Bhagy Dile tu Mala - 67 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ६७

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ६७

एक अरसा गुजर गया है
जिंदगी की तलाश मे
तुम आये और थम गयी है जिंदगी
मैने जाना अब मोहब्बत मेही ईबादत है

स्वराच्या आयुष्यात पुन्हा एक दिवस आला तो नव्या आशा, नवी स्वप्न घेऊन. पुन्हा एकदा स्वप्नांचा प्रवास सुरु झाला होता कारण तिच्यासोबत होता तो तिचा जिवलगा. ज्याने तिला नव्याने जगायला शिकविल, प्रेम अनुभवायला शिकविल. पाहता-पाहता अगदी काही दिवसातच तीच आयुष्य बदललं होत, जी मुलगी एके वेळी प्रेमाचा राग-राग करत होती आता तिनेच आपलं मन कुणाला तरी सोपवलं होत आणि झाली राधा कृष्णाची. त्याच्या निस्सीम प्रेमात तिने स्वतःला बुडवून घेतलं आणि प्रेम ह्या भावनेचा खरा अर्थ पुन्हा एकदा ती मनोमन अनुभवू लागली होती. अन्वय आला आणि स्वराच्या आयुष्याला सुंदर वळण मिळाल. ज्यात सर्व काही नवीन असणार होत. त्यात त्रास हा ठरलेला होताच पण पहिल्यांदा तिला आनंद अनुभवता येणार होता. ज्यासाठी ती इतके वर्ष आसुसली होती. पहिल्यांदा कुणाच तरी निस्वार्थ प्रेम अनुभवता येणार होत म्हणूनच कदाचित स्वराने प्रेमाचा वेदनादायी भूतकाळ विसरायचे ठरविले होते. पुन्हा एक प्रवास स्वराचा. कितपत सोपा होणार होता देव जाणे पण ती तयार होती प्रत्येक क्षण नव्याने अनुभवायला.

स्वरा-अन्वय आज दोघेही सकाळी- सकाळीच उठले होते. ती सकाळ काहीतरी विशेष होती. दोघेही काही स्वप्न घेऊन जागे झाले होते. ते प्रत्येक स्वप्न आता त्यांना पूर्ण होताना दिसत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर सतत तेज झळकत होत. अन्वयला तिला आपलं करण्याची इतकी घाई झाली होती की अन्वयने रात्रीच दोघांच्याही फ्लाइट्सचे तिकीट बुक केले होते तर स्वरानेही सरांच्या रागावण्याचा विचार न करता अन्वयकडून सुट्टी मॅनेज केली. ते आतुर होते एकमेकांचे व्हायला पण त्यांना त्यासाठी अजून थोडी वाट बघावी लागणार होती. अजून त्यांना घराकडे निघायला वेळ असल्याने स्वरा दोघांसाठीही नाश्ता बनवत होती. सकाळचे जवळपास ८ वाजले होते. अन्वय-स्वराच्या नजरेचा खेळ सतत सुरू होता. आज असा एक क्षण नव्हता जेव्हा अन्वय स्वराकडे बघत नव्हता. स्वराला आज त्याला फेस करणे अवघड जात होते. आज त्याच्या नजरेत तिला काहीतरी वेगळं भासत होत म्हणून स्वराही आज वेगळ्याच मूडमध्ये होती. दोघांच्याही नजरांचा खेळ सुरू होताच की स्वराचा फोन वाजला आणि दोघांही काही क्षण एकमेकांना बघून हसू लागले. स्वरा त्यावेळी पोहे बनवत होती, फोन येताच स्वराने अन्वयला म्हटले," सर जरा बघा बर कुणाचा कॉल आहे ते."

अन्वयने तिला गोड स्माईल देत फोन बघितला आणि हळूच उत्तरला," मधू नाव लिहिलंय ग !! घेऊ का फोन?"

स्वराने हसत हळूच आवाजात उत्तर दिले," हो घ्या. फोन रिसिव्ह नाही केला तर वारंवार फोन करून त्रास देईल ती. वेडी आहे ती. मी काय सांगत बसले, एक काम करा रिसिव्ह करून स्पीकरला ठेवा. मी बोलते इथूनच."

अन्वयने कॉल रिसिव्ह करत फोन स्पीकर वर ठेवला आणि माधुरी मोठ्यातच ओरडत म्हणाली," गुड मॉर्निंग जान!! तुला सांगू मला ना रात्री झोपच लागली नाही. लोक स्वतःच्या प्रेमात रात्र रात्र जागतात पण मी तर माझ्या बहिणीच्या प्रेमाचा विचार करून जागत होते. माझं मलाच माहिती मी कस कंट्रोल करून बसले होते स्वतःला रात्रभर म्हणून सकाळी उठताच कॉल केला. ताई सांग ना काय झालं काल? तू सांगितलंस ना सरांना मनातलं? ते काय बोलले? होकार दिला ना त्यांनी? ए बोल ना शांत का बसलीय आहेस?"

ती पटापट बोलत होती तर अन्वय शांतपणे हसत होता. अन्वय आपल्याबद्दलच कुणाकडून तरी ऐकतोय म्हणून त्याला हसू आवरत नव्हतं तर अन्वयला बघून स्वराही हसतच म्हणाली," हो बाबा सांगते सर्व पण आधी मला तरी बोलू दे. तू संधी तरी देत आहेस का मला बोलायची. हा आता तुझं उत्तर. हो सांगितलं. सर्व काही सांगितलं. एक-एक शब्द फिल करते तो व्यक्त केला."

स्वरा बोलतच होती की माधुरी पुन्हा ओरडत म्हणाली," क्या बात है पण मॅडम मुद्द्याच बोला ना!! काय म्हणाले मग सर? होच म्हणाले असतील म्हणा. आमच्या लाडक्या मुलीला कुणी नकार देऊ शकत का?"

स्वरा-अन्वय क्षणभर हसतच होते. एक तर ती स्वतःच प्रश्न विचारत आणि उत्तरही स्वतःच देत होती शिवाय स्वराला उत्तर द्यायची संधीही ती देत नव्हती म्हणून स्वराला मधूवर आज हसू आवरत नव्हतं. स्वराने आता गॅस कमी केली आणि अन्वयकडे येत उत्तरली," मधू मॅडम सर म्हणाले की आता रिस्क नको बाबा ! आता होकार आलाच आहे तर चट मंगणी पट ब्याह!! तुझा काय भरवसा?? तू पलटली तर?"

स्वरा हसत-हसत उत्तरली तर माधुरी थोडी चिडत म्हणाली," अस कधी असत का? माझी उडवत आहेस ना तू?? सकाळी- सकाळी मीच भेटले ना तुला खेचायला? उत्तर घ्यायच नसेल तर नको देऊ पण मला उल्लू तरी नको घुमवू. तुला ना मला त्रास द्यायला आवडत म्हणून अशी बोलत आहेस. आय नो!! खडूस कुठली!! म्हणे चट मंगणी पट ब्याह!! इथे प्रपोज नाही आणि सरळ लग्नाची बोलणी. मी काय तुला कच्चा लिंबू वाटले का तू काहीही फेकशील आणि मी सर्व ऐकून विश्वास ठेवेल. खडूस कुठली!! नाही सांगायचं ना तुला सर्व?"

मधू इतकं गोड बोलत होती की स्वरा-अन्वय सतत हसत होते. अन्वयला तर मधुचं बोलणं ऐकून कंट्रोल होत नव्हतं म्हणून स्वरा हसतच उत्तरली," तुला विश्वास नाही माझ्यावर?? थांब त्यांच्याच तोंडून एक, मग तर बसेल ना विश्वास? "

माधुरी पुन्हा ओरडत म्हणाली," काहीही! पुन्हा एका खोट!! मला घुमवू नकोस हा ताई. मी शेवटच विचारतेय आता गुपचूप सांग मुलगा पटला की नाही त्याने होकार दिला की नाही? आता उत्तर दिलं नाहीस तर सरळ घरी येऊन त्रास देईन तुला. आता सांगणार आहेस मी खरच येऊ घरी??"

मधू पटर-पटर करत होती. स्वराला हसू आवरत नव्हतं आणि आता अन्वय तिला अडवतच उत्तरला," मिस मधू!! मुलगा पटला नाही हो, खर तर मुलगी पटली. मुलगा तर केव्हाच पटून होता. तुमची मुलगीच होकार द्यायला तयार नव्हती. किती भाव खाते तुम्हाला माहिती असणारच? काल फायनली मॅडमचा होकार आला तेव्हा मीच म्हटलं स्वरा मॅडमचा विचार बदलायच्या आत सरळ लग्नाची मागणी घालावी. काही चुकीच केलं का मी मॅडम?"

अन्वयचा आवाज येताच मधू शांत झाली. तिचा आता आवाजच येत नव्हता. इकडे अन्वय- स्वरा नुसते हसत होते आणि स्वरा म्हणाली," आता बसला ना मॅडम विश्वास की मुलाच्या आवाजात मीच बोलतेय अस वाटतंय तुला आता."

माधुरी आता हळुवारं आवाजात उत्तरली ," हो बसला. तुला काय केलं ग ते मघापासून आपल बोलणं ऐकतात हे सांगायला. ते मला किती मूर्ख समजत असतील ना?"

मधू हळुवार स्वरात उत्तरली. स्वरा-अन्वय तर पोट धरून हसत होते आणि बिचारी मधू गप्पच बसली. काही क्षण ते दोघेही हसतच होते. आता त्यांना जाणवलं की मधू अगदीच गप्प झालीय म्हणून दोघेही हसू आवरत, काही क्षण विचार करत अन्वय म्हणाला," सॉरी मधू तुझा मूर्खपणा नाही तर क्यूटनेस बघून हसतोय. खूप क्युट आहेस तू. बाय द वे मधू थॅंक्यु. थॅंक्यु सो मच. स्वरा तुझ्याबद्दल काल मला भरभरून सांगत होती. तू तिला खूप मदत केलीस मी तिच्या सोबत नसताना. थॅंक्यु माझ्या स्वराची काळजी घेण्यासाठी. तू नसतीस तर कदाचित स्वरा आज माझी नसती. थॅंक्यु बर का क्युट बेबी डॉल!!"

अन्वयने गोड बोलून माधुरीच क्षणात मन जिंकल. माधुरीही आता हसतच उत्तरली," जीजू मदत मी तुमची नाही केली हा, मी माझीच मदत केली. मीच देवाला प्रार्थना केली होती की अन्वय सरांनी जसे ताईला मुक्त केले तसच तिला प्रेमात पाडाव आणि अगणित आनंद घ्यावा. बघा ना झाली माझी इच्छा पूर्ण त्यामुळे खूप खूप थॅंक्यु जीजू. मी ताईला आनंदी ठेवलं की नाही माहीत नाही पण आता ताई कायम आनंदी राहिला ह्याचा मला विश्वास आहे. मग सांगा केव्हा घेऊन जाणार आहात आमच्या मुलीला पळवून?"

अन्वय तिची थोडी उडवायला म्हणाला," हे काय आजच!! आईबाबांचा होकार येऊ द्या मग बघा एक क्षण इथे ठेवणार नाही पण मॅडम मला तुमचीच चिंता आहे."

मधू विचार करत उत्तरली," का बरं?"

अन्वय जरा हसतच उत्तरला," तुमची मैत्रीण परकी होणार ना. आता ही दिल्लीची सून होईल मग तिला काही वेळ मिळणार नाही तुमच्याशी बोलायला. मला नाही वाटत ती तुमच्याशी बोलणार जास्त. तुमची मैत्रीण परकी झाली आता, ती हरवली सासरच्या स्वप्नांत!"

अन्वय स्वराकडे बघून बोलत होता तर स्वरा चिडतच म्हणाली," मधू हे चिडवत आहेत ग तुला!! अस काहीही होणार नाही. यु आर माय जान मी नाही विसरणार तुला कधीच. ह्यांच्यासमोरच रोज कॉल करेन तुला बघतच राहा."

त्यांचं आपल्यातच बोलणं सुरू होत की माधुरी म्हणाली," सर घेऊन जा हिला. मला काही प्रॉब्लेम नाही. तस पण मॅडमने प्रश्न विचारून विचारून डोकं खाल्लय. मला नाही जमत बाबा एवढ्या कमी वयात हिचे उत्तर द्यायला. हिचे प्रश्न आणि हिला तुम्हीच सोडवू शकता. हुश्श... मी वाचले बाबा आता. नाही तर बाईसाहेबांच्या प्रश्नांनी जिवंच घेतला असता माझा.."

स्वरा मधूची बाजू घेत होती पण इथे तर मधूने बाजूच पलटली. मधुचं बोलणं ऐकून अन्वयला आता हसू आवरत नव्हतं आणि स्वरा अन्वयकडे डोळे मोठे करून रागावतच उत्तरली," ए शहाणे! तू मला काय सहन करत होतीस? मी तुझी बाजू घेतेय तर तू माझिच खेचत आहेस? तू तर लगेच ह्यांच्या बाजूने झालीस. बरोबर म्हणतात सर्व फ्रेंड्स कमीने असतात. मी ना आता कॉलच करणार नाही तुला. जा बाय.."

अन्वय स्वराचे ती निरागस भाव जवळून बघत होता. आज पहिल्यांदा तो इतकं मनमोकळपणे हसत होता शिवाय त्याला साथ होती ती मधूची. दोघेही बऱ्याच वेळा स्वराच्या निरागसपणावर हसत होते आणि मधू शेवटी उत्तरली," अन्वय सर तुम्ही म्हटलं तेच झालं. बघा ना तिनेच कबूल केलं की आता ती कॉल करणार नाही. आमची ताई वेडी झाली तुमच्या प्रेमात. तिला जपून ठेवा हा, एकुलती एक आहे मला. ताई मी नाही मानणार हा वाईट तू त्यांच्यासाठी माझ्याशी बोलणं सोडलं तरीही. खर तर आता तुझी उडवायला मज्जा येतेय पण वेळ नाहीये. अन्वय सर ऑल द बेस्ट. गोड बातमी घेऊन या. मी वाट बघतेय. आता मला ऑफिसला निघायचं आहे मग निवांत बोलू. लव्ह यु ताई!! तू दिवस बनवलास आज माझा..बाय बाय.."

माधुरीनवं फोन ठेवला पण तिच्या एक फोनने रूम मधील वातावरण प्रफुल्लित झालं. माधुरीने त्या खास दिवसाची सुरुवात अगदी खासच केली. ते दोघेही रूममध्ये सतत हसत होते. अन्वय-स्वराच्या आयुष्याची पहिली सकाळ इतकी खास होती तर बाकी आयुष्य कस असेल हा विचार एकदा स्वराच्याही मनात येऊन गेला होता. अन्वयच्याही मनात आज काहीसं असच सुरू होत. फक्त पूर्ण आयुष्य जगण्यासाठी हवा होता घरच्यांचा होकार. तो होकार इतक्या सहज मिळणार होता का?

ती अंघोळ करून परत येईपर्यंत १५-२० मिनिटे गेली होती. आज दिवसाची सुरुवात खास झाली होती पण तिने पुन्हा एकदा उरलेली सकाळ खास बनवायची ठरवली. आज ती त्याला हवं तेवढं छळनार होती. स्वरा फ्रेश होऊन बाहेर पडली आणि अन्वय तिचं रूप बघून तिला बघतच राहिला. ती टॉवेलने केस पुसत बाहेर पडली होती. हळुवार केसांच पाणी त्याच्या चेहऱ्यावर पडलं आणि त्याची नजर तिच्यावर गेली. ती त्याच्याकडे बघत नव्हती पण तो एकटक तिच्याकडे बघत होता. पैंजनाचा आवाज अन्वयला मंत्रमुग्ध करून सोडत होता आणि त्याच लक्ष गेलं ते तिच्या रूपावर. ती आज जाणून रेड ड्रेस घालून त्याच्यासमोर आली होती. अन्वयचे रेड ड्रेसशी काहीतरी वेगळेच संबंध होते म्हणून काही क्षण त्याची नजर तिच्यावरून हटतची नव्हती. स्वराला ते समजत होत म्हणून कदाचित तिच्या चेहऱ्यावरच हसू तसच होत. कितीतरी वेळ दोघांची अशीच जुगलबंदी सुरू होती. स्वराचे गाल लाजून-लाजून लाल झाले होते तरीही अन्वयने तिला बघणे सोडले नाही आणि शेवटी स्वराने त्याची खेचावी म्हणून विचारले," सर मला मृन्मयी म्हणाली की तिला शॉपिंगला घेऊन गेला होता तेव्हा तुम्ही रेड ड्रेसकडे सतत बघत बसला होता, खर आहे का हे? कोण करत बर इतका वेडेपणा!! काय आहे बर ह्या ड्रेस ड्रेसमध्ये?"

अन्वय तिच्याकडे बघत तर होता पण लाजेने त्याची नजर खाली झाली होती. तो काहीच बोलत नाहीये हे बघुन स्वरा पुन्हा हसतच उत्तरली," सर मी आता तुमचीच अमानत आहे सो बिनधास्त बोलु शकता हा. कुणी काही बोलणार नाही. हक्क आहे ना तुमचा माझ्यावर मग लाजायच कशाला बर? मिस केलं ना तुम्ही मला रोज? तेव्हाच त्या ड्रेसकडे सतत बघत होतात ना?? बोला बोला!!"

स्वरा केस विंचरत त्याच्यावर हसत होती तर अन्वय स्वतःच स्वतःच्या वेडेपणावर हसत उत्तरला," हो प्रत्येक क्षणी मिस केलं तुला किंवा अस म्हणू शकतो की तुला कधीच विसरू शकलो नाही. इथून गेलो तरी नजरेसमोर सतत तुझाच चेहरा होता. तुझं हसन ऐकू येत होतं. तू कुठेतरी बाजूला बसून आहेस असच वाटत होतं. खर आहे वेड लागलं होतं तुझं मला, फक्त कधी तुला सांगू शकलो नाही. तो ड्रेस बघत होतो ना तेव्हा अचानक मला त्यात तुझं रूप दिसलं आणि मी त्यात हरवून गेलो. वेडेपणा आहे हा मान्य आहे पण मला सतत आवडेल हा वेडेपणा करायला. स्वरा मी एकदा कविता केली होती तुला आठवतंय. त्यावेळी ना तिचा चेहरा मला स्पष्ट दिसत नव्हता. ती माझ्या विचारात होती, मनात होती पण आता आनंदाने सांगेल की मिळाला तो मला चेहरा. स्वरा आता पक्क सांगू शकतो की तो भास नव्हता. चाहूल होती भविष्याची. ती कविता सहज केली गेली नव्हती, कदाचित त्या कवितेने मला तुझ्या येण्याची चाहूल दिली आणि बघ ना तू आहेस माझ्या आयुष्यात. अगदी त्याच ड्रेसमध्ये आणि त्याच रुपात."

अन्वयच बोलणं ऐकून स्वरा काही क्षण त्याच्या शब्दात हरवली होती. आपल्यावर प्रेम करणाऱ्या त्या व्यक्तीचे ते शब्द ऐकण्यात किती आनंद असतो हे स्वराला त्याक्षणी समजत होत. ती आज फार बोलत नव्हती पण तिचा चेहरा तिच्या मनात काय चालल आहे ह्याची उत्तरे देत होता. स्वरा आज स्वतातच हरवली होती. ती भानावर आली ते अन्वयच्या आवाजाने.

अन्वय तीही स्थिती बघून क्षणभर हसलाच होता तर स्वरा आता त्याच्याशी नजर मिळवू शकत नव्हती. स्वरा केव्हाची वेड्यासारखी केस करत होती आणि अन्वय हसतच उत्तरला," स्वरा मोकळे केस तुझ्यावर छान दिसतातग. राहू दे ना असेच. प्लिज!!!"

त्याचे शब्द येताच स्वराच्या चेहऱ्यावर पुन्हा लाजेचे भाव प्रकट झाले आणि ती लाजतच उत्तरली," माहिती आहे सर तुम्हाला आवडत ते पण आज प्रवास करायचा आहे ना मग बांधावे लागतील. आज नाही पण लग्नानंतर तुम्हाला आवडतात तसे रोज ठेवेन. चालेल ना?"

स्वरा त्याच्याकडे एकटक बघत होती तर अन्वय तिच्या चेहऱ्यात हरवला होता. काही क्षण दोघे वेळ आणि जगाला विसरले होते. क्षणात दुःख नाहीसे झाले होते आणि प्रेम करणारे प्रेमात हरवले होते. खूप सुंदर क्षण होता तो.

काही वेळातच स्वराने अन्वयकडे नजर टाकत कशीबशी तयारी आटोपली आणि पुढच्या प्रवासासाठी दोघांनीही एकाच वेळी पाऊल टाकले. ती पावले आता त्यांना नवीन जगात घेऊन जाणार होती. सोपं असणार होत की कठीण माहिती नाही पण ते दोघे सोबत असणार होते हे पक्क!! काही पावले दोघेही चालले होतेच की अन्वयने विचारले," स्वरा मला मनातलं सांगितलंस पण स्वयमला कस सांगणार आहेस सर्व? तो खरंच समजून घेईल?"

अन्वयचा प्रश्न ऐकून स्वरा जरा शांत होत उत्तरली," हो सर घेईल समजून. त्याला हे स्वीकारावं लागेल की प्रेम तसच असलं तरीही परिस्थिती बदलते. मग नकळत आपल्याकडून काही निर्णय घेतले जातात. तो आपल्या जागी कायमच राहील पण हे सत्य त्याला स्वीकारावं लागेल की तुम्ही आता माझं भविष्य आहात. तुमची जागा दुसर कुणीच घेऊ शकत नाही. आई- बाबांशी बोलल्यावर मी बोलेन त्याच्याशी. त्याला समजून घ्यावच लागेल."

तीच उत्तर ऐकून त्याच्या चेहऱ्यावर समाधान आलं आणि दोघेही पुढे चालू लागले. काहीच क्षणात स्टेशनवर पोहोचले. ट्रेन सुरू झाली आणि त्यांचा महत्वपूर्ण प्रवासही सुरू झाला. आज ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. ट्रेन खूप जास्त भरली होती आणि स्वरा त्याला चिकटून उभी होती. ते इतक्या जवळ होते की एकमेकांच्या हृदयाचे आवाजही त्यांना येत होते. गर्दी भरपूर असली तरीही अन्वयची नजर तिच्यावरून एक क्षण हटली नव्हती. स्वराने ते भरपूर वेळ बघितलं होत आणि आता हळूच विचारले," सर इतकं काय बघत आहात? कधी बघितलं नाही का मला?"

अन्वय तिच्या कानात हळूच उत्तरला," खूप वेळा बघितलं पण आज अधिकार आहे मला तुला बघण्याचा. हा प्रेम करण्याचा अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. अगदी तुही नाही. आज काय स्वरा आता माझी प्रत्येक सकाळ अशीच व्हाही ही देवाला प्रार्थना करेन. आहे ना मला अधिकार??"

त्याच उत्तर ऐकताच स्वराच्या चेहऱ्यावर पुन्हा लाजेचे भाव प्रकटले. आज असा एक क्षण नव्हता जेव्हा तो तिला बघत नव्हता आणि ती लाजत नव्हती. कदाचित प्रेमाची चाहूल होती ती. एकमेकांना जवळ आणणारी. आयुष्यात कितीही त्रास असला तरीही आयुष्यभर साथ देण्याची वचन देणारी. त्या नजरा आज दोघानाही एकमेकांच भविष्य सांगत होत्या आणि पहिल्यांदाच स्वरा आपल्या भविष्याचे स्वप्न बघताना घाबरली नव्हती. प्रेमात किती ताकद असते ह्याच उदाहरण म्हणजे स्वरा-अन्वयमधला तो क्षण होता...

***********

दुपारचे ३ वाजले होते. स्वरा-अन्वय प्लेन, बसचा प्रवास करत तिच्या गावी पोहोचले. दुपारची वेळ असल्याने गावात फार वर्दळ नव्हती पण रिकामटेकडी मानस मात्र सर्वांकडे लक्ष देऊन होतीच. स्वरा- अन्वय समोर समोर जात होते. स्वराच्या चेहऱ्यावर अजूनही सकाळच्या क्षणांचा अंश जसाच्या तसा होता. ती हसतच सर्वांकडे बघत चालली होती तर अन्वय लोकांकडे जरा विचित्र नजरेने बघत होता. त्याच ते तस वागणं स्वरापासून लपल नव्हतं तरीही स्वरा त्याला काहिच म्हणाली नव्हती. काही क्षण स्वराचे हसण्यातच गेले. अन्वय जसजसा समोर जात होता तसतस त्याला जाणवू लागल की गावातले जवळपास सर्वच लोक त्यांच्याकडे बघत आहेत. त्याला ते विचित्र वाटत असल तरीही तो त्यांना गमतीत घेत उत्तरला," स्वरा मानल हा तुला, तुझी तर गावात खूप फॅन फॉलोविंग आहे! बघ ना सर्व तुझ्याकडेच बघत आहेत. एक व्यक्ती असा नाही जो तुझ्याकडे बघत नाहीये. आय एम इंप्रेस हा!!"

स्वराने त्याच्यवर लक्ष दिलं. तो हसत नव्हता पण हसत असल्याचं भासवत नक्कीच होता म्हणून स्वरा त्याच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघत हसत उत्तरली," थॅंक्यु थॅंक्यु हा सर पण कस आहे ना ते आज माझ्याकडे नाही तर तुमच्याकडे बघत आहेत सो ही स्तुती वेस्ट गेली."

स्वरा समोर बघून चालत होती तर अन्वय विचार करत उत्तरला," माझ्याकडे का? मी काय हिरो आहे माझ्याकडे बघायला? स्वरा तू मधूसारख मला पण फिरवू नको हा!! मी हुशार आहे तुझ्यापेक्षा जास्त कळलं ना?"

अन्वय बोलून तर गेला पण स्वराला आता हसू आवरत नव्हतं. काही क्षण ती मनमोकळे हसत म्हणाली," झाली असेल स्वतःची स्तुती करून तर मी काय म्हणते ते ऐकणार का?"

स्वरा हसत होती तर अन्वय शांतपणे तिच्याकडे बघत उत्तरला," हम्मम..."

स्वराला त्याचा चेहरा बघून आज हसू आवरत नव्हतं तरीही तिने स्वतःच हसू आवरत म्हटले," अन्वय बाबू, अगर एक लडकी एक लडके के साथ आये तो लोग क्या सोचेंगे? कौन है ये? कही इसे भगा के तो नही लायी ना? अन्वय सर हे गाव आहे गाव. इथे लोकांना इतरांबद्दल बरीच क्युरीओसीटी असते आणि एखादी मुलगी जर मुलाला सोबत घेऊन आली असेल तर?? तुमच्या मनात जे विचार आहेत तेच सेम भाव त्यांच्या मनात आहेत म्हणून तुम्हाला ते बघत आहेत. त्यांना वाटत आहे की ह्या भुताने कुठून असा मुलगा पटविला? लग्न वगैरे तर करून आली नाही ना? "

हे सर्व बोलतानाहीं स्वराच्या चेहऱ्यावर हसण्याचे भाव होते.अन्वयने क्षणभर तिच्याकडे बघितले. त्याला तिची उत्तर देण्याची पद्दत फार आवडली होती म्हणून तीच बोलणं ऐकून तो क्षणभर हसलाच पण तिच्या शब्दातल्या वेदना त्याच्यापासून लपल्या नव्हत्या. ती बोलून गप्प झाली तर लोक तिच्याकडे बघत होते. अन्वयच्या चेहऱ्यावरचे विचित्र भाव आता बदलले आणि तो आता जाणूनच तिच्या जवळ- जवळ चालत होता. स्वराने ते बघितलं आणि हसतच तिने विचारले," हसायला काय झालं सर?"

अन्वय क्षणभर तिच्या नजरेत बघत उत्तरला," स्वरा त्यांना माहिती नाही ना की ह्या भुताने मला नाही तर मीचं ह्या भुताला फसवलं. त्यांना हे कळाव म्हणून जवळ जवळ येतोय. तू म्हणशील तर ओरडून सांगू का मीच ह्या भुताच्या प्रेमात पडलोय अस??"

अन्वय बोलत होता आणि स्वराच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा निखळ हसू पसरल. आता तिला लोकांना फेस करतानाही क्षणभर वाईट वाटत नव्हतं. ते दोघेही जगाच्या नजराना तोंड देत समोर चालले होते. स्वराला भीती होती की तो लोकांना बघून कसा रिऍक्ट करेल पण त्याच्या दोन वाक्याने स्वराची संपूर्ण भीतीच नाहीशी केली आणि अन्वय परत घेऊन आला ते तीच गोड हसू जे त्याला सतत प्रेमात पाडत होत.

काहीच क्षण गेले. स्वरा-अन्वय हसत-हसतच घरासमोर पोहोचले. घर येताच स्वराने बॅग अंगणात आपटली आणि मोठ्याने ओरडू लागली," आई.... आई… बाहेर ये ना! बघ मी आलेय. कुठे आहेस तू? ओ मेरी माँ कहा पर हो? आ भी जाओ. देखो तुम्हारी बीटीया आयी है."

स्वरा ओरडत होती तर अन्वय तीच हे रूप बघून हसत होता. त्याने तिला नेहमी सिरियसच बघितले होते म्हणून हा नौटंकी स्वभाव बघताना त्याच क्षणभर हसू थांबल नव्हतं. स्वरा कितीतरी वेळ ओरडत होती आणि आई डोळे चोळत बाहेर आल्या. त्यांनी समोर बघितलं तर स्वरा उभी होती. स्वराला बघून त्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्या काहो बोलणार त्याआधीच स्वराने त्यांना धावत मिठी मारली. स्वरा मिठीत शांत स्थिरावलीच होती की आई म्हणाल्या" स्वरा मी स्वप्न तर बघत नाहीये ना? तू आज इकडे? उगाच आली नसणार. काही कामानिमित्त आली आहेस का?"

आई तिची खेचत होत्या आणि स्वरा रागावतच उत्तरली," हे बर आहे, नाही आले तरी ओरडतेस आणि आता आलेच आहे तर अस म्हणत आहेस. मला माझ्याच घरी यायला आता कामाचे बहाणे करावे लागतील का? मी ना आताच जाते बघ परत."

स्वरा क्षणभर रागावली आणि आई तिच्या कपाळावर किस करत उत्तरल्या," जाऊन तर बघ मग सांगते तुला.."

आई-मुलीच्या मिलनाचा क्षण सुरू होता तर अन्वय ते सर्व डोळेभरून बघत होता. आईचीही अन्वयकडे नजर गेलीच होती की स्वराला आठवलं आपण तर त्यांना मध्ये घेतलंच नाही आणि ती डोक्यावर हात मारत म्हणाली," अरे देवा!! आईच्या नादात तुम्हाला विसरलेच का मी? तुम्ही काय बघत बसला आहात आम्हाला. बोलायच ना काहितरी. बसले नुसते गुपचूप.आता काय बघत बसला आहात चला मध्ये. "

स्वरा अन्वयची बॅग हातात घेत मध्ये जाऊ लागली तर स्वराच्या आई अन्वयकडे एकटक बघत होत्या. आजपर्यंत स्वराने कधीच कुठल्या मुलाला घरी आणले नव्हते म्हणून त्यांच्या मनात शंका-कुशंकानी घर केलं होत पण नेमके त्या क्षणी त्यांची काहीच विचारायची हिम्मत झाली नाही. त्याही मागोमाग मध्ये आल्या. अन्वय मध्ये आलाच होता की स्वरा त्याच्या हातात टॉवेल देत म्हणाली," सर बाथरूम तिकडे आहे. फ्रेश व्हा तोपर्यंत मी चहा बनवून आणते."

अन्वय फ्रेश व्हायला गेला तर स्वरा पटकन किचनमध्ये पळाली. आईदेखील दोघांनाही वेड्यासारखं बघत तिच्या मागे गेली. स्वराने पटापट चहासाठी भांड मांडल तर कितीतरी वेळेपासून शांत असलेल्या आईनी तिला विचारलंच," कोण ग हा स्वरा? आधी कधी सांगितलं नाहीस ना ह्याच्याबद्दल. बर सांगितलं नाहीस ते ठीक आहे पण सरळ घरीदेखील घेऊन आलीस. कोण आहे हा ते तरी कळू दे मला?"

स्वरा आईचे प्रश्न बघून क्षणभर हसतच होती. आई काहीतरी असेच प्रश्न विचारणार हे तिला माहिती होत म्हणून आईचे गाल ओढत स्वरा उत्तरली," मेरी प्यारी माँ!! सांगते ग सर्व. जरा धीर धर. लेक खूप दिवसाने आलीय तिची काळजी घ्यायची तर प्रश्न विचारत बसली आहेस. बर ते सोड आधी मला सांग बाबा कुठे गेलेत?"

स्वराच्या आईने आपले प्रश्न काही वेळ बाजूला ठेवले आणि हळुवार स्वरात उत्तरल्या," ते गेलेत जरा फिरायला. त्यांचा पाय कुठे राहतो घरात? येतीलच इतक्यात."

स्वरा पुढे काहीच म्हणाली नाही पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आईच्या मनात खूप प्रश्न निर्माण करत होता. स्वरा आज इतक्या आनंदाने सर्व बनवत आहे हे बघून तर आईची शंका जास्तच मजबूत झाली होती. त्या आपल्या विचारात हरवल्या होत्याच की काहिच वेळात त्यांचा चहा झाला आणि ते हॉल मध्ये परतले. एव्हाना अन्वय देखील हॉल मध्ये फ्रेश होऊन बसला होता. स्वराने त्याला चहा दिला. अन्वयने चहा घेतला आणि स्वरा आईची ओळख करून देत म्हणाली," अन्वय सर ही माझी लडकी आई एकुलती एक आई. टेढि है पर मेरी है."

अन्वयने स्वराच्या बोलण्यावर हसतच त्याना नमस्कार केला. त्या क्षणभर हसल्याच होत्या की पुढच्याच क्षणी ती आईला म्हणाली," आई हे अन्वय सर! सध्या एव्हढीच ओळख पुरेशी आहे. बाबा आल्यावर पूर्ण ओळख करून देते. तोपर्यंत तुझ्या चेहऱ्यावर असलेले प्रश्न मनात सांभाळून ठेव."

अन्वय खर तर जरा घाबरला होता पण स्वराचा नटखट स्वभाव बाहेर आला की त्याला हसू आवरत नव्हत. तेव्हा थोडा फार तो रिलॅक्स व्हायचा.

काहीच क्षण गेले. सर्वांचा चहा घेऊन झाला. ह्या पूर्ण वेळात तिघेही एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघत होते. स्वराला तर अन्वयचा चेहरा बघून हसू आवरत नव्हतं तरीही तिने कसतरी ते आवरल. हॉल मध्ये शांतता होती. कुणाशी काय बोलावं ते कुणालाच समजत नव्हतं तेवढ्यात तिचे बाबा आले आणि रूममध्ये असलेली शांतता नाहीशी झाली. बाबांना बघताच स्वराने धावतच त्यांना मिठी मारली. स्वराला बघताच ते हसत म्हणाले," बापरे! मी स्वप्न बघतोय की काय? स्वरा मॅडमने आज घराचा दौरा कसा काय काढला? कामानिमित्त आली आहेस ना?"

बाबनीही सेम विचारल्याने रूममध्ये काही वेळ हसू पसरल आणि सर्व वातावरण शांत झाल. तिने हात पकडतच बाबांना सोफ्यावर आणून बसविले. ती स्वता बाबासाठी चहा आणायला जाणार होती पण तिच्या आई उठल्या आणि स्वरा तिथेच बसून राहिली. बाबा अन्वयकडे बघत होते आणि स्वरा उत्तरली," बाबा हे अनव्य सर! माझे फ्रेंड, कलीग, बॉस अगदी सर्वच. ह्यांनाच भेटायला घेऊन आलेय मी खर तर."

स्वराच्या बाबांना स्वराच्या शब्दावरून तिला काय म्हणायचं होत ह्याचा अंदाज आला होता पण त्यांनी शांत बसायचंच ठरवलं होतं. ते अन्वयच्या प्रत्येक बारीक हालचालीकडे लक्ष देत होते म्हणून अन्वय आणखीच घाबरला होता. रूममध्ये जीवघेणी शांतता होती. आईने काहीच क्षणात चहा गरम करून आणला आणि बाबा चहा घेऊ लागले.

स्वरा आतापर्यंत रिलॅक्स वाटत होती पण आता स्वरालाही जराशी भीती वाटू लागली. अन्वयबद्दल एकूण ते कसे रिऍक्ट करतील हे स्वरालाही माहिती नव्हत म्हणून तिची नजर सतत खाली जात होती. ह्यावेळी अन्वयची देखील काहीशी अशीच अवस्था होती. एक विचित्र वातावरण घरात तयार झालं होतं. काही वेळ असाच गेला. बाबांचा चहा झाला आणि स्वरा समोर बघत उत्तरली," आई-बाबा मला माहित आहे तुमच्या डोक्यात कोणते प्रश्न सुरू आहे ते. जास्त वेळ नाही घेणार मी, आता त्यालाच सुरुवात करते आहे. "

स्वराचे आई-वडील तिच्या उत्तराकडे आतुरतेने वाट बघत होते आणि स्वरा उत्तरली," आई तू मला म्हणाली होतीस ना की तुला चिंता वाटते माझी, तुमच्यानंतर माझं काय होणार? तू हेदेखील म्हणालीस की तुझ्या आयुष्याचा नव्याने विचार कर, स्वप्न बघ आणि ती पूर्ण कर. गेले काही दिवस मी ह्याच गोष्टीचा विचार करत होते आणि फायनली माझा विचार पक्का झालाय. तू मला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा तुला सांगू शकले नाही कारण माझा स्वतःशीच गोंधळ सुरू होता पण आता तो क्लिअर झालाय. सो आम्ही इथे आहोत हे सांगायला की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला लग्न करायचं आहे. तुम्हाला वाटत असेल का हा मुलगा अचानक कुठून आला पण अचानक अस काहीच नाही. मागील काही महिन्याची आमची ओळख आहे. माझ्या हसण्यात, आनंदी राहण्यात ह्यांचा खूप वाटा आहे हे मी तुम्हाला कधी सांगू शकले नाही ह्याची खंत आहे. सरांनी मला आधीच सांगितलं होतं त्यांच्या मनात काय आहे ते पण माझ्या मनात प्रेमाबद्दल काय भाव आहेत हे तुम्हालाही माहीत आहे म्हणून कदाचित त्यांना उत्तर देऊ शकले नाही पण अन्वय सर जेव्हा माझ्यापासून दूर झाले तेव्हा त्यांचं माझ्या आयुष्यातील स्थान समजलं. ह्या पूर्ण काळात मी माझ्यातच हरवले होते. मी मुक्त झाले ते काल माझ्या वाढीदिवशी. काल मी त्यांना होकार कळविला आणि त्यांनी एक क्षणही वाया न घालवता मला सरळ लग्नाचं विचारलं. मला तुमच्याशी बोलायला वेळच मिळाला नाही म्हणून सरळ ह्यांना इथे घेऊन आलेय. तुम्ही ह्यांना ओळखत नाही पण मी खूप जवळून ओळखते. तुमच्यानंतर जर मला कुणावर पूर्ण विश्वास असेल तर फक्त अन्वय सरांवर. तरी आई-बाबा मला अन्वय सरांवर पूर्ण विश्वास आहे की ते मला कायम खुश ठेवतील. आम्हाला तुमची सहमती हवी. तुमच्या परवानगीशिवाय आम्हाला काहीच करायचं नाही. "

स्वरा बोलून गेली आणि काही वेळ सर्व शांत झाल. त्यांचा मनात काही प्रश्न असतील हे अन्वयला जाणवलं होत म्हणून तोच आता म्हणाला," मला माहित आहे तुमच्या मनात खूप प्रश्न असतील सो तुम्हाला हवा तेवढा वेळ विचार करू शकता पण तत्पूर्वी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. खर सांगू आईबाबा मी तुम्हाला खोट सांगणार नाही की स्वराला तिच्या चेहऱ्यामुळे माझ्या घरी त्रास होणार नाही पण त्या प्रत्येक त्रासात मी तिच्यासोबत असून तिच्या चेहऱ्यावर हसू आणेन हा शब्द आहे माझा. मला स्वराची सर्व स्वप्न पूर्ण करायची आहेत. तिच्यासोबत सुंदर भविष्य निर्माण करायच आहे. तिला सन्मानाची वागणुल द्यायची आहे फक्त त्यासाठी तुमचा होकार हवाय. बाकी कसलीच अपेक्षा नाही. तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या. तुमचा होकार येणार नाही तोपर्यंत मी वाट पाहीन मग कितीही दिवस लागू दे. स्वरासाठी मी कितीही दिवस वाट बघायला तयार आहे."

अन्वयने बोलून वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला होता पण आई-बाबांच्या चेहऱ्यावरून कशाचाच अंदाज येत नव्हता. अन्वय- स्वराच बोलणं झालं होतं. सर्व कस शांत वाटत होतं. दोघांना भीतीही वाटत होती तेवढ्यात आई हळूच हसत म्हणाल्या," अन्वय माझ्या मुलीच्या निर्णयावर मी कधी शंका घेतलीच नाही तेव्हा आजही शंका घेण्याचा प्रश्न येत नाही. मी रोज पाहिलं आहे अन्वय स्वराच्या चेहऱ्यावरून मुलांना जज करताना. तू पहिलाच आहेस ज्याला तिच्या चेहऱ्याचा फरक पडत नाहीये. तू इथपर्यंत आला आहेस लग्नाच बोलायला म्हणजे तु तिच्याबद्दल किती सिरीयस आहेस हे समजू शकतो त्यामुळे वेळ घेण्याचा प्रश्नच येत नाही. मला शंका होती की माझ स्वप्न कधी पूर्ण होणार की नाही पण आज तुझ्यामुळे ते पूर्ण होतंय. अन्वय थॅंक्यु स्वराच्या आयुष्यात आनंद आणायला, तिला प्रत्येक क्षणी हसवायला. मला विश्वास आहे की तू कधीच तिची साथ सोडणार नाहीस. माझा होकार आहे तुमच्या लग्नाला. बनवा सुंदर अस आयुष्य. माझी सहमती आहे."

आई बोलून गेल्या आणि आता सुई फिरली ती तिच्या बाबांवर. ते तिघेही त्यांच्याकडे बघत होते आणि बाबा उत्तरले," माझ्याकडे काय बघत आहात? ह्या दोघांचा निर्णय तोच माझा निर्णय. मी काही वेगळं बोलणार आहे का? मुलीचा बाप म्हटलं तर मला आता सर्व तयारी करायला घ्यावी लागेल लग्नाची. मी तर खूपच खुश आहे माझ्या मुलीचा निर्णय ऐकून. खुश राहा दोघेही."

बाबा बोलताच सर्वांचे चेहरे क्षणात खुलले पण स्वरा हळूच म्हणाली," थॅंक्यु तुम्ही माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवल्याबद्दल पण मला लग्न धूम धडाक्यात करायचं नाही. मला कोर्ट मॅरेज, माझ्या काही खास लोकातच करायला आवडेल. जिथे फक्त माझे काही निवडक लोक असतील बाकी कुणीच नाही. तुम्हाला चालेल ना अन्वय सर?"

अन्वय हसतच उत्तरला," मलाही तसच वाटत पण बाबा तुमच्या निर्णयाचा आदर करतो. तुमची एकुलती एक मुलगी आहे सो तुम्ही घेणार तो निर्णय मला मान्य असेल. तुम्ही मिळवुन ठरवा तुम्हाला काय आवडेल ते."

स्वराचे बाबा आता काही क्षण शांत राहत उत्तरले," इच्छा तर खूप आहे आहे पण स्वरा म्हणतेय तेसुद्धा पटत आहेे तेव्हा ती म्हणतेय तेच होईल."

दोघांनीही होकार दिला आणि आता सर्वांचे चेहरे आनंदाने न्हाहून निघाले. स्वराने बाबांना धावतच मिठी मारली. आज स्वरा आईबाबांच्या मिठीत होती आणि संपूर्ण घर हास्याने उजळून निघालं होत. प्रत्येक आईवडिलांच स्वप्न असत आपल्या मुलीच लग्न बघण्याच. एक वेळ अशी होती की ते स्वप्न कधी पूर्ण होणार की नाही ह्याची सर्वाना शंका होती पण अन्वयने येऊन ते देखील स्वप्न पूर्ण केलं.

*******

सायंकाळची वेळ होती. जवळपास दोन तास अन्वयला झोप लागली होती. अन्वय उठताच स्वरा- अन्वय दोघांनीही चहा घेतला. आता जरा तो फ्रेश वाटत होता. दोघांचाही चहा होताच स्वरा मोठ्याने ओरडली," आई सरांना बाहेर फिरायला नेतेय ग!! तू स्वयंपाक बनवून ठेव. खूप भूक लागली आहे आम्हाला. तोपर्यंत येतो आम्ही "

स्वराने आईला सांगितले आणि स्वरा-अन्वय बाहेर फिरायला निघाले. ते हिवाळ्याचे दिवस होते. अंधार पडला होता. गावात शेती, मोकळं वातावरण असल्याने थंडी जरा जास्तच जाणवत होती. अन्वय बाहेर निघाला आणि त्याला थंडी जाणवू लागली पण स्वरा निवांत होती. हळूहळू ते समोर जाऊ लागले. सायंकाळची वेळ असल्याने गावात बरीच गर्दी होती. ते जात होते आणि पुन्हा एकदा स्वराला जाणवू लागल की गावातले लोक आपल्याकडेच बघत आहेत. स्वराला आता राहवलं नाही आणि हळूच तिने अन्वयच्या चेहऱ्यावर नजर टाकली. अन्वयचा चेहऱ्यावर हसू होते म्हणजे तोही ह्या लोकांचं अस बघन एन्जॉय करत होता. त्याने लोकांची वागणूक क्षणात स्वीकारली म्हणून स्वरा सुखावली होती. आज त्याला अस बघून तिला आपल्याच निवडीवर अभिमान वाटत होता. तो चालत होता तर आज तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. इतकं प्रेम आज तिला त्याच्यावर येत होतं.

हळूहळू एकमेकांकडे बघत त्यांची सैर सुरू होती. गावातल्या जागा बदलत होत्या, लोक बदलत होते पण सर्वांच्या त्या नजरा मात्र तशाच होत्या. स्वराला त्याचा फरक पडत नव्हता पण अन्वयलाही काही वाटत नाहीये म्हणून ती जरा शांत झाली होती. चालता- चालता आता ते गावाच्या बऱ्याच समोर आले. अन्वयला थंडी लागत असल्यानेे तिने जास्त समोर न जाण्याचा निर्णय घेतला. गावाच्या जवळच ओढा होता. ते दोघेही तिथे पोहोचले आणि स्वराच आवडत ठिकाण आल्यावर ते तिथेच बसले. बाहेरच वातावरण खूप रोमँटिक होत. त्यामुळे स्वराची नजर इकडे-तिकडे फिरत होती. ती खूप दिवसाने इकडे आली म्हणून त्यावरून तीच लक्ष हटत नव्हतं त्यामुळे तीच काही क्षण अन्वयकडे लक्ष गेलं नव्हतं. तिची नजर फिरून आता त्याच्यावर पडली आणि तिला जाणवू लागली की तो काहीतरी विचार करतोय. तिला ते लक्षात येताच तीने विचारले," अन्वय सर काही झालय का?"

कितीतरी वेळेपासून शांत असलेला अन्वय हळूच उत्तरला," खूप भीती वाटतेय मला स्वरा."

स्वराने क्षणभर हसतच त्याला म्हटले," तुम्ही अंधाराला घाबरता मला माहिती नव्हतं. आधी माहिती असत तर आलोच नसतो इथे. हरकत नाही, मी आहे ना इथे मग कशाला काळजी करता?"

स्वरा हसत होती पण अन्वय अजिबात हसला नव्हता. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू होत हे तिला तिला पुढच्याच क्षणी जाणवल. ती त्याचा चेहरा वाचण्यात व्यस्तच होती की तो अनपेक्षितपने उत्तरला," रात्रीची नाही स्वरा, तुझी भीती वाटतेय! खूप खूप भीती वाटतेय."

त्याच उत्तर ऐकून स्वरा शांतच झाली. ती मनातून उदास झाली होती कारण अन्वय अस काही बोलणार तिला अस स्वप्नांत देखील वाटलं नव्हतं तरीही चेहऱ्यावरचे भाव लपवत ती हसतच म्हणाली," माझ्या चेहऱ्याची भीती वाटते आहे तर? वाटणारच ना!! आहेच चेहरा इतका खराब तर कुणालाही भीती वाटणारच."

स्वरा बोलून मोकळी झाली तर अन्वय तिच्याकडे रागाने बघत होता. तिला त्याच्या मनात काय सुरू आहे समजत नव्हत म्हणून एकटक त्याला बघत होती तर अन्वय आपला राग शांत करत म्हणाला म्हणाला," चेहऱ्याची नाही वेडाबाई तर माझ्या घरच्यांची. तुझ्या घरून तर होकार मिळाला पण माझ्या घरी तुला कुणी काही बोलल तर? बाहेरच ठीक होत ग मी ओरडू शकत होतो पण माझे घरचेच जर तुला त्रास देतील तर त्यांना कस बोलू, त्यांचा विचार करताना तुझ्यासोबत अन्याय झाला तर? हीच भीती त्रास देतेय केव्हापासून."

अन्वय नजर खाली करून बसून होता तर स्वराच्या चेहऱ्यावर आता थोडं हसू आलं आणि ती म्हणाली," मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही माझ्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही. राहिला प्रश्न घरच्यानि त्रास देण्याचा तर मी म्हणेन की सर तुम्ही मला अजून ओळखलं नाही. मी एवढीही कमजोर नाहीये हो. आजपर्यंत जगाचा त्रास सहन करून स्वतःला सांभाळल ना मग आता माझ्याच खास व्यक्तीसाठी दोन शिव्या खाऊ शकणार नाही का? खर सांगू तर माझा चेहरा चांगलाही असता ना तरी आईने मला शिव्या दिल्या असत्याच. सासू सुनेच नात तसच असत हो! थोडं तिखट! ते तुम्हाला नाही कळणार! फक्त आता फरक असा आहे की दोन शिव्या जास्त खाईल. पण खरं सांगू माझ्या खास व्यक्ती सोबत मला राहायला मिळणार असेल तर मी आनंदाने खाईन शिव्या आणि नका पडू तुम्ही आमच्यात. आम्ही करू आमचं मॅनेज. तुम्हाला मधात पडायची वेळच येऊ देणार नाही मी. आता देखील भीती वाटत आहे का?"

स्वरा बोलून गेली आणि अन्वयच्या चेहऱ्यावर क्षणात हसू आलं. लोक उगाच स्वराचा चेहरा बघून कमेंट करत होते कारण तोच चेहरा, तेच हसू बघून अन्वयचे सर्व प्रश्न सुटतात होते. असे होते स्वरा-अन्वय. कदाचित कुणालाच न हरणारे..

ते काही क्षण तिथेच गप्पा मारत होते. थंडीही वाढू लागली होती आणि भूक देखील लागली होती म्हणून ते घराकडे निघाले. आता पुन्हा एकदा गावातून जाण्याची वेळ होती आणि स्वराने पटकन भीतीने त्याचा हात पकडला. गावातले लोक त्यांच्याकडे बघतच होते तरीही तिने हात सोडला नाही आणि अन्वय हे बघून उत्तरला," हे काय मॅडम? रोमांस आणि अगदी रस्त्यावर. इतका निर्लज्जपणा !! तुम्ही तर म्हणाला होतात लग्नाआधी फायदा घेणार नाही तुमचा तरीही इथेच सुरू झालीस?"

अन्वय हसत हसत बोलून गेला पण स्वराला त्याचे शब्द लागले. त्याचे शब्द येताच तिने त्याचा हात सोडला आणि हळूच उत्तरली," सर काही वर्षांआधी हीच मूल होती ज्यांनी कधी भूत तर कधी माकड म्हणून मला चिडवल होत. ते म्हणाले होते की तुला एखादा चांगला मुलगा ढुंकूनसुद्धा बघणार नाही पण नकळत तुम्ही आयुष्यात आलात आणि सर्व काही बदललं. आज मला तुमचा हात पकडून त्यांना सांगायचं आहे की मलाही तो मिळाला. ज्याला चेहऱ्यावर नाही तर मनावर प्रेम आहे. आज हे सर्व मला विचित्र नजरेने बघत आहेत ना मला त्याचा आनंद होतोय कारण मला त्यांना सांगायचं आहे की मलाही मिळाला आहे माझा जिवलगा. तुम्ही कितीही काहीही म्हणा पण देवाने आपल्यासाठी कुणीतरी बनवून ठेवलच असत. त्यांना मला आज डोळ्यात डोळे घालून सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखा नसतो. काही आहेत ज्यांनी आजही प्रेमाला जिवंत ठेवलं आहे. मीही त्यातलीच एक नशीबवान! प्रेमासाठी रंग, वय महत्त्वाचं नसत. महत्त्वाचं असत ते साफ मन. माझ्याकडे ते कदाचित आहे म्हणूनच मला जगातला सुंदर जिवलगा मिळाला. मला त्यांना ह्याक्षणी निरुत्तर करायचं आहे म्हणजे पुढे कधीच कोणत्याच स्वराला ते टाकून बोलणार नाहीत."

स्वराच्या नजर खाली करून चालू लागली, तिच्या डोळ्यात यातना होत्या. अन्वयने ते बघितलं आणि लगेच तिचा हात हातात घेत उत्तरला," अस आहे तर मग त्यांना सांग. दे उत्तर, मी आहे माझ्या स्वराच्या सोबती. तूच का उत्तर देशील मी पण देईल प्रत्येक पावली पण स्वरा मॅडम उत्तर देताना अशी मान खाली ठेवून चालणार नाही. चल मान वर कर आणि सांग जगाला तू किती सुंदर आहेस ते."

अन्वयने एक क्षण देखील तिचा हात सोडला नाही आणि स्वरा आज ताठ मान करून चालत होती. त्यांना कदाचित तोंडाने उत्तरे द्यायची गरज नव्हती कारण खरी उत्तरे तर त्यांच्या सोबतीत मिळत होती. ते सोबत होते आणि लोक त्यांना बघत होते. कदाचीत ह्यापेक्षा सुंदर उत्तर लोकांसाठी दुसर काहीच नव्हतं. सोबत होती एकमेकांची आणि सोबत होत न संपणार प्रेम..

स्वरा त्याच्या शब्दाने पुन्हा एकदा सुखावली आणि तिने त्याचा हात घट्ट हातात घेतला. ते जात होते आणि लोक बघत होते. त्यांना ही शिकवण होती जगाला की कोणत्याही व्यक्तीला कमी लेखू नका कारण प्रत्येक व्यक्ती चेहरा, रंग, वय, वजन पाहणारा नसतो. प्रेम करायला शुद्ध मन लागत ते असलं की सर्वाना हवा तो जिवलगा मिळतोच.."

जग सारे इथे थांबले वाटते
भोवताली तरी चांदणे दाटते
मर्म बंधातल्या ह्या सरी बरसता
ऊन वाटेतले सावली भासते
हो ओघळे थेंब गाली सुखाचा
मिटे अंतर लपेटून घेता
तू माझा मीच तुझी सख्या
जिवलगा...जिवलगा...जिवलगा...जिवलगा
ऐल ही तूच अन पैल ही तू सख्या
जिवलगा...जिवलगा...जिवलगा...जिवलगा…

मौन नात्यातले बोलते सारखे
शब्द माझेच आता मला पारखे
अंतरंगातले रंग हे शोधण्या
भेटलो एकमेकां मनासारखे
रोज दारावरी सांज ओथंबते
भोवताली तरी चांदणे दाटते
मर्म बंधातल्या ह्या सरी बरसता
ऊन वाटेतले सावली भासते
विरघळे थेंब हळव्या मनाचा
रिते अंबर मिठीतुन झरता
तूच हृदयातही तूच श्वासात ह्या
जिवलगा...जिवलगा..जिवलगा...जिवलगा
आज ही ती जुनी हाक येते मला
जिवलगा...जिवलगा...जिवलगा...जिवलगा...