ये लम्हा सजा कर रखं लु
ये वादे याद कर लु
आओगे जीस दिन तुम
मै इस जहा को नजरअंदाज कर दु...
पुन्हा एक सुंदर दिवस. स्वरालां आज पुन्हा एकदा नटायची इच्छा झाली. त्यामुळे तिच्या आवडत्या कलरचा म्हणजेच व्हाइट सलवार कुर्ता घालून ती लवकरच तयारी झाली. तो ड्रेस फुल्ल स्लेव्हचा होता. तिने आज सकाळी- सकाळीच उठून केस धुवून काढले म्हणून तिचे केसही आज सिल्की सिल्की जाणवत होते. तिने आज केसांना बांधले सुद्धा नाही. हातात निळ्या कलरच्या बेल्टची घड्याळ घातली आणि सॅंडल घालून ती ऑफिसला निघाली. आज स्वरा खूपच सुंदर दिसत होती. शांततेचा तो व्हाइट कलर, शांत स्वरावर आज उठून दिसत होता. जणू त्यापेक्षा सुंदर मॅच काहीच होऊ शकता नव्हता. स्वरा स्टेशनकडे जात होती आणि आजूबाजूचे लोक तिला बघू लागले. चांगल्या नजरेने की वाईट ते तिलाही कळत नव्हतं पण आज ते तिला सर्व खूप सुंदर वाटत होतं. काय होत स्वरामध्ये आज? फार काही नाही. तिची सिम्प्लिसिटी पण आज त्यात वेगळेपण होत. तोच चेहरा पण त्यावर आनंद होता. तोच स्वभाव पण त्यात नव्याने बहर होता. लोक तिला बघत राहिले आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव उतरले होते. ती आज लाजत-लाजतच स्टेशनवर पोहोचली आणि माधुरीला बघू लागली. माधुरीला ती बघत होती पण तिचा कुठेच पत्ता नाही म्हणून ती क्षणभर रुसली. तिचा मूड क्षणात खराब झाला आणि ती तोंड पाडून तिथेच उभी राहिली. माधुरी तिची गंमत करत असेन म्हणून स्वरा स्टेशनवर दूरवर नात टाकत होती पण तिला ती दिसलीच नव्हती. स्वराचा चेहरा पडला आणि ती हळूच स्वतःशीच उत्तरली," काय यार मधू नेमकी आजच आली नाहीस!! किती खास दिवस आहे तुला माहिती आहे ना आज??"
ती स्वतःशीच बोलून गप्प झाली. तेवढ्यातच माधुरी मागून धावतच आली आणि तिला मिठी मारत म्हणाली," वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताईसाहेब!! तुमचा प्रत्येक दिवस आनंदात जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि लवकरच लग्न होऊन मला ३-४ मुली खेळवायला देशील ही दुसरी प्रार्थना करते."
तिला बघताच स्वराचा आनंद द्विगुणित झाला. स्वरानेही तिला मिठीत घेतच म्हटले," थॅंक्यु लाडोबा!! देवाला प्रार्थना पूर्ण करायची गरज नाही वेडोबा!! जोपर्यंत तू माझ्यासोबत आहेस तोपर्यंत माझ्या आयुष्यात सर्वच आनंदी-आनंद आहे आणि मी काही देणार नाही ३-४ उलट तू दे मला. मी खेळवेन त्यांना!!"
माधुरी आज गमतीच्या मूड मध्ये होती म्हणून ती तिची खेचत उत्तरली," मी की अन्वय सर? आनंद त्यांच्यामुळे आहे, माझ्यामुळे थोडी? मला तर केवळ मस्का मारल्या जातो. ते पण सर नसतील तेव्हा!!"
माधुरी क्षणभर रुसली आणि स्वरा तिच्याकडे प्रेमाने बघू लागली. स्वरा तिचा हा स्वभाव बघून खुश झाली होती तर माधुरी पुन्हा उत्तरली," बाय द वे हे सर्व सोड. मला सांग अन्वय सरांनी विश केलं की नाही? त्यांचं तर खास विस असायला हवं आज!! एकदम खास विश!! जे आमच्या कॅटेगरीमध्ये अजिबात येणार नाही. बोल!! शांत का आहेस?"
स्वरा आता जरा उदास होत उत्तरली," तू बोलू देशील तर बोलेन ना? नाही केलं खडूसने! खडूस कुठले!! मला तर शंका आहे की त्यांना आठवण देखील आहे की नाही? स्वयम, पूजा, कियारा, आई-बाबा ह्यांनी रात्रीच कॉल केला होता पण सरांचा अजूनही कॉल आला नाहीये. इतक्या दिवसात माझी आठवण नाही आली तर आज काय येणार? बसले असतील खडूस ऑफिसमध्ये फाइल्स घेऊन!!"
माधुरी क्षणभर हसत उत्तरली," आज जर सर वाढदिवस विसरले ना तुझा तर लग्नानंतर त्यांचं काही खर नाही हे आताच सांगतेय. तुझा पक्का मार खातील ते!! मग समजेल बायकोचा वाढदिवस विसरल तर काय होत...बरोबर ना?"
स्वराच्या उदास चेहऱ्यावर आता आपोआप हसू उत्तरल. माधुरीने पुढच्याच क्षणी तिच्या हातात गुलाब आणि गिफ्ट दिलं आणि उत्तरली," ताई तुझ्या लहान बहिनीकडून छोटस गिफ्ट. पण आताच उघडून नको बघुस. रात्री निवांत उघड. खूप खास वगैरे काही नाही अन्वय सरांसारख पण मी घेतलं माझ्या कुवतीप्रमाणे."
स्वराने तिला पुन्हा एकदा मिठी मारत म्हटले," थॅंक्यु वेडोबा! खूप खास गिफ्ट आहे हेे माझ्यासाठी. कितीतरी वर्षानंतर कुणीतरी पहिल गिफ्ट दिलं. तुला नाही कळणार त्यातला आनंद!! आणि गिफ्ट छोट वगैरे नसत ग!! गिफ्ट, गिफ्ट असत फक्त त्यात प्रेम असायला हवं आणि तुझं प्रेम तर भरभरून आहे ह्यात. मग ते क्स छोट असणार? ते तर जगातील सर्वात सुंदर गिफ्ट असेल. पुन्हा एकदा थॅंक्यु माझ्याड दिवसाची सुंदर सुरुवात करण्यासाठी!!"
माधुरी क्षणभर हसली आणि तिच्याकडे बघतच राहिली. त्या एकमेकांकडे बघतच होत्या की ट्रेन आली आणि दोघीही पटकन चढल्या. ट्रेन पुन्हा सुरू झाली. आज वातावरण खूप सुंदर होत. एक तर तीच ते रूप, दुसर ते आल्हाददायी वातावरण आणि तिसरा त्या खास दिवसाची लाली. स्वराचा चेहराही खुलला होता आणि माधुरी उत्तरली," ताई, हा रंग तुझ्यावर खूप शोभून दिसतो!! किती सुंदर दिसत आहेस तू आज कल्पनाच करू शकत नाही! अन्वय सरांनी जर तुला आज बघितलं ना तर असेच फ्लॅट होऊन जातील. आय विश की ते तुला बघतील आज. इतक्या सुंदर मुलीला बघण्याचा आज चान्स जर त्यांनी सोडला ना तर काही खर नाही. त्यांचं नशीब खराब आहे असच म्हणेन मी!!"
स्वरा क्षणभर पुन्हा रुसत म्हणाली," बघन तर दूरच राहील मधू. त्यांना जर माझा वाढदिवस आठवन असेल ना तेच खूप झालं. इतक्या दिवसात त्यांनी कधी कॉल केला नाही. काय माहिती आज पण करतील की नाही? बहुतेक आज पण पूर्ण दिवस वाट बघण्यातच जाईल माझा आणि नाही आला कॉल तर मग रात्रही खराब जाईल. त्यांना कोण सांगणार की त्यांचं विश किती खास आहे माझ्यासाठी!!"
माधुरीही क्षणभर हसत उत्तरली," ओ.. कोण सांगणार म्हणजे अफकोर्स तू!! त्यांनी तर सांगितलं आधीच, आता तुलाच पुढाकार घ्यावा लागेल. एक मिनिट मी चुकते वाटत, माझ्या लक्षात कस नाही आलं मॅडमची खूप इच्छा आहे वाटत, सरांनी तुला आज बघावं म्हणून. एम आय राइट?"
तिचे शब्द ऐकून स्वरा जास्तच लाजली आणि पुन्हा माधुरी उत्तरली," हाय ये शरमाना!! मी मुलगा असते ना तर इथेच फ्लॅट झाले असते बघ!! ताई खरच सुंदर दिसते आहेस. मी एक गोष्ट बोलू?"
स्वरा लाजत उत्तरली," हमम.. आता काय?"
माधुरी बिनधास्त होत उत्तरली," आय लव्ह यु बेब!! माहिती आहे तुला हे शब्द अन्वय सरांकडून ऐकायचे आहेत पण काय करू तुला बघून आज राहवलं नाही. आज माझ्याकडून ऐकून घे. ते आले की तुला नंतर एकवतील. आज ह्यावरच काम चालव किंवा मग आज कॉल आला तर ते पण बोलून देतील. मला वाटत करतील तर कॉल. बी पॉसिटीव्ह माय लव्ह!!"
स्वरा पुन्हा एकदा लाजत उत्तरली," लव्ह यु टू स्वीटू! तू म्हटलं तसच होऊ दे. तेरे मूह मे घी शक्कर!!"
माधुरीचा आज मूड मस्त होता तेव्हा तीच म्हणाली," मग आता अन्वय सर कॅन्सला ना?? माझीच गर्लफ्रेंड ना तू?"
स्वराने तिच्याकडे बघितले आणि स्वतःला हसण्यापासून थांबवू शकली नाही. ती हसता- हसताच बोलून गेली," मधू, वेडी आहेस तू पूर्ण!! काहीही बोलत असतेस!"
माधुरी तिचा हात हातात घेत म्हणाली," वेड तर लावलय तू!! आणि स्वतःच म्हणत आहेस वेडी आहेस. हाय ये कंबक्त जमाना कही जाण ना लेले मेरी!!"
स्वरा स्वताला हसण्यापासून सावरू शकत नव्हती. मधूने सकाळी सकाळी तिचा दिवस खास बनवला होता आणि एक क्षण तिच्या चेहऱ्यावरून हसू गायब झाल नाही. स्वरा हसतच होती की मधु उत्तरली," हे हसन वगैरे ठीक आहे ताई पण पार्टीचा काय प्लॅन आहे?"
स्वरा हसतच उत्तरली," हे काय विचारन झालं? सायंकाळी जाऊ आल्यावर. पक्का जाऊ आज, मी करते कॉल सायंकाळी. मग ठरवू कुठे जायच तर!!"
आज स्वराचा वाढदिवस. एक तर ती खरच खूप सुंदर दिसत होती त्यात माधुरीने सकाळी- सकाळीच तिचा मूड बनवला त्यामुळे आज क्षणभरही तिच्या चेहऱ्यावरच हसू गायब झाल नव्हतं. आज पूर्ण वेळ त्यांच्या गप्पा सुरु होत्या. माधुरी भरभरून बोलत होती तर स्वराच्या चेहऱ्यावर ते लाजेचे भाव बघून माधुरीला मनोमन आनंद झाला होता. आज असा एक क्षण नव्हता जेव्हा स्वरा हसली नव्हती.
फायनली माधुरीच स्टेशन आलं आणि ती पुन्हा एकदा विश करून बाहेर पडली. अगदी १०-१५ मिनिटांचा कालावधी गेला आणि स्वराही आपल्या स्टेशनवर उतरली. तिथून ऑफिसला जातानाही स्वराकडे लोक बघत होते म्हणून स्वरा आज स्वतःला लाजण्यापासून स्वतःला थांबवू शकली नव्हती. तिच्या एका हातात घातलेल कंगण आणि कानात घातलेले झुमके तिच्या सुंदरतेत आणखी भर घालत होते आणि ती हसत-हसतच ऑफिसकडे जाऊ लागली. काहिच क्षणात ती ऑफिसच्या दारावर पोहोचली. तिने डोकावून पाहिलं तर मध्ये कुणीच असल्याच जाणवलं नाही. तिला क्षणभर शॉकच लागला होता. सहसा ह्या वेळेपर्यंत ऑफिसला सर्वच येत असत तेव्हा आज कुणी का आले नाही म्हणून ती विचार करतच मध्ये जाऊ लागली. ऑफिसमध्ये आज लाईट पण ऑन केले नव्हते त्यामुळे ती बुचकाळ्यात पडली होती. तिला शंका आली होती तरीही तिने मध्ये पाऊल टाकले आणि अचानक लाईट ऑन झाले. मधातून कुणीतरी फुगा फोडला आणि त्या आवाजाने स्वरा जागिच उभी राहिली. स्वरा बघतच राहिली आणि सर्वच मोठ्याने ओरडू लागले," हॅपी बर्थडे टू यु.. हॅपी बर्थडे टू यु.. हॅपी बर्थडे डिअर स्वरा… हॅपी बर्थडे टू यु…"
स्वरा उभीच होती की दीपिकाने तिला मिठी मारत म्हटले," स्वरा मॅडम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला दिवस, आपलं आयुष्य सदैव सुखाने भरून निघावं हीच बाप्पाचरणी प्रार्थना!!"
तिने शुभेच्छा दिल्यावर ऑफिसमधला प्रत्येक व्यक्ती तिला शुभेच्छा द्यायला समोर येऊ लागला. पूर्ण ऑफिस आज स्वरासाठी सजवलं होत म्हणून काही क्षण ती ते सर्व बघून भारावून गेली होती. ती एक-एक पाऊल समोर टाकत होती आणि सर्व तिला शुभेच्छा द्यायला आतुर होते. तिने पुन्हा पाऊल पुढे टाकले आणि अरुण काका हळूच उत्तरले," वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा!! तुझ्या आयुष्यात खूप सारा आनंद येवो हीच बाप्पा चरणी प्रार्थना करतो आणि सुंदर साथीदार मिळाला तर पेढे वाटेन ऑफिसमध्ये.."
त्यांनी शुभेच्छा देताच स्वराने त्यांना वाकून नमस्कार केला आणि स्वराच्या मनाला समाधान मिळालं. आज तिचे आई-बाबा सोबत नव्हते म्हणून त्यांना नमस्कार करताना तिला आपल्याच आईवडिलांना नमस्कार केल्याचं वाटत होतं. ती त्यांना बघतच होती की जयेश केक समोर टेबलवर ठेवत म्हणाला," चलो चलो. बहोत हो गयी बधाईया देकर. अब वक्त है केक कट करणे का! सबर नही होता केक खाणे को. बाद मे पार्टी भी तो देगी स्वरा मॅडम!! क्यू सही कहा ना?"
दिपक हसतच उत्तरला," ये भी पूछने की बात है जयेश. हमने तो टिफिन भी नही लाया. आज दोपहर को जलसा होगा जलसा!!"
आता सर्व लोक हसू लागले होते अगदी स्वराही. पुढच्याच क्षणी सर्व कलीग टेबलच्या सभोवताली गोळा झाले आणि दीपिका, स्वराला केक कट करायला समोर घेऊन आली. सर्व कस मस्त सुरू होत. स्वरा केक कट करायला समोर येणारच की कार्तिकने जस्ट ऑफिसमध्ये प्रवेश केला. आता सर्व वातावरण शांत झाल. कार्तिकला बघून सर्वांची बोबडी वळाली होती. आता कार्तिक सर काय करतील हा विचार सर्वाना येत होता. कार्तिक समोरच दृश्य बघत एक-एक पाऊल टाकत त्यांच्याकडे येत होता आणि सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. फक्त स्वराचा चेहरा सोडून. ती आताही हॅपी होती. कार्तिक आता अगदीच त्यांच्या जवळ पोहोचला आणि चेहऱ्यावर हसू आणत, हात समोर करत उत्तरला," हॅपी बर्थडे स्वरा!!!"
सर्व कलीग त्याच्याकडे शॉक होऊन बघत होते आणि कार्तिक हसत उत्तरला," केक कट नही करणा क्या? ऐसें ही देखते रहोगे मुझे? माना की थोडा अकडू हु पर किसीका बर्थडे सेलिब्रेट करणे पर गुस्सा थोडी होणे वाला हु. चलो मै बॅग रखकर आता हु. शूरु करो सेलिब्रेशन."
कार्तिक बॅग ठेवायला केबिनमध्ये गेला आणि सर्व अजून शॉकच होते. तो बॅग ठेवून काहीच क्षणात परतला आणि जयेशने कँडल्स सजविल्या. दीपिकाने स्वराला केक कट करायला सांगितले आणि तिने केक कट करताच पुन्हा एकदा सर्व मोठ्याने म्हणाले," हॅपी बर्थडे टू यु...हॅपी बर्थडे टू यु...हॅपी बर्थडे डिअर स्वरा...हॅपी बर्थडे टू यु!!"
स्वराने केक कट करताच पहिला बाईट दीपिकाला भरवला आणि हळूहळू सर्वाना भरवू लागली. अगदी कार्तिकसुद्धा आज कुणावरच क्षणभर रागावला नव्हता त्यामुळे ऑफिसमध्ये मस्त वतातवरण होत. केक कटिंगचा कार्यक्रम संपला आणि हळूहळू सर्वच आपल्या कामावर जॉईन झाले.
स्वराने नेहेमीप्रमाणे बाप्पासमोर डोळे मिटले आणि मनातल्या मनात म्हणाली," बाप्पा!! अन्वय सरांच्या वाढदिवसाला त्यांनी मला त्या बंदिस्त केबिनमधून मुक्त करून आनंद दिला. आज माझ्या वाढदिवशी मी तुला मागते की अन्वय सरांवर कधीच दुःख येऊ देऊ नको. त्यांना इतका आनंद दे की त्यांच्या चेहऱ्यावरच हसू कधीच जाणार नाही. ते लोकांचा इतका विचार करतात तेव्हा त्यांनका दुःख देऊ नकोस. करशील ना??"
तिने बाप्पाला वीश मागितली आणि पुन्हा एकदा आपल्या कामावर लागली. कामाला लागण्यापूर्वी तिने आपला मोबाइल चेक केला. त्यावर सर्वांचे मॅसेज होते. एवढंच काय मृन्मयीचा देखील मॅसेज होता पण अन्वयचा अजूनही आला नव्हता. सर्वांनी स्वराचा फोटो स्टेटसला ठेवला असतानाही अन्वयने तिला वीश केलं नाही म्हणून काही क्षण तिला त्यांचा रागच आला आणि ती मोबाइल बाजूला ठेवून, कामात व्यस्त झाली.
आज स्वरा काम तर करत होती पण राहून- राहून तीच लक्ष मोबाइलवर जात होतं. कुणाचा मॅसेज आला तर ती पटकन मोबाईलकडे लक्ष देई पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. अन्वयचा मॅसेज तर आला नाही पण सौरभ सरांचा येऊन गेला होता. स्वयमच्या आईचा कॉलही येऊन गेला पण अन्वयच्या मॅसेजचा काहीच पत्ता नव्हता. तो जसजसा तिला मॅसेज करत नव्हता तसतसा तिचा राग अनावर होऊ लागला. ती कामात मन लावण्याचा प्रयत्न करत होती पण तीच कामात मनच लागत नव्हत.
आता दुपार झाली होती. आज स्वरा पार्टी देईल म्हणून कुणीच टिफिन आणला नव्हता. स्वरानेही सर्वांचा आनंद म्हणून स्वतःचा मूड ठीक केला आणि काही क्षणाकरिता तिने मोबाइलकडे दुर्लक्ष केलं. सर्व अगदी बाहेर जायला आतुर झाले होते की स्वरा कार्तिकच्या केबिनमध्ये जात म्हणाली," कार्तिक सर, आज डिनर बाहर करणे जा रहे है. अगर आप हमे जॉईन होंगे तो मेरी खुशी दुगणी होगी. अगर आप आ सकते है तो प्लिज!!"
कार्तिक क्षणभर हसत उत्तरला," अफकोर्स! आप रुकिये दो मिनिट बाहर. मैं जस्ट पॅकअप करके आता हु."
स्वरा बाहेर गेली आणि आता सर्वच कार्तिकची वाट बघू लागले. काहीच क्षणात कार्तिक बाहेर आला आणि सर्व हॉटेलकडे प्रस्थान करू लागले..हे तेच हॉटेल होत जिथे अन्वय सोबत सर्वांनी खूप पार्ट्या केल्या होत्या शिवाय ते ऑफिसच्या जवळ असल्याने सर्वाना पायदळ जायला सोयीस्कर होणार होत म्हणून सर्व गप्पा मारत- मारत हॉटेलला पोहोचले. जवळपास पूर्णच ऑफिसच हॉटेलला गेलं असल्याने सर्वांनी टेबल जॉईन करायला सांगितले आणि काहीच क्षणात टेबल जॉईन करण्यात आले. कार्तिक सर सोबत असल्याने फार कुणीतरी मस्ती करत नव्हते शिवाय लवकरात लवकर ऑफिसला पोहोचायला ऑर्डर मागवत होते. सर्वांनी मेन्यू कार्ड हातात घेतले आणि त्यांना हवं ते मागवू लागले. स्वरा कार्तिकच्या बाजूलाच बसली होती. कार्तिकने अजूनही काहीच मागवलं नाही म्हणून स्वरा हळूच उत्तरली," सर प्लिज आप भी ऑर्डर दिजिये ना!!"
कार्तिकने तीच बोलणं ऐकून ऑर्डर केला आणि सर्वच जेवण येण्याची वाट पाहू लागले. काही क्षण गेले. तिथलं वातावरण खूपच शांत जाणवत होतं आणि कार्तिक हसतच मोठ्याने उत्तरला," गाईज ऐसें ही शांत बैठे-
बैठे पार्टी मनाने वाले हो क्या? तुम ऐसेंही सेलिब्रेट करते हो? अगर मेरे दोस्त होते यहा तो अब तक जलसा होता. पता है मुझे की मै यहा हु इसलीये शांत हो पर ये ऑफिस नही है इसलीये तुम एन्जॉय कर सकते हो. चिल गाईज!! एन्जॉय द मोस्ट ब्युटीफुल गर्ल्स बर्थडे!!"
स्वरा तर त्याच्याकडे क्षणभर बघतच राहिली. सर्वाना कळतच नव्हतं की आज सूर्य नेमका कोणत्या दिशेने उगवला आहे पण कार्तिकची परवानगी मिळाली आणि क्षणातच सर्वांनी धिंगाणा घालायला सुरुवात केली. आज बर्थडे गर्ल सोबत प्रत्येक व्यक्ती फोटो काढत होता. एकमेकांची खिचाई सुरू झाली आणि जिकडे-तिकडे नुसता गोंधळ सुरू झाला. कार्तिक सुद्धा ते सर्व एन्जॉय करत होता. त्यांच्या प्रत्येक फोटो सेशनमध्ये त्यानेही हिरहिरीने भाग घेतला होता. त्यांची धम्माल बराच वेळ सुरू होती आणि शेवटी उशिरा का होईना जेवण आलं. जेवण आलं आणि सर्वाना भूक लागली असल्याने ते सर्व तुटून पडले पण जेवण करतानाही कुणीच शांत बसले नव्हते उलट सर्व एकमेकांची खिचाई करत होते. आज पूर्ण वेळ कसा धम्माल करण्यात गेला. त्यांचं जेवण आटोपलं तेव्हा ४ वाजून गेले होते म्हणून सर्वानी पटापट जेवण आवरल आणि सर्व ऑफिसच्या दिशेने निघाले. स्वरानेही बिल पे केलं आणि ऑफिसच्या दिशेने निघाली.
हे दोन तास मज्जा मस्ती करण्यात गेले आणि स्वराच मोबाइलकडे लक्ष गेलं नाही. ती आता हॉटेलच्या बाहेर आली आणि तिने मोबाइलवर लक्ष दिलं. तिने व्हाट्सअप्प ओपन केलं पण अजूनही तिच्या हाती निराशाच आली. तिने अन्वय ऑनलाइन आहे की नाही बघितलं पण तो अजूनही ऑनलाइन नव्हता आणि स्वराचा मूड अधिकच खराब झाला. ४ वाजून गेले असतानाही अन्वयचा फोन आला नाही म्हणून तिने सरळ फोनच बंद केला आणि कामाला लागली. आज इतक्या सुंदर दिवशी फक्त त्याच्या एका वीश न केल्याने तिला किती फरक पडला होता हे तिला जाणवत होतं आणि तिला पूजाचे शब्द आठवले," ज्यादिवशी तुला एक क्षण देखील वाटेल की तू त्याच्याशिवाय राहू शकत नाहीस त्यादिवशी तू त्याला मनातलं सांग."
तिला पूजाचे शब्द तर आठवले पण आज रागासमोर तीच काहीच चाललं नाही. तिने फोन बंद केला आणि त्यानंतर आपोआप त्याकडे दुर्लक्ष झाल. ती आता आपल्या कामात मन लावण्याचा प्रयत्न करत होती. कामात मन लागत होतं की नाही तीच तिला माहिती.
पाहता- पाहता ६ वाजले आणि दीपिका तिला म्हणाली," स्वरा निघायच नाही का उशीर झालाय खूप??"
स्वराचा मूड काही चांगला नव्हता म्हणून ती जरा नाखूष होत उत्तरली," ताई तू जा मी जरा आवरून निघते. अर्धा तास लागेल जास्त. येते लवकरच काळजी नको करुस."
स्वराने म्हटलं आणि दीपिका तिला पुन्हा एकदा विश करून बाहेर पडली. हळूहळू बाहेर अंधात पडू लागला होता. ऑफिसमधील प्रत्येक व्यक्ती बाहेर पडला एवढंच काय कार्तिक सुद्धा शेवटी गेला पण ती काही जाग्यावरून हलायला तयार नव्हती. आता जवळपास ७ वाजले होते. स्वराच्या लक्षात आलं की आपण माधुरीला सायंकाळी पार्टीला जायचं सांगितलं होतं त्यामुळे तिने पटापट लॅपटॉप बंद केला आणि मोबाइल ऑन करून बाहेर पडली. तिने मोबाइल ऑन केला तसाच माधुरीचा कॉल आला. तिने रिसिव्ह केला आणि समोरून माधुरी म्हणाली," ताई मोबाइल का बंद करून ठेवला आहेस? मी केव्हाची थांबून आहे स्टेशनवर आणि तुला माझं काहीच पडलं नाही. आठवन नाहीये का तुला आपण बाहेर जातोय ह्याची? आणखी किती वेळ वाट बघायची मी? आता नाही आलीस ना तर खरच जातें मी!!"
स्वराही जरा पटापट उत्तरली,"सॉरी सॉरी! ते अन्वय सरांचा कॉल नाही आला आणि मग माझी ती चिडचिड..सॉरी सॉरी!! जाऊ नकोस मी येते लगेच. तू मूड छान कर आपण मस्त पार्टी करू. काय झालं त्यांनी वीश नाही केलं तर. त्यांना काय वाटत, त्यांनी वीश नाही केलं तर माझा वाढदिवस पूर्ण होणार नाही."
स्वरा बऱ्याच रागात होती. ती कॉलवर अन्वयवर ओरडत चालली होती. तिला त्याचा इतका राग आला होता की आजूबाजूला लक्ष गेलं नव्हतं, तिला फक्त माधुरीकडे जायचं होतं आणि समोरून आवाज आला," बाईसाहेबाना इतक्या दुरून भेटायला आलो त्याच काही नाही आणि त्या मलाच शिव्या देत आहेत. बर शिव्या तर सोडा पण साधं नोटीस देखील केलं नाही. केव्हापासून इथे लोकांची नजर चुकवून उभा आहे, पाय देखील दुखायला आलेत पण त्याच त्यांना काय? धीस इज नॉट फेअर मिस टॉपर! वाटलं नव्हतं तुम्ही अशा वागणार आम्हा दिल्ली कारांसोबत!!"
अन्वयच्या आवाजाने तिचे पाय जागीच थांबले. हृदय धडधड करू लागल. नजर बोलू लागली. शब्द जागिच थांबले आणि ओठून एकच वाक्य निघालं," अनव्य सर तुम्ही इथे?"
माधुरीने ते वाक्य ऐकलं आणि स्वतःच फोन कट केला. स्वरा अन्वयकडे वळुन बघत होती आणि तो हसतच उत्तरला," बाईसाहेब वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!! माझ्या आयुष्याचे सर्व सुख तुमच्या नशिबात येवो अशी बाप्पाला प्रार्थना करेन. ह्यावर ना मागायला काही आहे ना द्यायला. इतक्या धनवान मुलीला मी काय देणार??"
अन्वयचा तो हसरा, सुंदर चेहरा आज स्वराने कितीतरी दिवसाने बघितला आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले. आजही अन्वय तसाच वाटत होता. चेहर्यावर तोच ग्लो आणि ओठांवर तेच हसू. नजरेत तीच प्रेमाची भाषा आणि तोच हसवणारा स्वभाव. अन्वयला तिने बघितलं आणि ती बघतच राहिली. अन्वय सुद्धा तिला बघतच होता. तो व्हाइट ड्रेस, ती बोलकी नजर आणि ओठांची चुप्पी त्याला तिच्याकडे आकर्षित करत होती. तो तिच्यात असा हरवला की त्याला जागाच भानच उरल नाही. माधुरी बरोबर म्हणाली होती अन्वय तिला पाहताच फ्लॅट झाला होता. आजूबाजूला लोक होते पण त्यांना त्यांची फिकीर नव्हती. ते तर हरवले होते एकमेकांच्या नजरेत..
रूप तुझं पाहिलं
काहूर दाटल
मनामंदी आगळ हे
रान कस पेटल
उमगणा काही
समजण काही
रात-दिस जिथ तिथं
भास तुझा होई
मन झुर लागलं
हुरहूर लागलं
पिरमात तुझ्या
येड ठरू लागल
पिरमात तुझ्या
येड ठरू लागलं
तिने त्याला बघितले..तिला राहवलं नाही आणि धावतच त्याच्याकडे गेली. तिची त्याला आज मिठी मारायची खूप इच्छा होती. ती त्याला धावतच मिठी मारणार होती पण अगदी त्याच्याजवळ जात तिने स्वतःला थांबविले आणि हळूच म्हणाली," अन्वय सर तुम्ही इथे?"
अन्वय हसतच उत्तरला," हो दिसतोय ना समोर मग मीच आहे. भास वगैरे नाहीये हा!! सॉरी मी तुझं बोलणं ऐकलं. मी विश केलं नाही म्हणून चिडचिड झाली होती ना? माहिती आहे पण काय करू तुला सरप्राइज द्यायच होत म्हणून विश आधी करू शकलो नाही. सॉरी!!
स्वरा हसतच उत्तरली," हो चिडले होते पण तुम्हाला बघितलं आणि सर्व विसरले क्षणात. खूप सुंदर गिफ्ट दिलं तुम्ही मला!! आता नाही होणार चिडचिड!! वाढदिवसाच सर्वात सुंदर गिफ्ट. थॅंक्यु सर येण्यासाठी आणि माझा वाढदिवस खास बनविण्यासाठी!!"
अन्वय तिच्याकडे बघून हसतच म्हणाला," ओ मॅडमने गिफ्टची पण आठवण करून दिली लगेच . देणार आहे देणार आहे काळजी नको पण त्याआधी आधी पार्टी नको का मला? आधी पार्टी मग गिफ्ट. पार्टीसाठी तर एवढ्या दुरून आलो, तुला भेटायला थोडी आलो."
त्याच बोलणं ऐकताच स्वरा हसली. त्याला कधीच खोट बोलता येत नव्हतं म्हणून ती क्षणभर हसतच म्हणाली," पक्का पार्टीसाठी आले?"
स्वराने त्याच्या डोळ्यात बघितलं. तिला त्याच्या उत्तराची गरजच नव्हती. ती त्याच्या डोळ्यात बघत होती आणि त्याने पटकन नजर खाली करत म्हटले," हो मग, तुला काय वाटलं?"
त्याने नजर खाली करताच तिला उत्तर मिळालं आणि ती हळूच हसत म्हणाली," चला मग. जाऊया!! तुम्हाला उपाशी पाठवल तर पाप लागेल ना मला!!"
स्वरासोबत अन्वय पण हसला आणि दोघेही एक एक पाऊल टाकत समोर चालू लागले. अन्वय समोर असला की ती सर्व विसरून जात असे पण आता समोर जाताना तीच्या लक्षात आलं की आपण माधुरीशी बोलयलाच विसरलो म्हणून तिने पटकन मोबाइल हातात घेत मॅसेज टाइप केला…
" सॉरी मधू अन्वय सर भेटायला आले आहेत आपण उद्या जाऊ बाहेर.."
तिने मोबाइल बाजूला केला आणि समोर चालू लागली तेवढ्यात मधूचा मॅसेज आला..
" हो कळलं मला ते म्हणून मीही घराकडे निघाले. ताई एन्जॉय कर आणि आज आपल्या मनातील सांगायला विसरू नको. हीच मस्त संधी आहे सोडू नकोस. जा बोलून टाक मनातलं.. बाय.."
स्वरा तिचा मॅसेज बघून क्षणभर हसली आणि दोघेही समोर चालू लागल. तीच हृदय आज एक क्षण धडधड करायचं थांबल नव्हतं. तिची नजर सतत त्याच्यावर होती..बोलायला ओठ आतुर होते पण शब्द निघत नव्हते आणि तिच्या मनात होत एकच वाक्य.."अन्वय सर माझं तुमच्यावर प्रेम आहे. खूप प्रेम आहे. मला तुमचं आयुष्य बनवणार."
ते वाक्य मनातच होत. आज बाहेर येणार होत का??
तेरी आने की खुशी को
बया किस तरहँ किया जाये
ओठोने बगावतसी कर ली
अब दिलं बेचारा क्या करे??
क्रमशा...