Bhagy Dile tu Mala - 71 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ७१

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ७१

बाट लिया है धर्मो को
क्या लोगो को भी बाटोगे
मोहब्बत गुनाहँ है अगर
तो बोलो उसकी सजा क्या दोगे ??

आज तीन लोक तीन मार्गाने प्रवास करत होते पण तिघांच्याही डोक्यात एकच प्रश्न होता. अन्वय कार चालवत होता. सकाळी आईच्या शब्दाने त्याच्या मनात जे घट्ट स्थान निर्माण केलं होतं ते तो अजूनही विसरू शकला नव्हता आणि त्याच्या मनात विचार आले," अन्वय आजपर्यंत स्वराचा प्रवास तू कधीच बघितला नाहीस पण आता तुला तो बघायचा आहे. तुझ्यासमोरच लोक तिला बोलत असताना सहन करू शकशील सर्व? आजपर्यंत लोक बोलत होते तेव्हा तू तिची बाजू सहज घेऊ शकला आहेस पण तुझे घरचेच तिला बोलतील तेव्हा त्यांना काय उत्तर देशील? नक्की कुणाची बाजू घेशील? स्वराला तू आनंद देण्यासाठी स्वतःच बनवलं आहेस पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येतेय का की जर सर्व काही सुरळीत झालं नाही तर तू स्वतःच तिला ह्या दुःखात कायमच बंदिस्त करून ठेवशील? दुःख इतकं जे तिला ह्याआधी कधीच मिळाल नाही पण पुढे रोज रोज मिळेल.मग काय दिलंस तू तिला? आनंद क्षणभर देशीलही पण इतर वेळ तिला कायम दुखच सहन करायचं आहे. मग कसला आनंद देतो आहेस तू? सेम राज तर आहेस तू. तो तिला दुःखात टाकून गेला तर तू तिला स्वता दुःखात ओढून आणलंस? ती आतापर्यन्त खुश होती पण आता तिला फक्त दुखच सहन करावे लागणार आहेत मग न्याय करशील का स्वराशी? नाही करू शकलास तर काय? तुझ्यामुळे तिच्या आयुष्यात ज्या यातना रोज येतील त्या कशा दूर करशील? अन्वय आनंद देण्याच्या नादात तिच अस्तित्त्व तर हिरावून घेत नाही आहेस ना तू?"

अन्वयला आज हजारो प्रश्न पडले होते. त्यांचं उत्तर त्याच्याकडेच नव्हतं आणि आज अचानक त्याच्या डोळ्यात पाणी आलं पण ते अश्रू त्याने पुसले नाही. ते तसेच वाहत होते कारण आधी अधिकार नसताना त्याने तिच्यासाठी खूप काही केलं होतं पण आता अधिकार असताना देखील त्याचे हात बांधले जाणार होते त्यामुळे तो आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत होता. ती हतबलता होती त्याची जो कुणालाच सांगू शकत नव्हता. ना स्वरा, ना घरच्यांना. त्याला एकीकडे तिला प्रेम द्यायचं होत तर दुसरीकडे घरच्यांनाही जोडून ठेवायचं होत. कस मॅनेज करणार होता तो?

दुसरीकडे होती ती पूजा. पूजा घराकडे जायला निघाली होती. ती रिक्षात एकटीच बसली होती आणि स्वराचे शब्द ऐकून तिच्याही डोळ्यात पाणी आलं. तिने स्वराला तर काहीच म्हटलं नाही पण स्वराचे शब्द ऐकून तिला किती त्रास झाला होता ते तिलाच माहिती. आज कितीतरी वेळ तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होत तरीही तिने ते पुसल नाही आणि भरलेल्या डोळ्याने स्वतःच स्वतःच्या मनाशी बोलू लागली," देवा काय चूक आहे रे स्वराची? मान्य की ती सहनशील आहे पण त्या सहनशीलतेला कुठेतरी अंत असेलच ना? का वरच्या वर परीक्षा घेतो आहेस तिची. मला माहित आहे देवा की ती वरून मजबूत दाखवते आहे पण तीही मनुष्यच आहे तेव्हा तिला नक्कीच त्रास होत असणार. आमच्या आयुष्यात चार क्षण दुःख आली तरी किती त्रास होतो आम्हाला पण तिला तर तू पूर्ण आयुष्य दुखच देतो आहेस..कधी थांबवणार आहेस हे सर्व? इतक्या लहान वयात आणखी तिने किती मोठ व्हायचं? देवा मला माहित आहे की ती आज भावनिक होऊन बोलत नव्हती. ती जर खरच हरली ना तर शेवटच्या क्षणी सुद्धा स्वतःला मुक्त करायला मागे- पुढे बघणार नाही. जर अस झालं ना तर ह्याला जबाबदार तूच असशील हे कायम लक्षात ठेव. तो दिवस शेवटचा असेल त्यानंतर मी तुझं कधीच तोंड बघणार नाही कारण तू माझ्या जिवलग मैत्रिणीला माझ्यापासून तोडल असणार. लक्षात ठेव हे माझे शब्द. हा तुझ्या मुलीचा संकल्प आहे तुझ्या दुसऱ्या मुलीसाठी. देवा तुला तिला ह्या संघर्षात जिंकवाव लागेलच नाही तर एकाच वेळी तू दोन मुलींचा विश्वास गमावून बसशील. देवा नको हरू देऊ रे तिला. तिला नाही गमवायच मला. खूप खुप आनंद दे तिला आयुष्यात. बस एवढी इच्छा पूर्ण कर."

पूजा मनातल्या मनात बोलत होती पण तिचेही अश्रू काही थांबायचं नाव घेत नव्हते. तिला ह्याक्षणी स्वरासोबत रहायच होत. तिला गच्च मिठी मारायची होती आणि सांगायचं होत की मी सोबत आहे तुझ्या. तुझ्या दुःखात सहभागी व्हायचं आहे आणि तुझ्या सानिध्यात राहून तुझं थोडं का होईना दुःख कमी करायचं आहे पण इच्छा असूनही ती पूर्ण शकत नव्हती म्हणूनच कदाचित तिच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. ते सतत वाहत होते तिचे शब्द ऐकून, तिचा संघर्ष बघून.

तिसरी कडे होती स्वरा. तो ट्रेनचा हॉर्न आणि पटापट धावणारी ट्रेन. मागे पडत चाललेली झाडे, समुद्र खाडी आणि तिच्या मनात सुरू असलेला गोंधळ," अन्वय सर आज हा विचार माझ्या मनात पुन्हा डोकावू पाहतो आहे तर मी तुम्हाला भित्री वाटत असेल ना? तर अस नाही हो. मी नाहीये भित्री. जोपर्यंत माझ्यात हिम्मत आहे तोपर्यंत मी प्रयत्न करेन पण खरंच नाही जिंकू शकले तर स्वतःला मुक्त करेन. माहिती आहे तुम्हाला त्रास होईल. तुम्ही मला विसरणार नाही पण अटलिस्ट माझ्या जाण्याने तुम्ही सर्वांच्या जवळ येणार तेच खूप असेल मला. तुम्हाला माझे हे विचार समजले तर स्वार्थी वाटेल ना मी? नाहीये हो मी स्वार्थी!! तुम्हीच एकदा म्हणाला होतात ना की स्वतःच्या आनंदासाठी स्वार्थी हो मग इथे तर माझ्या शांततेचा प्रश्न आहे. त्यासाठी मला स्वार्थी होणं भाग पडेल. जीवनाच अंतिम ध्येय शांतीच तर आहे. तेव्हा त्यासाठी काहीही. अन्वय सर हा शेवटचा पर्याय आहे हा!! तोपर्यंत आपण मिळुन लढू..जिंकलो तर अमर प्रेम असेल आणि हरलो तर हा कुरूप चेहरा आणि हे नाव कायमच निघून जाईल सर्वांच्या आयुष्यातून. चालेल ना तुम्हाला? फक्त एकच विनंती आहे, मी गेले तर मला वाईट समजू नका. सर्व प्रयत्न करूनही जर मार्ग मिळत नसेल तर कुठेतरी थांबाव लागतच कदाचित माझ्या आयुष्याचा तोच शेवट असेल. माझ्यावर ओरडा पण मला चुकीच समजू नका कारण मी खऱ्या अर्थाने तिथे हरेल आणि जगातून शांती मिळूनही मी अशांतच राहील. नाही हरवणार ना तुम्ही आपल्या स्वराला??"

अन्वय, पूजाच्या डोळ्यात अश्रू होते पण स्वराच्या मात्र क्षणभर सुद्धा अश्रू आले नाही. ती आताही हसतच होती जणू तिने दोन्हीही परिणाम स्वीकारले होते पण त्याआधी तिला जगायच होते आपल्या जिवलगा सोबत काही सुंदर क्षण म्हणून ती त्याच्याशी लग्न करायला तयार झाली होती अन्यथा ती कुणासाठीच झुकली नसती. स्वरा झुकली फक्त प्रेमासाठी. कसा प्रवास होता ना हा की ज्या प्रेमाचा विचार करून तिच्या अंगावर काटे येत होते, अंग थरथरत होत, आता तीच मुलगी त्याच प्रेमासाठी खडतर रस्ते पार करायला तयार झाली होती आणि गंमत अशी की लोक कधी बदलतील का हे तिलाही माहिती नव्हत म्हणजेच काय तर आपली संपूर्ण मेहनत केल्यावरही यशाची प्राप्ती केवळ दुसऱ्यावर अवलंबून राहणार होती म्हणून स्वरा हसत होती आणि तिने दुखाना जणू आव्हान केलं होत की मी येतेय तुमच्याशी युद्ध करायला. कदाचित शेवटच...एक तर मी राहीन नाही तर मग ....

स्वराच्या ह्या संघर्षाला नक्की नाव काय द्यावे??

अल्फाज गुम हो जाते है अक्सर
तेरे बारे मे लिखते-लिखते
तुम सच मे किस्सा हो इस दुनिया का
या तेरा कोई अपणा और धरम है...

**********

लग्नाचा दिवस हळूहळू जवळ येऊ लागला होता. अन्वयनेही तयारी करायला घेतली होती. त्याच्या लग्नात त्याच्याच घरचे येतील की नाही ह्याबद्दल त्याला शंका होती. त्याला त्याच वाईट वाटत होतं पण त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. जरी स्वरा आपल्या पद्धतीने जगाशीे संघर्ष करत होती तर इकडे अन्वय आपल्या पद्धतीने घरच्यांशी संघर्ष करत होता. दोघांनाही त्या नात्याचा अंत काय असेल माहिती नव्हत पण दोघेही झटत होते एकमेकांच्या प्रेमासाठी. प्रेमाला दूषण लावणारे हजार मिळतील पण प्रेम निभावणारे कसेही निभावतात ह्याचच उदाहरण म्हणजे स्वरा-अन्वय. दिवस जसजसे जाऊ लागले अन्वय तसतसा अधिकच बिजी झाला. त्याला स्वरा येण्यापूर्वीच सर्व सेट करून ठेवायचं होत मग ती जॉब असो की घर. तिचे आईबाबाही दिल्लीला राहायला येत असल्याने त्याने फ्लॅटमध्ये सर्व सामान भरायला घेतले होते. फ्लॅटची पेंटिंग करून घेतली होती, फर्निचर बसवून घेतले होते, टीव्ही पासून सर्व गोष्टी त्याने मॅनेज करायला सुरुवात केली होती. तो दिवसभर ऑफिसला असायचा आणि रात्री तिच्या घराची सर्व कामे बघायचा त्यामुळे तो घरी फार उशिरा जायचा. एक तर आई त्याच्यावर आधीच रागावली होती पण जेव्हा तिला त्याला उशीर का होतो हे कळलं तेव्हा तिचा त्यांच्यावरचा राग आणखीच वाढला होता. अन्वय एक नात जोडण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होता पण त्याच नादात दुसर नात कमजोर होऊ लागलं होतं. अन्वय-आई आणखीच दुरावू लागलं होते आणि नकळत का होईना दोघातला संवाददेखील देखील संपू लागला होता. त्यांचंही नात आता परीक्षेच्या वळणावर येऊन थांबल होत. इथे स्वरा एकटीच परीक्षा देत नव्हती तर अन्वय सुद्धा प्रत्येक पावली वेगळीच परीक्षा देत होता. त्याच्या जीवलग व्यक्तीपासून दूर होण्याचा त्रास त्याला सेकंद- सेकंद जाणवत होता पण त्यानेही ते अश्रू जणू डोळ्यात खोलवर आत जपून ठेवले. त्याला आता कुणासाठी कमजोर पडायचं नव्हतं.तो कमजोर पडला असता तर कदाचित संघर्ष करायच्या आधीच स्वरा उरली असती. स्वरा हरने म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्याची हार म्हणून त्याने ते अश्रू आता कायमस्वरूपी मनात दडवून ठेवले. त्यांना आता बाहेर येण्याची मुभा नव्हती.

इकडे मुंबईमध्ये स्वराचा रिटर्न काउन्टडाउन सुरू झाला होता. तिला आता दिल्लीला जायचं असल्याने ती ऑफिसमधले सर्व काम लवकरात लवकर आटोपत होती. ऑफिसला रोज ती लवकर यायची आणि उशिरा पर्यंत थांबायची. घरीही जायला तिला फार उशीर होत असे पण घरी आई असल्यामुळे तिला आता घरच्या कामाची चिंता राहिली नव्हती म्हणून ती आपलं पूर्ण लक्ष ऑफिसमध्ये घालू शकत होती. हे काही दिवस स्वरा केवळ यंत्रासारख काम करत होती. ऑफिसच वातावरणही पूर्णता बदलल होत. जी दीपिका सतत तिच्याशी बोलत बसायची तिने आता बोलणं सोडून दिलं होतं त्यामुळे ती एकटीच पडली होती. वरवर पाहता तिच्याकडे सर्वच होत पण प्रत्यक्षात स्वरा अपूर्णच होती. हा काही दिवसाचा प्रवास स्वराच्या आता जीवावर आला होता पण ती कुठलीच गोष्ट अपूर्ण सोडत नसे म्हणून तिने हाही प्रवास पूर्ण केला. आपल्याच लोकांना मागे सोडून जाण्याचा प्रवास होता तो. एका नवीन प्रवासासाठी तिची काही नाती नकळत दुखावली जात आहेत हे ती स्वतःला कायमच आठवण करून देत राहिली पण ती सर्व काही नॉर्मल करू शकत नव्हती म्हणून स्वतःला दोष देता देता तिने हा प्रवास देखील पार केलाच. पाहता पाहता १५ दिवस कसे गेले तीच तिलाही कळलं नाही.

आज स्वराचा ऑफिसमधला शेवटचा दिवस होता. स्वराने आपलं सर्व सामान आधीच एका बॉक्समध्ये भरलं होत. स्वराचा आज ऑफिसमध्ये शेवटचा दिवस असल्याने तिला सर्व स्पेशल ट्रीटमेंट देत होते. एवढंच काय ती जात असताना तिला सर्वांनी फेअरवेल सुद्धा दिला होता. ती आज काम तर करत होती पण तिला हे ऑफिस सोडून जाताना भरून आलं होतं. कारण हे तेच ऑफिस होत ज्यांनी दिला तीच टॅलेंट दाखवायची संधी दिली. हे तेच ऑफिस होत जिथे स्वरा रडली होती, हसली होती. हे तेच ऑफिस होत जिथे तिची अन्वयशी भेट झाली होती. काही सुंदर क्षण तिने त्याच्यासोबत इथेच घालवले होते. दीपिका व इतर कलीग सोबत सर्वात सुंदर नाती इथेच विणल्या गेली होती म्हणून हे ऑफिस तिच्यासाठी खरच खूप खास होत. आज पूर्ण दिवस स्वराची नजर त्या ऑफिसवर फिरत होती आणि तिचे डोळे पाणावले. हे ऑफिस नव्हतं तर तीच दुसर घर होत आणि घराला सोडून जाताना किती यातना होतात ह्याचा अनुभव ती आज प्रत्येक सेकंद घेत होती. आपल्याच काही खास लोकांना सोडून जाणे तिला आवडणार नव्हते पण दुसऱ्या खास लोकांसाठी ती इतर काही खास लोकांना सोडून जात होती. तरीही त्यांच्या आठवणी तिने आपल्या मनाच्या एक कोपऱ्यात घट्ट बंद केल्या. अशा आठवणी ज्या तिला आता पुढच्या प्रवासात हसविण्याचं काम करत होत्या नाही तर नवीन आयुष्य स्वराला नक्की काय देणार होत हे तीच तिलाच माहिती नव्हतं.

सायंकाळचे जवळपास साडे चार वाजले होते. स्वरा काम करतच होती की तिला जाणवलं अमर काका सर्वाना पेढे वाटत आहे. तिला नक्की त्यांचं काय सुरू आहे कळत नव्हतं. ते सर्वाना पेढे वाटत होते की जयेशने त्यांचा हात पकडत विचारले," काका, आज पेढे ते कशासाठी? काही खास आहे का?"

काका जरा मोठ्यानेच ओरडत उत्तरले," हो खूप खास बातमी आहे! मी माझ्या मुलीला वचन दिल होत की तिला जर योग्य जोडीदार मिळाला तर सर्वाना पेढे वाटेन आणि नशिबाने तो दिवस आला. तीच फक्त स्वप्न पूर्ण झालं नाही तर तीच आयुष्य आता आनंदाने न्हाहून निघणार आहे. तोंड गोड करा जयेश सर. माझ्या मुलीच लग्न आहे."

काका आनंद साजरा करतच होते की तेवढ्यात दीपकने विचारले," पण मृन्मयी तर शिकत आहे ना? मग एवढ्या लवकर लग्न?? काही काय गंमत करत आहात काका?"

काका त्यालाही पेढा देत उत्तरले," मला एकच मुलगी नाहीये दीपक सर. माझ्या दुसऱ्या मुलीच लग्न आहे. स्वराच, तेही अन्वय सरांसोबत. आज मला खूप आनंद होतोय हे बघून की तिला कुणीतरी उत्तम जोडीदार मिळाला आहे जो तिच्या चेहऱ्यावर नाही तर मनावर प्रेम करतो. ज्याने संपूर्ण जगाशी लढून तिचा स्वीकार केला आहे. मी आज जगातला सर्वात खुश व्यक्ती आहे दिपक सर. तुम्हीदेखील माझ्या आनंदात सामील व्हा. घ्या पेढा."

काका बोलतच होते की कार्तिक केबिनच्या बाहेर येत म्हणाला," सही कहा काका आपणे! मैने स्वरासे पुछा था की ऐसा चेहरा कैसे हुवा? तब उसने कुछ बताया नही. लेकिन कुछ दिन पेहले उसने शादी की बात बतायी तो मैने पुरी जाणकारी निकाली. हम तो यहा सिर्फ काम करणे के लिये आते है पर स्वरा आयी थि खुद की पहचान धुंडने. हमारेही किसीं की गलती की वजह से वो कैद हो गयी. ये बडी शरम की बात है की ये सब हमारे ऑफिस मे हुवा और हमने कुछ किया भी नही. लेकिन वक्त जाते जाते सब बदल गया. हमारेही किसीं अपणेने स्वरा को आझाद कर दिया. उसे जिने की सिर्फ राह नही दिखायी बलकी उसको अपनी जिंदगी बना ली. उसने सिर्फ उसे जिना कैसे बताया नही बलकी उसका हात पकडकर उसके हर पल मे साथ निभा रहा है. इस ऑफिससे शुरु हुवा एक दर्दभरा किस्सा आज शादी जैसे पवित्र बंधन मे बंधने जा राहा है. हम खुशनसीब है की हम कुछ दिनही सही लेकीन इनकी जिंदगी का हिस्सा है. इस कहाणी को मुझे जबभी किसीं और को सुनाने का मौका मिलेगा तो मै जरूर कहुंगा के प्यार ऐसें करो, संघर्ष ऐसें करो. जिस्म, चेहरे से प्यार करणे वाले मिल जायेंगे हजार पर किसीं के मन से, किसीं के संघर्ष से प्यार करो. स्वरा-अन्वय के प्यार के लिये मेरे शब्द कम पड जायेंगे. क्या प्यार है यार तुम्हारा? किस्से कहाणीयो के बाद भी ऐसा प्यार मिलता है सच मे मैने आज जाना है. मै आज खुशभी हु और दुःखी भी. खुश हु की तुम एक नयी शुरुवात करणे जा रही हो पर मुझे इस बात का दुःख है के अब स्वरा यहा नजर नाही आयेगी पर सच बोलू तो हमे बहोत खुश होणा चाहीये की उसको एक नई राह मिली है. गाईज प्लिज स्टॅण्डअप अँड क्लॅप हॅन्ड फॉर द ब्रेव्ह गर्ल, द ऑनेस्ट एम्प्लॉयी , द हार्डवर्कर मीस स्वरा मोहिते!! अँड मेनी मेनी कॉंग्रेचुलेशन फॉर युअर मॅरेज. गाईज प्लिज क्लॅप्स लाऊडली!!"

कार्तिकचा आवाज येताच सर्व उठून उभे राहिले आणि टाळ्यांचा आवाज क्षणात ऑफिसमध्ये पसरला. कार्तिकने पुढच्याच क्षणी तीच बुके देऊन स्वागत केलं आणि हसत म्हणाला," स्वरा आज आप जलदी जा सकते हो. इस ऑफिस को आपणे जो दिया है वो काबिल ए तारीफ है. इस ऑफिसका हर एक आदमी आपको जरूर याद करेगा. आपणे इस ऑफिस को सिर्फ मेहनत से सिंचा नही तो इसे प्यार करणा सीखाया है, इंसानियत सिखाई है. आपका ईस्तेकबाल कैसे करे पता नही बस आपकी जिंदगी खुशीयो से भर जाये येही दुवा करेंगे. बहोत बहोत बधाईया स्वरा शादी और अपणे ब्राइट फ्युचरके लिये."

कार्तिकने तिच्याशी येऊन हात मिळविला आणि भावी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या. सेम ऑफिसमधला प्रत्येक व्यक्ती तिला शुभेच्छा देऊन गेला. आता जवळपास सर्वांनी शुभेच्छा दिल्या होत्या. स्वराला त्यांचं प्रेम बघून भरून आलं होतं. तिचा पाय ऑफिसमधून निघत नव्हता पण थोड्या वेळ ती इथे थांबली असती तर तिला बाहेर पडणे शक्य नव्हते म्हणून तिने इच्छा नसतानाही बाहेर जायचा निर्णय घेतला. स्वराने सामान आधीच पॅकिंग करून ठेवल होत त्यामुळे तिने आपल्या वस्तू बॅग मध्ये भरल्या आणि काकांना नमस्कार करत म्हणाली," काका आशीर्वाद द्या मला की मी सर्व काही सांभाळू शकेन. माझ्या लग्नाला येऊन माझा आनंद द्विगुणित करा."

काका तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाले," बाळा माझे आशीर्वाद कायम तुझ्यासोबत आहेत. मला माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे की ती पुढचाही प्रवास सहज पार करेल. तू आजपर्यंत सर्व सहन केलंस तेव्हा हे काहीच नसेल तुझ्यासाठी. मला नाही जमनार बाळा यायला पण मृन्मयीला बोलावून घे. तिच्या रूपाने मीच सोबत आहे अस समज. जा बाळा सुंदर आयुष्य निर्माण कर. भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा स्वरा!!"

काकांचे आशीर्वाद घेताच तिने बाजूला पडलेला बॉक्स उचलला आणि बाहेर जाऊ लागली. तिला सर्व हात हलवून बाय बाय म्हणत होते फक्त दीपिकाला सोडून. तिला त्याच वाईट वाटत होतं पण आता तिला समजावनेही कठीण होते. स्वरा दाराच्या बाहेर पडली आणि सर्व आपापल्या कामात बिजी झाले. स्वरा बाहेर पडली आणि तिने पुन्हा एकदा मागे वळून बघितलं. दीपिका तिच्याकडे पाहतच होती. तिने दीपिकाला इशारा करून बोलावून घेतले आणि बाहेर उभी राहिली. दीपिकला बोलावून दोन मिनिटं झाले. तिला दीपिका येईल की नाही माहिती नव्हत तरीही ती तिथेच वाट बघत होती. काही क्षण गेले आणि दीपिका बाहेर आली. तसच स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल. स्वरा हसतच होती की दीपिका समोर येऊन उभी राहिली. तिला बघताच स्वराने बॉक्स खाली ठेवला आणि नम्र स्वरात उत्तरली," ताई तुला मी त्रास देऊन जातेय त्यासाठी सॉरी. मी तुझी खूप गंमत केली ना, खूप त्रासही दिला. लहान बहिन समजून माफ कर. मला माहित होतं अन्वय सरांबद्दल तुझ्यापासून लपवायला नको होतं पण मी काय सांगणार होते जेव्हा मीच शोअर नव्हते त्यांच्याबद्दल. मला नव्हतं पडायचं प्रेमात पण त्यांनी जिंकल माझं मन आणि नंतर स्वतःला अडवू शकले नाही त्यांच्या प्रेमात पडण्यापासून. तूच म्हणाली होतीस ना अशी कोणती मुलगी असेल जी त्यांना बघताच प्रेमात पळणार नाही मग ताई मी कशी त्यातून सुटणार? एक सांगू ताई, तुला ना खूप सुंदर सुंदर मूल मिळतील पण माझ्या नशिबात कदाचित एकच आहे. ज्याने सर्व माहिती असूनही मला स्वीकारलं, माझी साथ देतोय. तो नसेल तर कदाचित कुणीच नसेल. तुझं तस नाही ना. तुला मिळतील हजारो कदाचित अन्वय सरांपेक्षाही सुंदर. माहिती आहे मी माफी मागून सर्व काही सुटणार नाही तरीही विना माफी मागता गेले तर माझं मन मला सतत खात राहील म्हणून सॉरी! मी खरंच तुला ताई मानलं आणि मी तुझ्यासोबतच्या सुंदर आठवणी माझ्यासोबत घेऊन जातेय. तेही तुला न सांगता. शक्य झालं तर आपल्या लहान बहिणीला माफ कर चल येते मी.बाय ताई मिस यु."

स्वरा निघणारच होती की दीपिका तिला मिठी मारत म्हणाली," सॉरी स्वरा तुझ्या भावना मी समजून घेऊ शकले नाही त्यासाठी आणि चुकीच वागत राहिले त्यासाठी. आता मीच सांगते अन्वय सर तुझेच आहेत आणि तुझेच राहतील. एक जन्म नाही तर सात जन्म. कार्तिक सर बरोबर म्हणाले होते आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखी प्रेम कहाणी जवळून बघता आली. अन्वय एकच आहे आणि तो फक्त स्वराला डिजर्व करतो हे मी स्वतःच मान्य करते. अन्वयला फक्त स्वराला च शोभेल हे मी खात्रीने सांगू शकते त्यामुळे सॉरी म्हणू नकोस उलट मीच सॉरी. तूच नाही आता मीही रोज मिस करेन तुला पण मी खुश आहे की तू आता त्यांच्यासोबत असणार. खुप खुप शुभेच्छा स्वरा. तुम्ही प्रत्येक क्षणी सोबत राहून असेच प्रेम वाटत रहा हेच आशीर्वाद देते मी माझ्या लहान बहिणीला. मिस यु सो मच डार्लिंग!!"

तिला मिठी मारताच स्वरा रडू लागली आणि दीपिका तिला थांबवत म्हणाली," वेडाबाई आताच रडू नकोस. लग्नाच्या दिवशी मिळून रडू. मी येणार आहे लग्नाला. जा आता सरांसोबत नवीन संसार सुरू कर आणि अशी कथा तयार करा की जगाच्या ओठांवर सदैव घर करून बसली पाहिजे. करणार ना ही माझी इच्छा पूर्ण?"

कितीतरी वेळ ते मिठीतच होते. आज दोघांचेही डोळे पाणावले होते. एका प्रेमाला दुसऱ्या प्रेमाने समजून घेतलं आणि जणू सर्व काही सुरळीत झालं. काही क्षण असेच गेले. स्वरा तिची मिठी सैल करत बाहेर पडली आणि समोर जाऊ लागली. दीपिका तिला मागून तशीच बघत होती. दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते. कदाचित हीच नात्यांची किंमत आहे कारण इथे प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याच्या प्रेमासाठी झटत होता. प्रेम असच नसत का हो??

*********


रात्रीचे ८ वाजले होते. स्वराला दीड तास वसई स्टेशनला झाला होता पण ती अजून घरी गेली नव्हती. ती कितीतरी वेळ त्या गर्दीत कुणाला तरी शोधत होती. गेले कित्येक दिवस तिने त्याला शोधण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही तिला दिसला नाही. त्याला भेटल्याशिवाय तिला समोरचा प्रवास सुरु करायचा नव्हता म्हणून ती तशीच बसून राहिली. तिला घरून कॉल येऊन गेले होते तरीही ती जागून हलायला तयार नव्हती. तिला आज कोणत्याही स्थितीत त्याला भेटूनच जायचं होतं. ती वाटच बघत होती की तो समोरून येताना दिसला. त्याला बघताच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्यानेही तिला बघितलं आणि तिच्या जवळ पोहोचला. तो जवळ आलाच होता की ती म्हणाली," आज चहा माझ्याकडून चालेल ना?"

तो हसला आणि तिला त्याच उत्तर मिळाल. स्वराने खाली ठेवलेला बॉक्स उचलला आणि ते दोघेही चहा घ्यायला समोर पोहोचले. समोरच काही अंतरावर चहा मिळत होता. स्वराने दोन चहा मागवले आणि दोघेही खुर्चीवर बसले. चहा हातात आलाच होता की स्वरा उत्तरली," मी कितीतरी वेळेपासून तुमची वाट बघत आहे किंवा अस म्हणू शकता कितीतरी दिवसापासून.. कुठे गेले होतात मला दिसला नाहीत ना?"

स्वराचा प्रश्न येताच तो किन्नर हसत उत्तरला," ताई जरा तब्येत खराब झाली होती म्हणून येऊ शकलो नव्हतो. पण मला सांगा इतकी वाट का बघत होतात माझी?"

स्वरा हसतच उत्तरली," कारण मला माझा नवीन प्रवास तुम्हाला भेटल्याशिवाय सुरू करायचा नव्हता म्हणून."

किन्नरने हसतच विचारले," नवीन प्रवास म्हणजे तू सांगितलं त्याला? काय म्हणाला तो?"

स्वरा मिश्किल हसू ओठांवर आणत उत्तरली," १४ फेब्रुवारीला दिल्लीला कोर्टात लग्न आहे. तुम्ही येणार?"

तो किन्नर हसत उत्तरला," नाही ताई! माझं जग इथेच आहे इथेच राहू दे पण मला आनंद झाला हे ऐकून. अभिनंदन ताईसाहेब.."

स्वरा फक्त हसली आणि काही वेळ शांत राहिली. तो किन्नर काही वेळ तिच्याकडे बघत उत्तरला," ताईसाहेब मला एक सांगा त्याच्या घरच्यांनी स्वीकारलं तुम्हाला??"

त्याचा प्रश्न ऐकताच स्वराच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि पुढे तिला काही बोलायची गरजच उरली नाही. तोही हसतच उत्तरला," मला अंदाज होताच की असच काहितरी होणार आहे पण मी हेदेखील जाणून होतो की तो तुझी साथ कधीच सोडणार नाही. बघितलं होत मी ते त्याच्या डोळ्यात. प्रेम काय असत हे मी चांगलं जाणून आहे. ताई मला नाही माहीत तुझा पुढचा प्रवास कसा असेल पण तू मुलगा खूप भारी निवडला आहेस. तो शेवटच्या क्षणापर्यंत तुझी साथ सोडणार नाही. सुटेल ती फक्त श्वासाने हे लिहून घे."

स्वरा हसतच उत्तरली," हो माहिती आहे म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा एक प्रवास सर करायला तयार झाले. नाही तर माझ्यात एवढी हिम्मत कुठे की मी पुन्हा लोकांचे बोलणं ऐकेन."

तो आता तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला," ताई मला आनंद आहे की तुला तुझं प्रेम मिळालं. आम्हाला आदर, प्रेम कधी मिळेल काय माहिती पण मी माझ्या बहिणीसाठी खूप खुश आहे. खूप खुश आहे. जा ताई खुशाल जीवन जग. माझे आशीर्वाद आहेत तुझ्यासोबत."

ती बघतच होती की त्याने एक पाचशेशी नोट काढून तिच्या हातात दिली. ती नाहीच म्हणत होती पण तो म्हणाला," हा शगुण आहे आमच्या लोकांकडून. तुझे स्वप्न पूर्ण करेन की नाही माहिती नाही पण सदैव आम्ही प्रार्थना करू तुझा प्रवास थोडा सुखकर व्हावा."

तो नोट हातात ठेवून निघून गेला होता आणि गंमत अशी की त्याच्या डोळ्यात पाणी होत. कोण म्हणतं हो त्यांना भावना नसतात?? स्वरा त्याच्याकडे बघत होती पण त्याने बघितले नाही. कदाचित त्याला त्याचे अश्रू दाखवायचे नव्हते. नाती बोलून निभवायची नसतात तर ती कृतीतून सिद्ध होतात हा आज दिवसातला प्रत्येक क्षण, प्रत्येक व्यक्ती जाणीव करून देत होता फक्त अट एकच आपण त्यांना आपलं मानायला हवं..

रात्रीची वेळ होती. स्वराने आज जवळपास सर्व कपडे पॅक केले होते आणि पुन्हा एका प्रवासासाठी सज्ज झाली. आजची रात्र फक्त बाकी होती. उद्या पुन्हा एकदा दिल्ली. दिल्लीने तिला ओळख दिली आणि हिरावून सुद्धा घेतली तेव्हा आता दिल्लीत काय घडणार होत माहिती नाही. स्वराच्या आयुष्यात दिल्ली आणि भाग्य हे शब्द कायमचे चिकटले होते आणि ते सुटणार होते एक तर स्वराच्या अंताने किंवा मग सर्वांचे विचार बदलल्यावर. उत्तर काय होत तीच तिलाही नाही माहिती. तिला आज त्यांच उत्तर शोधायच देखील नव्हतं. कारण आता त्रास झाला तरीही तिला सांभाळायला अन्वय होता.

तीच रात्र पण जागा वेगळी. अन्वय आपल्या खोलीमध्ये अंधार करून एकटाच बसला होता. निहारिका आणि बाबा बाहेर गेले होते. त्यालाही उद्यापासून नवीन प्रवासाची तयारी करायची होती म्हणून स्वताच्या मनाची तयारी करत होता. त्याने ठरवलं होतं की काहीही झालं तरीही कमजोर पडायचं नाही. तो आपल्याच विचारात हरवला होता की त्याला बाहेरून आवाज आला. त्याची आई कुणाशी तरी बोलत होती. तो आवाज आता स्पष्ट जाणवू लागला. आई म्हणत होती," अग सीमा आजच्या मुलांचा काही भरवसा नाही. ज्या आई-वडिलांनी त्यांना लहानाच मोठं केलं त्यांची सुद्धा त्यांना काळजी राहिली नाही. ते तर आंधळे झालेत एका मुलीसाठी. तिच्यासमोर आपल्या म्हाताऱ्या लोकांच प्रेम, कष्ट काय दिसणार ना? आम्हाला त्रास झाला तर त्यांना काय फरक पडतो? त्यांना तर आपला आनंद हवा असतो. असो एवढं बोलूनही काय फायदा. बोलून फरक पडला असता तर बघायच काय होत. शेवटी हेच खरं की आपण कितीही करून काहीच दिसणार नाही आपलं आणि समोरचीने थोडं जरी केलं तरी तिच्याबद्दल गावभर फिरून सांगतात आपले पोर. त्यांची काय चूक म्हणा. आपल्याच कर्माची ही फळे. चांगल्या फळात एखादं फळ खराब निघणारच त्यात झाडाचा काय दोष??"

आई बोलून शांत झाली होती तर अन्वयच्या चेहऱ्यावर क्षणभर मिश्किल हसू पसरल आणि त्याने बाजूचा मोबाइल हातात घेत स्वराला मॅसेज केला..

" झाली स्वरा तयारी. उद्या येणार आहात ना ११ च्या फ्लाइटने. मी तुझी वाट बघतोय. आता नाही राहवत तुझ्या विना! लवकर ये. मिस करतोय तुला खूप. उशीर नको करू हा.."

स्वराने मॅसेज बघताच रिप्लाय केला..

" मलाही नाही राहवत. बस ही आजची रात्र त्यानंतर आपण कायम सोबत असू शेवटच्या श्वासापर्यंत मग कुणी वेगळे करू शकणार नाही आपल्याला. ना जग ना संघर्ष..मी येतेय अन्वय सर. कायमस्वरूपी तुमची व्हायला बस ही आजची एक रात्र वाट पहा. तेवढी वाट बघणार ना की सरळ स्वप्नांत येऊ आजपुरते?"

अन्वय मॅसेज बघून हसत होता तर स्वरा आपल्याच विचारात हरवली होती. पण ह्यावेळी जगाचे विचार नव्हते. ह्यावेळी ती स्वतःच्या स्वप्नात हरवली होती. अशी स्वप्न जी तिने खूप मागे सोडली होती. पूर्ण होणार होती की नाही वेळ सांगणार होती पण आज स्वराला त्या स्वप्नांतून कुणीच बाहेर काढू शकणार नव्हतं. आज ती वाहवत होती स्वतःच स्वतःच्या स्वप्नांत. त्यात ती आणि अन्वय होता. एक सुखी संसार आणि मनसोक्त प्रेम..

आजची रात्र दोघांनाही झोप लागली नव्हती. जे लोक एकमेकांवर प्रेम करतात त्यांना लग्नाचा विचार करूनच झोप लागत नाही पण इथे काहीतरी वेगळ होत. आज झोप न लागण्याच कारण म्हणजे एकमेकांप्रति असलेली काळजी. आज दोघांनीही काहीतरी शेवटचा निर्धार केला आणि तो निर्धार मनात कुठेतरी बंदिस्त करून चावी फेकून दिली. आता उद्याची नवीन सकाळ आणि तोच नवीन प्रवास. आजपर्यंत एकट्याने केलेला प्रवास खूप सोपी होता पण एकत्र प्रवास करणे किती अवघड आहे ह्याचा प्रत्यय काहीच दिवसात दोघांनाही आला होता. कसे पार करणार होते अन्वय- स्वरा मिळून हा प्रवास??

तेरे हर किस्से मे
खुद का जिक्र चाहती हु
रिता तो बस नाम का है
मै तो तेरी परछायी बनना चाहती हु....