सावकार आणी त्याचे गावगुंड बाल्याच्या फसवी आवाजाच्या दिशेने निघाले होते.
स्ट्रेचरवर म्हातारीच झोपलेल प्रेत चौघांनी कापसाच्या पोत्यासारख उचलून धरल होत..आणी सावकाराच्या मागून आरामात चालत होते.
" ए फोन लाव त्या रांxच्याला ! दहा मिंट झाली चालतोय आपण ..! आवाज देऊन कुठ झक मारत बसलाय.. कुणास ठावूक? !" सावकार त्रासिक स्वरात म्हंणाला. त्या आवाजात जरासा राग सुद्धा होता.
" जी- जी " त्या गुंडाने खिशात हात घातला..की-बोर्डच फोन बाहेर काढल.
परंतु हे काय? पिवळ्या स्क्रीनवर सिमला रेंज का नव्हती?
एक एक करत सर्वाँनी फोन बाहेर काढुन रेंज तपासली - पन सर्वाँच्या फोनची रेंज कट झाली होती.
सावकार आजुबाजुला नजर फिरवत होता.
शक्यता होती की बाल्या नजरेला दिसेल !
परंतू बाल्या तर इथे नव्हताच ना?
मग तो ईथे कब्रस्तानात कस काय येऊ शकतो?
सावकारासोबतच त्याचे गुंडही आजुबाजुला नजरा फिरवत बाल्या कुठे दिसतो का ते पाहत होते.
पन त्या अभद्र स्थळी - पांढ-या धुक्या व्यतिरीक्त आणखी काही दिसेल तर ना ? जिथे नजर जात होती.. त्या जागेवरच धुक गायब होताच समोर ती
मृत आत्म्याची कबर उभी राहत होती.
मोठ मोठ्या उंच दैत्यसारख्या कबरी छातीत धडकी भरवत होत्या.
वातावरणातली थंडगार हवा जशी कानांतून आत घुसत होती तसा देहातली आत्मा ठणकत होती.
थंडीने हातापायांना वळ मारत होते.
सावकाराची भिरभिरणारी शोधक नजर शेवटी एका जागेवर थांबली.
" बाल्या !" सावकार हळुच पुटपुटला..
ह्या सर्वाँपासून पूढे वीस पावळांवर पाठमोरा बाल्या उभा होता. न्क्की तोच होता का ?
अंगयष्टीने वाळलेल्या शेंगेसारखा, उंची जेमतेम साडे चार फुट - आणी अंगात एक फुल बाह्यांचा सफेद रंगाचा फुल बाह्यांचा कुर्ता घातलेला - आणी खाली सफेद पायजमा .
अंतयात्रेतली लोक जसे कपडे घालतात हुबेहूब तसेच कपडे.
त्याच्या दोन्ही पांढुरक्या पायांच्यात चपला नव्हत्या..म्हंणूनच पायांची धारधार चार इंच लांब वाढलेली काळीशार नख दिसत होती. त्यांची वळवलती हालचाल होत होती.
" ए बाल्या .. रांxxच्या !"
सावकाराने जागेवर उभ राहूनच एक शिवी हासडली.
बाल्याच्या चेह-याचा रंग - जणू थंडगार पांढरट बर्फ चिकटला होता. चेह-यावरची त्वचा मुका मार लागल्यासारखी काळी निळी पडली होती..
अस वाटत होत मोर्ग मधल मेलेल प्रेत डोळे उघडून जागेवर उभ राहिल आहे.
त्याचे ते पांढरे दुधाळ बुभळ आणि त्यात काळा मिरिचा ठिपका ..- असे ते डोळे आपल्या सर्वाँकडे
पाहत होते..
मध्येच बाल्याच्या अवतीभवती पांढरट धुक्याची झुलुक येत होती.. त्याला पुर्णत आपल्यात सामावून घेत होती. पाच - सहा सेकंदासाठी तो त्या धुक्यात अदृश्यच होत होता.
सावकाराने त्याला हाक दिली परंतु त्याने मागे वळून पाहिल नव्हत. तो एकटक पुतळ्यासारखाच जागेवरच उभा होता.
.. " अरे ए !" सावकाराने आपल्या गुंडाणा हाक मारली.
" जी सावकार !" तोच तो टकलु पुढे आला.
सावकाराचा तो प्रिय असावा, कारण नेहमीचंच पुढे तो पुढे जो करत होता.
" अरे चंमण ! तो बाल्या तिथ उभ हाई आहे बघ , मी आवाज देतोय तर ओ देत नाहीये..! बहिरा झालाय का हरामखोर..?" सावकाराने दात ओठ चावले.
त्या टकलू गुंडाच डोक्यावर भुईसपाट मैदान पाहूनच सावकाराने चंमन नाव ठेवल असाव..
" सावकार तुम्ही चिढू नका ! रात्री ढोसायची सवय आहे त्याला , मी बघतो ना, थांबा हं !"
चंमनने समोर पाहिल..बाल्याच्या रुपात
आलेल ते ध्यान अद्याप पाठमोरच उभ होत.
चंमनने बाल्याच्या दिशेने पाऊले वाढ़वली..
इकडे बाल्याच्या रुपात आलेल ते ध्यान , त्या मानवाला आपल्या दिशेने येताना पाहून दात विचकत हसल..त्याचे डोळे आसुरी चमकेने चकाकले...
हळू हळू तो पावल वाढवत बाल्याजवळ येत होता.
बाल्याच रुप घेऊन आलेल ते ध्यान ह्याच संधीची वाट पाहत होत..
सावज आणखीनच जवळ येण्याची वाट पाहत होत.
मग जवळ आल्यावर ते पाठमोर वळून आपल ते अभद्र हिडिस रुप दाखवणार होत..त्याची मानगुट पकडून मांसाच फडशा पाडणार होत .. रक्ताची चटक भागवूम ..हाड दातांनी चावून चावून फोडुन फोडुन खाणार होत.
घाबरलेल - भ्यायलेल सावज म्हंणजे अमृतच ..
त्याच मांस खायला खुपच चविष्ट लागत .
म्हंणूनच या अश्या शक्ति सावजाला घाबरवून- भीती दाखवून मारतात.
चंमन बाल्यापाशी पोहचला होता.
त्याने बाल्याच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी आपला हात वाढवला..
" हेय राम बाल्या.. इतक्या रातच्याला ढोसायची काही गरज होती का?"
नकळत का असेना चंमनच्या मुखातून निघालेल्या एका शब्दाने काहीतरी विलक्षण,अघाती,चमत्कारीक घडल. !
राम , देवाच नाव नाही का? ! त्या एका श्ब्दाने बाल्याच फसव रुप घेऊन उभ राहिलेल ते ध्यान घाबरल, त्याच्या चेह-यावर भयप्रद, आश्चर्य,भीति,नवल,सर्वाँचा अनपेक्षित बार फुटला गेला होता . भीतिने त्याच्या भुवया उडवल्या गेल्या . तोंड जरास वासल गेल.
मागून त्या टकलू गुंडाचा हात पुढे पुढे येत होता.
त्या हाताची आता त्या आत्म्याला भीती वाटू लागली होती.
पन का ? हा तुमच्या मनात प्रश्ण येणे साहजिकच आहे..!
सांगायचं तर ह्या पृथ्वीतळावरचे सर्व जीव त्या परमार्थासाठी सारखेच आहेत . तो विधाता मत भेद मांडणा-यांमधला मुळीच नाही. ही मतभेदाची पोकळी तर मानवाने निर्माण केलीये , त्या विधात्याने नाही.
चंमनच्या मनात कधीतरी लहानपणी, देवाविषयी अपार श्रद्धा असावी - ज्याने देवाच नाव घेताच चंमनच्या सर्व देहभोवताली एक सुरक्षा कवच निर्माण झाल होत.
ते कवच अदृश्य असल्याने त्या सामान्य मानवी जिवांच्या नजरेला दिसण अशक्य कोटीतली गोष्ट होती.
पन त्या ध्यानाला ते तेज ती दैवी शक्ति दिसत होती.
त्याचा तो पूढे पुढे येणारा हात चंदेरी रंगाने लक्खपणे चकाकून उठला होता.
त्या हाताचा स्पर्श त्या आत्म्याला होताच त्याचा नाश पावणार होता- हे विधीलिखीत होत.
आणि पुढच्याक्षणाला जी क्रिया तिथे घडली तिथे उप्स्थित सर्वाँच्या अंगावर भीतिचे ठणकधारी ढोस बसले.
फक्त चार सेकंदासाठी तिथे पांढ-या गडद धुक्याचा पडदा दिसला..आणी पुढच्या चार सेकंदात ते धुक गायब झाल. आणी समोर पाहताच जे दिसल , अविश्वस्निय होत. समोरची जागा रिकामी होती.
या एवढ्याश्या वेळेत बाल्याला पळायला तरी मिळाल असत का ? मग तो गेला तर गेला कुठे?
की ती धुक्याची झुळुक आपल्यासमवेत त्यालाही
सोबत घेऊन गेली होती?
काय घडल ईथे? डोळ्यांनी पाहिलेल नेहमी सत्य असतं! पन हे ? डोळ्यांसमोर दिसणारा माणुस एक धुक्याची झुळुक येते आणि ते धुक गेल्यावर तो माणुसही धुक्यासमवेत गायब होतो ? कस विश्वास ठेवायचं? तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या छातीत भीतिचा एक विषारी कण शिरला होता. समोर घडलेल ते दृष्य त्यावर कोणी काहीच बोलत नव्हत ! जो तो शॉक झाला होता.
चंमनने जरासा धीर टेकवत आवंढ़ा गिळला. चार पावल चालून तो पुढे आला.. आणि समोर पाहतो तर काय? खाली एक साडे पाच फुट उंचीचा खड्डा खणलेला होता. पन नकळत अजुन एक पाऊल पुढे पडल असत , तर काय झाल असत्ं? नक्कीच तो त्या खड्ड्यात पडला असता ! हात-पाय, एन थंडीत मूरगाळले असते... मुका मार लागला असता .
वर उभ राहूनच त्याने खाली खड्डयात पाहिल..
जमिनीच्या गर्भातली तपकिरी मूरूमाची माती , आत प्रकाश नसल्याने कालसर- काळी दिसत होती.
जणू कालोखाचा रंग दिला होता. त्या अंधा-या खड्डयात , घोण, साप,विंचू असे कितीतरी विषारी
जनावर असतील जी डोळ्यांना दिसणार नव्हती.
" स..स..सावकार..!"चंमनने काफ-या स्वरात हाक दिली.
" काय ..?" सावकार जरा भीतच म्हंणाला.
काही वेळा अगोदर घडलेल्या घटनेचे पाष ताजे होते ना? डोळ्यांसमोरून तो दृष्य जाता जात नव्हता.
" ई..ईथ खड्डा आहे...!" त्या टकलू गुंडाचा काफरा आवाज आला .
अघोरीबाबाने त्याला देशीची दारू चप्टी पाजली होती..
दारूची नशा चढ़ायला किती वेळ लागनार होता.?
नशेने बाल्याची भीति जरा कमी झाली होती.
बाल्या जरासा झिंगत भुईवर बसला होता.
आणी अघोरी बाबा त्यांच्या लालभडक डोळ्यांनी
त्याच्याकडेच पाहत होते.
त्यांच्या हातात पेटता गांज्याचा बार होता...
त्याची नशा त्यांच्या डोळ्यात दिसून येतच होती.
" बाबा.. !" बाल्या हलु आवाजात बोलत होता.
अघोरीबाबांनी फक्त होकारार्थी मान हलवली , काही बोलले नाहीत.
" सांगतो ...सांगतो..! " बाल्याने जरासा दम खाल्ला...मग नाकावाटे एक मोठा श्वास आत ओढुन तो तोंडातून सोडत बोलायला सुरुवात केली.
" सात वाजता सावकाराची आई वारली , संमधा गाव वाड्यात जमलेला ,मईत इथंच जाळायला आणणार होतो..! पन तुम्ही बहि-या गज्याकडे निरोप पाठीवला.. की मईत जाळायचा नाही , तर गाडाव लागणार आहे.."
" व्हो..व्हो..- मीच पाठवला होता निरोप ,आणी त्याला हे बी सांगितल व्हत की मईत ह्या मसणात गाडायलाच पाठवा....! पन अजुन मईताची पालखी आली नाय ...! "
" काय? " बाल्याला जरासा धक्काच बसला.
पन त्याच्या ह्या वाक्यावर बाबांना सुद्धा एक धक्काच बसला होता.
" सत्यानाशा झाला बाबा !" बाल्याने कपाळावर हात मारल..तोंड रडकूंडीला आल होत.
" ए बाल्या ,आता जास्त गुढ वाढवू नको लगा..! तूझ अस वागन बघून त्या बहि-यान काय तरी घोळ घालून ठेवला अस वाटू राहिलं मला..!"
" बाबा ..घोळ नाय ..! जाम मोठा घोळ झालाय ,अहो त्या बहि-या गज्याने आम्हाला येवढच सांगितलं की मईत कब्रस्तानात गाडायचं- पन ते इथ मसणात गाड़ायचं आहे अस काय बी सांगितल नाय ! आण म्हंणून आम्ही पिरित - मय्यत त्या कबरस्तानात गादायचं ठरवलं!"
बाल्याच्या वाक्यावर.. क्षणार्धात बाबांच्या चेह-यावर भीतिचा बार फुटला.. डोळे मोठे झाले- कानसुळे तापली, तोंड वासल गेल.
" बाल्या..! तू...तू...तुम्ही त्या कब्रस्ताना बद्दल तर बोलत नाही ना ..? " अघोरीबाबांची भीतिने वाचा बसली, होती.. ! बाल्याला त्यांची ती भीति पाहून तोंडातून शब्द बाहेर पडेनासे झाले..जीभ टाळ्याला चिकटली होती.
मग जरा काही वेळाने बाल्या पोपटासारखा बोलू लागला.
" शुश्श्शशश्श ..!" बाल्या पुढे बोलणार तोच बाबांनी तोंडावर हात ठेवून त्याला शुश्कारत गप्प रहायला सांगितल.
नशेने लाल झालेले त्यांचे डोळे भयान भासत होते.
झोपडीत गांज्याचा धुर पसरला होता..ह्या दोघांच्या अवतीभवती मंदगतीने फिरत होता.
" नाव नको घेऊ, अमुश्या हाई आज! मसणात बसलाय तू , विसरू नकोस ! ह्यो इलाका माझा असला
तरी त्यांचा बी आहे..! तू इथ बोलशील.. पन त्यांना कोणीतरी इथून - तू बोललेल तिथ जाऊन सांगल"
बाबांनी दाराच्या उघड्या चौकटीतून बाल्याला बाहेर पाहण्याचा इशारा केला.
उघड्या चौकटीबाजुला काळोखात कोणीतरी हात - पाय पोटात घेऊन बसल होत. अंगावर काली घोंगडी पांघरली होती , की त्याच पुर्णत रूपच कालसर होत !. ते कालशार रंगाच उपद्रव तिथे झोपडी बाहेर बसून ह्या दोघांच बोलण ऐकत होत.
" बाल्या तुझ्या माग आलंय ते ध्यान , समजलं का ? नाव घेतल तर आत येऊन तुला फरफटत घेऊन जाईल- म्हंणून नाव नको घेऊ..! " बाबांच्या वाक्यावर बाल्याने गप्प बसून मान हळवली.
" नाव नको घेऊ, अमुश्या हाई आज! मसणात बसलाय तू , विसरू नकोस ! ह्यो इलाका माझा असला
तरी त्यांचा बी आहे..! तू इथ बोलशील.. पन त्यांना कोणीतरी इथून - तू बोललेल तिथ जाऊन सांगल"
बाबांनी दाराच्या उघड्या चौकटीतून बाल्याला बाहेर पाहण्याचा इशारा केला.
बाल्याने थरथरत्या नजरेने झोपडीच्या उघड्या चौकटीतून समोर पाहिल -
उघड्या चौकटीबाजुला काळोखात कोणीतरी हात - पाय पोटात घेऊन बसल होता. अंगावर काली घोंगडी पांघरली होती , की त्याच पुर्णत रूपच कालसर होत !. ते कालशार रंगाच उपद्रव तिथे झोपडी बाहेर बसून ह्या दोघांच बोलण ऐकत होत.
बाल्याची भीतिने तणतणली होती.. घशात काटा अडकला होता - दात वाजत होते.
बाहेर दरवाज्याभोवती त्याचा काळ येऊन बसला होता.
" बाल्या तुझ्या माग आलंय ते ध्यान , समजलं का ? नाव घेतल तर आत येऊन तुला फरफटत घेऊन जाईल- म्हंणून नाव नको घेऊ..! " बाबांच्या वाक्यावर बाल्याने गप्प बसून मान हळवली.
जर त्याने त्या जागेच नाव घेतल असत , तर त्या ध्यानाला वेळीच आयत आमंत्रण मिळाल असत ,मग त्या ध्यानाला बाल्याच देह त्या झोपडीतून बाहेर फरफटत नेहायला दोन सेक्ंदही लागले नसते.. !
मग जरा काहीवेळाने अघोरीबाबा पुन्हा म्हंणाले.
" माझीच गलती झाली , म्या त्या बहि-या गज्याला निरोप द्यायलाच नको होत. खैर त्या बिचा-याची बी काय गलती म्हंणा , ऐकू कमी येत त्याला..! निसर्गाची खेळी सारी.."
अघोरीबाबांनी एक मोठा उसासा सोडला व पुढे म्हंणाले.
" असो ! नियतीच्या मनात काय कपट हाई आपण थोडी ओळखू शकतो.!आता जे झाल ते झाल निस्तराव तर लागलच .! " अघोरीबाबा आपल्या जागेवरून ऊठले.
उठताच अंगाला फासलेली प्रेतांची राख जराशी खाली पडली.
" चल बाल्या !"
" मी ..!" बाल्या जरा भीतच पटकन म्हंणाला.
त्याने उघड्या चौकटीत पाहिल ते कालसर म्हाता-या देहाच ध्यान अद्याप अंगाच मुटकूल करून तस्ंच बसल होत.
" व्होय तूच..! त्या पीडेचा अंत झाल्याशिवाय
तुझी बी सुटका नाय ! " अघोरीबाबांनी बाल्याची नजर बाहेर त्या कालसर उपद्रवावर खिळली आहे अस पाहिल..त्यांना कळून चुकल होत.
बाल्या त्या ध्यानाला घाबरत आहे.
पन बाबांना ठावूक होत - ते ध्यान झोपडी त बिना परवानगीने प्रवेश करू शकणार नाही.
" ए बाल्या ..!" अघोरी बाबांनी जड स्वरात म्हंणाले.त्यांचा आवाज ऐकून बाल्या जरासा दचकलाच.
" क...क .काय..!"
" अरे ए भित्र्या ! घाबरू नकोस, म्या आहेना ! "
अघोरीबाबांनी जराशी हालचाल केली. ते झोपडीच्या एका कोप-यात गेले,भुवईवर एक मातीच गोलसर भांड होत- भांड्यावर मातीची जाड थाळी होती.
तीच त्यांनी उचल्ली- मातीचा भांडा पांढरट राखेने भरला होता.
अघोरीबाबांनी त्या भांड्यात हात घातल..
मुठभर राख हातात घेतली.
पुन्हा चालत बाल्या जवळ आले.
. " चौकटीपासून माग व्हो !" अघोरीबाबा म्हंणाले.
तसा बाल्या चौकटीपासून चार हात लांब जाऊन उभा राहिला.
बाबांनी एकवेळ उजव्या हाताच्या मूठीकडे पाहिल..ज्या हातात पांढरट राख होती.
" जय महाकाल !" अघोरी बाबांच्या तोंडुन त्यांच्या धन्याचा उच्चार बाहेर पडला. त्या शब्दांनी ती राख अक्षरक्ष चांदीसारखी चकाकून ऊठली.
बाबांच्या तोंडावर मंद स्मितहास्य उमटल.
हातात असलेली राख त्यांनी त्या चौकटीत बसलेल्या काळ्या ध्यानावर भिरकावली..
त्या कालसर उपद्रवावर ती राख पडताच
फुलभाज्यांसारख्या , लाल,निळ्या,पिवलया, ठिंणग्या उडाल्या - ' झप' आवाज होत- त्या ध्यानाच्या काळसर त्वचेवर तांबडसर आग पेटली.
" आहहह..अह्ह्..ऐ...आय..आय...! कुत्र्यासारख खेकालत ते ध्यान जागेवरून ऊठल.
चार हातांवर माकडा सारख उड्यामारत पळत जाऊ लागल..!
बाल्या विस्फारलेल्या नजरेने हा भयाण प्रकार पाहत होता. त्याच्या सामान्य जिवनात असले प्रकार कधीच न घडणा-यांमधले - अनपेक्षितच होते म्हंणा .
जरा दुर मसनाच लोखंडी गज होते.. त्या चार गजांमध्ये जाऊन ते मधोमध उभ राहिल..जिथे प्रेत..मईत जाळतात..
त्या मसणात ते उभ होत.पाहणा-याला अस वाटेल की एक जिवंत माणसाच देह जागेवर उभ्या अवस्थेतच जळत आहे.
त्याने गर्रकन वळून ह्या दोघांकडे पाहिल..
काय तो अभद्र , अवतार होता - अघोरी बाबा - बाल्या दोघांच्या सर्रकन काटा उभा राहिला..
त्या ध्यानाच कालसर चीपचिपित थोबाड, होत. त्याच थोबाडावर लहान- लहान केस उगवले होते.. पुर्णत चेहरा - केसांनी भरला होता.. आणी त्या भरलेल्या केसांतून त्याचे ते नागासारखे हिरवेजर्द , त्यात एक वाकडी चिर असे डोळे लुकलुकत होते .
मानवाला ओठ असतात - पन ह्या ध्यानाला
ओठ नव्हते..उघडा जबडा होता..त्यातून ते धारधार हिंस्त्र दात दिसत होते.. एकदा मांसात घुसले..की मांसासहित हाड सुद्धा बाहेर काढेल अशी धार असलेले दात.
" भट्या..तुझ्या .आxxxची गांxx..तुझ्या..! ..तू भेट मला मादरxxx त! तुझी चामडी सोलून टाकेन, उकळत्या तेळात म्हढ तलीन तुझ! आकरमाश्या! .."
" माझी चामडी लोलवतो काय , मला उकळत्या तेलात तळतोस काय ? मग ये असा इकडे..ये. ! .पाहू तर दे .तुझ्यात किती हिंम्मत आहे ये...! "
त्याच आगीन जळणार देह अद्याप मसणातल्या लोखंडा मधोमध उभ होत.
चार फुट उंचीच ते पुर्णत काळ्या देहाच , आणी पातळसर हात -पाय, असलेल ते ध्यान होत.
बाबांनी झोपडीतून बाहेर पाऊळ टाकल..
उजव्या हातात थोडीशी राख अद्याप शिल्लक होती.
बाल्या बाबांच्या मागे मागे..आला.
मसणात ते ध्यान जळणा-या देहासहित उभ होत.
हळू- हळू ती आग आता कमी-कमी होत होती.
" ए भट्या.! त्याला माझ्या हवाली कर मालकीणीचा हूकूम आहे..! " भसाडा आवाज..
" मालकीण? कोण मालकीण?"
अघोरी बाबा स्वर उंचावत म्हंणाले.
" लालसटवी.!"
तोच तो भसाडा आवाज आला..पन ह्या वेळेस त्याचे ते सापासारखे डोळे लकाकले..
" लालसटवी....!" अघोरीबाबांना जरासा धक्काच बसला होता, डोळे ते नाव ऐकून जरासे मोठे झाले होते. त्यात आश्चर्य- भीती समीश्रित भाव होते.
" .फिफिफ्फीफीफीफिफिफ..! " तोंडावर हत ठेवून ते लहानमुलासारख हसत होत.
" फाटली का ? फाटली तुझी..! फिफिगिफिफी..! चल गपगूमान त्याला सोपव माझ्याकडे ..बघू...! त्याबदल्यात मी तूला तुझ्या जिवाची भिक देईन....!.." त्याच्या त्या भसाड्या आवाजातल बोलण बाबांना पटल होत.
त्यांनी होकारार्थी मान हलवली गर्रकन वळून मागे पाहिल.
" बाल्या..!" ते पुर्णत मागे वळाले...
त्याचे हात हातात धरले..! आपल्या हातातली..राख बाल्याच्या हातात दिली.
" घाबरू नको..! मन कठोर ठेव..! आण म्या काय बोलतो ते निट ऐक.. म्या सांगतो तस करशील तर नक्कीच वाचशील..! हे बघ ते ध्यान मसणात उभ हाई ..- ती चार लोखंडी गज म्हंणजे त्याच सूरक्षा कवच झाल हाई..! त्या मुळे मी काहीही करू शकत नाय.! आण हे बघ तू गेल्याशिवाय ते बाहेर यायचं नाही ..कारण ते तुला मारायला..आलाय ! मी तुला जी राख दिलीये ..ती राख काही साधरण नाही..! मनिकर्नीका घाटातल्या प्रेतांची राख आहे..ती..!
जिथे महाकालच वास्तव आहे. हजारो- लाखो शक्तिस्तोत्र आहेत ह्या राखेत..जस ते ध्यान चार लोखंड .(मसाण )ओलांडून बाहेर येईल..! तव्हाच ही राख त्याच्या अंगावर फेक .! समजल? "
अघोरीबाबा पुटपूटत्या स्वरात म्हंणाले.
बाल्याने थरथरत्या नजरेने मान हळवली.
" ए भट्या..! काय खुसुरपुसूर लावले रे? .पाठवतो की नाय त्याला.? " मागून ते कालसर चार फुट उंच, हाडकूळ्या देहाच ध्यान भसाड्या आवाजात गरजल.
" हो हो पाठवतो..पाठवतो..! जा बाल्या..!"
अघोरीबाबांनी वळुन समोर पाहिल..
बाल्याने आवंढ़ा गिळला. हा लढ़ा आता त्याला एकट्यालाच लढ़ायचा होता. बाल्या हळू हळू पुढे जात होता.
दहा पावळ चालून बाल्या जागेवर थांबला.
उज्व्या हाताच्या बंद मुठीत ती राख होती.
वखवख नागासारख्या डोळ्यांनी ते ध्यान बाल्याच्या डोळ्यांत पाहत होत. ती नजर विषारी होती..ह्दयाला टोचणारी होती.. त्या नजरेला पाहता बाल्याची पाऊळे थरथर काफु लागली..मांड्याना ताप भरला होता.
घसा सुकलेला, डोळे आत खेचले होते - अशक्त वाटत होते. अवतीभवतीची झाडे रोखून पाहतायेत असा भास होत होता.
रात्रीच्या अंधारात कोणत्यातरी झाडावर टीटवी बसून ओरडत होती. तिचा तो स्वर - बाल्याच्या कानांना ऐकू येत होता.
सावज पुढे आल हे पाहून त्या ध्यानाच्या बिन ओठांवर हसू उमटल..! ते जबदा विचकत - तोंडातले सर्वच्या सर्व दात दाखवत हसल..
त्याच ते.आसुरी हास्य पाहून बाल्याचा अर्धा जिव मेला. कपाळावरून खाली गळणारा घाम खालची माती सोकून घेत होती.
त्या ध्यानाने हळुच आपल काडीसारख केसाळ पाय त्या चार लोखंडांमधुन पुढे टाकल.
पायांना वाकडीतिकडी वाढलेली कालसर विषारी धारधार नख होती...आणी विळक्षण भयप्रद बाब अशी ,की पाऊल हडळीसारख उलट होत.
दुसरही पाउल त्या लोखंडी गजांमधून बपूढे टाकत ते बाहेर आल.
" हिह्हिहिहिहिही! उम्म..स्ल्प..स्ल्प..! " त्या ध्यानाने जिभळ्या चाटल्या.
" शुद्ध मांस..शुद्ध मांस..! घाबरगुबर काळीज फाडून खायला लागत्ं खास..शुद्ध..मांस..शुद्ध मांस..हिहिहिहिहिह"
लहान मुलासारख त्याने टाळ्या वाजवल्या..
जागेवर माकडासारख्या टूण टून उड्या मारल्या..
आंनद साजरा करू लागल..
बाल्याने हळू हळू तिरकसपणे अघोरीबाबांकडे पाहील... तस त्यांनी हळुच होकारार्थी मान हळवली.
" गुर्र्र्र..गुर्र्र..गुर्र्र...गुर्र....!" ..
भयानक- अतीभयानक दृष्य..! ते ध्यान चार पावलांवर हिंस्त्र श्वापदासारख जमिनीवर हात पाय टेकवून बसल, त्याच्या घशातून ती घोग-या आवाजातली गुरगूर बाहेर पडली..
बाल्याच काळीज बंद पिंज-यात धडधड करत वाजत होत.
भुकेले लुकलुकणारे डोळे- बाल्याच्या अंगावरून फिरले.. आणी ते एका पिसाळलेल्या रानटी श्वापदासारख बाल्याच्या दिशेने धावल.
जमिनीवर त्याच्या प्रत्येक पावळांनी
' धप धप धप ' असा आवाज होत..माती हवेत उडत होती. जमिनीवर माकडासारख उड्या मारत तर कधी धावत बाल्याजवळ आल..
त्याचा तो केसाळ देह- नागासारखे विषासारखे हिरवट डोळे आणी त्यात ती वाकडी काळी चिर ..बाल्याची भीतिने वाचा बसली तो विसरला..
की आपल्या हातातली राख त्याच्या अंगावर फेकायची आहे. भीतिने त्याची पावळे मागे मागे सरू लागली..
" बाल्या..बाल्या..आर ती राख फेक..! घाबरू नको...बाल्या..!" बाबा मुळाच्या देठापासून ओरडले..
अघोरी बाबांची कृती फसली होती..
भीतिचा विजय झाला होता . भीतीने बाल्याच्या मनावर कब्जा केला होता.
त्याची मागे मागे पडणारी पाऊले आणि ते ध्यान त्याच्या जवळ आल..चार पावल दुर असतांनाच त्याने दोन पायांवर हवेत उडी घेतली..
बाल्याच्या मागे मागे जाणा -या पावळांना ..खाली जमिनीत एक दगड अडकल होत..
त्या दगडाला बाल्याची टाच लागली.. तसा बाल्या मागच्या मागे पडला..
पुर्णत अवतीभवतीचा काळ गोठला होता.
उभी सृष्टी मंद गतीने धावत होती.
हवेत झेपावळेल ते ध्यान - हवेतच त्याचा जबडा वासला , ते काळसर पाषाणी धारधार दात बाहेर आले, आणी ती दोन भागांत विभागलेली लालभडक जिभ दिसली..जात त्याचे हिरवट डोळे
लकाकले..
बाल्याचा तोळ गेला होता..हळू हळू तो..पाठीवर पडत होता..आणी त्याच्या अंगावर पुढुन ते ध्यान त्याच काळ बनून येत होत..
तेवध्यात बाल्याची उजव्या हाताची मुठ सुटली..
पांढरट राख वर हवेत उडाली..
बाल्या जामिनदोस्त झाला.. पाठिला जरास लागल होत..पन समोरून येणारा तो भयंकर मृत्यु
ह्या साधारण वेदने समोर काय होता ?
वटारळेल्या नजरेने बाल्या त्या ध्यानाला आपल्या दिशेने येताना पाहत होता. चार मीटर , तीन- मीटर, दोन ,मीटर अस ते ध्यान हवेतून बाल्याजवळ पुढे पुढे येत होत .
तेवढ्यात
बाल्याने डोळे गच्च मिटले , आणी त्याच वेळेस ती पांढरट त्या ध्यानाच्या केसाळ देहावर पडली..
बाल्याच्या गच्च मिटलेल्या डोळ्यांआत , काळ्या पडद्यांवर एक चमकिल्या लाल-पिवल्या,हिरव्या,निळ्या धुळीकणांचा
बार उडाला ... ! काळ्या पडद्यांवर ते रंगीबेरंगी उजेड चमकतांना दिसत होते .
त्या ध्यानाचा अंगावरचा एक नी एक केस लाल,निळा,पिवळा, हिरवा अश्या रंगाने पेटून ऊठला होता...आणी त्यातून लहान-लहान वेगवेगळ्या रंगाचे निखारे बाहेर पडत होते..
चट चट आवाज करत ते ध्यान हवेतच जळत होत. बाल्याच्या पुर्णत अंगाला आती उष्ण धग ,जानवत होती..जस की गरम भट्टीत उभ आहोत.
पन कानाचे फडदे फाटावा तसा तो ओरडण्याचा आवाज चित्कार फुटला..त्या आवाजाने झोपलेल स्मशान जाग झाल - झाडांवर आपआपल्या घरट्यात झोपलेली पाखरे घाबरूगुबरी होऊन हवेत उडाली.. .
मध्यरात्रीच्या समयी तो काळसर कावळा ओरडू लागला..
" काव ...काव..काव...काव..!"
हवेतच त्या ध्यानाची राख झाली होती..आणी हवेत विरुन गेली ही होती.
अंगाला जाणवणारी उष्ण धग, आणी बंद पापण्यांवर पडणारा तो रंगीबेरंगी प्रकाश सर्वकाही संपल होत.
बाल्याने भित भितच डोळे उघडले..आणी समोर पाहिल.
सर्वकाही पहिल्यासारख होत.
कुठेही अमानवीय घटकांच चिन्ह नव्हत.
" मी वाचलो....मी वाचलो ..हिहिहिहिहई..!"
बाल्या जागेवर उठून उभा राहिला..
अघोरीबाबांनी नाही नाही अशी मान हळवत त्याच्याकडे पाहिल.
" ही तर सुरुवात झालीये..! अजुन तर लालसटवी बाकी आहे..! आणी जो पर्य्ंत तिच अंत होत नाही तो पर्यंत तु सुटला नाही आहेस..!"
अघोरीबाबा गूढ स्वरात म्हंणाले.
त्यांच्या त्या वाक्यावर बाल्याचा हसरा चेहरा दुखात बदल्ला.
" पटकन त्या कबरास्तानात पोहचायला हव .! नाहीतर ती लालसटवी आत जी जी मांणस गेली आहेत ...त्या सर्वाँना मारून त्यांच्या रक्ताची रांगोळी काढील कबरस्तानात ..!"
अघ्रोरीबाबा म्हंणाले..आणी ताड ताड चालत झोपडीत शिरले..
त्यांनी एका कापडी पिशवीत त्या मातीच्या भांड्यातून तीच मनिकर्नीका घाटातल्या प्रेतांची र्सख भरली..!
आणी पुन्हा झोपडी बाहेर आले ..
" चल बाल्या..!" अस म्हंणतच बाल्या आणी
अघोरीबाबा स्मशानातून बाहेर पडले..कब्रस्तानाच्या दिशेने निघाले .
आणी ते पोहचेपर्य्ंत कब्रस्तानात न जाणे कोणाच..कीती जणांचे मय्यत - म्ह्ढ पडणार होते ? देवालाच ठावूक!
xxxxxx
जेमतेम आठ फुट उंच आणी - साडे सात फुट रुंद अशी एक भलीमोठ्ठी कबर दिसत होती.
त्या मोठ्या कबरीवर पुढे एका चौकोणी काळ्या पाषाणावर इंग्रजीत नाव लिहील होत.
फादर जॉर्ज सेलिव्हा आणी पुढे इंग्रजी अंकांत जन्म दिनांक आणी मृत्यु दिनांक लिहील होत.
ही कबर त्याच फादर- प्रिस्टची होती , ज्याने निळ्याला काहीवेळा अगोदर सतर्क केल होत.
आणी त्याच कबरीमागे हे चार जण लपले होते.
ते चारजण म्हंणजे कोण बर ? या पाहुयात..!
सर्वप्रथम निळ्या, बाजुला आवडी -तिच्याही बाजुला प्रिया उभी होती..आणी शेवटला सोपान उभा होता.
" निळ्या ..?" सोपान हळूच पुटपुटला..
" काय..!" निळ्याने हळू आवाजात विचारल.
" अरे तो अण्णा कसला डेंंजर दिसतोय! अस वाटतं , की तो माणुस नाही .."
" सैतान आहे!" निळ्या पटकन म्हंणाला.
त्याच्या त्या वाक्यावर प्रिया- सोपान दोघांनिही एकदाच आवंढा गिळला.
" निळ्या..! " आवडी बोलू लागली."तो पादरी तुला म्हंणाला , की गो रन - सी इज कमिंग..!
म्हंणजे ह्याच अर्थ अस होतो की जा पळ ती येतीये..!" आवडी तिची अक्कल लावत होती.
" हो ना ग आवडे ! पन ही ती नक्की कोण असेल?" प्रियाच्या वाक्यावर आवडी - निळ्या ,सोपान, खुद्द प्रिया सुद्धा , सर्वच विचार करत बसले होते.
तोच त्या सर्वाँच्या डोक्यावर ट्यूब पेटली.
आणी सर्वाँच्या तोंडून एकदाच ते वाक्य बाहेर पडल..
" ती काचेची बरणी..!" चौघांच्याही तोंडून एकदाच वाक्य बाहेर पडल होत.
तोच प्रथम निळ्या म्हंणाला.
" त्या शवपेटीत असलेली ती काचेची बरणी? त्या बरणीत ते लालसर धुर कोंबल होत..!"
" आणी तीच बरणी- अण्णाने बाहेर काढली."
ह्यावेळेस सोपान म्हंणाला.
" आणी मग त्या पादरीच्या आत्म्याला पाहून मी ओरडलो.." निळ्याच पुढील वाक्य सोपानने पुर्ण केल..
" तुझ्या आवाजाने ती बाटली फुटली..आणी त्यात कैद असलेल ते मुक्त झाल..!
" म्हंणजे फादरच्या म्हंणन्या नुसार ही ती जी कोणी आहे..! ती त्या बरणीत कैद होती तर..!"
ह्यावेळेस आवडी म्हंणाली.
निळ्या-सोपान- आवडी- पिया चारही जण गोल घोळका करून उभे राहिले होते.
ह्या चारहीजणां मधोमध सामान्य मानवी तर्कांविरुद्ध जाऊन एक अकल्प्तीत, अविश्वसनीय - अस गूढ उकळण्याच्या मार्गावर होत.
" म्हंणजे त्या काचेच्या बरणीतच कायतरी होत?
म्हंणूनच तर तो पादरी अस म्हंणाला ना, की डोंट ओपन , उघडू नका!" पियाने आपल मत मांडल..
" ए..ए...एक मिनीट " सोपान काहीतरी लक्षात आल्यासारख पटकन म्हंणाला..त्याच्या चेह-यावर जरासे भीतीदायक भाव पसरले होते.
" तो..तो अण्णा.. भुतात बदलला आहे..बरोबर..! पन चर्चमध्ये त्याच्या बरोबर पांडू सुद्धा होता ना ? मग त्या अण्णाने त्याला.."
सोपानच्या विधानाने सर्वाँच्या अंगावर काटा आला.
" बापरे , मी तर हा विचारच केल नाही यार..!
की तो बिचारा म्हातारा पांडू ही वर होता..! जर त्याला काही झाल असलं तर? त्याची आंधळी बायको.. ? तिच कस होइल रे ? बिच्चारी..!"
निळ्या जरा दुखी स्वरात म्हंणाला.
" हे देवा ! हे तर खुपच भयानक आहे !" पिया जराशी रडकूंडीला आली होती. तिने आवडीकडे पाहिल.
" आवडे भुत पाहायच्या लालसेने मी तुझ्या बरोबर आले खर , पन आता माझच भुत ह्या कब्रस्तानात लोकांना पाहायला मिळणार वाटत..!"
" पिये गप्प बस्स .! असं काहीही होणार नाही आहे.. ओके! हे बघ आपन चौघेही काहीतरी मार्ग काढु, आणी इथून सहिसलामत बाहेर पडू..! हंम्म..?"
आवडीने पियाला धीर दिला..तिच्या हंम्म वर पियाने रडण ब्ंद केल..व खुद्दकन गालात हसली..! "
सोपान निळ्या दोघिंकडेच पाहत होते.
काहीवेळाने
" हे पहा .!" निळ्या गंभीर होऊन बोलत होता.
" माझ्याकडे एक मार्ग आहे..ज्याने आपल्याला इथून सुखरूप बाहेर पडता येईल....! "
आवडी- पिया- सोपान तिघेही लक्ष देऊन ऐकत होते.
" हे पहा ईथुन पाच मिनीटांवर चर्च आहे..आणी चर्चच्या उजव्या बाजुला ..जरा दूर एक गेट आहे..! जो गेट मागच्या बाजुने उघडतो.. - तर आपण सर्व त्या गेटजवळ जाऊ ..! आणी आपण सर्व गेटमधून बाहेर पडलो..की जरा दुर अण्णाची फॉर व्हीलर जीप उभी असेल - त्या जिफ मार्फत आपन आपली सुटका करू शकतो."
" ग्रेट आईडीया.!" सोपान म्हंणाला.
आवडी - पिया दोघिंनाही त्याची कल्पना आवडली होती. आता फक्त ती सत्यात उतरवण बाकी होत..
पन एक गोष्ट मात्र ते विसरत होते. कल्पना करणे आणि ती सत्यात उतरवणे ह्यात जमीन आस्मानाचा फरक आहे.
निल्याने सुटकेची आईडीया तर आखली होती..
पन त्यात संकटे येणार नव्हती का ? आणी ती संकटे जिवावर बेतणार नाहीत , हे कोण सांगू शकणार होत..! या पाहूयात काय घडेल पूढे !..
xxxxxxxxxxxxxxx
सावकार आणी त्याच्या गावगुंडांना प्रेताला गाड़ण्यासाठी खणलेला खड्डा सापडला होता.
म्हातारीच स्ट्रेचवर झोपलेल प्रेत , खड्ड्याबाजुला हिरव्यागार गवताच्या जमिनीवर खाली ठेवल होत. प्रेताच्या पायापासून ते डोक्यापर्यंत पांढरा कापडा टाकला होता, ज्याने प्रेताच दर्शन होत - नव्हत.
तसंही त्या थेरडीच मेलेल प्रेत तीच ते भकास, पांढरट त्वचेच थोबाड, डोळ्याखाली उमटलेली काली वर्तूळे , विचकलेला जबडा, बाहेर आलेली- जीभ! आणी तो कपाळावरचा मोठा कूंकू कोणालाही हौ ते भयाण रूप पाहायची हौस नव्हती.
" चंमन ..! " सावकाराने चंमनला आवाज दिला.
तसे चंमन हळूच पुढे चालत आला.
" जी सावकार !" चंमन हाताची घडी घालून उभा होता.
" दफनविधी सुरू करा , जाम वेळ झालीये.!"
सावकाराने रेंज नसलेल्या स्मार्टफोन मध्ये पाहील..
अकरा वाजायला पाच मिनीटे शिल्लक होती.
सांगायचं तर सावकाराला काही घाई झाली नव्हती,
पन काही वेळा अगोदर बाल्याच ते अचानक गायब होण- सावकाराला एक अनामिक - अशुभ संकेताची चाहुल लावून गेल होत.
सावकाराच्या हूकमावर चंमनने प्रेताची दफनविधी सुरू केली.
दोन आड-दांड देहाचे गुंड पाच फुट लांबीच्या खड्डयात उतरले ! त्या दोघांच्याही हातात खड्डयातल्या कालोखाला दूर ठेवण्यासाठी स्मार्टफोनची फ्लैशलाईट सुरु होती.
दोन जण खड्डयाच्या वर जिथे प्रेत स्ट्रेचरवर झोपवल होत तिथे उभे राहीले होते..
सावकार ह्या सर्वाँपासून जरा दूर खड्ड्याबाजुला हाताची घडी घालून डोळ्यांतून अश्रु गाळत उभा होता.. त्याच्या बाजुला टकल्या चंमन सूद्धा उभा होता.
खड्डयाबाजुला स्ट्रेचर ठेवल होत..तिथेच दोन गुंड उभे होते..त्यांनी म्हातारीच पांढ-या कापडात झाकलेल प्रेत....
हात आणि पाय धरत अलगद स्ट्रेचरवरून उचल्ल.
" हळू ...!" सावकाराच्या तोंडून हूंदका बाहेर पडला.
वर उभ्या त्या गुंडाणी प्रेत , खड्डयात उतरलेल्या त्यांच्या दोन साथीदारांकडे सोपावल..!
आरामात प्रेत खड्डयात उतरवल गेल होत.
" राख्या..!" प्रेताचे हात धरलेला तो गुंड आपल्या साथीदार मित्राला हळू स्वरात म्हंणाला.
" काय , रे सम्या..?" राख्या सम्याला म्हंणाला.
ज्याने म्हातारीचे पाय धरले होते.
" सावकार, चंमण आणि बाकीचे ते दोघ वरच राहतील..! तर..? " सम्याने जराश्या जिभळ्या चाटल्या.. कसतरीच खवचट निर्जज्यासारखा हसला.
" काय म्हंणायचं तुला? काही कळलं नाही बूवा..!" राख्या न समजून म्हंणाला.
" हे बघ..! तू आपला जिगरी मित्र आहे म्हंणून सांगतो." सम्याने एक चोरटा कटाक्ष वर टाकला...
वर उभे ते दोन गुंड म्हंणजेच त्याचे साथीदार हाताची घडी घालून एकमेकांसोबत काहीतरी चर्चा करत होते.
तसा सम्या पुढे म्हंणाला.
" राख्या सावकाराने त्याच्या आईच्या प्रेतावर जाम महागडे महागडे..दागीने घातलेत..! "
" हा मंग ?" राख्या न समजून पटकन म्हंणाला.
" अरे बुद्धू ! " सम्या आपला आवाज जितक होइल तितक लहान ठेवण्याचा प्रयत्न करत होता .
कोणीही त्यांच बोलण ऐकायला नको होत..नाहीतर जिवाशी खेळ होणार होत. सावकार किती माथेफिरु आहे हे त्या दोघांनाही ठावूक होत.
" अरे येड्या..! सोन्याचे दागीने आहेत प्रेतावर , एक एका दागिन्याची किंमत किती आहे माहीती आहे का?" राख्या ने न समजून भुवया उडवल्या..
" वीस- ते पंचवीस लाख इतकी आहे..! जरा इचार कर? जर आपण दोन दागीने काढुन घेतले तर...?" सम्याने डोळे जरासे मोठे करत भुवया उडवल्या.
" अरे पन सम्या, सावकाराला कळल तर ? चामडी सोळेल तोंआपली ! त्या वॉर्डबॉय सोबत काय केलं बघितल ना?" राख्या भीत म्हंणाला.
" राख्या काही बी होणार नाही.! फक्त एक काम करायचं, आपल्या हातात असलेली ही फोनची बैटरी
काहीवेळासाठी बंद करायची , म्हंणजे - कस ? काळोख होइल..! आणी तेवढ्यात आपण आपल काम करून टाकु ! काय?" सम्या म्हंणाला.
त्याची ही युक्ति राख्याच्या चांगलीच पसंतीला उतरली होती. आयतेच वीस -पंचवीस लाख रूपये भेटत असतील तर कोण नाही म्हंणणार आहे ?
पैश्याची लाळसा, वासना ही फारच भयंकर आहे.
आणी त्याचा एक नमुन सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार होता. आणी त्याचे वाईट परिणाम सुद्धा पाहायला मिळणार होते.
लवकरच !
xxxxxxxxxxx
मंद धुक्यातून वाट काढत हि चारही जण जीव मुठीत घेऊण कब्रस्तानाच्या - मागच्या गेटच्या दिशेने निघाली होती.
सर्वात पुढे निळ्या होता- त्याचा हात धरून आवडी चालत होती, तिच्याही मागे पिया , आणी सर्वात शेवटी सोपान होता.
सोपानची घाबरलेली नजर राहून राहून मागे वळून पाहत होती.
मागून तो अण्णा आला तर ? त्याच्या हल्ला करण्याअगोदरच पळायला सोप्प जाणार होत आणि हाच त्याचा हेतू होता. सतर्क राहणे केव्हाही चांगल असत !
काहीवेळातच धुक्यातून वाट काढत हे तिघेही कब्रस्ताच्या शेवटच्या बाजुला आले होते.
समोर तो अवाढव्य काळ्या दैत्यासारखा गेट ह्या तिघांना खूनशी नजरेने पाहत होत होता .
काहीवेळा अगोदर गेटच्या दोन्ही झाप उघड्या होत्या- पन ह्याक्षणाला गेटची दोन्ही झाप बंद होती.
" गेट तर उघड होत ना? मग बंद कस झाल ?" पिया स्वत:शीच म्हंणाली.
" थांबा मी गेट उघडतो !" सोपान हळूच म्हंणाला.
चालत तो गेटजवळ आला..
गेटच्या कडीला हात लावण्या अगोदर .. त्याने एकवेळ मागे वळून पाहिल..
पुर्णत कब्रस्तानाने धुक्याची चादर ओढ़ली होती.
वातावरणात पांढरट धुका पोतला होता...
कबरींच्या अवतीभवती थयथय नाचत होता .
ह्या चौघां व्यतिरिक्त कोणतेही सजीव चिन्ह नव्हते ..
तसे सोपानने पुन्हा समोर पाहिल.. गेट उघडण्यासाठी हळुच आपला हात कडीवर ठेवला..
" आह्ह्ह्ह्ह्ह्ह..आह्ह्ह्ह्ह!":
सोपान मोठ्याने ओरडला..
निळ्या, आवडी- पिया तिघांनी भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिल..
सोपानने गेटच्या कडीवर ठेवलेल्या हातावरून निळ्सर रंगांचा विद्युत सळसळत्या प्रवाह धारा आतिवेगाने त्याच्या देहात घुसत होत्या.
सर्व शरीर आतून खेचल जात होत...
एक असहनीय वेदना होत होती- त्वचा काळी निळी पडु लागली होती , केस ताठ झाले होते- वासलेल्या तोंडातली गुलाबी जिभ काळी झाली होती-
मग ती अघोरी अमानवीय शक्तिने तैयार झालेली विद्युत लहरीधारा बंद झाल्या - तसा सोपानच निश्चल , कलेवर मंद गतीने मागोमाग जात खाली जमिनीवर पाठिवर पडल..
सोपानच्या कलेवराची पुर्णत त्वचा
काली निळी पडली होती. डोळे तोंड अपेक्षापेक्षा जास्त वटारले - वासले गेले होते.
डोक्यावरचे केस काट्यांसारखे ताठ झाले होते -
चेहरा काळ- निळी पडल जात - तोंडा-कानांतून लालसर धुर बाहेर पडत होत..
ही सर्व ती लालसटवीचीच करामत होती.
घटना इतकी वेगाने घडली होती - बाकीच्यांना एकसेकंद काय झाल ? कस झाल? काही समजायला, किंवा हालचाल करायला मार्गच उरला नव्हता !
होत्याच कस नव्हत झाल होत !
" सोपानsssss!"
निळ्या खाली बसला.. त्याच्यासाठी हा दुसरा धक्का होता.
" सोपान ..सोपान..उठ....भावा..! "
निळ्याने सोपानच्या प्रेताचे दोन्ही खांदे पकडले गदा गदा हळवू लागला..
पन हेच सत्य होत- की तो मरण पावला होता..
त्या अघोरी तामसी अनाकलनीत शक्तिने त्याचा घात केला होता.
" हिहिहिहिहिहीहीही, हंम्म ईथे लपला आहेत काय? थांबा..थांबा .आलोच..हिहिहिहिह!"
तोच तो तारस्वरातला बायळी- पुरुषी आवाज आला...आणी त्याला जोड म्हंणून थरकाप उडवणार तो हास्या.
आवडी-पिया दोघिही शॉक लागल्यासारख्या उभ्या होत्या ...हा धक्का पचवणे जरा जड जाणार होत .
पन आलेला आवाज ? त्या आवाजाने एवढ मात्र कळल होत- की ते ध्यान इकडेच येणार आहे ! कोणत्याही क्षणी ईथे पोहचेल ही ! शेवटी आवडीने धीर एकटवला..
" निळ्या..निळ्या..! " तिने त्याच्या खांद्याला धरल..
निल्याच्या डोळयांतून आसवे बाहेर आलेली..
त्याचे दोन्ही जिवाभावाचे मित्र एका सैतानी शक्तिने मृत्युच्या घाटी उतरवले होते.
अमोल- सोपान दोघांवर त्याचा किती जिव होता.
ह्या जगात त्याला आवडी नंतर कोणी आपल म्हंणवून घेणा-यां मधल कोणी असेल तर ते हे दोघे होते.
" निळ्या...निळ्या..उठ तो येतोय.! तो ईकडेच येतोय चल लवकर..चल..!" आवडीने त्याला कसतरी उठवल..
पिया , आवडी- निळ्या तिघेही पून्हा त्या कब्रस्तानात घुसले.
आता सुटका शक्य नव्हती..
xxxxxxxxxxxxx
" राख्या ? " सम्याने राख्याला आवाज देत ईशारा केला . ठरलेल्या प्लान नुसार मोबाईलची फ्लैशलाईट तीस- चाळीस सेकंदांसाठी बंद करायची होती - आणी तेवढ्यातच प्रेतावरच पांढर कापड बाजुला काढून गळ्यातील दोन सोन्याचे दागीने बाहेर काढ़ायचे होते.
सम्याच्या वाक्यावर राख्याने एक आवंढ़ा गिळला ..आणी हळुच होकारार्थी मान हळवळी.
दोघांनिही एकदाच मोबाईलकडे पाहिल..आणी हळकेच फ्लैशलाईट बंद केली...तसा
झपकन अंधार पसरला , डोळ्यांसमोर दिसणारा काळोख आधीकच गडद होता.
पाच सेकंद अंधारात दिसण्यासाठी जाऊन द्यावी लागली- मग अंधाराचा सराव झाला.
" सम्या लवकर काढ..... वेळ कमी आहे! .."
राख्या हळूच पुटपुटला.
सम्याच्या कपाळावरून घामाचे ओघळ खाली येऊ लगले.
सांगणे आणि ती कृती आस्तित्वात करुन आणने म्हंणजे किती कठीण क्रिया नाही ?
फ्लैशलाईट बंद झाली- पाच सेकंद सम्या थांबला होता..डोळयांना अंधाराची सवय झाली तस
त्याने वेगाने हालचाल केली..
हात वाढवून मयताच्या तोंडावरच पांढर कापड त्याने झटकन बाजुला सारल.. आणि अंधारातही त्याला ते भयाण दृष्य दिसल होत.
म्हातारीच्या मयताचे काजळ पोतळेले दोन बुभळांचे डोळे उघडे होते. पन डोळ्यांचा रंग किती आगळा वेगळा होता.-?
पिवळेजर्द बुभळ ( अंधारात काजव्यासारखे लकाकत होते ) त्यात मीरीचा काळा कालसर ठिपका होता .
" बाबोवsss.!" राख्याच्या तोंडून ते चकाकते डोळे पाहून आश्चर्यकारक उद्दार बाहेर पडला.
बसल्या जागेवरच त्याच्या मणक्यावरून घामाची थंडगार लाट वाहून गेली.
" आई शप्पथ...सम्या ह्या प्रेताच डोळ उघड हाईत! " राख्या जरा घाबरत म्हंनाला.
सम्याने म्हातारीच्या गळ्यात हात घातल..प्रेताच स्पर्श अगदी थंडगार होत - बर्फाच्या लादीसारख थंडगार ..!
पन सम्याला त्याच काहीचं वाटल नाही.
सेकंदाभरापेक्षा जास्त वेळ लागल होत ..एक मिनीट झाल होत -
सम्याने
दोन सोन्याचे जाडजुड दागीने काढले होते.
" झालो..झालो..! आपण श्रीमंत झालो राख्या..!"
सम्याने दात चावत हे वाक्य उच्चारल.
पन राख्याच्या चेह-यावर मात्र जरासे भयभीत भाव पसरले होते.
त्याला राहून राहून काहीतरी वाईट घडणार आहे अशी चाहूल लागत होती.
" राख्या काय झालं ? आर मालामाल झालो आपण... आणी तू आहेस की अस थोबाड पाडून बसलाय साल्या..!" सम्याने दागीने मागच्या खिशात ठेवले.
" आरर्र..मी अस ऐकलं की मयताचे डोळे उघडे असले की तो मईत झालेला मेलेला माणुस संमद ऐकतो.!"
" एं ?" सम्या न समजून म्हंणाला.
ह्या दोघांच बोलण सुरु होत.. आणी त्याच वेळेस म्हातारीचे ते पिवळेजर्द डोळे ह्या दोघांच्या दिशेने फिरले होते .
विचकलेल्या जबड्यावर हलकस कुत्सिक - छद्मी हसू आल होत .
" काय? अरे तू पागल आहे का? भुत खेतांच्या गोष्टी ऐकतो का येड्या मंमद्या..! पच्चीस लाख भेटलेत तुला, अमीर झाला तू अमीर..! एश मना साल्या .. ह्या असल्या फाजिल भुताखेतांच्या गोष्टी काय करतो ? "
सम्या हळु स्वरात म्हंणाला. राख्याने हळुच मान हळवली.
" ए ..काय झाल रे लाईट का बंद केले.!"
वरून चंमनचा आवाज आला.
तस ते दोघे जरा घाबरले मग भीत भीतच सम्या म्हंणाला.
" अं.. आ. ते फोनची बैटरी संपली आमची.."
" हा बर..बर..चला बाहेर या .!"
पुन्हा चंमन चा आवाज आला.
" चल राख्या.. लवकर वर चल.! त्यांना संशय नको यायला चल.!" सम्या म्हंणाला. राख्या - सम्या दोघेही जागेवरून ऊठले .
" ए हात द्या रे!"
राख्या खड्डयावर उभ्या आपल्या साथीदारांकडे पाहत म्हंणाला.
वर दोन जण उभे होते - त्या दोघांनीही राख्या आणी सम्या दोघांचे हात धरले होते..
त्या दोघांच्याही खांद्यांमागून
खड्ड्यात जमिनिवर पांढर कापड अंगावर घेऊन झोपलेल ते प्रेत दिसत होत ...तोच अचानक निर्जीव प्रेताची हालचाल झाली खाडकन ते प्रेत कमरे ईतपत उठून उभ राहील..
पांढर कापड हळुच खाली आल..
पांढरट पिंजारळेल केस खांद्यावर लोंबत होते - कपाळावर लाल कूंकवाचा मळवट भरला होता..
नाकात भलीमोठ्ठी सोन्याची नथ होती...
जबडा विचकला जात त्यातून धार धार पिशाच्छ धारी टोस्कूले दात बाहेर आले होते .
पिवळेजर्द डोळे ह्या दोघांच्या पाठमो-या आकृतीवर खिळले होते. तोच ते प्रेत दात विचकत हसल.
गुरुत्वाकर्षणाच नियम तोडत ते बिन आधारासहित दोन्ही पावळ पुढच्या दिशेने उचलत
जागेवर झटकन उभ राहिल..
जागेवर उभ राहताच अंगावरचा पांढरट कपडा गळून खाली पडला ..
हिरव लुगड अंगावर घेऊन उभी ती म्हातारी
हडळी पेक्षा भयाण भासत होती.
राख्या सम्या दोघांनाही वर उभ्या त्यांच्या साथीदारांच्या हातात आपले हात दिले होते..
दोघांनीही वर जाण्यासाठी आपली पाऊले वाढवली होती.
तेवढयात मागून अंधारातून दोन पिठासारखे पांढर हात आले ...
त्या हातांनी त्या दोघांचीही मागून टी- शर्ट पकडली आणि अलगद मागे खेचल ...
त्या दोघांनीही वर उभ्या त्यांच्या साथीदारांचेही हात धरले होते..ते सुद्धा वरूण त्या खड्डयात पडले..
" अरे..एय..!" चंमन ओरडलाच..
त्याच्या डोळ्यांसमोरच वर उभे दोन तगडे गडी अलगद खाली खड्डयात पडले होते.
अचानक घडलेली ही क्रिया जराशी आश्चर्यकारकच होती.
सावकार जरा घाबरल्यासारख त्या खड्डयाकडे पाहत उभा होता.
त्याच्या चेतासंस्था त्याच्या मनाला एक सुचना देत होती- राहून राहून मनातली ती भीतिची भावना कसल्यातरी धोक्याची चाहूल लावत होती.
बाल्याच अचानक गायब होण त्याच्या डोळ्यांसमोरून ते द्रुष्य जाता जात नव्हत , तोच त्या विचीत्र भयप्रद घटनेत ही अजुन एक घटना सामिल झाली होती.
आपल्या नजरेआड नक्कीच काहीतरी अनाकलनीय घडत आहे - अस सावकाराला वाटत होत . आणी ते जे काही घडत आहे - ते सामान्य नाही, मुळीच नाही !
" आsssss..आssssss..!"
अचानक खड्डयातून ओरडण्याचे आवाज येऊ लागले.
मुळाच्या देठापासून किंकाळ्या फुटत होत्या.
त्या किंकाळीतला स्वर त्या वेदनेचा उच्चांक सांगून
जात होती.
मध्येच तो मानवी हाड मोडल्याचा कडकड आवाज यायचा ..आणी तेवढ्याच वेगाने तो ओरडण्याचा आवाज ही खड्डयातून बाहेर पडत होता.
मांस तोंडून खाल्ल्याचा आवज येत होता..मध्येच लचके तोडले जात होते.
चंमन- आणी सावकार डोळे फाडून त्या खड्डयाकडे पाहत उभे होते. चंमनने कपालावरून आलेली ती घामाच ओघळ हळुच थरथरत्या हाताने पुसली..
न जाणे त्या खड्डयात काय सुरु होत-
मनात हा विचार येताच अंगावर कस सर्रकन काटा येत होता?
" चंमन .. !" सावकाराचा आवाज आला.
चंमनने गर्रकन वळून मागे पाहिल..
सावकाराने माणेनेच त्याला इशारा करत पुढे जायला सांगितल .
टकल्या चंमनचाही नाइलाज होता..
शेवटी सुकलेल्या गळ्यात त्याने आवंढ़ा गिळला.
निळ्या रंगाची पैरागोन त्याने घातली होती..
त्याच पैरागोनचा उजवा पाय हळूच पुढे पडला..
" चट ' आवाज करत पैरागोन वाजली.
चंमणला खरतर त्या खड्डयाच्या दिशेने जायचं नव्हत .
पन सावकाराच मीठ खाल्ल होत - त्या मीठाला जगण भाग्य होत !
पन हीच इनामदारी त्याच्या जिवावर बेतणार होती , त्याच काय?
xxxxxxxxxxxxx
निळ्या - आवडी, पिया तिघेही धुक्यातुन धावत आले... तसेच पुढे निघुन ही गेले.
" पळा ...पळा.. धावा..!"
पिया धावता धावताच म्हंणाली.
अवतीभवती उभ्या कबरींजवळून हे तिघेही धावत पुढे जात होते.
वेगाने आजुबाजुच्या कबरी पास होत होत्या..
काहीवेळ असंच धावून ते एका कबरीपाशी थांबले.
पिया आवडी पोटावर हात ठेवून दम भरत उभ्या होत्या.
निळ्या धप्पकन खाली जमीनीवर असलेल्या लाकडी कबरीवर बसला.
दोन्ही हात तोंडावर ठेवले.. मुसमुसत रडू लागला..
" निळ्या..!" आवडी ही त्याच्या बाजुला बसली ..
त्याच्या खांद्यावरून हात फिरवू लागली..
" निळ्या ..निळ्या शांत हो !"
आवडी म्हंणाली.
" कस शांत होवू आवडे..? माझे जिवाभावाचे दोन्ही मित्र माझ्या डोळ्यांसमो मारले गेले , आणी मी? आणी मी काहीच करू शकलो नाही ! "
" निळ्या..! "पिया बोलू लागली." हे बघ तू स्वत:ला दोष देऊ नकोस कारण समोर ची शक्ति अमानविय आहे ! तिला आपण सामान्य मानव नाही हारवू शकत , आपण फ्ज्त इथून बाहेर पडण्याच मार्ग शोधायल हव ! "
" होय निळ्या! पिया बरोबर बोलत आहे ! आपण सामान्य हाड मांसाने बनलेले मानव आहोत-
भले आपण त्या शक्तिशी कस लढु शकतो ?"
" आणी आपल्याकडे देवाची काही खूण पन नाहीये !"
" देवाची खूण ?" निळ्याने चटकन वर पियाकडे पाहिल.
" हो निळ्या..! भुत देवाच्या खुणेला घाबरतात ना ? म्हंणजे जस की फोटो, दोरा, किंवा काहीही चिन्ह..!"
पियाच्या वाक्यावर निल्याने मेंदूवर जोर दिला..
आठवणीची फुटेज दिसू लागला.
सोपान - निळ्या चर्चच्यावर माळ्यावरच्या जिन्यावर उभे होते . अण्णा- पांडू ती शवपेटी खोलत होते. शवपेटीवर तो चांदीचा क्रॉस होता - जो अण्णाने खिशात टाकला होता..
" आहे..!" निळ्या पटकन ओरडलाच..
" काय आहे?" आवडीने विचारल.
" क्रॉस..!" निळ्याच्या चेह-यावर तेज आल होत.
" क्रॉस.? म्हंणजे येशूचा क्रॉस का ?
" हा हा तेच ते काय ते ख्रिश्चनवाल्यांच बेरीजच चिन्ह क्रॉस ..! ती शवपेटीवर अडकवल होत."
निळ्या पटकन म्हंणाला.
" अच्छा, म्हंणजे नक्कीच तो क्रॉस कोणितरी
त्या शक्तिला बंदिस्त करून ठेवण्यासाठी त्या शवपेटीवर अडकवल अशणार .. !" आवडीची विचारबुद्धी..
" अरे पन तो क्रॉस आहे कुठे ?" पियाने न राहवून विचारल.
" तो क्रॉस ..? " निळ्याच्या वाक्यावर पिया- आवडी दोघिनी म्हशीसारख्या माना हलवल्या..
" तो क्रॉस तर !" निळ्या जरा थांबला व काहीवेळाने पुढे म्हंणाला." त्या अण्णाच्याच खिशात आहे!" त्याच्या त्या वाक्यावर पिया- आवडी दोघिनीही आवासून एकमेकिंकडे पाहिल..
××××××××××××××
चंमन खड्डयाजवळ पोहचला होता - मान थोडी पुढे झुकवत त्याने खड्डयाआत पाहिल, पाच फुट खोल त्या खड्डयात अंधार साचला होता.
गडद अंधारी काळी शेवाळ जणू त्यात ओतली होती. आतून येणारे आवाज थांबले होते.
शांतता विलक्षण शांतता पसरली होती.
ह्दयाचे ठोके वाजतांना ऐकू येत होते..
श्वासांचा स्वर ऐकू येत होता.
टकळ पडलेल्या डोक्यावर घाम जमा झालेला..
चंमनच्या मागे वीस पावळ दुर सावकार उभा होता - चंमनची क्रिया पाहत होता.
" काय दिसत आहे का रे आत ?"
सावकार म्हंणाला.
चंमनने हळूच डोक मागे वळवल..
खालच्या खड्डयातून तो पिठासारखा पांढरट अमानवीय पंजा हळुच बाहेर आला....
चंमनचा पैरागोन घातलेले दोन्ही पाय दिसत होते..
आणी त्या दोन्ही पायांजवळच तो अमानवीय ध्यानाचा पंजा उभा होता.
" जी काळोख हाई आतमधी..! काय दिसत नाही बघा.."
त्या पंज्याची हालचाल झाली.. पाचही बोटांनी चंमनच पाय पकडल..
अचानक झालेल्या ह्या क्रियेने चंमनने घाबरून खाली पाहिल....
"आssss.ssssss.."
चंमन जमिनीवर पालथा पडला....
" चंमन ssssss!' सावकार ओरडला...
" सावकार ..! ...सावकार ...वाचवा...मला.....!
मला वाचवा सावकारsssssss "
चंमन खड्डयात खेचला गेला..
त्याचा शेवटचा शब्द स्वर टिव्हीच आवाज कमी कराव तस कमी कमी होत हवेत विरुन गेला होता..
सावकार डोळे फाडून समोर पाहत होता...
वाचा बसली होती..- हाड- मांस गोठल होत..
ताठ झालेल्या नसांवरून कोणीतरी थंडगार सुरु फिरवली होती.
छाती धडधड करत जनरेटरसारखी वाजत होती.
डोळे त्या खड्डयावरच स्थिरावले होते..तोच..
" सावकारssssss ..!"
चंमनची एक आर्तकिंकाळी फुटली..त्यासोबतच तो मणक्याचा हाड मोडल्याचा आवाज आला होता...आणी मग पुन्हा शांतता पसरली होती...
शुश्श्श्श्श्श्श्श्श शांतताssssss
xxxxxxxxxxx
काहीवेळाअगोदर
अघोरी बाबा कब्रस्तानाच्या मुख्य गेटसमोर पाठमोरे उभे होते.
पुर्णत देहाला प्रेतांच्या राखेने अंघोळ घातली होती. खाली फक्त एक पांढरट मळलेल धोतर दिसत होत - (त्या व्यतिरिक्त अंगावर काहीही नव्हते) केसांच्या जटा अंगा खांद्यावरून पाठीवर लोंबत होत्या-
दोन्ही पाय नग्न होते पायांत चपला नव्हत्या.
दोन्ही हातांना रुद्राक्षाच्या माळा बांधल्या होत्या..
गळ्याभोवतीही तीन- चार रुद्राक्ष माळा घातलेल्या दिसत होत्या ..
त्यांच्या जरा बाजुलाच बाल्या उभा होता.
" बाबा .." बाल्या पुढे बोलणार तोच अघोरी बाबांनी त्याला गप्प राहण्यास सांगितल.
" शूश्श्शsss! गप्प रहा , ती ऐकल..!"
अघोरी बाबांच्या वाक्यावर बाल्याने बैलासारखी मान हळवली.. गप्प उभ राहिला. अघोरी बाबा गेटसमोर चालत आले..
दोन झापांच लोखंडी गेट बंद होत.
अघोरी बाबांनी गेटवरून एक नजर फिरवली..
खालच्या जमिनीवर त्यांना गाडीच्या टायरचे व्रण दिसले, जे की एम्बुलेंसचे होते.
" सावकारsssssss..!"
अचानकच एक तीव्रस्वरातली किंकाळी वातावरणात घुमली.
बाल्याच्या अंगावरून सर्रकन काटा आला..
निवडुंगाचे काटे देहभर टोचले.
" चंमन!" बाल्या हळूच पुटपुटला..
बाबांना कळून चुकल होत , प्रेत घेऊन सावकार आणी त्याची मांणस आत पोहचली येफआणि त्यांच्या समवेत नक्कीक्ष काहीतरी भयाणक घडल आहे.
" बाल्या आत जाव लागल, चल!"
अघोरी बाबा म्हंणाले.
कर्र्र्र्र..कर्र्र कुई..ssssssss आवाज करत आपोआप गेटच्या दोन्ही झापा आतल्या बाजुने उघडल्या.
सामान्य मानवी नजरेचा आवाका तरी किती असावा? ही घडलेली क्रिया नक्की नैसर्गिक होती का?
हवेच्या झोताने ते अवाढव्य गेट उघडल होत ? खासच नाही ! कोणाच्यातरी नियंत्रणाखाली ती पुर्णत निर्जीव वास्तू होती, आणी त्या निर्जीव वास्तुतल्या एक नी एक वस्तूवर तीचा हक्क होता. तिथे वाहणारी हवा सुद्धा
तीची हेर होती.
अचानक आपोआप उघडलेल्या ह्या गेटच्या दोन झापा पाहून बाल्या ने भीतच आवंढ़ा गिळला..
कपाकपाळावरून घामाची ओघळती रेष आली..होती
तीच त्याने थरथरत्या हाताने पुसली..
" मला आमंत्रण देते काय सटवे..? नाय तुझ्या चिंब-या पकडून तुला बाटलीत कोंबली..तर बघ.!" बाबा जरा मोठ्याने म्हंणाले... ताड़ ताड़ चालत गेटमधुन आत घुसले..
त्यांच्या मागोमाग घाबरत घाबरत बाल्या चालत आला.. वटारलेल्या भित्र्या डोळ्यांनी अवतीभवती नजर फिरवत पुढे जाऊ लागला..
कारण गेल्यावेळेस जस हल्ला झाला होता तसंच पुन्हा होण्याची ही शक्यता होती..
पन ह्यावेळेस त्याच्यावर कोणताही हल्ला झाला नाही.
xxxxxxxx
निळ्या - आवडी-पिया तिघेही धुक्यातून चालत निघाले होते - तेवढ्यात तो चंमनचा ओरडण्याचा आवाज आला होता.
" आ..आ .आवडे..हा..हा..आवाज ?"
पियाने आवडीच हात धरल - काफ-या स्वरात म्हंणाली.
" मला वाटतं आपल्या शिवाय अजुन कोणीतरी कब्रस्तानात आहे..! " निळ्याने आवडी -पिया दोघींकडे पाहिल.
" मग आपल्याला तिथे जायला हव चला नक्कीच तिथे जर जास्त मांणस असली तर मदत मिळण्याची शक्यता आहे- चला !"
आवडी पिया निळ्या तिघेही आवाजाच्या दिशेने धावले.
xxxxxxxxxxx
एन थंडीत सावकाराची दातखिळी बसली होती..
रात्रीचा थंड वारा त्याच्या दोन्ही कानांतून आत घुसत होता..शरीरात घुसून हाड - मांस गोठवत होता.
भीतिने सावकाराचा कोंबडा , कासव, बैल सर्व बनून झाल होत.
दोन्ही हात छातीशी पकडून घाबरलेली नजर अद्याप त्या खड्डयावर स्थिरावलेलीच होती.
तब्बल पाच जण त्या खड्डयात पडली होती -
पण त्यातला एकही वर आला नव्हता ! आल्या होत्या त्या फक्त त्यांच्या किंकाळ्या- मरण यातना देणा-या किंकाळ्या- हाड फोडुन खाल्ल्याचे आवाज, लचके मारून खाल्लेल्या मांसाचा आवाज..
आणी शेवटला आलेला तो चंमनचा आवाज..
" सावकारssss..!"
खड्डयातून हळू हलू पांढरट धुर बाहेर येऊ लागल..
काडी पेटी विझल्यावर कस वाकडतिकड धुर निघत तस ते धुर होत.
" शोण्याsssss..!"
हिमवातावरणात तो लाडीकस्वरातला आवाज घुमला. सावकाराच्या कानांना ह्या आवाजाची ओळख होती..
सावकार विस्फारलेल्या नजरेने समोर पाहत होता,
छाती फुग्यासारखी फुगत होती. भीतिने नाक बंद झाल होत..तोंडावाटे श्वास सुरु होते.
" शोण्याsssss..ईकडे येतो ना ..?"
पुन्हा तीच लाडीक स्वरातली हाक आली.
सावकाराची मृत आई त्याला ह्या नावाने हाक मारायची.
खड्डयातून एकापाठोपाठ दोन लाडीकस्वरातल्या हाका आल्या होत्या.
परंतू सावकार जागेवरून हळला नव्हता..त्याला ठावूक होत - आपली आई मेलीये..मेलेला माणुस परत येत नाही ! कधीच नाही!
आणी समजाच जर मेलेला माणसाची कोठून हाक आली, तर त्या हाकेला ओ देण आणि त्या दिशेने जाण म्हंणजे..- मृत्यु पत्कारण होय!
" शोन्या..!" तिस-यांदा लाडीक स्वरातली हाक आली..
सावकाराचे पाऊल पुढे जाण्या ऐवजी मागे गेले..
तसा तो आवाजातला लाडीक स्वर बदल्ला..
राकिट,उर्मट, रागिट झाला.
" शोन्या ईकडे ये..नाहीतरsss हिहिहिही!"
खड्डयातून निघणा-या धुक्यासहित ते ध्यान उडी घेत बाहेर आल.
शरीराने अगदी काठीसारख, पातळसर,कुपोषित देह होत . अंगावर हिरव लुगड होत- डोक्याचे पिंजारळेले पांढरट केस कोंडा होऊन बसले होते. हातापायाची कातडी- पांढरट काली पडली होती.. डोळ्यांच्या खोबण्या काळ्या पडल्या होत्या..त्यात पिवळ्या रंगाचा मीरी एवढ़ा ठीपका चमकत होता .
कपाळावर मयताच्या चांदीचा एक रुपया चिकटला होता..
दात विचकत ते ध्यान हसल..हसताच त्याचे ते धारधार पिशाच्छी दात बाहेर आले.
" शोन्या..! हिहिहिहिही..यव..यव..यव..! माझ्या जवळ..ये शोन्या....!" त्या ध्यानाने आपले दोन्ही काठीसारखे हात पुढे पसरवले.. दोन्ही हाताची नख कालसर हिंस्त्र श्वापदासारखा धारधार होती.
" नाय..नाय....!"
सावकार मागे जात होता.
" अरे मी तुझी आई आहे..पोरा..मला घाबरतो..!" घोगरा खर्जातला आवाज..
" नाही..नाही....तू आई नाहीस..! माझी आई मेली .. मेलेला माणुस परत येत नाही... तू..तू.. सैतान हाईस सैतान हायेस..तू..! तू माझ्या मांणसांना मारल..! "
" मारल?" ह्यावेळेस आवाज आला तो किन्नरी...
त्याने मान वाकडी केली..दोन्ही बोट तोंडात घुस्वून खुद्दकन हसल..
" मारल फिफिफिफिफिफ.."खांदे हलवत ते येड्यासारख हसत होत." मारल नाही मी त्यांना..खाल्ला एकेकाला, नरडी फाडून रक्त प्यायले मी, मांस चावून चावून खाल्ल, आणी हाड स्ल्ल्प."
तीने ती काळसर पाच इंच लांबीची सरड्यासारखी जीभ पांढ-याफट्ट ओठांवरून फिरवली.
" हाड फोडूनफोडून खाल्ली हिहिहिहिहिहीहीहीही! माझ्या शोन्या माझ्या जवळ ये ना रे , मला खुप भुक लागले ..! तुझ गरम रग्त " तीने नाकावाटे वास घेतल..
" मस्त वास येतोय तुझ्या रक्ताचा , मांस पन आहे अंगावर , हाड पन भरलेली आहेत..! ये ..माझ्या जवळ ये .." ते एका हाताने इशारा करत होत..
सावकाराला आपल्या दिशेने बोलावत होत..
पन सावकार मात्र प्राणभयाने भीत भीत मागे सरकू लागला होता.
तोच तो मागे कोणालातरी धडकला..
सावकाराच्या छातीत कळ आली.. तोंडाचा- आ वासला डोळे मोठे झाले..कपाळावरून घामाची वाकडीतिकडी धार खाली येऊन वेगाने पुढे निघुन गेली.
सगळ संपल होत - ह्या आर्वीभावात त्याने डोळे बंद केले.. तोच तो ओळखीचा आवाज आला.
" सावकार , डोळ उघडा माग बघा कोण आलय..!" आवाज सामान्य होत ओळखीच होत.
" बाल्या..?" सावकारांनी वळून मागे पाहिल..
मागे अघोरी बाबा उभे होते. जरा बाजुला बाल्या उभा होता.
" बाबा..बाबा..इपरीत घडलंय..! "
" सर्व ठावूक आहे मला..! आता मी आलोय ना , मी बघतोच.!" सावकाराने मान हळवली अघोरीबाबांच्या मागे जाऊन उभ राहिला.. त्याच्या मनातली भीति आता जराशी कमी झाली होती.
" काय रे ए , तुझी हिंम्मत कशी झाली.इथं यायची"
" ए बिन आमंत्रणाचा पाव्हणा नाही मी..! आमंत्रण घेऊन आलोय त्या सटवीच.."
" आमंत्रण? फिफिफीफीफिफिफीफी!" तोंडावए हात ठेवून ते ध्यान पुन्हा हसल..
" आमंत्रण नाय , मौतेची तिकीट भेटली तुला..
मरणार तू...मरणार..! तुझ्या संग संमद्यांचा मूडदा पाडणार..ती..! शेवटची फेरी आहे तुझी म्हाता-या ..
तू बी भटकणार इथ आमच्या सारखाफ़ीफिफीफी..!"
अचानकच ते ध्यान बाबांच्या अंगावर धावल..
बाबांना त्याच्या ह्या कृतीची जणू जाणिव नव्हती..
दोन्ही हात पूढे करत ते वेगाने बाबांच्या दिशेने आल..
तोच बाबा बाजुला झाले, त्यांच्या मागे सावकार उभा होता.. ते ध्यान सावकाराच्या अंगावर धावल ..पण सावकार सावध होता त्याने..त्या ध्यानाला धक्का दिला... जरा बाजुला बाल्या उभा होता..बाल्याच्या दिशेने ते गेल.. माकडासारखी जागेवरून उडी घेतली.. जी थेट बाल्याच्या अंगावर .होती.
. भ्यायलेल्या बाल्याच्या अंगावर ते ध्यान पडताच बाल्याच तोळ गेल..
" आ..आ..आई....!"
बाल्याच्या छाताडावर ते ध्यान बसल होत..
त्या ध्यानाने आपला जबडा वासला ..तोंडातून चार पिशाच्छी दात बाहेर आले..तेच बाल्याच्या नरडीत घुसवले..
" आssssss..!" बाल्या मुळाच्या देठातून ओरडला.
" बाल्या..!" अघोरीबाबांनी अस म्हंणतच - कमरेला बांधलेली कापडी पिशवी काढली..ती पटकन खोल्ली..आणी मुठीत पांढरट राख घेऊन ते खाली पडलेल्या बाल्या जवल पोहचले..
अघोरी बाबांनी समोर पाहिल...
बाल्याची हालचाल होत नव्हती..त्या ध्यानाने त्याच जिव घेतल होत..अघोरीबाबांचा संताप वर उफाळून आला...त्यांनी हातातली राख ..त्या ध्यानाच्या अंगावर फ़ेकली..जे अद्याप बाल्याच्या प्रेताच रक्त ग्रहण करत होत.
राखेच स्पर्श होताच... त्या ध्यानाच्या पांढ-या पिठाच्या कातडीवर कालसर - तांबडे विस्तवासारखे डाग पडले..त्यातून पांढरट धुर बाहेर पडू लागला..
" आर्घ्र्ग्र्ह्ग्र्ग्र्ग्रह्ह्र्ह्रह! माता....माता...माता.... " किन्नरी स्वरात ते ध्यान ओरडल.. ती किंकाळी उभा कब्रस्तानाला झोपेतून उठवून गेली..
xxxxxxxxxxxx
" हा आवाज ..हा..आवाज.! लवकरच चला लवकर चला.." निळ्या - आवडी ,पिया..
तिघेही त्या आवाजाच्या जवळ पोहचले होते..
xxxxxxxxxxxxx
ते ध्यान जागेवर उभ राहिल.. हाता पायाच्या काड्या होत्या. अंगावरच प्रेताड मांस त्या शुभ , शुद्ध राखेच्या स्पर्शाने जळायला सुरुवात झाली होती.
" माते..माते...! वाचव..वाचव..!..."
ते आपल्या मालकीणीला हाक देत होत
जागेवरच त्या ध्यानाच्या हातापायांच मांस खाली जमिनीवर गळून पडू लागल..जमिनीवर पडताच
त्या मांसाला आग लागून ते प्लास्टीक सारख पेट घेत होत..आतून काळसर विषारी धुर निघत होत..
सावकार डोळ्यांतून अश्रु गाळत समोर पाहत होता..त्याच्या आईच्या देहाच हे काय होऊन बसल होत ?
शेवटी त्या ध्यानाच सर्व शरीर सावकाराच्या नजरेसमोरच जमिन दोस्त झाल - पांढरट हाड जमिनिवर पडली होती..आणी त्या हाडांवर जळणार ते मांस चिटकून बसल होत...आणी ती डोक्याची कवटी जबडा विचकून हसत होती..
" बाल्या, माफ कर मला ! मी वाचवू नाही शकलो तुला ! " अघोरीबाबांनी त्या कापडी पिशवीतली पांढरट राख एका मुठीत घेतली..
अघोरी बाबांना ठावूक होत - ही लालसटवीची लुचाई ज्याला डसेल तो तसंच बनणार होता.
त्यांनी हातातली पांढरट राख बाल्याच्या निर्जीव अंगावर फेकली, चामडीला त्या राखेचा स्पर्श होताच..
एसीड ओतल्याप्रमाणे त्वचा , मांस, हाड वितळली जाऊ लागली.
सावकार डोळे विस्फारून पाहत होता..त्याच्या साठी हे सर्व आश्चर्यकारक , अनाकलनीय,अतर्कनीय होत .
" अंबो बाबा .....अंबो..बाबा..!"
अघोरीबाबांच्या नावाने हाक मारल्याचा आवाज आला ..त्यांनी गर्रकन वळून मागे पाहिल..
धुक्यातून तीन आकृत्या धावत बाहेर आल्या..
ह्या तिघांच्या पुढ्यात येऊन थांबल्या...
एक मुलगा होता , तर उर्वरित दोन मुली होत्या..
" निळ्या..? तू..?" अघोरीबाबा म्हंणाले..
:
xxxxxxxxx
" अंस आहे काय!"
अघोरीबाबा आपल्या सर्वाँकडे पाहत म्हंणाले.
त्यांच्या पाठिमागे उजव्या बाजुला निळ्या- आवडी ,पिया उभी होती.
डाव्या बाजुला सावकार एकटाच हाताची घडी घालून उभा होता .
निळ्याने थोडक्यात ढ़ाब्यापासून ते आतापर्यंत जे काही घडल ते सर्व अघोरीबाबांना सांगितलं होत.
वातावरणात ह्या कठीण परिस्थिच गांभीर्य जाणवत होत.
अघोरीबाबांनी होकारार्थी मान हळवली गर्रकण मागे वळले .
" ती काचेची बरणी?" अघोरी बाबा ईतकेच म्हंणाले.
:" मला त्या पादरीच ते भयाण रुप पाहून माझी किंकाळी नाही दाबून ठेवता आली.! मी किंकाळो .. अण्णाच्या हातून ती बाटली सटकली आणि फुटली ती , "
निळ्या तोंड पाडून म्हंणाला.
अघोरीबाबांच्या चेह-यावर गंभीर भाव होते..त्यातच त्यांनी डोक होकारार्थी हळवल.
" संमद नियतीच खेळ हाई! होतय ते संमध विधिलिखित हाई..! थांबवणारे आपण कोण?
पण हा लढ़ा आहे, जिंकाव लागल, इथं बाहेर पडायचं तर तिला हारवावच लागल.."
" तिला? तिला म्हंणजे कोणाला.!"
आवडीने न समजून विचारलं.
अघोरीबाबांनी दोन्ही डोळे मोठे केले डावीकडूनउजवीकडे फिरवले आणि हळूच मान पुढे करत म्हंणाले.
" एकदाच नाव घेतो वापस उच्चारू नका..! "
सर्वाँनी एकमेकांकडे पाहून डोक होकारार्थी हळवलं.
अघोरीबाबा पुढे म्हंणाले.
" ती म्हंणजे , लालसटवी."
अघोरीबाबांच्या तोंडून जस हे वाक्य बाहेर पडल..
एक अदृश्य थंड हवेचा झोत आला..
सर्वाँच्या अंगावरून फिरून पुढे निघुन गेला..
त्या थंड हवेच्या झोताने सर्वाँच अंग शहारल..
" गेल हरामखोर सांगायला..! " बाबांनी दात ओठ चावले.
" बाबा ही तीच जे तुम्ही नाव घेतल..! ती त्या बाटलीत लाल धुरात कैद तर नव्हती? !" आवडी म्हंणाली.
" होय ही तीच हाई..! "
" बाबा हिच्या बद्दल तुम्हाला काही ठावूक आहे का? म्हंणजे ती इथे कशी आली वगेरे वगेरे..!"
" नाही ती इथ कशी आली , मला हे ठावूक नाही !" अघोरीबाबांनी एक मोठा श्वास आत घेतला..तो हळकेच सोडत पुढे म्हंणाले.
" खरंतर हे ध्यान आपल्या हिकडच नाही. इंग्रज जव्हा ईथे आले त्यांच्या बरोबरच बाहेर देशातन ती बी आली. "
" आली म्हंणजे?" आवडी म्हंणाली. निळ्या - पिया - सावकार तिघांनी तिच्याकडे पाहिल.
मग पुन्हा बाबांकडे पाहिल..
अघोरीबाबा गंभीर स्वरात बोलू लागले.
" आली म्हंणजे हिला बोलवायची एक इज्ञा असते . जी फक्त इल्यूमिनाती वाल्यांनाच ठावूक असते. "
" इल्यूमिनाती म्हंणजे सैतानाचे हस्तक का ?"
आवडीला हे सर्व भूतांच्या गोष्टी वाचुनच कळल होत.
" व्होय बरोबर ! सैतानाला पुजणारी मांणस..त्यांना सैतान म्हंणल तरी चालतय. हिला बोलावण्यासाठी एक विधी करायची असते , ते मी तुम्हाला सांगू शकत नाही ..! पन हा , मंत्र सोडले तर मात्र मी थोडस तूम्हाला सांगतो , हिला बोलवायचं असल - तर एक विचीत्र, अघोरी, कामूक विधी करावी लागते. "
" विचीत्र , कामूक, विधी..? कोणती.?"
" सांगतो ऐका ( बाबा सांगू लागले) लालचंद्र उगवतो अश्या दिवशी तेवीस कुमारीकेंचा नग्न अवस्थेत लालसटवीच्या मुर्तीसमोर बळी द्यायचा- आणी सर्व बळींच्या देहातून निघालेले रक्त एका खड्डयात साठवायचं..! मग एका वांझोटी स्त्रीला , देहावर एकही कपडा न घालता पुर्णत नग्न अवस्थेत त्या रक्ताळलेल्या खड्डयात बुडवून मारायची.."
अघोरीबाबा चेह-यावर थंड भाव ठेवत म्हंणाले.
त्यांचा तो थंड चेहरा - आणी ती माहीती ऐकून सर्वाँच्या अंगावर भीतिचे टोकदार खिळे ठोकले गेले होते..अंग थरथरत होत.
माहीती खुपच भयावह होती.
"एकदा त्या वांझोटी स्त्रीच बळी दिल गेल ,की ते लाल रक्त तिच्या योनीमार्गातून आत प्रवेश करत आणी मग सैतानी शक्तिंमार्फत निसर्गाचे नियम तोडले जात - त्या रक्तामार्फत मेलेल्या वांझोटी स्त्रीच्या पोटात एक गर्भ तैयार होतो..! मग त्या वांझोटच प्रेत रक्ताळलेल्या खड्डयातून बाहेर काढल..जात... "
बाबांनी डोळे मोठे करून त्या सर्वाँकडे पाहिल..
" त्या वांझोटी स्त्रीच प्रेत बाहेर काढल जात..तेव्हा तिच पोट फुगलेले असत..- आणी लालसटवीचा जन्म झालेला असतो. मग ते गर्भ आपोआप मृत स्त्रीच्या योनीमार्गातून बाहेर येत..
तुम्हाला सांगतो..ते जन्माला आलेल पोर त्याच्या देहावरची पुर्णत चामडी लाल रक्ताची असते..-
डोळे घुबडासारखे मोठे असतात - पांढरती बुभळ पन जरासे पिवळे झालेले- त्या गोळसर काळा टीपका असतो, दात पिशाच्छी टोकदार असतात- पायापासून ते कमरेपर्य्ंत भाग पुरुषी तर वरच भाग स्त्रीच असत..
आणी..!"
" ब..ब..बाबा..! म..म..मी काय बोलते आ ..आपन माहीती कधीतरी नंतर ऐकू ..! तसंही तिच्याशी आपल्याला काही गरज नाही..! आपण एक काम करूया इथून सटकूया ना , कशाला उगीचंच विषाची परिक्षा..!" पिया एका दमात म्हंणाली..
तिला पुढे ती भयाण विधी ऐकायची नव्हतीच.
पन तिच्या त्या वाक्यावर अघोरीबाबा हसले ..
" तुम्हाला वाटतं, ती तुम्हाला अशीच जाऊन देइल.! तर ते साफ खोट आहे. हे बघा ( अघोरी बाबांनी बाल्याच्या देहाच्या सांगाड्याची झालेली काळी राख दाखवली )इथून सुटका हवी असेल तर ही अशी भेटल..!"
निळ्या - आवडी, पिया , सावकार चौघांनी आवंडा गिळला.
अघोरीबाबा पुढे बोलू लागले.
" इथून सुटका तिला संपवल्याशिवाय भेटणार नाही..कारण ती हिंसक आहे, रक्ताच्या एक एका थेंबासाठी हवरटलेली आहे..! तिच्या जाळ्यातून सुटायचं असल तर एकच मार्ग हाये..- एक तर तिच्या हातून मरा , नाहीतर तिला तरी मारा..!"
पियाने घाबरत आवडीकडे पाहिल..
दोघिंचीही नजरा नजर झाली - तसा झटकन दोघींनिही आवंढ़ा गिळला.
" तिला मारायचं म्हंणजे ? अण्णाला माराव लागेल..!" निळ्या थंड स्वरात म्हंणाला.
" तो आधीच मेलाय पोरा , ज्याच्या देहात ती घुसते ! तेव्हाच मानवाच्या आतील मांस, हाड,अवयव
निकामी होतात.- तीची ती विषारी लालसट धुळीकण
जस वाळवी लाकडाला आतून पोखरून पोखरून खाते तस ती आपल्या शिका-याच देह आतून पोखरून पोखरून काढते..मग उरतो तो फक्त कळेवर..- हाड आणि मांसाचा बाहुला..हिहिहिहिहिही !"
अघोरीबाबा आपले तोंडातले काळे कालसर दात दाखवत हसले .
" होय आणी त्या बाहुलीसमवेत मी हव तस खेळते , हिहिहिहिहिही" घोगरा खर्जातला आवाज आला.
अघोरीबाबासहित सर्वाँच्या नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या.
समोर आडदांड देहाचा अण्णा उभा होता.
अंगावर काळे कपडे, डोक्यावरचे केस पांढुरक्या प्रेताड चेह-यावर पसरले होते...
त्या केसांमधुन त्याचे ते हिरवेजर्द त्यात एक वाकडी चीर असे - सापासारखे डोळे अर्धवट ह्या सर्वाँना दिसत होते.
" आलीस व्हय तू? नाहीतर मीच येणार होतो. तसंबी तू तुझ्या मृत्युच आमंत्रण दिलंय मला!"
अघोरीबाबा ह्या सर्वाँच कवच बनून उभे होते..
त्यांच्या पाठीमागे निळ्या- आवडी,पिया सावकार अशी चार जण उभे राहिलेले.
" ए थेरड्या .." किन्नरी ,स्त्री-पुरुष मिश्रित स्वरात दरडावणारा आवाज अण्णाच्या मुखातून आला .
" मसणातल उष्ट मांस खाणार तू, मला-मला मारणार तू ? "
अण्णाच्या देहात घुसलेली लालसटवी -
दोन पावळ चालत पुढे आली..तोच बाबांनी कापडी पिशवीतली राख बाहेर काढली मूठीत धरली...
तस लालसटवी जागीच थांबली..
" ए म्हाता-या तुला काय वाटतं रे, ही राख माझ्यावर फेकशील आणि मी मरेल? ( अण्णाने मान वाकडी केली..) ह्या प्रेतांच्या राखेने मला मारणार तु..? (अण्णाने पुर्ण जबडा विचकला मान वाकडी केलेल्या अवस्थेतच हसला.) तूला मी आमंत्रण दिलंय खर म्हाता-या थेरड्या ! पन ते माझ्या अंताच नाही , तर तुझ्या अंताच..हिहिहिहिहिही! " मान वाकडी करून ते हसत होते.. हस्तांना अण्णाचे दोन्ही खांदे हळत होते.
" अंग ए भवाने , तुझ अंत तर नाही करू शकत
ही राख , पन तुला कैद करू शकते ना , हा!"
" कैद ? " अण्णाच्या तोंडून लालसटवी म्हंणाली.
वाकडी झालेली मान सरळ झाली..
" मला कैद करण आता सोप्प नाही..! कारण मला कैद करणारी ती दंडगोल बाटली फुटली..- फिफिफीफीफी..! तुकडे तुकडे झाले.. , तो..तो../"
अण्णाने डोक हलवल.त्याचा इशारा निळ्याच्या दिशेने होता.
" तो ..त्या फादरला बगून..ओरडला ! आणी ह्या वेड्या- स्टूपिड कडून ती बाटली निसटली..- आणी खळ..खल..किह्किखिहिखी..- फुटलीsssss "
शेवटचा स्वर लहान मुलीच्या आवाजात मज्जा मस्ती थेर उडवणा-या स्वरातला होता.
अघोरीबाबांच्या चेह-यावर गंभीर भाव पसरले होते.
निळ्या - आवडी, पिया सावकार चौघेही घाबरून त्या ध्यानाला पाहत होते..सर्वाँसाठी हे रोजच्या सामान्य जिवनात घडणा-या घटनेंपेक्षा कितीतरी आगळ वेगळ क्षण होत.
ह्या सर्वाँनी कधी कल्पनेत सुद्धा ह्या क्षणांची ह्या वेळेची विचारधारा केली नसेल. हे जग किती वेगळ आहे आणि कित्येक अनाकलनीय रहस्यांनी भरले आहे , हे आजतागायत कोणीही पाहिल , किंवा अनुभवल नाहीये. पन त्यातल थोडस का असेना ह्या सर्वाँना पाहायला अनुभवायला मिळत होत.. जर पुढे जाऊन हे सर्व इथून बचावले ? तर नक्कीच ही सर्व घटना त्यांच्या मेंदूच्या आठवणीत कायम कोरली जाणार होती- हे विधिलिखित होत.
" ए म्हाता -या , मसणात रहाणारा तू , प्रेतांची राख अंगाला लावणारा तू ? तुझ मांस मला चवीष्ट लागणार नाही- म्हंणून माझ ऐक , ह्या चौघांना इथ सोडून तू आल्या पावळे निघुन जा ! असं समज मी तुला मृत्यूची भीक दिली..!" अण्णाच्या एका साईडच्या ओठांवर कुत्सिक हसू उमटल.
" ह ह हा..हा हा हा !"
अघोरीबाबा हसू लागले.
त्यांच्या हसण्याचा अर्थ त्या लालसटवीला मात्र कळल नाही.
अण्णाची मान वाकडी झाली ओठांवरच कुत्सिक हसू ओसरल.
" अंग मला जिवाची इतकी पर्वा असती , तर मी इथ आलो असतो का ? "
" तू तुझी हद्द ओलांडतोयस म्हाता-या."
" हद्द ओलांडण आवडत मला."
" फाडून खाईल तुला मी .."
" आधी हात तर लावून दाखव ..!"
" शेवटच सांगतीये..ऐक माझ.! त्यांना माझ्या हवाली कर !"
" त्यांना हात लावायच्या अगोदर माझ्याशी लढ !"
" तू असा ऐकणार नाहीसच म्हाता-या !"
" ऐकायला मी तुझा गुलाम नाही !"
अघोरीबाबा लालसटवी दोघांचिही शाब्दिक चकमक सुरु होती.
प्रत्येक वाक्यावर अण्णाच्या देहात असलेली लालसटवी विचीत्र आवाजात गुरकत होती..तीचा तो आवाज भयप्रद होता..कानांचे पडदे टरकत होते..
आकाशात भयान आवाजाच्या वाकड्या तिक्ड्या सळसळत्या निळसर विजा कडाकडल्या होत्या..युद्धाची रणशिंग फुंकली जात होती.
" बस्स थेरड्या ..बस्स, मी तुला इतकी जिवाची भिक देऊन ही तू तुझी औकाद दाखवलीच आता नाही मी तुझ शिर कापून ह्या कब्रस्तानावर झुंबरासारख टांगल..! आण तुझी ही फडफड चालणारी जीभ आगीवर भाजुन खाल्ली तर नाव नाही सांगणार - ला .ला..ला..लालसटवी...!"
अण्णाने आपल्या काठीसारख्या हातांच्या दोन्ही मूठी झटकल्या..
हातांच्या नखांची लांबी चार इंचाने वाढली..
हिंस्त्र , रानटी श्वापदासारखी धारधार पौलादी झाली...
अण्णाने डोक - पाठ जराशी वाकवली..
दोन्ही हात पुढे केले..
" मागे व्हा मागे व्हा तुम्ही संमदे..!"
अघोरीबाबा पटकन म्हंणाले.
निळ्या- आवडी, पिया , सावकार जरा मागे आले..
पुढे घडणार युद्ध पाहू लागले.
अण्णा अघोरीबाबांच्या दिशेने धावला..
दण दण पावळे उचलत त्यांच्या दिशेने येऊ लागला.
अघोरीबाबांनी कापडी पिशवीतली राख हातात घेतली..तीच पुढून धावत येणा-या अण्णाच्या दिशेने फ़ेकली... ती साधारणशी राख जशी अण्णाच्या शरीरापासून चार हात लांबीवर येऊन पोहचली होती..तोच त्या पांढरट राखेच रूपांतर लहान लहान चंदेरी चमकील्या- चमचमत्या धुळीकणांत झाल..
आणी ती चमचमती धुळीकण त्या ध्यानाच्या अंगावर पडली...
कपड्यांवर आगीची एक ठिंणगी पडल्यावर तिथल्या जागेवर एक छोठस छिद्र पडत ..तसंच छिद्र
अण्णाच्या कपड्यांवर - मग हाता- पाय, चेह-यावर पडली..- त्वचा , फाटली..मांस होरपळल्यासारखा आतून करपट धुर बाहेर पडला..
" आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह!" ते जागेवर उभ राहून आकाशाकडे पाहत ओरडल .
तो आवाज तिथे उपस्थीत सर्वाँचे कानाचे पडदे फाडून गेला... शेवटी आवाज असहनीय होऊन सगळ्यांनी कानांवर हात ठेवले.
फक्त अघोरीबाबांनी कानांवर हात ठेवले नव्हते..ते त्या ध्यानाकडे पाहत होते.
अण्णाच तोंड उघडल होत..
जबडा हळू हळू रबडसारखा निताळणा जात होता..
मोठा मोठा होत होता..तोंड फाटल जात होत..
वासलेल्या जबड्यातून शरीरातून वेगाने लालरंगाची धुळीकण बाहेर पडली..आकाशात सापासारखी वाकडीतिकडी भिंगू लागली ..आणी तीने मार्ग हेरला...ती लालसट धुळीकण वेगाने बाबांच्या दिशेने आली..बाबांनी दोन्ही हाताचे पंजे तोंडावर ठेवले आणि हळुच खाली झुकले..
ती लालसटवी मागे निघुन गेली..
" तोंडावर हात ठेवा, तोंड उघडू नका पोरांनो.!"
ते मागे पाहत मोठ्याने ओरडून म्हंणाले.
निळ्या, आवडी- सावकार तिघांनिही वेळीच तोंडावर हात ठेवल..- पन पिया? तीची मात्र वाचा बसली होती..ती तोंडाचा आ- वासून मागे मागे सरकत होती.
लालसटवीला अजुन काय हव होत..भीतिच तर तीचा खुराक होती. ती लालसट धुळीकण वेगाने सापासारखी वळ् वलत तिच्या दिशेने आली..उघड्या जबड्यातून लालरंगाची विषारी वाफ फव्वा-या सारखी कोंबून कोंबून आत घुसली..
" पिया...नाहीssssssss"
....
बूटक्या जाडसर पियाने झटकन मान खाली घातली होती...डोक्यावरचे केस सूटून चेह-यावर लोंबकळत होते..
" हिहिहिहिहिहिही फ़ीफिफीफिफ.."
तोच तो किन्नरी -स्त्रीपुरुष मिश्रित हसण्याचा आवाज पुन्हा घुमला.
क्रमशः ...