लोगो की सोच से परे है
शहर की अपनी दुनिया
इंसान बदलते है अपना फायदा देखके
एक शहर ही है जो सबका साथ देते है
ती सकाळची वेळ. स्वराचे आई वडील आपले सामान घेऊन रूमच्या बाहेर पडले होते. स्वरा अजूनही रूमच्या मध्येच होती. ती आज आपली प्रत्येक गोष्ट नव्याने बघत होती आणि ते सर्व शेवटच बघून ती भावुक झाली. जरी ह्या शहरातला तिचा सुरुवातीचा प्रवास थोडा वेदनादायक होता तरी ह्याच शहराने तिला एक नवीन ओळख दिली त्यात ह्या घराने तर तिची कायमच साथ दिली. मग ते आनंदाचे क्षण असो की दुःखाचे, हे घरच होत ज्याच्या चार भिंतीमध्ये ती आपल सुख दुःख अनुभवत होती पण आज हे घर सोडून जाताना तिला सर्व काही आठवू लागलं आणि ती जरा भावुक झाली. तिने शेवटचच नजरेखालून संपूर्ण घर काढलं आणि भरलेल्या डोळ्याने दार लावले. दार लावताच डोळे घट्ट मिटून ती मनातल्या मनात उत्तरली," कधी तरी विचार यायचा की ह्या शहराने मला नक्की काय दिलं? हे शहर प्रत्येकाच स्वप्न पूर्ण करत मग माझंच स्वातंत्र्य का हिरावून घेतलं ह्याने? पण मी आज हे कबूल करेन की मी इथे चुकले. शेवटी ह्याच शहराने मला अपेक्षे पेक्षा जास्त परत केलं. त्याने फक्त मला ओळख दिली नाही तर उडायला पंख सुध्दा दिले. मी स्वप्न न बघणारी स्वरा मोहितेही आज खूप मोठं स्वप्न जगायला चालले आहे. ह्यात ह्या शहराचा खूप मोठा वाटा आहे त्यातही ह्या सुंदरशा घराचा मोलाचा वाटा आहे. तूच तर माझा एकांत, हसन सर्व बघितलं आहेस. तू प्रत्येक क्षणी मला साथ दिली आहेस त्यामुळे जाताना तुला धन्यवाद नक्की म्हणेन. जेवढ्या लोकांनी मला साथ दिली तेवढीच साथ तुझीही मिळाली त्यामुळेच कदाचित मी नव्याने उभी होऊ शकले. तेव्हा तुझे आभार न मानता जाणे शक्यच नाही. तेव्हा खुप खूप धन्यवाद. मी येते पुन्हा. नशिबात असेल तर भेटू पून्हा एकदा."
डोळे उघडून तिने पुन्हा एकदा पूर्ण घरावरून नजर काढली आणि ब्रोकरला चावी सोपवून बाहेर पडली. कमालीची गोष्ट आहे ना कधी कधी निर्जीव वस्तू आपल्याला साथ देतात तर सजीव फक्त बघ्याची भूमिका घेतात. त्या निर्जीव वस्तूच आपली नकळत साथ निभावून जातात. मग स्वराच्या आयुष्यात तो स्कार्फ असो की मग हे घर ज्याने तिचा प्रत्येक प्रवास जवळून बघितला होता म्हणून ती त्यांना विसरू शकत नव्हती. ती खाली पोहोचली. खाली टॅक्सी त्यांची वाट बघत होती. आज सामान जास्त असल्याने त्यांनी टॅक्सी बोलावली होती. स्वरा आजूबाजूच्या वातावरणावर एक नजर टाकून टॅक्सीमध्ये बसली आणि टॅक्सीने हळुवार प्रवासास सुरुवात केली. टॅक्सी निघालीच होती की स्वराच लक्ष टॅक्सीच्या काचेमध्ये गेले. तिला दिसलं की मागून माधुरी धावत येत आहे. तिला दिसताच तिने चालकाला टॅक्सी थांबवायला लावली आणि पटकन बाहेर उतरली. माधुरी काही अंतरावरून धावतच तिच्या जवळ आली. तिचा श्वास लागला होता. स्वराने आपल्या बॅगमधून पाण्याची बॉटल काढत तिच्या हातात दिली. माधुरीनेही पटापट पाणी पिऊन घेतलं. एव्हाना स्वराचे आई-बाबा देखील बाहेर उतरले होते. मधूने पाणी घेतलं आणि आता ती जरा शांत वाटत होती. तरीही तिच्या हृदयाचे ठोके काही कमी झाले नव्हते. ती आता स्वतःला शांत करत हळुवार आवाजात उत्तरली," ताई, तू मला न भेटताच सोडून जाणार होतीस ना? तुला जाताना मला भेटावस पण वाटलं नाही ना?"
स्वराला कामाच्या नादात लक्षातच राहील नव्हतं की माधुरीला भेटायचं राहूनच गेलं म्हणून शांत नजरेने ती उत्तरली,"सॉरी मधू लक्षातच आलं नाही. नाही तर तुला विसरेन का मी? तूच तर माझा आनंद आहेस. तू जीवनाचा महत्त्वाचा भाग आहेस मग तुला न सांगता जाईल का मी? सॉरी मधू दिवसभरात बरेच काम होते आणि त्याच नादात सर्व विसरले."
माधुरीही जरा उदास स्वरात उत्तरली," खोट खोट!! अन्वय सर मिळाले तर मला विसरलीस ना? बरोबर म्हणाले होते ते तू विसरून जाशील मला. पण इतक्या लवकर विसरशील अस वाटलं नव्हतं. त्यांना भेटायची इतकी घाई झाली आहे की मी आठवणीतच राहिले नाही. समजतंय मला!!"
स्वराच्या डोळ्यात क्षणभर अश्रू आले, स्वराने तिला त्याचक्षणी मिठी मारत म्हटले," मधू अस नको बोलू ग!!! तुला माहिती आहे ना तुझं माझ्या आयुष्यातील स्थान खूप महत्त्वाचं आहे. तुझ्याशिवाय ह्या शहरात मला जगणं पण मुश्किल झालं असत. तू मला आधार दिलास म्हणून आज मी इथपर्यंत येऊ शकले. तुझ्यामुळेच अन्वय सरांच प्रेम समजलं, तुझ्यामुळेच माझ्या आयुष्याचे सर्व क्षण सहज गेले. ह्या कठीण प्रवासात तू एकमेव कायम सोबत होतीस तेव्हा तुला कस विसरेल मी? हा पण आज चूक झाली माझ्याकडून त्यासाठी सॉरी!! खूप खूप सॉरी! तू म्हणशील तर मी थांबते इथेच, कान पकडून सॉरी!!"
स्वरा नजर खाली करत बोलून गेली तर माधुरीही तिला घट्ट मिठी मारत म्हणाली," ताई आता जास्त सेंटी नको करुस! मी गंमत करतेय. खर तर मलाच यायला हवं होतं तुला भेटायला आधीच पण तू जाणार आहेस मला सोडून हे स्वीकारणंच मला जमत नव्हतं. तू उद्यापासून माझ्या प्रवासात दिसणार नाहीस हे मन मानत नव्हतं म्हणून तुला भेटायची हिम्मत करू शकले नाही पण आज तुला न भेटता राहिले असते तर मनात खंत राहिली असती कायम म्हणून आले धावत- पळत. माहिती आहे ताई तू उद्यापासून नसशील पण मला ह्याचा जास्त आनंद होतोय की तू तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिल्लीला जाते आहेस त्यामुळे ह्यावेळी रडून नाही तर हसून अलविदा म्हण. ताई तुला पुढच्या प्रवासाच्या भरभरून शुभेच्छा. पुन्हा कधीही तुला माझी गरज वाटली तर एकदा नक्की कॉल कर. मी कायम राहील तुझ्यासोबत. आज शहर वेगळी होत आहे, मन नाही. मन कायम एक होती आणि एक राहतील. मिस यु दिदु!! लव्ह यु!!"
स्वराने तिची मिठी सैल करत म्हटले," माहिती आहे मला म्हणूनच माझं तुझ्या आयुष्यातील स्थान खूप खास आहे. तू आहेस म्हणून माझ्या चेहऱ्यावर हसू आहे. आठवण काय करेन त्रासच देणार आहे तुला. सर्व प्रश्न त्यांनाच कशाला विचारू, काही प्रश्न तुलाही विचारेन मग बघू अशीच म्हणतेस का?? मिस यु मधू!!"
मधू हसलीच होती की बाजूला असलेल्या आई म्हणल्या," ए मधू अस निर्वानीच बोलू नकोस हा. आम्ही येत राहू तुला भेटायला आणि तुला तुझं वचन आठवण आहे ना? तू येणार आहेस लग्नाला. मान्य की धूम- धडाक्यात करणार नाही आहोत पण आम्हाला आमची लाडकी मुलगी कायमच सोबत हवी. तू येणार आहेस ना? अस नको म्हणू की आई येऊ देणार नाही. नाही तर फोन करेन त्यांना."
मधूने आईलाही मिठी मारत म्हटले," ह्या क्षणाची तुमच्यापेक्षाही मी जास्त वाट बघितली आहे आई तेव्हा ह्या क्षणात मला नक्कीच सहभागी व्हायला आवडेल. मी येईल आई नक्की. आई ओरडली तर भांडण करून येईल पण येईल. ताईच्या आयुष्यात खूप सुंदर दिवस आलाय मग मी तो कसा मिस करू? मी येईल, लग्न धूम धडाक्यात होवो किंवा नको होवो पण मी तर धम्माल करणार आहे. तुम्ही बघतच राहा. काय म्हणतेस ताई करू न धम्माल?"
आई हसतच होत्या की बाबा उत्तरले," ये हुयी ना बात!! मधू तू ये हा. ह्यानि आपल्याला धूम धडाक्यात लग्न नाही लावू दिलं तर काय? आपण तिथेही धम्माल करू. दाखवून देऊ की आमच्या मुलीच लग्न आहे."
माधुरीही बाबांना मिठी मारत उत्तरली," चालेल बाबा!! खूप खूप धम्माल करू आपण. आफ्टरऑल ताईच लग्न आहे. मज्जा तर करायला हवीच."
माधुरीचा मूड जरा मस्त वाटत होता आणि बाबा उत्तरले," ही आहे माझी खरी मुलगी! आता तुम्ही बघाच किती धम्माल करतो आम्ही! दिल्ली वाले बघत बसणार अस लग्न करू आम्ही. मग तुम्ही साथ द्या किंवा नका देऊ. आम्ही तर करू मज्जा."
क्षणात सर्व हसू लागले होते तर इकडे टॅक्सी वाट बघत होती म्हणून स्वरा तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली," माझी लाडकी बहिन खूप मिस करेन तुला आणि हो माझ्या काही मैत्रिणी येणार आहेत. त्यांचा नंबर तुला देते. त्यांच्यासोबत ये. म्हणजे येन सोपं जाईल तुला. तशी मी येईल तुला पीक करायला तरीही त्यांच्यासोबत ये. प्रवास सोपा जाईल. बाय मेरी जान. मीस यु सो मच!!"
स्वराने पुन्हा एकदा तिला घट्ट मिठी मारली आणि तिघेही टॅक्सीमध्ये बसले. टॅक्सी क्षणात समोर निघाली तर माधुरी मागून तिला बघतच होती. माधुरीच्या डोळ्यात अश्रू होते तर इकडे स्वराच्याही. कधी कधी ना नाती रक्ताची असावी लागत नाही. ती मनाची असावी लागतात. एकदा मन जुळलं की मग नात्यात बंधन उरत नाही आणि आपलं कुणीही नसलेल्या व्यक्तीसाठी आपण खूप काही करून जातो. स्वरा-माधुरीच नातही असच. प्रत्यक्षात पाहिलं तर एकमेकांचा काहीच संबंध नाही पण त्याचं नात इतकं घट्ट होत की त्यांना कधी रक्ताच्या नात्यांची गरज पडली नाही. आज हा शेवटचा दिवस होता जेव्हा ती आपल्या सर्व खास लोकांना भेटून दिल्लीला निघाली होती. ह्या प्रवासात तिला काही नाती नकळत मागे सोडायची होती तर काही नात्याना अलगद स्वीकारावं लागणार होतं. प्रत्येक मुलीचा हाच प्रवास असतो पण स्वराचा प्रवास त्यापेक्षा जास्त कठीण होणार होता हेदेखील तितकंच सत्य होत.
स्वरा निघाली होती. धावता-धावता शेवटी टॅक्सीने एक अस वळण घेतलं की त्या वळणावर सर्व जुनी नाती क्षणात नाहीशी झाली. जणू पुन्हा एकदा भाग्याच्या रेषा पुसल्या गेल्या आणि ती सज्ज झाली नवीन रेषा आखायला. टॅक्सीमधून एक-एक जागा मागे जाऊ लागली आणि स्वरा आपल्याच आठवणीत हरवली. टॅक्सीमध्ये कुणीच कुणाशी बोलत नव्हतं पण स्वराचे मनातल्या मनात कितीतरी संवाद सुरू होते. त्या जागा, ती माणस तिला बरच काही आठवण करून देत होती. तिला एकदा प्रश्न पडला होता की हे शहर खरच माझं स्वप्न पूर्ण करेल का? लाखो, करोडो लोकांच्या गर्दीत माझं अस्तित्त्व निर्माण होऊ शकेल का? पण सरतेशेवटी ह्या शहराने तिला उत्तर दिलच. स्वप्नांच्या शहराने शेवटी स्वराच स्वप्नही पूर्ण केलंच. मुंबई स्वप्नांच शहर!! उगाच म्हटल्या जात नाही. फक्त मन लावून काम करणारा व्यक्ती ह्या शहराला हवा मग हे शहर त्या व्यक्तीची कधीच साथ सोडत नाही. मग ती व्यक्ती कुरूप असो की लठ्ठ हे शहर कुणामध्ये भेदभाव करत नाही. सुरुवातीला ह्या शहराने तिच्याकडून स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं पण अंती त्यानेच तिला दिलं नवीन आयुष्य!!! अस आयुष्य ज्याबद्दल तिने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता.
साधारणता दोन तास प्रवास करून ते एअरपोर्टला पोहोचले होते. अजूनही फ्लाइटला वेळ होता. स्वराचे आई-बाबां वाट पाहत चेअरवर बसले तर स्वरा तिकीट घेऊन त्यांच्याकडे आली. अजूनही थोडा वेळ असल्याने स्वरा तिथेच बसली. स्वरा इकडच- तिकडच वातावरण बघण्यात व्यस्तच होती की बाबा उत्तरले," बाळ स्वरा मला सांग ह्या शहराने तुला काय दिलं?"
स्वरा थोड्या वेळेपूर्वी हाच विचार करत होती म्हणून हसतच उत्तरली," बाबा प्रश्न जरा थोडा वेगळा करू. काय नाही दिलं अस विचारा. ह्या शहराने मला श्वास घेण्याची परवानगी दिली. ह्या शहराने माझा चेहरा तितका महत्त्वाचा नाही हे दाखवून दिलं आणि प्रत्येक व्यक्तीला जितक प्रेम मिळत तितकंच प्रेम मला दिलं. सोपं नव्हतं ह्या लोकांत मिसळन कारण गर्दीचा आधी मला खूप त्रास व्हायचा पण केव्हा ह्या गर्दीत मिसळले आणि ह्यांचा भाग होऊन गेले कळलंच नाही. गर्दीला चेहऱ्यांने, रूपाने फरक पडत नाही हे पहिल्यांदाच मला जाणवलं. प्रत्येक शहरात व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतातच पण हे नक्की आनंदाने सांगेन की ह्या शहराने मला आनंद जास्त दिला. मी हा चेहरा घेऊन जिथंही जाईल तिथे त्रास होणारच हे त्रिवार सत्य आहे, तेव्हा मला त्याच काहीच वाटणार नाही पण तिथे मला आनंद किती मिळतो ह्यावरुन मी त्या शहराला मार्क्स देईन. ह्या शहराने मला खूप आनंद दिलाय बाबा. नशिबात नव्हता तितका. सर्वात मोठा आनंद म्हणजे अन्वय सर! एकीकडे ह्या शहराने सुरुवातीला दिलेले दुःख आणि दुसरिकडे अन्वय सर, जेव्हा ह्यांची तुलना करते तेव्हा अन्वय सर जास्त मोठे ठरतात म्हणून ह्या शहराने माझ्याकडून काहीच हिरावून घेतलं नाही अस ठामपणे सांगेन. दिलंय ते इतकं की ते आयुष्यभर पुरेल. शहर भेदभाव करत नाही बाबा, लोक करतात. शहर आपल्याला हवं तसं स्वीकारतात. लोक उगाच म्हणतात गावात संस्कृती जपली जाती पण मला अनुभव आलाय की शहरात गुण जपले जातात तर गावात प्रथा, परंपरेच्या नावाने बंधने टाकले जातात. मुलावर कदाचित फार कमी पण स्वरासारख्या मुलीवर बंधने टाकताना कुणाला काहीच वाटत नाही. इतकं करूनही त्यांच्या डोळ्यात लज्जा नसते तर अभिमान असतो. ह्या शहराने मला माझ्यातली मी शोधण्याची संधी दिली ह्यापेक्षा मोठी देणं नक्की काय असेल?"
स्वराच्या चेहऱ्यावर हास्य होत तर स्वराच्या आई आता हळूच म्हणाल्या," स्वरा बरोबर आहे तुझं!! व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतातच पण शहर बदलतात तशी माणसही बदलतील तेव्हा दिल्लीचा प्रवास करताना तुझ्या मनात काय सुरू आहे हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल."
स्वरा आताही हसत उत्तरली," खर सांगू तर काहीच नाही. मला माहीत आहे ह्या शहरात भरपूर लोक मला त्रास देणारे असतील पण त्या सर्वाना पुरून उरणारा एक व्यक्ती आहे तो म्हणजे अन्वय!! आतापर्यंतचा प्रवास माझा एकटीचा होता म्हणून जास्त त्रास झाला पण आता ते सोबत आहेत. रडताना खांदा द्यायला, उदास असताना हसवायला. एकटी असताना सोबत द्यायला आणि घाबरले असताना साथ निभवायला. ते एक व्यक्ती नाहीत पूर्ण आयुष्य आहेत म्हणून ह्यावेळी प्रवास करताना मला भीती वाटत नाहीये. मी अस म्हणणार नाही की आई त्रास होणार नाही पण हेदेखील आनंदाने सांगेन की त्या प्रत्येक गोष्टीवरचे उपाय माझ्याकडे आहेत. व्यक्ती एकच असला तरी माझ्यासाठी तो पूर्ण जग आहे. वन मॅन आर्मी!! तो असताना विचार कशाला. मी विचार करेन आणि ते चेहरा बघून मला म्हणतील, स्वरा मी आहे ना..मग भीती कशाची?"
स्वराच्या चेहऱ्यावर आज कमालीचा कॉन्फिडन्स होता जो त्यांनी ह्याआधी फक्त ती पुन्हा कॉलेज जॉईन करणार होती त्यादिवशी बघितला होता. आज तोच उत्साह बघुन त्यांना आनंद झाला होता. स्वराच इतकं सकारात्मक असनच कदाचित तिच्या संघर्षाच नेहमी जिंकण्याच कारण होत हे क्षणात त्यांना समजलं होत.
काहीच क्षणात फ्लाइटची घोषणा झाली आणि ते फ्लाइटमध्ये पोहोचले. स्वराला मुंबई सोडून जाताना नक्किच त्रास होत होता पण तिची स्वप्न आता तिची वाट बघत असल्याने ती आनंदीसुद्धा होती. अन्वय तिच्या आयुष्यात आल्याने तीच एक स्वप्न नक्कीच पूर्ण झालं होतं पण त्याच्या आयुष्यात कायमस्वरूपी आनंदी राहण्याच स्वप्न अजूनही खुपच दूर होत. स्वरासाठी आतापर्यंतच्या प्रवास खूप सोपी होता कारण पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये तिला बाहेरच्या जगाशी लढावं लागलं होतं पण इथे आता लढाई होणार होती तिच्या सर्वात जवळच्या व्यक्तीच्या विचारांशी..एकीकडे तिला नाती निभावायची होती तर दुसरीकडे अन्वयला आपला त्रासही दाखवायचा नव्हता. त्याच्यासोबत राहून त्याला मनातलं काहिच कळू देऊ नये हे खूप मोठं आव्हान होत कारण त्याला तिच्या मनातलं सर्वच समजायचं. आजपर्यंत स्वराने सर्व आव्हाने यशस्वीरीत्या पेलली होती पण हे सर्वात कठीण आव्हान होत. म्हणतात ना जेवढी स्वप्न मोठी तेवढाच खडतर प्रवास मग स्वरा ह्याला नक्की कशी चुकणार होती? स्वराच्या डोक्यात क्षणभर विचार आलेच होते की फायनली विमान उडायला सज्ज झाले आणि स्वराही तयार झाली नवीन आव्हान पेलायला. तिने आपले सर्वात सुंदर स्वप्न पूर्ण करायला एक पाऊल पुढे टाकले होते. हे होते संसाराचे चाक. ज्यात सासू, सासरे, ननंद, नवरा आणि त्यांचे जवळचे लोक ह्या सर्वाना सांभाळायचं होत तेही त्रास सहन करून. स्वरा हे सर्व खरच करू शकणार होती का?? उत्तर माहिती नाही पण स्वरा सर्व सहन करायला तयार होती ह्यातच बरीच उत्तरे सामावलेली होती.
अंजाम चाहे जो हो
मोहब्बत हम कर लेंगे
तकलीफे आती रहेगी युही सदा
भला मोहब्बत करणा हम क्यू छोडे?
*********
दुपारचे ३ वाजले होते जेव्हा फ्लाइट दिल्लीला लँड झाली. अन्वयने स्वराला आधीच जायचा पत्ता दिला असल्याने तिने त्याला बोलावण्याचा त्रास दिला नव्हता. फ्लाइट लँड झाली आणि ती एअरपोर्टच्या बाहेर जाऊ लागली. हातात दोन बॅग असल्याने तिला उचलायला जड जात होतं. एक व्हील बॅग असल्याने ती सरकवत नेत होती पण दुसरी बॅग हातात न्यायची असल्याने तिला वजन उचलत नव्हतं तरीही ती कशीतरी नेत होती. ती समोर जातच होती की बाजूने एक हात आला आणि त्याने तिची बॅग स्वतःच्या हातात घेतली. दुसरीही बॅग त्याने तिच्या हातातून काढून स्वताच्या हातात घेतली आणि समोर चालू लागला. आतापर्यँत तिला बॅग उचलायचा त्रास होत होता पण आता त्याला बघताच तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा स्मित पसरले. अन्वयमध्ये काय जादू होती माहिती नाही पण त्याचा चेहरा बघितला की तिचा चेहरा आपोआप बोलू लागायचा. तो तिच्याकडे क्षणभरसुद्धा बघत नव्हता पण ती सतत त्याच्याकडे बघत होती एवढं प्रेम तिला त्याच्यावर आलं होतं. ते समोर जातच होते की अन्वय म्हणाला," बाबा-आई कसा झाला प्रवास? काही त्रास तर झाला नाही ना येताना?"
अन्वयचा आवाज येताच समोर चालणारे बाबा मागे वळत म्हणाले," अरे जावई बापू तुम्ही कुठून आलात? आम्हाला तर दिसलाच नाहीत. जादू वगैरे येते की काय तुम्हाला? क्षणात हजर झालात ना इथे म्हणून म्हटलं."
अन्वय हसतच उत्तरला," खूप वेळेपासून वाट बघतोय. तुम्ही समोर चालत होतात म्हणून लक्ष गेलं नाही. जादू वगैरे काही नाही हो. बस तुमच्या येण्याची आतुरतेने वाट बघत होतो म्हणून वेळेआधीच आलो होतो."
अन्वयच बोलणं झालं होतच की बाबा आता हसतच म्हणाले," काय सांगू जावई बापू प्रवास. पहिल्यांदा विमानात बसलो, वाटत होतं विमान पडत की काय? खूपच भीती वाटत होती. एक क्षण तर वाटलं मुलीच लग्न बघतो की नाही काय माहिती?"
त्यांच्या चेहऱ्यावर जरा गमतीशीर भाव होते आणि आई म्हणाल्या," तुमचं तर ठीक आहे हो! मला तर चक्करच मारायला लागली होती. मी जे डोळे बंद केले ते आता उघडलेत. नको बाबा हा विमानाचा प्रवास!! तुम्हीच करा हे सर्व मी जाईन माझ्या ट्रेनने. नुसती भीती विमान पडत की काय? जीव मुठीत घेऊन कसे आले माझं मलाच माहिती."
त्यांच्या शब्दाने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू परतल आणि अन्वय समोर जात म्हणाला," बाबा तुम्ही थोड्या वेळ इथे उभे राहा मी कार घेऊन येतो मग निघू लगेच."
अन्वयने बॅग्स तिथेच ठेवल्या आणि काही क्षणातच कार घेऊन परत आला. त्याने सर्वाना मध्ये बसायला लावले आणि सामान डिक्कीमध्ये ठेवू लागला तेव्हाच स्वरा त्याच्या बाजूने उभी राहत हळुवार स्वरात उत्तरली," सर मला वाटलं तुम्ही येणार नाहीत. ऑफिस असेल ना तुमचं. मग सर्व काम बाजूला ठेवून कशाला आलात बर. काम जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला माहिती आहे ना मला मग उगाच कशाला वेळ वाया घालविला?"
अन्वयने सर्व बॅग्स डिक्की मध्ये ठेवल्या आणि हळूच तिच्या नजरेला नजर देत उत्तरला," तुम्हाला खरच वाटत स्वरा मॅडम की मी तुम्हाला सोडून कामावर जाईन. काम महत्त्वाचं असेलही पण बायको किती महत्त्वाची आहे हे मनाला कस समजावणार बर? तुम्हाला बघता यावं म्हणून तर केव्हाचा इथे येऊन बसलोय. काम होत राहील पण होणाऱ्या बायकोला बघायची मज्जाच वेगळी. ती काही मी सोडणार नाही. कळलं?? कळलं नसेल तर दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सांगू शकतो."
आज अन्वय पहिल्यांदा तिच्या डोळ्यात बघून बोलत होता. एक क्षण सुद्धा त्याने नजर बाजूला केली नव्हती म्हणून स्वरा क्षणभर लाजलीच. तिला कधीच वाटलं नव्हतं की तो इतका रोमँटिक असेल. ती लाजतच होती की अन्वय उत्तरला," तुला कुणी सांगितलं का स्वरा की लाजल्यावर खूप गोड दिसतेस. चेहऱ्यावर अशी लाली पसरते की बस दुसरीकडे बघायची इच्छाच होत नाही. सतत तुझ्याकडेच बघत राहावस वाटत. जगाला क्षणभर विसरून जावस वाटत. इतकं गोड असू नये हो!!"
आज अन्वय पहिल्यांदा मन भरून तिची स्तुती करत होता आणि तिला लाजण्यापासून फुरसद मिळत नव्हती. तिच्या पोटात फुलपाखरू उडू लागले होते. ते एकमेकांना बघतच होते की मागून गाडीचा हॉर्न आला आणि अन्वय हसतच कार मध्ये बसला. स्वराही लाजत- लाजतच मध्ये बसली. फायनली कार सुरू झाली.
अन्वय अगदी हळूवारपणे कार चालवू लागला होता. त्याने स्वरा आरशातून त्याला दिसावी अशा प्रकारे आरसा सेट केला होता आणि अधून- मधून तो तिच्याकडे बघू लागला. तिलाही ते समजत होत म्हणून तिच्या चेहऱ्यावरचे लाजेचे भाव आज काही जात नव्हते. कारमध्ये वातावरण जरी शांत असलं तरीही दोघेही एकमेकांशी नजरेनेच बोलत होते. त्यांच हे अस वागणं आईने बघितलं आणि हळुवार आवाजात उत्तरल्या," जावई बापू लग्नाला फक्त काही दिवसच बाकी आहेत तेव्हा निवांत बघा तिला. ती तुमचीच असणार आहे. आता पूर्ण लक्ष गाडीवर द्या नाही तर हिच्या नादात आम्हाला हॉस्पिटलला पोहोचवणार. आम्हाला मुलीच लग्न बघायच आहे हो, सो काही दिवस वाट बघा. काय म्हणता पटतय का माझं बोलन?"
आईने गमतीला सुरुवात केली आणि स्वराचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तसा अन्वयदेखील शांतच होता पण आज स्वराला बघून त्याचा मूड जरा जास्तच रोमँटिक जाणवत होता आणि तो हसतच उत्तरला," आई ह्यात पण तुमचीच चूक आहे."
आई विचार करत उत्तरल्या," जावई बापू तुम्हाला अस वाटत नाही का की बिल तुम्ही माझ्यावर फाडत आहात. माझी चूक कशी ती कळू द्या बर मला."
अन्वय पुन्हा आरशात बघतच उत्तरला," आता इतक्या सुंदर मुलीला तुम्ही जन्म दिला तर आम्ही काय करणार ना? माझी नजरच हटत नाही तिच्यावरून. तुम्ही जन्मच दिला नसता तर आम्ही बघितलंच नसत. मग ही सर्वस्वी तुमचीच चूक नाही का?"
अन्वयचे बाबा मधातच हसत उत्तरले," हे बरोबर आहे जावई बापू! आमची स्वरा खूपच सुंदर आहे. तिच्याकडे कुणी बघितलं की नजर हटविणे अगदीच कठीण!! तेव्हा तुमचं बोलणं मला पटतय. चूक नाहीच तुमची."
अन्वय पुन्हा हसतच उत्तरला," तेच ना बाबा!! आता बायको इतकी सुंदर असल्यावर, इतक्या दिवसाने तिला बघायला मिळाल्यावर मग तिला बघत बसणार नाही का? माझी नजर सतत तिच्यावर जाते ह्यात माझी काय चूक? आता ह्या नजरेला कोण समजवणार? तिला तर स्वराची चाहूल लागली होती म्हणून तर घेऊन आली ना मला सकाळी सकाळी एअरपोर्टवर."
अन्वयच्या बोलण्याने कारमधील वातावरण हास्यमय झालं होतं. स्वरा तर नुसती लाजत होती आणि अन्वय तिला बघून कामातूनच गेला होता. कार मध्ये मस्ती सुरू होतीच की स्वराने आता क्षणात लाजेचे भाव दूर केले आणि रागावतच म्हणाली," अन्वय सरांच ठीक आहे ते करत असतात गंमत माझी!! पण आई-बाबा तुम्ही पण सामील झालात ह्यांना. इतक्या लवकर होणाऱ्या जावयाची बाजू घेतली आणि मला विसरले ना सर्व? सर्व मिळून माझीच खेचत आहात. धीस इज नॉट फेअर हा!!"
ती बोलली आणि सर्वांनी हसन क्षणात थांबवलं. अन्वयने क्षणभर तिच्या चेहऱ्यावर लक्ष दिले आणि हसतच म्हणाला," बापरे मुलीचा हा दरारा !! आई-बाबाच एवढे घाबरतात तर माझं काय होणार? मला तर एका कोपर्यातच बसून राहावं लागेल बहुतेक. वाचव रे देवा मला!!"
काही क्षण आईबाबा शांत झाले होते पण त्याच्या बोलण्याने पुन्हा हास्याचे फवारे उडाले. सर्व अगदी मोठ्या-मोठ्याने हसू लागले. ह्यावेळी स्वराही स्वतःला हसण्यापासून अडवू शकली नाही. सर्व स्वराची गंमत घेत होते की आई उत्तरल्या," जावई बापू नका हो माझ्या मुलीची गंमत करू!! किती निरागस आहे ही आणि तुम्ही लगेच उडवत आहात. नका देऊ हो तिला इतका त्रास!!"
आईच बोलणं होताच अन्वय पुन्हा हसत उत्तरला," आई त्याबद्दल काहीच वाद नाही की ती निरागस आहे पण लग्नानंतर मला ती एका कोपऱ्यात बसवून ठेवेल ह्यात मला शंका वाटत नाही. मॅडम म्हणतील तर बसायचं आणि म्हणतील तर उठायचं. हो ना स्वरा?? मी बरोबर बोलतोय ना??"
अन्वय हसतच होता की तिने त्याला पाठीमागून एक ठोसा लगावला आणि रुसत म्हणाली," मग कशाला करत आहात ना लग्न? शोधा एखादी जी तुमच्या ऑर्डर खाली सतत काम करत राहील. कशाला घातली लग्नाची मागणी. मी तर नव्हते आले माझ्याशी लग्न करा म्हणून. तुम्हीच एकाच दिवसात मागणी घालायला आलात आणि आता असे म्हणत आहात."
स्वराच्या चेहऱ्यावर रुसण्याचे भाव आले आणि अन्वय पुन्हा हसत म्हणाला," आई शोधल्या हो खूप मुली पण नजर तुमच्या मुलीवर येऊन थांबली ती थांबलीच. आता ही नजर दुसरीकडे कुठेच थांबणार नाही. कायमस्वरूपी बांधल्या गेलीय ही नजर तुमच्या मुलीच्या सुंदरतेवर. आता ह्यातून बाहेर निघन माझ्या आवाक्यात नाही. सांगा तुमच्या मुलीला की दुसरी बघणे कदापि शक्य नाही. टेढि है पर मेरी है."
अन्वयचा मूड आज काहीतरी वेगळाच होता, स्वराला आता हसू आवरेना. तिला काहिच क्षणात समजलं की आज त्याला जिंकन शक्य नाही म्हणून ती लाजत बाहेरच वातावरण बघत बसली. काही क्षण गेले, कारमध्ये हसण्याच वातावरण तसच होत आणि अन्वय म्हणाला," आई तुम्ही शॉपिंग वगैरे केली की नाही लग्नाची?"
आई जरा त्रासिक स्वरात उत्तरल्या," कुठे हो जावई बापू!! हेच सामान आणायला किती त्रास गेला मग पुन्हा ते सामान कुठे आणत बसायचं. आता आलो आहोत ना मग करू शॉपिंग. आहेत की अजून१०-१५ दिवस आमच्याकडे!!"
अन्वय ही सुरात सूर मिसळत म्हणाला," बर झालं नाही केली ती. मलाही तुमच्यासोबत करता येईल शॉपिंग. मिळूनच करू. तस पण तुमच्या नवीन घरात मला ज्या गोष्टी सुचल्या त्या सेट केल्या. आता बाकी काय लागत ते तुम्ही बघून घ्या. उद्या सायंकाळपासून आपण लागू शॉपिंगला."
अन्वय नकळत बोलून गेला आणि आईने विचारलं," का हो तुमच्या आई वगैरे नाही येणार का शॉपिंगला?"
अन्वयने ते वाक्य ऐकलं आणि शांतच बसला. त्याला काय उत्तर देऊ कळतच नव्हतं तेव्हाच स्वरा मध्ये पडत म्हणाली," अग आई ते मला म्हणाले की त्यांना मिळून करायची आहे शॉपिंग. माझ्या आवडीचे कपडे घ्यायचे आहेत त्यांना म्हणून म्हणाले ते. हो ना सर??"
अन्वयने कसेतरी सुरात सूर मिसळले. आता कारमधील हसण्याच वातावरण कुठेतरी नाहीस झालं होत. स्वराने त्याचा चेहरा बघितला त्यावर थोडं टेन्शन जाणवत पण तिला ह्या क्षणी काहीच बोलता येणार नव्हतं म्हणून ती शांतच राहिली.
सुमारे तासभर गेला होता जेव्हा अन्वयने गाडी थांबवली. अन्वयने सर्व बॅग्स काढल्या. आई-बाबांनी आपली बॅग घेतली आणि स्वरा आपली बॅग घेतच होती की अन्वयने पुन्हा तिची बॅग घेतली. ह्यावेळी स्वरा हसतच उत्तरली," सर तुमची स्वरा एवढीही कमजोर नाहीये. नेऊ शकते मी. काहीच तर बॅग्स आहेत ह्या! मला सहज नेता येईल."
अन्वय क्षणभर तिच्या नजरेला नजर देत म्हणाला," माझी स्वरा कमजोर नाहीये हे मला खूप आधीच माहीत आहे. तेव्हाच तर तिच्या प्रेमात पडलो. मी तर तुझी साथ निभावायला आलोय. आता प्रत्येक नात निभावन असो की सुख-दुःख वाटण सोबतच करायचं आहे. मग सुरुवात आताच केली तर काय बिघडत? बरोबर बोलतोय ना स्वरा?"
स्वरासमोर त्याने बोलायला काहीच ठेवलं नाही आणि तिने हसतच बॅग घेतली. दोघेही एकमेकांकडे बघत चालले होते. आज दोघांच्याही नजरेत प्रेम होतं. ते समोर जात होते. बॅग उचलताना त्यांच्या बोटांचा स्पर्श एकमेकांना होत होता आणि ते मोहरून उठत होते. स्वरा आज हे खूप दिवसाने एन्जॉय करत होती. अन्वय सोबत असला की असच काहीतरी व्हायचं. आजपर्यंत स्वरा कितीतरी विचार करत होती पण तो साथ द्यायला आला आणि ती जगाच टेन्शन, दुःख सर्व विसरून गेली आणि समोर उभे राहिले ते तिचे काही सुंदर स्वप्न. जे ती त्याच्या डोळ्यात बघत होती. तिच्या भविष्याचे स्वप्न जे कदाचित खूप सुंदर असणार होते. फक्त सुंदर नाही तर अविस्मरणीय असणार होते.
अन्वयने सर्वाना चौथ्या माळ्यावर आणले आणि त्याच्याकडे असलेल्या चावीने दार उघडले. अन्वयने दार उघडताच सर्व सामान घेऊन मध्ये आले. स्वराने बॅग मध्येच हॉल मध्ये ठेवली आणि घर बघू लागली. घर सर्वच बाबतीत सुसज्ज जाणवत होतं. अन्वय सोफ्यावर निवांत बसला होता. स्वरा काहीच क्षणात पूर्ण घर बघून आली आणि आनंदातच उत्तरली," अन्वय सर काहीही म्हणा आई-बाबांची रूम मस्त शोधली तुम्ही. अगदी सुसज्ज रूम आहे. कसलीही कमतरता नाही पण ना तुमचा चॉइस काही खास नाही! त्याबाबतीत जरा कमतरता आहेच."
आई स्वरावर ओरडतच म्हणाल्या," स्वरा हे काय बोलते आहेस? जावई बापूशी अस बोलतात का? मूर्ख कुठली!!"
स्वरा चिडण्यापेक्षा हसतच उत्तरली," आहे तर आहे त्यात काय? कारण आहे त्याला उगाच नाही म्हणत आहे. सरांनी सामान मस्त आणलय पण कोणत्या वस्तू कुठे लावायच्या आहेत ते नाही कळलं त्यांना!! हरकत नाही आता मी घेते करायला."
तिच्या उत्तराने आई जरा शांत झाल्या आणि हसतच म्हणाल्या," आताच घेणार आहेस? एकटीने झेपेल का तुला हे सर्व? निवांत घे मग सर्वच मिळून करू."
आई बोलल्याच होत्या की स्वरा हसतच उत्तरली," मी एकटी कुठे आहे. सर आहेत ना! आता आयुष्यभर साथ निभावायची आहे तर मग आताच सुरुवात करायला नको का? काय हो बरोबर बोलतेय ना मी ?? सुरुवात इथूनच करायची ना?"
स्वराने त्याचा पॉईंट त्याच्यावरच मारला आणि अन्वय हसतच उत्तरला," हो बाबा करू आपण. आई-बाबा तुम्ही बेडरूममध्ये जाऊन आराम करा. आम्ही सर्व नीट करतो. आम्ही असताना कसलं टेन्शन आणि बघा आधीच म्हणालो होतो की मॅडम म्हणतील तसच करावं लागेल. पहिल्याच दिवशी सिद्ध झालं ते देखील. पटलं मी का म्हणत होतो ते."
अन्वयनेही तिचा पॉईंट तिच्यावर मारला. त्याच उत्तर ऐकून स्वरा गालातल्या गालात हसत होती तीच स्थिती आई-बाबांची पण होती.
आईला जावयाकडून काम करून घेणं आवडलं नव्हतं पण अन्वयच्या शब्दांसमोर त्यांचं काहीच चाललं नाही. आई-बाबा जाताच स्वराने ओढणी कमरेला बांधून घेतली, केस बांधले आणि क्षणात कामाला लागली. अन्वय तिच्याकडे बघतच होता की स्वरा म्हणाली," काय हो एवढ्यातच थकलात?"
अन्वय तिच्या जवळ येत कानात म्हणाला," मॅडम थकलो नाहीये. आताच कल्पना करतोय तुम्ही माझ्या आयुष्यात आल्यानंतर ते दिवस कसे असतील. कदाचित मी तुझ्याकडे असाच सतत बघत राहणार आहे."
अन्वय अगदी तिच्याजवळ आला होता. स्वरा लाजतच म्हणाली," आज तुम्हाला काय झालंय सर? खूप रोमँटिक झाला आहात!! काही खास कारण?"
अन्वयही हसतच उत्तरला," तुला बघितलं की माझं असच होत. काय करू बर?? मेरा दिलं मेरे बस मे रेहता नही आणि चॉइसच म्हणशील तर माझी खूप सुंदर आहे तेव्हाच तर तू माझ्या आयुष्यात आहेस. हा आता घराचं डिपार्टमेंट तू घे हाती आणि सजव माझं आयुष्य नव्याने. त्याबद्दल मी काही बोलणार नाही पण माझी चॉइस बेस्ट आहे कुणालाही विचार. जगात अशी चॉइस कुणाचीही नाही."
स्वराने क्षणभर त्याच्या नजरेत बघितले. त्याच्या नजरेत आज काहीतरी वेगळेपण होत. ती पूर्ण वेळ त्याच्या डोळ्यात बघायची हिम्मतच करू शकली नाही. इतकं प्रेम कदाचित तिने विचारही केला नव्हता. ती लाजतच त्याच्यापासून दूर जात म्हणाली," काहीही असत तुमच!! सर इतकं पण लाजवू नका ना. आज तरी नको.. बघा ना मला स्वतःवरच कंट्रोल राहीला नाही. आज सोडा ना प्लिज!! प्लिज कामात लक्ष देऊया का??"
अन्वयने तिच्यावर प्रेमळ नजर टाकली आणि हसतच कामाला लागला. आज स्वरासोबत अन्वयला काम करण्यातही बरीच मज्जा येत होती. त्याची एक क्षण नजर तिच्यावरून हटली नव्हती. स्वराला हा अन्वय ह्याआधी कधीच दिसला नव्हता आणि आता जेव्हा बघत होती तेव्हा तिला तिचच वागणं सुधरत नव्हतं. ती त्याला काम तर सांगत होती पण तो जवळ आला की स्वतःच दूर पळायची. आज वेगळीच गंमत त्याच्यात सुरू होती आणि ह्या काही क्षणातच स्वरा सुखाऊन गेली होती. ते आज काम तर करत होते पण त्याहीपेक्षा नजरे-नजरेतली ती भाषा बोलत होती. ते प्रेम व्यक्त करण्याचा अनुभव वेगळा होता पण तितकाच सुखद होता हे पहिल्याच क्षणी तिला जाणवू लागल आणि स्वरा त्याच्या प्रेमात धुंद न्हाहू लागले.
कितीतरी वेळ निघून गेला होता. आज स्वराने दिवसभर रूम नीट केली होती. सोफ्यापासून तर सर्व वस्तू नीट जाग्यावर सजवून ठेवल्या होत्या. ती स्वतःच काम करत नव्हती तर तिने अन्वयलाही थकवून सोडले होते. आज पहिलाच दिवस असल्याने जेवायला कुणीच काही बनवलं नव्हतं म्हणून अन्वय स्वतःच जेवायचं बाहेरून घेऊन आला होता. आज अन्वयसोबत पहिलाच दिवस असा निवांत तिने घालवला होता आणि तिच्या चेहऱ्यावर हसू परतल होत तेव्हा पुढे आयुष्य किती सुंदर असणार ह्याची तिला प्रचिती आली. अन्वयच हे प्रेम बघून ती आज भारावून गेली होती. हे तेच प्रेम होतं ज्यासाठी ती कितीतरी आसुसली होती आणि जेव्हा तिला मिळालं तेव्हा काय करू काय नको झालं होतं. तिच्या प्रवासाचा पहिलाच दिवस इतका सुंदर असेल ह्याचा विचार तिने स्वप्नात सुद्धा केला नव्हता पण जेव्हा तिला हे जगायला मिळाल तिने त्यातला एक क्षण सुद्धा मिस केला नव्हता. ती आली होती आयुष्यभर अन्वयच प्रेम अनुभवायला आणि गंमत अशी की पहिल्याच क्षणी ती प्रेमाची व्याख्या विसरली तर इकडे प्रेमाची नवीन व्याख्या तयार करायला अन्वय तयार झाला होता.
आज अन्वय सोबत असताना तिचा पूर्ण दिवस कसा गेला तिलाच कळले नाही. अन्वय फ्रेश होत बाहेर जाऊ लागला. स्वराही त्याच्या मागे मागे धावतच कार जवळ पोहोचली. तो कार सुरुच करणार होता की ती त्याच्या कार समोर जाऊन उभी राहिली. तिला बघताच तो कारच्या बाहेर येऊन उभा राहिला आणि ती जरा उदास स्वरात उत्तरली," सर आज इथेच थांबलात तर नाही जमणार का?"
अन्वय चेहऱ्यावर मिश्किल हसू आणत म्हणाला," माझीही तीच इच्छा आहे पण स्वरा घरच वातावरण काही ठीक नाही. जर आईला कळलं की मी आधिच तुझ्या घरी राहायला लागलो आहे तर ती वेगवेगळे अर्थ काढेल आणि तुझ्यावर आणखी कमेंट झालेल्या मला अजिबात आवडणार नाही. सो मला जावं लागेल. तस पण मी कुठे जातोय. स्वतःच्या हृदयात शोध मी तुझ्या जवळच आहे. सोबत काही लागलं तर मला सरळ कॉल कर. फक्त अर्ध्या तासावर आहे माझं घर! मी लगेच हजर होईन."
अन्वय बोलून गेला आणि स्वरा उदास होत उत्तरली," माझ्यामुळे तुमचं आणि आईच नात खराब झालं ना? मला वाईट वाटत सर खुप विचार करून. रात्री बऱ्याच वेळ झोप येत नाही हा विचार करून करून. होईल ना हो सर्व नीट?"
अन्वय हसतच उत्तरला," काहीही असत तुझं!! आई आहे ग ती. आज रागावणार उद्या जवळही घेईल. त्यात काय एवढं. ती भलाई दूर करेल मला पण मी जाईल का तिच्यापासून दूर. तू काळजी नको करू. सर्व नीट होईल. मला विश्वास आहे तुझ्यावर तू करशील सर्व नीट. काळजी घे स्वतःची आणि लागलं काही तर सांग. आता मी जाऊ?"
स्वरा हसतच उत्तरली," हो या..आज थकला असणार ना?? उद्यापासून लग्नाची काम आहेत सो आणखी धावपळ होईल. जा आणि निवांत झोपा. बाय बाय सर!!"
ती हसत बोलून गेली आणि अन्वयने इकडे- तिकडे बघतच म्हटले," मिस यु स्वरा!! लव्ह यु सो मच!!"
तो बोलून पटकन गाडीमध्ये बसला आणि क्षणात पसार झाला. ती आताही हसतच त्याला बघत होती. अन्वय म्हणजे तीच उत्तर. मग परिस्थिती काहीही असो की वेळ कोणतीही असो. त्याने जर एखाद नात निभवायला घेतलं तर मग तो कुणाचाही विरोध सहन करून ते नात निभावेल. म्हणून तो खास होता. आज पहिल्याच दिवशी तिला त्याच्या प्रेमाचा अनुभव आला आणि अन्वयवर प्रेम करून, त्याच्याशी लग्न करून आपण आनंदाकडे एक पाऊल टाकलं आहे ह्याची तिला खात्री झाली. त्रास तर होताच पण अन्वय सोबत असताना तो तिला नक्कीच जाणवणार नव्हता ह्याचीही शाश्वतीही होती. तो आज गेला पण तिला उद्याची नवीन स्वप्न दाखवून. तिला पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात पाडून. अस प्रेम जे ते तिच्या कल्पनेपलीकडील असणार होत.
तेरी बन गयी हु मै
तेरा ही ये जहा है
कैसे बताये तुम्हे इस पल
तुम नही तो आशिकी बेजुबान है