My Cold Hearted Boss - 3 in Marathi Love Stories by saavi books and stories PDF | My Cold Hearted Boss - 3

The Author
Featured Books
Categories
Share

My Cold Hearted Boss - 3

जवळ जवळ अर्ध्या तासाने त्याचे प्रेसेंटेशन संपवले... आणि सगळे लाईट चालू झाले.. आणि आता सगळ्यांची नजर त्यांच्या त्या हिटलर बॉस वर गेली... जी एकटक निर्विकार पणे स्क्रीनवर पाहत होती...


सगळ्यांचे श्वास अटकले होते... आणि आदित्यचे तर जास्तच..!!


एकाही देवाला सोडले नव्हते त्याने... सगळ्या देवांची नावे घेऊन झाली होती मनातच..!!
खूप नर्व्हस झाला होता तो... पण तरीही त्याने जास्त एक्सप्रेशन दाखवले नाही...



सगळ्यांची आतुरता आता शिगेला पोहोचली होती...



...


" गुड... ", बऱ्याच वेळा नंतर तिने स्क्रीनवरची नजर आदित्यवर टाकली आणि म्हंटल... तसा त्याचा जीव भांड्यात पडला.. आदित्य ने मनातच देवाचे आभार मानले...

सुधीरचा मात्र पचका झाला होता... त्याला हे अपेक्षित होतं की त्याला ओरडा भेटावा ....


आदित्यच्या मेहनतीने रंग दाखवले होते... आदित्यला मनातून खूप आनंद झाला होता.. पण त्याने जास्त काही दाखवलं नाही...


" थँक यू बॉस.. ", आदित्य अदबीने म्हणाला.. तसं वेदांशीने मान डोलावली....


तिने तसंच संपूर्ण मिटिंग रूम मध्ये असलेल्या स्टाफवर नजर टाकली... एकाएकाला ती निरखून पाहत होती... त्यांच्या थेट डोळ्यांत पाहून प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत होती... चेहऱ्यावरची एकही रेष न हलवता..!!


" उद्या सगळ्यांनी मला त्यांनी केलेल्या कामांची रिपोर्ट दाखवायची आहे.. तेही इथेच सगळ्यांसमोर प्रेसेंट करायचं आहे.. !! And make sure that i won't get angry.. If I did.. Then tomorrow will be your last day working here..!!
Am I clear to everyone..??? If anyone have objection just mail me your resignation letter.. No need to work here..", वेदांशी सगळ्यांवर थंड नजर टाकत जरबेने म्हणाली... तसं सगळ्यांनी आवंढा गिळला...



सगळ्यांना दरदरून घाम फुटला होता..!


" Am I clear...????", तिने पुन्हा एकदा कठोरपणे विचारलं.. तसं सगळ्यांनी घाबरून लगेच येस मॅम म्हणून उत्तर दिलं.....


सगळ्यांचे चेहरे पाहून ती तिच्या चेयर वरून उठली... तसे सगळे उठले...


" आदित्य... कम टू माय कॅबिन.. ", वेदांशी म्हणाली... तसं आदित्यने लगेच होकार दिला आणि तिच्या पाठीच तिच्या कॅबिन मध्ये आला..


.....



वेदांशी तिच्या तिच्या मेन चेयर वर बसली.. आदित्य तिच्या समोरच उभा होता..


" बस... ", ती त्याच्यावर एक नजर टाकून म्हणाली... तसं त्यानेही थँक यू म्हणत एका चेयर वर बसला...


तिने तिच्या ड्रॉवर मधून एक एनवलप काढला आणि एक नजर ते पाहून आदित्यच्या पुढे सरकवले...


तसं त्याने गोंधळून वेदांशी कडे पाहिले...



" read it.. And if you are fine with it just sign it and give me the paper.. ", ती शांतपणे म्हणाली....


तसं त्याने मान डोलावली.. पण तो अजूनही गोंधळात होता... कसले पेपर असतील काय माहीत ... असाच काहीसा विचार होता त्याच्या डोक्यात...


त्याने ते पेपर घेतले.... आणि वाचायला सुरवात केली... पण तो जसा जसा वाचत होता.. तसं तसं त्याचे डोळे आनंदाने मोठे होत होते... आणि काहीच वेळेत त्याचे डोळे आनंदाने भरून आले...


वेदांशी मात्र त्याला एकटक पाहत होती.... त्याच्या बदलणाऱ्या भावनांना पाहून ती कोड्यात पडली..


" why are you crying..?? रडण्या सारखं काही लिहलं नाहीये त्याच्यात.. इट्स जस्ट contract papers... यात केवळ हेच लिहलं आहे की पुढील पाच वर्ष पर्यंत तु ही नोकरी सोडून नाही जाऊ शकत..!! आणि जायचं असेल तर मला एक करोळ तुला द्यावे लागतील.. यात रडण्यासारखं काय आहे.. I m not forcing you.. तुला जर हा contract नको असेल तर जस्ट टेल मी... नो नीड टू क्राय... मला रडकी माणसं आवडत नाही... ", ती म्हणाली त्याच्याकडे विचित्रपणे पाहत म्हणाली...


पण यावेळी त्याला तिच्या बोलण्याचं काहीच वाईट वाटलं नाही... त्याला उलट याचा आनंदच झाला की पुढच्या पाच वर्ष तरी त्याला ही चांगल्या पगाराची नोकरी गमावण्याची काळजी नाही.. पुढच्या पाच वर्षापर्यंत त्याची नोकरी सेफ होती... आणि त्याला खात्री होती की पुढच्या पाच वर्षात तो स्वतःची स्वप्ने नक्की पूर्ण करेल...



" थँक यू बॉस..!! थँक यू सो मच..!! मला आवडेल हा contract करायला.. ", तो आंनदानं म्हणाला.. तसं तिने केवळ मान डोलावली...


" वाच आणि सही कर..", ती पुन्हा एकदा शांतपणे म्हणाली...


तसं त्याने मान डोलावली आणि आपल्या खिश्यातील पेन काढून पेपर वाचून सही केली.. आणि पेपर परत वेदांशी कडे दिले...


" तु जाऊ शकतोस.. आणि मला आजच्या प्रेसेंटेशन ची ppt मेल करून ठेव.. ", वेदांशी म्हणाली... तसं त्याने मान डोलावली... आणि तिला थँक्यू म्हणत तिथून खुशीतच निघून गेला...


तो बाहेर येऊन पाहतो तर सगळा स्टाफ गोंधळ घालत बसला होता.. कोणी डोक्याला हात लावून होता.. तर कोणी आपल्या फाईल्स च्या ढिगाऱ्यात काहीतरी डॉक्युमेंट शोधत होता... सगळयांची झोप चैन क्षणात उडालं होतं... सगळयांची ही अवस्था पाहून आदित्यला हसू आलं.. कारण काल त्याची पण हिच अवस्था झाली होती... नुसता धुमाकूळ माजला होता... पण आज मात्र तो खूप खुश होता त्या सगळ्यांमध्ये... त्याने रात्रभर केलेली मेहनत चांगलंच फळ देऊन गेली होती..


तो खुशीतच आपल्या डेस्क वर जाणार की इतक्यात त्याची नजर सुधीर वर पडली... जो बोटांची नख कुर्तडत काम करत होता लॅपटॉप वर...

त्याचीही चांगलीच वाट लागलेली दिसत होती... आदित्य मनातच हसला.. आणि आपल्या डेस्क वर बसला... इतक्यात मेसेज आला.. तसं त्याने त्याचा मोबाईल उघडून पाहिला.. आणि मेसेज पाहताच त्याचा आनंद अजूनच द्विगुणित झाला... त्याचा या महिन्याचा पहिला पगार झाला होता... तेही जास्त रक्कम होती.. म्हणून तर तो खूपच खुश झाला.. आणि देवाचे आभार मानत पुन्हा एकदा कामाला सुरवात केली...



आज त्याचा चेहरा कोणालाही ओळखून येईल असा होता.. आज हा खूप खुश आहे म्हणून कोणीही सांगितलं असतं...


...


हिच गोष्ट वेदांशीने पण नोटीस केली होती...


" एवढं काय खुश होण्यासारखं आहे आज..?? केवळ contract साईन केला आहे... त्याचा एवढा आनंद..?? ", वेदांशी मनातच विचार करत म्हणाली...
आणि आपल्या कामाला लागली...



कामाची वेळ तर अशीच निघून गेली.. शेवटी दुपार झाली... आदित्य ने कॅन्टीन मधून वेदांशी साठी जेवण आणलं..!!


तिने जेवणाचा एक घास खाल्ला आणि वेदांशीचे डोळे जे सकाळपासून शांत होते.. ते पुन्हा एकदा आग ओकू लागले...


" आदित्य...!!! काय आहे हे.. तुला माहीत नाही का मला अद्रक चालत नाही...!! मग यात का आहे हे..???", ती त्याच्यावर भडकून म्हणाली.... तसं त्याची ट्यूब पेटली...


कॅन्टीन च्या शेफने त्याला विचारलं होतं की अद्रक टाकू का म्हणून आणि हा पण लगेच हो बोलून गेला होता.. कारण आज तो खूप आनंदात होता की त्याला कसेलच भान नव्हते .. त्याने डायरेक्ट जिभच चावली...


" सॉरी बॉस.. ते.. ", तो पुढे होत म्हणत होताच की...


" what rubbish..!! I already told you.. That i hate this word sorry..!! How many mistakes are you going to do..!! Just take this out from here.. And within 5 minutes मला माझं जेवण काहीही करून इथे आणून दे... नाहीतर परिणाम वाईट होतील.. गेट आऊट..!!!", ती चिडून म्हणाली... तसं त्याने लगीबगिने सगळं जेवण घेऊन तो बाहेर आला...


" शीट..!! मी पण कशी काय माती खाऊ शकतो... आता काय करू??? पाच मिनिट मध्ये तर काहीतरी दुसरं बनवणं शक्यच नाही..!! ", तो अगदी टेन्शन मध्ये आला होता... इतक्यात त्याला काहीतरी सुचले..




....



बरोबर पाचव्या मिनिटाला.. आदित्य वेदांशीच्या कॅबिन मध्ये आला होता... वेदांशीचा राग अजूनही कमी झाला नव्हता.. ती अजूनही रागात धुसफुसत होती...


आदित्य आला तसं काही न बोलता आधी त्याच्यावर रागीट डोळ्यांनी फायरिंग केली..

आदित्य काहीच बोलला नाही...


त्याने डायरेक्ट जेवणाची प्लेट वेदांशीच्या पुढे केली.. त्याला एवढे तर नक्कीच समजले होते की तिला वेळेवर जेवण लागायचे.. आणि जर नाही भेटले तर मात्र सगळ्यांना कच्च खाऊन जाईल अशी व्हायची...


समोरच्या प्लेट मध्ये तिने पाहिले तर काही पोळ्या होत्या.. एक वाटी जेवण होतं.. एका वाटीत डाळ होती.. लोणचं.. काही सलाड.. आणि एक भेंडीची भाजी होती....


तिने काहीवेळ त्या प्लेटला पाहिले.. इकडे आदित्यचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला होता.. ती काही खात नाही पाहून...


तिने एक घास पोळीचा घेतला आणि भाजीसोबत खाल्लं तसं तिचे डोळे आपोआप बंद झाले...


मग मात्र तिने मुक्तपणे जेवायला सुरवात केली... तिला जेवताना पाहून त्याने सुस्कारा सोडला.. आणि तिथून हळूच निघाला...


तो त्याच्या डेस्क वर आला आणि बसला...


" नशीब मी माझा डब्बा दिला.. आईने मला दिलेला... नाहीतर आज पुन्हा एकदा नोकरी धोक्यात होती...", आदित्य म्हणाला.. आणि वेदांशी साठी नेलेलं जेवण जेऊ लागला..


इकडे वेदांशी खूप चवीने जेवत होती... पहिल्यांदा पोटभरून जेवत आहे असंच तिला वाटलं...




....



जेवणानंतर वेदांशीने आदित्यला पुन्हा एकदा बोलावून घेतले... तो तर जीव मुठीत घेऊन कॅबिन मध्ये आला होता...


" येस बॉस..?? ", तो म्हणाला.. तसं तिने त्याच्याकडे.. पाहिलं...


" जेवण कोणी बनवलं होतं..?? नेहमीच्या कॅन्टीनची चव नव्हती त्याला.. ", तिने सरळ प्रश्न केला..


तसा त्याला घाम फुटला..की ती कशी रिऍक्ट करेल हे ऐकल्यावर की त्याने त्याच्या आईच्या हातचा डब्बा तिला दिला आहे..



ती अजूनही त्याच्या डोळ्यांत पाहत उत्तराची वाट पाहत होती...


" बॉस.. ते माझ्या आईने मला दिलेला डब्बा मी तुम्हाला दिला.. कारण पाच मिनिटात तर काही होणार नव्हतं पटकन जेवण.. म्हणून... ", तो अडखळत म्हणाला...


पण तिने काही जास्त रिऍक्ट केले नाही...


" आईने..??", तिने विचारलं... तसं त्याने मान डोलावली....



" तुझी आई जॉब करते का???", तिने प्रश्न केला..


" आधी करायची.. पण आता नाही... मीच नाही सांगितले.. ", तो गोंधळून म्हणाला..


" माझ्याकडे तुझ्या आईसाठी एक जॉब आहे.. ", ती म्हणाली... तसा तो गोंधळात पडला...


तो प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागला...





क्रमश :


कथा आवडत असल्यास नक्की कमेंट करा...