Bhagy Dile tu Mala - 42 in Marathi Love Stories by Siddharth books and stories PDF | भाग्य दिले तू मला - भाग ४२

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

भाग्य दिले तू मला - भाग ४२

तुझको तुझसे चुरालु
एक येही मेरी आरजू है
कोई बंदिश ना हो मेरे प्यार पे
ये ख्वाहीश कबसे दिलं मे बाकी है

पुन्हा एक प्रश्न आणि स्वरा नकळत शांत झाली होती. तस स्वराच शांत राहणं काही वेगळं नव्हतं पण ह्या शांत राहण्यात काहीतरी वेगळेपण होत. स्वराला प्रेमाचं नाव घेतलं की राग यायचा पण माधुरीने तो प्रश्न करूनही ती रागावली नव्हती उलट शांतपणे पुन्हा एकदा आपल्या विचारात हरवली. तिच्या मनात काय होत हे कुणालाच माहिती नव्हत आणि तशी परिस्थिती आल्यावर ती कशी वागणार ह्याबद्दल अन्वयला अंदाज नव्हता. हळूहळू परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची होऊ लागली होती आता त्यातून तो रस्ता कसा शोधतो ह्यावरच नात्यांच सर्व गणित अवलंबून होत. पुन्हा काही दिवस गेले. स्वरा आधी शांत होती पण आता जास्तच शांत झाली होती. ती अन्वयपासून दूर राहत नव्हती की त्याला टाळत नव्हती पण तिची एक बारीक नजर कायम त्याच्यावर होती. दिवस बदलत होते आणि माधुरीला स्वराची चिंता होऊ लागली. तिला माहिती होत की अन्वयच स्वरावर प्रेम आहे तेव्हा तो तिला मनातलं सांगेल त्यावेळी काय होणार होत ह्या प्रश्नाने तिला हैराण करून सोडलं होत.

बेवक्त की बारिश की तरह
जिंदगी मे आये हो तुम
अब तुम सुकून हो या सैलाब
बारिश की बुंदोसे पूचेंगे हम

तो जुलैचा महिना होता. पावसाची रिपरिप सुरू झाली होती. स्वराला घरून निघताना वाटलं होतं की जास्त पाऊस असणार नाही म्हणून ती छत्री घेऊन आली नव्हती पण स्टेशन पासून तर ऑफिसपर्यंत येईपर्यंतच ती बरीच भिजली. ती ऑफिसला पोहोचली तेव्हा अन्वय केबिनमध्येच बसला होता. ती आली आणि चेहऱ्याला बांधलेला स्कार्फ तिने काढला. हळूच केस मोकळे केले आणि त्यांना कोरड करू लागली. अन्वयच अचानक तिच्याकडे लक्ष गेलं आणि तीच ते रूप बघून अन्वय क्षणभर तिच्यात हरवला. एक तर वरून पडणारा पाऊस त्यात स्वराच हे रूप बघून रोमँटिक वातावरण तयार झालं होतं आणि अन्वयचा चेहरा होता की ब्लश करायच थांबत नव्हता. ती २-३ मिनिटे आपली स्थिती सावरत होती तर अन्वय तिच्यावरून लक्ष बाजूला करू शकत नव्हता. अचानक स्वरा आपल्या डेस्कवर जाऊन बसली आणि त्याचा रोमँटिक मूड क्षणात खराब झाला. त्याच्या मूडचे बारा वाजले होते आणि तो खुर्चीवर जाऊन बसला. त्याला तिला काही क्षण असच बघायच होत पण स्वराने त्याचा पूर्ण प्लॅन खराब केला. स्वराला त्याबद्दल अंदाज नव्हता पण आज स्वराला अशा भिजलेल्या स्थितीत बघायच म्हणून त्याने तिला कॉल करून केबिनमध्ये बोलावून घेतले. तीही आपलं सर्व काम बाजूला ठेवून केबिनला पोहोचली. स्वरा त्याच्यासमोर जाऊन उभी झाली होती तर तो आताही तिच्याकडे वेड्यासारखं बघून हसत होता. स्वरा त्याला आवाज देतेय ह्याच देखील त्याला भान नव्हतं. तो वेड्यासारखं बघतोय म्हणून स्वराच मोठ्याने ओरडत म्हणाली," सर कुठे हरवला आहात? तुम्हाला काही काम नसेल तर मी जाऊ का?"

तिचा मोठा आवाज येताच अन्वयची तंद्री भंग झाली. त्याला जाणवलं की आपली चोरी पकडली गेली म्हणून चेहऱ्यावर अनामिक भाव आणत तो उत्तरला," काम कस नाही उगाच बोलावलं का मी तुम्हाला? मला काय काम नाहीत की काय? तर मला हेच सांगायचं होत की तुम्ही खूप सुंदर दिसत आहात."

ती त्याच्याकडे रागावून बघत होती आणि त्याला जाणवल की आपण नकळत मनातलं बोलून गेलोय. त्याने तिचा चेहरा बघितला त्यावर बराच राग होता म्हणून तोही खडूस होत म्हणाला," काहीही काय! तुम्हाला नाही म्हटलं. ते काल मूवी मध्ये डायलॉग होता तर तो चुकून आला तोंडात. तुम्ही तर कायमच खडूस दिसता तुम्हाला थोडी म्हणेन मी छान दिसत आहात म्हणून. मी तर तुम्हाला हे विचारायला बोलावल आहें की उद्या आपल्याला पुण्याला जायचं आहे तर तयारी झाली ना पूर्ण तुमची. नसेल झाली तर पूर्ण करून घ्या."

स्वरा उदास स्वरात उत्तरली," तयारी झालीय सर पूर्णच."

अन्वय आता हसतच उत्तरला," क्या बात है!! उद्या आपल्याला लवकर निघायचं आहे सो मग एक काम करा आज दुपारी लवकर घरी जा, आराम करा म्हणजे उद्या फ्रेश फ्रेश बाहेर पडता येईल. तुम्ही आता जेवढे काम असतील तेवढे लवकर आवरा आणि दुपारीच निघा घरी. मीही माझे काम आटोपून निघतो. चला ह्या मग."

अन्वयने तिला जायला परवानगी दिली तरीही ती तिथेच उभी होती. अनव्यने तिच्यावर क्षणभर नजर टाकली. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी होत जे त्याला समजत नव्हतं म्हणून हसतच तो उत्तरला," मिस टॉपर पुन्हा प्रश्न आहे का तुमचा?"

स्वरा नम्र स्वरात उत्तरली," नाही सर पण भीती वाटते आहे मला आज खूप. "

अन्वयचा मूड आज छान होता म्हणून तो हसतच उत्तरला, " बापरे!! भीती आणि तुम्हाला? हे काय नवीनच ऐकतोय मी? बर सांगा कसली भीती? कळू तर द्या मिस टॉपरला नक्की कशाची भीती वाटते आहे?"

ती नजर खाली करत उत्तरली," सर उद्या मिटींग आहे ना मग माझा चेहरा..."

अन्वय क्षणभर तिच्याकडे बघत होता . तिची नजर खाली होती आणि तो हसत उत्तरला , " तुमचा चेहरा ना दाखवू की त्यांना आणि कांदे पोह्याचा कार्यक्रम पण ठेवू . दोन्ही काम एकाच वेळी होतील. तुम्हाला तुमचे पती परमेश्वर मिळतील आणि आम्हाला कॉन्ट्रॅक्ट. कंपनीचा फायदाच फायदा. किती सुंदर कल्पना आहे ना? वा! क्या बात है!!! भारी सुचतय मला..! अन्वय तू तर जास्तच हुशार झाला आहेस. किप ईट अप बॉय." तो तिची उडवायला बोलून गेला.

स्वराने आता नजर वर केली. तिच्या नजरेत त्याच्या उत्तराची चीड होती. तिने त्याच्याकडे रागाने बघितले. तिला त्याला खूप काही बोलायचं होत पण आज ती समोर काही बोलली असती तर त्यांचं नात खराब झालं असत म्हणून ती काहीही न बोलता केबिनसोडून जाऊ लागली तेव्हाच अन्वयच्या शब्दाने ती थांबली. तो म्हणाला," मिस टॉपर प्रत्येक गोष्टीत तुमचा चेहराच मधात का येतो बर? तुमच्या टॅलेंटला काही महत्त्व नाहीये का? स्वरा उद्याची मिटींग तुझा चेहरा बघायला नाही तर तुझं काम बघायला आहे. तुझा चेहरा खराब आहे का ह्यावरुन आपल्याला प्रोजेक्ट मिळणार नाही तर तुझं काम कस आहे ह्यावरुन प्रोजेक्ट मिळेल आणि मला तुझ्या कामावर विश्वास आहे मग कसली भीती आणि सॉरी गंमत केली त्याबद्दल पण चेहर्याबद्दल विचार करायच्या ऐवजी कामावर लक्ष दे. उद्या तू सहज जिंकून येशील."

त्याच उत्तर येताच स्वराचा राग क्षणात गायब झाला. ती बोलायची नाही पण तिला त्याच बोलणं फार आवडायचं. तो अस काही बोलत असला की तिला सतत ऐकावस वाटत होतं म्हणूनच जायला निघालेली ती अजूनही तिथेच उभी होती. तिला बघून पुन्हा तो म्हणाला," स्वरा ऑल द बेस्ट मला विश्वास आहे तू स्वतःवर ठेव. हे प्रोजेक्ट आपल्यालाच मिळणार आहे आणि जास्त काम नको करुस लवकर निघ. उद्या मी तुला सकाळी ७ ला वसईला पीक करेन."

अन्वय तिच्याशी बोलून कामात व्यस्त झाला तर स्वरा त्याच्याकडे एक नजर टाकून बाहेर पळाली. अलीकडे तिला प्रेम ह्या विषयावर बोलायला लागलं की भीती वाटायची पण अन्वयचा हा स्वभाव बाहेर आला की मग ती सर्व काही विसरून जायची. तिची इच्छा नसतानाही नकळत तिच्या ओठांवर हसू पसरायच. आजही तसच झालं. ती भीती घेऊन गेली आणि आनंद घेऊन परतली होती. ती डेस्कवर बसली आणि आपल्याच विचारात हरवली. तिच्या चेहऱ्यावर नकळत आनंद पसरला होता. अन्वय तिच्या आयुष्यात का आलाय असा एकदा प्रश्न तिने स्वतःला विचारला होता. शंकेमुळे तिला त्यातलं काही दिसत नव्हतं पण तिच्या ह्या प्रश्नाचं उत्तर तो नकळत रोज देऊन जात होता.

*************

एक सुबहँ तेरे साथ भी
कुछ ऐसी निकल आये
तुम देखती रहो मुझको दिनभर
शायद तूम्हे भी मुझसे प्यार हो जाये

सकाळचे ठीक ७ वाजले होते. पावसाची रिपरिप आजही सुरूच होती. अन्वय, स्वराने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला होता पण ती अजून काही आली नव्हती. तो क्षणभर बाहेरच्या वातरवणात हरवला. आज खूप दिवसाने तो मनसोक्त पावसाला बघत होता शिवाय आजचा पाऊस खूप खास होता. आज त्याच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती त्याच्यासोबत बाहेर येणार होती. त्यामुळे आजचा हा प्रवास काहीतरी खास देऊन जाईल अशी त्याला अपेक्षा होती. आज तो पहिल्यांदा स्वरासोबत बाहेर जाणार आहे हा विचार करून त्याची नीट झोप झाली नव्हती. त्याला अपेक्षा होती की स्वराच्या मनातल्या गोष्टी आज सहज बाहेर येतील आणि तिला आणखी ओळखायची संधी मिळेल. ऑफिसमध्ये शांत शांत असणारी स्वरा बाहेर पक्की बोलणार ह्याची त्याला खात्री होती त्यामुळे तो मनोमन खुश झाला होता. तो विचारच करत होता की खिडकीच्या काचावर टप टप आवाज येऊ लागला. आवाज येताच त्याचे लक्ष पहिल्यांदा तिच्याकडे गेले. ती आज मेहंदी कलरचा सलवार कुर्ता घालून आली होती. गुलाबी कलरची लेडीज घड्याळ तिच्या हातात चमचम करत होती. त्याच लक्ष तिच्याकडे गेलच होत की तिने पुन्हा आवाज केला आणि अन्वयने दार उघडले. ती पटकन आतमध्ये शिरली आणि खांद्याला असलेली बॅग तिने कारच्या मागे टाकली. आपला ड्रेस नीट केला आणि तिने दार ओढले. अन्वयची नजर तर आता तिच्यावरून हटत नव्हती. त्याला तिचा चेहरा पाहण्याचा मोह आज आवरत नव्हता पण तिने स्कार्फ घातला असल्याने त्याला तिचा चेहरा पाहता आला नाही. त्याला वाटलं होतं की ती स्कार्फ काढणार म्हणून तो क्षणभर तिच्याकडे पाहतच होता की स्वरा उत्तरली, " निघुया सर?? "

तिच्या शब्दाने तो भानावर आला आणि तिच्या विचारातून बाहेर येत त्याने गाडी सुरू केली. सकाळची वेळ असल्याने फार काही गर्दी नव्हती. त्यामुळे अन्वय निवांत गाडी चालवत होता तर स्वरा बाहेर पावसात हरवली होती. त्याला वाटलं होतं की ती निदान आज तरी बोलेल पण इथेही तिने शांत राहनच पसंद केलं होत. तरीही काही वेळ त्याने वाट बघायची ठरवली. ते निघून आता बराच वेळ झाला होता . कारमध्ये भयानक शांतता होती. गाडीने ट्रॅफिक क्लिअर केली आणि आता पुणे मुंबई हायवे लागला होता. सुरुवातीला गाडी ट्रॅफिकमधून काढायची आहे म्हणून तो काही बोलला नव्हता पण आता पूर्ण रस्ता क्लिन असल्याने त्याने तिच्याशी बोलायची हिम्मत केली. तिने त्याच्याकडे एकदाही वळून पाहिले नव्हते म्हणून तो हसतच उत्तरला," मिस स्वरा तुम्हाला स्कार्फचा कंटाळा नाही येत का? का सतत घालून बसता? काढून ठेवा हो. कार मध्ये तरी काढून ठेवायला हरकत नाही. "

त्याच्या शब्दाने तीच लक्ष त्याच्याकडे गेलं आणि ती हसतच उत्तरली," सर जशा सर्वांच्या अन्न, वस्त्र, निवारा गरजा आहेत ना तशीच माझी स्कार्फ गरज आहे. ऊन, थंडी काहीही असो मला तो सुरक्षित ठेवतो. मग का त्रास होईल बर मला त्याचा? उलट हाच माझा सोबती आहे? ह्यानेच माझ्यासोबत कितीतरी वर्ष साथ दिली. आता तर मलाच त्याच्याविना करमत नाही."

तीच उत्तर आलं की समजा समोरचा शांत झालाच. आताही काही नवीन नव्हतं. तिच्या उत्तरासमोर नक्की आता काय बोलावं त्याला कळेना. त्याने पुन्हा एकदा तिच्यातून बाहेर येत गाडीवर लक्ष दिले तर स्वराने पुन्हा एकदा आपली नजर बाहेर पावसाकडे वळवली. पुन्हा एकदा एकाकीपणाचा प्रवास सुरु झाला. त्याला वाटलं होतं की आज तरी स्वरा खूप काही बोलेल पण त्याचा हा भ्रम अगदी अर्ध्या वाटेतच दूर झाला. रोज ती थोडं जास्त बोलायची पण आज तिच्या तोंडातून एक शब्द बाहेर फुटत नव्हता. बोलणं तर सोडाच ती अन्वयकडे साधं फिरून बघत नव्हती. काही क्षण गेले. आता अन्वयलाच हा अबोला नकोसा झाला. तीही बोलणार नव्हती म्हणून तो हळूच चिडत म्हणाला," मिस स्वरा तुम्ही तर काही बोलणार नाही मग मी गाणे लावू का? मला ना अस शांत शांत राहायला नाही आवडत. प्लिज लावू का ? "

तिने क्षणभर हसून त्याला आपले उत्तर दिले. ती बोलत नाहीये तर काय झालं आपण गाणे लावून तिचा मूड बनवू ह्या विचाराने त्याने गाणे सुरू केले पण इथेही उलटंच होत. तो तिला एखादं गाणं आवडेल म्हणून सुरू करायचा. दोन मिनिटं सुरू ठेवायचा आणि पुन्हा बदलायचा तर स्वरा अशी होती की तिने आपली नजर फक्त बाहेरच्या वातावरणावर केंद्रित केली. तो कितीतरी वेळ गाणे बदलवत होता पण त्याने तीच लक्ष विचलित झालं नव्हतं उलट ती शांतपणे बाहेरचा निसर्ग बघण्यात व्यस्त होती. त्याचा हा प्लॅनही आता फ्लॉप झाला होता. तिला गाण्यामुळे काहीच फरक पडत नाहीये म्हणून तो थोडा चिडला आणि पुन्हा एक गाणं समोर करू लागला. तेवढ्यात नकळत स्वरा बोलून गेली. सर प्लिज एक गाण रिवर्स जाऊ द्या. तिचे शब्द येताच त्याने एक गाणं रिवर्स केलं आणि कारमध्ये आवाज पसरला" स्वप्न की आभास हा?"

तो आवाज इतका गोड होता की तिला ते एकण्यापासून राहवलं नाही आणि आवाज येताच ती म्हणाली, " हा राहू द्या."

त्याने हातातला रिमोट बाजूला ठेवला आणि तोही ऐकू लागला. ते पहिले वहिले शब्द ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं होत कारण ते गाणं नव्हतं तर ती कविता होती. तिला कविता आवडते हे बघूनच त्याला क्षणभर आनंद मिळाला होता आणि त्याच्या चिडचिडा स्वभाव क्षणात आनंदी झाला. ती कविता ऐकायला आतुर होती तर तो तीच मन जाणून घ्यायला. दोघेही आता ती कविता ऐकण्यात व्यस्त झाले .

स्वप्न की आभास हा ?

अलवार ओठांनी तुझ्या ह्या
प्रेम गीत जेव्हा गायिले
मी झालो तुझाच सखे
डोळ्यात तुझ्या जेव्हा पाहिले

लपून- छपून तुला ते पाहणे
चिंता जगाची त्यात नव्हती
पण पाहताच तुला सखे ग
तुझी प्रतिमा नाहीशी झाली

हसणारे तुझे ओठ ते
नकळत गालावर खळी पाडतात
होताच क्षणभर दर्शन तयाचे
क्षणात हवेत का विरतात ?

पैंजनाचे छनछन आवाज ते
जगाला वेड लावून जाई
मी येताच जवळी तुझ्या
का वाजने त्यांचे बंद होई?

तुझे ते खट्याळ वागणे
जरा मला विचित्रच वाटते
पण ओठांवर हसू बघताच
मन का ते क्षणात विसरते?

हळूहळू उलगडत गेले
रहस्य तुझ्या स्वप्नांचे
तू फसवूनी मला विचारें
काय चुकले माझे सांग ना रे?

तुझे येणेही सवयीचा भाग
जानेही खेळ नियतीचा
उघडताच डोळे क्षणभर माझे
समजते खेळ होता तो माझ्या मनाचा

तरीही वेडा दिवाना तुझा मी
स्वप्न रोज रोज तुझे पाहतो
मनातली धूसर प्रतिमा तुझी
कागदावर नकळत उतरवतो

भास-आभासाचे जग ते
तुझ्या माझ्यात जन्मलेले
कधी तू स्वप्नांत छेडीलेले
कधी मी सत्यात पाहिलेले

तरीही स्वप्नानाही जणू तुझी
सवय झाल्याचे जाणवते
स्वप्न की आभास हा
मन माझे तुला विचारें ?

सुमारे दोन मिनिटे कविता सुरू होती आणि संपताच ती त्याला बघत म्हणाली," सर हा तुमचा आवाज आहे ना? किती गोड आवाज आणि सुंदर कविता आहे. आज खूप दिवसांनी कविता ऐकली . खरच खूप मस्त कविता आहे. खूप दिवसांनी कविता एकताना आज पुन्हा कॉलेजच्या काही गोष्टी ताज्या झाल्या. मी अशीच कविता ऐकायचे. ते ना … "

ती बोलता बोलता थांबली. ती फारच खुश जाणवत होती पण तिने आपले शब्द तिथेच थांबविले आणि हळूच हसत उत्तरली, " सर तुम्ही कविता करता मला माहिती नव्हत? "

तिला आनंदी बघून अन्वयच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू परतल होत आणि तो हसतच म्हणाला," कविता करत नाही तो फक्त एक अपघात होता. नकळत घडलेला सुंदर अपघात."

ती आता त्याच्याकडे वळत हसतच म्हणाली, " इतका सुंदर अपघात ! मग तर तो किस्सा ऐकायलाच हवा. सांगा ना सर. तसे पण तुमच्या आयुष्याचे किस्से भारी असतात. "

अन्वय क्षणभर स्वतःवरच हसला आणि बोलून गेला, " तर ती १४ फेब्रुवारी होती. आमच्या ब्रँचने व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा ठरवला होता पण वेगळ्या पद्धतीने. आता ती पद्धत अशी की आपल्याला हवं ते करायचं नव्हतं तर ज्याला जी चिठ्ठी येईल त्यातलीच गोष्ट त्याला करायची होती. मी ती चिट्ठी उचलली आणि तिथेच हा सुंदर अपघात झाला."

स्वरा हसतच उत्तरली," म्हणजे?"

अन्वय पुन्हा हसत उत्तरला, " म्हणजे त्या चिठ्ठत विषय होता. प्रेम कविता. एक तर माझा प्रेमाशी दूर दूर संबंध नव्हता त्यात हा विषय आल्याने मी जरा घाबरलोच. आपल्या आयुष्यात एखादा पार्टनर असला ना तर कविता येत नसतानाही ती आपण करू शकतो पण पार्टनर नसेल तर मग कविता लिहायला खूप प्रॉब्लेम्स होतात. मीही भरपूर विचार केला तेव्हा जाणवलं की आपल्याला कुणी खास आहे नाही पण ती कधीतरी येईलच तेव्हा ती समोर आहे अस अनुभवून कविता लिहायची. त्या रात्री मी मस्त घट्ट डोळे मिटले आणि ती अचानक समोर येऊन राहिली. तिचा चेहरा कसा आहे आठवत नाही पण होती ती खूप सुंदर. तीच रूप मला स्वप्नांतच वेड लावून गेलं. ते सर्व किती वेळ चाललं माहिती नाही पण डोळे उघडले तेव्हा क्षणात सर्व गायब झाल. ते सर्व बघून मी माझ्याच कपाळावर हात मारला पण हे खरं की त्या एका स्वप्नांने मला विषय दिला 'स्वप्न की आभास हा ' मी ही कविता सादर केली तेव्हा खूप स्तुती मिळाली आणि ती आयुष्यात नसतानाही कवितेतून ती माझी झाली. "

स्वरा त्याच बोलणं ऐकून क्षणभर शांतच होती आणि नकळत विचारून गेली," मग मिळाली का ती कवितेतली?"

अन्वय क्षणभर स्वतःवरच हसला आणि गाडी चालवण्यावर त्याने लक्ष दिले तर स्वरा पुन्हा उत्तरली," सांगा ना?"

अन्वय क्षणभर स्वतःवरच हसत उतरला, " मिस स्वरा ही गोष्ट माझ्यावर उधार राहिली."

त्याच बोलणं पूर्ण होताच ती रागावत म्हणाली," हे काय उत्तर झालं? तुम्हाला काहीही विचारलं की असच म्हणता. "

अन्वय पुन्हा हसत म्हणाला, " मिस स्वरा प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. ती वेळ येईल तेव्हा सर्वात आधी तुम्हालाच सांगेल. वाट बघा त्याची."

त्याने बोलून क्षणभर तिच्याकडे नजर टाकली. तिने त्याच उत्तर फक्त ऐकलं होतं. तो आपल्या मनातील तिच्याबद्दलच्या भावना अप्रत्यक्षपणे बोलून गेला हे तिलाही कळलं नाही."

ती पुन्हा एकदा शांत झाली आणि अन्वय हसत हसत गाडी चालवू लागला. आता त्याला जाणवलं की ती दाखवत नसली तर मन लावून सर्व एकते आहे म्हणून त्याने गाणे तसेच सुरू ठेवून गाडीवर लक्ष घातले.

किसका है ये तुमको इंतज़ार मैं हूँ ना
देख लो इधर तो एक बार मैं हूँ ना
ख़ामोश क्यों हो जो भी कहना है कहो
दिल चाहे जितना प्यार उतना माँग लो
हो, तुमको मिलेगा उतना प्यार मैं हूँ ना

किसका है ये तुमको इंतज़ार मैं हूँ ना
देख लो इधर तो एक बार मैं हूँ ना..

कभी जो तुम सोचो, कि तुम ये देखो
अरे कितना मुझको तुमसे प्यार है
तो चुप मत रहना, ये मुझसे कहना
अरे कोई क्या ऐसा भी यार है
दिल ही नहीं दे, जान भी दे जो तुम्हें
दिल ही नहीं दे, जान भी दे जो तुम्हें
हो, तो मैं कहूँगा सरकार मैं हूँ ना

किसका है ये तुमको इंतज़ार मैं हूँ ना
देख लो इधर तो एक बार मैं हूँ ना..

त्यांने नजर हटवली आणि त्याच्याच मनातले शब्द जणू गाण्याच्या रुपात बाहेर आले. अन्वयने त्याच वेळी तिच्याकडे बघितले आणि स्वराचीही नजर गेली. अन्वय तिला बघून क्षणभर हसला होता तर तिने जाणून मान बाजूला केली. आज पूर्ण प्रवासात सर्व असच सुरू होत. ती त्याच्यापासून नजर चोरत होती तर तो तिच्याकडे बघून खुश होता.

एक सफर ऐसा हो की हमसफर मिल जाये
बिना कुछ कहे वो दिलं का हाल जान जाये
आसान नही है उसको अपणा बनाना
पर वो ख्वाब ही क्या जो पुरा ना हो पाये


फायनली ते १२ च्या आसपास पुण्याला पोहोचले . तसा फार वेळ लागायला नको होता पण पावसामुळे त्याने गाडी जोराने चालवली नव्हती. मिटिंग १ वाजताची होती म्हणून त्यांनी आधी थोडं फार खाऊन घेतलं. मिटिंग रॅडीसन ब्लू हॉटेलमध्ये होती त्यामुळे ते वेळेच्या १५ मिनिट आधीच तिथेच पोहोचले. त्यांनी आपल्या बुकिंगची चौकशी केली आणि तिथे जाऊन बसले. १ वाजून गेला होता तरीही ते आले नाही म्हणून ते दोघे तिथेच शांत बसले होते. अन्वयने त्यांना कॉल केला तेव्हा समोरून उत्तर आलं की पावसामुळे त्यांना एखादा तास उशीर होईल. अन्वयने त्याही वेळेचा फायदा घेतला आणि स्वराची कामात मदत करू लागला. तिने त्याला पूर्ण प्रेझेन्टेशन ऐकवलं होत. त्यात तिच्या एक दोन जागी चुका झाल्या होत्या त्या त्याने सुधरवल्या आणि त्यांची वाट पाहू लागले. स्वरा आधी आली तेव्हा घाबरली होती पण आता अन्वयशी बोलून ती कॉन्फिडन्ट फिल करू लागली होती.

जवळपास दुपारचे दोन वाजले होते. जेव्हा ते आले. त्यात दोन मेल तर एक फिमेल होत्या. त्यांच्या टेबलवर कॉफी आल्या आणि सर्व विराजमान झाले. स्वरानेही आप स्कार्फ घाबरतच काढला आणि त्यांच्याकडे नजर वळवली. तिने नजर वळवलीच होती की एकाने विचारले, " व्हॉट हॅपन टू हर फेस?"

ती काही बोलणार त्याआधीच अन्वय उत्तरला, " सर शी इज द ब्रेव्ह गर्ल!! कुणाला तरी तिचा नकार आवडला नाही आणि म्हणून त्याने बदल्या स्वरूप तिचा चेहरा खराब केला. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती!"

तेवढ्यात तिथे बसलेल्या फिमेल म्हणाल्या, " ऐकून छान वाटलं. ऑल द बेस्ट डिअर."

तेवढ्यात आधीचा प्रश्न विचारणारा म्हणाला, " तर मग सुरुवात करूया मिस प्रेझेन्टेशन साठी. तुमचा चेहरा सांगतोय की तुम्ही उत्सुक आहात सादर करायला आणि आम्हीही उत्सुक आहोत तुमचं बोलणं ऐकायला."

त्यांचं उत्तर ऐकून तिची भीती क्षणात नाहीशी झाली. त्यांना आपल्या चेहर्याने काही फरक पडत नाही हे विचार करून तीच मन विश्वासाने भरलं. तिने प्रेझेन्टेशन द्यायला सुरुवात केली आणि सर्व शांतपणे ऐकू लागले. तिने एकदा सुरुवात केली आणि ती क्षणभर सुद्धा थांबली नव्हती. सुमारे एक तास ती प्रेझेन्टेशन देत राहिली. तीच प्रेझेन्टेशन बहुतेक सर्वाना आवडलं होत पण ते तिला पुन्हा प्रश्न विचारत राहिले. स्वरा एक एक प्रश्नाचं उत्तर इतक्या विश्वासाने देत होती की त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होत. मिटींग संपली तेव्हा ४ वाजले होते. ते एकमेकांशी हात मिळवून जाणारच होते की त्यांनी समोरून विचारलं," अन्वय आज घाईत जेवण करायला जमलं नाही. तुम्ही आम्हाला जॉईन होणार का? तेवढीच चर्चा करता येईल पुन्हा."

अन्वयची खर तर काहीच खायची इच्छा नव्हती पण त्यांना नकार देन योग्य नव्हतं त्यामुळे दोघेही त्यांना जॉईन झाले. इकडे पावसाचा वेग वाढत होता तर त्यांच्या गप्पा रंगात आल्या. स्वरा सतत आज घड्याळाकडे बघत होती. अन्वयला तिची अवस्था समजत होती पण त्यांच्या समोर तो काहीच बोलू शकत नव्हता त्यामुळे तोही त्यांच्या मनाप्रमाणे वागत राहिला. आता सायंकाळचे ६ वाजले होते जेव्हा त्यांचं जेवण आटोपलं. स्वरा अन्वय बाहेर आले. बाहेर अंधार पडला होता. पावसाने अधिकच गती पकडली होती. स्वराला उशीर होत असल्याचं त्याला जाणवलं आणि मनात इच्छा नसतानाही त्याने गाडी सुरू केली. हळूहळू शहरातून तो गाडी काढू लागला. पावसामुळे बहुतेक जागी ट्रॅफिक जाम झाली होती तिथून बाहेर निघताना एका तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. इकडे उशीर झाल्यामुळे स्वराचा चेहरा पडला होता. त्याला ते जाणवत म्हणून तो लवकरात लवकर गाडी काढण्याचा प्रयत्न करत होता. फायनली हळूहळू का होईना त्याने गाडी शहराच्या बाहेर काढली. शहरात होते तोपर्यंत त्याला पावसाचा अंदाज येत नव्हता पण आता रस्ता मोकळा झाला आणि त्याला जाणवू लागल की गाडी चालवन अगदीच कठीण होऊ लागलं तरीही तो गाडी चालवत राहिला. आता पावसाचा जोर खूपच वाढला होता. बाहेर खूप जास्त अंधार पडला होता. त्याला समोरच काही दिसत नव्हतं म्हणून नाईलाजाने तो स्वरा म्हणाला, " सॉरी स्वरा तुला उशीर झालाय कळत आहे मला पण आता आपण समोर जाऊ शकत नाही. पावसाचा जोर खूप वाढलाय. मला समोरच काहीच दिसत नाहीये. असाच गाडी चालवत राहिलो तर पक्का अपघात होईल. "

स्वराने त्याच्याकडे क्षणभर बघितले आणि उदास स्वरात उत्तरली," मग आता?"

अन्वयही हळुवार स्वरात उत्तरला," आता एकच उपाय आहे. समोर २ किमी वर लोणावळा आहे. तिथे हॉटेल मिळेल. एक रात्र आपल्याला काढावी लागेल. सॉरी पण पर्याय नाहीये. तुला चालेल ना?"

स्वरा काही वेळ शांत होती आणि उदास स्वरात उत्तरली, " मला माझ्या जीवाची चिंता नाही पण तुम्हाला काही झालेले मला आवडणार नाही सो चला काहीही प्रॉब्लेम नाही. मॅनेज करू एक दिवस."

तिने नाराजीने ते म्हटले होते पण अन्वयकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे हळूहळू हळूहळू त्याने गाडी समोर चालवली. काहीच वेळात ते लोणावळा पोहोचले. त्यांना समोरच ऑर्किड नावाचा मोठ्या हॉटेलचा बोर्ड दिसत होता त्यामुळे त्याने गाडी तिकडे घेतली. काहीच क्षणात गाडी हॉटेलच्या समोर उभी राहिली आणि स्वरा अन्वय धावतच हॉटेलमध्ये शिरले. स्वराला त्याने बाजूला उभे ठेवले आणि तो समोर रिसेप्शनमध्ये जात म्हणाला, " मॅडम प्लिज दोन रूम्स मिळतील का?"

रिसेप्शनिस्ट हळुवार आवाजात उत्तरली, " सॉरी सर अलीकडे पर्यटक खूप आले आहेत म्हणून रूम बुक आहेत. दोन नाही पण एक रूम मी अरेंज करून देऊ शकते."

तो क्षणभर विचार करत म्हणाला, " ठीक आहे. प्लिज कीज द्या आणि कुणाला तरी पाठवून माझ्या रूममध्ये एक गादी टाकायला सांगा."

रिसेप्शनिस्टने त्याच्या हातात चावी दिल्या आणि तो चावी घेत स्वराकडे पोहोचला. स्वरा त्याची वाट बघतच होती की तो हळूच म्हणाला, " बॅड लक स्वरा!! रूम एकच आहे सो शेअर करावी लागेल. तशी पण आजची रात्रच आहे. मॅनेज करावं लागेल. मी गादी सांगितली आहे रूममध्ये टाकायला. कुणीतरी येईल आणि टाकून देईल. होप तुला काही प्रॉब्लेम होणार नाही माझ्यासोबत रूम शेअर करायला.??"

तिचं उत्तर काय असेल म्हणून काही क्षण तो तिच्याकडे बघत होता पण ती काहीच म्हणाली नाही उलट समोर चालू लागली. अन्वयही आता तिच्या मागे मागे चालू लागला. काही क्षणातच ते रूम नंबर २०४ मध्ये पोहोचले. रूम तशी सुसज्ज होती त्यामुळे पाहताच त्यांना समाधान मिळालं. अन्वयने रूममध्यें पोहोचताच टॉवेलने केस पुसून घेतले आणि तिला टॉवेल दिला. तिनेही आता चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला आणि आपले केस पुसू लागली तेवढ्यात रूम क्लिनर गादि घेऊन आला आणि तो गादी खाली टाकून पुन्हा बाहेर पळाला. तो गेला आणि अन्वयने दार लावून घेतले. शु बाजूला काढले आणि सोफ्यावर निवांत पडला. स्वरानेही आपले केस पुसले आणि बेडवर बसली. अन्वय आता थोडा रिलॅक्स वाटत होता म्हणून तो मोबाइल काढून त्यात काहीतरी बघत बसला. स्वराही मोबाइलमध्ये बघत होती. दोघेही आज एकमेकांसमोर होते पण कुणीच कुणाशी बोलत नव्हते. अन्वय अधून मधून तिच्याकडे बघत होता पण तिने एकदाही आपली मान वर केली नव्हती. कदाचित स्थितीच अशी ऑकवर्ड होती की अन्वय इच्छा असूनही काहीच बोलू शकत नव्हता.

आता जवळपास १० वाजले होते. गाडी चालवून चालवून अन्वयची कंबर लागली होती म्हणून तो खाली गादीवर पडला. खर तर त्याला लाईटमध्ये झोप लागायची नाही पण तो स्वराला काही म्हणू शकला नाही. तो गादीवर पडला तर सही पण त्याला लाइटमुळे झोप लागत नव्हती. तो कितीतरी वेळ कुस बदलत होता पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. तो आता अचानक उठला आणि त्याच बेडवर लक्ष गेलं. स्वराने मोबाइल खाली ठेवला होता पण अजूनही ती तशीच बसून होती. अन्वय तिला क्षणभर बघत होता आणि हसतच उत्तरला," मिस स्वरा काळजी करू नका इथे आपण दोघेच आहो म्हणून मी तुमच्यासोबत काहीच चुकीच करणार नाहीये. मी त्यातला नाही हा? मी जेंटलमन आहे सो तुम्ही बिनधास्त झोपू शकता. नाही तर मी काही करेल म्हणून रात्रभर झोपणार नाहीत." तो तिला हसवायला बोलून गेला.

अन्वयने तिच्या चेहऱ्यावर हसू आणायला गंमत केली होती. तिच्या चेहऱ्यावर हसू तर आलं पण ती चेहऱ्यावर मिश्किल भाव आणत म्हणाली," सर मला त्याची चिंता नाही. माझ्या चेहऱ्याकडे एखादा पुरुष बघायची हिम्मत करू शकत नाही तर माझ्यासोबत काही करायची गोष्टच वेगळी. कुणात इतकी हिंमत आहे का ह्या भुतासोबत काही वाईट करेल? आहे का कुणात हिम्मत? तुम्ही पण ना कधी कधी पांचट जोक मारता. जिला कुणी मुलगीच समजलं नाही तिच्यासोबत काही करायची हिम्मत कुणात असेल अस मला वाटत नाही. कधी ऐकलं आहे का भुतासोबत काही करताना?"

तीच उत्तर ऐकून अन्वयच्या ओठांवरच हसू क्षणात गायब झाल. तो काहीही न बोलता पुन्हा एकदा गादीवर पडला . ह्यावेळी स्वरा लाईट बंद करून स्वता झोपली होती. अन्वयला आतापर्यंत झोप येत होती पण तिच्या उत्तराने त्याची झोप उडवली. ती हसत हसत सर्व बोलून गेली होती पण त्या उत्तरामागे किती त्रास होता हे त्याला जाणवलं होत. आज त्याला स्वतःच्याच माणूस म्हणून जगण्याची लाज वाटू लागली. ती लाईट बंद करून बेडवर पडली होती. तर रूममधल्या शांततेने त्याच श्वास घेन मुश्किल केलं होतं. स्वराचा एक प्रश्न आला होता आणि रूम मध्ये सन्नाटा पसरला होता. काही वेळ तो गादीवर विचार करत पडून होता. झोप येण्याची काही चिन्हे दिसेना. तिला फेस करणेही त्याला आता अवघड जाऊ लागले आणि तो उठून बाहेर गेला. ज्या पावसापासून तो बचाव करायला तो हॉटेल मध्ये आला होता आता त्याच पावसात तो मनमोकळं भिजत होता. आज त्या पावसाची टपोर थेंबेही त्याला कोमल भासत होती आणि नकळत त्या पावसाच्या थेंबात त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू तीच उत्तर ऐकून आले नव्हते तर अन्वयची हतबलता बघून आले होते. तो जिच्यावर प्रेम करत होता, तिच्या आयुष्यात तो सर्व काही ठीक कराव म्हणून स्वप्न बघत होता तीच म्हणत होती की तिला मुलगीच समजल्या जात नाही. एक वेळ तिच्या सौंदर्यावर मरणारे आज तिला बघत सुद्धा नाहीत हा विचार त्याला मनातून तोडून गेला होता. तो आपल्याच अश्रूंच्या पावसात रात्रभर भिजत राहिला तर स्वरा त्याला वर खिडकीतून बघत राहिली. अन्वय अश्रू गाळत होता ह्याचा अर्थ नक्की काय होता? अन्वय जो तिला ह्या बंधनातून मुक्त करायला आला होता आता तोच तर हरला नव्हता ना? आणि जर तोच हरला असेल तर स्वराच काय? स्वराच भाग्य पुन्हा तिला त्याच वळणावर आणून तर सोडणार नव्हतं ना? जिथे फक्त त्रास आणि त्रास होता. तिच्या आयुष्यात आनंद लिहिला नव्हता का? स्वराची कथा नक्की काय रंग घेऊन येणार होती.

कोई नही जो मुझको मुझसे मिला सके
यहा तो मेरा खुदाही मुझसे रुठा है

क्रमशा..