Bhagy Dile tu Mala - 73 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ७३

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ७३

खो जाऊ तेरे प्यार मे
बेशुमार मै प्यार करू
आझाद हो जाऊ तकलिफोसे
सजदे तेरे मै सर झुकाऊ..

अन्वयने अगदी पहिल्याच दिवशी तिला स्वप्न बघायला लावली होती. त्याच्या स्वभावाची ती आधीच फॅन होती पण त्याचा हा रोमँटिक अंदाज बघून स्वराच्या चेहऱ्यावरच हसू गायब झालं नव्हतं. कदाचित ह्याच गोष्टींमुळे स्वराने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. हळुहळु स्वराच्या लग्नाचे दिवस जवळ येऊ लागले होते आणि स्वरा नवीन- नवीन स्वप्नांत हरवू लागली होती. अशी स्वप्न ज्यावर तिने कधीतरी बंधने घातली होती पण तो येताच ती आता आपोआप नाहीशी झाली. तीच मन स्वतःच नव्याने स्वप्न बघायला तयार झालं होतं, त्याच्यासोबत आयुष्य घालवायला तासंतास वाट बघू लागल होत. एक नवीन कहाणी रचायला आतुर झालं होतं.

स्वरा आणि स्वराच कुटूंब दिल्लीमध्ये आलं आणि पुन्हा नव्याने ते तिघेही आयुष्याची सुरुवात करू लागले. तस सोपं नव्हतं इतके वर्ष गेल्यावर पुन्हा नवीन सुरुवात करणं, नवीन लोकांना स्वीकारणं पण तेही करणं गरजेचं होतं. तिच्या आई- वडिलांना हे सर्व सफर करणं जितक त्रासदायक नव्हतं त्याहीपेक्षा स्वराला ते जास्त त्रासदायक ठरणार होत कारण लोक आणि जागा बदलली की स्वराला प्रत्येक वेळी नव्याने मनाची तयारी करावी लागत होती. विशेष म्हणजे हे तेच शहर होत ज्या शहरात स्वरासोबत तो अपघात झाला होता. तेव्हा त्याच शहरात एक नवीन सुरुवात करणं स्वरासाठी बरच अवघड जाणार होत तरीही तिने ते स्वीकारलं. स्वीकारलं होत फक्त अन्वयसाठी..

दुसऱ्या दिवसाची ती सायंकाळ. अन्वयने म्हटलं होतं त्याप्रमाणे तो आज शॉपिंग करायला लवकरच आला होता. त्यांने आधीच स्वराला तसा मॅसेज केला होता म्हणून स्वरा, तिचे आई-बाबा तयार होऊन बसले होते. अन्वयने बिल्डिंगच्या खाली येताच हॉर्न वाजवला आणि स्वरा धावतच बाहेर आली. कालच्या प्रसंगानंतर तर तिला अन्वयला केव्हा एकदा बघते अस झालं होतं. त्याला पाहण्यात ती इतकी व्यस्त झाली होती की तिला स्वतःवरच भान उरल नव्हतं. तिच्या हृदयाची धडधड त्याला पाहून आणखीच वाढली. त्याच क्षणी अन्वयची तिच्याशी नजरानजर झाली आणि स्वराचा चेहरा पुन्हा एकदा लाजरा- मोजरा झाला. स्वराचा लाल झालेला चेहरा बघून अन्वयने विचारले," मॅडमना बहुतेक झोप लागली नाही रात्री, हो ना? हरवली होतीस का दिवसभराच्या क्षणात?"

एक तर ती आधीच लाजरी होती त्यात त्याच्या शब्दाने तिच्यावर आणखीच जादू केली. तिला त्याला काय उत्तर देऊ समजत नव्हतं तर अन्वय सतत तिच्याकडे बघत होता. त्याच अस बघन तिला आवडत होतही आणि जास्तच लज्जा आल्याने नकोस झालेलं पण थांबेल तो अन्वय कसला. तो बघतच होता की नजर खाली करत हसतच म्हणाली," हो अगदी खर हरवले होते मी रात्रभरं!! किती दिवसाने स्वप्न बघितले मी आज माझं मलाच माहिती. आपल्या प्रवासाचा पहिला दिवस आणि स्वप्नांनी स्वतःच बंधने तोडली. त्यांनी दाखवलं मला आपलं भावी आयुष्य. अस आयुष्य ज्यातून बाहेर यायचं मन करत नव्हतं. फक्त तुमचं आणि माझं एक खास जग. कशी व्यक्त होऊ मी कालची रात्र कशी गेली ती?? आता तर वाटही पाहवत नाही."

अन्वय शांतपणे तीच बोलणं ऐकत होता तर तिने आताही नजर वर केली नाही. तिच्या हृदयाची धडधड तशीच सुरू होती. ती नजरेच्या एका कोपऱ्यातून त्याला बघत होती आणि अन्वय तिच्याजवळ येत कानात हळुवार म्हणाला," मॅडम मग लग्न करायचं की असच घेऊन जाऊ तुला घरी आजच? म्हणशील तर मला काही प्रॉब्लेम नाही. तसही मला कुठे राहवत आहे तुझ्याविना? मीही हरवलो होतो तुझ्या लाजण्यात. वाटलं ते लाजन डोळ्यात कैद करून घ्याव कायमस्वरूपी. तुला क्षणासाठी दूर करू नये. मग जायचं का आजच घरी??"

अन्वय आशेने तिच्याकडे बघत होता. स्वराच हृदय आताही आवाज करत होत. तिला त्याच्याकडे कस बघू समजत नव्हतं. तिने नजरेच्या कोपऱ्यातून त्याला बघितलं. तो सतत तिच्याकडे बघत होता. तिने पुन्हा एकदा नजर खाली केली आणि गोड हसत उत्तरली," नाही हा सर!! आज नको, मी वाट बघेन त्या क्षणाची. कदाचित माझं लग्न म्हणजे खूप मोठा सोहळा नसेल पण मला अनुभवायचे आहेत ते क्षण. कशी असते लग्नाची भावना ती जाणून घ्यायची आहे, तुमच्यासाठी नटायच आहे, सजायच आहे. तुम्हाला नवऱ्या वेशात सजलेलं बघायच आहे आणि आपल्या काही खास लोकांसमोर मला आयुष्यभरासाठी तुमचं व्हायचं आहे. तस पण मी ना माझ्या काही जिवलग मैत्रिणींना बोलावलं आहे. त्यांनी माझ्या आयुष्यात पावलोपावली खूप साथ दिली आहे तेव्हा माझ्या ह्या सुंदर सोहळ्यात त्यांना सामावून घ्यायच आहे. त्यांच्यासाठी शॉपिंग करायची आहे, त्याना साथ देण्यासाठी आभार मानायचे आहेत, नवीन प्रवासाआधी जुन्या सर्व लोकांना एकदा निवांत भेटायच आहे, एक पर्व आनंदात संपवून दुसऱ्या पर्वाकडे वाटचाल करायची आहे. आताच आले तर हे कसं पूर्ण होणार ना? आणि मी जर आजच आले तुमच्यासोबत तर सर्व म्हणतील की आमच्या पोरीला जरासा धीर पण नाहीये. नवऱ्याकडे जायला आतुर झालीय नुसती. आयुष्यभर चिडवतील मला ते."

ती बोलतच होती की अन्वय तिला अडवत तिच्या डोळ्यात बघत म्हणाला," मग नाहीये का तस? आतुर नाहीयेस का यायला माझ्या आयुष्यात?"

ती आधीच लाजत होती त्यात त्याच्या प्रश्नाने आणखीच भर घातला. स्वरा लाजरी गोजिरी होत म्हणाली," हे बरोबर नाहीये हा सर! तुम्ही मला नुसते शब्दात पकडत आहात. हा मान्य की मी आतुर आहे पण इतके दिवस वाट बघितली तर १५दिवस पण बघेल. हा सोहळा खूप मोठा नसेल पण जिने कधी लग्नाची स्वप्न मधातच सोडून दिली होती तिच्यासाठी नक्कीच मोठा सोहळा आहे आणि मला तो आपल्या लोकांसोबत पूर्ण करायचा आहे. मग त्यासाठी काही दिवस वाट बघावी लागली तरीही चालेल. अस नका समजू की मी वाट पाहू शकत नाही."

अन्वयही हसतच म्हणाला," हे बरोबर बोलते आहेस तू!! मलाही माझ्या मित्रांसोबत हा क्षण शेअर करायचा आहे त्यामुळे मीही वाट बघेन. १५ दिवसानंतर माझी झालीस की मग तुला कुठेच जाऊ देणार नाही. सतत मागे-पुढे राहील. मग म्हणशील तरी हा तुझा नवरा तुला कुठे जाऊ देणार नाही. मग नाही शोधायची हा पळवाट.."

स्वरा हसतच म्हणाली," आई म्हणेल मग जोरू का गुलाम झालात ते चालेल का तुम्हाला? बघा हा मला काही प्रॉब्लेम नाही पण लोक तुम्हालाच बोलतील."

अन्वय जरा आता नौटंकी करतच म्हणाला," स्वरा मॅडम प्रत्येक पुरुष जोरू का गुलामच असतो. आता मागेच बघा तुमचे बाबा बोलतात का आईसमोर? ते तर शब्द पण मोजून मोजून काढतात. त्यामुळे कुणी स्वीकारलं नाही तरी तेच सत्य आहे की प्रत्येक पुरुष असतोच. कुणी दाखवतात कुणी नाही बस एवढा काय तो फरक. बघ वडिलांकडे अजूनही आईवरच त्यांचं प्रेम कमी झालं नाही. वय वाढत जात तस प्रेम आणखी वाढत म्हणून बघ त्यांची तयारी होईपर्यंत तेही बाहेर आले नाही. ह्याला काय म्हणशील? स्वरा आपणही असच प्रेम करू म्हातारहोईपर्यंत. मला आवडेल हा तुझा गुलाम व्हायला."

त्याच बोलणं ऐकून स्वरा मोठ्याने हसू लागली आणि आईने जवळ येत विचारले," का ग!! इतक्या मोठ्याने का हसते आहेस? मलाही सांग."

स्वरा हसण्याच्या नादात बोलून गेली," आई ते अन्वय सर ना जोरू का गुलाम.."

ती बोलतच होती की अन्वय म्हणाला," काही नाही आई एक जोक होता तिला फार आवडला म्हणून हसत होती."

अन्वयने स्थिती सांभाळली पण स्वरा अजूनही हसतच होती. अन्वयने तिला डोळे दाखवले तरीही तिने हसन बंद केलं नव्हतं. अन्वय स्वतःवरच हसत पुढच्याच क्षणी अन्वय कारमध्ये बसला. स्वरा मागे बसणारच होती की तिची आई म्हणाली," स्वरा तू ना समोरच बस. जावई बापू सतत मागे बघत असतात गाडी चालवताना. उगाच तुझ्यामुळे अपघात व्हायचा. नको ही रिस्क!!"

आईच्या एका वाक्याने कारमध्ये क्षणात हसू पसरल. स्वराही लाजतच समोर बसली आणि अन्वय तेवढ्यातच पुटपुटला," ही पोरगी ना मला मार खायला लावणार आहे खर सांगून. कोण सांगत बर जोरू का गुलाम बद्दल.."

तिने ते ऐकलं आणि तिच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरले. अन्वयने तिच्याकडे बघतच कार सुरू केली. अन्वयने गाडी सुरू केली तरीही तिच्या चेहऱ्यावरच हसू कमी झालं नव्हतं आणि असा एक क्षण नव्हता जेव्हा तीच हसन बघून तो आनंदी नव्हता..

तेरी हसी मे छुपी है
लाखो कहाणीया
मुझे धुंडनी है इस पल
तुझे हसाने की वजहँ..

अन्वयने येताच वातावरण अगदी आनंदी करून टाकलं होतं. अन्वय कार चालवतच होता की स्वराने विचारले," अन्वय सर आपण कुठे जाणार आहोत आणि काय काय खरेदी करायचं आहे?"

अन्वयनेही हसतच उत्तर दिले," इथे जवळच चाणक्य शॉपिंग मॉल आहे. काय काय खरेदी करायच आहे हे मला कळलं असत तर तुमच्यासोबत कशाला आलो असतो ना मॅडम? सो शॉपिंग काय करायची ते तुम्हीच बघा, तुम्हाला जे योग्य वाटत ते घ्या. मला वाटत फार काही लग्नाची तयारी करायची नाहीये फक्त आपल्याच लोकांसाठी कपडे खरेदी करायचे आहेत. दागिने नंतर घेऊ बाकी छोटी-मोठी तयारी माझे मित्र करून घेतील. आई पुन्हा काही लागेल का हो?"

स्वराची आई हसतच उत्तरली," वाटत तर नाही पण बघू तिथे काही मिळालं तर!! जे आवडेल ते करू शॉपिंग."

पुन्हा एकदा सर्व वातावरण शांत झाल होत. स्वरा आज अन्वयकडे राहून राहून बघत होती कारण तिला जे घडतय त्यावर विश्वासच बसत नव्हता. अगदी सर्व काही शांत झालंच होत की आईने विचारले," जावई बापू, तुमचे आई-वडील नाही आले. मला वाटलं ते पण सोबत येतील. काही झालय का हो??"

स्वराच्या आईने हा प्रश्न पुन्हा एकदा विचारला आणि स्वरा अन्वयकडे बघू लागली. ह्याही वेळी स्वरा उत्तर देणार होती पण त्याने नजरेनेच नकार दिला आणि तो जरा हसतच उत्तरला," आई ते घरी नाहीयेत! ते फॉरेनल गेले आहेत. ते म्हणाले की तू आपल्या आवडीच घे नंतर आम्ही घेऊ उरलेल सर्व."

अन्वयने कशीतरी वेळ मारून नेली पण त्याच्या चेहऱ्यावर किती टेन्शन होत ते स्वरालाच माहिती होत. अन्वयने काही वेळाआधी वातावरण मस्त बनविल होत पण आता पुन्हा कारमध्ये शांतता झाली. समोर कुणीच काहीच बोलत नव्हते. एक खोट लपवायला किती खोट बोलावी लागतात ह्याचा त्याला अंदाज होता पण बोलायची ही योग्य वेळ नाही म्हणून तोही शांत बसला होता.

शांत- शांत बसण्याचा हा प्रवास अगदी काही वेळ चालला आणि अन्वयने मॉल समोर गाडी थांबवली. अन्वयला आईच्या प्रश्नामुळे टेंशन आलं होतं पण त्याने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हसतच मॉलमध्ये सर्व जाऊ लागले. मॉलमध्ये एन्ट्री करताच स्वराने साडीचे शॉप्स कुठे आहेत ते बघितले आणि प्रत्यक्ष शॉपिंगला सुरुवात झाली. आई आणि स्वरा साड्या बघण्यात व्यस्त होते. तो सेल्समन सतत स्वराच्या चेहऱ्याकडे बघायचा आणि तिला कोणती साडी सूट होईल त्या अंदाजाने तो साडी तिला दाखवत होता. स्वराला अजिबात त्याबद्दल अंदाजा नव्हता पण अन्वयच पूर्ण लक्ष होत. काही वेळ अन्वयने त्याला काहीच म्हटले नाही. त्याला खर तर सेल्समनच्या वागण्याचा राग आला होता तरीही राग न दाखवता तो हळूच मिश्किल हसतच उत्तरला," दादा तिला सर्व साड्या सूट होतील तुम्ही पूर्णच दाखवा. वेळ पडली तर पूर्णच विकत घेऊ आम्ही. पैशाच टेन्शन नका घेऊ. मोजून मोजून साड्या नका दाखवू. तुमच्या शॉप मधल्या बेस्ट साड्या दाखवा तिला."

स्वराला त्याच्या बोलण्याचा रोख कळाला नव्हता पण सेल्समनला त्याला नक्की काय म्हणायचं होत ते कळलं आणि त्याने आपली नजर चोरत सर्व साड्या समोर ठेवल्या.

स्वरा एक-एक साडी नजरेखालून काढत होती आणि तिची एका साडीवर नजर पडली. ती लाल रंगांची रेखीव काम केलेली साडी होती. साडीला बघताच स्वरा म्हणाली," आई ही साडी कशी दिसतेय ग? मला खूप आवडतो हा रंग. मी ना खूप खास दिवशी ही साडी नेसली होती. तेव्हापासून माझ्या नजरेतच बसली."

स्वरा, अन्वयला कळावं म्हणून बोलून गेली होती आणि अन्वय ते ऐकून हसलाही. आईला समजलं नव्हतं तरीही त्या तिच्या निरागसपणावर हसतच म्हणाल्या," स्वरा हीच तर साडी तुला लग्नात नेसायची आहे सो ती तर घ्यायलाच हवी. तिच्याविना माझी मुलगी नवरी म्हणून कशी नटेल बर? त्याच साडीत तर ती अन्वयची होणार मग ती न घेऊन कशी चालणार? घे हा आणि नवर्याला विचार आवडली त्याला की नाही ते??"

आईच बोलणं ऐकताच स्वराचा चेहरा पुन्हा एकदा खुलला आणि ती अन्वयला साडी दाखवू लागली. अन्वयसाठी तो रंग तर खूप खास होता म्हणून ती साडी बघताच तो खूप सुखावला. लाल रंग आणि अन्वयच नात तिच्यापेक्षा कोण चांगलं समजू शकेल.

आज कितीतरी वेळ त्यांची शॉपिंग सुरू होती. स्वराने जवळपास ८-१० कलरच्या साड्या खरेदी केल्या होत्या. अन्वयलाही त्यातली प्रत्येक साडी आवडली होती.

साडी खरेदी करून झाल्यावर ते सर्व अन्वयला शेरवानी बघायला गेले. तिथेही अन्वय केवळ शांतच होता. आज स्वराच त्याच्यासाठी सर्व खरेदी करत होती. ती त्याला निवड करायला सांगायची तर तो सर्व तिच्यावर सोपवुन मोकळा व्हायचा. त्यामुळे तिला त्याचा खूप राग आला होता. जवळपास ३-४ तास झाले होते. ते ५ वाजता मॉलला आले होते आणि आता १० च्या आसपास वाजले होते. जवळपास पूर्ण शॉपिंगही करून झाली होती. अन्वयने त्यांना बाहेर पाठवल आणि स्वता बिल पे करायला थांबला होता. काही क्षण गेले त्याने कोड स्कॅन केलाच होता की स्वरा त्याच्या समोर दोन साड्या ठेवत म्हणाली," सर तुमच्या आई आल्या नाही ना मग त्यांच्यासाठी आणि ताईसाठी ही साडी! तुम्ही द्याल ना त्यांना?"

अन्वय ओठांवर मिश्किल हसू आणत म्हणाला," स्वरा मी देईल पण त्या घेणार नाहीत हे खरं. निहारिका घेईल कदाचित पण आई घेणार नाही शिवाय मला अस पण वाटत की आपल्या लग्नाला माझ्या घरून कुणीच येणार नाही. तुला काही प्रॉब्लेम तर नाही ना?"

स्वराला खर तर त्याक्षणी वाईट नक्कीच वाटलं होतं तरीही चेहऱ्यावर ती सुंदर हसू ठेवत म्हणाली," मी समजू शकते! हरकत नाही. तुम्ही देऊन बघा. घेतली तर आनंदच आहे."

तिच्या चेहऱ्यावर उदासी होती पण अन्वय त्या उदासींवर कुठलाच उपाय करू शकत नव्हता. अन्वयने क्षणात बिल पे केलं आणि दोघेही बाहेर निघाले.

स्वरा- अन्वय समोर जातच होते की अन्वयला काहीतरी आठवलं आणि अन्वय म्हणाला," स्वरा मला वाटत तू माझ्या घरच्या परिस्थितीबद्दल तुझ्या आईला अंदाज द्यावा. मला त्यांना फसवायच नाहीये. त्यांना माहिती असावं थोडं फार कारण लग्नात कुणी आले नाही तर त्यांना कळेलच त्यापेक्षा कल्पना दे त्यांना. वेळेवर कळलं तर फसवल्यासारखं वाटेल. प्लिज एवढं करशील माझ्यासाठी. माझ्यात हिम्मत नाहीये त्यांना हे सर्व सांगायची. करशील ना?"

अन्वय नजर रोखून स्वराकडे बघत होता तर स्वरा विचार करत उत्तरली," हो सर मीही तेच विचार करत होते. मी सांगेल वेळ बघून. तिला थोडं वाईट वाटेल पण मला माहित आहे ती समजून घेईल मला. तुम्ही काळजी करू नका. टेन्शन नका घेऊ अन्वय सर. होईल सर्व नीट. मी आहे ना मग टेन्शन घेण्याची गरज नाही. आता तरी थोडं हँसा नवरोबा."

अन्वय हसला आणि दोघेही समोर जाऊ लागले. आता स्वराला काहीतरी सुचल आणि ती त्याला अडवत म्हणाली," सर मला उद्या स्वयमला भेटायला जावं लागेल. जवळपास लग्न फिक्स झालंय पण त्याच्याशी काहीच बोलले नाही. मला त्याला सर्व सांगूनच आपल्या नात्यांची नवीन सुरुवात करायची आहे. आता जास्त उशीर करून जमणार नाही. मी थोडी घाबरले आहे, तुम्ही येणार का माझ्यासोबत?"

अन्वयने तिच्या हातावर हात ठेवत म्हटले," नाही स्वरा मी आलेलं बर वाटणार नाही. मला वाटत तो तुमच्या दोघांचा प्रश्न आहे आणि तो तुम्हीच सोडवावा सो तूच जाऊन ये. तू बोललीस तर तो समजून घेईल. मी आलो तर प्रकरण बिघडेल सो शक्यतो तूच जाऊन ये."

अन्वय बोलून गेला तर स्वरा विचार करत म्हणाली," ओके सर कळवते तुम्हाला काय म्हणाला तो तर. पण होईल ना सर्व नीट की पुन्हा काही??"

अन्वय आता जरा हसतच म्हणाला," त्याची गरज नाहीये स्वरा. मला विश्वास आहे तुझ्यावर. तू मॅनेज करून घेशील सर्व. काही होणार नाही वेडाबाई. आता स्वरा-अन्वयला कुणीच वेगळं करू शकणार नाही. मग ते कुणीही असो. समजलं??"

तीने पुढच्याच क्षणी त्याच्या नजरेत बघितल. त्यात तिला काहीच विचित्र जाणवलं नाही उलट जास्तच विश्वास त्याच्या डोळ्यात जाणवत होता म्हणून समोर ती काहीच म्हणाली नाही. ते दोघेही हसत- हसतच कारमध्ये बसले आणि पुन्हा घराकडे निघाले.

**********

जवळपास रात्रीचे ११ वाजले होते. स्वराचे आई-बाबा थकल्यामुळे येताच बेडवर पडले तर स्वरा बेडवर पडून विचार करत होती. उद्या स्वयमशी नक्की काय बोलायचं ह्याबद्दल तिच्या मनात विचार येत होते. तिने अन्वयच्या घरच्यांच सत्य तर स्वीकारलं होत पण स्वयमच आणि त्याच्या आईच स्वप्न कस तोडायच हा विचार तिच्या मनात घर करून गेला होता. त्याच्याशी नक्की काय बोलायचं, तो कसा रिऍक्ट करेल ह्याबद्दल तिच्या मनात आज प्रश्न निर्माण झाले होते म्हणून ती थोडी चिंतीत होती पण त्याच्याशी बोलनही गरजेच होतच त्यामुळे तिने बाजूला पडलेला मोबाइल हातात घेत मॅसेज टाइप केला…

" स्वयम कल मिलते है. सेम प्लेस, शाम को..याद से आ जाना."

स्वराने मॅसेज सेंड केला आणि मोबाइल बाजूला टाकून तशीच पडून राहिली. काही क्षण गेलेच होती की स्वयमचा समोरून मॅसेज आला…

" इसी वक्त का इंतजार कबसे कर रहा हु स्वरा. भुलने का सवालही आता नही. तुम्हारे पेहले ही आ जाऊंगा. गुड नाईट स्वीट ड्रीम, टेक केअर.."

स्वराने क्षणात त्याचा मॅसेज वाचून काढला. त्याच्या शब्दातला उत्साह बघून तिला अजूनच टेन्शन आलं होतं. अन्वय पासून दूर राहण जेवढं त्रासदायक नव्हतं त्यापेक्षा जास्त त्रासदायक त्याला नकार देन होत म्हणून आज विचार करताना तिला झोप लागत नव्हती. ती विचार करतच होती की तेवढ्यात पुन्हा एक मॅसेज आला. तिने बाजूला पडलेला मोबाइल हातात घेऊन तो बघितला आणि मॅसेज वाचू लागली...

" मला वाटत स्वरा मॅडम तुम्ही उद्याचा जास्तच विचार करत बसला आहात तेव्हाच तर मला इकडे झोप येत नाहीये. तुम्ही लवकर झोपा बर नाही तर मला कशी झोप येणार?? किती टेन्शन घेता हो स्वरा मॅडम तुम्ही ? उद्याची गोष्ट उद्या. आज विचार करून काही मिळणार आहे का? बाबा अन्वय म्हणतात की शांत झोप झाली ना तर उत्तर लवकर सुचतात सो पटकन झोपा. तुम्ही झोपला म्हणजे मलाही झोप येईल. झोपू देणार ना मला की विचार करून मलाही जागवतच ठेवणार??"

त्याचा एक मॅसेज आणि स्वराच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू. तिने पटकन मोबाइल वर मॅसेज टाइप केला.

" कस जमत हो तुम्हाला माझं मन वाचून घ्यायला?"

" मॅडम प्रेमात सर्वच जमायला लागत. तुमचं माझ्यावर प्रेम नाही ना म्हणून जमत नाही तुम्हाला. तस पण तुम्ही मला कुठे आय लव्ह यु म्हटलं आहे अजून. तुम्ही तरी नुसती खेचता माझी. खडूस कुठल्या. मीच करतो प्रेम. तुम्ही नाही करत माझ्यावर.."

" झोपा!! आता झोप येत नाहीये का? गुड नाईट", स्वरा हसत हसत उत्तरली..

" गुड नाईट.."

तिने मोबाइल बाजूला ठेवला आणि तिच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल. हसू एक अशी गोष्ट होती की ती क्षणात तिचे विचार नाहीसे करायची. आजही काहीसं असच झालं. ती हसायला लागली आणि हसता-हसता झोपी गेली. उगाच हसू सर्व आजारांवर उपाय आहे म्हणत नाहीत..



दुसरा दिवस उजाळला. स्वरा उठली होती पुन्हा एक आव्हान सोडवायला. स्वयमला सायंकाळी भेटायच होत पण आज दिवसभर त्या क्षणाची वाट पाहन तिला त्रासदायक जाणार होत. अन्वयदेखील आज ऑफिसला गेला होता त्यामुळे त्याच्याशी बोलायला देखील जमणार नव्हतं. तिने स्वयमला माफ करून त्याच्यासाठी एक आशेची किरण जागी केली होती तेव्हा आता अचानक ती बुझवायची म्हणजे त्याला त्रास होणार होता हे पक्क होत म्हणून स्वराला जास्तच टेन्शन आलं होतं तर दुसरीकडे स्वयम आज फायनली स्वराच उत्तर येईल म्हणून खुश झाला होता. गेले कित्येक वर्षे त्यानेही तिची आयुष्यात परत येण्याची वाट बघितली होती तेव्हा त्याच्यासाठी हे काही क्षण सुद्दा काढणं कठीण जाऊ लागलं होतं. तो आतुरतेने वाट बघत होता तिच्या उत्तराची कारण हे उत्तरच त्याचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करणार होते. आज दोन लोक एकमेकांविरुद्ध विचार करत होते. कदाचित ह्या एका क्षणाने दोन नाती कायमची दूर जाणार होती.

स्वराला आज घरात करमनार नव्हतं त्यामुळे ती आईसोबत काही सामान आणायला बाहेर पडली होती. त्या बहाण्याने का होईना तिच्या डोक्यातून काही क्षण त्याबद्दलचे विचार बाजूला राहणार होते. झालंही तसच होत. आईसोबत फिरता- फिरता तिचा बराच टाइमपास झाला होता. ती घरी परत आली तेव्हा दुपार टळून गेली होती. ती घरी पोहोचली तेव्हा ३ वाजले होते. ती विचार करत-करत बेडवर पडली आणि थकण्याने तिला केव्हा
झोप लागली तिलाच कळलं नाही.

ती सायंकाळची वेळ होती. तिला वेळेच भान नव्हतं. आईने उठविल तेव्हा तीच घड्याळात लक्ष गेले. आईने उठवताच ती पटकन कपडे चेंज करून हॉलमध्ये परतली. तिला जाणवत होतं की स्वयम एव्हाना निघाला असेल म्हणून तिला जास्तच टेन्शन आलं होतं. तिने पटापट पर्स हातात घेतली आणि आईला बाहेर जात असल्याचे कळवून पसार झाली. ती क्षणात निघाली, समोर चालत असतानाही तीच अर्ध लक्ष घड्याळावर होत. ती धावत- पळतच टॅक्सी स्टॅण्डवर पोहोचली. नशिबाने ऑलरेडी टॅक्सी तिथे उभीच होती. तिने त्या चालकांला पार्कचा पत्ता सांगितला आणि स्वरा जरा निवांत बसली. धावून- धावून तिच्या हार्टबिट वाढल्या होत्या. ती टॅक्सीत बसली.टॅक्सी धावू लागली आणि स्वरा शांत जाणवू लागली पण स्वयमला नक्की काय सांगायचं ह्याबद्दलचे विचार अजूनही तिला त्रास देत होते. ही तिच्यासाठी सर्वात कठीण घडी होती. तिला क्षणभर वाटलं होतं की इथूनच घरी परत जावं पण तस करून चालणार नव्हतं. लवकरात लवकर तिला स्वयमशी बोलून सर्व सोडवायच होत. टॅक्सी धावत होती तर त्यापेक्षा फास्ट स्वराचे विचार धावत होते. तिच्या मनाला आज शांती मिळणे अगदी कठीणच झाले होते. विचारातून बाहेर यावं म्हणून ती खिडकीतुन बाहेर बघू लागली. तिने प्रवास सुरूच केला होता की तिच्या मोबाइलची मॅसेज टोन वाजली. तिला वाटलं की स्वयमने मॅसेज केला असावा म्हणू पर्स मधून मोबाइल काढत तिने पटकन हातात धरला. पटकन लॉक उघडून मॅसेज बघू लागली.

" मॅडम उशीर झाला यायला तर सरळ मला कॉल करा मी येईल न्यायला आणि काळजी करू नका सर्व नीट होईल. तो समजून घेईल तुला सो आधी ह्या टेन्शन वाल्या चेहऱ्यावर स्माईल घेऊन ये. कदाचित ही स्माईलच तुझा प्रवास सोपा करेल."

त्याचा मॅसेज वाचताच स्वराच्या चेहऱ्यावर हसू पसरल आणि तिने पटकन मॅसेज टाइप केला," काळजी करू नका सर. स्वयमला सांगून देईन घरी ड्रॉप करायला. तस पण तुम्हाला यायची गरज नाहीये, मी येईल इतकी सुद्धा लहान नाहीये मी."

" लहान नाही आहेस पण माझी होणारी बायको आहेस आणि बायकोची काळजी घेऊ नये असं कुणी म्हटलं. असो आता त्रास देत नाही..जा निवांत बोल. बाय.."

" बाय.."

तिने मोबाइल हातातच ठेवला आणि अन्वयच्या बोलण्यावर जरा हसू लागली. ह्याला कोईसिंडन्स म्हणतात की प्रेम माहिती नाही पण जेव्हा- जेव्हा ती टेन्शनमध्ये असायची तेव्हा तो नकळत हसवून तीच टेन्शन कमी करायचा.

तिने मोबाइल ठेवला आणि बाहेरच वातावरण बघू लागली. बाहेर अंधार पडायला सुरुवात झाली होती आणि तिला तो क्षण आठवला. अशीच ती सायंकाळ. स्वयमने तिला रिंग देऊन प्रपोज केलेलं आणि त्याचवेळी नेमकं झालेलं भांडण. स्वराच्या समोर ते सर्व अचानक उभं झाल आणि आठवले त्याचे शब्द " देख लेना इसिसे शादी करुंगा" ते आता तिच्या डोक्यात घुमू लागले. आजपर्यंत ती कॉन्फिडन्ट होती की त्याच्याशी बोलू म्हणजे सर्व सोपं होईल पण जसजशी वेळ जवळ येत होती तीच अंग थरथरायला लागलं होतं. अशीच वेळ कॉलेजच्या वेळी होती. जेव्हा त्याने स्वराला नाही म्हटले. किती रडली होती स्वरा. पहिल्याच प्रेमात नकार मिळाल्याच दुःख काय होत ते तिलाही जाणवत होतं. ह्या काही क्षणाच्या प्रवासात स्वराचा मागील पूर्ण भूतकाळ डोळ्यासमोरून गेला आणि ती क्षणभर घाबरली. कुणीतरी नकार देण्याच्या वेदना काय असतात त्या तिलाही जाणवत होत्या. ते क्षणभर सर्व अगदी तिच्या डोळ्यासमोर आल्याने तिला ते सांभाळण अगदीच कठीण होऊन बसल होत. जशी टॅक्सी धावत होती तसेच तिच्या डोक्यातही विचार धावत होते. ती बाहेर तर बघत होती पण तीच तिलाच भान नव्हतं आणि समोरचा चालक म्हणाला," दीदी आपका स्टॉप आ गया."

त्याचे शब्द येताच तिने बाहेर बघितले. तिच्या अगदीच समोर तो पार्क होता. तिने गाडीचे हळुवार दार उघडले आणि त्याला पैसे देऊन समोर जाऊ लागली. खर तर ती समोर जात होती पण अजूनही तिच्या डोक्यातुन ते विचार बाहेर गेले नव्हते. त्यामुळे समोर जाऊ की नको अस तिला झालं होत. ती एक-एक पाऊल टाकत समोर पोहोचलीच होती की अगदी त्याच बेंचवर तो तिला बसून दिसला. त्याच्या चेहऱ्यावर आज कमालीचा आनंद होता आणि ते बघुन स्वरा आणखीच घाबरली पण आज तिच्याकडे त्याच्यासोबत बोलण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून मनाविरुद्ध ती त्याच्याकडे एक-एक पाऊल टाकत चालली होती. समोर काय होणार आहे ह्याबद्दल तिला अंदाजा नव्हता पण स्वयम दुखावला जाणार ह्या विचारानेच ती गळून पडली होती.

अगदी त्याला बघता- बघता ती त्याच्यासमोर पोहोचली. स्वयमला स्वरा दिसताच त्याने हातात असलेले गुलाबाचे फुल तिला देऊ केले. तिचे हात ते फुल घेतानाही थरथरत होते तरीही तिने स्वतःला सांभाळत, चेहऱ्यावर मिश्किल हसू आणत ते घेतले. फुल घेतानाच तिने त्याच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली. आज तो खूप आनंदात दिसत होता. तिला इम्प्रेस करता ह्यावा म्हणून ब्लॅक चेक शर्ट आणि क्रिमी पॅन्ट घालून तो आला होता. तेच फॉर्मल शु पण पॉलिश केलेले, बारीक- बारीक केस पण त्याला शोभून दिसनारे. ती त्याला बघतच बाजूला बसली. तिचे हात अजून थरथरायच बंद झाले नव्हते. सेम स्थिती पायाचीही होती. डोळ्यांची उघडझाप सतत सुरू होती. त्याला आपली अवस्था कळू नये म्हणून स्कार्फच्या खाली तिने आपले हात लपविले, नजर त्याच्यावरून इकडे- तिकडे फिरवू लागली. काही वेळ त्यांच्यात तशीच शांतता होती आणि फायनली त्यानेच सुरुवात केली " स्वरा तुम दिल्ली कब आयी? मुझे क्यू नही बताया? वो भी छोडो..ठेहरी कहा हो? घर क्यू नही आयी?"

स्वयम एकावर एक प्रश्न विचारत होता. त्याच्या प्रत्येक शब्दात तिला उत्साह दिसत होता आणि नजरेत वेगळीच चमक होती त्यामुळे ती काही वेळ शांत राहिली आणि घाबरतच म्हणाली," वो छोडो तुम बताओ कैसे हो? ममी कैसी है?"

स्वयम तिच्याकडे बघत हसतच उत्तरला," अब तक तो ठीक नही था पर अब लगता है ठीक हो जाऊंगा! तुम जो आयी हो जवाब देणे.."

त्याने तिच्याकडे बघावं आणि तिने क्षणात नजर बाजूला केली. त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होत तर स्वराच्या चेहऱ्यावर भीती. स्वराने चेहरा बाजूला केला आणि त्याला वाटलं की ती लाजली म्हणून तो काहीच म्हणाला नाही पण प्रत्यक्षात त्याच्या उत्तराने तिच्या डोळ्यात आज अश्रू आले होते. तो आज हजार स्वप्न घेऊन आला होता आणि ती त्याच प्रत्येक स्वप्न धुळीत मिळवायला आली होती हा विचार येताच ती अश्रूंना डोळ्यात येण्यापासून थांबवू शकली नाही. काही वेळ तसाच गेला. तिने त्याच्या नकळतच डोळ्यातले अश्रू पुसले आणि हिम्मत करत तिने त्याच्याकडे पाहिले. तिची नजर पुन्हा एकदा मिळताच तोही हसतच म्हणाला," स्वरा तुम कुछ बताने वाली थि ना? कहो..मुझे कबसे इंतजार है. और इंतजार नही कर सकता सो प्लिज टेल मी."

त्याचा प्रश्न येताच स्वराच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू आलं आणि ती हळूच स्वरात उत्तरली," हा आज सब कुछ बताने वाली हु पर तुम प्रॉमिस करो की जब तक मेरी बात पुरी नही होती, तुम बिच मे कुछ नही बोलोगे."

स्वयम हसतच म्हणाला," ठीक है. प्रॉमिस!!! देख लो मूह पर उंगली भी रखं दि.."

त्याच्या ह्या वाक्याने तिच्या चेहऱ्यावर हलकेसे का होईना स्मित पसरले आणि ती त्याच्या नजरेला नजर देत पुन्हा एकदा म्हणाली," स्वयम तुमने पुछा था ना की क्या तुम्हारे जिंदगी मे कोई और है. तो उसका जवाब आज देना चाहती हु. बाकी तुम सब समझ जाओगे. स्वयम सॉरी पेहले न बताने के लिये पर हा है मेरे जिंदगी मे कोई और! उनका नाम अन्वय. मेरे ऑफीसमे बॉस थे. दो साल पेहले मैने मुंबई मे जॉब जॉईन की ये तब की बात है. तब मै बहोत बुरे दौरसे गुजर रही थि. ऐसा दौर जब मेरा चेहराही मेरा दुष्मन बन गया था. शायद मरणाही बाकी रेह गया था. मैं जी तो रही थि पर एक जिंदा लाश बनकर. तब वो आये और अन्वयने मेरी जिंदगी को नरकसे स्वर्ग बना दिया. एक जिंदा लाश को इंसान समझने वाले इंसान वही थे. बहोत कुछ बदलाव नही किये अन्वयने मेरी जिंदगी मे पर एक सिख दि की अगर जिंदा रेहना है तो लोगो की नजर को नजर अंदाज कर दो. अन्वयने सिर्फ सलाह नही दि, अन्वयने साथ भी दिया और जो लडकी कभी प्यार के नाम से चीड जाती थि वो खुद ही उनके प्यार मे पड गयी."

तिने एवढं बोलून त्याच्याकडे लक्ष दिलं. त्याच्या डोळ्यात सहज अश्रू आले होते..तो तिच्यासमोर रडू शकत नव्हता म्हणून बाजूला जाऊन त्याने अश्रू पुसले आणि तिथूनच म्हणाला," हम मिले थे तब क्यू नही बताया तुमने?"

स्वरा उदास स्वरात उत्तरली," तुमही वजह हो इसकी. तुम्हारा जीस दिन कॉल आया उसी दिन वो दिल्ली लौट आये थे. मुझे उन्हे रोखना था पर तुम वापस जिंदगी मे आये और मै सोच मे गिर गयी. शायद तुम मेरी सोच मे हर पल थे इसलीये उन्हे रोक ना पायी. तुम्हारे साथ जैसे- जैसे जुडती गयी तबसे उनकी कमी मेहसुस होणे लगी. मेरे खयाल से शायद तुम मुझे उनसे मिलाने आये थे. तुम्हारे वजहसेही मुझे उनके प्यार का एहसास हुवा. मैने आखरी वक्त उनसे तुम्हारे बारे मे बात की और उनका जवाब सूनकर सच मे उनके प्यार मे पड गयी. तुमने मुझसे पूछा था की क्या कोई है. तब मेरे पास जवाब नही था पर आज है..स्वयम पीछले कही सालो मे तुम्हारी स्वरा बदल गयी है. जीस स्वरा से तुम प्यार करते थे वो आज जिंदा नही है. आज जो जिंदा है वो उनकी स्वरा है,तुम्हारी तो दुनिया की साजिश मे कही गुम हो गयी. वो प्यार करते रहे बिना किसीं उम्मीद के बस एक यही वजह काफी थि उंन्हे अपणाने की. उनहोणें कभी मुझे फोर्स नही किया लेकिन अगर उनका प्यार देखकर भी मै उनका साथ नही निभा पाती तो शायद आज प्यार हार जाता. इसलीये मैने उन्हे चुना है. सॉरी स्वयम! तुम्हारा दिलं दुखाने के लिये पर हमारा प्यार वक्त के साथ पिछे छुट गया. आज अगर यहा कोई है तो उनकी स्वरा. जो उनके सिवा किसीं और के बारे मे सोच भी नही सकती. अपणे पेहले प्यार के बारे मे भी नही. सॉरी!!"

स्वयम काही वेळ शांतच होता. त्याच्या डोळ्यातुन अश्रू सतत वाहत होते. त्याला ते थांबवता येत नव्हते पण तो सतत प्रयत्न करत होता. खूप वेळ असच सुरू होत आणि स्वयम हसतच उत्तरला," मुझे पेहलेही समझ जाना चाहीये था. मेरीही गलती थि. मैने कैसे सोच लिया की ८ साल बाद भी सब कुछ वैसे के वैसेही रेह जायेगा. मै हर रोज तुम्हारे सवाल का जवाब धुंडता रहा. तब मेहसुस हो रहा था लेकिन दिलं ने माना नही. मैने वो स्वरा देखी थि जीसने दिलं तुटने के बाद भी कहा था की मै तुमसेही प्यार करती रहुंगी. पर जब शादी की बात की और तुम्हारे चेहरे पे खुशी नही दिखी तबही मुझे तुम्हारा जवाब समज जाना चाहीये था. तो शायद इतनी तकलीफ ना होती. कोई बात नही पर स्वरा मुझे एक बात बताओ मेरी गलती कहा हुयी? पापा का साथ निभाया वो गलती थि या तुम्हारा साथ नही दिया वो गलती थि?"

स्वरा आता बेंच वरून उठत म्हणाली," येही सवाल तो पीछले सात सालो मे खुदसे मांगती रही स्वयम. राजने ऐसें किया, उसमे मेरी गलती क्या थि? वो मुझसे प्यार करता था, स्वयम घबरा कर मुझे छोड गया मेरी गलती क्या थि? अन्वय आने से पेहले ये सवाल हर रोज मेरे कान मे गुंजते थे. जवाब तो नही मिला मुझे पर इस जमाणे को नयी स्वरा मिल गयी. माना स्वयम तुम्हारी गलती नही थि. पर जब हम किसी के साथ होते नही ना तो उसके जिंदगी के सफर मे बहोत से नये लोग जुड जाते है और उनकी आदत हो जाती है. प्यार वही रेहता है पर हालात बदल जाते है. शायद जरूरते भी बदल जाती है. मै अगर आज जिंदगी जी रही हु तो उनके वजहसे सो उनको ठुकराकर मै अपणे पेहले प्यार से शादी कर लु ये धोका हो जायेगा. प्यार के साथ नाइंसाफी हो जायेगी. स्वयम जिंदगी का सब कुछ खोकर प्यार का मतलब पाया है मैने. अगर उन्हे आज खो देती हु तो प्यार हार जायेगा और वो मै होणे नही दे सकती. येही सच है राज के वक्त मेरी गलती नही थि, पापा के वक्त तुम्हारी गलती नही थि. तुम मेरे पेहले प्यार हो ये सच है, ये हर किसिसे केह सकती हु पर ये दिल आज उनके लिये धडकता है इसे नजरंदाज नही कर सकती. मै पेहला प्यार याद करके मुसकुरा तो सकती हु पर उसे स्वीकार नही कर सकती क्यूँकी वो सच मे नाइंसाफी हो जायेगी. इस स्वरा ने हर पल अन्यायही देखा है और मै खुद किसीं के साथ अन्याय नही कर सकती. हम अलग नही हुये स्वयम, हालातो ने हमे जुदा कर दिया और उसे अपनानाही शायद जिंदगीका इंसाफ होगा. मुझे नही पता स्वयम ये सूननेके बाद तुम मुझे मिलोगे या नही पर तुम मेरे सबसे सच्चे दोस्त हो और हमेशा रहोगे. वो जगहँ मै चाहू तो भी किसीं और को दे नही सकती."

स्वयमने सर्व ऐकलं आणि हसतच म्हणाला," शायद तुम सच केह रही हो. बहोत कुछ बदल जाता है वक्त साथ. इसलीये वक्त रेहते अपणो को बताना चाहीये की वो कितने खास है. चलो जिंदगी का नया सबक तो मिल गया. अब चले घर की अन्वय लेणे आने वाला है?"

स्वरा पुढच्याच क्षणी त्याचा हात धरत म्हणाली," स्वयम एक और बात है!"

स्वयम हसत म्हणाला," कहो और क्या झटका देणे वाली हो.."

स्वरा त्याच्याकडे बघत उत्तरली," मेरी१४ फेब को शादी है कोर्ट मॅरेज. तुम आओगे ना?"

स्वयम हसत हसतच म्हणाला," ग्रेट!! माना की दिलं बडा है स्वरा मेरा पर इतना भी नही की तुम्हारी शादी देख लु. अब ना केहने के हालात समझलो. मुझे तुम्हारा हर डिसीजन मंजूर है पर नही देख सकता मै स्वरा तुम्हे किसींसे शादी करते हुये. होप तुम समझोगे? सॉरी पर नही आ सकता!!"

तो तिच्याकडे बघत होता आणि तिने पटकन त्याला मिठी मारली..तिच्याही डोळ्यात अश्रू होते..त्यानेही तिला घट्ट मिठी मारली आणि स्वरा म्हणाली," सॉरी स्वयम तुम्हे दुखाने के लिये!! "

स्वयम हसतच उत्तरला," ठीक है यार!! तुमने मुझे माफ कर दिया वही काफी है. शायद एक बोझ उतर गया दिलंसे वरणा जिंदगीभर खुदको माफ नही कर पाता शायद आज बिना बोझ के जी तो सकता हु. आज जाना है स्वरा जिंदगी हमारे इशारे से नही चलती. वक्त रेहते सब कर लिया करो वरणा कुछ नही मिलता फिर इंसान हो या फिर चीजे. छोडो मै खुश हु तुम्हारे लिये. अब चले ज्यादा देर रुक गया तो तुम्हारे सामने रो पडूंगा और मुझे नही रोना तुम्हारे सामने. प्लिज!!"

स्वरा-स्वयम दोघेही क्षणात कार मध्ये जाऊन बसले आणि कार क्षणात सुरू झाली. कार भरधाव वेगाने पळत होती आणि दोघेही कितीतरी वेळ ते शांत होते. कदाचित आता बोलायला काहीच उरल नव्हत. स्वरा तर पूर्ण प्रवासात त्याचा चेहरा बघत होती तर तीच सतत पाहणं त्याला आणखीच त्रास देत होत. पूर्ण प्रवासात ते दोघेही शांत होते. ती शांतता तुटली ती स्वरा घरी आल्याने. ती दार उघडत त्याला म्हणाली," स्वयम आंटी को प्रॉब्लेम तो नही होगी ना? उनको नही समझा सकती मै प्लिज बता दोगे उन्हे.."

स्वयम हसतच उत्तरला," बिलकुल नही होगी. ममी को मै मॅनेज कर लुंगा और उन्हे शादी मे भी भेजूंगा.. वो तुम्हे बेटी मानती है इसलीये ये बात सूनकर खुश हो जायेगी. तुम शादी की तयारी कर लो."

स्वराच्या चेहऱ्यावर हसू परतल होत तर स्वयम तुटक तुटक बोलत होता. तिलाही ते जाणवलं पण त्याच्याशी आता काहीही बोलणं योग्य नव्हतं म्हणून ती जाऊ लागली आणि स्वयम तिला अडवत म्हणाला," स्वरा रुको ( ती वळून त्याच्याकडे बघू लागली) मैने रिंग दि थि ना वो अन्वयके नाम से पेहन लेना. मैने कहा था जो तुम्हारे दिलं मे है उसके नाम से पेहन लेना. वो गिफ्ट है मेरा ऐसें समझ कर रखं लो और कभिभी किसींभी बात की जरूरत पडे तो जरूर याद करणा..मै हु दोस्त बनकर हमेशा साथ मे. ममी के साथ शादी का गिफ्ट भेजने वाला हु. नही तो कंजूस बोलोगी मुझे. शादी की बहोत बहोत मुबारक बात स्वरा. हमेशा खुश रहो. बस इतनाही कहँ सकता हु. स्वरा तुमसे बात क्या करू सच मे समझ नही आ राहा. शायद बहोत तकलीफ मेहसुस कर रहा हु इसलीये भी होगा पण एक बात जरूर केहना चाहता हु, स्वरा मेरी जिंदगी मे आकर मुझे प्यार के कुछ खास पल देणे के लिये शुक्रिया!! आज मै केहता हु, जिंदगी मे कोई साथ रहे ना रहे पर तुम्हारा प्यार हमेशा मेरे साथ रहेगा. तुम साथ हो या ना हो वो खास जगह कोई और नही ले सकता. तुमने दिया ये एहसास हमेशा दिलं मे संभाल कर रखुंगा. वक्त लगेगा मुझे संभलने के लिये लेकिन तुम्हारे खुशी के लिये ये दर्द भी सह लुंगा. तुम नही जिंदगी मे तबभी मंजूर है पर तुम ना होते हुये भी प्यार निभाते रहूंगा. ये अधिकार नही छिन सकती तुम मुझसे. कहोगी तबभी नही. इस पल का एहसास कराणे के लिये शुक्रिया. इन्कार मतलब जिंदगिकी नयेसे शुरुवात ये तुम्हारे संघर्षसे सिख रहा हु. मुझे राज नही स्वरा के जैसे प्यार करणा है ये आज तुमसे केहता हु. थॅंक्यु स्वरा मेरी जिंदगी मे आने के लिये. तुम नही होती तो ये सुंदर एहसास मै कभी मेहसुस नही कर पाता. माना की तकलीफ हुयी है पर जो तुमने दिया है वो कोई और नही दे सकता. थॅंक्यु थॅंक्यु सो मच.."

ती एकदम गोड हसली तर स्वयम भरधाव वेगाने निघून गेला. ती आताही त्याच बोलणं ऐकून हसत होती. तिला कधीच वाटलं नव्हतं की स्वयमच्या सोबतीचा शेवट इतका सुंदर होईल. प्रेम म्हणजे काय?? तशा आहेत हजार व्याख्या. काही लोक राजसारखं प्रेम करतात तर काही स्वरासारखं. कोणतं प्रेम घ्यायच हे त्याच त्यांनी ठरवाव पण प्रेमाच्या नावाखाली कुणाच आयुष्य नक्कीच बरबाद करू नये...

कैसे बया करू मै मोहब्बत-ए-जश्न
मोहब्बत उसने चेहरे से की तो तबाहँ कर दिया
तुमने जो की दिलं से आजमाहिश
मुझे मोहब्बत से और प्यार हो गया...