Bhagy Dile tu Mala - 76 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ७६

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ७६

सहवासात तुझ्या आयुष्य म्हणजे
नभात फुललेली चांदरात असेल
साथ तुझी असताना
सुखांची अविरत बरसात असेल...

" स्वरांवय- पर्व नव्या प्रेमाचे "

तारीख १४ फेब्रुवारी...सकाळचे ११ च्या जवळपास झाले असावेत. अन्वयने आज ब्लू कलरची शेरवानी घातली होती. पायात मोजळी, एका हातात घड्याळ असा साधा पोषाख करून तो तयार झाला होता. त्याला आज पाहिलं असत तर कुणीच म्हटलं नसत की त्याचा आज विवाह आहे. त्याने आरशात एकदा स्वतःला बघितले आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड हास्य अवतले. त्याने पुढच्याच क्षणी समोर बेडवर पडलेला मोबाइल हातात घेतला. तो रूममधून बाहेर जाणारच की समोर पडलेल्या एका बॉक्सवर त्याची नजर गेली. त्या बॉक्सकडे बघताच अन्वयच्या चेहऱ्यावर पुन्हा सुंदर हसू आलं. त्याने बॉक्स उघडून बघितला. त्यात होत मंगळसूत्र. पाहिला तर एक साधा धागा पण तोच धागा आता त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार होता. त्याने आयुष्यात भरपूर स्वप्न बघितले होते पण ह्या स्वप्नाला कुठलीच तोड नव्हती आणि काही क्षणातच आता त्याच ते स्वप्न पूर्ण होणार होत. त्याने हसतच तो बॉक्स खिशात टाकला आणि बेडरूमच्या बाहेर पडला. खर तर त्याला माहित होतं की त्याच्या घरचे कुणीच आज लग्नाला येणार नाही तरीही एक छोटीशी आशा त्याच्या मनात होती म्हणून तिरकस नजर टाकत तो हॉलमध्ये पोहोचला. त्याने दुरूनच आईच्या बेडरूमकडे नजर टाकली. दार आतून बंद करून होत, त्याला न बोलताही आईच उत्तर मिळाल होत. तरीही एक आशा घेऊन तो काही मिनिट तिथे आईची वाट बघत होता. अगदी ५ मिनिट झाले होते त्याला आता कळून चुकलं होत की आईची वाट पाहणे निरर्थक आहे म्हणून तो डोळ्यात पाणी घेऊन हळूवार पावले टाकत घराच्या बाहेर पडला.. तो क्षणातच कारच्या जवळ पोहोचला आणि त्याने पुन्हा एकदा दारावर नजर टाकली. दारावर कुणीच नव्हतं. त्याने चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आणली आणि कारचे दार उघडून मध्ये बसला. तो वरवर आनंदी दाखवत असला तरीही आपल्या घरचे आज कुणीच सोबत असनार नाहीत म्हणून त्याला वाईट वाटलं होतं. अश्रुंचे एक दोन थेंब त्याच्या चेहऱ्यावर रेंगाळू लागले होते. त्याने क्षणातच ते पुसले आणि डोळे घट्ट मिटून काही क्षण तसाच राहिला. त्याने स्वतःच्या मनाला सावरले आणि दीर्घ श्वास घेत त्याने हळुवार डोळे उघडले. चेहऱ्यावर खोटी का असेना गोड स्माईल आणली. आता जरा तो शांत वाटत होता. बऱ्याच वेळाने त्याने एकटेच जाण्याचा निर्णय पक्का केला. तो आता कार सुरू करणारच की एक कार अचानक त्याच्या कार समोर येऊन थांबली. अन्वय समोर बघतच होता की समोरच्या कारमधून सौरभ बाहेर निघाला. सौरभ बाहेर निघताच अन्वयही बाहेर निघाला आणि सौरभ त्याला मिठी मारत म्हणाला," तुझे क्या लगा हम दुल्हेको अकेले- अकेले जाणे देणे वाले थे? पता था मुझे कोई साथ नही होगा तेरे. इसलीये यहा आ गये."

त्याच्या मागूनच विराजने त्याला मिठी मारत म्हटले," हा ना, माना की कुछ खास लोग साथ नही है पर इसका मतलब ये थोडी है की हम हमारे भाई की शादी हम ऐसेंही कर लेंगे. आज सब कुछ खास होगा. बारात भी जायेगी और बाराती भी होगे."

श्रीलेखा ( विराजची वाईफ ) आता अन्वयच्या जवळ येत म्हणाली," फिर नही तो क्या?? तुझे ऐसेंही थोडी जाने देणे वाले है. ओ हिरो अब तो हम आ गये है, ये झुठी स्माईल दिखाना बंद कर. क्या पेहचानने नहीे हम तुझे. चल एक दिलंसे स्माईल कर. हमारा लडका सुंदर दिखना चाहीये या नही?"

श्रीलेखाने त्याला मिठी मारली आणि अन्वयच्या चेहऱ्यावर त्यांना बघून हसू आलं. खोट खोट नाही तर निखळ हसू.. तो हसतच होता की सौरभ म्हणाला," विराज तू मेरी कार ड्राईव्ह कर के आ मै अन्वय की ड्राईव्ह करता हु. जलदी से निकल कही देर ना हो जाये वरणा लडकी भाग जायेगी और हमारा लडका ऐसेंही रेह जायेगा."

आज प्रत्येक व्यक्ती अन्वयला हसवायचा प्रयत्न करत होता. त्यांचे एफर्ट्स बघून अन्वयला त्यांचा अभिमान वाटू लागला होता.

विराजने गाडी सुरूच केली होती की श्रीलेखा म्हणाली," यार सौरभ एक ही पिस बचा था वो भी आज बुक हो गया. क्या करे मेरी किसंमत का. एक मिला वो भी कंजूष कही का. अन्वय सोचले, अभिभी टाइम है. मेरे से शादी कर ले मै विराज को छोड के आ जाऊंगी फिर भाग जायेंगे हम कही. चल बता जलदी गाडी भी तैयार है बस तेरे हा केहणे की देर है."

अन्वय तीच बोलणं ऐकून गालातल्या गालात हसतच होता की सौरभ म्हणाला," श्री अगर विराजने सून लिया ना तो. तो तेरी कोई खैर नही. इसकी शादी दूर रेह जायेगी और तुम्हारा ही मसला कही बडा ना हो जाये."

त्याचे शब्द तोडतच श्रीलेखा उतरली," तो क्या? वो मेरे सामने बोले तब ना!! उसकी इतनी हिम्मत के वो मुझे सबके सामने कुछ कहे. उसमे क्या पुरे खानदान मे इतनी हिम्मत नही. उसका छोड यार आज अन्वयपे बात करणे दे, अन्वय बोल ना, भाग चले क्या?"

अन्वय केव्हाच तिच्याकडे बघून हसत होता तर सिया ( सौरभची वाईफ ) आता त्याला मिठी मारत म्हणाली," भैया बहोत बहोत मुबारक बात आपको! सौरभने बताया मुझे स्वरा के बारे मे गुड चॉइस भैया. इतने साल ठेहरने का फायदा हुवाही. हिरा लाये है आप!!"

त्याने हसूनच तिच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि आता सौरभ म्हणाला," मेरी माँ चलो जलदीसे! तुम्हारी बाते कभी खतम नही होगी. अगर विराज हमारे पेहले पोहोच गया तो फोन कर-करके दिमाग खायेगा! और आज उसकी रोतली बाते मुझे नही सूननी."

श्रीलेखा हसतच उत्तरली," उसे दुसरे काम आते कोणसे है? मै आज भी सोचती हु वो कोणसा मनहूस दिन था जब मैने उसे शादी को हा कहा था. अगर मुझे चान्स मिले तो मै ऊस पल मे जाकर अपणा डिसीजन चेंज करणा चाहती हु. हो सकता है क्या सौरभ??"

सौरभ तिच्या पायांना हात लावत म्हणाला," मेरी माँ चल अभि नही तो सच मे देर हो जायेगी. इतना तो रेहम कर मुझपे.."

श्रीलेखा पुडच्याच क्षणी म्हणाली," चल तू केहता है तो छोड देती हु.."

ती बोलून गेली आणि सर्व कसे हसू लागले. अन्वय आज एक शब्द बोलला नव्हता पण त्यांना बघूनच त्याच्या चेहऱ्यावर हसू परतल होत. आता पुढच्याच क्षणी सर्व कार मध्ये बसले आणि सौरभने हळुवार कार सुरू केली. हळूहळू कार समोर जात होती आणि अन्वयने पहिल्यांदा तोंड उघडले," सौरभ सारी तैयारी हो गयी? कुछ बचा तो नही ना?"

सौरभ विचार करत उत्तरला," हा अलमोस्ट हो गयी है. तू टेन्शन ना ले. स्वराको लाने को दो कार भेज दि है. संकल्प हार लेकर आयेगा. अपणे खास हॉटेलमे एक रूम स्पेशल बुक की है. शादी के बाद सिधे वही जायेंगे. थोडी पार्टी हो जायेगी. हमने हमारा सब काम कर दिया. मंगलसूत्र तेरे पास है बाकी मुझे नही लगता कुछ बचा होगा. मंगलसूत्र तो लाया ना तुने??"

अन्वय हळुवार स्वरात उत्तरला," हा लाया है. उसके बिना शादी कैसे होगी इसलीये याद से लेकर आया हु."

मंगळसूत्राच नाव घेताच अन्वयच्या चेहऱ्यावर हसू पसरल आणि गप्प बसलेली श्रीलेखा म्हणाली," मुझेही पेहनायेगा ना?"

ती केव्हाची त्याची उडवत होती आणि आता अन्वयही तिच्याकडे बघत म्हणाला," देखते है.. तू चल तो मेरा मन पलट गया तो तुझसेही कर लुंगा खुश!! अब तो चलेगी की यही पे बकबक करनी है."

त्याच उत्तर येताच श्रीलेखा म्हणाली," सोच रही हु स्वरा को गायब कर दु. तब तो करेगा ना मुझसे शादी."

श्रीलेखा त्याच्या डोळ्यात डोळे टाकत बोलून गेली तर अन्वय तिच्याकडे बघून हसतच होता एवढंच काय सिया, सौरभही स्वतःला हसण्यापासून थांबवू शकले नाही. श्रीलेखाने अगदी काही मिनिटात अन्वयचा मूड बनवला आणि तो पुन्हा एकदा स्वराच्या स्वप्नात हरवला. ती आज नक्की कशी दिसत असेल? तिला केव्हा एकदा पाहायला मिळत अस त्याच त्याला मन विचारत होत. त्याच्याकडे कदाचित उत्तर नव्हतं पण तो आज स्वतःच तिला फिल करू पाहत होता. ज्या मुलीला कुणी सुंदर समजलं नाही त्याच मुलीची सुंदरता बघायला तो आतुर होता.

दुसरीकडे स्वराच्या घरी सर्व आपापली तयार करून बाहेर हॉलमध्ये बसले होते. सौरभने पाठवलेल्या कार केव्हाच पोहोचल्या होत्या म्हणून बाबांची केव्हापासून ओरडा ओरड सुरू होती तर कितीतरी वेळापासून बेडरूमच दार लावून बसलेल्या मुली अजूनही बाहेर आल्या नव्हत्या. त्यांनी दार अस लावून घेतलं होतं की कुणाला मध्ये येण्याची परवानगी सुद्धा नव्हती म्हणून बाहेरच मंडळी वाट बघून बघून कंटाळली होती. एक तासापेक्षा जास्त होऊन गेला होता पण त्यांची बाहेर येण्याची चिन्हे काही दिसेना. इकडे बाहेरचे ओरडून-ओरडून थकले होते आणि फायनली बेडरूमच दार उघडलं. सर्व मुली समोर समोर होत्या तर स्वरा अजूनही दिसत नव्हती. सर्वांची नजर आताही स्वरालाल शोधत होती. ते सर्व स्वराला शोधतच होते की हॉलमध्ये येताच तिच्यासमोरून एक-एक मुली बाजूला होऊ लागल्या आणि नवरीच्या वेशात सजलेली स्वरा अचानक समोर आली. स्वराला आज सर्व बघत होते आणि काही क्षण सर्वच थांबल. ती लाल साडी, गळ्यात सोन्याची चैन, केसांना गजरा, चेहऱ्यावर मेकपचार अंश नाही तरीही तिचा चेहरा खुलून दिसत होता. सर्व तिच्याकडे बघत होते तर तिने आपली नजर अजूनही वर केलीच नव्हती. स्वरा आपल्याकडे सर्व लोक बघत आहेत म्हणून लाजत होती आणि आईने समोर येत तिच्या चेहऱ्यावरून कडकडा बोट मोडले. स्वरा पुन्हा एकदा लाजली आणि डोळ्यात अश्रू घेत आई म्हणाली," किती वाट बघितली होती मी ह्या क्षणाची स्वराची!! तुझं लग्न म्हणजे आमचं सर्वात सुंदर स्वप्न. केव्हांचे ह्या क्षणाची वाट बघत होतो आणि बघा शेवटी आमच स्वप्न पूर्ण झालंच. माझी मुलगी आज किती सुंदर दिसत आहे ना! कुणाची नजर नको लागो हा. जावई बापू तर हिला बघताच कामातून जाणार आहेत."

पूजाही हसतच उत्तरली," आमची बहीण आहेच इतकी सुंदर की तिने काहीही नाही केलं तरी सुंदरच दिसतेच. मुळात सुंदर लोकांना दुसरी कशाचीच गरज नसते, हीच तर खासियत आहे ना सुंदरतेची. मलाही तेच वाटत आहे, आज जीजूच काही खर नाही. आई सोबत पाण्याची बॉटल घे ग. जर स्वराला बघताच ते बेहोश झाले तर त्यांना उठवायला कामी येईल. होता न फ्रेंड्स??"

एक तर स्वरा आधीच लाजरी गोजिरी झाली होती त्यात पूजाच्या शब्दाने आणखीच भर घातली. तिचा चेहरा आज किती सुंदर भासत होता हे आज तिला माहिती नव्हत. ते सर्व तिची स्तुती करत होते तर स्वराच मन वेगळ्याच जगात होत. तिला केव्हा एकदा अन्वयची भेट होते अस झालं होतं म्हणून तिच्या चेहऱ्यावर आणखीच लाजेची लाली पसरली होती. ती लाजतच होती की काहीच क्षणात स्वयमच्या आई समोर येत म्हणाल्या," बहोत सुंदर दिख रही हो स्वरा. शायद आज हमारीही नजर ना लग जाये."

स्वराने त्यांच्याकडे नजर वर करून बघितले आणि पूजा हसतच म्हणाली," आय हेट टीअर्स पुष्पां!! अब ये रोना धोना बंद करो. अभि तो सबसे खूबसुरत पल आने को बाकी है. इस पल को ऐसें जियो की स्वरा को हमेशा याद रहे. और मेरी माँ अभि कोई रोना धोना नही करेगा. आप रोओगे तो हम नही रोख पायेगे खुदको. पुरा मेकप खराब हो जायेगा वो बात अलगही."

पूजा गंमत करतच होती की तेवढ्यात तिचे बाबा म्हणाले," तुमच्या गप्पा जर अशाच सुरू राहिल्या ना तर जावइ बापू पळून जातील किती उशीर करता तुम्ही म्हणून. मग ते सापडणार नाहीत. केव्हांच्या त्यांनी गाड्या बोलावल्या आहेत चला बर."

त्यांचा आवाज येताच खाली उतरून सर्व गाडीत बसले. आज जवळपास सर्व मुली एकत्र बसल्या होत्या तर दुसऱ्या गाडीत बाकीचे बसले होते. मृन्मयीच नशीब खराब होत की तिला इतर लोकांसोबत बसावं लागलं होतं. गाड्या सुरूच झाल्या होत्या की पूजाने हलकेच प्रश्न विचारला," स्वरा मला सांग आता नक्की काय सुरू आहे तुझ्या मनात? अन्वय सर कसे दिसत असतील त्याचाच विचार करत आहेस ना?"

स्वराने पटकन लाजून मान खाली केली आणि दीपिकाच म्हणाली," पूजा तू पण ना काय प्रश्न विचारत आहेस? समजून घे की तूच. किती आतुरता असेल तिला त्याला बघण्याची, ती तर शब्दात सुद्धा सांगू शकणार नाही. तिला वाटत असेल की मी केव्हा पोहोचेल आणि त्यांना बघेन आणि आपण उगाच उशीर करतोय. मुलीनो स्वराला त्यांना बघण्यापासून अडवू नका ग, चला आणि बघू द्या एकमेकांना ह्याक्षणी.."

पूजाने स्वराचा चेहरा ओंजळीत घेत विचारले," मग निघायचं का नवरीनबाई?"

स्वरा आताही नजर खाली करून होती, ती एक शब्द बोलली नाही आणि पूजा हसतच म्हणाली," हिला नाही भेटायच त्यांना, आपण निवांत गेलो तरीही चालेल."

ती ड्राइवरला तस सांगणारच तेव्हाच स्वराने तिचा हात पकडला. क्षणात नजर वर केली आणि पूजाकडे बघू लागली. स्वराच्या चेहऱ्यावर आज कमालीचा आनंद होता आणि डोळ्यात चमक. स्वराला असे बघताच पूजा म्हणाली," हाय मे मर जावा. स्वरा तुला एकदा म्हणाले होते ना पुन्हा आज विचारते. आज पण चान्स आहे करतेस का माझ्याशी लग्न? इतक्या सुंदर मुलीला पळवून नेण्याचा चान्स मी सोडणार नाही. मी तर ह्या नजरेत हरवून जायला तयार आहे. बोल जायचं का पळून?"

तिचे शब्द ऐकताच स्वराने दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर ठेवून लाजेचे भाव लपवणीच्या प्रयत्न केले पण आज ते भाव लपणार कुठे होते. ते आज तिच्या मनात काय सुरू आहे ह्याच उत्तर देत होते. आज सर्व मुली तिला अन्वयच्या नावाने चिडवत होत्या आणि स्वरा आज ते चिडवनही एन्जॉय करत होती कारण आज तो आणि त्याची प्रत्येक गोष्ट तिचीही होणार होती..

कैसे बया करू मै दिलं के हाल
मुझको मुझपर होश नही
खो गयी हु तुम्हारी यादो मे
मुझे अब जमाणे की फिकर नही..

**********


दुपारचा जवळपास १ वाजला होता जेव्हा अन्वयची गाडी कोर्टासमोर येऊन थांबली. सौरभने गाडी पार्क केली आणि ते अगदीच कोर्टाच्या मुख्य द्वारावर येऊन थांबले..सौरभ- विराज अन्वयचा नंबर किती वाजता लागणार आहे ह्याची विचारपूस करायला गेले होते. तेवढ्यात स्मृती ( संकल्पची वाईफ ) त्याला हग करत म्हणाली," भैया बहोत बहोत शुबकामनाये लेकिन मै गुस्सा हु आपसे."

अन्वयने हसतच विचारले," क्यू भला? इस वक्त भी कैसा गुस्सा?"

स्मृती पुन्हा नाराज होत उत्तरली," इतने जलदी शादी हो रही है. हमे साडी नही के कुछ नही. क्या हमारे भाई पे हमारा हक नही बनता? कितने सोचा था की शॉपिंग करेंगे, ये करेंगे वो करेंगे पर ऐसा कुछ नही कर पाये."

ती रुसलीच होती की अन्वय हसतच म्हणाला," बस इतनीसी बात!! बहोत जलदीही तुम सबको शॉपिंग करवाने ले जाऊंगा. वो भी एक नही बहोतसी साडीया लेंगे. साडीया ही क्यू जो चाहे वो ले लेना. अब खुश? अब तो नही ना मेरी बेहेन गुस्सा?"

ती हसली आणि आता मौसम पून्हा शांत झाल. अजूनही सौरभ आला नव्हता की स्वरा आली नव्हती. स्मृतीने आता दोघीना मिठी मारली. ह्यांची भेट सुरूच होती की शरद धावतच आला आणि अन्वयशी हात मिळवित म्हणाला," दादा उशीर तर नाही झाला ना यायला?"

अन्वयचे उत्तर येण्याआधीच श्रीलेखा म्हणाली," देर नही हुयी है शरद लेकिन निहारिका को क्यू नही लेकर आये हो? उसे भी प्रॉब्लेम है क्या अन्वयकी शादी से. मिलने दो उससे फिर बताती हु."

श्रीलेखा चिडलीच होती की शरद अन्वयकडे बोट दाखवत म्हणाला," ये मुझे नही भैया से पूछो. ये तो मुझेभी आने नही देने वाले थे पर मै कैसे तो भी छुपते छुपाते आ गया. पुछो पुछो उनसे क्यू अपनी लाडली बेहेन को आनेसे मना किया तो."

सर्व अन्वयकडे बघत होते आणि सियाने आता विचारलेच," भैया क्यू? प्रॉब्लेम तो ममी को है ना फिर निहारिका को क्यू आने नही दिया? ऊस बिचारी की क्या गलती? भाई के शादी मेही आने की नही मिल रहा. इस पल उसे कैसे लग रहा होगा आपको पता भी है??"

अन्वयने हसतच म्हटले," हा पता है पर क्या करू सिया मै भी. मै मेरी ममी को जाणता हु. अगर निहारिकाको बुलाता तो ऊन्हे लगता की मेरे दोनो बच्चे मुझसे दूर हो गये है. किसींको मेरे होणे, न होणे से परवाह नही है. उन्हे फिर गुस्सा आ जाता और वो इस सबमे फिर स्वरा को कसुरवारइ मान लेती. मुझे नही लगता था क्या मेरी बेहेन मेरे साथ हो पर क्या करु सब कुछ नही मॅनेज कर पाया. ममी के वजहसे उसे भी बुला नही पाया. अब ममी को सिर्फ मुझपर गुस्सा आयेगा और वो खुश रहेगी ये सोचके की मेरी बेटी तो साथ है मेरे. भलेही लडका हो या ना हो.."

त्याचे शब्द ह्यावे आणि स्वराची गाडी येऊन दूरवर थांबली. स्वरा त्यातून हळुवार उतरली आणि अन्वय सर्व विसरून तिच्याकडे बघत राहिला. अन्वयने अचानक बोलणे बंद केले आणि तो जसा मागे बघत होता त्यावरून त्यांना समजलं होत की ती आलीय. त्यामुळे क्षणात सर्वांनी नजर अन्वयवरून स्वराकडे वळवली. स्वराबद्दल जवळपास सर्वांनीच ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात ते बघत होते. स्वराने क्षणातच कार मधून पाऊल बाहेर काढले आणि सर्वांची नजर तिच्यावर स्थिरावली. असा एक व्यक्ती नव्हता जो तिच्याकडे बघत नव्हता. ती नजर खाली करून, चेहऱ्यावर लाजेचे भाव घेत एक एक पाऊल टाकत समोर येत होती आणि श्रीलेखाने हळुवार आवाजात विचारले," अन्वय आज तक शादीसे दूर भागते थे, आज शादी के पवित्र बंधनमे बंधने जा रहे हो..आज तक किसीं लडकी को आख उठाकर न देखणे वाला हमारा दोस्त, घर वालो की खिलाफ जाकर शादी करने जा राहा है. तो उसे देखकर पुछना चाहती हु, क्या खास बात दिखी तुम्हे स्वरा मे की सिधे शादी करने का फैसला लिया? जो लडका प्यार से डरता उसने इसीसे शादी करणे का फैसला क्यू किया??"

अन्वय आताही स्वराला येताना बघत होता आणि तिच्या चेहऱ्याकडे एकटक बघत उत्तरला," श्री आज तक हजारो सुंदर चेहरे देखे है पर सुंदर मन सिर्फ एक मे दिखा, वो है स्वरा. उसने अपनी जिंदगी मे हर किसींको प्यार दिया है, उसे ये मालूम होते हुये भी की उसे हर कोई बुरी नजर से देखता है. प्यार करणे के लिये सुंदर चेहरा काफी हो सकता है लेकिन रिशता केवल सुंदर मन वालीही निभाती है. स्वरा को जाना तो पेहली नजर मेही लगा, यही है जो मेरा हर अजीज रिशता मुझसेभी बहोत अच्छेसे संभाल लेगी. जो तोडणे से ज्यादा जोडणे पे विश्वास रखती हो भला उससे कैसे खुद को दूर रखु? हजारो क्वालिटी है उसमे पर इतनाही काफी था उसके प्यार मे पड जाणे के लिये. बाकी वो क्या है तुम धिरे धीरे जाण लोगी. अगर उसको मिलकर प्यार मे तुम ना पडी तो फिर केहना. वो ऐसी है, खुद दुःखी होते हुये भी दुसरो को प्यार बाटने वाली. ऐसी लडकी आज मिलती कहा है? मुझे मिली और मैने उसे झटसे अपना बना लिया."

त्याच बोलन झालंच होत की मागून सौरभ जॉईन होत म्हणाला," तुम उसका ये चेहरा देखकर अंदाजा लगा रही हो ना खूबसुरती का? लेकिन उसे जज करणे से पेहले इसके पेहले की उसकी तसविर भी एक बार जरूर देख लेना. उसकी तसविर देख लो फिर शायद तुम भी कहोगी, उसका जैसा सुंदर कोई और नही दिखा.."

आता सर्व त्याच्याकडे एकटक बघत होते तर त्याने मोबाइल काढत तिचे जुने फोटो दाखवले आणि तिचा एक एक फोटो बघून सर्व शॉक झाले. ते फोटो बघतच होते की अन्वय उत्तरला," तुम उसकी सुंदरता ऊन फोटो मे धुंडो. मुझे तो यही चेहरा दुनिया मे सबसे सुंदर दिखता है. तुम नही जाण सकते वो मेरे लिये क्या है. नही जाणते और शायस मै बता भी नही सकता."

अन्वय तिच्याकडे बघून बोलत होता आणि सिया म्हणाली," भैया सच मे आपका प्यार बेमिसाल है. बहोत सुंदर लडकी धुंडी है आपने. पता नही सबको आपने उसको जैसे जाणा वैसी क्यू नही दीखती??"

सौरभ हसतच म्हणाला," क्यूकी ऊन सबकी अन्वय जैसी नजर नही है. बस यही फरक है.."

सर्व स्वरालाबद्दल बोलत होते तर श्रीलेखा शांत झाली होती. तिला काय बोलू समजत नव्हतं आणि काही वेळ शांत राहिल्यावर श्रीलेखाही म्हणाली," अन्वय करले उसीसे शादी. उससे बेहतर तेरे लिये कोई नही है. मुझे सवाल पडते थे मी सिर्फ वही क्यू? पर आज तुमसे जानकर जाना सिर्फ वही तुम्हारे लिये बनी है और कोई नही. अन्वय ग्रेट डिसीजन यार!! पेहले विराजसे सुना था तो बहोत सवाल मेरे मन मे थे पर लगता है आज सब जवाब मिल गये. प्राउड ऑफ यु डिअर!!"

ते बोलतच होते आणि स्वरा आता अगदीच जवळ आली. ते सर्व तिच्याकडे एकटक बघत होते आणि पूजाने हसतच म्हटले," लडके की निगाहे लडकीसे हटही नही रही है. लगता है इंतजार नही हो रहा है. क्यू जिजाजी सही कहा ना हमने? शादी का इंतजार करणा है या यही से भगाके ले जाणे का इरादा है."

अन्वय काही बोलणारच तेवढ्यात सौरभ म्हणाला," पूजाजी लडकी भी कहा नजर उपर करके देख रही है. लगता है डुबी है इनकेही खयालो मे. उनसेभी पुछ लिजीए जरा, शादी करणी है या भाग जाना है?"

दोन्ही बाजूने जुगलबंदी सुरू झाली आणि हसण्याच वातावरण निर्माण झालं. मग काय लहान आणि काय मोठे सर्व हसण्यात गुंग झाले होते. सौरभ म्हणाला आणि पहिल्यांदा स्वराने नजर वर करून बघितले. त्याची नजर आताही तिच्यावरच होती. तिला बघताना त्याची पापणीही आज हलत नव्हती. तिची नजर त्याच्यावर पडली आणि दोघांचीही क्षणभर नजरा नजर झाली. बाकी सर्व एकमेकांची उडवण्यात व्यस्त होते तर दोघेही एकमेकांत हरवले होते आणि गंमत अशी की कुणीच कुणाला लाजत नव्हते. स्वराची नजर त्याच्यात हरवली होती आणि तिला बघून अन्वयच्या मनात काही ओळी आल्या..

बेहद खूबसुरती से बनाया होगा तुम्हे खुदा ने
वरणा ऐसी कारींगरी तो खुद कलाकार के बस की बात नही

तो नजरेतून बोलून गेला आणि जणू ते बोल तिच्यापर्यंत पोहोचले. तिनेही नजरेनेच त्याला दाद दिली. सर्व हसत होते आणि ते नजरेने एकमेकांशी बोलत होते. त्यांना आज एकमेकांशी बोलताना जगाच भान नव्हतं. ते हरवले होतेच मी विराज धावत जवळ येत ओरडला," गुड न्यूज गाईज. एक कपल को आने मे देरी है इसलीये हमे बुलाया है. अगला नंबर हमारा ही है. हरी अप!"

विराज बोलून गेला आणि सर्व गप्पा बाजूला सारून त्या रूमच्या दिशेने जायला तयार झाले. अन्वय अजूनही तिच्याकडे बघतच होता की पूजाने अलगद तिचा हात त्याच्या हातात दिला आणि क्षणभर स्वरा- अन्वयला एकमेकांच्या हृदयाच्या ठोक्याचे आवाज येऊ लागले. त्यानी एकमेकांच्या नजरेत बघतच एकाच वेळी पाऊल समोर टाकले. ते एकमेकांना बघत चालू लागले, बाजूला सर्वांचा गोंगाट सुरू होता आणि ते एकमेकांत हरवलेले. आजूबाजूला त्यांचे खास लोक हातात फुल घेऊन त्यांच्यावर वर्षाव करत होते आणि ते मधातून एकमेकांचा हात पकडत चाललेले. त्या दोघांना फक्त तिचे फ्रेंड्सच नाहीत तर आवरातले सर्व लोक बघत होते. अगदी सिम्पल सोहळा असतानाही सर्वांनी तो सोहळा खास बनविला होता. आज केवळ नावाला त्यांच लग्न फक्त खास लोकांमध्ये होत, प्रत्यक्ष पाहता आजूबाजूचा पूर्ण परिसर त्यांच्या लग्नात सामील झाला होता.

अगदी काही सेकंद लागले होते त्यांना त्या रूम जवळ पोहोचायला पण आणखी काही मिनिट वाट बघावी लागणार होती ती त्यांना एक व्हायला..आता एक एक सेकंद जास्त वाटत होता आणि अगदी पुढच्याच क्षणी मधून पुकारा झाला. त्यांचं नाव येताच अन्वयला श्रीलेखा तर स्वराला पूजा समोर घेऊन जाऊ लागली. सोबत होते तिचे आईबाबा, स्वयमच्या आई. फार लोकांना मध्ये जायची परवानगी नसल्याने बाकी सर्व बाहेरूनच तो सोहळा बघत होते. मध्ये पोहोचताच त्या ऑफिसरने ते दोघे अन्वय-स्वरा असल्याची खात्री केली आणि क्षणात लग्नाला सुरुवात झाली. लग्नही कसला म्हणा फक्त छोटासा प्रसंग. अन्वयने स्वराच्या गळ्यात हार टाकला आणि स्वराने अनव्यच्या गळ्यात. अन्वयने जपून ठेवलेलं मंगळसूत्र तिच्या गळ्यात टाकले, पुढच्याच क्षणी तिच्या भांगेत कुंकू भरले आणि अगदी काही मिनिटात स्वरा अन्वयची झाली. त्या पूर्ण वेळात स्वराची एक मिनिट त्याच्यावरून नजर दूर झाली नव्हती. ती मनभरून त्याला बघत होती. तिला आज फक्त त्याला अनुभवायचं होत. पण तिच्या गळ्यात मंगळसूत्र जाताच ऑफिसरचा आवाज आला " सो स्वरा आणि अन्वय आजपासून कायद्याने पती- पत्नी झाले आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हाला.."

त्याचा आवाज येताच स्वराने हळूच आपल्या मंगळसूत्राला हात लावले आणि तिच्या डोळ्यातुन अश्रू जमत. ती त्या मंगळसूत्राला हात लावून बहुदा त्याला सांगत होती की अन्वय सर आज जगाची सर्व बंधन झुगारून मी तुमची झालेच. स्वरा मंगळसूत्रकडे बघत होती तर अन्वय तिच्या गोड हसण्याकडे. खूप मोठा सोहळा नव्हता तो पण त्यांच्यासाठी आज तो जगातला सर्वात सुंदर सोहळा होता. फायनली स्वरा-अन्वय आज एक झाले होते.

पुढच्याच क्षणी पूजा, सौरभने विटनेस म्हणून सह्या मारल्या. विराजने त्यांचे काहीसे सुंदर फोटो काढले आणि त्यांचा शॉर्ट आणि स्वीट लग्न सोहळा इथेच संपला. आज तो लग्न सोहळा बघून फक्त स्वराच्या डोळ्यात अश्रू नव्हते तर तिथे असा एकही व्यक्ती नव्हता ज्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते. असा सोहळा अगदी कुणीच बघितला नव्हता. शेवटी सर्वाना हरवून प्रेम जिंकल होत आणि तो सोहळा प्रत्यक्ष बघणारे डोळ्यात पाणी घेऊन टाळ्यांचा वर्षाव करत होते. वजन, रंग, वय आणत नाही प्रेमात अडथळा कदाचित हीच आहे प्रेमाची परिभाषा. आज अन्वय-स्वरा " स्वरांवय " झाले होते..कदाचित कधीच न वेगळे होण्यासाठी..

************

दुपारचे ३ ते ३.३० दरम्यानचा वेळ झाला होता. सौरभने प्रिन्स हॉटेलचा एक ब्लॉक आज बुक केला होता. जवळपास १५ ते २० मिनिट झाले होते जेव्हा सर्व इथे आले होते. तसे सर्व एकमेकांसाठी अनोळखी होते पण अन्वय-स्वराच्या सहवासात केव्हा ते ओळखीचे झाले त्यांनाच कळलं नाही. आज त्यातला कुठलाच व्यक्ती अनोळखी वाटत नव्हता. हॉटेलमध्ये गप्पाना उधाण आल होत आणि सौरभ सर्वांसमोर जात म्हणाला," हॅलो गाईज! अगर आपकी बाते खतम हो गयी हो तो क्या आप मेरी बाते सिर्फ २ मिनिट के लिये सून सकते है?"

त्याचा आवाज येताच सर्व शांत बसून त्याच्याकडे बघू लागले आणि सौरभ हसतच म्हणाला," थॅंक्यु!! आज इस पल मै यहा हु इस बात के लिये खुदा का शुक्रिया करता हु या ऐसें केह सकता हु की हम सब यहा है इसलीये खुदा का शुक्रिया करता हु. सबसे पेहले अन्वय-स्वरा थॅंक्यु हमे इतना सुनहरा मौका देणे के लिये. मुझे नही लगता की हमने इससे पेहले इतनी सुंदर शादी देखी हो. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रेचूलेशन टू द स्वीट कपल. गाईज प्लिज किप युअर हँडस फॉर द बेस्ट कपल!! डोन्ट स्टॉप! क्लॅप युअर हँडस!!"

त्याचे शब्द येताच सर्वच अगदी जोरा- जोराने टाळ्या वाजवू लागले आणि पुन्हा सौरभ म्हणाला," मै यहा क्यू हु ये सवाल आपको सता रहा होगा. तो चलो ज्यादा वक्त नही लुंगा. अन्वय- स्वरा को मुझसे ज्यादा कोई नही जाणता होगा तो इस खूबसुरत पल की सुरुवात क्यू ना मै ही शुभकामनाये देकर करू? इन दोनो की लाइफ मैने बहोत नजदिकसे मेहुसुस की है इसलीये ये बता सकता हु की ये सफर सच मे आसान नही हुवा होगा. आज अन्वय के ममी- पापा यहा नही है इस बात को देखते हुये हमे पेहलेही पता चल गया होगा की उनका सफर इतना भी आसान नही होने वाला. पर बडे अभिमान से केहता हु की मेरा दोस्त कभी उसे अकेले नही पडणे देगा. अन्वय इस कहाणी का हिस्सा मुझे बनाने के लिये बहोत बहोत शुक्रिया भाई. मै यहा भाषण देणे नही आया हु बलकी ये बताने आया हु की शायद अब तक सफरमे तुम दोनो ने बहोत कुछ अकेले सहा है लेकिन अब हम तुम्हारे साथ है. चाहे आधी रात हो या घना कोहरा मेरा प्रॉमिस है मेरे भाई की मै तुम दोनो के साथ मे रहुंगा. चाफे फिर कोई साथ दे या ना दे. लव्ह यु भाई, भाभी. आप हमेशा साथ रहो बस यही दुवा करता हु.."

त्याच बोलणं झालंच होत की तेवढयात विराज समोर जात म्हणाला," सही कहा सौरभने. मै हर पल सोचता था की क्यू मेरा भाई शादी नही कर रहा है पर आज पता चला की शायद वो हिरा लाने के लिये इंतजार कर रहा था..हिरे की चमक देखकर तो कुछ लोग जलेंगेही फिर वो घर वाले हो या बाहर वाले. तुम डरना नही मेरे भाई कोई समझें या न समझें पर इस हिरे की चमक को हम जरूर समझते है. हम अनलकी थे की आपके सफर मे साथ नही दे पारे पर सबकी तरफ ये आज प्रॉमिस करता हु की इस पल के बाद यहा का हर इंसान आपके सफर मे साथ रहेगा. ये शाम आज स्वरा- अन्वय के नाम..बहोत बहोत मुबारक बात भाई मेरे."

त्यांचे बोलणे ऐकून फक्त अन्वय भावुक झाला नव्हता तर स्वराही झाली होती आणि तिचे आई- बाबा देखील भावुक झाले होते. तेवढ्यात अन्वयने आपले डोळे पुसत दोघांनाही घट्ट मिठी मारली आणि हळूच म्हणाला," थॅंक्यु यारो पर सच बोलू तो ये सफर सिर्फ स्वरा और मेरा है. अगर जगसे लढणा होता तो शायद तुम्हारा साथ जरूर होता लेकिन जब घरवालो से लढाइ करणी हो तो फिर हमेही लढणा होगा. उनसे नही उनके विचारो से. सच बोलू तो तुम्हारा साथही बहोत है मेरे लिये और मे ये दावे से केहता हु की स्वरा मेरा हर रिशता अपणा लेंगी. एक दिन ऐसा आयेगा जब मेरे घर वाले मुझसे ज्यादा स्वरासे प्यार करेंगे. मै उस दिन का जरूर इंतजार करुंगा."

त्या सर्वांच्या स्पीच ऐकून सर्व भावुक झाले होते आणि श्रीलेखा म्हणाली," तुम ना ये ड्रामा बंद करो पेहले..जो आ राहा है वो रुला रहा है. अगर हमारा मेकप खराब हो गया तो फोटो कैसे आयेगी. चलो बाजू मे हो जावो. स्वरा तुम सामने आओ हमे फोटो निकालनि है."

श्रीलेखाने जणू दोघांना बाहेरच काढले आणि सर्व स्वरा- अन्वय सोबत फोटो काढू लागले.

आज तिथला प्रत्येक व्यक्ती स्वरा- अन्वय सोबत आठवणी तयार करण्यात व्यस्त होता. गप्पा तर विचारूच नका. ज्याला वाटेल तो त्याच्यासोबत फोटो काढत होता. मुलींनी तर त्यांच्यासोबत किती फोटो काढले होते माहितीच नाही. त्यांच मन भरेपर्यंत त्यांनी काही मुलांना फोटो काढायला वर येऊ दिलं नव्हतं. तर अन्वय- स्वरा आज एकमेकांत हरवले होते. फायनली ते एकमेकांचे झाले होते. स्वराला आधी वाटायच की कदाचित लग्नाच्या वेळी तिच्या चेहऱ्यावरून बऱ्याच कमेंट पास होतील पण तिथल्या प्रत्येक व्यक्तीने तिला चुकीच ठरवलं. तिला समजलं होत की काही लोक वाईट असले म्हणून सर्व वाईट होत नाही तर काही लोक आपल्या आयुष्यात केवळ आनंद बघायला येत असतात. त्यांना रंग, वय ह्याने फरक पडत नाही. कदाचित तीच खरी नाती असतात. नाती म्हणजे दुःखात सोबत रडन नसतंच तर जेव्हा कुणीच सोबत नसत तेव्हा त्यांच्या सोबत राहून त्यांचा आनंद द्विगुणित करणं ही नात्यांची खरी व्याख्या. आज त्या पार्टीमधला प्रत्येक व्यक्ती हसत होता. त्यांचं तिच्या चेहऱ्यावर जराही लक्ष नव्हतं उलट तिच्यासोबत फोटो काढताना तोच आनंद त्यांच्याही चेहऱ्यावर दिसत होता फक्त प्रश्न एकच समोर उरतो मग का सर्व त्यांच्यासारखे नाहीत? कदाचित त्यांना कुणाशीच संघर्ष करावा लागला नसता..

सायंकाळचे ७ वाजले होते. आज दिवस कसा गेला कुणालाच कळलं नाही. सर्वांचे जेवण आटोपले आणि आता सर्व त्यांची बिदाई करायला तयार झाले. आतापर्यंत स्वरा खूप खुश होती पण आई-बाबाना सोडून जाताना तिच मन भरून आलं होतं. हे अश्रू सोडून जाण्याचे नव्हते तर काही नाती कदाचित तिला समोरच्या प्रवासाकडे जाताना मागेच ठेवावी लागणार होती म्हणून ते अश्रू होते. अन्वयच्या घरी जाण्याची एक-एक घडी जसजशी समोर येत होती. तस तशी स्वरा जरा खचत होती. तिने ठरवलं होतं की आज काहीही केल्या रडायचं नाही पण आज अश्रूंनी सुद्धा तीच ऐकलं नाही. अन्वय- स्वरा घरी जायला तयार होते आणि धावतच स्वराने आपल्या आईला मिठी मारली. ते मोठं- मोठ्याने रडत होती आणि आपोआपच तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती रडतच उत्तरली," आई कधी सर्वांसमोर बोलले नाही पण आज सांगते. तुमच्यासारखे आई-बाबाना प्रत्येक मुलीला भेटायला हवे म्हणजे कुठल्याच स्वराला अत्याचार सहन करावा लागणार नाही. आज मी एवढ्या आनंदात आहे त्यांच कारण तुम्हीच आहात. तुम्ही नसता तर कदाचित ही स्वरा इतर स्वरासारखी कोणत्या फासावर चढली असती नाही माहिती. तुम्ही मुलीला फक्त जन्म दिला नाही तर खऱ्या अर्थाने लक्ष्मीचा दर्जा दिला. आई- बाबा खूप आठवण येईल तुमची. खूप खूप आठवण येईल."

स्वराला रडताना बघून आईच्याही डोळ्यात अश्रू आले होते आणि आई म्हणाल्या," स्वरा आम्हालाही खूप भीती वाटत होती तुझ्या आयुष्याची बेटा. एक क्षण तर वाटलं होतं की माझ्या मुलीला स्वीकारणारा कुणीच येणार नाही का? पण देवाने माझे ऐकलं आणि अन्वयला पाठवल. आज माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस आहे. मला माहित आहे की आम्ही जेवढं तुझ्यावर प्रेम केलं त्याहीपेक्षा अन्वय तुझ्यावर जास्त करेल. तो तुला इतक सुख देईल की तुला कधीच कशाचीच कमी जाणवणार नाही. आम्हालाही तू खूप आठवण येशील. जा स्वरा आणि आमच्या घराला जस घरपण दिलंस, आम्हाला नवीन ओळख दिलीस तशीच ओळख त्याही घराला दे. जा बाळा. आमचा विचार नको करुस. आम्ही आहोत. तू फक्त आता त्या घराची काळजी घे."

आईने मिठी सैल केली आणि अन्वय- स्वराने त्यांना नामस्कार केला. स्वयमच्या आईलाही त्यांनी पुढच्याच क्षणी नमस्कार केला. आज स्वरा आपल्या प्रत्येक खास व्यक्तीला आलिंगन देऊन त्यांचं तिच्या आयुष्यातल स्थान सांगत होती. ते नसते तर कदाचित ती इथपर्यंत आलीच नसती म्हणून त्यांचं स्थान खूप खास होत. स्वराने जवळपास सर्वाना मिठी मारली आणि हळूहळू एक- एक पाऊल टाकत समोर जाऊ लागली. तिच्या डोळ्यात अश्रू सामावले होते आणि तीच अवस्था जवळपास सर्वांची होती. चालता-चालता एक वेळ अशी आली की स्वरा अगदीच कार जवळ पोहोचली आणि मोठ्याने रडू लागली. कारच्या दाराजवळ जात तिने पुन्हा एकदा मागे वळून बघितलं. तिला पसंद करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते. ते खरं तर अश्रू नव्हते त्यांचं प्रेम होतं. तिला सर्व हात हलवून बाय करत होते आणि आता स्वरानेही त्यांना हात हलवून बाय म्हटले. तिने सर्वांच प्रेम हृदयाच्या एका कप्प्यात साठवुन घेतले आणि ती निघाली एका सुंदर प्रवासासाठी. ज्यात नाती बदलणार होती पण प्रेम तसच कायम राहणार होत. आव्हान तशीच राहणार होती पण ह्यावेळी आव्हानाशी लढताना साथ द्यायला तिचा जिवलगा सोबत होता. अन्वयने गाडी सुरू केली आणि गाडी समोर जाऊ लागली. गाडी समोर तर जात होती पण स्वराचे डोळे अजूनही त्या लोकांवरच स्थिरावले होते. ते सांगत होते इतकंही सोपं नसत एका मुलीला जून सर्व विसरून नव्याने सुरुवात करणं? पण सर्व मुलीसारख स्वरालाही ते कराव लागणार होतं फरक एवढाच होता की तिचा संघर्ष हा इतर मुलींपेक्षा जास्त असणार होता. गाडी समोर जात होती आणि स्वरा त्यांच्याकडे बघत होती. ते देखील तिच्याकडे बघत होते आणि सर्वांच्या मनात एकच प्रश्न होता " कस असेल स्वरान्वय च आयुष्य? सर्व लोक विरोधात असताना ते सर्व काही कस निभावू शकतील? निभावू शकतीलही की????"

स्वरा जात होती आणि तिच्या डोक्यात विचार सुरू होते..

माझी डोली चालली ग दूरदेशी नव्या गावा
तिथे सोबतीला येई माझ्या स्वप्‍नांचा रावा
तिथल्या चौकटीत शोधीन माझे नवेसे आभाळ
तिथले ऊन-पाऊस भरतील माझी ओंजळ

स्वप्‍न राही मागे आता व्यथा सतत उरात
नव्या उंबर्‍याची आस जागे तरीही मनात

एक नदी सारखी वाहते मी जणू
पाऊलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू

एक नदी सारखी वाहते मी जणू
पाऊलखुणा ठेवून मागे चालले मी कुलवधू

पुन्हा एक वळण आणि सुटली मागे काही नाती. कदाचित कायमची नाही पण रोजच्या जीवनातील ते भाग नक्कीच राहणार नव्हते. आता तिला गुंफायची होती नवीन नाती आणि जिंकायची होती काही नवीन मन..सोपं नव्हतं तिच्यासाठी काहीच पण तिला करायचं होतं ते सर्वांची मन राखून. ठेवायचं होत सर्वाना आनंदी स्वतःचे अश्रू पिऊन.

एक लमहे मे सब कुछ बदल गया
तेरा होतेही सब कुछ मिल गया
वैसे तो छुट जायेंगे कुछ रिषते युही पिछे
पर तुमको पाया तो जाना भला मैने और क्या गवाया??