If you want to make a student... in Marathi Short Stories by Ankush Shingade books and stories PDF | विद्यार्थी घडवायचा असेल तर......

Featured Books
Categories
Share

विद्यार्थी घडवायचा असेल तर......

विद्यार्थी विकास साधायचा असेल तर.........
अलीकडील काळात शिक्षणाला फारच महत्त्व प्राप्त झालं आहे व त्यानुसार विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. याचा अर्थ असा की विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न व्हायला हवा. मग पुर्वी काय शिकवीत नव्हते काय? पुर्वीही शिकवीत होतेच व पुर्वीही विद्यार्थी सर्वगुणसंपन्न बनत होतेच. मात्र बव्हंशी पुर्वीच्या शिक्षणात आणि आताच्या शिक्षणात बराच फरक आहे.
आजपर्यंत आपण पाहिलं की शिक्षण शिकवितांना ते शिक्षण कसं शिकवायचं हेच आपल्याला कळत नव्हतं. सगळं माहीत होतं. कधीकधी त्याचा वापरही करीत होतो आपण. परंतु त्या पद्धतीचा वापर सातत्यानं करीत नव्हतो. त्या पद्धती कोणत्या? असा विचार नक्कीच आपल्या मनात येईल.
आपण शिकवीत होतो त्था पद्धती होत्या. भीती, बक्षीस, प्रेरणा आणि स्वयंप्रेरणा. या चार पद्धतीत पहिली जी पद्धत आहे भीती. तीच जास्त वापरत आलो आजपर्यंत शिकवीत असतांना. कधीकधी आपण आदरयुक्त भीती दाखवली तर कधी आपण भीतीयुक्त आदर दाखवला. यातूनच आपण जेव्हा जेव्हा वस्तीत जायचो. तेव्हा आपली मुलं आपल्यासमोर यायची नाहीत. ती जर क॔चे वा इतर खेळ खेळत असतील तर पडून लपून जायचे. आज तसं नाही. आज जर आपण वस्तीत गेलोच. तर मुलं जवळ येतात. नमन करतात व बोलून संवाद साधतात. तसं पाहता अलीकडील काळ तर डिजीटल काळ आला आहे.
भीती, बक्षीस, प्रेरणा व स्वयंप्रेरणा या अलीकडील काळातील शिकविण्याच्या पायऱ्या आहेत. काल भीती ही पायरी प्रत्येकजण वापरत होता. कधी कधी बक्षीस ही देखील पायरी वापरत होतो आपण. परंतु प्रेरणा वा स्वयंप्रेरणा ह्या गोष्टी आपण वापरत नव्हतो.
अलीकडील काळात शिकवितांना भीती हा पर्याय कालबाह्य झाला आहे नव्हे तर करायचा आहे. कारण भीतीनं राग मनात कुटकूट भरला जातो. तसंच बक्षीस हा पर्यायही एखाद्याच वेळेस वापरायचा आहे. कारण बक्षीस हा पर्याय वापरल्यानं विद्यार्थ्यांच्या मनात लोभ निर्माण होतो. शिवाय राग व लोभ या गोष्टी षडरिपुतील घटक आहेत. त्यानंतर येणारा घटक आहे प्रेरणा. परंतु प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकवेळा कोण प्रेरीत करेल ही संभावना नाकारता येत नाही. तशीच ती त्यावेळेस प्रेरणा देतांना ती कशी द्यावी हेही आठवायला हवं. ती प्रेरणा ऐनवेळेस आठवत नाही. हं, एखाद्या वेळेस या तिन्ही पर्यायाचा वापर करता येईल. मग शिकवायचा आणखी एक पर्याय आहे स्वयंप्रेरणा. होय, स्वयंप्रेरणाच. विद्यार्थ्यांना शिक्षकानं असं मार्गदर्शन करायचं आहे की तो स्वतःच एखाद्या गोष्टीवर प्रेरीत होईल व तो स्वतःच शिकेल.
आजचं शिक्षण हे डिजीटल आहे. या काळात निराशा लवकर पदरी येते. साधा व्हिडीओ बनवला. तो फेसबुकवर टाकला आणि त्याला लाईक आल्या नाहीत तर मुलं आत्महत्या करतात असा हा काळ आहे. त्यामुळंच या काळात मुलं निराशच होणार नाही तर त्यांना निर्माण झालेल्या शंकेवर ते स्वतःच तोडगा काढू शकतील असं शिक्षण त्यांना द्यायचं आहे.
महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचा जर खऱ्या अर्थानं विकास साधायचा असेल तर त्यांना आता जास्त शिकवायची गरज नाही. जास्त बोलायचीही गरज नाही. थोडंसंच शिकवायची व बोलायची गरज आहे. तर विद्यार्थ्यांना असं सांगायची गरज आहे की ते स्वतःच शिकतील. स्वतःच प्रश्न निर्माण करतील व स्वतःच त्याची उत्तरं शोधतील. आता त्यांच्या मनातील पुर्ण स्वरुपात भीती नष्ट करायची आहे. तशाच त्यांच्या शिकण्याच्या वेळाही. शिवाय त्यासोबतच त्यांच्या बैठक व्यवस्थाही. त्यांनी बाकावरच बसायला हवं. शांतच बसायला हवं. खालीच बसायला हवं असंही बंधन नको. ते कुठेही बसू शकतात. खाली चटईवर वा बेंचवर वा उभेही राहून शिकू शकतात. वर्गात कुठंही फिरु शकतात. अर्थात मुक्त विहार करु शकतात. हा बदलाव आला आहे नवीन शिक्षणात. कारण आपला भारत सर्व गोष्टीत निपुण करायचा आहे.
विशेष म्हणजे देशाला निपुण करण्यासाठीच हा शिक्षणातील बदलाव. तो बदल कोण करतो तर शिक्षक. कारण जसा विद्यार्थी हा देशाचा कणा आहे तसाच शिक्षकही कणाच आहे देशाचा. जर शिक्षक नसेल तर देशाला चालविण्यासाठी कोणीच मिळणार नाही. म्हणूनच शिक्षणाच्या बाबतीत शिक्षकांवर भर दिला जात आहे. त्यानुसार शिक्षकानंही स्वतःच तसा बदलाव करुन त्यांना आलेली पठारावस्था झटकायची आहे व विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करणे हे आपले आव्हान समजून ते आव्हान त्यांना पुर्ण करायचे आहे यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०