Bhagy Dile tu Mala - 43 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ४3

Featured Books
Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ४3

क्या खुब बतायी तुमने
हकीकत-इस-जमाणे की
लोग छोड जाते रहे तुमको राह मे
तुम हो की हसकर उनकी हर बात भूल गयी

रात्र सरत होती तर अन्वय पावसात भिजत होता. त्याच्या मनात नक्की काय सुरू आहे हे स्वराला माहिती नव्हतं. ती त्याला बघत राहिली. अन्वय सहसा खचून जात नसे पण आज तो तिच्या बोलण्याने इतका खचला होता की क्षणभर त्याच त्यालाच वाईट वाटत होतं. तिने दोन तीन वाक्यात तिच्या सोबत घडलेले क्षण जसेच्या तसे त्याच्यासमोर समोर उभे केले आणि त्या क्षणाला त्याने कस रिऍक्ट करावे त्यालाच कळले नाही. त्याने आपर्यंत तीच दुःख ऐकले होते पण तिच्या शब्दात तो प्रत्यक्ष बघू लागल्याने आज तो स्वतःला सावरू शकला नाही. तिच्या आयुष्यात तिची स्तुती तर दूरच पण तिच्याकडे कुणी प्रेमाने बघितलंही नाही हा विचार करून कदाचित त्याच मन बेचैन झालं होतं. एकीकडे तिचा सुंदर फोटो त्याच्या नजरेसमोर होता जो प्रत्येकाला प्रेमात पाडत होता तर एकीकडे स्वराचे ते वेदनादायक शब्द होते ज्यात तिच्याबद्दल मुलांची मेंटॅलिटी होती. शेवटी हेच खरं की मुलांनाही फक्त सुंदर चेहरे आवडतात. चेहरा सुंदर नसला तर त्या व्यक्तीकडे हजारो गुण असतानाही तिच्याकडे सतत दुर्लक्ष केलं जातं. आज अन्वय स्वतःच पावसात भिजून स्वतःला प्रश्न विचारत होता आणि त्याला समजलं की इथे तिच्यासारख्या लोकांना काहीच स्थान नाही म्हणून कदाचित अशा मुलींच्या मनात पहिला प्रश्न आत्महत्याच असतो.

किस मूह से कहू की
आझाद हो तुम
बेडीया तो खुद हमने
तुम्हारे पैरो मे डाली है


रात्री बऱ्याच वेळ तो पावसात उभा होता आणि नंतर बाहेर मेन गेटच्या बाजूला जाऊन बसला. एवढ्या रात्री त्याला कुणी काही विचारणार नव्हतं. त्यामुळे तो तिथेच बसला. आज स्वराला फेस करणं त्याला शक्य होणार नव्हत. आज तो पहिल्यांदा एवढ्या विचारात हरवला होता. इकडे अन्वय झोपला नव्हता तर तिकडे स्वराही बेडवरच बसून होती. अन्वयच्या मनात नक्की काय सुरू आहे हे ती प्रत्येक वेळा जाणून घेण्याचा प्रयत्न करत असे. तिला तो नक्की कसा आहे कधी कळलंच नाही पण आज त्याच वागणं बघून तिला वेगळीच शंका येऊ लागली होती. तिच्या काही शब्दाने त्याला इतकं बेचैन का करून सोडलं हे तिलाच समजत नव्हतं. तिच्याकडे उत्तर नव्हतं पण तिला माहिती होत की आज अन्वयमध्ये काहीतरी खास आहे. नाही तर सतत हसत राहणारा तो इतका शांत बसेल ह्यावर तिला विश्वास बसता नव्हता. आज ते दोघेही एकमेकांशी न बोलता एकमेकांबद्दल विचार करत होते. विचार करता करताच अन्वय-स्वराची रात्र सरली.

क्यू तुम्हे फिकर है इस पामिर की
क्यू मेरी हर बात दिलं पर लेते हो
जाग जाओ और देख लो एक बार
मैं तेरे काबिल नही जो मेरे खयाल मे तुम रोते हो


अन्वय खाली बसलाच होता की स्वरा खाली मेन गेटवर आली. तिला बघताच त्याने काउंटर वर जाऊन पेमेंट केले आणि दोघेही पुन्हा वसईकडे निघाले. पुण्याला येताना अन्वयने मनोमन भरपूर विचार केले होते. तिच्या मनात नक्की काय सुरू आहे, तिच्या मनाचा अंदाज घेता येईल ह्या दृष्टीने त्याने खूप स्वप्न पाहिले होते पण जाताना तस काहीच नव्हतं. जाताना त्याच्या मनात वेगळेच विचार होते. आज पाऊस देखील पूर्णपणे थांबला होता त्यामुळे अन्वय होईल तेवढ्या लवकर गाडी चालवत होता. येताना त्याच पूर्ण लक्ष तिच्याकडे होत पण जाताना त्याने एकदाही तिच्याकडे वळून बघितलं नाही. स्वराला खर तर आता त्याच्याकडे बघायची इच्छा होत होती पण आज त्याचा शांत स्वभाव तिला नकोसा होऊ लागला होता. त्यामुळे तीही बाहेर बघतच चालली होती. आज ना कारमध्ये गाणे सुरू होते ना दोघांच बोलणं. वातावरण पूर्णता शांत होत आणि केव्हा एकदा वसईला पोहोचतो अस दोघांनाही झालं होतं. सुमारे तीन तास त्यांचा हा अबोला सुरू होता. ते कदाचित एकमेकांशी बोलत नव्हते पण मनातून ते दोघेही स्वतःशीच बोलत होते फक्त कारण ह्यावेळी दोघांचीही एकमेकांशी बोलायची हिम्मत झाली नाही. शेवटी तो शांततेचा प्रवास नाहीसा झाला. अन्वयने तिला जिथून पीक केले होते तिथेच तिला ड्रॉप केले. तिला पीक करताना तो तिच्याकडे क्षणभर बघत होता पण आता सोडून जाताना त्याने तिच्याकडे लक्ष दिले नाही. ती त्याला कितीतरी वेळ तशीच उभी राहून मागून बघत होती पण अन्वयने तिला क्षणभरसुद्धा बघितले नाही. काय सुरू होत अन्वयच्या मनात आणि का तो असा वागत होता?

स्वरा घरी तर पोहोचली होती पण अन्वयचा तो शांत चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नव्हता. स्वराला आपल्या आयुष्यात विचार करण्यापासून फुरसद मिळत नव्हती पण आज का कळेना ती त्याच्या विचारात नकळत हरवत गेली. तिला राहून-राहून एकच प्रश्न सतावत होता की का अन्वय सर इतके शांत झाले होते? मी त्यांना काही बोलले का? तिला फक्त दोन तीन वाक्य आठवत होते पण त्यात त्यांना त्रास होईल अस काही आहे अस तिला वाटत नव्हतं त्यामुळे ती पुन्हा विचारात हरवली होती. आज पूर्ण दिवस स्वराच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न होता आणि त्याच उत्तर तिच्याकडे नव्हतं. सतत दुसर्यांना प्रश्न विचारून हैराण करून सोडणारी स्वरा स्वता शांत होती आणि तेही एका मुलासाठी. का? तो दिवस तिला काही चैन पडलं नाही. ती स्वतातच हरवली होती.

सोचा ना था कभी के खुद सोचने लगुंगी
किसीं और के दर्द को मेहसुस करूंगी
वक्त ने ली फिर कुछ ऐसी करवट के
मैभी अब किसीकी पर्वा करणे लगी


दुसऱ्या दिवशी ती सकाळी सकाळीच ऑफिसला पोहोचली. तिला आज अन्वयला बघायची घाई झाली होती. ती लवकर ऑफिसला पोहोचली आणि कामाला सुरुवात केली. काम करताना सुद्धा आज तीच लक्ष फक्त अन्वयच्या केबिनवर होत पण आज त्याचा काहीच पत्ता नव्हता. सकाळची दुपार झाली आणि दुपारची संध्याकाळ पण अन्वयचा काही पत्ता नव्हता. ती मनातून जरा घाबरली होती म्हणून तिने काकांनादेखील अन्वयबद्दल विचारल पण आज कुणालाच अन्वयबद्दल काहीच माहिती नव्हतं. ती बेचैन झाली होती अन्वयसाठी पण का? ते प्रेम नक्कीच नव्हतं पण हे खरं की तिला त्याची काळजी होती. अन्वय जेव्हा जेव्हा तिच्या सोबत असे तेव्हा ती कायम खुश राहत असे त्यामुळे तिला आता त्याची सवय झाली होती. तिला आता हेही कळत होतं फक्त तीच मन मानायला तयार नव्हत. तिने स्वतःच्या मनावर जे बंदिस्त आवरण घातलं होत ते कदाचित तिला कुठल्याच गोष्टी पलीकडे जाऊ देत नसे. आज सुद्धा विचार करता करताच गेला.

दुसऱ्या दिवशी स्वरा पुन्हा एकदा ऑफिसला पोहोचली. तिला वाटत होतं की आज तरी अन्वय ऑफिसला येईल पण आजही तिची आशा फोलच ठरली. ती त्याची सकाळ पासून वाट पाहत होती पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. बऱ्याच जणांनी त्याला कॉल लावले होते पण त्याने एकाचाही कॉल रिसिव्ह केला नव्हता. अचानक अन्वयला काय झालं स्वराला कळत नव्हतं. तर स्वरा होती की राहून राहून त्याचाच विचार करत होती. तिला जेव्हा कधी एखादी गोष्ट त्रास द्यायची तेव्हा तीच कामात मन लागत नसे पण ह्यावेळी तीच मन अन्वयमुळे लागत नव्हत. अन्वय शांतपणे निघून तर गेला होता पण त्यासोबतच तीच सुख-चैन सुद्धा घेऊन गेला होता.

ती दुपारची वेळी होती. तीच कामात मन लागत नव्हत म्हणून ती सुट्टी मागायला काळे सरांकडे निघालिच होती की अगदीच समोर अन्वय दिसला. त्याला बघताच तिचा चेहरा प्रफुल्लित झाला होता. त्याला पाहताच तिच्या तोंडून"गुड आफ्टरनून" सर निघाल पण अन्वयने साधं तिच्याकडे बघितलं सुद्धा नव्हतं. त्याला बघताच तिने सुट्टीचा प्लॅन कॅन्सल केला आणि डेस्कवर जाऊन बसली. ती त्याला बघून आनंदी तर झाली होती पण तो तिच्याशी अस का वागला म्हणून तिच्या डोक्यात सतत विचार येऊ लागले. तिला त्याला एखादा प्रश्न विचारायचे असे तेव्हा सरळ जाऊन विचारायची. आजही तोच विचार तिच्या मनात आला आणि ती त्याच्याकडे जायला उठू लागली तेवढ्यात काका मोठ्याने म्हणाले, " सरांनी सांगितलं आहे की ज्यांच त्याच्याकडे कुठलंही काम असेल ते उद्या घेऊन या. आज त्यांना कुणीही डिस्टर्ब करू नये."

त्यांचे शब्द ऐकताच स्वरा पुन्हा जाग्यावर बसली. पुन्हा एकदा कशीतरी कामात मन लावू लागली पण तीच मन आज कुठेतरी हरवल होत. वेळ निघत होती पण स्वराच मन काही तीच ऐकेना. तीच मन आज तिच्या कंट्रोलमधून बाहेर गेल होत. पाहता पाहता सायंकाळचे पावणे सहा झाले. सर्व आता घरी जायची तयारी करू लागले. स्वराला तर केव्हा ६ वाजणार आणि घरी जायला मिळेल अस झालं होतं. तिची नजर घड्याळावर गेलीच होती की मोबाइलवर मॅसेज आला. तिने समोर पडलेला मोबाइल हातात घेतला आणि लॉक ओपन करून बघू लागली. त्यावर अन्वयचा मॅसेज होता. अन्वयचा मॅसेज बघून तिचा चेहरा पुन्हा एकदा खुलला आणि ती पटकन त्याचा मॅसेज बघू लागली. समोर स्क्रीनवर मॅसेज होता.

" स्वरा आज माझं तुझ्याकडे काम आहे सो सर्वाना जाऊ दे. तू थोड्या वेळ थाम्ब मग सोबत जाऊ."

स्वराला त्याचा मॅसेज बघताच आनंद झाला होता. तो आता स्वतःहून बोलणार म्हटल्यावर तर तिची बेचैनी क्षणात नाहीशी झाली. तो कामाच जरी बोलला असता तरीही त्याचा तो शांत स्वभाव तिला आता बघावा लागणार नव्हता. जो तिला त्रास देत होता. आता स्वराही केव्हा सर्व घरी जातात त्याची वाट बघत होती. आता एक एक सेकंद स्वराला जास्त वाटत होता. ती घड्याळात बघायची आणि ५ मिनिट बाकी आहेत अस स्वतालाच सांगून पुन्हा गुपचूप बसायची. घड्याळात बघता बघता फायनली ६ वाजले आणि तसाचा स्वराचा चेहरा पुन्हा खुलला. सर्व घरी जाणारच होते की दीपिका स्वराला म्हणाली," स्वरा चल ना जायचं नाही का? किती काम करत बसतेस?"

ती थोडं हसतच उत्तरली," दीपिका ताई सॉरी जरा आजच काम आहे बाकी पूर्ण करूनच निघते. नाही तर उद्या पुन्हा हाती घ्यावं लागतं. तू हो पुढं मी येते."

दीपिकाने तिला कुठलाही प्रश्न विचारला नाही आणि घराकडे निघाली. आता सर्व ऑफिस क्लिअर वाटत होती. तिने लॅपटॉप बंद केला आणि तिची नजर आता केबिनच्या दारावर येऊन थांबली. ती बघतच होती की काकाने समोर दोन कॉफी आणून ठेवल्या आणि काका काहीही न बोलता घराकडे निघाले. स्वरा कॉफीकडे बघतच होती की केबिनच दार उघडण्याचा आवाज आला आणि स्वराच क्षणात तिकडे लक्ष गेलं. ती त्याच्याकडे वेड्यासारखं बघत होती आणि त्याने जवळ येऊन कॉफीचा कप उचलला. त्याने बाजूची खुर्ची स्वराच्या समोर ठेवली आणि तिथेच बसला. स्वरा आताही त्याच्याकडे बघत होती. अन्वयचा चेहरा आता बऱ्यापैकी खुललेला जाणवत होता. नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू पसरल होत. ती त्याला बघत होती आणि तो हसतच उत्तरला," स्वरा बघत काय बसली आहेस? समोर पडलेली कॉफी घे. तुझ्यासाठीच आहे ती!! "

त्याच्या आवाजाने ती आपल्या विचारातून बाहेर आली आणि तिने कॉफीचा कप हातात घेतला. कॉफीचा एक सिप घेताच तिने हळुवार स्वरात विचारले," बोला सर काय काम होत? काही मिटिंग बद्दल बोलायच होत का पुण्याला गेलो त्या? काही चुकलं का माझ सर?"

अन्वय हसतच उत्तरला," गेले दोन दिवस तुझ्या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो. खूप प्रयत्न केले पण तुझे उत्तर काही सापडलं नाही. तुझं उत्तर सोडवन माझ्यासारखा पामराच काम नव्हतं हे मला काहीच क्षणात समजलं. तरीही हार मानेल तो अन्वय कसला! विचार करत होतो आणि सतत तुझे प्रश्न डोळ्यासमोर येत होते. किती आणि काय साठवून ठेवलं आहेस डोळ्यात ते तेव्हा समजलं. तुझ्या डोळ्यात बघितलं आणि मला माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. हळूहळू एक-एक कळी जोडत गेलो आणि तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्या हाती आलं. फायनली मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधल आहे. आता तुला कोणतेच प्रश्न त्रास देणार नाही. "

स्वरा प्रश्नार्थक नजरेने उत्तरली," सर मी कोणते प्रश्न विचारले तुम्हाला? जे विचारले त्याचे उत्तर तुम्ही कायमच दिले. मला आठवत सर्वच. मग आता कोणते प्रश्न बाकी आहेत. मला तर काहिच समजेना."

अन्वय क्षणभर स्वतःवरच हसला आणि उत्तरला," स्वरा तुला आठवतंय आपन मागे कॅफे मध्ये गेलो होतो जेवायला, दीपिकाच्या वाढदिवसाला. तेव्हा तू मला विचारल होतस की सर कोण माझं आयुष्य बदलणार आणि ते काय आयुष्यभर असणार आहेत माझ्या आयुष्यातील बंधन दूर करायला? ते गेल्यावर सुद्धा मला एकटच जगायच आहे मग का त्रास करून घ्यायचा?"

स्वरा हसतच उत्तरली," हो मग बरोबर तर म्हणाले होते कोण असणार आहे माझ आयुष्य बदलायला? कोण किती दिवस राहणार मग कशाला त्रास करून घ्यायचा त्यांच्या बोलण्याचा, वागण्याचा?"

अन्वय क्षणभर हसतच उत्तरला," मीही तेच म्हणतोय स्वरा. मागचे ७ वर्ष तुझ्या आयुष्यात कायमस्वरूपी कोण आलय? जो आला तो कधीतरी परत गेला. कधीतरी तुला हातात खेळवनारे नातेवाईक सोबत नाहीत की शाळेतील मित्र नाहीत, ना कॉलेजमधले सोबतीे. आयुष्यात शाश्वत काहीच नसत स्वरा. दुर्दैवाने एक शाश्वत गोष्ट तुझ्या नशिबी आली. तुझा चेहरा. तुझा चेहरा आता नॉर्मल नाही हे तुझ्या आयुष्याच अंतिम सत्य आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यात तुला कुणिच मुक्त करू शकत नाहीत. ना मी, ना ते लोक ज्यांच्यासोबत तू आज ऑफिसला बसतेस ना तुझे आई बाबा. स्वरा हे प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी साथ सोडणारच फक्त एक व्यक्ती आहे जो कायम तुझ्या सोबत राहील आणि तुला कुठल्याही स्थितीतुन मुक्त करेल."

स्वरा त्याला अडवतच उत्तरली," कोण सर?"

अन्वय पुन्हा हसत उत्तरला," तू.. स्वता स्वरा मोहिते!! तूच आहेस स्वरा जी स्वतःला ह्यातून मुक्त करू शकतेस . एक वेळ अशी येईल की कधी ना कधी सर्वच साथ सोडून जातील पण तू एकमेवच आहेस जी स्वतःची कधीच साथ सोडणार नाहीस. खर सांगू स्वरा तुला कुणिच कैद केले नाही. तुला कैद केलंस तू. तुझ्या विचारातून तुझ्या मनातून. तू स्वतःच्या मनाला सांगून स्वतःच्या मनाची दार बंद केली आहेस. त्या मनाला मुक्त कर. स्वरा बघ तुला इतर कुणाची गरजच पडणार नाही. गेले कित्येक वर्षे स्वरा तुझा संघर्ष सुरू आहे, त्याचा मला अभिमान आहे पण एक गोष्ट वाईट वाटते स्वरा सांगायला की तू ना स्वतःला बिचारी बनवून घेतलं आहेस. तू ना स्वतःला जगावर ओझं समजत आली आहेस. तुला ना सतत कुणीतरी विचारपूस करायला हवी आहे. त्यांचं लक्ष तुझ्याकडे जावं म्हणून तुझा आटापिटा सुरू आहे. का स्वरा हा अट्टहास? जी मुलगी ७ वर्षे सर्व सहन करू शकते ती दुसऱ्याच्या नजरेत स्वतःला का शोधत असते? तिला स्वतःची नजर नाही का? तुला खरच दुसर्यांच्या दयेवर जगायच आहे? तुला त्यांच्या विचाराने इतका का फरक पडतो?"

सतत दुसर्यांना प्रश्न विचारनारी स्वरा आज शांत होती आणि पुन्हा अन्वय म्हणाला," स्वरा तुला एक प्रश्न विचारू? का तुझ्यासाठी चेहरा इतका महत्त्वाचा आहे? जीवणापेक्षा चेहरा इतका महत्त्वाचा असतो का ग?? जेव्हा पाहिलं तेव्हा लोक तुझ्या चेहर्याबद्दल काय विचार करतील हा विचार का करतेस? स्वरा आयुष्यात शाश्वत काहीच नाही. ना मानस ना सुंदरता. विशीतला चेहरा तिसीमध्ये बदलणारच, तिसीमधला चाळीशीमध्ये आणि म्हातारपणीही, ज्या चेहऱ्याचे लोक दिवाने होते त्या चेहऱ्याला म्हातारपणी कुणीच बघणार नाही. तो कदाचित ३० वर्षाने बिघडला असता फक्त तुझ्याबाबतीत आज घडलं एवढाच काय तो फरक. माणूस म्हातार झाल्यावर तो सुंदर नाही म्हणून जगणं सोडून देतो का? तो लोकांमध्ये राहणं सोडून देतो का? उलट तो ते क्षण पण एन्जॉय करत दिवस काढतो. त्यांना माहिती असत आपली कुणी पर्वा करणार नाही तरीही तो जगतो लोकांचा विचार सोडून. का मग स्वरा एका चेहऱ्यांने तुला इतका फरक पडतोय? स्वरा तुझा चेंहरा खराब झालाय जीवन नाही!! मी हे मान्य करतो की ह्या वयात चेहरा महत्त्वाचा आहे पण हेही सत्य आहे की आता सर्व नॉर्मल होऊ शकत नाही. मी हे म्हणणं की तु त्रास करून नको घेऊस अगदीच अर्थहीन आहे पण गेल्या ८ वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या स्वरा फक्त तुला सोडून. तू अजूनही तिथेच आहे. तू जे आहेस ते सत्य स्वीकार आणि सामोरे जा. जीवन जगायच असेल तुला तर लोकांचे विचार सोडावे लागतील. स्वतालाच एक प्रश्न विचार तुला जिवंत रहायच आहे का? आणि जर रहायच असेल तर मग त्यांना इग्नोर कर. हाच तुझ्या मुक्तीचा सर्वात सुंदर मार्ग आहे. स्वरा जीवन खूप सुंदर आहे. जीवनाचे भरपूर रंग आहेत आणि ते बघायला सुंदर चेहरा नाही तर सुंदर नजर लागते. जीवन जगायला चेहरा नाही तर आयुष्यात दिवस असावे लागतात. कधीकधी लोक जगाला तयार असतात पण त्यांना वेळ मिळत नाही. इथे ते दोन्हीही तुझ्याकडे आहेत मग स्वरा तू नक्की गमावल काय आहेस? तूच विचार स्वतःला तू काय गमावल आहेस?? "

त्याला बोलून बोलून ठसका लागला आणि त्याने बाजूला पडलेल्या बॉटलमधील पाणी पिले. आज स्वरा खूप शांत वाटत होती आणि त्याचा प्रत्येक शब्द ऐकत होती तेव्हाच तो म्हणाला," स्वरा तुला आठवत तू म्हणाली होतीस की माझे आयुष्यात काही गोल्स नाहीत, स्वप्न नाहीत पण मी म्हणेन तो व्यक्ती मूर्ख आहे ज्यांना स्वप्न नाहीत, गोल्स नाहीत. मान्य स्वरा तुझे स्वप्न तुटले पण तुटन,जुडन तोच तर आयुष्याचा भाग आहे. एक स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून प्रत्येकच स्वप्न पूर्ण होणार नाहीत हे विचार म्हणजे मूर्खपणा आहे. छोटस बाळ देखील ना चालताना कितीतरी वेळ पडत पण म्हणून ते हार मानत नाही. तू तर संपूर्ण समाजाशी झगडून जगत आहेस मग तुझे स्वप्न किती मोठे असावेत विचार केलास? स्वरा मी पक्क सांगतो की तू ह्या काही वर्षात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असणार पण त्यातून तू वाचलीस आणि आज इथे आहेस म्हणजे नक्कीच देवाने तुझ्यासाठी काहीतरी चांगला विचार केला असणार पण देव सर्व तुला हातात नाही देणार त्यासाठी तुला स्वतःच मेहनत घ्यावी लागेल. तुला स्वता प्रयत्न करावे लागेल. तुझ्या आयुष्यात बरेच चुकीचे लोक आलेत म्हणून तू आयुष्यात लोकांना येउच देणं बंद केलं आहेस म्हणून कदाचित तुझं आयुष्य फक्त आईवडील आहेत पण स्वरा काही लोक चुकीचे होते म्हणून पूर्ण लोक चुकीचे असू शकत नाहीत. तुझ्या आयुष्यातून चांगले लोक सुद्धा गेलेच ना? तशीच वाईटही जातील मग का त्यांचा विचार करून स्वतःच्या मनाला बंदिस्त करून घेतलं आहेस? स्वरा आपल्या आयुष्यात असणारी माणसच आपली खरी संपत्ती आहे आणि आपले लोक नसतील तर कदाचित काहिच नाही. विचार कर माझ्या बोलण्याचा. तुला सतत लोक कसे वागतात हे बघून स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे की स्वता उभं राहून त्या प्रत्येक व्यक्तीला सांगायचं आहे की मला तुमच्या वागण्याचा त्रास होत नाही आणि तुम्ही माझ्या आयुष्यात इतकं महत्त्व द्यायला माझे कोण ? हा एक प्रश्न आणि तुझे सर्व उत्तरे सुटतील बाकी मी आजही तेच म्हणेन की स्वतःला मुक्त कर. तुझी शत्रू स्वरा तूच आहेस बाकी कुणी नाही. तेव्हा ह्या शत्रूला कस हरवायच विचार कर. आजपर्यंत जस तू सर्वाना हरवल तसाच मला विश्वास आहे की तू आताही हरवशील. स्वरा काहीही करू शकते फक्त तिने मनावर घेतले पाहिजे."

तो बोलून थांबला. तिला काय बोलू कळत नव्हतं म्हणून तिने पटकन बॅग घेतली आणि जाऊ लागली. तिने स्कार्फ बांधला आणि बाहेर जाणारच की अन्वय मोठ्याने म्हणाला," स्वरा हा स्कार्फ खऱ्या अर्थाने तुझ्या बंदिस्त असण्याच प्रतीक आहे. तुला मुक्त व्हायचं असेल ना तर आधी ह्याला मुक्त कर. तुला भीती वाटते ना की लोक हा चेहरा बघून नको नको ते बोलतील. पण एक प्रश्न स्वतःलाच विचार की ज्या लोकांनी तुझ्या चांगल्या काळात साथ दिली नाही त्यांचं मत तुला इतकं का महत्त्वाचं ? म्हणून हा स्कार्फ सोड आणि स्वतःला मुक्त कर. होऊ शकत की लोकांना तुझा चेहरा आवडणार नाही पण काही लोक नक्कीच असतील ज्यांना तुझी स्थिती नक्की समजेल. त्या क्षणाची वाट बघ. तुझी सत्य स्थिती जाणूनही तुझ्या आयुष्यात जो व्यक्ती येईल ना त्याला स्वार्थ नको असेल उलट तुला त्याच बहाण्याने काळजी करणारे चांगले लोक मिळतील. स्वरा तुझ्या मनाची बंधने तोडून टाक कारण फक्त तूच स्वतःला मुक्त करू शकतेस. तुझे प्रॉब्लेमही तूच आणि त्यावर समाधानही तूच!! "

अन्वयच बोलणं झालंच होत की स्वराने पहिला प्रश्न केला, " सर मग जर मी स्वतःला मुक्त केलं नाहीये तर मग तुम्ही सर्वाशी भांडून मला मुक्त का केलं?"

अन्वय क्षणभर हसलाच आणि उत्तरला, " स्वरा आपण येतो एकटे आणि जातोही एकटे. मंजिल आपल्याला स्वतालाच पार करायची असते पण चालत असताना काही वाटाडे सोबत येतात. ते आपल्याला मंजिल पर्यंत सोडत नाहीत पण ते सांगतात की ह्या दिशेने जा लवकर पोहोचणार. मीही त्यातलाच एक. मी फक्त तुला इशारा करून रस्ता दाखवला. आता वाट तुला पूर्ण करायची आहे. जेव्हा तू ह्या वाटेच्या शेवटी पोहोचशीलना ना तुला कधीच कुणाला प्रश्न विचारावा लागणार नाही उलट तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू स्वतःच शोधलेल असणार. एवढं सोपं आहे आयुष्य!! तूच त्याला स्वतःच्या विचाराने कठीण बनवू शकतेस तर तूच त्याला सोपं बनवू शकतेस. तू ठरवलस तर अडचणी येतील. तू ठरवलं तर त्या पटकन सोडवल्या जातील. लोकही तुला तोडण्याचा प्रयत्न सतत करतील पण तुझा इरादा असा असावा की लोकांची हिम्मत तुटून जावी आणि तरीही त्रास झाला तर एक गाणं लक्षात ठेव..

कुछ तो लोग कहेंगे
लोगो का काम है केहना
छोडो इन बेकार की बातो को
कही बीत ना जाये रैना
कुछ तो लोग कहेंगे

स्वरा स्वप्न बघून तर बघ, मानस जोडून तर बघ, स्वतःच्या मनाला मुक्त करून तर बघ!! मग स्वतःच्या मनाला विचार जीवन किती सुंदर आहे!! "

अन्वय बोलत होता आणि स्वरा ऑफिसच्या बाहेर पडली. स्वरा चालत चालत समोर गेली आणि तिने मागे वळून बघितलं. अन्वय तिच्याकडे बघून हसत होता. ती काही वेळ त्याच्याकडे तशीच बघत राहिली. काय होत अन्वयकडे माहिती नाही पण स्वराच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे होत. ते तिला समजलं होत म्हणून तीही क्षणभर त्याला बघण्यापासून आवरू शकली नाही. म्हणतात ना सुंदर हसू हाच जीवन जगण्याचा सुंदर मार्ग मग त्याला अपवाद ती कशी? आता बदलणार होत का स्वराच आयुष्य? स्वरा अन्वयच्या बोलण्यावरून स्वतःला बदलवणार होती?

कुछ तो है तेरी बातो मे
युही नही हम तेरी बातो के दिवाने है

क्रमशा....