Kouff ki Raat - 25 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | खौफ की रात - भाग २५

The Author
Featured Books
Categories
Share

खौफ की रात - भाग २५

भाग 25

लेखक -जयेश झोमटे



महत्वाच संदेश- सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्वकाही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी

फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत🙏

ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने भूत,प्रेत, अंधश्रद्धा दाखवली आहे - पन, लेखकाचा ह्या कथेवाटे समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही. जर कोणी लेखकाला पर्सनल मेसेज करून आक्षेपार्ह मेसेज आणि वागणूक दिली- तर कायद्यानूसार कारवाई करून कडक, एक्शन घेतली जाईल!

सदर कथेत शुद्धलेखनाच्या चुका असू शकतात तर कृपया करून लेखकास समजून घ्या !

लेखक चुका सुधारण्याचा प्रयत्न करत आहे ..

धन्यवाद

कथा सुरु

कब्रस्तानाच्या अवाढव्य गेटमधुन एम्बुलेंस आत शिरली. मागच दरवाजा उघडला गेला.

उघड्या दरवाज्यातून प्रथम सावकार बाहेर आला, मग त्याच्या पाठोपाठ त्याचे गुंड बाहेर आले.

एम्बुलेंसच्या पुढून वॉर्डबॉय धावफ मागे आले आणि त्यांनी सावकाराची म्हातारीच प्रेत ठेवलेल स्ट्रेचर बाहेर काढल ...खाली जमिनीवर ठेवल.

अमुश्याच्या काळ्या रात्री आकाशात काळे ढग पसरलेले, अंधारात सुद्धा गडद पांढर धुक वाहतांना दिसत होती.

मोठ मोठाल्या कबरी गुढ नजरेने ह्या मानवी आकृत्यांना रोखून पाहत होत्या.

पांढ-या कापडात म्हातारीच प्रेत स्ट्रेचरवर गुंडाळून ठेवलेल, वॉर्डबॉयझनी प्रेत स्ट्रेचरवरून जमिनीवर ठेवण्यासाठी म्हातारीचे हात पाय कापडासहितच धरले..तसा सावकार खेकसलाच..

" ए काय करतो?"

" साहेब स्ट्रेचर परत घेऊन जाव लागल ना ?
नाय तर हॉस्पिटवाली कामावरून काढतील!"

" असं !" सावकाराने कमरेत खोवलेली काळ्या रंगाची जुनी स्टाईल पिस्तूल बाहेर काढली.

पिस्तूल पाहून त्या बिचा-यांनी आवंढा गिळला.

" माझ्या आईला स्ट्रेचरवरून उचलून दाखव तू?
नाय ना तुला त्याच स्ट्रेचरवर झोपवला तर नाव नाय सांगणार "

" अहो साहेब , हा येडा आहे हो !" तो दूसरा वॉर्डबॉय बोलू लागला." हा स्ट्रेचर इथच राहुद्या आमच्या इस्पितळात लेय आहेत..!"

पैसे आणी स्ट्रेचर न घेताच दोन्ही वॉर्डबॉयझनी तिथून धुम ठोकली.
धुरळा उडवत एम्बुलेंस गेट मधून बाहेर पडली.
जातांनी वॉर्डबोयझनी सावकाराच्या आईला आणी त्याच्या नावाने चार पाच शिव्या घातल्या होत्या.


" ए खड्डा कुठ खणला रे?" सावकार म्हंणाला.

" सावकार .. बाल्याने खड्डा खणून झालं अस सांगितलं फोनवर , पन बाळ्या काय माहीती इथ दिसत न्हाई हाई ! फोन लावतो तर उचल ना झालंय.."

" अरे खड्डा ईकड आहे !"
अचानक जरा दुरून धुक्यातून बाल्याची नकली- फसवी हाक आली.

" बाळ्या तू हाई का?" त्या गुंडाने आवाज दिल.

" हा मीच आहे ईकड या !" धुक्यातून पुन्हा हाक आली.

" चला सावकार !" तो गुंड म्हंणाला.

सावकार आणी त्याच्याबरोबर दोन जण चालू लागले..आणी उर्वरीत बाकीच्यांनी म्हातारीच प्रेत असलेल स्ट्रेचर तिरडी सारख खांद्यावर घेतल..
आणी आवाज ज्या घुप्प धुक्यातुन आला होता त्या दिशेने चालत निघाले.

xxxxxxxxcc

कोहराम कब्रस्तानच्या शेवटला चर्च होत.
रुंदीने पसत्तीस फुट लांब पसरलेला - सफेद रंगाच्या लाकडाच्या भिंती वीस फुट उंच होत्या - आणी वरच लाल रंगाच कौलारू छप्पर त्रिकोणी आकाराच होत.

त्याच छप्परावर एक तुटलेला क्रॉस लोंबकळत होता - भरवसा नव्हता की कधी -कस तुटून खाली पडेल..

चर्चच्या आत प्रवेश करण्यासाठी एक दोन झापांचा चौकलेटी रंगाचा दरवाजा दिसत होता ..

दरवाज्याची एक बाजू मोडुन खाली पडली होती -तर दुसरी शाबूत होती.

मोडलेल्या त्या दरवाज्यातून चर्चच्या आत पसरलेला जहरी अंधार नजरेस दिसत होता -त्या अंधारात पाहता ,संमोहिंत झाल्यासारख वाटत होत..
तो अंधार खोळ-अगदी खोळ गर्तेत घेऊन जाणा-या गढूळ पाण्यासारखा होता -किती खोळ असेल? सांगता येत नव्हत !

चर्चच्या आजुबाजुला चार पाच मोठाली झाडे होती- झाडांमागे आठ फुट उंचीच कंपाउंड होत ,- ह्याचा अर्थ ही कब्रस्तानाची शेवटची बाजू होती.

दरवाज्याची एक फळी तुटली होती..त्या फटीतूनच म्हातारा पांडू त्याच्या बायकोला शोधत आत घुसला होता.

हॉलमध्ये डावि आणि उजवीकडे चार चार असे मिळून आठ लाकडी बाक होते.
आणी समोर येशूची क्रॉसवर चिटकलेली..पाच फुट उंच आकाराची मुर्ती होती..

भगवंत येशूच्या मुर्तीच्या , डाव्या हाता बाजुला
एक लाकडी जिना होता... त्या जिन्यावरून पांडू लाकडी रेलींगवर हात ठेवून उभा होता
पांडूच्या हातात एक पेटता कंदील होता..त्याच तांबुस प्रकाशात त्याने हलू हळू जिना चढ़ायला सुरुवात केली..

xxxxxxxxxx


सोपान - निळचंद्र दोघेही कोहराम कब्रस्तानाच्ब्या आत आले होते.

" आईला सोपान..! दोनशे - तीनशे रुपयांसाठी
आपन आपला मित्र गमावला रे !"
निळ्या रडकूंडीला येत म्हंणाला.

" निळ्या, अमोल बद्दल मला पन जाम वाईट वाटत आहे रे , पन आता रडू काय उपयोग नाय ना , आता आपल्याला आपल जिव वाचवायचं आहे..!
तो अण्णा रांxxxचा कधी पन इथं येईन...! त्याच्या अगोदर आपण त्या घरात कोण तरी गेलं..त्याची मदत घेऊ चल!" सोपानच्या वाक्यावर निळ्याने मान हळवली .
ते दोघे धावत चर्चच्या पुढे आले..

समोर चर्चच तुटलेल दार पाहून निळ्याने सोपानकडे कसतरीच पाहिल..

" आईची गांxx, तू ह्याला घर म्हंणतो .
अरे हा तुटलेला चर्च आहे इंग्रजांचा , आणी ह्या असल्या तुटळ्या फुटल्या जागेत कोण राहत असेल रे? तुझी उतरली आहे ना नक्की, की भुत दिसल तुला..?" निळ्या जरा रागात म्हंणाला.

तोच अचानक बंदुकीची गोळी झाडल्याचा आवाज आला..आणी मग कब्रस्ताना मागे असलेला गेट उघडल्याचा आवाज आला..
" कुईईईईईईईई!" .कब्रस्ताना मागे एक टाळ लावलेल बंद गेट होत तेच अण्णाने बंदुकीमार्फत उघडल होत....

धुक्यातून गेटच्या दोन झापा उघडल्या आणि सहा फुटी एंडरटेकर अण्णा झपकन आत आला..

बारीकसे डोळे आणी खप्पड चेह-याच डोक त्याने डाविकडून- उजवीकडे एका लयीत फिरवल...

डाव्याबाजुला दुर धुक्यात त्याला एक चर्च दिसल तसे त्याने डोळे बारीक केले..बंदुकीवरची पकड घट्ट केली..आणी ताड ताड त्या चर्चच्या दिशेने निघाला..

" आई शप्पथ निळ्या पळ , तो हैवान ईकडच येतोय..!" सोपान भिंतीमागून लपून पुढे पाहत होता..त्याच्या नजरेला काळ्या कपड्यातला , केस मोकळेला सोडलेला अण्णा त्यांच्या दिशेनेच येतांना दिसत होता.

दोघांनाही मागचा पुढचा विचार न करता थेट त्या उघड्या दरवाजातून आत प्रवेश केला.

पन अनावधणाने घडलेल्या ह्या क्रियेची त्यांना खुप मोठी किंमत चुकवावी लागणार होती.
कारण ते ज्या दरवाज्यातून घुसले होते.. ती जागा पछाडलेली श्रापित होती.

एका अखंड अमानवीय शक्तिचा साक्षात येशूच्या चर्चमध्येच वास्तव होत.

दोघेही चर्चमध्ये घुसले...
आजुबाजुला कुठे लपायला जागा आहे का ते पाहू लागले ... हॉलमध्ये डाव्या उज्व्याबाजूला एका रांगेत
खुपसारे बाक होते..हे तिघे त्याच बाकांना खाली लपून बसले.

त्यांच्या थरथरत्या भयप्रद नजरा तूटलेल्या दरवाज्यावर खिळल्या.

xxxxxxxx


" ए ईठे...!" पांड्याने पहलकिशी हाक दिली.
हा चर्चचा दुसरा मजला होता.. एकप्रकारे मालाच म्हंणूयात .

आजुबाजुला कालोखी घुप्प अंधार होता, पन पांडूच्या हातात कंदील होता ना ? कंदिलाच्या प्रकाशात दहा पावलांवरच साफ दिसत होत.

माल्याला खाली लाकडी बांधकाम केल होत.आजुबाजूला लाकडी भिंती होत्या - लाकडाचेच चौकोनी खांब होते. जिथे पहाव तिथे कोळ्यांची जळमटे लागली होती. फक्त समोर पंधरा पावळांवर ती एक चौकोनी क्रॉसच्या आकाराची शवपेटी सोडून पुर्णत माला रिकामा सुनसान होता.

पन तिथे कोणाचीतरी अदृश्य आस्तित्वाची चाहुल लागत होती. पावळो क्षणि क्षणि भास होत होते .

त्या चौकोनी पेटीला पाहून पांडूची उत्सुकतता चालवली गेली. कारण आपली पत्नी ह्या माळ्यावरच आली होती. मग गेली कुठे ? ह्या माळ्यावर त्या चौकोनी पेटीशिवाय आणखी काहीच नाही , मग माझी बायको ह्या पेटीत लपली असेल तर ? पाहायल हव !
त्याच्या मनात चाललेली घालमेल. शेवटी हातातला कंदील जरासा वर उचलत तो चालत शवपेटीपाशी
निघाला- कंदीलाचा प्रकाश , चेह-यावर आणी त्याच्या अवतीभवती एक गोलवर्तुळाकारीत रिंगण बनवत होता.
xxxxxxx

" आई शप्पथ निळ्या , आपण इथ लपलोय खर ! पन त्याला दिसणार नाही ना ?दिस्लो तर डायरेक्ट गोळी घालेल ना तो ? "

" सोपान गप्प बस्स , तो आपला आवाज ऐकेल!"

मध्येच ' धाड ' आवाज झाला.

दोघांनी गर्रकन दरवाज्यात पाहिल..
दरवाज्याची दारूड्यासारखी झुकलेली फळी जमिनीच्या गटारात पडली होती. आणी तिला पाडणारा अण्णा होता.


बंदुक हातात घेऊन तो चौकटीत उभा होता.
त्याची ती कृष, दानवी आकृती अंधारात अजुनच भयावह दिसत होती.

दोन्ही बारीकसे जिवणी असलेले डोळे हळुवारपणे तो डावीकडुन उजवीकडे फिरवत होता.

पन डोळ्यांना अंधारात अंधुक दिसत होत..त्याचाच फायदा ह्या दोघांना झाला होता.

अण्णाच्या शोधक नजरेला उजव्या हाताला असलेला जिना दिसला ..त्याने जिन्यावरून वर पाहिल..शेवटच्या आंतिम पाय-यांवरून पुढच्या लाकडी भिंतीवर आगीचा तांबडसर प्रकाश पडला होता. ..तो पांडूच्या हातातल्या कंदिलाचा प्रकाश होता .

" असं आहे काय? वर लपला आहात ? "
अण्णा खूनशी हसला. त्याने हातातली बंदुक गच्च पकडली.. आणी बाकांच्या मधोमधच्या वाटेतून ताड ताड पाय आपटत जिन्यापाशी पोहचला.. जिन्याच्या पाय -या चढु लागला.

xxxxxxxx

पांडू शवपेटीपाशी पोहचला होता. शवपेटीपाशी पोहचताच जरा घाणेरडा कुजकट वास नाकांत गेला होता..तस त्याने नाकावर हात ठेवल..
मग ती शवपेटी निरखून पाहू लागला.
चौकोनी आकाराची तुळतूलीत स्टाईलीश डिजाईनची
शवपेटी होती ..
लांबीने साडे पाच फुट उंच होती. शवपेटीवर एक चांदीचा क्रॉस ठेवला होता...

तो चांदीचा क्रोस वरून पड़ायला नको म्हंणुन शवपेटीला गोल साखली बांधून त्यात तो अडकवून ठेवला होता.

पन का ? कशाच्या हितासाठी? अस काय होत त्या पेटीत ? ईंग्रजांच्यात म्हंणे अशा शवपेटींमध्ये
पिशाच्छ झोपलेली असायची, आणी त्यांना बाहेर यायला नको म्हंणुन क्रॉस ठेवले जायचे ! जर तसंच काहीसा प्रकार इथे असेल तर?


वातावरणात जरासा गारवा वाढला होता
थंड हवा नाकात शिरत होती.

आवंढ़ा गिळुन पांडूने शवपेटीच्या दिशेने हात वाढवला- त्याचा म्हातारलेला हात जरासा थरथरत होता.!
छाती जोराने धडधडत होती.

" ए थांब !" मागून जरासा घोगरा करडा आवाज आला.

त्या आवाजाने आधिच भ्यायलेल्या पांडूची भीतिने वाट लागली गर्रकन वळून त्याने मागे पाहिल..

समोर अण्णा उभा होता.. बंदुक ताणून पांडू कडे पाहत होता.

" कोन आहे तू? इथ काय करतो ?"
अण्णा आवाज वाढवत म्हंनाला.

पांडूला वाटल ही जागा ह्याचीच असावी.
त्यासहितच त्याच्या हातातली बंदुक पाहून पांडूची जागीच फाटली होती.

" म...म..माझ्या बायकोला गवसत आलो आहो.!'
पांडू काफ-या आवाजात म्हंणाला.

त्याच्या त्या वाक्यावर अण्णाने एकवेळ त्याला खालून वर पर्यंत नेहाळून पाहिल..

अंगात एक फाटलेला सदरा, खाली दोन झापांच पांढरट मातीने मळलेल धोतर - त्यासहितच
हात-पाय, चेह-यालाही माती लागली होती.
बोलतांना तोंडातून दारूचा भपकारा वाहत होता.

त्याचं हे रूप पाहून अण्णाला हा कोणीतरी वेडाच वाटला.

" तुझी बायको ?"

" हो इथ माल्यावरच आले की! ह्या पेटीत झोपली वाटत!" त्याने ती पेटी दाखवली..

पांडूच हे वाक्य किती गमतीशीर होत ..त्याच्या त्या वाक्यावर अण्णाने मागे पाहिल आणि गालात हसला.
मग पुन्हा वळुन पुढे पाहील ...


अण्णाला आता खात्रीच पटली की हा म्हातारा पांड्या नक्कीच वेडा आहे.

मग त्याने त्या शवपेटी कडे पाहिल..

तसे त्याचे डोळे चकाकले ..
तो सोन्याचा क्रॉस त्याची लालस जागवून गेला.

" ह्या पेटीत तूझी बायको झोपले ? की तू मारल तिला ? खर सांग नाहीतर पोलिसांना बोलावेल.?"
अण्णाच्या वाक्यावर पांडु घाबरला ..
हाता पाया पडत विनवणीच्या सुरात म्हंणाला.

" अहो काय बी काय बोलता साहेब, मी नाय मारल तिला..!"

" असं मग बाजूला हो पाहू ?"
अस म्हंणतच अण्णा पुढ झाला.

अण्णाच्या खांद्यामागे पांडू उभा दिसत होता..आणी पांडूच्याही मागे दहा- पावळांवर खाली जायचा जिना होता...त्या जिन्याच्या शेवटच्या पायरीवरून दोन डोके वर आले होते. निळ्या आणी सोपान ह्या दोघांची कृती पाहत होते .

" अरे हा आपला गावातला पांडू आहे, पन तो इथे काय करतोय ?" सोपान हळुच पुटपुटला.

" काय माहीत भौ, पन समोर ती शवपेटी दिसते बघ ! त्या पेटीवर चांदीचा क्रॉस आहे..नक्कीच त्या अण्णाला तो चोरायचं असेल ! "

" हो निळ्या त्याचे हावभाव तर तसेच दिसतायेत. ढापण्या साला !" सोपान दात ओठखात म्हंणला.

अण्णाने क्रॉसवर हात ठेवल.
जीभळ्या चाटळ्या.. !

आणी हळुच त्या साखळीतून तो सहा इंच लांबीचा क्रॉस काढून घेतला ..गुपचुप आपल्या शर्टच्या वरच्या खिशात ठेवला.

त्या शवपेटीवरून जस क्रॉस बाहेर काढल..
तस पांडूच्या हातात जळणारा कंदील फडफडला


xxxxxxx



पियाची स्कुटी येऊन , अण्णाच्या जिपपाशी थांबली.

तस तिने स्कुटीच इंजिन बंद केल.
स्कुटीची पिवळी हेडलाईट मात्र सुरू होती.
तेवढ़ाच प्रकाश त्यांच्या सोबती होता.

नाहीतर अवतीभवती काळ्या अंधाराने झाडा- झुडपांना खालच्या जमिनीलाही गिळून टाकले होते.

आणी काळोखी गर्भाने त्या सर्वाँना एक विचीत्र भयप्रद रूप दिल होत..

" आवडे ही गाडी कुठे तरी पाहिल्यासारखी वाटतीये ना?" पिया गाडीवर बसल्या अवस्थेतच म्हंणाली.

" अंग ही गाडी त्या व्हिडिओत नाही का पाहिली आपण, ही त्या अण्णाची गाडी आहे!"
आवडीची तल्लख बुद्धी.

" हो , म्हंणजे निळ्या, सोपान, आणी अमोल ते तिघेही ईथेच कुठेतरी असतील ना? आणी तो एंडरटेकर अण्णा, पन इथेच असेल ! "

पिया एकटीच बोलत होती. पन तिच्या बोलण्यावर मागून कसलंच प्रतिउत्तर का येत नव्हत ?

"आवडे काय झाल?" पियाने मागे वळून पाहिल. तस तिला दिसल..की आवडीच्या तोंडाचा आ-वासला आहे, आणी तीचे ते पाणीदार डोळे वटारून ती समोरच पाहत आहे.

" अंग ए बाई , तूला काय झालं ? अशी खिळखिळी होऊन काय बघतीये समोर ,भुत पाहिल का?" पिया हसत म्हंणाली.

तोच आवडीचा थरथरता हात संथगतीने वर आला, आणी तिने पियाला समोर पाहायला लावल.

आवडीची ती भयभीत नजर -
.. तिच्या भीतीचा उच्चांक दर्शवत होत.
चेहरा घामाने भिजला होता..घशाला कोरड पडली होती.

पियाने सूद्धा वळून समोर पाहिल..
तिला हे अस काही भयाण मन हादरवणार दुष्य दिसेल अस स्वप्नात ही वाटल नव्हत.

स्कुटीचा पिवळा प्रकाश सरळ रेषेत पुढे पडला होता..

त्याच प्रकाशात जरा दुर एक कंपाउंड दिसत होत ..आणी त्या कंपाउंडखाली जमिनीवर अमोलच निर्जीव देह पडल होत.

अंगात टी- शर्ट, खाली हाल्फ पेंट, आणी खांद्यातून रक्त बाहेर आल होत..

पुर्णत जामिन रक्ताने भिजली होती. पन खुप वेळ झाल्याने लाल रक्त सुकून काळ झाल होत.

" अमोलsssss..!" पिया धक्का बसल्यागत
पुटपुटली.

xxxxxxxxxx

पांडूच्या हातातला कंदील बिना हवेच्या झोताने फडफडला - पांडूने त्या कंदीला कडे पाहिल.
मनात अशुभ संकेताची चाहूल जाणवू लागली..होती.
पन ती कसली ? मात्र सांगता आल नसत !
कारण भीतिला ना व्याख्या असते, ना रूप, ना तीचे वर्णन करता येत , ती फक्त अनुभवली जाऊ शकते

पांडुने हळूच आवंढ़ा गिळला...आणी पुन्हा समोर अण्णाच्या पाठमो-या आकृतीकडे पाहिल..
काल्या रंगाचा फुल बाह्यांचा कुर्ता- आणीखाली काळा पायजमा , असा आडदांड उंच शरीरयष्टीचा एंडरटेकर अण्णा शवपेटीजवळ पाठमोरा उभा होता.

त्याने आपले दोन्ही लांबसडक हात त्या शवपेटीवर ठेवले होते..तो कधीही , कोणत्याहीक्षणी ती शवपेटी उघडणार होता.

" निळ्या काय असल रे पेटीत ?"
सोपान ने विचारल.

"मला काय माहीत , माझ्या आज्याचा चर्च आहे का ?" निळ्या जरासा खेकसलाच.

" शश्श्शssss!" हळू बोल तो ऐकेल...
सोपान म्हंणाला.

आणी तेवढ्यात अण्णाने मागे वळून पाहील..
दोघांनीही पटकन डोके खाली घेतले..

अण्णाने दोन - चार क्षण प्रश्नार्थक नजरेने त्या जिन्याकडे पाहिल.. पन कसलीच हालचाल नाही झाली.. मग आवाज आला तो कसला ? कान वाजले असतील असं समजुन अण्णाने पुन्हा शवपेटीकडे पाहिल..

आणी हळुच हात त्या शवपेटीवर ठेवले..
पांडूच्या हातातला कंदील पुन्हा फडफडला..
वात वाकडीतिकडी होऊन नाही नाही असा होकार देत सुचित करत होती..

पन नियतीच्या मनात जणू काही औरच होत...

दोन्ही हातांनी जोर लावत अण्णाने शवपेटीच झाकण उघडल.. पुढे लोटून दिल.. आणी त्या शवपेटीच्या आत पाहिल...

xxxxxxxxx

" अ...आ..आवडे.. ह..ह.हा.तर अमोल आहे.. बापरे ! हा मेला तर नाही ना !" पिया काफ-या स्वरात म्हंणाली.

त्या दोघीही समोरून येणा-या गाडीच्या उजेडात कंपाउंडच्या भिंतीपाशी उभ्या होत्या.

गाडीच्या पिवळ्या उजेडाने दोघींच्याही काळ्या सावल्या उंच होऊन पुढे कंपाउंडच्या भिंतींवर पडल्या होत्या.

आणी दोघींच्याही समोर खाली जमिनीवर अमोलच प्रेत पडल होत.

चेह-यावर निर्जीव स्तबध भाव होते- डोळे बंद होते.. तोंड़ थोड उघडल होत..त्यातून त्याचे ते घोड्यासारखे दोन दात बाहेर आले होते .

" मेलाच आहे वाटतं ! बघ ना , तोंड कस उघड पडल आहे - आणी डोळेही बंद आहेत." आवडी अमोलच्या प्रेताच निरीक्षण करत म्हंणाली.

" आवडे सो...सोपान आणी निळ्या त्या दोघांचही जर ..!"
पियाच्या म्हंनण्याचाअर्थ आवडीला कळाल होत.त्या वाक्याने तिच्या अंगावर काटे फुटले , कानसूळ्या गरम झाल्या...तिच काळीज धडधडू लागल,डोळ्यांसमोर
निळ्याच तिरडीवर झोपलेल प्रेत दिसत होत- प्रेताच्या अंगावर पाच फुट लांबीचा सफेद कापड टाकला होता.
तोंडात गंगाजल ओतून - तुळशीच पान ठेवल होत.
डोक्यामागे धुर सोडनारा धुंदेरा होता.

कपाळावर एक रूपया ठेवला होता... त्या रूपयावर हळद कूंकू वाहील होत.

आणी तिरडीसमोर एकटीच आवडी कपाळावर हात मारत रडत होती, आजुबाजूला उभी मांणस मोठ मोठ्याने पोटावर हात ठेवून तिच्याकडे एक बोट दाखवत खुळ्यागत हसत होते.

त्या पिया सुद्धा होती.

कोणी खांदे हळवून हसत होत - तर कोणी डोक गरागरा हळवत होत - तर कोणी मध्येच जागेवर उड्या मारत होत..

आणि बाजुलाच आवडीच्या बापाने फुलाच्या हारांच दुकान टाकल होत आणी दहा रूपयांच हार तो वीस रूपयांना विकत होता.
येड्यांच अंत्यसंस्कार सुरु असल्यासारख द्रुष्य आवडीच्या स्पप्न क्ल्पनेत दिसत होत.

तोच तिने मान झटकली..

" नाही..नाही..!" तीने पियाकडे पाहिल.
" माझ मन मला सांगतय - माझा निळ्या
सुखरूप आहे , त्याला काही झाल..नाहिये! "

आवडीच्या वाक्यावर पियाने फक्त होकारार्थी मान हळवली.

" मला वाटत ,निळ्या आणी सोपान ह्या कंपाउंड पलिकडे गेले अशणार - चल आपण ही आत जाऊयात !" आवडी पियाकडे पाहत म्हंणाली.

" हो हो चल!" पियानेही होकार दर्शवला.

दोघीही कब्रस्ताना आत जायला निघाल्यां.


xxxxxxxxxxx

अण्णा- पांडू दोघांनीही एकदाच शवपेटीत पाहिल.

शवपेटीत एक माणुस आरामात झोपेल अस छानशी डिजाईन केलेला बिछाना होता.

इंग्रजांमध्ये कोणी मोठा माणुस मेला की अश्या
हाई - फाई शवपेटींमध्ये त्यांना डफन केल जायचं.

पन ह्या पेटीत म्रृत कलेवर नव्हत - होती ती फक्त एक दंडगोळ आकाराची ,दहा इंच लांबीची काचेची बरणी- आणी त्या बरणीला एक तपकीरी रंगाच झाडाच्या लाकडाला विशिष्ट प्रकारे झाकणाच रुप देऊन अडकवल होत.

त्या बरणीत लाल रंगाच धुर होत.
बरणीतला तो विषारी फेसाळता धुर साप ,अळ्या,कृमी, किड्यामुंगीसारखा वळवळत होता.

जर तो झाकण काढल तर तो विषारी धुळ वळय थेट बाहेर येणार होत - वातावरणातल्या हवेत पसरणार होत.

पन ते लालसर धुर नक्की होत तरी काय?

" काय आहे हे !? "
अण्णाने आपले दोन्ही हात वाढवले ..दोन्ही हातांच्या पंज्याच्या आपल्या लांबसडक बोटांनी ती काचेची बरणी ऊचलून हातात धरली..

मग हळूच डोळ्यांसमोर आणली..
एक डोळा बंद करून दुसरा त्या काचेच्या बरणीवर ठेवला

" ए निळ्या त्या काचेच्या बरणीत काय आहे रे? "
सोपानने विचारल !

" काय माहीत - पन लाल धुरासारख दिसतंय रे ! "

त्या दंडगोल काचेच्या बरणीवर अण्णाने मान थोडी पुढे आणत आपला एक डोळा ठेवला .

त्या काचेच्या बरणी आतून पाहता अण्णाचा डोळा खुपच मोठा दिसत होता. एका लिंबू एवढ़ा मोठा- आणी त्या बरणीतली ती विषारी लालसट धुळीकण त्या अण्णाच्या डोळ्याला पाहत होती.

अण्णाची नजर त्या लालसट धुळीवर स्थिरावली होती.

आजुबाजुला शांत वातावरण होत.
बाहेरून उभा चर्च अगदी शांत भक्कास भासत होता.. चर्चच्या चारही बाजुंनी धुक्याने वेढ़ा घातलेला ..जणू हळूवार मंद धुक्याचे वळये चर्च भोवताली रात्रीचा पहारा देत होते...

ह्या भक्कास अश्या निर्जण वास्तुत बाहेरून पाहता कोणिही म्हंणेल , की कोण राहत असेल ह्यात? ही जागा तर कोणी फुकट ही घेणार नाही ! ह्या अश्या जागेत फक्त उंदीर,घुशी,सर्प राहत असतील.

पन एकदा आत नजर टाकली की कळेल
आत काय सुरु आहे !

चार सामान्य मानवी जीव त्या अभद्र वास्तुत
आहेत आणि नकळत त्यांच्या हातून महाभयंकर अश्या विकृत शक्तिची सुटका होणार आहे .

अण्णाच्या डोळ्यांसमोर त्या बरणीतल लालसट धुळीकण सामान्यपणे तरंगत फिरत होते .
अण्णाने डोक मागे घेतल.. तस त्याचक्षणी ती
त्या लालसर धुळीकणांनी एका अभद्र अघोरी तामसी कवटीच रुप घेतल होत..
डोळे विस्तवासारखे चकाकत होते..जबडा खिखिखी करत हलवत ते अण्णावर धावल होत..
पन अण्णा- पांडू दोघांनाही त्या अघोरी दृष्याची कल्पना नव्हती.

निळ्या सोपान दोघेही जिन्याच्या वरच्या पायरीवर बसले होते ..आणी एकटक अण्णा- पांडू त्या दोघांकडे पाहत होते.

त्या दोघांच्या खांद्यामागे काळभोर अंधारात बुडाळेल्या जिन्याच्या पाय-या दिसत होत्या..

तोच त्या अंधारात हवेत एक निळसर रंगाची ठिंणगी उडाली... आणी जिन्याच्या खालच्या पायरीजवळ निळसर प्रकाश पडला जात एक अमानवीय आत्मा अवतरली..

उंची जेमतेम पाच फुट , तपकीरी रंगाचे केस..
चौकोनी प्रेताड दुधाळ कातडीचा चेहरा
डोळयांची बुभळे चांदीसारखी चकाकत होती..
ओठ काळसर होते.
अंगात एक फुल बाह्यांचा काळसर जब्बा होता.
त्या काळ्या जब्ब्यावर छातीवर एक सोनेरी रंगाने क्रॉसची खूण रेखाटली होती.

तस पाहता हा प्रेताड आत्मा एका पादरीचा वाटत होता.

ते मेलेल ध्यान निर्विकार - स्तब्ध चेह-याने चांदीच्या लकाकत्या डोळ्यांसहित ह्या दोघांकडेच पाहत होत.


निळ्याच्या मानवी चेतातंतुनी त्याला चाहुल दिली.

मागे कोणीतरी उभ असल्याची जाणिव होऊ लागली.. .

एक दोन वेळा डोळे मिचकाऊन त्याने आपल्या सर्वाँकडे पपाहिल..आणी गर्रकन मान मागे वळवली..

डोळ्यांना प्रथम निळसर प्रकाश दिसला -
मग त्या प्रकाशात उभी काळ्या जब्बयातली..पादरीची आकृती दिसली.

डोक्यावर तपकीरी रंगाचे केस, चौकोनी आकाराचा प्रेताड चेहरा , बस्क नाक, लुकलुकणा- या चांदीच्या डोळ्यांनी ते थंडपणे ..निळ्याकडेच पाहत होत.

निळ्याची वाचा बसली- घशात आवंढ़ा अडकला..
आणी भीतीने पोटात गोळा आला..
.... अण्णाने बरणी जस एका मांणसाची मान खाकेत आवळून धरावी- तशी ती बरणी खाकेत धरली होती..आणी दुस-या हाताने तीच लाकडी झाकण उघडायला घेतल होत.

इकडे पादरीच्या आत्मयाची हालचाल झाली..
फुल बाह्यांचा जब्बा असलेला हात हळुच वर आला..


" डोंट ..ऑपन....डोंट ऑपन...!"
पादरीच्या तोंडून घोगरा आवाज पड़ला..

त्याची भाषा इंग्रजी होती.
निळ्याला त्याच बोलण समजल नाही .
पन पादरीच्या आत्म्याचा हावभाव, तो आवाज ऐकून त्याच्या भीतिचा स्फोट नक्की झाला , जिन्याच्या पायरीवर तो टूणकन उभ राहीला...दोन्ही हात कानांवर गेले..आणी -तो मोठ्याने ओरडला..

" आssssssssss...! भुsssss त!"
अचानक आलेल्या ह्या आवाजाने पांडू, सोपान , अण्णा तिघेही दचकले,

त्यातच अचानक झालेल्या ह्या क्रियेने अण्णा बिथरला त्याच्या हातून काचेची ती बरणी निसटली..

हवेतून हळुवारपणे खाली येत येत , मग एकदाच वेगाने जमिनीवर येऊन आदळून फुटली..

जाडसर काचांचे तुकडे झाले..

बरणी फुटताच पादरीच्या थंड निर्विकार चेह-यावर भीतिची छाया पसरली..

तो आत्मा चलचल काफु लागला..
त्याचे चंदेरी डोळे रूपया एवधेढे मोठे झाले..
तोंड जरास वासल गेल..

त्या पादरीच्या चेह-यावरची भीति पाहून निळ्या आश्चर्यकारक नजरेने त्यांच्याकडे पाहू लागला.

पादरी काहीतरी बोलत होता..त्याच्या तोंडाची हळुवार पणे हालचाल होत होती..आणी तो पुटपुटल्यासारखा आवाज बाहेर येत होता.

" सी इज कमिंग..!" ह्लुवार खर्जातल्या आवाजत तो पाद्री म्हंणाला.

" गो...रन...सी ...इज..कमिंग..! "


xxxx


दोन झापांच दहा फुट उंचीच लोखंडी गेट दिसत होत , दोन्ही झाप अर्धवट उघडलेल्या होत्या..(काहीवेळापुर्वी अण्णाने ह्याच गेटमधून कब्रस्तानात प्रवेश केला होता) उघड्या गेटमधून धुक्यात
बुडालेल कब्रस्तान दिसत होत.
थयथय नाचणारा धुका कबरींभोवताली
वेड्या गबलू सारखा फीरत होता.

भरभक्कम उभ्या , उंच बांधणीच्या कबरी छातित धडकी भरवत होत्या.
ह्या दोघिंच्याही नजरेला कबरांची ती लांबच्या लांब मुर्द्यांची घर दिसत होती.

ह्या इतक्या रात्री कब्रस्तानात जायचं हा विचार अंगावरच्या कातडीवर थंडगार टोकदार सुई.. फिरवावा तसा भीति अंगाला टोचवून जात होता.

कल्पनेच्या स्मृतीभ्रंशाने डोळ्यांभोवताली वाकडे तिकडे थयथय नाचणारे अघोरी चित्र रेखाटले जात होते.

कितीतरी वेळ त्या दोघि नुसत्या गेटबाहेर उभ राहूनच कब्रस्तानातल्या मृत मांणसांच्या घर रुपी कबरांच दर्शन करत होत्या.

आवडी- पिया दोघिही त्या उघड्या गेट समोर उभ्या होत्या.

" जायचं आतssss!" शेवटी आवडीच म्हंणाली.
तिच्या त्या वाक्यावर पियाने आवंढ़ा गिळला..
तिच्या तोंडून एक चकार शब्द बाहेर निघेल तर नवळच म्हंणाव लागेल!

अर्ध उघड्या गेटमधून प्रथम आवडी आत आली.. मग आजुबाजुला घाब-या गुब-या नजरेने पाहत पियाने सुद्धा आत प्रवेश केला !

xxxxxxxxx

काचेची बरणी फुटताच पादरीच्या थंड निर्विकार चेह-यावर भीतिची छाया पसरली..

तो आत्मा चलचल काफु लागला..
त्याचे चंदेरी डोळे रूपया एवढे मोठे झाले..
तोंड जरास वासल गेल..

त्या पादरीच्या चेह-यावरची भीति पाहून निळ्या आश्चर्यकारक नजरेने त्यांच्याकडे पाहत होता...

पादरी काहीतरी बोलत होता..त्याच्या तोंडाची हळुवार पणे हालचाल होत होती..आणी तो पुटपुटल्यासारखा आवाज बाहेर येत होता.

" सी इज कमिंग.. !... रन... सी ... इज.. कमिंग..!"

शेवटचे शब्द संपताच जिन्याखालच निळसर प्रकाश झपकन विझला - घुप्प कालोखी विषारी अंधार पसरला.

निळ्याची वाचा बसली होती. कानसुळ सुन्न झाली होती. अवतीभवतीच सार जग थांबल होत.
मग हलु हळू धक्का बसल्यागत, डोक डाव्या बाजुला फिरू लागल..


दंडगोल आकाराची ती दहा इंच लांबीची बरणी खळखल काचांचा आवाज करत फुटली..

बरणी फुटताच ते आत कैद असलेल फे अघोरी,तामसी, ध्यान, आजाद - अबंधित झाल.

तो लाल रंगाचा धुर हळुहळू पुर्णत माळ्यावर पसरू लागला..

सोपान, पांडू - अण्णा सर्वजण त्या एवढ्याश्या धुराला इतक खोलीभर पसरलेल पाहून जरासे आश्चर्यचकीत झाले होते...

अद्याप भीतिने आपला कर्तब दाखवला नव्हता..!

पन ती ही वेळ आता सुरु होणार होती.

पुर्णत माळ्यावर लालसर रंगाचा धुर पसरला. पांडूच्या हातात जळणारा तपकीरी आगीचा कंदील त्याने हळुच चेह-याजवळ आणला..

लाल धुरात काही दिसत का ? ते पाहू लागला..!
पन त्या कंदीलाच्या काचेत हळू हळू ते धुर घुसत होत...ह्या क्रीयेपासून पांडू अजाण होता.

" हरामखोर साले..! तुमच्या मुळे ही घाण पसरली इथ , आता तर मी तुमच मूडद पाडून इथंच गाडणार एकेकाला..!" अण्णा रागात म्हंणाला.

त्या लालसर धुक्यातून त्याचा शिव्या हासडल्याचा आवाज ..सोपान निळ्या दोघांच्या कानांवर पडत होता.

" सोपान !" निळ्या जरासा ओरडला त्याने सोपानचा हात धरला.

" चल इथून लवकर!" निळ्या सोपान दोघांनी धावतच जिन्याच्या पाय-या उतरल्या..

मग बाकांच्या रांगेतून धावत थेट चर्चच्या उघड्या चौकीटीतून बाहेर शिरले.

पांडूच्या हातात असलेल्या काचेच्या कंदीलात हळू हळू ती लाल रंगाची धूरासारखी धुळीकण आत घुसली..

तांबड्या आगीने जळणारी वात ..जशी तेल खेचते आणि पुर्णत ओली होते.. तसंच..त्या लालसर विषारी धुराने , त्या तांबडसर आगीने जळणा-या वातिला लाल रंगात बदलायला सुरूवात केली..

तपकीरी वात खालून ते वरपर्य्ंत लाल रंगात बदल्ली..आणी पांडूच्या चेह-यावर तो लाल रंगाचा खुनी फेसाळता प्रकाश पडला..

विस्फारलेल्या थरथरत्या नजरेने पांडूने त्या वातीकडे पाहिल ..

" देवाsss " तो इतकेच म्हंणाला ..आणी त्याचा जबडा वासला..होता .

आणी जस जबडा वासला..

कंदीलाच्या आ जळणा-या लालसर आगीने
विषारी सर्पाच आकार घेतल..

" फुस्स..!" आवाज करत काचेवर फणा आदळला..

कंदीलाची काच फुटून ..ती विषारी लालसर आग थेट बाहेर आली..पांडूच्या वासलेल्या जबड्यात घुसली..

घश्यातून आत जाऊ लागली...
त्या लालसर अघोरी आगीने पांडूचा घसा लालरंगाने
चमकला..!

घशात एक असहनीय वेदना झाली...निवडुंगाचे काटे घशात अटकल्यासारखी ती महाभयंकर वेदना होती..

पांडूच्या घश्याला लहान लहान छिद्रे पडली..त्यातून चाळणीतून माती चालावी तसा कारंज्यांसारख लालसर रक्त बाहेर येऊ लागल...

पांडूचे डोळे वटारले.. पांढरट बुभळे लाल रंगाची झाली- त्यात एक कालसर मणी एवढ़ा टीपका अवतरला होता ...

पांडूच्या तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर आली.. रक्ताने त्याचे पिवळसर दात लाल भडक झाले होते.
रक्त थांबवण्यासाठी विव्हळतच त्याने एक हात गळ्यावर ठेवल..

पन हात ठेवून काही फायदा होता का ? पुर्णत हात रक्ताने माखल गेल..रक्तस्त्राव सुरुच राहिल..

" आह्ह्ह्ह्ह !" विव्हलतच पांडूने आपल्या गळ्यावरच्या हाताची पकड घट्ट केली.

चिखलात पाय रूतावा तसा तो हात गळ्यावरची चामडी फाडत अलगद आत घुसला..

थेट मांसात अडकलेल गळ्यातील हाड हाताला लागल..

गळ्यातून रक्ताचा फव्वारा उडाला... खालच्या लाकडी माल्यावर पडला..

तोच पांडूने हातामार्फत गळ्याच हाड उपटून बाहेर काढल..

पांडूचा विव्हळण्याचा आवाज आता बंद झाला होता. आणी फक्त खर्जातल्या घोग-या हसण्याचा आवाज येऊ लागला होता..


अण्णा डोळे फाडून त्याच्या ह्या कृतीला पाहत होता. तो हसण्याचा घोगरा , खर्जातला तारस्वरातला आवाज.. सामान्य मुळीच नव्हता..

काहीतरी भयंकर , तामसी, कृल्प्ती,अघोरी त्याच्या देहात घुसल होत..

पन काय? काहीवेळा अगोदर कंदीलाच्या आगीत घुसलेली ती लालसर धुळीकण? तीच तर पांडूच्या तोंडावाटे आत गेली होती ना ? आणी मगच तर ह्या अघोरी नाट्याला सुरुवात झाली होती!

त्या अमानविय शक्तिने त्याच्या देहावर कब्जा केला होता. त्याच शरीर आता त्याच राहिल नव्हत.

पांडूला जणू हे सर्व कृत्य करतांना कसलीच वेदना होत नव्हती- किंवा त्याच्या देहात घुसलेली ती अभद्र शक्ति - तीने त्याचा सेकंदाताचंच काटा काढला असावा ?! आणी आता ती एका खेळण्यासारख विकृतपणे त्याच्या देहाच वापर करत होती! ताच्या देहाशी हव तस खेळत होती.

पांडू जबडा विचकत हसत होता.
त्याचे तोंडातले रक्ताळलेले दात ,ओठ ,जीभ हसतांना स्पष्ट दिसत होते. तोच त्याने आपल्याच गळ्यातील हाड - तोंडात कोंबल..

अण्णाकडे पाहून पुन्हा दात विचकत हसला..आणी

" कट कट कट " आवाज करत दातांत आपल्याच गळ्यातल हाड चावू लागला..

तोंडात चावत असलेल हाड जस तो गिळत होता..तस ते खाली फाटलेल्या गळ्यातून लहान- लहान तुकडे होऊन जमिनीवर पडत होते .


अण्णाला हे द्रुश्य पाहून किळस आली..त्याला कळून चुकल होत - आपल्या हातून फुटलेली ती बरणी- आणी त्यातल ते लालसट धुर , काही साधरण नव्हत !

आपल्या हातून काहीतरी नक्कीच भयानक अशी अमानवीय शक्ति, सैतान, एविल , डेमॉन असल्या श्रेणीतले काहीतरी सुटले - मुक्त झाले आहे .

" फक .. बिच..!" तारस्वरातला ..
कीन्नरी आणि पुरुषी असा मिश्रित आवाज पांडूच्या तोंडून बाहेर पडला.

त्याचे ते लालसट चकाकते डोळे खाली जमिनीवर लहान- लहान तुकडे होऊन पडलेल्या हाडांवर खिळले होते.

तोच त्याची मान हळू हलु वर येऊ लागली..
जशी जशी मान ह्ळत होती..कट- कट आवाज करत पांडूचा मणका वाजत होता.

पांडूने त्याच त्या लालसट डोळ्यांनी अण्णाकडे पाहिल..

ती नजर पांडूचा जिव चिरत आत घुसली..

" थुझा.. खून..दे..म्हला..! म्हला...भुक लागले..
.. ....थुझा....खून दे..म्हला..! म्हला..भुक लागले.."
पांडूने दोन्ही हात वाढवले.. चालत तो अण्णाच्या दिशेने येऊ लागला..
तोंडातून तेच तेच वाक्य पुन्हा पुन्हा निघत होत
फाटलेल्या गळ्यातून रक्त बाहेर पडल जात कपडे लालसर झाले होते.

गळ्याजवळ जो खड्डा पडला होता..त्यातून आतल मांस, वेगवेगळ्या रंगाच्या मांस पेक्षी बाहेर आलेल्या दिसत होत्या.

" ए माझ्या जवळ येऊ नको !" अण्णाने एम-24 स्नाइपर बंदूकीची नळी पांडूच्या दिशेने धरली.

पन भुकेने आसुसलेलं सैतानच तो - त्याची वासना शमल्या शिवाय तो गप्प बसणार नव्हता.
पांडूची पाऊळे थांबण्याच नाव घेत नव्हती..ती..एका लयीत पुढे पूढे येतच होती.

" ए म्हाता -या तिथंच थांब..! थांब तिथंच म्हंटल ना , नाहीतर हकनाक मरशील !"

त्यांच्या धमकीवर सुद्धा पांडूची पावळे थांबली नाहीत..तसंही तो जिवंत होताच कुठे?

शेवटी अण्णाने ट्रिगर खेचला..

सुनसान स्मशान शांततेत " धाड "आवाज झाला.
पुढच्या नळीतून धुर आणी गोळी एकसाथ बाहेर पडली..

गोळीच वेग इतक अफाट- वेगवान होत की पांडूच्या कपाळातून गोळी जशी आत घुसली..
पुर्णत डोक्याचा भुगा झाला..आणी आत घुसलेली तीच गोळी मागच्या दिशेने बाहेर आली ..पुढे जाऊन लाकडी भिंतीतून "फट " आवाज करत आरपार झाली..

पांडूच धड सेकंदात फटाक्यासारख फुटल..
आतल, मेंदु, कवटी तीचे लहान लहान शोरमा सारखे पीस होत हवेत उडाले .. अण्णाच्या अंगावरही पडले होते.

पांडूच धड नसलेल देह धपदीशी खाली जमिनिवद कोसळल..

अण्णाने जागेवरच उभ राहून त्या निर्जीव देहाकडे खात्रीलायक नजरेने पाहिल...की हा नक्की मेलाच आहे ना ?

काहीवेळ अण्णा जागेवर उभ राहूनच निरीक्षण करत होता.

कसलीच हालचाल झाली नाही मग अण्णाच्या मनाची खात्री पटली..की हा मेला..!

त्याला स्वत:वर गर्व ..आभिमान वाटत होता..कारण त्याने एका सैतानी शक्तिचा अंत जो केला होता !

" अण्णा..!" त्याने बंदुकीची नळी छातीवर मारली.. " अण्णा स्वामी..! अण्णा स्वामी नाम हाई माझ....! " अण्णा दोन पावळ चालत पुढे आला.. - पांडूच्या प्रेतासमोर येऊन ढोप्यांवर बसला.. पुढे म्हंणाला.

" अण्णा के बंदुक से बचना म्हंणजे..यंम पॉसिबल..यंम..पॉसिबल.. हहहहहह्जह्हह्ह्ह!"
अण्णा स्वत:शीच येड्यासारखा हसू लागला.

त्याची ती विकृत बुद्धी अश्या ह्या वेळेला जागी व्हायची !

अण्णा स्वत:शीच हसत होता.
त्याच्या बुद्धिला ही गोष्ट पटली होती, की पांडू खरच मेला आहे..- तसंही त्याच खरच होत म्हंणा! की पांडू मेलाच होता..! पन त्याच्या देहात शिरलेली ती आसुरी शक्ति? तिचा कुठे अंत झाला होता?

तोच अचानक पांडूच प्रेत कमरेपर्यंत उभ राहिल ..

अण्णाच संमंध शरीर शहारल, थंडगार मणक्यावरून कोणीतरी धारधार पातीचा सुरा फिरवला अस जाणिव झाली..

अण्णाच तोंड वासल होत..भीतिने तो किंचाळणार होता...

तेवढ्यात बिन धडाच्या पांडूच्या प्रेताने आपला एक हात वाढवला आणि अण्णाची हनुवटी धरली..
तोंड उघडच होत..तसा त्याचा दुसरा हातही पुढे आला....हाताच्या पंज्याची पाचही बोट त्या प्रेताने अण्णाच्या तोंडात घुसवली..

त्या बोटांच्या नखांतून कालसर रंगाच द्रव बहेर निघू लागल..तेच अण्णाच्या तोंडातून पोटात जात होत...

अण्णाच सर्व शरीर शॉक लागल्यासारख हळत
होत..! पांडूच्या देहात घुसलेली ती लालसट अघोरी धुर..धुळीकण- अण्णाच्या देहात प्रवेश करत होती.. पाहता..पाहता...अण्णाच्या शरीरावर त्याचा प्रभाव दिसू लागला...छ्ताकडे पाहणा-या
अण्णाचे डोळे लालसर झाले..त्यांत काळसर टीपका ..उमटला..!

जबड्यातून काळ्या रंगाची विषारी द्रवयुक्त लाळ बाहेर येऊ लागल.. हनुवटी जराशी टोकदार झाली .. !
आणी त्याच तारस्वरातल्या पुरुषी आणी किन्नरी मिश्रित आवाजात हसला.

" हिहिहीहिहिहिही..खिखिखिखिखी..!"

xxxxxxxxx



रामपूर स्मशानभूमि..


ह्या जगात मानवाच जन्मस्थान घर, हॉस्पिटल,मंदिर, अश्या ब-याच जागा आहेत .

ह्या जगात जो कोणी जन्म घेतो - पैश्यावाला धनाढ्य माणुस असो की

...बाराही वर्ष दारिंद्रयात काढणारा भिकारी असो .


सर्वाँचंच शेवटच आंतिम स्टेशन - द फाईनल डेस्टीनेशन आहे - स्मशान घाट!


जिवनाच हेच सत्य आहे - जन्म आणि आंतिम मृत्यु स्मशान घाट..!


मग तुम्ही कितीही पैसा कमवा ,कितीही सोने - चांदीचे महागडे दागीनेही का नाही घालून मिरवा- शेवटच्याक्षणाला ही सर्व धन- दौलत तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकत नाही.


इश्वरी मुखी हेच आंतिम सत्य आहे की ..

जो आला आहे - तो एक दिवशी जाणारच आहे..

मग तो पैश्याचा माज का , अहंकार, गर्व कशासाठी बाळगावा? दुस-यांना तुच्छ म्हंणून का रेखाटाव?

की अस तर नाही ना, की मेल्यावद श्रीमंताच्या देहाची राख सोन्याची- चांदीची होते ,

आणी गरीबाची पांढरी साधीशी राखाडी होणार आहे!

नाही ना ? मग!


कशासाठी अंगी बाळगता तो अहंकार ,गर्विष्ठपणा..धुडकाऊन लावा त्या नराधमाला..आणी एकीने वागा..

कोणालाही लहाण किंवा . मोठा समजून वागू नका.



कथा..सुरु..

रामपूर स्मशानाला झाडांनी गोल वेढ़ा घातला होता. आणि त्या गोळवर्तुळाकार चाळीस फुट जागेत

मधोमध चार लोखंडी गज जमिनीत गाड़ले..होते.

ज्याला स्मशान म्हंणतात.


ज्यावर चित्ता रचून प्रेत ,मईत,मांणसाच निर्जीव देह जाळल- दहन केल जात.


सावकारची आई वारली तर होती , पन म्हातारीला गाडायला कोहराम कब्रस्तानात घेऊन गेले होते. त्यामुळे स्मशान पेटलेल नव्हत -


स्मशानाच्या एका लोखंडासमोर उभे राहून पूढे पाहता साठ पावलांवर एक पेरूच झाड होत आणि त्या झाडाखाली काट्या कुट्यांची एक आठ -फुट उंचीची झोपडी होती.


झोपडीच्या चौकटीवर दरवाजा नव्हता..

उघड्या चौकटीतून तपकिरी आगीचा प्रकाश बाहेर येत होता.


स्मशानातली सर्व झाड त्या झोपडीकडे टक लावून पाहत होती!


काळाभोर अंधारात रातकिडे किरकिरत होते..

मध्येच चिंमण्यांचा, कावळ्यांचा अशुभ रात्र संमयी

आवाज येत होता..


कोठेतरी झाडावर बसून कोकिळा ओरडत होती.. दिवसा मनधुंद करणारा तिचा आवाज आता अभद्र अपशकूनी भीतीदायक वाटत होता..


थंडीमुळे तो आवाज दूर दुर पर्यंत वाहत जात होता..


" कुई...कुई...कुई..कुई...!"


झोपडीच्या चौकटीतून हळु हळू पुढे जात

आतिल दृष्य दिसू लागल..


झोपडीत खाली जमिन होती.तिलाच झाडून पुसून साफ केल होत , शेणाने सारवली होती.


भुवईवर दोन आकृत्या बसल्या होत्या..

एक साठीपार केलेला म्हातारा दिसत होता..

पुर्णत अंगाला प्रेताची राख फासलेली, चेह-यावर चार पाच महिन्याची दाढी होती..


केसांच्या झालेल्या जटा अंगाखांद्यावर सोडल्या होत्या. वरच अंग उघड होत तर खाली एक पांढर मळलेल धोतर होत.त्यांच नाव अंबो अघोरी होत.


त्यांच्या पुढ्यातच एक तरूण बसला होता.

वय जेमतेम बावीशीच्या आसपास होत. अंगावर एक कॉटन फुल बाह्यांची ब्लैक टी- शर्ट आणि खाली एक ब्लैक जीन्स होती. गोलसर चेहरा होता. , डोक्यावरचे काले केस उभे होते...नाक जरास टोकदार होत- पातळसर ओठ होते..ओठ जरासे काळे दिसत होते , त्या ओठांना पाहून अस वाटत होत की हा दिवसातून तीन चार सिगारेट नक्कीच ओढत अशणार , डोळे जरासे मध्यम लहाण होते.


त्या दोघांच्या जराबाजुला एक कंदील पेटत होता.

त्या कंदीलाच्या उजेडात दोघांचे चेहरे दिसले जात मधोमध खाली एक देशी दारूची चप्टी बाटली दिसत होती..दारूच्या बाजुलाच एक प्लास्टीकची पुडी होती..त्यात गांज्या होता.


" वा ...वा....वा ...छान काम केलंय !"

अंबो अघोरी बाबांनी चप्टीची बाटली आणि गांज्याची पुडी हाती घेतली..

गांज्याची पुडी नाकावर ठेवून तिच वास घेतल..



" स्स्स्स्स हा...! भारी वास येतोय ना..?

अघोरी बाबा त्या युवकाकडे पाहत म्हंणाले..तसा तो ही हसला.


" हा मग घेतलय कोणी?"


" कोणी घेतलय ? !" अघोरी बाबा थट्टेत म्हंणाले.


तसा तो युवक म्हंणाला.


" जयविकने हो ! तुमची आवड म्हंणजे त्यालाच ठावूक आहे !नाहीतर मी ऑनली सिगारेट ओढतो..! "

त्याने खिशातून गोल्डफ्लेक सिगार काढली ,तोंडाच चंबू केल ..त्यात सिगार ठेवली..आणी लाईटरने ती शिलगावली.


" मग त्याला इथ यायला काय धाड भरली होती ?तो का नाय आला.!"


" येणार होता ना बाबा !" त्याने तोंडातली सिगारेट हातात धरली..ओढलेळ धुर नाका तोंडातून बाहेर सोडल..


" मंग का नाय आला." अघोरीबाबांनी पुन्हा विचारल.


" अहो काय सांगू बाबा , त्या बारीक डोळ्यावाल्यांकडून (चीन) एक प्रयोग फेल झालं आणि एक वाईरस सगळीकडे पसरला..ज्याने लोक झोंबीज मध्ये बदललीयेत ! "


" झुंबीज ? म्हंणजे?" अघोरीबाबा न समजून म्हंणाले.


" अहो म्हंणजे..!" तो युवक जरा वेळ विचार करत राहिला आणि मग पटकन म्हंणाला.


" जिवंत प्रेत ! ज्या प्रेताला कसलीच भावना नाही, त्याला फक्त एवढच ठावूक असत्ं की समोरचा जिवंत माणुस दिसला..की त्याच ताज मांस भक्ष करायचं . आणी मग ही जी झोंबीज ज्या दुस-या मांणसाला चावतात , ते सुद्धा त्यांच्या सारखेच बनत आहेत..! सर्व पृथ्वीवर हा वाईरस पसरला..तर सजीव सृष्टी धोक्यात येईल..! मानवाच आस्तित्व फक्त नावाला उरेल..! म्हंणूनच जयविक ..त्या मिशनवर गेला आहे.!"


" ..वा ....वा..वा .! खुप छान कामगीरी करतोय पोरगा..! त्याच्याकड ती शक्ति आहे तिचा चांगला वापर सुरु आहे नाही का ?"

समोर बसलेल्या त्या युवकाने तोंडात सिगारेट ठेवली आणि ती ओढतच होकारार्थी मान हळवली..


तोच बाहेरून बाबांच्या नावाने हाका ऐकू येऊ लागल्या.


" अंबो बा..अंबो..बा .अंबो..बा..!"

एकापाठोपाठ अघोरीबाबांच नाव ऐकू येत होत.


तोच उघड्या चौकटीतून बाल्या आत आला..

आत येऊन त्याने सर्व शरीर भुवईवर सोडल..

मोठ मोठ्याने श्वास भरू लागला.. धावल्याने धाप लागली होती छाती धडधड ढोल बदडावे तशी वाजत होती. डोक्याच्या टाळूवरून ते खाली पायांपर्यंत घामाने भिजवून टाकल होत ..अंगातला शर्ट

घामाने कातडीला चिटकला होता.


" बाल्या..!" अघोरी बाबा म्हंणाले. घाई घाईत बाल्याजवळ आले..!


" ए बाल्या अस उर फाटेस्तोपर्यंत कुणापासून पळत आला आहे ?" अघोरीबाबांनी विचारल.. पन बाल्या बोलण्याच्या मनस्थिती नव्हता.


" नक्कीच ह्याने काहीतरी भयानक पाहिल आहे ! " तो युवक म्हंणाला.


त्याच्या त्या वाक्यावर अघोरीबाबांच्या चेह-यावर गुढ भाव पसरले.


" ती चप्टी आण ईकड !"

त्या युवकाने ती दारूची बाटली अघोरीबाबांना दिली.

अघोरी बाबांनी तीच झाकण खोळल, आणी तीच चप्टी बाल्याच्या तोंडाला लावली.. मग लागलीच बाजुला काढली..!

आता बाटलीत अर्धी दारू शिल्लक होती.

बाटली बाजुला ठेवली आणि दोघे बाल्याकडे पाहू लागले.


" दारूने भीती कमी होइल?"

त्या युवकाने विचारल !


" नशा बी शक्तिच असती की ,भीति हिच्या पुढ काय बी नाय!"


त्या युवकाने ह्या वाक्यावर फक्त होकारार्थी मान हलवली.


तोच त्याच फोन वाजु लागला.

त्याने जीन्सच्या खिशात हात घातल..

खिशातून काळया रंगाचा स्मार्टफोन बाहेर काढला.

फोनच्या मागे Tअक्षर होत.


त्या युवकाने स्क्रीनवर आलेल मैसेज वाचल..

त्याच्याही चेह-यावर गंभीर भाव पसरले होते..


" चला बाबा येतो मी , माझी निघायची वेळ झालीये..! " त्या युवकाने जीन्सच्या दुस-या खिशातून एक काळ्या रंगाच घड्याळ बाहेर काढल..


चौकोनी आकाराच स्मार्ट वॉचच म्हंणूयात तिला.

स्मार्ट वॉचवर त्याने एक दोन बटण दाबली ..आणी पुढच्याक्षणाला , आकाशातून स्मशानाच्या दिशेने एक काळ्या रंगाच हेलिकॉप्टर उडत आल,


हेलिकॉप्टरची धारधार पात इतकी वेगाने फिरत होती..की स्मशानातला एक नी एक झाड थरथरत हळत डुलत होता. पानांची सळसळ होत होती, फांद्या वेगाने हळत होत्या.

" चला पुन्हा भेटु !" त्या युवकाने बाबांचे चरण स्पर्श केले.

उघड्या चौकटीतून बाहेर जाऊ लागला..तोच बाबांनी त्याच नाव उच्चारल..



" रौद्र महाजन , बेस्ट ऑफ लक..फॉर मिशन..!"

अघोरी बाबांच्या वाक्यावर त्याच्या तोंडात अर्धवट जळत असणा-या सिगारेट सहित तो गालात हसला..


xxxxxxxxxxx



निळ्या - सोपान दोघेही चर्चच्या उघड्या चौकटीतून बाहेर पडले..!


आणी तोच सोपान कोणालातरी धडकला..

धप आवाज करत जमिनीवर पडला.


" आई..आई..आई.!" डोळे बंद करून कमरेला हात लावत तो विव्हलत होता." कोण म्हैस मधी आली रे ..! पाठीचा पार खूळ खुला झाला..माझ्या..! "


त्याने डोळे उघडून समोर पाहिल..तसं त्याला दिसल....की एक जाडी मुलगी समोर उभी राहून..

आपल डोक चोळत आहे.


निळ्याने सुद्धा मागे वळून पाहिल तस त्याला

आपल्या पुढ्यात पिया दिसली..त्याने ते लागलीच ओळखल सुद्धा..


" पिया..!" तो पुटपुटला..तोच त्याला मागून

एक ओळखीची हाक ऐकू आली .


" निळ्या..!" हा आवाज निल्याच्या ओळखीचा होता. आंधळा होऊन जरी त्याने ती हाक ऐकली तरी त्याला त्या आवाजाची दिशा कळेल..!


" आवडे!" अस म्हंणतच त्याने मागे वळून पाहिल..


मागे चार पावळांवर आवडी उभी होती.

तिच्या डोळ्यांतून घळा घळा अश्रु वाहत होते. निळ्याला सुखरूप पाहून तिला तिच जिवात जिव आल्यासारख वाटत होता..ते अश्रु आनंदाचे अश्रु होते अस म्हंणायला काही हरकत नाही! मुळीच नाही.


" आवडे ..!" तिला ईथे पाहून निळ्याला आश्चर्यकारक झटका बसला.

तेवढ्यात आवडी त्याच्या दिशेने धावत आली..

आणी तीने त्याला मिठी मारली..


सोपानने हसतच त्या दोघांकडे पाहिल..

मग एकवेळ पियाकडे पाहिल.. तस ती खेकसलीच .


" काय बघतो डोळ फाडून , देइन एक कानाखाली..!"

आवडीने निळ्याची मिठी सोडली.


" आवडे ? तू..तू..ईथे..काय करतेस ? "

निळ्याच्या वाक्यावर आवडीने पियाकडे पाहिल..

मग सर्वकाही थोडक्यात सांगू लागली...


पियाने दाखवलेली ती व्हिडिओ , मग त्या दोघिही घरात न सांगता ईथे कशा आल्या...ते सर्व तिने ब्लैक अँड व्हाईट पडद्यावर दाखवल.


" आवडे अंग तू इथ यायला नको हवी होतीस..! " निळ्या त्रासिक स्वरात म्हंणाला.



" ये निळ्या तु वेडा आहे का रे थोडा ! अरे ती प्रेम करते ना तुझ्यावर , तुला माहीतीये, मी जेव्हा तिला

ती व्हीडीओ दाखवली, तेव्हा तिचा जिवच टांगणीला आला होता. तुझ्या जिवाच काही बर वाईट झाल तर हा विचार करूनच तिचा जिव जायची पाळी आली होती.! आणी तू काय लावलय मगाचपासून तू ईथे काय करते ? तू ईथे काय करते हं? " पिया एका दमात म्हंणाली. ह्यालाच तर खर बेस्टफ्रेंन्ड़ म्हंणतात ना? जो आपल्या बाजुने बोलतो! आणी नेहमीचंच कठीण परिस्थीतीत आपल्या सोबत असतो.



"हे बघ आवडे !" निळ्याने तिचा चेहरा आपल्या ओंजळीत भरला


" माझ पन तुझ्यावर खुप प्रेम आहे ग, आणी मला हे पन माहीतीये की तुझा माझ्यावर खुप जिव आहे..! पन आता मी जे काही सांगतो ते निट ऐका..!"

अस म्हंणतच निळ्याने काहीवेळा अगोदर घडलेली ती पादरीच्या प्रेताड आत्म्याची हकीकत जशीच्या तशी वर्तवुण सांगितली.


सोपान - पिया- आवडी तिघांच्याही चेह-यावर आविश्वस्निय, आश्चर्यकारक भाव पसरले होते.

गुढ शांतता त्या तिघांमध्ये पसरली होती.

सोपान , आवडी, पिया तिघेही गंभीर चेह-याने निळ्याकडे पाहत होते..


तोच सोपान फिफीफी..करत हसू लागला.

त्याच्या पाठोपाठ पिया- सुद्धा.


" ए निळ्या तुझी अजुन उतरली नाही का ? "


" ए !" अस म्हंणतच निळ्याने त्याची कॉलर धरली..


सोपान- त्याच्या बाजुला उभी पिया झटकन गप्प बसली ..निळ्याचा तो स्वभाव जरासा रागिट होता..


" मी पुर्णत शुद्धीवर आहे ! माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं तेच मी सांगितलं आहे..! विश्वास बसत नाहीये ना तुमच ..मग बसेल ते ही..! मागे बघा...!"


निळ्याच्या वाक्यावर सोपान, पिया, आवडी तिघांनाही गर्रकन वळून मागे पाहिल..


समोर चर्चची उघडी चौकट दिसत होती.

आणी त्या चौकटीबाहेर उभ राहून हे तिघे आत पाहत होते..


बाकांच्या रांगेतून तीस पावळांवर समोर येशूची मुर्ती होती..आणी उजव्या बाजूला वर जाणारा जिना होता.


त्याच जिन्याची सर्वात वरची लाकडी पायरी

करकर आवाज करत वाजली. आत घुप्प अंधार असल्याने काही दिसत नव्हते..पन आवाज येत होता..


' कर्र..कर्र..क्र्र्र.. ' तीन पाय-या उतरल्याचा आवाज आला होता.


जिन्यावरून अंधाराचा फायदा घेत काहीतरी खाली चालत येत होत.


अंधारात ती काळसर सावळी हळू हळू पुढे सरकतांना दिसत होती.


जस की कुत्र्या-मांजरा सारख कोणीतरी हाता पायांवर चालत जिना उतरत आहे..


काळ्याभोर अंधाराने ती आकृती

आपल्या गर्भात लपवली होती..पन तो कालसर ठिपका तिघांना पूढे पुढे येतांना दिसत होता.


त्याच्या प्रत्येक हालचालीसरशी जिन्याची पायरी आवाज करत होती..


स्मशान शांततेत तो कर्र..कर्र आवाज ह्या चौघांचही काळीज गार करत होता.


चौघेहीजण स्तबध उभे राहत चौकटीतून आत पाहत होते..

अंधारत दोन लेजर लाईटचे बिंदू चमकत होते..


पियाच्या हातात तिचा मोबाईल होता...

भुताची व्हीडीओ करण्यासाठीच तर तीने सोबत घेतला होता.


समोरच द्रुष्य किती भयाण ,घातकी,भयप्रद असेल? ह्याची त्या चौघांनाही जाणिव नव्हती..!

वातावरण जरास गंभीर झाल होत..

पियाच्या हातात असलेला मोबाईलचा थरथरणारा हात हळू हलू वर वर येऊ लागला होता.


मोबाईल मागची बाजु पुर्णत सरळ झाली होत्या-

पियाने थरथरत्या हाताने स्क्रीनवर तीन चार वेळा टच केला..आणी पुढच्याक्षणाला मोबाईलच्या त्या लहानसर एल .ई. डी लाईटमधून झपकन चंदेरी प्रकाशाचा झोत बाहेर पडला.


चौकटीतून थेट आत घुसला..अंधाराचा काळा पडदा चिरत थेट पुढे जात त्या ..जिन्यावर पडला..



एखादा जंगली काळा अस्वल जस चार पायांवर उभा राहतो.


तसा हाडकुळ्या देहाचा अण्णा जिन्याच्या पाय-यांवर हाता पायांवर कुत्र्यासारखा उभा होता.. त्याचे अंगातळे कालसर कपडे अस्वलाचे काळेशार केस वाटत होते...डोक्यावरचे वाढ़लेले केस पुर्णत चेह-यावर पसरले होते.


आणी त्याच डोक सापासारख डावीकडन उजवीकडे झुलत होत.


तोच त्याची ती क्रिया थांबली..डोक एकाच जागेवरच स्थिरावल..


नाकातून एक मोठा श्वास घेतल्यासारखा आवाज आला.


जणू ह्या मानवी सजीवांच्या ताज्या मांसाच वास त्याला असाव !


" पिया ..? पिया...? फ्लश बंद कर..! त्याला आपली चाहूल लागेल..! बंद कर फ्लश..!" निळ्या पियाला म्हंणाला.


पण पिया भीतीने बधीर झाली होती.

तिचे कान सुन्न पडले होते. विस्फारलेली नजर समोर त्या ध्यानावरच एकटक खिळली होती..


ते केसाळ डोक डाविकडून उजवीकडे फिरत होत..

नाकातून मोठ मोठ्याने वास घेतल्याचा आवाज येत होता..

तोच त्याने गर्रकन वळून ह्या सर्वाँकडे पाहिल..

मानेला हिसकाला बसला तसे अण्णाचे केस चेह-यावरून जरासे बाजुला झाले..

आणि त्याच ते बिभत्स अवतार सर्वांना दिसल..

खप्पड चेहरा , पातळसर भुवया - लालसट चकाकते डोळे त्यात एक कालसर ठिपका - नाक नप्ट होत- ओठ फाकले होते आणि काळसार दात दाखवत ते ध्यान ह्या सर्वाँकडे पाहत छद्मी हसत होत.



" हिहिहिहिहिहीहिहिही...! येऊ का ? "

तो खर्जातला आवाज घुमला..


ह्या सर्वाँचे कानाचे पडदे फाटले..छातीच्या पिंज-यातला ह्दय बाहेर पडू लागला..

त्यातच आवडीची पावळे मागे- मागे जात ती हात कानांवर ठेवत मोठ्याने ओरडली...


तेवढ्यात अण्णाच्या देहात घुसलेल्या त्या ध्यानाने मांजरीसारखी जिन्यावरून थेट हॉलच्या फरशीवर उडी घेतली..


" सोपान....पिया....धावsssss!"

निळ्याने आवडीचा हात हातात धरला ..

आणी थेट पळायला सुरुवात केली..

सोपान पिया..दोघेही धावले आणि त्या दोघांच्याही मागून कुत्र्यासारखा हाता पायांवर धावत अण्णा येऊ लागला..मध्येच तो खर्जातल्या आवाजात हसत - होता खिदळत होता.


क्रमशः