कथा इथून पुढे...
"रुद्राक्ष किती फेऱ्या मारणार आहेस ?"
रुद्राक्ष त्याच्या रूममध्ये इकडून तिकडून फेऱ्या मारत होता.
मला टेन्शन आलं होतं की खरोखर तू स्वामिनी आणि आकाशच्या लग्न लावून देतोस की काय...? तुझा काहीही भरोसा नसतो. ऐन वेळेस काय करशील? हे फक्त तुलाच माहीत असतं."
" I have another tension Vihan. Someone in the house is thinking that I should not get married with Swamini, because with such security, it is not possible for anyone to enter this palace easily. Someone has planned and made this happen. who will be It must be discovered soon."
" घरातलं कोण का असू शकेल? रुद्राक्ष ड्रायव्हर आहेत, आपले बाकी सिक्युरिटी गार्ड्स आहेत... तेही करू शकतात ना?"
"विहान माझा बाहेरच्यांवर जेवढा विश्वास आहे ना तेवढा घरातल्या लोकांवर नाही. माझ्या बऱ्याचशा पर्सनल, ऑफिशियल गोष्टी घरात माहित नसतात तेवढ्या या लोकांना माहीत आहेत आणि माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. किती वर्ष झाले ते तर काम करतात. असं कोणी करूच शकत नाही.
" रुद्राक्ष मला माहित आहे. ठीक आहे आपण ते नंतर बघूया आधी लग्न होऊ जाऊ दे ."
"If anyone comes in by then...?"
"माझं लक्ष चारही बाजूला असेल... अजून सिक्युरिटी वाढवेन.
" विहान घरातल्यांना सिक्युरिटी कशी ठेवू शकतो? आपण पॅलेस बाहेर ठेवू शकतो... घरात ...? घरात काय चालू आहे कसं समजेल?"
" रुद्राक्ष मी असेपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव भाई... मी असताना तुला काहीही होऊ देणार नाही."
" हो माझं पूर्ण विश्वास आहे विहान तुझ्यावर... but you know dad...?"
"रूद्राक्ष....?"
"Yes... dad..."
"I will see...चल आराम कर उद्या हळद अँड एंगेजमेंट आहे. आणि प्लीज सईकडे दुर्लक्ष कर. त्यामुळे स्वामिनी नाराज होतीये. तुझ्या लक्षात येते का?"
" तिला तर माझ्याशी लग्न करायचंच नव्हतं..."
" रुद्राक्ष तुझ्या लक्षात नाहीये जेव्हा सगळ्यांना वाटलं तू स्वामिनी लग्न आकाशसोबत लावून देशील तेव्हा स्वामींनी स्वतः म्हणाली होती. तिला तुझ्याशी लग्न करायचे आहे. भूतकाळात काय झाले... हे मला आणि तुला माहित आहे, पण तिला नाही. तिला काहीच कल्पना नाही. तू सूड भावनेनी जरी तिच्याशी लग्न करत असशील. तरी ती चांगल्या मनानेच तुझ्याशी लग्न करत आहे.- तिचीही स्वप्न असतील ..."
"विहान मी स्वामिनीशी लग्न करतोय याचा कारण तूच मला सांगितलं ते बरं झालं... पण तिला मी कधी सुख देणार नाही. कारण तिने माझ्या आयुष्यातलं सुख हिरावून घेतल आहे. पार्थला ती त्याच्या आत्या म्हणून नाही तर एक थर्ड पर्सन म्हणून प्रेम करते. जेव्हा तिला समजेल की हा तिच्या भावाचा मुलगा आहे तेव्हा तिला जी अपराधीपणाची जाणीव होईल तिला त्रास होईल तो मला बघायचा आहे. मला जितका त्रास झाला तो तिला झाला होता तो त्रास मला तिच्या चेहऱ्यावर बघायचा आहे. तिला त्रास व्हायला पाहिजे विहान.... या माझ्या बहिणीला मी गमावले आहे."
"रुद्राक्ष तू फक्त त्या गोष्टीचा विचार करतोस... पण तू स्वतःकडे बघ तिच्या येण्याने तुझ्या आयुष्यात किती फरक पडलाय... खरच तुला सूट घ्यायचा असता तर इतर दुष्मनांसारखा तू घेऊ शकला असतास ना...? मग लग्नाचा घाट कशासाठी...?"
" कारण ती माझ्याजवळ असेल आणि मी वेळोवेळी तिला फक्त त्रास देऊ शकेल."
विहान हसला.
या आधी होती कि ती आहे पॅलेसमध्ये..."
"नाही ती पॅलेस मध्ये होती आता माझ्या रूममध्ये येईल तेव्हा समजेल तिला रुद्राक्ष प्रधान..."
" रुद्राक्ष एक गोष्ट लक्षात ठेव स्वामिनीला पार्थ ममा म्हणतो, त्याच्या ममाला त्रास झालेला पार्थला बघवेल...? तू तिचा विचार नको करू, पार्थचा विचार कर."
पार्थ नाईट ड्रेस घालून दरवाजात उभा होता.
" डाडा मला झोप येत नाही. मम्माचा हातावर मेहंदी आहे. मी तिला काही बोललो तर ती तिची मेंहदी काढून टाकेल आणि मग रंगणार नाही, मी तुझ्याकडे आलो. मला झोप आली आहे पण मला तू किंवा मम्मा सोबत हवी आहे . तरच मला झोप लागेल. "
" रुद्राक्ष मी येतो तुम्ही दोघे झोपा."
"येस ... कम माय लिटल चॅम्प..."
रुद्राक्ष बेडला टेकून बसला आणि त्याच्या मांडीवर पार्थ झोपला.
"डॅड ममा आपल्याकडे राहणार ना, आपल्या सोबत?"
" हो बच्चा..."
" इथे तुझ्या सोबत तुझ्या रूममध्ये...?"
" हो बच्चा..."
" मग मी सुद्धा इथे झोपणार तुमच्या दोघांच्या मध्ये रोज..."
"yes why not..."
"बट डॅड ... तुला तर कोणीच आवडत नाही तुझ्या शेजारी झोपलेल? ममा आवडेल का तुझ्या शेजारी झोपलेली ...? तुला बेड शेअर करायला आवडत नाही ना ?"
" तुला मम्मा पाहिजे म्हटल्यावर बेड तर शेअर करावा लागणार ना ..."
"म्हणजे तू माझ्यासाठी करणार मामा सोबत बेड शेयर..."
" एस ऑफ कोर्स बच्चा..."
दरवाजावर स्वामिनीने नॉक केलं. रुद्राक्षने दरवाजा उघडला. "येस."
"पार्थ आला आहे का इकडे..?"
" हो झोपतोय तो..."
" ठीक आहे मगाशी माझ्याकडे आला होता, मला वाटत होतं त्याला काहीतरी सांगायचंय आहे, त्यांने माझ्या हातावरची मेहंदी बघितली आणि तुमच्याकडे आला. एकदा बघू का त्याला...?"
रुद्राक्षाची परमिशन घेऊन ती पार्थकडे आली.
" बच्चा तू कशासाठी आला होता मामकडे...?"
" ममा मला झोप येत नव्हती पण तुझ्या हातावर मेहंदी होती म्हणून मी डॅड कडे आलो."
"बच्चा मी घेतला असता ना तुला ..."
"हो ममा , मी रमा आतुला विचारलं की मेहंदी का काढतात ?
आतुने मला समजवलं की, तुझ्या डॅडचं मम्मावर किती प्रेम आहे हे बघण्यासाठी मेहेंदी लावतात. जर मेहंदी रंगली तर तुझ्या डॅडचे ममा वर खूप प्रेम आहे. तुझी मेहंदी गेली असती आणि कलर आला नसता."
स्वामींच्या डोळ्यात पाणी होते. स्वामींनी त्याला हाताने खुणावले. पार्थ तिच्या मिठीत शिरला. हातावर सुकलेली जी मेहंदी होती ती रुद्राक्षाच्या बेडवर पडत होती. स्वामिनीच्या लक्षात येत नव्हतं . पण रुद्राक्षला मात्र राग येत होता.
"मग मी झोपवू तुला...? का डॅड झोपतोय ...? "
"ममा तू थांब ना ग थोडा वेळ... माझी झोप लागली की मग तुझा जा..." स्वामिनी रुद्राक्षकडे बघितले.
रुद्राक्ष ओके म्हणाला. स्वामिनी तिथेच बेडवर पार्थला शेजारी घेऊन झोपली. रुद्राक्ष पार्थच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला.
दोघेही एकमेकांना बिलकुल झोपले होते. स्वामिनी तिची मेहंदी सावरत त्याला जवळ घेऊन त्याला झोपवायचा प्रयत्न करत होती आणि पार्थला झोपवता झोपता तिचीही तिथे झोप लागली. रुद्राक्ष तिच्याकडे एकटक बघत होता. स्वामिनी खूप गोड दिसत होती. चेहऱ्यावरचा मेकअप काढला नव्हता की अंगावरचा मेहंदी कलरचा ड्रेस काढला होता. ती तशीच होती. आहे तशी... रुद्राक्षला सुद्धा तिथेच डोळा लागला.
इकडे साधनांनी रूममध्ये स्वामिनीला शोधायला सुरुवात केली होती.
" म्हणजे रात्रभर स्वामिनी रूम मध्ये नव्हती ? मग कुठे गेली ती?"
" आई रमाताईच्या रूममध्ये गेली असेल झोपायला किंवा पार्थ कडे असेल, तू कशाला एवढं टेन्शन घेतेस?"
" नक्की तिथेच असेल ना? का लग्नाच्या आधी जाऊन झोपली नवऱ्यासोबत?"
" आई हळू... कोणी ऐकलं तर काय विचार करेल?"
" काय विचार करायचा त्यात? खरं तेच बोलते. या आधी राहत होती ना इथे ... कोणाला माहीत काय करते काय नाही ते..."
" आई तू ताई बद्दल अशी बोलूच कशी शकतेस ? "
"अग घड्याळ बघ नऊ वाजलेत... तरी अजून तिचा पत्ता नाही."
" जा रमाच्या रूममध्ये बघून ये किंवा पार्थच्या रूममध्ये बघून ये."
दिशा उठली आणि रमाकडे गेली.
"दिशा ये ना आत मध्ये..."
" रमाताई ताई आली आहे का ? "
" सकाळपासून मला एकदाही भेटली नाही."
"ठीक आहे. ती रात्री रूममध्ये नव्हती म्हणून म्हटलं तुझ्याकडे येऊन झोपली का बघाव?"
" रात्री पार्थ शोधत होता तिला कदाचित त्याच्याजवळ झोपली असेल।"
" ठीक आहे मी पार्थ कडे बघते."
दिशा पार्थच्या रूम मध्ये गेली.
रूम मध्ये पार्थच्या नॅनीला विचारले.
"स्वामिनी मॅडम आणि पार्थ कुठे आहे?"
" ते दोघे रुद्राक्ष सरांचे रूम मध्ये होते. तुम्ही तिथे बघा."
दिशाला आता टेन्शन आले होते.
"रात्री ताई तिथे झोपली की काय ? जर आईला हे समजलं तर उगीचच गोंधळ करत बसेल. आता मी कशी जाऊ त्यांच्या रूममध्ये...? एक तर मला त्यांना बघितलं तरी भीती वाटते. माझी बोलायची हिम्मत सुद्धा होत नाही. "
दिशा विचारात तशीच चालली होती. आजूबाजूला कोण होतं कोण नाही हे तिच्या लक्षात येत नव्हतं. चालता चालता करुणाला धडकली.
" दिशा लक्ष कुठे तुझं? काय झालं? टेन्शनमध्ये का दिसतेस?" दिशाने घडलेला प्रकार करुणाला सांगितला.
"दिशा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस... मी जाते तू आईला सांग की ताई माझ्यासोबत आहे. तिला काही सांगू नकोस."
करुणा रुद्राक्षाच्या रूमकडे गेली आणि तिने दरवाजा नॉक केला. रुद्राक्षला जाग आली तर तो स्वामिनीच्या बाजूला झोपलेला होता. स्वामिनी त्याच्या मिठीत होती आणि पार्थ एका बाजूला होता. स्वामिनीला दरवाजावरचे नॉक ऐकून जाग आली. ती रुद्राक्षाच्या मिठीत होती. त्याला एवढ्या जवळ बघून ती खडबडून जागी झाली. तिला काहीच समजेना.
" मी यांच्या एवढी जवळ कशी काय आले. तिच्या हार्टबीट्स खूप वाढले. तिला एका सेकंदात खूप प्रश्न पडले. रुद्राक्ष तिच्याकडे बघून गालात हसला. तिचं भीतीने अंग थरथर कापत होते. रुद्राक्षने दरवाजा उघडला आणि करुणा दारात होती. स्वामीनी अजून त्या धक्क्यातून सावरलीच नव्हती.
" ताई अग तू इथे आहेस...? सगळेजण तुला शोधत आहेत."
"अग पार्थने हट्ट केला म्हणून त्याला झोपवत होते आणि माझा इथेच डोळा लागला. मलाच टेन्शन आले आता आईला काय सांगू ...?"
"तू काळजी करू नकोस... तू चल मी काय जे आहे ते सांगते. तू काही बोलू नकोस प्लीज..."
त्या दोघींची गडबड होऊन रुद्राक्ष ला हसू आले.
स्वामिनीच्या मनात दुसरीच गडबड सुरू होती. तिने रुद्राक्षकडे एकदाही पाहिले नाही. ती धावत पळत तिच्या रूमकडे निघून गेली. साधना दरवाजातच त्याची वाट बघत थांबली होती.
" काय झालं मावशी ? नाही म्हटलं कुठे झोपला होता स्वामिनीबाई ...? नवऱ्याच्या रूममध्ये आत्तापासूनच झोपायला गेला होता की काय???"
" नाही ग मावशी ती माझ्यासोबत होती रात्रभर... खूप दिवसांनी भेटलो ना... गप्पा मारत स्वामिनी तिथे झोपली."
" खरंच का..? मला वाटते ही जावईबापूंच्या रूम मध्ये झोपली होती. खोटं बोलतेस ना करुणा, स्वामिनीला वाचवण्यासाठी..?"
" नाही ग मावशी खरच... स्वामिनी माझ्या रूम मध्ये होती." स्वामीनीचे मन मात्र थार्यावर नव्हते. ती दुसऱ्या विचारात होती. तिला एक कळत नव्हतं की रुद्राक्षाच्या मिठीत ती कशी काय होती. तिचे हात पाय थरथर कापत होते. ती बाथरूम मध्ये गेली.
तिला काय झालं होतं...? दिशा, साधना, करुणा तिघी एकटक स्वामिनीकडे बघत होत्या. स्वामींनी बाथरूममध्ये जाऊन शॉवर चालू केला आणि शॉवर खाली आहे तशीच उभी राहिली. हे असे का हसत होते माझ्या हातून काही झालं असेल का? मी त्यांच्या मिठीत एवढ्या जवळ गेली कशी ??? नाही नाही ते माझ्याजवळ आले होते. मी त्यांच्याजवळ गेले नव्हते.
वसंतराव पार्थच्या रूमच्या इथे उभे होते. त्यांनी त्याला भेटायचा खूप प्रयत्न केला होता. पण नेहमी कोणी ना कोणी येत होते.
रूद्राक्षने त्यांना पाहिले.
"वसंतराव..."
"रुद्राक्ष...?"
"काय हवं आहे?"
"पार्थला भेटायचे आहे."
"भेटायचे आहे न फक्त... प्लिज वसंतराव त्याला काहीही सांगू नका. आत्तापर्यंत मी त्याच्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या. तुम्ही त्याचे आजोबा आहात मी तुम्हाला भेटू नका अस म्हणणार नाही पण लांबून त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा नाही. तसा अर्थातच तुमचा अन त्याचा काहीही संबंध नाही आता ."
"रूद्राक्ष आल्यापासून धडपडतोय मी त्याला भेटायला त्याला जवळ घ्यायला. एकदा भेटू दे त्याला..."
"भेटा... एक अटीवर त्याला काहीही सांगायचे नाही..."
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत