कितने साल गुजार दिये है
मोहब्बत पर इलजाम लगाये
लोगो की नियत देखकर भूल गये है
प्यार ही तो जीवनमे खुशीया लाया है
आयुष्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ओळखायला चुकू शकतो पण प्रत्येक व्यक्ती जर तेच म्हणत असेल तर मग मात्र विचार करणे भाग पडते. आधी माधुरी एकटीच म्हणत असायची की सरांच तुझ्यावर नक्कीच प्रेम आहे. तेव्हा तिला थोडी चीड यायची पण जेव्हा आज त्या किन्नरच्या तोंडून तिने ते ऐकलं तेव्हा मात्र स्वरा आपल्या मनाला आवरू शकली नाही. ज्या नजरेने सतत घृणा बघितली होती त्या नजरा प्रेम खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात हे स्वराने अनुभवलं होत म्हणून आज त्या किन्नरचे ते शब्द स्वरावर जादू करून गेले होते. आज स्वरा लाईट ऑफ करून झोपायचा प्रयत्न करत होती पण सर्वांच बोलणं आज तिला झोपू देत नव्हत. ती विचारच करत होती की तिला दीपिकाचे शब्द आठवले " कुणी मुर्खच असेल जो त्याच्यावर प्रेम करणार नाही." स्वराला ते वाक्य ऐकून पुन्हा हसू आलं. खरच ती मूर्ख होती, जी त्याची राजसोबत तुलना करत होती म्हणून आज ती स्वतःच्याच विचारांवर हसत होती.
स्वरा आज खूप खुश होती. तिला कधीच वाटलं नव्हतं की ह्या चेहऱ्यावर सुद्धा कुणी प्रेम करू शकत पण जेव्हा समजलं तेव्हा ती पुन्हा एकदा विचारात हरवली. आज तिला दुपारी घडलेला किस्सा जसाच्या तसा आठवला. त्याचा तो हातात हात आणि तिच्या नजरेला नजर देताना त्याच्या नजरेत वेगळीच चमक तिला दिसत होती आणि ती ते सर्व आठवून क्षणभर लाजली. अन्वयने नकळत तिच्या आयुष्यात आपलं स्थान निर्माण केलं आणि तिला चाहूल देखील लागली नाही. आज स्वतःच्याच मनाला ती विचारत होती, " हे मना मी तर तुला बंदिस्त केलं होतं ना मग आज तू त्याच्यासाठी एवढा आतुर का झाला आहेस? तुलाही त्याची ओढ लागली आहे का? तुलाही त्याच्याविना राहत नाहीये का? त्याचा चांगुलपणा तुलाही तर आकर्षित करत नाहीये ना? तूच जर त्याच्या बाजूने झालास तर मी काय करायचं एकटीने. प्लिज ना त्याच्या बाजूनर नको होऊस. मग माझं माझ्याकडे काय असेल बर? सांग ना जाणार नाहीस ना तू की सर्व बंधन तोडून त्याचा होशील?? "
तिचा प्रश्न ह्यावा आणि हृदयाचे हार्ट बिट्स आणखीच वाढू लागले. आज तीच मन तिच्या ताब्यात नव्हतं. तिच्या आयुष्यात ह्या ७ वर्षात अशा भरपूर रात्री गेल्या होत्या जेव्हा तिला बेचैनीने झोप लागत नव्हती पण आज खूप दिवसाने तिला आनंदाने झोप लागत नव्हती. ती नकळत अन्वयच्या विचारात हरवली होती. तिला कुणी सोबत नेत नाहीत म्हणून स्वता बाहेर घेऊन जाणे असो की प्रत्येक वेळेला तिची बाजू घेणे. पुण्याला त्याने क्लायंटला दिलेलं उत्तर असो की हक्काने तिला समजावन असो आज स्वराला अन्वयची प्रत्येक गोष्ट आवडत होती. तीच आज मन तिला एका वेगळ्याच जगात घेऊन जाऊ पाहत होत आणि पहिल्यांदा ती त्या जगात जायला तयार होती. काही क्षण पुढे काय होईल? आयुष्य कस असेल? असे एकही विचार तिच्या मनात आले नव्हते. तिलां ह्या क्षणातून आज स्वतःच बाहेर यायच नव्हतं. ती वाहत होती अन्वयच्या विचारात.एखाद्या संथ नदीप्रमाणे.
तुझसे दूर भागते भागते
कब न जाणे तेरे करिब कब आ गये
कभी हुआ करती थि मर्द जात से मुझे शिकायत
आज तुमसे मिले तो जाना हमे तो शिकायत सेभी शिकायत है
दुसऱ्या दिवशी स्वरा मस्त तयार होऊन स्टेंशनला पोहोचली. माधुरीला पुन्हा एकदा मिठी मारतच तिने " गुड मॉर्निंग " विश केले. माधुरी तिच्या बाजूने वळाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आज काही विशेष असल्याचं जाणवत होतं आणि ती उत्तरली," ए ताई हे काय आज तू ब्लश करते आहेस?काही खास आहे का आज? "
स्वराच्या चेहऱ्यावर लाजेचे भाव स्पष्ट दिसत होते पण तिने तिला खरच उत्तर दिलं असत तर माधुरीने तिला कैचीत पकडल असत म्हणून स्वरा चेहर्यावरचे भाव बदलत म्हणाली," कुठे काय बर? तशीच तर आहे मी. रोज दिसते अगदी तशीच. ब्लश वगैरे काही नाही ग अलीकडे मी आनंदी राहायला लागली आहे ना म्हणून वाटत असेल तुला. काय खास असणार बर माझ्यात? तोच जळलेला चेहरा आणि भुतासारखी दिसणारी मी. आपलं आयुष्य असच आहे."
माधुरी काही बोलणार त्याआधीच नेहमीप्रमाणे ट्रेन आली. स्वरा - माधुरी दोघ्याही चढल्या आणि पुन्हा एकदा माधुरीने तिच्यावर नजर फिरवली. स्वरा खर तर आज माधुरीपासून चेहऱ्यावरचे भाव लपवू पाहत होती पण आज ते काहीही केल्या लपत नव्हते. माधुरी काही क्षण तिच्याकडे बघत म्हणाली, " ताई पण तू काहीही म्हण, हे भाव ते रोजचे नाहीत काही वेगळं आहे त्यात? काहीतरी स्पेशल जे मी कधी बघितलं नाही पण लक्षात येत नाही आहेत. "
स्वरा हसतच म्हणाली," काय वेगळं आहे बर? वेगळ तर तुझं डोकं चालत आहे बुद्धू! मी तर तशीच आहे बिनधास्त."
स्वरा तिच्यावर हसत होती तर माधुरी तिच्या चेहऱ्यावर बारीक नजर देत म्हणाली, " एक मिनिट मी काल पण लक्ष देत होते तुझ्या चेहऱ्यावर. सेम भाव आहेत. हा आता लक्षात येतंय. हे सरांमुळे आहे ना सर्व. ताई तुला ते आवडायला लागले आहे ना? खर बोल? त्यांचा विचार करून करूनच तुझ्या चेहऱ्यावर ही लाली पसरली आहे ना?"
माधुरी तिच्या चेहऱ्यावर बारीक लक्ष ठेवून होती तर स्वराच हसू आता गायब झाल होत. ती अडखळतच म्हणाली," काहीही काय बोलतेस मधू? मी कालच म्हणाले की ते बेटर लाइफ पार्टनर डिजर्व करतात. माझ्यासारखी भूत त्याला शोभणार नाही. सो उगाच तर्क- वितर्क लावू नकोस."
तीच बोलणं झालंच होत की मधू उत्तरली, " हो माहिती आहे मला पण ते सर ठरवतील ना की त्यांना कोण आवडत. त्यांना तूच आवडत असणार तर मग? मग काय करशील? हेच वाक्य जर म्हटलंस ना तर ते तुझ्या कानाखाली सीतार वाजवतील? आता सांग नाही हे भाव त्यांच्यासाठी??"
माधुरीच्या उत्तराने स्वराचे हार्ट बिट्स अचानक वाढले होते. तिच्या चेहऱ्यावरचे रंग अचानक समोर दिसू लागले होते. विचार करून अंगावर शहारे आले होते. डोळ्यांची सतत उघडझाप सुरू होती आणि स्वरा अडखळत बोलून गेली, " खयाली पुलाव बनविणे सोड मधू आणि मला उगाच स्वप्न दाखवू नकोस. मला नाही बघायचे स्वप्न जे पूर्ण होऊ शकणार नाहीत."
माधुरीने आता तिला मिठी मारत म्हटले, " ह्याचा अर्थ तू स्वप्न पाहत आहेस. नॉट बॅड हा आणि मला तुझं आता कुठलंच उत्तर नकोय. मला माहित आहे तुझ्या चेहऱ्यावरच्या आनंदाच कारण. आमची पोरगी आज फसली सरांच्या प्रेमात."
स्वरा आज काहीच बोलत नव्हती पण तिला ती गंमत देखील फार आवडत होती. तिने अजून तरी हा विचार केला नव्हता पण हेही खर होत की स्वराला हे सर्व आवडत होत. आज पूर्ण वेळ माधुरी स्वराची गंमत करत होती आणि स्वराही लाजत होती. कदाचित तिला अजून तरी त्याच्यावर प्रेम झालं नव्हतं पण सर्वांच्या बोलण्यावरून ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती. आज पुन्हा तर अल्लडपणीचे, कॉलेजचे क्षण जगायला तिला मज्जा येत होती. अन्वय बोलून गेला होता की स्वप्न पाहायला शिक पण एवढ्या लवकर तीच मन तिच्या कंट्रोलमधून बाहेर जाईल तिला वाटलं नव्हतं. आजचा प्रत्येक क्षण ती स्वतःच एन्जॉय करत होती.
दिल के बदल दिलं
यही प्यार की परिभाषा
ये ऐसी भावनाये है
जो दिखलाती है नयिसी आशा
दादर स्टेंशन आलं आणि स्वरा धावत- पळतच ऑफिसकडे जाऊ लागली. आज ती घरून काहीतरी ठरवून आली होती त्यामुळे तिला लवकरात लवकर ऑफिसमध्ये पोहोचायच होत. ती फायनली ऑफिसला पोहोचली आणि तिने वाकून केबिनमध्ये बघितलं. अन्वय अजूनही ऑफिसमध्ये आला नव्हता म्हणून तिचा जीव भांड्यात पडला. त्यासोबतच ऑफिसमध्ये अजूनही कुणीच आलं नसल्याने स्वराला तिच्या मनात होत ते करायला काहीही प्रॉब्लेम जाणार नव्हता. तिने ऑफिसमध्ये येताच आपली बॅग डेस्कवर ठेवली आणि कशाचा तरी डब्बा त्याच्या केबिनमध्ये ठेवून आली. स्वराने डब्बा ठेवला आणि पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसली. तिची नजर आता दारावर खिळली होती. अन्वय येण्याची तिला घाई लागली होती. तो येत नव्हता आणि आज तिला एक-एक सेकंद जास्त वाटू लागला होता. पंधरा मिनिटे होऊन गेली तर अन्वय अजून आला नाही म्हणून तिचा थोडा मूड गेला होता. एक तर तो कधी कधी येत नसे त्यामुळे आपला प्लॅन फसणार तर नाही ना ह्याची भीती तिला वाटतच होती की अन्वय येताना दिसला आणि तिने आपली नजर खाली केली. तशी ती त्याला स्वतःहून रोज " गुड मॉर्निंग " विश करायची पण आज तिने जाणून नजर वर केली नाही आणि अन्वय हसतच केबिनमध्ये गेला. तो केबिनमध्ये गेला आणि तिची बारीक नजर त्याच्यावर खिळली होती. अन्वय केबिनमध्ये गेला आणि त्याने समोर बॅग ठेवली तेव्हाच त्याच्या लक्षात आलं की समोर एक डब्बा ठेवला आहे. त्यांने डब्बा उघडून बघितला तर त्यात गुलाब जाम होते. त्याने डब्बा हातात उचललाच होता की खाली एक चिट्ठी पडलेली दिसली. त्याने हातात घेतलेला डब्बा खाली ठेवला आणि चेअर वर बसून चिट्ठी वाचायला घेतली. त्याने वाचायला सुरुवात केली .
" डिअर अन्वय सर. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि सर्वच बदललं. तुमच्यामुळे नकळत हसायला लागले, तुमच्यामुळे शांत असलेले मी बोलू लागले, तुमच्यामुळे केबिनमधून मुक्त झाले तर तुमच्यामुळेच मी मनानेही मुक्त झाले. इन शॉर्ट माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने मी आता जगायला शिकले. तुम्ही कायम म्हणता ना की तू माझी टॉपरशिप हिरावून घेतलीस तर आज आवडीने सांगेन की जर मला संधी मिळाली तर मीच जगाला ओरडून सांगेन की मी अन्वय सरांसमोर काहीच नाही. ते फक्त अभ्यासाने टॉपर नाहीत तर ते जगण्याने पण टॉपर आहेत. त्यांच्यासारख्या व्यक्ती जर ह्या जगात असतील ना तर अशा हजार स्वरा स्वतःला मनातून मुक्त करून जगू शकतील. सर मला आदर आहे खूप तुमचा. मी गेले काही वर्षे संघर्ष केला पण तुम्ही त्या संघर्षाला जगण्याच रूप दिले. खर तर कशाकशासाठी थॅंक्यु म्हणू माहिती नाही तरीही खूप खूप थॅंक्यु माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला माझ्याशीच ओळख करून देण्यासाठी. आता मीच तुम्हाला वचन देते की माझ्या आयुष्यात कुणी नसलं तरीही मी जीवन जगत राहीन. खर सांगू तुम्हाला काय देऊ सुचत नव्हतं म्हणून स्वतःच्या हाताने बनविलेले गुलाब जाम आणले आहेत. टेस्ट करून माझे आभार स्वीकारा."
अन्वय ती चिट्ठी वाचून क्षणभर हसला. त्याने केबिनमधून बाहेर बघितलं अजून कुणीच आले नव्हते म्हणून तो डब्बा हातात घेत बाहेर निघाला. तो तिच्या जवळ गेला आणि एक गुलाब जाम त्याने समोर केला. तो तिने तोंड उघडण्याची वाट पाहत होता. तिने एकदा त्याच्या नजरेत बघितले. त्याच्या डोळ्यात काहीतरी होत. तिने त्याच्या नजरेत बघितले आणि आपोआप तीच तोंड उघडल्या गेलं. तिला गुलाब जाम भरवताच तो नम्र स्वरात म्हणाला," स्वरा खर सांगू तर मी तुझ्यासाठी काही केलं नाही. माझ्यासाठी केलं. आयुष्यात खूप काही मिळविल पण समाधान कधी मिळालं नाही पण तू जेव्हा पुन्हा नव्याने जगू लागलीस तेव्हा समाधान मिळाल. आज हा गुलाब जाम मी तुला भरवतोय कारण मी सर्वात आनंदी व्यक्ती आहे की मला काही काळाकरिता तुझी साथ लाभली . तुझ्यासारख्या मुलीसोबत मला काही क्षण मिळाले मी ह्याच भाग्य समजतो आणि हा गुलाब जाम कुलकर्णी सरांकडून पण आहे अस समज. त्यांच्याकडून जी चूक झाली त्यासाठी आम्ही सर्व क्षमस्व आहोत स्वरा. आम्हाला सर्वाना माफ कर. प्रयत्न करू की पुन्हा अशा स्वराला आमच्याकडून कुठलाच त्रास होणार नाही. सॉरी आणि थॅंक्यु की आम्हाला तुझी साथ मिळाली."
स्वरा अन्वयला अडवत म्हणाली, " त्याची गरज नाही सर! खर सांगू सर त्यावेळी मला नक्किच त्रास झाला पण जेव्हा आता तुमच्याशी भेटते आहे तेव्हा समजत की सरांनी छान केलं मला बंदिस्त करून. तस नसत झालं तर कदाचित मी तुम्हाला भेटले नसते. मी तर त्यांना थॅंक्यु म्हणणार आहे बंदिस्त करायला. सर म्हणतात ना जो होता है अच्छे के लिये होता है. पटतंय सर आज आणि तुम्ही बरोबर म्हणाला होतात सर मी केलं होतं सुसाईड. आता खरच जाणवायला लागलं की देवाने मला नव्याने जन्म दिला तर काहीतरी खास असणार आहे माझ्या आयुष्यात. मी बघेन सर स्वप्न.खूप बघेन आणि फक्त बघणार नाही तर तुमच्या १ % लोकांप्रमाणे ते पूर्ण करायला मेहनत पण घेईन. खूप खूप थॅंक्यु मला माझ्यासोबत भेट घडवून द्यायला."
तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अन्वय क्षणभर हसत होता. तो डब्बा घेऊन जाणारच की स्वरा उत्तरली, " सर मी ज्यांना आदर्श मानते त्यांना एक गुलाब जाम भरवू शकते का ?"
तो तीच उत्तर ऐकून फक्त हसला आणि स्वरा त्याला गुलाब जाम भरवत म्हणाली," ती मुलगी खूप लकी असेल जिला तुमच्यासाखा लाइफ पार्टनर मिळेल."
अन्वय क्षणभर तिच्याकडे बघतच होता की कुणीतरी ऑफिसमध्ये येताना दिसलं आणि अन्वय सरळ केबिनमध्ये गेला."
अन्वयने केबिनमध्ये जाताच कितीतरी गुलाब जाम एकाच वेळी खाल्ले तर स्वरा त्याला बघून हसतच होती. आज स्वराच्या वागण्यात अधिकार, आनंद सर्व दिसला होता म्हणून अन्वय खूप खुश झाला होता पण एकीकडे तो दुःखी होता की त्याला आता हे ऑफिस सोडून जायचं आहे. आज काहीच वेळ अन्वय, स्वराने कितीतरी वेळा एकमेकांकडे बघितलं होत. त्यांच्या स्वभावात ऑकवर्डनेस नव्हता की स्वराला आज त्याच्या नजरेत काही विचित्र भासत होते. उलट आज स्वरा त्याची ती नजर वाचायला उत्सुक होती. अन्वयने गुलाब जाम तर खाल्ले पण बाकी वेळ त्याच स्वराकडे लक्ष गेलं नाही . त्यानंतर त्याने स्वतःला कामात बिजी करून घेतलं. एवढंच काय तो आज टिफिन खायला केबिनच्या बाहेर सुद्धा पडला नव्हता. तो आपल्या कामात सिरीयस असल्याने तिला त्याबद्दल काही शंका वाटली नव्हती पण अन्वयला आता काहीच दिवसात सर्व सोडून जायचं असल्याने तो आपली सर्व काम पटापट आवरत होता . स्वरा म्हणाली तर होती की तिच्या आयुष्यात कुणी असल्याने नसल्याने फरक पडत नाही पण जेव्हा त्याच्या जाण्याची बातमी तिला अचानक मिळाली असती तेव्हा काय झालं असत? आपला लकी चार्म आपल्याला सोडून जातोय हे ऐकून तिने काय फिल केलं असत? उत्तर सध्या देणे कठीण आहे पण हीच स्वराच्या भाग्याची परीक्षा सुद्धा होती. तीच भाग्य दिला सर्व काही देत की सर्व काही देऊन पुन्हा हिरावून घेत ह्याच उत्तर तिलाही माहिती नव्हत.
तुझे अपना नसिब माना है
तुझेही अपना खुदा माना है
मूरत मे कहा धुंडू तुझे
मैने तो तुझे अकसर अपने दिलं मे पाया है
क्रमशा...