अमोल, सोपान , पिया, अण्णा, चंमण, सावकार , बाल्या आणी शेवटला अघोरीबाबा सर्वाँचा त्या लालसटवीने जिव घेतला होता.
एकेरात्री आठ जणांचा मूडदा पडणे म्हंणजे लालसटवी किती रक्तपाती होती? हे कळून येत होत ! नाही का? काही क्रूर शक्तिंना रक्तपात म्हंणजे व्यसना सारखा असतं, ते मिळाल नाही तर त्यांचा जिव कावरा बावरा होतो- जस की एका नशेड्याला ड्रग्ज घेणा-याला जर ड्र्ग्ज मिळाल नाही , तर त्याच्या हाता पायांना मुंग्या येतात, जिव कासावीस होतो..
गूदमरायला होत..ती नशा म्हंणजे त्याच आहारच बनते..जर ते त्याला मिळाल नाही तर परिणाम फार भयानक होतात.
तसंच ह्या तामसी शक्तिंच आहे.
ह्यांना रोज एक बळी हवा असतो -अघोरी खेळ खेळण्यासाठी, रक्त पिण्यासाठी, मांस खाण्यासाठी आणी जर ते मिळाल नाही तर ? त्यांच्या शक्ति लोप पावतात , हळू हळू त्या जीर्ण होऊन, अंताच्या दिशेने सरसावतात ..
दोघेही पांढ-या प्रेताड फुसक्या धुक्याला चिरत , कबरांच्या रांगेतून मधोमध असलेल्या वाटेतून धावत निघाले होते.
अवतीभवतीच्या कबरी वेगाने पास होत होत्या..
त्या मोठ्या कबरीवर पुढे एका चौकोणी काळ्या पाषाणावर इंग्रजीत नाव लिहील होत.
फादर जॉर्ज सेलिव्हा आणी पुढे इंग्रजी अंकांत जन्म दिनांक आणी मृत्यु दिनांक लिहील होत.
( 1890- 1946 )
ही कबर त्याच फादर- प्रिस्टची होती , ज्याने निळ्याला सतर्क केल होत.
त्याच कबरेच्या थोड बाजुला गवतावर , एक कालसर जब्बा घातलेली पाठमोरी आकृती उभी होती.
त्या आकृतीला पाहताच निळ्याने लागलीच ओळखल , हे तेच पादरी आहेत ज्यांनी आपल्याला सतर्क केल होत ..
निळ्याच्या पावलांचा वेग मंदावळा..
हळू हळू कमी होत पावळे जागीच थांबली..- आवडी पाच पावळ धावत पुढे गेली होती - परंतू निळ्याला अस थांबलेल पाहूण ती सुद्धा जागेवरच थांबली..
तिने मागे वळून पाहिल..
" निळ्या, काय झाल ? चल..!" ती घाईत म्हंणाली. तसंही तिच बरोबर नव्हत का? ह्या भयाण वास्तूत तिचा हर एका जागेत कणा- कणांत वावर होता.. कोणत्याही क्षणी , केव्हा कसे ते ध्यान अवतरेल काहीच सांगता येत नव्हत- म्हंणूनच तर तिला घाई झाली होती ना !
त्या मोठ्या कबरीवर पुढे एका चौकोणी काळ्या पाषाणावर इंग्रजीत नाव लिहील होत.
फादर जॉर्ज सेलिव्हा आणी पुढे इंग्रजी अंकांत जन्म दिनांक 1990आणी मृत्यु दिनांक 1946 लिहील होत.
त्या आकृतीच्या अवती भवती वाहणारा धुका - त्या आकृतीच्या देहातून आरपार होऊन पुढे जात होता..जणू ती आकृती हवेसारखी पारदर्शक होती..तिला अंधुकसा पारदर्शक फसवा आकार होता..
" फादर..!" निळ्याचा आवाज आला.
आवडी जरा भीतच पुढे जे काही घडत होत ते पाहत कारण समोर लालसटवीसारखच एक पिशाच्छ,आत्मा सैतान असंच काहीतरी उभ होत ना ? आणि निळ्या? तो त्याच्याशी बोलत होता?
निळ्याच्या एका वाक्यासरशी ते ध्यान वळल..
गर्रकन त्याने गिरकी घेतली.
उंचीने साडे पाच फुट, अंगावर एक पायघोळ बिना कॉलरचा जब्बा, गळ्यात क्रॉसची मफलर होती-
प्रेताड चौकोनी चेहरा होता , जणू शवागारातल प्रेत उठुन उभ राहिल आहे?- डोळे लहानसर , त्यांखाली
काली वर्तुळे उमटली होती- त्या डोळ्यांत शुन्य भाव होते. डोक्यावरचे कुर्ले केस तपकीरी रंगाचे होते. दोन्ही हात खांद्यांवरून सैल सोडले होते..
" फादर ...फादर मला माफ करा ,मला नव्हत माहीती की तुम्ही माझी मदत करत होतात.."
( पुढिल वाक्य इंग्रजी शब्द उच्चार आहेत - पन ते आपन मराठीतच पाहुयात)
" घडणा-याला कोणीच थांबू शकत नाही पोरा , जे झालं ते झालं ! " ( इंग्रजी शब्द उच्चार)
फादरच्या तोंडून घोगरा खर्जातला आवाज बाहेर पडला..- तो आवाज ऐकुन आवडीच्या अंगावर सर्रकन काटा आला.
" फादर..आम्ही दोघांनीही आमचे मित्र गमावलेत फादर , त्या लालसटवीने - सगळ्याना मारलं..- आणि आता आमच्या जिवावर उठलीये .- फादर.." निळ्याने दोन्ही हात जोडले..
" आमची मदत करा फादर , आम्हाला ह्या संकटातून बाहेर पडायचा रस्ता दाखवा फादर !"
" हो !" आवडी थरथर त्या स्वरात म्हंणाली. ( इंग्रजी शब्द उच्चार)
" कोणत मार्ग ? तुम्ही फक्त सांगा, आम्ही तैयार आहोत -!" आवडी म्हंणाली.( इंग्रजी शब्द उच्चार)
" ती काचेची बरणी एकच अस साधन होत जी लालसटवी उर्फ(ब्लडक्वीनला ) कैद करू शकत होती!" ( इंग्रजी शब्द उच्चार)
" पन ती काचेची बाटली आता आस्तित्वात नाहीये ! तर मग ? तिला कैद कस करायचं? "
" होय," आवडी पटकन म्हंणाली. तिने निळ्याकडे पाहिल.
" निळ्या क्रॉस दे!" निळ्याने खिशातून क्रॉस काढला, आवडीकडे सोपावला- तो न समजून आवडी- फादरकडे पाहत होता..त्याला दोघांच्याही संभाषणातला एक शब्द ही समजला उमजला नव्ह्ता कारण त्याला इंग्रजी काही केल्या समजत नव्हती , आता ख-या अर्थाने त्याला शिक्षणाच मोळ कळल होत. आणी खुपच पश्चात्ताप ही होत होता.
" हा क्रॉस निट पहा- क्रॉसच्या मधोमध एक लालसर मणी आहे , तो मणी लालसटवी (ब्लडक्वीन) जेव्हा तिच्या मुळ रुपात येईल..तेव्हाच तिच्या कपाळावर मधोमध लावायचं ..ज्याने तीच देह लालसट धुळीकणांत परावर्तित होऊन ती त्या मणीत कैद होइल..- ते ही कायमची ! आणी हो ही सर्व क्रिया तुम्हाला चर्च मध्येच करावी लागेल - जिथून ह्या सर्वाची सुरुवात झालीये.."
" ए आवडे....ए आवडे..बाई माझे..तुझ्या पाया पडतो ग ! पन तो इंग्रज म्हातारा ( निळ्याने दात ओठ चावले) इंग्रजीत काय बडबडत होता..ते मला सांग..मी कान असुन पन बहिरा झालो होतो ग! सांग ना पिलिज काय बोल्ला तो..सांग.."
निल्या हात जोडत विनवनिच्या सुरात म्हंणाला.
" सांगते ..सर्व सांगते रसत्यात...पन आधी आपल्याला चर्च मध्ये जाव लागेल..! चल.?"
दोघेही पुन्हा धावले , चर्चच्या दिशेने निघाले .
पुर्णत चर्च लाकडाच बनल होत - आणी अमावास्या असल्याने , आकाशात अंधार होता..अंधारामुळे लाकडाला कालसर रंग प्राप्त झाला होता.
चर्चच्या वरच छप्पर त्रिकोणी होत..त्या त्रिकोणी छप्परावर लोखंडी क्रॉस - उभ होत..- थोडस पुढे झुकल होत. एक हलकासा धक्का जर कोणी मागून त्या क्रॉसला दिला तर ते थेट खाली पडणार होत.. आणी खाली जे कोणी उभ असेल ? त्याच अंत बनणार होत.
त्याच क्रॉसजवळून जरा दुर जमिनीवरून दोन आकृती चर्चच्या दिशेने धावत आल्या..
निळ्या आणि आवडी..
दोघेही चर्चच्या तुटक्या दरवाज्यापाशी उभे होते.
" अच्छा , म्हंणजे चर्चमधुनच तर ह्या सर्व घटनेला सुरुवात झालीये - आणी तिथेच अंत सुद्धा होइल - म्हंणजे तो वरचा माळा..!" निळ्याने झटकन वर पाहिल..
दुस-या मजल्यावरची माल्यावरची एक उघड्या झापेची खिडकी दिसत होती.
निळ्याने जस वर पाहिल. तस त्या उघड्या खिडकीत कोणितरी उभ होत ते झटकन बाजुला झाल होत.
निळ्याने ते पाहिल होत..
निळ्या - आवडी दोघेही दरवाज्यापासून पाच पावळ दूर उभे होते.
निळ्याच्या मनात संशयाची पाळचुकचुकली..
तो एकटक जागेवर उभ राहून वरच पाहत होता
" निळ्या चल !" आवडी म्हंणाली.
निळ्याच लक्ष तिच्यावर नव्हत.
आता त्याची नजर त्या खिडकीवरून थेट वर छप्परावर असलेल्या लोखंडी क्रोसवर खिळली होती.
कारण तिथे छतावर काहीतरी उभ होत ? अंधार असल्याने दिसत नव्हत - पन तो जाडसर आकार कालोखात ठ्ळकपणे दिसत होता.
एका जाड्या बाईची आकृती होती ती..
निळ्याने प्रश्नार्थक नजरेने डोळे बारीक करून पुढे पाहील. पण तेवढ्यातच त्या काळसर आकृतीने झटकन आपले डोळे उघडले..
अंधारात त्या कालसर आकृतीच्या गोलसर डोक्यावर डोळ्यांजागी दोन रूपयांएवढे चांदीचे डोळे लुकलुकले-
निळ्याने ते पाहताच तोंडाचा आ- वासला..बारीक झालेले डोळे पुन्हा मोठे झाले..
त्या काळभोर ध्यानाने त्या लोखंडी क्रॉसला हलकासा धक्का दिला..
आधीच तुटलेला तो लोखंडी क्रॉस जागेवरून हळला....- अलगद तुटू वेगाने खालच्या दिशेने येऊ लागला..
निल्याने झटकन पूढे पाहिल..
आवडी दरवाज्याच्या दिशेने चालत निघाली होती.
" आवडेsssssss.." मुळाच्या देठापासून त्याने आवडीला हाक दिली.
त्याच्या अचानक आलेल्या हाकेने ती जरा दचकलीच.. ती जागीच थांबली तिने गर्रकन वळून मागे पाहिल..
वेळेची गती जणू मंदावळी गेली..काळ गोठला..
पुर्णत पृथ्वीच जणू फिरायची थांबली होती.
निळ्याने जागेवरूनच धाव घेतली..
धप आवाज करत त्याच्या पावळांनी जमिनीवरची माती उधळली..
आवडीला काहीच समजल नव्हत - की निळ्या अस का वागत आहे. नक्की काय झालं त्याला...
पन तिला त्याच्या नजरेत एक काळजीपूर्वक भीतिच मिश्रण दिसत होत..
वेळेची चक्रे वेगाने फिरली..
हवेतून खाली येणारा लोखंडी क्रॉस वेगाने खाली आला..
आवडीच्या चेतासंस्थेने तिला धोक्याचा इशारा दिला.. तिने वर पाहिल..
तीचे डोळे विस्फारले - शेवटच्या क्षणाला तिच्या पांढरट बुभळांत तो लोखंडी क्रॉसची छवी दिसली..
तो अवाढव्य लोखंडी क्रॉस धप्प आवाज करत आवडीच्या डोक्यावर आदळला.. वजन इतक होत की..काठीसारखी तीची मानेची,मणक्याची हाड तुटली.. - पायाची हाड तूटली जात - पुर्णत देहाचा चेंदामेंदा झाला..
निळ्याच्या पायातले त्राण गळून गेले.
धप्प आवाज करत तो गूढघ्यांवर बसला.. -
त्याच्या थोबाडावर आवडीच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते..
इथे वेळ - केव्हा , आणी कशी बदलेल काही सांगता येत नव्हत कारण..- दहा सेकंदा अगोदर जिवंत असलेला माणुस अकरावा सेकंद काटा घड्याळात पडण्या अगोदर मृत होत होता..
ईथे मूडदे पाडायच काउंट ड़ाऊन सुरु होत.
निळ्याला एक जबरी धक्का बसला होता.
त्याने काय गमावयला होत? हे ईथे मी लेखक असूनही सांगू, लिहू , शब्दांत प्रकट करू शकत नाही.
त्याने त्याच्या आयुष्यातल सुख आपला जिवनसाथी गमावला होता.
दुखात ही ज्याच्या असण्याने हिंम्मत प्रदान व्हायची ते मोटीवेशन त्याने गमावल होत.
त्याचा तो पुढे केलेला हात अद्याप हवेतच धरलेला होता ...
त्याच्या हाताची पाचही बोटे थरथरत होती..
डोळे लालसर झाले होते..त्यातून घळा घळा अश्रु बाहेर येत होते..खाली जमिनीवर पडत होते..
पन नियती किती क्रूर आहे पाहा जरा -
निल्याने दोनक्षण डोळे मिचकावले..
" हा आवाज तर ..." निळ्या मनातच म्हंणाला ..
" पिया..?" निळ्या हळुच पुटपुटला..
त्याला स्वत:च्या कानांवर विश्वास बसेना..
काहीवेळा अगोदर त्याने स्वत:च्या डोळ्यांनी सावकाराच्या देहात घुसलेल्या लालसटवी मार्फत तिला मारताना पाहिल होत.
ईतकंच नाही तर तिचा कलेवर सुद्धा त्याने जमिनिवर पडलेल पाहिल होत.. तीच्या निर्जीव नजरेला तो आयुष्यात सुद्धा कधी विसरणार नव्हता..कारण त्या नजरेत आवडीसाठी किती माया भरली होती.
निळ्याने जरा खाली पाहिल, समोर लोखंडी क्रॉस होता..आणी त्या क्रॉसखाली आवडीच चेंदामेंदा होऊन , पडलेल मृत देह होत. हात पाय सर्व भागांच्या तुकड्यांचा तिथे ढिग साचला होता..आणी त्याच ढिगातून आवडीचा तुटलेला रक्ताने माखलेला हाताचा पंज्या बाहेर आलेला..त्या हाताच्या पंज्यात तोच चांदीचा क्रॉस होता.
मनाशी काहीतरी चंग बांधल-एक आत्मविश्वास निर्माण केल..- आताची ही वेळच अशी होती..की विश्वासाची ढ़ाळ कमकुवत होता कामा नये..
पिया तर कधीच मेली होती, तिचा आत्मा एव्हाना इथून मोक्षासाठी गेला ही असावा- पन आत्मा गेला होता हे खर , परंतू ते शरीर ? देह? कलेवर? प्रेत ? मात्र मागे राहिल होत.
आणी त्याच प्रेताचा लालसटवीने बाहुल्यासारख वापरायला सुरुवात केली होती.
आपल्या काळ्या सैतानी शक्तिने ती त्या प्रेताला , कलेवराला हवी तशी नाचवणार होती..हव तस खेळवणार होती.
ते कळेवर आता तिच्या हाताचे गुलाम झाले होते. आपल्याच मांणसांच जिव घ्यायला निघाले होते.
आणी मग शेवटला - फिदीफिदी तोंडावर हात ठेवून हसल्याच एक ह्ळक्या स्वरातल हसू आल..-
मित्रहो हे जग किती मोठे आहे नाही ? सामान्य मानव ईथे जन्म घेऊन येतो ,काम - धंदा नोकरी - चाकरी करण्यातच त्याच पुर्ण आयुष्य निघुन जात..
अश्या ह्या सामान्य मानवाला ह्या पृथ्वीवर पैश्या व्यतिरिक्त काहीही दिसत नाही.
तो फक्त त्या चार भींतीआड, प्रकाशातच जगत असतो , वावरत असतो !
पन कधी विचार केला आहे का? की हे जग आपल्या पुरतच मर्यादित नाही , जिथे आपण राहतोय , त्याच जगात काही रहस्यमयी , जग आहेत..
जिथे मानवी कल्पनेच्या पलीकडच वास्तव आहे..!
प्रकाश आपला , तर अंधार त्यांचा आहे !
दिवसभर प्रकाशात वावरणारे आपण जस तो सुर्याचा प्रकाश नाहीसा होतो - तसं अंधार पडत - अंधार पडताच सामान्य माणस निद्रेस जातात..
मग ती ही जी काही मानवी निद्रेची वेळ असते - दहा- ते बारा तास (10to 12 hr ) त्या वेळेस ह्या पृथ्वीवर शुकशुकाट पसरत - मध्यरात्री तीन - ते सहाच्या दरम्यान ह्या पृथ्वीवर जितकी लोक आहेत..
त्या लोकांमधुन 100•/. प्रतिशींत माणसांमधुन 94 प्रतिशींत मांणस गाढ झोपलेली असतात.
आणी उर्वरीत सहा प्रतिशींत मांणस जागी असतात
ह्या अश्या वेळेला तीन - ते सहा दरम्यान -मानवी देह ,आतील इंद्रीय अगदी कूमकूमत असत .
एका जागतिक सर्वेक्षणानुसार अस कळलं की तीन ते सहा दरम्यान हार्टअटेकने मरणा-या मांणसांची संख्या जास्त आहे.
पाणी प्यायला उठल्यावर एकटच किचनला जाणारे, लघवी- शौच साठी एकटेच बाथरूमला जाणारी मांणस , सकाळी जोडीदारांनी जमिनीवर तोंडाचा आ- वासून, विस्फारलेल्या नजरेने सकाळी मृत आढळलीयेत.. - पन त्याला कारण काय?
ते एक रहस्य ते रहस्यच आहे !
ह्या अंतरळात तरंगणारी आपली पृथ्वी आणी त्या पृथ्वीवर आपल आस्तित्व आहे - तसंच आस्तित्व अंतराळात तरंगणा-या ह्या अन्य ग्रहांवर सुद्धा असेल का ? तुमच्या मनात कधी असं विचार आल आहे का?
मित्रहो तुम्ही एलियन्सला मानता का ?
पिक्चर ,सिरियल्ज, ह्या अश्या वेगवेगळ्या पटात
वाहीन्यांवर तुम्ही त्यांना पाहिल असेल , परंतू आपण टिव्हीवर पाहिलेले त्यांचे आकार -रुप ही मानवाची कल्पना झाली ! पन ते नक्की वास्तवात कसे दिसतात , हे कोणालाच ठावूक नाही !
नासा अवकाशी( अंतराळ) विज्ञानावर अभ्यास करणारी संस्था सुद्धा हे मानते की ह्या विश्वा पल्याड अंतराळातच कोठेतरी, एलियन्सच आस्तित्व आहे !
जिथे मानव कधीच पोहचू शकत नाही - अश्या ठिकाणी ते राहत आहेत.-
त्यांची बुद्धीही सामान्य मानवापेक्षा लाखोपटीने तल्लख आहे.- जिथे मानवाला 5g तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी इतकी वर्ष लागली ते एलियन्सनी केव्हाच विकसीत केल असाव , आणि त्यांच्याकडे विविध प्रकारची शक्तिशाली गेझेटस आहेत - त्यातलच एक युफओ , युफओच वेग इतक आहे - की ते पापणी मिटुन उघडायला समोरून गायब झालेल दिसेल. !
मानवाने जिथे , अणूबॉम्ब - हाइड्रोजन बॉम्ब
असे दोनच सर्वात घातक विध्वंसक शस्त्र बनवले आहेत.- तिथे एलियन्सकडे लेझर गन्स आहेत, लेझर गन्सने - एका सेकंदात शत्रुच्या शरीराच्या राख केली जाऊ शकते - त्यांच्या कडे काही असे बॉम्बस सुद्धा आहेत , की ज्याने एलियन्स आपल्या पृथ्वीच एका मिनिटात अंत करू शकतात ! नासा अस म्हंणते की एलियन्स हे मानवाला त्यांचा शत्रु मानतात - म्हंणूनच तर ते अंतराळात इतक्या दुर वास्तववास आहेत की तिथे पोहचण मानवास शक्य नाही.
पन ह्या सर्व माहितीत किती तथ्य आहे , हे सूद्धा एक रहस्यच आहे .
ह्या मानवाच्या सामान्य वातावनूलिकीत
जिवनापल्याड अशी कित्येकतरी रहस्यमय घटना घडल्या आहेत - ज्यांची मानवाला काडिचीही कल्पना नाही.
सांगायचं झालं तर हा अंतराळ आणि हा पृथ्वीवरचा अंधार दोन्ही आपल्या गर्भात रहस्य दडवून आहेत .
असो चला तर कथा चालू करूयात .? ठिक आहे या पाहुयात अंत आरंभ भाग 2 ...!
....
निळ्या जागेवर उभा राहिला होता .
उजव्या हातात चांदीचा क्रॉस घट्ट पकडलेला.
त्याने हळुच एक गिरकी घेतली - समोर पाहिल .
त्याच्या नजरेने, बुद्धीने ही अपेक्षा कधीच केली नव्हती , मुळीच केली नव्हती.
समोर आवडीची जवळची मैत्रीण पिया उभी होती. तशीच साडे चार फुट उंचीची, जाड जुड देह यष्टी - अंगावर काळ्या रंगाचा ड्रेस, आणी खाली काळा पायजमा - पन चेहरा , हात,पाय डोळे जरासे विचीत्रच होते.
चेहरा प्रेताड पीठासारखा होता.
ती त्वचा अगदी थंडगार प्रेताला , बर्फाच्या लादीवर झोपवतात तशी होती- त्यात टवटवीत पणा नव्हता ..
डोळ्यांची बुभळे पांढरट त्यात काळ्याशार मिरिचा ठिपका होता. हातांची काळीशार विषारी नख दोन इंचाने वाढली होती , तोंड सुजल्यासारख वाटत होत..
त्यात नक्कीचे ते धारधार पिशाच्छी दात असावेत !
" पिया?" निळ्या हळूच पुटपुटला.
त्या ध्यानाने हळूच मान हलवली.
" तू..तू..तुझ्या जिवलग मैत्रीणीचा जिव घेतलास पिया..? " निळ्या डोळ्यांतली आसव अडवून धरू शकला नाही..- घळा घळा अश्रु बाहेर येत होते..गाळांवरून खाली जात जमिनीवर पडत होते.
"मी..? नाहीतर!"ती लाडीक स्वरात म्हंणाली.
जरा काहीवेळ थांबून पुढे बोलू लागली.
" त्याने मारली तिला , तो बघ आला.. ..!"
पिया अस म्हंणताच हवेतून पुन्हा काहीतरी खाली
झेपावल , पियाच्या बाजुला उभ राहिल.
निळ्याने त्याला पाहताच त्याला आश्चर्यकारक धक्का बसला -
" सोपानsssss?" निळ्या पुटपुटला..
" काय निळ्या भावा कसा आहेस ? तुझी आईटम मेली का ? अं ! हिहिहिहिहिहीही"
सोपानने पियाला टाळी दिली - दोघेही फिफिफीफिफ करत हसू लागले..
" सोपान..! तू असं का केलंस , तू तर तिला वहिनी मानायचा ना ? "
" वहिनी? हिहिहिहि" सोपान खांदे हलवत हसला.
पिया निळ्याकडे एका ओठांत कुत्सिक हास्य करत पाहत होती.
" अरे भिकारचोट साल्या , हिला मी कधीच वहिनी मानली नाही..! उलट हिला हेपाxxची , संधीच शोधत होतो..! कारण तुझ्या सारख्या दलभद-या मांणसाला एवढी भारी माल भेटली..- ते मला कधीच पटल नव्हत ! मी तुझ्यावर नेहमीच जळायचो.. म्हंणूनच म्हंणूनच हिला मारली मी..-
बघ कशी कासवासारखी गप्प बसले बघ.. बघ..हिहिहिही..! "
निळ्याच्या डोळ्यांतून अश्रु वाहत होते..
त्याची जिवाभावाची मांणस हे काय बोलत होती.?
सोपानच्या शब्दांनी निळ्याच्या मनावर खोल घाव बसत होते. तो निराशेच्या आमळाखाली जात होता.
" निळ्या रांxxच्या ! तुझी लायकी तरी होती का रे त्या आवडीशी प्रेम करायची " पिया बोलू लागली., " ती कूठे आणी तू कुठे रे ? तू त्या आवडीला कधी सुखात ठेवू शकला असतास का रे फाटक्या खिशाच्या ? अठाणे कमवायची लायकी आहे का तुझी? "
पियाच बोलण तरी कुठे चुकीच होत.
निळ्या आठवी नापास होता ! हो म्हंणायला त्याचे वडील सरकारी कामगार होते - मोठा भाऊ ऑफिसात कामाला होता - त्याची बायको गृहीणी होती- पन ह्या तिघांनाही त्याच्याशी काहीही घेण देन नव्हत! जर कोणी आपलस असेल तर ती त्याची आई होती , पन काहीवर्षांअगोदर तिच मृत्यू झाल होत . वडीलांनी, भावाने, वहिनीने त्याच्याकडे कधी लक्ष दिलंच नव्हत...तर ते आता देणार होते. शिक्षण कमी असल्याने मोठी नौकरी लागणार नव्हती , मग तो आवडीच पोट कस भरणार होता ? आताची महागाई इतकी वाढलेली आहे की ह्या महागाईच्या जमान्यात तिला चांगले कपडे, दाग - दागीने तिच्या अपेक्षा तो कधी पुर्ण करू शकला असता का?
निळ्या मनातून पार तुटून पडला होता..
खरच त्याने हे सर्व विचार कधी केलेच नव्हते.
आपण अस आठवी नापास , फाटक्या नशीबाचे..
आणी आवडी हुशार , श्रीमंत बापाची मुलगी..
निळ्याच्या मनात न जाणे किती विचार येत होते ..
शेवटी त्याने डोळे मिटले ...मिटळेल्या डोळ्यांच्या कडेतून अश्रुधारा टपकत होत्या.
पिशाच्छ सोपान- पिया दोघांनिही एकमेकांकडे पाहिल.. कुत्सिक हसले - त्यांची खेळी सफल झाली होती !
अंधारातून एक एक करत लालसटवीच्या हातून मेलेली मांणस पिशाच्छ बनली होती..ती आता बाहेर येऊ लागली.
चंमण,सम्या,राख्या,त्यांचे साथीदार ,आणी बिनधडाचे अघोरीबाबा सर्वजण पिशाच्छ बनून हलू हळू निळ्याच्या दिशेने येऊ लागले..
कारण शेवटचा बळी निळ्या होता-
ती सर्व त्याच्यावर तुटुन पडायला आली होती.
त्यांच्या हाडा मांसाची मेजवानी चाखायला आली होती.
अंधारात त्यांच्या काळ्या सावल्या..आणी चांदीचे लुकलुकणारे डोळे भयाण दिसत होते.
निळ्याच्या बंद डोळ्यांआड कालोखी पडद्यांवर
आवडीचा हसरा चेहरा झळकला , काहीवेळा अगोदर - तीची आणी त्याची झालेली ती भेट आठवली..
त्याच जिव धोक्यात आहे हे पाहून ती स्वतहा तिच्या घरच्यांना न कळवता इतक्या रात्री ह्या झपाटलेल्या कब्रस्तानात आली होती!
तिच्या ह्या कृतीने तीच आपल्यावर किती प्रेम होत हे कळून येत होत !
खर प्रेम असणारा जोडीदार कधीच आपल्या जोडीदाराच्या पैश्यावर प्रेम करत नाही - अश्या मांणसांची जिवनात आपल्या साथीदारा करवी सोने- दागीने,पैसा-गाडी,मोठा बंगला अशी कोणतीच कसलीच अपेक्षा नसते.
आणी आवडी? तशीच होती!
तिला आयुष्यात निळ्याची साथ हवी होती.
मोठ घर ,बंगला, सोना- चांदी, गाडी अशी तीची त्याच्याकडून कसलीच अपेक्षा नव्हती.
मग हा सोपान आणि पिया दोघांच्या बोलण्याचा
आपल्याला पश्चात्ताप का व्हावा ? निळ्याच्या मनाफ प्रश्न आला.
हळू- हलु करत ती पिशाच्छवळ त्या सर्वाँनी निळ्याभवती गोळसर वेढ़ा घातला होता. त्या सर्वाँनी चारही बाजुंनी निळ्याला घेरल होत..
आता त्या मौतेच्या घे-यातून सुटका शक्य नव्हती.
निळ्याला कळून चुकल होत , ही सर्व त्यांची चाल आहे ! शब्दांच्या जाळ्यात ही सर्व आपल्याला ओढत आहेत आणि आपण अलगद फसलोही?
त्याने झटकन डोळे उघडले..- समोर पाहिल.
त्याच्या अवतीभवताली चारही बाजुना काळ्या काळसर सावल्या जमा झाल्या होत्या - सर्वाँनी त्याला घेराच घातला होता.
त्यांचे ते लुकलुकणारे रूपयांएवढे चांदीचे डोळे..
निळ्यावर खिळले होते..
निळ्याला ते दृष्य पाहून भीति वाटली,
पोटात प्राणभयाने गोळा आला..- पन तेवढ्यात
काहीतरी आठवल..
त्याने हातात पाहिल..मुठीत तो क्रॉस धरला..
होता.
नक्की ह्या चांदीच्या एवढ्याश्या कोसमध्ये
असं काय होत की ज्याने त्या शक्तिशाली ध्यानास अडवून धरलेल..- जर खरंच दैवी चमत्कार घडत असतील तर पहायला हव !
ती कालिशार पिशाच्छ रक्त मांसाच्या लाळसेने निळ्याच्या खुपच जवळ आली होती.
तोच निळ्याने आपला क्रॉस असलेला हात झटकन वर धरला..-
क्रॉसवर असलेला लालसर मणी तीव्र प्रकाश फ़ेकत चमकला - ती चमक त्या पिशाच्छांच्या डोळ्यात गेली - काही जणांचे लुकलुकते चांदीचे डोळे फुटले...- क्रॉसमधून वाकड्या तिक्ड्या विद्युत लहरी बाहेर पडल्या..- तिथे जमलेल्या सर्वपिशाच्छांच्या अंगावर पडल्या .!
फट फट फटाके फुटल्यासारखा आवाज आला.
फुलभाज्यांसारख्या चांदणीसारख्या ठिंणग्या त्या पिशाच्छां च्या देहातून बाहेर पडू लागल्या..
जो तो विचीत्र आवाजात वेदनादायक चित्कारत ओरडत होता.
हात चेह-यावर आणत फिरवत होता..
निळ्याच्या अवतीभवती जमलेला पिशाच्छ ध्यानांचा गराडा दोन सेकंदात फुटला होता..
निळ्याने जरास आश्चर्यकारक नजरेने हातातल्या क्रॉसकडे पाहिल..- खरच आता घडलेली ही क्रिया किती आश्चर्यकारक,आविश्वसनिय,अतर्कनीय नवळधारी होती.
त्या विश्वास होत नव्हत , की आपण आता काय केलं ?
" निळ्या..!" कानांवर आवाज पडताच निळ्याने समोर पाहिल..
समोर काही पावळ दुर पिशाच्छ रूपात सोपान उभा होता.
त्याचा पिठासारखा चेहरा , ते लुकलुकणारे चांदीचे डोळे आणी सुजलेला जबडा ज्यात धारधार पिशाच्छी दात होते.
" तू ते हातात काय धरलं आहे माझ्या प्रिय मित्रा..! काय आहे ते ? " आवाज लाडीक स्वरातला होता.
:" हे ? " निळ्या क्रॉस दाखवत बोलू लागला .
" अरे तूच ये ना इकडे आणि तुझ्या हाती घेऊन बघ ये. ..!" निळ्या दोन पावळ पूढे सरकला..
" नाही..!" सोपानने घाबरून दोन पावले मागे घेतली.
क्रॉसची शुद्धता - त्या पिशाच्छसाठी घातक होती. त्या क्रॉसला सोपान घाबरत होता.
" काय झालं तूला पहायचं ना?"
निळ्या मुद्दाम म्हंणाला.
" निळ्या तू ते फेकून दे !"
" काय फेकून देऊ ? "
" तेच ते तुझ्या हातात आहे ते !"
" काय? हे क्रॉस का ?"
निळ्याने हातातला क्रॉस दाखवल.
त्याला त्या क्रॉसची खरी शक्ति कळत होती..
की ते पिशाच्छ साध त्या क्रॉसच नाव सुद्धा घ्यायला टरकत होत.
" बर मी हे बाजुला ठेवतो , तू ये ईकडे..! मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे.."
निळ्याने क्रॉस मागे असलेल्या भल्या मोठ्या लोखंडी क्रॉसच्या एका लोखंडावर ठेवला..
सोपानच्या ओठांवर विजयी हसू उमटल..
" ए सोपान ईकडे ये" सोपानने होकारार्थी मान हलवली. सोपान चालत पुढे येऊ लागला..
" ती पिया , कुठे राहिली..!"
निळ्याने विचारल..
" आहे ना ! " जरा थांबून त्याने मोठ्याने हाक दिली.."पिया..?"
त्याने हाक दिली..
बाजुच्याच एका मोठ्या कबरेच्या आडोश्याला
ते ध्यान लपलेल.. ! तीने पिठासारखा पांढ़रा चेहरा बाहेर काढला , लुकलुकत्या चांदीच्या डोळ्यांनी ह्या दोघांकडे पाहिल..
" अंग ए इकडे..निळ्या बोलावतोय ए.."
पिया खुद्दकन हसली चालत त्या दोघांच्या दिशेने आली.
"सोपान मी विचार करतोय!
आता आवडी तर मेली , आणी माझ्याकडे तुम्ही म्हंणताय त्यानुसार ..काही कामधंदा पन नाही , आणी घरच्यांसाठी तर मी मेलेलोच आहे..! तरss "
" तर काय?" सोपान पटकन म्हंणाला.
" तर " निळ्याने अस म्हंणतच नकळत आपला हात सोपानच्या खांद्यावर ठेवला आणि जस हात खांद्यावर ठेवल..त्याच्या हाताला थंडगार बर्फाच्या लादीवर हात ठेवल्यासारख भासल..- हाताचा पंज्या पाच सेकंदच त्याने सोपानच्या खांद्यावर ठेवला होता पन..तेवढ्या वेळेतच हाताच हाड ठणकू लागल..
त्याने चेह-यावर तशी वेदना न दाखवता हळूच हात काढुन घेतला..
" मी अस ठरवलं , की " निळ्या पाठमोरा वळला..
" मला आता जगायचं नाही! मला ही तुमच्यासारख पिशाच्छ व्हायचं आहे."
निळ्याच्या पुढ्यात तो मोठा लोखंडी क्रॉस होता आणि त्या क्रॉसच्या एका लोखंडी फळीवर त्याने तो लहान क्रॉस ठेवलेला तोच त्याने पुन्हा उचल्ला..हळुच आपल्या पेंटच्या खिशात ठेवला..! निळ्याच्या ह्या कृतीची त्या दोघांनाही बिल्कुल भनक लागली नव्हती.
" वा ..वा..निळ्या..वा.!"
सोपान खुश झाला..
निळ्या चेह-यावर खोट हसू आणत पाठमोरा वळला .
" निळ्या, तू चांगली निवड केलीयेस..ये..आम्हाला तुझ्या रक्ताचा एक घोट घेवू दे ये! मग तू लागलीच आमच्यासारखा होशील..ये!"
" नाही !" निळ्या पटकन हंणाला.
" पन तूच तर म्हंणालास ना ? मला पिशाच्छ व्हायचं!" पियाने प्रश्नार्थक संशयी नजरेने त्याच्याकडे पाहिल..
" हो हो मला पिशाच्छ व्हायचंय, पन माझी अशी इच्छा आहे.! की मला लालसटवी म्हंणजेच माताराणीने लुचाव..!.. माझ्या रक्ताचा तीने भोग घ्यावा..आणी मला पिशाच्छ बनवून टाकाव..! "
सोपान -पिया दोघांनी एकमेकांकडे पाहिल..
नजरेनेच त्यांच संभाषण सुरु होत. .
निळ्या ते पाहत होता..!
तोच त्या दोघांनीही त्याच्याकडे पाहिल..आणी दोघेही एकदाच म्हंणाले.
" ठिक आहे..!"
निल्याच्या चेह-यावर हसू पसरल..त्याची युक्ति काम करून गेली होती.. आता फक्त लालसटवीची भेट होताच पुढील कार्य पार पाडायचं होत
xxxxxxxxx
निळ्याच्या डोक्यात एक युक्ति होती !
सोपान -पिया मार्फत लालसटवीजवळ पोहचायच..
तिला आपल्याला लुचाईला सांगायचं - आणी जशी ती आपल्या मानेत तीचे विषारी डंख मारायला येईल , तसं तो क्रॉस तिच्या कपाळावर लावणार होता - तिला कैद करणार होता..
पन कल्पनेत योजलेली ही युक्ति सत्यात
उतरवण जरा जोखमीच काम होत - एक चुकीच पाऊल , मृत्यू चाखायला लावणार होती.
सोपान - पिया पुढे तर निळ्या त्या दोघांच्या मधोमध जरास मागेच चालत होता.
ते दोघेही चर्चच्या उघड्या गेटमधुन आत घुसले होते - आता जिन्याच्या पाय-यांवरून चालत वर निघालेले - जिना मागे सोडून माल्यावर आले.
माल्यावरून चालत जिथे टेबलावर ती चौकलेटी शवपेटी ठेवली होती , ज्यात लालसटवीला कैद केल होत...तिथे आले.
अण्णाच्या हातून फुटलेली ती काचेची बरणी (बाटली ) जशीच्या तशी अद्याप तुकडे होऊन तिथे पडलेलीच होती.
निळ्या त्या फुटलेल्या काचेंजवळ थांबला.
ह्या दोघांकडे पाहिल.. दोघेही त्या शवपेटीसमोर पाठमोरे उभे होते.- हीच संधी साधुन त्याने तुटलेला एक काचेचा तुकडा हाताने ऊचल्ला आणि हळुच पेंटच्या खिशात ठेवला !
काहीच केलं नाही अश्या अविर्भावात चालत त्या दोघांजवळ आला.
" इथूनच तळघर आहे ! ही पेटी फ़ेक तिकडे.!"
सोपान म्हंणाला.
पियाने त्या जाडसर पेटीला अलगद हाताने
एक धक्का दिला तशी ती पेटी टेबलावरून एका साईडला सरकत खाली जमिनीवर पडली..
" आहाहाहाह..आई...आई..आई..!"
पेटीतून विव्हळण्याचा आवाज आला.
निळ्याने सावध होऊन त्या पेटीकडे पाहिल..
धाडकन पेटीच झाकण उघडल - आतून पांध-या फट्ट दुधाळ चामडी चा हात बाहेर , हाताला काळ्या रंगाची धार धार विषारी नख होती.
हातानंतर पुर्णत शरीर बाहेर आल-
निळ्या त्या ध्यानाला पाहून हळुच पुटपुटला .
" पांडू काका..!"
" कोण आलय रे कडमडायला इथ..! झोपू द्या की गरिबाला , हरामखोर मेले.!'
पांडूचा चेहरा पांढराफेक पीठासारखा होता..
डोळ्यांची बुभळे लालसटवीने केव्हाच फोडली होती.
पांडू आंधळा पिशाच्छ झाला होता.
" ए म्हाता -या , रात्री आपण झोपत नाही , विसरला का तू?" पिया खेकसलीच
" रात्र झाली व्हय!"
पांडू आजुबाजुला पाहत होता..- त्याची हालचाल- ते भाव आंधळ्या मांणसासारखे होते.
" च्यायला पिया काय तू पन ? ह्या आंधळ्या म्हाता-याला काय समजतं की रात्र आहे की दिवस आहे..!" सोपान म्हंणाला. पिया जराशी कुत्सिक हसली.
पांडू चालत जिन्याच्या दिशेने निघुन गेला.
निळ्या त्याला जाताना पाहत होता.
सोपानने समोर असलेला चौकोनी
वीस किलोचा टेबल एका हाताने उचल्ला- अलगद बाजुला फ़ेकला..
टेबल जमिनीवर पडताच धाड आवाज झाला..!
निळ्याने दचकून समोर पाहिल..
अवाढव्य टेबल सोपानने अलगद
उचलून बाजुला भिरकावल होत.
ह्या दोन्ही कृत्यांनी निळ्याला ह्या दोघांची शक्ति कळून येत होती.
टेबल भिरकावताच , तिघांनी खाली पाहिल..
खाली एक लालसर जाडीशार सतरंगी अंथरली होती.
पियाने ती हातात उचल्ली आणि बाजुला फ़ेकली, खाली एक चौकोनी आकाराचा दरवाजा होता.
" हा दरवाजा ?" निळ्याने न समजून विचारलं..
" खाली तळघर आहे ना ! "
सोपानने अस म्हंणतच - दरवाजा बाहेरच्या बाजुने उचल्ला..!
खाली एक चौकोनी आकाराच एक माणुस आत जाईल असा काळोखी भगदाड होता -
" जाम काळोख आहे राव !"
निळ्या म्हंणाला.
त्याने खिशातून आगपेटी काढली..
तीची एक काडी पेटवली..
' खस्स' आवाज होत सलफर पेटल..
अंधार बाजुला सारला जात तांबड्या रंगाचा प्रकाश पडला.
उजेडाने आतल दिसू लागल..
एक चौकोनी भगदाड होत - खाली जायला पाषाणी नागमोडी वळणाच्या पाय -या होत्या..पुढेपुढे जात अंधारात नाहिश्या होत होत्या..-
ज्याने कळून येत नव्हत की नक्की किती लांब आहेत आणि किती संख्यांच्या पाय-या आहेत.
" चला , जाऊयात.!" निळ्या म्हंणाला.
" फारच घाई झालेली दिसतीये , हां?"
पिया म्हंणाली.
" हो मग , मला सुद्धा पिशाच्छ व्हायचं तुमच्या सारख !" निळ्याने जणू हा उत्तर आधीच तोंडपाठ करून ठेवलेल..- तसा तो पटकण जो म्हंणाला होता.
आणी त्या दोघांनाही मूर्ख बनवण्यासाठी एवढ पूरेस होत.
" चला पुजा सुरु व्हायच्या अगोदर पोह्चायला हव... !"
सोपान त्या भगदाडातून आत घुसला पाय-यांवरून चालतपुढे जाऊ लागला.. त्याच्या मागे पिया निघाली.
"सोपान पुजा म्हंणजे , कसली पुजा रे?
निळ्याने विचारल.
" पुजा म्हंणजे - जिथे सर्व पिशाच्छ जमली असतील , आणी त्या सर्वाँपुढे एक जाडजुड मेजवाणी ठेवलेली असेल - जिला मातारानी नंतर आम्ही सर्व चाखू..!
" अंस काय !" निळ्या हळुच म्हंणाला.
अवतीभवती गडद अंधार होता.
नागमोडी वळणांच्या पाय -यांच्या जरा बाजुला पाहता
खाली गर्द खाई असल्यासारखी भासत होती..जर एक पाय जरी चुकून सटकला तर थेट खाली पडून , जिव जाऊ शकत होता!
परंतू सोपान - पिया दोघेही त्या नागमोडी वळणांच्या पाय-यांवरून बिनधास्त चालत निघाले होते.
जणू त्यांना अंधारात सुद्धा उजेड असल्यासारख दिसत होत.
हातातील काडीपेटी संपली की निळ्याच्या काळजात धस्स व्हायचं- तलघराच्या पाय-यांवरून
तोळ जात आहे अस वाटायचं , मग तो जागीच थांबून पुन्हा काडी ओढ़ायचा आणि त्या तांबडसर प्रकाशात वाट पाहत चालायचा.
पाच मिनिटे चालून झाल्यावर शेवटी- आंतिम पायरी आली- आणि हे तिघेही जमिनीवर उतरले..!
पन हे काय?
खाली जमिन होती कुठे? हे तर काळशार पाणी होत..
खालचे पाय एक फुटांपर्य्ंत पाण्यातत बुडत होते. कोठूनतरी पाण्याचा खळखळ आवाज येत होता .
निळ्याने खाली पाहिल - तेवढ्यात हातातली काडी पेटी विझली अंधार झाला.
' खससस ' आवाज करत त्याने काडी पेटी पेटवली.
तांबडसर उजेडात त्याने पाण्यात पाहिल-
त्या काळशार पाण्यात त्याला स्वत:च काडीपेटी हातात पकडलेल प्रतिबिंब दिसल.
" सोपान हे पाणी ईथे..?"
" इथून एक शारदा नावाची नदी आहे बघ - , तिला जाऊन हे पाणी मिळत !"
सोपान म्हंणाला. निळ्याने होकारार्थी मान हलवली.
दोन- मिनीटे ते तिघे पाण्यातूनच चालत होते.
अवतीभवती गडद अंधार होता तसाच होता.
पाणी संपल होत- आता खाली भुईसपाट जामिन होती.
हळुहळु गारठा वाढु लागला होता..
निळ्याच्या अंगाला थंडी वाजु लागली..
ही थंडी फार भयंकर होती, कधीच न अनुभवलेली रहस्यमय थंडी होती.
" जाम थंड आहे रे ईथे?"
निळ्याने दोन्ही हातांनी तळवे चोळ्ले.
"असायलाच हवी, कारण आपन पिशाच्छ आहोत..आपल देह गरम वातावरणात जास्त काळ टिकाव धरू शकत नाही! म्हंणूनच आपण जिथे जातो तिथे अनैसर्गिक गारठा आपल्या सोबत असतो..! आणी आता हा जाणवणारा, गारठा!" सोपानने इतकावेळ मागे वळून पाहिल नव्हत तो मागे वळला..
अंधारात त्याचे चांदीचे डोळे लुकलुकले..
तो पुढे म्हंणाला.
" ह्याचा अर्थ असा होतो की , आपण सभामंडपाजवळ पोहचलो आहोत ." सोपान एवढ़ बोलून पुन्हा पुढे वळला.
निळ्याने आजुबाजुला पाहिल.. खाली भुईसपाट जमिन ,आणि डाव्या उजव्या बाजुला पाषाणी काळ्या रंगाच्या जाडजुड भिंती होत्या.
भिंतीवर काडीपेटीचा तांबडसर प्रकाश आणि निळ्याची एकट्याची सावली पडली होती-
उर्वरीत ह्या दोघांची सावलीमात्र दिसत नव्हती..
पिशाच्छांची सावली नसते ना?..
पाच - सहा मिनिटे चालून झाल्यावर समोर एक पाचफुट उंचीची पाषाणाची चौकट दिसू लागली ,
आणी त्या चौकटीतून लालसर प्रकाश किरणे बाहेर येत होती.
हाड गोठवणारा गारठा जाणवत होता .
गारठ्याने अंग शहारत होत.
समोर दिसणा -या चौकटीतून प्रथम सोपान- मग पिया- आणी शेवटला निळ्या आत घुसला .-
आत घुसताच निळ्याने समोर चारही दिशेना नजर फिरवली.
लांबीने साठ फुट - आणी रुंदीने चाळीस फुट - व उंचीने पंधराफुट अस ते तळघर होत .
चारही बाजुंना मोठ मोठे दंडगोल आकाराचे पाषानी स्तंभ होते.
प्रत्येक स्तंभावर एक एक लाल रंगाची मशाल पेटत होती.- त्या मशालींचा लाल भेसुर रक्ताळलेला प्रकाश चारही दिशेंना तलघरात पडला होता.
त्याच लाळेलाल रक्तळलेल्या प्रकाशात ते आकार गर्दी करून उभे होते.
निळ्याने उजव्या हाताला नजर फिरवली-
समोर वीस- तीस मांणस,बायका मिस्रित लोकांची गर्दी जमली होती.- पन ते सर्व लोक कुठे होते? सर्वच्या सर्व मेलेली प्रेत - पिशाच्छ बनुन उभी होती.
आणी त्या सर्वाँपुढे सावकार उभा होता - अंगावर एक पायघोळ लाल रंगाचा झगा घातला होता.
त्याला एक लाल रंगाची ताठ कॉलर जोडलेली होती.
" माते, प्रिय माते..!" सोपान सर्वात पुढे जाऊन कमरेत लवत म्हंटला.
" बोल प्रिय !" सावकाराच्या तोंडून स्त्रीचा आवाज बाहेर पडला.
अस म्हंणतच सोपानने सावकाराशी कुजबूज करण्यास सुरुवात केली.
निळ्या जरा दूर उभा होता - त्या दोघांच्यात सुरु असलेली चर्चा त्याला काही ऐकू येत, समजत, नव्हती.
पन हावभाव पाहता , एवढ समजून येत होत - की हे दोघे आपल्याच विषयी बोलत आहेत.
कारन सावकाराने त्याच्या त्या हिरव्याजर्द नजरेने तीन चार वेळेस त्याच्याकडे वळुन पाहिल होत...आणी हास्य केल होत.
सोपान पुन्हा कमरेत लवला- चालत निळ्या जवल आला.
" माताराणी, तुला लुचाईला तैयार झाल्या आहेत. तू खुप भाग्यवान आहेस निळ्या..की माताराणी तुला लुचणार आहेत..!" सोपान म्हंणाला.
निळ्याने खोट हसू चेह-यावर आणल..
" चल..! " सोपान पुढे चालू लागला..
निल्याही त्याच्या मागोमाग जाऊ लागला..
समोर पिशाच्छांची गर्दी जमा होती.
लालसटवी मार्फत मरण पावळेली ती मांणस सर्व पिशाच्छ होऊन उभी होती.
सर्वजन निल्याकडे पाहत होती.
त्यांची ती चांदीच्या चकाकत्या डोळ्यांची थंडगार नजर निळ्याच काळीज चिरत आत घुसत होती .
आता पुढील क्रिया - त्यालाच करायची होती-
आणी आपण जर फसलो तर ह्या सर्वाँच्यात आपला ही नंबर लागणार होता ,हे त्याला ठावूक होत! जे काही करायचं होत ते जाणिवपूर्वक- काळजीपूर्वक)) विचार करूनच करायचं होत.
एक छोठीशी चुकी जिवाशी खेळ खेळून जाणार होती..- जिवावर बेतणार होती.
निळ्या त्या सर्वाँसमोर उभा होता.
तो एकटाच त्या पिशाच्छांच्या थव्यात उभा होता..
त्याच्या रक्ताचा गरम चवीष्ट वास, सर्वाँच्या आत लपलेला पिशाच्छ उत्तेजित करत होता..सर्वजण वखवखलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते..
जर लालसटवी ईथे नसती तर कधीचंच केव्हाचंच ह्या सर्वाँनी निळ्याचा लचका तोडला असता. हाड नी हाड फोडुन खाल्ली असती.
मांस मिटक्या मारून खाल्ल असत.
पन माताराणी लालसटवी तीचा ह्या सर्वाँवर धाक होता..- आधी ती चाखणार आणी मग हे पाळीव कुत्रे तिच उष्ट खाणार..होते!
" आम्ही तुझ्या विचारांनी खुप खुष झालो आहोत मुला!" सावकाराच्या तोंडून लालसटवी म्हंणाली.
"आमच्या प्रिय वत्साने (सोपान) आम्हाला सर्व इत्यंभूत माहीती दिली आहे - की कस तू त्या क्रॉसला.. बाजुला फेकून दिलस - आणी आमच्या चमुत येण्याच ठरवलंस !"
निळ्याने सोपानकडे पाहिल..सोपानने जरा मीठ मसाला लावून लालसटवीला माहिती दिली होती.
निळ्या दात दाखवत त्याच्याकडे पाहून हसला.
" तुझ्या विचारांवर आम्ही खुप खुश झालो आहोत- आणी म्हंणूनच आम्ही असं ठरवलं की -
तुला आम्ही स्वत:हा मानवी कैदेतून मुक्त करून..तुला आमच्यात सामील करून घ्यायचं ."
' कड , कड ,कड,' आवाज झाला..
निळ्याच्या छातीतच धस्स झाल..
सर्वाँनी अचानक टाळ्या ज्या वाजवल्या..होत्या.
मनातल्या मनात त्याने सर्वाँना शिव्या घातल्या..
" चला तैयारीला लागा .!"
लालसटवी उर्फ सावकराने निळ्याकडे हसून पाहिल.
आणी हलकेच डोळा मारला..-
निळ्या कसतरीच हसला..- त्याला किळसच आली.
निळ्याच्या समोर एक साडे सहा फुट उंचीचा माणुस आला..- त्याला पाहून निळ्या जरा घाबरलाच.
" घाबरू नको तुझ माप घेतोय !"
लालसटवी ..
निळ्याने होकारार्थी मान हलवली.
त्या मांणसाने एक सफेद दोरी बाहेर काढली..तीच्या मार्फत निल्याच माप घेतल..आणी निघुन गेला.
काहीवेळाने तो परत आला - तेव्हा एक लालचंदनाच सात फुट लांबीच जाडजुड लाकूड त्याने अलगद खांद्यावर उचलून आणल होत..
मग जरा थोड्यावेळाने तोच लाकूड एकफुट जमिनीत गाडून सरळ उभा केला.
" हा लाकुड..!"
" तुला ह्या लाकडाला बांधतील..! आणि मग मी तुला लुचेल आणि मग माझी ही सर्व पोर ,बाळ सुद्धा.! तू हालचाल करायला नकोस म्हंणूनच तर तुला बांधल जाई" निळ्याने गंभीर होत मान हळवली.
" बांधा ह्याला..!" लालसटवी उर्फ सावकार निळ्याकडे पाहून हसली.
दोन जणांनी एक मळलेली दोरी आणली.
निळ्या पाठमोरा वळळा..वळताच त्याने पुढच्या खिशात हात घातला..- तो काचेचा तुकडा खरच त्याने उचलून घेतल ते बरच केल होत..
तो तुकडा त्याने पुढच्या खिशातून काढुन हातात घेतला..- लालसर मशालिंच्या मंद प्रकाशात दोरी कापतांना कोणालाही दिसणार नव्हत! - ह्याच त्याला फायदा झाला होता होत होता.
तो पाठमोरा वळला - काचेचा तुकडा मुठीत गच्च धरला होता.
त्याने पाठ लाकडाला टेकवली- तसे दोन जणांनी त्याला लाकडाला बांधायला सुरुवात केली.
सर्व बाजुंनी त्याला दोरीने बांधून ठेवल..
निळ्याच्या दोन्ही बाजुंना पिशाच्छ उभे होते.
समोर सावकाराच्या देहात उभी लालसटवी उभी होती.
" करूयात सुरुवात !"
" नाही..थांबा.!"
निळ्या पटकन म्हंणाला.
"का कायझाल ? " लालसटवीने विचारल.
" मला तुमच्याकडून लुचून घ्यायचं आहे..! "
" हो मग मीच लुचणार आहे तुला!"
" नाही..नाही.." निळ्या जरासा हसला.
" हे तुम्ही नाही आहात माताराणी..- हा सावकाराच देह आहे! आणी मला तुमच्याकडून..तुमच्या ख-या रुपातून लुचवून घ्यायचं ..अशी माझी इच्छा आहे माझ्या प्रिय माताराणी.. !" निळ्या नम्रपणे म्हंणाला..
त्याच्या त्या वाक्यावर लालसटवीच्या कपाळावर आठ्या उमटल्या - ती जराशी प्रश्नार्थक , संशयित नजरेने निळ्याकडे पाहू लागली.
" माताराणी, ही माझी शेवटची इच्छा आहे असंच समजा हव तर , आणी जर तुम्हाला वाटत असेल की ह्या माझी काही हुशारी असेल- तर तुम्ही सोपान कडून ऐकलंच असेल , की मी क्रॉस बाहेरच ठेवून आलो आहे , आणी काही हातचालाखी करायला माझे हात तर बांधलेले आहेत..! "
निळ्या म्हंणाला.
लालरंगाचा पायघोळ झगा घातलेला सावकार
मान जराशी वर करून - निळ्याकडे पाहत होता.
मशालींचा रक्ताळलेला लालसर भेसुर प्रकाश त्याच्या पांढुरक्या चेह -यावर पडला होता.
चेह-यावर थंड भाव होते - भुवया जरा वर केल्या होत्या.
निळ्या मंद स्मित हास्य करत त्या हिरवेजर्द नजरेला नजर भिडवत होता.
मनात भीति वाटत होती- पन ते चेह-यावर दाखवत नव्हता..- दाखवल तर मृत्यु फिक्स होत.
निळ्या उत्तराची अपेक्षा करत होता - तोच लालसटवीचा आवाज आला.
" ठीके ..! तैयार आहे मी !"
निळ्याच्या चेह-यावर विजयी भाव पसरले.
हातात असलेली काच ,झटकन त्या काचेच टोक त्याने दोरीवर ठेवल..-आणि हळुच फिरवायला सुरुवात केली.
xxxxxxxxx
क्रमशः