Bhagy Dile tu Mala - 57 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ५७

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ५७

बेहद आसान है किसीं से प्यार करणा
उतनाही आसान है किसींसे इजहार करणा
प्यार तो कर लेते है लोग युही पेहली नजर मे
मगर मुश्किल है उसे दिलं-ओ- जान से निभाना

आयुष्यात वर्तमानकाळ आणि भूतकाळ यामध्ये फरक काय असतो? साधं सोपं उत्तर द्यायचं असेल तर गेलेला वेळ पण ह्याच उत्तर तितक देखील सोपं नाही. आयुष्यात वेळेसोबतच बऱ्याच गोष्टी बदलत असतात. आयुष्यात नवीन-नवीन माणस येतात जी आपल्याला लळा लावतात आणि आपली स्वतःची एक जागा बनवतात. भावना तर अगदी त्याच असतात पण भावनांची तीव्रता तेवढीच असन शक्य नाही म्हणून भूतकाळ वर्तमानकाळात अलगद डोकावू पाहत असताना नक्की कस वागायचं हे कुणालाच पटकन कळत नाही. नेमकी हीच स्थिती स्वराची झाली होती.

स्वराच्या आयुष्यात आधी प्रेमाला तितक महत्त्व नव्हतं. एक वेळ ती म्हणाली होती की माझ्यावर प्रेम करणं वेगळं आणि मला पाहूनही माझ्यावर प्रेम करत राहण वेगळं. जो माझ्यावर प्रेम करेल तो मुर्खच असेल पण दिवस बदलायला वेळ लागत नाही तसेच विचार बदलायला वेळ लागत नाही हेही अनुभव तिला फक्त काहीच महिन्यात आले. आता तिच्यावर एक नाही तर दोन व्यक्ती प्रेम करणारे होते. दोघेही अगदी काही काळासाठीच तिच्या आयुष्यात आले होते पण दोघांचीही तिच्या आयुष्यात वेगळी जागा होती. एक येऊन निस्वार्थ प्रेम कस करायचं ते शिकवून गेला. त्याने तिला जगायला हिम्मत दिली, प्रेरणा दिली आणि तिला प्रेमाचा त्रास होऊ नये म्हणून तिलाच सोडून गेला तर दुसरा तिला भूतकाळात काही कारणाने जी सुख देऊ शकला नव्हता ते देण्यासाठी स्वप्न सजवू लागला होता पण ह्या सर्वात स्वराला नेमकं काय हवं होतं??

ते तिच्या आयुष्यातले सर्वात सुंदर व्यक्ती होते त्यामुळे एकाला नकार देन म्हणजे त्याला आयुष्यातुन गमावून बसणं होत तेव्हा स्वरा विचारात हरवत चालली होती. ती नक्की कुणाला स्वीकारणार होती आणि दुसर्याला न स्वीकारण्याचे कारण काय देणार होती? हा एक प्रश्नच होता. तिने ज्याच्यावर प्रेम केलं त्याला स्वीकारणार होती की जो अलीकडे तिच्या आयुष्याचा एक महत्त्वपूर्ण भाग झाला, जो तिच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होता त्याला स्वीकारणार होती? कदाचित ह्याच उत्तर तिलाच माहिती नव्हत म्हणून ती दिल्लीला यायला घाबरत होती. ती दिल्लीला आली आणि तोच प्रश्न तिला त्रास देऊ लागला. पण दिल्ली मध्ये स्वयम एकटाच नव्हता. होता तो अन्वय आणि त्याच निस्वार्थ प्रेम. जेव्हा त्याला कळलं असत की जिला प्रेमाने त्रास होतो म्हणून मी सोडून गेलो होतो आता तीच दुसऱ्याशी लग्न करतेय तेव्हा तो कसा वागला असता ह्याची उत्तर स्वरा शोधू लागली होती. स्वाभाविकच प्रश्न गहन होता. तिने नक्की काय करायला हवं होतं. ऐकालाही नाकारणं म्हणजे दुसऱ्या शब्दात प्रेमाचा अपमानच होता. त्यांनी न केलेल्या चुकीची शिक्षा होती ती तेव्हा स्वराला विचार करून निर्णय घ्यावा लागणार होता. आता स्वराच उत्तर काय असणार होत हे काळच ठरवणार होता.

ती त्याच दिवसाची सायंकाळ होती. स्वयम आज तिला बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन आला होता. ती त्याच्यासोबत येताना सुद्धा आज बाहेरच्या वातावरणातच हरवली होती. ती जेव्हा- जेव्हा स्वयमच्या नजरेत बघत असे तेव्हा तिला तो एकच प्रश्न आठवत असे त्यामुळे स्वरा त्याच्याशी नजर मिळवायला घाबरत होती. स्वराचा बाहेर बघत-बघतच प्रवास सुरु होता की स्वयमने समोर गाडी थांबवली आणि स्वरा आपल्या विचारातून बाहेर पडली. स्वरा आपल्या विचारातून बाहेर येताच समोर बघू लागली. स्वरा बाहेर बघतच होती की स्वयम गाडीतून बाहेर पडला आणि स्वराही बाहेर पडली. बाहेर हलकासा अंधार पडला होता. चांदण्या चमचम करू लागल्या होत्या आणि समोर आकर्षक दृश्य. स्वरा त्या क्षणात क्षणभर हरवलीच होती की स्वयम उत्तरला," स्वरा याद है ये प्लेस कोणसा है?"

स्वयम तिच्याकडे हसऱ्या चेहऱ्याने बघत होता आणि स्वरा आपल्या चेहऱ्यावर हसू आणत उत्तरली," हा ये जगहँ मै कभी भूल नही सकती. शायद पेहली और आखरी बार मे यही आयी थि. जगह का माहोल बदल गया है, जगह पेहलेसेभी खूबसुरत हो गयी लेकिन वो याद मुझमे अभिभी जिंदा है और शायद मै भी!"

स्वरा- स्वयम दोघेही हसत होते आणि स्वयमने तिला समोर जायला हात दिला. स्वरानेही त्याच्या हातात हात दिला आणि दोघे समोर जाऊ लागले. ही तीच जागा होती जेव्हा स्वरा, स्वयमला मनातलं सांगायला आली होती त्यामुळे तो प्रसंग तिच्या डोक्यात तसाच बसला होता. स्वरा ते गार्डन बघत- बघतच समोर जाऊ लागली. स्वरा ८ वर्षाआधी इथे आली होती शिवाय सकाळच्या वेळी त्यामुळे ह्या जागेची सुंदरता ती अनुभवू शकली नव्हती पण आज या सांजवेळी तिला ती जागा खूपच खास वाटू लागली. त्या गार्डनच्या रोपटावर वगैरे छान लायटिंग केली होती शिवाय वेगवेगळ्या प्रकारची झाडे तिथे होती त्यामुळे ते सर्व बघून स्वराच्या चेहऱ्यावर अचानक आनंद पसरला तर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून स्वयमदेखील आनंदी झाला. ते चालत- चालत समोर जात होते आणि अचानक स्वराचे पाय थांबले. ही तीच जागा होती जिथे स्वरा त्याला मनातलं सांगायला वाट बघत होती पण तो क्षण कधी आलाच नाही. स्वरा त्या जागेकडे बघून क्षणभर हसली आणि समोर जाऊ लागली तेव्हाच स्वयम तिला अडवत म्हणाला," स्वरा यहा कुछ देर बैठे क्या?"

कदाचित स्वयमलाही ती जागा बरोबर आठवणीत होती म्हणून त्याने तिला बसायला सांगितले होते. स्वयमची इच्छा म्हणून तिनेही बसायला हरकत घेतली नाही. ते तिथे विराजमान झाले आणि समोरच दृश्य चुपचाप बघू लागले. सायंकाळची वेळ असल्याने थोडी फार गर्दी होती. नेहमीप्रमाणे लहान मूल, म्हातारे आणि काही तरुण मूल मुलींना बघत टाइमपास करत होते. सर्व कस मस्त सुरू होत. स्वरा तो प्रत्येक क्षण बघण्यात हरवली होती आणि स्वयम हळूच हसत म्हणाला," स्वरा तूम्हे पता है मै तूम्हे यहा क्यू लेकर आया हु??"

त्याच्या आवाजाने स्वराच लक्ष त्याच्याकडे गेलं आणि तिने हसतच मानेने नकार दिला. ती त्याच्याकडे बघतच होती की तो म्हणाला," करिब ८ साल पेहले ये लास्ट जगह थि जहा हम साथ आये थे और उसके बाद कभी अकेले मे जा न सके. पता है मुझे की बहोत वक्त गुजर चुका है पर मैने सोचा था की अगर तुम कभी मेरी जिंदगी मे लौट आयी तो मै हमारे कहाणी की यही से शूरुवात करुंगा. इसलीये आज यहा लेकर आया हु. तुम्हे अच्छा लगा ना?"

स्वराच्या चेहऱ्यावर तसच हसू कायम होत आणि तो नजर चोरत उत्तरला," स्वरा मुझे पता है की तुम यही पर बैठकर मुझसे इजहार करणे के बारे मे सोच रही थि पर वो पल आयाही नही इसलीये आज वो कमी आज मै पुरी कर देता हु."

स्वरा आता बऱ्याच वेळाने एकच वाक्य उत्तरली," मतलब??"

तिचे शब्द ह्यावे आणि तो खिशातून सोन्याची रिंग काढत, आपल्या गुढघ्यावर बसला. त्याला गुडघ्यावर बसताच बघून स्वरा शॉकने उभी झाली तेव्हाच तो रिंग तिच्याकडे करत म्हणाला," स्वरा माना की हम बहोत आगे आ चुके है पर फिर भी केहता हु की मेरी जिंदगी मे तुम्हारे सिवा कोई आ नही सकती और मै आनेभी नही दे सकता. तुमही मेरा पेहला और आखरी प्यार हो. क्या तुम मुझसे शादी करोगी?"

स्वरा त्याच बोलणं ऐकून शॉकच झाली. आताच तर त्याने तिला विचार करायला वेळ दिला होता आणि अचानक हे काय म्हणून स्वरा त्याच्याकडे डोळे फाडून बघत होती. तिच्या चेहऱ्यावर ना आनंद होता ना दुःख. तो रिंग घेऊन तसाच होता तर स्वरा हात समोर करायला बघत नव्हती. तिला हा निर्णय इतक्या लवकर घ्यायचा नव्हता आणि ती त्याला ह्याक्षणी दुखावू पण शकत नव्हती म्हणून ती थोडी घाबरली होती. कुणी नाही म्हटलं तर किती त्रास होतो हे स्वराला माहिती होत म्हणून तिच्या तोंडून एक शब्द बाहेर पडत नव्हता. तिच्या हृदयाच्या हार्ट बिट जास्तच जोराने वाढू लागल्या. तिच्या चेहऱ्यावर घाम सुटला होता आणि नक्की काय करायचं तिला समजत नव्हतं. स्वयम तिने समोर हात करायची वाट बघत होता. त्याचा चेहरा हळूहळू खाली पडत होता म्हणून तिचा नकळत हात समोर झाला. तिचा हात समोर येताच स्वयमच्या चेहऱ्यावर अचानक हसू आलं. त्याच हसू बघून ती क्षणभर त्याच्या चेहऱ्यात हरवली आणि मागचं- पुढचं सर्व विसरून गेली. तो रिंग घालायला पुढाकार घेऊ लागला. स्वराला नेमकं काय सुरू आहे कळत नव्हतं. ती थोडी घाबरली होती तेवढ्यात बाजूच्या काही मुलांचा आवाज आला. त्यातला एक आपल्या मित्रांना म्हणत होता," देखो भाई इसको प्रपोज करणे को कोई और जगह नही मिली क्या? साले सब यहा पर आशिको से भरे है. कहा क्या करना है इनको पता ही नही. बहोत पहुचे हुये आशिक लगते है. तभी तो सबके सामने ऐसें बेशरम होंकर प्रपोज कर रहे रहे. सबर नही होता होगा क्या करेंगे ये भी. घोर कलीयुग है भाई घोर कलियुग.!!"

त्यांचा आवाज जाताच स्वयमने त्यांच्याकडे नजर केली आणि स्वराने पटकन हात खाली केला. तिची भीती क्षणभर नाहीशी झाली. स्वयम त्या मुलाकडे रागावून बघत होता की पुन्हा तोच म्हणाला," भाई, प्रपोज वगैरे ठीक है यार पर लडकी तो ढंग की धुंड लेता. ऐसें बंदर वाली सुरत को कोण प्रपोज करता है. चल ये भी ठीक है लेकिन मजे मार ने के वक्त क्या करेगा? तब क्या मूह पर रुमाल रखं कर करेगा सब कुछ?"

ते हसत होते आणि स्वयमचा आता स्वतःवरचा ताबा सुटला. त्याच्या डोळ्यात आग दिसत होती आणि तो त्याला मारायला धावला तेवढ्यात स्वराने त्याचा हात पकडत म्हटले," स्वयम प्लिज कोई तमाशा नही. मुझे आदत है इस बात की. चलो हम इनसे कही दूर चलते है."

स्वयमची खर तर त्याला सोडायची इच्छा नव्हती पण त्याने स्वराकडे बघितले. ती अतिशय घाबरली होती म्हणून त्याने आपला राग ताब्यात घेतला. स्वरा त्याचा हात ओढतच दुसरीकडे घेऊन गेली. स्वयम दुसरीकडे जात तर होता पण त्याच्या चेहऱ्यावरचा राग काही कमी झाला नव्हता पण तो तिच्या चेहऱ्याकडे बघून शांत झाला होता. काही क्षण गेले. ते थोडे दूर जाऊन बसले. स्वराही आता थोडी रिलॅक्स वाटत होती. स्वयमने तिला चेहरा पुसायला रुमाल दिला आणि शांत बसला. फक्त काही सेकंद झाले होते आणि तोच मुलगा पुन्हा त्यांच्या जवळ येत म्हणाला," बता भी दे भाई? क्या रुमाल चेहरे पे डालकर करेगा या फिर कोई और टेक्निक है? मेरी सूनता होगा तो पिछेसे..."

आता मात्र स्वयमला आवरण शक्य नव्हतं. तो सरळ जाऊन त्याच्यावर पडला आणि त्याला मातीत लोळवून मारू लागला. स्वरा त्याला आवरायचा प्रयत्न करू लागली पण तो आता थांबायला तयार नव्हता. त्या दुसऱ्या मुलाचे मित्र स्वयमला ओढत होते पण स्वयम काही थांबायचं नाव घेत नव्हता. स्वरा तर नुसती ओरडत होती. स्वराच्या ओरडल्याने पूर्ण लोक तिथे क्षणात जमा झाले आणि अर्ध्या लोकांनी त्या मुलाला आवरले तर अर्ध्या लोकांनी स्वयमला आवरले. स्वयम खूपच रागात असल्याने बोलून गेला," सिर्फ प्यार नही है उससे शादी भी करणे वाला हु और सालो तुम जैसा शरीर पे प्यार करणे से बेहतर है की मै उससे मनसेही प्यार करू. मन से देखो तो हजार गुणहँ अच्छि है वो और सालो तुम उसके बारे मे ऐसें बात कर रहे हो. तुम जैसे ही किसीं कमीनेने इसका ये हाल किया है वरणा उससे खूबसूरत लडकी पुरी दिल्ली मे नही मिलती. अब तो तुमको खुले आम बताता हु की देख लेना शादी तो मै इससेही करुंगा क्यूकी मुझसे उसके सुरतसे नही सिरत से प्यार है!!"

तो रागात बोलतच होता की स्वरा त्याचा हात पकडून गाडीकडे घेऊन जाऊ लागली. स्वयमची हालत खूपच खराब झाली होती. त्याचा शर्ट पॅन्ट सर्व मातीने भरलेले होत तरीही त्याला स्वतःच्या रागावर आवर घालणं कठीण जात होतं. ते काही क्षणातच कारमध्ये पोहोचले आणि स्वयमने गाडी सुरू केली. स्वयम ने काही क्षणातच गाडी सुरू केली आणि तो चालवू लागला. काही क्षण झाले असतील शांत बसलेली स्वरा ओरडत म्हणाली," क्या जरुरत थि तुम्हे लढाई करणे की? मुझे आदत है अभि ऐसें लोगो की. मुझे अच्छा नही लगता मेरे लिये ऐसें कोई लढाई करे. मैं खुदको संभाल सकती हु."

आणि रागात असलेला स्वयम उत्तरला," नसिब अच्छा था सालो का सबने रोक लिया वरणा आज उन्हे मार डालता. समझते क्या है वो? और पेहलेही तूमनें बहोत सेह लिया है. अब तुम्हे कोई कुछ कहेगा तो उसे छोडने वाला नही हु फिर तुम्हे ईच्छा लगे या नही मुझे फरक नही पडता."

स्वयम खूप रागात होता म्हणून त्याच्याशी आता बोलणं योग्य नव्हतं तेव्हा स्वराने शांत राहायचाच निर्णय घेतला. आता त्यांचा शांत- शांत प्रवास सुरु झाला पण स्वराच्या अचानक लक्षात आले त्याचे ते शब्द," देख लेना इससेही शादी करुंगा."

स्वराने त्याच्याकडे बघितलं. तो अजूनही शांत नव्हता पण स्वराच्या चेहऱ्यावर मात्र भीती तशीच कायम राहिली. ती लग्नाची होती की आता झालेल्या वादाची ते तिलाच माहिती होत.

क्यू बेइंतेहा प्यार करते हो
क्यू लोगो से लढते हो
तकलीफ वो नही देते मुझे
तकलीफ सुरत है मेरी ये तुम क्यू नही समझते हो??


त्यांचा हा शांततेचा प्रवास अगदी घर येईपर्यंत तसाच सुरू राहीला. घर आलं तशीच स्वयमने पटकन गाडी पार्क केली आणि रागातच घरात पोहोचला. स्वयमची आई अगदी हॉलमध्ये बसूनच होती. त्याला तस बघताच ती काहीतरी विचारू लागली पण स्वयम तिच्याशी एक शब्दही न बोलता बेडरूममध्ये गेला. आईने त्याला एवढ्या रागात आधी कधीच बघितलं नव्हतं म्हणून काही क्षण त्या त्याला बघतच राहिल्या. त्या त्याला बघतच होत्या की मागून स्वरा अली आणि आई उत्तरल्या," स्वरा इसको क्या हुआ? इसके कपडे कैसे मैले हो गये?"

स्वराने घडलेल सर्व सांगितलं असत तर आई पण टेन्शनमध्ये आल्या असत्या म्हणून स्वरा चेहऱ्यावर खोट हसू आणत म्हणाली," आंटी आपका बेटा ना ज्यादाही खडूस है. वो पैर लटककर गीर गया और मै ऊसको चिढाणे लगी इसलीये वो गुस्सा हो गया. देखीये ना कैसा है आपका बेटा? कोई बात नही मै समझाती हु उसे."

स्वरा समोर समोर जात होती तर आई म्हणाल्या," तुमभी ना इतने बडे होंकर भी बच्चेकी तरहही बिहेव करते हो."

आई हसत होत्या तर स्वरा त्याच्या बेडरूमला गेली पण त्याने दार लावून घेतले होते. स्वराने त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला पण तो आज काहीच एकण्याच्या मूडमध्ये नव्हता. स्वराने काही क्षण तिथेच वाट बघितली आणि नंतर त्याला एकट सोडून, फ्रेश होऊन आईकडे पोहोचली. स्वरालाही आज त्याच टेन्शन आलं होतं पण आईसमोर ती काहीच बोलू शकली नाही.

स्वयमने स्वतःला बंद करून घेऊन आता बराच वेळ झाला होता. आईने जेवण बनविल आणि स्वयमला बोलवायला जाऊ लागली तेवढ्यात स्वराच त्याच्या रूमकडे धावत गेली. खर तर तिची त्याला बोलवायची हिम्मत होत नव्हती तरीही हळुवार आवाजात उत्तरली," पता है स्वयम तूम्हे अकेले रेहना है पर अगर थोडी देर तुम बाहर नही आये तो आंटी को सच बताना होगा और तुम जाणते हो फिर आंटी परेशान होगी. क्या तुम सच मे आंटी को परेशान करना चाहते हो?"

स्वरा एवढं बोलून त्याची काही क्षण वाट पाहू लागली तर स्वयम देखील लगेच बाहेर आला. तो बाहेर जरी आला तरी स्वराशी काहीच बोलला नाही. स्वराला माहिती होत की तो काहीच बोलणार नाही म्हणून तिनेही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. स्वयम खाली आला आणि आईने जेवन वाढायला घेतलं. जेवणाला सुरुवात झाली. स्वराची नजर त्याच्यावर अधून मधून जात होती पण तो गपगुमाने नजर खाली करून जेवण करत होता. त्याच्या आईला त्रास होऊ नये म्हणून तो तिच्याशी दोन शब्द बोलत होता मग पुन्हा शांत होऊन बसायचा. स्वयम आधी अस कधीच वागला नव्हता म्हणून स्वराला थोडं टेन्शन आलं होतं. इथेही शांततेत जेवण पार पाडल.

रात्री १२ च्या आसपासची वेळ झाली होती. स्वयम आपल्या रूममध्ये होता तर स्वरा आईसोबत झोपून होती. ती कितीतरी वेळ झोपण्याचा प्रयत्न करत होती पण स्वयमच ते रूप आणि त्याचा प्रत्येक शब्द तिच्या मनात तसाच घुमत होता. कितीतरी वेळ तिने स्वयमकडे जाऊन बोलण्याचा विचार केला होता पण त्याची आई जागीच असल्याने तिला काही जायला मिळालं नव्हतं. आता तिने आईवर लक्ष दिलं. त्या झोपल्या ह्याची खात्री होताच ती हळूहळू पावले टाकत त्याच्या रूमकडे गेली. तिने रूमकडे बघितलं. दार उघड होत म्हणून तिच्या मनाला शांती मिळाली. तिने आत डोकावून पाहिलं तर तो अजूनही रूममध्ये इकडून तिकडे चकरा मारत होता. एवढंच काय ती दारावर असून सुद्धा त्याच लक्ष तिच्याकडे गेलं नव्हतं. स्वरानेही दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या रूममध्ये प्रवेश करत म्हणाली," छोडो भी स्वयम! ऐसी बाते होती रेहती है. हो गया अब इतना टेन्शन क्यू लेना? ऐसें लोग है जगमे. अब उनका क्या कर सकते है हम? अच्छे लोग है वैसेही ये लोग भी है. उनका इतना टेन्शन नही लेणेका. समझें? अब छोड भी दो गुस्सा!!"

स्वयम आता थोडा शांत जाणवत होता. तो चकरा मारता मारता बेडवर बसला. त्याने डोक्यावर दोन्ही हात ठेवले आणि नजर खाली करत हळुवार आवाजात उत्तरला," स्वरा वो बात मै भूल गया हु. मुझे तो दुसरीही बात का बुरा लगा रहा है."

तो नक्की कशाबद्दल बोलत आहे स्वराला कळत नव्हतं म्हणून तीही त्याच्या बाजूला बसत म्हणाली," किस बात का??"

स्वयम आता उदासपणे बोलला," आज जो मैने देखा वो सिर्फ एक झलक थि. मै तो सोच रहा हु की इतने सालो मे तुमने क्या क्या सहा होगा और मै कायर घर मे बैठकर रोता रहा. स्वरा आज मुझे अपणे आपपे गुस्सा आ राहा है. क्यू नही था मै तुम्हारे साथ?? क्या मै सच मे तुम्हारे प्यार के लायक हु? हर बार तुमसे शादी के बारे मे पुछता हु पर क्या सचमे मैं प्यार करना भी जानता हु? स्वरा तुम इतना बडा मन कहा से लाती हो? तुम्हारे साथ लोग जो करते है उनको भी तुम कैसे माफ कर सकती हो? मुझे आज मेहसुस हो रहा है की मेरी गलती नही, गुनाहँ है. स्वरा मुझे प्लिज सजा दो. सजा दो. मेरे लिये यही सबसे अच्छा सबक है. प्यार ना निभाने की सजा शायद यही है!!"

तो एकाच श्वासात सर्व बोलून गेला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि स्वरा त्याचे डोळे पुसत म्हणाली," सच कहु स्वयम अगर मुझे मेरे मम्मी पप्पा के लिये तूम्हे छोडणा पडता तो छोड देती क्यूकी वो हमारा पेहला प्यार है और उनके सामने बाकी कोई भी मेरे लिये खास नही. इसलीये मुझे तुम पर गुस्सा नही है और दुसरी बात मुझे तुम मिलने क्यू नही आये इस बात का दुःख था और जब तुमने सब बताया तो शायद वो दर्द भी गायब हो गया. सच बोलू तो स्वयम ऊस वक्त अगर तुम मुझे देखणे आते और पापा को अस्थमा का अटॅक आया होता और चल बसते तो शायद मै अपने आप को माफ नही कर पाती. तब तूम्हे पाकर भी मै खुश नही रेहती. बस यही केहना है स्वयम की जो हुआ उसे भूल जावो. तुम शाम को केह रहे थे ना नयी शुरुवात तो चले आजसे करते है. मैने तुम्हे माफ किया खुश.अब तो हस दो."

स्वरासारखी मुली खरच खूप कमी मिळतात. तिलाच माहिती असत गमावण्याचं दुःख म्हणून इतक्या सहज ती स्वयमला माफ करून गेली होती. तो आता रिलॅक्स झाला आणि तीही आपल्या रूम मध्ये झोपायला गेली. पम झोपले दोघेही नव्हते. तो प्रसंग जसाच्या तसा दोघांच्याही डोळ्यासमोर उभा होता.

ये किस्सा अब आम हो गया
मेरा चेहरा युही बदनाम हो गया
लोग मारते रहे ताने वो सही था
उनकी जुबा खराब थि ये युही नजरअंदाज हो गया..

****************


दुसऱ्या दिवसाची दुपारची वेळ होती. पुन्हा एकदा मुंबईला निघायचं असल्याने स्वरा बॅग भरून तयार झाली होती. आज सकाळी उठल्यापासून स्वरा जाणार असल्याने तिच्या काकूने आवडीच बनवून खायला घातलं होत. आज कितीतरी वेळ त्या तिघांच्या गप्पा सुरु होत्या. स्वरा तो प्रत्येक क्षण आपल्या मनात साठवून घेत होती. तर तेही आपल्या मनात साठवून घेत होते. आईने तिला छान एक ड्रेस घेऊन दिला होता तर स्वयमने देखील तिला काहीतरी गिफ्ट घेऊन दिले होते फक्त तिला घरी जाऊन उघडायला सांगितले होते.

पाहता पाहता हे तीन दिवस कसे गेले तिलाच कळलं नाही. स्वरा बॅग घेऊन स्वयमच्या रूममध्ये पोहोचली. तो तिला शांत वाटत होता. तो उभाच होता की स्वरा उत्तरली," चले स्वयम?? फ्लाइट को देर हो जायेगी."

स्वयम ती जाणार म्हणून थोडा सेंटी झाला होता आणि तिला पटकन मिठीत घेत म्हणाला," स्वरा सच बोलू तो तूम्हे जाणे देणे का मन नही कर रहा. पेहले ही बहोत साल गुजार लिये है तुम्हारे बिना अब रहा नही जाता. पर क्या कर सकते है? जाना तो होगा ही. पर अगली बार आओगी ना, तो जाणे नही देणे वाला. फिर तुम्हारी नही चलेगी. मिस यु स्वरा. लव्ह यु सो मच."

स्वरालाही त्याच्या शब्दाने भरून आलं होतं म्हणून ती म्हणाली," मिस यु स्वयम. अपणा और मम्मी का खयाल रखना. उन्हे तुम्हारे सिवा कोई नही है. लव्ह यु!!"

काही क्षण ते तसेच मिठीत होते आणि स्वयम तिच्यापासून वेगळा झाला. त्याने तिच्या हातातली बॅग घेतली आणि स्वतःचे डोळे पुसत समोर जाऊ लागली.त्यांनी काही पावले टाकलीच होते की आई दिसल्या. स्वराने त्यांना पाहताच घट्ट मिठीत घेतले. आईच्याही डोळ्यात अश्रू होते. स्वरा शांतच होती तर आई म्हणाल्या," स्वरा तुम यहा आयी तो ये घर, घर जैसे लगने लगा. जा रही हो तो मन नही मान रहा पर ठीक है कुछ दिनो की बात है और मैने जो तुम्हे प्रस्ताव दिया है वो याद रखना. अगर वो स्वीकार कर लिया तो हम साथ रेह सकेंगे. "

स्वराही त्यांना म्हणाली," हा माँ. अपना खयाल रखना और जब भी लगे की अकेले मेहसुर कर रहे है मुझे कॉल कर लेना. "

त्यांचं बोलणं सुरूच होत की स्वयम उत्तरला," स्वरा चलो वरणा फ्लाइट छुट जायेगी."

स्वराने मिठी सोडली आणि भरलेल्या डोळ्याने तिने घराच्या बाहेर पाऊल टाकले..स्वयमने क्षणात कार काढली आणि ती क्षणात बाहेर गेली. त्या क्षणी स्वयमच्या आईच्या डोळ्यात काही स्वप्न होती, ते स्वरा पाहू शकत होती म्हणून स्वराला आणखीच वाईट वाटत होत. पण पर्याय नव्हता म्हणून ते दोघेही निघाले. आज कार चालवत असताना देखील स्वयम खूप शांत होता तर स्वरा त्याच्याकडे बघत होती. तो बोलत नाहींये म्हणजे तो भावुक झाला होता तर स्वराही त्याला अधून-मधून बघत राहिली. स्वरा ह्याच प्रेमाची आसुसली होती. कधीतरी तिने हेच प्रेम त्याच्या डोळ्यात बघितलं होत पण तो व्यक्त झाला नाही आणि इथे आज तो बोलत होता तर स्वरा व्यक्त होत नव्हती. हा अर्धा- पाऊण तासाचा प्रवास असाच शांततेत गेला आणि स्वरा एअरपोर्ट वर पोहोंचली. तिने तिकीट काउंटरकरून कलेक्ट केले आणि फ्लाइटचा पुकारा होण्याची घोषणा वाट पाहू लागली. ह्या पूर्ण प्रवासात स्वयम एकही क्षण तिच्याशी बोलला नव्हता तर स्वराही त्याच्याकडे केवळ बघतच राहिली होती. पाहता- पाहता फ्लाइटची शेवटची घोषणा झाली आणि स्वरा फ्लाइटकडे जाऊ लागली. ती जाणारच की स्वयम म्हणाला," स्वरा वापस आओगी ना??"

त्याच्या शब्दात वेदना होत्या त्या तिला लगेच जाणवल्या. तिच्याही डोळ्यातून क्षणभर पाणी आलं आणि ती ते पुसत म्हणाली," तुम्हे क्या लगता है?"

स्वयम क्षणभर हसला आणि त्याने तिला जायला परवानगी दिली. स्वरा समोर समोर जात होती तर स्वयम तिच्याकडे तिथेच उभा राहून बघत होता. त्याच्या मनात राहून राहून एकच शब्द होते.

" हाय मर जायेंगे हम तो लूट जायेंगे
ऐसी बाते किया न करो
आज जाणे की जिद ना करो...

तुम ही सोचो जरा
क्यू ना रोके तुम्हे
जाण जाती है जब
उठके जाते हो तुम
बात इतनी सी आज मान लो
आज जाणे की जिद ना करो "

त्याच्याही डोळ्यात पाणी आणि तिच्याही. स्वराला चालता- चालता असही एक वळण आल की ती आता दिसेनाशी होणारच तेव्हाच ती पलटली आणि चेहऱ्यावर गोड हसू आणत त्याला हात हलवून बाय करू लागली. तिच्या चेहऱ्यावरच हसू बघून त्याचाही चेहऱ्यावर हसू परतल पण त्याला तिला जाऊ द्यायचं नव्हतं. तिने काही क्षण त्याला बघितले आणि ते वळण घेऊन आपली वाट निवडली.

स्वरा डोळे मिटून फ्लाइटमध्ये बसली होती आणि तिच्या डोक्यात काहीतरी विचार सुरू होते. सेम परिस्थिती काही महिन्या आधी होती. अन्वय मुंबई एअरपोर्ट वर वाट बघत होता. स्वराच्या मनात त्याला थांबवायचं असूनही तिने फक्त स्वयमच्या लग्नाच्या प्रपोजसाठी त्याला थांबवलं नव्हतं तर इथे स्वयम आजही तिच्या उत्तराची वाट बघत होता. अन्वय तिच्यावर प्रेम करत होता पण सोबत नव्हता तर स्वरा अजूनही विचारात हरवली होती आणि स्वयम आता तिची वाट बघत होता. काय होत ह्या तिकडीच्या प्रेमाचं समाधान??

बहोत आसानिसे मोहब्बत को
भुला देते है लोग
हमे यहा एक लम्हा भुलाने को केहते हो
तो यादे हमीसे लढ पडती है..

क्रमशा...