तेरे इस चेहरे को देखकर
वो चेहरा याद आ गया
ख्वाबो मे देखते- देखते
वो चेहरा हकीकत बन गया
दुख कारणाशिवाय येत नाही तर आनंद वाटायला कारण लागत नाही. अगदी छोट्या - छोट्या गोष्टी जगताना सुद्धा आनंद साजरा करता येतो. खर तर हेच गणित आहे जीवनाच. स्वराच्या आयुष्यात चांगली मानस खूप आली पण तिच्या संघर्षासमोर, तिच्या प्रश्नासमोर उत्तर देण्याची कुणाची ऐपत नव्हती की कुणाच वय नव्हतं. साहजिकच जो प्रश्न फक्त स्वरा अनुभवू शकत होती तितक्याच संवेदशील मनाने तिला कुणीच समजू घेऊ शकलं नसत म्हणूनच कदाचित तिच्या आयुष्यात येणाऱ्या लोकांनी तिला फक्त सकारात्मक राहायला सांगितल आणि तिची कायम स्तुती करत राहिले. अन्वय जरी काहीच दिवस तिच्यासोबत होता तरीही त्याला समजलं होत की तिच्या आयुष्यातून दुःख कुणीच नाहीस करू शकत नाही. दुःख तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तेव्हा ते बदलणं कठीण आहे पण ह्यातून जगण्याचा मार्ग एकच आहे तो म्हणजे दृष्टिकोन बदलणे. एक प्रश्न स्वराला काही दिवस आधी पडला होता. अन्वय तू का आला आहेस आयुष्यात? तो कदाचित तीच पूर्ण आयुष्य बदलवायला आला नव्हता पण त्याने तिचा जगण्याप्रति दृष्टिकोन बदलला आणि आता त्याच वस्तू, तीच लोक सारखी असताना स्वरा वेगळ्या पद्धतीने सर्वाना पाहू लागली. आता तिला समजायला लागलं की आपण उगाच लोक काय म्हणतील म्हणून स्वतःला बंदिस्त करून ठेवल होत. लोक चांगलं असतील तरीही बोलतात आणि वाईट असतानाही बोलतात तेव्हा यांच्यानुसार जगण्याचे नियम बनविणे म्हणजे मूर्खपणाच. अन्वयने जेव्हा स्वराला प्रत्यक्षात पाहिलं होतं तेव्हा त्याला तिच्या विद्रुप दिसण्याच काहीच वाटलं नव्हतं त्याच कारण एकच त्याची नजर आणि त्यातून तयार झालेला नजरिया. कदाचित त्याची नजर इतकी साफ होती की त्याला कधी कुठे वाईट दिसलच नाही म्हणून अन्वय त्या सर्वात बेस्ट होता आणि अन्वयने रागावून सांगितलेली गोष्टही स्वराने सहज स्वीकारली.
तेरे तारीफ के मै हजार बहाणे धुंडता हु
और लोग तुझे नीचा दिखाने के
फरक क्या है हम दोनो की सोच मे
मै तुझे हसीन समझता और क्यू वो तुझेबेचारा समझते है?
पुन्हा एक रात्र. अन्वय एकटाच गॅलरीमध्ये उभा होता. पावसाची रिपरिप अजूनही सुरूच होती आणि तो पाण्याच्या थेंबाना हातात वेचत होता. ते थेंब फक्त त्याच्या शरीराला नाही तर मनाला सुखावून जात होते. काय होत त्या क्षणात की अन्वय खुश होता? फक्त२-३ दिवसाचा फरक. अन्वय असाच एका रात्री तिच्या प्रश्नाने हैराण होऊन रडत होता पण त्याच पावसाच्या थेंबानी त्याला वादळातून वाट काढायला शिकवली म्हणून तो आज खूप खुश होता. तो पावसाचे थेंब हातात घेत म्हणाला, " स्वरा आजपर्यंत आयुष्यात खूप काही मिळविल आहे. इतकं की तू विचार करू शकत नाही. तरीही मिळविण्याची भूक कधी गेली नाही. प्रत्येक वेळेला जेव्हा काही मिळवायचो तेव्हा खुश असायचो पण मनाला शांती मिळत नव्हती, समाधान मिळत नव्हत पण आज खूप आनंदाने सांगेन की तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खऱ्या अर्थाने समाधान मिळालं. तुझे ते सुंदर, निरागस हसू मिळालं आता समोर काहिच मिळवायची गरज नाही. तुझा फोटो बघितला ना तेव्हा पहिल्यांदा ते हसू मी बघितलं आणि त्यांनतर ते हसू बघण्याची ओढ काही कमी झाली नाही. स्वरा तुला सांगायचं होत की प्रेम आहे माझ तुझ्यावर पण आता विचार करतोय की नाही नको सांगूंया. कारण आज तू खूप खुश आहेस आणि जर मी उद्या तुला सांगितलं तर तुला वाटेल की मी स्वार्थापोटी सर्व केलं. स्वरा मला तुला मिळविण्यापेक्षा, तुझ्या चेहऱ्यावर हसू कायम बघायला आवडेल आणि ते जर माझ्या सांगण्याने हिरावून जाणार असेल तर नको मला ते सर्व. स्वरा मला आता माहिती आहे की तुला कुणीच हरवू शकणार नाही. मी तुझ्या डोळ्यात पाहिलं ते. तेव्हा आता दुसर काहीच नको. मी फक्त इथे काही दिवस आहे. ह्या काही दिवसात तुझ्या भरपूर आठवणी गोळा करून सोबत न्यायच्या आहेत. आता तेच माझं जीवन. स्वरा मला आठवण करशील ना? "
मेरी होंकर भी मेरी नही
किसने मुझे रोका है
मै केहता था सब कुछ कर लुंगा
पर जीसने रोका वो तो मेरे हाथ की रेखा है
अन्वय क्षणभर स्वतावरच हसला आणि पुन्हा म्हणाला," नको करुस पण हसन सोडू नकोस. मी आता जाईन पण तुला जेव्हाही गरज असेल तेव्हा सांग मी तुझ्या प्रत्येक क्षणाला साथ देईल. मग जग सोबत असो वा नसो. मला फरक पडत नाही. तुला मिळविण्यापेक्षा तुझा मित्र बनून मी कायम तुझ्यासोबत सावलीप्रमाणे राहीन. लव्ह यु स्वरा!! "
अन्वय आज खूप भावुक झाला होता. त्याने तिला जे हवं ते मिळवून दिल होत पण ती त्याचा जीव असूनही त्याने तिला मुक्त सोडलं. खरंच नाती अशीच असतात. नात्याना बांधून ठेवलं तर बहरत नाहीत आणि स्वातंत्र्य दिल तर ते कदाचित आपल्यासोबत नसतील पण खुश असतील हे तो जाणून होता. त्याने खऱ्या अर्थाने त्याग ह्या शब्दाचा अर्थ जाणून घेतला होता. त्याला त्रास होत होता की ती आपली होऊ शकत नाही पण तरीही त्याने तो प्रत्येक त्रास स्वतःपुरता मर्यादित ठेवला होता.
इकडे स्वरा दिवसेंदिवस बहरू लागली होती. स्वराच्या त्या अल्लडपणाने ऑफिसमध्ये बहर आला. घरात असताना देखील ती घरात राहत नव्हती. तिच्या आयुष्यात मागे जो एकटेपणा आला होता तो स्वतःच ती दूर करू लागली होती. आयुष्यात मानस नव्हती पण सोबत आजूबाजूला पूर्ण जग असताना तिला माणसाची कमीही जाणवत नव्हती. बाहेर निघताना कधी कधी लोक तिला दयेने बघायचे तर कधी घाबरून बघायचे पण स्वराला त्यांच्यात कधी वाईट व्यक्ती दिसलाच नाही. ते आपापल्या परीने हवं तसं वागत राहिले तर स्वरा आपल्याप्रमाणे वागत राहिली. अन्वयने सर्वांत सुंदर गोष्ट तिला दिली होती नजरिया. एकीकडे लोक कसे वागतात तिला फरक पडत नव्हता तर दुसरीकडे निसर्ग होता जो तिच्यात कधीच भेदभाव करत नव्हता. स्वराला सध्या तरी जगायला हेच पुरेस होत. स्वराच्या आवाजात आधी कायमच दुःख दिसायच म्हणून ती घरी फार तर कॉल करत नसे पण जेव्हापासून ती आनंदी राहू लागली तेव्हापासून ती रोज घरी कॉल करत होती आणि ऑफिसमधल्या गोष्टी सांगत होती. स्वरा पुन्हा एकदा आपल्या आवाजाप्रमाणे सर्वाना आपलं करत होती आणि अन्वयने विचार केल्याप्रमाणे तो प्रत्येक गोष्ट आपल्या मनात साठवून ठेवत होता. त्याला माहित होतं की आता आपली जायची वेळ झाली आहे.स्वराला हे सर्व माहिती झाल्यावर ती काय विचार करणार होती माहिती नाही पण हे पक्क की तिने त्याला थांबवलं नसत तर ही कहाणी नक्की अपूर्ण राहिली असती. शेवटी भाग्यच ते. कुणाच्या हातात असेल??
तो सोमवारचा दिवस होता. काल रविवारी सुट्टी असल्याने स्वराचा मूड मस्त फ्रेश झाला होता आणि ती पुन्हा एकदा ऑफिसला जायला उत्सुक होती. आज स्टेशनवर येताच माधुरी तिला भेटल्याने तिचा आनंद द्विगुणित झाला होता. त्या बोलतच होत्या की ट्रेन येताना दिसली आणि स्वरा- माधुरी गडबडीत ट्रेनमध्यें चढल्या. स्वरा माधुरीशी बोलत होती तिथपर्यंत ठीक होत पण समोर तिने बघितलं आणि त्याच वेळी ट्रेन सुरू झाली. नकळतपणे तिची कुणावर तरी नजर गेली आणि ट्रेनच्या नकळत झटक्याने ती खाली पडणार होती. ती पडणारच की त्याने तिचा हात पकडून घेतला. ती आनंदी चेहऱ्यांने त्याच्याकडे बघत होती तर तोही तेवढ्याच आनंदाने स्वराकडे बघत होता. त्याने तिचा हात खेचला आणि ती त्याच्या अगदी जवळ जाऊन थांबली. तीच हृदय कितीतरी दिवसांनी पुन्हा एकदा धडधड करू लागल होत. नजरेत लाजेचे भाव होते पण ओठांनी जणू चुप्पी साधली होती तर तोही तिच्याकडे शांतपणे बघत होता. त्याने तिचा हात सोडला आणि ती सरळ उभी राहिली तर तो पुन्हा सरळ उभा झाला. त्याने मोबाइल खिशातून काढला आणि त्याच्यावर बघू लागला तर स्वरा त्याच्याकडे क्षणभर बघतच होती. तो अन्वय होता. तिला क्षणभर विश्वासच बसत नव्हता की तोच समोर आहे. त्याला बघून क्षणभर तिची बत्ती गुल झाली होती म्हणून ती इच्छा असूनही काहीच बोलू शकत नव्हती. तर माधुरीने पहिल्यांदा तिला कुणाकडे तरी अस बघताना पाहिलं होतं. स्वरा त्याच्याकडे बघतच होती की माधुरी हळूच कानात म्हणाली, " कोण आहे ग तो?"
स्वरा शांत स्वरात उत्तरली, " अन्वय सर!! "
अन्वयच नाव ऐकताच माधुरी मोठ्याने ओरडली " अन्वय!" तिच्या आवजामुळे सर्व तिच्याकडे बघू लागले अगदी अन्वयदेखील. स्वराची तर काही क्षण बोबडी वळाली होती आणि माधुरी ऑकवर्ड फिल करत होती. काही क्षण सर्व शांत होत आणि सर्व पुन्हा एकदा आपल्याला कामात व्यस्त झाले तर अन्वय पुढच्या स्टेशनला दुसऱ्या बाजूने जाऊन गार वारा घेऊ लागला. अन्वयच आता दोघींकडे लक्ष नव्हतं आणि स्वराने सुस्कारा सोडला. तेवढ्यात माधुरी पुन्हा स्वराला म्हणाली, " ताई काय म्हणाली होतीस तू?? बरा दिसतो फक्त अन्वय?? ह्याला जर बरा म्हणशील ना तर मी म्हणेन तुझे डोळे खराब झालेत. किती सुंदर दिसतो यार तो! मला तर खूप आवडला. तुला जर आवडत नसेल तर मी चान्स मारून बघू का? किती हँडसम आहे तो!! यार मी तर गेलेच कामातून."
स्वरा हसतच उत्तरली," जा ग बाई मारून बघ पण आधीच सांगतेय आयुष्य बरबाद होईल तुझं कारण सहेबांचा राग काही खर नाही. एकदा रागावले की मग सर्वच गेले कामातून. "
माधुरी हसतच उत्तरली, " आणि दुसरी बाजू म्हणजे बाकी वेळ कसे राहतात?"
आता स्वराच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि ती हळूच स्वरात म्हणाली, " एकदम शांत. त्यांच्या तो स्वभाव अगदी हवाहवासा वाटत जातो. त्यांना कुणी दुःखात असताना हसवन फार छान जमत आणि ते पहिले असे व्यक्ती असतील ज्यांना दुसऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान बघून आनंद होतो. लकी असेल त्यांच्या आयुष्यात येणारी ती मुलगी."
ते सर्व बोलताना आजूबाजूला कोण आहे त्याच भान नव्हतं की स्वतःच्या मनावर ताबा तर माधुरी तीच ते उत्तर ऐकून शांत झाली होती. कितीतरी दिवसाने तिने अन्वयबद्दल इतकं सुंदर वर्णन केल होत आणि माधुरी हसतच म्हणाली, " ती लकी मुलगी तूच असणार तर ?"
स्वरा कायम ह्या प्रश्नावर चिडत असे पण आज ती हसून बोलून गेली, " मधू खर सांगू तर मी डिजर्व नाही करत त्यांना. त्यांना कुणीतरी एखादी सुंदर मुलगी हवी जी त्यांचं आयुष्य आनंदाने भरेल. ती जर त्यांच्या आयुष्यात आली ना तर सर्वात जास्त आनंद मला होईल. त्यानी मला जगायला शिकविल म्हणून नाही तर ते खरच खूप सुंदर व्यक्ती आहेत म्हणून. मी देवाला प्रार्थना करेन की जर माझ्या आयुष्यात त्याने पुढे आनंद लिहिला असेल तर तो त्यांच्या आयुष्यात द्यावा मला फक्त जगण्याच कारण मिळालं तेच खूप आहे. आता मला कसलेच आनंद देवाकडून नकोत. मी शोधेल माझा आनंद. "
स्वरा आज पहिल्यांदा इतकं भावनिक बोलत होती. बोलताना तिची एक नजर त्याच्यावर होती हे माधुरीने हेरल आणि माधुरी खुश झाली. कदाचित तिला स्वराच्या बोलण्यात अस काही सापडलं होत ज्याचा तिला खूप आनंद झाला होता म्हणून माधुरीने पुन्हा तिला काहीच विचारलं नाही. त्या बोलतच होत्या की त्यांना मागून किन्नरचा आवाज आला आणि त्यांनी नजर मागे वळवली. त्यांना दिसलं की तो किन्नर अन्वयला आशीर्वाद देत आहे. अन्वय त्या किन्नरला पहिल्यांदा भेटला होता तरीही त्याच्याशी मस्त गप्पा मारत होता हे स्वरा आणि माधुरी बघत होत्या आणि त्यांचे क्षणभर डोळे पाणावले. त्यांच्यात बऱ्याच वेळ बोलणं झालं आणि तो किन्नरकडे आला. स्वराने त्याचा हात ओढतच स्वतःकडे खेचले आणि हळूच त्याच्या हातात शंभरची नोट ठेवली. तो नाही म्हणतच होता की स्वरा हळूच उत्तरली," कुणासाठी तर आशीर्वाद द्यायचे आहेत म्हणून देतेय. तुमचे आशीर्वाद खाली जात नाहीत सो प्लिज आज नाही म्हणून नका."
तो किन्नर क्षणभर हसत म्हणाला," ताईसाहेब तुम्ही त्यांच्यासाठी जी प्रार्थना करत आहात ती नक्की पूर्ण होईल."
तो किन्नर समोर गेला आणि स्वराच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. किती विचित्र होत ना त्याच्यासाठी ती बेस्ट होती आणि ती त्याला दुसरी मिळावी म्हणून आशीर्वाद मागत होती.
तेरे सजदे मै मांगु लाखो मन्नते
तेरी हर खुशीमेही मेरी हर खुशी बसी है
आज त्या प्रवासात स्वराची क्षणभर नजर अन्वयवरून दुर गेली नव्हती आणि माधुरीच स्टेशन येताच माधुरी उतरली. पुढच्या १० मिनिटात स्वराच स्टेशन आलं आणि स्वरा अन्वयच्या मागे चालू लागली. अन्वय समोर समोर चालत होता तर स्वरा मागे- मागे.
स्टेशन सुटलं आणि ते आता आपल्या ऑफिसच्या मार्गे लागले तेव्हाच स्वरा त्याला जॉईन होत म्हणाली," सर आज तुम्ही ह्या मार्गे?"
अन्वय हसतच उत्तरला, " माझा मित्र विरार ईस्टला राहतो. तो खूप दिवसांपासून मला भेटायला बोलावत होता. काल मी घरी एकटाच होतो म्हटलं त्याच्याकडे जाऊन ह्याव . गेलो तर सही पण त्याने परत येऊ दिलं नाही म्हणून मग आता सकाळी सकाळी निघालो."
अन्वय पुन्हा शांत झाला तर स्वराही आता शांत झाली होती. काही वेळ ते शांततेत रस्ता पार करू लागले तेव्हाच स्वरा पुन्हा उत्तरली, " सर तुम्ही त्या किन्नरसोबत एवढा वेळ काय बोलत होते? "
अन्वयने क्षणभर तिच्या डोळ्यावर नजर टाकली आणि हळूच हसत म्हणाला, " मिस टॉपर आयुष्यात काही सिक्रेट आपले असावे. प्रत्येक गोष्ट सर्वाना सांगायची नसते. कळलं?"
आता स्वराकडे बोलायला काहीच उरल नव्हतं म्हणून ते शांतपणे चालू लागले. काहीच क्षणात ते ऑफिसला पोहोचले. ऑफिसमध्ये दोघे- तिघेच आले होते. अन्वय आपल्या केबिनला जाणारच तेव्हा स्वरा हळुवार आवाजात म्हणाली, " अन्वय सर गुड मॉर्निंग. आज विसरले. तुमच्या गुड मॉर्निंग पासून तर सुरुवात होते ना माझ्या ऑफिसची ."
अन्वय चेहऱ्यावर निरागस भाव आणत म्हणाला, " गुड मॉर्निंग स्वरा."
अन्वय केबिनमध्ये गेला तर स्वराही आपल्या डेस्कवर बसली. स्वराचा आजचा दिवस मस्त निघाला होता. आजचाच काय आता स्वराचा प्रत्येक दिवसच खास होता. स्वरा निवांत कामावर लागली. स्वराला अलीकडे प्रमोशन मिळालं होतं म्हणून कामाचा व्याप वाढला होता. अचानक स्वराच्या आयुष्यात सर्व काही चांगलं घडत होतं आणि ती सुखावून गेली. आता काम करतानाही तिला खूप उत्साह जाणवत होता. कामाच्या मधात कुणीतरी मस्ती करत बसायचे आणि अन्वयही कधी रागवायचा नाही. ह्या काही दिवसात कलीगनाही समजून आलं होतं की आपलं काम जर वेळेत झालं तर अन्वय कधीच रागावत नाही म्हणून तो काहीच दिवसात त्यांचा मित्र झाला. आता प्रत्येक व्यक्ती त्याचा खूप आदर करत होता. त्याच्या टॅलेंटबद्दल कुणाला कधी शंका नव्हती आणि आता त्याच्या स्वभावाचे सर्व फॅन झाले होते. ऑफिसमधल्या मुलींची तर त्याच्यावरून नजर हटत नव्हती. अस हा अन्वय.
दुपारच जेवण झालं होतं. अजूनही लंच ब्रेक पूर्ण व्हायला वेळ होता आणि दीपिका स्वराच्या जवळ येत म्हणाली," स्वरा तू कधी बघितलंस अन्वय सरांकडे?? "
स्वरा हसतच उत्तरली," दीपिका ताई हा काय प्रश्न आहे? रोजच तर बघते त्यांना. "
दीपिका क्षणभर तिच्यावर हसत म्हणाली," तस नाही ग! मला म्हणायचं आहे की त्यांच्याकडे बघ! काय आहेत ना ते. सर्वात सुंदर व्यक्ती. टॅलेंटची काही कमी नाही, सॅलरी मस्त. दिसायला अगदी रुबाबदार पण त्याहीपेक्षा त्याचा नम्र स्वभाव. कुणाला कमी लेखत नाही. तुझ्यासाठी जेव्हापासून त्यांनी स्टॅण्ड घेतला ना तेव्हापासून आदर आणखीच वाढला आहे."
स्वरा हसत उत्तरली, " ताई प्रेमात पडलीस का सरांच्या? "
दीपिका क्षणभर हसत म्हणाली, " कदाचित हो! कोणती मुलगी पडणार नाही? जी पडणार नाही ती खरच मूर्ख असेल. अन्वय सारखा लाइफ पार्टनर शोधून पण मिळणार नाही पण त्याचा काय फायदा?? साहेब आताच असे आहेत तर कॉलेज लाइफ मध्ये कसे असतील ? रांगा लागून असतील त्यांच्या मागे मुलींच्या."
स्वरा क्षणभर हसत उत्तरली," कदाचित ह्याच उत्तर मला माहित आहे. ते एकटेच आहेत. त्यादिवशी आम्ही पुण्याला जात होतो तेव्हा मी त्यांची कविता ऐकली आणि तेव्हा माहिती झालं की त्यांच्या आयुष्यात कुणीच नाही. सो तू प्रयत्न करू शकतेस ?"
दीपिका पुन्हा हसत म्हणाली, " स्वरा स्वप्न भारी आहे पण अपूर्ण आहे. साहेबांचा राग बघितला ना? प्रपोज करायला जाईल आणि माझी जॉब सोडवतील ते. नको बाबा ही रिस्क. त्यापेक्षा त्यांना दुरून बघण्यातच मज्जा आहे."
त्यांच्यात थोडया वेळ बोलणं सुरू होते आणि दीपिकाचे शब्द जादू करून गेले. आज दिवसभर काम करताना स्वराची नजर कितीतरी वेळ त्याच्यावर गेली होती. तो शांतपणे काम करत होता. त्याला कशाचं काहीच पडलं नव्हतं. त्याला बघून आज स्वराच्या चेहऱ्यावर आनंद सामावत नव्हता हे खरं. स्वरा अन्वयच्या प्रेमात पडली होती का? ह्याच उत्तर तिच्याकडेच नव्हतं. कदाचित तिने स्वतःच ह्याबद्दल विचार केला नव्हता.
सायंकाळचे साडे सात वाजले होते. स्वरा वसई स्टेशनला पोहोचली. ती पटापट पावले टाकत घराकडे जाऊ लागली तेव्हाच कुणितरी तिचा हात पकडला आणि ती मागे पलटून पाहू लागली. तिची नजर त्याच्यावर गेली आणि ती क्षणभर हसू लागली. तो किन्नर होता. त्याने तिला थांबवतच म्हटले, " ताईसाहेब चहा घेणार का माझ्यासोबत? ल"
ह्यावेळी स्वराला चहा घ्यायची इच्छा नव्हती म्हणून ती शांत बसली तर तोच म्हणाला, " किन्नर सोबत आवडणार नाही घ्यायला? "
स्वरा त्याचा हात पकडत म्हणाली , " का आवडणार नाही? चला घेऊया."
स्वरा हसत हसत त्याचा हात पकडून समोर घेऊन जाऊ लागली. त्यावेळी सर्व त्यांच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. खर तर दोघेही ह्याच समाजाचा भाग असताना सर्वांनी त्यांच्याकडे त्या नजरेने बघन विचित्र होत पण म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रकृती. त्या दोघांनी इतके अनुभव घेतले की आता त्यांना त्यांचं काही वाटत नाही. स्वराने चहा घेतला आणि बाजूला बसले. स्वरा शांतच होता की किन्नर म्हणाला," कोण होता ग तो डॅशिंग लुकवाला? सकाळी ट्रेनमध्ये होता तो?"
स्वरा हसतच उत्तरली," ते सर आहेत आमचे. अन्वय सर. खूप मस्त व्यक्ती आहेत. तुमच्याशी कितीतरी वेळ बोलत होते ना? ते पटकन मन जिंकतात सर्वांच. तुमचं पण जिंकल ना त्यांनी ?"
किन्नर हसत म्हणाला, " हो जिंकल मन अगदी पहिल्याच भेटीत. पण त्याच्या स्वभावाने नाही आणखीच वेगळ्या गोष्टीने."
स्वरा हसत उत्तरली , " आणखी काय बर जे मला माहिती नाही? "
किन्नर हसत उत्तरला, " मी सकाळी त्याच्याजवळ गेले ना तेव्हा त्याने मला ५०० ची नोट दिली. तसच मी त्याला आशीर्वाद दिला की तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो तर त्याने पुढे काय केलं माहिती आहे? "
स्वरा हसत उत्तरली," काय?"
त्याने पॉकेटमधील सर्व नोटा काढल्या आणि माझ्या हाती देत म्हणाला," जर एका नोटने एवढे आशीर्वाद मिळत असतील तर ह्या पूर्ण घ्या आणि तुमच्या सर्व लोकांना वाटा. पण आशीर्वाद मला नको त्या मुलीला द्या. तिला आयुष्यात कुठलीच कमी पडणार नाही हे आशीर्वाद द्या. "
मी त्यांला नको म्हणत होते पण त्याने माझं ऐकलं नाही. त्याक्षणी मला त्याच्या नजरेत दिसलं ते प्रेम. अस प्रेम जे कुणीच करू शकत नाही ताई. ह्या नजरेने हजारो लोक पाहिले आहेत पण त्याच्या डोळ्यात जे प्रेम दिसलं ते बाकी कुठे दिसलं नाही. तेव्हा मी नक्की म्हणेन की त्याला आयुष्यातुन जाऊ देऊ नकोस. ह्या नोटा किंवा किन्नरचा आशीर्वाद तुझं काहीच बदलनार नाहीत पण तो सोबत असेल ना तर तुझं पूर्ण आयुष्य बदलेल. नक्कीच जाऊ देऊ नको. "
किन्नर बोलून, पैसे पे करून निघून गेला तर स्वरा आताही कप हातात घेऊन तिथेच बसून होती. आजपर्यंत तिला कुणी प्रेमाचं नाव घेतलं तर ती चिडायची पण आज तिच्या चेहऱ्यावर हसू होत. तो किन्नर जात होता आणि स्वरा त्याच्याकडे बघून हसत होती. किन्नरने जाता जाता तिच्याकडे पलटून पाहिले आणि दोघांच्याही चेहऱ्यावर सेम भाव आले. होत ओठांवर निरागस हसू आणि मनात एक वाक्य," त्याला जाऊ देऊ नकोस. हजार आशीर्वाद कामी येणार नाही पण त्याच प्रेम सर्व काही आहे."
कैसा ये ईश्क है
जो दुनिया की नजरो मे है
क्या मुझेभी लत लग पायेगी
तेरे इस जुणून वाले प्यार की??
क्रमशा...