.. " एवढं घरापर्यंत आणून सोडले.. आणि थँक यू सांगायचं टाकून मलाच गणिताचे धडे देत बसल्या..!! cold hitler..!!!
कोणता एवढा मोठा तिर मारणार होत्या त्या 20 मिनिट मध्ये काय माहीत... ", आदित्य मनातच वैतागून म्हणाला.. आणि आपल्या घरी जाऊ लागला...
त्याने परत u turn घेतला होता.. कारण त्याचं घर वेदांशीच्या घराच्या ओप्पोसिट डायरेक्शन मध्ये होते...
" पेट्रोल काय कमी महाग आहे काय.. जो आजचा पेट्रोल वाया गेला माझा.. बॉसला सोडण्याच्या नादात... ", तो घरी जाईपर्यंत आपल्या बॉसचे गुणगान गात होता...
....
" अरे आदी... एवढा वेळ कसा काय लागला तुला घरी यायला..?? ", तो नुकताच घरी पोहोचला होता की त्याच्या आईने प्रश्न केला...
तो आणि त्याची आई एवढंच काय ते त्याचं कुटुंबं..! दोघेही एका बिल्डिंगच्या अपार्टमेंट मध्ये राहत होते... केवळ एक रूम एक हॉल आणि किचन बाथरूम होतं.. आणि एक छोटीशी बालकणी.. ! पण घर छोटे असले तरीही त्याच्या आईने खूप छान सजवलं होतं ते घर.. आणि म्हणून त्या छोट्या अपार्टमेंटलाही घरपण आले होते..
" अगं आई आमच्या cold hitler ला सोडायला गेलो होतो... म्हणून वेळ झाला..", आदित्य त्याचे शूज काढत म्हणाला... आणि आपली ऑफिस बॅग त्याच्या आईकडे दिली..
" cold hitler ???", त्याची आई विचारात पडली... आणि त्याची बॅग घेत विचारलं...
" अगं आई आमची बॉस..!! जिचा मी गेल्या महिन्याभरात पाच वेळा ओरडा खाल्ला आहे...", आदित्य तोंड पाडून पण काहीसा चिडून म्हणाला...
तसं आई गालात हसली...
" काम करायचे आहे म्हंटल्यावर अश्या गोष्टी सहन कराव्या लागतात रे.. नको काळजी करुस.. होईल सगळं नीट..", त्याची आई त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली..
" आई... जादूची झप्पी दे ना.. ??", आदित्य अगदी लहान मुलाप्रमाणे ओठ बाहेर काढून हात पुढे करत म्हणाला.. तसं आई हसली...
" अले माझ्या छोट्या बाबूला जादूची झप्पी पाहिजे काय..??? ये इकडे.. ", आई हसून म्हणाली... आणि आदित्यला मिठी मारली... तसं आदित्य ने स्वतःला आपल्या आईच्या त्या मायेने भरलेल्या मिठीत झोकून दिले..
आपल्या आईला मिठी मारताच त्याला सगळा थकवा पळून गेल्यासारखा वाटला..
" हा... आई.. तुला ना मिठी मारल्यावर अगदी रिचार्ज झाल्यासारखं वाटतं... ", आदित्य आईच्या मिठीतुन बाहेर येत आईच्या कपाळावर किस करत म्हणाला..
तसं आई मनापासून हसली...
" आता जा आधी फ्रेश होऊन घे.. तोवर मी जेवण गरम करते.. ", आई म्हणाली... तसं तो होकार देत आपले कपडे घेऊन पटकन अंघोळ करायला निघून गेला..
तो फ्रेश होऊन आला.. तसे आई आणि आदित्य दोघेही जेवायला बसले...
" फार काम करायला सांगतात का रे तिकडे तुझ्या ऑफिसला..???", आईने जरा काळजीने विचारले कारण आदित्यचा चेहरा थोडासा उदास वाटला तिला..
" त्रास आहे गं.. पण पगार पण तर तेवढाच आहे ना... म्हणून काही एवढं नाही वाटत... फक्त ही नोकरी टिकून राहावी एवढंच वाटतंय मला.. आमची बॉस जरा संकी आहे.. कधी ज्वालामुखीचा उद्रेक होईल सांगता येत नाही.. त्यात मी त्यांचा पी.ए. आहे.. म्हणून जरा जास्त जबाबदाऱ्या आहेत.. ", आदित्य जेवत म्हणाला...
" बाळा खूप मेहनत घ्यावी लागतेय ना तुला?? म्हणून म्हणतेय मी की काहीतरी छोट मोठं काम मी पण करते... तेवढाच आपल्याला आधार.. आणि तुला थोडी मदत पण होईल.. ", आई म्हणाली...
" अज्जीबात नाही... आई बाबा गेल्यापासून तूच तर सगळं सांभाळलंस ना.. आता मी आहे ना.. तु कसलीच काळजी करू नकोस.. ", आदित्य म्हणाला.. तसं आईने त्याच्याकडे खुप कौतुकाने पाहिले...
.....
दोघांची जेवणे झाली... तसं आई रूम मध्ये झोपायला गेली.. आदित्य हॉलमध्येच गाडी अंथरून झोपायचा.. म्हणून त्याने आधी गादी टाकली आणि आपला लॅपटॉप घेऊन बसला..
" आधी अलार्म लावून ठेवतो नाहीतर उद्या वेळेवर नाही पोहचता आले ना ऑफिसला.. तर मग उद्याचा दिवस माझ्या नोकरीचा शेवटचा दिवस असेल... तसंही हिटलर तर तयारच आहे मला लाथ मारून काढायला... म्हणे तुझं रेसिग्नेशन लेटर दे मी आनंदाने स्वीकारेन... त्यांना काय जातं बोलायला.. एवढ्या कंपनीची मालकीण आहे.. एवढा मोठा बंगला.. एवढ्या महागड्या गाड्या.. आणखी काय हवं आहे त्यांना..?? पण आम्हाला फरक पडतो ना नोकरी गेल्यावर..!!
लाईट बिल भरा... घराचं भाडं भरा.. औषध पाणीचे बिल भरा... गाडीचे हफ्ते भरा... राशन भरा... लोण भरा... अजून काही अडचणी येतात त्याला समोरे जा म्हणजे हातात पैसे नको का..?? त्यांना काय आहे?? केवळ त्या आलिशान कॅबिन मध्ये बसून ऑर्डर झाडा सगळ्यांवर..!! एखादी चुक झाली की सरळ शब्दांची फायरिंग... सतत जीव धोक्यात ...!!!
बॉसचा स्वभाव असाच राहील तर मग लग्न कोण करेल त्यांच्याशी..??? सन्न्यास घ्यावा लागेल मग तर त्यांना..!! तसंही एवढ्या मोठ्या घरच्या आहेत त्या.. मग तर एखादा मोठा बिझनेस वाला मुलगाच पसंत करतील त्या...
मी तर हे पण ऐकलं आहे की त्यांचं लग्न जुळलं आहे.. बिचारा कसा हॅन्डल करत असेल काय माहीत..?? ", आदित्य मनातच पुटपुटला..
" जाऊ दे ना.. मला काय करायचे आहे.. त्या कोणाशीही लग्न करू देत... माझं काय जातंय..??? फक्त ही नोकरी नाही जायला पाहिजे.. बाकी एवढ्या नोकऱ्या केल्या त्यापेक्षा इथे तरी जास्त पगार आहे... तसंही उद्या तर मला या महिन्याचा पगार भेटणार आहे... आईसाठी मस्त साडी घेऊन येतो... मागच्या कंपन्यात काम करुनपण एवढं काही मिळायचं नाही... सगळे पैसे तर हे ते करण्यातच जातात.. काही शिल्लकच उरत नाही.. पण आता या पगारातून थोडीफार सेविंग होईल असे वाटत आहे.. ", आदित्य सगळं काही गणित करत म्हणाला आणि कामाला लागला...
त्याला कसंही करून ही नोकरी टिकवून ठेवायची होती...
तो मन लावून काम करत होता.. किंवा मग नोकरी टिकवून ठेवण्यासाठी धडपडत होता...
सकाळी चार वाजेपर्यंत त्याने काम आवरून घेतले... आणि मग पुन्हा एकदा अलार्म चेक करून तो झोपला...
तीन तासच झाले असतील की त्याचा अलार्म वाजायला लागला... तसं तो पटकन उठला.. आणि तयारी करून ऑफिसला निघून गेला...
....
इकडे वेदांशी पण वेळेवर तिच्या ऑफिसला आली होती... ती तिच्या ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये शिरली...

तसं सगळे तिला गुड मॉर्निंग ग्रीट करू लागले... पण तिने सगळ्यांना इग्नोर केले आणि आपल्या पर्सनल elevator आपल्या कॅबीनच्या फ्लोरवर गेली...
आता जवळ जवळ सगळ्यांनाच तिच्या या cold स्वभावाची सवय झाली होती... तरीही तिचं हे असं वागणं कोणालाही खास पसंत यायचं नाही..
बरेच जण तिला मागून शिव्या घालायचे ....
वेदांशी तिच्या कॅबिन मध्ये आली... तसं थोड्याच वेळात पाठोपाठ आदित्य पण तिच्या कॅबिन मध्ये आला.. हातात ट्रे घेऊन ... ज्यात तिच्या साठी एक लेमन टी होती... आदित्य सगळं काही करायचा ... मग तिच्यासाठी लंच आणणं असो.. की मग कॉफ़ी वैगेरे...
शेवटी पर्सनल असिस्टंट होता तो तिचा..
" बॉस तुमची लेमन टी.. ", त्याने कप तिच्यासमोर सरकवत म्हंटले... तसं तिने त्याच्याकडे पाहत केवळ हुंकार भरला..
साधा निर्विकार चेहरा तो निर्विकार चेहराच...
तोही मग बाहेर निघून गेला...
" यांचा हा थंड निर्विकार चेहरा पाहून असं वाटतं की मी कंपनीत नाही तर एखाद्या हॉस्पिटल मध्ये कामाला आहे.. जिथे केवळ सिरीयस पेशन्ट आहेत.. ", आदित्य मनातच पुटपुटला...
आदित्य म्हणजे जवळ जवळ सत्तावीस वर्षांचा मिडल क्लास मुलगा..!! जबाबदारीने वेढलेला... पण महत्वाकांक्षी होता तो.. सगळ्यात पहिलं स्वप्न त्याचं हेच होतं की त्याला त्याच्या आईसाठी मोठं घर घ्यायचं होतं.. त्याला फॉरविलरही घ्यायची होती... आणि योग्य जोडीदार निवडून लग्न करून आपला छोटासा संसार चालू करायचा होता.. जास्तीची अपेक्षा नव्हती त्याची.. पण निदान आयुष्य समाधानाने जगता येईल एवढं नक्कीच हवं होतं त्याला.. म्हणून धडपड चालू होती त्याची...
आणि हे सगळं काही मिळवण्यासाठी तो वाटेल टी मेहनत करायला तयार होता... पण जास्त लोकांत घुळायची पण त्याला सवय नव्हती... आपण बरे आणि आपलं काम बरे.. हा त्याच्या आयुष्याचा पहिला नियम..
आपल्या कथेचे नायक नायिका हे आदित्य आणि वेदांशी हेच आहेत बरं का..!!
आदित्य त्याच्या कामात पुन्हा एकदा व्यस्त झाला होता.. थोड्याच वेळात मीटिंगची वेळ झाली.. तसं तो त्याचा लॅपटॉप घेऊन मिटिंग रूम मध्ये गेला.. आणि काही स्टाफला मिटिंग रूम मध्ये बोलावले...
" आज तर आदित्यचा शेवटचा दिवस असेल रे या कंपनीत... किती वाईट ना रे... कारण हे तर पक्के आहे की जर आज आदित्यला नीट प्रेसेंटेशन देता आले नाही... तर याला बॉस काढूनच टाकतील या कंपनीतून.. आणि भर म्हणजे जर बॉसला राग आला तर याची सगळ्यांसमोर इज्जत काढतील ती वेगळीच गोष्ट..!! पण मज्जा येईल रे हे पाहायला... शेवटी बॉसचा राग म्हणजे आग का गोला.. नाही का???", कालचा सुधीर आदित्यला ऐकवत त्याच्या दुसऱ्या कलीग सोबत बोलत होता... सुधीर म्हणजे त्यांच्या ऑफिस स्टाफ मधला आग लाव्या.. स्वतःच्या आयुष्यात काय चालु आहे.. यापेक्षा दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये काय चालू आहे.. यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट असणारा माणूस...
त्याला माहीत होतं की आज आदित्य प्रेसेंटेशन देणार आहे... म्हणून त्याच्यावर काही प्रमाणात राग होताच त्याला...
त्याला आदित्य कडूनही गोसिप ऐकायच्या होत्या त्यांच्या बॉसच्या... म्हणजे मग इतर स्टाफ पर्यंत पोहोचवायला बरं.. पण त्याला आदित्य ने काही खास घास टाकली नाही.. म्हणून त्याचा राग आला होता सुधीरला.. आणि म्हणूनच तो आता त्याला असं काहीतरी उलट सुलट बोलत होता..
पण तो जे काही बोलत होता ते मात्र सगळं बरोबर होतं..!!
आदित्य त्याला समोर तर काही बोलला नाही... पण आता आदित्यलाही टेन्शन तर आलेच होते...
तो तसाच वेदांशीला बोलवायला तिच्या कॅबिन मध्ये गेला...
" बॉस.. मिटिंग रूम मध्ये सगळे तुमची वाट पाहत आहेत... ", आदित्य अदबीने म्हणाला.. तसं कामात व्यस्त असलेली ती त्याच्याकडे पाहते.. आणि मग हुंकार भरत जागेवरून उठते...
तसा तो तिच्यासाठी दरवाजा उघडतो... तशी ती पुढे निघून जाते... आणि आदित्य मनातच देवाचा धाबा करत तिच्या पाठी जातो...
सगळे मिटिंग रूम मध्ये जमले होते...
त्यांच्या cold हिटलर बॉस मूळे त्या सगळ्या एम्प्लॉई ना भर एसी मध्ये घाम फुटायचा बाकी होता... आदित्य ही घाबरला होता... एवढी शांतता होती की सगळ्यांना याची भीती होती की त्यांच्या श्वास घेण्याचाही आवाज स्पष्टपणे येत होता...
वेदांशी मात्र तिच्या चेयर वर आरामात निर्विकार चेहऱ्याने बसली होती... तिचा प्रेसेन्स पण तिच्या एवढाच थंड होता.. आणि तिचा हा औरा बाकी स्टाफना अजूनच घाबरवत होता..
" Start your presentation..!!", तिने थंड आवाजात ऑर्डर केली... तसं आदित्य ने येस बॉस करत होकार दिला..
आणि रूम मधल्या सगळ्या लाइट्स ऑफ करून समोर असलेल्या स्क्रीन वर प्रेसेंटेशन द्यायला सुरवात केली... आदित्य ने त्याचा 200% दिला होता.. म्हणजे निदान त्याने त्याचे पूर्ण प्रयत्न केले होते....
जवळ जवळ अर्ध्या तासाने त्याचे प्रेसेंटेशन संपवले... आणि सगळे लाईट चालू झाले.. आणि आता सगळ्यांची नजर त्यांच्या त्या हिटलर बॉस वर गेली... जी एकटक निर्विकार पणे स्क्रीनवर पाहत होती...
सगळ्यांचे श्वास अटकले होते... आणि आदित्यचे तर जास्तच..!!
एकाही देवाला सोडले नव्हते त्याने... सगळ्या देवांची नावे घेऊन झाली होती मनातच..!!
खूप नर्व्हस झाला होता तो... पण तरीही त्याने जास्त एक्सप्रेशन दाखवले नाही...
सगळ्यांची आतुरता आता शिगेला पोहोचली होती...
क्रमश :
कथा आवडत असल्यास कमेंट नक्की करा...
कशी वाटली आहे जोडी हेही नक्की सांगा... कमेंट करून...