Bhagy Dile tu Mala - 54 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ५४

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ५४







सब कुछ ठेहर गया है
वक्त की साजिश मे
अब तो सवालो के कटघरो मे
मेरा हर अजीज रिशता है

आयुष्यात जेव्हा चांगली वेळ असते तेव्हा माणूस सतत स्वप्न बघत असतो पण आयुष्यात काहीतरी वाईट घडायला लागलं की माणसांचा स्वप्नांवरचा विश्वासच उडायला लागतो. काल्पनिक जगाचा मोह अचानक नाहीसा होतो आणि स्वप्नांची ती सुंदर दुनिया कुठेतरी हरवली जाते. स्वराला आयुष्यात येणारा प्रत्येक व्यक्ती स्वप्न बघायला सांगत होता पण तिला पुन्हा एकदा स्वप्न बघणे खरच सोपे होते का? तिला सुखाने जगण्याचा अधिकार नक्कीच आहे पण तीच मन पुन्हा एकदा स्वप्न बघायला आणि ते स्वप्न पूर्ण करायला हिम्मत करणार होत का? स्वराच्या आयुष्यात हळूहळू एका-एका गोष्टीची भीती नाहीशी होत होती पण ही गोष्ट इतक्या सहज तिच्याकडून सोडवली जाणार नव्हती.

अबभी उलझी पडी हु रूझानो मे
कोई तो होगा जो ले जायेगा कोसो दूर आसमान मे

आज स्वरा ऑफिसला पोहोचली. दोन- तीन दिवस सुट्टी झाल्याने स्वरा मन लावून काम करत होती. अलीकडे ऑफिसच वातावरण थोडं बोरिंग झालं होतं म्हणून वेळ काम करण्यातच जायचा. काम करता- करता दुपार झाली आणि स्वरा कार्तिकच्या केबिनसमोर जात म्हणाली," मे आय कम इन सर?"

कार्तिक थोड्या मोठ्या आवाजातच म्हणाला," आइये मिस स्वरा. काम करणे के लिये बहोत अच्छा वक्त है. मै भी आपहीका इंतजार कर रहा था! अच्छा हुआ तुम खुद आ गयी. मै अभि तूम्हेही बुलाने वाला था. प्रोजेक्टका कुछ काम है इसलीये तूम्हे पुना जाना होगा. होप यु डोन्ट हॅव या प्रॉब्लेम्स विथ धीस!!"

कार्तिक बोलून तर गेला पण स्वरा काहीच बोलली नाही उलट ती तशीच शांत उभी राहून त्याला बघत होती. त्याची नजर क्षणभर तिच्यावर गेली. त्याला जाणवलं ती काहीतरी बोलायच म्हणून आली होती पण तिची हिम्मत काही होत नाहीये. ती शांत शांत जाणवत होती म्हणून कार्तिक म्हणाला," व्हॉट हॅपन स्वरा? आज गुमसुम क्यू खडी हो? कुछ केहना है मुझसे? यु कॅन से एनीथिंग सो टेल मी फास्ट!"

स्वरा थोड्या वेळ विचार करत हळुवार आवाजात उत्तरली," हा सर. मुझे और दो-तीन दिन की छुट्टी चाहीये. मेरे करिबी है दिल्ली मे उनके घर मे कुछ दिन पेहले मौत हो गयी. तब नही जा पायी लेकिन अब जाणे की सोच रही हु. कुछ खास काम है वरणा मैं जाती नही प्लिज हो सके तो सर??"

कार्तिक काही क्षण तिच्याकडे रागातच बघत होता. त्याने हातातला पेपरवेट टेबलवर फिरवायला सुरुवात केली. सर्व कस शांत वाटत होतं. त्याने नजर वर केली आणि रागातच म्हणाला," आय डोन्ट लाईक द पीपल हु हेट द वर्क्स!!तुम कुछ बहोतही ज्यादा छूट्टी ले रही हो. पर आय हॅव सीन युअर रेकॉर्डस्. तुमने पिछले देड साल मे ज्यादा छुट्टी ली नही इसलीये दे रहा हु. लेकिन ये लास्ट टाइम इसके बाद इतनी नही मिलगी. गॉट ईट? वी हॅव लॉट ऑफ पेंडिंग वर्क्स. होप यु अंडरस्टॅण्ड व्हॉट आय एम ट्रायींग टू से??"

स्वरा नम्र स्वरात उत्तरली," अफकोर्स सर. आय विल डू ईट आफटर हॉलीडे..!!"

कार्तिक थोडा आता खडूस होत म्हणाला," रिमेंबर ऑलव्हेज. यु मे लिव्ह नाऊ."

त्याचे कणखर शब्द येताच स्वरा बाहेर पडली. एव्हाना सर्वांच जेवण आटोपलं होत. स्वरा आपल्या डेस्कवर जाऊन बसली आणि दीपिका तिच्या जवळ जात म्हणाली," स्वरा काही खास होत का दोन दिवस सुट्टीवर होतीस?"

स्वरा हसतच उत्तरली," हो ग आई-बाबा आले होते. त्यांना फिरायला घेऊन गेलेले. उद्यापासून पुन्हा तीन दिवसांच्या सुट्टीवर आहे."

दीपिका सुद्धा हसतच उत्तरली," आज काल खूप सुट्ट्या होत आहेत बहुतेक अन्वय सरांना मिस करते आहेस, हो ना? त्याच्याशिवाय ऑफिसमध्ये मन लागत नसेल. एम आय राइट??"

स्वरा तिच्याकडे रागाने बघतच होती तर दीपिका हसत उत्तरली," सॉरी! पण आता कुठे जात आहेस ते तरी सांग?"

स्वरा आता थोडी नॉर्मल झाली आणि हसतच म्हणाली," दिल्ली. माझ्या फॅमिलीफ्रेंड्सकडे."

दीपिका पुन्हा ही संधी सोडणार नव्हती म्हणून तिला चिडवतच म्हणाली," म्हणजे माझा अंदाज बरोबर होता तर? तू नक्की फॅमिली फ्रेंड्सना भेटायला जात आहेस ना की दिल्ली मध्ये कुणी खास असत तिथे जात आहेस? कोण असत बर दिल्लीमध्ये खास? मिस्टर अन्वय असतात ना तिथे!!"

स्वरा आता तिला रागातच म्हणाली," ताई तुला काम नाहीत का आज दुसरे मला चिडविण्याशिवाय? मी म्हटलं ना फॅमिली फ्रेंड्सकडेच जाणार आहे. सो तिथेच जाणार आहे. तस पण ते मला स्वतःहून कॉल करत नाहीत तर मी का जाऊ त्यांच्याकडे? मला नाही जायचं त्यांच्याकडे आणि ही गोष्ट तू देखील लक्षात ठेव."

दीपिका पुन्हा चिडवत म्हणाली," कॉल करत नाहीत म्हणून राग आलाय हो?"

स्वरा पुन्हा एकदा डोळे मोठे करून तिच्याकडे बघू लागली. ती काही म्हणणार त्याआधी कार्तिक केबिनमधून बाहेर पडला आणि दोघीही शांतच झाल्या. कार्तिकला अशा गप्पा मारणे आवडत नसे त्यामुळे त्यांनी कामात लक्ष दिल. स्वरा आताही कामात व्यस्त होती तर दीपिकाच्या चेहऱ्यावरच हसू थांबायच नाव घेत नव्हतं. ते फक्त काही वेळच चाललं. पुन्हा एकदा स्वरा कामात बिजी झाली आणि उद्यापासून तिला सुट्टी घ्यायची असल्यांने आवश्यक असलेली सर्व काम पटापट आवरू लागली.

ती रात्रीची वेळ होती. स्वरा जेवण करून गादीवर पडली होती. तिने दिल्लीला जायचं तर ठरवलं होतं पण अजूनही स्वयमला सांगितलं नव्हत. मागे कॉलेजला जेव्हा स्वरा दिल्लीला गेली होती तेव्हा तिला भीती वाटत होती पण आता तस काहीच नव्हतं. तिला परिस्थितीने इतकं कणखर बनवलं होत की खुद्द राज जरी तिच्यासमोर येऊन उभा राहिला असता तरीही तिला फरक पडला नसता त्यामुळे ती आज घाबरत नव्हती पण आज हे खरं की ती स्वयमला फेस करायला घाबरत होती. नाही म्हटलं तरीही ती त्याच्याबद्दल काहीतरी फिल करत होतीच. मागे बराच काळ सुटला होता पण तिचा चेहरा काही बदलला नाही म्हणून तिला पाहताच स्वयमची काय प्रतिक्रिया असेल ह्याबद्दल तिच्या मनात सतत विचार येत होते. सोबतच स्वयमच्या आईला जे बोलायच होत त्याचा विचार करून तिला टेन्शन आलं होत. स्वयम-स्वयमची आई तिला जो प्रश्न विचारणार होते त्याच नक्की उत्तर काय देऊ असे कितीतरी प्रश्न तिच्या मनात येत होते. आजची रात्र सरत होती आणि स्वरा पुन्हा एकदा आपल्या विचारात हरवत गेली. तिच्यासमोर असे काही आणि क्षण नकळत येणार होते ज्याची उत्तरे देणे तिला खरच सोपी नव्हतं म्हणून आज तिच मन तिच्या ताब्यात नव्हतं. ती विचार करत होती आणि काही दिवसांआधीच स्वयमच बोलणं जसच्या तस तिला ऐकू येऊ लागलं.

जवाब आसान नही है
तेरी बनायी पहेली का
गुम कर देता है मुझे वो
अक्सर उलझी हुयी यादो मे

***************


दुपारचे सव्वा तीन वाजले होते जेव्हा फ्लाइट दिल्लीला लँड झाली. स्वराची दिल्लीला येण्यासाठी सकाळपासूनच चलबिचल सुरू होती. तिच्या मनात सुरू असलेल्या प्रश्नामुळे तिला दिल्लीला जाऊ की नको अस झाल होत पण तिने शेवटी स्वतःच्या मनाला समजावल आणि फायनली १ च्या फ्लाइटने ती मुंबईहून निघाली. तिने दिल्ली एअरपोर्टवर पाऊल टाकले आणि अचानक तिच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. पुन्हा काय घेऊन येणार होती तिच्या आयुष्यात दिल्ली? ती अलीकडे कुणाला घाबरत नव्हती पण त्या अपघाताचा एक अंश अजूनही तिच्यात तसाच होता म्हणून ती क्षणभर तिथेच थांबली. तिची नजर अचानक सैरभैर फिरू लागली आणि पुन्हा एकदा तिला विचित्र जाणवू लागल. तिच्या हृदयाची धडधड कमी व्हायचं नाव घेत नव्हती तर पापण्यांची सतत उघडझाप होत होती. तिने हिम्मत करून पहिले पाऊल टाकले आणि मधातच तिचा पाय अडकला. तिने स्वतःला सावरत पुन्हा दुसरे पाऊल समोर टाकले. ही तीच दिल्ली होती जिंने तिच्यापासून सर्व हिरावून घेतलं होतं त्यामुळे एक-एक पाऊल टाकताना तिचे हार्ट बिट्स आणखीच वाढत होते. तिची नजर आजूबाजूच वातावरण बघतच होती की तिच्यासमोर अचानक टॅक्सी समोर येऊन उभी राहिली. अचानक तिच्या हार्टबिट्स कितीच्या गतीने वाढल्या तिलाही कळलं नाहीं. तिने तशाच अवस्थेत समोर बघितलं. कुणीतरी खूप लांब दाढी वाढवून तिच्याकडे बघत होता. त्याची नजर एकटक तिच्याकडे बघत होती आणि ती घाबरली. काही क्षण ते दोघेही एकमेकांकडे बघत होते आणि तो सरदार म्हणाला," कहा जाना है मॅडम? आइये आपको छोड दु?"

स्वरा आधीच घाबरली होती म्हणून टॅक्सीमध्ये बसू की नको तिला अस झालं होतं. तेवढ्यात कुणीतरी एक व्यक्ती त्याच्या टॅक्सीमध्ये बसली होती. ती मुलगी देखील त्याच रूटने जाणार असल्याने स्वरा जरा शांत झाली आणि हळूच उत्तरली ," इलाईट ऑनलाइन सोल्युशन्स. "

तीच उत्तर येताच तो सरदार हसला आणि स्वरा आपली बॅग टॅक्सीमध्ये टाकत निवांत बसली. टॅक्सी हळूहळू आपली गती पकडू लागली तर स्वरा आपल्याच विचारात हरवली होती. तिची नजर बाहेरच्या इमारतीमध्ये हरवली होती. त्या इमारती बघताना ती आता थोडी शांत वाटत होती आणि आधी असलेली भीती आता नाहीशी झाली. ती बघत होती, आजूबाजूला त्याच इमारती होत्या पण ह्या ८ वर्षात खूप काही बदललं होत. स्वरासोबत तो प्रसंग झाला होता तेव्हा तो हॉट मुद्दा झाला होता पण अलीकडे दिल्ली मुलींसाठी त्याहीपेक्षा अनसेफ झाली आहे ह्या बातम्या स्वरा कायमच ऐकत आली होती त्यामुळे दिल्लीची भीती तिच्या मनात तशीच राहिली होती. ती आज पूर्ण वेळ शांतपणे बाजूच वातावरण बघत चालली होती. दुपारची वेळ असल्याने रोडवर फार काही गर्दी नव्हती. हॉर्नचे कर्कश आवाज तसेच सुरू होते तर स्वरा शांत होती. तिने एअरपोर्टवर पाऊल टाकले तेव्हा ती क्षणभर घाबरली होती पण आता ती नॉर्मल वाटत होती. काहीच क्षण गेले, ती आपल्या विचारात हरवलीच होती की तो सरदार म्हणाला," मॅडम लो जी आपका अड्रेस आ गया."

त्याच्या शब्दाने स्वरा भानावर आली आणि टॅक्सीतुन बाहेर पडली. मीटरवर जेवढे पैसे दाखवत होते तेवढे पैसे तिने पे केले आणि हळूहळू स्वयमच्या घराकडे जाऊ लागली. अगदी काही पावलांवर त्यांचं घर होत म्हणून स्वराची नजर इकडे- तिकडे फिरत होती. ती जवळपास ७ वर्षांपूर्वी इथे आली होती म्हणून तिला सर्व काही बदलल्या सारख वाटत होत. आता दिल्ली शहरात भरपूर लोकसंख्या वाढली असल्याने फार गर्दी वाढली होती. ती नजर इकडे - तिकडे फिरवतच स्वयमच्या घरी पोहोचली. स्वयमच्या घराचं दार लावूनच होत म्हणून तिने डोरबेल वाजवली आणि तिथेच उभी राहिली. स्वराने बेल वाजवून काही क्षण झाले होते तरीही कुणीच बाहेर आल नाही म्हणून स्वराने पुन्हा बेल वाजवली आणि स्वयमच्या आई ओरडतच म्हणाल्या," रुक जाओ इतनी भी क्या जलदी है? सोने भी नही देते लोक ठीक से. अब क्या दरवाजा फोडकर अंदर आओगे?"

स्वराला त्यांचा आवाज आला आणि क्षणभर ती हसलीच. त्या अजूनही थोड्या फार तशाच होत्या. त्यांनी क्षणात दार उघडलं. स्वयमची आई आता ओरडणारच तेव्हाच ती समोर दिसली आणि स्वयमची आई हसतच म्हणाली," स्वरा तुम? बदमाश बताया भी नही आने वाली हो करके. नही तो स्वयम को भेजती तुम्हे एअरपोर्टसे लाने के लिये. अकेले क्यू आयी? दुनिया अच्छि नही है ना बेटा तुम्हे तो पताही है!!"

स्वयमच्या आई तिच्याशी बोलतच होत्या तर स्वरा त्यांच्याकडे चेंहऱ्यावर हसू आणत बघत तशीच उभी होती. त्यांना ते जाणवलं आणि त्या स्वराला अलगद मिठी मारत म्हणाल्या," बहोत मिस किया स्वरा तुम्हे बस केहनी की कभी हिम्मत नही हुयी. तूम्हे आज यहा देखकर कितना खुशी मेहसुस कर रही हु बता नही सकती. लव्ह यु बच्चा! बहोत अच्छा हुवा की तुम आ गयी शायद अब हमको बेचैनी से मुक्ती मिलेगी."

स्वरानेही त्यांना घट्ट मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून क्षणभर अश्रू येऊ लागले. स्वराची आई तिच्या केसांवरून मायेने हात फिरवत होती तर स्वरा अश्रू गाळत होती. काकूंनाही तिला बघून अश्रू आवरले नाही आणि त्याही काही क्षण रडत होत्या. दोघेही काही क्षण तसेच होते आणि आई पुन्हा म्हणाल्या," स्वरा मैं भी ना स्टुपिड हु. देखो खुद भी रो रही हु और तूम्हे भी रुला रही हु.पेहले चलो अंदर बाते करणे को तो बहोत वक्त पडा है. पेहले मेरी बेटी की खतीरदारी कर लु बाद मे गप्पे लढायेंगे. आओ प्लिज!"

आईनी तिची अलगद मिठी सोडवली आणि तिच्या हातातली बॅग घेऊन त्यांच्या रूममध्ये घेऊन गेल्या. स्वरा त्यांना बघतच होती की आई म्हणाल्या," स्वरा तुम फ्रेश होंकर चेंज करलो. तब तक मै हमारे लिये कॉफी बना कर लाती हु बाद मे आरामसे बात करते है."

काकू तिला बेडरूममध्ये सोडून स्वता किचनरूम मध्ये गेल्या तर स्वरा इकडे कपडे चेंज करून निवांत बसली होती. काही क्षण गेले, स्वरा बेडवर बसलीच होती की काकू कॉफी घेत बेडरूममध्ये आल्या आणि तिला कॉफी देत तीच्या बाजूला बसल्या. काही क्षण अगदी शांततेत गेले . स्वरा कॉफी घेतच होती की आई म्हणाल्या," सॉरी स्वरा!!"

स्वराने कॉफीचा सिप घेताच म्हटले," किस लिये आंटी?? "

काकू जरा उदास स्वरात म्हणाल्या," हर एक चीज के लिये स्वरा. किस किस के लिये मांगु. बहोत कुछ दबाकर रखा है दिलं मे स्वरा लगता है अब वक्त आ गया है तुम्हे बताने का!! स्वरा एक बात है जो बहोत दिन से तूम्हे बतायी नही. स्वरा तूम्हे लगता होगा ना कितने सेल्फीश लोग है हम? इतना सब कुछ हो गया और हमने तुम्हे एक कॉल भी नही किया बाकी तो दूर की बात है. तो ऐसा नही है स्वरा. जब तुम्हारे बारे मे हमे पता चला था ना तो स्वयम और मैं दोनो दौडे दौडे तूम्हे देखणे निकल पडे थे पर स्वयम के पापाने रोक लिया. स्वयम ऊस वक्त भी तुम्हारे बारे मे सूनकर बहोत रो रहा था पर उसके पापाने हमे जाणे नही दिया. ऊस दिन उसके पापा और उसके बिचमे बहोत कहा सुनी हुयी. उसके पापा अपनी जिद पर सवार थे और वो अपनी जिद पर. उसने घर के बाहर कदम रखाही था की उन्हे अस्थमा का अटॅक आया और उनकी तंबीयत बिघडणे लगी. स्वयम ऊस वक्त सोच मे गिर गया था. एक और तुम थि तो दुसरी और उसके जानसे भी बडे उसके पापा. तूम्हे देखणे आये या फिर उसके पापा को देखे? आखीरकार उन्हे तडपते देखकर उसका दिलं पिघल गया और हम उन्हे हॉस्पिटल ले गये. एकही वक्त तुम हॉस्पिटल मे तडप रही थि और दुसरी तरफ उसके पापा. बिच मे थे हम दो. "

स्वराने आता कॉफीचा कप बाजूला ठेवला आणि त्यांच्या कुशीत झोपून सर्व ऐकू लागली," स्वरा उसने सोचा की पापा ठीक होणे के बाद वो तूम्हे मिल लेंगा और अपणे प्यार का इजहार करके तुम्हे ऊस हालत मे भी अपणा लेंगा. पर उसकी सोच, सोच ही रेह गयी क्यूकी उसके पापा जिद पर अड गये थे की एक तो उसे चुनलो या तो मुझे. अगर स्वयम तुमसे मिलने गया तो वो वापस घर नही आयेगे. हमने उनको बहोत समझाया पर वो नही माने. उनकी तंबीयत ज्यादाही बिघड रही थि इसलीये फिर स्वयमने उनकी बात मान ली. स्वयमने उनको प्रॉमिस दिया की वो तुमसे कभी बात नही करेगा इसलीये वो तुमसे कभी मिलने नही आया. पापा की प्रॉमिस की खातीर उसने तुम्हे भूल दिया. पण स्वरा वो दिलं से नही भुला पाया. उसके दिलं मे हमेशा तुमही रही हो. मैने देखा है उसे अकेले मे तुम्हारे लिये रोते हुये. स्वरा वो कभी किसींके लिये कमजोर पडा नही पर ऐसा एक दिन नही गया जब वो तुम्हारे लिया रोया नही. वो तुम्हारी जली हुयी तसवीर देखकर कितने घंटो रोता रेहता मुझेही पता है. दो- तीन बार तो वो रोते-रोते मेरे गोदमेही सोया था. वो केहता था की स्वरा मेरा इंतजार कर रही होगी और मै जा भी नही सकता. स्वरा शायद तुम ऊस वक्त जितना तडप रही होगी ना वो भी उतनाही तडपता था. बहोत प्यार करता है वो तुमसे. करता है और करता रहेगा पर सिर्फ उसे इस बात का अफसोस है की वो तुम्हारे बुरे दौर मे साथ नही रेह सका. इस वजह से वो हर रोज खुदको कोसता है."

स्वरा सर्व मन लावून ऐकत होती. अन्वय जायच्या दिवशी स्वयमने हे सर्व तिला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे आज तिला ते ऐकताना काहीच वाटत नव्हत. ती तर आणखी एका प्रश्नांची वाट बघत होती. ती शांतपणे ऐकत राहिली तर काकू पुन्हा म्हणाल्या," वो तुमसे मिलने को इंतजार करता रहा और एक दिन जब वो बाहर काम के लिये गया था तभी उसके पापा को अस्थमा का अटॅक आया और हॉस्पिटल ले जाणे से पेहले ही वो चल बसे. सच बोलू तो वो तुमसे बात करणे की हिम्मत नही जोड पा रहा था पर उनके साथ उनका प्रॉमिस भी चला गया और मैनेही उसे कॉल करणे को कहा था. स्वरा हमसे अंजानेमे बहोत बडी गलती हुयी पता है पर अब हम सारी गलतीया सुधारणा चाहते है. स्वरा हमने जितने तुम्हे दर्द दिये है वो एक पलमे खतम करणा चाहते है. स्वरा मै तूम्हे अपणे बहु के रूप मे अपनाना चाहती हु. क्या तुम मेरे स्वयमसे शादी करोगे? हमे तुम्हारे चेहरे से नही तुमसे प्यार है क्या तुम हमारा प्यार कबूल करोगे?"

त्यांचा प्रश्न येताच स्वराच्या डोळ्यातुन अचानक पाणी आलं. हा तोच प्रश्न होता ज्याचा स्वरा कितितरी दिवस विचार करत होती पण तिला उत्तर काय देऊ समजत नव्हतं. नेमका हाच प्रश्न स्वयमनेही तिला विचारला होता. स्वरा शांत बसून होती तर त्याच्या आई तिच्या उत्तराची वाट बघत होत्या. काय देणार होती स्वरा उत्तर? तिच्या डोक्यात एकाच क्षणात हजार विचार येऊन गेले होते आणि डोळ्यात अश्रू. काय असणार होत स्वराच उत्तर..

हकीकत से ख्वाबो का ये सफर
कुछ ज्यादा ही लंबा लग रहा है
खडा है किस्मत बनकर वो
क्या वही मेरी हात की रेखा है?

क्रमशा....