Jhoka - 2 in Marathi Horror Stories by Kalyani Deshpande books and stories PDF | झोका - भाग 2

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

झोका - भाग 2

झोका एका लयीत कर्रर्रर्रर कर्रर्रर्रर्र आवाज करत मागे पुढे हलत होता,जसं काही कोणी त्यावर बसून झोके घेतेय,पण झोक्यावर तर कोणीच दिसत नव्हतं, ते विचित्र दृश्य बघून सुधाला दरदरून घाम फुटला, झोक्याने आता वेग घेतला होता,जोरजोरात झोका मागे-पुढे हलत होता.


कुssssssकूsss दुरून कोल्ह्याचं रडणं ऐकू येत होतं,रात्रीच्या त्या निरव शांततेत ते रडणं भीषण वाटत होतं.


तेवढयात अचानक एक काळी मांजर सुधा ज्या खिडकीत उभी होती त्या खिडकीत येऊन बसली,आणि चित्रविचित्र आवाज काढू लागली,ती मांजर एकटक सुधाकडेच बघत होती,सुधाला तिची किळस आली तिने लगेच खिडकी लावून घेतली.


सुधा बेडरूम मध्ये आली तर सुरेंद्र झोपेतच होता,उद्या ह्याला सकाळीच दवाखान्यात जायचंय तेव्हा आत्ता उठवण्यापेक्षा उद्या सकाळीच सगळं सांगावं असं तिला वाटलं,झोक्याचा आवाज येतच होता,सकाळी तीन वाजता झोक्याचा आवाज थांबला,सुधाला झोप लागून गेली होती.


सकाळी सुरेंद्रला तिने रात्रीची सगळी हकीकत सांगितली,तर त्याचा विश्वासच बसला नाही,

"सुधा जास्त विचार करत जाऊ नको, एखादं स्वप्न वगैरे पडलं असेल तुला,तुझ्या सोबतीला गुंजा ला पाठवायला सांगतो मी खंडूला म्हणजे तुला एकटं वाटणार नाही,मला आता दवाखान्यात निघालं पाहिजे असं तू वागलीस तर दवाखान्यात नीट काम करू शकणार नाही मी,काही चांगले गाणे ऐक म्हणजे बरं वाटेल तुला, चल मी येतो संध्याकाळी, गुंजा येईलच एवढ्यात",सुरेंद्र असं बोलला आणि फटकातून बाहेर पडला सुद्धा.


सुधाला मान डोलावण्याखेरीज पर्याय नव्हता.


सकाळचे दैनंदिन कामं आटोपताना सुधाला काल रात्रीचेच प्रसंग आठवत होते,

'मी जे काल बघितलं ते नक्कीच स्वप्न नव्हतं,माझ्या उघड्या डोळ्यांनी मी बघितलं तो झोका कोणीतरी बसल्यासारखा हलत होता,आता हे कोणाला सांगू? गुंजा आली की तिला विचारता येईल,ती ह्याच गावची दिसते, तिला नक्की काहीतरी माहिती असणार',असा सुधा विचार करतच होती तेवढ्यात तिला फाटकाचा आणि त्याच्या मागोमाग कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला.


खंडू एक शिकारी कुत्र्यासारखा दिसणारा कुत्रा घेऊन आला होता,

"खंडू! एवढया मोठ्या कुत्र्याला का आणलं इथे?",सुधा


"साहेबांनी सांगितलं, मॅडम! घरी एक शेपटी साठी कुत्र पाहिजे म्हणून",खंडू


'शेपटी? ओह! खंडूला सेफ्टी म्हणायचंय',सुधाने विचार केला.


"कुठे बांधणार त्याला? माझ्याच्याने त्याची देखभाल होणार नाही,तशीही मला मांजरीची किळस आणि कुत्र्याची भीती वाटते",सुधा त्रासिक पणे म्हणाली.


"त्याची कायबी काळजी करू नगा मॅडम, मी आनी गुंजा करू ह्याची देखभाल",खंडू


"मग ठीक आहे",सुधाने निःश्वास सोडला.


"गुंजा कधी येणार आहे इकडे?",सुधा


"येईलच थोड्या वेळानं",खंडू


त्याने कुत्र्याला फाटक उघडून आत आणले आणि ते कुत्रं पुढे जायलाच तयार होईना जागच्या जागेवरच ते जोरजोरात भुंकू लागलं.


"अरे चल! चल! पुढे!",खंडू त्याला अजून आत आणण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो तसूभरही जागचा हलेना, त्याचं जोरजोरात भुंकणं सुरूच होतं.


सुधाला आश्चर्य वाटू लागलं, खंडूलाही काही कळेना कुत्रं असं का करून राहिलं ते.


कुत्रं आता झोपाळ्याकडे एकटक बघून भुंकू लागलं, चित्रविचित्र आवाजात केकाटू लागलं,आणि अचानक त्याने ऊssss असा जोरात गळा काढून रडणं सुरू केलं,त्याचा तो आवाज फारच भेसूर वाटू लागला.


खंडूच्या हाताला झटका देऊन ते कुत्रं फाटकाबाहेर वेगात पळून गेलं.


खंडू पण सुधाचा निरोप घेऊन त्याच्या मागे निघून गेला.

सुधा चमत्कारिक नजरेने झोपाळ्याकडे बघत राहिली,'काहीतरी भानगड नक्कीच आहे ह्या झोक्यात, कालचा तो प्रसंग आणि आजचं झोक्याकडे बघून भेसूर रडणं, सगळं साधं सरळ नाहीये, घर हे बरोबर नाही,किती वर्षांपूर्वीचं आहे कोण जाणे, घराचं नाव चाहूल ते ही विचित्रच, किती छान वाटलं होतं मला काल हा झोका बघितल्यावर आणि आज त्या झोक्याकडे बघतानाही अंगावर काटा येतोय',सुधा विचार करत होती.


तेवढयात पुन्हा फाटक वाजलं, आता गुंजा आली होती.

"काय झालं! वैणीसायेब अशा कशापायी हुब्या तुमी दारात?",गुंजा


"बरं झालं गुंजा तू आली, मी तुझीच वाट बघत होती",सुधा


गुंजा आणि सुधा आत गेल्या, आत गेल्यावर सुधाने गुंजाला विचारलं,

"हा बंगला आधी कोणाचा होता गं? तुला काही माहिती आहे का?"


"न्हाई वैनीसायेब! म्या आन माजा घरधनी मागल्याच वरसापासून इते आलो व्हतो, तवापासून हा बंगला सरकारी दवाखान्याच्याच मालकीचा होय.",गुंजा


कालच्या रात्रीचा अनुभव हिला सांगावा की नको ह्या विचारात सुधा पडली.

"तुम्ही मागच्या वर्षी इथे आले म्हणतेस न, मग तेव्हा या बंगल्यात कोणी राहत होतं का?",सुधा


"न्हाई बा! रिकामाच होता ह्यो बंगला, आता तुमी आले त भरल्यावानी वाटतोया",गुंजा


'गुंजा काल रात्री हा अंगणातील झोपाळा आपोआप मागे पुढे हलू लागला,जसं कोणी त्यावर बसलेलं आहे, असंच मला वाटलं पण कोणी दिसलं नाही', असं सुधा गुंजाला सांगणारच होती की पुन्हा एकदा फाटक वाजलं.

★☆★☆★☆★☆★☆★☆


क्रमशः


(फाटक का वाजलं? कोण आलं असेल? कुत्रं झोक्याकडे बघून का भेसूर रडलं? जाणून घ्या पुढच्या भागात.)


वाचकांनो कथामालिका कशी वाटली हे शक्य झाल्यास नक्की अभिप्रायाने कळवा. कारण वाचकांचा अभिप्राय हीच लेखकाची प्रेरणा!


धन्यवाद🙏