अगर लफजो से प्यार बया होता
तो तेरे शायरी बन जाते
फिरते रेहते लोगो की जुबा पर
हम तो तेरे आशिकी केहलाते!!
स्वरा तिचा मॅसेज बघून क्षणभर हसली आणि दोघेही समोर चालू लागले. तीच हृदय आज एक क्षण धडधड करायचं थांबल नव्हतं. तिची नजर सतत त्याच्यावर होती..बोलायला ओठ आतुर होते पण शब्द निघत नव्हते आणि तिच्या मनात आलं,"अन्वय सर माझं तुमच्यावर प्रेम आहे. खूप प्रेम आहे. मला तुमचं आयुष्य बनवणार?"
ते वाक्य मनातच होत. आज ते बाहेर येणार होत का??
दोघेही चालत होते. अन्वय समोर बघत होता तर स्वराची नजर अधून-मधून त्याच्यावर जात होती. तो आजही खूपच सुंदर दिसत होता म्हणून ती त्याला पाहण्यापासून थांबवू शकली नाही. काहीशी अशीच स्थिती अन्वयची देखील होती. त्याचीही नजर आज तिच्यावर स्थिर नव्हती. त्याच्याही मनात काहीतरी सुरू होत. ते चालतच होते की तिला आवाज आला…
पाहताच तुझंला भान माझे हरपले
नयनरम्य रूप तुझे पाहण्याचे भाग्य मला आज मिळाले
कशी उधळावी स्तुतिसुमने ह्या मोहक सुंदरतेची
तुला पाहिले आणि पाहताना शब्द हवेतच विरले..
अन्वयच्या आवाजात इतकी सुंदर रचना ऐकून स्वराच्या तोंडून शब्द निघाले," वाह!! क्या बात है! सुबान अल्लाह!! कुणासाठी आहे ही?"
अन्वय तिच्याकडे बघून क्षणभर हसला आणि हळुवार स्वरात उत्तरला," माहिती आहे तू आता दुसऱ्याची अमानत आहेस पण आज तू इतकी सुंदर दिसत आहेस की खरच शब्दांना ओठांवर येण्यापासून थांबवू शकलो नाही. त्याला नको सांगू हे नाही तर राग येईल त्याला. त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल मी अस काही बोललो हे त्याला आवडणार नाही पण हे स्वीकारावं लागेल की आज खरच खूप सुंदर दिसत आहेस!! शांत स्वरावर शांत रंगाच प्रतीक हा व्हाइट कलर!! शब्दात व्यक्त करणे सोपे नाही ह्या क्षणाला म्हणून ही शायरी.."
स्वरा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्यात व्यस्त होती. तिने जणू त्याचे पुढचे शब्द ऐकलेच नाही असा भाव तिने चेहऱ्यावर आणला कारण प्रत्यक्षात काय होत तिच्या मनात ते तिलाच माहिती होत. ती मनातल्या मनात बोलत चालत राहिली तर अन्वय तिच्याकडे अधून-मधून बघत साथ निभावत राहिला. आता त्यांच्यात एक वेगळीच शांतता होती. त्याला वाटत होतं की आपण शायरी बोलून चूक केली तर तिच्या मनात ते शब्द सतत दरवळत होते. अन्वय आणि कविता एक वेगळंच रसायन होत!! जे कधीकधीच यायचं पण मनात रंगांच्या वेगवेगळ्या छटा पसरवून जायचं. काहीच वेळात ते हॉटेल आलं आणि दोघेही मध्ये जाऊन बसले. दोघेही बसलेच होते की अन्वय खुर्चीवरून उठत म्हणाला," स्वरा मी आलोच जरा! इकडे पोहोचलो म्हणून आईला कॉल करायचा राहूनच गेला. ती काळजी करत बसेल. सॉरी दोन मिनिटं एकट सोडतोय पण वाट बघ माझी. मी आलोच"
ती चेहऱ्यावर हसू आणत मनातल्या मनात म्हणाली," आयुष्यभर वाट पाहीन.."
तो तिच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला," काही म्हणालीस का?"
स्वराने हसूनच नकार दिला पण त्याला आपल्या मनातील कायमच कळत म्हणून तिच्या चेहऱ्यावरच हसू काही कमी झालं नव्हतं.
स्वरा क्षणभर सर्वाना बघत तिथेच बसून राहिली तर अन्वय काहीच क्षणात बाहेर गेला. जवळपास १० मिनिट गेले जेव्हा अन्वय पुन्हा आला. अन्वय पुन्हा येऊन निवांत बसला आणि स्वरा उत्तरली," मग कसा गेला प्रवास तुमचा? थकला असणार ना तुम्ही?"
अन्वय तिच्याकडे बघतच उत्तरला," बस गेला कसातरी!! कालपासून ठरवलं होतं की तुझा बर्थडे इकडेच सेलिब्रेट करू म्हणून मग जरा लवकरच सर्व आटोपून इकडे आलो. माहिती होत रागावशील कॉल नाही केला म्हणून पण म्हटलं समोर बघशील तर तो रुसवा क्षणात नाहीसा होईल. थकलो होतो आधी पण तुला बघितलं आणि तोही नाहीसा झाला."
अन्वय बोलून गेला आणि स्वराच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव पसरले. तिला आता नक्की काय बोलू कळत नव्हतं. त्यामुळे तिने नजर खालीच केली तेवढ्यात अन्वय म्हणाला," म्हणजे तुझा वाढदिवस आहे ना आज तर तुला खुश बघून थकवा गेला. नाही तर काय फायदा झाला असता येण्याचा."
अन्वयने स्पष्टीकरण दिलं आणि स्वराच्या चेहऱ्यावर हसू तसच राहील कारण तिला माहिती होत त्याला खोट बोलता येत नाही. आता तो शांत झाला आणि ती त्याला बघत राहिली. अन्वयच बोलून झालंच होत की वेटर ऑर्डर घ्यायला आला आणि फायनली त्यांची शांतता तुटली. अन्वयने स्वतासाठी जेवण ऑर्डर केलं आणि स्वरानेही स्वतासाठी मागवलं. पुन्हा ते शांत बसले. स्वरा आता जरा जास्त बोलत होती तर अन्वय मागे वळून कुणाला तरी बघत होता. तिच्या ते लक्षात येत होतं पण ती काहिच म्हणाली नाही. असेच १० मिनिट गेले आणि स्वराने न राहवता विचारले," काय झालं सर मागे वळून कशाला बघत आहात? कुणी येणार आहे का पुन्हा? दीपिका ताई वगैरे??"
तो काही बोलणार त्याआधीच वेटरने दोन लेयरचा समोर केक आणून ठेवला. स्वराला अजिबात अंदाज नव्हता की अन्वयने केक ऑर्डर केला होता. ती त्याच्याकडे बघतच होती की अन्वय जाग्यावरून उठून मोठ्याने म्हणाला," हॅलो फ्रेंड्स!! आज माझ्या सर्वात सुंदर आणि खास मैत्रिणीचा वाढदिवस आहे सो तुम्ही आम्हाला जॉईन होऊन आमचा दिवस खास बनविणार का? प्लिज!! तुमच्याशिवाय हा क्षण खास होऊच शकत नाही. इथे आम्ही दोघेच आहोत तेव्हा तुम्ही जॉईन झालात तर आम्हाला आमचे मित्र सोबत असल्याचा भास होईल."
काही क्षण सर्व शांत होत. स्वरा इकडे- तिकडे बघत होती आणि मधातच साऊंड सिस्टीम सुरू झाली. त्यातून शांत मधुर स्वर बाहेर येऊ लागले. स्वरासाठी ते सर्व सरप्राइज होत. तिला नक्की काय रिऍक्ट करू कळत नव्हतं. ती विचार करतच होती की आजूबाजूच्या टेबलवरचे लोक त्यांच्याजवळ आले आणि अन्वयने तिला केक कट करायला सांगितला. स्वराच्या डोळ्यात क्षणभर पाणी आलं. तिने भरलेल्या डोळ्यानेच केक कट केला तेव्हाच अन्वय मोठ्याने म्हणाला," हॅपी बर्थडे टू यु..हॅपी बर्थडे टू यु.. हॅपी बर्थडे डिअर स्वरा...हॅपी बर्थडे टू यु.."
स्वराने एका हाताने डोळ्यातले पाणी पुसले आणि अन्वयच्या स्वरात सर्वांनी स्वर मिसळले. पुढच्याच क्षणी स्वराने केक कट करून अन्वयला भरविला. अन्वयनेही तिला केक भरविला आणि आजूबाजूचे सर्व लोक तिला वीश करू लागले. खूप सुंदर क्षण होता तो! स्वरा तर भारावून गेली होती. दोघांनी एकमेकांना केक भरवताच अन्वयने वेटरला सर्वाना केक द्यायला सांगितले आणि पुन्हा एकदा मोठ्याने अन्वय म्हणाला," थॅंक्यु फ्रेंड्स आमच्या आनंदात सामील व्हायला. आज तुमच्यामुळे आमचा आनंद पूर्ण झाला आणि मी माझ्या खास लोकांना असच राहू देणार नाही. आज जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत जेवढे लोक येतील त्या सर्वाच बिल होईल ते मी भरेन. आफ्टरऑल यु आर फॅमिली..थॅंक्यु आमच्या खास क्षणाचा भाग होण्यासाठी.."
अन्वय खाली बसला आणि स्वरा हळूच हसत म्हणाली," काय आहे हे अन्वय सर?"
अन्वय हसतच उत्तरला," तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघता ह्यावा म्हणून थोडासा प्रयत्न. इथे असतो तर खूप काही केलं असत पण आता जेवढं जमलं तेवढं करतोय. ह्या काही वेळात जेवढं अरेंज करता आलं तेवढं केलं. बस एवढंच जमलं. आणखी खूप काही करायचं होतं पण राहून गेलं."
स्वरा क्षणभर तर त्याच्या विचारातून बाहेर पडलीच नव्हती. काय होता अन्वय? तिच्या समजण्या पलीकडे अस म्हणता येईल त्यामुळे ती हळूच हसत उत्तरली," थॅंक्यु सर!! माझ्या आयुष्यात येण्यासाठी."
अन्वय केवळ हसला.. काहीच क्षणात ऑर्डर आले आणि हळूहळू दोघेही जेवण करू लागले. आज दोघेही शांतच होते. अन्वय निवांत जेवण करत होता तर स्वरा अधून- मधून त्याच्याकडे बघत होती. असा एक क्षण नव्हता की स्वराने त्याचा चेहरा डोळ्याखालून काढला नव्हता. आज तीच त्याच्यावरच प्रेम आणखीच वाढत होत. आजपर्यंत तिने त्याच प्रेम बघितलं होत पण काळजी, रोमांस आज बघायला मिळाला आणि ती स्वतःच त्यातून बाहेर यायला तयार नव्हती. आता जेवण देखील झालं आणि अन्वय सर्वांचे आभार मानून, बिल पे करून बाहेर पडला.
रात्रीचे साडे नऊच्या आसपास झाले होते. अन्वय- स्वरा चालत-चालत स्टेंशनवर गेले. तो प्रत्येक क्षण तिच्यासोबत चालत होता आणि स्वरा उत्तरली," सर तुम्ही सोबत येणार आहात मला सोडायला?"
अन्वय तिच्या नजरेला नजर देत म्हणाला," नको येऊ का? तू म्हणशील तर नाही येत."
स्वराने त्याच्या डोळ्यात बघितलं आणि तीच हृदय जोराने धडकू लागलं. ती कसाबसा आवाज काढत उत्तरली," चला ना मला तर फार आवडेल. सोबत होईल तुमची तेवढ्याच वेळ. आजचा दिवस तुमच्या संगतीत पूर्ण होईल ह्यापेक्षा मोठं गिफ्ट काय असेल माझ्यासाठी? मला आवडेल चला. "
अन्वय तिच्याकडे बघून हसत उत्तरला," अग आज कार नाही तेव्हा तुला एकट जाऊ द्यायला मन माननार नाही. तस पण मला आता कुठे घरी जायच आहे. मी निवांत आहे पूर्ण रात्र. सो चल तेवढंच फिरण होईल."
अन्वयने स्पष्टीकरण दिले पण स्वराला त्याची गरजच नव्हती. ती तर त्याच्यासोबत प्रत्येक सेकंद राहायला स्वतःच तयार होती. ते स्टेशनवर पोहोचले आणि काहीच क्षणात ट्रेन आली. ते धावत-धावतच ट्रेनमध्ये चढले आणि ट्रेन सुरू झाली. आज ट्रेनमध्ये फार गर्दी नव्हती. ट्रेनचा डब्बा खाली-खाली जाणवत होता. दोन-चार लोक काय ते होते. बसायला जागाही होती पण बाहेर गार वारा सुरू असल्याने ते दोघेही दारावरच थांबले. हळूहळू ट्रेन गती पकडू लागली आणि वारा अधिकच थंड जानवु लागला. स्वराला थोडी थंडी वाटत होती ते त्याला जाणवत होतं म्हणून तो हळूच उत्तरला," स्वरा थंडी वाजत आहे तर बस तिथे. उगाच उभी राहू नकोस. तब्येत खराब होईल."
स्वराने नजरभर त्याच्याकडे बघितले आणि त्याच्या डोळ्यात बघत उत्तरली," सर हा क्षण मला कैद करून ठेवायचा आहे कायमस्वरूपी आणि हा गार वाराच त्याला खास बनवत आहे. तुम्हाला नाही कळणार काय आहे ह्या क्षणात ते?"
अन्वय पटकन उत्तरला," म्हणजे?"
स्वरा क्षणभर हसली आणि पुन्हा एकदा समोरच्या वातावरणात हरवली. ती काहिच बोलली नाही आणि त्यानेही पुढे काहीच विचारलं नाही. ट्रेन हळूहळू समोर जात होती. अन्वय अगदी स्वराच्या जवळ होता. स्वराने आज केस मोकळे ठेवले होते त्यामुळे ते उडून त्याच्या चेहऱ्यावर येऊ लागले. तिच्या त्या सिल्की सिल्की केसांचा स्पर्श त्याला होऊ लागला आणि तो वेगळ्याच जगात हरवला. त्याने तिचे केस बाजूला केले नाही उलट तो स्पर्श अनुभवण्यात त्याला जास्त आनंद मिळत होता. कधी कधी त्या केसांच्या मधून तो तिचा सुंदर चेहरा, घारदार डोळे बघायचा. तिने फक्त म्हटलं होतं पण अन्वय खरच तो क्षण आपल्या नजरेत कैद करत होता. तो तिच्या चेहऱ्याकडे बघतच होता की त्याच वेळी तिने त्याच्याकडे बघितले. तिची नजर त्याच्यावर पडताच त्याची धांदल उडाली. त्याने तिच्यावरून आपली नजर बाजूला केली. स्वराला ते बघून क्षणभर हसू आलं. अन्वय जरा गोंधळला होता की स्वरा म्हणाली," अन्वय सर तुम्ही मला बघायलाच आला आहात ना? तुमचं मन नाही राहू शकल ना मला बघितल्याशिवाय ? तेव्हाच तर इथे धावत- पळत आलात. उगाच कुणी कुणासाठी अस करत नाही. बरोबर बोलतेय ना मी?"
अन्वय नजर चोरत उत्तरला," नाही ग! सांगितलं ना तुला की पार्टी घ्यायला आलो. तुला का बघू? तुला बघायचा अधिकार फक्त स्वयमचा आहे. मला नाही त्यामुळे ते मी करणार नाही."
स्वरा हळूच हसत उत्तरली," मग तेच उत्तर माझ्या डोळ्यात बघून दिलं तर बर होईल. बघा बर माझ्या डोळ्यात आणि द्या उत्तर!! बघू तरी किती खर बोलता ते!!"
अन्वयने क्षणभर तिच्या नजरेला नजर देण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही तें जमलं नाही. तो समोरच बघत राहिला आणि स्वराला त्याच उत्तर मिळाल.
रात्रीचे साडे दहा वाजले होते जेव्हा ते वसईला पोहोचले. वसई आली आणि अन्वय स्वराला म्हणाला," चला मॅडम मी आता निघतो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आयुष्य असा जगा की तुमच्यावर पुस्तक लिहिल्या जावं. स्वयम- तुझी प्रेम कथा जगभर फेमस व्हावी ह्यापलीकडे आशीर्वाद द्यायला काहिच नाहीत बालिके!!"
अन्वय हसत-हसत जाणारच होता की तिने त्याचा हात पकडला आणि हसत उत्तरली," मॅनर्स काय तुम्हालाच दिले आहेत? मलाही आहेत. अन्वय सर मला अजिबात आवडणार नाही मी सोबत असताना कुणी इतक्या रात्री दुसरीकडे राहावं. तेही माझ्या जवळच्या लोकांनी. सो तुम्ही सोबत येणार आहात माझ्या!!"
स्वराने त्याचा हात सोडला आणि तो तिथेच उभा राहिला. तो काहीच बोलला नाही आणि स्वरा हसत उत्तरली," काळजी करू नका सर!! मी तुमच्यासोबत काही चुकीच करणार नाही. तुम्ही ठेवू शकता माझ्यावर विश्वास. मी पण तुमच्यासारखीच जेंटल वूमन आहे. सो यु कॅन ट्रस्ट मी!!"
स्वरा तर हसलीच पण आता अन्वयही हसत उत्तरला," विश्वास मला तुझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त आहे. पण प्रश्न हा नाही. राहायला काही प्रॉब्लेम नाही स्वरा पण स्वयमला आवडणार नाही कदाचित. त्याला माहिती झालं तर प्रॉब्लेम होईल. तुमच्या लाइफमध्ये गोंधळ नको उगाच. त्यापेक्षा मी जातो हॉटेलवर. एक रात्र काढेन आणि उद्या फ्लाइट पकडून घरी जाईन."
अन्वय तिच्याकडे बघतच होता की स्वरा उत्तरली," तो माझा प्रॉब्लेम आहे मी मॅनेज करेन. तुम्हाला यायच आहे की नाही ते सरळ सांगा."
अन्वय अजूनही शांतच होता आणि स्वरा चिडत म्हणाली," इट्स ओके जा. पण माझ्या वाढदिवशी तुम्ही तुम्ही मला दुखावलं हे कायम लक्षात राहील. इतकं सर्व चांगलं झाल्यावर एका क्षणासाठी हा दिवस खराब झाला म्हणून ही बोच अशीच कायम राहील माझ्या मनात!! आयुष्यभर!!"
ती चिडून समोर जाऊ लागली तर अन्वय काही क्षण तिथेच उभा होता. ती समोर जात होती आणि शेवटी तोही धावतच तिला जॉईन झाला. तिच्या चेहऱ्यावर आता क्षणात हसू पसरल पण ती त्याला काहीच बोलली नाही. ते दोघेही शांत- शांत प्रवास करत होते. खर तर स्वराला ह्याक्षणी त्याच्याशी खूप काही बोलायच होत पण तिने मनाला आवरून धरलं होत. त्यांचा हा शांत-शांततेचा प्रवास दहा- पंधरा मिनिटे असाच सुरू राहीला. तिची रूम आली आणि ती दार उघडत म्हणाली," सर तिकडे वॉशरूम आहे तुम्ही फ्रेश व्हा. भरपूर थकला असणार!! माहिती आहे तुम्ही कूल आहात..तुम्हाला गरज नाही पण आणखी जास्त कुल दिसणार!! अजून भरपूर मुली पटवायच्या आहेत तुम्हाला!!"
अन्वय तिच्या बोलण्यावर स्मित करू क्षणात वॉशरूममधून फ्रेश व्हायला गेला आणि अगदी काहीच क्षणात बाहेर आला. त्याला बघताच स्वरा हसतच उत्तरली," सर माझा कुणी भाऊ नाही हा की त्याचे कपडे इथे असतील. जे तुम्हाला घालायला मिळेल. सो आज तुम्हाला असवच झोपावं लागेल. पर्याय नाही की माझा।प्लाजो देऊ. इथे आपन दोघेच आहोत कुणिच बघणार नाही आणि मी कुणाला सांगणार पण नाही. आपलं।सिक्रेट राहील हे!!"
अन्वय तिच्या चेहऱ्यावरच हसू बघत म्हणाला," मिस टॉपर तुम्हाला अस वाटत नाहीये का तुम्ही माझं आज जास्तच खेचत आहात?"
अन्वय जरा डोळे मोठे करून बोलून गेला आणि स्वरा आपली नजर लपवत पटकन वॉशरूमला गेली. अन्वय फ्रेश होऊन गादीवर पडला आणि स्वरा १० मिनिटात कपडे चेंज करून पुन्हा परतली. तिने आधी अन्वयला पाणी देऊ केले आणि तीही त्याच्या बाजूला शांत बसली. आज सकाळपासून काम करून ती जास्तच थकली होती तर अन्वय प्रवासाने थकला होता म्हणून तो उशीला टेकून बसला. त्याच स्वराकडे लक्ष नव्हतं. तो जरा दीर्घ श्वास घेत होता आणि स्वरा पटकन उत्तरली," सर तुम्ही मला खूप मिस केलं ना?"
तिच्या प्रश्नाने अन्वय जरा गोंधळला. त्याने तिच्याकडे बघने सुद्धा पसंद केले नाही. तो काय उत्तर देऊ म्हणून विचार करत होता आणि काही वेळाने म्हणाला," नाही तर! मी का आठवण करू तुम्हाला? मी तर माझ्या गर्लफ्रेंड सोबत मस्त बिजी होतो. खूप एन्जॉय केला तिच्यासोबत!! तिच्यापासून मला वेळच मिळाला नाही."
त्याच उत्तर येताच स्वरा मोठ्याने हसू लागली. इतकं मोठ्याने की तिला स्वतःवरच भान नव्हत. तीच हसन बघून अन्वय विचार करत उत्तरला," इतकं हसायला काय झालं? मी काय जोक मारला?"
त्याचे शब्द येताच स्वरा शांत झाली आणि त्याच्याकडे बघत म्हणाली," अन्वय सर तुम्हाला खोट पण बोलता येत नाही हो नीट!! ही गोष्ट सोडून काहीही सांगितलं असत तर मी नक्कीच मान्य केलं असत. पण ह्या गोष्टीवर मला विश्वास नाही."
अन्वयची तिच्याकडे बघत उत्तरला," का विश्वास नाही? का मला मुली पटू शकत नाही? अरे लाइन लागली असते बर का!!"
स्वरा त्याच्याकडे बघत पुन्हा उत्तरली," बर विश्वास ठेवेन आधी माझ्याकडे बघून सांगा!! बस एवढं छोटस काम. चला बघा!!"
अन्वयने तिच्याकडे बघितले. ती एकटक त्याच्याकडे बघत होती आणि तो खरच हिम्मत करू शकला नाही. तो पुन्हा गुपचूप बसला. स्वराला त्याच वागणं बघून हसू येत होतं. काही क्षण सर्व शांत होत आणि स्वराला जाणवलं की हीच योग्य संधी आहे अन्वयला सर्व सांगण्याची. त्याला सर्व सांगायचा तिने विचार केला आणि तिच्या हार्ट बिट्स पुन्हा फास्ट झाल्या. तिने डोळे बंद केले. स्वतःच्या हृदयावर हात ठेवला. त्याला शांत केले आणि हळुवार शब्दात उत्तरली," अन्वय सर मला तुम्हाला काही सांगायचं आहे बोलू शकते का?"
अन्वय तिच्याकडे बघून हसतच उत्तरला," बापरे! पुन्हा एक प्रश्न. नको बाबा.."
तो हसत होता तर ती मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत होती. तिला बघताच त्याच हसन आपोआप बंद झाल आणि तो उत्तरला," हा बोला!!"
त्याने परवानगी देताच स्वरा गॅलरी मध्ये जाऊन उभी राहिली आणि हळुवार शब्दात उत्तरली," सर ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी एकटी- एकटी राहायचे. स्वतःलाच घाबरायचे. जगण्याचे गोल्स नव्हते, आयुष्यात लोक नव्हते की स्वप्न नव्हते. अस म्हणू शकता की मी जिवंत बॉडी होते. दुसऱ्या शब्दात मी जगण्याची इच्छाच हरवून बसले होते. तेव्हा एक व्यक्ती माझ्या आयुष्यात नकळत आला. ना मॅसेज, ना कॉल, ना टेलिग्राप. सरळ एंट्री!! त्याने न सांगताच माझ्या आयुष्यात बदल करायला सुरुवात केली. माझीही परवानगी न घेता मला मुक्त करायला सुरुवात केली. सुरुवातीला मला त्याच काहीच वाटत नव्हतं कारण मला आनंदासमोर दुसर काहिचंद दिसलं नाही पण जेव्हा मला समजलं की हे सर्व तो त्याच माझ्यावर प्रेम असल्याने करतोय तेव्हा मात्र खचले कारण असच कधीतरी राजने केलं होत. सेम पद्धत, सेम वागणं त्यामुळे काही क्षण का असेना मला त्यांच्यात फरक करताच आलं नाही. मी त्यालाच घाबरू लागले होते. त्याला विचारू लागले तू का आला आहेस माझ्या आयुष्यात? आता माझं काय हिरावून घ्यायच आहे? सर्वच तर घेतलं आहे. आता काय जीव घेणार आहेस?"
स्वरा बोलता बोलता भावुक झाली होती तर अन्वय तीच बोलणं शांतपणे ऐकत होता. स्वरा पुन्हा बोलून गेली," त्यावेळी माझं मलाच समजत नव्हतं मी कुठे चुकतेय पण त्याला त्याक्षणी घाबरल हे खरं. त्या पूर्ण प्रवासात माझी मैत्रीण मधु माझ्यासोबत होती. तिने मला आधी सांभाळल आणि जेव्हा मी बेटर फिल करू लागले तेव्हा तिने मला समजवल की त्याला पूर्णपणे न ओळखता त्याला जज करणे कितपत चुकीचे आहे. त्याला कशाची शिक्षा तू देत आहेस? तो जर खरच चांगला असेल तर मग तू आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाहीस. त्याने चांगल्या मनाने केलं असेल तर ह्यात त्याची काय चूक सांग? तिच्या त्या शब्दाने मी पहिल्यांदा भानावर आले आणि भीतीच्या पलीकडे जाऊन विचार करू लागले. ती मला म्हणाली होती की त्याला ओळख आणि मग ठरव तो कसा आहे. मला तीच बोलणं पटलं आणि मी त्याची प्रत्येक गोष्ट जवळून बघू लागले. त्याची मुलीकडे बघण्याची नजर असो की त्याच्या बोलण्या मागचं सत्य. मी त्याला ओळखू लागले आणि आयुष्यात पहिल्यांदा स्वताचच राग आला. कारण मी खरच त्याला ओळखायला चुकले. त्याची ती शांत नजर आणि लोकांना मदत करण्याची प्रवृत्ती बघून मी त्याची फॅन झाले. इतकी फॅन की त्याच्याशी बोलल्याशिवाय माझा दिवस जात नव्हता. एक वेळ पुरुषांचा विचार करून घाबरणारी मी केव्हा एका पुरुषाशी मैत्री करून बसले मलाच कळलं नाही. हळूहळू मी जसजसे त्यांना ओळखू लागले त्याची मला सवय लागली. इतकी सवय की तो बाजूला असला तरच माझा दिवस छान जायचा. इतक्यात त्याची सवय झालीच होती की त्याने मला दोन धक्के दिले. एक कायमस्वरूपी सोडून जाण्याचा आणि दुसरा त्याच माझ्यावर प्रेम आहे हे सांगण्याचा. धक्का एकच खोलवर लागला तो सोडून जाण्याचा कारण मला आधीच माहीत होतं की त्याच माझ्यावर प्रेम आहे म्हणून मला त्याचा राग आला नव्हता. तो खरच चांगला होता हे माझ्या मनाने स्वीकारलं होत त्यामुळे त्याच्या शब्दाने मला त्रास झाला नाही. त्रास झाला फक्त तो सोडून जातोय ह्याचा. आता कुठे मला त्याची सवय झाली होती. मी आनंदी राहायला लागले होते तेव्हा तो अस अचानक का सोडून जातोय या हे विचारायचं होत पण हिम्मतच झाली नाही. त्या रात्री माझा खूप गोंधळ उडाला होता. काय करू काय नको झालं होत आणि शेवटी माझ्या मनाने उत्तर दिलं. त्याला सांग की प्रेम करतोस तर संधी दे मला तुला समजून घेण्याची. मला इतकं सोपं नाही रे प्रेम स्वीकारणं. आता कुठे नात्यावर विश्वास बसू लागला आहे. प्रेम करायला थोडा तरी वेळ दे. थाम्ब काही दिवस. मी माझ्याच मनाशी निर्णय घेतला होता त्यामुळे खूप खुश होते. मी दुसऱ्या दिवशी त्याला काही करून थांबवणार होते. वेळ पडली असती तर रडलेजी असते पण त्याच रात्री स्वयमचा कॉल आला. त्याचा एक कॉल आणि सर्व बदललं. त्याने त्याची एक हकीकत सांगितली. मी त्याला त्यांच क्षणी माफ केलं आणि लग्नाची मागणी घालून त्याने मला एक धक्का दिला. एका धक्क्यातून आताच तर सावरले होते पुन्हा एक धक्का. मी आयुष्यात इतकी कधीच गोंधळले नव्हते जितकी त्यादिवशी गोंधळले आणि त्या नादात त्याला थांबवायचं राहूनच गेलं. माझा तो लकी चार्म मला सोडून गेला कायमचाच आणि सोबत घेऊन गेला ते माझं हसन!!"
बराच वेळ शांत बसलेला अन्वय उत्तरला," ह्यातलं तू बरच काही बोलली आहेस!! त्यांनतर मी तुझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं मग अजून आहे का काही सांगायला?"
स्वराने त्याच्याकडे बघितले नाही पण हळूच उत्तरली," हो खूप काही आहे. तुम्ही फक्त ऐकत राहा. तर तो गेला मुंबई सोडून आणि मग स्वयम आयुष्यात आला. त्याच्या बद्दल ऐकून मला फारच वाईट वाटलं होतं. त्याचे बाबा गेले हे ऐकून तर फारच जास्त वाईट वाटलं. त्याच वेळी त्याच्या आईने मला घरी बोलावलं आणि मला नकार देता आला नाही. खर तर तिथे जाताना मी खूप घाबरले होते कारण लग्न हा विषय पुन्हा येणार होता हे माहिती होत. तरीही मी गेले आणि तो प्रश्न सतत समोर येऊ लागला. कधी स्वयम कडून तर कधी त्याच्या आईकडून. जणू माझ्यावर एक प्रेशर बनत होत. एक वेळ अशी होती की त्याच्या उत्तराची मी वाट पाहत होते आणि आता त्याने लग्नाला विचारलं तरी मी काहिच बोलू शकले नाही. अस का होत होतं माझ्यासोबत? मला खरच माहिती नव्हत. मी खूप गोंधळले होते. दिवसरात्र एकच प्रश्न समोर होता..ना नीट झोप यायची ना काही काम व्हायचं आणि माझ्याकडे एकच पर्याय उरला. जो माझ्या प्रश्नांची उत्तरं देतो त्यालाच हा प्रश्न विचारन. मला माहित होतं हा प्रश्न ऐकल्यावर त्याला त्रास होईल पण ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नसत तर मी कदाचित जगू शकले नसते म्हणून स्वार्थी होऊन त्याला प्रश्न विचारला आणि त्याच उत्तर ऐकून जस नेहमी हसू येत तसच ह्याही वेळी आल!!"
स्वरा बोलतच होती की अन्वय म्हणाला," मी खूप हॅपी आहे तुझा तो निर्णय ऐकून. फायनली तुला प्रेमावर विश्वास बसला. मला कधीच वाटलं नव्हतं की मी तुला प्रेमावर पुन्हा विश्वास ठेवायला लावू शकेन पण झालं तेही. आता मला काहिच नकोय आयुष्यात. मग केव्हा काढली आहे लग्नाची तारीख?"
त्याचा प्रश्न ऐकून ती हसली आणि हळूवार बोलून गेली," खर तर मी गुंता सोडवायला त्याला कॉल केला होता पण झालं उलटंच. मी त्याच्या निस्वार्थ प्रेमाचे भाव बघितले आणि क्षणभर त्याच्यातच हरवले. कुणी माझ्यावर एवढं प्रेम कस करू शकत हा विचार मनात सतत येऊ लागला. त्या क्षणी तो गुंता सुटला नाही पण त्याच प्रेम बघून मात्र खूप आनंद झाला. एखादा व्यक्ती आपल्यावर आपल्यापेक्षा जास्त प्रेम करतो हा आनंद जगातल्या सर्वोत्कृष्ट आनंदातला एक आनंद. दिवस जसजसे जात होते तसतस माझं उत्तर मला मिळत होत. अफकोर्स ते पूजाने मला उलगडून सांगितलं नाही तर मला डम्बोल कळालं नसत. तिने मला प्रश्नही विचारला की का तू स्वयमने विचारताच होकार नाही दिलांस? प्रश्नही तिनेच विचारला आणि उत्तरही तिनेच दिलं."
अन्वय विचार करत उत्तरला," काय आहे मग त्याच उत्तर?"
स्वराने पहिल्यांदा त्याच्याकडे बघितलं आणि हसत उत्तरली," त्याच उत्तर सोपं आहे. माझं पहिल प्रेम स्वयम आहे ह्यात काहीच शंका नाही पण त्या गोष्टीला भरपूर वर्ष झाले. ह्या ८वर्षात खूप काही बदललं आणि त्या बदलण्यात जुनी स्वराही बदलली. मग तुम्हीच सांगा, जुनी स्वराच नसेल तर ती स्वयमला होकार कशी देणार? ही स्वरा आहे अन्वयची. ज्याने तिला जगायला शिकविल आणि स्वतःवर प्रेम करायला शिकविल. त्याने तिला एक नवीन रूप दिलं, एक आकार दिला. त्याने तिला नव्याने उभं राहायला शिकविल. इन शॉर्ट सर्व त्याचीच देणं आहे. मग ही स्वरा कोणाची? ही स्वरा पूर्णता बदलली आहे. ही स्वरा नवीन स्वरा आहे म्हणून ह्या स्वरावर फक्त तुमचाच अधिकार आहे. स्वयम आयुष्यात का आला ह्याच उत्तर विचार करते तेव्हा जाणवत " प्रेम हा शब्द चुकीचा नाही हे समजवायला" तुम्ही बरोबर म्हणता सर की कधी कधी लोक चुकतात तर कधी कधी परिस्थिती. प्रेम चुकीच नसत. आपण आजही सोबत असतो ना तर किती वेळात मला तुमचं प्रेम समजलं असत मला नाही माहिती पण तुम्ही दूर गेला आणि मला तुमच्या प्रेमाची कमी जाणवली. तुमच्या दुराव्याने मला प्रेमाचा अर्थ शिकविला. मी कदाचित तुमच्यात इतकी अडकले होते की त्याला उत्तर द्यायची हिम्मत करू शकले नाही. अन्वय सर तुम्ही मला प्रेमाचा अर्थ दिला आणि आता मला तुमचच प्रेम आयुष्यभर अनुभवायचं आहे. मी कबूल करते की माझं तुमच्यावर प्रेम आहे पण मला आता तुमची प्रेयसी बनून जीवन जगायच नाही तर तुमची अर्धांगिनी बनून आयुष्यभर तुमचं निस्वार्थ प्रेम अनुभवायच आहे. बोला देणार का मला अधिकार तुमचं प्रेम आयुष्यभर अनुभवन्याचा. बनविणार मला तुमचं आयुष्य??"
अन्वयच्या डोळ्यात पहिल्यांदा अश्रू होते आणि तो डोळे पुसतच उत्तरला," माझ्या आयुष्यावर फक्त तुझाच अधिकार आहे स्वरा. तू नाहीस तर ह्या जीवनाला काहीच अर्थ नाही. तू आहेस तरच सर्व आहे."
अन्वयच उत्तर आल आणि तिने धावतच त्याला मिठी मारली. आज दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. दोघांनीही एकमेकांना घट्ट कवेत घेतले होते. किती वेळ ते त्यांचं त्यांनाही माहीत नाही. बराच वेळ घट्ट मिठीत घेतल्यावर तो उत्तरला," स्वरा तू म्हणाली होतीस ना माझा फायदा उचलणार नाही, मग हे काय आहे?"
स्वराने पुन्हा मिठी घट्ट केली. दोघेही हसले आणि एका क्षणात कैद झाले.
रात्र सरत होती आणि स्वरा अन्वयच्या मिठीत झोपली होती. अन्वय तेंव्हाच उत्तरला," तुला माहिती आहे ना मी तुझ्यापेक्षा ६-७ वर्षाने मोठा आहे तरीही लग्न करणार आहेस माझ्याशी? लोक काय म्हणतील एका म्हाताऱ्यासोबत लग्न केलंस?"
स्वरा त्याच्याकडे बघत उत्तरली," लोक तर तुम्हालाही अस म्हणतील की एका भुतासोबत लग्न केलं. तुम्हाला चालत असेल तर मला का नाही? तसही खर प्रेम रंग बघून होत नाही हे तुम्ही शिकविल आणि वजन, वय बघून होत नाही हे मी अनुभवलं आहे. शिवाय मी लहान आहे, अल्लड आहे तेव्हा तुमच्या सारखा समजदार व्यक्तीच मला सांभाळू शकतो सो मला माझ्या निर्णयावर कसलीच शंका नाही."
ती बोलतच होती की अन्वय पुन्हा उत्तरला," पुन्हा एक प्रॉब्लेम. कदाचित माझी आई तुला स्वीकारणार नाही. मग कस मॅनेज करशील?"
स्वराने पुढच्याच क्षणी त्याचा हात हातात घेतला आणि हळूच उत्तरली," सर मी आयुष्यभर संघर्ष केला आहे स्वतःच अस्तित्व जपण्यासाठी. मग आता जेव्हा मला माझ्या प्रेमासाठी संघर्ष करावा लागतोय तर मागे का सरकायच? हा माझ्या आयुष्याचा शेवटचा संघर्ष आहे. तुम्ही सोबत असताना मी कधीच एकटी पडणार नाही माहिती आहे म्हणून हा संघर्ष करायला मी तयार आहे. मी पूर्ण प्रयत्न करेन आईला मनविण्याचे!! तुम्हाला विश्वास आहे माझ्यावर?"
अन्वय हसतच उत्तरला," स्वतःपेक्षा जास्त. मी तुला वचन देतो की तुझ्या प्रत्येक सुख-दुखात सोबत राहीन मग कुणी साथ देवो अथवा नको! मी राहीन सोबत.."
स्वराच्या चेहऱ्यावर क्षणात हसू पसरल होत आणि अन्वय पुन्हा उत्तरला," मग उद्या सुट्टी काढ!!"
स्वरा विचार करत उत्तरली," कशाला?"
अन्वय हसतच उत्तरला," आईबाबांना मागणी घालायला जायचं आहे. किती दिवसाने तू होकार दिला आहेस. तुझा विचार बदलायच्या आत मला तुला माझ्या आयुष्यात कायमस्वरूपी आणायच आहे. आता रिस्क नको. तू पळून गेलीस तर मला सोडून."
स्वरा हसतच उत्तरली," खरच तुम्ही मला मागणी घालणार!!"
अन्वय हसतच उत्तरला," हो फक्त ही आजची रात्र नंतर उद्यापासून तुला ऑफिशिअली माझी बनवेल. आता फक्त काही दिवस मग आपल्याला कुणीच वेगळं करू शकणार नाही. मग तयार आहात एका खडतर प्रवासासाठी?"
स्वरा हसतच उत्तरली," तुम्ही सोबत असताना प्रत्येक खडतर प्रवास सहज पार करून जाऊ. मला विश्वास आहे तुमच्यावर आणि तुमच्या प्रेमावर!!"
आजची रात्र खुप खास होती कारण खऱ्या अर्थाने प्रेमाचा विजय झाला होता. पुन्हा एक प्रवास पण शेवटचा. अन्वय इतक्या विश्वासाने सांगत होता म्हणजे तिला पुन्हा त्रास सहन करावाच लागणार होता फक्त आता तो तिच्यासोबत होता. जिंकणार होत का त्यांचं प्रेम जगाच्या बंधनाना सारून??
कोई खबर नही
किस और ले जा रहा है तू
मै आंखे मुंद चुकी है
तेरे हाथो पे भरोसा करके
क्रमशा....