हणाला," यार मिश्रा सर पण ना!! थोड्या वेळानंतर कॉल केला असता तर काय झालं असत? त्यांच्यामुळे किती भारी क्षण मिस झाला. नाही तर आज पूर्ण रुसवाच काढला असता तुझा."

स्वरा त्याच्याशी काहिच बोलली नाही पण ती बाहेर बघून हसत होती. तिच्या चेहऱ्यावर अचानक कळी खुलली होती. त्यांनी तो क्षण ठरवला नव्हता म्हणूनच कदाचित तो खास होता पण तिला अन्वयच बोलणं ऐकून आता हसू येत होतं फक्त अन्वयला कळू नये म्हणून ती अधा-मधात हसत होती. काही क्षण अन्वय शांत बसला आणि हळूच उत्तरला," कसे आहेत ना लोक? बायको सोबत चार सुखाचे क्षण पण जगू देत नाहीत. ह्यांना पण डिस्टर्ब करतील बघ लोक!! ह्यांच्यासोबत असच काहीसं होईल."

स्वराला खर तर हसू आवरत नव्हतं तरीही लटकेच रागात म्हणाली," हा त्यांना म्हणता ते ठीक आहे पण आपण क्रश समोर मला विसरून गेलात त्याच काही नाही. ते चालत. तेव्हा नाही आठवली ना तुम्हाला बायको."

अन्वय जरा मोठ्या आवाजात म्हणाला," ए अस काही नाही हा!! माझी कुणी क्रश वगैरे नव्हती..माझी एकच क्रश आहे आणि ती सोबत बसून आहे कारमध्ये."

स्वरा पुन्हा रागात उत्तरली," ते कळलं मला म्हणून बायकोकडे दुर्लक्ष केलं ना?? बोला बोला?"

अन्वय जरा शांत झाला आणि हळूच म्हणाला," बर बाबा सॉरी!!आता काय करू सांग की तुझा रुसवा जाईल?"

स्वरा पुन्हा रागात उत्तरली," एकच काम करा. शांत बसा म्हणजे मला माझा राग आवरता येईल. जर नाही केलं तर मी इथेच उतरून ऑफीसला जाईल."

अन्वय नम्र आवाजात उत्तरला," बर बाई राहतो शांत पण चिडू नकोस.."

स्वरा,"हमम.."

स्वराला पुन्हा राग येऊ नये म्हणून अन्वय शांत होऊन कार चालविण्याकडे लक्ष देऊ लागला. त्याने आता तिच्याकडे बघण्याचा प्रयत्नही केला नव्हता तर स्वरा अधून-मधून त्याच्याकडे बघून हसत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून तिला त्याच्यावर क्षणभर प्रेमच आलं होत पण आपण रुसवा सोडायचा नाही म्हणून तिने पटकन चेहऱ्यावरच हसू दूर केलं. त्यांचा असाच गमतीशीर प्रवास सुरू राहीला.

जवळपास १०.४५ झाले होते जेव्हा ते ऑफिसला पोहोचले. ऑफिसमध्ये एंटर करण्याआधी अन्वयने अगदी गोड हसुन तिच्याकडे बघितले पण स्वराने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि जाऊन आपल्या डेस्कवर बसली. अन्वयला मिश्रा सरांनी लवकर बोलविल्याने तो सरळ त्यांच्या केबिनमध्ये पोहोचला आणि काही क्षण का होईना त्यांच्यातली गंमत जरा बंद झाली. स्वरानेही माहीला विश करून आपल्या कामाला सुरुवात केली. तसे दोघेही लहान मुलासारख वागायचे पण कामात ते कायमच सिरीयस होते म्हणून अगदी काहीच क्षणात ती आपल्या कामात बिजी झाली.

अन्वय जवळपास एक तास सरांच्या केबिनमध्ये होता. त्यांची एका प्रोजेक्टवर चर्चा सुरू होती म्हणून तो तिथेच होता. मिश्रा सर अन्वयशी चर्चा झाल्यावर कुठेतरी बाहेर निघाले. अन्वय सोबतच बाहेर आला आणि स्वराकडे बघू लागला. त्याला वाटलं की ती त्याच्याकडे बघेल पण अस काहीच झालं नाही. तो वाट पाहून- पाहून थकला आणि शेवटी केबिनमध्ये पोहोचला. काहीच क्षण झाले. अन्वय निवांत चेअरवर बसला होता आणि त्याने लँड लाइनवरून कॉल लावला. स्वराने समोरून फोन उचलला आणि हळूच आवजात उत्तरली," हॅलो.."

अन्वय जरा मोठ्या आवाजात खडूस शब्दात उत्तरला," मिसेस स्वरा प्लिज आपण केबिनमध्ये या मला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर तुमच्याशी बोलायच आहे."

स्वराने फोन ठेवला आणि लगेच त्याच्या केबिनमध्ये परवानगी मागत पोहोचली. अन्वय समोर चेअरवर बसून होता आणि स्वराने विचारले," काय काम होत सर?"

अन्वय पुन्हा खडूस होत उत्तरला," मिसेस स्वरा तुम्हाला जास्तच घाई आहे अस वाटत नाहीये का? बसा समोर खुर्चीवर. कॉफी बोलावली आहे ती घेत- घेत बोलू. इतका महत्त्वाचा विषय आहे सो काही सुटायला नको."

स्वरा समोर खुर्चीवर बसली आणि काहिच क्षणात कॉफीचा कप आला. अन्वय हळुवार तिला बघत कॉफी घेत होता तर स्वरा काही मिनिटातच कॉफी संपवत म्हणाली," बोला सर आता तर कॉफीही झाली. काय काम होत सर आपलं माझ्याकडे? माझ्याकडे दुसरे सुद्धा काम आहेत सो प्लिज लवकर बोलणार का?"

अन्वयने आपल्या कॉफीकडे बघितले ती अजून संपली नव्हती म्हणून तो क्षणभर मनातल्या मनात उत्तरला," हिला काय एवढ्या लवकर संपवायची होती कॉफी. आता काय बहाणा शोधू मॅडमला थांबवायचा?"

तो विचार करत होताच की स्वरा पुन्हा म्हणाली," सर बोलत आहात ना की जाऊ?"

अन्वयने तोंड वाकड करत कॉफीचा कप बाजूला ठेवला आणि अगदी नम्र स्वरात उत्तरला," तर अस काम आहे मॅडम!!( ती लक्ष देऊन ऐकत होती) प्लिज सॉरी ना!! नको रागावूस अशी. सॉरी ना स्वरा!!"

त्याच बोलणं ऐकून स्वराला हसू यायचंच बाकी होत पण तिने स्वतःला कंट्रोल करत म्हटलं," सर तुम्ही ह्यासाठी बोलावलं मला? तुम्हाला माहिती आहे ना कामाच्या वेळी मला अस काही आवडत नाही. तुम्हाला पण आवडत नाही. मला वाटलं होतं की कामासाठी बोलावलं असणार पण तुम्ही तर!! मी तक्रार करेन हा मिश्रा सरांना!! कामात अस करणं बर वाटत का?"

अन्वय अगदी लहान तोंड करत उत्तरला," तेच ना कामात मनच लागत नाहीये. तू अशी रुसून राहिलीस तर कामात कस मन लागेल बर? प्लिज सोड ना रुसवा..प्लिज!"

स्वराही आता जरा रागातच उत्तरली," बॉस हे तुमचे घरचे मॅटर घरी सोडवा इथे नाही. पुन्हा कामाच असेल तरच मला सांगा. मी येते बाय."

ती पटापट रागावत केबिनबाहेर पडली पण तिने आता आवरलेल हसू बाहेर आल. स्वरा त्याचा तो इनोसंट चेहरा बघून खूपच खुश झाली होती तर इकडे अन्वयची गंमत आता अन्वयवर भारी पडू लागली. तो चुपचाप तिच्याकडे बघत तसाच उदास- उदास राहिला.

स्वरा डेस्कवर पोहोचली पण हा गमतीचा शेवट नव्हता. आज मिश्रा सर ऑफिसमध्ये नव्हते तेव्हा अन्वयला अडवणार कुणीच नव्हतं म्हणून अन्वय दुपारपर्यंत तिला सतत कॉल करून बोलावत होता. जवळपास ती २ ते ३ वेळा केबिनला गेली पण ती काही रुसवा सोडायला तयार नव्हती. तो विनाकारण बोलावतोय आणि लोकांसमोर आपलं हसू होऊ नये म्हणून तिने आता त्याचा कॉलच घेणे बंद केले. अन्वयला आज करमत नव्हतं म्हणून कोणत्या- ना- कोणत्या बहाण्याने तो तिला बघायला बाहेर येत होता. अन्वय जेव्हा बाहेर यायचा तेव्हा ती रुसवा दाखवायची पण तो एकदा मध्ये गेल्यावर तिला त्याच्यावर हसू आवरायच नाही. अशाच गमती- गमतीत दुपार झाली.

सर्व काम आवरून जेवायला बसलो होते. स्वरा जेवायला त्याच्या बाजूला बसली होती पण अजूनही ती त्याच्याशी बोलली नव्हती. जेवन करतानाही तो कुणाला लक्षात येणार नाही अशा पद्धतीने कानाला हात लावून तिची माफी मागत होता पण ती काही आज त्याला माफ करायला बघत नव्हती. तरीही त्याने हार मानली नाही. तीच लक्ष जावं म्हणून तो तिच्या पायाला पाय मारत होता. बऱ्याच वेळ असच सुरू होत. ह्यावेळी स्वराने आपला पाय बाजूला केला आणि नेमका पाय माहीला लागला. माही मोठ्याने ओरडतच उत्तरली," अन्वय सर ये क्या कर रहे है आप? कितने जोर से लगा है मुझे?"

अन्वयचा आता पोपटच झाला आणि तो उदास होत उत्तरला," सॉरी सॉरी गलती से लग गया."

माही रागाने त्याच्याकडे बघत होती तर स्वरा त्याची झालेली फजिती बघून गालातल्या गालात हसू लागली. अन्वयला ते समजलं पण तो काहिच करू शकला नाही. त्याने आता तोंड लहान केले आणि चुपचाप जेवण करू लागला. त्याची वर बघण्याची हिम्मतही आता झाली नव्हती.

काहीच क्षणात सर्वांचे जेवण आटोपले. अन्वय आपल्या केबिनला पोहोचला तर स्वरा डेस्कवर निवांत बसली होती तेवढ्यात माहीने तिच्या बाजूला जात विचारले," स्वरा क्या चल रहा है तुम दोनो का?"

स्वरा जरा चेहऱ्यावर विचित्र भाव आणत म्हणाली," मतलब??"

माही जरा हसतच उत्तरली," तुम्हे क्या लगता है. सुबहँ से तुम्हारा क्या चल रहा है मुझे पता नही. उसीके चक्करमे मुझे लात पडी है. अभिभी दुःख रहा है. बता ना क्या हुआ है?"

स्वरा आता तिच्या बाजूने वळत म्हणाली," सुबहँ वो मेरा मजाक उडा रहे थे और अब मै उडा रही हु तो देखे कैसे कर रहे है. पुरी कोशीष हो रही है मुझे मनाने की."

माही हसतच उत्तरली," क्या बात है अन्वय सर का ऐसा रूप मैने कभी नही देखा. चलने दो तुम्हारा रोमांस ऐसेही. वैसे बहोत छेड रही हो तुम ऊन्हे देख लेना कही ज्यादा ना हो जाये."

स्वरा हसतच उत्तरली," शादी की है तो बीबी के नखरे थोडे झेलने तो पडेगेही. क्यू सच कहा ना?"

माहीने तिला टाळी देत म्हटले," ये भी सही बात है. शादी के बाद थोडी मस्ती तो बनती है."

स्वरा- माही आज त्याचा विचार करून हसतच होत्या. काही वेळ त्यांनी गप्पा मारल्या आणि पुन्हा कामात व्यस्त झाल्या पण तिच्या चेहऱ्यावरच हसू काही कमी झालं नव्हतं.

अन्वयने दुपार पर्यंत तिची गंमत केली होती पण माही सोबत त्याची फजिती झाल्यापासून त्याने स्वराला एकदाही केबिनमध्ये बोलावले नव्हते की काही नाही. तो आपल काम करण्यात व्यस्त झाला तर आता स्वराही आपलं काम करत बसली होती. अन्वयला मिश्रा सरांनी जे काम करायला सांगितलं होतं त्याच्या फायनली तो मागे लागला आणि काही क्षणाकरिता स्वराचा विषय तो सहज विसरून गेला. अन्वयच काम आटोपलं तेव्हा जवळपास ५.१५ वाजले होते. आता त्याला दुसर कोणतच काम नव्हतं म्हणून त्याने स्वराला मॅसेज केला…

" स्वरा पटकन आवरायला घे. १० मिनिटात बाहेर जातोय आपण."

अन्वय स्वराच्या मॅसेजची वाट बघत होता आणि समोरून रिप्लाय आला..

" वाटलंच मला त्या श्वेताला भेटायला जाणार आहात म्हणून. सकाळी बोलत होतात ना की भेटू म्हणून तेव्हाच तर ऑफिसचा टाइम संपायच्या आधीच निघाला आहात. जात आहात ते ठीक आहे पण मला कशाला नेत आहात? तुमची काय अपेक्षा आहे मी तुमच्या क्रशचे किस्से ऐकावे. मी नाही येणार. मी टॅक्सी करून घरी जाईन. तुम्ही भेटून या तुमच्या खास मैत्रिणीला."

अन्वयने क्षणभर मॅसेज वाचला आणि तो स्वतःला हसण्यापासून थांबवू शकला नाही पण त्याने काही रिप्लाय दिला नाही उलट तो १० मिनिट पूर्ण होण्याची वाट पाहू लागला. त्याने आपली बॅग घेतली. लॅपटॉप वगैरे बंद केला तेंव्हापर्यंत १० मिनिट निघून गेले होते. तो सरळ केबिनमधून निघाला आणि तिच्या डेस्कसमोर जाऊन उभा झाला. तो तिची येण्याची वाट बघत होता पण ती उठायला तयार नव्हती म्हणून अन्वय जरा मोठ्यानेच म्हणाला," स्वरा निघायचं ना??"

स्वराची इच्छा तर नव्हती पण सर्वांसमोर त्याला नाही म्हणणं योग्य नव्हतं म्हणून तिने लॅपटॉप बंद केला आणि माहीला बाय म्हणत कारकडे निघाली. जातानाही अन्वय- स्वरा एकमेकांशी बोलले नव्हते. अन्वयने काहिच क्षणात कार सुरू केली आणि तिच्या मूडचा अंदाजा घेऊ लागला. ती ओरडणार म्हणून तो काही बोलला तर नाही पण तो अधून-मधून तिला बघत बसला होता. काही क्षण सर्वच शांत होत आणि स्वराने विचारले," अन्वय सर तुम्हाला जायचं होतं तर कुणी मनाई केली होती पण मला का यायला फोर्स केला? सर्वांसमोर चल म्हटलं म्हणून आले नाही तर कधीच नसते आले. कशाला कबाबमे हड्डी बनवून नेत आहात मला?"

अन्वयचा चेहरा एकदम शांत वाटत होता. काही क्षण त्याने उत्तर दिलच नाही पण काही वेळाने उत्तरला," अग ती आता इथेच कायमस्वरूपी आलीय. मला म्हणाली को शिफ्टिंग करायला ये. मी विचार केला की एकटा केव्हांपर्यंत करू सर्व म्हणून तुला नेतोय. शेवटी मित्रच कामी येतात ना?? बरोबर केलं ना मी??"

स्वरा जरा रागातच उत्तरली," अजिबात नाही. तुम्ही करायचं होतं मला का त्रास देत आहात? एक तर ऑफिसच काम करायचं आणि मग स्वयंपाक बनवायचा त्यात पुन्हा हे."

अन्वयने पुन्हा म्हटले," अग कुणी मदत मागितली तर नाही कस म्हणणार?? माझी मैत्रीण तुझी मैत्रीण नाही का? कुणी मदत मागितली तर सरळ नाही म्हणायचं का?"

अन्वयच बोलणं ऐकून ती शांतच झाली होती आणि हळूच म्हणाली," आता निघालोच आहो तर जाऊ. वाढेल थोडं काम माझं आणखी काय?? बायको आहे ना तुमची म्मग वागवा हवं तसं.."

स्वरा बोलून शांत झाली होती तर अन्वय आता तिला लपून- लपून बघून हसत होता. तिला कळलंच नव्हतं की तो तिची गंमत करत होता. कारमधील वातावरण अगदी शांत झाल होत म्हणून अन्वयने गाणे लावले पण स्वराने रागात तेही बंद केले. दुपारी त्याच्यावर हसणारी स्वरा आता कुठेतरी गायब झाली होती आणि तोंड फुगवून बसली होती.

साधरणाता एक तास झाला जेव्हा अन्वयने गाडी थांबवत म्हटले," आलं घर. सुंदर घर आहे ना श्वेताच?"

स्वराने समोर बघितले. तो तिला आई-बाबांकडे घेऊन आला होता फक्त नवीन रस्त्याने घेऊन आल्याने तिला ते समजलं नव्हतं. तिला समजलं की आपण त्याला उगाच इतकं सर्व बोललो तरीही ती काहीच बोलली नाही आणि बाहेर निघू लागली. तेव्हाच अन्वय उत्तरला," मॅडम हा रुसवा जरा इथेच सोडून चला नाही तर आईबाबाना वाटेल की मी त्रास देतो तुम्हाला."

अन्वयने हसत हसत म्हटले तर स्वराने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत उत्तर दिले," खर तर आहे ते. तुम्ही देता त्रास मला. मी तर जाणून आईला सांगणार आहे ह्याबद्दल. ऐकवू दे तुम्हाला थोडस."

स्वरा रागा- रागातच समोर निघाली तर अन्वय मागेच राहिला. त्याला कॉल आल्याने तो काही क्षण बाहेरच थांबला होता. स्वरा दारावर पोहोचली आणि तिने दाराची बेल वाजवली. अन्वय अजूनही वर आला नव्हता म्हणून ती त्याची वाट बघत होती. तेवढ्यात समोरून दार उघडल्या गेले आणि बाबा स्वराकडे बघत म्हणाले," अरे स्वरा तू इथे?"

स्वरा हसतच उत्तरली," हो ना बाबा तुमची खुप आठवण येत होती म्हणून आले इकडेच ऑफिसवरून."

बाबांना भेटून तिचा मूड जरा चेंज झाला होता. ती काही पून्हा बोलणार त्याआधीच बाबा पुन्हा म्हणाले," अरे तू एकटीच आलीस? जावई बापू नाही आले?"

ते बोलायला आणि अन्वयने पाय टाकायला अगदी एकच वेळ झाली. अन्वय दारातून येत उत्तरला," अस कस येणार नाही बर मी??"

अन्वयला बघताच बाबांचा चेहरा खुलला. बाबांनी त्याला मध्ये घेतले. एव्हाना आईही हॉल मध्ये आली होती आणि स्वरा रागावतच उत्तरली," हा आता तुम्हाला जावईच जास्त महत्त्वाचा असणार ना? मी काय परकी झाले. घ्या जावयला डोक्यावर आणि नाचा. बस एवढंच उरलय आता."

स्वरा बोलून वॉशरूमकडे पळाली तर आईने हसतच विचारले," जावई बापू काय झालंय हिला? ही का अशी वागते आहे? भांडण वगैरे झालं की काय तुमचं?"

अन्वय हळुवार आवाजात हसतच उत्तरला," काही नाही हो. आज एक मैत्रीण मिळाली जुनी तिच्याशी बोलत होतो आणि हिच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही तर सकाळपासून गाल फुगवून बसली आहे. म्हटलं तुमच्याकडे घेऊन यावं मूड तरी बरा होईल मॅडमचा."

स्वराच्या आई हसत उत्तरल्या," बर केलंत! तशी पण मला आठवण येत होती खूप स्वराची. बर ते सोडा..मला सांगा थांबणार आहात ना तुम्ही आज?"

अन्वय हळूच म्हणाला," आई घरी सांगून आलो नाही तर थांबू शकत नाही. नंतर स्पेशली येतो राहायला. थांबन नाही होणार पण जेवण करून नक्की जाऊ. त्याआधी जर तुमच्या हातचा चहा झाला असता तर बर वाटल असत. प्लिज मिळेल का?"

स्वराच्या आई हसतच उत्तरल्या," तुम्ही बसा मी घेऊन येते लगेच."

आई किचनला गेल्या आणि अन्वय सोफ्यावर बसला. आईने किचनमध्ये चहा टाकला आणि तिथेच उभ्या होत्या की स्वराने आईला मागून मिठी मारली. काही क्षण तिने आईला सोडलंच नाही आणि तिच्या केसांवरून हात फिरवत आई म्हणाल्या," बाळ स्वरा सर्व चांगलं सुरू आहे ना घरी? खूप काळजी वाटते ग तुझी. एक रात्र नीट झोप लागत नाही बघ विचार करून. सर्व ठीक आहे ना बाळा? खूप त्रास तर नाही ना सर्वाचा?"

स्वराने हसतच उत्तर दिले," सर्व काही ठीक आहे आई. तुला म्हणाले होते ना अन्वय सर असताना काही टेन्शन असणार नाही. ते घेतात माझी खूप काळजी. कुणी काही बोलल तर भांडायला सुद्धा मागे बघत नाहीत. एवढं टेन्शन नको घेऊस. मी खुप खुश आहे त्यांच्यासोबत."

आई हसतच म्हणाल्या," अच्छा मग त्यांच्यावर रुसली का आहेस?"

स्वराने मूड पटकन चेंज केला आणि आईवर रागावत उत्तरली," म्हणजे तुलाही त्यानी आपल्या बाजूने करून घेतलं तर. तुम्हाला माझं काहीच पडलं नाही ना? तू करत बस चहा मी जाते तिकडेच. तुझ्याशी बोलायला आले तर तू देखील त्यांचीच बाजू घेत आहेस. खडूस कुठली!!"

स्वरा रागात बाहेर पोहोचली तर आई आताही तिच्या निरागसपणावर हसत होत्या. स्वरा बाहेर येत रागातच सोफ्यावर जाऊन बसली त्यावेळी अन्वय-बाबांमध्ये गप्पा सुरु होत्या. स्वरा येताच अन्वयने बाबांना विचारले," बाबा कस सुरू आहे मग इथे सर्व? बोर तर होत नाहीये ना?"

बाबा जरा उदास स्वरातच म्हणाले," जावई बापू!! काढतो कसातरी वेळ आम्ही घरात पण दिवसभर काही करायला नसत तर बोर तर होणारच. त्याला काही पर्याय नाही दुसरा."

त्यांचं समोर काही बोलणं होणारच की आई चहा घेऊन आल्या आणि अन्वय चहा घेत उत्तरला," मी विचार केलाय ह्यावर. पुढच्या वर्षी स्वराकडून लोण काढून देणार आहे तुम्हाला. एक इलेक्ट्रॉनिक शॉप काढू तुमच्या मालकीची मग तुमच्या दोघांचा वेळ सहज जाईल. पैसे स्वराच्या सॅलरी मधून कटत राहतील."

आई लगेच म्हणाल्या," अहो पण स्वराचे पैसे तुमचे आहेत ना. मग आम्ही कसे?"

अन्वयने बारीक नजर स्वराकडे करत म्हटले," ते पैसे तुमचेच आहेत आणि तस पण मी जर तिचे पैसे घेतले तर तुमची मुलगी म्हणेल की एवढे पैसे असूनही माझेच हवेत ह्यांना. तुमच्या मुलीला राग आला की काय काय बोलेन ते अनुभवलंय मी आज. नको बाबा ती रिस्क!! आयुष्यभर ऐकवायला मागे पुढे बघणार नाही तुमची मुलगी."

अन्वयने बोलताच सर्विकडे हसू पसरल. स्वराची आई हसतच बोलून गेली," हे बरोबर बोललात जावई बापू. तिचा राग फक्त आम्हाला माहिती आहे."

अन्वय पटकन बोलून गेला," आणि आता मला..सकाळपासून माफीच मागतोय पण काहीही परिणाम होत नाहीये मॅडमवर. पुन्हा काय अवस्था होणार आहे ह्या गरीब नवऱ्याची काय माहिती?"

अन्वयचे शब्द ऐकून पुन्हा एकदा सर्व लोक हसू लागले होते. आज जणू सर्व स्वरावर कमेंट पास करत होते म्हणून हसण्याच वातावरण जसच्या तस होत. आज घरामध्ये केवळ स्वरा- अन्वयची जुगलबंदी सुरू होती म्हणून घर कस बहरून निघालं होत. अन्वय- स्वरा तिथे जेवण करेपर्यंत होते. तेवढ्या वेळ त्यांची मस्ती सुरू होती. त्यांना बघून खऱ्या अर्थाने आई-बाबांना आनंद मिळाला होता.

ती रात्रीची वेळ. जवळपास११ वाजले होते. स्वरा रूम मध्ये आली तर होती पण त्याच्याशी काहींच बोलत नव्हती. तिने आपले सर्व काम आवरले आणि झोपायला जाऊ लागली. ती लाईट ऑफ करणारच की अन्वय म्हणाला," स्वरा तुला काहीतरी दाखवायच आहे. ये इकडे."

त्याने म्हटल्यावरही स्वरा त्याच्याकडे गेली नव्हती म्हणून क्युट भाव चेहऱ्यावर आणत तो उत्तरला," प्लिज स्वरा! फक्त दोन मिनिटं. एवढं पण नाही ऐकणार माझं?"

त्याचा इतका गोड आवाज ऐकून ती स्वतःला त्याच्याजवळ जाण्यापासून थांबवू शकली नाही. ती त्याच्या बाजूने बसली तसेच अन्वयने तिला समोर बसविले आणि मागून मिठी मारली. ती काही विचार करणार त्याआधीच त्याने समोर मोबाइल केला. तिला इशाऱ्यानेच त्याने समोरचा मॅसेज वाचायला लावला. ती मॅसेज वाचू लागली.

" श्वेता सच बोलू तो तुमसे सुंदर कॉलेज मे कोई नही थि ऐसा मुझे लगता था पर आज पता चला की तुमसेभी सुंदर एक लडकी कॉलेजमे थि और आज उससे मैने शादी कर ली है. केहना नही चाहता लेकिन अब रेह नही सकता. मेरी बिवी तुमसेभी ज्यादा सुंदर है इसलीये मै उसके अलावा किसींके बारे मे नही सोचता. ना आज और ना जिंदगीभर. जमाणे मे कितनी भी सुंदर लडकिया हो पर मेरी स्वरा जैसी दुसरी कोई नही. इसिलीये मै उससे दिवानो की तरहँ प्यार करता हु."

सोबतच त्याने लग्नाचे फोटो तिला सेंड केले होते आणि एक प्रश्न खाली लिहिला होता. " है ना तुमसे भी ज्यादा सुंदर??"

तिचा रिप्लाय अजून आला नव्हता पण स्वराच्या चेहऱ्यावर सहज हसू पसरल आणि तिने त्याच्या डोळ्यात बघत विचारले," इतकं प्रेम करता तुम्ही माझ्यावर?"

अन्वय काहीच बोलला नाही आणि स्वराने पटकन त्याच्या गालावर किस करत म्हटले," मिश्रा सरांमुळे जो क्षण सकाळी अपूर्ण राहिला होता आता तो पूर्ण करूया? प्लिज!!"

अन्वयने हसतच तिला मिठीत घेतले आणि पुढे कुणाला काहिच बोलायची गरज पडली नाही.

ती कितीतरी वेळ आता त्याचा हळुवार स्पर्श अनुभवत होती आणि जणू जगाला एक प्रश्न विचारत होती. खर प्रेम करणाऱ्याला स्पर्श करताना, इतरांशी ओळख करून देताना चेहऱ्याने फरक पडतो का??

प्रेम हे एकमेव नात आहे जे रूप, रंग बघून केल्या जात आणि तिला जपण्याशिवाय दुसरी सुंदरता काहीच नाही..

देखकर आयने मे खुदको
हमने उससे युही पुछा है
नजरो से सुंदर क्या
कोई और नजारा है?