Bhagy Dile tu Mala - 74 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ७४

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ७४

इजहार-ए-ईश्क का दस्तुर कुछ ऐसा था
मिले वो हमे तो जमाने ने ठुकरा दिया...

स्वराने गेले ८ वर्ष संघर्ष करत स्वतःच प्रेम मिळविल होत, जीवनाचा खरा अर्थ मिळविला होता. ते कौतुकास्पद नक्कीच होत पण त्या प्रत्येक संघर्षात कुणीतरी अशी व्यक्ती कायम सोबत होती जिने स्वराला योग्य मार्ग दाखवला म्हणूनच कदाचित अन्वय तिच्या आयुष्यात येऊ शकला होता. स्वयमलाही ती हक्काने सर्व सांगू शकली होती आणि ज्यांच एकमेकांवर खर प्रेम असतात ते त्यांचं बोलणं समजून घेतातच हेही स्वयमच्या रूपाने तिला पटलं. स्वयमने जणू तिला सुखद धक्का दिला होता. हा प्रवास ह्या सर्व लोकांमुळेच सुखकर झाला होता म्हणून स्वराने ह्या सर्वाना आपल्या लग्नात सामील करायचं ठरवलं होतं. कदाचित तिला माहीत होतं की पुढे हे सर्व लोक आयुष्यात फक्त नाममात्र राहतील कारण सासरची पायरी ओलांडल्यावर कदाचित वेळ मिळणारच नाही म्हणून स्वराने त्यांच्यासोबत काही सुंदर क्षण जगण्याचे स्वप्न बघितले. आता ती त्या प्रत्येक व्यक्तीची घरी येण्याची आतुरतेने वाट पाहू लागली होती. लग्नाचे दिवस जवळ येत होते आणि स्वरा त्या प्रत्येक व्यक्तीच्या भेटीसाठी आसुसली होती कारण त्यांच्याविना तिचा हा नवीन प्रवास शक्यच नव्हता. प्रत्येक मुलीला लग्न करताना काही नाती मागे ठेवावी लागतात तेव्हाच ती इतर नाती स्वीकारू शकते. स्वराही त्याच उंबरठ्यावर उभी होती. एकीकडे ते आता रोजच्या जीवनात नसतील ह्याच तिला वाईट वाटत होतं तर दुसरीकडे त्यांच्या साथीनेच नवीन प्रवासास सुरुवात होणार आहे म्हणून ती आनंदी झाली होती..

रविवारचा तो दिवस. एकीकडे तो आनंद घेऊन आला होता तर दुसरीकडे घेऊन आला ती शांतता. अन्वयने स्वराच्या कुटुंबाला आनंदी तर ठेवलं होतं पण त्या नादात अन्वयच कुटुंब मात्र कायमच विखुरल्या गेलं. अन्वयची आई ह्या घराची शान होती. ती बोलत असली की घर घरासारख वाटायचं पण अलीकडे तिने चुप्पी साधली आणि घराचं घरपणदेखील हरवल. घरात माणसं राहत तर होते पण कुणाचा कुणाशीही संवाद नव्हता. अन्वय आजही सकाळीच उठला. बाहेर हॉलमध्ये येताच निहारिकाने त्याला चहा आणून दिला. तो सृष्टीला बघत-बघतच चहा घेऊ लागला. सृष्टी त्या घरात एकमेव होती जी रडायची आणि घरात कुणीतरी असल्याचे भास व्हायचे त्यामुळे अन्वय तिच्याकडे सतत बघत असायचा. सृष्टी मामाची लाडकी होती. जेवढं प्रेम तिचे आई-वडील तिच्यावर करायचे नाही तेवढं प्रेम तो तिच्यावर करायचा. सृष्टीला बघताच त्याचा मूड मस्त झाला. त्याने चहा पिऊन होताच कप समोर टेबलवर ठेवला आणि बेडरूममध्ये पोहोचला. स्वराने त्याला आई-निहारिकाला द्यायला साड्या दिल्या होत्या. तो गेला आणि त्याची नजर त्या साड्यावर गेली. साड्याना बघताच अन्वय क्षणभर हसला कारण त्याला अंदाज होता की त्यांची जागा केवळ कपाटातच असेल तरीही हसून त्याने साडी उचलली आणि आईकडे जाऊ लागला. त्याची आई अलीकडे फक्त कामासाठी रूमच्या बाहेर निघायची पण आज निहारिकानेच चहा- नाश्ता बनविला असल्याने त्या बेडरूममधून काही बाहेर आल्या नव्हत्या. अन्वय त्यांच्या रूममध्ये गेला तेव्हा त्या मोबाइल वापरत बसल्या होत्या. अन्वय मध्ये आला आणि त्यांनी त्याच्यावर बारीक नजर टाकली. त्याला बघून सुद्धा नजरअंदाज करत पुन्हा त्या मोबाइल बघण्यात व्यस्त झाल्या. अन्वयला सुद्धा ते बघुन क्षणभर हसू आवरल नाही. जी कधी त्याच्या येण्याची वाट बघत असायची आज तीच त्याच्याकडे कानाडोळा करते आहे हे बघून अन्वयला हसू आवरल नव्हतं. तो मिश्कीलपणे हसला आणि पुढच्याच क्षणी ते भाव आवरत म्हणाला," आई, ही लग्नासाठी साडी आहे. स्वराने तुझ्यासाठी निवडली. म्हटलं तिला तू घेणार नाहीस पण जबरीने दिली तिने. तू घ्यावीस अस जबरदस्ती नाही. समजा तुझा विचार बदललाच तर हीच साडी नेसून नक्की ये लग्नाला. मला खूप आवडेल तू त्या सोहळ्यात सामील झालीस तर. तुलाही माहिती आहे तो सोहळा तुझ्याविना पूर्ण होणार नाही. तरीही मी तुझ्यावर सोडतो. नाही आलीस तरी रागावणार नाही."

अन्वय बोलून तर गेला पण आईने त्याच्याकडे क्षणभर सुद्धा लक्ष दिलं नव्हत. ना साडीकडे बघितले. ती आपल्या मोबाइलमध्येच व्यस्त राहिली आणि तो साडीकडे बघून, तिच्या हट्टीपनावर क्षणभर हसला. तिथे उभा राहून तो तिला त्रासच देतोय हे समजल्यावर त्याने लगेच रूम सोडली.

तो पुन्हा हॉलमध्ये परतला. निहारिका टीव्ही बघत बसली होती. तो अगदी तिच्या जवळ जाऊन बसत म्हणाला," निहू ही साडी तुझ्या वहिनीने तुला दिलीय. सांग कशी आहे तर. तुझी वहिनी म्हणाली की तिला आवडली नाही तर दुसरी घेऊ. तेव्हा आवडली नाही तर सांग बिनधास्त."

अन्वय तिच्याकडे बघतच होता तर निहारिकाने त्याच्या हातातली साडी पटकन ओढून घेतली. हातात साडी येताच तिने साडीची घडी उघडून बघितली आणि बघून ओरडतच म्हणाली," क्या बात है दादा!! वहिनीची चॉइस एकदम भारी आहे. तिला सांग मला खूप आवडली साडी. मला नव्हतं माहिती वहिनीला माझी चॉइस न भेटताही समजेल. "

निहारिका अजूनही साडीकडे बघतच होती की अन्वय पुढच्याच क्षणी हसत उत्तरला," मग जिने मला प्रेमात पाडल तिची कशी चॉइस असेल ना निहू?"

निहारिकासुद्धा त्याला टाळी देत म्हणाली," ही गोष्ट तर बरोबर म्हटलीस तू. माझ्या भावासारखा दुसरा कुणिच नाही. इतके वर्ष थांबला आणि हिरा शोधून आणला. लग्नाला नकार देता देता, लग्न केलं तेही त्याने जिच्यावर प्रेम केलं तिच्याशीच. मग रंग बघितला नाही की धर्म. रूप बघितलं नाही की जात. खूप सुखी राहणार आहे ती तुझ्यासोबत. मी अस म्हणेन की तुला ती आवडली म्हणजे ती तुला खूप सुखी ठेवणार आहे. आय एम सो हॅपी की ती तुझ्या आयुष्यात आली आहे. आता माझा वेडा भाऊ कुणाला तरी घाबरणार हे बघून आताच हसू येतंय.."

निहारिका अन्वयबद्दल भरभरून बोलत होती तर अन्वय केवळ मिश्किलपणे हसत राहिला. ह्या काही दिवसात निहारिकाने अन्वयला हसताना बघितलेच नव्हते म्हणून त्याला हसताना बघून तिला समाधान मिळालं होतं. तो हसतच होता की निहारिका म्हणाली," ए दादा ह्याचा अर्थ मी लग्नात येऊ शकते ना तुझ्या? भेटू शकते ना वहिनीला? तू मला येऊ देणार आहेस लग्नात? मी हीच साडी नेसून येईल मग धम्माल करू आपण. मी भेटेन तिला. मला आवडेल तुझी निवड बघायला. "

ती पटापट बोलत होती आणि अन्वय हसत म्हणाला," एकाच अटीवर!!"

निहारिकाने हातातली साडी बाजूला ठेवली आणि प्रश्नार्थक नजरेने विचारले," कसली अट आता??"

अन्वय तिचे गाल ओढतच म्हणाला," आई सोबत येणार असेल तरच येऊ शकतेस."

निहारिका हसतच म्हणाली," मग त्यात काय आता निर्णय होईल थाम्ब मी आलेच."

अन्वय तिला अडवणार त्याआधीच ती धावत आईच्या बेडरूममध्ये गेली आणि मोठ्याने ओरडत म्हणाली," आई आपण दादांच्या लग्नाला जाणार आहोत ना? तो म्हणाला तू येशील तर मी जाऊ शकते. मग जाऊया ना आपण त्याच्या लग्नात? मला तर खूप धम्माल करायची आहे."

आई आतापर्यंत शांत होती पण तिचा आवाज येताच मोठ्याने म्हणाली," निहारिका अशी कशी ग वेंधळट तू? कळत नाहीये का तुला मला बर वाटत नाहीये ते. तस पण लग्न त्याच आहे, लग्न करायला तो असला तरी खूप आहे. आपली काही गरज नाही त्याच्या लग्नाला. त्याने विचारल का आपल्याला एकदा तरी लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी. स्वतःच तर सर्व केलं मग आता कशाला सांगतोय आपल्याला. तशा पण मी त्याच्याकडून अपेक्षा आधिच सोडल्या कारण आता तो माझा मुलगा राहिलेला नाही. तो तिचा नवरा होणार आहे. तेव्हा मला त्याच्या लग्नात काही रस नाही. मी नाही जाणार कधीच त्याच्या लग्नाला आणि दोघांना स्वीकारणारही नाही. माझा प्रत्येक दिवस हाच विचार करण्यात जातोय की मला लोक काय काय बोलणार आहेत. तो नवीन पिढीचा आहे तर त्याला आपल्या लोकांशी, समाजाशी काही फरक पडत नाही पण आम्ही लोक जपत आलो आहे समजाला, समाजाच्या विचारांना तेव्हा आम्हाला फरक पडतो लोकांच्या बोलण्याने. त्याला नाही कळणार हे सर्व. सध्या प्रेमाच्या घोड्यावर स्वार झाला आहे ना? सो त्या मुलीच्या वेदना समजून घेण्यात त्याला जास्त रस आहे. लोकांनी त्याच्या आईला बोलल तरीही काहीच फरक पडणार नाही. गेलेही असतेने शरमेने लग्नाला पण त्याने माझा अभिमान माझ्यापासून हिरावून घेतला त्याच्याच लग्नात मान खाली करून राहणे मला आवडणार नाही. त्याला माझ्या म्हणण्याचा फरक पडत नाही तेव्हा मलाही त्याच्या असण्या, नसण्याने फरक पडत नाही तेव्हा लग्नाला जायचा विषयच येत नाही. ज्यादिवशी तो मला हवं ते करेल त्यादिवशी मी स्वतः त्याच लग्न लावून देईल पण आता ते शक्य नाही. तुला तुझ्या लाडक्या भावाच्या लग्नात जायचं असेल तर बिनधास्त जा. तुला कुणीच अडवलं नाही पण माझ्यासमोर त्याच्याबद्दल काहीच बोलू नको. त्याच नाव पण घेऊ नकोस. तुला तुझ्या आईचा थोडासाही आदर वाटत असेल तर मला माझ्या हालतीमध्ये एकटी सोड. जमेल तुला?"

निहारिका आईच बोलणं ऐकून अगदी लहान तोंड करून बाहेर आली आणि अन्वयच्या बाजूने बसत म्हणाली," खडूस कुठली!! इतका राग आपल्याच मुलाचा!! तेही का तर त्याने मुलगी सुंदर आणली नाही म्हणून. लग्नानंतर तिने निवडलेल्या मुलीसोबत अस काही झालं असत तर त्या मुलीला खरच टाकून दिलं असत का हिने?? तिला नाही यायचं तर नको येऊ दे पण तिने परवानगी दिली मला तेव्हा मी येणार आहे. मला नका ओढू तुमच्या भांडणात."

ती नाराज होऊन बोलतच होती की अन्वयने तिचा हात हातात घेत म्हटले," तुला काय वाटत निहू मला नको आहेस तू माझ्या लग्नात? खर सांगू निहू चूक आईची नाही की तुझी नाही. चूक आहे परिस्थितीची!! मला वाटत मी सर्वाना विश्वासात घेऊन हे आधीच सांगायला हवं होत. इथे चुकलं माझं पण माझ्याही आयुष्यात काहीशी अशी परिस्थिती निर्माण झाली की मलाही लगेच निर्णय घेणे गरजेचे होत गेले हे कुणीच समजून घेतलं नाही. असो जे झालं ते झालं. मला स्पष्टीकरण द्यायचं नाही. तू आलीस ना निहू लग्नात तर मला खूप आनंद होईल पण आई मात्र कायमची दुखावली जाईल. तिला वाटेल की माझ्या एका मुलाने तर मला त्रास दिलाच पण दुसरीनेही त्याला साथ देऊन मलाच पूर्णता चुकीच ठरवलं. आज ती जे माझ्याशी वागतेय त्यापेक्षा मला जास्त वाईट वाटेल तेव्हा. नकळत मूल म्हणून आपण तिला हरवू. तिला तुला खरच हरवायच आहे? निहू तू तिच्यासोबत कायम राहा. ती चुकीची वागत असली तरीही कारण आई आहे ती आपली. बऱ्याच वेळा आएन चुकतानाही तिने आपली साथ सोडली नाही तेव्हा आपणही सोडणे योग्य नाही. तुला समजत आहे ना निहू मी काय म्हणतोय?"

निहारिका मिश्किल हसत म्हणाली," दादू तू खरच ग्रेट आहेस!! लव्ह यु!! नाती कशी निभवायची ना तुला खूप छान कळत पण आईला कधी कळेल काय माहिती. ती समजून घेईल ना रे तुला?"

निहारिकाने त्याला अलगद मिठी मारली. ते काही क्षण तसेच होते. निहारिकाच्या डोळ्यात अश्रू होते..त्याने ते पुसले आणि हसत म्हणाला," हो होईल सर्व नीट. माझ्यावर विश्वास ठेव आणि सांगेन तुझ्या वहिनीला तुला साडी आवडली म्हणून.तिला खूप आनंद होईल ऐकून. बर हे रडन वगैरे सोड, चल आता मी फ्रेश होऊन बाहेर पडतो. मित्रांना भेटायचा प्लॅन आहे सो जेवणाच बघुन घ्या तुम्ही. आज मी बाहेरच जेवण करणार आहे."

अन्वयने तिच्या केसांवरून हात फिरवत बेडरूममध्ये आला. निहारिका त्याच्याकडे काही क्षण बघतच राहिली. किती रूप होते अन्वयचे. आई- वडिलांशी भांडून त्याने शरदशी लावून दिलेलं तीच लग्न असो की हजारो सुंदर मुली सोडून त्याने आपल्या प्रेमाला स्वीकारण असो!! आई रागावली आहे, चुकीच्या पध्दतीने वागतेय हे बघूनही क्षणभर तिच्यावर न रागावणारा तो असो की आपल्याच बहिणीला त्याला एकट एकट वाटत असतानाही साथ सोडू नको म्हणणारा तो मुलगा असो. व्यक्ती एक होता पण नाती निभावताना जणू सर्व रूप घेऊन चालत होता. त्याला कदाचित नात्यांची किंमत कळली होती..त्याला कायम जपता येत, तोडता येत नाही म्हणून अन्वय खास आहे. कदाचित म्हणूनच तो मनात हजार यातना असतानाही चेहऱ्यावर हसू ठेवून वावरत होता.

किंमत रिशतो की बोलणेसे बया नही होती
कभी कभी रिषते खामोशी से निभाते है...

*********


वेळ सकाळी ११.३०. स्वरा चहा घेऊन निवांत बसली होती. तेवढ्यात दारावर बेल वाजली. स्वराला दार उघडायचा कंटाळा येत होता. ती जाऊ की नको विचार करतच होती की आई मोठ्यानेच ओरडत म्हणाल्या," स्वरा बघ बर बाळा कोण आहे ते प्लिज."

कंटाळा येत असतानाही स्वराने हातातला मोबाईल बाजूला ठेवला आणि पटकन जाऊन दार उघडले. दार उघडले आणि तिची नजर स्थिर झाली. समोरच दृश्यच अस होत की तिची पापणी हलत नव्हती, डोळे मोठे झाले होते आणि शब्द जणू कंठातच अडकले होते. ती बोलायचा प्रयत्न करतच होती की स्वयमच्या आईच म्हणाल्या," अंदर आऊ या बाहर ही रखणे का प्लॅन है?"

त्यांचे शब्द येताच स्वराने हसतच त्यांना मिठी मारली. त्यांनीही अगदी प्रेमाने तिला जवळ घेतले. काही क्षण तसेच गेले आणि स्वराच्या आई मोठ्याने ओरडत म्हणाल्या," स्वरा कोण आलंय ग?"

आईचा आवाज येताच ती मिठीतुन बाहेर येत हळूच म्हणाली," आंटी सॉरी मुझे लगा नही था की आप यहा आयेगी! कुछ पल तो मुझे मेरीही आंखो पर विश्वास नही हो राहा था. आप इतनी सुबहँ यहा??"

स्वराने त्यांना मध्ये घेतले आणि त्याही म्हणाल्या," स्वयमने कल तुम्हारे शादी के बारे मे मुझे बताया. मै समझ सकती हु की तुम्हे मुझसे बात करणे मी हिचकीचाहट हो सकती है. तो मैने सोचा की क्यू ना बेटी से खुद ही बात करके उसका मन हलका किया जाये. इसलीये स्वयम को यहा छोडने को कहा! वो अभि बाहर गया है कामसे वरणा वो भी आता. आज मै सिर्फ तुमसे मिलने आयी हु. आज पुरे दिने गप्पे मारेंगे. कोई प्लॅन तो नही है ना तुम्हारा??"

स्वरा हसत उत्तरली," बिलकुल नही. आज पुरा दिन फ्री हु. मस्त खाना खाकर गप्पे लडाऐंगे. वक्त की किसे चिंता है ."

स्वयमच्या आईही हसत म्हणाल्या," फिर तुझे क्या लगा मै खाना खाकर आयी हु?? मै तो खाकरही जाणे वाली हु. तू नही देगी तो येही बैठी रहुंगी."

त्यांचं बोलणं ऐकताच स्वरा क्षणभर हसली आणि त्यांना बेडरूममध्ये बसवून आईकडे गेली. आई किचनमध्ये काम करत होत्या. तिने कोण आलंय ह्याची कल्पना दिली आणि चहा बनवू लागली. स्वयमच्या आई काही वेळ एकट्याच बसल्या होत्या. स्वराने पटापट चहा बनविला आणि मध्ये पोहोचली. स्वयमच्या आईला चहा दिला आणि त्यांच्या बाजूला जाऊन बसली. आईने चहा घेता-घेताच म्हटले," स्वरा घर क्यू नही आयी सिधे? भला मुझसे क्या डरना? "

स्वरा जरा उदास स्वरात म्हणाली," मुझे लगा आपको बुरा लगेगा इसलीये.."

तिचे शब्द येताच स्वयमच्या आईने चहाचा कप बाजूला ठेवला आणि हसतच म्हणाली," पागल लडकी!! मै चाहती थि की तू खुश रहे इसलीये मैने तुझसे शादी की बात की थि. इतने साल तुम अकेली थि तो मुझे लगा की शायद तुम्हारे जिंदगी मे कोई नही होगा इसलीये पूछा था! हम तुम्हे खुशीया देना चाहते थे पर अगर तुम खुश हो तो. तुम कही और खुश हो तो जरुरी नही मेरी बात मानणे की. तुम मेरी बेटी हो और हमेशा रहोगी. तुम्हारी खुशी ज्यादा जरुरी है ना की मेरे घर की बहू बनना. तुमने उसे ना कहा इसका बुरा नही लगा, तुमने मुझे सिधे नही बताया इसका बुरा लगा. क्या इतना भी हक नही है हमे??"

स्वरा आता नजर खाली करतच उत्तरली," सॉरी माँ! मुझे कुछ समझ नही रहा था इसलीये..."

त्याच्या आई हसतच म्हणाल्या," समझ सकती हु!! कोई बात नही. मुझे लगा की मेरी बेटी मुझसे बात नही कर सकती तो क्या मै उससे जाकर बात कर लेती हु इसलीये आ गयी. पर आज से ध्यान रखना. बात कोई भी हो सिधे आकर केह देना.."

बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर क्षणभर उदासी नव्हती म्हणून त्यांना बघून तीही हसली. काही क्षण असेच गेले आणि स्वराने विचारले," माँ, स्वयम कैसा है? रो तो नही रहा था ना?"

स्वयमच्या आई हसत उत्तरल्या," मुझेभी लगा था की रोयेगा पर नही रोया. मेरी गोदी मे सोकरही रात गुजारी साहेबजादेने. केह रेह था की स्वराने सही फैसला लिया. अगर हालात खराब होणे के बावजुद कोई साथ देता है तो उसका साथ कभी नही छोडना चाहीये क्यूकी वैसा इंसान फिर कभी नही मिलता. हा उसको ये जरूर बुरा लगा था की तुम्हारे बुरे दौर मे वो साथ नही था लेकिन कल केह रहा था की मुझे स्वराने जो ऊसके बारे मे बताया वो बात सूनकर उसे सुकून मिला क्यूकी कोई तो था जो स्वरा को बाहर निकाल रहा था, सपोर्ट कर रहा था. शायद उसी की वजहसेही स्वरा आज हर किसींसे आख मिला सकती है. स्वरा मैने उसे इससे पेहले कभी इतना खुश नही देखा. थॅंक्यु मेरा बेटा मुझे वापस दिलाने के लिये. शायद उसने अपणे आप को ऊस बोझसे आज मुक्त कर लिया है वरणा उसको हर पल लगता था की तुम्हारे तकलीफ की वजहँ वोही है. थॅंक्यु स्वरा उसे प्यार का एहसास दिलाने के लिये और मेरा बेटा मुझे लौटाने के लिये. उसे वक्त लगेगा बाहर निकलने मे लेकिन ये बात जरूर केह सकती हु की अब वो पीछले ८ सालो से जीस पल मे कैद था उससे मुक्त हो जायेगा. थॅंक्यु स्वरा फॉर धिस!!"

स्वरा आता अगदी त्यांच्या कुशीत झोपत म्हणाली," मुझे एक वक्त लगता था की मुझसे कोई प्यार नही करता फिर अन्वय सरने समझाया की रिशतो के बगेर हमारी जिंदगी कुछ नही. आज वो सच हो गया. मुझे इतने प्यार करणे वाले मिले है की मै वो बता नही सकती. थॅंक्यु माँ मुझे समझ कर मुझे अपणाने के लिये."

स्वयमच्या आई तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या," जरूर कुछ खास होगा उसमे स्वरा की उसने तूम्हे नया जीवन दिया. मै शादी मे आउंगी तब उसको थॅंक्यु बोलुंगी! मेरा बेटा, मेरी बेटी मुझे लौटाने के लिये. अन्वय जैसे लोग है इसलीये जिंदगी चल रही है वरणा राज जैसे सब होते तो शायद यहा कोई औरत सेफ नही होती. मुझे सच मे मिलना है उससे. देखु तो कौन है जीसने मेरी बेटी को दिवाना बना दिया.."

त्या बोलून गेल्या आणि स्वरा हसतच म्हणाली," वो खास है इसलीये तो उनके प्यार मे पड गयी ना मै!"

ती पटकन बोलून गेली आणि आपण काय बोलून गेलो हे लक्षात येताच लगेच तिने तोंडावर हात ठेवला. स्वयमच्या आई तिच्याकडे काही क्षण बघत होत्या आणि आता दोघींचाही मोठ्याने रूममध्ये हसण्याचा आवाज येऊ। लागला. त्या दोघांनाही हसताना कुणाच भान नव्हतं. अन्वयने कधीतरी फक्त काही वाक्य वापरले होते पण ते प्रत्येक वाक्य तिच्या आयुष्यात इतकं कामी येईल अस कधीच वाटलं नव्हतं. त्यातलं हे एक वाक्य," स्वरा प्रेम करून तर बघ, स्वप्न सजवून तर बघ, नाती जोडून तर बघ!! ह्यापेक्षा सुंदर जीवन काहीच नाही. ते असतील तर आपल्या जीवनाला अर्थ, नसतील तर जीवन अपूर्णच राहील.."

खरच नाती किती महत्त्वाची असतात ना आयुष्यात? सोपी असत बोलून तोडण पण लोक तिरस्कार करत असतानाही नात्याना तेवढ्यात तत्परतेने निभावणं हे फक्त अन्वय करू शकत होता म्हणून तो कदाचित खास होता.

लमहें बित जाणे दो
इंतजार हम करेंगे
तुम करते रहो आलोचना
हम मोहब्बत बाटते फिरेंगे...

**********

दुपारचे बारा वाजले असतील. अन्वय गाडी चालवतच होता की त्याला कॉल आला. फोन येताच त्याने स्क्रीनवर बघितले, तो विराजचा कॉल होता. अन्वयने कॉल रिसिव्ह करताच विराज म्हणाला," भाई कहा पे हो? कब से इंतजार कर रहे है तुम्हारा? आओगे या युही इंतजार करा रहे हो??"

त्याच बोलणं होताच अन्वय हसतच उत्तरला," बे नौटंकी चुप! ५ मिनिट मे पोहोच रहा हु. बस लास्ट टर्न लिया की कॅफे पोहोच जाऊंगा. अब रखं फोन. फिर कॉल किया तो बहोत मार खायेगा.."

अन्वयने त्याला उत्तर देतच फोन ठेवला आणि गाडी चालवू लागला. त्याने म्हटल्याप्रमाणे तो अगदी ५ मिनिटातच सनशाईन कॅफेला पोहोचला. त्याने गाडी पार्क केली आणि पटापट पावले टाकत मध्ये पोहोचला..सौरभ, विराज, संकल्प त्याची वाट बघतच होते. अन्वय दिसताच विराज म्हणाला," क्या यार अन्वय!! एक दिन तो छुट्टी मिलती है. मस्त आराम से सो राहा था की तुने उठाया और कैसे केहता है ' जरुरी काम हैं जलदी से आओ.' एक तो पेहले बॉस की कटकट, फिर बिवी की और अब इसकी. साला सुकूनसे कोई जिनेही नही देता. अब बोल क्या काम है? क्यू बुलाया तुने??"

अन्वय दिसताच सौरभने त्याला खुर्ची दिली आणि अन्वय हसतच उत्तरला," ये आज फिर बीबी की गालिया खाकर आया है इसलीये इसका मूड खराब है. उधर सुना नही सका इसलीये मुझे ताने मार रहा है. सही है ना रज्जो??"

अन्वयच बोलणं होताच संकल्पही हसतच म्हणाला," ये साला इसका हमेशा का हो गया है. शादी भी की तो जीसके कॉलेज मे सबसे ज्यादा नखरे थे उससे. अब झेल रहा है तो मालूम पड रहा है. बिवी को सुना नही सकता तो हमे सुनाता है. साले तब तो बडा जानू जानू करता फिरता था ना!! अब क्या होगया तुझे?? बहोत समझाया था ना साले. पर नही माना और अब हम पे गुस्सा करता है. तू ना निकल जलदी से.."

संकल्प त्याला हात धरून बाहेर काढणारच होता की विराज हसत म्हणाला," भाई मजाक भी नही समझता क्या?"

विराज त्याचा हात सोडवत खुर्चीवर बसला आणि सर्व मोठ्यांने हसू लागले. त्यांचं हे नेहमीच. एकत्र आले की धम्माल पक्की असायची. विराजचा चेहरा पडला होता आणि अन्वय हसतच म्हणाला," कुछ बुलाया नही तुमने?"

केव्हाचा शांत असलेला सौरभ आता म्हणाला," तेरा ही इंतजार कर रहे थे. तेरे बिना कभी मंगाया है क्या कुछ? वैसे खुश खबरी है आज का बिल विराज पे करणे वाला है सो सोचा की तुझेभी बता दे. अब बिनधास्त खा सकते है. "

एकाने सुरुवात केली आणि आता जणू सर्वांनी विराजची गंमतच करायची ठरवली होती. विराज थोडा कंजूस टाइप मध्ये होता शिवाय कॉलेजला असताना तो गर्लफ्रेंडवर हवे तेवढे खर्च करायचा पण मित्रांवर एक रुपया सुद्धा करायचा नाही म्हणून त्याला कॉलेजपासूनच सर्व चिडवायचे. सर्व हसतच होते की वेटर आला आणि सर्वांनी आपापले ऑर्डर दिले. ऑर्डर यायला थोडा वेळ होता म्हणून ते तसेच बसून होते आणि विराज म्हणाला," अगर मेरी खेच कर हो गयी हो तो भाईयो इससे पूछोगे की साहब ने क्यू हमे बुलाया है!! वो भी इतने अर्जंट."

सौरभ त्याच्याकडे बघत म्हणाला," हा अन्वय बता ना क्यू इतने जलदि मे बुलाया सबको? कोई खास बात है क्या??"

अन्वय क्षणभर शांत होता. त्याने सर्वांच्या चेहऱ्यावरून एकदा नजर फिरवली आणि हळूच म्हणाला," तुम सबकी मदत चाहीये थि इसलीये बुलाया है! करोगे मदत??"

अन्वय सर्वांच्या चेहऱ्याकडे बघत होता. आता बऱ्याच वेळेचा शांत असलेला संकल्प म्हणाला," तो सिधे कॉल पर बता देता हमारा टाइम बच जाता. यहा क्यू बुलाया? अब बता क्या हेल्प चाहीये तुझे?"

अन्वय जरा शांत वाटत होता. सौरभला काहीतरी सिरीयस असल्याच जाणवलं आणि त्याने शांत राहा म्हणून हातानेच सर्वाना इशारा केला.

अन्वय आता हळूच हसत म्हणाला," मेरी शादी है १४ फेब को, कोर्ट मॅरेज. शायद मेरे घरसे कोई नही आयेगा. क्या तुम मेरे इस फंक्शन मे साथ रेहकर मेरी खुशीया और बढाओगे?"

अन्वय बोलला आणि सर्व त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागले. कुणी काहीच बोलत नाही हे पाहून अन्वयच म्हणाला," क्या हुआ ऐसें क्या देख रहे हो?"

विराज शॉक होत म्हणाला, " संकल्प एक मार तो मुझे लगता है मैने कुछ तो गलत सुना? तुमने शादी वगैरे कुछ लफज सुना क्या इसके मूहसे??"

संकल्प प्रतिउत्तर देत म्हणाला," तू मुझे मार! मैने भी वही सुना है. शादी और अन्वय!! ये खेल कब हो गया.."

ते दोघे शॉकच होते की सौरभने विचारलं," ये सब कब हुआ और इतने जलदी शादी क्यू?"

ते सर्व शॉकमध्ये होता तर अन्वय त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला," एक लडकी थि जीससे मुझे प्यार हुवा था पर उसे प्यार नामसेही नफरत थि इसलीये मैने प्यार दिलं मे दबा दिया. लेकिन कुछ दिन पेहले की बात है. मै मिलने गया और उसी वक्त उसने अपणेे दिलं की बात मुझसे कही. सच बोलू तो इतना वक्त बित गया उसके इजहार मे के मुझेही उसके बिन रहा नही गया और सिधे मैने उसे अपनी बिवी बनाने का निर्णय लिया. तुम्हे बता नही सका क्यूँकी अपणेही उलझनो मे फसा था. आज वक्त मिला और मै यहा हु.."

विराज डोकं खाजवत म्हणाला," पर इसमे तेरे घर वाले क्यू नही आ रहे तेरी शादी मे? उनको कैसी परेशानी??"

अन्वय समोर बोलणारच होता की सौरभ मधातच उत्तरला," क्यूकी वो लडकी स्वरा है. भाई साहबने ५ साल मे कितनी सुंदर लडकियो को मना किया और ऍसिड अटॅक वाली को लेकर आया इसी वजहसे माताजी रूठ गयी. उन्हे सुंदर बहु चाहीये थि. एम आय राइट अन्वय?"

अन्वय केवळ हसला आणि विराज मोठ्याने म्हणाला," मेरी जान तुझे कैसे शूक्रियादा करू पता नही. जीस लडकी को मिलने के लिये हम कबसे इंतजार कर रहे थे आज उसीको तुने भाभी बना दिया. मान गये बॉस! कॉंग्रेचूलेशन भाई! फायनली तुझे तेरा प्यार मिल गया."

संकल्पही हात समोर करत म्हणाला," अन्वय प्राउड ऑफ यु यार! तुने आज तक किसीं लडकी की और देखा नह. अब देखा तो सिधे शादी कर रहे हो. क्या खूबसुरत लडकी धुंडी है यार तुने. तुने तो सुबहँ सुबहँ मूड बना दिया. बता क्या हेल्प करणी है हमे? तू सिर्फ ऑर्डर दे, तुझे कामही नही करणे देंगे. तू बता सिर्फ क्या क्या करणा है?"

अन्वय बोलणारच होता की विराज म्हणाला," सब ठीक है पर कोर्ट मॅरेज क्यू? धूम धाम से करते है ना शादी.."

विराज बोलून गेलाच होता की सौरभ त्याच्या डोक्यावर मारत म्हणाला," डफर! उसने जिंदगी मे बहोत कुछ सहा है इसलीये वो दुनिया को शोर करके नही बताना चाहती. उसकी शादी कुछ खास लोगो मे हो येही चाहती है वो. अन्वय कोई हो या ना हो हम है तेरे साथ."

बाकी सर्व शांत झाले आणि विराज मधातच म्हणाला," भाई तूने दिलं खुश कर दिया. आज तो मै पेट भर के खाऊंगा क्युकी संकल्प.."

दोघेही एकाच वेळी म्हणाले," मेरे यार की शादी है.."

ते इतक्या मोठ्याने म्हणाले की सर्व लोक त्यांच्याकडे बघत होते पण त्यांना कुणाच पडलेलं नव्हतं. अन्वयच्या आयुष्यात फार कमी मित्र होते पण सर्व जिवलग होते. त्यामुळे त्यांचा उत्साह बघून तो खूप खुश झाला होता. आज अन्वयने जरी आनंदाची बातमी दिली असली तरीही चर्चे फक्त स्वराचे होते. आयुष्यात मेड फॉर इच अदर असतात का माहिती नाही पण इथे मात्र होते. प्रेम आणि संघर्ष कसा असतो हे दोघांनाही चांगलं माहिती होत.

त्यांचं जेवण आटोपलं आणि ते बाहेर जाऊ लागले. तिघेही एकाच कारने आल्याने ते सोबतच जाणार होते. विराज, संकल्प मध्ये जाऊन बसले होते तर सौरभ अन्वयला मिठी मारत म्हणाला," अन्वय सच मे मान गये यार तुझे! तेरे जैसा दोस्त कही नही मिल सकता
. तुने कहा था की यहा ऐसी लडकी नही जिसके प्यार मे पड जाऊ. सच कहा था तुने. तेरे लिये स्वराही बेस्ट है. आय एम प्राउड ऑफ यु माय ब्रदर! सच कहा था तुने की अगर वो मिल गयी तो जमाणे से लढ जायेगा. जमाणे से लढणा आसाना है अन्वय लेकिन घरवालो से लढणा बहोत मुश्किल. सच मे तुने प्यार की मिसाल दि है. तुने उसे दया नही दिखायी, बलकी तुने उसको प्यार दिया अब अधिकार देणे जा रहा है. तुझसे सच्चा जीवनसाथी उसे कोई और नही मिल सकता था. साले आज तू इतना बडा लगने लगा है की सोच रहा हु पॅन्ट निकाल कर केहही दु ' जहापना तुस्सी ग्रेट हो तोफा कबूल करो."

अन्वयने हसतच मिठी घट्ट केली आणि म्हणाला," तुम ही तो मेरी हिम्मत हो. माना की आज मेरे घरवाले रुठे है पर तुम सब हो तो क्या गम है!! थॅंक्यु यारो!! तुमने मेरा बोझ कम कर दिया..."

सौरभही हसतच म्हणाला," विराज नौटंकी है लेकिन आज मै भी कहुंगा, मेरे यार की शादी है और वो भी सबसे खूबसुरत लडकीसे. जश्न होगा, धुमधाम से होगा और आज से तुझे काम से छुट्टी. हम संभाल लेंगे सब. चल मै जाता हु सिया को भी बताना है की तेरे भाई की शादी है."

सौरभ नाचत- नाचतच त्यांच्याजवळ पोहोचला. आता तिघेही ह्यांच्याकडे बघत होते आणि मोठ्याने म्हणाले," हमारे भाई की शादी है!! हमारे भाई को शादी है!"

सर्व हात हलवत घराकडे निघाले तर अन्वय त्यांच्याकडे बघतच होता. जगात एक वेळ कुणी साथ देणार किंवा नाही देणार पण खरे मित्र साथ कधीच साथ सोडत नाही हेच खरं. तेच आपलं जीवन आहेत. ते एकमेव अस नात आहे ज्याला रक्ताची गरज नाही आणि वेळ पडली तर दुसऱ्यांच रक्त सांडवायलाही मागे-पुढे बघत नाहीत.

मिसाल प्यार की भी कम पड जाती है
दोस्ती वो लफज है जहा सुखो की बरसात होती है

********

दुपारचे जवळपास ४ वाजले होते. आज स्वयमच्या आईशी स्वराच्या भरपूर गप्पा रंगल्या होत्या. त्या आज मनभरून तिच्याशी बोलल्या आणि त्यांना दुखावण्याच गिल्ट स्वराच्या मनातून कायमच निघाल. आता स्वराच्या मनात काहीच उरल नव्हतं. त्या गेल्या पण स्वराचा दिवस बनवून. स्वराची आई आज स्वयंपाक बनवून खूप थकल्या होत्या म्हणून त्या आराम करायला बेडवर पडल्या होत्या तेवढ्यात स्वराने त्यांचे पाय चेपून द्यायला सुरुवात केली. स्वराचा हात त्यांच्या पायाला लागताच आईचा डोळा उघडला आणि त्या म्हणाल्या," स्वरा हे काय करते आहेस?"

स्वरा हसतच उत्तरली," आई मी काहिचं दिवसात इथून जाणार आहे मग थोडी सेवा करू दे ना तुझी."

आईने तिचा हात ओढून स्वतःकडे खेचले आणि तिच्या कपाळावर किस्सी करत म्हणाली," मला सेवा नकोय वेडाबाई! मला तुझ्या चेहऱ्यावर आनंद हवाय. तो असेल ना तर मी कायम खुश राहील."

आई म्हणाल्या आणि स्वराला काहीतरी आठवल. स्वरा जरा आता विचार करत म्हणाली," आई तुला काहितरी सांगायचं आहे."

आईने हसतच विचारले ," बोल ना बाळ काय झालं?"

स्वरा आईला नजर देत म्हणाली," आई अन्वय सर खोट बोलले तुझ्याशी. त्यांचे आई-बाबा कुठेच गेले नाहीत. ते घरीच आहेत. त्यांना सुंदर मुलगी हवी होती सून म्हणून आणि नशीबी मी आले तेव्हा त्या कदाचित लग्नात येणार नाहीत. त्यांना ते तुझ्याशी खोट बोलले ह्याच वाईट वाटलं म्हणून ते तुला सांग म्हणाले सर्व. आईला वेळेवर कळेल तर बरं वाटणार नाही म्हणाले. तुला काही प्रॉब्लेम नाही ना?"

आई क्षणभर मिश्किल हसत म्हणाल्या," मला माहित आहे ते सर्व कारण अन्वयला खोट बोलता येत नाही. त्यांच्या डोळयात दिसत ते सर्व. खर सांगू तर अन्वयच्या जागी दुसर कुणी असत तर मी ह्यावर रागावले असते पण अन्वयच्या डोळ्यात मला तुझ्याबद्दल प्रेम दिसत. त्याच्या घरी आज खूप प्रॉब्लेम चालू असतील पण त्यातलं एक देखील तो आपल्या पर्यंत पोहोचू देत नाही. तो मुलगा म्हणून खास आहे आणि मला विश्वास आहे की तो लवकर सर्व सुरळीत करेन. मी तुझं बोलणं ऐकलं होतं जेव्हा अन्वय लग्नाचं विचारायला त्याच्या घरी गेला होता. तू म्हणाली होतीस की मी दोन निर्णय स्वतःहून घेतले. एक राजला धडा शिकवायचा आणि दुसरा अन्वयला स्वीकारण्याचा. माझी मुलगी काहीही झालं तरी आपले काम पूर्ण करते माहिती आहे मला सो मला काही प्रॉब्लेम नाही. मला विश्वास आहे माझ्या मुलीच्या विश्वासावर. माझी चिऊ किती मोठी झाली ना? विश्वासच बसत नाही. तू सोडून जाशील तर खूप मिस करेन तुला आणि बाळ स्वरा आनंदाने सांगेन की अन्वय खरच खूप सुंदर निवड आहे. तू खूप आनंदी राहशील त्याच्यासोबत!! आज सर्व नीट नसेल पण मला विश्वास आहे की तो सर्व नीट करेल."

स्वराने तिला मिठी मारतच म्हटले," लव्ह यु सो मच आई!! सो सो सो मच!!"

आईही हसतच म्हणाली," आता हे आय लव्ह यु त्यांना म्हण! आमची लेक आता त्यांची अर्धांगिनी होणार आहे तेव्हा ह्या लव्ह यु वर फक्त त्यांचा हक्क आहे."

स्वरानेही हसतच म्हटले," पण मी अजून त्यांना कुठे लव्ह यु म्हटलं? त्यांना वाट बघावी लागेल माझ्या लव्ह यु ची. मी लवकर लग्नाला होकार दिला पण हे शब्द इतक्या लवकर म्हणणार नाही काही!!"

आई डोक्यावर हातच मारत म्हणाल्या," अरे देवा! माझ्या जावयाच काही खर नाही! बरोबर म्हणत होता तो की तू फिरवणार आहेस त्याला मागे- मागे. देवा वाचव रे माझ्या मुलीपासून माझ्या जावंयाला!!"

आईचे शब्द येताच स्वरा मोठ्याने हसू लागली. आईही आता मोठ्याने हसत होती तर दुसरीकडे अन्वय तिच्या सुंदर स्वप्नांत हरवला होता. त्याला वाटलं होतं त्याचे मित्र त्याला चिवडतील की इतके वर्ष थांबलास आणि अशा मुलीशी लग्न करतो आहेस पण त्यांचा सपोर्ट बघून तो भारावून गेला होता. आता फक्त वाट होती ते एक होण्याची. मग सुरू होणार होत एक पर्व अन्वय-स्वराच्या प्रेमाचं...

बांधल्या गेलोत आपण
प्रेमाच्या सुंदर धाग्याने
नकळत उलगडत गेले
बंध सारे मनाचे...