My Cold Hearted Boss - 4 in Marathi Love Stories by saavi books and stories PDF | My Cold Hearted Boss - 4

The Author
Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 107

    ભાગવત રહસ્ય-૧૦૭   જ્ઞાની પુરુષો –પરમાત્માના રૂપમાં એવા મળી જ...

  • ખજાનો - 74

    " તારી વાત પરથી એવું લાગી રહ્યું છે કે તમે લોકો મિચાસુને ઓળખ...

  • મૂર્તિનું રૂપાંતર

    મૂર્તિનું રૂપાંતર ગામની બહાર, એક પથ્થરોની ખાણ હતી. વર્ષો સુધ...

  • ભીતરમન - 53

    મેં ખૂબ જ ઉત્સાહ સાથે કાગળ ખોલી વાંચવાનું શરૂ કર્યું,"પ્રિય...

  • ગામડાં ની ગરિમા

    ગામના પાદરે ઉભો એક વયોવૃદ્ધ વડલો તેના સાથી મિત્ર લીમડા સાથે...

Categories
Share

My Cold Hearted Boss - 4

" तुझी आई जॉब करते का???", तिने प्रश्न केला..


" आधी करायची.. पण आता नाही... मीच नाही सांगितले.. ", तो गोंधळून म्हणाला..


" माझ्याकडे तुझ्या आईसाठी एक जॉब आहे.. ", ती म्हणाली... तसा तो गोंधळात पडला...


तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागला...


...



" कोणता जॉब..?? बॉस.. माझी आई आता वयस्कर आहे.. तिला जास्त जड काम जमत नाही.. म्हणून मी तिला काम नाही करू देत.. आणि तसंही मला इथून मिळणारा पगार जास्त आहे.. मी आणि आई दोघेही सुखाने जगू शकतो.. जास्त पैशांची हाव नाहीये मला.. माझ्या आईला काम करताना मी नाही पाहू शकत..! प्लिज.. ", आदित्य अगदी पोटतिडकीने म्हणाला... तसं वेदांशी त्याला कपाळावर आठ्या पाडून पाहू लागली..


अगदी त्रासून पाहत होती ती त्याच्याकडे... तिचा वैतागलेला चेहरा पाहून तो शांत झाला..


" मला तुझ्याकडे माझ्या जेवणाची मेस लावायची आहे... ही जॉब आहे तुझ्या आईसाठी माझ्याकडे.. आणि त्याचे पैसे तुझ्या आईलाच भेटतील.. तुझ्या पगारात जमा नाही करणार ते मी.. ", वेदांशी म्हणाली... तसं त्याने चकित होऊन तिच्याकडे पाहिले...


तर ती निर्विकार बसली होती...


" ऑफर ऍक्सेप्ट असेल तर सांग.. हवं तर तुझ्या आईला विचार त्यांना चालेल का म्हणून.. पण मला माझ्या तिन्ही वेळेचे जेवण लागेल त्यांच्याकडून... ", ती शांत पणे म्हणाली... तसं त्याला कळलं की तिला जेवण हवे आहे त्याच्या घरून.. त्याच्या आईच्या हातचे..!!


" मी.. आईला विचारून तुम्हाला उद्या सांगतो...", आदित्य म्हणाला...


" उद्या नाही... आजच सांगशील... तु तुझ्या घरी गेल्यावर... ", ती म्हणाली तसं त्याने तिच्याकडे चमकून पाहिलं...


" तुझा मोबाईल दे.. ", ती तिचा हात पुढे करत म्हणाली... तसं त्याने गोंधळून त्याचा मोबाईल दिला... तेही लॉक उघडून..


त्याचा मोबाईल भेटताच तिने पटकन तिचा प्राईव्हेट मोबाईल चा नंबर सेव केला...


" मी माझा पर्सनल नंबर सेव केला आहे... तुझ्या आईला विचार आणि मग मला लगेच फोन करून उत्तर दे.. ", ती त्याचा फोन त्याला परत करत म्हणाली...


तसं त्याने तो घेतला...


घरचं जेवण म्हंटल्यावर ती खूप उत्सुक भासली त्याला... पण तो आपला भास असेल.. असं त्याला वाटलं...


" तु आताच घरी जाऊन विचारलं तरी चालेल.. ", ती म्हणाली तसं त्याने धक्का लागल्यासारखे तिच्याकडे पाहिले...


अजून कामाची वेळ संपायला दोन तास बाकी होते... आणि जेवढा तो ओळखत होता त्याच्या बॉसला... त्यावरून तर तो हे ठामपणे सांगू शकतो की त्याच्या बॉसला कामाच्या वेळी केवळ काम केलेलंच आवडतं... बाकी काही नाही..!


जर कोणी चुकून सुद्धा बाहेर गेलं ना काम टाकून मग मात्र त्या व्यक्तीची वाट लावत होती ती...


आणि ती चक्क त्याला जायला सांगत होती..???


" बॉस मी वर्किंग अवर संपले की जातो घरी.. आणि विचारतो आईला.. ", तो म्हणाला... त्याला उगीच काही अजून सिन नको होता.. कधी त्याच्या बोसचं डोकं फिरेल आणि त्याला धारेवर धरेल काही सांगता येत नव्हतं...
त्याला रिस्क घ्यायची नव्हती...


" तु जा... विचार आणि कॉल कर मला.. ", ती म्हणाली... म्हणजे तिने जवळ जवळ ऑर्डर सोडली... तसं त्याचाही नाईलाज झाला..


" ओके बॉस... ", तो पण म्हणाला आणि तिथून निघाला...



....


" बॉसला झटके लागतात की काय मध्ये मध्ये??? चक्क कामाच्या वेळेत तिने मला घरी जायला सांगितले... ते पण केवळ हे विचारण्यासाठी ...??? की आईला चालेल का तिच्यासाठी जेवण बनवायला.. काय बॉस आहेत..??", आदित्य गाडी चालवतच विचार करत होता...


घरी जाण्या अगोदर त्याने मात्र एका चांगल्या साडीच्या दुकानातून चांगली तीन हजाराची साडी घेतली... आणि त्यावरील प्राईज मात्र काढलं ... त्याला माहीत होतं की जर तिला कळलं ना की साडी महागातली आहे.. तर ती संकोच करेल.. उगीच पैसे घालवले म्हणून सांगेल...


तो घरी आला.. तेही खुशीतच..!!


आज दिवस खरंच त्याचा चांगला होता...


त्याने दरवाजा वाजवला... थोड्याच वेळात त्याच्या आईने दरवाजा उघडला... समोर आदित्यला पाहून त्या चकित झाल्या...


" काय रे आज एवढ्या लवकर..??? ", त्यांनी अगदी गोंधळून विचारलं...


" हो .. आज जरा लवकर सुट्टी मिळाली.. म्हणून आलो... आणि आई.. आज माझ्या कडे तीन आनंदाच्या बातम्या आहेत तुझ्यासाठी...!!!", अगदी लहान मुलाप्रमाणे आनंदून म्हणाला..


" अरे बापरे.. आज तर खूप खुश आहेस...! बरं आधी बस तु.. मी पाणी घेऊन येते तुझ्यासाठी..! ", आई म्हणाली... तसं त्यानेही होकार दिला..


तो तसाच हॉल मध्ये असलेल्या सोफ्यावर बसला...


थोड्याच वेळात आई पाण्याचा ग्लास घेऊन आली... तसं त्याने पाणी पिलं...


" आता बोल.. काय आहेत तीन आनंदाच्या बातम्या.. जो तु एवढा खुश आहेस..???", आईने विचारलं...


" आई.. माझा पहिला पगार झाला या नोकरीचा..! आणि एवढा पगार तर नक्कीच आहे.. की बचत पण होईल आपली घरचा सगळा खर्च काढूनही... ", तो आनंदाने म्हणाला.. तसं आईही आनंदी झाली...


तिच्या काही एवढ्या अपेक्षा नव्हत्या... पण आपला मुलगा तरुण आहे... त्यालाही त्याची काही हौशी असतील ना.. पण जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली त्याला कधी तेवढी हौस करताच आली नाही हे आईला माहीत होतं... म्हणून तिला याचं कधी कधी खूप वाईट वाटायचं की आपण आपल्या मुलाच्या इच्छा नाही पूर्ण करू शकलो... पण आदित्यनेही कधीच अशी कुठलीच तक्रार केली नाही कधी.. की आई तु मला हे नाही दिलंस.. किंवा ते नाही दिलंस..!!


तो उलट नेहमी आईचे कौतुकच करायचा.. की आई तु खूप स्ट्रॉंग आहेस.. की बाबा गेल्यावरही तु एवढी मेहनत घेतलीस माझ्यासाठी आणि कधीच आपल्याला रस्त्यावर राहायची पाळी नाही येऊ दिली...


" अरे वाह.. खूप चांगली गोष्ट आहे ... माझा बाळ खरंच गुणाचा आहे अगदी..! ",आई त्याच्या केसावरून हात फिरवत म्हणाल्या....


तसं त्याने गोड smile दिली...


" आणि दुसरी आंनदाची गोष्ट काय आहे..???", आईने विचारलं...


" दुसरी आनंदाची गोष्ट ही आहे.. की मी माझ्या कंपनीसोबत करार केला आहे.. पाच वर्षांसाठी... निदान आता पाच वर्ष तरी मला नोकरी जाण्याची भीती नाही... ", तो म्हणाला.. तसं आईला सुखद धक्का भेटला.. त्याही जरा निर्धास्त झाल्या..


" नशीब.. देव पावला.. ", आईने लगेच देवाच्या पाया पडल्या मनाताच...



" आणि तिसरी बातमी..???",


" तिसरी बातमी खास तुझ्यासाठी आहे... ", आदित्य म्हणाला...


" काय ???", आई जरा गोंधळून विचारते.. तसं आदित्य तिला सांगतो की वेदांशीला तिच्या हातच्या जेवणाची मेस लावायची आहे.. तसं त्याची आई अजूनच शॉक होते...


" अरे पण ... आपण एवढी साधी माणसं आहोत.. माझ्या हातचे जेवण चालेल का त्यांना...??? ", आईने जरा काळजीने विचारलं...


" मी पण तोच विचार केला होता... पण त्यांना कदाचित तुझ्या हातचे जेवण आवडले... आणि आई तु खरंच छान जेवण बनवतेस.. कोणाला नाही आवडणार..??? ", आदित्य म्हणाला..


पण तरीही आई संकोचत होती....


" आई.. मी पैशांसाठी नाही सांगत... तुला नाही करायचे असेल तर ठीक आहे.. मी सांगेन तसं त्यांना.. पण खरं सांगू आज तुझ्या हातचे जेवताना मी पहिल्यांदा त्यांच्या त्या नेहमीच्या निर्विकार चेहऱ्यावर समाधान पाहिलं... असं वाटलं.. जणू त्या मनापासून तृप्त झाल्या... ! ", आदित्य म्हणाला.. तसं त्या काहिश्या विचारात पडल्या... आणि मग होकार दिला त्यांनी...


" सांग तुझ्या बॉस ना.. की आवडेल मला त्यांना आपल्याकडून जेवणाचा डब्बा द्यायला... ", आई म्हणाली.. तसं आदित्यने गालात हसत मान डोलावली.....


" आई.. ही साडी आणली आहे मी तुझ्यासाठी... बघ बर तुला आवडते काय???", आदित्य साडीची पिशवी आईच्या हातात देत म्हणाला.. तसं आईने हसून पाहिलं त्याच्याकडे...


" तुझा पहिला पगार झाला.. आणि तु माझ्यासाठी साडी नाही आणली असं कधी होणार आहे का..??? दरवेळी आणतोस रे... आता कशाला आणलीस.. तुझ्यासाठी घ्यायचं ना काहीतरी ..!! ", आई म्हणाली...


" अगं आई.. घेईन ना मी माझ्यासाठी.. आधी तु बघ ना साडी.. आवडली का सांग मला.. ", तो हट्टाने म्हणाला.. तसं आईनेपण हसून साडी काढून पाहिली....


आणि आईला साडी खूप आवडली...


" तुझ्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे बघ पुढच्या आठवड्यात... तेव्हा हिच नेसेन बघ... ", आई कौतुकाने म्हणाली... तसं त्याने हसून मान डोलावली....



....


आईला आवडेल वेदांशीला जेवण द्यायला हे सांगण्यासाठी आदित्यने वेदांशीला फोन केला... तिने तिचा नंबर वेदांशी म्हणून सेव केला होता...


" हॅलो.. ", तिकडून तिचा आवाज आला..


" हॅलो बॉस आदित्य बोलतोय.. ", आदित्य...


" हा आदित्य बोल ना... तुझ्या आईला विचारलं का तु..?? काय म्हणाल्या त्या..?? चालेल का त्यांना माझ्यासाठी जेवण बनवायला...??? ", तिने अगदी अधीरतेने विचारलं... तसं तिचा हा उतावीळ पणा पाहून तो चक्रावला...



" ही खरंच बॉसच आहे ना..???", तो मनातच म्हणाला.. आणि पुन्हा एकदा फोन पाहिला नंबर चेक करण्यासाठी..


" हॅलो.. आदित्य अरे ऐकतोयस का..???", टी जरा चिडून म्हणाली तिकडून तसं त्याला खात्री झाली की टी त्याचीच हिटलर बॉस आहे..



" आई म्हणाली की तिला आवडेल तुमच्यासाठी जेवण बनवायला... ", आदित्य म्हणाला... तसं तिकडे वेदांशीचे डोळे आनंदाने मोठे झाले...


" खरंच...???", तिने उत्साहाने विचारलं...


" हो.. ", आदित्य हलका हसून म्हणाला...


" ओके... मग.. ", ती पुढे म्हणाली.. आणि तिचं ऐकून इकडे आदित्यने कपाळाला हात मारून घेतला...






क्रमश :


कथा आवडल्यास कमेंट नक्की करा... waiting for the comments...