My Cold Hearted Boss - 1 in Marathi Love Stories by saavi books and stories PDF | My Cold Hearted Boss - 1

The Author
Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 107

    ભાગવત રહસ્ય-૧૦૭   જ્ઞાની પુરુષો –પરમાત્માના રૂપમાં એવા મળી જ...

  • ખજાનો - 74

    " તારી વાત પરથી એવું લાગી રહ્યું છે કે તમે લોકો મિચાસુને ઓળખ...

  • મૂર્તિનું રૂપાંતર

    મૂર્તિનું રૂપાંતર ગામની બહાર, એક પથ્થરોની ખાણ હતી. વર્ષો સુધ...

  • ભીતરમન - 53

    મેં ખૂબ જ ઉત્સાહ સાથે કાગળ ખોલી વાંચવાનું શરૂ કર્યું,"પ્રિય...

  • ગામડાં ની ગરિમા

    ગામના પાદરે ઉભો એક વયોવૃદ્ધ વડલો તેના સાથી મિત્ર લીમડા સાથે...

Categories
Share

My Cold Hearted Boss - 1

सदर कथा पूर्ण पणे काल्पनिक आहे.. याचा दैनंदिन जीवनाशी कोणत्याही प्रकारे संबंध नाही.. काही साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मनावा...

......



एका मोठ्या क्लासी ऑफिस मध्ये दोन व्यक्ती होत्या... एक प्रचंड रागात होती... तर दुसऱ्या व्यक्तीच्या कपाळावर घाबरून घाम जमा झाला होता..!!

रागात असणारी व्यक्ती तिथली बॉस वाटत होती... आणि कदाचित घाबरलेली व्यक्ती त्या व्यक्तीच्या हाताखाली काम करणारी..!!

" आदित्य...!!!!", ती रागात असलेली व्यक्ती जोरात ओरडली... तसं त्या दुसऱ्या व्यक्तीचे धाबे दणाणले..!!

ती व्यक्ती मात्र रागात पाहत होती त्याला... प्रचंड राग होता त्या व्यक्तीच्या डोळयात.. आणि भयानक राग होता चेहऱ्यावर..!!

" ये..येस बॉस..", त्या व्यक्तीने जरा घाबरून म्हंटले...

त्याच वेळी त्याच्या बॉसने त्याच्याकडे जोरात त्याच्या हातात असलेली फाईल भिरकावली जी आदित्यच्या पायाखाली पडली आणि त्यातले बरेच कागदपत्रे विखूरले गेले..

" याला प्रेसेंटेशन म्हणतात का...???? !!?? ", बॉस रागात ओरडली...

" सॉरी बॉस.. मी.. मी करेकशन करून देतो..!!!", आदित्य जरा घाबरून म्हणाला...

" don't say sorry!!!!! I %%%ing hate this word..!!! Do you get that..?? Now get lost..!!! ", बॉस त्याच्यावर ओरडला.... परत रागानेच...!!

तसं आदित्यला अगदी humiliate झाल्यासारखं वाटलं..!

तो कसाबसा हो म्हणाला.. आणि तिथून जाऊ लागला तोच पुन्हा त्याच्या बॉसचा आवाज आला..

" आजच्या आज हे प्रेसेंटेशन कम्प्लिट झालं पाहिजे..!! उद्या मिटिंग मध्ये मला प्रेसेंटेशन परफेक्ट पाहिजे... नाहीतर आपला बोरिया बिस्तर बांधून ठेवायचा..!! मला कामचुकार आळशी एम्प्लॉयी आवडत नाही..!! आणि तु पी.ए आहेस माझा..!! मग तर अजूनच जबाबदारी आहे तुझ्यावर.. नीट पार पाडता येत नसेल.. तर just give me your resignation letter I will happily accept it..", त्याचा बॉस थंड पणे म्हणाला...

तसं आदित्य काही न बोलता तिथून तसाच निघून गेला... पण डोळ्यांत मात्र आसवं आली त्याच्या..!!

तो बाहेर आला.. तर काही एम्प्लॉयी त्याच्याकडेच पाहत होते.. पण काहींच्या डोळ्यांत त्याच्यासाठी अगदी दयेचे भाव होते... तर काहीजण हसत होते त्याच्यावर...!!

कारण ही चौथी वेळ होती तो बॉसचा ओरडा खात होता.. आता त्यालाही लाज वाटू लागली की सगळेजण आपल्याला विचित्र नजरेने पाहत आहेत...

तो तसाच कोणाला काहीही न बोलता त्याच्या डेस्क वर जाऊन बसला... आणि सोबत आणलेली फाईल पुन्हा एकदा उघडून पाहू लागला.. पण कामात अजिबात मन लागणार नव्हतं त्याचं...

तेवढ्यात त्याचा ऑफिसचा कलीग सुधीर त्याच्या जवळ येतो..

" काय रे आदित्य.. आज पुन्हा ओरडा..?? ", तो काहीसा हसत म्हणाला.. पण यावर आदित्य काहीच बोलला नाही...

" मी काय म्हणतो आदित्य.. अरे रिझाईन कर ही जॉब.. कशाला उगीच डोक्याला त्रास करून घेतोस त्या बॉसचा..!! आहे बाई माणूस आपली बॉस.. पण किती रे अंगात दाह तिच्या..!!! नुसती आग ओकत असते सदा न कदा..!! तुला इथे येऊन केवळ महिनाच झाला आहे... आणि तु या महिन्यात पाचव्यांदा ओरडा खातो आहेस तिचा..!! ", सुधीर म्हणाला.. पण आदित्य ने त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही...

खरंच तर होतं त्याचं..!!

आदित्य आणि त्या सगळ्यांची बॉस म्हणजे लेडी होती..!!

वेदांशी भोसले...!!!

त्यांच्या बॉसचे नाव.. CEO of Bhosale industry..!!!

" सध्या मला काम आहे.. गोसिप करायला वेळ नाही माझ्याकडे..", आदित्य स्पष्टपणे म्हणाला... तसं सुधीर त्याच्याकडे रागात पाहू लागला.. पण तरीही आदित्यने त्याच्याकडे पाहिले नाही...!!

तो आपला लॅपटॉप उघडून बसला... आणि सुधीरला पूर्णपणे इग्नोर केले..

त्याच्याकडून काहीच भाव मिळाला नाही... तसा सुधीरला आणखीनच राग आला...

" एवढा कसला माज रे तुला..?? तसंही बॉसचा आज पर्यंत एकही पी.ए. दोन महिन्याहून जास्त टिकला नाही..!! तु पण नाहीच टिकणार..!! ", सुधीर दात ओठ खात म्हणाला आणि तिथून निघून गेला..

तो जाताच आदित्यने सुस्कारा सोडला..

राग तर त्यालाही येत होता त्याच्या बॉसचा... पण करणार काय.. आहे तर शेवटी बॉसच ना..

" बाई माणूस आहे पण राग किती आहे बॉसला..!! अश्या तर कधी काही बोलत नाही.. पण जेव्हा चुकतो ना.. तेव्हा तर फाईली तोंडावर फेकून मारतात.. आज पाचवी वेळ आहे माझी त्यांचा ओरडा खायची..!! पगार चांगला मिळतो म्हणून मला ही नोकरी पाहिजे आहे.. काहीही करून ही नोकरी टिकवून ठेवावी लागेल.. ", आदित्य मनातच म्हणाला...

बॉस ओरडली म्हणून राग वाईट दोन्ही वाटत होतं..

ऑलरेडी संध्याकाळ झालीच होती... फक्त दोन तास बाकी होते त्यांची कामाची वेळ संपायला..

त्याने नजर बाजूला करून पाहिलं तर त्याला त्याच्या बॉसची कॅबिन अगदी स्पष्टपणे दिसत होती..

आणि आत बसलेली बॉस पण..!!

त्याने एकनजर त्याच्या बॉस वर टाकली आणि मग लगेच नजर खाली केली...

" यार.. जेव्हा पहिल्यांदा बॉसला पाहिलं तेव्हा वाटलं किती निरागस आहेत... जास्त सुंदर नसल्या तरीही किती आकर्षक वाटत होत्या.. आणि तेही का तर त्यांचा तो जबरदस्त ओरा..!! अगदी भल्या भल्या माणसांना घाम फोडेल असा.. त्या निर्विकार चेहऱ्यावर किती तेज.. आणि ते शांत डोळे... !! पण छ्या..!!!

कुठे काय..!! त्या डोळ्यांत या एका महिन्यात मक केवळ राग पाहिला आहे..!!

Cold hearted boss…!!! ", आदित्य मनातच पुटपुटला.. आणि कामाला लागला...

संध्याकाळ झाली... तसं सगळे एम्प्लॉयी घरी जाण्याची घाई करू लागले... कोणाला बस पकडण्याची घाई.. तर कोणाला रिक्षा पकडण्याची घाई.. तर कोणी यासाठी घाई करत होतं की रस्त्यात ट्रॅफिक नको भेटायला... तर कोणाचे काही वेगळे प्लॅन असतील फॅमिली किंवा फ्रेंड्स सोबत तिकडे वेळेवर पोहोचण्याची घाई.. कोणला गर्लफ्रेंडला तर कोणाला आपल्या बॉयफ्रेंडला भेटण्याची घाई म्हणून एक एक करून सगळे निघून जाऊ लागले आपल्या बाकी कलीगचा निरोप घेत.. आणि उद्या पुन्हा भेटू याचा दावा देत निघून गेले सगळे..!!

आदित्य मात्र सात वाजेपर्यंत थांबला होता... काही तुरळक एम्प्लॉयी अजूनही होते ऑफिस मध्ये जे त्यांची काही काम करत बसली होती..

इकडे वेदांशीही तिच्या त्या प्रशस्त ऑफिस मध्ये काम करत बसली होती...

खांद्यावर येणारे अगदी सळसळीत मोकळे केस.. एका साईडने भांग पाडला होता.. थोडासा गव्हाळ रंग.. उंचीही बऱ्यापैकी होती आणि फिगरही उंचीला शोभेल अशीच.. ! चेहरा थोडा लांबट ... आणि त्या चेहऱ्यावर थंड भाव..!! डोळे रहस्यात्मक..!!!

तिचा ओरा एवढा खतरनाक होता की सगळेच ऑफिस मध्ये तिला घाबरायचे.. ती जास्त काही करायची नाही एवढी.. पण कामाच्या बाबतीत ती खूपच स्ट्रिक्ट होती.. त्यामुळे जर कोणी कामात आळशीपणा केला तर त्याला डायरेक्ट कामावरून काढून टाकायची.. कामचुकारपणा तिला आवडत नव्हता..!!

ओरडायला कमी करायची नाही..!!

केवळ थंड भाव असायचे तिच्या चेहऱ्यावर.. म्हणून ती त्यांच्या ऑफिसमध्ये Cold hitler या नावाने प्रसिद्ध होती..

रात्रीचे सात वाजले तसा आदित्य त्याच्या डेस्क वरून उठला... आणि आपलं सगळं सामान आपल्या बॅग मध्ये भरू लागला..

घरी जाऊन पुन्हा काम करायचे होते त्याला.. आणि आज तर त्याचा जीव टांगणीला लागला होता..! जर उद्या त्याला नीट प्रेसेंटेशन देता आले नाही.. तर त्याला या जॉबला टाटा बाय बाय करावे लागणार होते.. आणि सॅलरी चांगली असल्यामुळे आदित्यला ही नोकरी गमवायची नव्हती..!

तो बाहेर निघाला.. एक नजर पुन्हा त्याच्या बॉसच्या कॅबिन वर टाकली तर त्याची बॉस पण घरी जाण्यासाठी तयार होती... ती पण तिचं सगळं सामान शांतपणे तिच्या बॅग मध्ये भरत होती..!!

आदित्य तसाच निघाला...

आणि पार्किंग लोट मध्ये आला.. तो बाईक घेऊन येत होता ऑफिसला.. तो त्याच्या बाईक जवळ आला.. त्याने चावी काढण्यासाठी खिशात हात घातला.. पण त्याला चावी मिळाली नाही... तसं त्याने आपल्या पॅन्टच्या दुसऱ्या खिशात हात घातला... पण तरीही त्याला चावी मिळाली नाही... त्याने आपल्या शर्ट आणि पॅन्टचे सगळे खिशे चेक केले.. पण नाहीच भेटली... तसा तो वैतागला..

" आजचा साला दिवसच खराब आहे.. दिवस नाही.. पूर्ण महिनाच खराब आहे माझा... !! ", तो वैतागत म्हणाला.. आणि पुन्हा एकदा ऑफिस मध्ये आला.. आणि तिथल्या लिफ्ट ने आपल्या वर्किंग फ्लोरला गेला..

तो लिफ्ट मध्ये चढला आणि तेवढ्यातच दुसऱ्या प्रायव्हेट लिफ्ट मधून त्याची बॉस वेदांशी बाहेर पडली... पण दोघांची भेट झालीच नाही...

आदित्य वैतागून त्याच्या फ्लोरला आला आणि आपल्या डेस्क वर येऊन पुन्हा एकदा आपल्या बाईकची चावी शोधू लागला.. एवढ्यात त्याला त्याची चावी खाली पडलेली दिसली... तसं त्याने पटकन उचलली...

" चुकून पडली असेल.. ", तो मनातच म्हणाला..

आणि पुन्हा एकदा पार्किंग लोट मध्ये गेला.. आणि आपली बाईक चालू करून तो तिथून निघाला होताच की काहीच अंतरावर त्याला त्याची बॉस उभी राहिलेली दिसली...
आणि तिचा ड्राइव्हर गाडी चा बोनेट उघडून त्यात काहीतरी पाहत होता...

" बॉसची गाडी बंद पडली असावी कदाचित..!! बरंच झालं..!! नुसत्या आग ओकत होत्या ना माझ्यावर..!! बिचारी गाडी पण त्यांचा एवढा हॉट टेम्पर नाही सहन करू शकला आणि गाडी बंद पडली... RIP my dear car..! ", आदित्य मनातच dramatically म्हणाला..

" काय करू थांबू की जावू ?? पण असाच गेलो तर ते रुड वाटेल ना..??? ", तो मनातच विचार करत म्हणाला..

" थांबतो नाहीतर याचा पण राग काढतील कधीतरी बॉस माझ्यावर..! ", आदित्य मनातच सुस्कारा सोडत म्हणाला..

आणि त्याने गाडी त्याच्या बॉसच्या समोर थांबवली...

" बॉस.. काही प्रॉब्ले...", तो पूर्ण वाक्य बोलला पण नाही.. त्या अगोदरच वेदांशी त्याच्या बाईक वर बसली... तसा त्याने कपाळावर हात मारून घेतला..

" drop me to my house ", तीने डायरेक्ट ऑर्डर सोडली... आणि हाताची घडी घालून त्याच्या पाठी ऐटीत बसली...
चेहरा तर निर्विकारच..!!

" cold hitlar..!!! आदित्य मनातच पुटपुटला..

" कुठून दुर्बुद्धी सुचली आणि यांच्यासमोर गाडी थांबवली काय माहीत..!! ", तो मनातच वैतागला..

" sure boss.. ", तो तेवढंच म्हणाला.. आणि त्याने गाडी स्टार्ट केली...

" मी काय ड्राइव्हर आहे का यांचा..??? आणि अश्या निर्धास्त बसतील तर बिन पकडून तर पडतील नाय का ?? पडतील तरी मलाच टेन्शन..!! निदान मला नाही पण गाडीला पाठून तरी धरायला पाहिजे ना.. अश्या बसल्या आहेत जणू त्या त्यांच्या राजदरबारातील सिंहासणावर बसल्या आहेत.. आणि मी त्यांना वारा घालाणारा असतो ना बाजूला तसा वाटत आहे..! 😮‍💨 ", आदित्य गाडीला असलेल्या काचेतून पाठी बसलेल्या वेदांशी वर नजर टाकत मनातच बडबडला जी अगदी कशाचाही आधार न घेता हाताची घडी घालून बसली होती आणि आजूबाजूला पाहत होती..

अंधार पडला असल्याने हायवेच्या कडेला असलेले लाइटचे खांबे चालू होते.. त्यांचा तो पिवळा पांढरा प्रकाश आजूबाजूला अजून सुंदर बनवत होता.. आणि तोच परिसर ती आजूबाजूला पाहण्यात व्यस्त होती... आदित्य पण आपल्या नेहमीच्या स्पीडपेक्षा हळू गाडी चालवत होता.. कारण त्याची बॉस जी बसली होती त्याच्या मागे..!

" बॉस तुमच्या घराचा पत्ता... ", काही पुढे जात आदित्य ने विचारले... त्याला पत्ता थोडीच माहित होता... आणि त्याची बॉस पत्ता न सांगताच बसली होती...

" घर आल्यावर सांगेन मी... सरळ चालव.. ", त्याची बॉस परत एकदा ऑर्डर सोडत म्हणाली.. तसं त्याने मनातच तोंड वाकडं केलं पण तरीही ओठांवर समाईल आणत ओके बॉस म्हंटल आणि गाडी चालवू लागला..

पावण तासाने तिने त्याला गाडी थांबवायला सांगितलं... तसं त्याने सावकाश गाडी थांबवली... जेणेकरून त्याच्या बॉसला काही त्रास नाही झाला पाहिजे..

त्याने गाडी थांबवली आणि समोर पाहिलं तर एक प्रशस्त असा मोठा बंगला होता.. तोही नवीन पद्धतीचा... दोन मजली.... समोर गेटच्या आतून तो बराच अंतरावर होता बंगला.. तो एवढा मोठा बंगला पाहून तर आदित्यचे डोळे दीपून गेले..

" भविष्यात मी पण असाच एक बंगला बांधेन.. जिथे मी असेल.. माझी आई.. आणि माझी भावी बायको आणि माझी भावी दोन मुले.. बस्स!! छोटा परिवार... आनंदी परिवार..!!!", तो समोरचा बंगला पाहून मनातच म्हणाला...

वेदांशी खाली उतरली...

" बाईक चालवतोस की बैलगाडी ?? ", वेदांशीने शांतपणे म्हंटल तसं तिच्या आवाजाने आदित्य भानावर आला..

" अ??", त्याला काही नीट समजलं नाही..

" मला घरी यायला केवळ twenty five मिनिट लागतात.. तु forty five minutes लावले... You waste my twenty minutes..! ", ती त्याच्या डोळ्यांत पाहत म्हणाली... आणि त्याला एक नजर पाहून पुढे गेली.. तर समोर असलेल्या गार्ड्स नी तिच्यासाठी मोठा गेट उघडला... आणि ती आत जाताच दरवाजा बंद करून घेतला...

इकडे आदित्य ने दात घासून तिच्याकडे पाहिले..

" you waste my twenty minutes..!! ", तो तिची मिमिक्री करत मनातच वेडावून म्हणाला...

त्याने तशीच गाडी पुढे पळवली ....

" एवढं घरापर्यंत आणून सोडले.. आणि थँक यू सांगायचं टाकून मलाच गणिताचे धडे देत बसल्या..!! cold hitler..!!!
कोणता एवढा मोठा तिर मारणार होत्या त्या 20 मिनिट मध्ये काय माहीत... ", आदित्य मनातच वैतागून म्हणाला.. आणि आपल्या घरी जाऊ लागला...

त्याने परत u turn घेतला होता.. कारण त्याचं घर वेदांशीच्या घराच्या ओप्पोसिट डायरेक्शन मध्ये होते...

" पेट्रोल काय कमी महाग आहे काय.. जो आजचा पेट्रोल वाया गेला माझा.. बॉसला सोडण्याच्या नादात... ", तो घरी जाईपर्यंत आपल्या बॉसचे गुणगान गात होता...



क्रमश :

कथा आवडल्यास कमेंट नक्की करा.. आणि रेटिंग स्टिकर्स ही नक्की द्या..