बात करते ही हर उलझन सुलझा देते हो
क्या शायर हो, दिलं का दर्द युही जाण लेते हो?
ती सायंकाळची वेळ. एक छोटंसं गार्डन. हळूहळू चांदण्या ढगांवर येऊ लागल्या होत्या. बाहेर गुलाबी थंडी लोकांना वेड लावत होती आणि स्वयम आपल्या गुडघ्यावर बसून, हातात रिंग घेत उत्तरला," स्वरा विल यु मॅरी मी प्लिज? इस पल के लिये मैने न जाणे कितने ख्वाब सजाये थेे. जिंदगी का एक-एक लम्हा गिन कर गुजारा था. तुम नही थे तो तुम्हारी तसविर को देखकर बाते कर लेते थे. कभी सोचा ना था की तुम फिरसे वही मोडपर मिल जाओगी? शायद ये सपनाही था जो कभी पुरा नही हो सकता था फिर भी सपणे देखणा मैने छोडा नही. पता नही था वो पुरे होगे की नही फिर भी देखता रहा और देखो आज तुम मेरे सवाल का जवाब लेकर आयी हो. तुम लौट आयी हो स्वरा! अब इंतजार होता नही स्वरा जलदी से केह दो की तुम्हे मुझसे बेइंतेहा प्यार है. तुम भी जी नही सकते मेरेे बिना. तुम भी मेरी जिंदगी का हिस्सा बनना चाहती हो. क्या पुरी करोगी तुम मेरे हर सपने मुझको अपणाकर? बोलो प्यार है तुम्हे मुझसे?"
स्वरा काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावर हसू होत. नजरेत प्रेम. तिच्या हसूमध्येच त्याला तीच उत्तर मिळाल. तीच बोट समोर होत आणि त्याने ती रिंग तिच्या बोटात घातली. ते आता हळूच एकमेकांना बघू लागले होते. त्यात प्रेम होतं, लज्जेचे भाव होते आणि जगाला झुगारून लढण्याच सामर्थ्य होत. हा सोहळा सर्व जगासमोर सुरू होता. आज त्यांच्यासमोर ते मूलही होते, ज्यांनी स्वराला त्रास दिला होता. आज त्यांच्याकडेही काहीच बोलायला नव्हतं. ते एकमेकांचे झाले आणि तो क्षण बघायला गार्डन मधील पूर्ण मित्र परिवार साक्षी झाला होता. स्वरा आपल्या बोटाकडे, त्याने घातलेल्या रिंगकडे बघतच होती. स्वयमचही त्यावरच लक्ष होत.
तेवढ्यात स्वराचा मोबाइल वाजला. तिने मोबाइल बंद करायला डोळे उघडले तेव्हा जाणवलं की बाजूला कुणीच नव्हतं. ना स्वयम, ना गार्डन, ना तिच्या हातात रिंग. तिला जाणवलं की ती स्वप्न पाहत होती म्हणून तिने स्वतःच्याच कपाळावर हात मारून घेतला आणि हसतच म्हणाली," वेडाबाई, काय सुरू आहे तुझं? स्वप्न आणि तू? विचित्र आहे बाबा. पण खरंच तेच भाव आहे का तुझ्या मनात? स्वयमच होता ना तो की.. " ती स्वतःशीच बोलून स्वतःवरच वेड्यासारखं हसत होती आणि पुन्हा अलार्म वाजला. मोबाइलवर लक्ष जाताच ती पुन्हा स्वतःवरच हसत उत्तरली," मॅडम लग्नाला उशीर आहे पण ऑफिसला नाही. चला तयारी करा आणि ऑफिसला लवकर पोहोचा अन्यथा कार्तिक सर तुम्हाला काही सोडणार नाहीत. कदाचित ह्यावेळी कायमची सुट्टी होईल तुमची. मग स्वप्न बघण्याशिवाय दुसरे काम उरणात नाहीत. चला मग उठताय ना? ती स्वतःवरच हसली आणि अलार्म बंद करत गादीवरून उठली.
स्वरा उठली, फ्रेश होऊन पुन्हा रूममध्ये परतली आणि स्वयंपाक बनवू लागली. आज स्वरा उठल्यापासून खुपच आनंदि होती. एवढंच काय आज मॅडमच्या ओठांवर वेगवेगळे गाणे येऊ लागली आणि रूमच वातावरण एकदम बहरून निघालं. स्वराच्या अशा वागण्यामागच कारण होत अन्वय. अन्वयशी ती जेव्हा- जेव्हा बोलत असे त्यानंतर तिच्या डोक्यात कुठलाच प्रश्न राहत नसे. हाच अनुभव तिला ह्यावेळी सुद्धा आला. त्याच तिच्यावर प्रेम असताना सुद्धा त्याने तिला स्वयमबद्दल अचूक सल्ला दिला होता. त्याचा प्रामाणिकपणा बघून स्वराला क्षणभर विचारच आला होता. ह्या एका प्रसंगावरून अन्वयबद्दलचा आदर तिच्या मनात आणखीच वाढला होता. ती त्याच्याशी बोलली आणि तिच्या मनातले सर्व गोंधळ क्लिअर झाले. कदाचित तिचा निर्णयही झाला होता. त्यामुळे ती आज खूपच खुश होती. ती दरवळू लागली होती.
बडे अरसे बाद प्यार का मतलब मिला है
इजहार कैसे करते ये सवाल फिरसे पडा है??
आज आनंदाच्या भरात मॅडमने केव्हा काम आवरले तीच तिलाच कळलं नाही आणि काम आवरून मॅडम स्टेंशनकडे निघाल्या. ते थंडीचे दिवस होते त्यामुळे तो सकाळचा गारवा तिच्या अंगाला स्पर्शून जात होता आणि स्वरा पुन्हा सुखावून जात होती. तिची आज ती नजर देखील सर्वाना भिरभिर न्याहाळू लागली होती. अगदी सर्वच लोक मस्त गरम कपडे घालून ट्रॅव्हल करत होते पण स्वराला मात्र त्याची गरज वाटत नव्हती. उलट तिला तो गार वारा हवाहवासा वाटत होता कारण आज ती कुणाच्या तरी प्रेमात धुंद न्हाहू लागली होती. लोक बदलत होते पण स्वराचा अंदाज काही बदलत नव्हता. स्वरा समोर जातच होती की तिच्या लक्षात आलं, एक छोटीशी मुलगी रस्ता क्रॉस करायला केव्हाची वाट बघत होती पण तिला ट्रॅफिकमुळे रस्ता क्रॉस करता येत नव्हता. स्वराला ते दिसलं आणि ती हसतच तिच्याजवळ पोहोचली. स्वराने त्या मुलीचा हात पकडला आणि काहीच क्षणात रस्ता क्रॉस करू लागली. तेव्हाच ती छोटी मुलगी म्हणाली," थॅंक्यु दिदु!!"
तिचे ते गोड शब्द ऐकून स्वराच्या आनंदात आणखीच भर पडला. स्वराने तिचे गाल ओढले आणि बाजूला दुकानातून धावत जाऊन चॉकलेट घेत तिच्या हातात ठेवले. तिनेही ते पटकन घेतले आणि पुन्हा आपल्या रस्त्याने जाऊ लागली. स्वरा त्या मुलीला दुरूनच बघत होती. ती मुलगी समोर गेली आणि मधातच वळून बाय करू लागली. तीच गोड हसू बघून स्वरा पुन्हा कामातून गेली. ती मुलगी आपल्या वाटेने गेली आणि स्वराही स्टेंशनकडे जाऊ लागली. आपलं मन प्रसन्न असलं की आजूबाजूच्या लहान-लहान गोष्टीतही आपण आनंद शोधतो हे आता स्वराला जाणवलं आणि स्वराचा चेहरा पुन्हा एकदा बहरून निघाला.
स्वरा स्टेशवर पोहीचली आणि तशीच ट्रेन आली. स्वराला धावतच ट्रेन पकडावी लागली. ट्रेन सुरू झाली आणि स्वरा श्वास घेत माधुरीला म्हणाली," हाय मधु!! कशी आहेस माझी लाडोबा??"
माधुरी तिच्या विरुद्ध बाजूने पाहत होती. तिचा आवाज येताच ती स्वराकडे बघू लागली. स्वराचा चेहरा आज खूपच खुलला होता म्हणून माधुरी हसतच उत्तरली," आज बहुतेक गुड न्युज आहे वाटत तेव्हाच चेहरा इतका प्रफुल्लित जाणवत आहे मॅडमचा. आहे ना खुशीची गोष्ट?"
स्वरा आता तिच्यावर हसत उत्तरली," हो पण मी सांगणार नाही. तुलाच ओळखावं लागेल. ओळख बघू काय असेल माझ्या आनंदामागचं कारण??"
माधुरी क्षणभर विचारात पडली तर स्वरा तिच्याकडे बघून हसत होती. काही क्षण गेले आणि माधुरी उत्तरली," तुझं लग्न ठरलं, एम आय राइट??"
स्वरा तिचे गाल ओढत आता म्हणाली," पूर्णता बरोबर नाही पण त्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे हे कबूल करेन. काल अन्वय सरांशी मी बोलले, खूप मस्त सल्ला दिला त्यांनी. त्यांच्याशी बोलले की सर्व प्रॉब्लेम सुटतात माझे. खरच ग्रेट आहेत अन्वय सर. मानलं पाहिजे त्यांना. स्वतःच माझ्यावर प्रेम असताना देखील सल्ला देताना एकदाही उदास झाले नाही, उलट हसून- हसुन त्यांनी सर्व समजावून सांगितलं. कोणत्या मातीचे बनले आहेत काय माहिती? बहुतेक ते अंबुजा सिमेंटची दिवार आहे, तुटतच नाही."
स्वरा मिश्किल हसत होती आणि माधुरी हळुवार स्वरात उत्तरली," काय दिला सल्ला त्यांनी? तू कशाबद्दल बोलते आहेस??"
स्वरा तिच्या चेहऱ्यावर नजर टाकत पुन्हा उत्तरली," मी ना स्वयमबद्दल त्यांना सर्व सांगितलं. मला वाटलं त्यांना एकूण थोडं तरी वाईट वाटेल पण अस काहीच झालं नाही उलट त्यांनीच मला सल्ला दिला की त्याच्याशी लग्न कर. स्वप्न बघ आणि पूर्ण कर. माणसाला एक संधी कायम द्यावी, त्यात स्वयमवर तर मी प्रेम करते मग त्याला नको का द्यायला संधी?? शेवटी म्हणाले कसे..लग्नाला नक्की बोलावं हा मी येईल डान्स करायला!!"
स्वराच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याजोगे होता तर माधुरी तोंडताच पुटपुटत उत्तरली," वाईट वाटलं असेल तरी तुझा आनंद बघून सांगितल थोडी असेल. तू तर त्याच्या प्रेमात वाहवत आहेस आणि अन्वय सर आता उदास झाले असतील तुझ्या लग्नाबद्दल विचार करून."
ती पुटपुटत होती आणि स्वरा उत्तरली," काय म्हणालात मॅडम तुम्ही??"
माधुरीने चेहऱ्यावर खोट खोट हसू आणले आणि हळूच म्हणाली," अभिनंदन म्हणाले ग!! दुसर काय बोलणार मी. "
स्वराही लाजतच उत्तरली," थॅंक्यु मॅडम!!"
त्यांनी आता बोलन बंद केलं आणि दुसरीकडे बघू लागल्या. तरीही अधमाधात त्या एकमेकांकडे बघायच्या. स्वराच्या चेहऱ्यावरचा आनंद तिळमात्र कमी झाला नव्हता तर माधुरीचा आधीच गोल असलेला चेहरा फुगला होता त्यामुळेही स्वराला हसू आवरत नव्हतं. स्वराला माहीत होतं की ती रागावली आहे तरीही स्वराने तिचा तो फुगा तसाच ठेवला आणि स्वता आपल्या आनंदात सामील झाली.
असाच दोघींचाही प्रवास त्यांचे स्टेशन येईपर्यंत सुरू होता. माधुरी उतरली नंतर स्वराही आपल्या स्टेंशनवर उतरली आणि ऑफिसकडे जाऊ लागली. आज इतका प्रवास झाल्यावरही स्वराला क्षणभर थकवा आला नव्हता. एव्हाना रोज लवकर उठून ऑफिसला यायला स्वराला कंटाळा येत असे पण आज तिच्या चेहऱ्यावर तो कुठेच दिसत नव्हता. काही क्षण गेले, ती ऑफिसला पोहोचली आणि नेहमीप्रमाणे बाप्पाला प्रणाम केला. ती आपल्या खुर्चीवर बसलीच होती की दीपिका तिच्या बाजूला खुर्ची आणत उत्तरली," स्वरा आज चेहरा जास्तच चमकत आहे. काही खास कारण??"
स्वरा आज अगदी रोमँटिक मूड मध्ये होती आणि तिने त्याच अंदाजात उत्तर दिले," ओळख बघू काय असेल कारण?? खास तर आहेच! "
दीपिका काही क्षण विचार करत उत्तरली," लग्न ठरलंय तुझं??"
स्वराच्या चेहऱ्यावरचा हसवा काहीच क्षणात गायब झाला आणि ती गोंधळत उत्तरली," तुम्हाला कुणी सांगितलं बर? माझ्या चेहऱ्यावर लिहिलं आहे का?? सर्व अगदी बरोबर गेस करत आहेत. तुम्ही काय चेहरे वाचायचे क्लास लावले का? हो ठरलं पण तुम्हाला कस कळालं ते??"
स्वराच लग्न ठरलं हे ऐकून दीपिका ओरडतच होती की स्वराने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि हळूच उत्तरली," अग ए ताई!! काय करत आहेस? लग्न ठरलं म्हणजे बोलनी सुरू आहे. पक्क झालं की सांगू सर्वाना खुश. तोपर्यंत शांत राहा आई माझी. नाही तर फजिती व्हायची!!"
दीपिकाने तिचा हात तोंडावरून काढला आणि पुन्हा विचारले," मुलगा काय करतो? कुठे राहतो? काही तरी सांग. किती ओढ लागली आहे मला सर्व ऐकून घ्यायची."
स्वराने पुन्हा हसत म्हटले," आपल्याच फिल्डचा आहे आणि राहतो दिल्लीला. दिसायला गुड लुकिंग आणि स्वभाव म्हणशील तर शांत. कुणालाही प्रेमात पाडू शकतो असा आहे तो!!"
दीपिका आता चेहरा पाडत उत्तरली," अन्वय सरांशी! केव्हा ठरलं, मला का सांगितलं नाहीस? लपवून का ठेवलस माझ्यापासून??"
दीपिका तिला प्रश्न विचारत होती आणि स्वरा त्यावर फक्त हसत होती. तिला आज उत्तर न द्यायला पण मज्जा वाटत होती. दीपिका पुन्हा काही बोलणार त्याआधीच कार्तिक समोरून जात म्हणाला," स्वरा प्लिज मेरे केबिन मे आओ. कुछ जरुरी बात करनी है."
सरांचा आवाज येताच स्वरा दीपिकाचा पिच्छा सोडवत त्यांच्या केबिनमध्ये गेली. इकडे दीपिका टेन्शनमध्ये आली होती आणि स्वरा होती की केबिनमधून बाहेर यायचं नाव घेत नव्हती. स्वरा बाहेर आली तेव्हा जववळपास पाऊणतास झाला होता. दीपिकाचा चेहरा अजूनही फुगला होता. स्वराने तिच्याकडे लक्ष दिले आणि हसतच कामाला लागली.
आज दिवसभर ऑफिसमध्ये एक वेगळीच मज्जा होती. स्वराच्या चेहऱ्यावरून आनंद कमी होत नव्हता तर दीपिकाचा चेहरा जरा फुगला होता. तसा पूर्ण दिवस कार्तिक ऑफिसला असताना कामातच जायचा पण आज लंच मध्येही स्वरा तिला सापडली नव्हती. कार्तिकने तिला तेव्हाही केबिनला बोलावून घेतले होते. दीपिका तीच उत्तर जाणून घ्यायला तिच्या मागे मागे जात होती तर स्वरा आज नुसती मोरणीसारखी इकडे तिकडे नाचत होती. दिवसभरात असा एकही क्षण दीपिकाला मिळाला नाही जेव्हा तिला स्वराशी बोलता येईल म्हणून तिचा मूड खराब झाला होता तर स्वरा अजूनही तशीच फ्रेश जाणवत होती..
ऑफिस सुटलं आणि स्वरा पटापट पावले टाकत स्टेशनकडे पळू लागली तर दीपिकाही तिच्या मागे पळू लागली. ती स्वराच्या जवळ पोहोचत म्हणाली," सांग ना ते अन्वय सरच आहेत का?? मला टेन्शन आलंय!! काहीतरी बोल. केव्हाची पळत आहेस माझ्यापासून? का सतावत आहेस मला?"
स्वरा आज केवळ हसायच काम करत होती. ती जाणून तिची शंका दूर करत नव्हती उलट आज तिची मज्जा घेण्यात तिला जास्त रस होता. दीपिका तिला प्रश्न विचारतच होती तर स्वरा फक्त हसत होती. काही क्षण गेले. स्वराचा मोबाइल वाजला आणि तिने व्हाट्सअप्प ओपन केलं. त्यावर अन्वयचा मॅसेज होता. तिने मॅसेज ओपन केला तर त्यावर त्यांनी त्यांच्या भाचीचा फोटो पाठवला होता आणि मॅसेजमध्ये लिहिले होते " स्वरा आता लग्नाचा निर्णय घेतलाच आहेस सो मला वाटत काहीच दिवसात असच बाळ होईल. अगदी गोर-गोमट. मग तुझा पूर्ण वेळ त्याला खेळवण्यात जाईल. आता माझी सुटका होईल बघ. आता तू काही मला प्रश्न विचारणार नाहीस. मला सुट्टी मग कायमची. वाचलो रे देवा तुझ्या प्रश्नातून!!"
त्याचा मॅसेज बघून स्वराला हसूच आलं आणि तिने पटकन मॅसेज टाइप केला. " सर मला एवढी सुंदर मुलगी होणे शक्य नाही. तुम्हाला होऊ शकते. वाटल्यास तुम्हाला झाल्यावर ती मला द्या. काय म्हणता?? बेस्ट आहे ना? विचारते काय म्हणा सरळ घेऊनच येईन!!"
स्वरा त्याच्या मॅसेजची वाट बघत होती पण त्याचा मॅसेज काही आला नाही वरून दीपिकाला अन्वयचा मॅसेज दिसताच स्वराचा पुन्हा राग आला फक्त त्यापुढे तिने काही विचारलं नाही. कदाचित तिच्या डोक्यात फिट्ट झालं होतं की ते अन्वयच आहेत..
रात्रीची वेळ. स्वरा निवांत जेवण करून गादीवर पडली होती. तिच्या मूडमध्ये आज एकही क्षण बदल झाला नव्हता. बाहेर गार वारा सुरू होता. ती गादिवर पडलीच होती की तिला काहीतरी सुचल आणि तिने मॅसेज टाइप केला.
" स्वयम मुझे तुमसे कुछ केहना है पर ऐसें मोबाइल पर नही. वही अपणे गार्डन पे. कुछ खास केहना है. शायद तुम्हारा जवाबभी वही मिल जायेगा. तुम्हे चलेगा ना उतना इंतजार??"
तिने मॅसेज टाइप केला आणि त्याच्या रिप्लायची वाट पाहू लागली. काहीच क्षणात त्याचा रिप्लाय आला.
" आखरी सांस तक इंतजार करुंगा. बस याद से आ जाना. जवाब के लिये इंतजार कर सकता हु लेकिन दुरी से डर लगता है."
स्वरा त्याचा मॅसेज बघून क्षणभर हसली. तेवढ्यात दुसरा मॅसेज आला पण तो अन्वयचा होता.
" मॅडम ऍसिड अटॅक तुमच्यावर झालाय, होणाऱ्या बाळावर नाही. तेव्हा तुम्हालाही सुंदर मुलगी होईल आणि बर का तुम्हाला मुलगी झाल्यावर मीच पळवणार आहे तिला. आई नाही तर काय झालं, मुलगी तर सोबत राहील माझ्या! बघतच राहा नाही पळवल तर म्हण!! "
त्याच उत्तर वाचून स्वरा आता मोठ्याने हसू लागली आणि मॅसेज टाइप करू लागली...
" बघू बघू हो! कोण कुणाच पळवत तर?"
स्वराच्या चेहऱ्यावर आज हसू होत आणि कदाचित तीच उत्तरही तिने शोधल होत. अन्वय म्हणाला होता स्वार्थी हो तिने त्याच ऐकलं होतं का? काय होत तिच्या हसण्याच रहस्य?
अच्छि खासी बैठे-बैठे
मै गुम हो जाती हु
अब मै अक्सर मै नही रेहती
तुम हो जाती हु
क्रमशा....