Kouff ki Raat - 28 - Last Part in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | खौफ की रात - भाग २८ आंतिम

The Author
Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

खौफ की रात - भाग २८ आंतिम

भाग २८ आंतिम
मागील भागात काय झालं होत ?

दोन पिशच्छांनी एक मळलेली दोरी आणली.
निळ्या पाठमोरा वळळा..वळताच त्याने पुढच्या खिशात हात घातला..- तो काचेचा तुकडा खरच त्याने उचलून घेतल ते बरच केल होत..

तो तुकडा त्याने पुढच्या खिशातून काढुन हातात घेतला..- लालसर मशालिंच्या मंद प्रकाशात जरास अंधुक दिसत होत - ह्याच त्याला फायदा झाला होता, होत होता.

तो पाठमोरा वळला - काचेचा तुकडा मुठीत गच्च धरला होता.

त्याने पाठ लाकडाला टेकवली- तसे दोन जणांनी लागलीच दोरीमार्फत त्याला लाकडाला बांधायला सुरुवात केली.

सर्व बाजुंनी त्याला दोरीने बांधून ठेवल..

निळ्याच्या दोन्ही बाजुंना पिशाच्छ उभे होते.
समोर सावकाराच्या देहात उभी लालसटवी उभी होती.

" करूयात सुरुवात !" ती म्हंणाली.

" नाही..थांबा.!"
निळ्या पटकन म्हंणाला.

"का काय झाल ? " लालसटवीने विचारल.

" मला तुमच्याकडून लुचून घ्यायचं आहे..! "

" हो मग मीच लुचणार आहे तुला!"
ती म्हंणाली.
" नाही..नाही.." निळ्या जरासा औपचारिक हसला.

" हे तुम्ही नाही आहात माताराणी..- हा सावकाराच देह आहे! आणी मला तुमच्याकडून..तुमच्या ख-या रुपातून लुचवून घ्यायचं आहे ..अशी माझी इच्छा आहे माझ्या प्रिय माताराणी.. !" निळ्या नम्रपणे म्हंणाला..

त्याच्या त्या वाक्यावर लालसटवी उर्फ सावकारा च्या कपाळावर आठ्या उमटल्या - ती जराशी प्रश्नार्थक , संशयित नजरेने निळ्याकडे पाहू लागली.

" माताराणी, ही माझी शेवटची इच्छा आहे असंच समजा हव तर , आणी जर तुम्हाला वाटत असेल की मी काही हुशारी करत असेल- तर तुम्ही सोपान कडून ऐकलंच आहे , की मी क्रॉस बाहेरच ठेवून आलो आहे , आणी काही हातचालाखी करायला माझे हात तर बांधलेले आहेत..! "
निळ्या म्हंणाला.

लालरंगाचा पायघोळ झगा घातलेला सावकार
मान जराशी वर करून - निळ्याकडे पाहत होता.
मशालींचा रक्ताळलेला लालसर भेसुर प्रकाश त्याच्या पांढुरक्या चेह -यावर पडला होता. चेह-यावर थंड भाव होते - भुवया जरा वर केल्या होत्या.

निळ्या मंद स्मित हास्य करत त्य हिरवेजर्द नजरेला नजर भिडवत होता.

मनात भीति वाटत होती- पन ते चेह-यावर दाखवत नव्हता..- दाखवल तर मृत्यु फिक्स होत.
निळ्या उत्तराची अपेक्षा करत होता - तोच लालसटवीचा आवाज आला.

" ठीके ..! तैयार आहे मी!"
निळ्याच्या चेह-यावर विजयी भाव पसरले.

सावकार उर्फ लालसटवी जराशी चालत मागे आली.

सावकाराने आपला हाताचा पंज्या जरासा वर आणला- हाताला धारधार पौलादी नख होती ,
त्याच धारधार नखांमधली तर्जनी वर केली..
तर्जनीला असलेला - धार धार नख जरास वर आल..
टोकदार झाल..

हाताचा पंज्या सावकाराने कपाळावर बरोबर मधोमध ठेवल.
निळ्या सर्व पाहत होता.

तो धारधार नखांचा पंज्या कपाळावर ठेवला..आणी चामडीवर हळकासा दाब दिला.. कपाळावरच्या चामडीला फाडत , नख एक इंच हात घुसल ...घुसलेल नख तीने कूंकू कपाळात भराव तस एका रेषेत चामडी फाडत वर नेहत टाळूवर आणल..
कपाळावरून ते टाळूपर्यंतची चामडी - त्वचा फाटली , त्यातून रक्ताचा झिलवा फुटला..सावकाराचा पुंर्णत चेहरा लालसर रक्ताच्या चिखलाने भिजला होता..आणी भिजलेल्या लालसर रक्तातून ते हिरवेजर्द , त्यात एक वाकडी चिर असे डोळे निळ्याकडेच पाहत होते.

निळ्याच्या पायाखालची जामिन केव्हाचीच सरकली होती.
हे असल भयाण दृष्य तो उभ्या डोळ्यांनी पापणी न लवता पाहत होता !
भीति काय असते ते तो आज ख-या अर्थाने अनुभवत होता.

कपाळापासून ते डोक्याच्या मध्यभागी टाळूपर्यंतची त्वचा फाटली होती.. - तोच तीने तर्जनी काढुन घेतली, आणि आता दोन्ही हातांनी डोक्यावरची ती चामडी धरली...!

प्लास्टीकची पिशवी दोन्ही बाजुंनी फाडावी तशी ती चामडी न किंचाळता, ना कसलेही वेदनादायक उसासे सोडता , शरीरावरून काढु लागली..!

डोक्यावरची सर्व कवटीवरची चामडी काढली होती , आतल्या ,विविध रंगाच्या नसा, मेंदू , सर्व अवयव - स्पष्ट दिसत होते.

निळ्याला पुढे पहावेच ना , त्याने झटकन
डोळे ब्ंद केले.

सावकाराच्या अंगावरची सर्व चामडी लालसटवीने काढुन टाकली होती - बाजूला जमिनीवर फ़ेकली होती.

सावकाराचे आतील , इंद्रिय- अवयव, धडधड़णार , हदय, रक्तनटीका ,लालसर स्नायू आतल सर्वकाही उघड - उघड स्पष्ट दिसत होत.
ही सर्व अमानवीय शक्तिची करामती होती -
आणी अजुन पुढे न जाणे काय काय अघोरीकांड घडणारे होते देवच जाणो.

" रक्त ..आणा.. लवकर रक्त आणा ! माताराणीला रक्ताचा आभिषेक घाला .-" सोपान ओरडला.. !

निळ्याने त्याच आवाज ऐकून डोळे उघडले..
समोर पाहिल- त्याचे डोळे नवळाने , आश्चर्याने,भितीने विस्फारले गेले.
समोरच दृष्यच तस होत.

पाच सहा जणांनी मिळुन एक मोठा तीन फुट उंच आणी दोन फुट रुंद असा सोन्याचा हंडा धरून आणला.. -

एकाने एक दंडगोलआकाराचा स्टूल जमिनीवर मांडला.. - त्यावर ते बिना कातडीच आतील सर्व अवयव दिसणार शरीर येऊन बसल..

निळ्या पाहत होता..
डोक्यातल्या नसा,डोळे-मेंदू,गाळाचे होल,हाता -पायाचे स्नायु,छातीत धडधडणारा ह्दय !

हे दृष्य पाहूण त्याला उलटी आल्यासारख झाल होत..पन कसतरी त्याने स्वत:वर
हिंम्मत ठेवून स्वत:ला सावरल..

कारण ही तर फक्त सुरुवात होती- पुढे खरी हार्ड आंतिम लेव्हल सुरु होणार होती.

चार जणांनी मिळुन तो सोन्याचा हंडा उचल्ला.
लालसटवीच्या मागे गेले..- हंडा जरासा वर धरला..आणी हळुच त्याची वरची बाजु पुढे झुकवली..

आतून लालसर रंगाच्या रक्ताचा आभिषेक झाला.. ! धबधब्यातून निघणा-या पाण्यासारख लाल रंगाच रक्त त्या देहावर पडू लागल..

त्यात विळक्षण मेंदूला चक्रावून टाकणारी गोष्टी अशी की वरून पडणार रक्त ते शरीर शोषुन घेत होत..
रक्ताचा साधारणसा एक थेंब सुद्धा खालच्या भुईसपाट जमिनीवर पडत नव्हता..

" आईशप्पथ ..!" निळ्याच्या तोंडून आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला.

आणी हे दृष्य त्या श्ब्दाच्या लायकीच ही होत.
कारण हा पुर्णत देखावाच मानवाची बुद्धीला चक्रावून टाकणारा होता.

हंड्यातला सर्व रक्त त्या शरीराने शोषून घेतल..
होत आणी त्या रक्तामार्फत शरीरावर एक नवी त्वचा तैयार झाली होती.. !
लालसटवीच खर रूप तिथे अवतरल होत..

निळ्या डोळे फाडून, तोंडाचा आ- वासून लालसटवीकडे पाहत होत..तिच सौंदर्यच तस होत.

पाच फुट उंचीच सुडोल देह, पुर्णत देहाची त्वचा दुधाळ, पिठासारखी पांढरी होती.

v आकाराचा दुधाळ चेहरा,डोळे मोठे होते-
पापण्यांची झडप - फडफडत करत ती नाचवत होती... समोरच्याने तीच्या डोळ्यांत पाहिल तर तिथेच गारद होइल..-

लालसर ओठ म्हंणायला वरच ओठ जरास लहान
आणी खालच जरास मोठ, लाल रंगाने रंगळेल होत..
पातलसर काल्या रंगाच्या भुवया होत्या..-

अंगावर एक लाल रंगाचा स्लिव्हलेस डिप ड्रेस घातला होता.

त्या ड्रेसमधुन तिच्या फुगीर पांढ-या दुधाळ कांतीच्या स्तनाग्रांची वरची बाजु जराशी वर येऊन मधली चिर दिसत होती.
तीच ते आसमानी सौंदर्य पाहून निळ्याच तोंड उघड ते उघडच राहील होत.. डोळे मोठे झाले होते..

" आईशप्पथ कसला भारी पीस आहे ? "
निळ्या स्वत;शीच पुटपूटला.!पुर्णत दुधाळ बत्तीशी दाखवत निळ्या लालसटवीकडे पाहत हसत होता.

लालसटवी चालत निळ्याच्या दिशेने येऊ लागली..तिची चालण्याची स्टाईल केट वॉल्क पद्धतीची होती.

तिच्या गो-यापान मांड्या, आणी दोन्ही नितंबांची
चालतांना एका लईत विशीष्ट प्रकारची उत्तेजित करणारी हालचाल होत होती.

ती चालत निळ्या जवल आली..
---निळ्या दात काढत हसत होता..

आणी तेवढ्याच वेगाने मागच्या हातात असलेली काच दोरीवरून फिरत होती.

" तुम्ही तर खुप सुंदर दिसत आहात , तुमच्या समोर तर ह्या जगातल्या सर्व नट्या फेल आहेत..!"
निळ्या तारिफ़ करत म्हंणाला.

त्यावर ती नाकावर तर्जनी ठेवत जराशी लाजली ओठांवर हसू आणत म्हंणाली.

" हो , असं न जाणे कित्येक जण म्हंणाले असतील..! पन तू मला आवडलास , कारण तू स्वत:हून आमच्यात यायचं ठरवलंस.!."
आवाज लाडीक स्वरातला मधाल होता..
असं वाटत होत..त्या आवाजात डुंबूण जाव..हा आवाज ऐकतच रहावा..कायमचंच ऐकतच रहावा..

तीने तिच्या हाताची तर्जनी निळ्याच्या ओठांवर ठेवली..- तर्जनीच नख लांब होत ,त्यावर लालरंगाची लाल भडक , नैलपॉलिश केली होती.

" मी तूझ्यावर खुप खुश आहे, तू जे मागशील दे द्यायला तैयार आहे मी.." तिच्या लालसर ओठांवर मादक, खट्याळ हसू उमटल..

निळ्याच्या हातातल्या काचेने मागची दोरी कापली होती दोन्ही हात मोकळे सुटले होते..
निळ्याला ते कळल होत..

तो दात दाखवत हसला...व म्हंणाला.

" काहीही मागू ? "

" हो !" तिने त्याच्या चेह-यावरून हात फिरवल..

" मग मला..!" निळ्या दात दाखवत हसत होता तोच तो एकदम गंभीर झाला.. चेह-यावरचे हास्य झटकन मावळत पुढे म्हंणाला.

" माझ्या माणसांना ..- मारल्याचा बदला हवाय ..! "

त्याच वाक्य ऐकून तिने कसतरीच पटकन त्याच्याकडे पाहिल..

" काय? बदला.?" तीच वाक्य पुर्ण व्हायच्या अगोदरच निळ्याने वेगवान हालचाल केली- दोरीतून
दोन्ही हात झटकन सोडवले..- मागच्या खिशात ठेवलेला क्रॉस काढुन तोच हात वेगाने पुढे आणला..
तीच्या कपाळावर लावला.. -

क्रॉसच्या बेरीजच चिन्ह कपाळावर बसताच
फस्स आवाज झाला..आतून पांढरट धुर वेगाने बाहेर निघु लागल..

" आह्ह्ह्ह्ह्ह!" खर्जातल्या आवाजात लालसटवी ओरडली.

पन बदल्याच्या आगीने पेटून उठलेला निळ्या त्याचा संताप उफाळून वर आला होता.. - राग,क्रोधाच्या भावनेने त्याची भीति कुठेतरी भिरकाऊन दिली होती..-



xxxxxxxxxx


सदर कथेत अश्लीलतेचा प्रसार नाही- कथेची जोड म्हंणून ह्या भागात काही थोडेफार 18 सीन्स दिले आहेत. पन हे सीन्स शृंगारीक नाहीत- त्यामुळे सर्ववयातील श्रेणी हा भाग वाचू शकते..!

धन्यवाद..🙏😊

मागील भागात काय झालं होत ?

क्रॉसच शुद्ध चांदीच स्पर्श त्या लालसटवीसाठी वर्ज्य होत..- तिच्या कपालावर क्रॉसचा स्पर्श होताच तो गरम विस्तवासारख तिच्या कपाळावर चिपकून बसला होता.-

लालसटवी वेगाने हात -पाय हळवत होती..
आजुबाजुच्या पिशाच्छांना एकक्षण नक्की काय झालं हे कळल सुद्धा नव्हत इतकी निळ्याने वेगवाण हालचाल केली होती
पन जेव्हा त्यांना आपल्या मातेवर हल्ला झाला आहे , हे त्यांना कळल तेव्हा त्यांचा संताप उफाळून वर आला सर्वजण निळ्याच्या अंगावर धावले.

क्रॉसच्या शक्तिने त्याच काम करायला सुरुवात केली होती..- क्रॉसच्या लालमणीने लालसटवीच्या आतिल तीची सर्वशक्ति आपल्याआत खेचायला सुरुवात केली होती.

तीच सौंदर्य गळून पडत होत- हळुहळू चेह-यावरच तेज गायब झाल - त्वचा सुरुकूतली गेली..
म्हातारी झाली - डोळे,ओठ,गाल सर्वच आत गेले..
आता तिथे लालसटवी ऐवजी फक्त एक शंभर वर्षाची जख्खड म्हातारी दिसत होती.

सर्व पिशाच्छ आपल्या अंगावर येत आहेत हे पाहून - निळ्याने क्रॉस दोन्ही बाजुंना फिरवला..

क्रॉसमधून चंदेरी रंगाची प्रकाश किरणे बाहेर पडली..! त्या चंदेरी प्रकाश किरणांचा स्पर्श चार पाच जणांच्या देहाला स्पर्श होताच ते जागेवर आग लागून जळाले..बाकीची पिशाच्छ जराशी लांब गेली..पन पळाली नाहीत..!

" निळ्या...- हरामखोर , तू धोका दिलास आम्हाला..! " सोपान त्याच्या तोंडातले सुळे बाहेर काढून हिंस्त्र श्वापदासारखा गुरगुरत म्हंणाला.

" मी! "
निळ्याने सोपान कडे पाहिल.

" होय तूच , तू आमचा विश्वास घात केलास - तू तू..आम्हाला फसवलस..! आमच वापर केलंस तू , जर तू माझा खरा मित्र असशील तर तो क्रॉस दुर फ़ेक , माताराणी तुला माफ करतील तू त्यांना तसंच सोड ..बाजुला हो...त्यांच्या जवळून . !
सोपान एका दमात म्हंणाला.

" अस म्हंणतोस, सोडून देऊ हिला..! "
निळ्याच्या वाक्यावर सोपानने हसून मान होकारार्थी हळवली.

" बर ए इकडे, तुझ्या ह्या माताराणीला उचलून घेऊन जा ये..!" निळ्या म्हंणाला.

" पन तू मला काही केलंस तर ?"

" नाही रे , तू तर माझा प्रिय मित्र आहेस ना? तुला मारायचं असत , तर आधीच मारल नसत का ?

सोपानने पून्हा मुर्खासारखी मान हलवली.

" हे बघ मी तुला तुझी ही म्हातारी माताराणी सुखरूप सोपावेल..पन त्या आधी माझी एक अट आहे.."

" तुझी अट मान्य आहे सांग काय अट आहे तुझी.." सोपान पटकन म्हंणाला.

" मला रॉकेल , किवा काहीही जळेल अस द्रव हवंय!"

" का ? कश्यासाठी?"

" प्रश्नाच्या आईची गांxx सोपान, तू सांगितल तस करतोस की नाही!" निळ्या खेकसला..

" ..ठिक आहे..करतो..करतो! ए जा जाऊन रॉकेलच डब्बा घेऊन ये!." सोपानने मान्य केल.. आपल्याच एका साथीदाराला हुकूम सोडल..
त्या पिशाच्छाने जाऊन एक सफेद रंगाच रॉकेलच डबा आणला..ज्यात..- लालरंगाच रॉकेल होत..

" हे काय आहे?"

" रॉकेल!"

" अस लालरंगाच?"

" हे अमानविय रॉकेल..आहे..! हे लगेच पेट घेत..ह्याची शक्ति खुप आहे."

" हा हा ..हा चल ठीके..ठीके जास्त प्रवचन नको देऊ! आता मी सांगतो तस कर ..! ह्या रॉकेलने जमिनीवर एक गोल आख - ( सोपानने निळ्याने सांगितल्यानुसार , रॉकेलच झाकण उघडून रॉकेल खाली ओतत त्यापासून एक गोल आखल. )
निळ्या पुढे बोलू लागला.

"आता , एक मशाल घे!"
सोपानने स्तंभावर जळणारी बाजूचीच एक मशाल हाती घेतली..

" ती मशाल माझ्याकडे फेक ..! " सोपानने
ती मशाल हवेतून निळ्याकडे फेकली..तीच निळ्याने हवेत झेळली..


" चल आता वापस मी सांगतो तस कर, तुझ्या सर्व साथीदारांना त्या गोळ्यात उभ कर !"

" काय ? नाही मी असं करणार नाही..तू त्यांना जाळून मारशील..!" सोपान दात ओठ खात म्हंणाला.

" सांगितलं तस कर सोपान , नाहीतर तुझ्या ह्या म्हातारीला तर, " निळ्या एका ढोप्यावर खाली बसला...त्याने ती त्रिकोनी काच बाहेर काढली..तीच टोकदार भाग ..लालसटवीच्या छाताडावर ठेवल..

" सांगतोय तस्ं कर नाहीतर हिच काळीज फाडील..!" निळ्या गरजला..त्याच्या डोळ्यांत राग भरला होता.

" नाही . नाही... थांब....मी मी करतो..! "
सोपान थरथरत्या स्वरात म्हंणाला त्याने सर्व पिशाच्छांना त्या वर्तुळाकारात उभ केल.

." एक मिनिट, ती पिया कुठे आहे .! "
निळ्याला त्या सर्व पिशाच्छांमध्ये पिया दिसली नाही ..

" होशियारी करू नको, कुठे आहे ती? बोलाव तिला..!" .निळ्याने पुन्हा दम दिल..

" पिया..!" सोपानने हाक दिली..
तसा त्याच वेळेस वर छप्परावर पाळिसारखी चिटकलेली पिया धप्प आवाज करत खाली आली..

" ए जाडे .त्या वर्तुळात उभी रहा !"

" निळ्या..! मी आवडीची मैत्रीण आहे, तुझी मेव्हणी आहे मी, तु..तू...मला मारणार निळ्या..!"
पिया मळुल चेहरा करत म्हंणाला एकक्षण निळ्याला खरच तिच्यावर दया आली , पण त्याला कळून चुकल..होत हे सर्व त्याच मन वळवण्याच काम आहे..

" ए उभी रहा गप्प चल..!" तो खेकसला..
ती गपचूप जाऊन त्या वर्तुळात उभी राहिली..

" तू..?" निळ्याने सोपानकडे पाहिल..
" तुला मराठी समजत नाही का रे , इंग्लिश मधी सांगू का? चल ..चल त्या वर्तुळात जाऊन उभा रहा..! तुझ्या मातारानीची फिकर नको करू, मी बघतो तीच काह करायचं ते, चल तू त्या वर्तुळात जा, चल..!"

" मी सुद्धा?"

" हा तर मग , तू काय ईथे जेवायला राहतो का?" निळ्या खेकसला..

सोपान चालत जात त्या वर्तुळात घुसला.
निळ्याने एक नजर त्या सर्वाँवर टाकली..आत
सोपान, पिया, चंमण, अघोरीबाबा सर्वच्या सर्व होते..
त्या सर्वाँनापाहता निळ्याचे डोळे भरून आले..

काहीवेळा अगोदर ही सर्व आपली मांणसे आपल्या सोबत होती..- त्याने मान जराशी मागे वळवली डोळ्यांतून बाहेर आलेले अश्रु बाहीने पुसले..
मन कठोर केल.. - मनाला समजवल की ही सर्व पिशाच्छ आहेत, ह्या सर्वाँमध्ये आता माणुसकी कद्दापी शिल्लक राहिली नाही.

ह्यांच अंत करण हेच भल्याच ठरेल..अन्यथा सर्व मानवतेला ह्यासर्वाँपासून धोका उद्भवू शकत होता.

निळ्याने जळणा-या मशालीकडे पाहिल..
दोन पावळ चालत पुढे आला आणी हळूच ती मशाल हवेतूनच त्या रिंगणापुढे फ़ेकली..

लालसर आगीचा स्पर्श त्या अमानवीय रॉकेलला होताच..-

एक विशिष्ट पद्धतीच'झप्प' असा आवाज होत आगीचा एक भडका हवेत उडाला - गोलाकार वर्तुळातली सर्व पिशाच्छांची देह चटचट करत जळू लागली..

वेगवेगळे आवाजातले चित्कार फुटू लागले..
कोणी निळ्याला शिव्या देत होत- तर कोणी मध्येच हसत , रड़त विव्हळत होत..-

निळ्या चालत लालसटवी जवळ आला..
त्याने खाली पाहिल.. - काहीवेळा अगोदर एवढी सुंदर दिसणारी लालसटवी, आता अगदी म्हातारी , अपशकुनी थोबाडाची ,किळसवाणी दिसत होती..
पन एवढ सर्व होऊन सुद्धा तीची ती हिरवेजर्द सर्पधारी नजर संतापाने त्याच्यावर खिळली होती.

" तू मला मारशील..!" खोल गेलेल्या स्वरात ते शेवटचे शब्द ती बोलत होती.

" तू मला एकदा मारशील, पन माझ जन्म, कुठे न कुठेतरी पुन्हा होइलच..! तेव्हा मी पुन्हा येईन..- तुझ्यासाठी - तुझा नाश केल्याशिवाय मला चैन पड़णार नाही.."

निळ्या पुन्हा खाली बसला त्याने हातात असलेली काच जोरात तिच्या छाताडात घुसवली.. - त्या काचेवर आधिक-आधिक जोर देऊ लागला..

लालसटवीच्या चेह-यावर कसलीच वेदना दिसून येत नव्हती- तीच्या चेह-यावर फक्त सूडाची भावना दिसत होती..

संताप,राग, सूड भावनेने ते हिरवेजर्द डोळे
त्याच्यावर खिळले होते..

निळ्या काचेवर आधीक आधिच जोर देत होता.. तोच त्याने शेवटचा आंतिम दाब दिला..
फट..असा आवाज झाला ...काच ह्दयाला फाडत आत घुसली होती.

लालसटवीच्या तोंडून काळसर रक्त बाहेर निघत होत..- हळू हळू.. तीचे ते हिरवेजर्द डोळे मिटले..
तसे निळ्याने सुटकेचा निश्वास टाकला..

तोच अचानक पुन्हा खाड़कन तीने डोळे उघडले....दात ओठ चावत, तेच हिरवेजर्द डोळे वटारून ती त्याला दम भरत होती..

निळ्या जागेवरून उठला...बाजुला तो सफेद रॉकेलचा डबा होता तो त्याने हातात उचल्ला.
होत नाही तेवढ सर्व रॉकेल तिच्या अंगावर ओतल..
बाजुची एक मशाल आणली..

" लक्षात ठेव...तु..धोका दिलायेस मला..मी बदला घ्यायला पुन्हा येईल, तुझा अंत केल्याशिवाय"
ती पुढे बोलणार तोच निळ्याने मशालीने तिच्या देहाला आग लावली..

आगीचा एक भडका उडाला..
लालरंगाची आग तीच प्रेत खाऊ लागली..
जळणा-या आगीतून तिच्या विव्हळ फुटण्या ऐवजी
चिरकस हसण्याचा आवाज येत होता.. निळ्याच काळीज भीतिने गारठून गेल होत..

नक्की हा अंतच होता - की सुरवात त्याल कळून येत नव्हत.

हळुहळु त्या हास्याचा आवाज कमी कमी होत गेला.

एक पेटती मशाल हाती घेऊन निळ्या त्या तळघरातून बाहेर पडला. नदीच्या काळ्याशार पाण्यात त्याने हात पाय धूतले... पाय-या चढुन वर आला..- चर्चच्या माळ्यावरून जिन्यामार्फत खाली उतरला..

कथेची एनडींग सुखद अंत ..
===================÷====÷
कब्रस्तानात निळ्या आपल्या मित्रांसोबत आला होता . पन जातांना मात्र तो एकटाच निघाला होता.
आता कब्रस्तानातल धुक कमी झाल होत - थंडी सूद्धा सामान्य होती- जणू लालसटवीच अंत होताच तिची माया सुद्धा अंत पावली होती..कोहराम कब्रस्तान त्या अघोरी लालसटवीपासून पुर्णत मुक्त झाल होत.
निळ्या कब्रस्तानाच्या मुख्य गेटजवळ आला..
गेट उघडल आणि समोर पाहतो तर काय ?

समोर रस्त्यावर लिमोजीन स्टाईलची काळ्या रंगाची दहा फुट लांबीची हाई- फाई कार उभी होती.

गाडीचा दरवाजा उघडला गेला..
गाडीतून एक काळ्या रंगाचा सुट बुट घातलेला माणुस बाहेर आला.

" मिस्टर निळचंद्र या, तुमचीच वाट पाहत आहोत आम्ही." त्या मांणसाने निळ्याला गाडीत बसण्यासाठी खुणावल.

निळ्या जरासा चक्रावलाच होता..
तो जागेवर उभ राहून दोन सेकंद त्या मांणसाकडे पाहतच राहिला.

तोच सायरन वाजवत पोलिसांची एक सफेद गाडी तिथे आली..- गाडीतून उच्च रेंकचे ऑफिसर उतरले - घाई घाईतच निळ्या जवळ आले .

" मिस्टर निळचंद्र..! प्लीज गाडीत जाऊन बसा..! ईथे लवकरच आमची टिम येईल. गो फ़ास्ट!"
निळ्या जरासा कावराबावरा होत त्या गाडीपाशी पोहचला..गाडीच्या उघड्या दरवाज्यातून आत घुसला.

" आई.पी.एस साहेब , ही तुमच्या कामाची रक्कम! " त्या सुटबुटातल्या मांणसाने एक काळ्या रंगाची बैग त्या ऑफिसरला सोपवली.

" मोजून घ्या बरोबर दहा आहेत.!"

" मोजायची काही गरज नाही हो, तुमच्यावर विश्वास आहे."

" बर , मग आमचा काम तेवढ़ करा. निळ्या आणी त्याचे मित्र अण्णाच्या हातून मेले अशी न्यूज मिडीया वाल्यांना द्या.- "

" हो हो तुमच काम झालं म्हंणून समजा."
त्या दोघांनिही हस्तांदोलन केल .

तो काळ्या सुटबूटातला माणुस गाडीत बसला..
गाडीचा दरवाजा लावताच गाडीच इंजिन सुरु झाल गाडी रस्त्यावरून धावू लागली.

गाडीच्या आतली सिस्टीम हाई- फाई होती.
मखमखली गादीचे मऊशार तपकीरी रंगाचे दोन सीट होते.

एकावर निळ्या बसला होता , आणी पुढच्या सीटवर तो सुटबुटातला माणुस -

गाडीत निळ्या रंगाची लाईट पेटली होती-
कोठूनतरी थंडगार एसीची हवा लागत होती.
अंगाला सुखद अनुभव देऊन जात होती.
निळ्या गाडीची हाई-फाई स्टाईल पाहत होता.
त्याची एवढी ऐपत नव्हती की ह्या अश्या करोडोच्या महागड्या गाडीत बसाव! पन हा माणुस त्याला ह्या गाडीत घेऊन आला होता ! पन का? कश्यासाठी?या पाहुयात.


" हेल्लो मिस्टर निल!" आवाज नॉर्मल होता.
त्यात गर्व,अहंकार,ह्यांच मिश्रण नव्हत.

त्या मांणसाने हात मिळवणीसाठी हात पुढे केला.
निळ्याने हात मिळवल...त्याच्या चेह-यावर अद्याप गांगारल्यासारखे भाव होते.

पन तो माणुस मात्र मंद स्मितहास्य करत ताच्याकडे पाहत होता.

" मिस्टर निल एकदम रिलैक्स होऊन बसा ओके ! बिल्कुल टेंशन घेऊ नका ओके!"

" टेंशन घेऊ नको" निळ्या बोलू लागला.

" तुम्ही त्या पोलिसाला काय सांगितल,मी मेलो म्हंणून मिडीयावाल्यांना सांगा- आणी वरून म्हंताय रिल्याक्स..- तुम्ही कोणी गुंड तर नाही ना ? जी मांणसांच्या शरीरातली अवयव , किडन्या वगेरे काढून विकत्यात.!" निळ्याच्या वाक्यावर तो माणुस खो खो हसू लागला.

" नो नो मिस्टर निल! आम्ही तशी काही मांणस नाही आहोत - सो मी तुमची जास्त उत्सुकता न ताणता विषयालाच हात घालतो! " तो माणुस बोलू लागला.

" माय नेम इज टी:सी - म्हंणजे तिकिट कंडक्टर नाही बर (ह्या वाक्यावर थोड हसण आलंच) टी:सी म्हंणजे त्रिकाळ अकाऊटंट..तूम्ही मला टी:सी म्हंणूनच हाक मारा ! तर मिस्टर निळ आमची एक त्रिकाळ नावाची घोस्टबस्टर संस्था आहे ! "

" एं ? घुसबस्तर?" निळ्या न समजून म्हंणाला

" नो नो घुसबस्तर नाही घोस्टबस्टर !"

" तुम्ही मराठीतच बोला ना साहेब , आधीच त्या फादरने डोक खाळलय-!'

" हो हो माहीतीये मला मिस्टर निळ - बर ठीके मी तुमच्याशी मराठीतच बोलतो."

" एक मिनिट तुम्हाला फादर बद्दल कस कळल."
निळ्या जरासा सावध झाला. त्याने खिशात हात घातला तोच क्रॉस पुन्हा बाहेर काढला - दोघांमधोमध समोर धरला.. ! निळ्याला वाटलं हा सूद्धा एक पिशाच्छ असावा!

" ओ वाव , नाईस - नाईस!" त्या काळ्या सुट बुटातल्या मांणसाने तो क्रॉस हातात धरला..

" मी त्यांच्यातला नाही , मी माणुसच आहे."
तो क्रॉस त्याने हाती घेतला.. - सुटातल्या खिशात ठेवला.

" बर मिस्टर निल , तुम्ही आता जे लालसटवीच अंत करून आलात- त्या बद्दल आम्हाला सर्वकाही ठावूक आहे. आता तुम्हाला आमच्याबद्दल सांगतो - आम्ही एक अशी संस्था चालवतो - जिथे भूत,पिशाच्छ,हडळ,मुंजा,प्रेताल,वेताळ,अश्या सर्व भुतखेतांना पकडल जात !"

" हो तर मग ?"

" तर मग , तुम्ही आमच्यासाठी काम करायचं!
तुम्ही जस लालसटवीच अंत केलत तसंच - ह्यापुढेही वेगवेगळ्या प्रजातीच्या भूतांचा खात्मा करायचा- तुमच्या कामासाठी म्हंणजेच भुत पकडायला आम्ही तुम्हाला , गेझेटज -भूतांना पकडायचे जादूई-गेझेटज देऊ ,ज्याने तुम्ही भूतांना अलगद पकडू शकता- आणी तुम्हाला ह्या कामाचे ,दर एका मिशनचे वीस लाख- तीस लाख , असे पैसे दिले जातील..- तुम्ही आता पाहिल असेलच की मी त्या ऑफिसरला . - तुमच्यासाठी दहा कोटी रूपये दिलेत.!."
टी:सी एवढ बोलून थांबले.

मग जरा वेळाने निळ्या म्हंणाला.

" आणी जर मी नाही म्हंणालो तर ?"

" नॉट प्रोब्लेम - मिस्टर निल , मग तुमच पुढील फुटक्या नशीबाच आयुष्य तुमची वाट पाहतच आहे.
आता तुम्ही गावात जाणार, तिथे जाऊन तुमच्या मित्रांच तुमच्या मुळे गेलेल जिव ! "

" माझ्या मुळे मेली नाही आहेत ती, त्यांना ता लालसटवीने मारलं !" निळ्या तडका फडकी , खेकसत म्हंणाला.

" हो हो मिस्टर निल, आम्ही विश्वास ठेवू शकतो ,की तुमच्या मित्रांना -लालसटवीने मारल आहे - पन तुम्हाला वाटतं,की तुम्ही तुमच्या मित्रांच्या आईवडीलांना हे सांगाल की तुमच्या मुलांना एका भुताने मारल ? आणी ते लागलीच तुमच्यावर विश्वास ठेवतिल ही? वाटतं तुम्हाला?" टी:सी चा आवाज तसाच शांत होता.

निळ्या विचारात पडला - खरंच आपण ह्याचा विचारच केला नव्हता..!

" मिस्टर निल , तुमच्या मित्रांचे पालक आईवडील कधीच तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत- आणी खुनाच्या आरोपात तुम्हाला पोलिसात
टाकतील- केस कोर्टात जाईल- अणि अजुन एक तुमच्या घरातल्यांसाठी तुम्ही मेलेलेच आहात..मग तुमच्या बाजुने कोर्टात साधा सरकारी वकील सुद्धा नसेल - असला तरी तो काहीच करू शकणार नाही..मग तुमच पुढील पुर्ण आयुष्य , खडी फोडण्यात, किंवा जेलमध्ये असलेल्या संडास साफ करण्यात निघून जाईल- सो मिस्टर निल , तुमच्याकडे पाच मिनीटाचा अवधी आहे-"

टी:सी साहेबांनी कोटमधून एक काळ्या रंगाची फाईल काढली- फाईलच्या प्रुष्टभागावर इंग्रजीत Tअसा मोठा अक्षराचा लोगो होता.

" ही फाईल- तुम्हाला आमच्यात यायचं असेल तर आत पेन आहे- ह्यावर कशीही सही करा ! आणी "
टी: सी साहेबांनी कोटमध्ये हात घातला - एक चावीचा गुच्छा फाईलवर ठेवला.

" ही चावी?" निळ्या..

" तुमच्या फाईव्ह स्टार हॉटेल रूमची चावी आहे!" एवढ बोलून टी:सी सीटवर ताठ बसले - त्यांनी कोटच्या खिशातून काळा चष्मा काढला डोळ्यांवर चढवला आणि तसेच कसलीही हालचाल न करता ताठ बसले.

निळ्या विचार करत होता.
अमोल,सोपन, - आणी सर्वात जवळची आवडी ..म्हंणायला त्याला आपल म्हंणून घेणारी त्याची ही सर्व मांणस त्याला ह्या जिवनाच्या प्रवासाफ अस एकाकी सोडुन कायमची निघुन गेली होती.

आता ह्या अश्या एकाकी जिवनात तो काय करणार होता? दिवसाची मोलमजुरी करून सुद्धा तीनशे ते चारशे रूपये हाती येणार होते..त्या पैश्यांची एक देशी दारूची चप्टी पिऊन रात्रभर कोणत्या तरी कालोख्या गल्लीबोलात ,किवा गटारात पडून तो त्याच आयुष्य काढणार होता का? ही एक संधी चालून आली होती! ती जर खरी असेल तर , आजमवायला काय हरकत होती? ह्या फुटक्या नशीबापेक्षा हे किस्मतवाल नशीब शंभर पटीने चांगल होत.
निळ्याने एक मोठा श्वास भरला ..व तो सोडत म्हंनाला.

" टी:सी साहेब मी तैयार आहे."
टी:सी साहेबांनी डोळ्यांवरचा काळा चष्मा काढला..
ते मंद स्मित हास्य करत होते..जणू त्यांना हे आधीच ठावूक होत होकार येणारच.

निळ्याने फाइल उघडली- आत काळ्या रंगाच्या शब्दांचा इंग्रजीत मजकूर होता.
बाजुलाच एक पेन होता..

निळ्याने पेन हातात घेऊन हळुच त्याचा खटका दाबला..- तशी अंगठ्याला एक सुई टोचल्यासारखी जाणिव झाली- थोडीशी वेदना झाली.

" हे काय होत?"

" हा स्पेशल पेन आहे मिस्टर निल, ह्यात शाई नसते- हा पेन घोस्टबस्टर्सच रक्त शोषून घेतो व रक्ताने सही करवतो."
टी:सी साहेबांच्या वाक्यावर निळ्याने होकारार्थी मान हलवली.

" निळचंद्र...." फाईलवर निळ्याने मराठीत नाव काढत साईन केली.

टी:सी साहेबांनी फाईल मिटली आपल्या हातात घेतली..

"वेल मिस्टर निल, आमच्या त्रिकाल घोस्टबस्टर्स मध्ये तुमच स्वागत आहे- पाच मिनीटांपेक्षा जास्तच वेळ घेतली तुम्ही बट येस ओके ..हहहह्हाहहहह्ह"
टी :सी साहेब हसू लागले.

निळ्या सुद्धा केव्हा नाही तो आज खुळ्यामनाने
हसला..

आणी ही त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात जी झाली होती.

समाप्त..:

हुशश ....दिवसाची रात्र- आणी रात्रीचा दिवस करून कथा संपवली आहे !

आणी आता पुढच्या कथेत भेटु ठीके..! 😊🙏
तो पर्यंत समर्थ कृणाल ही कथा सुरू राहिलच...

धन्यवाद...