किसीं चेहरे से पुछा हमने
मोहब्बत कैसे होती है
उसने पटलकर कुछ यु जवाब दिया
मानाके मोहब्बत शुरु चेहरे से होती है
पर येभी मत भुलना की वो अंत तक दिलं मे ठहर जाती है
आयुष्यात चेहरा कायम महत्त्वाचा असतो का?...
जगात वावरताना चेहरा खरच महत्त्वाचा होऊन जातो. तेव्हाच तर सुंदर चेहऱ्यावर मरणारे हजार असतात तर सुंदर नसणाऱ्या चेहऱ्याकडे लोक पाहणे पसंद करत नाही पण खऱ्या प्रेमात तस नसत. जगात करोडो पुरुष आहेत त्यात एक व्यक्ती नक्कीच असा असतो, जो तिच्या चेहऱ्याच्या नाही तर तिच्या प्रवासाच्या प्रेमात पडतो. तिच्यावर दया दाखवत नाही उलट तिचा जगण्याचा आदर करतो. तिने हजारो दुःख सहन केल्यावर तिला साथ द्यायला तयार होतो. ते असत खर प्रेम!! हे प्रेम फक्त पुस्तकात किंवा कथेतच असत का तर मी म्हणेन नाही. खर्याही आयुष्यात आहेत. अगदी बोटावर मोजणारे का असेना पण त्यांनी प्रेम अजूनही जिवंत ठेवलं आहे. त्यातलाच एक अन्वय. स्वराने अन्वयच प्रेम अनुभवलं आणि ती त्याच्या रंगात रंगू लागली. ती त्याला मनातल्या भावना केव्हा एकदाची सांगून स्वतःच बनवून घेते अस वाटू लागलं पण तिला हे त्याला समोरासमोर सांगायचं असल्याने ती त्या क्षणाची वाट पाहू लागली. ज्या मुलीने प्रेमाचा सतत तिरस्कार केला होता, त्या मुलीने स्वता कुणाला तरी प्रेमाची कबूली देण्यासाठी ह्यापेक्षा सुंदर क्षण नक्कीच येणार नव्हता. तो सोहळा असणार होता कदाचित जगासाठी नाही पण तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. कारण पुन्हा एकदा चेहऱ्यासमोर प्रेम जिंकणार होत. पुन्हा एकदा चेहरा हरणार होता आणि प्रेम जिंकणार होत!!
आज रविवार. स्वरा निवांत उठली होती. तिने मोबाइलमध्ये बघितलं तर १० वाजून गेले होते. तिने पटकन अन्वयला " गुड मॉर्निंग" विश केले. तो अजूनही ऑनलाइन नव्हता त्यामुळे तिने पटकन त्याच्या फ़ोटोकडे बघत विश केले. अन्वयला विश करताना तीच लक्ष माधुरीकडे गेले. तिला जाणवलं की काल ती नाराज झाली होती तेव्हा आता काहीही करून आज तिचा रुसवा घालवावा लागेल. माधुरीचा रुसवा कसा घालवायचा म्हणून ती विचार करतच होती की तिला काहीतरी कल्पना सुचली आणि तिने पटकन मॅसेज टाइप केला " मधू मला ना आज करमत नाहीये सो आज आपण बाहेर जातोय. तू एका तासात मला स्टेशनवर भेट."
माधुरिही आताच उठली होती त्यामुळे तिने रागातच मॅसेज केला," मला नाही यायचं. माझा मूड खराब आहे. तूच जा. नाही तर त्या स्वयमला बोलावं."
स्वरा क्षणभर तिच्यावर हसत म्हणाली," इतका राग माझ्यावर? धिस इज नॉट फेअर!! तस पण ना मला तुझा रागच घालवायचा आहे म्हणून बाहेर जातोय आणि खर सांगू तर माझ्या आयुष्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची आहे. आजच्या दिवशी तू माझ्या सोबत नसलीस तर कदाचित त्या आनंदाला काहीच अर्थ उरणार नाही. तू म्हणाली होतीस ना की कधीच माझी साथ सोडणार नाही मग आता सोडणार माझी साथ?? काहीच दिवस आहेत इथे माझे सोबत नाही येणार का? अस करणार तू आता माझ्यासोबत?"
स्वरा उत्तराची वाट बघत होती आणि समोरून उत्तर आलं," ओके ओके. जास्त इमोशनल नको करुस. येते मी ११ पर्यंत पण तू उशीर नको करुस. चल बाय ये तू देखील लवकर."
स्वरा तीच उत्तर ऐकून क्षणभर हसली होती आणि मोबाइल बाजूला ठेवला. तिच घड्याळात लक्ष गेलं आणि तिला जाणवलं की सव्वा दहा वाजून गेले आहेत. ती तशीच उठली आणि सर्व काही आवरू लागली.
ती तयार होऊन बाहेर पोहोचली तेव्हा ११ वाजले होते. माधुरी आता आपल्यावर पक्क ओरडणार म्हणून ती दार बंद करत, धावत-पळतच स्टेशनला निघाली. ती अगदी दमछाक होत स्टेशनला पोहोचली तेव्हा माधुरी आधिच पोहोचली होती. तिला बघून स्वराला जाणवलं की आता आपल्याला नक्कीच ओरडा पडणार म्हणून स्वराने जाता- जाताच आपले कान पकडले आणि माधुरी शांत झाली. स्वरा तिच्याजवळ पोहोचली होतीच की माधुरी उत्तरली," आता तरी सांग इथून कुठे जात आहोत?"
स्वरा क्षणभर हसत उत्तरली," सरप्राइज आहे तुझ्यासाठी! आणि सरप्राइज सांगितल्या जात नाही. चल गुपचूप.."
ती समोर काही बोलणार त्याआधीच स्वराने तिचा हात पकडला आणि समोर आलेल्या ट्रेनमध्ये जाऊन बसली. माधुरी तिला विचारत होती पण स्वरा आज काहिच उत्तर द्यायला तयार नव्हती. माधुरीला माहीत होतं की ती काहीच बोलणार नाही म्हणून तीही शांतच बसली.
काहीच क्षणात ट्रेन बोरिवलीला येऊन थांबली. तरीही स्वराने काहीच सांगितले नव्हते पण जसजसे ते प्रवास करत होते तसतसा माधुरीला अंदाज येत होता की ते कुठे जात आहेत म्हणून तिनेही पुढे काहीच विचारले नाही.
वेळ जवळपास १२ च्या आसपास. स्थळ बोरिवली नॅशनल पार्क. स्वराने तिकीट काढली आणि माधुरीला आतमध्ये घेऊन गेली. माधुरी आताही काहीच बोलत नव्हती पण ह्या पूर्ण प्रवासात स्वराने माधुरीचा क्षणभरही हात सोडला नव्हता. स्वरा-माधुरी मध्ये पोहोचले आणि समोरचा नजारा बघण्यास उत्सुक होते. समोर एक नदी होती. ज्यात पाणी साचल होत. तिथे बोटिंगची व्यवस्था होती. आजूबाजूला मुलांना झुलण्यासाठी, खेळण्यासाठी व्यवस्था केली होती. समोर झोपाळा बघताच माधुरीचा मूड बदलला आणि ती उड्या मारतच म्हणाली," ताई, चल ना झोका घेऊ!"
माधुरी समोर जाणारच की स्वरा तिला अडवत उत्तरली," ओय मॅडम!! तिथे लिहिलं आहे की लहान मुलांसाठी. तू बसलीस ना तर पक्का मार खाऊ आपण आणि तुटला तर हसू व्हायचं ते वेगळच!! गर्दी बघ. कितीतरी मूल आहेत..आपल्याला अस बघितलं तर काय वाटेल त्यांना. शोषिअल मीडियावर टाकलं कुणी तर?"
माधुरी आता स्वतःच मागे हटली. स्वराने तिला।घाबरवल आणि ती घाबरली सुद्धा. स्वराने तिचा हात सोडला नाही उलट तिला समोर ट्रेन दिसली. ती वनराणी एक्सप्रेस होती. ती ट्रेन कान्हेरी लेणीला घेऊन जायची. अशा निसर्गरम्य वातावरणातून प्रवास करून कुणाला आवडलं नसत?? स्वराने तिचा हात पकडतच तिकीट काउंटरवर नेले आणि काहीच क्षणात त्या ट्रेनमध्ये दाखल झाल्या. ती ट्रेन सरळ कान्हेरी लेणीला घेऊन जाणार होती. ट्रेन अगदी काहीच क्षणात सुटणार होती तेव्हाच त्या तिथे जाऊन बसल्या. काहीच क्षणात ट्रेन सुरू झाली आणि त्या गर्द रानातून ती ट्रेन जाऊ लागली. अलीकडेच पाऊस ओसरून गेल्याने सर्व कस हिरवेगार दार दिसत होतं. ती मस्त हिरवी झाडी आणि त्यातून धावणारी ती ट्रेन. स्वरा तर काहीच क्षणात त्या जगाचा भाग झाली. सुरुवातीला माधुरी रागात होती पण त्या ट्रेनच्या सफरमध्ये तिचा मूड मस्त बनला होता. तीही आता स्वराचा हात पकडून एन्जॉय करू लागली होती. माधुरीला सोबत आणण्याचा उद्देश तिचा सफल झाला आणि स्वराही खुश झाली.
ट्रेन धावत होती आणि स्वराला समोरच माकड उड्या मारताना दिसले. स्वराला राहवलं नाही आणि माधुरीची गंमत उडवायला ती म्हणाली," स्वरा बघ तुझा भाऊ!! अगदी तुझ्यावर गेला आहे. किती मस्त खेळतोय ना? तुला मारता येतात का अशा उड्या?"
माधुरीने क्षणभर माकडाकडे बघितले आणि हसतच म्हणाली," मला नाही येत कारण मी लहान आहे. माझ्या मोठ्या बहिणीची छान बॉंडिंग आहे त्याच्यासोबत. तिला येतात मस्त उड्या. तिनेच शिकविल त्या उड्या मारायला? विश्वास नसेल तर विचार तिला. ती आता मारून दाखवेल."
स्वराने हळूच तिला टोमणा मारला आणि स्वरा तिला धपाटे घालू लागली. आज त्या खूप मस्त हसत होत्या. स्वराच बोलणं सुरुच होत की स्वरा ओरडतच म्हणाली," मधू बाजूला हो तो बघ बिबट्या"!!"
माधुरीला क्षणभर गंमतच वाटली म्हणून ती निवांत वळाली. तिने मागे वळून बघितले आणि क्षणभर तिचे पाय मागे आले. बिबट्या जरा दूर होता पण माधुरीला त्याला बघून धक्काच लागला होता. काही क्षण तर तिची बोबडीच वळाली होती. तिला घाबरलेल बघून स्वरा हसत उत्तरली," मला नव्हतं माहिती की कुणी इतकं घाबरट आहे? मधू घाबरली असणार तर जा मागे बस सर्वांच्या मध्ये. उगाच हालत खराब व्हायची तुझी आणि तब्येत खराब झाली तर उगाच मला ओरडा!!"
स्वरा तिच्यावर हसत होती आणि मधू आता गुपचूप उभी राहिली. स्वराला तिला अस बघून हसू आवरत नव्हतं आणि ती मिठी मारत म्हणाली," माझा वेडोबा रुसू नकोस. बघ समोर किती सुंदर आहे सर्व. ते बघ. अस गाल फुगवून बसण्यात काय मज्जा? पुन्हा हे क्षण येणार नाहीत सो एन्जॉय कर. ते नाही ऐकलं की शाहरुखच गाणं ' हर पल यहा जी भर जियो जो है समाँ कल हो ना हो'."
तीच बोलणं ऐकताच माधुरीने तिचा हात पकडला आणि त्या दोघीही आता समोरच्या दृश्यात हरवल्या. त्या पार्क मध्ये जवळपास २८० प्रकारचे पक्षी होते त्यामुळे ट्रेन धावत असताना त्यांची किलबिल सतत सुरू होती. त्यांच्या आवाजाने त्या वातावरणात आणखीच बहर आणला. माधुरीला तर ते सर्व इतकं आवडलं होत की ती स्वतःला गाणे म्हणण्यापासून थांबवू शकली नाही. माधुरीने गाणे म्हणायला सुरवात केली आणि आता ट्रेन मधील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या सुरात सूर मिसळत होता. आधी शांत असलेलं ट्रेनमधील वातावरण अचानक आल्हाददायी झालं आणि सर्विकडे आवाजच आवाज घुमू लागले. तो बहरणारा निसर्ग, त्यात पक्षांचे मंजुळ आवाज आणि माधुरीची सोबत त्यामुळे स्वरा अक्षरशा वाहवत होती. तिला इतकं खुश कदाचित कुणी कधीच बघितलं नव्हतं.
फायनली गर्द वनराईतुन ट्रेन कान्हेरी लेणीला पोहोचली. पुन्हा एकदा त्यांचा वेळ तिथे तिकीट काढण्यात गेला. स्वरा-मधूने ट्रेनमध्ये धम्माल केली असल्याने त्यांना खूप भूक लागली होती. त्या समोर पोहोचल्याच होत्या की त्यांना फ्रुटस विकताना दिसले आणि दोघीही त्यावर तुटून पडल्या. खाताना देखील त्यांचं त्यांना भान नव्हतं. काहीच क्षणात त्यांनी पोट भरेल इतकं खाल्लं आणि समोर जाऊ लागल्या. कान्हेरी लेणी!! दोघीही मध्ये पोहोचल्या आणि त्या कोरण्यात आलेल्या कलाकृतीमध्ये हरवल्या. कितीतरी सुंदर कोरीव काम त्यावर केलं गेलं होतं म्हणून त्या स्वतःला ते पाहण्यापासून थांबवू शकल्या नाही. माधुरी इतक्या जवळ असूनही तिने कधीच ते सर्व बघितलं नव्हतं म्हणून तीही आज स्वरासोबत एन्जॉय करत होती. कितीतरी वेळ त्यांचा ते पाहण्यातच गेला.
त्या आता बाहेर आल्या. काही अंतरावरूनच मामा- भाचा डोंगर अगदी स्पष्ट दिसत होतं. वरून त्या गर्द झाडीने त्यांचं मनमोहून घेतलं होतं. कितीतरी सुंदर दृश्ये तिथे पाहण्यासारखी होती म्हणून आज काहीच क्षणात त्यांनी कितीतरी फोटो काढून घेतले होते. माधुरीने तर किती सेल्फी काढल्या होत्या तीच तिला माहिती. तिथेच जवळच व्हॉटरफॉल होता पण तेव्हा पाऊस नसल्याने त्यांना त्याची मज्जा घेला आली नव्हती. आज स्वरा- मधूने फिरून फिरून धम्माल केली होती पण आता त्या खूप थकल्या होत्या. माधुरी चालता-चालताच माळरानावर एका मोकळ्या जागी बसली. स्वराही खूप थकली असल्याने तिच्या बाजूला बसली. स्वराने पाण्याची बॉटल काढून पटापट पाणी पोटात रिचले आणि बॅगमधले चिप्स काढत त्या तिथेच खाऊ लागल्या. त्या तिथे बसल्या आणि कमालीची शांतता त्यांना तिथे जाणवू लागली. बसून त्या सुंदर वातावरणाला डोळ्यात साठवतच होत्या की स्वरा उत्तरली," मधु तुला माहिती आहे तू मला एक प्रश्न कायम विचारतेस?"
मधूही हसतच उत्तरली," ताई मी तर तुला खूप प्रश्न विचारते. तू नेमका कोणता प्रश्न म्हणत आहेस बर?"
स्वरा हसतच पुन्हा म्हणाली," तो प्रश्न ज्याने माझ्या रात्रीच्या कितीतरी झोप उडवल्या होत्या. तुझं अन्वयवर प्रेम आहे का?"
मधू आता तोंड वाकळ करत उत्तरली," मिळालं मला उत्तर. आता त्या प्रश्नाला काही अर्थ नाही. तू तर स्वयमशी लग्न करत आहेस ना? मग आता हे कशाला सांगत आहेस मला?"
स्वरा काही क्षण मिश्किल हसत उत्तरली," कारण खरच मला ते आवडतात. लग्नाचं माहिती नाही स्वरा पण त्यांना मी माझ्या मनातलं नक्की सांगणार आहे. मीही त्याच दिवसाची वाट बघत आहे जेव्हा ते माझ्या समोर येतील आणि मी त्यांना मनातलं सांगेल."
माधुरी आता शॉक होऊन तिच्याकडे बघत होती. स्वरा ती अस का बघते आहे म्हणून काही वेळ तिच्याकडे बघत होती आणि माधुरीने म्हटले," ताई मला चिमटा घे बर!! मला वाटत मी स्वप्न बघत आहे आणि काहीतरी वेगळंच ऐकू येत आहे मला."
स्वराने पुढच्याच क्षणी तिचा चिमटा घेतला आणि माधुरी ओरडतच उत्तरली," मी खरच ऐकलं की तुझं प्रेम आहे त्यांच्यावर??"
स्वरा हसतच उत्तरली," हो वेडाबाई! माझं खरच प्रेम आहे त्यांच्यावर. काल तुझी फक्त गंमत करत होते आणि हेच सांगायला तुला आज इथे घेऊन आले आहे. मी सांगणार आहे त्यांना माझ्या मनातल. आता तरी खुश? गेला ना रुसवा?"
माधुरी आता हर्षोल्हासित होत म्हणाली," आणि सरांनी लग्न कर म्हटलं तर??"
स्वरा लाजत म्हणाली," मग काय मी दिल्लीचीच सून होईल फक्त फरक असा की बायको अन्वयची असेल."
स्वराने उत्तर द्याव आणि मधु हातातली चिप्स दोघांवर उडवत म्हणाली," ये..ताई- अन्वय लग्न करणार. माझं स्वप्न पूर्ण होणार. होणार सून त्या घरची. आता मज्जा करायची फक्त.. "
ती एकटीच उड्या मारत नव्हती तर तिने स्वरालाही आता सोबत घेतलं आणि मोठ्याने म्हणाली," देवा माझं तू ऐकलस फायनली. ताईला कळलं अन्वय सरांच प्रेम. आता माझी ताई कायम हॅपी राहणार. खूप खूप खूप थॅंक्यु देवा माझ्या ताईच्या आयुष्यात आनंद परत आणण्यासाठी."
माधुरी एकटीच नाचत नव्हती तर स्वराही आता जॉईन झाली आणि दोघ्याही मनमुराद नाचू लागल्या. त्यात फक्त पावसाची कमतरता होती. स्वरा आज आपल्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीसोबत तो आनंद साजरा करत होती आणि काही क्षण तिच्यातच हरवली. किती सुंदर असतात ना नाती? खरा आनंद तर त्यांच्यासोबत असतो आणि पुन्हा एकदा तिला अन्वयचे शब्द आठवले " नाते जोडून तर बघ मग कळेल किती आनंद मिळतो त्यातून!! सुखात ते असतील तर आनंदाची मज्जा आणि दुःखात असतील तर अश्रूंना किंमत..नसतील तर हे दोन्हीही अनुभव अर्थहीन!!"
***************
रात्रीची वेळ होती. स्वराचा आज आनंद चेहऱ्यावर तसाच होता. आधी अन्वयशी बोलल्यावर स्वराच्या चेहऱ्यावर आनंद येत असे पण आता केवळ त्याच्याबद्दल विचार करूनही तिचा चेहरा खुलत होता. तरीही त्याच्याबद्दल जाणून घ्यायची तिची ओढ कमी झाली नव्हती. ती एकटीच वेड्यासारखी हसत होती आणि तिला क्षणभर काहीतरी आठवलं. तिने बाजूला पडलेला मोबाइल हातात घेतला आणि कुणाला तरी कॉल लावला. काहीच क्षणात कॉल उचलल्या गेला आणि प्रश्न आला," हॅलो..आप कौन?"
स्वरा गमतीतच म्हणाली," आपके दोस्त जिसे थॅंक्यु बोलणे के को केह रहे थे वो लडकी. पेहचाना कौन??"
सौरभ हसतच उत्तरला," स्वरा !! बोलो बोलो आज कैसे याद किया हमे?"
स्वरा क्षणभर विचार करत उत्तरली," आपणे कुछ बोला ना था ना उसका जवाब चाहीये. मुझे बताइये की मैने अन्वय सर को कैसे बदला और वो पेहले कैसे थे?"
सौरभ हसतच उत्तरला," अगर तुम उसे बतोओगी नही तो तुम्हे बताउंगा. बोलो करती हो प्रॉमिस."
स्वरा हळुवार आवजात उत्तरली," सच्ची वाला प्रॉमिस. किसीं को नही बताउंगी."
सौरभ पुढच्याच क्षणी हसत उत्तरला," पेहले ना वो बहोत खडूस था और अब दिलदार बन गया है. पेहले अकेले अकेले रेहता था और अब खुद हम सबको याद करता है. शायद तुम्हारी वजह से जेंटलमन बन गया है."
स्वरा जरा नाटक करत म्हणाली," सर मुझे नही लगता की वो अकेले अकेले रहे होंगे. उनके पिछे तो बहोत लडकिया घुमती होगी और वो बिजी रेहते होगे ऊन सबमे फिर आप क्यू ऐसी बाते करते है उनके बारे मे??"
तीच बोलणं ऐकून सौरभ क्षणभर हसतच राहिला. हळूहळू त्याचा हसण्याचा आवाज आणखीच मोठा होत गेला आणि ती हळुवार शब्दात उत्तरली," सर मैने कोई जोक किया क्या?"
सौरभ क्षणभर स्वतःच हसून आवरत उत्तरला," ये बात सही है की लडकीया उसके पिछे रेहती थि पर उसको लडकीयो मे कहा इंटरेस्ट था. वो अपणे आप मे बिजी रेहता था. हमे लडकीया देखती नही थि और उसे देखती तो उसे इंटरेस्ट नही था फिर उन्मे बिजी रहणे का सवालही नही आता."
स्वराला त्यांना न सांगता त्यांच्या मनातील सर्व काढायचं होत म्हणून ती पुन्हा नाटक करत म्हणाली," इतने हँडसम लडके को गर्लफ्रेंड ना हो ये मै मानही नही सकती. आप मेरा मजाक उडा रहे है ना? सच कहिये??"
सौरभ आता जरा शांत होत म्हणाला," नही स्वरा सच मे उसके जिंदगी मे कोई लडकी नही थि. लडकीया उसके हा का इंतजार करते करते दुसरो को बिवी बन गयी पर उसने ऊन किसीं को भाव नही दिया. एक दिन ऐसेंही मैने उससे पुछा की क्या तुझे किसीं मे इंटरेस्ट नही है. तो उसने कहा इंटरेस्ट है यार पण यहा कोई ऐसी लडकी नही जीसके बारे मे सूनकर, जिसे देखकर मै पेहली नजर मे प्यार मे पड जाऊ. वो जीस दिन आयेगी ना उसे जमाणेसे, घरवालोसे लढकर हासिल करुंगा. उसे इतना प्यार करुंगा की उसे जिंदगी मे सुख की कोई कमी नही मेहसुस होगी. ऐसें लडकी आने तो दे. खुद उससे दिलं की बात करुंगा. न जाणे कहा है वो लडकी? मेरे ख्वाब मे या मेरे जेहनमे?"
त्याच बोलणं ऐकून स्वराच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. ती शांत झाली होती की सौरभ म्हणाला, " क्या हुआ स्वरा?"
स्वराने पटकन डोळे पुसले आणि हलकी हसत म्हणाली," और अब कैसे है सर? खुश तो है ना?"
सौरभ आता जरा शांत वाटत होता आणि तो उदास स्वरात उत्तरला," सच बोलू तो वो पेहले अकेले रेहता था पर खुश था लेकिन अब सब को खुशीया बाटता है पर भी खुश नही. कुछ तो है दिलं मे जो वो किसींको बताता नही. वो जमाणे को खुश है ऐसा दिखता है पर अंदर से वो खुश नही है ऐसा मेहसुस होता है. मैने पुछा बहोत बार लेकिन वो बात टाल देता है शायद मुंबई से आने के बाद से है ये सब. कुछ हुवा था क्या वहा? तुम्हे पता है वजह उसके ऐसें होणे की?"
स्वरा आता जरा जड आवाजात उत्तरली," हा सर वजह भी पता है और उसका उपाय भी है. मै आपको प्रॉमिस करती हु की वो फिरसे हसणे लगेगे. उनका चेहरा कभी उदास नही होगा. उनको भी बहोत सारी खुशीया मिलेगी."
स्वरा विश्वासाने बोलून गेली तर सौरभ प्रश्नार्थक शब्दात उत्तरला," क्या है वजह? बताओ तो सही?"
स्वरा हसतच म्हणाली," सर अब बताने की नयी करणे का वक्त है. सिर्फ कुछ दिन इंतजार किजीए आपको आपका जवाब मिल जायेगा "
त्याने काही बोलण्याआधीच स्वराने फोन ठेवला. सौरभ त्यावेळी विचारात पडला होता तर स्वरा आनंदात होती. त्याच प्रेम बघून तिच्या डोळ्यातुन सतत आनंदाश्रू वाहत होते आणि तिला एकच विचारत होते," अन्वय सर इतकं प्रेम आहे तुमचं माझ्यावर की स्वता दुःखी राहूनही मला सुखी करू पाहत होता?? मग आता तुमचे सर्व आनंद मी तुम्हाला देणार आहे. अन्वय सर तुम्हाला धक्का द्यायला मी तयार आहे. तुम्ही आहात ना? सहन होईल ना तुम्हाला तो धक्का??"
ती हसली. आता कदाचित काहीतरी सुंदर घडणार होत. कदाचित प्रेमाचा विजय होणार होता.
मोहब्बत के फरीशते से
मोहब्बत बया करना चाहती हु
लगता है अटपटासा ये मेरा अंदाज
पर भगवान तुझसे मैं इजहार करणा चाहती हु..
क्रमशा....